श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
द्वितीयोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


ग्रन्थसंख्याविषयवर्णनम् -

सूत उवाच
धन्योऽहमतिभाग्योऽहं पावितोऽहं महात्मभिः ।
यत्पृष्टं सुमहत्पुण्यं पुराणं वेदविश्रुतम् ॥ १ ॥
तदहं सम्प्रवक्ष्यामि सर्वश्रुत्यर्थसम्मतम् ।
रहस्यं सर्वशास्त्राणामागमानामनुत्तमम् ॥ २ ॥
नत्वा तत्पदपङ्कजं सुललितं मुक्तिप्रदं योगिनां ॥
ब्रह्माद्यैरपि सेवितं स्तुतिपरैर्ध्येयं मुनीन्द्रैः सदा ।
वक्ष्याम्यद्य सविस्तरं बहुरसं श्रीमत्पुराणोत्तमं ॥
भक्त्या सर्वरसालयं भगवतीनाम्ना प्रसिद्धं द्विजाः ॥ ३ ॥
या विद्येत्यभिधीयते श्रुतिपथे शक्तिः सदाद्या परा ॥
सर्वज्ञा भवबन्धछित्तिनिपुणा सर्वाशये संस्थिता ।
दुर्ज्ञेया सुदुरात्मभिश्च मुनिभिर्ध्यानास्पदं प्रापिता ॥
प्रत्यक्षा भवतीह सा भगवती सिद्धिप्रदा स्यात्सदा ॥ ४ ॥
सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं
    शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वम् ।
संहृत्य कल्पसमये रमते तथैका
    तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि ॥ ५ ॥
ब्रह्मा सृजत्यखिलमेतदिति प्रसिद्धं
    पौराणिकैश्च कथितं खलु वेदविद्भिः ।
विष्णोस्तु नाभिकमले किल तस्य जन्म
    तैरुक्तमेव सृजते न हि स स्वतन्त्रः ॥ ६ ॥
विष्णुस्तु शेषशयने स्वपितीति काले
    तन्नाभिपद्यमुकुले खलु तस्य जन्म ।
आधारतां किल गतोऽत्र सहस्रमौलिः
    सम्बोध्यतां स भगवान् हि कथं मुरारिः ॥ ७ ॥
एकार्णवस्य सलिलं रसरूपमेव
    पात्रं विना न हि रसस्थितिरस्ति कच्चित् ।
या सर्वभूतविषये किल शक्तिरूपा
    तां सर्वभूतजननीं शरणं गतोऽस्मि ॥ ८ ॥
योगनिद्रामीलिताक्षं विष्णुं दृष्ट्वाम्बुजे स्थितः ।
अजस्तुष्टाव यां देवीं तामहं शरणं गतः ॥ ९ ॥
तां ध्यात्वा सगुणां मायां मुक्तिदां निर्गुणां तथा ।
वक्ष्ये पुराणमखिलं शृण्वन्तु मुनयस्त्विह ॥ १० ॥
पुराणमुत्तमं पुण्यं श्रीमद्भागवताभिधम् ।
अष्टादश सहस्राणि श्लोकास्तत्र तु संस्कृताः ॥ ११ ॥
स्कन्धा द्वादश चैवात्र कृष्णेन विहिताः शुभाः ।
त्रिशतं पूर्णमध्याया अष्टादशयुताः स्मृताः ॥ १२ ॥
विंशतिः प्रथमे तत्र द्वितीये द्वादशैव तु ।
त्रिंशच्चैव तृतीये तु चतुर्थे पञ्चविंशतिः ॥ १३ ॥
पञ्चत्रिंशत्तथाध्यायाः पञ्चमे परिकीर्तिताः ।
एकत्रिंशत्तथा षष्ठे चत्वारिंशच्च सप्तमे ॥ १४ ॥
अष्टमे तत्त्वसङ्ख्याश्च पञ्चाशन्नवमे तथा ।
त्रयोदश तु सम्प्रोक्ता दशमे मुनिना किल ॥ १५ ॥
तथा चैकादशस्कन्धे चतुर्विंशतिरीरिताः ।
चतुर्दशैव चाध्याया द्वादशे मुनिसत्तमाः ॥ १६ ॥
एवं सङ्ख्या समाख्याता पुराणेऽस्मिन्महात्मना ।
