व्यास उवाच
इति तस्या वचः श्रुत्वा दानवः काममोहितः ॥ ४६ ॥
उवाच श्लक्ष्णया वाचा मधुरं वचनं ततः ।
बिभेम्यहं वरारोहे त्वां प्रहर्तुं वरानने ॥ ४७ ॥
कोमलां चारुसर्वाङ्गीं नारीं नरविमोहिनीम् ।
जित्वा हरिहरादींश्च लोकपालांश्च सर्वशः ॥ ४८ ॥
किं त्वया सह युद्धं मे युक्तं कमललोचने ।
रोचते यदि चार्वङ्गि विवाहं कुरु मां भज ॥ ४९ ॥
नोचेद् गच्छ यथेष्टं ते देशं यस्मात्समागता ।
नाहं त्वां प्रहरिष्यामि यतो मैत्री कृता त्वया ॥ ५० ॥
हितमुक्तं शुभं वाक्यं तस्माद् गच्छ यथासुखम् ।
का शोभा मे भवेदन्ते हत्वा त्वां चारुलोचनाम् ॥ ५१ ॥
स्त्रीहत्या बालहत्या च ब्रह्महत्या दुरत्यया ।
गृहीत्वा त्वां गृहं नूनं गच्छाम्यद्य वरानने ॥ ५२ ॥
तथापि मे फलं न स्याद्बलाद्भोगसुखं कुतः ।
प्रब्रवीमि सुकेशि त्वां विनयावनतो यतः ॥ ५३ ॥
पुरुषस्य सुखं न स्यादृते कान्तामुखाम्बुजात् ।
तत्तथैव हि नारीणां न स्याच्च पुरुषं विना ॥ ५४ ॥
संयोगे सुखसम्भूतिर्वियोगे दुःखसम्भवः ।
कान्तासि रूपसम्पन्ना सर्वाभरणभूषिता ॥ ५५ ॥
चातुर्यं त्वयि किं नास्ति यतो मां न भजस्यहो ।
तवोपदिष्टं केनेदं भोगानां परिवर्जनम् ॥ ५६ ॥
वञ्चितासि प्रियालापे वैरिणा केनचित्त्विह ।
मुञ्चाग्रहमिमं कान्ते कुरु कार्यं सुशोभनम् ॥ ५७ ॥
सुखं तव ममापि स्याद्विवाहे विहिते किल ।
विष्णुर्लक्ष्या सहाभाति सावित्र्या च सहात्मभूः ॥ ५८ ॥
रुद्रो भाति च पार्वत्या शच्या शतमखस्तथा ।
का नारी पतिहीना च सुखं प्राप्नोति शाश्वतम् ॥ ५९ ॥
येन त्वमसितापाङ्गि न करोषि पतिं शुभम् ।
कामः क्वाद्य गतः कान्ते यस्त्वां बाणैः सुकोमलैः ॥ ६० ॥
मादनैः पञ्चभिः कामं न ताडयति मन्दधीः ।
मन्येऽहमिव कामोऽपि दयावांस्त्वयि सुन्दरि ॥ ६१ ॥
अबलेति च मन्वानो न प्रेरयति मार्गणान् ।
मनोभवस्य वैरं वा किमप्यस्ति मया सह ॥ ६२ ॥
तेन च त्वय्यरालाक्षि न मुञ्चति शिलीमुखान् ।
अथवा मेऽहितैर्देवैर्वारितोऽसौ झषध्वजः ॥ ६३ ॥
सुखविध्वंसिभिस्तेन त्वयि न प्रहरत्यपि ।
त्यक्त्वा मां मृगशावाक्षि पश्चात्तापं करिष्यसि ॥ ६४ ॥
मन्दोदरीव तन्वङ्गि परित्यज्य शुभं नृपम् ।
अनुकूलं पतिं पश्चात्सा चकार शठं पतिम् ।
कामार्ता च यदा जाता मोहेन व्याकुलान्तरा ॥ ६५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे महिषद्वारा
देवीप्रबोधनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
महिषासुराचा रणात प्रवेश -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अखेर महिषासुर कुद्ध झाला आणि सारथ्याला म्हणाला, "दारुका, हजार गर्दभे जोडलेला, ध्वज व पताका लावलेला, आयुधांनी परिपूर्ण, शुभ्रवर्णी, उत्तम चाके व सुंदर दांडी असलेला माझा रथ सत्वर घेऊन ये.
