श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ९ वा - अन्वयार्थ

प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहांची स्तुती -

एवं - याप्रमाणे - ब्रह्मरुद्रपुरःसराः - ब्रह्मदेव आणि रुद्र पुढे आहेत ज्यांच्या असे - सर्वे - सर्व - सुरादयः - देवादिक - मन्युसंरंभं - क्रोधामुळे आवेशयुक्त झालेल्या - सुदुरासदं - अगदी अजिंक्य अशा नरसिंहाच्या - उपैतुं - जवळ जाण्यास - न अशकन् - समर्थ झाले नाहीत. ॥ १ ॥

देवैः - देवांनी - प्रेषिता - पाठविलेली - साक्षात् - प्रत्यक्ष - सा श्रीः - ती लक्ष्मी - तत् - ते - महत् - मोठे - अद्भुतं रूपं - चमत्कारिक रूप - दृष्टा - पाहून - तस्य अदृष्टाश्रुतपूर्वत्वात् - असे त्याचे रूप पूर्वी कधी पाहिलेले व ऐकलेले नसल्यामुळे - शङ्‌किता - भ्यालेली - न उपेयाय - जवळ जाईना. ॥ २ ॥

ब्रह्मा - ब्रह्मदेव - अंतिके - जवळ - अवस्थितं - असलेल्या - प्रल्हादं - प्रल्हादाला - प्रेषयामास (उवाच च) - पाठविता झाला व म्हणाला - तात - बा प्रल्हादा - स्वपित्रे - आपल्या बापावर - कुपितं - रागावलेल्या - प्रभुं - प्रभूच्या - उपेहि - जवळ जा - (तं) प्रशमय - त्याला शांत कर. ॥ ३ ॥

राजन् - हे राजा - तथा इति - बरे आहे असे म्हणून - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - अर्भकः - बालक प्रल्हाद - शनकैः - हळूहळू - उपेत्य - जवळ जाऊन - विघृतांजलिः - हात जोडलेला असा - भुवि - पृथ्वीवर - कायेन - शरीराने - ननाम - नमस्कार घालिता झाला. ॥ ४ ॥

देवः - देव - स्वपादमूले पतितं - आपल्या पायापाशी पडलेल्या - तं - त्या - अर्भकं - प्रल्हाद बाळाला - विलोक्य - पाहून - कृपया - कृपेने - परिप्लुतः नृसिंहः - उचंबळलेला नृसिंह - (तं) उत्थाप्य - त्याला उठवून - तच्छीर्ष्णि - त्याच्या मस्तकावर - कालाहिवित्रस्तधियां - काळसर्पाला भ्याल्या आहेत बुद्धि ज्यांच्या अशांना - कृताभयं - अभय देणारे - करांबुजं - आपले करकमळ - अदधात् - ठेविता झाला. ॥ ५ ॥

तत्करस्पर्शधुताखिलाशुभः - त्याच्या हस्तस्पर्शाने सर्व पापे धुवून गेली आहेत ज्याची असा - सपदि - तत्काळ - अभिव्यक्तपरात्मदर्शनः - प्रत्यक्ष परब्रह्माचे ज्ञान झालेला - हृष्यत्तनुः - रोमांचयुक्त झाले आहे शरीर ज्याचे असा - क्लिन्नहृत् - प्रेमाने ओले झाले आहे हृदय ज्याचे असा - अश्रुलोचनः - डोळ्यांतून अश्रु वाहात आहेत ज्याच्या असा - सः - तो प्रल्हाद - निर्वृतः - सुखी झालेला - हृदि - हृदयाच्या ठिकाणी - तत्पादपद्मं - त्याचे चरणकमळ - दघौ - धारण करिता झाला. ॥ ६ ॥

सुसमाहितः - पूर्णपणे समाधान पावलेला - तन्न्यस्तहृदयेक्षणः (प्रल्हादः) - ज्याने मन व डोळे परमेश्वराच्या ठिकाणी लाविले आहेत असा तो प्रल्हाद - हरिं - नरहरीला - एकाग्रमनसा - एकाग्र अंतःकरणाने - प्रेमगद्‌गदया - प्रेमामुळे सद्‌गदित झालेल्या - वाचा - वाणीने - अस्तौषीत् - स्तविता झाला. ॥ ७ ॥

सत्वैतानमतयः - ज्यांची मने शुद्ध सत्त्वगुणमय झाली आहेत असे - ब्रह्मादयः - ब्रह्मादिके - सुरगणाः - देवगण - अथ - तसेच - मुनयः - ऋषि - सिद्धाः - सिद्ध - वचसां - शब्दांच्या - प्रवाहैः - ओघांनी - पुरुगुणैः - विपुल गुणांनी - अधुना अपि - अजूनही - (यं) आराधितुं - ज्याची आराधना करण्यास - न पिप्रुः - समर्थ झाले नाहीत - सः - तो - हरिः - हरि - उग्रजातेः मे - क्रूर स्वभावाच्या आसुरी योनीत जन्मलेल्या माझ्या योगाने - तोष्टुं - संतुष्ट होण्यास - अर्हति किं - योग्य होईल काय. ॥ ८ ॥

