श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
अथाष्टादशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


जनकोपदेशवर्णनम्

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत उवाच
श्रुत्वा तमागतं राजा मन्त्रिभिः सहितः शुचिः ।
पुरः पुरोहितं कृत्वा गुरुपुत्रं समभ्यगात् ॥ १ ॥
कृत्वार्हणां नृपः सम्यग्दत्तासनमनुत्तमम् ।
पप्रच्छ कुशलं गां च विनिवेद्य पयस्विनीम् ॥ २ ॥
स च तां नृपपूजां वै प्रत्यगृह्णाद्यथाविधि ।
पप्रच्छ कुशलं राज्ञे स्वं निवेद्य निरामयम् ॥ ३ ॥
कृत्वा कुशलसंप्रश्नमुपविष्टं सुखासने ।
शुक व्याससुतं शान्तं पर्यपृच्छत पार्थिवः ॥ ४ ॥
किं निमित्तं महाभाग निःस्पृहस्य च मां प्रति ।
जातं ह्यागमनं ब्रूहि कार्यं तन्मुनिसत्तम ॥ ५ ॥
शुक उवाच
व्यासेनोक्तो महाराज कुरु दारपरिग्रहम् ।
सर्वेषामाश्रमाणां च गृहस्थाश्रम उत्तमः ॥ ६ ॥
मया नाङ्गीकृतं वाक्यं मत्त्वा बन्धं गुरोरपि ।
न बन्धोऽस्तीति तेनोक्तो नाहं तत्कृतवान्पुनः ॥ ७ ॥
इति सन्दिग्धमनसं मत्वा स मुनिसत्तमः ।
उवाच वचनं तथ्यं मिथिलां गच्छ मा शुचः ॥ ८ ॥
याज्योऽस्ति जनकस्तत्र जीवन्मुक्तो नराधिपः ।
विदेहो लोकविदितः पाति राज्यमकण्टकम् ॥ ९ ॥
कुर्वन् राज्यं तथा राजा मायापाशैर्न बध्यते ।
त्वं बिभेषि कथं पुत्र वनवृत्तिः परन्तप ॥ १० ॥
पश्य तं नृपशार्दूलं त्यज मोहं मनोगतम् ।
कुरु दारान्महाभाग पृच्छ वा भूपतिं च तम् ॥ ११ ॥
सन्देहं ते मनोजातं कथयिष्यति पार्थिवः ।
तच्छ्रुत्वा वचनं तस्य मामेहि तरसा सुत ॥ १२ ॥
सम्प्राप्तोऽहं महाराज त्वत्पुरे च तदाज्ञया ।
मोक्षकामोऽस्मि राजेन्द्र ब्रूहि कृत्यं ममानघ ॥ १३ ॥
तपस्तीर्थव्रतेज्याश्च स्वाध्यायस्तीर्थसेवनम् ।
ज्ञानं वा वद राजेन्द्र मोक्षं प्रति च कारणम् ॥ १४ ॥
जनक उवाच
शृणु विप्रेण कर्तव्यं मोक्षमार्गाश्रितेन यत् ।
उपनीतो वसेदादौ वेदाभ्यासाय वै गुरौ ॥ १५ ॥
अधीत्य वेदवेदान्तान्दत्त्वा च गुरुदक्षिणाम् ।
समावृत्तस्तु गार्हस्थ्ये सदारो निवसेन्मुनिः ॥ १६ ॥
न्यायवृत्तिस्तु सन्तोषी निराशी गतकल्मषः ।
अग्निहोत्रादिकर्माणि कुर्वाणः सत्यवाक्शुचिः ॥ १७ ॥
पुत्रं पौत्रं समासाद्य वानप्रस्थाश्रमे वसेत् ।
तपसा षड्‌रिपूञ्जित्वा भार्यां पुत्रे निवेश्य च ॥ १८ ॥
सर्वानग्नीन्यथान्यायमात्मन्यारोप्य धर्मवित् ।
वसेत्तुर्याश्रमे श्रान्तः शुद्धे वैराग्यसम्भवे ॥ १९ ॥
विरक्तस्याधिकारोऽस्ति संन्यासे नान्यथा क्वचित् ।
