श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
चतुर्विंशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


देवीमहिमवर्णनम्

व्यास उवाच
तस्यास्तद्वचनं श्रुत्वा भवान्याः स नृपोत्तमः ।
प्रोवाच वचनं तत्र सुबाहुर्भक्तिसंयुतः ॥ १ ॥
सुबाहुरुवाच
एकतो देवलोकस्य राज्यं भूमण्डलस्य च ।
एकतो दर्शनं ते वै न च तुल्यं कदाचन ॥ २ ॥
दर्शनात्सदृशं किञ्चित्त्रिषु लोकेषु नास्ति मे ।
कं वरं देवि याचेऽहं कृतार्थोऽस्मि धरातले ॥ ३ ॥
एतदिच्छाम्यहं मातर्याचितुं वाञ्छितं वरम् ।
तव भक्तिः सदा मेऽस्तु निश्चला ह्यनपायिनी ॥ ४ ॥
नगरेऽत्र त्वया मातः स्थातव्यं मम सर्वदा ।
दुर्गादेवीति नाम्ना वै त्वं शक्तिरिह संस्थिता ॥ ५ ॥
रक्षा त्वया च कर्तव्या सर्वदा नगरस्य ह ।
यथा सुदर्शनस्त्रातो रिपुसंघादनामयः ॥ ६ ॥
तथाऽत्र रक्षा कर्तव्या वाराणस्यास्त्वयाम्बिके ।
यावत्पुरी भवेद्‌भूमौ सुप्रतिष्ठा सुसंस्थिता ॥ ७ ॥
तावत्त्वयाऽत्र स्थातव्यं दुर्गे देवि कृपानिधे ।
वरोऽयं मम ते देयः किमन्यत्प्रार्थयाम्यहम् ॥ ८ ॥
विविधान्सकलान्कामान्देहि मे विद्विषो जहि ।
अभद्राणां विनाशञ्च कुरु लोकस्य सर्वदा ॥ ९ ॥
व्यास उवाच
इति सम्प्रार्थिता देवी दुर्गा दुर्गार्तिनाशिनी ।
तमुवाच नृपं तत्र स्तुत्वा वै संस्थितं पुरः ॥ १० ॥
दुर्गोवाच
राजन्सदा निवासो मे मुक्तिपुर्यां भविष्यति ।
रक्षार्थं सर्वलोकानां यावत्तिष्ठति मेदिनी ॥ ११ ॥
अथो सुदर्शनस्तत्र समागत्य मुदान्वितः ।
प्रणम्य परया भक्त्या तुष्टाव जगदम्बिकाम् ॥ १२ ॥
अहो कृपा ये कथयाम्यहं किं
     त्रातस्त्वया यत्किल भक्तिहीनः ।
भक्तानुकम्पी सकलो जनोऽस्ति
     विमुक्तभक्तेरवनं व्रतं ते ॥ १३ ॥
त्वं देवि सर्वं सृजसि प्रपञ्चं
     श्रुतं मया पालयसि स्वसृष्टम् ।
त्वमत्सि संहारपरे च काले
     न तेऽत्र चित्रं मम रक्षणं वै ॥ १४ ॥
करोमि किं ते वद देवि कार्यं
     क्व वा व्रजामीत्यनुमोदयाशु ।
कार्ये विमूढोऽस्मि तवाज्ञयाऽहं
     गच्छामि तिष्ठे विहरामि मातः ॥ १५ ॥

