श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १० वा - अन्वयार्थ

प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुरदहनाची कथा -

तत् - ते - सर्वं - सगळे - भक्तियोगस्य - भक्तियोगाचे - अंतरायतया - विघ्न म्हणून - मन्यमानः - मानणारा - अर्भकः (प्रल्हादः) - बालक प्रल्हाद - स्मयमानः - हसत - हृषीकेशं - नरहरीला - उवाच ह - म्हणाला. ॥ १ ॥

उत्पत्त्या - जन्मतः - कामेषु - विषयांच्या ठिकाणी - आसक्तं - आसक्त अशा - मां - मला - तैः - त्या - वरैः - वरांनी - मा प्रलोभय - लालूच दाखवू नकोस - तत्संगभीतः - त्या उपभोगांच्या संगाला भ्यालेला - निर्विण्णः - खिन्न झालेला - मुमुक्षुः (अहं) - मुक्तीची इच्छा करणारा मी - त्वां - तुला - उपाश्रितः - शरण आलो आहे. ॥ २ ॥

प्रभो - हे प्रभो - भृत्यलक्षणजिज्ञासुः - सेवकांची लक्षणे कळण्याची इच्छा करणारे - भवान् - आपण - भक्तं - भक्ताला - संसारबीजेषु - संसाराचे बीज अशा - हृदयग्रंथिषु - हृदयाला गाठीप्रमाणे बंधनरूप होणार्‍या - कामेषु - उपभोगांच्या ठिकाणी - अचोदयत् - प्रेरणा करिते झाला. ॥ ३ ॥

अखिलगुरो - हे सर्वांच्या गुरो - अन्यथा - असे नसेल तर - करुणात्मनः - कृपाळु अंतःकरणाच्या - ते (भक्तानां विषयेषु प्रलोभनं) न घटेत् - तुजकडून भक्ताला लालुच दाखविण्याकडे प्रवृत्ति झाली नसती - यः - जो - ते - तुझ्यापासून - आशिषः - भोग - आशास्ते - इच्छितो - सः - तो - भृत्यः - सेवक - न (अस्ति) - नव्हे - सः - तो - वै - खरोखर - वणिक् (अस्ति) - व्यापारी होय. ॥ ४ ॥

स्वामिनि - स्वामीकडून - आत्मनः - स्वतःला - आशिषः - भोग - आशासानः - इच्छिणारा - वै - खरोखर - भृत्यः - सेवक - न वै - नव्हेच - न च (सः) स्वामी - आणि तो धनी नव्हे - यः - जो - भृत्यतः - चाकरापासून - स्वाम्यं - धनीपणाला - इच्छन् - इच्छिणारा - भृत्याय आशिषः - त्या सेवकाला भोग - राति - देतो. ॥ ५ ॥

अहं तु - मी तर - अकामः - निरिच्छ असा - त्वद्भक्तः (अस्मि) - तुझा भक्त आहे - च - आणि - त्वं - तू - अनपाश्रयः - निरिच्छ असा - स्वामी (असि) - स्वामी आहेस - इह - येथे - राजसेवकयोः इव - राजा व सेवक ह्यांच्या संबंधासारखे - आवयोः - उभयतांचे - अन्यथा - ह्याशिवाय दुसरे - अर्थः न (अस्ति) - प्रयोजन नाही. ॥ ६ ॥

वरदर्षभ - हे वरदोत्तमा - ईश - ईश्वरा - त्वं - तू - मे - मला - कामान् वरान् - इच्छित वर - यदि - जर - रासि - देशील - तु - तर - भवतः - तुझ्याजवळ - हृदि - हृदयात - कामानां - कामांचा - असंरोहं - अंकुर न उद्भवणे हा - वरं - वर - वृणे - मी मागतो. ॥ ७ ॥

यस्य - ज्या कामाच्या - जन्मना - उत्पत्तीने - इंद्रियाणि - इंद्रिये - मनः - मन - प्राणः - प्राण - आत्मा - देह - धर्मः - धर्म - धृतिः - धैर्य - मतिः - बुद्धि - ह्लीः - लज्जा - श्रीः - संपत्ति - तेजः - तेज - स्मृतिः - स्मृति - सत्यं च - आणि सत्य - नश्यंति - नाश पावतात. ॥ ८ ॥

पुंडरीकाक्ष - हे कमलनयना - यदा - ज्यावेळी - मानवः - मनुष्य - मनसि - मनात - स्थितान् - राहणार्‍या - कामान् - वासनांना - विमुंचति - सोडून देतो - तर्हि एव - तेव्हाच - भगवत्त्वाय - भगवत्स्वरूपाला - कल्पते - तो प्राप्त होतो. ॥ ९ ॥