महिषाच्या आज्ञेप्रमाणे त्याने त्वरित रथ जोडून आणला. तो म्हणाला, "राजा, रथ शृंगारून दारात उभा आहे. रथ सर्व आयुधे व अस्त्र यांनी युक्त आहे. तेव्हा महाबलाढ्य महिष मानव देह धारण करून संग्रामात जाण्यात निघाला. त्याने मनात विचार केला, "मी दुर्मुख आणि शृंगयुक्त महिष आहे असे पाहून त्या देवीला आनंद होणार नाही. स्त्रियांना रूप व चातुर्य हवे असते. तेव्हा आपण रूप व चातुर्य घेऊनच तिच्याकडे जावे म्हणजे ती यौवना माझ्यावर प्रेम करील. मलाही इतर स्वरूपाने तिच्यापासून सुखप्राप्ती होणार नाही, तर मनुष्य रूपानेच ती होईल. अशाप्रकारे विचार करून तो महाबलाढ्य दानवराज आपल्या महिषरूपाचा त्याग करून सुंदर व मनुष्यदेहधारी झाला.
त्या महिषाने उत्तम आयुधे घेतली, मनोहर भूषणे, दिव्य वस्त्रे व माळा धारण केल्या. तो मदनासारखा दिसू लागला. असा तो मदोन्मत्त दैत्य मन हरण करून घेणारे सुंदर रूप धारण करून सैन्यासह देवीकडे निघाला. त्याच्या सभोवती अनेक वीर होते. देवीने त्याला येताना पाहून शंख वाजवला. तो विस्मयकारक शंखनाद ऐकताच महिष हसतच देवीसमोर येऊन म्हणाला, "हे देवी, प्राणी स्त्री असो वा पुरुष असो, नित्य सुखाची इच्छा धरतो. ते सुखसंयोग अनेक प्रकारचे आहेत. काही संयोग द्वेषामुळे, काही हेतुपूर्वक व काही प्रसंगोपात असतात. त्यापैकी प्रेमामुळे होणारे संयोग मी आता निवेदन करतो. माता पितरांचा पुत्राशी होणारा संयोग प्रेमामुळे होतो म्हणून उत्तम होय. भ्रात्यांशी भ्रात्याचा होणारा संयोग उपकार बुद्धीने होतो म्हणून तो मध्यम होय.
अनेक प्रकारच्या कार्यांनी व काही प्रसंगामुळे एकत्र आल्याने लोकांचा होणारा परस्पर संयोग, त्याला विद्वज्जन स्वाभाविक संयोग म्हणतात. हा अल्पकाल सुख देतो म्हणून तो कनिष्ठ संयोग आहे. परंतु चवथा व अत्युत्तम संयोग हाच खरा श्रेष्ठ संयोग होय. तो नित्य सुखदायी आहे. हे कांते, तो म्हणजे समवयस्क स्त्री पुरुषांचा होणारा संयोग. कारण चातुर्य, रूप, वेश या गोष्टींनी आणि कुल, शील व गुण यांच्या योगाने तो अत्युत्तम सुख देतो. म्हणून त्याला अत्युत्तम संयोग म्हटले आहे. त्या अत्युत्तम संयोगात एकमेकांमुळे परस्परांचा उत्कर्ष होतो. म्हणून माझ्यासारख्या वीराबरोबर तो संयोग तू करशील तर तुला अत्युत्तम सुखाची प्राप्ती होईल. हे प्रिये, मी इच्छेप्रमाणे नाना रूपे धारण करणारा असून इंद्रादी देवांना युद्धात मी जिंकले आहे. तेव्हा या जगात तूर्त तरी माझ्यासारखा अद्वितीय पुरुष दुसरा नाही. म्हणून तू माझा स्वीकार कर. मजजवळील दिव्य रत्नांचा उपभोग घे अथवा दान देऊन टाक.
हे सुंदरी, मी तुला माझी पट्टराणी करीन. मी तुझा दास होऊन देवांशी वैर करण्याचे सोडून देईन. तुला ज्यात सुख वाटेल ते मी करीन. तेव्हा तू आज्ञा कर. तुझ्या रूपाने माझे चित्त मोहित झाले आहे.
हे सुंदरी, अत्यंत आतुरतेने मी तुला शरण आलो आहे. तेव्हा कामबाणांनी पीडित झालेल्या माझे रक्षण कर. शरणरगताचे रक्षण हाच खरा धर्म आहे. हे सुनयने, मी तुझा दास आहे. मी अन्यथा हे बोलत नाही. मी शेवटपर्यंत शब्द पाळीन. हे तनुलते, माझी सर्व शस्त्रास्त्रे टाकून मी तुझ्यापुढे नम्र झालो आहे. हे चारुगात्री, मी जन्मापासून इतका दीन कधीच झालो नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाशी गाठ पडली असताही मी नमलो नाही. रणांगणातील माझा पराक्रम देवही जाणून आहेत. तेव्हा असा हा पुरुष तुझा दास झाला आहे.
यावर ती भगवती हसत हसत म्हणाली, "अरे मूर्खा, परम पुरुषाशिवाय मी अन्य पुरुषांची इच्छा करीत नाही. हे दैत्या, मी त्या परम पुरुषांची इच्छा शक्ती असून मीच हे
सर्व जग उत्पन्न करते. विश्वकर्म्याची सर्वकाळ मजकडेच दृष्टी असते मी त्याची शक्तिसंज्ञात्मक प्रकृती आहे. म्हणूनच मला शाश्वत चैतन्य प्राप्त झाले आहे. मला ग्राम्य सुखाची कधीही इच्छा होत नाही.
