श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
दशमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


शिववरदानवर्णनम् -

ऋषय ऊचुः
सूत पूर्वं त्वया प्रोक्तं व्यासेनामिततेजसा ।
कृत्वा पुराणमखिलं शुकायाध्यापितं शुभम् ॥ १ ॥
व्यासेन तु तपस्तप्त्वा कथमुत्पादितः शुकः ।
विस्तरं ब्रूहि सकलं यच्छ्रुतं कृष्णतस्त्वया ॥ २ ॥
सूत उवाच
प्रवक्ष्यामि शुकोत्पत्तिं व्यासात्सत्यवतीसुतात् ।
यथोत्पन्नः शुकः साक्षाद्योगिनां प्रवरो मुनिः ॥ ३ ॥
मेरुशृङ्गे महारम्ये व्यासः सत्यवतीसुतः ।
तपश्चचार सोऽत्युग्रं पुत्रार्थं कृतनिश्चयः ॥ ४ ॥
जपन्नेकाक्षरं मन्त्रं वाग्बीजं नारदाच्छ्रुतम् ।
ध्यायन्परां महामायां पुत्रकामस्तपोनिधिः ॥ ५ ॥
अग्नेर्भूमेस्तथा वायोरन्तरिक्षस्य चाप्ययम् ।
वीर्येण सम्मितः पुत्रो मम भूयादिति स्म ह ॥ ६ ॥
अतिष्ठत्स गताहारः शतसंवत्सरं प्रभुः ।
आराधयन्महादेवं तथैव च सदाशिवाम् ॥ ७ ॥
शक्तिः सर्वत्र पूज्येति विचार्य च पुनः पुनः ।
अशक्तो निन्द्यते लोके शक्तस्तु परिपूज्यते ॥ ८ ॥
यत्र पर्वतशृङ्गे वै कर्णिकारवनाद्‌भुते ।
क्रीडन्ति देवताः सर्वे मुनयश्च तपोऽधिकाः ॥ ९ ॥
आदित्या वसवो रुद्रा मरुतश्चाश्विनौ तथा ।
वसन्ति मुनयो यत्र ये चान्ये ब्रह्मवित्तमाः ॥ १० ॥
तत्र हेमगिरेः शृङ्गे संगीतध्वनिनादिते ।
तपश्चचार धर्मात्मा व्यासः सत्यवतीसुतः ॥ ११ ॥
ततोऽस्य तेजसा व्याप्तं विश्वं सर्वं चराचरम् ।
अग्निवर्णा जटा जाता पाराशर्यस्य धीमतः ॥ १२ ॥
ततोऽस्य तेज आलक्ष्य भयमाप शचीपतिः ।
तुरासाहं तदा दृष्ट्वा भयत्रस्तं श्रमातुरम् ॥ १३ ॥
उवाच भगवान् रुद्रो मघवन्तं तथास्थितम् ।
शङ्कर उवाच
कथमिन्द्राद्य भीतोऽसि किं दुःखं ते सुरेश्वर ॥ १४ ॥
अमर्षो नैव कर्तव्यस्तापसेषु कदाचन ।
तपश्चरन्ति मुनयो ज्ञात्वा मां शक्तिसंयुतम् ॥ १५ ॥
न त्वेतेऽहितमिच्छन्ति तापसाः सर्वथैव हि ।
इत्युक्तवचनः शक्रस्तमुवाच वृषध्वजम् ॥ १६ ॥
कस्मात्तपस्यति व्यासः कोऽर्थस्तस्य मनोगतः ।
शिव उवाच
पाराशर्यस्तु पुत्रार्थी तपश्चरति दुश्चरम् ॥ १७ ॥
पूर्णवर्षशतं जातं ददाम्यद्य सुतं शुभम् ।
सूत उवाच
इत्युक्त्या वासवं रुद्रो दयया मुदिताननः ॥ १८ ॥