धनाभिजनरूपतपःश्रुतौजस्तेजः - द्रव्य, सत्कुली जन्म, सौंदर्य, तप, पांडित्य, इंद्रियपटुता, कांति, - प्रभावबलपौरुषबुद्धियोगाः - पराक्रम, बल, उद्योग, बुद्धि व अष्टांगयोग हे - परस्य पुंसः - श्रेष्ठ पुरुषाच्या - आराधनाय - संतोषाला - न हि भवंति - कारणीभूत होत नाहीत - इति मन्ये - असे मी मानितो - भगवन् - हे परमेश्वरा - भक्त्या (एव) - भक्तीनेच - गजयूथपाय - गजेंद्रावर - तुतोष - प्रसन्न झाला. ॥ ९ ॥

अरविंदनाभपादारविंदविमुखात् - परमेश्वराच्या चरणकमली विमुख अशा - द्विषट्‌गुणयुतात् - बारा गुणांनी युक्त अशा - विप्रात् - ब्राह्मणांहून - तदर्पितमनोवचनेहितार्थप्राणं - परमेश्वराला ज्याने आपले मन, भाषण, व्यापार, अर्थ व प्राण अर्पण केले आहेत अशा - श्वपचं - चांडाळाला - वरिष्ठं - श्रेष्ठ - मन्ये - मानितो - (तादृशः) सः - तसला चांडाळ - कुलं - कुळाला - पुनाति - पवित्र करितो - तु - पण - भूरिमानः (ब्राहणः) - गर्विष्ठ ब्राह्मण - न पुनाति - पवित्र करीत नाही. ॥ १० ॥

निजलाभपूर्णः - आत्मानंदलाभाने पूर्ण - च - आणि - करुणः - कृपाळू - अयं - हा - प्रभुः - परमेश्वर - अविदुषः - अज्ञानी - जनात् - लोकांपासून - आत्मनः - स्वतःकरिता - मानं - पूजा - न एव वृणीते - मागतच नाही - जनः - लोक - भगवते - परमेश्वराला - यत् यत् - जी जी - मानं - पूजा - विदधीत - करितो - तत् - ती - आत्मने (भवति) - आत्म्याला होते - यथा - ज्याप्रमाणे - मुखश्रीः - मुखाची शोभा - प्रतिमुखस्य (भवति तथा) - प्रतिबिंबातील मुखाला दिसते तशी. ॥ ११ ॥

तस्मात् - त्याकरिता - नीचः - नीच जातीत उत्पन्न झालेला - अहं - मी - विगतविक्लवः - निर्भय होत्साता - ईश्वरस्य - ईश्वराचे - महि - माहात्म्य - सर्वात्मना - एकनिष्ठेने - यथामनीषं - यथामति - गृणामि - वर्णन करितो - येन अनुवर्णितेन - ज्या माहात्म्याच्या वर्णनाने - अजया - मायेने - विसृष्टं - गुणसृष्टीत - अनुप्रविष्टः - प्रविष्ट झालेला - पुमान् - पुरुष - पूयेत हि - खरोखर पवित्र होईल. ॥ १२ ॥

ईश - हे परमेश्वरा - उद्विजंतः - भिणारे - सर्वे - सगळे - अमी - हे - ब्रह्मादयः - ब्रह्मादिक देव - सत्त्वधाम्नः - सत्त्वगुणरूप अशा - तव - तुझे - विधिकराः हि (सन्ति) - आज्ञाधारक आहेत - वयं इव - आमच्यासारखे विरोधी भक्त - न - नाहीत - भगवतः - भगवंताचे - रुचिरावतारैः - मनोहर अवतारांच्या योगे - विक्रीडितं - खेळणे - अस्य - ह्या जगाच्या - क्षेमाय - कल्याणाकरिता - च - आणि - भूतये - ऐश्वर्यवृद्धीकरिता - उत च - शिवाय आणि - आत्मसुखाय (अस्ति) - आत्मसुखाकरिता होय. ॥ १३ ॥

तत् - यास्तव - मन्युं - क्रोध - यच्छ - आटोप - त्वया - तुझ्याकडून - अद्य - आज - असुरः - दैत्य - च - तर - हतः - मारिला गेला - साधुः अपि - साधु सुद्धा - वृश्चिकसर्पहत्या - विंचू व साप यांच्या वधाने - मोदेत - आनंद पावेल - च - आणि - सर्वे - सर्व - लोकाः - लोक - निर्वृतिं - सुखाला - इतः - प्राप्त झालेले - (तव क्रोधस्य उपशमं) प्रतियंती - तुझा कोप शांत होण्याची वाट पाहत आहेत - नृसिंह - हे नरहरे - जनाः - सर्व लोक - रूपं - तुझे रूप - विभयाय - निर्भय होण्याकरिता - स्मरति - स्मरतात. ॥ १४ ॥

अजित - हे अपराजिता - अतिभयानकास्यजिह्‌वार्कनेत्र - अत्यंत भयंकर असे मुख, जिव्हा, सूर्यासारखे नेत्र, - भ्रुकुटीरभसोग्रदंष्ट्रात् - चढविलेल्या भुवया, व भयंकर दाढा आहेत ज्याला अशा - आन्त्रस्रजः - गळ्यात आतडयाच्या माळा अडकविलेल्या - क्षतजकेसरशङ्‌कुकर्णात् - रक्ताने भिजलेल्या जटा व शङ्‌कुसारखे उभे कान आहेत ज्याला अशा - निर्ह्नादभीतदिगिभात् - ज्याच्या शब्दाने दिग्गज भिऊन गेले आहेत अशा - अरिभिन्नखाग्रात् ते (रूपात्) - ज्याची नखाग्रे शत्रूला फाडणारी आहेत अशा तुझ्या रूपाला - न अहं बिभेमि - मी भीत नाही. ॥ १५ ॥

