[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यासोपदेशवर्णनम्
व्यास उवाच
दृष्ट्वा तं विस्मितं देवं शयानं वटपत्रके ।
उवाच सस्मितं वाक्यं विष्णो किं विस्मितो ह्यसि ॥ १ ॥
महाशक्त्याः प्रभावेण त्वं मां विस्मृतवान्पुरा ।
प्रभवे प्रलये जाते भूत्वा भूत्वा पुनः पुनः ॥ २ ॥
निर्गुणा सा परा शक्तिः सगुणस्त्वं तथाप्यहम् ।
सात्त्विकी किल या शक्तिस्तां शक्तिं विद्धि मामिकाम् ॥ ३ ॥
त्वन्नाभिकमलाद्ब्रह्मा भविष्यति प्रजापतिः ।
स कर्ता सर्वलोकस्य रजोगुणसमन्वितः ॥ ४ ॥
स तदा तप आस्थाय प्राप्य शक्तिमनुत्तमाम् ।
रजसा रक्तवर्णञ्च करिष्यति जगत्त्रयम् ॥ ५ ॥
सगुणान्पञ्चभूतांश्च समुत्पाद्य महामतिः ।
इन्द्रियाणीन्द्रियेशांश्च मनःपूर्वान्समन्ततः ॥ ६ ॥
करिष्यति ततः सर्गं तेन कर्ता स उच्यते ।
विश्वस्यास्य महाभाग त्वं वै पालयिता तथा ॥ ७ ॥
तद्भुवोर्मध्यदेशाच्च क्रोधाद्रुद्रो भविष्यति ।
तपः कृत्वा महाघोरं प्राप्य शक्तिं तु तामसीम् ॥ ८ ॥
कल्पान्ते सोऽपि संहर्ता भविष्यति महामते ।
तेनाहं त्वामुपायाता सात्त्विकीं त्वमवेहि माम् ॥ ९ ॥
स्थास्येऽहं त्वत्समीपस्था सदाहं मधुसूदन ।
हृदये ते कृतावासा भवामि सततं किल ॥ १० ॥
विष्णुरुवाच
श्लोकस्यार्धं मया पूर्वं श्रुतं देवि स्फुटाक्षरम् ।
तत्केनोक्तं वरारोहे रहस्यं परमं शिवम् ॥ ११ ॥
तन्मे ब्रूहि वरारोहे संशयोऽयं वरानने ।
निर्धनो हि यथा द्रव्यं तत्स्मरामि पुनः पुनः ॥ १२ ॥
व्यास उवाच
विष्णोस्तद्वचनं श्रुत्वा महालक्ष्मीः स्मितानना ।
उवाच परया प्रीत्या वचनं चारुहासिनी ॥ १३ ॥
महालक्ष्मीरुवाच
शृणु शौरे वचो मह्यं सगुणाहं चतुर्भुजा ।
मां जानासि न जानासि निर्गुणां सगुणालयाम् ॥ १४ ॥
त्वं जानीहि महाभाग तया तत्प्रकटीकृतम् ।
पुण्यं भागवतं विद्धि वेदसारं शुभावहम् ॥ १५ ॥
कृपां च महतीं मन्ये देव्याः शत्रुनिषूदन ।
यया प्रोक्तं परं गुह्यं हिताय तव सुव्रत ॥ १६ ॥
रक्षणीयं सदा चित्ते न विस्मार्यं कदाचन ।
सारं हि सर्वशास्त्राणां महाविद्याप्रकाशितम् ॥ १७ ॥
नातः परं वेदितव्यं वर्तते भुवनत्रये ।
प्रियोऽसि खलु देव्यास्त्वं तेन ते व्याहृतं वचः ॥ १८ ॥
व्यास उवाच
इति श्रुत्वा वचो देव्या महालक्ष्याश्चतुर्भुजः ।
दधार हृदये नित्यं मत्वा मन्त्रमनुत्तमम् ॥ १९ ॥
कालेन कियता तत्र तन्नाभिकमलोद्भवः ।
ब्रह्मा दैत्यभयात्त्रस्तो जगाम शरणं हरेः ॥ २० ॥
ततः कृत्वा महायुद्धं हत्वा तौ मधुकैटभौ ।
जजाप भगवान्विष्णुः श्लोकार्धं विशदाक्षरम् ॥ २१ ॥
जपन्तं वासुदेवं च दृष्ट्वा देवः प्रजापतिः ।
पप्रच्छ परमप्रीतः कञ्जजः कमलापतिम् ॥ २२ ॥
किं त्वं जपसि देवेश त्वत्तः कोऽप्यधिकोऽस्ति वै ।
यत्कृत्वा पुण्डरीकाक्ष प्रीतोऽसि जगदीश्वर ॥ २३ ॥
हरिरुवाच
मयि त्वयि च या शक्तिः क्रियाकारणलक्षणा ।
