श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
षष्ठोऽध्यायः


च्यवनेश्विनोः कृते सोमपानाधिकारत्वचेष्टावर्णनम्

जनमेजय उवाच -
च्यवनेन कथं वैद्यौ तौ कृतौ सोमपायिनौ ।
वचनं च कथं सत्यं जातं तस्य महात्मनः ॥ १ ॥
मानुषस्य बलं कीदृग्देवराजबलं प्रति ।
निषिद्धौ भिषजौ तेन कृतौ तौ सोमपायिनौ ॥ २ ॥
धर्मनिष्ठ तदाश्चर्यं विस्तरेण वद प्रभो ।
चरितं च्यवनस्याद्य श्रोतुकामोऽस्मि सर्वथा ॥ ३ ॥
व्यास उवाच -
निशामय महाराज चरितं परमाद्‌भुतम् ।
च्यवनस्य मखे तस्मिञ्छर्यातेर्भुवि भारत ॥ ४ ॥
सुकन्यां सुन्दरीं प्राप्य च्यवनः सुरसन्निभः ।
विजहार प्रसन्नात्मा देवकन्यामिवापरः ॥ ५ ॥
कदाचिदथ शर्यातिभार्या चिन्तातुरा भृशम् ।
पतिं प्राह वेपमाना वचनं रुदती प्रिया ॥ ६ ॥
राजन् पुत्री त्वया दत्ता मुनयेऽन्धाय कानने ।
मृता जीवति वा सा तु द्रष्टव्या सर्वथा त्वया ॥ ७ ॥
गच्छ नाथ मुनेस्तावदाश्रमं द्रष्टुमादरात् ।
किं करोति सुकन्या सा प्राप्य नाथं तथाविधम् ॥ ८ ॥
पुत्रीदुःखेन राजर्षे दग्धास्मि सर्वथा हृदि ।
तामानय विशालाक्षीं तपःक्षामां मदन्तिके ॥ ९ ॥
पश्यामि सर्वथा पुत्रीं कृशाङ्‍गीं वल्कलावृताम् ।
अन्धं पतिं समासाद्य दुःखभाजं कृशोदरीम् ॥ १० ॥
शर्यातिरुवाच -
गच्छामोऽद्य विशालाक्षि सुकन्यां द्रष्टुमादरात् ।
प्रियपुत्रीं वरारोहे मुनिं तं संशितव्रतम् ॥ ११ ॥
व्यास उवाच -
एवमुक्त्व तु शर्यातिः कामिनीं शोकसंकुलाम् ।
जगाम रथमारुह्य त्वरितश्चाश्रमं मुनेः ॥ १२ ॥
गत्वाऽऽश्रमसमीपे तु तमपश्यन्महीपतिः ।
नवयौवनसम्पन्नं देवपुत्रोपमं मुनिम् ॥ १३ ॥
तं विलोक्यामराकारं विस्मयं नृपतिर्गतः ।
किं कृतं कुत्सितं कर्म पुत्र्या लोकविगर्हितम् ॥ १४ ॥
निहतोऽसौ मुनिर्वृद्धस्त्वनयान्यः पतिः कृतः ।
कामपीडितया कामं प्रशान्तोऽप्यतिनिर्धनः ॥ १५ ॥
दुःसहयोऽयं पुष्पधन्वा विशेषेण च यौवने ।
कुले कलङ्कः सुमहाननया मानवे कृतः ॥ १६ ॥
धिक्तस्य जीवितं लोके यस्य पुत्री हि कुत्सिता ।
सर्वपापैस्तु दुःखाय पुत्री भवति देहिनाम् ॥ १७ ॥
मया त्वनुचितं कर्म कृतं स्वार्थस्य सिद्धये ।
वृद्धायान्धाय या दत्ता पुत्री सर्वात्मना किल ॥ १८ ॥
कन्या योग्याय दातव्या पित्रा सर्वात्मना किल ।
तादृशं हि फलं प्राप्तं यादृशं वै कृतं मया ॥ १९ ॥
हन्मि चेदद्य तनयां दुःशीलां पापकारिणीम् ।
स्त्रीहत्या दुस्तरा स्यान्मे तथा पुत्र्या विशेषतः ॥ २० ॥
मनुवंशस्तु विख्यातः सकलङ्कः कृतो मया ।
लोकापवादो बलवान्दुस्त्याज्या स्नेहशृङ्खला ॥ २१ ॥
किं करोमीति चिन्ताब्धौ यदा मग्नः स पार्थिवः ।
सुकन्यया तदा दैवाद्‌दृष्टश्चिन्ताकुलः पिता ॥ २२ ॥
सा दृष्ट्वा तं जगामाशु सुकन्या पितुरन्तिके ।
गत्वा पप्रच्छ भूपालं प्रेमपूरितमानसा ॥ २३ ॥
किं विचारयसे राजंश्चिन्ताव्याकुलिताननः ।
उपविष्टं मुनिं वीक्ष्य युवानमम्बुजेक्षणम् ॥ २४ ॥
एह्येहि पुरुषव्याघ्र प्रणमस्व पतिं मम ।
मा विषादं नृपश्रेष्ठ साम्प्रतं कुरु मानव ॥ २५ ॥
व्यास उवाच -
इति पुत्र्या वचं श्रुत्वा शर्यातिः क्रोधपीडितः ।
प्रोवाच वचनं राजा पुरःस्थां तनयां ततः ॥ २६ ॥
राजोवाच -
क्व मुनिश्च्यवनः पुत्रि वृद्धोऽन्धस्तापसोत्तमः ।
कोऽयं युवा मदोन्मत्तः सन्देहोऽत्र महान्मम ॥ २७ ॥
मुनिः किं निहतः पापे त्वया दुष्कृतकारिणि ।
नूतनोऽसौ पतिः कामात्कृतः कुलविनाशिनि ॥ २८ ॥
सोऽहं चिन्तातुरस्तं न पश्याम्याश्रमसंस्थितम् ।
किं कृतं दुष्कृतं कर्म कुलटाचरितं किल ॥ २९ ॥
निमग्नोऽहं दुराचारे शोकाब्धौ त्वत्कृतेऽधुना ।
दृष्ट्वैनं पुरुषं दिव्यमदृष्ट्वा च्यवनं मुनिम् ॥ ३० ॥
विहस्य तमुवाचाशु सा श्रुत्वा वचनं पितुः ।
