श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


नरनारायणकथावर्णनम्

व्यास उवाच
अथ किं बहुनोक्तेन संसारेऽस्मिन्नृपोत्तम ।
धर्मात्माद्रोहबुद्धिस्तु कश्चिद्‌भवति कर्हिचित् ॥ १ ॥
रागद्वेषावृतं विश्वं सर्वं स्थावरजङ्गमम् ।
आद्ये युगेऽपि राजेन्द्र किमद्य कलिदूषिते ॥ २ ॥
देवाः सेर्ष्याश्च सद्रोहाश्छलकर्मरताः सदा ।
मानुषाणां तिरश्चां च का वार्ता नृप गण्यते ॥ ३ ॥
द्रोहपरे द्रोहपरो भवेदिति समानता ।
अद्रोहिणि तथा शान्ते विद्वेषः खलता स्मृता ॥ ४ ॥
यः कश्चित्तापसः शान्तो जपध्यानपरायणः ।
भवेत्तस्य जपे विघ्नकर्ता वै मघवा परम् ॥ ५ ॥
सतां सत्ययुगं साक्षात्सर्वदैवासतां कलिः ।
मध्यमो मध्यमानां तु क्रियायोगौ युगे स्मृतौ ॥ ६ ॥
कश्चित्कदाचिद्‌भवति सत्यधर्मानुवर्तकः ।
अन्यथान्ययुगानां वै सर्वे धर्मपरायणाः ॥ ७ ॥
वासना कारणं राजन् सर्वत्र धर्मसंस्थितौ ।
तस्यां वै मलिनायां तु धर्मोऽपि मलिनो भवेत् ॥ ८ ॥
मलिना वासना सत्यं विनाशायेति सर्वथा ।
ब्रह्मणो हृदयाज्जातः पुत्रो धर्म इति स्मृतः ॥ ९ ॥
ब्राह्मणः सत्यसम्पन्नो वेदधर्मरतः सदा ।
दक्षस्य दुहितारो हि वृता दश महात्मना ॥ १० ॥
विवाहविधिना सम्यङ्‌मुनिना गृहधर्मिणा ।
तास्वजीजनयत्पुत्रान्धर्मः सत्यवतां वरः ॥ ११ ॥
हरिं कृष्णं नरं चैव तथा नारायणं नृप ।
योगाभ्यासरतो नित्यं हरिः कृष्णो बभूव ह ॥ १२ ॥
नरनारायणौ चैव चेरतुस्तप उत्तमम् ।
प्रालेयाद्रिं समागत्य तीर्थे बदरिकाश्रमे ॥ १३ ॥
तपस्विषु धुरीणौ तौ पुराणौ मुनिसत्तमौ ।
गृणन्तौ तत्परं ब्रह्म गङ्गाया विपुले तटे ॥ १४ ॥
हरेरंशौ स्थितौ तत्र नरनारायणावृषी ।
पूर्णं वर्षसहस्रं तु चक्राते तप उत्तमम् ॥ १५ ॥
तापितं च जगत्सर्वं तपसा सचराचरम् ।
नरनारायणाभ्यां च शक्रः क्षोभं तदा ययौ ॥ १६ ॥
चिन्ताविष्टः सहस्राक्षो मनसा समकल्पयत् ।
किं कर्तव्यं धर्मपुत्रौ तापसौ ध्यानसंयुतौ ॥ १७ ॥
सिद्धार्थां सुभृशं श्रेष्ठमासनं मे ग्रहीष्यतः ।
विघ्नः कथं प्रकर्तव्यस्तपो येन भवेन्न हि ॥ १८ ॥
उत्पाद्य कामं क्रोधञ्च लोभं वाप्यतिदारुणम् ।
इत्युद्दिश्य सहस्राक्षः समारुह्य गजोत्तमम् ॥ १९ ॥
विघ्नकामस्तु तरसा जगाम गन्धमादनम् ।
गत्वा तत्राश्रमे पुण्ये तावपश्यच्छतक्रतुः ॥ २० ॥
तपसा दीप्तदेहौ तु भास्कराविव चोदितौ ।
ब्रह्मविष्णू किमेतौ वै प्रकटौ वा विभावसू ॥ २१ ॥
धर्मपुत्रावृषी एतौ तपसा किं करिष्यतः ।
इति सञ्चिन्त्य तौ दृष्ट्वा तदोवाच शचीपतिः ॥ २२ ॥
किं वा कार्यं महाभागौ ब्रूतं धर्मसुतौ किल ।
ददामि वां वरं श्रेष्ठं दातुं यातोऽस्म्यहमृषी ॥ २३ ॥
अदेयमपि दास्यामि तुष्टोऽस्मि तपसा किल ।
व्यास उवाच
एवं पुनः पुनः शक्रस्तावुवाच पुरः स्थितः ॥ २४ ॥