गत्वा ऋषिसमीपं तु तमुवाच जगद्‌गुरुः ।
उत्तिष्ठ वासवीपुत्र पुत्रस्ते भविता शुभः ॥ १९ ॥
सर्वतेजोमयो ज्ञानी कीर्तिकर्ता तवानघ ।
अखिलस्य जनस्यात्र वल्लभस्ते सुतः सदा ॥ २० ॥
भविष्यति गुणैः पूर्णः सात्त्विकैः सत्यविक्रमः ।
सूत उवाच
तदाकर्ण्य वचः श्लक्ष्णं कृष्णद्वैपायनस्तदा ॥ २१ ॥
शूलपाणिं नमस्कृत्य जगामाश्रममात्मनः ।
स गत्वाश्रममेवाशु बहुवर्षश्रमातुरः ॥ २२ ॥
अरणीसहितं गुह्यं ममन्थाग्निं चिकीर्षया ।
मन्थनं कुर्वतस्तस्य चित्ते चिन्ताभरस्तदा ॥ २३ ॥
प्रादुर्बभूव सहसा सुतोत्पत्तौ महात्मनः ।
मन्थानारणिसंयोगान्मन्थनाच्च समुद्‌भवः ॥ २४ ॥
पावकस्य यथा तद्वत्कथं मे स्यात्सुतोद्‌भवः ।
पुत्रारणिस्तु या ख्याता सा ममाद्य न विद्यते ॥ २५ ॥
तरुणी रूपसम्पन्ना कुलोत्पन्ता पतिव्रता ।
कथं करोमि कान्तां च पादयोः शृङ्खलासमाम् ॥ २६ ॥
पुत्रोत्पादनदक्षां च पातिव्रत्ये सदा स्थिताम् ।
पतिव्रतापि दक्षापि रूपवत्यपि कामिनी ॥ २७ ॥
सदा बन्धनरूपा च स्वेच्छासुखविधायिनी ।
शिवोऽपि वर्तते नित्यं कामिनीपाशसंयुतः ॥ २८ ॥
कथं करोम्यहं चात्र दुर्घटं च गृहाश्रमम् ।
एवं चिन्तयतस्तस्य घृताची दिव्यरूपिणी ॥ २९ ॥
प्राप्ता दृष्टिपथं तत्र समीपे गगने स्थिता ।
तां दृष्ट्वा चञ्चलापाङ्गीं समीपस्थां वराप्सराम् ॥ ३० ॥
पञ्चबाणपरीताङ्गस्तूर्णमासीद्‌धृतव्रतः ।
चिन्तयामास च तदा किं करोम्यद्य संकटे ॥ ३१ ॥
धर्मस्य पुरतः प्राप्ते कामभावे दुरासदे ।
अङ्गीकरोमि यद्येनां वञ्चनार्थमिहागताम् ॥ ३२ ॥
हसिष्यन्ति महात्मानस्तापसा मां तु विह्वलम् ।
तपस्तप्त्वा महाघोरं पूर्णवर्षशतं त्विह ॥ ३३ ॥
दृष्ट्वाप्सरां च विवशः कथं जातो महातपाः ।
कामं निन्दापि भवतु यदि स्यादतुलं सुखम् ॥ ३४ ॥
गहस्थाश्रमसम्भूतं सुखदं पुत्रकामदम् ।
स्वर्गदं च तथा प्रोक्तं ज्ञानिनां मोक्षदं तथा ॥ ३५ ॥
न भविष्यति तन्नूनमया देवकन्यया ।
नारदाच्च मया पूर्वं श्रुतमस्ति कथानकम् ।
यथोर्वशीवशो राजा पराभूतः पुरूरवाः ॥ ३६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महायुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
प्रथमस्कन्धे शिववरदानवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥


पुत्रप्राप्तीसाठी व्यास तप करतात. शिवाने व्यासांना वर दिला !

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ऋषींनी सूताला विचारले, "हे सूता व्यासांनी शुकाला पुराण सांगितले. तो शुक कसा जन्म पावला हे आम्हाला सांग."

त्यावर सूत सांगू लागला. "पुत्रप्राप्तीसाठी व्यास मेरु पर्वतावर गेले व नारद मुनींपासून मिळालेल्या एकाक्षरी मंत्राने ते देवीची उपासना व जप करु लागले. अग्नि, वायू, भूमी आणि अंतिरिक्ष ह्यांशी वीर्याने बरोबरी करणारा पुत्र व्हावा ह्या उद्देशाने ते निराहार राहून जगदंबा व महादेव यांची आराधना करु लागले. कारण शक्तीलाच सर्वत्र मान्यता मिळते, अशक्त पुरुष जगात निंदेला पात्र ठरतो, शक्तीची प्रशंसा होते.

कर्णिकारवनामुळे आश्चर्यकारक झालेल्या त्या पर्वतशिखरावर सर्व देवता व तपोवृद्ध मुनी क्रीडा करतात. आदित्य, वसू, रुद्र, मरुदगण, अश्विनीकुमार आणि इतरही ब्रह्मदेव वगैरे श्रेष्ठ असलेले मुनी त्या ठिकाणी वास्तव्य करतात. संगीत ध्वनीने व्याप्त झालेल्या शिखरावर व्यास तपश्चर्या करु लागले. त्यांच्या तेजाने सर्व विश्व व्याप्त झाले. त्या पराशरपुत्राच्या जटाही अग्निवर्ण झाल्या. त्याचे तेज पाहून इंद्रालाही भय वाटले. इंद्र भयाकुल झाल्याचे पाहून रुद्र म्हणाला, "हे सुरेश्वरा इंद्रा, तुला कसले भय निर्माण झाले आहे? कोणते दु:ख झाले आहे? तपस्यावर कधीही क्रोध करु नये. तपस्वी कोणाच्याही अकल्याणाची इच्छा करीत नाहीत. मला शक्ती समजून ते तपश्चर्या करतात.

इंद्राने विचारले, "व्यासांच्या तपश्चर्येचे कारण काय? त्यांचा उद्देश काय ?"

शिव म्हणाला, "पुत्रप्राप्तीसाठी हा सत्यवती पुत्र व्यास दुष्कर तपश्चर्या करीत आहे. तपाला आरंभ होऊन शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून मी आज त्याला शुभ पुत्र देतो."

असे म्हणून सुप्रसन्न होऊन शिव व्यासमुनीजळ गेला व म्हणाला, "हे सत्यवती पुत्रा ऊठ, तुला शुभ पुत्र प्राप्त होईल. हे निष्पाप, तो सर्वत्र तेजोमय ज्ञानी व तुझी कीर्ती वृद्धिंगत करणारा होईल. तो सात्विक गुणी व सदवर्तनसंपन्न असा तुझा होणारा पुत्र सर्वाना प्रिय होईल. हे मधुर भाषण ऐकून व्यासांनी त्या शूलपाणि शंकराला नमस्कार केला व ते आपल्या आश्रमाला गेले. बरीच वर्षे तप करुन श्रांत झालेले ते मुनी अरणितील गुप्त अग्नि प्रज्वलीत करण्यासाठी मंथन करु लागले. परंतु त्याचवेळी त्यांच्या मनात पुत्रप्राप्तीसाठी चिंता उत्पन्न झाली.

मथा व अरणी यांच्या संयोगामुळे मंथनापासून अग्नि निर्माण होतो. तसे मला पुत्र कसा प्राप्त होणार ? पुत्रारणी जीला म्हणतात ती तरुण, रुपवती, कुलीनक व पतिव्रता भार्या तर मला नाही. शृंखलेप्रमाणे असणार्‍या भार्येचा मी कसा स्वीकार करावा ? पुत्रोत्पदनाविषयी दक्ष व पतिव्रता भार्या कोठून मिळणार ? शिवही नेहमी स्त्रीपाशात गुंगून राहिलेला असतो. तेव्हा त्या दुर्घट गृहस्थाश्रमाचा स्वीकार मी कसा करावा ?

असा विचार व्यासमुनी करीत असताना घृताची नावाची दिव्यरुपधारी अप्सरा आकाशात उभी असलेली, जवळच त्यांनी पाहिली. तिच्या नेत्रकटाक्षाणक्ष व्यासमुनीचे मन मदनव्याकुळ झाले. ते मनाशी म्हणाले, "ही काम-वासना अजिंक्य आहे, तेव्हा काय करावे ? मला फसविण्याकरता आलेल्या ह्या स्त्रीचा मी स्वीकार केला तर इतर तपस्वीजन माझा उपहास करतील. शंभर वर्षे तपश्चर्या करणारा हा व्यासमुनी कामाधीन कसा झाला? गृहस्थाश्रमामुळे आनंदोत्पादक पुत्रसुख प्राप्त होत असेल तर ते होवो. पण या देवकन्येच्या योगाने मला मात्र खरे सुख प्राप्त होणार नाही. नारदांनी सांगितले होतेच. उर्वशीच्या आधीन झाल्यामुळे पुरुरव्याची हानी झाली. तस्मात् आता काय करावे ? असा व्यास विचार करु लागले.



अध्याय दहावा समाप्त

GO TOP