म्हणून हे मंदबुद्धे, स्त्रीसमागमाची इच्छा करणारा तू मूर्ख आहेस, कारण पुरुषाच्या बंधनासाठी स्त्री ही शृंखला म्हणून निर्माण केली आहे. अरे, बेड्यांनी जखडलेला मनुष्य एकवेळ सुटेल, पण स्त्रीने बद्ध झालेला पुरुष कधीही मुक्त होणार नाही. हे मूर्खा, मूत्रद्वाराचे सेवन करण्याची तुला का बरे इच्छा होत आहे ? तुला खरे सुख हवे असेल तर शमाचे अवलंबन कर.
स्त्रीसंगाने महादुःख प्राप्त होते. देवांबरोबरचे तुझे वैर सोडून जीविताची इच्छा असल्यास तू पातालात जा किंवा मजबरोबर युद्ध कर. सध्या मी बलाढ्य असून तुझ्या नाशाकरताच मला देवांनी पाठवले आहे. तू मला आता जे मधुर शब्दांनी बोललास त्यामुळे मी संतुष्ट झाले आहे.
म्हणून तू येथून जीवितासह चालता हो. सज्जनांची मैत्री सात पाऊले बरोबर टाकली तरीही होते. म्हणून मी तुला जीवदान देते. तुला मृत्यूची इच्छा असेल तर युद्ध कर. मी निश्चित तुझा वध करीन."
हे ऐकून महिष स्पष्टपणे म्हणाला, "हे सुमुखी, तुझ्यावर प्रहार करण्याची मला भीती वाटते. कारण, तू मनोहर अवयवांनी युक्त अशी स्त्री आहेस. शिवाय प्रत्यक्ष ब्रह्माविष्णुमहेश यांचाही मी युद्धात पराभव केला असल्याने तुजबरोबर युद्ध करणे योग्य नाही.
तेव्हा तुला पटत असेल तर तू मजबरोबर विवाह कर, नाही तर जेथून आलीस तेथे चालती हो, ज्याअर्थी तू माझ्याशी मैत्री केली आहेस, त्याअर्थी मी तुला प्रहार करणार नाही. तेव्हा खुशाल निघून जा. त्यात तुझे हित आहे.
तुझ्यासारख्या सुंदरीचा वध करून मी काय साधणार ? स्त्रीहत्या, बालहत्या, ब्रह्महत्या ही दुस्तर पापे आहेत. जरी तुला घेऊन मी घरी गेलो तरी ते निरुपयोगी आहे. कारण बलात्काराने उपभोग घेण्यात सुख नाही. हे सुकेशी, मी नम्रतापूर्वक सांगतो की स्त्रीशिवाय पुरुषाला सुख नाही. त्याचप्रमाणे पुरुषाशिवाय स्त्रीला सुख नाही. संयोगाने सुख तर विरोधाने दु:ख होते. तू सर्व गुणसंपन्न आहेस. पण तू माझा स्वीकार करीत नाहीस त्याअर्थी तुजजवळ चातुर्याचा अभाव असावा. हा भोगवर्जनाचा उपदेश तुला कोणी दिला ? कोणी दुष्ट भावनेने तुला हे उपदेशिले आहे ?
खरोखरच विवाहामुळे तुला व मला सुख होईल. तूच पहा, विष्णु लक्ष्मीसह, ब्रह्मदेव सावित्रीसह, शिव पार्वतीसह आणि इंद्र शचीसह असतो, म्हणून ते सुखी आहेत. तेव्हा तू माझ्यासारखा पती न वरणे हे तुला शोभत नाही. कोणत्या पतिहीन स्त्रीला चिरंतन सुख प्राप्त होते ? हे कांते, तो काम आज कुणीकडे गेला आहे हे समजत नाही. तो मदन आपल्या बाणांनी तुला का यथेष्ट ताडन करीत नाही याचे आश्चर्य वाटते !
मला वाटते, तू अबला आहेस म्हणून का तुझ्यावर मदन बाण सोडीत नाही. तुझ्याशी त्याचे वैर असेल किंवा माझ्या सुखाला नाश करणार्या देवांनी ह्या मदनाचे निवारण केले असेल म्हणून तो तुझ्यावर प्रहार करीत नाही.
हे मृगनयने, ज्याप्रमाणे सुंदर राजाचा त्याग करून त्या मंदोदरीला अखेर पश्चात्ताप करावा लागला त्याचप्रमाणे माझा त्याग केल्याने तुलाही पश्चात्ताप होईल. मोहाने व्याकुळ होऊन जेव्हा ती कामातुर झाली तेव्हा एका शठालाच तिने पती म्हणून वरले.