श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
त्रिंशोऽध्यायः


मायाप्राबल्यवर्णनम्

नारद उवाच
मां दृष्ट्वा नारदं विप्रं विस्मितोऽसौ महीपतिः ।
क्व गता मम भार्या सा कुतोऽयं मुनिसत्तमः ॥ १ ॥
विललाप नृपस्तत्र हा प्रियेति मुहुर्मुहुः ।
क्व गता मां परित्यज्य विलपन्तं वियोगिनम् ॥ २ ॥
विना त्वां विपुलश्रोणि वृथा मे जीवितं गृहम् ।
राज्यं कमलपत्राक्षि किं करोमि शुचिस्मिते ॥ ३ ॥
न प्राणा मे बहिर्यान्ति विरहेण तवाधुना ।
गतो वै प्रीतिधर्मस्तु त्वामृते प्राणधारणात् ॥ ४ ॥
विलपामि विशालाक्षि देहि प्रत्युत्तरं प्रियम् ।
क्व गता सा मयि प्रीतिर्याभूत्प्रथमसङ्गमे ॥ ५ ॥
निमग्ना किं जले सुभ्रूर्भक्षिता मत्स्यकच्छपैः ।
गृहीता वरुणेनाशु मम दौर्भाग्ययोगतः ॥ ६ ॥
धन्या सुचारुसर्वाङ्‌गि या त्वं पुत्रैः समागता ।
अकृत्रिमस्तु पुत्रेषु स्नेहस्तेऽमृतभाषिणि ॥ ७ ॥
न युक्तमधुना यन्मां विहाय त्रिदिवं गता ।
विलपन्तं पतिं दीनं पुत्रस्नेहेन यन्त्रिता ॥ ८ ॥
उभयं मे गतं कान्ते पुत्रास्त्वं प्राणवल्लभा ।
तथापि मरणं नास्ति दुःखितस्य भृशं प्रिये ॥ ९ ॥
किं करोमि क्व गच्छामि रामो नास्ति महीतले ।
रामाविरहजं दुःखं जानाति रघुनन्दनः ॥ १० ॥
विधिना निष्ठुरेणात्र विपरीतं कृतं भुवि ।
दम्पत्योर्मरणं भिन्नं सर्वथा समचित्तयोः ॥ ११ ॥
उपकारस्तु नारीणां मुनिभिर्विहितः किल ।
यदुक्तं धर्मशास्त्रेषु ज्वलनं पतिना सह ॥ १२ ॥
एवं विलपमानं तं राजानं भगवान्हरिः ।
निवारयामास तदा वचनैर्युक्तियोजितैः ॥ १३ ॥
श्रीभगवानुवाच
किं विषीदसि राजेन्द्र क्व गता ते प्रियाङ्गना ।
न श्रुतं किं त्वया शास्त्रं न कृतोऽसौ बुधाश्रयः ॥ १४ ॥
का सा कस्त्वं क्व संयोगो वियोगः कीदृशस्तव ।
प्रवाहरूपे संसारे नृणां नौतरतामिव ॥ १५ ॥
गृहे गच्छ नृपश्रेष्ठ वृथा ते रुदितेन किम् ।
संयोगश्च वियोगश्च दैवाधीनः सदा नृणाम् ॥ १६ ॥
अनया सह ते राजन् संयोगस्त्विह संवृतः ।
भुक्ता त्वया विशालाक्षी सुन्दरी तनुमध्यमा ॥ १७ ॥
न दृष्टौ पितरावस्यास्त्वया प्राप्ता सरोवरे ।
काकतालीप्रसङ्गेन यद्‌भूतं तत्तथा गतम् ॥ १८ ॥
मा शोकं कुरु राजेन्द्र कालो हि दुरतिक्रमः ।
कालयोगं समासाद्य भुङ्क्ष्व भोगान् गृहे यथा ॥ १९ ॥
यथागता गता सा तु तथैव वरवर्णिनी ।
यथा पूर्वं तथा तत्र गच्छ कार्यं कुरु प्रभो ॥ २० ॥
रुदितेन तवाद्यैव नागमिष्यति कामिनी ।
वृथा शोचसि पृध्वीश योगयुक्तो भवाधुना ॥ २१ ॥
भोगः कालवशादेति तथैव प्रतियाति च ।
नात्र शोकस्तु कर्तव्यो निष्फले भववर्त्मनि ॥ २२ ॥
नैकत्र सुखसंयोगो दुःखयोगस्तु नैकतः ।
घटिकायन्त्रवत्कामं भ्रमणं सुखदुःखयोः ॥ २३ ॥
मनः कृत्वा स्थिरं भूप कुरु राज्यं यथासुखम् ।
अथवा न्यस्य दायादे वनं सेवय साम्प्रतम् ॥ २४ ॥
दुर्लभो मानुषो देहः प्राणिनां क्षणभङ्गुरः ।
तस्मिन्प्राप्ते तु कर्तव्यं सर्वथैवात्मसाधनम् ॥ २५ ॥
जिह्वोपस्थरसो राजन् पशुयोनिषु वर्तते ।
ज्ञानं मानुषदेहे वै नान्यासु च कुयोनिषु ॥ २६ ॥
तस्माद्‌गच्छ गृहं त्यक्त्वा शोकं कान्तासमुद्‌भवम् ।