व्यास उवाच
तं तथा भाषमाणं तु देवी प्राह दयान्विता ।
गच्छायोध्यां महाभाग कुरु राज्यं कुलोचितम् ॥ १६ ॥
स्मरणीया सदाऽहं ते पूजनीया प्रयत्‍नतः ।
शं विधास्याम्यहं नित्यं राज्यं ते नृपसत्तम ॥ १७ ॥
अष्टम्याञ्च चतुर्दश्यां नवम्याञ्च विशेषतः ।
मम पूजा प्रकर्तव्या बलिदानविधानतः ॥ १८ ॥
अर्चा मदीया नगरे स्थापनीया त्वयाऽनघ ।
पूजनीया प्रयत्‍नेन त्रिकालं भक्तिपूर्वकम् ॥ १९ ॥
शरत्काले महापूजा कर्तव्या मम सर्वदा ।
नवरात्रविधानेन भक्तिभावयुतेन च ॥ २० ॥
चैत्रेऽश्विने तथाऽऽषाढे माघे कार्यो महोत्सवः ।
नवरात्रे महाराज पूजा कार्या विशेषतः ॥ २१ ॥
कृष्णपक्षे चतुर्दश्यां मम भक्तिसमन्वितैः ।
कर्तव्या नृपशार्दूल तथाऽष्टम्यां सदा बुधैः ॥ २२ ॥
व्यास उवाच
इत्युक्त्वान्तर्हिता देवी दुर्गा दुर्गार्तिनाशिनी ।
नता सुदर्शनेनाथ स्तुता च बहुविस्तरम् ॥ २३ ॥
अन्तर्हितां तु तां दृष्ट्वा राजानः सर्व एव ते ।
प्रणेमुस्तं समागम्य यथा शक्रं सुरास्तथा ॥ २४ ॥
सुबाहुरपि तं नत्वा स्थितश्चाग्रे मुदान्वितः ।
ऊचुः सर्वे महीपाला अयोध्याधिपतिं तदा ॥ २५ ॥
त्वमस्माकं प्रभुः शास्ता सेवकास्ते वयं सदा ।
कुरु राज्यमयोध्यायां पालयास्मान्नृपोत्तम ॥ २६ ॥
त्वत्प्रसादान्महाराज दृष्टा विश्वेश्वरी शिवा ।
आदिशक्तिर्भवानी सा चतुर्वर्गफलप्रदा ॥ २७ ॥
धन्यस्त्वं कृतकृत्योऽसि बहुपुण्यो धरातले ।
यस्माच्च त्वत्कृते देवी प्रादुर्भूता सनातनी ॥ २८ ॥
न जानीमो वयं सर्वे प्रभावं नृपसत्तम ।
चण्डिकायास्तमोयुक्ता मायया मोहिताः सदा ॥ २९ ॥
धनदारसुतानां च चिन्तनेऽभिरताः सदा ।
मग्ना महार्वणे घोरे कामक्रोधझषाकुले ॥ ३० ॥
पृच्छामस्त्वां महाभाग सर्वज्ञोऽसि महामते ।
केयं शक्तिः कुतो जाता किं प्रभावा वदस्व तत् ॥ ३१ ॥
भव त्वं नौश्च संसारे साधवोऽति दयापराः ।
तस्मान्नो वद काकुत्स्थ देवीमाहात्म्यमुत्तमम् ॥ ३२ ॥
यत्प्रभावा च सा देवी यत्स्वरुपा यदुद्‌भवा ।
सत्सर्वं श्रोतुमिच्छामस्त्वं ब्रूहि नृवरोत्तम ॥ ३३ ॥
व्यास उवाच
इति पृष्टस्तदा तैस्तु ध्रुवसन्धिसुतो नृपः ।
विचिन्त्य मनसा देवीं तानुवाच मुदान्वितः ॥ ३४ ॥
सुदर्शन उवाच
किं ब्रवीमि महीपालास्तस्याश्चरितमुत्तमम् ।
ब्रह्मादयो न जानन्ति सेशाः सुरगणास्तथा ॥ ३५ ॥
सर्वस्याद्या महालक्ष्मीर्वरेण्या शक्तिरुत्तमा ।
सात्त्विकीयं महीपाला जगत्पालनतत्परा ॥ ३६ ॥
सृजते या रजोरूपा सत्त्वरूपा च पालने ।
संहारे च तमोरूपा त्रिगुणा सा सदा मता ॥ ३७ ॥
निर्गुणा परमा शक्तिः सर्वकामफलप्रदा ।
सर्वेषां कारणं सा हि ब्रह्मादीनां नृपोत्तमाः ॥ ३८ ॥
निर्गुणा सर्वथा ज्ञातुमशक्या योगिभिर्नृपाः ।
सगुणा सुखसेव्या सा चिन्तनीया सदा बुधैः ॥ ३९ ॥
राजान ऊचुः
बाल एव वनं प्राप्तस्त्वं तु नूनं भयातुरः ।
कथं ज्ञाता त्वया देवी परमा शक्तिरुत्तमा ॥ ४० ॥
उपासिता कथं चैव पूजिता च कथं नृप ।
या प्रसन्ना तु साहाय्यं चकार त्वरयान्विता ॥ ४१ ॥
सुदर्शन उवाच
बालभावान्मया प्राप्तं बीजं तस्याः सुसम्मतम् ।
स्मरामि प्रजपन्नित्यं कामबीजाभिधं नृपाः ॥ ४२ ॥
ऋषिभिः कथ्यमाना सा मया ज्ञाताम्बिका शिवा ।
स्मरामि तां दिवारात्रं भक्त्या परमया पराम् ॥ ४३ ॥
व्यास उवाच
तन्निशम्य वचस्तस्य राजानो भक्तितत्पराः ।
तां मत्वा परमां शक्तिं निर्ययुः स्वगृहान्प्रति ॥ ४४ ॥
सुबाहुरगमत्काश्यां तमापृच्छ्य सुदर्शनम् ।
सुदर्शनोऽपि धर्मात्मा निर्ज्जगाम सुकोसलान् ॥ ४५ ॥
मन्त्रिणस्तु नृपं श्रुत्वा हतं शत्रुजितं मृधे ।
जितं सुदर्शनञ्चैव बभूवुः प्रेमसंयुताः ॥ ४६ ॥
आगच्छन्तं नृपं श्रुत्वा तं साकेतनिवासिनः ।
उपायनान्युपादाय प्रययुः सम्मुखे जनाः ॥ ४७ ॥
तथा प्रकृतयः सर्वे नानोपायनपाणयः ।
ध्रुवसन्धिसुतं दत्त्वा मुदिताः प्रययुः प्रजाः ॥ ४८ ॥
स्त्रियोपसंयुतः सोऽथ प्राप्यायोध्यां सुदर्शनः ।
सम्मान्य सर्वलोकांश्च ययौ राजा निवेशनम् ॥ ४९ ॥
वन्दिभिः स्तूयमानस्तु वन्द्यमानश्च मन्त्रिभिः ।
कन्याभिः कीर्यमाणश्च लाजैः सुमनसैस्तथा ॥ ५० ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सुदर्शनेन
देवीमहिमवर्णनं नाम तृतीयस्कन्धे चतुर्विशोऽध्यायः ॥ २४ ॥