विचारय महाभाग या सा भगवती शिवा ॥ २४ ॥
यस्याधारे जगत्सर्वं तिष्ठत्यत्र महार्णवे ।
साकारा या महाशक्तिरमेया च सनातनी ॥ २५ ॥
यया विसृज्यते विश्वं जगदेतच्चराचरम् ।
सैषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये ॥ २६ ॥
सा विद्या परमा मुक्तेर्हेतुभूता सनातनी ।
संसारबन्धहेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी ॥ २७ ॥
अहं त्वमखिलं विश्वं तस्याश्चिच्छक्तिसम्भवम् ।
विद्धि ब्रह्मन्न सन्देहः कर्तव्यः सर्वदानघ ॥ २८ ॥
श्लोकार्धेन तया प्रोक्तं तद्वै भागवतं किल ।
विस्तरो भविता तस्य द्वापरादौ युगे तथा ॥ २९ ॥
व्यास उवाच
ब्रह्मणा संगृहीतं च विष्णोस्तु नाभिपङ्कजे ।
नारदाय च तेनोक्तं पुत्रायामितबुद्धये ॥ ३० ॥
नारदेन तथा मह्यं दत्तं हि मुनिना पुरा ।
मया कृतमिदं पूर्णं द्वादशस्कन्धविस्तरम् ॥ ३१ ॥
तत्पठस्व महाभाग पुराणं ब्रह्मसम्मितम् ।
पञ्चलक्षणयुक्तं च देव्याश्चरितमुत्तमम् ॥ ३२ ॥
तत्त्वज्ञानरसोपेतं सर्वेषामुत्तमोत्तमम् ।
धर्मशास्त्रसमं पुण्यं वेदार्थेनोपबृंहितम् ॥ ३३ ॥
वृत्रासुरवधोपेतं नानाख्यानकथायुतम् ।
ब्रह्मविद्यानिधानं तु संसारार्णवतारकम् ॥ ३४ ॥
गृहाण त्वं महाभाग योग्योऽसि मतिमत्तरः ।
पुण्यं भागवतं नाम पुराणं पुरुषर्षभ ॥ ३५ ॥
अष्टादशसहस्राणां श्लोकानां कुरु संग्रहम् ।
अज्ञाननाशनं दिव्यं ज्ञानभास्करबोधकम् ॥ ३६ ॥
सुखदं शान्तिदं धन्यं दीर्घायुष्यकरं शिवम् ।
शृण्वतां पठतां चेदं पुत्रपौत्रविवर्धनम् ॥ ३७ ॥
शिष्योऽयं मम धर्मात्मा लोमहर्षणसम्भवः ।
पठिष्यति त्वया सार्धं पुराणीं संहितां शुभाम् ॥ ३८ ॥
सूत उवाच
इत्युक्तं तेन पुत्राय मह्यं च कथितं किल ।
मया गृहीतं तत्सर्वं पुराणं चातिविस्तरम् ॥ ३९ ॥
शुकोऽधीत्य पुराणं तु स्थितो व्यासाश्रमे शुभे ।
न लेभे शर्म धर्मात्मा ब्रह्मात्मज इवापरः ॥ ४० ॥
एकान्तसेवी विकलः स शून्य इव लक्ष्यते ।
नात्यन्तभोजनासक्तो नोपवासरतस्तथा ॥ ४१ ॥
चिन्ताविष्टं शुकं दृष्ट्वा व्यासः प्राह सुतं प्रति ।
किं पुत्र चिन्त्यते नित्यं कस्माद्व्यग्रोऽसि मानद ॥ ४२ ॥
आस्से ध्यानपरो नित्यमृणग्रस्त इवाधनः ।
का चिन्ता वर्तते पुत्र मयि ताते तु तिष्ठति ॥ ४३ ॥
सुखं भुंक्ष्व यथाकामं मुञ्च शोकं मनोगतम् ।
ज्ञानं चिन्तय शास्त्रोक्तं विज्ञाने च मतिं कुरु ॥ ४४ ॥
न चेन्मनसि ते शान्तिर्वचसा मम सुव्रत ।
गच्छ त्वं मिथिलां पुत्र पालितां जनकेन ह ॥ ४५ ॥
स ते मोहं महाभाग नाशयिष्यति भूपतिः ।
जनको नाम धर्मात्मा विदेहः सत्यसागरः ॥ ४६ ॥
तं गत्वा नृपतिं पुत्र सन्देहं स्वं निवर्तय ।
वर्णाश्रमाणां धर्मांस्त्वं पृच्छ पुत्र यथातथम् ॥ ४७ ॥
जीवन्मुक्तः स राजर्षिर्बह्मज्ञानमतिः शुचिः ।
तथ्यवक्तातिशान्तश्च योगी योगप्रियः सदा ॥ ४८ ॥
सूत उवाच
तच्छ्रुत्वा वचनं तस्य व्यासस्यामिततेजसः ।