मायेयं भगवत्यास्तु यया सम्मोहितं जगत् ॥ २७ ॥
नारद उवाच
इत्युक्तो हरिणा राजा प्रणम्य कमलापतिम् ।
कृत्वा स्नानविधिं सम्यग्जगाम निजमन्दिरम् ॥ २८ ॥
दत्त्वा राज्यं स्वपौत्राय प्राप्य निर्वेदमद्‌भुतम् ।
वनं जगाम भूपालस्तत्त्वज्ञानमवाप च ॥ २९ ॥
गते राजन्यहं वीक्ष्य भगवन्तमधोक्षजम् ।
तमब्रवं जगन्नाथं हसन्तं मां पुनः पुनः ॥ ३० ॥
वञ्चितोऽहं त्वया देव ज्ञातं मायाबलं महत् ।
स्मरामि चरितं सर्वं स्त्रीदेहे यत्कृतं मया ॥ ३१ ॥
ब्रूहि मे देवदेवेश प्रविष्टोऽहं सरोवरे ।
विगतं पूर्वविज्ञानं स्नानादेव कथं हरे ॥ ३२ ॥
योषिद्देहं समासाद्य मोहितोऽहं जगद्‌गुरो ।
पतिं प्राप्य नृपश्रेष्ठं पुलोमी वासवं यथा ॥ ३३ ॥
मनस्तदेव तच्चित्तं देहः स च पुरातनः ।
लिङ्गं तदेव देवेश स्मृतेर्नाशः कथं हरे ॥ ३४ ॥
विस्मयोऽयं महान्मेऽत्र ज्ञाननाशं प्रति प्रभो ।
कथयाद्य रमाकान्त कारणं परमं च यत् ॥ ३५ ॥
नारीदेहं मया प्राप्य भुक्ता भोगा ह्यनेकशः ।
सुरापानं कृतं नित्यं विधिहीनं च भोजनम् ॥ ३६ ॥
मया तदेव न ज्ञातं नारदोऽहमिति स्फुटम् ।
जानाम्यद्य यथा सर्वं विविक्तं न तथा तदा ॥ ३७ ॥
विष्णुरुवाच
पश्य नारद मायावी विलासोऽयं महामते ।
देहेषु सर्वजन्तूनां दशाभेदा ह्यनेकशः ॥ ३८ ॥
जाग्रत्स्वप्नसुषुप्तिश्च तुरीया देहिनां दशा ।
तथा देहान्तरे प्राप्ते सन्देहः कीदृशः पुनः ॥ ३९ ॥
सुप्तो नरो न जानाति न शृणोति वदत्यपि ।
पुनः प्रबुद्धो जानाति सर्वं ज्ञातमशेषतः ॥ ४० ॥
निद्रया चाल्यते चित्तं भवन्ति स्वप्नसम्भवाः ।
नानाविधा मनोभेदा मनोभावा ह्यनेकशः ॥ ४१ ॥
गजो मां हन्तुमायाति न शक्तोऽस्मि पलायने ।
किं करोमि न मे स्थानं यत्र गच्छामि सत्वरः ॥ ४२ ॥
मृतं पितामहं स्वप्ने पश्यति स्वगृहागतम् ।
संयोगस्तेन वार्ता च भोजनं सह मन्यते ॥ ४३ ॥
प्रबुद्धः खलु जानाति स्वप्ने दृष्टं सुखासुखम् ।
स्मृत्वा सर्वं जनेभ्यस्तु विस्तरात्प्रवदत्यपि ॥ ४४ ॥
स्वप्नेकोऽपि न जानाति भ्रमोऽयमिति निश्चयः ।
तथा तथैव विभवो मायाया दुर्गमः किल ॥ ४५ ॥
नाहं नारद जानामि पारं परमदुर्घटम् ।
गुणानां किल मायाया नैव शम्भुर्न पद्मजः ॥ ४६ ॥
कोऽन्यो ज्ञातुं समर्थोऽभून्मानतो मन्दधीः पुनः ।
मायागुणपरिज्ञानं न कस्यापि भवेदिह ॥ ४७ ॥
गुणत्रयकृतं सर्वं जगत्स्थावरजङ्गमम् ।
विना गुणैर्न संसारो वर्तते किञ्चिदप्यदः ॥ ४८ ॥
अहं सत्त्वप्रधानोऽस्मि रजस्तमसमन्वितः ।
न कदाचित्‍त्रिभिर्हीनो भवामि भुवनेश्वरः ॥ ४९ ॥
तथा ब्रह्मा पिता तेऽत्र रजोमुख्यः प्रकीर्तितः ।
तमःसत्त्वसमायुक्तो न ताभ्यामुज्झितः किल ॥ ५० ॥
शिवस्तथा तमोमुख्यो रजःसत्त्वसमावृतः ।
गुणत्रयविहीनस्तु नैव कोऽपि मया श्रुतः ॥ ५१ ॥
तस्मान्मोहो न कर्तव्यः संसारेऽस्मिन्मुनीश्वर ।
मायाविनिर्मितेऽसारेऽपारे परमदुर्घटे ॥ ५२ ॥
दृष्टा माया त्वयाद्यैव भुक्ता भोगा ह्यनेकशः ।
किं पृच्छसि महाभाग तस्याश्चरितमद्‌भुतम् ॥ ५३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
षष्ठस्कन्धे मायाप्राबल्यवर्णनं नाम त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥


महामायेच्या प्रभावाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, ''हे व्यासमुने, मी स्त्री नसून पुरुष झालेले पाहताच तो राजाही विचार करू लागला. 'आपली भार्या कोणीकडे गेली ?' असे म्हणून तो विलाप करू लागला. तो म्हणाला, "हे कमलाक्षी, तुझ्यावाचून मला हे जीवन व्यर्थ वाटत आहे. तुझ्या विरहामुळे माझा प्राण गेला असता तर बरे झाले असते. तुझ्यावाचून मला आनंद राहिला नाही. हे विशालनयने, तुझे मजवरील प्रेम कोणीकडे गेले ? तू उदकात बुडल्यावर तू कूर्ममत्स्यादि जलचरांच्या भक्षस्थानी पडलीस काय ?''

हे सुंदरी, पुत्रांसह तू परलोकी गेलीस. खरोखरीच तू धन्य आहेस. पतीचा त्याग करून तू पुत्रप्रेमाने मोहित होऊन स्वर्गात गेलीस. पुत्र व भार्या दोघेही नष्ट झाल्यामुळे मी फारच दुःखी झालो आहे. स्त्रीविरहाचे दुःख फक्त रामच जाणतो. पतीबरोबर सती जाण्याचा धर्म सांगून मुनींनी स्त्रियांवर फारच उपकार केला आहे.''

शेवटी श्रीहरीने विलाप करणार्‍या त्या राजाच्या दुःखाचे निवारण केले. ते म्हणाले, '' हे राजेंद्रा, शोकाचा त्याग कर. तुझी स्त्री नाहीशी झाली नाही. अरे, शास्त्रांचे श्रवण, ज्ञानवंतांशी सहवास यांपैकी तू काहीच केले नाहीस. कारण वियोग, संयोग यांतील फरक तुला माहित नाही. हे सर्व दैवाधीन आहे. म्हणून हे राजा तू घरी जा.''

