श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
द्वितीयोऽध्यायः


त्रिशिरवधानन्तरं वृत्रोत्पत्तिवर्णनम्

व्यास उवाच
अथ स लोभमुपेत्य सुराधिपः
    समधिगम्य गजासनसंस्थितः ।
त्रिशिरसं प्रति दुष्टमतिस्तदा
    मुनिमपश्यदमेयपराक्रमम् ॥ १ ॥
तमभिवीक्ष्य दृढासनसंस्थितं
    जितगिरं सुसमाधिवशं गतम् ।
रविविभावसुसन्निभमोजसा
    सुरपतिः परमापदमभ्यगात् ॥ २ ॥
कथमसौ विनिहन्तुमहो मया
    मुनिरपापमतिः किल सम्मतः ।
रिपुरयं सुसमिद्धतपोबलः
    कथमुपेक्ष्य इहासनकामुकः ॥ ३ ॥
इति विचिन्त्य पविं परमायुधं
    प्रति मुमोच मुनिं तपसि स्थितम् ।
शशिदिवाकरसन्निभमाशुगं
    त्रिशिरसं सुरसङ्घपतिः स्वयम् ॥ ४ ॥
तदभिघातहतः स धरातले
    किल पपात ममार च तापसः ।
शिखरिणः शिखरं कुलिशार्दितं
    निपतितं भुवि चाद्‌भुतदर्शनम् ॥ ५ ॥
तं निहत्य मुदमाप सुरेश-
    श्चुक्रुशुश्च मुनयस्तु संस्थिताः ।
हा हतेति भृशमार्तनिःस्वनाः
    किं कृतं शतमखेन पापिना ॥ ६ ॥
विनापराधं तपसां निधिर्हतः
    शचीपतिः पापमतिर्दुरात्मा ।
फलं किलायं तरसा कृतस्य
    प्राप्नोतु पापी हननोद्‌भवस्य ॥ ७ ॥
तं निहत्य तरसा सुरराजो
    निर्जगाम निजमन्दिरमाशु ।
स हतोऽपि विरराज महात्मा
    जीवमान इव तेजसां निधिः ॥ ८ ॥
तं दृष्ट्वा पतितं भूमौ जीवन्तमिव वृत्रहा ।
चिन्तामापातिखिन्नाङ्गः किं वा जीवेदयं पुनः ॥ ९ ॥
विमृश्य मनसातीव तक्षाणं पुरतः स्थितम् ।
मघवा वीक्ष्य तं प्राह स्वकार्यसदृशं वचः ॥ १० ॥
तक्षंश्छिन्धि शिरांस्यस्य कुरुष्व वचनं मम ।
मा जीवतु महातेजा भाति जीवन्निव स्वयम् ॥ ११ ॥
इत्याकर्ण्य वचस्तस्य तक्षोवाच विगर्हयन् ।
तक्षोवाच
महास्कन्धो भृशं भाति परशुर्न तरिष्यति ॥ १२ ॥
ततो नाहं करिष्यामि कार्यमेतद्विगर्हितम् ।
त्वया वै निन्दितं कर्म कृतं सद्‌भिर्विगर्हितम् ॥ १३ ॥
अहं बिभेमि पापाद्वै मृतस्यैव च मारणे ।
मृतोऽयं मुनिरस्त्येव शिरसः कृन्तनेन किम् ॥ १४ ॥
भयं किं तेऽत्र सञ्जातं पाकशासन कथ्यताम् ।
इन्द्र उवाच
सजीव इव देहोऽयमाभाति विशदाकृतिः ॥ १५ ॥
तस्माद्‌बिभेमि मा जीवेन्मुनिः शत्रुरयं मम ।
तक्षोवाच
नात्र किं त्रपसे विद्वन् क्रूरेणानेन कर्मणा ॥ १६ ॥
ऋषिपुत्रमिमं हत्वा ब्रह्महत्याभयं न किम् ।
इन्द्र उवाच
प्रायश्चित्तं करिष्यामि पश्चात्पापक्षयाय वै ॥ १७ ॥
शत्रुस्तु सर्वथा वध्यश्छलेनापि महामते ।
तक्षोवाच
त्वं लोभाभिहतः पापं करोषि मघवन्निह ॥ १८ ॥
तं विनाहं कथं पापं करोमि वद मे विभो ।
इन्द्र उवाच
मखेषु खलु भागं ते करिष्यामि सदैव हि ॥ १९ ॥
शिरः पशोस्तु ते भागं यज्ञे दास्यन्ति मानवाः ।
शुल्केनानेन छिन्धि त्वं शिरांस्यस्य कुरु प्रियम् ॥ २० ॥
व्यास उवाच
एतच्छ्रुत्वा महेन्द्रस्य वचस्तक्षा मुदान्वितः ।
कुठारेण शिरांस्यस्य चकर्त सुदृढेन हि ॥ २१ ॥
छिन्नानि त्रीणि शीर्षाणि पतितानि यदा भुवि ।
तेभ्यस्तु पक्षिणः क्षिप्रं विनिष्पेतुः सहस्रशः ॥ २२ ॥
कलविङ्कास्तित्तिरयस्तथैव च कपिञ्जलाः ।
पृथक्पृथग्विनिष्पेतुर्मुखतस्तरसा तदा ॥ २३ ॥
येन वेदानधीते स्म सोमं च पिबते तथा ।
तस्माद्वक्त्रात्किलोत्पेतुः सद्य एव कपिञ्जलाः ॥ २४ ॥
येन सर्वा दिशः कामं पिबन्निव निरीक्षते ।
तस्मात्तु तित्तिरास्तत्र निःसृतास्तिग्मतेजसः ॥ २५ ॥
