श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
सप्तदशोऽध्यायः


राजपुत्रीमन्दोदरीवृत्तवर्णनम्

व्यास उवाच
इति श्रुत्वा वचस्तस्य देवी पप्रच्छ दानवम् ।
का सा मन्दोदरी नारी कोऽसौ त्यक्तो नृपस्तया ॥ १ ॥
शठः को वा नृपः पश्चात्तन्मे ब्रूहि कथानकम् ।
विस्तरेण यथा प्राप्तं दुःखं वनितया पुनः ॥ २ ॥

महिष उवाच
सिंहलो नाम देशोऽस्ति विख्यातः पृथिवीतले ।
घनपादपसंयुक्तो धनधान्यसमृद्धिमान् ॥ ३ ॥
चन्द्रसेनाभिधस्तत्र राजा धर्मपरायणः ।
न्यायदण्डधरः शान्तः प्रजापालनतत्परः ॥ ४ ॥
सत्यवादी मृदुः शूरस्तितिक्षुर्नीतिसागरः ।
शास्त्रवित्सर्वधर्मज्ञो धनुर्वेदेऽतिनिष्ठितः ॥ ५ ॥
तस्य भार्या वरारोहा सुन्दरी सुभगा शुभा ।
सदाचारातिसुमुखी पतिभक्तिपरायणा ॥ ६ ॥
नाम्ना गुणवती कान्ता सर्वलक्षणसंयुता ।
सुषुवे प्रथमे गर्भे पुत्रीं सा चातिसुन्दरीम् ॥ ७ ॥
पिता चातीव सन्तुष्टः पुत्रीं प्राप्य मनोरमाम् ।
मन्दोदरीति नामास्याः पिता चक्रे मुदान्वितः ॥ ८ ॥
इन्दोः कलेव चात्यर्थं ववृधे सा दिने दिने ।
दशवर्षा यदा जाता कन्या चातिमनोहरा ॥ ९ ॥
वरार्थं नृपतिश्चिन्तामवाप च दिने दिने ।
मद्रदेशाधिपः शूरः सुधन्वा नाम पार्थिवः ॥ १० ॥
तस्य पुत्रोऽतिमेधावी कम्बुग्रीवोऽतिविश्रुतः ।
ब्राह्मणैः कथितो राज्ञे स युक्तोऽस्या वरः शुभः ॥ ११ ॥
सर्वलक्षणसम्पन्नः सर्वविद्यार्थपारगः ।
राज्ञा पृष्टा तदा राज्ञी नाम्ना गुणवती प्रिया ॥ १२ ॥
कम्बुग्रीवाय कन्यां स्वां दास्यामि वरवर्णिनीम् ।
सा तु पत्युर्वचः श्रुत्वा पुत्रीं पप्रच्छ सादरम् ॥ १३ ॥
विवाहं ते पिता कर्तुं कम्बुग्रीवेण वाञ्छति ।
तच्छ्रुत्वा मातरं प्राह वाक्यं मन्दोदरी तदा ॥ १४ ॥
नाहं पतिं करिष्यामि नेच्छा मेऽस्ति परिग्रहे ।
कौमारं व्रतमास्थाय कालं नेष्यामि सर्वथा ॥ १५ ॥
स्वातन्त्र्येण चरिष्यामि तपस्तीव्रं सदैव हि ।
पारतन्त्र्यं परं दुःखं मातः संसारसागरे ॥ १६ ॥
स्वातन्त्र्यान्मोक्षमित्याहुः पण्डिताः शास्त्रकोविदाः ।
तस्मान्मुक्ता भविष्यामि पत्या मे न प्रयोजनम् ॥ १७ ॥
विवाहे वर्तमाने तु पावकस्य च सन्निधौ ।
वक्तव्यं वचनं सम्यक्त्वदधीनास्मि सर्वदा ॥ १८ ॥
श्वश्रूदेवरवर्गाणां दासीत्वं श्वशुरालये ।
पतिचित्तानुवर्तित्वं दुःखाद्दुःखतरं स्मृतम् ॥ १९ ॥
कदाचित्पतिरन्यां वा कामिनीं च भजेद्यदि ।
तदा महत्तरं दुःखं सपत्‍नीसम्भवं भवेत् ॥ २० ॥
