व्यास उवाच
एवं प्राप्तवरा देवा ऋषयश्च तपोधनाः ।
(जग्मुः सर्वे च सम्मन्त्र्य वृत्रस्याश्रममुत्तमम् ।)
ददृशुस्तत्र तं वृत्रं ज्वलन्तमिव तेजसा ॥ १ ॥
धक्ष्यन्तमिव लोकांस्त्रीन्ग्रसन्तमिव चामरान् ।
ऋषयोऽथ ततोऽभ्येत्य वृत्रमूचुः प्रियं वचः ॥ २ ॥
देवकार्यार्थसिद्ध्यर्थं सामयुक्तं रसात्मकम् ।
ऋषय ऊचुः
वृत्र वृत्र महाभाग सर्वलोकभयङ्कर ॥ ३ ॥
व्याप्तं त्वयैतत्सकलं ब्रह्माण्डमखिलं किल ।
शक्रेण तव वैरं यत्तत्तु सौख्यविघातकम् ॥ ४ ॥
युवयोर्दुःखदं कामं चिन्तावृद्धिकरं परम् ।
न त्वं स्वपिषि सन्तुष्टो न चापि मघवा तथा ॥ ५ ॥
सुखं स्वपिति चिन्तार्तो द्वयोर्यद्वैरिजं भयम् ।
युवयोर्युध्यतोः कालो व्यतीतस्तु महानिह ॥ ६ ॥
पीड्यन्ते च प्रजाः सर्वाः सदेवासुरमानवाः ।
संसारेऽत्र सुखं ग्राह्यं दुःखं हेयमिति स्थितिः ॥ ७ ॥
न सुखं कृतवैरस्य भवतीति विनिर्णयः ।
संग्रामरसिकाः शूराः प्रशंसन्ति न पण्डिताः ॥ ८ ॥
युद्धं शृङ्गारचतुरा इन्द्रियार्थविघातकम् ।
पुष्पैरपि न योद्धव्यं किं पुनर्निशितैः शरैः ॥ ९ ॥
युद्धे विजयसन्देहो निश्चयं बाणताडनम् ।
दैवाधीनमिदं विश्वं तथा जयपराजयौ ॥ १० ॥
दैवाधीनाविति ज्ञात्वा न योद्धव्यं कदाचन ।
कालेऽथ भोजनं स्नानं शय्यायां शयनं तथा ॥ ११ ॥
परिचर्यापरा भार्या संसारे सुखसाधनम् ।
किं सुखं युध्यतः संख्ये बाणवृष्टिभयङ्करे ॥ १२ ॥
खड्गपातातिरौद्रे च तथारातिसुखप्रदे ।
संग्रामे मरणात्स्वर्गसुखप्राप्तिरिति स्फुटम् ॥ १३ ॥
प्रलोभनपरं वाक्यं नोदनार्थं निरर्थकम् ।
छित्त्वा देहं व्यथां प्राप्य शृगालकरटादिभिः ॥ १४ ॥
पश्चात्स्वर्गसुखावाप्तिं को वा वाञ्छति मन्दधीः ।
सख्यं भवतु ते वृत्र शक्रेण सह नित्यदा ॥ १५ ॥
अवाप्स्यसि सुखं त्वं च शक्रश्चापि निरन्तरम् ।
वयं च तापसाः सर्वे गन्धर्वाश्च निजाश्रमे ॥ १६ ॥
सुखवासं गमिष्यामः शान्ते वैरेऽधुनैव वाम् ।
संग्रामे युवयोर्धीर वर्तमाने दिवानिशम् ॥ १७ ॥
पीड्यन्ते मुनयः सर्वे गन्धर्वाः किन्नरा नराः ।
सर्वेषां शान्तिकामानां सख्यमिच्छामहे वयम् ॥ १८ ॥
मुनयस्त्वं च शक्रश्च प्राप्नुवन्तु सुखं किल ।
मध्यस्थाश्च वयं वृत्र युवयोः सख्यकारणे ॥ १९ ॥
शपथं कारयित्वात्र योजयामो मिथः प्रियम् ।
शक्रस्तु शपथान्कृत्वा यथोक्तांश्च तवाग्रतः ॥ २० ॥
चित्तं ते प्रीतिसंयुक्तं करिष्यति तु साम्प्रतम् ।
सत्याधारा धरा नूनं सत्येन च दिवाकरः ॥ २१ ॥
तपत्ययं यथाकालं वायुः सत्येन वात्यथ ।
उदन्वानपि मर्यादां सत्येनैव न मुञ्चति ॥ २२ ॥
तस्मात्सत्येन सख्यं वा भवत्वद्य यथासुखम् ।
एकत्र शयनं क्रीडा जलकेलिं सुखासनम् ॥ २३ ॥
युवाभ्यां सर्वथा कार्यं कर्तव्यं सख्यमेत्य च ।
