श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


कन्यया स्वपितरं प्रति सुदर्शनेन सह विवाहार्थकथनम्

व्यास उवाच
सुबाहुरपि तच्छ्रुत्वा युक्तमुक्तं तया तदा ।
चिन्ताविष्टो बभूवाशु किं कर्तव्यमतः परम् ॥ १ ॥
सङ्गताः पृथिवीपालाः ससैन्याः सपरिग्रहाः ।
उपविष्टाश्‍च मञ्चेषु योद्धुकामा महाबलाः ॥ २ ॥
यदि ब्रवीमि तान्सर्वान्सुता नायाति साम्प्रतम् ।
तथापि कोपसंयुक्ता हन्युर्मा दुष्टबुद्धयः ॥ ३ ॥
न मे सैन्यबलं तादृङ्न दुर्गबलमद्‌भुतम् ।
येनाहं नृपतीन्सर्वान् प्रत्यादेष्टुमिहोत्सहे ॥ ४ ॥
सुदर्शनस्तथैकाकी ह्यसहायोऽधनः शिशुः ।
किं कर्तव्यं निमग्नोऽहं सर्वथा दुःखसागरे ॥ ५ ॥
इति चिन्तापरो राजा जगाम नृपसन्निधौ ।
प्रणम्य तानुवाचाथ प्रश्रयावनतो नृपः ॥ ६ ॥
किं कर्तव्यं नृपाः कामं नैति मे मण्डपे सुता ।
बहुशः प्रेर्यमाणाऽपि सा मात्राऽपि मयाऽपि च ॥ ७ ॥
मूर्घ्ना पतामि पादेषु राज्ञां दासोऽस्मि साम्प्रतम् ।
पूजादिकं गृहीत्वाऽद्य व्रजन्तु सदनानि वः ॥ ८ ॥
ददामि बहुरत्‍नानि वस्त्राणि च गजान् रथान् ।
गृहीत्वाऽद्य कृपां कृत्वा व्रजन्तु भवनान्युत ॥ ९ ॥
न वशे मे सुता बाला म्रियते यदि खेदिता ।
तदा मे स्यान्महद्‍दुःखं तेन चिन्तातुरोऽस्म्यहम् ॥ १० ॥
भवन्तः करुणावन्तो महाभाग्या महौजसः ।
किं मे तया दुहित्रा तु मन्दया दुर्विनीतया ॥ ११ ॥
अनुग्राह्योऽस्मि वः कामं दासोऽहमिति सर्वथा ।
सुता सुतेव मन्तव्या भवद्‌भिः सर्वथा मम ॥ १२ ॥

व्यास उवाच
श्रुत्वा सुबाहुवचनं नोचुः केचन भूमिपाः ।
युधाजित्क्रोधताम्राक्षस्तमुवाच रुषान्वितः ॥ १३ ॥
राजन्मूर्खोऽसि किं ब्रूषे कृत्वा कार्य सुनिन्दितम् ।
स्वयंवरः कथं मोहाद्‌रचितः संशये सति ॥ १४ ॥
मिलिता भूभुजः सर्वे त्वयाहूताः स्वयंवरे ।
कथमद्य नृपा गन्तुं योग्यास्ते स्वगृहान्प्रति ॥ १५ ॥
अवमान्य नृपान्सर्वांस्त्वं किं सुदर्शनाय वै ।
दातुमिच्छसि पुत्रीञ्च किमनार्यमतः परम् ॥ १६ ॥
विचार्य पुरुषेणादौ कार्यं वै शुभमिच्छता ।
आरब्धव्यं त्वया तत्तु कृतं राजन्नजानता ॥ १७ ॥
एतान्विहाय नृपतीन्बलवाहनसंयुतान् ।
वरं सुदर्शनं कर्तुं कथमिच्छसि साम्प्रतम् ॥ १८ ॥
अहं त्वां हन्मि पापिष्ठं तथा पश्‍चात्सुदर्शनम् ।
दौहित्रायाद्य ते कन्यां दास्यामीति विनिश्‍चयः ॥ १९ ॥
मयि तिष्ठति कोऽन्योस्ति यः कन्यां हर्तुमिच्छति ।
सुदर्शनः कियानद्य निर्धनो निर्बलः शिशुः ॥ २० ॥
भारद्वाजाश्रमे पूर्वं मुक्तो मुनिकृते मया ।
नाद्याहं मोचयिष्यामि सर्वथा जीवितं शिशोः ॥ २१ ॥
तस्माद्विचार्य सम्यक्त्वं पुत्र्या च भार्यया सह ।
दौहित्राय प्रियां कन्यां देहि मे सुभ्रुवं किल ॥ २२ ॥
सम्बन्धी भव दत्त्वा त्वं पुत्रीमेतां मनोरमाम् ।
उच्चाश्रयः प्रकर्तव्यः सर्वदा शुभमिच्छता ॥ २३ ॥
सुदर्शनाय दत्त्वा त्वं पुत्रीं प्राणप्रियां शुभाम् ।
एकाकिनेऽप्यराज्याय किं सुखं प्राप्तुमिच्छसि ॥ २४ ॥
( कुलं वित्तं बलं रूपं राज्यं दुर्गं सुहृज्जनम् ।
दृष्ट्वा कन्या प्रदातव्या नान्यथा सुखमृच्छति) ॥
परिचिन्तय धर्मं त्वं राजनीतिञ्च शाश्‍वतीम् ।
कुरु कार्यं यथायोग्यं मा कृथा मतिमन्यथा ॥ २५ ॥
सुहृदसि ममात्यर्थं हितं ते प्रब्रवीम्यहम् ।
समानय सुतां राजन् मण्डपे तां सखीवृताम् ॥ २६ ॥
सुदर्शनमृते चेयं वरिष्यति यदाऽप्यसौ ।
विग्रहो मे तदा न स्याद्विवाहोऽस्तु तवेप्सितः ॥ २७ ॥
अन्ये नृपतयः सर्वे कुलीनाः सबलाः समाः ।
विरोधः कीदृशस्त्वेनं वृणोद्यदि नृपोत्तम ॥ २८ ॥
अन्यथाऽहं हरिष्येऽद्य बलात्कन्यामिमां शुभाम् ।
मा विरोधं सुदुःसाध्यं गच्छ पार्थिवसत्तम ॥ २९ ॥