कृपणवत्सल - हे दीनदयाळा - अहं - मी - दुःसहोग्रसंसारचक्रकदनात् - दुःसह व भयंकर अशा संसारचक्राच्या दुःखाने - त्रस्तः - गांजलेला - अस्मि - आहे - स्वकर्मभिः - आपल्या कर्मांनी - बद्धः - बांधलेला - ग्रसतां - हिंस्त्रप्राण्यांमध्ये - प्रणीतः - पडलो आहे - उशत्तम - अतिप्रिय देवा - प्रीतः त्वं - संतुष्ट झालेला तू - अपवर्गं - मोक्षरूपी - अरणं - आश्रय अशा - ते अङ्‌घ्रिमूलं - तुझ्या पायापाशी - कदा - केव्हा - नु - निश्चयेकरून - (मां) ह्‌वयसे - मला बोलावशील. ॥ १६ ॥

यस्मात् - ज्याअर्थी - अहं - मी - प्रियाप्रियवियोगसयोगजन्मशोकाग्निना - प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा संयोग झाल्यामुळे उद्भवलेल्या शोकाग्नीने - सकलयोनिषु - सर्व योनींमध्ये - दह्यमानः (अस्मि) - जाळिला जात आहे - (यस्मात् च) दुःखौषधं - आणि ज्याअर्थी दुःख दूर होण्याचे औषध - तत् अपि - तेहि - दुःखं (अस्ति) - दुःखरूप असते - तथा च - तसेच - भूमन् - हे देवा - अतद्धिया - अचेतन देहाच्या अभिमानाने - भ्रमामि - मोह पावलो आहे - मे - मला - तव - तुझ्या - दास्ययोगं - सेवायोगाला - वद - सांग. ॥ १७ ॥

नृसिंह - हे नरहरे - गुणाविप्रमुक्तः - रागद्वेषादि गुणांनी सोडिलेला - ते पदयुगालहंससंगः सः अहं - तुझे दोन्ही चरण आहेत आश्रय ज्यांचे अशा त्या साधूंची संगती झालेला मी - प्रियस्य सुहृदः - प्रिय हितकर्ता अशा - परदेवतायाः तव विरिञ्चगीताः - तुज श्रेष्ठ देवतेच्या ब्रह्मदेवांनी गाइलेल्या - लीलाकथाः - लीलांच्या कथा - अनुगृणन् - वर्णन करीत - दुर्गाणि - दुःखे - अंजः - अनायासे - तितर्मि - तरून जाईन. ॥ १८ ॥

नृसिंह - हे नृसिंहा - इह - इहलोकी - बालस्य - बालकांचे - शरणं - रक्षणकर्ते - पितरौ - आईबाप - न (स्तः) - नव्हेत - आर्तस्य - रोगाने पीडिलेल्यांचे - अगदं - औषध - च - आणि - उदन्वति - समुद्रात - मज्जतः - बुडणार्‍याचे - नौः - नौका - (तथा) इह - तसेच इहलोकी - न - नव्हे - विभो - परमेश्वरा - तप्तस्य - तप्त झालेल्या प्राण्याला - यः - जो - तत्प्रतिविधिः - त्यातून सुटण्याचा उपाय - प्रसिद्धः - प्रसिद्ध आहे - त्वदुपेक्षितानां - तुझ्याकडून उपेक्षिलेल्या - तनुभृतां - प्राण्यांना - तावत् - तितका - अंजसा - यथार्थ - इष्टः (स्यात् किम्) - इष्ट होईल काय. ॥ १९ ॥

पृथक्स्वभावः - निरनिराळ्या स्वभावाचा - यः - जो - अपरः - अर्वाचीन - वा - अथवा - परः - प्राचीन - संचोदितः - प्रेरणा केलेला - भावः - कर्ता - तु - तर - यस्मिन् - ज्या आधारावर - यतः - ज्या निमित्तामुळे - यर्हि - ज्यावेळी - येन - ज्या साधनाने - यस्य - ज्यासंबंधी - यस्मात् - ज्यास्तव - यस्मै - ज्याला - यथा - जसे - उत - शिवाय - यत् - जे - करोति - निर्मितो - च - आणि - विकरोति - अन्य स्वरूपास नेतो - तत् - ते - अखिलं - सर्व - भवतः - तुझे - स्वरूपं (अस्ति) - स्वरूप होय. ॥ २० ॥

कालेन - काळाने - चोदितगुणा - ज्यात गुणांची प्रेरणा केली आहे अशी - माया - माया - पुंसः - पुरुषाच्या - अनुमतेन - संमतीने - कर्ममयं - कर्ममय - बलीयः - बलिष्ठ - छन्दोमयं - वेदमय - अजया अर्पितषोडशारं - अविद्येने ज्याला अकरा इंद्रिये व पाच भूते अशा सोळा पाकळ्या जोडिल्या आहेत अशा - संसारचक्रं - संसारचक्ररूपी - यत् - ज्या - मनः - मनाला - सृजति - उत्पन्न करिते - अज - हे प्रभो - त्वदन्यः - तुला विमुख असणारा - कः - कोणता प्राणी - अतितरेत् - तरून जाईल ॥ २१ ॥