भगवते - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - पुरुषाय - पुराणपुरुष - महात्मने - जगदात्मा - ब्रह्मणे - परब्रह्म - परमात्मने - परमात्मा अशा - अद्भुतसिंहाय - विलक्षण सिंहरूप धारण करणार्‍या - हरये - भक्तांची संकटे हरण करणार्‍या - तुभ्यं - तुला - नमः - नमस्कार असो. ॥ १० ॥

ये - जे - मे - माझे - भवद्विधाः - तुझ्यासारखे - एकान्तिनः (भक्ताः सन्ति) - निस्सीम भक्त आहेत - ते-ते (जातु) - कधीही - इह - ह्या लोकी - च - आणि - अमुत्र - परलोकी - मयि - माझ्यापासून - आशिषः - उपभोग - न आशासते - मागत नाहीत - अथ अपि - तथापि - एतत् मन्वंतरं - ह्या मन्वंतरापर्यंत - अत्र - येथे - दैत्येश्वराणां - दैत्य राजांच्या - भोगान् - ऐश्वर्यांना - अनुभुंक्ष्व - भोग. ॥ ११ ॥

प्रियाः - आवडत्या अशा - मदीयाः - मत्संबंधी - कथाः - कथा - जुषमाणः - सेवन करणारा - त्वं - तू - सर्वेषु भूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - संतं - वास करणार्‍या - एकं - अद्वितीय - ईशं - ऐश्वर्यवान अशा - अधियज्ञं - यज्ञाधिपती-पती अशा - मां - मला - आत्मनि - अंतःकरणात - आवेश्य - स्थापन करून - च - आणि - योगेन - मला अर्पण करण्याच्या योगाने - कर्मं - कर्म - हिन्वन् - सोडीत - यजस्व - पूजा कर. ॥ १२ ॥

भोगेन - उपभोगाने - पुण्यं - पुण्याला - कुशलेन - पुण्याचरणाने - पापं - पापाला - कालजवेन - कालगतीने - कलेवरं - देहाला - हित्वा - सोडून - विशुद्धां - अत्यंत निर्मळ अशा - सुरलोकगीतां - देवलोकांनी गाइलेल्या - कीर्तिं - कीर्तीला - विताय - पसरून - मुक्तबंधः - सर्व बंधनांपासून मुक्त झालेला - मां - मत्स्वरूपी - एष्यसि - प्राप्त होशील. ॥ १३ ॥

यः - जो - नरः - मनुष्य - त्वां - तुझे - च - आणि - मां - माझे - च - आणि - इदं - ह्या स्तवाचे - स्मरन् - स्मरण करीत - काले - वेळोवेळी - मह्यं - माझ्यासाठी - त्वया - तुझ्याकडून - गीतं इदं (स्तोत्रं) - गाईलेले हे स्तोत्र - कीर्तयेत् - पठण करील - (सः) कर्मबंधात् - तो कर्मबंधापासून - विमुच्यते - मुक्त होईल. ॥ १४ ॥

महेश्वर - हे परमेश्वरा - वरदेशात् - वर देणार्‍यांमध्ये श्रेष्ठ अशा - ते - तुझ्यापासून - एतत् वरं - हा वर - यत् - की - वरये - मी मागतो - ऐश्वरं - ईश्वरी - तेजः - तेज - अविद्वान् - न जाणणारा - विद्धामर्षाशयः - ज्याचे मन क्रोधाने व्याप्त झाले आहे असा - साक्षात् - प्रत्यक्ष - सर्वलोकगुरुं - सर्व लोकांचा गुरु अशा - प्रभुं - ईश्वराविषयी - भ्रातृहा - भावाला मारणारा - इति - असा - मृषादृष्टिः - मिथ्या ग्रह करणारा - त्वद्भक्ते - तुझा भक्त अशा - मयि - माझ्या ठिकाणी - अघवान् - छळ करणारा - मे - माझा - पिता - बाप - त्वां - तुला - अनिंदत् - निंदिता झाला. ॥ १५-१६ ॥

तस्मात् - त्या - दुरंतात् - अपरंपार अशा - दुस्तरात् अघात् - दुस्तर पापापासून - मे - माझा - पिता - पिता - पूयेत - पवित्र होवो - कृपणवत्सल - हे दीनदयाळा - ते - तुझ्या - अपांगसंदृष्टः सः - कटाक्षांनी पाहिलेला तो - तदा - तेव्हाच - पूतः - पवित्र झाला. ॥ १७ ॥

