श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वितीयः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


मस्त्यगन्धोत्पत्तिवर्णनम्

ऋषय ऊचुः
आश्चर्यकरमेतत्ते वचनं गर्भहेतुकम् ।
सन्देहोऽत्र समुत्पन्नः सर्वेषां नस्तपस्विनाम् ॥ १ ॥
माता व्यासस्य मेधाविन्नाम्ना सत्यवतीति च ।
विवाहिता पुरा ज्ञाता राज्ञा शन्तनुना यथा ॥ २ ॥
तस्याः पुत्रः कथं व्यासः सती स्वभवने स्थिता ।
ईदृशी सा कथं राज्ञा पुनः शन्तनुना वृता ॥ ३ ॥
तस्यां पुत्रावुभौ जातौ तत्त्वं कथय सुव्रत ।
विस्तरेण महाभाग कथां परमपावनीम् ॥ ४ ॥
उत्पत्तिं वद व्यासस्य सत्यवत्यास्तथा पुनः ।
श्रोतुकामाः पुनः सर्वे ऋषयः संशितव्रताः ॥ ५ ॥
सूत उवाच
प्रणम्य परमां शक्तिं चतुर्वर्गप्रदायिनीम् ।
आदिशक्तिं वदिष्यामि कथां पौराणिकीं शुभाम् ॥ ६ ॥
यस्योच्चारणमात्रेण सिद्धिर्भवति शाश्वती ।
व्याजेनापि हि बीजस्य वाग्भवस्य विशेषतः ॥ ७ ॥
सम्यक् सर्वात्मना सर्वैः सर्वकामार्थसिद्धये ।
स्मर्तव्या सर्वथा देवी वाञ्छितार्थप्रदायिनी ॥ ८ ॥
राजोपरिचरो नाम धार्मिकः सत्यसङ्गरः ।
चेदिदेशपतिः श्रीमान् बभूव द्विजपूजकः ॥ ९ ॥
तपसा तस्य तुष्टेन विमानं स्फाटिकं शुभम् ।
दत्तमिन्द्रेण तत्तस्मै सुन्दरं प्रियकाम्यया ॥ १० ॥
तेनारूढस्तु सर्वत्र याति दिव्येन भूपतिः ।
न भूमावुपरिस्थोऽसौ तेनोपरिचरो वसुः ॥ ११ ॥
विख्यातः सर्वलोकेषु धर्मनित्यः स भूपतिः ।
तस्य भार्या वरारोहा गिरिका नाम सुन्दरी ॥ १२ ॥
पुत्राश्चास्य महावीर्याः पञ्चासन्नमितौजसः ।
पृथग्देशेषु राजानः स्थापितास्तेन भूभुजा ॥ १३ ॥
वसोस्तु पत्‍नी गिरिका कामान् काले न्यवेदयत् ।
ऋतुकालमनुप्राप्ता स्नाता पुंसवने शुचिः ॥ १४ ॥
तदहः पितरश्चैनमूचुर्जहि मृगानिति ।
तच्छ्रुत्वा चिन्तयामास भार्यामृतुमतीं तथा ॥ १५ ॥
पितृवाक्यं गुरुं मत्वा कर्तव्यमिति निश्चितम् ।
चचार मृगयां राजा गिरिकां मनसा स्मरन् ॥ १६ ॥
वने स्थितः स राजर्षिश्चित्ते सस्मार भामिनीम् ।
अतीव रूपसम्पन्नां साक्षाच्छ्रियमिवापराम् ॥ १७ ॥
तस्य रेतः प्रचस्कन्द स्मरतस्तां च कामिनीम् ।
वटपत्रे तु तद्‌राजा स्कन्नमात्रं समाक्षिपत् ॥ १८ ॥
इदं वृथा परिस्कन्नं रेतो वै न भवेत्कथम् ।
ऋतुकालं च विज्ञाय मतिं चक्रे नृपस्तदा ॥ १९ ॥
अमोघं सर्वथा वीर्यं मम चैतन्न संशयः ।
प्रियायै प्रेषयाम्येतदिति बुद्धिमकल्पयत् ॥ २० ॥
शुक्रप्रस्थापने कालं महिष्याः प्रसमीक्ष्य सः ।
अभिमन्त्र्याथ तद्वीर्यं वटपर्णपुटे कृतम् ॥ २१ ॥
पार्श्वस्थं श्येनमाभाष्य राजोवाच द्विजं प्रति ।
गृहाणेदं महाभाग गच्छ शीघ्रं गृहं मम ॥ २२ ॥
मत्प्रियार्थमिदं सौम्य गृहीत्वा त्वं गृहं नय ।
गिरिकायै प्रयच्छाशु तस्यास्त्वार्तवमद्य वै ॥ २३ ॥
सूत उवाच
इत्युक्त्वा प्रददौ पर्णं श्येनाय नृपसत्तमः ।
स गृहीत्वोत्पपाताशु गगनं गतिवित्तमः ॥ २४ ॥
गच्छन्तं गगनं श्येनं धृत्वा चञ्चुपुटे पुटम् ।
तमपश्यदथायान्तं खगं श्येनस्तथापरः ॥ २५ ॥
आमिषं स तु विज्ञाय शीघ्रमभ्यद्रवत्खगम् ।
तुण्डयुद्धमथाकाशे तावुभौ सम्प्रचक्रतुः ॥ २६ ॥
युद्ध्यतोरपतद्‌रेतस्तज्जापि यमुनाम्भसि ।
खगौ तौ निर्गतौ कामं पुटके पतिते तदा ॥ २७ ॥
एतस्मिन्समये काचिद्‍अद्रिका नाम चाप्सराः ।
ब्राह्मणं समनुप्राप्तं सन्ध्यावन्दनतत्परम् ॥ २८ ॥
कुर्वन्ती जलकेलिं सा जले मग्ना चचार सा ।
जग्राह चरणं नारी द्विजस्य वरवर्णिनी ॥ २९ ॥
प्राणायामपरः सोऽथ दृष्ट्वा तां कामचारिणीम् ।
शशाप भव मत्स्यी त्वं ध्यानविघ्नकरी यतः ॥ ३० ॥
सा शप्ता विप्रमुख्येन बभूव यमुनाचरी ।
शफरी रूपसम्पन्ना ह्यद्रिका च वराप्सराः ॥ ३१ ॥
श्येनपादपरिभ्रष्टं तच्छुक्रमथ वासवी ।
जग्राह तरसाभ्येत्य साद्रिका मत्स्यरूपिणी ॥ ३२ ॥
अथ कालेन कियता मत्स्यीं तां मत्स्यजीवनः ।
सम्प्राप्ते दशमे मासि बबन्ध तां मनोरमाम् ॥ ३३ ॥
उदरं विददाराशु स तस्या मत्स्यजीवनः ।
युग्मं विनिःसृतं तस्मादुदरान्मानुषाकृति ॥ ३४ ॥
बालः कुमारः सुभगस्तथा कन्या शुभानना ।
दृष्ट्वाश्चर्यमिदं सोऽथ विस्मयं परमं गतः ॥ ३५ ॥
राज्ञे निवेदयामास पुत्रौ द्वौ तु झषोद्‌भवौ ।
राजापि विस्मयाविष्टः सुतं जग्राह तं शुभम् ॥ ३६ ॥
स मत्स्यो नाम राजासौ धार्मिकः सत्यसङ्गरः ।
वसुपुत्रो महातेजाः पित्रा तुल्यपराक्रमः ॥ ३७ ॥
कालिका वसुना दत्ता तरसा जलजीविने ।
नाम्ना कालीति विख्याता तथा मत्स्योदरीति च ॥ ३८ ॥
मत्स्यगन्धेति नाम्ना वै गणेन समजायत ।
विवर्धमाना दाशस्य गृहे सा वासवी शुभा ॥ ३९ ॥