विभो - हे समर्था - ईश्वर - ईश्वरा - स्वधाम्ना - आपल्या चैतन्यशक्तीने - नित्यविजितात्मगुणः - ज्याने बुद्धीचे गुण जिंकले आहेत असा - कालः - काळरूपी - वशीकृतविसृज्याविसर्गशक्तिः - उत्पन्न झालेल्या सर्व शक्ति ज्याने आपल्या स्वाधीन केल्या आहेत असा - सः - तो - त्वं - तू - हि - खरोखर - अजया - अविद्येने - विसृष्टं - उत्पन्न केलेल्या - षोडशारे चक्रे - सोळा पाकळ्यांच्या चक्रातून - निष्पीडयमानं - पिळून निघणार्‍या - प्रपन्नं (मां) - शरण आलेल्या - उपकर्ष - बाहेर काढ. ॥ २२ ॥

विभो - हे ईश्वरा - अयं जनः - हो लोक - यान् - ज्यांना - इच्छति - इच्छितो - दिवि - स्वर्गातील - अखिलधिषपानां - सर्व लोकपालांची - विभवः - ऐश्वर्ये - आयुः - आयुष्य - श्रियः - संपत्त्या - मया - मी - दृष्टाः - पाहिल्या - ये - जे लोकपाल - अस्मत्पितुः - आमच्या पित्याच्या - कुपितहासविजृंभितभ्रूविस्फूर्जितेन - क्रोधयुक्त हास्यामधील चढविलेल्या भुवयांच्या तेजाने - लुलिताः - लुले होत - सः - तो - तु - तर - ते - तुझ्याकडून - निरस्तः - मारिला गेला. ॥ २३ ॥

तस्मात् - यास्तव - अमूः - ह्या - तनुभृतां - देहधार्‍यांच्या - आशिषः - भोगांना - ज्ञः - जाणणारा - अहं - मी - आयुः - आयुष्याला - श्रियं - संपत्तीला - आविरिञ्‌च्यात् - ब्रह्मदेवापासून सर्व प्राण्यांच्या - ऐंद्रियं - इंद्रियसंबंधी - तथा च - तसेच - विभवं - ऐश्वर्याला - ते - तुझ्या - उरुविक्रमेण कालात्मना - महापराक्रमी कालगतीने - विलुलितान् - नष्ट होणार्‍या अणिमादि सिद्धी - न इच्छामि - इच्छित नाही - मां - मला - निजभृत्यपार्श्वं - आपल्या सेवकांच्या समीप - उपनय - ने. ॥ २४ ॥

कुत्र - कोठे - श्रृतिसुखाः - ऐकण्याला गोड - मृगतृष्णिरूपाः - मृगजळाप्रमाणे मिथ्या - आशिषः - भोग - क्व (च) - आणि कोठे - अशेषरुजां - सर्व रोगांचे - विरोहः - उत्पत्तिस्थान असे - इदं कलेवरं - हे शरीर - यत् - ज्यापासून - इति विद्वान् अपि - असे जाणणाराही - जनः - लोक - दुरापैः - दुर्मिळ असा - मधुलवैः - क्षुद्र सुखांनी - कामानलं - कामरूप अग्नीला - शमयन् - शांत करीत - न तु निर्विद्यते - विरक्त होतच नाही. ॥ २५ ॥

ईश - हे ईश्वरा - क्व - कोठे - रजःप्रभवः - रजोगुणापासून जन्म पावलेला - तमोधिके - तमोगुण ज्यात अधिक आहे अशा - अस्मिन् - ह्या - सुरेतरकुले - दैत्यकुलात - जातः - उत्पन्न झालेला - अहं - मी - क्व (च) तव अनुकंपा - आणि कोठे तुझी कृपा - यत् - ज्याअर्थी - मे - माझ्या - शिरसि - मस्तकावर - प्रसादः - प्रसादरूपी - पद्मकरः - कमलासारखा हा - त्वया अर्पितः - तुझ्याकडून ठेविला गेला - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाच्या - न - नाही - भवस्य - शंकराच्या - न - नाही - रमायाः तु - लक्ष्मीच्याही - वै - खरोखर - न - नाही. ॥ २६ ॥

एषा - ही - परावरमतिः - उच्चनीच बुद्धि - यथा - जशी - जंतोः - साधारण प्राण्याची - (तथा) जगतः आत्मसुहृदः - तशी जगाचा आत्मा व हितकर्ता अशा - भवतः - तुला - ननु - खरोखर - न स्यात् - होणार नाही - तथा अपि - तथापि - सुरतरोः इव - कल्पवृक्षाप्रमाणे - ते - तुझा - प्रसादः - प्रसाद - संसेवया - चांगल्या सेवेने - सेवानुरूपं - सेवेला योग्य असा - उदयः (भवति) - धर्मादिकांचे फल मिळते - (तत्र) परावरत्वं - तेथे उच्च-नीच भाव - न (अस्ति) - नाही. ॥ २७ ॥

भगवन् - हे परमेश्वरा - एवं - याप्रमाणे - प्रभवाहिकूपे - संसाररूपी सर्पयुक्त विहिरीत - निपतितं - पडलेल्या - कामाभिकामं - उपभोगांची इच्छा करणार्‍या - जनं - लोकाला - अनु (गच्छन्) - अनुसरणारा - प्रसंगात् - प्रसंगवशात - यः - जो - सुरर्षिणा - देवर्षि नारदाने - आत्मसात् - आपलासा - कृत्वा - करून - गृहीतः - स्वीकारिला गेला - सः - तो - अहं - मी - तव भृत्यसेवां - तुझा सेवक जो नारद त्याच्या सेवेला - नु - खरोखर - कथं - कसा - विसृजे - सोडू. ॥ २८ ॥