वेदवाक्यमिदं तथ्यं नान्यथेति मतिर्मम ॥ २० ॥
शुकाष्टचत्वारिशद्वै संस्कारा वेदबोधिताः ।
चत्वारिंशद्‌गृहस्थस्य प्रोक्तास्तत्र महात्मभिः ॥ २१ ॥
अष्टौ च मुक्तिकामस्य प्रोक्ताः शमदमादयः ।
आश्रमादाश्रमं गच्छेदिति शिष्टानुशासनम् ॥ २२ ॥
शुक उवाच
उत्पन्ने हृदि वैराग्ये ज्ञानविज्ञानसम्भवे ।
अवश्यमेव वस्तव्यमाश्रमेषु वनेषु वा ॥ २३ ॥
जनक उवाच
इन्द्रियाणि बलिष्ठानि न नियुक्तानि मानद ।
अपक्वस्य प्रकुर्वन्ति विकारांस्ताननेकशः ॥ २४ ॥
भोजनेच्छां सुखेच्छां च शय्येच्छामात्मजस्य च ।
यती भूत्वा कथं कुर्याद्विकारे समुपस्थिते ॥ २५ ॥
दुर्जरं वासनाजालं न शान्तिमुपयाति वै ।
अतस्तच्छमनार्थाय क्रमेण च परित्यजेत् ॥ २६ ॥
ऊर्ध्वं सुप्तः पतत्येव न शयानः पतत्यधः ।
परिव्रज्य परिभ्रष्टो न मार्गं लभते पुनः ॥ २७ ॥
यथा पिपीलिका मूलाच्छाखायामधिरोहति ।
शनैः शनैः फलं याति सुखेन पदगामिनी ॥ २८ ॥
विहङ्गस्तरसा याति विघ्नशङ्कामुदस्य वै ।
श्रान्तो भवति विश्रम्य सुखं याति पिपीलिका ॥ २९ ॥
मनस्तु प्रबलं काममजेयमकृतात्मभिः ।
अतः क्रमेण जेतव्यमाश्रमानुक्रमेण च ॥ ३० ॥
गृहस्थाश्रमसंस्थोऽपि शान्तः सुमतिरात्मवान् ।
न च हृष्येन्न च तपेल्लाभालाभे समो भवेत् ॥ ३१ ॥
विहतं कर्म कुर्वाणस्त्यजंश्चिन्तान्वितं च यत् ।
आत्मलाभेन सन्तुष्टो मुच्यते नात्र संशयः ॥ ३२ ॥
पश्याहं राज्यसंस्थोऽपि जीवन्मुक्तो यथानघ ।
विचरामि यथाकामं न मे किञ्चित्प्रजायते ॥ ३३ ॥
भुञ्जानो विविधान्भोगान्कुर्वन्कार्याण्यनेकशः ।
भविष्यामि यथाहं त्वं तथा मुक्तो भवानघ ॥ ३४ ॥
कथ्यते खलु यद्‌दृश्यमदृश्यं बध्यते कुतः ।
दृश्यानि पञ्चभूतानि गुणास्तेषां तथा पुनः ॥ ३५ ॥
आत्मा गम्योऽनुमानेन प्रत्यक्षो न कदाचन ।
स कथं बध्यते ब्रह्मन्निर्विकारो निरञ्जनः ॥ ३६ ॥
मनस्तु सुखदुःखानां महतां कारणं द्विज ।
जाते तु निर्मले ह्यस्मिन्सर्वं भवति निर्मलम् ॥ ३७ ॥
भ्रमन्सर्वेषु तीर्थेषु स्नात्वा स्नात्वा पुनः पुनः ।
निर्मलं न मनो यावत्तावत्सर्वं निरर्थकम् ॥ ३८ ॥
न देहो न च जीवात्मा नेन्द्रियाणि परन्तप ।
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ॥ ३९ ॥
शुद्धो मुक्तः सदैवात्मा न वै बध्येत कर्हिचित् ।
बन्धमोक्षौ मनःसंस्थौ तस्मिञ्छान्ते प्रशाम्यति ॥ ४० ॥
शत्रुर्मित्रमुदासीनो भेदाः सर्वे मनोगताः ।
एकात्मत्वे कथं भेदः सम्भवेद्‌द्वैतदर्शनात् ॥ ४१ ॥
जीवो ब्रह्म सदैवाहं नात्र कार्या विचारणा ।