व्यास उवाच
महर्षिवचनं श्रुत्वा तानुवाच महामतिः ॥ २४ ॥
अवश्यं भगवन्तो मे माननीयास्तपस्विनः ।
भवन्तो मुनयः क्वापि न मिथ्यावादिनो भृशम् ॥ २५ ॥
सदाचाराः सुशान्ताश्च न विदुश्छलकारणम् ।
कृतवैरे शठे स्तब्धे कामुके च गतत्विषि ॥ २६ ॥
निर्लज्जे नैव कर्तव्यं सख्यं मतिमता सदा ।
निर्लज्जोऽयं दुराचारो ब्रह्महा लम्पटः शठः ॥ २७ ॥
न विश्वासस्तु कर्तव्यः सर्वथैवेदृशे जने ।
भवन्तो निपुणाः सर्वे न द्रोहमतयः सदा ॥ २८ ॥
अनभिज्ञास्तु शान्तत्वाच्चित्तानामतिवादिनाम् ।
मुनय ऊचुः
जन्तुः कृतस्य भोक्ता वै शुभस्य त्वशुभस्य च ॥ २९ ॥
द्रोहं कृत्वा कुतः शान्तिमाप्नुयान्नष्टचेतनः ।
विश्वासघातकर्तारो नरकं यान्ति निश्चयम् ॥ ३० ॥
दुःखं च समवाप्नोति नूनं विश्वासघातकः ।
निष्कृतिर्ब्रह्महन्तॄणां सुरापानां च निष्कृतिः ॥ ३१ ॥
विश्वासघातिनां नैव मित्रद्रोहकृतामपि ।
समयं ब्रूहि सर्वज्ञ यथा ते चेतसि ध्रुवम् ॥ ३२ ॥
तेनैव समयेनाद्य सन्धिः स्यादुभयोः किल ।
वृत्र उवाच
न शुष्केण न चार्द्रेण नाश्मना न च दारुणा ॥ ३३ ॥
न वज्रेण महाभाग न दिवा निशि नैव च ।
वध्यो भवेयं विप्रेन्द्राः शक्रस्य सह दैवतैः ॥ ३४ ॥
एवं मे रोचते सन्धिः शक्रेण सह नान्यथा ।
व्यास उवाच
ऋषयस्तं तदा प्राहुर्बाढमित्येव चादृताः ॥ ३५ ॥
समयं श्रावयामासुस्तत्रानीय सुरेश्वरम् ।
इन्द्रोऽपि शपथांस्तत्र चकार विगतज्वरः ॥ ३६ ॥
साक्षिणं पावकं कृत्वा मुनीनां सन्निधौ किल ।
वृत्रस्तु वचनैस्तस्य विश्वासमगमत्तदा ॥ ३७ ॥
बभूव मित्रवच्छक्रे सहचर्यापरायणः ।
कदाचिन्नन्दने चोभौ कदाचिद्गन्धमादने ॥ ३८ ॥
कदाचिदुदधेस्तीरे मोदमानौ विचेरतुः ।
एवं कृते च सन्धाने वृत्रः प्रमुदितोऽभवत् ॥ ३९ ॥
शक्रोऽपि वधकामस्तु तदुपायानचिन्तयत् ।
रन्ध्रान्वेषी समुद्विग्नस्तदासीन्मघवा भृशम् ॥ ४० ॥
एवं चिन्तयतस्तस्य कालः समभिवर्तत ।
विश्वासं परमं प्राप वृत्रः शक्रेऽतिदारुणे ॥ ४१ ॥
एवं कतिचिदब्दानि गतानि समये कृते ।
वृत्रस्य मरणोपायान्मनसीन्द्रोऽप्यचिन्तयत् ॥ ४२ ॥
त्वष्टैकदा सुतं प्राह विश्वस्तं पाकशासने ।
पुत्र वृत्र महाभाग शृणु मे वचनं हितम् ॥ ४३ ॥
न विश्वासस्तु कर्तव्यः कृतवैरे कथञ्चन ।
मघवा कृतवैरस्ते सदासूयापरः परैः ॥ ४४ ॥
लोभान्मत्तो द्वेषरतः परदुःखोत्सवान्वितः ।
परदारलम्पटः स पापबुद्धिः प्रतारकः ॥ ४५ ॥
रन्ध्रान्वेषी द्रोहपरो मायावी मदगर्वितः ।
यः प्रविश्योदरे मातुर्गर्भच्छेदं चकार ह ॥ ४६ ॥
सप्तकृत्वः सप्तकृत्वः क्रन्दमानमनातुरः ।
तस्मात्पुत्र न कर्तव्यो विश्वासस्तु कथञ्चन ॥ ४७ ॥
कृतपापस्य का लज्जा पुनः पुत्र प्रकुर्वतः ।