अनघ - हे निष्पाप - साधो - साधो प्रल्हादा - ते - तुझा - पिता - पिता - त्रिःसप्तभिः - एकवीस - पितृभिः सह - पूर्वजांसह - पूतः - पवित्र झाला आहे - यत् - कारण - भवान् - तू - अस्य - ह्याच्या - गृहे - घरी - वै - खरोखर - कुलपावनः - कुळाला पवित्र करणारा असा - जातः - उत्पन्न झालास. ॥ १८ ॥

यत्रयत्र च - आणि जेथेजेथे - प्रशांताः - अत्यंत शांत - समदर्शिनः - समदृष्टि ठेवणारे - साधवः - सत्पुरुष - समुदाचाराः - ज्यांचा आचार चांगला आहे असे - मद्भक्ताः (सन्ति) - माझे भक्त होतात - ते - ते - कीकटाः अपि - कीकट देश सुद्धा - पूयंति - पवित्र होतात. ॥ १९ ॥

दैत्येंद्र - हे दैत्यराजा - मद्भावेन - माझ्या भक्तिमुळे - गतस्पृहाः - निरिच्छ झालेले भक्त - सर्वात्मना - कायावाचामनाने - उच्चावचेषु - उच्च व नीच अशा - भूतग्रामेषु - भूतसमुदायांतील - किंचन - कोणाचीही - न हिंसन्ति - हिंसा करीत नाहीत. ॥ २० ॥

लोके - जगात - त्वां - तुझ्या - अनुव्रताः - अनुरोधाने वागणारे - पुरुषाः - पुरुष - मद्भक्ताः - माझे भक्त - भवंति - होतील - भवान् - तू - मे - माझ्या - सर्वेषां - संपूर्ण - भक्तानां - भक्तांना - प्रतिरूपधृक् (अस्ति) - उपमा देण्याजोगा आहेस ॥ २१ ॥

अंग - बा प्रल्हादा - त्वं - तू - सर्वशः - सर्वतोपरि - पूतस्य - पवित्र झालेल्या अशा - पितुः - पित्याची - प्रेतकार्याणि - और्ध्वदेहिक कार्ये - कुरु - कर - सुप्रजाः - तुझ्यासारखा सत्पुत्र ज्याच्या पोटी उत्पन्न झाला असा तुझा पिता - मदङ्गस्पर्शनेन - माझ्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे - लोकान् - चांगल्या लोकांना - यास्यति - जाईल ॥ २२ ॥

तात - बाळा प्रल्हादा - पित्र्यं - पित्याच्या - स्थानं - सिंहासनावर - आतिष्ठ - बैस - च - आणि - मयि - माझ्याठिकाणी - मनः - अंतःकरण - आवेश्य - ठेवून - मत्परः - माझ्यावर निष्ठा ठेवणारा - कर्माणि - कर्मे - कुरु - कर ॥ २३ ॥

राजन् - हे राजा - द्विजोत्तमैः - श्रेष्ठ ब्राह्मणांनी - अभिषिक्तः - राज्याभिषेक केलेला - प्रल्हादः अपि - प्रल्हादही - भगवान् - भगवान - यथा - जसे - आह - सांगता झाला - तथा - त्याप्रमाणे - पितुः - बापाचे - यत् - जे - सांपरायिकं (कर्तव्यं) - उत्तरकार्य करणे असते - (तत्) चक्रे - ते करिता झाला ॥ २४ ॥

ब्रह्मा - ब्रह्मदेव - देवादिभिः - देवादिकांनी - वृतः - वेष्टिलेला - नरहरिं - नृसिंहरूपधारी - हरिं - परमेश्वराला - प्रसादसुमुखं - प्रसादाविषयी उद्युक्त झालेला असे - दृष्टवा - पाहून - पवित्राभिः - पवित्र अशा - वाग्भिः - शब्दांनी - (तं) स्तुत्वा - त्याची स्तुती करून - प्राह - बोलला. ॥ २५ ॥

देवदेव - हे देवाधिदेवा - अखिलाध्यक्ष - हे सर्वांच्या अध्यक्षा - भूतभावनपूर्वज - हे सृष्टि करणार्‍या प्रजापतीच्या पूर्वजा - दिष्ट्या - सुदैवाने - ते - तुझ्याकडून - लोकस्रंतापनः - लोकांना त्रास देणारा - पापः - पापी - असुरः - दैत्य - हतः - मारिला गेला ॥ २६ ॥