गृहीत्वाऽऽनीय पितरं भर्तुरन्तिकमादरात् ॥ ३१ ॥
च्यवनोऽसौ मुनिस्तात जामाता ते न संशयः ।
अश्विभ्यामीदृशः कान्तः कृतः कमललोचनः ॥ ३२ ॥
यदृच्छयात्र सम्प्राप्तौ नासत्यावाश्रमे मम ।
ताभ्यां करुणया नूनं च्यवनस्तादृशः कृतः ॥ ३३ ॥
नाहं तव सुता तात तथा स्यां पापकारिणी ।
यथा त्वं मन्यसे राजन् विमूढो रूपसंशये ॥ ३४ ॥
प्रणम त्वं मुनिं राजन् भार्गवं च्यवनं पितः ।
आपृच्छ कारणं सर्वं कथियिष्यति विस्तरम् ॥ ३५ ॥
इति श्रुत्वा वचं पुत्र्या शर्यातिस्त्वरितस्तदा ।
प्रणनाम मुनिं तत्र गत्वा पप्रच्छ सादरम् ॥ ३६ ॥
राजोवाच -
कथयस्व स्ववृत्तान्तं भार्गवाशु यथोचितम् ।
नयने च कथं प्राप्ते क्व गता ते जरा पुनः ॥ ३७ ॥
संशयोऽयं महान्मेऽस्ति रूपं दृष्ट्वातिसुन्दरम् ।
वद विस्तरतो ब्रह्मन् श्रुत्वाहं सुखमाप्नुयाम् ॥ ३८ ॥
च्यवन उवाच -
नासत्यावत्र सम्प्राप्तौ देवानां भिषजावुभौ ।
उपकारः कृतस्ताभ्यां कृपया नृपसत्तम ॥ ३९ ॥
मया ताभ्यां वरो दत्त उपकारस्य हेतवे ।
करिष्यामि मखे राज्ञो भवन्तौ सोमपायिनौ ॥ ४० ॥
एवं मया वयः प्राप्तं लोचने विमले तथा ।
स्वस्थो भव महाराज संविशस्वासने शुभे ॥ ४१ ॥
इत्युक्तः स तु विप्रेण सभार्यः पृथिवीपतिः ।
सुखोपविष्टः कल्याणीः कथाश्चक्रे महात्मना ॥ ४२ ॥
अथैनं भार्गवं प्राह राजानं परिसान्त्वयन् ।
याजयिष्यामि राजंस्त्वां सम्भारानुपकल्पय ॥ ४३ ॥
मया प्रतिश्रुतं ताभ्यां कर्तव्यौ सोमपौ युवाम् ।
तत्कर्तव्यं नृपश्रेष्ठ तव यज्ञेऽतिविस्तरे ॥ ४४ ॥
इन्द्रं निवारयिष्यामि क्रुद्धं तेजोबलेन वै ।
पाययिष्यामि राजेन्द्र सोमं सोममखे तव ॥ ४५ ॥
ततः परमसन्तुष्टः शर्यातिः पृथिवीपतिः ।
च्यवनस्य महाराज तद्वाक्यं प्रत्यपूजयत् ॥ ४६ ॥
सम्मान्य च्यवनं राजा जगाम नगरं प्रति ।
सभार्यश्चातिसन्तुष्टः कुर्वन्वार्तां मुनेः किल ॥ ४७ ॥
प्रशस्ते‍हनि यज्ञीये सर्वकामसमृद्धिमान् ।
कारयामास शर्यातिर्यज्ञायतनमुत्तमम् ॥ ४८ ॥
समानीय मुनीन्पूज्यान्वसिष्ठप्रमुखानसौ ।
भार्गवो याजयामास च्यवनः पृथिवीपतिम् ॥ ४९ ॥
वितते तु तथा यज्ञे देवाः सर्वे सवासवाः ।
आजग्मुश्चाश्विनौ तत्र सोमार्थमुपजग्मतुः ॥ ५० ॥
इन्द्रस्तु शङ्‌कितस्तत्र वीक्ष्य तावश्विनावुभौ ।
पप्रच्छ च सुरान्सर्वान्किमेतौ समुपागतौ ॥ ५१ ॥
चिकित्सकौ न सोमार्हौ केनानीताविहेति च ।
नाब्रुवन्नमरास्तत्र राज्ञस्तु वितते मखे ॥ ५२ ॥
अगृह्णाच्च्यवनः सोममश्विनोर्देवयोस्तदा ।
शक्रस्तं वारयामास मा गृहाणैतयोर्ग्रहम् ॥ ५३ ॥
तमाह च्यवनस्तत्र कथमेतौ रवेः सुतौ ।
न ग्रहार्हौ च नासत्यौ ब्रूहि सत्यं शचीपते ॥ ५४ ॥
न सङ्करौ समुत्पन्नौ धर्मपत्‍नीसुतौ रवेः ।
केन दोषेण देवेन्द्र नार्हौ सोमं भिषग्वरौ ॥ ५५ ॥
निर्णयोऽत्र मखे शक्र कर्तव्यः सर्वदैवतैः ।
ग्राहयिष्यामहं सोमं कृतौ तौ सोमपौ मया ॥ ५६ ॥
प्रेरितोऽसौ मया राजा मखाय मघवन्किल ।
एतदर्थं करिष्यामि सत्यं मे वचनं विभो ॥ ५७ ॥
आभ्यामुपकृतः शक्र तथा दत्तं नवं वयः ।
तस्मात्प्रत्युपकारस्तु कर्तव्यः सर्वथा मया ॥ ५८ ॥
इन्द्र उवाच -
चिकित्सकौ कृतावेतौ नासत्यौ निन्दितौ सुरैः ।
उभावेतौ न सोमार्हौ मा गृहाणैतयोर्ग्रहम् ॥ ५९ ॥
च्यवन उवाच -
अहल्याजार संयच्छ कोपं चाद्य निरर्थकम् ।
वृत्रघ्न किं हि नासत्यौ न सोमार्हौ सुरात्मजौ ॥ ६० ॥
एवं विवादे समुपस्थिते च
     न कोऽपि वाचं तमुवाच भूप ।
ग्रहं तयोर्भार्गवतिग्मतेजाः
     संग्राहयामास तपोबलेन ॥ ६१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां सप्तमस्कन्धे च्यवनाश्विनोः कृते
सोमपानाधिकारत्वचेष्टावर्णनं नाम षष्टोऽध्यायः ॥ ६ ॥