भेदबुद्धिस्तु संसारे वर्तमाना प्रवर्तते ॥ ४२ ॥
अविद्येयं महाभाग विद्या चैतन्निवर्तनम् ।
विद्याविद्ये च विज्ञेये सर्वदैव विचक्षणैः ॥ ४३ ॥
विनातपं हि छायाया ज्ञायते च कथं सुखम् ।
अविद्यया विना तद्वत्कथं विद्यां च वेत्ति वै ॥ ४४ ॥
गुणा गुणेषु वर्तन्ते भूतानि च तथैव च ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु को दोषस्तत्र चात्मनः ॥ ४५ ॥
मर्यादा सर्वरक्षार्थं कृता वेदेषु सर्वशः ।
अन्यथा धर्मनाशः स्यात्सौगतानामिवानघ ॥ ४६ ॥
धर्मनाशे विनष्टः स्याद्वर्णाचारोऽतिवर्तितः ।
अतो वेदप्रदिष्टेन मार्गेण गच्छतां शुभम् ॥ ४७ ॥
शुक उवाच
सन्देहो वर्तते राजन्न निवर्तति मे क्वचित् ।
भवता कथितं यत्तच्छृण्वतो मे नराधिप ॥ ४८ ॥
वेदधर्मेषु हिंसा स्यादधर्मबहुला हि सा ।
कथं मुक्तिप्रदो धर्मो वेदोक्तो बत भूपते ॥ ४९ ॥
प्रत्यक्षेण त्वनाचारः सोमपानं नराधिप ।
पशूनां हिंसनं तद्वद्‌भक्षणं चामिषस्य च ॥ ५० ॥
सौत्रामणौ तथा प्रोक्तः प्रत्यक्षेण सुराग्रहः ।
द्यूतक्रीडा तथा प्रोक्ता व्रतानि विविधानि च ॥ ५१ ॥
श्रूयते स्म पुरा ह्यासीच्छशबिन्दुर्नृपोत्तमः ।
यज्वा धर्मपरो नित्यं वदान्यः सत्यसागरः ॥ ५२ ॥
गोप्ता च धर्मसेतूनां शास्ता चोत्पथगामिनाम् ।
यज्ञाश्च विहितास्तेन बहवो भूरिदक्षिणाः ॥ ५३ ॥
चर्मणां पर्वतो जातो विन्ध्याचलसमः पुनः ।
मेघाम्बुप्लावनाज्जाता नदी चर्मण्वती शुभा ॥ ५४ ॥
सोऽपि राजा दिवं यातः कीर्तिरस्याचला भुवि ।
एवं धर्मेषु वेदेषु न मे बुद्धिः प्रवर्तते ॥ ५५ ॥
स्त्रीसङ्गेन सदा भोगे सुखमाप्नोति मानवः ।
अलाभे दुःखमत्यन्तं जीवन्मुक्तः कथं भवेत् ॥ ५६ ॥
जनक उवाच
हिंसा यज्ञेषु प्रत्यक्षा साहिंसा परिकीर्तिता ।
उपाधियोगतो हिंसा नान्यथेति विनिर्णयः ॥ ५७ ॥
यथा चेन्धनसंयोगादग्नौ धूमः प्रवर्तते ।
तद्वियोगात्तथा तस्मिन्निर्धूमत्वं विभाति वै ॥ ५८ ॥
अहिंसां च तथा विद्धि वेदोक्तां मुनिसत्तम ।
रागिणां सापि हिंसैव निःस्पृहाणां न सा मता ॥ ५९ ॥
अरागेण च यत्कर्म तथाहङ्कारवर्जितम् ।
अकृतं वेदविद्वांसः प्रवदन्ति मनीषिणः ॥ ६० ॥
गृहस्थानां तु हिंसैव या यज्ञे द्विजसत्तम ।
अरागेण च यत्कर्म तथाहंकारवर्जितम् ॥ ६१ ॥
साहिंसैव महाभाग मुमुक्षूणां जितात्मनाम् ॥ ६२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
प्रथमस्कन्धे शुकाय जनकोपदेशवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥


विदेही राजाचा शुकाला उपदेश

शुक आल्याचे वर्तमान कळताच राजा शुचिर्भूत होऊन आपल्या मंत्र्यासह शुकाजवळ आला. त्याची पूजा करुन त्याला योग्य आसन दिले व एक दुभती गाय त्याला अर्पण केली. त्याचा स्वीकार करुन शुकाने राजाचे कुशल विचारले व शाम्त मनाने तो आसनावर बसला तेव्हा राजा म्हणाला," महाराज, आपल्यासारख्या निस्पृह पुरुषाचे आगमन का बरे झाले! आपले जे कार्य असेल ते सांगा."

शुक म्हणाला, "सर्व आश्रमात गृहस्थाश्रम उत्तम आहे म्हणून विवाह करण्यास मला व्यासांनी सांगितले. पण तो बंधनकारक म्हणून मी गुरुवचन मानले नाही. विवाह बंधनकारक नसतो. हे पुन्हापुन: सांगूनही मला पटले नाही. म्हणून संदेह निवारणार्थ त्यांनी मला उपदेश केला व मिथिला नगरीत जाण्यास सांगितले. तेथील राजा यज्ञयागतत्पर व जीवनमुक्त आहे व तो विदेही म्हणून प्रख्यात आहे. तो निष्कंटक राज्य करीत आहे. असे असूनही तो मायापाशात बद्ध नाही. अशास्थितीत कंदमूलावर जीवन जगणारा तू, का भितोस! असे व्यासमुनी म्हणाले, तेव्हा त्या राजाला अवलोकन कर म्हणजे मोहनाश होऊन तू विवाह कर अथवा राजाचा सल्ला घे. तो तुझ्या संदेहाचे निरसन करील. ते ऐकून तू त्वरेने निघून ये. अशी व्यासांची आज्ञा आहे. म्हणून हे महाराजा मी तुझ्या कडे आलो आहे. तेव्हा हे निष्पापा मी आता कय करावे. ते निवेदन कर. तप, तीर्थाटन, व्रते, यज्ञयाग, वेदाध्ययन गुरुशुश्रुषा आणि ज्ञान यापैकी मोक्षाचे कारण कोणते! ते मला सांग."

जनक म्हणाला, "मोक्षकारण सांगतो, तू ऐक. उपनयन झाल्यावर गुरुदक्षिणा देऊन समावर्तन करावे आणि सपत्निक होऊन गृहस्थाश्रम स्वीकारावा. गृहस्थाश्रमी शुद्ध, सत्यवचनी, निष्पाप, संतुष्ट व निरिच्छ राहून अग्निहोमादि कर्म करुन शास्त्रयुक्त साधनांनी उपजीविकाकरावी. पुत्रपौत्र प्राप्तीनंतर वानस्थाश्रम स्वीकारावा. तपश्चर्या करुन षडरिपूंचा पराजय करावा. अग्नीचा यथाविधी आत्मसमारोप करुन व श्रांत होऊन शुद्ध वैराग्य उत्पन्न झाल्यावर, चतुर्थाश्रमाचे अवलंबन करावे, असा धर्म आहे. ‘सन्यास हा विरक्त पुरुषासाठी आहे’ हे वेदवाक्य मला सत्य वाटते. हे शुका, वेदविहित अठ्ठेचाळीस संस्कार आहेत. त्यापैकी गृहस्थाला धर्मवेत्त्यांनी चाळीस सांगितले आहेत. शमदमादि आठ संस्कार मुमुक्षूसाठी असून एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात क्रमाने जावे असे शिष्ठ सांगतात."

शुक म्हणाले, "ज्ञान व अनुभवामुळे ह्रदयात वैराग्य उत्पन्न झाले असता, आश्रमात रहावे, का वनात जावे ?"

जनक म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठा, अंत:करण परिपक्व न होता जर इंद्रियांचा निग्रह झाला नाही तर विकार उत्पन्न होतात, यति झाल्यावर जर हे विकार उत्पन्न झाले तर भोजन, सुख, शय्या, पुत्र याविषयीची इच्छा पुरुषाला कशी तृप्त करता येईल?वासनानाश होने आवघड म्हणून क्रमाक्रमाने तिचा त्याग केल्याने वासना शांत होते. उच्चस्थानी निजलेला पुरुष जसा खालीच पडतो. तसेच संन्यासाश्रम भ्रष्ट झालेल्या पुन: मार्ग नाही. जसे मुंगी मुळापासून शाखेकडे आरोहरण करुन फल प्राप्त करुन घेते, तसेच आश्रम क्रमाक्रमाने स्वीकारल्यास सुखाने मोक्षप्राप्ती होते. धोक्याचा विचार न करता पक्षी त्वरेने फलाजवळ जातो. पण थकतो. मुंगी विश्रांती घेत जाते म्हणून तिला सुखाने फलप्राप्त होते. मन प्रबल असल्याने अंत:करण शुद्धी न झालेल्या पुरुषास जय मिळत नाही.