ऋषय ऊचुः
अद्रिका मुनिना शप्ता मत्स्यी जाता वराप्सराः ।
विदारिता च दाशेन मृता च भक्षिता पुनः ॥ ४० ॥
किं बभूव पुनस्तस्या अप्सराया वदस्व तत् ।
शापस्यान्तं कथं सूत कथं स्वर्गमवाप सा ॥ ४१ ॥
सूत उवाच
शप्ता यदा सा मुनिना विस्मिता सम्बभूव ह ।
स्तुतिं चकार विप्रस्य दीनेव रुदती तदा ॥ ४२ ॥
दयावान्ब्राह्मणः प्राह तां तदा रुदतीं स्त्रियम् ।
मा शोकं कुरु कल्याणि शापान्तं ते वदाम्यहम् ॥ ४३ ॥
मत्क्रोधशापयोगेन मत्स्ययोनिं गता शुभे ।
मानुषौ जनयित्वा त्वं शापमोक्षमवाप्स्यसि ॥ ४४ ॥
इत्युक्ता तेन सा प्राप मत्स्यदेहं नदीजले ।
बालकौ जनयित्वा सा मृता मुक्ता च शापतः ॥ ४५ ॥
सन्त्यज्य रूपं मत्स्यस्य दिव्यरूपमवाप्य च ।
जगामामरमार्गं च शापान्ते वरवर्णिनी ॥ ४६ ॥
एवं जाता वरा पुत्री मत्स्यगन्धा वरानना ।
पुत्रीव पाल्यमाना सा दाशगेहे व्यवर्धत ॥ ४७ ॥
मत्स्यगन्धा तदा जाता किशोरी चातिसुप्रभा ।
तस्य कार्याणि कुर्वाणा वासवी चातिसुप्रभा ॥ ४८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
द्वितीयस्कन्धे मस्त्यगन्धोत्पत्तिवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥


मत्स्यगंधेचा जन्म

ऋषी सूताला म्हणाले, ''तुझे हेतुगर्भ भाषण ऐकून आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पण सत्यवतीशी शंतनूने समजून उमजून विवाह कसा केला ? ती स्वगृही असताना तिला पुत्र कसा झाला ? पराशराने स्वीकारलेल्या स्त्रीशी राजाने पुनः विवाह केला व तिला दोन पुत्र झाले. ही कथा आता तू आम्हाला सांग. निर्मल आचरण करणारे ऋषी ती पवित्र कथा ऐकण्यास उत्सुक आहेत.

चतुर्विध पुरुषार्थ देणार्‍या आदि शक्तीला प्रणाम करून सूत ती शुभ कथा सांगू लागला. कारण त्या आदि शक्तीच्या नावाचा कोणत्याही कारणाने जरी उच्चार केला तरी ती अक्षय सिद्धि प्राप्त करून देते. म्हणून आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठी, त्या आदि शक्तीचे स्मरण करावे.

पूर्वी उपरिचर नावाचा सात्विक, धर्मनिष्ठ, श्रीमान, ब्राह्मणांना मान देणारा असा राजा होऊन गेला. तो चेदि देशाचा राजा होता. त्याच्या तपश्चर्येमुळे संतुष्ट होऊन इंद्राने त्याला एक सुंदर स्फटिकाचे विमान दिले. त्यात आरूढ होऊन तो राजा सर्वत्र संचार करी. तो नित्य विमानातच राहात असे. भूमीवर उतरत नसे. त्याला उपरिचर वसु हे नाव प्राप्त झाले. तो सर्वविख्यात झाला. गिरीका नावाची त्याची शुभलक्षणी पत्‍नी होती. त्याला महापराक्रमी व तेजस्वी पाच पुत्र झाले. त्यांना वेगवेगळ्या देशांच्या राज्यावर उपरिचराने बसविले. एकदा गिरीका ऋतुकालानंतर स्नान झाल्यावर पतीकडे गेली. आपली पुत्रोत्पत्तीची इच्छा तिने पतीला सांगितली. पण मृगया करण्याविषयी त्याच दिवशी त्याला वडिलांनी आज्ञा केली होती. म्हणून पित्याची आज्ञा श्रेष्ठ हे जाणून, तो आपल्या पत्‍नीच्या मनोगताचे चिंतन करीत मृगयेला गेला, मृगयेच्यावेळी आपल्या अत्यंत सुंदर स्त्रीविषयीचे विचार त्याच्या मनात घोळत होते. असे विचार येताच राजाचे वीर्य पडू लागले. पण ते वाया जाऊ नये म्हणून त्याने ते वटपत्रावर घेतले, व आपल्या पत्‍नीचा ऋतुकाल आहे, हे लक्षात घेऊन हे सर्वथा अमोघ वीर्य आपल्या पत्‍नीकडे पाठवावे, असा विचार त्याने केला. राणीकडे वीर्य पाठविण्याची वेळ होताच, त्याने वटपत्राच्या द्रोणातील वीर्य अभिमंत्रण केले, व जवळच असलेल्या एका श्येन पक्षाला तो म्हणाला,
'' हे महाभाग्यवान पक्षा, हे घेऊन तू त्वरीत माझ्या घरी जा. माझी प्रिया गिरीका हिला ते सत्वर दे. कारण आज तिचा ऋतुकाल आहे.'' असे म्हणून राजाने ते श्येन पक्षाकडे देताच, तो पक्षी शीघ्र गतीने आकाशात उडाला, पण चोचीत द्रोण धरून जाणार्‍या या श्येन पक्षाला पाहून, काही तरी अमिष आहे, असे दुसर्‍या एका श्येन पक्षाला वाटले. तो त्वरेने तिकडे धावला. या दोघांचे चंचुयुद्ध झाले, पण त्यामुळे चोचीतून द्रोण सुटला व खाली यमुनेच्या पाण्यात ते वीर्य पडले. ते पहाताच दोन्ही पक्षी स्वेच्छेने निघून गेले.