प्रत्युवाच महातेजाः शुकश्चारणिसम्भवः ॥ ४९ ॥
दम्भोऽयं किल धर्मात्मन्भाति चित्ते ममाधुना ।
जीवन्मुक्तो विदेहश्च राज्यं शास्ति मुदान्वितः ॥ ५० ॥
वन्ध्यापुत्र इवाभाति राजासौ जनकः पितः ।
कुर्वन् राज्यं विदेहः किं सन्देहोऽयं ममाद्भुतः ॥ ५१ ॥
द्रष्टुमिच्छाम्यहं भूपं विदेहं नृपसत्तमम् ।
कथं तिष्ठति संसारे पद्मपत्रमिवाम्भसि ॥ ५२ ॥
सन्देहोऽयं महांस्तात विदेहे परिवर्तते ।
मोक्षः किं वदतां श्रेष्ठ सौगतानामिवापरः ॥ ५३ ॥
कथं भुक्तमभुक्तं स्यादकृतं च कृतं कथम् ।
व्यवहारः कथं त्याज्य इन्द्रियाणां महामते ॥ ५४ ॥
माता पुत्रस्तथा भार्या भगिनी कुलटा तथा ।
भेदाभेदः कथं न स्याद्यद्येतन्मुक्तता कथम् ॥ ५५ ॥
कटु क्षारं तथा तीक्ष्णां कषायं मिष्टमेव च ।
रसना यदि जानाति भुंक्ते भोगाननुत्तमान् ॥ ५६ ॥
शीतोष्णुसुखदुःखादिपरिज्ञानं यदा भवेत् ।
मुक्तता कीदृशी तात सन्देहोऽयं ममाद्भुतः ॥ ५७ ॥
शत्रुमित्रपरिज्ञानं वैरं प्रीतिकरं सदा ।
व्यवहारे परे तिष्ठन्कथं न कुरुते नृपः ॥ ५८ ॥
चौरं वा तापसं वापि समानं मन्यते कथम् ।
असमा यदि बुद्धिः स्यान्मुक्तता तर्हि कीदृशी ॥ ५९ ॥
दृष्टपूर्वो न मे कश्चिज्जीवन्मुक्तश्च भूपतिः ।
शङ्केयं महती तात गृहे मुक्तः कथं नृपः ॥ ६० ॥
दिदृक्षा महती जाता श्रुत्वा तं भूपतिं तथा ।
सन्देहविनिवृत्त्यर्थं गच्छामि मिथिलां प्रति ॥ ६१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
प्रथमस्कन्धे शुकं प्रति व्यासोपदेशवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
शुक मिथिला नगरीकडे जातो
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
बालविष्णूला विस्मय झाल्याचे पाहून देवी हसतमुखाने म्हणाली, ’हे विष्णो, तू विस्मित का झाला आहेस! पूर्वी जगाची उत्पत्ती व प्रलय झाल्यावर पुन्हापुन: तुला उत्पन्न केलेल्या माझ्या प्रभावाचे तुला विस्मरण झाले काय! ती शक्ती निर्गुण आहे, तू सगुण आहेस. मीही तशीच आहे. सात्विकी म्हणून असलेली उत्कृष्ट शक्ती माझीच आहे, तुझ्या नाभीकमलापासून प्रजापती ब्रह्मदेव उत्पन्न होईल व तो ही सर्व पृथ्वी निर्माण करील. नंतर उत्कृष्ट तपश्चर्या करुन ती शक्ती प्राप्त झाल्यावर रजोगुणाच्या योगाने तो त्रैलोक्य रक्तवर्ण करील. तो सगुण पंचमहाभूते उत्पन्न करुन मन व इतर इंद्रिये व इंद्रियाधिपती उत्पन्न केल्यावर तो सृष्टि उत्पन्न करील, म्हणून त्याला विश्वाचा कर्ता व तुला पालक असे म्हणतात. त्याच्या भुकूटीचे मध्यप्रदेशापासून रुद्र उत्पन्न होईल. घोर तपश्चर्येनंतर त्याला तामसी शक्ती प्राप्त होईल, कल्पाचे अंती तो या जगाचा संहार करील. हे सर्व करण्याकरता मी तुझ्याजवळ आले आहे. हे मधुसूदना मी सदासर्वदा तुझ्याजवळ राहुन तुझ्या ह्रदयात वास्तव्य करीन.