शर्याति राजाचा यज्ञ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय पुराणकथा ऐकण्यास एकाग्र झाला होता. आपल्याला येणार्‍या शंका तो व्यासांना विचारून आपली संशयनिवृत्ती करून घेत असे. च्यवन मुनींनी वर दिल्यावर जनमेजयाच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. जनमेजयाने महर्षीना विचारले, "मुनीवर्य, देवराज इंद्राने ज्यांना सोमपान करण्याविषयी अटकाव केला, तेथे च्यवन भार्गवमुनींना - कसे शक्य होते ? देवापुढे मानवाचे सामर्थ्य कमीच पडणार. मग त्या महात्म्या च्यवनाने अश्विनीकुमारांना असे वचन का दिले ? वैद्यांना सोमपान निषिद्ध असता च्यवनाने त्यांना सोमपान करवून धर्मनिष्ठ करून घेतले. हे खरोखरच महादाश्चर्यच आहे. तेव्हा माझ्या मनात अनेक उलटसुलट संभ्रम निर्माण झाल्याने आपण माझी संशयनिवृत्ती करावी. मला ती कथा विस्ताराने सांगावी. अशाप्रकारचे अद्‌भुत सामर्थ्य असलेल्या चवनभार्गवमुनींची कथा संपूर्ण ऐकावी अशी तीव्र इच्छा क्य्या मनात निर्माण झाली आहे."