अनंत - हे अनंता - असत् - वाईट कृत्य - विधित्सुः (मत्पिता) - करण्याची इच्छा करणारा माझा पिता - खड्‌गं - तलवार - प्रगृह्य - घेऊन - मदपरः - माझ्याहून दुसरा - ईश्वरः - ईश्वर असला तर तो - त्वां - तुला - अवतु - राखो - (तव) कं - तुझे मस्तक - हरामि - हरण करितो - इतियत - असे जेव्हा - अवोचत् - बोलला - मत्प्राणरक्षणं - माझ्या प्राणाचे रक्षण - च - आणि - पितुः - बापाचा - वधः - वध - स्वभृत्यऋषिवाक्यं - आपला सेवक जो नारद त्याचे वचन - ऋतं - खरे - विधातुं (आस्ताम्) - करण्याकरिता होतो - (इति) मन्ये - असे मी मानितो. ॥ २९ ॥

एतत् - हे - जगत् - जग - त्वं एव - तूच - एकः (असि) - एकटा आहेस - यत् - कारण - अमुष्य - ह्या जगाच्या - आद्यन्तयोः - प्रारंभी व अंती - च - आणि - मध्यतः - मध्ये - पृथक् - वेगळा - अवस्यसि - प्रत्ययास येतोस - निजमायया - आपल्या मायेच्या योगाने - गुणव्यतिकरं - गुणांचे परिणामरूप - इदं - हे जग - सृष्ट्‌वा - उत्पन्न करून - तदनुप्रविष्टः - त्यामध्ये प्रवेश केलेला - तैः - त्या गुणांच्या योगे - नाना इव - जणु काय अनेक प्रकारचा - (त्वम् एव) अवसितः - तूच प्रत्ययास आलेला आहेस. ॥ ३० ॥

ईश - हे परमेश्वरा - त्वं - तू - वै - खरोखर - इदं - हे - सदसत् (असि) - खोटे असून खरे आहे असे भासणारे जग आहेस - ततः - त्या जगाहून - भवान् - तू - अन्यः (अस्ति) - वेगळा आहेस - यत् - कारण - इयं - ही - आत्मपरबुद्धिः - आपले व दुसर्‍याचे अशी जी बुद्धि - हि - खरोखर - अपार्था - निरर्थक - माया (अस्ति) - माया होय - यत् - ज्यापासून - यस्य - ज्याची - जन्म - उत्पत्ति - ईक्षणं - प्रकाशन - स्थितिः - पालन - च - आणि - निधनं (भवति) - नाश होतो - तत् - तो पदार्थ - वै - निःसंशय - अष्टितर्वोः - बीज व वृक्ष यांचे - वसुकालवत् - महाभूतांचे सूक्ष्मरूप व महाभूते हेच स्वरूप असते त्याप्रमाणे - तत् एव (अस्ति) - तद्रूपच होय. ॥ ३१ ॥

इदं - हे - जगत् - जग - आत्मना - स्वप्रकाशरूपाने - आत्मनि - आत्मस्वरूपी - न्यस्य - ठेवून - निजसुखानुभवः - आत्मसुखाचा अनुभव घेणारा - निरीहः (त्वम्) - निरीच्छ असा तू - विलयांबुमध्ये - प्रलयकाळाच्या उदकांत - शेषे - शयन करितोस - योगेन - योगबलाने - मीलितदृक् - दृष्टी मिटलेला - आत्मनिपीतनिद्रः (त्वम्) - स्वतःच्या प्रकाशरूपाने निद्रा नाहीशी केली आहे ज्याने असा तू - तुर्ये - चवथ्या अवस्थेत - स्थितः (अस्ति) - राहिलेला आहेस - तु - परंतु - तमः - अज्ञानाला - न युंक्षे - चिकटून राहात नाहीस - च - आणि - गुणान् - विषयांना - न युंक्षे - चिकटून राहात नाहीस. ॥ ३२ ॥

निजकालशक्त्या - आपल्या कालशक्तीच्या योगाने - संचोदितप्रकृतिधर्मणः - प्रेरिले आहे प्रकृतीचे सत्त्वादि धर्म ज्याने अशा - विरमत्समाधेः - समाधिकाळ संपला आहे ज्याचा अशा - तस्य एव - तुझ्याच - नाभेः - नाभीपासून - अनंतशयनात् - शेषशयनापासून - इदं वपुः - हे शरीर - अंभसि - उदकात - आत्मगूढं - आत्म्यात गुप्त असलेले - महाब्जं - मोठया कमळाचे रूप आहे ज्याचे असे - स्वकर्णिकावटवत् - आपल्या सूक्ष्म बीजापासून जसे वडाचे झाड त्याप्रमाणे - अभूत - उत्पन्न झाले. ॥ ३३ ॥

तत्संभवः - त्या कमळापासून उत्पन्न झालेला - कविः - ब्रह्मदेव - अतः - या कमळापासून - अन्यत् - दुसरे - अपश्यमानः - न पाहणारा - अब्दशतं - शंभर वर्षे - अप्सु - उदकांत - निमज्जमानः - बुडालेला - आत्मनि - आत्म्याच्या ठिकाणी - ततं - पसरलेल्या - बीजं - बीजरूपी - त्वां - तुला - स्वबहिः - आत बाहेर - विचिन्त्य - शोधून - न अविंदत - प्राप्त करून घेता आला नाही - उह - अहो - अंकुरे जाते - अंकुर उत्पन्न झाला असता - बीजं - बी - कथं - कसे - उपलभेत - सापडेल. ॥ ३४ ॥

