|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ७ वा - अध्याय ११ वा - अन्वयार्थ
मानवधर्म, वर्णधर्म आणि स्त्रीधर्माचे निरुपण - युधिष्ठिरः - धर्मराज - उरुक्रमात्यमनः - ज्याचे मन त्रिविक्रम भगवानाकडे लागलेले आहे अशा - महत्तमाग्रण्यः - महान सत्पुरुषात श्रेष्ठ अशा - दैत्यपतेः - दैत्यराज प्रल्हादाचे - साधुसभा सभाजिते - साधूंच्या सभेने गौरविलेले - ईहितं - चरित्र - श्रुत्वा - श्रवण करून - मुदा - हर्षाने - युतः - युक्त झालेला - भूयः - पुनः - स्वयंभुवः - ब्रह्मदेवाच्या - तनयं - मुलाला म्हणजे नारदाला - पप्रच्छ - विचारिता झाला. ॥ १ ॥ भगवन् - हे नारदा - नृणां - मनुष्यांचा - वर्णाश्रमाचारयुतं - वर्ण व आश्रम यांच्या आचारांनी युक्त - सनातनं - सनातन - धर्मं - धर्म - श्रोतुं - ऐकण्यास - इच्छामि - मी इच्छितो - यत् - त्यापासून - पुमान् - पुरुष - परं (ज्ञानं) - उत्तम ज्ञान - विन्दते - प्राप्त करुन घेतो. ॥ २ ॥ ब्रह्मन् - हे नारदा - भवान् - तू - साक्षात् - प्रत्यक्ष - परमेष्ठिनः - ब्रह्मदेवाचा - आत्मजः - मुलगा - तपोयोगसमाधिभिः - तपश्चर्या, योगाभ्यास व समाधि यांच्या योगे - (तस्य) सुतानां - ब्रह्मदेवाच्या सर्व मुलांना - सम्मतः (असि) - मान्य आहेस. ॥ ३ ॥ नारायणपराः - नारायणाचे निस्सीम भक्त - करुणाः - कृपाळू - साधवः - सज्जन - शांताः - शांत असे - त्वद्विधाः - तुझ्यासारखे - विप्राः - ब्राह्मण - परं - अत्यंत - गुह्यं - गुप्त असा - धर्मं - धर्म - विदुः - जाणतात - तथा - तसे - अपरे - दुसरे - न - जाणत नाहीत. ॥ ४ ॥ लोकानां - लोकांच्या - धर्महेतवे - धर्माला कारणीभूत अशा - अजाय - जन्मरहित अशा - भगवते - भगवंताला - नत्वा - नमस्कार करुन - नारायणमुखात् - परमेश्वराच्या मुखापासून - श्रुतं - ऐकिलेला - सनातनं - सनातन - धर्मं - धर्म - वक्ष्ये - मी सांगतो. ॥ ५ ॥ यः - जो - तु - खरोखर - लोकानां - लोकांच्या - स्वस्तये - कल्याणाकरिता - आत्मनः - स्वतःच्या - अंशेन - अंशाने - धर्मतः - धर्मापासून - दाक्षायण्यां - दक्ष कन्या जी मूर्ति तिच्या उदरी - अवतीर्य - अवतार धारण करून - बदरिकाश्रमे - बदरिकाश्रमात - तपः - तपश्चर्या - अध्यास्ते - करीत आहे. ॥ ६ ॥ राजन् - हे राजा - हि - खरोखर - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - सर्वदेवमयः - सर्वदेवतारूपी - हरिः - श्रीकृष्ण - च - आणि - तद्विदाम् - त्याला जाणणार्यांची - स्मृतं - स्मृति - च - आणि - येन - ज्याच्यायोगे - आत्मा - अंतःकरण - प्रसीदति - प्रसन्न होते - तत् आचरणं - ते आचरण - धर्ममूलम् (अस्ति) - धर्माचा आधार होय. ॥ ७ ॥ सत्यं - सत्य - दयाः - दया - तपः - तप - शौचं - शुध्दता - तितिक्षा - सहनशीलता - ईक्षा - योग्यायोग्यविचार - शमः - मनाचे नियमन - दमः - बाह्येद्रियांचे वशीकरण - अहिंसा - अहिंसा - ब्रह्मचर्यं - ब्रह्मचर्य - त्यागः - दान - स्वाध्यायः - उचित मंत्रांचा जप - आर्जवं - सरळपणा - च - तसेच, ॥ ८ ॥ संतोषः - संतोष - समदृक्सेवा - सर्वत्र समदृष्टि ठेवणार्यांची सेवा - शनैः - हळूहळू - ग्राम्येहोपरमः - प्रवृत्तिमार्गांतील कर्मे सोडणे - नृणां - मनुष्यांच्या - विपर्ययेहेक्षा - निष्फल कर्मांचे अवलोकन - मौनं - निरर्थक भाषण न करणे - आत्मविमर्शनं - देहादिकाहून भिन्न अशा आत्म्याचे सतत चिंतन करणे. ॥ ९ ॥ च - तसेच - पाण्डव - हे पंडुपुत्रा - यथार्हतः - योग्यतेप्रमाणे - भूतेभ्यः - प्राण्यांना - अन्नाद्यादेः - अन्नवस्त्रादिकांचा - संविभागः - वाटा देणे - तेषु - त्या प्राण्यांविषयी - नृपु - मनुष्यांच्या ठिकाणी - सुतरां - अत्यंत - आत्मदेवताबुध्दिः - ही आपला आत्मा व देव आहेत अशी बुध्दि ठेवणे. ॥ १० ॥ महतां - साधूंची - गतेः - गति अशा - अस्य - ह्या श्रीकृष्णाचे - श्रवणं - कथाश्रवण - कीर्तनं - नामसंकीर्तन - च - आणि - स्मरणं - स्मरण - सेवा - सेवा - इज्या - पूजन - अवनतिः - वंदन - दास्यं - सेवकत्व - सख्यं - मित्रत्व - आत्मसमर्पणं - शरीराचे अर्पण. ॥ ११ ॥ राजन् - हे राजा - अयं - हा - सर्वेषां नृणां - सर्व मनुष्यांचा - त्रिंशल्लक्षणवान् - तीस लक्षणांनी युक्त असा - परः - श्रेष्ठ - धर्मः - धर्म - समुदाहृतः (अस्ति) - सांगितलेला आहे - येन - ज्याच्या योगाने - सर्वात्मा - सर्वांचे चित्त - तुष्यति - प्रसन्न होते. ॥ १२ ॥ यत्र - ज्याच्या ठिकाणी - संस्काराः - गर्भाधानादिक सर्व संस्कार - अविच्छित्राः (सन्ति) - अखंड असे आढळतात - यं (च) - आणि ज्याला - संस्कारयुक्तं - संस्कारांनी युक्त असे - अजः - ब्रह्मदेव - जगाद - वर्णिता झाला - सः - तो - द्विजः (अस्ति) - द्विज होय - जन्मकर्मावदातानां - जन्माने व आचरणाने शुध्द अशा - द्विजन्मनां - द्विजांची - इज्याध्ययनदानानि - यज्ञकर्म, वेदाध्ययन व दान ही कर्मे - विहितानि (सन्ति) - सांगितली आहेत - च - आणि - आश्रमचोदिताः - आश्रमात विहित अशा - क्रियाः (विहिताः) - क्रियाहि सांगितल्या आहेत. ॥ १३ ॥ विप्रस्य - ब्राह्मणाला - अध्ययनादीनि - अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह ही - षट् - सहा कर्मे - विहितानि - सांगितली आहेत - अन्यस्य - क्षत्रियाला - अप्रतिग्रहः (विहितः) - दान न घेणे हे सांगितले आहे - वा - किंवा - प्रजागोप्तुः - प्रजेचे रक्षण करणार्या - राज्ञः - राजाला - अविप्रात् - ब्राह्मणाखेरीज बाकीच्यांपासून - करादिभिः - कर वगैरे घेऊन - वृत्तिः (विहिता) - उपजीविका सांगितली आहे. ॥ १४ ॥ च - आणि - वैश्यः - वैश्य - तु - तर - ब्रह्मकुलानुगः - ब्राह्मणाच्या अनुरोधाने वागणारा असा - नित्यं - सर्वदा - वार्तावृत्तिः (स्यात्) - शेतकी व व्यापार यावर निर्वाह करणारा असवा - च - आणि - शूद्रस्य - शूद्राला - स्वामिनः - धन्याची चाकरी - द्विजशुश्रूषा - द्विजांची सेवा - वृत्तिः - उपजीविकेचे साधन - भवेत् - होय. ॥ १५ ॥ विचित्रा - अनकेप्रकारचे - वार्ता - शेती, गाई राखणे, व्यापार, इत्यादि धंदा - शालीनयायावरशिलोञ्छनं - आपोआप मिळालेले घेणे, रोज धान्याची भिक्षा मागणे व शेतात पडलेले धान्य गोळा करून आणणे - इयं - ही - चतुर्था - चार प्रकारची - विप्रवृत्तिः - ब्राह्मणाची उपजीविका - उत्तरा उत्तरा - पुढली पुढली - पूर्वस्याः पूर्वस्याः - अलीकडच्याहून - श्रेयसी (स्यात्) - अधिक चांगली होय. ॥ १६ ॥ राजन्यं - क्षत्रियाच्या - ऋते - शिवाय - जघन्यः - नीच वर्णाच्या - नरः - मनुष्याने - अनापदि - आपत्ति नसताना - उत्तमां - उच्च वर्णाच्या - वृत्तिं - वृत्तिला - न भजेत् - स्वीकारु नये - आपत्सु - आपत्काळात - सर्वेषां अपि - सर्वांनाही - सर्वशः (वृत्तिः स्यात्) - सर्व उपजीविकेची साधने मोकळी आहेत. ॥ १७ ॥ ऋतामृताभ्यां - ऋत व अमृत ह्या वृत्तीने - जीवेत - उपजीविका चालवावी - मृतेन - मृतवृत्तीने - प्रमृतेन (जीवेत) - व प्रमृतवृत्तीने उपजीविका करावी - वा - किंवा - सत्यानृताभ्यां - खर्याखोट्याने - जीवेत - उपजीविका करावी - कथंचन - काही झाले तरीही - श्ववृत्त्या - श्वान वृत्तीने - न् (जीवेत) - उपजीविका करू नये. ॥ १८ ॥ उंछशिलं - धान्य कापून नेल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले धान्य गोळा करणे - ऋतं - ऋत - प्रोक्तं - म्हटले आहे - यत् - जे - अयाचितं - मागितल्याशिवाय मिळालेले - (तत्) अमृतं प्रोक्तं - ते अमृत असे म्हटले आहे - नित्ययाञ्चा - नेहमी भिक्षा मागणे - तु - तर - मृतं - मृत - स्यात् - होय - कर्षंणं - शेतकी - प्रमृतम् - प्रमृत - स्मृतं - म्हटले आहे. ॥ १९ ॥ सत्यानृतं - खरे खोटे - तु - म्हणजे - वाणिज्यं (स्यात्) - व्यापार होय - श्ववृत्तिः - कुत्र्यासारखे जगणे - नीचसेवनं - नीचाची सेवा - सदा - सर्वदा - विप्रः - ब्राह्मणाने - च - आणि - राजन्यः - क्षत्रियाने - तां - ती - जुगुप्सितां (वृत्ति) - निंद्य वृत्ति - वर्जयेत् - सोडावी - विप्रः - ब्राह्मण - सर्ववेदमयः - सर्व वेदांची मूर्ती - नृपः - राजा - सर्वदेवमयः (अस्ति) - सर्व देवांची मूर्ती होय. ॥ २० ॥ शमः - शांती - दमः - इंद्रियनिग्रह - तपः - तपश्चर्या - शौचं - शुद्धि - संतोषः - संतोष - क्षांतिः - सहनशीलता - आर्जवं - सरळपणा - ज्ञानं - ज्ञान - दया - दया - अच्युतात्मत्वं - परमेश्वराकडे सर्वदा लक्ष्य लावणे - च - आणि - सत्यं - सत्य - ब्रह्मलक्षणं (अस्ति) - ब्राह्मणांचे लक्षण होय. ॥ २१ ॥ शौर्य - शूरपणा - वीर्यं - प्रभाव - धृतिः - धैर्य - तेजः - प्रौढपणा - त्यागः - दान - आत्मजयः - मन स्वाधीन ठेवणे - क्षमा - क्षमा - ब्रह्मण्यता - ब्राह्मणांचा कैवार घेणे - प्रसादः - प्रसन्नता - च - आणि - रक्षा - रक्षण - क्षत्रलक्षणं (अस्ति) - क्षत्रियांचे लक्षण होय. ॥ २२ ॥ देवगुर्वच्युते - देव, गुरु व श्रीविष्णु यांच्या ठिकाणी - भक्तिः - भक्ति - त्रिवर्गपरिपोषणं - धर्म, अर्थ व काम हे पुरुषार्थांचे चांगल्या प्रकारचे साधन - अस्तिक्यं - परमेश्वरावर निष्ठा - उद्यमः - उद्योग - च - आणि - नित्यं - नित्य - नैपुणं - व्यवहारदक्षता - वैश्यलक्षणं (अस्ति) - वैश्यांचे लक्षण होय ॥ २३ ॥ संनतिः - नम्रपणा - शौचं - शुध्दपणा - स्वामिनि - धन्याची - अमायया - निष्कपटपणे - सेवा - सेवा करणे - अमंत्रयज्ञः - वेदमंत्रावाचून पंचयज्ञ करणे - हि - तसेच - अस्तेयं - चोरी न करणे - सत्यं - सत्य - गोविप्ररक्षणं - गाईब्राह्मणांचे पालन - शूद्रस्य लक्षणं (अस्ति) - शूद्राचे लक्षण होय. ॥ २४ ॥ च - आणि - पतिदेवानां - पति हाच आहे देव ज्यांचा अशा - स्त्रीणां धर्मः - स्त्रियांचा धर्म - तच्छुश्रूषा - पतीची सेवा - अनुकूलता - पतीला अनुकूल वागणे - तद्बंधुषु - पतीच्या बंधूविषयी - अनुवृत्तिः - आदर - च - आणि - नित्यं - नित्य - तद्व्रतधारणं (अस्ति) - पति जे व्रत करील ते आपण पाळणे हा होय. ॥ २५ ॥ साध्वी - पतिव्रता स्त्रीने - संमार्जनोपलेपाभ्यां - झाडणे व सारावणे इत्यादिकांनी - गृहमंडलवर्तनैः - घरात रांगोळीची स्वस्तिके इत्यादि काढून - च - आणि - स्वयं - स्वतः - नित्यं - सदोदित - मंडिता - अलंकार धारण केलेली - परिमृष्टपरिच्छदा - सर्व साहित्ये स्वच्छ आहेत जीची अशी - भूत्वा - होऊन - च - आणि - उच्चावचैः - लहानमोठ्या - कामैः - इच्छांनी - प्रश्रयेण - नम्रतेने - दमेन - इंद्रिय-निग्रहाने - सत्यैः - खर्या - प्रियैः - आवडत्या अशा - वाक्यैः - भाषणांनी - प्रेम्णा - प्रेमपूर्वक - कालेकाले - वेळोवेळी - पतिं - पतीची - भजेत् - सेवा करावी. ॥ २६-२७ ॥ संतुष्टा - संतुष्ट - अलोलुपा - हावरी नव्हे अशी - दक्षा - गृहकार्यात तत्पर - धर्मज्ञा - धर्म जाणणारी - प्रियसत्यवाक् - प्रिय व खरे बोलणारी - अप्रमत्ता - सावध - शुचिः - शुद्ध - स्निग्धा - स्नेहयुक्त अशा पतिव्रतेने - तु - तर - अपतितं - पापरहित अशा - पतिं - पतीची - भजेत् - सेवा करावी. ॥ २८ ॥ या - जी स्त्री - श्रीः इव - लक्ष्मीप्रमाणे - तत्परा - एकनिष्ठ अशी - हरिभावेन - हा विष्णु आहे अशा भावनेने - पतिं - पतीला - भजेत् - सेवील - सर्वात्मना - हरिरुप अशा - पत्या - पतीसह - हरेः - विष्णुच्या - लोके - लोकी - श्रीः इव - लक्ष्मीप्रमाणे - मोदते - आनंद भोगिते. ॥ २९ ॥ अचौराणां - चोर नसणार्या - अपापानां - पातकी नसणार्या - अन्त्यजान्तेवसायिनां - अत्यंज व चांडाल यांची - सङ्करजातीनां - मिश्रजातीचे - वृत्तिः - उपजीविकेचे साधन - तत्तत्कुलकृता - त्या त्या वंशपरंपरेने चालत आलेले - भवेत् - असावे. ॥ ३० ॥ राजन् - हे राजा - वेददृग्भिः - वेद हेच ज्यांचे नेत्र आहेत अशा सत्पुरुषांनी - युगेयुगे - प्रत्येक युगात - प्रायः - बहुतकरुन - नृणां - मनुष्यांचा - स्वभावविहितः - सत्त्वादि प्रकृतीला योग्य असा - धर्मः - धर्म - इह - इहलोकी - च - आणि - प्रेत्य - परलोकी - च - सुध्दा - शर्मकृत् - कल्याणकारक म्हणून - स्मृतः - सांगितला आहे ॥ ३१ ॥ स्वभावकृतया - स्वाभाविक - वृत्त्या - उपजीविकेने - वर्तमानः - चालणारा - स्वकर्मकृत् - स्वधर्माचरण करणारा मनुष्य - स्वभावजं - स्वभावजन्य - कर्म - कर्माला - हित्वा - टाकून - शनैः - हळूहळू - निर्गुणतां - निर्गुण स्थितीला - इयात् - प्राप्त होतो. ॥ ३२ ॥ मुहुः - वारंवार - उप्यमानं - पेरलेले - क्षेत्रं - शेत - स्वयं - स्वतः - निर्वीर्यता - निकसपाणाला - इयात् - प्राप्त होते - सूत्यै - धान्य प्रसवण्यास - पुनः - पुनः - न कल्पते - समर्थ होत नाही - च - आणि - उप्तं - पेरलेले - बीजं - बी - नश्यते - नष्ट होते. ॥ ३३ ॥ एवं - याप्रमाणे - राजन् - हे राजा - कामाशयं - कामनांचे घर असे - चित्तं - अंतःकरण - कामानां - भोगांच्या - अतिसेवया - अत्यंत सेवनाने - यथा - जसे - विरज्येत - विरक्त होईल - अग्निवत् - तसे अग्नीत थेंबथेंब तूप टाकल्याप्रमाणे - कामबिन्दुभिः - थोड्या थोड्या कामोपभोगांनी - न विरज्येत - विरक्त होणार नाही. ॥ ३४ ॥ यस्य - ज्या - पुंसः - पुरुषाचे - वर्णाभिव्यंजकं - वर्ण ओळखण्याचे - यत् - जे - लक्षणं - लक्षण - प्रोक्तं - सांगितले आहे - (तत्) यत् - ते जर - अन्यत्र अपि - अन्य ठिकाणीही - दृश्येत तत् - आढळून येईल तर - तेन एव - त्याच वर्णाने - (तं पुमासं) विनिर्दिशेत् - त्या पुरुषाला दर्शवावे. ॥ ३५ ॥ सप्तमः स्कन्धः - अध्याय अकरावा समाप्त |