यः - जो - असौ - हा - मत्तः - माझ्यापासून - लब्धवरः - वर प्राप्त झाला आहे ज्याला असा - मम सृष्टिभिः - मी उत्पन्न केलेल्या प्राण्यांकडून - न वध्यः - मारिला जाण्यास अशक्य झालेला - तपोयोगबलोन्नद्धः - तपश्चर्या आणि योग यांच्या सामर्थ्याने उन्मत्त झालेला दैत्य - समस्तनिगमान् - सर्व वैदिक धर्मांना - अहन् - बुडविता झाला ॥ २७ ॥

दिष्ट्या - सुदैवाने - अस्य - ह्या दैत्याचा - तनयः - मुलगा - साधुः - सज्जन - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - अर्भकः - बालक प्रल्हाद - त्वया - तुझाकडून - मृत्योः - मृत्यूपासून - विमोचितः - सोडविला गेला - अधुना - आता - त्वां - तुजप्रत - समितः - प्राप्त झाला ॥ २८ ॥

भगवन् - हे भगवंता - ते - तुझे - एतत् - हे - रूपं - रूप - ध्यायतः - चिंतणार्‍या - प्रयतात्मनः - निग्रह केला आहे मनाचा ज्याने अशा पुरुषाला - सर्वतः - चोहोबाजूंनी - जिघांसतः - घात करू इच्छिणार्‍या - मृत्योः अपि - मृत्याच्याहि - संत्रासात् - भीतीपासून - गोप्तृ (भवेत) - राखणारे होईल ॥ २९ ॥

पद्मसंभव - हे ब्रह्मदेवा - ते - तुझ्याकडून - एवं - याप्रमाणे - क्रूरनिसर्गाणां - स्वभावतः क्रूर अशा - असुराणां (दत्तः) - दैत्यांना दिलेला - वरः - वर - मा प्रदेयः - दिला जाऊ नये - वरः - वर - यथा - जसे - अहीनां - सर्पांना - अमृतं (तथा अस्ति) - दूध त्याप्रमाणे होय ॥ ३० ॥

राजन् - हे राजा - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांना - अदृश्यः - न दिसणारा - परमेष्ठिना - ब्रह्मदेवाने - पूजितः - पूजिलेला - भगवान - ऐश्वर्यसंपन्न - हरिः - नरहरि - इति - असे - उक्त्वा - बोलून - तत्र एव - तेथेच - अंतर्दधे - गुप्त झाला ॥ ३१ ॥

ततः - नंतर - प्रल्हादः - प्रल्हाद - भगवत्कलाः - भगवंताचे अंश अशा - परमेष्ठिनं - ब्रह्मदेवाला - भवं - शंकराला - प्रजापतीन् - प्रजापतींना - (देवान्) च - आणि देवांना - संपूज्य - चांगला मान देऊन - शिरसा - मस्तकाने - ववंदे - वंदन करिता झाला ॥ ३२ ॥

ततः - तदनंतर - काव्यादिभिः - शुक्रादिक - मुनिभिः सार्धं - ऋषींसह - कमलासनः - ब्रह्मदेव - प्रल्हादं - प्रल्हादाला - दैत्यांना - दैत्यांचा - च - आणि - दानवानां - दानवांचा - पतिं - अधिपती - अकरोत् - करिता झाला. ॥ ३३ ॥

राजन् - हे धर्मराजा - ततः - नंतर - (प्रल्हादेन) प्रतिपूजिताः - प्रल्हादाने पूजिलेले - ब्रह्माद्याः - ब्रह्मादिक - देवाः - देव - (तं) प्रतिनंद्यः - प्रल्हादाचे अभिनंदन करून - परमाशिषः प्रयुज्य - उत्तम आशीर्वाद देऊन - स्वधामनि - आपल्या स्थानी - ययुः - गेले ॥ ३४ ॥

एवं - अशा प्रकारे - तौ - ते दोघे - विष्णोः - विष्णूचे - पार्षदौ - सेवक - दितेः - दितीच्या - पुत्रत्वं - पुत्रपणाला - प्रापितौ - पोचविले गेले - तौ - ते दोघे - हृदि - हृदयात - स्थितेन - राहिलेल्या - हरिणा - हरीकडून - वैरभावेन - वैरभावास्तव - हतौ - मारिले गेले. ॥ ३५ ॥

च - आणि - पुनः - पुनः - विप्रशापेन - ब्राह्मणाच्या शापाने - तौ - ते दोघे - कुंभकर्णदशग्रीवौ - कुंभकर्ण व रावण या नावाचे दोन - राक्षसौ बभूवतुः - राक्षस झाले - तौ - ते दोघे - रामविक्रमैः - रामाच्या पराक्रमाने - हतौ - मारिले गेले. ॥ ३६ ॥