विष्णू म्हणाला, "हे देवी स्पष्ट अक्षरांनी युक्त असा अर्धाश्लोक पूर्वी मी ऐकला. पण त्या कल्याणकारक रहस्याचा उपदेश कोणी केला. हे मला सांग हे सुमुखी मला संशय आल्यानेच मी निर्धन मनुष्याप्रमाणे वारंवार त्याचे स्मरण करीत आहे.
अदभूत मुख व मनोहर हास्य यांनी युक्त असलेली ती महालक्ष्मी, त्याचे भाषण ऐकून प्रेमाने म्हणाली, हे विष्णो माझे ऐक, मी सगुण आहे. तू मला जाणतोस, पण त्यातील निर्गुण देवीचे तुला ज्ञान झाले नाही. हे विष्णो, तिने कल्याणकारक व वेदतात्पर्यरुप पवित्र भागवत प्रकट केले. हे शत्रूनाशका सव्रता, तुझ्या हितासाठी तुला अत्यंत गुप्त भागवत सांगून तुजवर तिने मोठी कृपा केली आहे. हे भागवत तू सर्वदा मनात रक्षण कर. कधी विसरु नकोस. महाविद्येने ते सार प्रकाशित केले आहे. यापेक्षा योग्य असे जाणण्यास त्रैलोक्यात काहीही नाही. तू देवीला प्रिय आहेस म्हणूनच तिने तुला उपदेश दिला."
देवी भगवतीचे भाषण ऐकून, अनुपम मंत्र भगवंताने सतत स्मरण केला. काही काळांनी त्याच्या नाभीकमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, दैत्यभयाने त्याला शरण आला. तेव्हा युद्धात मधुकैटभांचा वध केल्यावर एकच जप सदैव विष्णू ह्रदयात जपू लागला. विष्णू जप करीत असलेला पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाला व विष्णूला म्हणाला, "हे सुरेश्वरा आपण कसला जप करीत आहात! कोण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे! कमलनयन, आपण कोणाच्या स्मरणाने प्रसन्न झाला आहात!"
विष्णू म्हणाला, "माझ्या व तुझ्याठिकाणी असलेली कार्यकारण शक्ती जी कल्याण स्वरुप भगवती देवी आहे, तिच्यासंबंधी तू विचार कर.ह्या महासागरावर जिच्या आधाराने हे जग राहिले आहे. ती पुरातन अतर्क्य महाशक्ती साकार आहे. हे जग उत्पन्न करणारी ती वरदायिनी देवी प्रसन्न झाल्यावर, पुरुषांना मुक्ती मिळते. तीच सनातन उत्कृष्ट विधी आहे. तीच सर्व देवांची स्वामीनी, संसाररुप बंधनाचे कारण आहे.
हे ब्रह्मदेवा, आपण तिच्याच चैतन्य शक्तीपासून उत्पन्न झालो आहोत. तिने अर्ध्या श्लोकात भागवत सांगितले. द्वापार, कृत युगात त्याचा विस्तार केला." व्यास म्हणतात विष्णूच्या नाभिकमलात असतानाच ब्रह्मदेवाने श्रवण केलेले भागवत नारदाला कथन केले. नारदमुनींनी ते पूर्वी मला अर्पण केले आणि द्वादशस्कंधानी विस्तार करुन, मी ते पूर्ण केले. तेव्हा हे महाभाग्यशाली शुका, तू ते पठण कर. पाच लक्षणांनी युक्त असे ते पुराण देवीचे उत्कृष्ट चरित्र आहे.
ते तत्वज्ञानरुप असल्याने ते धर्मशास्त्राने पूर्ण व पुराणात उत्तम वेदार्थाने भरलेले व पवित्र आहे.
