जनमेजय उवाच
भगवन्सर्वधर्मज्ञ सर्वशास्त्रविशारद ॥ ५५ ॥
कलावधर्मबहुले नराणां का गतिर्भवेत् ।
यद्यस्ति तदुपायश्चेद्दयया तं वदस्व मे ॥ ५६ ॥
व्यास उवाच
एक एव महाराज तत्रोपायोऽस्ति नापरः ।
सर्वदोषनिरासार्थं ध्यायेद्देवीपदाम्बुजम् ॥ ५७ ॥
न सन्त्यघानि तावन्ति यावती शक्तिरस्ति हि ।
नास्ति देव्याः पापदाहे तस्माद्भीतिः कुतो नृप ॥ ५८ ॥
अवशेनापि यन्नाम लीलयोच्चारितं यदि ।
किं किं ददाति तज्ज्ञातुं समर्था न हरादयः ॥ ५९ ॥
प्रायश्चित्तं तु पापानां श्रीदेवीनामसंस्मृतिः ।
तस्मात्कलिभयाद्राजन् पुण्यक्षेत्रे वसेन्नरः ॥ ६० ॥
निरन्तरं पराम्बाया नामसंस्मरणं चरेत् ।
छित्त्वा भित्त्वा च भूतानि हत्वा सर्वमिदं जगत् ॥ ६१ ॥
देवीं नमति भक्त्या यो न स पापैर्विलिप्यते ।
रहस्यं सर्वशास्त्राणां मया राजन्नुदीरितम् ॥ ६२ ॥
विमृश्यैतदशेषेण भज देवीपदाम्बुजम् ।
अजपां नाम गायत्रीं जपन्ति निखिला जनाः ॥ ६३ ॥
महिमानं न जानन्ति मायाया वैभवं महत् ।
गायत्रीं ब्राह्मणाः सर्वे जपन्ति हृदयान्तरे ॥ ६४ ॥
महिमानं न जानन्ति मायाया वैभवं महत् ।
एतत्सर्वं समाख्यातं यत्पृष्टं तत्त्वया नृप ।
युगधर्मव्यवस्थायां किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ६५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या संहितायां
षष्ठस्कन्धे युगधर्मव्यवस्थावर्णनं नामकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
सदसद्धर्माचे विवेचन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''हे द्विजश्रेष्ठा, भूभार हरण करण्यासाठी श्रीहरीने अवतार धारण केले. पण द्वापरयुगाच्या शेवटी पृथ्वी भाराने पीडित झाल्यावर अत्यंत आर्त झाली व गाईचे रूप घेऊन ती ब्रह्मदेवाला शरण गेली. तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णूची प्रार्थना केल्यावर भारतखंडात वसुदेवाच्या गृहात वासुदेवाने अवतार घेतला. तो बलरामासह पृथ्वीवर अवतीर्ण झाला. दुष्ट व दुराचारी राजांचा वासुदेवाने वध केला. पण त्यामुळे पृथ्वीचा असा किती भार त्याने हलका केला ?
भीष्म, द्रोण, विराट, द्रुपद, बाल्हिक, सोमदत्त वैकर्तन, कर्ण यांचाच वध झाला. पण स्त्रिया व धन लुटणारे तसेच इतरही दूराचारी भूमीवर राहिलेच. मग कृष्णाने भूभार हलका केला म्हणजे काय केले ? माझ्या मनात हा संशय निर्माण झाला आहे.''
व्यास म्हणाले, ''हे राजा, कालयोगाने उत्पन्न झालेल्या प्रजेचा समूळ नाश होत नाही. युगधर्म हेच तिचे कारण होय. धर्म, अर्थ, ह्याचे अवलंबन करणारे असे प्राणी त्रेतायुगात झाले. धर्म, अर्थ, काम यांचा आश्रय करणारे द्वापारयुगात होऊन गेले. पण कलियुगात अर्थ व काम ह्याविषयीच लोक तत्पर राहिले. म्हणून या सर्वांचा कर्ता कालच आहे."
राजा म्हणाला, ''सत्ययुगात जन्मास आलेले धर्मनिष्ठ प्राणी आता कोठे असतात ? तसेच त्रेता व द्वापर युगांत व्रते - दाने करणारे प्राणी आज कोठे आहेत ? तसेच कलियुगातील पापी, दुराचारी, निंद्य पुढे कुठे असतील ? हे मला सांगा.