म्हणून अनुक्रमे आश्रमाचा अवलंब करावा. म्हणजे मनाचे संयमन होते. गृहस्थाश्रमी पुरुषाने शांत, सुविचारी, जितेंद्रिय राहून लाभ झाला असता हर्ष अथवा हानी प्राप्त झाल्यास विषाद न मानता मन सारखे ठेवावे, विहित कर्म करावे, पश्चाताप होईल असे करु नये. आत्मलाभाने संतुष्ट असावे. म्हणजे पुरुष मुक्त होतो. मी राज्यावर असूनही जीवन्मुक्त आहे व येथेष्ट संचार करीत आहे. म्हणून हे शुका, नाना भोग भोगून व कार्य करुन मी जसा मुक्त होईन तसा तू हो. दृश्य म्हणून जे सांगितले, त्यायोगे अदृश्याला कोणते बंधन प्राप्त होणार? पाच भूते व गुण दृश्य आहेत. आत्मा अनुमानाने समजतो. तो कधीही अनुभवाला येत नाही. म्हणून हे ब्रह्मन, निर्विकार व निरंजन अशा त्या आत्म्याला बंध कोठून असणार? सुख दु:खाचे, मन हेच कारण आहे. ते मन निर्मल झाले म्हणजे सर्व निर्मल होते. जोवर मन निर्मल नाही तोवर सर्व तीर्थे वारंवार हिंडले तरी निरर्थक होय. हे महातपस्वी शुका, देह, जीवात्मा व इंद्रिये ही बंधमोक्षाचे कारण नसून, मन हेच आहे. आत्मा सदैव शुद्ध व मुक्त आहे. तो बद्ध नाही. म्हणून मन शांत हवे. म्हणजे सर्व संसार शांत होतो. शत्रू, मित्र व उदासीन हे मनोगत भेद आहेत. द्वैतबुद्धीचा त्याग केला, म्हणजे भेद कोठून संभवणार? जीव सर्वदा ब्रह्मच आहे म्हणून हे मुने हे अज्ञान, हेच भेदबुद्धीचे कारण व ज्ञान ते नाहीसे करते. ज्ञान व अज्ञान हेच. ही अनुक्रमे मोक्षाला व बंधाला कारण आहेत. उन्हाशिवाय छायेचे सुख समजत नाही. तसेच अज्ञानाशिवाय ज्ञान समजत नाही. गुण व भूते यामुळे इंद्रिये रममाण होतात. त्यात आमचा काय दोष? सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून वेदमर्यादा रक्षण केली पाहिजे. नाहीतर बौद्धाप्रमाणे धर्माचा नाश होईल व त्यायोगे अक्षय्य चाललेला वर्णाचार नाहीसा होईल. म्हणून वेदमार्गाने राहावे. म्हणजे कल्याण होते."

शुक म्हणाला, "राजा, हे सर्व ऐकूनही मनात संदेह निर्माण झाला आहे. वेदोक्त धर्मात हिंसा संभवते व त्यामुळे धर्मनाश होण्याचा संभव आहे. मग मुक्ति कशी मिळणार? सोमपान, पशुवध व मासभक्षण म्हणजे अनाचार आहे. द्यूत, क्रीडा व व्रते यज्ञामधे विहित आहेत.

क्रीडा व व्रते हेच विहित कर्म आहे.

फार वर्षापूर्वी शशबिंदू नावाचा सत्यप्रिय, धर्मनिष्ठ,उदार, यथाविधी यज्ञयाग करणारा, धर्मसंरक्षण अधर्माचा नाश करणारा असा राजा होऊन गेला. त्याने पुष्कळ धर्म करुन दक्षिणा देऊन यज्ञ केले. त्याच्या धर्माचा विंध्याद्रीप्रमाने एक पर्वत झाला. त्यावर मेघवृष्टी होऊन, त्यातून चर्मण्वति नावाची शुभ नदी निर्माण झाली. त्या राजाची पृथ्वीवर अतुल कीर्ती पसरली. अखेर त्या राजाला स्वर्गप्राप्ती झाली. हे सगळे खरे. पण या वेदांतील धर्माचे ठिकाणी माझे मन अजून स्थिर होत नाही. स्त्री भोगापासून माणसाला सुख मिळते व तसे भोग न मिळाल्यास मान्व दु:खी होतो. मग पुरुष जीवनमुक्त कसा होणार ?"

जनक राजा म्हणाला, "यज्ञात जरी प्रत्यक्ष हिंसा होत असली, तरी ती एक प्रकारची अहिंसाच आहे असे, धर्म सांगतो. अनासक्तीयुक्त संबंध असल्यास हिंसा नाही. जसे इंधनाच्यामुळे अग्नीत धूर उत्पन्न होतो व इंधनाशी संबंध नसेल तर धूर होत नाही. त्याचप्रमाणे वेदोक्त अहिंसेचे आहे. आसक्त पुरुषांची ती हिंसा आहे. अनासक्त पुरुषांना ती हिंसा बाधत नाही. कारण अनासक्त राहून, अहंकाररहित कर्म ते घडलेच नाही. अस ते पंडित सांगतात. तस्मात, यज्ञात होणारा पशुवध आसक्तीपोटी झाला असेल तर ती हिंसाच ठरते. अनासक्त व निरहंकारी पशुवध ही जितेंद्रिय मनुष्यांची अहिंसाच होय." असे जनकाने शुकाला समजावून सांगितले.



अध्याय अठरावा समाप्त

GO TOP