व्यास उवाच
एवं प्रबोधितः पित्रा वचनैर्हेतुसंयुतैः ॥ ४८ ॥
न बुबोध तदा वृत्र आसन्नमरणः किल ।
स कदाचित्समुद्रान्ते तमपश्यन्महासुरम् ॥ ४९ ॥
सन्ध्याकाल उपावृत्ते मुहूर्तेऽतीव दारुणे ।
ततः सञ्चिन्त्य मघवा वरदानं महात्मनाम् ॥ ५० ॥
सन्ध्येयं वर्तते रौद्रा न रात्रिर्दिवसो न च ।
हन्तव्योऽयं मया चाद्य बलेनैव न संशयः ॥ ५१ ॥
एकाकी विजने चात्र सम्प्राप्तः समयोचितः ।
एवं विचार्य मनसा सस्मार हरिमव्ययम् ॥ ५२ ॥
तत्राजगाम भगवानदृश्यः पुरुषोत्तमः ।
वज्रमध्ये प्रविश्यासौ संस्थितो भगवान्हरिः ॥ ५३ ॥
इन्द्रो बुद्धिं चकाराशु तदा वृत्रवधं प्रति ।
इति सञ्चिन्त्य मनसा कथं हन्यां रिपुं रणे ॥ ५४ ॥
अजेयं सर्वथा सर्वदेवैश्च दानवैस्तथा ।
यदि वृत्रं न हन्म्यद्य वञ्चयित्वा महाबलम् ॥ ५५ ॥
न श्रेयो मम नूनं स्यात्सर्वथा रिपुरक्षणात् ।
अपां फेनं तदापश्यत्समुद्रे पर्वतोपमम् ॥ ५६ ॥
नायं शुष्को न चार्द्रोऽयं न च शस्त्रमिदं तथा ।
अपां फेनं तदा शक्रो जग्राह किल लीलया ॥ ५७ ॥
परां शक्तिं च सस्मार भक्त्या परमया युतः ।
स्मृतमात्रा तदा देवी स्वांशं फेने न्यधापयत् ॥ ५८ ॥
वज्रं तदावृतं तत्र चकार हरिसंयुतम् ।
फेनावृतं पविं तत्र शक्रश्चिक्षेप तं प्रति ॥ ५९ ॥
सहसा निपपाताशु वज्राहत इवाचलः ।
वासवस्तु प्रहृष्टात्मा बभूव निहते तदा ॥ ६० ॥
ऋषयश्च महेन्द्रं तमस्तुवन्विविधैः स्तवैः ।
हतशत्रुः प्रहृष्टात्मा वासवः सह दैवतैः ॥ ६१ ॥
देवीं सम्पूजयामास यत्प्रसादाद्धतो रिपुः ।
प्रसादयामास तदा स्तोत्रैर्नानाविधैरपि ॥ ६२ ॥
देवोद्याने पराशक्तेः प्रासादमकरोद्धरिः ।
पद्मरागमयीं मूर्तिं स्थापयामास वासवः ॥ ६३ ॥
त्रिकालं महतीं पूजां चक्रुः सर्वेऽपि निर्जराः ।
तदाप्रभृति देवानां श्रीदेवी कुलदैवतम् ॥ ६४ ॥
विष्णुं त्रिभुवनश्रेष्ठं पूजयामास वासवः ।
ततो हते महावीर्ये वृत्रे देवभयङ्करे ॥ ६५ ॥
प्रववौ च शिवो वायुर्जहृषुर्देवतास्तथा ।
हते तस्मिन्सगन्धर्वा यक्षराक्षसकिन्नराः ॥ ६६ ॥
इत्थं वृत्रः पराशक्तिप्रवेशयुतफेनतः ।
तया कृतविमोहाच्च शक्रेण सहसा हतः ॥ ६७ ॥
ततो वृत्रनिहन्त्रीति देवी लोकेषु गीयते ।
शक्रेण निहतत्वाच्च शक्रेण हत उच्यते ॥ ६८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या
संहितायां षष्ठस्कन्धे छद्मेनेन्द्रेण फेनद्वारा पराशक्ति-
स्मरणमूर्वकं वृत्रहननवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
वृत्रासुराचा वध -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
देवीचा वर प्राप्त झाल्यावर सर्वांनी विचार केला. ते वृत्राच्या आश्रमाकडे गेले. तेथे तो वृत्र स्वतेजाने झळकत होता.