व्यास म्हणाले, ''कृतयुगात पुण्य करणारे प्राणी देवलोकी जातात. चतुर्वर्णातील स्वधर्मनिष्ठ लोक कर्माप्रमाणे उत्तम लोक प्राप्त करून घेतात. सत्य, दया, दान, स्वस्त्रीगमन, द्रोह न करणारे, सर्वांना सारखे मानणारे, चातुर्वण्यातीत अशा वृत्तीचे लोक स्वर्गाला जातात.
हे राजा, त्रेता व द्वापर युगांत हीच स्थिती असते. कलियुगातील पापी लोक नरकात जातात व युग संपल्यावर पृथ्वीवर जन्माला येतात. कलियुगाचा अंत हाच सत्ययुगाचा प्रारंभ होय. द्वापराचा अंत म्हणजे कलियुगाचा आरंभ, असा हा चक्रनेमिक्रण चालू आहे. कालाचा स्वभाव बदलत नाही. कलिकाल हा पापी आहे.
कलियुगातील साधु द्वापरात उत्पन्न झालेले असतात. द्वापरातील साधु त्रेता व सत्ययुगात जन्मास येतात. पण दुराचारी मात्र कलियुगात जन्मास येतात. कर्माप्रमाणे त्यांना दुःखे प्राप्त होतात.''
जनमेजय म्हणाला, ''हे मुने, आपण युगधर्माविषयी मला सांगा.''
व्यास म्हणाले, ''हे राजेंद्रा, युगस्वभावामुळे अंत:करणाला भ्रम होतो. धर्मवेत्ता असूनही तुझ्या पित्याने विप्राची मृतसर्प कंठात अडकवून अवहेलना केली. युगाचे बल जाणून सुज्ञ पुरुषाने धर्मकर्म करावे.
सत्युयगात ब्राह्मण वेदशास्त्रज्ञ, पराशक्तीची सेवा करण्यात तत्पर, गायत्रीचे ध्यान करणारे, देवीची उपासना करणारे, भुवनेश्वरीचा मंत्र जपणारे, धार्मिक, शुद्ध व दयाळू होते. क्षत्रिय प्रजाहित करीत असताना वेदकर्मरत होते व पंडित होते. सत्ययुगात चारी वर्णाचे लोक असताना सर्वजण धर्माचरण करणारे होते. तसेच जगदंबेची ते आराधना करीत.
त्रेतायुगात धार्मिकता कमी झाली. पूर्वीचे राक्षस कलियुगात ब्राह्मण होते. म्हणून ते ब्राह्मण धर्मरहित, पाखंडी, दांभिक, व्यवहारचतुर, वेदरहित, निंदक, शूर, वृथा बडबडणारे, धर्मापासून च्युत झालेले असे असतात.
जसजसा कलीचा प्रभाव वाढतो तसतसा धर्म क्षय पावतो, चारी वर्णांचे लोक स्वधर्मरहित होतात. सर्वत्र पापाचार माजतो, स्त्रिया स्वैराचारी होऊन काम, मोह, पातक, परपीडा देणार्या, पतीची फसवणूक करणार्या पापतत्पर असलेल्या अशा निर्माण होतात.
शुद्ध आहारानेच चित्त शुद्ध होते. चित्त शुद्ध असल्यास धर्माचा प्रभाव दृढ होतो. वर्णसंकर झाल्यास धर्म संकर होऊ लागतो. कलियुगात धर्मज्ञही अधर्माने वागतात. या युगात पापचरण हे मनुष्याच्या स्वभावातच असते. त्याचे निवारण करता येणार नाही.
त्यासाठी एकच उपाय आहे. तो म्हणजे देवीच्या चरणांचे दर्शन करणे. देवीच्या नामामृताने पापाचा नाश होतो. या उपायाने भीती नाहीशी होते. सहजगत्या भगवतीचे नाव उच्चारले तरी जे फल मिळते, तेवढे फल देण्यास प्रत्यक्ष इंद्र वगैरेही समर्थ नाहीत. पुण्यक्षेत्री देवीचे नाव घेतल्यास काळाचीही भीती नाही. चित्तशुद्ध करून देवीची भक्ती केल्यास पापमोचन होते.
हे जनमेजय राजा, मी तुला हे शास्त्ररहस्य सांप्रत निवेदन केले. तू देवीच्या चरणांचे स्मरण कर, अजपा नावाचा जप पुष्कळजण करतात. पण त्यांना त्याची महती माहित नसते. कारण ते मायेने मोहित असतात. आता तुला युगधर्माच्या विषयी आणखी काय ऐकायचे आहे ?