जनमेजय उवाच
कथितं चरितं ब्रह्मञ्छक्रस्याद्भुतकर्मणः ।
स्थानभ्रंशस्तथा दुःखप्राप्तिरुक्ता विशेषतः ॥ १ ॥
यत्र देवाधिदेव्याश्च महिमातीव वर्णितः ।
सन्देहोऽत्र ममाप्यस्ति यच्छक्रोऽपि महातपाः ॥ २ ॥
देवाधिपत्यमासाद्य दुःसहं दुःखमन्वभूत् ।
मखानां तु शतं कृत्वा प्राप्तं स्थानमनुत्तमम् ॥ ३ ॥
देवेशत्वं च सम्प्राप्य भ्रष्टः स्थानादसौ कथम् ।
एतत्सर्वं समाचक्ष्व कारणं करुणानिधे ॥ ४ ॥
सर्वज्ञोऽसि मुनिश्रेष्ठ पुराणानां प्रवर्तकः ।
नावाच्यं महतां किञ्चिच्छिष्ये च श्रद्धयान्विते ॥ ५ ॥
तस्मात्कुरु महाभाग मत्सन्देहापनोदनम् ।
सूत उवाच
इति पृष्टः स राज्ञा वै तदा सत्यवतीसुतः ॥ ६ ॥
तमाहातिप्रसन्नात्मा यथानुक्रममुत्तरम् ।
व्यास उवाच
निबोध नृपतिश्रेष्ठ कारणं परमाद्भुतम् ॥ ७ ॥
कर्मणस्तु त्रिधा प्रोक्ता गतिस्तत्त्वविदां वरैः ।
सञ्चितं वर्तमानं च प्रारब्धमिति भेदतः ॥ ८ ॥
अनेकजन्मसञ्जातं प्राक्तनं सञ्चितं स्मृतम् ।
सात्त्विकं राजसं कर्म तामसं त्रिविधं पुनः ॥ ९ ॥
शुभं वाप्यशुभं भूप सञ्चितं बहुकालिकम् ।
अवश्यमेव भोक्तव्यं सुकृतं दुष्कृतं तथा ॥ १० ॥
जन्मजन्मनि जीवानां सञ्चितानां च कर्मणाम् ।
निःशेषस्तु क्षयो नाभूत्कल्पकोटिशतैरपि ॥ ११ ॥
क्रियमाणं च यत्कर्म वर्तमानं तदुच्यते ।
देहं प्राप्य शुभं वापि ह्यशुभं वा समाचरेत् ॥ १२ ॥
सञ्चितानां पुनर्मध्यात्समाहृत्य कियान्किल ।
देहारम्भे च समये कालः प्रेरयतीव तत् ॥ १३ ॥
प्रारब्धं कर्म विज्ञेयं भोगात्तस्य क्षयः स्मृतः ।
प्राणिभिः खलु भोक्तव्यं प्रारब्धं नात्र संशयः ॥ १४ ॥
पुरा कृतानि राजेन्द्र ह्यशुभानि शुभानि च ।
अवश्यमेव कर्माणि भोक्तव्यानीति निश्चयः ॥ १५ ॥
देवैर्मनुष्यैरसुरैर्यक्षगन्धर्वकिन्नरैः ।
कर्मैव हि महाराज देहारम्भस्य कारणम् ॥ १६ ॥
कर्मक्षये जन्मनाशः प्राणिनां नात्र संशयः ।
ब्रह्मा विष्णुस्तथा रुद्र इन्द्राद्याश्च सुरास्तथा ॥ १७ ॥
दानवा यक्षगन्धर्वाः सर्वे कर्मवशा किल ।
अन्यथा देहसम्बन्धः कथं भवति भूपते ॥ १८ ॥
कारणं यस्तु भोगस्य देहिनः सुखदुःखयोः ।
तस्मादनेकजन्मोत्थसञ्चितानां च कर्मणाम् ॥ १९ ॥
मध्ये वेगः समायाति कस्यचित्कालपाकतः ।
तत्प्रारब्धवशात्पुण्यं करोति च यथा तथा ॥ २० ॥
पापं करोति मनुजस्तथा देवादयोऽपि च ।
तथा नारायणो राजन्नरश्च धर्मजावुभौ ॥ २१ ॥
जातौ कृष्णार्जुनौ काममंशौ नारायणस्य तौ ।
पुराणपीठिकेयं वै मुनिभिः परिकीर्तिता ॥ २२ ॥
देवांशः स तु विज्ञेयो यो भवेद्विभवाधिकः ।
नानृषिः कुरुते काव्यं नारुद्रो रुद्रमर्चते ॥ २३ ॥