सुदर्शनाला युद्धात जय प्राप्त होतो -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

त्या भवानीचे ते भाषण श्रवण केल्यानंतर भक्तीने युक्त असलेला तो नृपश्रेष्ठ सुबाहू तिला म्हणाला, "हे देवी, देवलोक व भूमंडल ह्यांचे राज्य एकीकडे घालून, दुसरीकडे तुझे दर्शन घातले असता, त्या राज्याची दर्शनाशी बरोबरी करणारे, त्रैलोक्यामध्ये मला काहीएक दिसत नाही. ह्यास्तव हे देवी, मी कोणत्या बरे वराची याचना करावी ?

ह्या भूतलावर मी कृतार्थ आहे. तथापि हे माते, इष्ट वर मागण्याची माझी इच्छा आहे. तुझे ठिकाणी माझी भक्ति निश्चल व अक्षय असो. हे माते, ह्या माझ्या नगरामध्ये तुझे सर्वदा वास्तव्य होवो. दुगदिवी ह्या नावाने तू शक्ति, ह्या ठिकाणी राहा, तू सर्वदा ह्या नगराचे रक्षण करीत जा.

ज्याप्रमाणे शत्रूपासून तू सुदर्शनाचे रक्षण करून त्याला बिनधोक ठेवलेस. त्याचप्रमाणे हे अंबिके, तू येथे वाराणसी नगरीचे रक्षण करीत जा. जोपर्यंत ही नगरी भूमीवर चांगल्या रीतीने कायम आहे, तोपर्यंत हे कृपानिधे, दुर्गे, हे देवी, तू ह्या ठिकाणी वास्तव्य कर. हा तू मला वर दे. दुसरे मी काय बरे मागू ? यापुढेही नानाप्रकारचे सर्व मनोरथ परिपूर्ण करून तू माझ्या शत्रूंचा वध कर आणि लोकांच्या अमंगलाचा सर्वदा नाश करीत जा."

ह्याप्रमाणे दुर्गसंबंधी दुःखाचा नाश करणार्‍या, त्या दुर्गादेवीची प्रार्थना केली असता, ती स्तुती ऐकून समोरच उभा असलेल्या राजाला ती देवी म्हणाली, हे राजा, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत सर्व लोकांच्या रक्षणार्थ ह्मा मुक्तिपुरीमध्ये माझे सर्वदा वास्तव्य होईल."

ह्यावर सुदर्शन आनंदाने तिच्याजवळ गेला आणि मोठ्या भक्तीने प्रणाम करून त्या जगदंबेचे स्तवन करू लागला. सुदर्शन म्हणाला, अहाहा ! काय ही तुझी कृपा वर्णन करावी ! तू खरोखर भक्तिहीनाचेही रक्षण केले आहेस. सर्व लोक भक्तावर कृपा करणारे असतात. परंतु, भक्तिहीनाचे रक्षण करणे हे तुझेच व्रत आहे. हे देवी, तू सर्व जगत उत्पन्न करीत असून, स्वतः उत्पन्न केलेल्या जगताचे रक्षण तूच करीत असतेस, असे माझ्या ऐकण्यात आहे. प्रलयकाली तू त्याचा संहारही करीत असतेस. म्हणून ह्या ठिकाणी तू माझे रक्षण केलेस, ह्यात काहीच आश्चर्य नाही. हे देवी, मी तुझे काय कार्य करू ते सांग अथवा कोठे जाऊ ते निवेदन कर. काय करावे हे मला समजत नाही. हे माते, तुझ्या आज्ञेने मी गमन करीन, अथवा उभा राहीन वा क्रीडाही करीन."

त्यावर ती दयाळू देवी त्याला म्हणाली, हे महाभाग्यवान राजा सुदर्शना, तू अयोध्येला जा. कुलपरंपरेने प्राप्त झालेले राज्य कर. सर्वदा तू माझे प्रयत्‍नपूर्वक स्मरण व पूजन करीत जा. हे नृपश्रेष्ठा, तुझ्या राज्यामध्ये मी सर्वदा कल्याणच करीत जाईन. विशेषतः अष्टमी, चतुर्दशी व नवमी ह्या दिवशी बलिदानविधानपूर्वक तू माझे पूजन करीत जा, हे निष्पापा, आपल्या नगरामध्ये तू माझी मूर्ती स्थापन कर. प्रयत्‍नाने व भक्तिपूर्वक तिचे त्रिकाल पूजन करीत जा. नवरात्रविधानाने भक्तिपूर्वक शरदऋतूमध्ये माझी सर्वदा महापूजा कर, चैत्र, आषाढ, आश्विन आणि माघ ह्या चारी महिन्यातील नवरात्रांमध्ये, हे महाराज, विशेषतः माझी पूजा करावी. त्याचप्रमाणे हे नृपश्रेष्ठा, कृष्णपक्षातील अष्टमीस व चर्तुदशीस, भक्तियुक्त प्राज्ञजनांनी, सर्वदा माझे पूजन करावे."

ती दुर्गसंबंधी दुःखाचा नाश करणारी दुर्गादिवी, असे बोलून अंतर्धान पावली तेव्हा सुदर्शनाने प्रणामपूर्वक तिचे अनेक प्रकाराने स्तवन केले. ती देवी अंतर्धान पावल्याचे अवलोकन करताक्षणी ते सर्वही राजे, इंद्रपाशी येणार्‍या देवांप्रमाणे, सुदर्शनासमीप आले. त्याला त्यांनी प्रणाम केला. नंतर सुबाहूही त्यांना प्रणाम करून आनंदाने त्यांचे अग्रभागी उभा राहिला.

त्यानंतर सर्व भूपाल त्या अयोध्याधिपती सुदर्शनाला म्हणाले, तू आमचा प्रभू व शास्ता आहेस. आम्ही सर्वदा तुझे सेवक आहोत. हे नृपश्रेष्ठा, आपण अयोध्येत राज्य करून आमचे परिपालन करावे. हे महाराज, विश्वेश्वरी, कल्याणी, आदिशक्ति व चतुर्वर्ण फल देणारी जी भवानी, तिचे दर्शन आपल्या कृपेमुळे आम्हाला झाले. आपल्याकरिता ती अक्षय देवी प्रकट झाली. ह्या भूतलावर धन्य कृतार्थ व महापुण्यवान आपणच आहात. हे नृपश्रेष्ठा, सर्वदा तमोगुणाने युक्त व मायेने मोहित झालेल्या आम्हा सर्वांना, चंडिकेचा प्रभाव विदित असणे शक्य नाही. कामक्रोधरूप जलचरांनी गजबजलेल्या संसाररूप घोर महासागरामध्ये मग्न झाल्यामुळे द्रव्य, भार्या व पुत्र ह्यांच्या चिंतनातच सर्वदा आम्ही गढून गेलो आहोत.