तुझ्याशी संयोग झालेल्या स्त्रीचे मातापिता तुला माहीत नाही. ती सरोवरात एकाएकी प्रकट झाली, तशीच नाहीशी झाली. कालगतीचा विचार कर. कारण ती स्त्री पुन: येणार नाही. तू वृथा शोक करू नकोस. कारण मानवाला सुख वा दुःख चिरंतन असे मिळत नाही. सुखदुःखाचे भ्रमण नित्य चालू असते. पुत्राला राज्य देऊन तू वनात गमन कर

हा मानवदेह क्षणभंगुर असल्याने आत्मसाधन करावे. रतिसुख, जिव्हासुख ही सुखे पशूसुद्धा उपभोगतात. ज्ञान मनुष्याशिवाय नाही. भगवतीच्या मायेने हे सर्व जग मोहित झाले आहे. म्हणून हे राजा, तू आता शोक करू नकोस.''

हे ऐकून राजाने स्नान केले व तो शोकरहित होऊन स्वस्थानी निघून गेला. नंतर मी श्रीहरीला म्हणालो, ''हे देवा, खरोखरच मायेचे सामर्थ्य केवढे आहे, हे मला पटले. कारण स्त्रीत्वप्राप्तीनंतरच्या सर्व घटना आता मला स्मरतात. पण स्त्रीत्व प्राप्त झाल्यावर मात्र माझे पूर्वस्मरण एकाएकी नाहीसे झाले. हे जगदीशा, मी त्यावेळी इतका मोहवश कसा झालो ? स्त्रीदेह असताना मी विविध प्रकारचे उपभोग घेतले. सुरापान देखील मी केले. मी नारद असल्याची थोडीही स्मृती त्यावेळी मला नव्हती. आज मात्र ते सर्व आठवत आहे. असे कसे झाले ?''

विष्णु म्हणाले, ''नारदा, मायाविश्वाच्या विविध तर्‍हेच्या दशा आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या दशा प्राण्यांना प्राप्त होतात. पण हा भ्रम आहे याची त्यांना जाणीव नसते. कारण उपदेशाशिवाय हे समजत नाही. निद्राधीन पुरुषाला कसलीही जाणीव नसते, पण जागेपणी मात्र त्याला सर्व स्मरत असते.

निद्रावस्थेत चित्त चंचल होते, म्हणून विविध स्वप्ने पडतात. मनातील भेदामुळे आपणाला ती विविध दृश्ये भासतात. हत्ती आपल्या अंगावर येत आहे, पण आपण पळू शकत नाही. आता आपले कसे होणार ? असे आपणाला स्वप्नात वाटू लागते. केव्हा तरी आपली व आपल्या मृत आप्ताची स्वप्नात भेट होते. आपण त्यांच्याबरोबर जेवतो, गप्पागोष्टी करतो. नंतर जागृत झाल्यावर आपणाला त्याचे स्मरण होते. आपले स्वप्न तो इतरांना सांगतो. हा भ्रम असल्याचे तो मान्य करतो. पण स्वप्नात मात्र त्याला हे सत्य वाटते. म्हणून मायेचे आकलन होणे सर्वस्वी अशक्य आहे.

हे नारदा, मी, महेश्वर, ब्रह्मदेव यांनाही मायेचा अंत समजला नाही. कारण या गुणांचे ज्ञान कुणालाच होत नाही. हे सर्व चराचर जग त्रिगुणात्मक आहे. मी जगदीश्वर असलो तरी मी सत्त्वगुणी आहे. शिवाय रज व तम गुण माझे ठिकाणी आहेतच. तसेच हे नारदा, ब्रह्मदेवाच्या ठिकाणी रजोगुण तीव्र असला तरी सत्त्व व तम हेही गुण आहेत. त्याचप्रमाणे शिवाचे ठिकाणी तमगुण श्रेष्ठ असून सत्त्व व रजगुण गौणाने का होईना आहेतच.

तेव्हा त्रयगुणांशिवाय असलेला कोणीही पुरुष विद्यमान नाही. पुरुषाने मोहवश होऊ नये. हा संसार मायेनेच भरलेला आहे. हे नारदमुने, त्या मायेचे अस्तित्व तुला आता समजले आहे. मायेने मोहित होऊन तू अनेक भोग भोगले असे असतानाही तू आता तिच्या अद्‍भुत चरित्राविषयी का विचारीत आहेस ?



अध्याय तिसावा समाप्त


GO TOP