नादेवांशो ददात्यन्नं नाविष्णुः पृथिवीपतिः ।
इन्द्रादग्नेर्यमाद्विष्णोर्धनदादिति भूपते ॥ २४ ॥
प्रभुत्वं च प्रभावं च कोपं चैव पराक्रमम् ।
आदाय क्रियते नूनं शरीरमिति निश्चयः ॥ २५ ॥
यः कश्चिद्बलवाँल्लोके भाग्यवानथ भोगवान् ।
विद्यावान्दानवान्वापि स देवांशः प्रपढ्यते ॥ २६ ॥
तथैवैते मयाख्याता पाण्डवाः पृथिवीपते ।
देवांशो वासुदेवोऽपि नारायणसमद्युतिः ॥ २७ ॥
शरीरं प्राणिनां नूनं भाजनं सुखदुःखयोः ।
शरीरी प्राप्नुयात्कामं सुखं दुःखमनन्तरम् ॥ २८ ॥
देही नास्ति वशः कोऽपि दैवाधीनः सदैव हि ।
जननं मरणं दुःखं सुखं प्राप्नोति चावशः ॥ २९ ॥
पाण्डवास्ते वने जाताः प्राप्तास्तु स्वगृहं पुनः ।
स्वबाहुबलतः पश्चाद्राजसूयं क्रतूत्तमम् ॥ ३० ॥
वनवासं पुनः प्राप्ता बहुदुःखकरं परम् ।
अर्जुनेन तपस्तप्तं दुष्करं ह्यजितेन्द्रियैः ॥ ३१ ॥
सन्तुष्टैस्तु सुरैर्दत्तं वरदानं पुनः शुभम् ।
नरदेहकृतं पुण्यं क्व गतं वनवासजम् ॥ ३२ ॥
नरदेहे तपस्तप्तं चोग्रं बदरिकाश्रमे ।
नार्जुनस्य शरीरे तत्फलदं सम्बभूव ह ॥ ३३ ॥
प्राणिनां देहसम्बन्धे गहना कर्मणो गतिः ।
दुर्ज्ञेया सर्वथा देवैर्मानवानां तु का कथा ॥ ३४ ॥
वासुदेवोऽपि सञ्जातः कारागारेऽतिसङ्कटे ।
नीतोऽसौ वसुदेवेन नन्दगोपस्य गोकुलम् ॥ ३५ ॥
एकादशैव वर्षाणि संस्थितस्तत्र भारत ।
पुनः स मथुरां गत्वा जघानोग्रसुतं बलात् ॥ ३६ ॥
मोचयामास पितरौ बन्धनाद्भृशदुःखितौ ।
उग्रसेनं च राजानञ्चकार मधुरापुरे ॥ ३७ ॥
जगाम द्वारवत्यां स म्लेच्छराजभयात्पुनः ।
सर्वं भाविवशात्कृष्णः कृतवान्पौरुषं महत् ॥ ३८ ॥
कृत्वा कार्याण्यनेकानि द्वारवत्यां जनार्दनः ।
देहं त्यक्त्वा प्रभासे तु सकुटुम्बो दिवं गतः ॥ ३९ ॥
पुत्राः पौत्राश्च सुहृदो भ्रातरो जामयस्तथा ।
प्रभासे यादवाः सर्वे विप्रशापात्क्षयं गताः ॥ ४० ॥
एवं ते कथिता राजन् कर्मणो गहना गतिः ।
वासुदेवोऽपि व्याधस्य बाणेन निधनं गतः ॥ ४१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां षष्ठस्कन्धे कर्मणां
गहनगतिवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
कर्माचे स्वरुप -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''हे ब्रह्मन्, इंद्राचे संपूर्ण, अद्भुत चरित्र आपण मला सांगितले. पण आता माझ्या मनात पुन: संशय उत्पन्न झाला आहे. इंद्राला देवांचे अधिपत्य मिळवल्यावरही दुःख भोगावे लागले. शंभर ऋतु करून उत्तम स्थान मिळाल्यावर तो च्युत कसा झाला ? आपण पुराणकर्ते आहात. शिष्याला न सांगण्यासारखे त्रैलोक्यात काही नसते.''