व्यास उवाच
युधाजिता समादिष्टः सुबाहुः शोकसंयुतः ।
निःश्‍वसन्भवनं गत्वा भार्यां प्राह शुचावृतः ॥ ३० ॥
पुत्रीं ब्रूहि सुधर्मज्ञे कलहे समुपस्थिते ।
किं कर्त्तव्यं मया शक्यं त्वद्वशोऽस्मि सुलोचने ॥ ३१ ॥
व्यास उवाच
सा श्रुत्वा पतिवाक्यं तु गत्वा प्राह सुतान्तिकम् ।
वत्से राजातिदुःखार्तः पिता तेऽद्यापि वर्तते ॥ ३२ ॥
त्वदर्थे विग्रहः कामं समुत्पन्नोऽद्य भूभृताम् ।
अन्यं वरय सुश्रोणि सुदर्शनमृते नृपम् ॥ ३३ ॥
यदि सुदर्शनं वत्से हठात्त्वं वै वरिष्यसि ।
युधाजित्त्वां च मां चैव हनिष्यति बलान्वितः ॥ ३४ ॥
सुदर्शनं च राजाऽसौ बलमत्तः प्रतापवान् ।
द्वितीयस्ते पतिः पश्‍चाद्‌भविता कलहे सति ॥ ३५ ॥
तस्मात्सुदर्शनं त्यक्त्वा वरयान्यं नृपोत्तमम् ।
सुखमिच्छसि चेन्मह्यं तुभ्यं वा मृगलोचने ।
इति मात्रा बोधितां तां पश्‍चाद्‌राजाप्यबोधयत् ॥ ३६ ॥
उभयोर्वचनं श्रुत्वा निर्भयोवाच कन्यका
कन्योवाच
सत्यमुक्तं नृपश्रेष्ठ जानासि च व्रतं मम ॥ ३७ ॥
नान्यं वृणोमि भूपाल सुदर्शनमृते क्वचित् ।
बिभेषि यदि राजेन्द्र नृपेभ्यः किल कातरः ॥ ३८ ॥
सुदर्शनाय दत्त्वा मां विसर्जय पुराद्‌बहिः ।
स मां रथे सामारोप्य निर्गमिष्यति ते पुरात् ॥ ३९ ॥
भवितव्यं तु पश्‍चाद्वै भविष्यति न चान्यथा ।
नात्र चिन्ता त्वया कार्या भवितव्ये नृपोत्तम ॥ ४० ॥
यद्‌भावि तद्‌भवत्येव सर्वथात्र न संशयः ।
राजोवाच
न पुत्रि साहसं कार्यं मतिमद्‌भिः कदाचन ॥ ४१ ॥
बहुभिर्न विरोद्धव्यमिति वेदविदो विदुः ।
विस्रक्ष्यामि कथं कन्यां दत्त्वा राजसुताय च ॥ ४२ ॥
राजानो वरसंयुक्ताः किं न कुर्युरसाम्प्रतम् ।
यदि ते रोचते वत्से पणं संविदधाम्यहम् ॥ ४३ ॥
जनकेन यथा पूर्वं कृतः सीतास्वयंवरे ।
शैवं धनुर्यथा तेन धृतं कृत्वा पणं तथा ॥ ४४ ॥
तथाहमपि तन्वङ्‌गि करोम्यद्य दुरासदम् ।
विवादो येन राज्ञां वै कृते सति शमं व्रजेत् ॥ ४५ ॥
पालयिष्यति यः कामं स ते भर्ता भविष्यति ।