व्यासांनी जनमेजयाची उत्कटता ओळखली. एकाग्रश्रवणतत्पर असलेल्या राजाबद्दल त्यांना आदर व अभिमान वाटू लागला. ते म्हणाले, "हे भरतश्रेष्ठा, आता च्यवनमुनींचे अद्‌भुत चरित्र मी तुला कथन करतो.

आपल्याला अत्यंत सुंदर व पतिव्रता महासाध्वी अशी भार्या प्राप्त झाल्याने च्यवनमुनींना अत्यानंद झाला. त्यांचे रूपयौवन आता देवांशी बरोबरी करणारे झाले होते. त्यामुळे त्यांना अधिक उत्साह प्राप्त होऊन ते पूर्णपणे प्रसन्न झाले व अत्यंत समाधानाने ते सुकन्येबरोबर क्रीडा करू लागले. अशाप्रकारे च्यवनांचा काळ सुखासमाधानात व्यतीत होत होता. त्याच वेळी इकडे शर्यातीची भार्या सुकन्येच्या आठवणीने अत्यंत दुःखी झाली. तिला सुचेनासे झाल्यामुळे ती आपल्या पतीकडे आली व थरथर कापत, दुष्ट शंकांनी व्याकुळ होऊन पतीला म्हणाली, "महाराज, आपल्या कन्येचा त्या अंध व शुद्ध तापसाशी विवाह होऊन बरेच दिवस झाले आहेत. पण त्यानंतर आपणाला तिकडचे काहीच वर्तमान समजले नाही. ती जिवंत आहे की मृत्यू पावली आहे याबद्दल आपणही कधी चौकशी केली नाहीत. आपणास काय म्हणावे ? हे नाथ, आता आपण सत्वर तिकडे जाऊन त्या उभयतांचे कुशल समजावून घ्यावे. असा वृद्ध, अंध व कुरूप पती प्राप्त झाल्याने आपली कन्या तेथे कोणत्या संकटात आहे याचाही शोध करावा. हे राजर्षे, कन्येच्या स्मरणाने, तिच्या दुःखाने माझे अंतःकरण नुसते जळत आहे. सुकन्या मूलतःच कृश शरीराची आहे. त्यातून अंध व वृद्ध पती प्राप्त झाल्याने ती अधिकच शोकाकूल झाली असेल. वल्कले ल्याली असल्याने ती पूर्वीपेक्षा जास्त कृश झाली असेल. तेव्हा हे पतीदेव, मला एकदा मुलीला डोळे भरून पहाण्याची इच्छा झाली आहे. आपण तिला सत्वर घेऊन या."