ईश - हे ईश्वरा - अब्जम् आस्थितः - कमळावर बसलेला - अतिविस्मितः - अत्यंत आश्चर्ययुक्त असा - सः - तो - आत्मयोनिः - स्वयंभू ब्रह्मदेव - तु - तर - कालेन - पुष्कळ काळाने - तीव्रतपसा - उग्र तपश्वर्येने - परिशुद्धभावः - शुद्ध अंतःकरण झाले आहे ज्याचे असा - भुवि - पृथ्वीमध्ये - गंधं इव - जसा गंध त्याप्रमाणे - भूतेंद्रियाशयमये - भूते, इंद्रिये, मन यांचा संघातरूप अशा - आत्मनि - आत्म्याच्या ठिकाणी - अतिसूक्ष्मं - अत्यंत सूक्ष्म अशा - विततं - व्यापून राहिलेल्या - त्वां - तुला - ददर्श - पाहता झाला. ॥ ३५ ॥

एवं - याप्रमाणे - विरिञ्चः - ब्रह्मदेव - सहस्रवदनांघ्रिशिरः - हजारो मुखे, पाय, मस्तके, - करोरुनासास्यकर्णनयनाभरणायुधाढयं - हात, मांडया, नाक, कान, डोळे, आभरणे व आयुधे यांनी युक्त अशा - मायामयं - मायारूप - सदुपलक्षितसंनिवेशं - ज्याच्या शरीराची रचना प्रपंचरूपाने दिसून येते अशा - महापुरुषं - विराट पुरुषाला - दृष्ट्‌वा - पाहून - मुदं - हर्षाला - आप - प्राप्त झाला. ॥ ३६ ॥

च - आणि - भवान् - तू - हयशिरस्तनुवं - हयग्रीवाचे रूप - बिभ्रद् - धारण करणारा - रजः - रजोरूपी - च - आणि - तमः - तमोरूपी अशा - वेदद्रुहौ - वेदांचा द्वेष करणार्‍या - अतिबलौ - अत्यंत बलवान - मधुकैटभाख्यौ - मधु व कैटभ या नावाच्या दोन दैत्यांना - हत्वा - मारून - तस्मै - त्या ब्रह्मदेवाला - श्रुतिगणान् - वेदसमूह - अनयत् - आणून देता झालास - तु - म्हणून - तव - तुझ्या - प्रियतमां - अत्यंत आवडत्या अशा - तनुं - मूर्तीला - सत्त्वं - सत्त्वगुणी असे - आमनंति - मानितात. ॥ ३७ ॥

महापुरुष - हे महापुरुषा - इत्थं - याप्रमाणे - नृतिर्यगृषिंदेवझषावतारैः - मनुष्य, पशु, ऋषि, देव व मासा या अवतारांनी - लोकान् - लोकांना - विभावयसि - रक्षितोस - जगत्प्रतीपान् - जगाच्या विरुद्ध वागणार्‍यांना - हंसि - मारितोस - युगानुवृत्तं - युगायुगात चालू असलेल्या - धर्मं - धर्माला - पासि - रक्षितोस - यत् - ज्याअर्थी - कलौ - कलियुगात - छन्नः - गुप्त - अभवः - झालास - अथ - म्हणून - सः - तो - त्वं - तू - त्रियुगः (असि) - त्रियुग या नावाने प्रसिद्ध आहेस. ॥ ३८ ॥

वैकुंठनाथ - हे वैकुंठपते - दुरितदुष्टं - पापाने दुष्ट झालेले - असाधु - नीच - तीव्रं - आवरण्यास कठीण - कामातुरं - विषयोन्मुख - हर्षशोकभयैषणार्त - हर्ष व शोक व भय या त्रिविध विकाराने पीडित असे - एतत् - हे - मनः - मन - तव - तुझ्या - कथासु - कथांमध्ये - न संप्रीयते - रममाण होत नाही - तस्मिन् - त्या स्थितीत - तव - तुझे - गतिं - स्वरूप - कथं - कसा - विमृशामि - जाणू. ॥ ३९ ॥

अच्युत - हे अच्युता - जिह्वा - जीभ - अवितृप्ता - तृप्त न होत्साती - मा - मला - एकतः - एकीकडे - विकर्षति - ओढिते - शिश्नः - लिंग - अन्यतः (विकर्षति) - दुसरीकडे ओढिते - त्वक् - त्वचा - उदरं - पोट - श्रवणं - कान - कुतश्चित् (विकर्षति) - कोठे तरी ओढितात - घ्राणः - नाक - अन्यतः (विकर्षति) - दुसरीकडे ओढिते - चपलदृक् - चंचल नेत्र - च - आणि - कर्मशक्तिः - कर्मेंद्रिये - क्व (अपि विकर्षतः) - कोठे तरी नेतात - बव्ह्‌यः - पुष्कळ - सपत्न्यः - सवती - इव गेहपतिं - जशा घरधन्याला तशी - (इंद्रियाणी) मा - इंद्रिये मला - लुनंति - तोडीत आहेत. ॥ ४० ॥