सुदर्शनस्तथाऽन्यो वा यः कश्चिद्‌बलवत्तरः ॥ ४६ ॥
पालयित्वा पणं त्वां वै वरयिष्यति सर्वथा ।
एवं कृते नृपाणां तु विवादः शमितो भवेत् ॥ ४७ ॥
सुखेनाहं विवाहं ते करिष्यामि ततः परम् ।
कन्योवाच
सन्देहे नैव मज्जामि मूर्खकृत्यमिदं यतः ॥ ४८ ॥
मया सुदर्शनः पूर्वं धृतश्चेतसि नान्यथा ।
कारणं पुण्यपापानां मन एव महीपते ॥ ४९ ॥
मनसा विधृतं त्यक्त्वा कथमन्यं वृणे पितः ।
कृते पणे महाराज सर्वेषां वशगा ह्यहम् ॥ ५० ॥
एकः पालयिता द्वौ वा बहवो वा भवन्ति चेत् ।
किं कर्तव्यं तदा तात विवादे समुपस्थिते ॥ ५१ ॥
संशयाधिष्ठिते कार्ये मतिं नाहं करोम्यतः ।
मा चिन्तां कुरु राजेन्द्र देहि सुदर्शनाय माम् ॥ ५२ ॥
विवाहं विधिना कृत्वा शं विधास्यति चण्डिका ।
यन्नामकीर्तनादेव दुःखौघो विलयं व्रजेत् ॥ ५३ ॥
तां स्मृत्वा परमां शक्तिं कुरु कार्यमतन्द्रितः ।
गत्वा वद नृपेभ्यस्त्वं कृताञ्जलिपुटोऽद्य वै ॥ ५४ ॥
आगन्तव्यञ्च श्वः सर्वैरिह भूपैः स्वयंवरे ।
इत्युक्त्वा त्वं विसृज्याशु सर्वं नृपतिमण्डलम् ॥ ५५ ॥
विवाहं कुरु रात्रौ मे वेदोक्तविधिना नृप ।
पारिबर्हं यथायोग्यं दत्त्वा तस्मै विसर्जय ॥ ५६ ॥
गमिष्यति गृहीत्वा मां ध्रुवसन्धिसुतः किल ।
कदाचित्ते नृपाः क्रुद्धाः सङ्ग्रामं कर्त्तुमुद्यताः ॥ ५७ ॥
भविष्यति तदा देवी साहाय्यं नः करिष्यति ।
सोऽपि राजसुतस्तैस्तु सङ्ग्रामं संविधास्यति ॥ ५८ ॥
दैवान्मृधे मृते तस्मिन्मरिष्याम्यहमप्युत ।
स्वस्ति तेस्तु गृहे तिष्ठ दत्त्वा मां सहसैन्यकः ॥ ५९ ॥
एकैवाहं गमिष्यामि तेन सार्धं रिरंसया ।
व्यास उवाच
इति तस्या वचः श्रुत्वा राजाऽसौ कृतनिश्चयः ।
मतिं चक्रे तथा कर्तुं विश्वासं प्रतिपद्य च ॥ ६० ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे
कन्यया स्वपितरं प्रति सुदर्शनेन सह विवाहार्थकथनं नामैकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥


राजकन्येचा स्वयंवरास नकार ! -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

तिने केलेले योग्य भाषण श्रवण करून सुबाहू तत्क्षणी चिंताक्रांत झाला आणि म्हणाला, "आता पुढे काय करावे ? माझ्या आमंत्रणावरून येथे सैन्य व लवाजमा यांसह आलेले भूपती एकत्र आले आहेत. हे महाबलाढ्य राजे युद्धाचा उद्देश निश्चित करून स्वयंवरमंडपात सिंहासनावर बसले आहेत. शशिकला सांप्रत येत नाही, असे जर मी त्या सर्वांना सांगितले तर ते दुष्टबुद्धी राजे क्रुद्ध होऊन माझा वध करतील. तसे सैन्याचे व किल्यांचे अद्‌भूत बल माझ्यापाशी नसल्यामुळे त्या सर्व राजांचा प्रतिकारही करण्याचे माझे सामर्थ्य नाही. सुदर्शन तर एकटा, शिवाय तो साहाय्यरहित, निर्धन व बालक आहे. तेव्हा आता काय करावे ? मी सर्वस्वी दुःखसागरामध्ये निमग्न झालो आहे. खरोखरच काय दारुण प्रसंग हा.

अशा प्रकारे चिंताक्रांत झालेला तो सुबाहू राजा विनयाने नम्र होऊन सर्वांना प्रणाम करून म्हणाला, "हे नृपहो, मी काय करू ? माझ्या कन्येला मी व तिची माता, वारंवार सांगत असताही ती मंडपामध्ये येत नाही. मी सांप्रत येथे जमलेल्या सर्व राजांचा दास आहे. मी आपल्या पायांवर मस्तक ठेवतो. आपण पूजा वगैरे स्वीकारून आपल्या स्थानी जावे. विपुल रत्‍ने, वस्त्रे, गज व रथ मी देत आहे, त्यांचा आपण स्वीकार करावा. कृपा करून घरी जावे.

माझी कन्या माझ्या हातात नाही व तिच्याविरुद्ध वर्तन करून तिला दुखविले असता, जर ती मृत झाली तर मला मोठे दुःख होईल. म्हणून मी चिंताक्रांत झालो आहे. तेव्हा मूढ व उद्धट अशा हा माझ्या कन्येचा काय उपयोग आहे ? आपण तिच्या प्राप्तीविषयी इच्छा सोडून द्या. आपण दयाशील, महाभाग्यवान व महाबलाढ्य आहा. मी सर्वस्वी आपला दास असल्यामुळे आपल्या कृपेस पात्र आहे. म्हणून माझ्या कन्येला आपण सर्वथा स्वकीय कथेप्रमाणे समजावे."

सुबाहूचे म्हणणे ऐकून कोणीही राजे काही एक बोलले नाहीत. परंतु युधाजित क्रुद्ध झाला व रागाने डोळे लाल करून त्याला म्हणाला, "हे राजा, तू मूर्ख आहेस. अत्यंत निंद्य कृत्य करून तू काय हे भाषण करीत आहेस ? कन्येच्य्या मनोगताविषयी संशय जर तुला वाटत होता, तर स्वयंवराची तयारी तू मूर्खपणाने का केलीस ? तू स्वयंवराला बोलावल्यामुळे सर्व राजे तेथे जुळले आहेत. तेव्हा आता ह्या राजांनी आपापल्या घरी परत जाणे कसे बरे योग्य होईल ? सर्व राजांचा अवमान करून तू सुदर्शनाला कन्या देण्याची इच्छा करीत आहेस. ह्यापेक्षा असभ्य गोष्ट दुसरी कोणती आहे ?

कल्याणेच्छु पुरुषाने प्रथमतः कार्याचा विचार करून नंतर त्याला आरंभ करावा. परंतु हे राजा, तूर विचार न करताच हे कार्य उपस्थित केले आहेस. सैन्य व वाहने ह्यांसह आलेल्या, ह्या श्रेष्ठ राजांचा त्याग करून, सुदर्शनाचा स्वीकार करण्याची तू सांप्रत कशी बरे इच्छा करीत आहेस ? हे महापाप्‍या, प्रथमतः मी तुझा व नंतर सुदर्शनाचा वध करून, आपल्या नातवाला आज तुझी कन्या देईन, हा माझा निश्चय आहे ! मी उभा असताना, कन्या हरण करण्याची इच्छा करणारा दुसरा कोण आहे ?

सुदर्शन तरी आज एवढा काय लागून गेला आहे ? तो निर्धन व निर्बल असून बालक आहे. भारद्वजाच्या आश्रमामध्ये केवळ मुनीकरताच पूर्वी मी ह्याला सोडले. परंतु आज हा बालकाला मी काही जिवंत सोडणार नाही. कन्या व भार्या ह्यासह तू चांगला विचार कर आणि उत्कृष्ट भिवयांनी युक्त असलेली आपली प्रिय कन्या, खरोखर माझ्या नातवाला अर्पण कर.