पत्‍नीचे हृदयव्याकुळ भाषण एकताच राजाही सुकन्येच्या स्मृतीने सद्‌गदित झाला. तो आपल्या प्रिय पत्‍नीला म्हणाला, "हे सुंदरी, आपली कन्या पतीसेवातत्पर आहे. पण शंकेने मन व्याकुळ झाले असल्याने आजच आपण दोघेही च्यवन मुनींच्या आश्रमात जाऊ आणि तेथील कुशल अवलोकन करू."

शोकविव्हल होऊन राजा आपल्या पत्‍नीसह वर्तमान त्वरेने वनात जाण्यास निघाला. च्यवन भार्गवमुनींच्या आश्रमाजवळ येताच त्याला तो अंध, वृद्ध असा च्यवन भार्गवमुनी कोठेच दिसेना. उलट त्या आश्रमात अत्यंत तेजस्वी देवतुल्य असा रूपसंपन्न व अत्यंत तरुण असलेल्या एका पुरुषाला पहाताच राजाच्या मनात शंकांचे वादळ उठले. तो अत्यंत खिन्न होऊन विचार करू लागला. त्याला वाटले, पति निर्धन, अंध, वृद्ध व कुरूप असलेला पाहून आपल्या कन्येने त्याचा वध केला असावा व आता ती या दुसर्‍या सुंदर पुरुषाबरोबर रहात आहे. काय पापिणी आहे ही ! अरेरे, केवळ मदनाने व्याकुळ झाल्यामुळेच तिच्या हातून हे पापकृत्य घडले आहे. खरोखरच मनुष्याला धर्मकार्यापासून परावृत्त करणारा हा मदन दुष्ट आहे. कामातुर होऊन आपल्या कन्येने सुंदर, तरुण अशा परपुरुषाबरोबर पत्‍नीच्या नात्याप्रमाणे रहाणे किती दुष्टपणाचे आहे ! आपल्या कुळाला यामुळे कलंक लागला आहे.

यौवन प्राप्त झाल्यावर कामवेदना दुःसह होऊन या कन्येने जगात निंद्य असे कृत्य केले. खरोखरच ज्याची कन्या अशाप्रकारचे जारकर्म करते त्याचा जगात धिक्कार असो. जगात दुःख निर्माण होण्याला या कन्याच कारण आहेत हे सत्य आहे. पण अंध व वृद्ध अशा मुनीला केवळ स्वार्थाने आपली कन्या अर्पण करण्यात मीसुद्धा खरोखरच फार मोठा अपराध केला आहे. माझ्या हातून हे अनुचित कर्मच घडले आहे.

माझ्यासारख्या पित्याने परिपूर्ण विचार करूनच कन्यादान करावे. रूपगुणाला योग्य अशाच पुरुषाला कन्या अर्पण करावी. तस्मात् मीच घोर अन्याय केला आहे. त्याचे प्राप्त फल मला भोगलेच पाहिजे. बरे, आता ळ पापी कन्येचा वध करावा तर स्त्रीहत्या - कन्याहत्या यासारखे पाप माझ्या हातून घडेल ! त्या प्रसिद्ध मनुवंशाला ते कलंक लावल्यासारखे होईल. आता सर्वस्वाचा त्याग करणेही शक्य नाही. मी या प्रेमशृंखलेत पूर्णपणे गुंतलो आहे. आता मी काय करू ?