जनमेजयाचा हा प्रश्न ऐकून व्यास म्हणाले, "हे नृपश्रेष्ठा, श्रेष्ठ तत्त्ववेत्यांनी कर्मगती तीन प्रकारच्या सांगितल्या आहेत. संचित, वर्तमान व प्रारब्ध अशा त्या होत. अनेक जन्मांतील कर्माला संचित कर्म म्हणतात. ते सात्त्विक राजस व तामस अशा तीन प्रकारचे असते.
हे भूपाला, संचित कर्म अशुभ व शुभ असे असते. ते कार्य शेकडो कल्प उलटले तरी नष्ट होत नाही. ते फलपरत्वे भोगावे लागते.
विद्यमान कालातील कर्माला वर्तमान म्हणतात. देहप्राप्तीनंतर त्याचे शुभाशुभ फल प्राणी आचरीत असतो.
देहाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रत्येकजण संचित कर्म बरोबर आणतो. हे प्रारब्ध कर्म प्रत्येक प्राण्याला भोगावेच लागते. मग तो मनुष्य, देव, असुर, यक्ष, किन्नर यांपैकी कोणत्याही योनीत जन्मला तरी ती कर्मे त्याच्यापासून सुटत नाहीत.
कर्मामुळे देह उत्पन्न होतो. प्राण्याच्या कर्माच्या क्षयाबरोबर त्यांची जन्मपरंपरा क्षय पावत असते. हा देहच प्राण्याच्या कर्माच्या उपभोगाचे कारण होय. ज्यावेळी कर्माला गती मिळते तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात.
या तत्त्वाप्रमाणे हरीचे अंश नर - नारायण हे पुढे कृष्ण व अर्जुन झाले. म्हणून सर्व काही दैवाधीन आहे. जो वैभवसंपन्न असेल त्याच्यात दैवांश असे मानावे. ऋषी असेल तरच काव्य अथवा ज्ञान प्राप्त होते. रुद्रांश असलेला रुद्राचा उपासक होतो. देवांश असलेला अन्नदान करतो. विष्णूचा अंश असलेला राजा होतो.
इंद्र, अग्नी, यम, विष्णु, कुबेर ह्यांच्या अंशांतून प्रभुत्व, प्रभाव, कोप, पराक्रम ह्या गुणांनी शरीर युक्त होते म्हणून पराक्रमी अथवा दानशुराला देवांश म्हणतात.
म्हणून पांडवांना देवांश म्हणायचे. देहधारी प्राण्याला सुखदुःखे असतातच. कारण कोणीही स्वतंत्र नाही. ते दैवाधीन आहेत. म्हणूनच दैवाधीनतेमुळे जन्म, मरण, सुख, दुःख ही प्राप्त होत असतात.
पांडवांचा जन्म वनात झाला. त्यांनी राजसूय ऋतू केला. तरीही त्यांना वनवास भोगावा लागला.
इंद्रिय ताब्यात नसलेल्यांनी तप केले तरी देव वर देतात. अखंड ब्रह्मचर्याने वनात राहूनही दुःख भोगावे लागतेच. अर्जुनानेही बद्रिकाश्रमात उग्र तप केले.
सारांश, देहाविषयी प्राण्यांची कर्मगती गहन असते. ती देवांनाही समजणे कठीण आहे, मग मनुष्याची काय कथा ?
वासुदेवाला कारागृहात जन्म घ्यावा लागला. नंदांच्या घरी त्याला अकरा वर्षे रहावे लागले. मथुरेस जाऊन त्याने स्वपराक्रमाने कंसांचा वध केला व कंसाच्या मातापित्यांना कारागृहातून सोडविले. त्याने उग्रसेनाला राज्य दिले.
दैवामुळेच कृष्णाच्या हातून हे कार्य झाले. पण अखेर प्रभास क्षेत्रावर त्याने देहत्याग केला व तो सहकुटुंब स्वर्गास गेला. तसेच कृष्णाचे पुत्र, पौत्रादि आप्तही विप्रशापाने नष्ट झाले.
अशाप्रकारे हे जनमेजया, तुला मी कर्माची गती सांगितली. केवळ कर्मगतीमुळेच व्याधाचा बाण लागून कृष्णास मृत्यू आला.