यत्सुरापं तु तद्वक्त्रं तस्मात्तु चटकाः किल ।
विनिष्पेतुस्त्रिशिरस एवं ते विहगा नृप ॥ २६ ॥
एवंविनिःसृतान्दृष्ट्वा तेभ्यः शक्रस्तदाण्डजान् ।
मुमोद मनसा राजन् जगाम त्रिदिवं पुनः ॥ २७ ॥
गते शक्रे तु तक्षापि स्वगृहं तरसा ययौ ।
यज्ञभागं परं लब्ध्वा मुदमाप महीपते ॥ २८ ॥
इन्द्रोऽथ स्वगृहं गत्वा हत्वा शत्रुं महाबलम् ।
मेने कृतार्थमात्मानं ब्रह्महत्यामचिन्तयन् ॥ २९ ॥
तं श्रुत्वा निहतं त्वष्टा पुत्रं परमधार्मिकम् ।
चुकोपातीव मनसा वचनं चेदमब्रवीत् ॥ ३० ॥
अनागसं मुनिं यस्मात्पुत्रं निहतवान्मम ।
तस्मादुत्पादयिष्यामि तद्वधार्थं सुतं पुनः ॥ ३१ ॥
सुराः पश्यन्तु मे वीर्यं तपसश्च बलं तथा ।
जानातु सर्वं पापात्मा स्वकृतस्य फलं महत् ॥ ३२ ॥
इत्युक्त्वाग्निं जुहावाथ मन्त्रैराथर्वणोदितैः ।
पुत्रस्योत्पादनार्थाय त्वष्टा क्रोधसमाकुलः ॥ ३३ ॥
कृते होमेऽष्टरात्रं तु सन्दीप्ताच्च विभावसोः ।
प्रादुर्बभूव तरसा पुरुषः पावकोपमः ॥ ३४ ॥
तं दृष्ट्वाग्रे सुतं त्वष्टा तेजोबलसमन्वितम् ।
वेगात्प्रकटितं वह्नेर्दीप्यमानमिवानलम् ॥ ३५ ॥
उवाच वचनं त्वष्टा सुतं वीक्ष्य पुरःस्थितम् ।
इन्द्रशत्रो विवर्धस्व प्रतापात्तपसो मम ॥ ३६ ॥
इत्युक्ते वचने त्वष्ट्रा क्रोधप्रज्वलितेन च ।
सोऽवर्धत दिवं स्तब्ध्वा वैश्वानरसमद्युतिः ॥ ३७ ॥
जातः स पर्वताकारः कालमृत्युसमः स्वराट् ।
किं करोमीति तं प्राह पितरं परमातुरम् ॥ ३८ ॥
कुरु मे नामकं नाथ कार्यं कथय सुव्रत ।
चिन्तातुरोऽसि कस्मात्त्वं ब्रूहि मे शोककारणम् ॥ ३९ ॥
नाशयाम्यद्य ते शोकमिति मे व्रतमाहितम् ।
तेन जातेन किं भूयः पिता भवति दुःखितः ॥ ४० ॥
पिबामि सागरं सद्यश्चूर्णयामि धराधरान् ।
उद्यन्तं वारयाम्यद्य तरणिं तिग्मतेजसम् ॥ ४१ ॥
हन्मीन्द्रं ससुरं सद्यो यमं वा देवतान्तरम् ।
क्षिपामि सागरे सर्वान्समुत्पाट्य च मेदिनीम् ॥ ४२ ॥
इत्याकर्ण्य वचस्तस्य त्वष्टा पुत्रस्य पेशलम् ।
प्रत्युवाचातिमुदितस्तं सुतं पर्वतोपमम् ॥ ४३ ॥
वृजिनात्त्रातुमधुना यस्माच्छक्तोऽसि पुत्रक ।
तस्माद्‌वृत्र इति ख्यातं तव नाम भविष्यति ॥ ४४ ॥
भ्राता तव महाभाग त्रिशिरा नाम तापसः ।
त्रीणि तस्य च शीर्षाणि ह्यभवन्वीर्यवन्ति च ॥ ४५ ॥
वेदवेदाङ्गतत्त्वज्ञः सर्वविद्याविशारदः ।
संस्थितस्तपसि प्रायस्त्रिलोकीविस्मयप्रदे ॥ ४६ ॥
शक्रेण तु हतः सोऽद्य वज्रघातेन साम्प्रतम् ।
विनापराधं सहसा छिन्नानि मस्तकानि च ॥ ४७ ॥
तस्मात्त्वं पुरुषव्याघ्र जहि शक्रं कृतागसम् ।
ब्रह्महत्यायुतं पापं निस्त्रपं दुर्मतिं शठम् ॥ ४८ ॥
इत्युक्त्वा च तदा त्वष्टा पुत्रशोकसमाकुलः ।
आयुधानि च दिव्यानि चकार विविधानि च ॥ ४९ ॥
ददावस्मै सहस्राक्षवधाय प्रबलानि च ।
खड्गशूलगदाशक्तितोमरप्रमुखानि वै ॥ ५० ॥
शार्ङ्ग धनुस्तथा बाणं परिघं पट्टिशं तथा ।
चक्रं दिव्यं सहस्रारं सुदर्शनसमप्रभम् ॥ ५१ ॥
तूणीरौ चाक्षयौ दिव्यौ कवचं चातिसुन्दरम् ।
रथं मेघप्रतीकाशं दृढं भारसहं जवम् ॥ ५२ ॥
युद्धोपकरणं सर्वं कृत्वा पुत्राय पार्थिव ।
दत्त्वासौ प्रेरयामास त्वष्टा क्रोधसमन्वितः ॥ ५३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादलसाहक्त्यां
संहितायां षष्ठस्कन्धे त्रिशिरवधानन्तरं
वृत्रोत्पत्तिवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥


विश्वरूपाचा वध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विश्वरूपासंबंधी द्वेषबुद्धी होऊन इंद्र त्याच्या आश्रमात गेला. त्या मुनीचा पराक्रम लक्षात आल्यावर इंद्र पुन: विचार करू लागला. कारण त्या मुनीचे तेज सूर्य व अग्नीप्रमाणे होते. तो मनाशी म्हणाला, "या निष्पाप मुनींचा वध कसा करावा ? पण या शत्रूच्या सामर्थ्याची उपेक्षा करणेही योग्य नव्हे."

इंद्राने त्या मुनीचा वध करण्याचा निश्चय केला. त्याने आपले सूर्यतुल्य वज्र त्या तपस्व्यावर सोडले. त्याच्या आघाताने तो तपस्वी मृत झाला. त्याचे भूमीवर पडलेले शरीर पर्वतशिखराप्रमाणे दिसू लागले. त्याचा वध झाल्याने इंद्र आनंदित झाला. पण आश्रमातले इतर मुनी आक्रोश करीत म्हणाले, "या इंद्राने या महात्म्याचा का बरे वध केला ? अपराधावाचून इंद्राने या महामुनीचा वध केला म्हणून त्या पापी इंद्राला लवकर याचे फल प्राप्त होईल."

त्या तपस्व्याचा वध करून इंद्र स्वस्थानी गेला. परंतु विश्वरूप मृत झाल्यावरही त्याचे शरीर तेजाने झळकत आहे हे इंद्राला समजताच तो चांगलाच भयभीत. झाला. तो पुन: जिवंत होईल अशी त्याला भीती वाटली. जवळच उभा असलेल्या सुताराला तो म्हणाला, ''तू देवांचा सुतार आहेस. तू त्या विश्वरूपाची मस्तके तोडून टाक व माझे कार्य कर."

सुतार इंद्राला म्हणाला, "हे इंद्रा नीच कर्म मी करणार नाही. स्वामी आज्ञा मी मानली असती, तर मुनींचा स्कंद मला विस्तृत असून कुर्‍हाडीचा उपयोग होणार नाही. शिवाय तू अत्यंत टाकाऊ व नीच कर्म केले आहेस. मेलेल्याला मारणे हे महापाप आहे. तुला कसले भय वाटते ते सांग".

इंद्र म्हणाला, ''याचा देह अजूनही जिवंत असल्यासारखा दिसत आहे. हा माझा शत्रु जिवंत होऊ नये."