तदेर्ष्या जायते पत्यौ क्लेशश्चापि भवेदथ ।
संसारे क्व सुखं मातर्नारीणां च विशेषतः ॥ २१ ॥
स्वभावात्परतन्त्राणां संसारे स्वप्नधर्मिणि ।
श्रुतं मया पुरा मातरुत्तानचरणात्मजः ॥ २२ ॥
उत्तमः सर्वधर्मज्ञो ध्रुवादवरजो नृपः ।
पत्‍नीं धर्मपरां साध्वीं पतिभक्तिपरायणाम् ॥ २३ ॥
अपराधं विना कान्तां त्यक्तवान्विपिने प्रियाम् ।
एवंविधानि दुःखानि विद्यमाने तु भर्तरि ॥ २४ ॥
कालयोगान्मृते तस्मिन्नारी स्याद्दुःखभाजनम् ।
वैधव्यं परमं दुःखं शोकसन्तापकारकम् ॥ २५ ॥
परोषितपतित्वेऽपि दुःखं स्यादधिकं गृहे ।
मदनाग्निविदग्धायाः किं सुखं पतिसङ्गजम् ॥ २६ ॥
तस्मात्पतिर्न कर्तव्यः सर्वथेति मतिर्मम ।
एवं प्रोक्ता तदा माता पतिं प्राह नृपात्मजा ॥ २७ ॥
न च वाञ्छति भर्तारं कौमारव्रतधारिणी ।
व्रतजाप्यपरा नित्यं संसाराद्विमुखी सदा ॥ २८ ॥
न काङ्क्षति पतिं कर्तुं बहुदोषविचक्षणा ।
भार्याया भाषितं श्रुत्वा तथैव संस्थितो नृपः ॥ २९ ॥
विवाहो न कृतः पुत्र्या ज्ञात्वा भावविवर्जिताम् ।
वर्तमाना गृहेष्वेव पित्रा मात्रा च रक्षिता ॥ ३० ॥
यौवनस्याङ्कुरा जाता नारीणां कामदीपकाः ।
तथापि सा वयस्याभिः प्रेरितापि पुनः पुनः ॥ ३१ ॥
चकमे न पतिं कर्तुं ज्ञानार्थपदभाषिणी ।
एकदोद्यानदेशे सा विहर्तुं बहुपादपे ॥ ३२ ॥
जगाम सुमुखी प्रेम्णा सैरन्ध्रीगणसेविता ।
रेमे कृशोदरी तत्रापश्यत्कुसुमिता लताः ॥ ३३ ॥
पुष्पाणि चिन्वती रम्या वयस्याभिः समावृता ।
कोसलाधिपतिस्तत्र मार्गे दैववशात्तदा ॥ ३४ ॥
आजगाम महावीरो वीरसेनोऽतिविश्रुतः ।
एकाकी रथमारूढः कतिचित्सेवकैर्वृतः ॥ ३५ ॥
सैन्यं च पृष्ठतस्तस्य समायाति शनैः शनैः ।
दृष्टस्तस्या वयस्याभिर्दूरतः पार्थिवस्तदा ॥ ३६ ॥
मन्दोदर्यै तथा प्रोक्तं समायाति नरः पथि ।
रथारूढो महाबाहू रूपवान्मदनोऽपरः ॥ ३७ ॥
मन्येऽहं नृपतिः कश्चित्प्राप्तो भाग्यवशादिह ।
एवं ब्रुवत्यां तत्रासौ कोसलेन्द्रः समागतः ॥ ३८ ॥
दृष्ट्वा तामसितापाङ्गीं विस्मयं प्राप भूपतिः ।
उत्तीर्य स रथात्तूर्णं पप्रच्छ परिचारिकाम् ॥ ३९ ॥
केयं बाला विशालाक्षी कस्य पुत्री वदाशु मे ।
एवं पृष्टा तु सैरन्ध्री तमुवाच शुचिस्मिता ॥ ४० ॥
प्रथमं ब्रूहि मे वीर पृच्छामि त्वां सुलोचन ।
कोऽसि त्वं किमिहायातः किं कार्यं वद साम्प्रतम् ॥ ४१ ॥
इति पृष्टस्तु सैरन्ध्र्या तामुवाच महीपतिः ।
कोसलो नाम देशोऽस्ति पृथिव्यां परमाद्‌भुतः ॥ ४२ ॥