अशाप्रकारे पश्चात्तापदग्ध होऊन राजा उद्विग्न अंतःकरणाने मनाशी विचार करू लागला. पण राजाची ही दुःखी मुद्रा पाहून सुकन्या चकित झाली. ती त्वरेनें पुढे येऊन आपल्या मातापित्यांच्या पाया पडली आणि आनंदातिशयाने म्हणाली, "हे ताता, हे राजर्षे, आपण माझ्या आश्रमात या. कमलनयन व रूपयौवनसंपन्न असलेल्या मुनींना - माझ्या पतीदेवांना आपण सत्वर येऊन भेटा. त्यामुळे तुमचे दुःख दूर होईल. आपण या महामुनींना प्रणाम करा व या माझ्या पतीचे दर्शन घ्या."

आपल्या कन्येचे हे भाषण ऐकताच राजा शर्याति लज्जित झाला आणि अत्यंत क्रोधायमान होऊन आपल्या कन्येला म्हणाला, "सुकन्ये, तो महातपस्वी, अंध, वृद्ध च्यवनभार्गव मुनी कोठे आहे ते मला दाखव. मी त्याच्या दर्शनासाठी आतुर झालो आहे. त्याच्याविना या आश्रमात या मदोन्मत्त व यौवनसंपन्न परपुरुषाला पाहून मला अत्यन्त दुःख होत आले. हे कन्ये, हा पुरुष कोण आहे ते सांग. खरोखरच तू पापिणी आहेस. हे जारिणी, तू कामाने व्याकुळ होऊन मदनविव्हलतेने काही तरी दुष्कृत्य केले आहे हे खचित समजावे. हे कुलाचा नाश करणार्‍या कन्ये, त्या मुनीचा वध तर केला नाहीस ना ? त्याचा वध करून कामातुर झाल्यानेच तू हा नवा तरुण पती स्वीकारले आहेस काय ? हे कन्ये, तो वृद्ध अंध मुनीश्रेष्ठ मला हे येथे दिसत नसल्याने मी चिंताग्रस्त व कुद्ध झालो आहे. हे सुंदर कन्ये, तू कशाला हे नीच कृत्य केलेस ? तुझ्याकडून हे जारकर्म करवले तरी कसे ? सांग. सत्वर मला सर्व घटना कथन कर.

खरोखरच तो वृद्ध-अंध महातपस्वी दिसेनासा होऊन हा दिव्य पुरुष येथे बसलेला पाहून मी शोकमग्न झालो आहे. तुझ्या हातून घडलेल्या या दुष्कृत्याचे पाप मलाही भोगावे लागणार आहे. आता मी या लोकनिंदेपासून मुक्त कसा होणार ? अग चांडाळणी, तू काय केलेस हे ?"

आपल्या पित्याच्या दुःखाचे कारण लक्षात येताच सुकन्या आनंदित होऊन पुढे झाली. तिने अत्यंत आदराने आपल्या पित्याला आपल्या पतीसन्निध आणले. सुहास्य व प्रसन्न मनाने ती म्हणाली, "हे तात, आपण व्यर्थ शोकमग्न झाला. हे कमलनेत्र व रूपयौवनसंपन्न माझे पती च्यवन मुनीच आहेत याबद्दल संशय धरू नका. देववैद्य अश्विनीकुमारांच्या प्रसादाने यांना हे रूप प्राप्त झाले आहे.

एक दिवस अगदी सहजगत्या अश्विनीकुमार आमच्या आश्रमाकडे आले व त्यांना दया येऊन त्यांनीच माझ्या या पतीला हे स्वरूप प्राप्त करून दिले. त्यांच्या औषधामुळे माझे पती व तुमचे जामात यांना नवयौवन प्राप्त झाले आहे. म्हणून हे राजर्षे, आपण विनाकारण संशयाने पीडित झालात. खरोखर तुमची कन्या तुम्ही समजता तशी पापचरणी नाही. हे महाराज, आता निःसंशय चित्ताने येऊन या च्यवन भार्गव मुनींना आपण प्रणाम करा व त्यांनाच आपण विस्ताराने सर्व काही प्रश्न विचारा म्हणजे तेच तुम्हाला सत्य घटना सांगतील."