रामसायकैः - रामाच्या बाणांनी - निर्भिन्नहृदयौ - विदीर्ण झाले आहे हृदय ज्यांचे असे - युधि शयानौ - रणभूमीवर पडलेले - यथा प्राक्तनजन्मनि - जसे पूर्वजन्मी - (तथा) तच्चितौ - तसे परमेश्वराकडे आहे चित्त ज्यांचे असे झालेले - देहं - देह - जहतुः - सोडिते झाले. ॥ ३७ ॥

अथ - नंतर - तौ - ते दोघे - पुनः - पुनः - इह - या जन्मी - शिशुपालकरूषजौ - शिशुपाल व दंतवक्त्र - जातौ - झाले - हरौ - श्रीकृष्णाविषयी - वैरानुबंधेन - नित्य वैर धारण केल्याने - पश्यतः ते - तू पाहत असता - (तौ तं) समीयतुः - ते दोघे कृष्णरूपात मिळून गेले. ॥ ३८ ॥

यथा - ज्याप्रमाणे - कीटः - कीडा - पेशस्कृतः (ध्यानेन यथा तद्रूपः भवति तथा) - कुंभारिणीच्या ध्यानाने तद्रूप होतो त्याप्रमाणे - कृष्णवैरिणः - श्रीकृष्णाचा द्वेष करणारे - राजानः - राजे - तदात्मानः - कृष्णस्वरूप झालेले - यत् - जे - पूर्वकृतं - पूर्वी केलेले - एनः - पाप - (तत्) तु अन्ते - ते तर अंतकाळी - जहुः - सोडिते झाले. ॥ ३९ ॥

यथायथा - ज्याज्याप्रमाणे - अभिदा - भेददृष्टिरहित अशा - परमया - श्रेष्ठ - भक्त्या - भक्तीने - भगवतः (सात्म्यं यान्ति) - भगवंताच्या सायुज्याला प्राप्त होतात - तथा - त्याप्रमाणे - चैद्यादयः - शिशुपाल आदिकरून - नृपाः - राजे - तच्चिंतया - परमेश्वराच्या चिंतनाने - हरेः - श्रीहरीच्या - सात्म्यं - सायुज्यमुक्तीस - ययुः - प्राप्त झाले. ॥ ४० ॥

यत् - जे - मां - मला - त्वं - तू - परिपृष्टवान् - विचारिता झालास - एतत् - हे - सर्वं - सर्व - ते - तुला - (मया) आख्यातं - माझ्याकडून सांगितले गेले - द्विषां - शत्रु अशा - दमघोषसुतादीनां - शिशुपालादिकांचे - हरेः - परमेश्वराशी - सात्म्यं अपि (आख्यातम्) - सारूप्यही सांगितले. ॥ ४१ ॥

एषा - अशी ही - ब्रह्मण्यदेवस्य - ब्रह्मज्ञानसंपन्न अशा - च - आणि - महात्मनः - उदार अंतःकरणाच्या - कृष्णस्य - श्रीकृष्णाची - पुण्या अवतारकथा (अस्ति) - पुण्यकारक अशी अवतारसंबंधी कथा आहे - यत्र - जीमध्ये - आदिदैत्ययोः - आदिदैत्य जे हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु यांचा - वधः (वर्णितः) - वध वर्णिला आहे. ॥ ४२ ॥

महाभागवतस्य - परम भगवद्भक्त अशा - प्रल्हादस्य - प्रल्हादाचे - अनुचरितं - चरित्र - च - आणि - भक्तिः - भक्ति - ज्ञानं - ज्ञान - च - आणि - विरक्तिः - वैराग्य - च - आणि - अस्य - ह्या - सर्गस्थित्यप्ययेशस्य - उत्पत्ति, स्थिति व पालन करणार्‍या - हरेः - परमात्म्याचे - याथात्म्यं - वास्तविक स्वरूप - गुणकर्मानुवर्णनं - गुण व लीला यांचे वर्णन - कालेन - कालगतीमुळे - परावरेषां - उच्च-नीच अशा - स्थानानां - स्थानांची - महान् व्यत्ययः - मोठी उलटापालट - च - आणि - येन - ज्या योगाने - भगवन् - परमेश्वर - गम्यते - प्राप्त होतो; ॥ ४३-४४ ॥

(सः) भागवतानां - तो भगवद्भक्ताचा - धर्मः - धर्म - (इति एतत्) आध्यत्मिकं (ज्ञानं) - असे हे आत्मानात्मविचारासंबंधी ज्ञान - अस्मिन् आख्याने - या आख्यांनात - अशेषतः - संपूर्णरीतीने - समाम्नातं - सांगितले आहे. ॥ ४५ ॥