पारचर - हे पलीकडल्या तीरावर फिरणार्‍या ईश्वरा - एवं - याप्रमाणे - भववैतरण्यां - संसाररूप वैतरणीनदीमध्ये - स्वकर्मपतितं - आपल्या कर्मामुळे पडलेल्या - अन्योन्य - परस्परांच्या संगतीने भोगाव्या लागणार्‍या - जन्ममरणाशनभीतभीतं - जन्ममणादि दुःखामुळे अत्यंत भ्यालेल्या - स्वपरविग्रहवैरमैत्रं - स्वकीयाविषयी प्रेम व परकीयांविषयी वैर वाटत असलेल्या - मूढं - अज्ञानी - जनं - मनुष्याला - पश्यन् (त्वं) - पहाणारा असा तू - हंत इति - अरेरे असे म्हणून - अद्य - सांप्रत - पीपृह - उतरुन ने. ॥ ४१ ॥

अखिलगुरो - सर्वांचा गुरु अशा - भगवन् - हे भगवंता - अस्य - ह्या जगाची - भवसंभवलोपहेतोः - उत्पत्ती, स्थिती व लय करण्याला कारणभूत अशा - ते - तुला - नु - खरोखर - अत्र - ह्या ठिकाणी - उत्तारणे - उतरुन नेण्यास - कः - काय - प्रयासः (अस्ति) - श्रम आहे - मूढेषु - अज्ञानी लोकांवर - वैः - निश्चयेकरून - महदनुग्रहः (स्यात्) - मोठी कृपा होईल - आर्तबंधो - पीडितांना सहाय्य करणार्‍या परमेश्वरा - ते - तुझ्या - प्रियजनान् - आवडत्या भक्तांची - अनुसेवतां - सेवा करणार्‍या - नः - आमच्या - तेन - त्या कारणाने - किं (स्यात्) - काय होणार आहे. ॥ ४२ ॥

त्वद्वीर्यगायन - तुझ्या पराक्रमाचे गायन - महामृतमग्नचित्तः (अहं) - हेच जे मोठे अमृत त्यात ज्याचे चित्त मग्न झाले आहे असा मी - परदुरत्ययवैतरण्याः - तरुन जाण्यास अत्यंत कठीण अशा वेतरणीला - न एव उद्विजे - खरोखर भीत नाही - ततः - त्या अमृतापसून - विमुखचेतसः - ज्याचे चित्त पराङमुख आहे अशा - इंद्रियार्थमायासुखाय - इंद्रियांच्या तृप्तीकरिता मिथ्या सुखाच्या प्राप्तीसाठी - भरं - कुटुंबाचा भार - उद्वहतः - वहाणार्‍या - विमूढान् - अत्यंत मूर्ख लोकांविषयी - शोचे - मी शोक करितो. ॥ ४३ ॥

देव - हे देवा - स्वविमुक्तिकामाः - स्वतःच्या मुक्तीची इच्छा करणारे - परार्थनिष्ठाः - दुसर्‍याचे कार्य साधण्याविषयी तत्पर असे - मुनयः - ऋषि - प्रायेण - बहुतकरून - विजनेन - एकांती - मौनं - मौन - चरंति - आचरितात - एतान् कृपणान् - ह्या दीन लोकांना - विहाय - सोडून - एकः (अहं) - एकटा मी - न विमुमुक्षे - मुक्तीची इच्छा करीत नाही - भ्रमतः - भ्रमण करणार्‍या - अस्य - ह्या लोकांना - त्वत् अन्यं - तुझाहून दुसरे - शरणं - आश्रयस्थान - न अनुपश्ये - मी पहात नाही ॥ ४४ ॥

यत् - जे - मैथुनादि - मैथुनादिक - गृहमेधिसुखं - गृहस्थाश्रम्यांचे सुख ते - करयोः - हाताच्या - कंडूयनेन इव - खाजविण्यासारखे - दुःखदुःखं - अत्यंत दुःखदायक - तुच्छं (अस्ति) - तिरस्करणीय होय - हि - म्हणून - बहुदुःखभाजः - अत्यंत दुःख सेवन करणारे - कृपणाः - दीन लोक - इह - ह्या लोकी - न तृप्यंति - तृप्त होत नाहीत - धीरः - धीर जन - मनसिजं - कामवासनेला - कंडूतिवत् - खरजेप्रमाणे - विषहेत - सहन करितो. ॥ ४५ ॥

पुरुष - हे परमेश्वरा - मौनव्रत - मौन, व्रत, - श्रुततपोऽध्ययन - विद्या, तप, अध्ययन, - स्वधर्मव्याख्यारहोजपसमाधयः - स्वधर्माचरण, व्याख्यान, एकांतवास, जप व समाधि ही दहा - आपवर्ग्याः (सन्ति) - मोक्षसाधने होत - ते तु - ती तर - प्रायः - बहुतकरुन - अजितेंद्रियाणां - इंद्रिये न जिंकलेल्या मनुष्यांची - परं - श्रेष्ठ - वार्ताः - निर्वाहसाधने - भवंति - होतात - अत्र - ही - उत दांभिकानां तु - पण दांभिक लोकांना तर - न वा (भवन्ति) - निर्वाहाची साधने होतिल किंवा न होतील. ॥ ४६ ॥

बीजांकुरौ इव - बीजांकुरांप्रमाणे - अरूपकस्य - निराकार अशा - तव - तुझी - सदसते - कार्य व कारण अशी - इमे - ही - रूपे - दोन रूपे - वेदसृष्टे (स्तः) - वेदाने प्रकाशित केली आहेत - अन्यत् - दुसरे - न - काही नाही - युक्ताः - योगी लोक - योगेन - भक्तियोगाने - त्वां - तुला - समक्षं - प्रत्यक्ष - उभयत्र - दोन्ही ठिकाणी - दारुषु - काष्ठांत - वह्निम् इव - जसे अग्नीला तसे - विचिन्वते - शोधितात - अन्यतः - अन्यरीतीने - (तव ज्ञानं) न स्यात् - तुझे ज्ञान प्राप्त होत नाही. ॥ ४७ ॥

भूमन् - हे व्यापका - त्वं - तू - वायुः - वायु - अग्निः - अग्नि - अवनिः - पृथ्वी - वियत् - आकाश - अंबु - उदक - मात्राः - पंचमहाभूते - प्राणेंद्रियाणि - प्राण व इंद्रिये - हृदयं - मन - चित् - चित्त - च - आणि - अनुग्रहः (असि) - व अहंकार आहेस - च - आणि - मनोवचसा - मन व वाणी यांनी - निरुक्तं - प्रकाशित केलेला - सगुणः - सगुण - विगुणः - निर्गुण पदार्थ - अपि - सुद्धा - सर्वं - सर्व - त्वं एव (असि) - तूच आहेस - त्वत् अन्यत् - तुझ्याहून दुसरे - न (किंचित्) अस्ति - काही नाही. ॥ ४८ ॥

उरुगाय - हे देवा - आद्यंतवन्तः - आदि व अंत ज्यांना आहेत असे - एते - हे - गुणाः - गुणाभिमानी देव - त्वां - तुला - ये - जे - महदादयः - महत्तत्वादिक - मनःप्रभृतयः - मनआदिकरून - सहदेवमर्त्याः - देव व मनुष्य यांसह - गुणिनः - जन्ममरणरूप ज्यांना आहेत असे - सर्वे - सर्व - ते न विदन्ति - ते जाणत नाहीत - हि - म्हणून - एवं - असा - विमृश्य - विचार करून - सुधियः - विद्वान लोक - शब्दात् - अध्ययनादि व्यापारापासून - विरमंति - विराम पावतात. ॥ ४९ ॥

तत् - यास्तव - अर्हत्तम - हे अत्यंत पूजनीय ईश्वरा - ते - तुझ्या - नमःस्तुतिकर्मपूजाः - नमस्कार, स्तवन सर्व कर्माचे अर्पण - कर्म - सेवा - चरणयोः स्मृति - चरणांचे स्मरण - कथायां - कथेचे - श्रवणं - श्रवण - इति - अशा - षडङ्गया - सहाप्रकारच्या - संसेवया विना - सेवेशिवाय - जनः - लोक - परमहंसगतौ - परमहंसाचे आश्रयस्थान अशा - त्वयि - तुझ्याविषयीच्या - भक्तिं - भक्तीला - किं लभेत - कसा प्राप्त होईल. ॥ ५० ॥

भक्तेन - भक्ताने - भक्त्या - भक्तीने - एतावद्वर्णितगुणः - याप्रमाणे वर्णिले आहेत गुण ज्याचे असा - प्रीतः - प्रसन्न झालेला - यतमन्युः - आवरला क्रोध आहे ज्याने असा - प्रणतं - नम्र झालेल्या - प्रल्हादं - प्रल्हादाला - अभाषत - बोलला. ॥ ५१ ॥

भद्र - हे कल्याणरूप - प्रल्हाद - प्रल्हादा - ते - तुझे - भद्रं (अस्तु) - कल्याण असो - असुरोत्तम - हे असुरश्रेष्ठा - ते - तुझ्यावर - अहं - मी - प्रीतः (अस्मि) - प्रसन्न झालो आहे - अयं - हा मी - नृणां - मनुष्यांच्या - कामपूरः - इच्छा पूर्ण करणारा - अस्मि - आहे - अभिमतं - इच्छित असा - वरं - वर - वृणीष्व - तू माग. ॥ ५२ ॥

आयुष्मन् - हे दीर्घायुषी प्रल्हादा - मां - मला - दर्शनं - दर्शन - दुर्लभं (अस्ति) - दुर्लभ होय - हि - म्हणून - जंतुः - प्राणी - मां - मला - दृषट्वा - बघितल्यावर - पुनः - पुनः - आत्मानं - स्वतःला - तप्तुं - दुःख देण्यास - न अर्हति - योग्य होत नाही. ॥ ५३ ॥

अथ - म्हणून - हि - याकरितां - धीराः - धैर्यवान - महाभागाः - महाभाग्यशाली - श्रेयस्कामाः - कल्याणाची इच्छा करणारे - साधवः - साधु लोक - सर्वभावेन - एकनिष्ठ भक्तीने - सर्वेषां आशिषां - सर्व उपभोगांचा - पतिः - स्वामी अशा - मां - मला - प्रीणंति - संतुष्ट करितात. ॥ ५४ ॥

असुरोत्तमः - लोकांना भुलविणार्‍या अशा - वरैः - वरांनी - प्रलोभ्यमानः अपि - भुलविला गेला असताहि - भगवति - परमेश्वराच्या ठिकाणी - एकान्तित्वात् - निस्सीम भक्ति असल्यामुळे - तान् - त्या वरांना - न ऐच्छत् - इच्छिता झाला नाही. ॥ ५५ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय नववा समाप्त

GO TOP