अष्टादशसहस्रीया सङ्ख्या च परिकीर्तिता ॥ १७ ॥
सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च ।
वंशानुचरितं चैव पुराणं पञ्चलक्षणम् ॥ १८ ॥
निर्गुणा या सदा नित्या व्यापिका विकृता शिवा ।
योगगम्याखिलाधारा तुरीया या च संस्थिता ॥ १९ ॥
तस्यास्तु सात्त्विकी शक्ती राजसी तामसी तथा ।
महालक्ष्मीः सरस्वती महाकालीति ताः स्त्रियः ॥ २० ॥
तासां तिसॄणां शक्तीनां देहाङ्गीकारलक्षणः ।
सृष्ट्यर्थं च समाख्यातः सर्गः शास्त्रविशारदैः ॥ २१ ॥
हरिद्रुहिणरुद्राणां समुत्पत्तिस्ततः स्मृता ।
पालनोत्पत्तिनाशार्थं प्रतिसर्गः स्मृतो हि सः ॥ २२ ॥
सोमसूर्योद्भवानां च राज्ञां वंशप्रकीर्तनम् ।
हिरण्यकशिप्वादीनां वंशास्ते परिकीर्तिताः ॥ २३ ॥
स्वायम्भुवमुखानां च मनूनां परिवर्णनम् ।
कालसङ्ख्या तथा तेषां तत्तन्मन्वन्तराणि च ॥ २४ ॥
तेषां वंशानुकथनं वंशानुचरितं स्मृतम् ।
पञ्चलक्षणयुक्तानि भवन्ति मुनिसत्तमाः ॥ २५ ॥
सपादलक्षं च तथा भारतं मुनिना कृतम् ।
इतिहास इति प्रोक्तं पञ्चमं वेदसम्मतम् ॥ २६ ॥
शौनक उवाच
कानि तानि पुराणानि ब्रूहि सूत सविस्तरम् ।
कतिसङ्ख्यानि सर्वज्ञ श्रोतुकामा वयं त्विह ॥ २७ ॥
कलिकालविभीताः स्मो नैमिषारण्यवासिनः ।
ब्रह्मणात्र समादिष्टाश्चक्रं दत्त्वा मनोमयम् ॥ २८ ॥
कथितं तेन नः सर्वान्गच्छन्त्वेतस्य पृष्ठतः ।
नेमिः संशीर्यते यत्र स देशः पावनः स्मृतः ॥ २९ ॥
कलेस्तत्र प्रवेशो न कदाचित् सम्भविष्यति ।
तावत्तिष्ठन्तु तत्रैव यावत्सत्ययुगं पुनः ॥ ३० ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य गृहीत्वा तत्कथानकम् ।
चालयन्निर्गतस्तूर्णं सर्वदेशदिदृक्षया ॥ ३१ ॥
प्रेत्यात्र चालयंश्चक्रं नेमिः शीर्णोऽत्र पश्यतः ।
तेनेदं नैमिषं प्रोक्तं क्षेत्रं परमपावनम् ॥ ३२ ॥
कलिप्रवेशो नैवात्र तस्मात्स्थानं कृतं मया ।
मुनिभिः सिद्धसङ्घैश्च कलिभीतैर्महात्मभिः ॥ ३३ ॥
पशुहीनाः कृता यज्ञाः पुरोडाशादिभिः किल ।
कालातिवाहनं कार्यं यावत्सत्ययुगागमः ॥ ३४ ॥
भाग्ययोगेन सम्प्राप्तः सूत त्वं चात्र सर्वथा ।
कथयाद्य पुराणं हि पावनं ब्रह्मसम्मतम् ॥ ३५ ॥
सूत शुश्रूषवः सर्वे वक्ता त्वं मतिमानथ ।
निर्व्यापारा वयं नूनमेकचित्तास्तथैव च ॥ ३६ ॥
त्वं सूत भव दीर्घायुस्तापत्रयविवर्जितः ।
कथयाद्य पुराणं हि पुण्यं भागवतं शिवम् ॥ ३७ ॥
यत्र धर्मार्थकामानां वर्णनं विधिपूर्वकम् ।
विद्यां प्राप्य तया मोक्षः कथितो मुनिना किल ॥ ३८ ॥
द्वैपायनेन मुनिना कथितं यच्च पावनम् ।
न तृप्यामो वयं सूत कथां श्रुत्वा मनोरमाम् ॥ ३९ ॥
सकलगुणगणानामेकपात्रं पवित्र- ॥
मखिलभुवनमातुर्नाट्यवद्यद्विचित्रम् ।
निखिलमलगणानां नाशकृत्कामकन्दं ॥
प्रकटय भगवत्या नामयुक्तं पुराणम् ॥ ४० ॥