नोचतुस्तावृषी ध्यानसंस्थितौ दृढचेतसौ ।
ततो वै मोहिनीं मायां चकार भयदां वृषः ॥ २५ ॥
वृकान्सिंहांश्च व्याघ्रांश्च समुत्पाद्याबिभीषयत् ।
वर्षं वातं तथा वह्निं समुत्पाद्य पुनः पुनः ॥ २६ ॥
भीषयामास तौ शक्रो मायां कृत्वा विमोहिनीम् ।
भयतोऽपि वशं नीतौ न तौ धर्मसुतौ मुनी ॥ २७ ॥
नरनारायणौ दृष्ट्वा शक्रः स्वभवनं गतः ।
वरदाने प्रलुब्धौ न न भीतौ वह्निवायुतः ॥ २८ ॥
व्याघ्रसिंहादिभिः कान्तौ चलितौ नाश्रमात्स्वकात् ।
न तयोर्ध्यानभङ्गं वै कर्तुं कोऽपि क्षमोऽभवत् ॥ २९ ॥
इन्द्रोऽपि सदनं गत्वा चिन्तयामास दुःखितः ।
चलितौ भयलोभाभ्यां नेमौ मुनिवरोत्तमौ ॥ ३० ॥
चिन्तयन्तौ महाविद्यामादिशक्तिं सनातनीम् ।
ईश्वरीं सर्वलोकानां परां प्रकृतिमद्‌भुताम् ॥ ३१ ॥
ध्यायतां कः क्षमो लोके बहुमायाविदप्युत ।
यन्मूलाः सकला माया देवासुरकृताः किल ॥ ३२ ॥
ते कथं बाधितुं शक्ता ध्यायन्ति गतकल्मषाः ।
वाग्बीजं कामबीजञ्च मायाबीजं तथैव च ॥ ३३ ॥
चित्ते यस्य भवेत्तं तु बाधितुं कोऽपि न क्षमः ।
मायया मोहितः शक्रो भूयस्तस्य प्रतिक्रियाम् ॥ ३४ ॥
कर्तुं कामवसन्तौ तु समाहूयाब्रवीद्वचः ।
मनोभव वसन्तेन रत्या युक्तो व्रजाधुना ॥ ३५ ॥
अप्सरोभिः समायुक्तस्तरसा गन्धमादनम् ।
नरनारायणौ तत्र पुराणावृषिसत्तमौ ॥ ३६ ॥
कुरुतस्तप एकान्ते स्थितौ बदरिकाश्रमे ।
गत्वा तत्र समीपे तु तयोर्मन्मथ मार्गणैः ॥ ३७ ॥
चित्तं कामातुरं कार्यं कुरु कार्यं ममाधुना ।
मोहयित्वोच्चाटयित्वा विशिखैस्ताडयाशु च ॥ ३८ ॥
वशीकुरु महाभाग मुनी धर्मसुतावपि ।
को ह्यस्मिन् सर्वसंसारे देवो दैत्योऽथ मानवः ॥ ३९ ॥
यस्ते बाणवशं प्राप्तो न याति भृशताडितः ।
ब्रह्माहं गिरिजानाथश्चन्द्रो वह्निर्विमोहितः ॥ ४० ॥
गणना कानयोः काम त्वद्‌बाणानां पराक्रमे ।
वाराङ्गनागणोऽयं ते सहायार्थं मयेरितः ॥ ४१ ॥
आगमिष्यति तत्रैव रम्भादीनां मनोरमः ।
एका तिलोत्तमा रम्भा कार्यं साधयितुं क्षमा ॥ ४२ ॥
त्वमेवैकः क्षमः कामं मिलितैः कस्तु संशयः ।
कुरु कार्यं महाभाग ददामि तव वाञ्छितम् ॥ ४३ ॥
प्रलोभितौ मयात्यर्थं वरदानैस्तपस्विनौ ।
स्थानान्न चलितौ शान्तौ वृथायं मे गतः श्रमः ॥ ४४ ॥
तथा वै मायया कृत्वा भीषितौ तापसौ भृशम् ।
तथापि नोत्थितौ स्थानाद्देहरक्षापरौ न तौ ॥ ४५ ॥
व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा शक्रं प्राह मनोभवः ।
वासवाद्य करिष्यामि कार्यं ते मनसेप्सितम् ॥ ४६ ॥
यदि विष्णुं महेशं वा ब्रह्माणं वा दिवाकरम् ।
ध्यायन्तौ तौ तदास्माकं भवितारौ वशौ मुनी ॥ ४७ ॥
देवीभक्तं वशीकर्तुं नाहं शक्तः कथञ्चन ।
कामराज महाबीजं चिन्तयन्तं मनस्यलम् ॥ ४८ ॥
तां देवीं चेन्महाशक्तिं संश्रितौ भक्तिभावतः ।
न तदा मम बाणानां गोचरौ तापसौ किल ॥ ४९ ॥