यः - जो - एतत् - हे - विष्णोः - विष्णुच्या - वीर्योपबृहितम् - पराक्रमांनी भरलेले - पुण्यं - पुण्यकारक - आख्यानं - आख्यान - श्रद्धया - श्रद्धेने - श्रुत्वा - श्रवण करून - कीर्तयेत् - वर्णन करील - कर्मपाशैः विमुच्यते - कर्मबंधनापासून मुक्त होईल. ॥ ४६ ॥

एतत् - याप्रमाणे - यः - जो - प्रयतः - इंद्रियनिग्रही पुरुष - आदिपुरुषस्य - पुराणपुरुषाच्या - मृगेंद्रलीला - सिंहरूप घेऊन केलेली लीला - दैत्येंद्रयूथप वधं - दैत्यराज व त्याचा सेनापति याचा वध - च - आणि - सतां - सत्पुरुषांमध्ये - प्रवरस्य - श्रेष्ठ अशा - दैत्यात्मजस्य - प्रल्हादाचे - पुण्यं - पुण्यकारक - अनुभावं - माहात्म्य - श्रुत्वा - श्रवण करून - पठेत - पठण करील - अकुतोभयं - कोणापासूनही भय नाही अशा - लोकं - लोकाला - एति - जाईल. ॥ ४७ ॥

बत - खरोखर - नृलोके - मनुष्यलोकांमध्ये - यूयं - तुम्ही पांडव - भूरिभागाः (स्थ) - अत्यंत भाग्यवान आहात - येषां गृहान् - ज्यांच्या घरी - लोकं - लोकांना - पुनानाः - पवित्र करणारे - मुनयः - ऋषि - मनुष्यलिंगं - मनुष्यरूप धारण केलेले - गूढं - गुप्त असे - परं - श्रेष्ठ - ब्रह्म - ब्रह्म - आवसति - राहत आहे - इति - या कारणास्तव - अभियंति - चोहोकडून येतात. ॥ ४८ ॥

वा - अथवा - सः - तो - अयं - हा - वः - तुमचा - प्रियः - आवडता - सुहृत् - मित्र - मातुलेयः - मामेभाऊ - आत्मा - जिवलग - अर्हणीयः - पूज्य - विधिकृत् - आज्ञाधारक - च - आणि - गुरुः (कृष्णः) - उपदेश कर्ता असा श्रीकृष्ण - खलु - खरोखर - महद्विमृग्य - मोठमोठे साधु शोधित असलेल्या - कैवल्यनिर्वाणसुखानुभूति ब्रह्म (अस्ति) - कैवल्यरूप मोक्षसुखाचा अनुभव हे ज्याचे स्वरूप आहे असे परब्रह्म होय. ॥ ४९ ॥

यस्य - ज्याचे - रूपं - रूप - साक्षात् - प्रत्यक्ष - भवपद्मजादिभिः - शंकर व ब्रह्मदेव इत्यादिकांनीही - धिया - बुद्धिच्या योगाने - वस्तुतया - वास्तविक रीतीने - न उपवर्णितं - वर्णिता आले नाही - सः - तो - एषः - हा - मौनेन - मौनव्रताने - भक्त्योपशमेन - भक्ति आणि उपशम ह्या साधनांनी - पूजितः - पूजिलेला - सात्वतां पतिः - यादवांचा पती श्रीकृष्ण - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥ ५० ॥

राजन् - हे धर्मराजा - सः - तो - एषः - हा - भगवान् - परमेश्वर - पुरा - पूर्वी - अनंतमायिना - महामायावी अशा - मयेन - मयासुराने - देवस्य - प्रकाशमान अशा - रुद्रस्य - शंकराच्या - विहतं - नष्ट केलेल्या - यशः - कीर्तीला - व्यतनोत् - वाढविता झाला. ॥ ५१ ॥

मयः - मयासुर - कस्मिन् - कोणत्या - कर्मणि - कृत्यांत - जगदीशितुः - जगाचा ईश अशा - देवस्य (यशः) - शंकराची कीर्ति - अहन् - नष्ट करिता झाला - च - आणि - यथा - ज्यारीतीने - अनेन कृष्णेन - ह्या कृष्णाने - (तस्य) कीर्तिः - त्या शंकराची कीर्ति - उपचिता - वाढविली - कथ्यतां - सांगितले जावे. ॥ ५२ ॥

अनेन - ह्या श्रीकृष्णाने - उपबृंहितैः - उत्कर्षास पोचविलेल्या - देवैः - देवांनी - युधि - युद्धात - निर्जिताः - पराजित केलेले - असुराः - दैत्य - मायिनां - मायावी कलेचा - परमाचार्यं - परम गुरु अशा - मयं - मयासुराला - शरणं आययुः - शरण गेले. ॥ ५३ ॥