हे महाभाग्यवान, हे महाविचारी राजा, तू सर्वज्ञ आहेस. ह्यास्तव आम्ही तुला विचारतो, ही शक्ति कोण ? कोठून उत्पन्न झाली हे आम्हाला कथन कर. तू ह्या संसारसागरामध्ये आमची नौका हो. हे साधु आपण अतिशय दयाशील आहात. हे काकुस्था, देवीचे उत्कृष्ट माहात्म्य तू आम्हाला कथन कर. त्या देवीचा प्रभाव काय आहे ? तिचे स्वरूप कसे आहे ? आणि तिची उत्पत्ति कोठून झाली आहे ? हे सर्व श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. हे श्रेष्ठ पुरुषोतमा, तू ते आम्हाला कथन कर." असा त्यांनी प्रश्न केला असता ध्रुवसंधिपुत्र सुदर्शनराजा, मनामध्ये देवीचे चिंतन करून, आनंदाने त्यांना म्हणाला, "हे भूपालहो, तिचे उत्कृष्ट चरित्र मी यःकश्चित काय बरे तुम्हाला कथन करू ? शंकरासह ब्रह्मादि देव व इतर देवगणही ते जाणीत नाहीत. हे भूपालहो, ही महालक्ष्मी श्रेष्ठ व उत्कृष्ट शक्ति असून सर्वापेक्षा प्राचीन आहे. ही सात्विकी शक्ति जगताचे परिपालन करण्याविषयी तत्पर राहणारी आहे. ही सृष्टिकाली रजोरूप, पालनसमयी सत्वरूप व संहारकाली तमोरूप, धारण करीत असते. म्हणून ती सर्वदा त्रिगुणा म्हणून प्रसिद्ध आहे. हे नृपश्रेष्ठहो, तीच सर्व मनोरथ परिपूर्ण करून, सर्व फले देणारी उत्कृष्ट शक्ति, निर्गुण असून, ब्रह्मादि सर्व देवांचे कारणही तीच आहे, हे नृपहो, तिच्या निर्गुण स्वरूपाचे सर्वस्वी ज्ञान होणे योग्यांशिवाय इतरांना शक्य नाही. आपणासारख्यांना तिच्या सगुण रूपाचे अनायासे सेवन करता येते. ह्यास्तव त्याच रूपाचे प्राज्ञजनांनी सर्वदा तिचे चिंतन करावे."

सुदर्शनाचे भाषण ऐकून सर्व राजे म्हणाले, "तू तर खरोखर बाल असतानाच भयाने व्याकूळ होऊन वनामध्ये गेला होतास. उत्कृष्ट व परमशक्ति जी देवी तिचे तुला कसे बरे ज्ञान झाले ? सांप्रत जिने प्रसन्न होऊन सत्वर तुला साहाय्य केले, तिची उपासना व पूजा तरी तू कशी केलीस व कधी केलीस ?"

सुदर्शन म्हणाला, "बालपणामुळे अकस्मात पूर्व पुण्याने तिचे शास्त्रसंमत बीज मला प्राप्त झाले. हे नृपहो, त्याच कामबीजसंज्ञक मंत्राचा मी नित्य जप व स्मरण करीत असतो. जप करीत असताना सुदैवाने त्या कल्याणी अंबिकेचे मला ज्ञान झाले व तेव्हापासून मी परभक्तीने रात्रंदिवस त्या श्रेष्ठ देवीचे स्मरण करीत आहे."

त्याचे ते भाषण श्रवण केल्यानंतर राजे देवीच्या भक्तीस तत्पर झाले. ती उत्कृष्ट शक्ती आहे असे समजून आपापल्या घरी गेले. त्या सुदर्शनाचा निरोप घेऊन सुबाहूही काशीमध्ये गेला. धर्मात्मा सुदर्शनही कोसलदेशाला निघून गेला. शत्रुजित राजा संग्रामामध्ये वध पावल्याचे व सुदर्शन विजयी झाल्याचे श्रवण करताक्षणी अयोध्येतील मंत्र्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न झाले. तो नृप येत आहे असे ऐकल्यावर अयोध्येतील लोक नजराणे घेऊन त्याला सामोरे गेले. सर्व प्रधानही नाना प्रकारचे नजराणे हातामध्ये घेऊन निघाले, आणि ध्रुवसंधीपुत्र येत आहे असे समजून आनंदीत झालेले सर्व प्रजाजनही तिकडे गेले.

नंतर तो सुदर्शनराजा भार्येसह अयोध्येमध्ये प्राप्त झाला व सर्व लोकांना मान देऊन राजवाड्यामध्ये गेला, तेव्हा भाट त्यांची स्तुती करू लागले. मंत्री वंदन करीत होते आणि कुमारीका त्याच्यावर लाह्या व पुष्पे उधळीत होत्या.


अध्याय चोविसावा समाप्त

GO TOP