इति श्रीभद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां ॥
प्रथमस्कन्धे ग्रन्थसंख्याविषयवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥


पुराणांची माहिती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत सांगतात, तुम्ही महात्म्यांनी पावन केल्यामुळे मी धन्य झालो आहे. आता तुम्ही प्रश्न केला आहे, त्याप्रमाणे मी तुम्हाला ते पुराण सांगतो. ब्रह्मदेव वगैरेंनी ज्याचे सेवन केले आहे, श्रेष्ठ मुनी ज्याचे नेहमी ध्यान करतात आणि योगिजनांना ज्यामुळे मुक्ती मिळते अशा त्या भगवंताच्या चरणकमलांना नमस्कार करुन भगवतीच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे संपित्तकारक उत्कृष्ट पुराण मी तुम्हाला सविस्तर सांगतो.

श्रुतीमध्ये जिला विद्या आणि आद्य शक्ती म्हटले आहे, जी सर्वत्र आणि संसाररुप बंधन तोडण्यात निपुण आहे, सर्वांच्या अंत:करणात जी रहात आहे. मलिन अंत:करणाच्या लोकांना जिचे ज्ञान होणे कठीण आहे आणि मुनींनी ध्यानयोगाने आवाहन केले तरच ती प्रत्यक्ष येत असते. अशी ती भगवती नेहमी सिद्धिप्रद असो. ती हे संपूर्ण जग उत्पन्न करते, त्याचे रक्षण करते आणि कल्पान्ताच्या वेळी याचा संहार करुन ती एकटीच खेळ खेळत असते, त्या या सर्व जगताच्या मातेचे मी मनात स्मरण करतो.

हे संपूर्ण विश्व ब्रह्मदेव उत्पन्न करतो हे प्रसिद्ध आहे, पण ब्रह्मदेवांची उत्पत्ती विष्णुच्या नाभिकमलापासून होत असल्याने तो परतंत्र आहे. विष्णू शेषरुप शय्येवर शयन करीत असतो, म्हणजे शेष त्याला आधार आहे ; त्यामुळे तोही विश्वाचा मुख्य उत्पादक कसा समजावयाचा ? आणि ज्या महासागरात हा शेष आहे तो सागर रसरुप असून पात्राशिवाय रस असणे संभवनीय नाही, म्हणून सागरही विश्वाचा उत्पादक म्हणता येत नाही. यास्तव सर्वरुपांविषयी जी खरोखर स्वतंत्र शक्तिरुप आहे त्याच सर्वभूतांच्या जननीला मी शरण आहे. सगुण व निर्गुण आणि मायारुप व मुक्तिप्रद असलेल्या त्या देवीचे ध्यान करुन मी संपूर्ण पुराण तुम्हांला सांगतो.