इन्द्र उवाच
गच्छ त्वं च महाभाग सर्वैस्तत्र समुद्यतैः ।
कार्यं ममातिदुःसाध्यं कर्ता हितमनुत्तमम् ॥ ५० ॥
व्यास उवाच
इति तेन समादिष्टा ययुः सर्वे समुद्यताः ।
यत्र तौ धर्मपुत्रौ द्वौ तेपाते दुष्करं तपः ॥ ५१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां ॥
चतुर्थस्कन्धे नरनारायणकथावर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


इंद्र भयभीत होतो -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मुनीश्रेष्ठ व्यास जनमेजयाला म्हणाले, "हे नृपश्रेष्ठा, याविषयी कितीही सांगितले तरी उपयोग काय ? या संसारात धर्मनिष्ठ, द्रोहबुद्धीशिवाय असलेला क्वचितच सापडतो. हे राजाधिराज, हे सर्व चराचर विश्‍व कृतयुगात रागद्वेषांनी व्याप्त झालेले होते. तेव्हा सांप्रत कलियुगात सर्व प्राणी दुषित असतील यात नवल नाही."

हे राजा, देवच द्रोहबुद्धी मनात धरतात, कपटाचरण करतात, असे असताना मानव व तिर्यग्योनीतील प्राणी यांच्यापासून निर्मल मनाची अपेक्षा कशी करावी ? जो द्रोह करतो त्याच्याशी द्रोहाने वागावे, ही पद्धत सर्वत्रच आहे. पण द्रोहापासून अलिप्त असलेल्या पुरुषाचा द्वेष करणे हे नीचपणाचे लक्षण आहे.

कोणीही तापसी, शांत असून, जप व ध्यान याविषयी तत्पर राहिल्यास, इंद्र त्याच्या तपाला विघ्न उत्पन्न करतो. आता यापेक्षा आणखी नीचत्व दुसरे कोणते उरले ? सज्जन लोकांच्या दृष्टीने सत्ययुगच नित्य असते, दुर्जनांना नित्य कलियुगच असते. मध्यम लोकांना कर्म, जप - तप याविषयी तत्पर असलेले द्वापर युगच असते. कलियुगात सत्य धर्माने वागणारा एखादा असतो. प्रायः सर्व लोक त्या त्या युगधर्माप्रमाणे वागणारे असतात.

हे राजा, कोणत्याही युगामध्ये, शुद्ध वासना हे धर्माच्या स्थितीचे कारण आहे. ती मलिन असल्यास धर्म मलिन होतो, मलिन वासनांमुळे सर्वस्वाचा नाश होतो. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून सत्यनिष्ठ व वेदधर्माविषयी तत्पर असा धर्म नावाचा ब्राह्मणपुत्र झाला. गृहस्थाश्रमाचे अवलंबन करणार्‍या त्या महात्मा धर्ममुनीने दक्षाच्या दहा कन्यांशी विवाह केला.

हे राजा, त्या सत्यश्रेष्ठ धर्माला हरिकृष्ण, नर व नारायण असे तीन पुत्र झाले. त्यापैकी हरिकृष्ण नेहमी योगाभ्यास तत्पर होता. नरनारायण उत्तम तपश्चर्या करीत असत. ते सनातन मुनी हिमालय पर्वतावरील बद्रिकाश्रमांत जाऊन तप करू लागले. व तपस्व्यात श्रेष्ठता पावले, गंगेच्या तीरावर परब्रह्माचा जप करीत करीत हरीचे अंश असलेले नरनारायण ऋषी त्या आश्रमात वास्तव्य करू लागले.

त्यांनी हजार वर्षे तप केले. त्यांच्या तपामुळे सर्व जग संतप्त झाले. तेव्हा तो सहस्रनयन इंद्र नरनारायणावर संतप्त झाला. त्याने चिंताक्रांत होऊन मनामध्ये विचार केला, 'आता काय करावे ? हे धर्मपुत्र ध्यानस्थ आहेत. त्यांना उत्तम सिद्धी प्राप्त झालेली आहे. आता हे माझे परमपद तर घेणार नाहीत ना ? तेव्हा तपाचा नाश करणारे विघ्न आणणे इष्ट आहे. त्यासाठी काम, क्रोध, लोभ हे त्यांच्याठिकाणी उत्पन्न केले पाहिजे.’

असा विचार करून इंद्र प्रयत्‍नाला लागला. श्रेष्ठ अशा ऐरावत हत्तीवर तो आरुढ झाला. सत्वर तो गंधमादन पर्वतावर गेला. तेथे तपाच्या योगाने तेजस्वी झालेले दोन सूर्यच, असे ते नर-नारायण इंद्राने पाहिले. तेव्हा तो विचार करू लागला.

'हे आता दुसरे ब्रह्मा - विष्णू निर्माण करीत आहेत की काय ? खरोखर तप करून हे काय साधणार आहेत ?’

असा मनात विचार करून तो नरनारायणांना म्हणाला, "हे महाभाग्यशाली धर्मपुत्रांनो, तुम्हाला काय साधायचे आहे, हे आता सत्वर मला सांगा. हे ऋषीहो, मी तुमच्या तपामुळे संतुष्ट झालो आहे. कोणताही दुर्घट वर मी तुम्हाला देण्यास तयार आहे.

अशारितीने त्या ऋषींसमोर उभा राहून इंद्राने सांगितले असताही, ते दोघेही मुनी तपात मग्न झाल्यामुळे काहीही बोलले नाहीत. तेव्हा इंद्राने मायेने तेथेच लांडगे, सिंह, व्याघ्र, पर्जन्य, वादळे, अग्नी इत्यादी निर्माण करून त्यांना भय उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न केला. पण ते धर्मपुत्र नर-नारायण भयाने क्षणभरही ढळले नाहीत.

ते पाहून चिंतायुक्त होऊन इंद्र स्वगृही परतला. ते दोघेही मुनी वरप्राप्तीचा लोभ धरून चळले नाहीत. अग्नी, वायु, हिंस्र श्‍वापदे यापासून ते भयभीत झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या तपाचा भंग करणे अशक्य होऊन, इंद्र दु:खित झाला. तो स्वतःशी विचार करू लागला,

'हे मुनीश्रेष्ठ नर नारायण, महाविद्या व आदी शक्ति या देवीचे चिंतन करतात, त्यामुळे त्यांना भय अथवा लोभ पदच्युत करू शकत नाही. सर्वांचे कारण व स्वामी असलेल्या त्या पराशक्तीचे सामर्थ्य जाणण्यास कोण बरे समर्थ आहे ? देव दैत्य यांनी उत्पन्न केलेल्या सर्व मायांना तिचाच एकमेव आधार आहे. अंतःकरण निर्दोष करून, जे तिचे ध्यान करतात, त्यांना भय कसे उत्पन्न होणार ? वाग्बीज, कामबीज, मायाबीज ही ज्यांच्या मनात स्थिर आहेत, त्यांना कोण बरे पीडा देऊ शकेल ?’

इंद्र मायेने मोहित झाला होता. त्याने वसंत व मदन यांना बोलावून तो त्यांना म्हणाला, "हे मदना, वसंत, रती व अप्सरा यांना घेऊन तू गंधमादन पर्वतावर जा. बद्रिकाश्रमांत एकांत ठिकाणी नर - नारायण हे ऋषीश्रेष्ठ तपश्चर्या करीत आहेत. हे मदना, तू कामबाणांनी त्यांचे चित्त कामातूर कर आणि माझे देवकार्य पूर्ण कर.

हे महाभाग्यशाली मदना, मोहन, उच्चाटन, व कामबाण यांच्या योगाने तू त्या धर्मपुत्रांना वश करून घे. कामबाणांच्या आघातांनी देव दैत्य वा मानव यापैकी कोण बरे मोहित होणार नाही. हे मदना, ब्रह्मदेव, मी, गिरीजानाथ, चंद्र, अग्नी यांना सुद्धा मोह होतोच. तेव्हा तुझ्या मदनबाणांच्या पराक्रमाने नरनारायण मुनी मोहित होणार नाहीत, हे अशक्य आहे. माझ्या आज्ञेने रंभा वगैरे वारांगना तुझ्या सहाय्याला येतील.

एकटी रंभा, तिलोत्तमा अथवा तूही हे कार्य सहज करू शकाल. मग तुम्ही सर्वजण एकाच वेळी गेलात तर माझे कार्य होण्यास संशय राहणार नाही. म्हणून हे महाभाग्यवान मदना, तू सत्वर हे कार्य कर. तुला जे हवे असेल ते मी देईन. या शांत तपस्व्यांना वरदान देऊन मी मोह पाडण्याचा प्रयत्‍न केला, हिंस्र श्‍वापदे उत्पन्न करून भय दाखविण्याचाही यत्‍न करून पाहिला, पण ते देहरक्षण तत्पर राहून स्वस्थानापासून च्युत झाले नाहीत."

हे इंद्राचे भाषण ऐकून मदन म्हणाला हे देवेंद्रा, मी तुझे कार्य पूर्ण करीन. पण एक अडचण आहे. ते जर विष्णू महेश्‍वर, ब्रह्मदेव अथवा सूर्य यांचे ध्यान करीत असतील तर माझ्या स्वाधीन होतील. पण कामराज नावाच्या महाबीजाचे जर ध्यान ते मनात करीत असतील तर त्या देवीभक्ताला वश करण्यास समर्थ असा कोणी नाही. त्या महाशक्ती देवीचा जप जर त्यांनी केला असेल तर खरोखर ते तपस्वी माझ्या बाणांनी वेधले जाणार नाहीत.

ते ऐकून इंद्र म्हणाला, "हे महाविचारी मदना, तू कार्य सिद्धीसाठी आवश्यक असलेल्या सर्वांना बरोबर घेऊन जा. माझे हे दुर्घट काम तू सिद्धीस ने."

अशा प्रकारे इंद्राची आज्ञा घेऊन तो गंधमादन पर्वतावर गेला. तेथे बद्रिकाश्रमात ते नर-नारायण मुनी तपश्चर्या करीत होते.





अध्याय पाचवा समाप्त

GO TOP