अरे. शुभेच्छु पुरुषाने सर्वदा मोठ्यांचा आश्रय करावा. ह्यास्तव तू आपली मनोहर कन्या देऊन माझा संबंधी हो, राज्यरहित व एकाकी असलेल्या सुदर्शनाला आपली ही शुभ व प्रामाणिक कन्या देऊन, कोणते बरे सुख प्राप्त करून घेण्याची, तू इच्छा करीत आहेस ? अरे, धर्म व सनातन राजनीति ह्याचा विचार करून तू यथायोग्य कार्य कर. भलताच विचार मनामध्ये आणू नको, तू माझा सुहृद् असल्यामुळे मी तुला अत्यंत हिताची गोष्ट सांगत आहे.

हे राजा, सख्यांसह तू ती कन्या मंडपामध्ये घेऊन ये. सुदर्शनाशिवाय हिने पती वरल्यास माझ्याशी कलह न होता तुझ्या इच्छेप्रमाणे विवाह शेवटास जाईल. हे नृपश्रेष्ठा, इतर सर्व राजे योग्यतेने सारखे असून कुलीन व बलाढ्य आहेत. तेव्हा त्यांना सोडून ही स्वतः जर ह्या सुदर्शनाला वरील, तर त्यांच्याशी विरोध उत्पन्न होणार. माझ्या इच्छेप्रमाणे जर न होईल तर ही शुभ कन्या मी बलात्काराने हरण करीन. म्हणून हे नृपश्रेष्ठा, अति दुर्घट वैराचे तू अवलंबन करू नकोस."

युधाजिताने सुबाहूला असे सांगितले असता तो दुःखित होऊन सुस्कारे टाकू लागला आणि तसाच परत घरात गेल्यानंतर शोकाकुल होऊन भार्येला म्हणाला, "हे धर्मज्ञे, जमलेल्या राजेलोकात कलह उपस्थित झाल्यावर माझ्या हातून काय बरे होणे शक्य आहे ? हे सुलोचने, मी सर्वस्वी दीन झालो आहे. माझे चांगले वाईट करणे हे सर्व तुझ्या आधीन आहे, असे तू मुलीला सांग.

हे पतीचे भाषण श्रवण करून ती कन्येजवळ गेली आणि तिला म्हणाली, "हे वत्से, तुझा पिता राजा असून सांप्रत फार दुःखाकुल झाला आहे. कारण, तुझ्याकरता सर्व राजांमध्ये खरोखर कलह उपस्थित होणार, ह्यास्तव हे सुंदरी, त्या सुदर्शन राजकुमाराशिवाय तू दुसरा पती वर. हे वत्से, हट्टाने जर तू सुदर्शनालाच पती वरण्याचा निश्चय करशील, तर बलाढ्य युधाजित तुझा व तुझ्या पिताच्या वध करील. इतकेच नव्हे, तर बलाने मत्त झालेला तो प्रतापी राजा सुदर्शनाचाही घात करील ह्याप्रमाणे कलह उपस्थित झाला असता तुला दुसराच पती करावा लागेल.

हे मृगलोचने, तुला व तुझ्या पित्याला सुख व्हावे अशी जर तुझी इच्छा असेल तर प्रथमच सुदर्शनाला सोडून दुसर्‍या नृपश्रेष्ठाला वर." याप्रमाणे मातेने बोध केल्यानंतर, राजानेही तिला बोध केला, परंतु उभयतांचेही भाषण ऐकून ती कन्या निर्भयपणे म्हणाली, "हे माते, तू भिऊ नकोस, माझा निरोप पित्याला सांग की, हे नृपश्रेष्ठा, आपले म्हणणे खरे आहे. परंतु सुदर्शनावाचून मी दुसरा भूपाल कधीही वरणार नाही. हे माझे व्रतही आपण जाणतच आहात. हे राजेंद्रा, आपण स्वतः भीरू असल्यामुळे जर राजांचे आपल्याला भय वाटत असेल तर मला आपण सुदर्शनाला देऊन नगराबाहेर जाण्याची अनुज्ञा द्या. तो मला रथावर बसवील आणि आपल्या नगरातून बाहेर घेऊन जाईल, मग जे व्हायचे असेल ते होईल, ते टळणार नाही. हे नृपश्रेष्ठा, भवितव्यतेसंबंधी आपणाला चिंता करण्याचे कारण नाही. जे घडून यायचे असेल ते येईल ह्यात संशय नाही." याप्रमाणे तिने मातेल्या द्वारा आपल्या पित्याला निरोप कळवला असता ऐकून, तो स्वतः राजा कन्येकडे आला आणि तिला बोध करू लागला.