या पवित्र भागवतपुराणात अठरा हजार संस्कृत श्लोक आहेत. व्यासांनी याचे बारा स्कंध केले असून त्यात तीनशेअठरा आध्याय आहेत. त्यातील पहिल्या स्कंधात वीस, दुसर्‍यात बारा, तिसर्‍यात तीस, चवथ्यात पंचवीस, पाचव्यात पसतीस, सहाव्यत एकतीस, सातव्यात चाळीस, आठव्यात चोवीस, नवव्यात पन्नास दहाव्यात तेरा, अकराव्यात चोवीस आणि बाराव्या स्कंधात चौदा अध्याय आहेत. सर्ग, पाच लक्षणे पुराणात असतात, सर्वदा नित्य, व्यापक विकाररहित, निर्गुण आणि कल्याणस्वरुप अशा देवीच्या सात्विक, राजस आणि तामस अशा तीन शक्ती आहेत. त्या स्त्रीरुप तीन शक्ती, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली म्हणून प्रसिद्ध आहेत. या तीनही शक्तींची देहरुपाची उत्पत्ती कथन केली आहे, त्याला सर्ग म्हणतात. विष्णू, ब्रह्मदेव आणि महेश्वर यांची अनुक्रमे रक्षण, सृष्टी व संहार याकरिता होत असलेली उत्पत्ती हाच प्रतिसर्ग होय. हिरण्यकश्यपू आणि चंद्र व सूर्य यांचा वंश सांगितला आहे. ते पुराणाचे तिसरे लक्षण होय. कालपरिणाम व स्वायंभुव वगैरे मनूचे वृत्तान्त म्हणजे मन्वंतर आणि या सर्वांचे वंश कथन करणे म्हणजे वंशानुचरित, हे पुराणाचे पाचवे लक्षण होय. या पाच लक्षणांनी सर्व पुराणे युक्त असतात, त्याचप्रमाणे सव्वा लक्ष श्लोकांचे जे व्यासांनी भारत केले, त्याला इतिहास म्हणतात."

त्यावर शौनक विचारतात, " सूता, ती पुराणे कोणती आणि ते आम्हाला सांग. आम्ही ब्रह्मदेवाकडे गेलो. त्याने आम्हाला एक मनोमय चक्र दिले व तो म्हणाला, " याच्या पाठोपाठ जा. या चक्राची धाव मोडेल त्या प्रदेशात कलीचा प्रादुर्भाव होनार नाही. मग सत्ययुग आल्यावर पुन्हा तुम्ही येते या." त्याप्रमाणे आम्ही चक्राच्या पाठीमागे जात जात या स्थानी आलो आहोत. येथे चक्राची नेमी मोडून पडल्यामुळे हे स्थान नैमिषारण्य म्हणून प्रसिद्ध झाले आहे. आम्ही येथे पशुशिवाय होणारे सारे यज्ञ पुरोडाशाचे हवन करुन केले आहेत. आम्हाला आता सत्ययुग येईपर्यंत असाच काळ घालवावयाचा आहे. सूता, आमच्या परम भाग्यानेच तू येथे आला आहेस. आता तू आम्हाला पवित्र पुराण सांग. आम्हाला ते ऐकण्याची फार उत्सुकता आहे. आम्हाला दुसरे काही काम नाही. आम्ही अगदी एकाग्र मन लावून बसलो आहोत. तू बुद्धिमान आहेस. तेव्हा आम्हाला ज्यात धर्म, अर्थ, आणि काम यांचे योग्य वर्णन आहे आणि ज्यातले ज्ञान प्राप्त झाले असता खचित मोक्ष मिळतो असे भागवत पुराण तू सांग. व्यासांनी सांगितलेल्या या मनोरम कथा ऐकून आमची संपूर्ण तृप्ती कधीच होत नाही. तेव्हा हे सर्व गुणांचे आगर, जगन्मातेच्या नाट्याने संपन्न असे अदभूत, पावन, मनोरथ पूर्ण करणारे आणि सर्व पापांचा नाश करणारे भगवतीच्या नावाने असलेले पुराण तू आम्हाला सांगून प्रकट कर.


अध्याय दुसरा समाप्त

GO TOP