आपल्या कन्येचे निश्चयी भाषण ऐकून राजा अत्यादराने पुढे येऊन मुनीसमोर नतमस्तक झाला. राजा म्हणाला, हे महातापसी मुने, आपण मला विस्ताराने सर्व कथा सांगा. आपले वार्धक्य जाऊन आपणास दृष्टी कशी प्राप्त झाली ? आपले अतिशय मनोहर रूप पहाताच माझ्या मनात संशय निर्माण झाला. तेव्हा आपणच सर्व काही सांगितले म्हणजे माझे मन तृप्त होईल."

च्यवनमुनी हसले व म्हणाले, "हे भूपाला, खरोखरच देववैद्य असलेल्या त्या सूर्यपुत्र अश्विनीकुमारांनी मजवर हा फार मोठा उपकार केला आहे. त्यांच्या दिव्य उपचारामुळेच माझे वार्धक्य व अंधत्व पार नाहीसे झाले आहे. पण हे राजा, मी त्यांच्या उपकाराची फेड करू इच्छित असल्याने त्यांना वचन दिले आहे. ते मला पूर्ण केले पाहिजे. पण त्यासाठी मला तुझी मदत घ्यावी लागणार आहे."

"हे मुनीश्रेष्ठा, आपण नुसती आज्ञा द्या. हे राज्य, हा राजा सदैव तुमच्या आधीन आहे. सांगा, काय करू मी ?" राजा हर्षभरित होऊन म्हणाला. च्यवनमुनींनी राजाला शुभासन दिले व म्हणाले, हे राजा, या शुभासनावर स्वस्थ चित्ताने बैस आणि ऐक. अश्विनीकुमारांनी मला हे सुंदर नेत्र हा सुडौल देह आणि हे चिरंतन तारुण्य प्राप्त करून देऊन मजवर अनंत उपकार केले आहेत. तेव्हा मी त्यांना वर दिला - हे अश्विनीकुमारांनो, शर्याति राजाच्या यज्ञात मी तुम्हाला सोमपान करवीन व तेव्हापासून तुम्ही सोमपायी व्हाल. असा वर मी त्यांना दिल्यामुळे ते आनंदित होऊन निघून गेले. तेव्हा हे राजा, आता तुझे योग्य कार्य असेल ते तू कर."

च्यवनमुनींनी सांगितलेली अद्‌भुत कथा ऐकून राजा संतुष्ट झाला आणि आपल्या प्रिय पत्‍नीसह मुनींनी दिलेल्या शुभासनावर बसून आपल्या जामात - कन्येशी विचार विनिमय करू लागला.

राजाचे पूर्ण समाधान झाल्यावर च्यवन म्हणाले, हे राजा, आता लवकरच मी तुझ्याकडून यज्ञ करवीन. तू सत्वर यज्ञसामग्री सिद्ध कर. अश्विनीकुमारांना सोमपायी करण्याबद्दल मी वचनबद्ध आहे. म्हणून माझी प्रतिज्ञा मला शेवटास न्यावयाची आहे. तुझ्या उत्कृष्ट यज्ञामुळे मला माझे वचन सत्य करता येईल. हे राजेंद्रा, इंद्र जरी क्रुद्ध झाला तरी तपश्चर्येमुळे मला प्राप्त झालेल्या तेजसामर्थ्याने मी इंद्राचे निवारण करीन याबद्दल मला खात्री आहे. म्हणून तुझ्या सोमयागात मी अश्विनीकुमारांना सोमपायी करणार आहे."

च्यवनमुनींच्या भाषणाने संतुष्ट झालेल्या राजाने मुनींचा गौरव केला व त्यांना अत्यंत मान देऊन; त्यांचे कुशल चिंतून, तो आपल्या नगराकडे आला. सर्व लोकांना मुनीच्या तेजबलाच्या वार्ता त्याने ऐकवल्या व परम संतोषाने तो राजवाड्यात आला.

राजाने एका सुमुहूर्तावर यज्ञभूमी तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तो जुळवू लागला व तयारी पूर्ण होताच च्यवन भार्गवांनी वसिष्ठादि सर्व मुनींना निमंत्रणे दिली व त्या सर्वांना आणून च्यवनऋषीने राजाकडून सोमयाग करविला.