त्याचवेळी अद्रिका नावाची अप्सरा जलक्रीडा करण्यात मग्न झाली होती. तेथे यमुना तिरावर संध्यावंदनासाठी एक ब्राह्मण आला होता. त्याच्याजवळ ती अप्सरा आली, तिने ब्राह्मणाचे पाय धरले, पण त्या स्वैराचारी अप्सरेने आपल्या कार्यात विघ्न आणले म्हणून, ब्राह्मणाने तिला शाप दिला की, तू मत्सी होशील. त्याबरोबर ती स्वरूपसुदंरी मत्सी होऊन यमुनेत संचार करू लागली. श्येनपक्षाच्या चोचीतील द्रोणातून गळालेले वीर्य, त्या मतस्या झालेल्या अप्परेने गिळले. या नंतर तिला दहावा महिना सुरू झाला असता एका कोळ्याने तिला जाळ्यात धरले व तिचे पोट फाडले. त्यातून एक मानवी आकाराचे जुळे बाहेर पडले. अत्यंत तेजस्वी एक बालक व शुभचिन्हांकित सुंदर कन्या, अशी ही दोन मुले पाहताच, तो कोळी आश्चर्यचकित झाला, ही हकीकत त्याने राजाला कळविली. राजाही आश्चर्यचकित झाला. त्याने पुत्राचा स्वीकार केला. तोच मलयराजा या नावाने प्रसिद्धी पावला. तो उपरिचर वसूचा पुत्र असल्याने अति तेजस्वी, धार्मिक व पित्याप्रमाणे सत्यवचनी व पराक्रमी निघाला. उपरिचर वसूने ती कन्या मात्र कोळ्याला परत दिली. कारण सापडलेल्या ठेवीचा अर्धा भाग राजाचा व अर्धा ज्याला ठेव सापडली त्याचा, असे धर्मवचन आहे.

ती कन्या मत्स्योदरी किंवा मत्स्यगंधा या नावाने प्रसिद्धिस आली, ती अत्यंत गुणसंपन्न होती.

ब्राह्मणाने अद्रिका नावाचा अप्परेला जेव्हा शाप दिला, तेव्हा ती रडू लागली, आणि विप्राची स्तुती करू लागली, तेव्हा तो दयाळू ब्राह्मण म्हणाला, ''हे कल्याणी, रडू नकोस, मी उःशाप सांगतो. शापामुळे तुला मत्स्ययोनी प्राप्त झाली तरी मानवयोनीतील दोन अपत्यांना जन्म देऊन तू शापमुक्त होशील. त्यामुळे कोळ्याने गर्भ असलेल्या त्या मत्स्येचे पोट फाडताच दोन बालकांना जन्म दिल्याने ती अद्रिका नावाची मत्सी शापमुक्त झाली व दिव्यरूप धारण करून स्वर्गाला निघून गेली. तिच्यापासून जन्मलेली मत्स्यगंधा सुंदर व सुलक्षणी होती, कोळ्याने तिचे पालन पोषण करून तिला वाढविले. ती अत्यंत तेजस्वी होती. तरुण वयात ती कोळ्याबरोबर सर्व कामे करू लागली.



अध्याय पहिला समाप्त

GO TOP