तस्य पालयिता चाहं वीरसेनाभिधः प्रिये ।
वाहिनी पृष्ठतः कामं समायाति चतुर्विधा ॥ ४३ ॥
मार्गभ्रमादिह प्राप्तं विद्धि मां कोसलाधिपम् ।
सैरन्ध्र्युवाच
चन्द्रसेनसुता राजन्नाम्ना मन्दोदरी किल ॥ ४४ ॥
उद्याने रन्तुकामेयं प्राप्ता कमललोचना ।
श्रुत्वा तद्‌भाषितं राजा प्रत्युवाच प्रसाधिकाम् ॥ ४५ ॥
सैरन्ध्रि चतुरासि त्वं राजपुत्रीं प्रबोधय ।
ककुत्स्थवंशजश्चाहं राजास्मि चारुलोचने ॥ ४६ ॥
गान्धर्वेण विवाहेन पतिं मां कुरु कामिनि ।
न मे भार्यास्ति सुश्रोणि वयसोऽद्‌भुतयौवनाम् ॥ ४७ ॥
वाञ्छामि रूपसम्पन्नां सुकुलां कामिनीं किल ।
अथवा ते पिता मह्यं विधिना दातुमर्हति ॥ ४८ ॥
अनुकूलः पतिश्चाहं भविष्यामि न संशयः ।
महिष उवाच
इत्याकर्ण्य वचस्तस्य सैरन्ध्री प्राह तां तदा ॥ ४९ ॥
प्रहस्य मधुरं वाक्यं कामशास्त्रविशारदा ।
मन्दोदरि नृपः प्राप्तः सूर्यवंशसमुद्‌भवः ॥ ५० ॥
रूपवान्बलवान्कान्तो वयसा त्वत्समः पुनः ।
प्रीतिमान्नृपतिर्जातस्त्वयि सुन्दरि सर्वथा ॥ ५१ ॥
पितापि ते विशालाक्षि परितप्यति सर्वथा ।
विवाहकालं ते ज्ञात्वा त्वां च वैराग्यसंयुताम् ॥ ५२ ॥
इत्याहास्मान्स नृपतिर्विनिःश्वस्य पुनः पुनः ।
पुत्रीं प्रबोधयन्त्वेतां सैरन्ध्र्यः सेवने रताः ॥ ५३ ॥
वक्तुं शक्ता वयं न त्वां हठधर्मरतां पुनः ।
भर्तुः शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मोऽब्रवीन्मनुः ॥ ५४ ॥
भर्तारं सेवमाना वै नारी स्वर्गमवाप्नुयात् ।
तस्मात्कुरु विशालाक्षि विवाहं विधिपूर्वकम् ॥ ५५ ॥
मन्दादर्युवाच
नाहं पतिं करिष्यामि चरिष्ये तप अद्‌भुतम् ।
निवारय नृपं बाले किं मां पश्यति निस्त्रपः ॥ ५६ ॥
सैरन्ध्र्युवाच
दुर्जयो देवि कामोऽसौ कालोऽसौ दुरतिक्रमः ।
तस्मान्मे वचनं पथ्यं कर्तुमर्हसि सुन्दरि ॥ ५७ ॥
अन्यथा व्यसनं नूनमापतेदिति निश्चयः ।
इति तस्या वचः श्रुत्वा कन्योवाचाथ तां सखीम् ॥ ५८ ॥
यद्यद्‌भवेत्तद्‌भवतु दैवयोगादसंशयम् ।
न विवाहं करिष्येऽहं सर्वथा परिचारिके ॥ ५९ ॥
महिष उवाच
इति तस्यास्तु निर्बन्धं ज्ञात्वा प्राह नृपं पुनः ।
गच्छ राजन् यथाकामं नेयमिच्छति सत्पतिम् ॥ ६० ॥
नृपस्तु तद्वचः श्रुत्वा निर्गतः सह सेनया ।
कोसलान्विमना भूत्वा कामिनीं प्रति निःस्पृहः ॥ ६१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे देवीमहिषसंवादे
राजपुत्रीमन्दोदरीवृत्तवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥


मंदोदरीची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

महिषाचे भाषण ऐकून देवी म्हणाली ! "हे महिषा, मंदोदरीने टाकलेला राजा व स्वीकारलेला शठ कोण ? ती कथा विस्ताराने मला सांग."

"भूतलावर झाडांची दाटी असलेला, धान्यांनी समृद्ध असा सिंहल नावाचा देश आहे. त्या देशात धर्मपरायण, न्यायी, प्रजाहितदक्ष, शांत, सत्यवादी, मृदू शूर, सहिष्णू, नीतिमान, शास्त्रवेत्ता, धर्मज्ञ व धनुर्वेदात प्रवीण असा चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला. त्याची भार्या सुंदर, सौभाग्यवती, सदाचारी, पतिसेवातत्पर, सर्व लक्षणसंपन्न अशी होती. तिचे नाव गुणवती होते. त्या दोघांना प्रथम कन्या झाली.

त्या सुंदर कन्येच्या प्राप्तीमुळे राजाने संतुष्ट होऊन तिचे नाव मंदोदरी ठेवले. ती चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवशी वाढत होती. होता होता मंदोदरीला दहावे वर्ष लागले तेव्हा राजाने तिच्यासाठी वरशोधन करण्याचा विचार केला.

त्याकाळी मद्रदेशात सुधन्वा नावाचा शूर राजा होता. त्याला अत्यंत बुद्धिमान असा कंबुग्रीव नावाचा पुत्र होता. तो वर मंदोदरीला उत्तम आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. कारण तो सर्वलक्षणी व सर्व विद्यापारंगत होता. जेव्हा राजाने आपल्या प्रिय गुणवती राणीला सांगितले की आपली कन्या कंबुग्रीवाला देण्याचे ठरविले आहे, तेव्हा गुणवती ते ऐकून समाधानाने आपल्या मंदोदरीला म्हणाली, "हे मुली, तुझ्या पित्याने तुझा विवाह कंबुग्रीवाशी करण्याचे ठरविले आहे.

मंदोदरी म्हणाली, "मला विवाह करण्याची इच्छा नाही. मी ब्रह्मचर्य व्रत अवलंबणार आहे. स्वतंत्रपणे मी तीव्र तपश्चर्या करणार आहे. या संसारात पराधीनतेसारखे दुसरे दुःख नाही. स्वतंत्रतेपासून मोक्षप्राप्ती होते. तेव्हा मी ज्ञान मिळवून मुक्त होईल. मला पतीची आवश्यकता नाही.

विवाह संस्काराचे वेळी अग्नीसन्निध 'मी सर्वदा तुझ्या आधीन आहे.' असे भाषण स्त्रीने पतीला उद्देशून करावे लागते. श्वशूरगृही राहून सासू व दीर इत्यादींचा दासीपणा पत्करावा लागतो. त्याचे फार दु:ख होते. पतीविषयी मत्सर उत्पन्न होऊन स्वतःला क्लेश होतात. स्वप्नवत असलेल्या संसारात स्त्रिया परतंत्र असतात. तेव्हा हे माते, संसारात काय बरे सुख आहे ?

हे माते, उत्तानपाद राजाचा उत्तम नावाचा पुत्र धर्मवेत्ता व ध्रुवाचा धाकटा भाऊ आणि भूपती होता. त्याची भार्या धर्मनिष्ठ, साध्वी, पतितत्पर, सौंदर्यसंपन्न आणि प्रिय होती. तरीही त्याने आपल्या पत्‍नीचा काही दोष नसतानाही त्याग केला.

तेव्हा पती जिवंत असतांना जर दु:ख प्राप्त होतात मग दैवकालयोगे पती मृत झाला तर स्त्रीदुःख भयानक असते. तसेच पती देशांतरी गेला तरीही होणारे दु:ख प्रचंड असते. कारण मदनाग्नीने दग्ध झालेल्या स्त्रीला त्या अवस्थेत पतिसमागमाचे सुख कसे मिळणार ? म्हणून कसलाही प्रसंग आला तरी पती करूच नये असे मला वाटते."

अशाप्रकारे कन्येने मातेला आपला मनोदय सांगितला. तेव्हा गुणवती आपल्या पतीला म्हणाली, आपली कन्या भर्त्याची इच्छा न करता ब्रह्मचर्य व्रताचे अवलंबन करणार म्हणाली. ती संसारसुख पराङ्मुख असून व्रतवैकल्ये, जपतप करण्याविषयी तत्पर राहून आयुष्य घालविणार आहे."