ऋषी त्याला म्हणाले, ''हे महाभाग्यवान वृत्रा, तू स्वसामर्थ्याने सर्व विश्व व्यापले, व सर्वांना भय निर्माण केलेस. पण इंद्राशी असलेले तुझे वैर सुखाचा नाश करणारे आहे. कारण दोघांनाही शत्रूबद्दलच्या चिंतेने सुखाने निद्रा मिळत नाही. आता बराच काल लोटला असून देव, मानव, असुर सर्वांना त्रास झाला आहे.
हे वृत्रा, दुःखाचा त्याग करून सुख भोगावे. कुणाशीही वैर करण्यात सुख नाही. युद्धामुळे विषय सुख नष्ट होते. पुष्पांनीही युद्ध करू नये मग बाणांचा विचार कशाला! युद्धात विजयाची निश्चिती नसते, पण प्रहार निश्चित असतात.
सर्व विश्व व यश - अपयश हे दैवाधीन आहे. योग्य त्या वेळी भोजन, शयन, परिचर्या, स्त्रीसुख हीच उत्तम सुखे होत. युद्धामुळे हे प्राप्त होत नाही. युद्धात मरण आल्यावर स्वर्गसुख मिळते असे म्हणणे म्हणजे केवळ विनोदच आहे.
हे वृत्रा, तुमचे दोघांचे सख्य झाल्यास दोघांनाही सुख प्राप्त होईल. युद्धाचे निवारण झाल्यामुळे ऋषी, मुनी आपापल्या आश्रमांत जातील. तुमच्या अहोरात्र संग्रामामुळे ऋषी, यक्ष, किन्नर, गंधर्व, मानव या सर्वांना त्रास होत आहे. शमाचे अवलंबन करण्यासाठी आम्ही शांततेची मागणी करीत आहोत व तुमच्या मैत्रीची इच्छा करीत आहोत.
हे वृत्रा, आम्ही तुमचे सख्य होण्यासाठी मध्यस्त होऊ. आम्ही उभयतांकडून शपथा घेववू, पृथ्वी सत्याधारेच स्थित आहे. सूर्य सत्यामुळेच प्रकाशतो, वायू सत्यासाठी वाहतो, समुद्र सत्यामुळेच मर्यादा उल्लंघन करीत नाही. त्या सत्यासाठीच तुम्ही उभयतांचे सख्य होईल. सख्य झाल्यावर तुम्ही दोघेही शयन, क्रीडा, सुखे एकत्र भोगावी."
ऋषीचे भाषण ऐकून महामती वृत्र म्हणाला, '' हे तपस्व्यांनो मी तुम्हाला मान देतो, कारण तुम्ही असत्य वदणार नाही. तुम्हाला कपट माहीत नाही. पण हा इंद्र निर्लज्ज, दुराचारी, ब्रह्मघातकी, लंपट व शठ आहे. अशा पुरुषावर विश्वास ठेवू नये. तुम्ही सदाचारी आहात. तुम्ही शांत असून द्रोह न करणारे आहात. म्हणून कपटी पुरुषांची मते तुम्ही जाणू शकत नाहीत.''
ऋषी म्हणाले, ''शुभ फलाची इच्छा करणार्याने द्रोह केल्यास शांती कशी मिळेल ? विश्वासघातक्याला दुःख भोगावेच लागते, म्हणून तू आता मनातील विचार सोडून दे. तुझ्या संकेताप्रमाणे तुमचे सख्य आम्ही घडवू." वृत्र म्हणाला, ''हे विप्रश्रेष्ठहो, शुष्क पदार्थ, आर्द्र पदार्थ, पाषाण, काष्ठ वज्र यांपासून दिवसा आणि रात्री तसेच त्या इंद्रपासून माझा वध न होईल याच संकेतावर सख्य होईल, नाहीतर अशक्य आहे.''