सः - तो - प्रभुः - समर्थ मयासुर - हैमीरौप्यायसीः - सुवर्ण, रुपे व लोखंडे यांनी बनविलेली - दुर्लक्षापायसंयोगाः - ज्याचे जाणे व येणे कळत नाही अशी - दुर्वितर्क्यपरिच्छदाः - ज्यातील सामग्री जाणणे कठीण आहे अशी - तिस्रः - तीन - पुरः - नगरे - निर्माय तेभ्यो ददौ - निर्माण करून त्या दैत्यांना देता झाला. ॥ ५४ ॥

नृप - हे धर्मराजा - पूर्ववैरं - पूर्वीचे वैर - स्मरंतः - आठवणारे - ते - ते - असुर सेनान्यः - दैत्यांचे सेनापति - अलक्षिताः - कोणाकडून पाहिले न गेलेले - ताभिः - त्या नगरीच्या साहाय्याने - सेश्वरान् - लोकपालांसह - त्रीन् - तिन्ही - लोकान् - लोकांना - नाशयांचक्रुः - नष्ट करिते झाले. ॥ ५५ ॥

ततः - नंतर - ते - ते - सेश्वराः - अधीपतींसह - लोकाः - लोक - ईश्वरं उपासाद्य - शंकराजवळ जाऊन - विभो - हे प्रभो - देव - शंकरा - त्रिपुरालयैः - तीन पुरात राहणार्‍या दैत्यांनी - विनष्टान् - नष्ट केलेल्या - तावकान् - तुझे म्हणविणार्‍या - नः - आम्हाला - त्राहि - राख. ॥ ५६ ॥

अथ - तेव्हा - अनुगृह्य - कृपा करून - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - विभुः - शंकर - मा भैष्ट - भिऊ नका - इति - असे - सुरान् - देवांना - धनुषि - धनुष्यावर - शरं - बाण - संधाय - जोडून - पुरेषु - पुरांवर - अस्रं - अस्र - व्यमुञ्चत - सोडिता झाला. ॥ ५७ ॥

यथा - जसे - सूर्यमंडलात् - सूर्यमंडलापासून - मयूखसंदोहाः (तथा) - किरणांचे समुदाय त्याप्रमाणे - ततः - त्या बाणापासून - अग्निवर्णाः - अग्नीसारखे - इषवः - बाण - उत्पेतुः - बाहेर पडले - यत् - ज्यांमुळे - पुरः - नगरे - न अदृश्यन्त - दिसेनाशी झाली. ॥ ५८ ॥

तैः - त्या बाणांनी - स्पृष्टाः - टोचिलेले - सर्वे - सगळे - पुरौकसः - नगरात राहणारे दैत्य - व्यसवः - गतप्राण झालेले - निपेतुः स्म - खाली पडले - महायोगी - महामायावी - मयः - मयासुर - तान् - त्या मेलेल्या दैत्यांना - आनीय - आणून - कूपरसे - विहीरीतील अमृतरसात - अक्षिपत् - टाकिता झाला. ॥ ५९ ॥

सिद्धामृतरसस्पृष्टाः - सिद्ध अमृतरसाचा स्पर्श झालेले - वज्रसाराः - वज्राप्रमाणे बळकट - महौजसः (ते दैत्याः) - महाबलाढय असे ते दैत्य - मेघदलनाः - मेघाला फोडून काढणार्‍या - वैद्युताः - विजेपासून उत्पन्न होणार्‍या - वह्नयः इव - अग्नीप्रमाणे - उत्तस्थुः - उठले. ॥ ६० ॥

तदा - तेव्हा - अयं - हा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्ययुक्त - विष्णुः - विष्णु - भग्नसंकल्पं - संकल्प भग्न झाला आहे ज्याचा अशा - विमनस्कं - दुःखी मनाच्या - वृषध्वजं - शंकराला - विलोक्य - पाहून - तत्र - त्या ठिकाणी - उपायं - उपाय - अकल्पयत् - योजिता झाला. ॥ ६१ ॥

तदा - तेव्हा - ब्रह्मा - ब्रह्मदेव - वत्सः - वत्स - आसीत् - झाला - हि - आणि - अयं - हा - विष्णुः - विष्णु - स्वयं - स्वतः - गौः आसीत् - गाय झाला - काले - भर दोन प्रहरी - त्रिपुरं - तीन नगरांत - प्रविश्य - शिरून - रसकूपामृतं - अमृताच्या विहीरीतील सर्व अमृत - पपौ - प्राशन करिता झाला. ॥ ६२ ॥