राजा म्हणाला, "हे कन्ये, विचारी मनुष्यांनी कधीही साहस करू नये. बहुजनांशी विरोध धरू नये - असे वेदवेत्ते म्हणत असतात. असाह्य राजपुत्राला कन्या देऊन मी त्या बलाढ्य राजांना जाण्याची कशी बरे अनुज्ञा देऊ ? वैर धारण करणारे ते राजे माझ्याविषयी व त्या सुदर्शनाविषयी कोणते बरे अयोग्य कृत्य करणार नाहीत ? हे वत्से, तुला जर रुचत असेल तर सीतास्वयंवरसमयी जनकाने जसा पण केला, तसा मी पण करतो. त्य्याप्रमाणे त्याने शैव धनुष्य पणाला लावून ठेवले, त्याप्रमाणे हे सुंदरी, मीही आज दुर्घट पण करतो. तसे केले म्हणजे राजांमध्ये उपस्थित झालेला कलह नाहीसा होईल व तो पण जो सिद्धीस नेईल, तो निर्विवाद तुझा भर्ता होईल. मग तो सुदर्शन असो अथवा दुसरा कोणी त्यापेक्षा बलाढ्य असो.

जो पण सिद्धीस नेईल, तो सर्वथा तुला वरील असे झाले म्हणजे, राजांमध्ये उपस्थित झालेला कलह नाहीसा होईल. नंतर मी तुझा विवाह सुखाने करीन.

राजकन्या म्हणाली, "बाबा, मी संदेहामध्ये पडणार नाही. संदेहात पडणे हे मूर्खाचे कृत्य आहे. मी पूर्वी सुदर्शनाला मनाने वरले आहे, ते अन्यथा होणार नाही. हे भूपते ज्याअर्थी मनच पुण्यपापांचे कारण आहे, त्याअर्थी हे तात, मनाने वरलेला वर सोडून मी दुसरा कसा बरे करू ? हे महाराज, आपण पण लावू असे म्हणाला. परंतु पण लावला असता मी सर्वांच्याच आधीन होणार. पण हा; दोघे अथवा तिघेही सिद्धीस नेतील ह्यामुळे जर विवाद झाला तर तात, काय बरे करावे ? म्हणून संशयग्रस्त कार्य करण्याचा विचार माझे मनामध्ये येत नाही.

हे राजेंद्रा, चिंता न करता यथाविधी विवाह करून आपण मला सुदर्शनाला द्या. चंडिका कल्याण करील. हे तात जिच्या नामाचा उच्चार होताक्षणीच दुःखाचा लय होतो, त्या परम शक्तीचे स्मरण करून व दक्ष राहून आपण कार्य करा. आपल्याला ती भगवती यश देईल. आपण आज राजांकडे जाऊन हात जोडा आणि "सर्व भूपालांनी उदयिक येथे स्वयंवराला यावे." असे त्यांना सांगा. असे सांगून सर्व राज मंडळाचे आपण सत्वर विसर्जन करा. नंतर वेदोक्त विधीने रात्री आपण माझा विवाह करा. त्या सुदर्शन राजकुमाराला यथायोग्य लवाजमा बरोबर देऊन आपण मला त्याच्याबरोबर पाठवा. तो ध्रुवसंधि- पुत्र खरोखर मला घेऊन जाईल. कदाचित ते राजे कुद्ध होऊन जर संग्रामाला उद्युक्त झाले, तर देवी आम्हाला साहाय्य करील. तो सुदर्शनही त्या राजपुत्रांशी युद्ध करील. कदाचित दुर्दैवाने तो युद्धात मृत झाला तर मीही सहगमन करीन. आपले कल्याण असो. माझे सुदर्शनाला दान करून आपण सैन्यासह घरी सुखाने रहा. त्या राजकुमाराच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने मी एकटीच त्याच्याबरोबर जाईन. आपण मजविषयी यत्किंचितही चिंता करू नका. ह्याप्रमाणे तिचे भाषण श्रवण केल्यावर राजानेही मन दृढ केले आणि तिच्या भाषणावर विश्वास ठेवून त्याने त्याप्रमाणे करण्याचे मनामध्ये ठरवले.


अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP