श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
अष्टादशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


शशिकलया मातरं प्रति संदेशप्रेषणम्

व्यास उवाच
श्रुत्वा तद्वचनं श्यामा प्रेमयुक्ता बभूव ह ।
प्रतस्थे ब्राह्मणस्तस्मात्स्थानादुक्त्वा समाहितः ॥ १ ॥
सा तु पूर्वानुरागाद्वै मग्ना प्रेम्णाऽतिचञ्चला ।
कामबाणहतेवास गते तस्मिन्द्विजोत्तमे ॥ २ ॥
अथ कामार्दिता प्राह सखीं छन्दोऽनुवर्तिनीम् ।
विकारश्‍च समुत्पन्नो देहे यच्छ्रवणादनु ॥ ३ ॥
अज्ञातरसविज्ञानं कुमारं कुलसम्भवम् ।
दुनोति मदनः पापः किं करोमि क्व यामि च ॥ ४ ॥
स्वप्नेषु वा मया दृष्टः पञ्चबाण इवापरः ।
तपते मे मनोऽत्यर्थं विरहाकुलितं मृदु ॥ ५ ॥
चन्दनं देहलग्नं मे विषवद्‌भाति भामिनि ।
स्रगियं सर्पवच्चैव चन्द्रपादाश्‍च वह्निवत् ॥ ६ ॥
न च हर्म्ये वने शं मे दीर्घिकायां न पर्वते ।
न दिवा न निशायां वा न सुखं सुखसाधनैः ॥ ७ ॥
न शय्या न च ताम्बूलं न गीतं न च वादनम् ।
प्रीणयन्ति मनो मेऽद्य न तृप्ते मम लोचने ॥ ८ ॥
प्रयाम्यद्य वने तत्र यत्रासौ वर्तते शठः ।
भीतास्मि कुललज्जायाः परतन्त्रा पितुस्तथा ॥ ९ ॥
स्वयंवरं पिता मेऽद्य न करोति करोमि किम् ।
दास्यामि राजपुत्राय कामं सुदर्शनाय वै ॥ १० ॥
सन्त्यन्ये पृथिवीपालाः शतशः सम्भृतर्द्धयः ।
रमणीया न मे तेऽद्य राज्यहीनोऽप्यसौ मतः ॥ ११ ॥

व्यास उवाच
एकाकी निर्धनश्‍चैव बलहीनः सुदर्शनः ।
वनवासी फलाहारस्तस्याश्‍चित्ते सुसंस्थिता ॥ १२ ॥
वाग्बीजस्य जपात्सिद्धिस्तस्या एषाप्युपस्थिता ।
सोपि ध्यानपरोऽत्यन्तं जजाप मन्त्रमुत्तमम् ॥ १३ ॥
स्वप्ने पश्यत्यसौ देवीं विष्णुमायामखण्डिताम् ।
विश्‍वमातरमव्यक्तां सर्वसम्पत्कराम्बिकाम् ॥ १४ ॥
शृङ्गवेरपुराध्यक्षो निषादः समुपेत्य तम् ।
ददौ रथवरं तस्मै सर्वोपस्करसंयुतम् ॥ १५ ॥
चतुर्भिस्तुरगैर्युक्तं पताकावरमण्डितम् ।
जैत्रं राजसुतं ज्ञात्वा ददौ चोपायनं तदा ॥ १६ ॥
सोऽपि जग्राह तं प्रीत्या मित्रत्वेन सुसंस्थितम् ।
वन्यैर्मूलफलैः सम्यगर्चयामास शम्बरम् ॥ १७ ॥
कृतातिथ्ये गते तस्मिन्निषादाधिपतौ तदा ।
मुनयः प्रीतियुक्तास्ते तमूचुस्तापसा मिथः ॥ १८ ॥
राजपुत्र ध्रुवं राज्यं प्राप्स्यसि त्वं च सर्वथा ।
स्वल्पैरहोभिरव्यग्रः प्रतापान्नात्र संशयः ॥ १९ ॥
प्रसन्ना तेऽम्बिका देवी वरदा विश्‍वमोहिनी ।
सहायस्तु सुसम्पन्नो न चिन्तां कुरु सुव्रत ॥ २० ॥
मनोरमां तथोचुस्ते मुनयः संशितव्रताः ।
पुत्रस्तेऽद्य धराधीशो भविष्यति शुचिस्मिते ॥ २१ ॥
सा तानुवाच तन्वङ्गी वचनं वोऽस्तु सत्फलम् ।
दासोऽयं भवतां विप्राः किं चित्रं सदुपासनात् ॥ २२ ॥
न सैन्यं सचिवाः कोशो न सहायश्‍च कश्‍चन ।
केन योगेन पुत्रो मे राज्यं प्राप्तुमिहार्हति ॥ २३ ॥
आशीर्वादैश्‍च वो नूनं पुत्रोऽयं मे महीपतिः ।
भविष्यति न सन्देहो भवन्तो मन्त्रवित्तमाः ॥ २४ ॥
व्यास उवाच
रथारूढः स मेधावी यत्र याति सुदर्शनः ।
अक्षौहिणीसमावृत्त इवाभाति स तेजसा ॥ २५ ॥
प्रतापो मन्त्रबीजस्य नान्यः कश्‍चन भूपते ।
एवं वै जपतस्तस्य प्रीतियुक्तस्य सर्वथा ॥ २६ ॥
सम्प्राप्य सद्‌गुरोर्बीजं कामराजाख्यमद्‌भुतम् ।
जपेद्यस्तु शुचिः शान्तः सर्वान्कामानवाप्नुयात् ॥ २७ ॥
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि वापि सुदुर्लभम् ।
प्रसन्नायाः शिवायाश्‍च यदप्राप्यं नृपोत्तम ॥ २८ ॥
ते मन्दास्तेऽतिदुर्भाग्या रोगैस्ते समभिद्रुताः ।
येषां चित्ते न विश्‍वासो भवेदम्बार्चनादिषु ॥ २९ ॥
या माता सर्वदेवानां युगादौ परिकीर्तिता ।
आदिमातेति विख्याता नाम्ना तेन कुरूद्वह ॥ ३० ॥
बुद्धिः कीर्तिर्धृतिर्लक्ष्मीः शक्तिः श्रद्धा मतिः स्मृतिः ।
सर्वेषां प्राणिनां सा वै प्रत्यक्षं वै विभासते ॥ ३१ ॥
न जानन्ति नरा ये वै मोहिता मायया किल ।
न भजन्ति कुतर्कज्ञा देवीं विश्‍वेश्‍वरीं शिवाम् ॥ ३२ ॥
ब्रह्मा विष्णुस्तथा शम्भुर्वासवो वरुणो यमः ।
वायुरग्निः कुबेरश्च त्वष्टा पूषाश्विनौ भगः ॥ ३३ ॥
आदित्या वसवो रुद्रा विश्‍वेदेवा मरुद्‌गणाः ।
सर्वे ध्यायन्ति तां देवीं सृष्टिस्थित्यन्तकारिणीम् ॥ ३४ ॥
को न सेवेत विद्वान्वै तां शक्तिं परमात्मिकाम् ।
सुदर्शनेन सा ज्ञाता देवी सर्वार्थदा शिवा ॥ ३५ ॥
ब्रह्मैव साऽतिदुष्प्राप्या विद्याविद्यास्वरूपिणी ।
योगगम्या परा शक्तिर्मुमुक्षूणां च वल्लभा ॥ ३६ ॥
परमात्मस्वरूपं को वेत्तुमर्हति तां विना ।
या सृष्टिं त्रिविधां कृत्वा दर्शयत्यखिलात्मने ॥ ३७ ॥
सुदर्शनस्तु तां देवीं मनसा परिचिन्तयन् ।
राज्यलाभात्परं प्राप्य सुखं वै कानने स्थितः ॥ ३८ ॥
सापि चन्द्रकलात्यर्थं कामबाणप्रपीडिता ।
नानोपचारैरनिशं दधार दुःखितं वपुः ॥ ३९ ॥
तावत्तस्याः पिता ज्ञात्वा कन्यां पुत्रवरार्थिनीम् ।
सुबाहुः कारयामास स्वयंवरमतन्द्रितः ॥ ४० ॥
स्वयंवरस्तु त्रिविधो विद्वद्‌भिः परिकीर्तितः ।
राज्ञां विवाहयोग्यौ वै नान्येषां कथितः किल ॥ ४१ ॥
इच्छास्वयंवरश्‍चैको द्वितीयश्‍च पणाभिधः ।
यथा रामेण भग्नं वै त्र्यम्बकस्य शरासनम् ॥ ४२ ॥
तृतीयः शौर्यशुल्कश्‍च शूराणां परिकीर्तितः ।
इच्छास्वयंवरं तत्र चकार नृपसत्तमः ॥ ४३ ॥
शिल्पिभिः कारिता मञ्चाः शुभैरास्तरणैर्युताः ।
ततश्च विविधाकाराः सु्क्लृप्ताः सभ्यमण्डपाः ॥ ४४ ॥
एवं कृतेऽतिसम्भारे विवाहार्थं सुविस्तरे ।
सखीं शशिकला प्राह दुःखिता चारुलोचना ॥ ४५ ॥
इदं मे मातरं ब्रूहि त्वमेकान्ते वचो मम ।
मया वृतः पतिश्चित्ते ध्रुवसन्धिसुतः शुभः ॥ ४६ ॥
नान्यं वरं वरिष्यामि तमृते वै सुदर्शनम् ।
स मे भर्ता नृपसुतो भगवत्या प्रतिष्ठितः ॥ ४७ ॥
व्यास उवाच
इत्युक्ता सा सखी गत्वा मातरं प्राह सत्वरा ।
वैदर्भीं विजने वाक्यं मधुरं मञ्जुभाषिणी ॥ ४८ ॥
पुत्री ते दुःखिता प्राह साध्वी त्वां मन्मुखेन यत् ।
शृणु त्वं कुरु कल्याणि तद्धितं त्वरिताऽधुना ॥ ४९ ॥
भारद्वाजाश्रमे पुण्य़े ध्रुवसन्धिसुतोऽस्ति यः ।
स मे भर्ता वृतश्‍चित्ते नान्यं भूपं वृणोम्यहम् ॥ ५० ॥
व्यास उवाच
राज्ञी तद्वचनं श्रुत्वा स्वपतौ गृहमागते ।
निवेदयामास तदा पुत्रीवाक्यं यथातथम् ॥ ५१ ॥
तच्छ्रुत्वा वचनं राजा विस्मितः प्रहसन्मुहुः ।
भार्यामुवाच वैदर्भीं सुबाहुस्तु ऋतं वचः ॥ ५२ ॥
सुभ्रु जानासि बालोऽसौ राज्यान्निष्कासितो वने ।
एकाकी सह मात्रा वै वसते निर्जने वने ॥ ५३ ॥
तत्कृते निहतो राजा वीरसेनो युधाजिता ।
स कथं निर्धनो भर्ता योग्यः स्याच्चारुलोचने ॥ ५४ ॥
ब्रूहि पुत्रीं ततो वाक्यं कदाचिदपि विप्रियम् ।
आगमिष्यन्ति राजानः स्थितिमन्तः स्वयंवरे ॥ ५५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे
शशिकलया मातरं प्रति संदेशप्रेषणं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥


शशिकलेच्या स्वयंवराविषयी विचार

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

त्याचे भाषण श्रवण केल्यावर त्या तरुणीच्या मनामध्ये त्या राजपुत्राविषयी प्रेम उत्पन्न झाले. तो ब्राह्मण, इतके स्वस्थपणाने सांगून त्या स्थानापासून निघून गेला. तो द्विजश्रेष्ठ गेल्यानंतर पूर्वी उत्पन्न झालेल्या प्रेमामुळे गुंग झालेली ती शशिकला, त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकल्यानंतर तर अतिशयच उतावीळ झाली. प्रेमामुळे कामबाणांनी व्याकूळ झाली. नंतर मदनाने व्याकूळ झालेली ती शशिकला आपल्या मनाप्रमाणे वागणार्‍या एका सखीला म्हणाली, "हे सखी, त्या द्विजाचे भाषण श्रवण केल्यापासून माझ्या देहाचे ठिकाणी उत्कट मनोविकार उत्पन्न झाला आहे. नुकतीच यौवनावस्था प्राप्त झाल्यामुळे जिला शृंगाररसाचा अनुभव नाही, अशा ह्या कुलीन कन्येला त्या राजपुत्रासंबंधाने दुष्ट मदन पीडा देत आहे. मग आता काय करू ? कोठे जाऊ ? स्वप्नामध्ये दुसरा मदनच की काय असा तो राजपुत्र, माझ्या दृष्टीस पडला. त्यामुळे तो माझ्या मनाला अतिशयच पीडा करीत आहे. हे सखे, त्या राजपुत्राच्या विरहवेदनेमुळे शरीराला लावलेले चंदन विषाप्रमाणे भासत आहे. ही पुष्पमाला सर्पाप्रमाणे वाटत आहे. चंद्रकिरणे ताप देत आहेत. राजवाडा, वन, वापी व क्रीडापर्वत ह्यांपैकी कोठेही मला रात्री अथवा दिवसा, कोणात्याही सुखसाधनांच्या योगाने सुख प्राप्त होत नाही. शम्या, तांबूल, गायन व वादन ही माझ्या मनाला आनंद देत नसून माझे नेत्रही तृप्त करीत नाहीत. म्हणून, तो माझे मन चोरणारा शठ ज्या वनामध्ये आहे, तेथे आज जावे असे मला वाटत आहे.

कुलज्जेमुळे मला भीती वाटत असून मी पित्याचे अधीन आहे. पिता आज माझे स्वयंवरही करीत नाही. तेव्हा, आता काय बरे करावे ! राजपुत्र सुदर्शनालाच मनापासून मी आपला देह अर्पण केला आहे. विपुल संपत्तीने युक्त असे दुसरे शेकडो भूपती आहेत परंतु, ते मला रमणीय वाटत नाहीत. हा राज्यहीन असूनही मला संमत आहे. '

एकाकी, निर्धन, निर्बल, वनवासी आणि फलांवर उपजीविका करणारा असा तो सुदर्शन होता. तरी तिच्या मनामध्ये तो एकसारखा खिळून राहिला. वाग्बीजाच्या प्रभावामुळेच तिलाही ही स्थिती प्राप्त झाली होती. इकडे तो सुदर्शनही ध्याननिष्ठ राहून त्या उत्कृष्ट मंत्राचा अतिशय जप करीत होता. त्यामुळे स्वप्नामध्ये विश्वमाता, अखंडित विष्णूमाया, अव्यक्त व सर्व संपत्ती देणारी जी अंबिका देवी, तिचे त्याला वारंवार दर्शन होत असे.

एके दिवशी शृंगवेरपुराधिपति निषाद त्याच्याकडे आला, आणि सर्व सामग्रीने युक्त असा एक रथ त्याने त्याला अर्पण केला, राजपुत्र विनयशील आहे हे जाणून, निषादाने देणगी म्हणून तो रथ त्याला दिला. त्या रथाला चार अश्व जोडलेले होते. श्रेष्ठ पताकांनी तो भूषित केलेला होता. त्या सुदर्शनाने त्या रथाचा प्रेमाने स्वीकार केला. मित्रभावाने वागणार्‍या त्या निषादाचे वनातील फलमूलांनी त्याने चांगले आदरातिथ्य केले.

आदरातिथ्य होऊन तो निषादाधिपति गेल्यावर सुदर्शनावर प्रेम करणारे ते तपस्वी मुनी एकांतामध्ये त्याला म्हणाले, "हे राजपुत्रा तुला सर्व प्रकारे निःसंशय राज्यप्राप्ती होईल. तुझ्या प्रतापामुळेच थोड्या दिवसात प्राप्ती होईल यात संशय नाही. तू दक्ष राहा. विश्वाला मोह पाडणारी व वर देणारी जी अंबिका देवी, ती तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. त्यायोगे तुला साहाय्यकर्ताही चांगला मिळाला आहे. यास्तव हे सुव्रता, तू काळजी करू नकोस."

यानंतर उग्र तपश्चर्या करणारे ते मुनी मनोरमेला म्हणाले, "हे सुहास्यवदने, तुझा पुत्र लवकरच पृथ्वीपति होईल."

यावर शरीराने सडपातळ असलेली ती मनोरमा त्यांना म्हणाली, "हा तुमचा आशीर्वाद सफल होवो ! हे विप्रहो, हा माझा पुत्र तुमचा दास आहे. दासाला साधूंच्या शुश्रुषेने राज्यप्राप्त होणे, ह्यात काही आश्चर्य नाही. महाराज, मंत्री, द्रव्यभांडार व साहाय्यकर्ता ह्यांपैकी काहीच नसताना कोणत्या साधनाने माझ्या पुत्राला ह्या जगात राज्य प्राप्त होणार आहे ? पण तुमच्या आशीर्वादामुळे खरोखर हा माझा पुत्र भूपति होईल. ह्यात संशय नाही. कारण, आपण मंत्रवेत्तांमध्ये श्रेष्ठ आहा."

व्यास म्हणाले, "तो बुद्धिमान सुदर्शन रथारूढ, होऊन जिकडे तिकडे जात असे, तिकडे आपल्या तेजाच्या योगाने जणू काय तो अक्षौहिणी सैन्याने परिवेष्टित असल्यासारखा दिसत असे. हे भूपते, तो प्रेमाने जप करू लागल्यामुळे त्या मंत्रबीजाचाच सर्वस्वी हा प्रताप होता. दुसरे काही एक कारण नाही. सद्‌गुरूपासून कामबीसंज्ञक अद्‌भूत बीजाचा

उपदेश घेऊन, जो शुद्ध पुरुष शांतपणाने जप करतो त्याचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात. हे नृपश्रेष्ठा देवी भगवती प्रसन्न झाली असता तिच्या प्रसादाने मनुष्याला पृथ्वीवरील अथवा स्वर्गातील कोणतीही वस्तू अप्राप्य अथवा दुर्लभ नाही.

अंबेच्या पूजनादिकांविषयी ज्यांच्या चित्तामध्ये विश्वास नसेल, ते लोक मंदमति, अत्यंत दुर्दैवी व रोगग्रस्त असतात. युगाचे आरंभी सर्व देवांची ती माता म्हणून प्रसिद्ध आहे, हे कुरुवंशजश्रेष्ठा, म्हणून या नावाने म्हणजे आदिमाता ह्या नावाने ती विख्यात आहे. बुद्धि, कीर्ती, धृति, लक्ष्मी, शक्ति, श्रद्धा, मति व स्मृति या रूपांनी ती सर्व प्राण्यांना प्रत्यक्ष भासत असते. परंतु खरोखर मायेने मोहीत झाल्यामुळे, जे मानव तिला जाणीत नाहीत, तेच त्या विश्वेश्वरी व कल्याणी देवीचे पूजन न करिता केवळ कुतर्क काढीत असतात.

ब्रह्मा, विष्णू महेश्वर, इंद्र, वरुण, यम, वायू अग्नी, कुबेर, त्वष्टा, पूषा, अश्विनीकुमार, भग, आदित्य, वसू रुद्र, विश्वदेव व मरुदाण हे सुद्धा सृष्टि, स्थिती व नाश करणार्‍या त्या देवीचे ध्यान करीत असतात. तस्मात त्या परमानंदरूप, शक्तीची सेवा कोण बरे विद्वान करणार नाही ? सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्‍या त्या कल्याणी देवीचे ज्ञान सुदर्शनाला झाले होते. ब्रह्माप्रमाणे ती प्राप्त होणे अत्यंत दुर्घट आहे. विद्या आणि अविद्या ही तिची स्वरूपे आहेत. योगमागनि तिचे ज्ञान होणे शक्य आहे. ती पराशक्ति मुमुक्षूंना सर्वदा प्रिय आहे. तिच्याशिवाय परमानंदस्वरूप जाणण्यास कोण बरे समर्थ होईल ? त्रिविध सृष्टी निर्माण करून परमात्म्याचे ज्ञान करून देते, त्या देवीचे मनामध्ये चिंतन करीत असलेला तो राज्यलाभापेक्षाही अधिक आपल्याला प्राप्त झाले, असे समजून परमानंदाने त्या वनामध्ये वास्तव्य करीत होता. इकडे ती शशिकलाही कामबाणांनी अतिशय पीडित झाली होती. एकसारखे दुःखित असलेले आपले शरीर नाना प्रकारच्या उपचारांनी शांत करीत होती. त्यावेळी आपली कन्या, श्रेष्ठ राजपुत्राची इच्छा करीत आहे असे जाणून, तिचा पिता जो सुबाहू त्याने मोठ्या दक्षतेने स्वयंवराची तयारी चालविली.

