श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
षड्‌विंशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


कुमारीपूजावर्णनम्

जनमेजय उवाच
नवरात्रे तु सम्प्राप्ते किं कर्तव्यं द्विजोत्तम ।
विधानं विधिवद्‌ब्रूहि शरत्काले विशेषतः ॥ १ ॥
किं फलं खलु कस्तत्र विधिः कार्यो महामते ।
एतद्विस्तरतो ब्रूहि कृपया द्विजसत्तम ॥ २ ॥

व्यास उवाच
शृणु राजन्प्रवक्ष्यामि नवरात्रव्रतं शुभम् ।
शरत्काले विशेषेण कर्तव्यं विधिपूर्वकम् ॥ ३ ॥
वसन्ते च प्रकर्तव्यं तथैव प्रेमपूर्वकम् ।
द्वावृतू यमदंष्ट्राख्यौ नूनं सर्वजनेषु वै ॥ ४ ॥
शरद्वसन्तनामानौ दुर्गमौ प्राणिनामिह ।
तस्माद्यत्‍नादिदं कार्यं सर्वत्र शुभमिच्छता ॥ ५ ॥
द्वावेव सुमहाघोरावृतू रोगकरौ नृणाम् ।
वसन्तशरदावेव सर्वनाशकरावुभौ ॥ ६ ॥
तस्मात्तत्र प्रकर्तव्यं चण्डिकापूजनं बुधैः ।
चैत्राश्विने शुभे मासे भक्तिपूर्वं नराधिप ॥ ७ ॥
अमावास्यां च सम्प्राप्य सम्भारं कल्पयेच्छुभम् ।
हविष्यं चाशनं कार्यमेकभुक्तं तु तद्दिने ॥ ८ ॥
मण्डपस्तु प्रकर्तव्यः समे देशे शुभे स्थले ।
हस्तषोडशमानेन स्तम्भध्वजसमन्वितः ॥ ९ ॥
गौरमृद्‌गोमयाभ्यां च लेपनं कारयेत्ततः ।
तन्मध्ये वेदिका शुभ्रा कर्तव्या च समा स्थिरा ॥ १० ॥
चतुर्हस्ता च हस्तोच्छ्रा पीठार्थं स्थानमुत्तमम् ।
तोरणानि विचित्राणि वितानञ्च प्रकल्पयेत् ॥ ११ ॥
रात्रौ द्विजानथामन्त्र्य देवीतत्त्वविशारदान् ।
आचारनिरतान्दान्तान्वेदवेदाङ्गपारगान् ॥ १२ ॥
प्रतिपद्दिवसे कार्यं प्रातःस्नानं विधानतः ।
नद्यां नदे तडागे वा वाप्यां कूपे गृहेऽथवा ॥ १३ ॥
प्रातर्नित्यं पुरः कृत्वा द्विजानां वरणं ततः ।
अर्घ्यपाद्यादिकं सर्वं कर्तव्यं मधुपूर्वकम् ॥ १४ ॥
वस्त्रालङ्करणादीनि देयानि च स्वशक्तितः ।
वित्तशाठ्यं न कर्तव्यं विभवे सति कर्हिचित् ॥ १५ ॥
विप्रैः सन्तोषितैः कार्यं सम्पूर्णं सर्वथा भवेत् ।
नव पञ्च त्रयश्चैको देव्याः पाठे द्विजाः स्मृताः ॥ १६ ॥
वरयेद्‌ब्राह्मणं शान्तं पारायणकृते तदा ।
स्वस्तिवाचनकं कार्यं वेदमन्त्रविधानतः ॥ १७ ॥
वेद्यां सिंहासनं स्थाप्य क्षौ‍मवस्त्रसमन्वितम् ।
तत्र स्थाप्याऽम्बिका देवी चतुर्हस्तायुधान्विता ॥ १८ ॥
रत्‍नभूषणसंयुक्ता मुक्ताहारविराजिता ।
दिव्याम्बरधरा सौ‌म्या सर्वलक्षणसंयुता ॥ १९ ॥
शंखचक्रगदापद्मधरा सिंहे स्थिता शिवा ।
अष्टादशभुजा वाऽपि प्रतिष्ठाप्या सनातनी ॥ २० ॥
अर्चाभावे तथा यन्त्रं नवार्णमन्त्रसंयुतम् ।
स्थापयेत्पीठपूजार्थं कलशं तत्र पार्श्वतः ॥ २१ ॥
पञ्चपल्लवसंयुक्तं वेदमन्त्रैः सुसंस्कृतम् ।
सुतीर्थजलसम्पूर्णं हेमरत्‍नैः समन्वितम् ॥ २२ ॥
पार्श्वे पूजार्थसम्भारान्परिकल्प्य समन्ततः ।
गीतवादित्रनिर्घोषान्कारयेन्मङ्गलाय वै ॥ २३ ॥
तिथौ हस्तान्वितायां च नन्दायां पूजनं वरम् ।
प्रथमे दिवसे राजन् विधिवत्कामदं नृणाम् ॥ २४ ॥
नियमं प्रथमं कृत्वा पश्चात्पूजां समाचरेत् ।
उपवासेन नक्तेन चैकभुक्तेन वा पुनः ॥ २५ ॥
करिष्यामि व्रतं मातर्नवरात्रमनुत्तमम् ।
साहाय्यं कुरु मे देवि जगदम्ब ममाखिलम् ॥ २६ ॥
यथाशक्ति प्रकर्तव्यो नियमो व्रतहेतवे ।
पश्चात्पूजा प्रकर्तव्या विधिवन्मन्त्रपूर्वकम् ॥ २७ ॥
चन्दनागुरुकर्पूरैः कुसुमैश्च सुगन्धिभिः ।
मन्दारकरजाशोकचम्पकैः करवीरकैः ॥ २८ ॥
मालतीब्रह्मकापुष्पैस्तथा बिल्वदलैः शुभैः ।
पूजयेज्जगतां धात्रीं धूपैर्दीपैर्विधानतः ॥ २९ ॥
फलैर्नानाविधैरर्घ्यं प्रदातव्यं च तत्र वै ।
नारिकेलैर्मातुलुङ्गैर्दाडिमीकदलीफलैः ॥ ३० ॥
नारङ्गैः पनसैश्चैव तथा पूर्णफलैः शुभैः ।
अन्नदानं प्रकर्तव्यं भक्तिपूर्वं नराधिप ॥ ३१ ॥
मांसाशनं ये कुर्वन्ति तैः कार्यं पशुहिंसनम् ।
महिषाजवराहाणां बलिदानं विशिष्यते ॥ ३२ ॥
देव्यग्रे निहता यान्ति पशवः स्वर्गमव्ययम् ।
न हिंसा पशुजा तत्र निघ्नतां तत्कृतेऽनघ ॥ ३३ ॥
अहिंसा याज्ञिकी प्रोक्ता सर्वशास्त्रविनिर्णये ।
देवतार्थे विसृष्टानां पशूनां स्वर्गतिर्ध्रुवा ॥ ३४ ॥
होमार्थं चैव कर्तव्यं कुण्डं चैव त्रिकोणकम् ।
स्थण्डिलं वा प्रकर्तव्यं त्रिकोणं मानतः शुभम् ॥ ३५ ॥
त्रिकालं पूजनं नित्यं नानाद्रव्यैर्मनोहरैः ।
गीतवादित्रनृत्यैश्च कर्तव्यश्च महोत्सवः ॥ ३६ ॥
नित्यं भूमौ च शयनं कुमारीणां च पूजनम् ।
वस्त्रालङ्करणैर्दिव्यैर्भोजनैश्च सुधामयैः ॥ ३७ ॥
एकैकां पूजयेन्नित्यमेकवृद्ध्या तथा पुनः ।
द्विगुणं त्रिगुणं वाऽपि प्रत्येकं नवकं च वा ॥ ३८ ॥
विभवस्यानुसारेण कर्तव्यं पूजनं किल ।
वित्तशाठ्यं न कर्तव्यं राजञ्छक्तिमखे सदा ॥ ३९ ॥
एकवर्षा न कर्तव्या कन्या पूजाविधौ नृप ।
परमज्ञा तु भोगानां गन्धादीनां च बालिका ॥ ४० ॥
कुमारिका तु सा प्रोक्ता द्विवर्षा या भवेदिह ।
त्रिमूर्तिश्च त्रिवर्षा च कल्याणी चतुरब्दिका ॥ ४१ ॥
रोहिणी पञ्चवर्षा च षड्‌वर्षा कालिका स्मृता ।