सुतार म्हणाला, ''हे प्राज्ञ, ऋषीपुत्राचा वध करून केलेल्या ब्रह्महत्येची तुला लज्जा व भय वाटत नाही का ?'

इंद्र म्हणाला, ''कपटाने शत्रूचा वध केलाच पाहिजे. मी त्याबद्दल प्रायश्चित्त घेईन.''

सुतार म्हणाला, ''तू लोभामुळे पाप केलेस पण मला लोभ उत्पन्न झालेला नाही."

इंद्र म्हणाला, ''यज्ञात मी तुला भाग देईन. आजपासून यज्ञात पशुंच्या शिराचा भाग मानव तुला अर्पण करतील. म्हणून तू त्या मुनीची शिरे तोड."

ते ऐकून सुताराने सत्वर जाऊन त्या मुनिश्रेष्ठाची शिरे तोडून टाकली. पण ती तिन्ही मस्तके जमिनीवर पडताच त्यातून हजारो पक्षी उत्पन्न झाले. कलविक, तित्तिर, कपिंजल असे तीन पक्षी मुखांतून बाहेर पडले. सोमपान करणार्‍या मुखातून कलविक, वेदाध्ययन करणार्‍या मुखांतून कपिंजल, ज्या मुखाने तो दिशांचे निरीक्षण करी त्यातून तित्तरपक्षी बाहेर पडले.

ते अवलोकन करून इंद्र समाधानाने स्वस्थानी गेला. सुतारही यज्ञभागाची प्राप्ती झाल्यामुळे स्वगृही गेला. इंद्र स्वतःला कृतकृत्य मानू लागला.

पण आपल्या पुत्राचा वध झाल्याचे ऐकून त्वष्टा संतप्त झाला. तो म्हणाला, ''माझ्या सुपुत्राचा इंद्राने वध केला म्हणून मी त्याच्या वधासाठी दुसरा पुत्र उत्पन्न करतो. माझे तपोबल त्याला कळेलच. शिवाय इंद्राला पापाचे फळ मिळेल.

त्वष्टयाने पुत्रप्राप्तीसाठी अर्थवेदमंत्रोक्त अग्रीमध्ये होम केला. आठ दिवसांनी त्या प्रज्वलित अग्नीतून एक पुरुष निर्माण झाला. त्या अग्नितुल्य पुत्राला पाहून त्वष्टा आनंदित झाला. तो म्हणाला, "हे इंद्र शत्रो, माझ्या तपोबलाने तुझी वाढ होऊ दे."

त्या क्रोधायमान त्वष्ट्याचे ते शब्द ऐकताच तो पुत्र स्वर्गापर्यंत उंच झाला. तो पर्वताकार होऊन स्वतेजाने झळकू लागला. आपल्या पित्याला त्याने विनयाने विचारले, "आता आपण माझे नामकरण करा. नंतर मी आपले कोणते कार्य करू ते सांगा. आपण चिंताक्रांत का झाला ? मी आजच आपणाला शोकमुक्त करतो. हे माझे व्रत आहे."

मी आताच सागर पिऊन टाकतो, पर्वतांचे चूर्ण करतो, सूर्याचे निवारण करतो, एका क्षणात इंद्रासह सर्व देवांचा वध करतो. पृथ्वी समुद्रात फेकतो.''

पुत्राचे भाषण ऐकून त्वष्टयाचे समाधान झाले. तो म्हणाला, ''हे पुत्रा, वृत्रिनापासून म्हणजे दुःखापासून तू मला मुक्त करणार आहेस म्हणून तू वृत्र या नावाने प्रसिद्ध होशील. हे महाभाग्यवान पुत्रा तुझा त्रिशिरनामक भ्राता महान तपस्वी व पराक्रमी पुरुष होता. तो अत्यंत ज्ञानी होता. तो घोर तप करीत होता. पण इंद्राने अपराध नसताही वज्राने त्याचा वध केला. म्हणून त्या पापी, अपराधी, ब्रह्महत्या करणार्‍या, निर्लज्ज, दुष्टबुद्धी व शठ इंद्राचा वध कर.''

असे म्हणून पुत्रशोकाने विव्हल झालेल्या त्वष्टयाने विविध प्रकारची आयुधे उत्पन्न केली. खङ्ग, शूल, गदा, शक्ती, तोमर ही सर्व हत्यारे त्यात होती. शिवाय शार्ङ्ग, धनुष्य, बाण, परीघ, गदा सहस्र आरांचे तेजस्वी चक्र, दिव्य भाते, सुंदर कवच, मेघतुल्य वेगवान रथ असे सर्व उत्पन्न करून त्याने इंद्रवधासाठी वृत्राला प्रवृत्त केले.



अध्याय दुसरा समाप्त


GO TOP