विद्वानांनी स्वयंवर तीन प्रकारचे सांगितले असून राज्यांच्याच विवाहाला खरोखर योग्य आहे असे म्हटले आहे. एक इच्छास्वयंवर व दुसरे पणसंज्ञक, ज्या योगाने रामाने त्र्यंबकचापाचा भंग करून सीता मिळविली, ते पणसंज्ञक स्वयंवर होय. शौर्यशुल्क म्हणून तिसरे स्वयंवर आहे, ते शूरांना उक्त आहे.

ह्यांपैकी नृपश्रेष्ठ सुबाहूने तेथे इच्छास्वयंवराची तयारी चालविली. शिल्पिजनांकडून शुभ आस्तरणांनी युक्त असे मंचक करवून, नंतर सभ्यांना बसण्याकरता नाना प्रकारचे उत्कृष्ट मंडप तयार केले. ह्याप्रमाणे विवाहाकरता मोठी तयारी झाली असताना, मनोहर नेत्रांनी युक्त असलेली शशिकला दुःखित होऊन सखीला म्हणाली, "मी ध्रुवसंधीचा शुभ पुत्र मनामध्ये पती म्हणून वरला आहे. त्या सुदर्शनाशिवाय मी दुसरा पती करणार नाही. भगवतीने तो राजकुमार माझा पती नेमला आहे. हे माझे म्हणणे, तू एकांतामध्ये माझ्या मातेला कळव."

ह्याप्रमाणे शशिकलेने सांगितले असता, तो सखी सत्वर तिच्या मातेकडे गेली. मधुरभाषण करणारी ती सखी एकांतामध्ये मधुर स्वराने वैदर्भीला म्हणाली, हे साध्वि, तुझ्या दुःखित कन्येने जो तुला निरोप सांगितला आहे, तो तू माझ्या मुखाने श्रवण कर. हे कल्याणि, सांप्रत तू तिचे सत्वर कल्याण कर. भरद्वाजमुनीच्या पवित्र आश्रमामध्ये जो ध्रुवसंधिराजाचा पुत्र आहे. तो भर्ता मी मनामध्ये वरला आहे. दुसरा भूपति मी वरणार नाही. असा तिचा निरोप आहे."

व्यास म्हणाले, "हे भाषण श्रवण करून राणीने आपला पति अंतःपुरात आल्यावर त्याला कन्येचे म्हणणे इत्यंभूत निवेदन केले. ते श्रवण केल्यानंतर राजा सुबाहू वारंवार हसू लागला. निश्चयी शब्दांनी आपल्या भार्येला म्हणाला, हे सुमुखी, हा बाल असतानाच ह्याचा राज्यावरील अधिकार नाहीसा झाला व त्याला राज्यापासून वनामध्ये हाकलून लाविले आहे. तू जाणतच आहेस. हा सांप्रत मातेसह निर्जन वनामध्ये एकटा राहत आहे. ह्याच्याकरता युधाजिताने वीरसेनाचा वध केला आहे, म्हणून हे चारुलोचने, तो निर्धन राजकुमार कसा बरे भर्ता योग्य होईल ? आता अनेक राजे स्वयंवराकरता येतील. म्हणून त्यांना अप्रिय वाटणारे हे भाषण तू कधीही करू नकोस. असे तू कन्येला सांग. '



अध्याय अठरावा समाप्त

GO TOP