चण्डिका सप्तवर्षा स्यादष्टवर्षा च शाम्भवी ॥ ४२ ॥
नववर्षा भवेद्‌दुर्गा सुभद्रा दशवार्षिकी ।
अत ऊर्ध्वं न कर्तव्या सर्वकार्यविगर्हिता ॥ ४३ ॥
एभिश्च नामभिः पूजा कर्तव्या विधिसंयुता ।
तासां फलानि वक्ष्यामि नवानां पूजने सदा ॥ ४४ ॥
कुमारी पूजिता कुर्याद्‌दुःखदारिद्रयनाशनम् ।
शत्रुक्षयं धनायुष्यं बलवृद्धिं करोति वै ॥ ४५ ॥
त्रिमूर्तिपूजनादायुस्त्रिवर्गस्य फलं भवेत् ।
धनधान्यागमश्चैव पुत्रपौत्रादिवृद्धयः ॥ ४६ ॥
विद्यार्थी विजयार्थी च राज्यार्थी यश्च पार्थिवः ।
सुखार्थी पूजयेन्नित्यं कल्याणीं सर्वकामदाम् ॥ ४७ ॥
कालिकां शत्रुनाशार्थं पूजयेद्‌भक्तिपूर्वकम् ।
ऐश्वर्यधनकामश्च चण्डिकां परिपूजयेत् ॥ ४८ ॥
पूजयेच्छाम्भवीं नित्यं नृपसंमोहनाय च ।
दुःखदारिद्र्यनाशाय सङ्ग्रामे विजयाय च ॥ ४९ ॥
क्रूरशत्रुविनाशार्थं तथोग्रकर्मसाधने ।
दुर्गाञ्च पूजयेद्‌भक्त्या परलोकसुखाय च ॥ ५० ॥
वाञ्छितार्थस्य सिद्ध्यर्थं सुभद्रां पूजयेत्सदा ।
रोहिणीं रोगनाशाय पूजयेद्विधिवन्नरः ॥ ५१ ॥
श्रीरस्त्विति च मन्त्रेण पूजयेद्‌भक्तितत्परः ।
श्रीयुक्तमन्त्रैरथवा बीजमन्त्रैरथापि वा ॥ ५२ ॥
कुमारस्य च तत्त्वानि या सृजत्यपि लीलया ।
कादीनपि च देवांस्तां कुमारीं पूजयाम्यहम् ॥ ५३ ॥
सत्त्वादिभिस्त्रिमूर्तिर्या तैर्हि नानास्वरूपिणी ।
त्रिकालव्यापिनी शक्तिस्त्रिमूर्तिं पूजयाम्यहम् ॥ ५४ ॥
कल्याणकारिणी नित्यं भक्तानां पूजिताऽनिशम् ।
पूजयामि च तां भक्त्या कल्याणीं सर्वकामदाम् ॥ ५५ ॥
रोहयन्ती च बीजानि प्राग्जन्मसञ्चितानि वै ।
या देवी सर्वभूतानां रोहिणीं पूजयाम्यहम् ॥ ५६ ॥
काली कालयते सर्वं ब्रह्माण्डं सचराचरम् ।
कल्पान्तसमये या तां कालिकां पूजयाम्यहम् ॥ ५७ ॥
तां चण्डपापहरणीं चण्डिकां पूजयाम्यहम् ॥ ५८ ॥
अकारणात्समुत्पत्तिर्यन्मयैः परिकीर्तिता ।
यस्यास्तां सुखदां देवीं शाम्भवीं पूजयाम्यहम् ॥ ५९ ॥
दुर्गात्त्रायति भक्तं या सदा दुर्गातिनाशिनी ।
दुर्ज्ञेया सर्वदेवानां तां दुर्गां पूजयाम्यहम् ॥ ६० ॥
सुभद्राणि च भक्तानां कुरुते पूजिता सदा ।
अभद्रनाशिनीं देवीं सुभद्रां पूजयाम्यहम् ॥ ६१ ॥
एभिर्मन्त्रैः पूजनीयाः कन्यकाः सर्वदा बुधैः ।
वस्त्रालङ्करणैर्माल्यैर्गन्धैरुच्चावचैरपि ॥ ६२ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे कुमारीपूजावर्णनं नाम षड्‌विंशोऽध्यायः ॥ २६ ॥


देवीच्या पूजनाचा नवरात्र विधी -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय व्यासांना म्हणाला, हे "द्विजश्रेष्ठा, विशेषतः शरदऋतूतील नवरात्र प्राप्त झाले असता कोणते अनुष्ठान करावे, त्याचप्रमाणे हे महाविचारी द्विजोतमा, त्याचे फल काय ? त्याचे विधान कसे काय करावयाचे ? हेही आपण कृपा करून सविस्तर सांगा."

व्यास म्हणाले, "हे राजा, मी कथन करतो, तू ऐक. विशेषतः शरदऋतुमध्ये हे नवरात्रव्रत विधीपूर्वक अवश्य करावे. त्याचप्रमाणे वसंत ऋतुमध्येही प्रेमपूर्वक हे व्रत करावे. सर्व लोकांमध्ये खरोखरच हेच संज्ञक दोन क्रतु मानले आहेत. शरद आणि वसंत हे ते ऋतु होत. हे दोन ऋतु येथील प्राण्यांना कठीण जात असतात. सर्वत्र कल्याण व्हावे अशी इच्छा करणार्‍या पुरुषाने प्रयत्‍नपूर्वक ही दोन नवरात्र व्रते अवश्य करावी. वसंत व शरद हे दोनच महाघोर व मनुष्यांना रोग उत्पन्न करणारे ऋतू आहेत. हे दोन्ही, लोकांचा नाश करणारे आहेत. हे प्रजाधिपते, चैत्र व अश्विन ह्या शुभ महिन्यात प्राज्ञजनांनी चंडिकेचे पूजन करावे.

अमावस्येचे दिवशी पूजेची शुभ सामग्री जुळवावी. त्या दिवशी एकच वेळ हविष्यान्न सेवन करावे. सपाट प्रदेशावर शुभस्थली स्तंभ व ध्वज ह्यांनी युक्त असा सोळा हात मंडप तयार करावा. गौरवर्ण मृत्तिका व गोमय ह्यांनी सारवण घालून सम व स्थिर अशी शुभ्रवर्ण वेदी त्या मंडपामध्ये करावी, ती एक हात उंच व चौरस चार हात असावी. ते पीठाकरता उत्कृष्ठ स्थान होय. त्या स्थानाला विचित्र तोरणे लावून वर चांदवा बांधावा. देवीतत्त्वज्ञ, आचारसंपन्न, वेदवेदांगपारंगत व जितेंद्रिय ब्राह्मण रात्रीचे वेळी बोलवावे.

नंतर प्रतिपदेचे दिवशी नदी, नद, तडाग, वापी, कूप आणि जृह ह्यांपैकी कोठे तरी प्रातःस्नान यथाविधी करून प्रातःकाळचे नित्यकर्म प्रथम करावे. नंतर द्विजांना निमंत्रण देऊन अर्घ्यपाद्यादिकासह मधुपर्कपूर्वक त्यांचे यथाविधी पूजन करावे. वस्त्रभूषणादिकही आपल्या शक्तीप्रमाणे द्यावी. वैभव असताना वित्तशाठ्य मात्र कधीही करू नये. विप्र संतुष्ट झाले असताच कार्य सर्वस्वी पूर्ण होते.

देवीच्या पाठाविषयी नऊ, पाच, तीन अथवा एक द्विज अवश्य असावा. एकच ब्राह्मण सांगण्याची अनुकूलता असल्यास तो ब्राह्मण शांत पाहून पारायणाकरता बोलवावा. नंतर वेदमंत्रविधानाने स्वस्तिवाचन करावे. वेदीवर रेशमी वस्त्राने झाकलेले सिंहासन स्थापून त्यावर चार हात व आयुधे ह्यांनी युक्त अशा अंबिका देवीची स्थापना करावी. रत्‍नभूषणे तिला घालावी, मोत्यांच्या हाराने तिला शृंगारावी दिव्य वस्त्र नेसवावे; ती सौम्यदेवी सर्व लक्षणसंपन्न करावी. ह्याप्रमाणे सिंहारूढ असलेली ही कल्याणी देवी शंख, चक्र, गदा व पद्य ह्या आयुधांनी युक्त करावी. किंवा ती सनातन देवी अष्टादश भुजा करूनही स्थापावी.