पश्यन्तः अपि - पाहत असताही - विमोहिताः - मोहित झालेले - ते - ते - असुराः - दैत्य - न न्यषेधन् - निषेध करिते झाले नाहीत - तत् - ते - विज्ञाय - जाणून - स्वयं - स्वतः - विशोकः - शोकरहित असा - च - आणि - तां - त्या - दैवगतिं - दैवगतीला - स्मरन् - स्मरणारा - महायोगी - महामायावी मयासुर - शोकार्तान् - शोकाने पीडित झालेल्या - रसपालान् - अमृतरसाच्या रक्षकांना - इदं - हे - जगौः - म्हणाला. ॥ ६३ ॥

देवः - देव - असुरः - दैत्य - वा - किंवा - अन्यः - दुसरा - कश्चन - कोणीही - नरः - मनुष्य - इह - ह्या सृष्टीत - आत्मनः - स्वतःचे - अन्यस्य - दुसर्‍याचे - वा - किंवा - द्वयोः - दोघांचे - दैवेन - दैवाने - दिष्टं - सिद्ध केलेले फळ - अपोहितुं - दूर करण्यास - ईश्वरः - समर्थ - न अस्ति - नाही. ॥ ६४ ॥

अथ - नंतर - असौ - हा श्रीकृष्ण - स्वाभिः - स्वतःच्या - धर्मज्ञानविरक्त्यृद्धितपोविद्याक्रियादिभिः - धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, तप, विद्या व क्रिया इत्यादि - शंभोः - शंकराला - रथं - रथ - सूतं - सारथी - ध्वजं - ध्वज - वाहान् - घोडे - धनुः - धनुष्य - वर्म - कवच - शरादि - बाण इत्यादि सामग्री - (इति) यत् - असे जे - प्राधानिकं - युद्धाचे साहित्य - व्यधान् - सिद्ध करून देता झाला. ॥ ६५ ॥

नृप - हे धर्मराजा - अथ - मग - ईश्वरः - ऐश्वर्यवान - हरः - शंकर - सन्नद्धः - सज्ज होत्साता - रथं आस्थाय - रथात बसून - शरं - बाण - च - आणि - धनुः - धनुष्य - उपाददे - ग्रहण करिता झाला - अभिजिति - अभिजित् नावाच्या - मुहूर्ते - मुहूर्तावर - धनुषि - धनुष्यावर - शरं - बाण - संधाय - जोडून - तेन - त्या बाणाने - दुर्भेद्याः - फोडून टाकण्यास कठीण अशा - त्रिपुरः - तिन्ही नगरांना - ददाह - जाळिता झाला. ॥ ६६ ॥

दिवि - आकाशात - दुंदुभयः - दुंदुभी - नेदुः - वाजू लागल्या - विमानशतसंकुलाः - शेकडो विमाने जमली आहेत ज्यांची असे - देवर्षिपितृसिद्धेशाः - देव, ऋषी, पितर व सिद्ध - जय इति - जय अशा शब्दाने - कुसुमोत्करैः - फुलांच्या राशींनी - अवाकिरन् - वर्षाव करिते झाले - हृष्टाः - आनंदित झालेले - अप्सरोगणाः - अप्सरांचे समुदाय - जगुः - गाते झाले - च - आणि - ननृतुः - नाचते झाले. ॥ ६७ ॥

नृप - हे राजा - एवं - याप्रमाणे - पुरहा - पुरांचा संहार करणारा - भगवान् - शंकर - तिस्रः - तीन्ही - पुरः - नगरांना - दग्ध्वा - जाळून - ब्रह्मादिभिः - ब्रह्मादिक देवांनी - स्तूयमानः - स्तविलेला असा - स्वधाम - स्वलोकी - प्रत्यपद्यत - गेला. ॥ ६८ ॥

स्वमायया - आपल्या मायेने - नृलोकं - मनुष्याच्या कृतीला - विडम्बमानस्य - अनुसरणार्‍या - अस्य - ह्या - जगद्‌गुरो आत्मनः - जगत्‌गुरु परमात्मा अशा - हरेः - श्रीकृष्णाचे - एवंविधानि - अशा प्रकारचे - लोकान् - लोकांना - पुनानानि - पवित्र करणारे - वीर्याणि - पराक्रम - ऋषिभिः - ऋषींनी - गीतानि (सन्ति) - गाइलेले आहेत - अपरं - आणखी दुसरे - किं - काय - वदामि - मी सांगू. ॥ ६९ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय दहावा समाप्त

GO TOP