राजाने आपल्या कन्येची विवाहाची इच्छा नाही असे समजून विवाहाचा विचार रद्द केला. पुढे पित्याच्या छत्राखाली ती वाढू लागली असता काही दिवसांनी स्त्रियांची कामवासना जागृत करणारे यौवनांकुर तिच्या ठिकाणी उत्पन्न झाले. तिच्या सख्यांनी तिला वारंवार विवाहाचा उपदेश केला. पण तिने पती वरण्याचे नाकारले. एकदा सुंदर मंदोदरी आपल्या दासींसह एका सुंदर उपवनात क्रीडा करण्याकरता गेली. इतक्यात दैवयोगाने कोसल देशचा राजा वीरसेन त्या मार्गाने जात होता. तो एकटाच रथारूढ होता व थोडे सेवक त्याचे बरोबर होते.

इतर सैन्य मागे होते. राजकन्येची एक सखी तिला म्हणाली, या मार्गाने रथारुढ झालेला आजानूबाहू व मदनाप्रमाणे सुंदर असलेला कोणी राजा येत आहे मला वाटते, कोणीतरी राजा येथे आला आहे."

तसे बोलणे चालू असतानाच कोसलाधिपती वीरसेन तेथे आला. त्या सुलोचन मंदोदरीला पाहून तो तिच्या सौंदर्याने विस्मयचकित झाला आणि खाली उतरून मंदोदरीच्या दासीला तो म्हणाला, "ही कोणाची कन्या हे सत्वर सांग."

याप्रमाणे राजाने विचारताच दासी हसतमुखाने म्हणाली, "हे सुंदर वीरा, मी आपणाला विचारते आपण कोण ? कुठले ? हे आपण मला सांगा."

त्यावर राजा म्हणाला, "पृथ्वीवरील अदभुत अशा कोसल देशाचा मी वीरसेन नावाचा राजा आहे. माझे चतुरंग सैन्य मागून येत आहे. चुकल्याने मी येथे आलो आहे.

दासी म्हणाली, "ही राजकन्या मंदोदरी चंद्रसेन राजाची कन्या असून क्रीडा करण्यास या उपवनात आली आहे."

राजा म्हणाला, "हे सैरंध्री, तू चतुर आहेस. तू राजकन्येला माझा निरोप सांग. हे चारूलोचने, मी काकुस्थ वंशातील राजा आहे. मला भार्या नसल्याने मला रूपयौवना कुलीन स्त्रीची इच्छा आहे. तेव्हा तू गांधर्व विवाहाने मला पती वर. तुझ्या पित्याने यथाविधी कन्यादान केले तर उत्तमच. मी नि:संशय तुला अनुकुल पती आहे."

हे ऐकून ती कामशास्त्र निपुण सेविका त्वरेने मंदोदरीकडे येऊन म्हणाली, "हे मंदोदरी, सूर्यवंशातील रूपवान राजा तुझ्या बरोबरीचा असून येथे प्राप्त झाला आहे. त्याचे तुझ्या ठिकाणी प्रेम स्थिर झाले आहे. तुझा पिताही काळजी करीत आहे.

चंद्रसेन राजाही वारंवार आम्हाला हेच सांगत असतो. पण केवळ हठधर्माचेच अवलंबन करून तू राहिली असल्याने आम्हाला तुला सांगण्यास धीर होत नाही. पतीसेवा हाच स्त्रियांचा धर्म आहे. त्यामुळेच स्वर्गप्राप्ती होते. तरी तू यथाविधी विवाह कर."

मंदोदरी म्हणाली, "मी पती करणार नाही. मी अदभुत तपश्चर्या करीन. हे सखी, तूच या राजाचे निवारण कर. हा निर्लज्ज होऊन माझीच का इच्छा धरतो आहे ?" सैरंधी म्हणाली, "कामाचा निग्रह करणे कठीण असून कालावर मात करता येत नाही. हे राजकन्ये, माझे हितावह भाषण तू मनावर घे. नाहीतर यथावकाश तू संकटात पडशील."

मंदोदरी म्हणाली, "दैवयोगे जे असेल ते होवो. पण मी विवाह करणार नाही."

ह्याप्रमाणे तिचा निश्चय दासीने वीरसेनाला येऊन सांगितला. हे राजा, आता तू गमन कर. असे सांगितले. ते ऐकून राजा निराश मनाने कोसल देशाकडे निघून गेला.


अध्याय सतरावा समाप्त

GO TOP