मूर्तीचा अभाव असेल तर नवार्णमंत्राने युक्त असे यंत्र पीठपूजेकरता स्थापून त्याच्या बाजूला कलशस्थापना करावी. वेदमंत्रांनी सुसंस्कृत केलेल्या त्या कलशामध्ये पंचपल्लव, सुवर्ण व रत्‍ने घालून उत्कृष्ट तीर्थोदकाने तो भरावा. नंतर आपल्याजवळ पूजासामग्री ठेवून सभोवती मंगलाकरता गीत व वाद्ये ह्यांचे घोष करावे. हस्तनक्षत्राने युक्त असलेल्या प्रतिपदा तिथीस पूजन करणे अधिक श्रेष्ठ आहे.

हे राजा, प्रथम दिवशी मुनष्यांचे मनोरथ परिपूर्ण करणारे पूजन यथाविधी करावे, प्रथमतः नियम करून नंतर पूजेला आरंभ करावा. उपवास अथवा एकभुक्त राहून 'हे माते, मी अनुपम नवरात्र व्रत करीन. हे देवी, हे जगदंबे, तू मला सर्व साहाय्य कर.' असा यथाशक्ती नियम प्रथम करून नंतर यथाविधी समंत्रक पूजन करावे. चंदन, अगर, कपूर, सुगंधी पुष्पे, मंदार, करज, अशोक, चंपक, करवीर, मालती व ब्राह्मी ह्यांची पुष्पे, शुभ बिल्वदळे आणि धूप, दीप यांच्यायोगाने जगद्धात्रीचे यथाविधी पूजन करावे. नंतर नारळ महाळुंगे, डाळिंबे, केळी, नारिंगे, फणस, बिल्वदळे इत्यादी नानाप्रकारच्या शुभ फलांनी अर्घ्य देऊन भक्तिपूर्वक अन्नदान करावे.

ज्यांना मांसाशन निषिद्ध नसेल त्यांनी पशुहिंसा करावी, त्यांनी महिष, अज, वराह यांच्यायोगाने बलिदान करणे विशेष फलप्रद आहे. त्यांच्याकरिता देवीचे अग्रभागी वध पावलेल्या पशूंना अक्षय सर्व प्राप्ती होते. हे निष्पाप राजा, देवीकरता पशू मारणार्‍यांना त्या ठिकाणी पशुहिंसेचे पातक लागत नाही, यज्ञसंबंधी पशुवध ही हिंसा नव्हे, असा सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे. देवतांकरता प्राणत्याग केलेल्या पशूंना स्वर्गप्राप्ती निश्चित होत असते. होमाकरता तिकानी कुंड अथवा तिकोनी स्थंडिल करावे व ते शास्त्रोक्त प्रमाणाने बद्ध असावे. नानाप्रकारच्या मनोहर द्रव्यांनी प्रत्यही त्रिकाल पूजन करावे. गीत, वाद्य व नृत्य यांच्या योगाने महोत्सव करावा. प्रत्यही भूमीवर शयन करावे आणि दिव्य वस्त्रालंकार व मिष्ट पदार्थ यांच्यायोगाने कुमारिकांचे पूजन करावे. प्रत्यही एका कुमारीचे पूजन करावे. अथवा प्रतिदिवशी एकएक कुमारीका वाढवून पूजन करावे, प्रत्यही कुमारिका दुप्पट अथवा तिप्पट वाढवून पूजन करावे. हे पूजन वैभवाला अनुसरून करावे.

हे राजा, देवीच्या यज्ञाविषयी कधीही वित्तशाठ्य करू नये. हे नृपा, कन्येच्या वयाचे वर्ष पहिलेच असल्यास पूजेकरता तिला स्वीकारू नये. ती बालिका गंधादिकांचा भोग घेण्यास फारच अज्ञानी असते. दुसरे वर्ष असल्यास ती कुमारिका म्हणून हा नवरात्रव्रतामध्ये पूज्य आहे. तीन वर्षाची असल्यास ती कन्या त्रिमूर्ती होय. चवथे, पाचवे, सहावे, सातवे, आठवे, नववे, व दहावे वर्ष असल्यास अनुक्रमे कल्याणी, रोहिणी, कालिका, चंडिका, शांभवी, दुर्गा व सुभद्रा होय. दहापेक्षा वयाने जास्त असलेल्या कन्येचे पूजन करू नये. कारण दहा वर्षापक्षा अधिक वयाच्या कन्येने अविवाहित राहणे हे देवी नवरात्र जेव्हापासून भूतलावर प्रसिद्ध झाले, तेव्हापासून निंद्य समजले जात असल्याचे दिसते.