ऋषींनी होकार देऊन इंद्राला तेथे आणले. त्याला संकेत निवेदन केला. इंद्राने त्या ऋषींसमोर अग्नीला साक्ष ठेवून शपथ घेतली. त्यामुळे वृत्राचा विश्वास बसला. त्या दिवसापासून तो इंद्राशी मित्रत्वाने राहू लागला. ते दोघेही गंधमादनावर, समुद्रावर अथवा नंदनवनात आनंदाने विहार करू लागले.
वृत्र आनंदित झाला होता, पण इंद्र मात्र मनात त्याच्या वधाची योजना करीत होता. सख्य केल्यापासून तो अधिकच उद्विग्न झाला होता. मध्यंतरी बराच काळ उलटला. तेवढयात वृत्राचा इंद्रावर विश्वास बसला, पण इंद्र मात्र कपटी होता.
इंद्रावर विश्वास ठेवणार्या पुत्राला त्वष्टा म्हणाला, "हे भाग्यवान पुत्रा, वैर्यावर विश्वास ठेवू नये. इंद्रसुद्धा तुझा मत्सर करतो. सांप्रत तो लोभासाठी तसा वागत आहे. दुसर्याच्या दुःखाने त्याला आनंद होतो. तो पापी, स्त्रीलंपट, फसवा, छिद्रान्वेषी, द्रोहतत्पर, मायावी असा आहे. तो गर्विष्ठ झाला आहे.
पूर्वी याने मातेच्या उदरात शिरून त्यातील गर्भाचे तुकडे केले होते. ज्याने एकदा पाप केले आहे तो पुन: पाप करण्यास लाजणार नाही. म्हणून तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हे माझे हिताचे बोलणे ऐक.''
पण पित्याने असे सांगितल्यावरही वृत्राला उमज पडला नाही.
एके दिवशी सायंकाळच्या वेळी तो वृत्रासुर एकटाच समुद्रकिनारी विहार करीत होता. त्याला पाहून इंद्राने विचार केला, "आता दिवस वा रात्र नसून संध्यासमय आहे. आता बुद्धीचातुर्याने त्याचा वध करावा." असा विचार करून इंद्राने हरीचे स्मरण केले. तेव्हा तो पुरुषोत्तम गुप्त रूपाने तेथे प्राप्त झाला. त्या हरीने इंद्राच्या वज्रात प्रवेश केला. त्यावेळी इंद्राने वृत्राच्या वधाचा निश्चय केला.
'या अजिंक्य शत्रूचा कपटाने मी जर वध केला नाही तर शत्रूचे रक्षण होऊन माझे अकल्याण होईल.''
असा विचार करताच समुद्रातील जलावर असलेल्या फेनाकडे त्याने सहज पाहिले. हा फेन शुष्क नाही अथवा आर्द्र नाही. इंद्राने हातात फेन घेऊन त्या पराशक्तीचे स्मरण केले. तेव्हा देवीचा अंश फेनात प्रविष्ट झाला. इंद्राने विष्णुयुक्त वज्र फेनाने व्यापून ठेवले. ते त्याने सत्वर वृत्रावर फेकले. तेव्हा तो पर्वततुल्य वृत्र धाडकन भूमीवर कोसळला आणि तत्काळ मृत झाला.
शत्रूचा वध झाल्याने इंद्राने देवासह आनंदाने देवीची स्तुती केली. विविध स्तोत्रे गाऊन तिला प्रसन्न करून घेतले.
नंतर इंद्राने नंदनवनात देवीचे प्रचंड देवालय बांधले, त्यात पद्मरागमय मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून देवीलाच इंद्राने आपले कुलदैवत मानले. तसेच तो विष्णूचीही पूजा करू लागला.
अशाप्रकारे देवांना घाबरवून सोडणार्या वृत्राचा वध झाला. देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर आनंदित झाले. वस्तुत: फेनात देवीने प्रवेश केल्यामुळे वृत्राचा वध झाला म्हणून देवीला वृत्रनिहंत्री असे म्हणतात. इंद्राच्या कारणाने वृत्राचा वध झाल्याने वृत्राला शक्रहन नाव मिळाले.