वृत्रासुर वध यांमध्ये आहेच. शिवाय अनेक आख्याने आहेत. संसारापासून तारणारे हे ब्रह्मविद्येचे भांडार आहे. ह्यास्तव तू हे महाभागवत पुराण ग्रहण कर. तू महाबुद्धीमान असल्याने ते ग्रहण करण्यास योग्य आहेस, हे अज्ञान नाशक, दिव्य व ज्ञानसूर्याचा उद्य करणारे आहे. ह्या अठरा हजार श्लोकांचा तू संग्रह कर . सुख, शांती, धन, दीर्घ आयुष्य देनारे हे भागवत असून पठण करणार्यांचे कल्याण करणारे आहे. पुत्रपौत्रादि, त्यांची संतती वृद्धिंगत करणारे आहे. लोमहर्षणापासून उत्पन्न झालेला हा माझा धर्मात्मा शिष्य सूत , तुझ्यासह ह्या शुभ व पुरातन संहितेचे अध्ययन करील."
सूत म्हणतो, "असे म्हणून त्या व्यासांनी आपल्या पुत्राला व मला ते विस्तृत पुराण कथन केले. ते आम्ही ग्रहण केले.पुढे पुराणांचे अध्ययन करुन शुक शुभ आश्रमात राहिला. पण प्रति ब्रह्मदेवपुत्राप्रमाणे असलेला हा शुक, त्याला कर्मामुळे देह धारण केल्याने सुख प्राप्त झाले नाही. तो खिन्न व स्तब्ध होऊन एकांतात वास करीत असे. भोजन वा उपवास कोणीकडेच त्याची आसक्ती नसे. ह्याप्रमाणे चिंताक्रांत शुकाला पाहून व्यास आपल्या पुत्राला म्हणाले,
"हे पुत्रा, तू कसले चिंतन करतोस ? कोणत्या गोष्टीत तुझे मन व्यग्र झाले आहे ? ऋणात डुबलेल्या चिंताक्रांत पुरुषाप्रमाणे तू नेहमी चिंतेत का व्यग्र असतोस? पण हे पुत्रा, मी तुझा पिता जिवंत असताना तुला कसली आली आहे चिंता ? तू द:ख नाहीसे करुन येथेष्ट सुख भोग., शास्त्रोक्त ज्ञानाने चिंतन कर आणि प्रत्यक्ष अनुभवाकडे लक्ष दे. हे सुव्रता, माझ्या भाषणाने जर तुला शांति लाभत नसेल तर जनकाने रक्षण केलेल्या मिथीली नगरीत तू जाऊन रहा. सत्याचा सागर, धर्मात्मा व विदेह भूपति, तुझा मोह नाहीसा करील. म्हणून तू तेथे जाऊन आपल्या मनातील संशयाची निवृत्ती कर. वर्णाश्रम धर्माविषयी तू त्याला योग्य प्रश्न कर. कारण तो राजर्षी जीवनमुक्त आहे. त्याची शुद्धमति ब्रह्मज्ञानाकडेच आहे. तो सत्यवक्ता वशाम्त आहे व योगी आहे."
शुक म्हणतो, हे धर्मात्मा माझ्या मनाला, सर्वत्र ढोंग दिसत आहे, जीवनमुक्त व विदेह असून आनंदाने राज्य करणारा जनकराजा मला विंध्यपुत्राप्रमाणे भासतो. कारण हाविदेह कसा? असा संशय मला जाणवतो आहे. तेव्हा त्या विदेह राजाला पाहण्याची मला इच्छा झाली आहे. उदकात राहूनही कोरडे राहणार्या कमलाप्रमाणे हा राजा संसारात राहूनही अलिप्त कसा ? हे श्रेष्ठ वक्त्या, सौगताप्रमाणे हा जनकराजा मोक्ष मानतो की काय? तात, उपयुक्त वस्तू अनुभवमुक्त कशी होईल! माता, पुत्र, भार्या, भगिनी वैश्य यामधील भेदाभेद नाहीसा का होणार ! तसे न होईल तर मुक्ती मिळणार कोठून ? ज्याच्या जिव्हेला कडू, खारट, तिखट, तुरट अथवा मधुर चव जाणवते, तो उपभोग्य वस्तूचा उपभोग घेत असला पाहिजे. शीत, उष्ण, सुख, दु:ख, हे ज्ञान आहे, तोवर मुक्तता मिळवणार कशी! शत्रू, मित्र, द्वेष, प्रीती हे भाव अंत:करणात आहेत. तेव्हा व्यवहारी असणारा चोर व तपस्वी यांना समान कसा मनतो! या दोहात जर हा फरक मानीत असेल तर त्याला मुक्तता कशी मिळणार! तेव्हा जीवनमुक्त असा राजा अद्याप माझ्या पाहण्यात नाही. तेव्हा अशा राजाला अवलोकन करण्याच्या इच्छेने व संदेहनिवृत्तीसाठी मी आता मिथिला नगरीकडे जातो."