यज्ञ सुरू झाल्यावर इंद्र देवांना घेऊन यज्ञभूमीवर आला व तो स्थानापन्न होतो आहे तोच अश्विनीकुमारही तेथे येऊन पोहोचले. अश्विनीकुमार तेथे येताच इंद्राच्या मनात शंकाकुशंका निर्माण झाल्या. तो इतर देवांना उद्देशून म्हणाला, "देवांनो, हे दोघे वैद्य येथे कसे आले ? त्यांना कोणी बोलावले ? हे वैद्य असल्याने सोमपानाला पात्र नसताही येथे का आले ? यांना सोमपानाचा अधिकार नाही."

पण इतर देव स्वस्थ बसले. ते काहीच बोलले नाहीत. च्यवनमुनींनी अश्विनीकुमारांकरता सोम हातात घेतल्याचे अवलोकन करताच विस्मयाने इंद्र म्हणाला, " हे मुने, हे दोघेही सोमपानास योग्य नाहीत. तू त्यांना आग्रह करू नकोस."

ते ऐकताच च्यवनमुनी त्वरेने इंद्राला म्हणाले, "हे शचीपते, हे दोघेही सूर्यपुत्र असून हे सोमपानाला का पात्र नाहीत ते आता सांग. हे देवेंद्रा, हे संकराने उत्पन्न झालेले नसून सूर्याला त्याच्या धर्मपत्‍नीपासून झालेले पुत्र आहेत. म्हणून हे चिकित्सक असले तरी सोमपानामुळे ह्यांना कोणता दोष लागणार आहे ते कथन कर. हे इंद्र-देवांनो, या ठिकाणी याच यज्ञात याचा योग्य तो निर्णय घ्यावा. मी त्यांना सोम घेण्यास भाग पाडणार व त्यांना नित्य सोमपायी करणार. हे देवराज, मीच शर्याति राजाला या यज्ञासाठी आवाहन केले आहे. माझ्याकरता राजा या यज्ञास प्रवृत्त झाला आहे. या दोघां अश्विनीकुमारांना मी वचन दिले आहे व त्या वचनाप्रमाणे मी यांना सोमपायी करणार आहे. केवळ यांच्याच उपकारामुळे मला नवतारुण्य प्राप्त झाले. यांनी मला नवे आयुष्य दिले. मलाही त्यांचेच तसेच प्रत्युपकार केले पाहिजेत. देवेंद्रा, आता आपद्ध निर्णय करा."

इंद्र च्यवनाच्या भाषणाने उद्विग्र झाला व म्हणाला. "हे च्यवनभार्गवा, हे दोघे अश्विनीकुमार वैद्य असल्याने देव त्यांना हीन मानतात. त्यांना देवांनी निंद्य मानल्यामुळे दोघेही सोमपानाला पात्र नाहीत. म्हणून देवांचा अधिक्षेप करून तू त्यांना सोमपायी करण्याच्या भरीस पडू नकोस." इंद्राचे हे मतलबी भाषण ऐकताच च्यवनभार्गवांन राग आला. ते धारदार शब्दात इंद्राला म्हणाले, व्यभिचारी इंद्रा, तू अहिल्येशी दुष्कृत्य करून तिला फसविलेस. हे वृत्रनाशका, ब्रह्मघ्ना इंद्रा, तू विनाकारण क्रुद्ध होऊ नकोस. मनाला आवरून धर. हे दोघे देवपुत्र देवतुल्य असून सोमपानाला अयोग्य कसे याचे योग्य कारण सांग. मला तरी तसे योग्य कारण दिसत नाही. म्हणून मी माझे वचन पूर्ण करणार."

तेव्हा यज्ञात मोठा वादविवाद निर्माण झाला. देव थोडेसे कुद्ध झाल्याने काहीच भाषण करीनात. तेव्ह च्यवनभगर्नवाने कोणाशीही न बोलता केवळ आपत्क तपःसामर्थ्यावर सर्वांकडून सोमपान करविले व अश्विनीकुमारांना अशाप्रकारे सोमपायी केले.



अध्याय सहावा समाप्त

GO TOP