म्हणून वरील नावांनी कुमारीपूजन यथाविधी करावे.

या नऊ कुमारिकांच्या पूजनाचे फल मी आता कथन करतो. कुमारीचे पूजन केले असता दुःख, दारिद्र्य व शत्रू यांचा नाश; धन व आयुष्य यांची प्राप्ती आणि बलाची वृद्धी होते. त्रिमूर्तीचे पूजन केले असता आयुष्य, धर्म, अर्थ व काम यांची सिद्धी; धन व धान्य यांची प्राप्ती व पुत्रपौत्रादिकांनी वृद्धी हे फल प्राप्त होते.

विद्या, विजय, राज्य, व सुख यांची इच्छा करणार्‍या राजाने खरोखर सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्‍या कल्याणीचे पूजन करावे. शत्रुनाश होण्याकरता भक्तिपूर्वक कालिकेचे पूजन करावे. हे राजा, संमोहनाकरता दुःख व दारिद्र्य यांचा नाश होण्याकरता व संग्रामामध्ये विजय प्राप्त होण्याकरिता शांभवीचे नित्य पूजन करावे. क्रूर शत्रूंचा नाश व उग्र कर्माची सिद्धी होण्याकरता व त्याचप्रमाणे परलोकसंबंधी सुख प्राप्त होण्याकरता भक्तीने दुर्गेचे पूजन करावे.

इष्टकामना पूर्ण व्हावी म्हणून सुभद्रेचे सर्वदा पूजन करावे आणि रोगनाशाकरता पुरुषाने रोहिणीचे यथाविधी पूजन करावे, 'श्रीरस्तू' या मंत्राने किंवा 'श्री' या पदाने युक्त अशा देवीच्या मंत्रांनी अथवा बीज मंत्रांनी देवीचे पूजन करावे.

व्यास म्हणतात, "हे राजा, आता पुढील नऊ श्लोक हे कुमारीप्रभूती नऊ कन्यांच्या पूजनाचे मंत्रच आहेत. त्यांचा अर्थ मी तुला सांगतो.

कुमारीची तत्त्वे, आणि ब्रह्मदेव प्रभूती देव, जी लीलेने उत्पन्न करते त्या कुमारीचे मी पूजन करतो. सत्त्वादी गुणांच्या योगाने जी नानाप्रकारची स्वरूप धारण करीत असते आणि जी त्रिकाल व्यापिनी शक्ती आहे, त्या त्रिमूर्तीची मी आराधना करतो. पूजन केले असता जी सर्वदा भक्तांचे कल्याण करीत असते. त्या सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्‍या कल्याणीचे मी भक्तीने पूजन करतो. पूर्वजन्मसंचित बीजांना जिच्यामुळे अंकुर फुटत असतात आणि जी सर्व भूतांची देवी आहे, त्या रोहिणीचे मी पूजन करतो. जी काली कल्पांत समयी सर्व चराचर ब्रह्मांडाचा संहार करीत असते. त्या कालिकेचे मी पूजन करतो. चंडिका, चंडस्वरूपिनी, चंडमुंडजा, नाश करणारी व प्रचंड पाप हरण करणारी जी चंडिका तिचे मी पूजन करतो. वेद जिचे स्वरूप आहे व त्या वेदांनी जिची उत्पत्ती सहज लीलेने कथन केली आहे, त्या सुखदायक शांभवी देवीचे पूजन करतो. जी संकटापासून सर्वदा भक्ताचे रक्षण करीत असते, दुःसह दुःखाचा जी परिहार करीत असते व सर्व देवांनाही जिचे ज्ञान होणे दुर्घट आहे त्या दुर्गेचे मी पूजन करतो. पूजन केले असता तिच्या भक्तांचे ती सर्वदा मंगलच करीत असते. त्या अभद्रनाशक सुभद्रादेवीचे मी पूजन करतो.

ह्याप्रमाणे हलकी, भारी वस्त्रे, अलंकार, पुष्पे, व सुगंधी द्रव्ये अर्पण करून, ह्या मंत्रांनी सदोदित प्राज्ञजनांनी कन्यांचे पूजन करावे.



अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP