श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ८ वा - अन्वयार्थ

भगवान नृसिंहांचा अवतार, हिरण्यकशिपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती -

अथ - नंतर - सर्वे - सगळे - दैत्यसुताः - दैत्यपुत्र - तदनुवर्णितं - प्रल्हादाने सांगितलेले - श्रुत्वा - श्रवण करून - निरवद्यत्वात् - निर्दोष असल्यामुळे - जगृहुः - ग्रहण करिते झाले - गुर्वनुशिक्षितं - गुरूने शिकविलेले - न एव (जगृहुः) - ग्रहण करिते झाले नाहीच ॥ १ ॥

अथ - नंतर - आचार्यसुतः - गुरूपुत्र - तेषां - त्या बालकांच्या - एकांतसंस्थितां - एकनिष्ठेने परमेश्वराकडे लागलेल्या - बुद्धिं - बुद्धिला - आलक्ष्य - पाहून - भीतः - भ्यालेला - त्वरितः - लागलाच - यथा (वत्) - इत्थंभूत - राज्ञे - राजाला - आवेदयत् - कळविता झाला ॥ २ ॥

दैत्यः - हिरण्यकशिपु - तत् - तो - अप्रियं - न आवडणारा - दुःसहं - दुःसह - तनयानयं - मुलाचा अपराध - श्रुत्वा - ऐकून - कोपावेशचलद्‍गात्रः - कोपाच्या आवेशाने ज्याचे शरीर कापत आहे असा - पुत्रं - मुलाला - हंतुं - मारण्याबद्दल - मनः - संकल्प - दधे - करिता झाला ॥ ३ ॥

प्रश्रयावनतं - विनयाने नम्र अशा - दांतं - इंद्रियनिग्रह केलेल्या - बद्धांजलिं - हात जोडिलेल्या - अवस्थितं - उभा राहिलेल्या - अतदर्हणं - त्या कठोर भाषणाला अयोग्य अशा - प्रह्लादं - प्रल्हादाला - परुषया वाचा - कठोर भाषणाने - क्षिप्त्वा - धमकी देऊन - पापेन - पापयुक्त - तिरश्चीनेन - वाकडया - चक्षुषा - दृष्टीने - ईक्षमाणः - पहाणारा - प्रकृतिदारुणः - स्वाभाविकपणे उग्र असा तो हिरण्यकशिपु - पदा - पायाने - हतः - ताडण केलेल्या - सर्पः इव - सर्प जणू काय असा - श्वसन् - फूत्कार टाकीत - आह - म्हणाला ॥ ४-५ ॥

हे दुर्विनीत - अरे दांडग्या - मंदात्मन् - अल्पबुद्धे - कुलभेदकर - कुलघातक्या - अधम - नीचा - स्तब्धं - हट्टी अशा - मच्छासनोद्धूतं - माझ्या शासनाचे उल्लंघन करणार्‍या - त्वा - तुला - अद्य - आज - यमक्षयं - यमलोकाला - नेष्ये - पोचवीन ॥ ६ ॥

मूढ - हे मूर्खा - यस्य क्रुद्धस्य - जो रागवला असता - सहेश्वराः - अधीपतींसह - त्रयः तिन्ही - लोकाः - लोक - कंपन्ते - कापतात - तस्य मे - त्या माझी - शासनं - आज्ञा - अभीतवत् - थट्टेसारखी - किंबल - कोणाच्या बळावर विसंबून - (त्वं) अत्यगाः - तू उल्लंघन करिता झालास ॥ ७ ॥

ये - जे - अमी - हे - परे - उच्च - च - आणि - अवरे - नीच - स्थिरजंगमाः - स्थावरजंगम असे - ब्रह्मादयः (सन्ति) - ब्रह्मदेवादि सर्व प्राणी आहेत - येन - ते ज्याने - वशं - आपल्या आधीन - प्रणीताः - ठेविले आहेत - सः - तो - वै - खरोखर - केवलं - केवळ - मे (एव) - माझेच - बलं - बळ - अस्ति इति न - आहे असे नव्हे - राजन् - हे राजा - भवतः - तुझे - च - आणि - अपरेषां बलिनां (अपि बलं अस्ति) - दुसर्‍या बलवानांचेही बळ होय ॥ ८ ॥

सः - तो - असौ - हा - उरुक्रमः - महापराक्रमी - कालः - काळरूपी - ओजःसहःसत्वबलेंद्रियात्मा - इंद्रियबल, उत्साह, धैर्य, बुद्धि व शरीर हे आहे रूप ज्याचे असा - परमः - श्रेष्ठ - गुणत्रयेशः (ईश्वरः अस्ति) - त्रिगुणाधिपति ईश्वर होय - सः एव - तोच - स्वशक्तिभिः - आपल्या शक्तींनी - विश्वं - जगाला - सृजति - उत्पन्न करितो - अवति - पाळितो - अत्ति - खातो. ॥ ९ ॥

त्वं - तू - आत्मनः - स्वतःच्या - इमं - ह्या - आसुरं भावं - आसुरी स्वभावाला - जहि - सोड - अजितात् - न जिंकिलेल्या - उत्पथस्तितात् - कुमार्गात असणार्‍या - आत्मनः - मनाच्या - ऋते - शिवाय - अन्ये - दुसरे - विद्विषः - शत्रु - न संति - नाहीत - हि - ह्याकरिता - मनः - मनाला - समं - शत्रुमित्रभावरहित असे - धत्स्व - राख - तत् हि - तेच - अनंतस्य - परमेश्वराचे - महत् - मोठे - समर्हणं (अस्ति) - पूजन होय. ॥ १० ॥

एके - कित्येक - पुरा - प्रथम - लुम्पन्तः - लुटणार्‍या - षट् - सहा इंद्रियरूप - दस्यून् - शत्रूंना - न विजित्य - न जिंकता - दश - दाही - दिशः - दिशा - स्वजिताः - आपल्याकडून जिंकिल्या गेल्या असे - मन्यंन्त - मानितात - जितात्मनः - मन जिंकिलेल्या - ज्ञस्य - ज्ञानी अशा - देहीनां समस्य - प्राण्यांवर समदृष्टी ठेवणार्‍या - साधोः - सत्पुरुषाला - स्वमोहप्रभवाः - आत्म्याच्या अज्ञानामुळे कल्पिलेले - परे - शत्रू - कुतः (भवन्ति) - कोठून उद्‌भवणार ॥ ११ ॥

मंदात्मन् - हे मंदमते - यः (त्वं) - जो तू - अतिमात्रं - फार - विकत्थसे - बडबड करीत आहेस - (सः) त्वं - तो तू - व्यक्तं - उघड रीतीने - मर्तुकामः - मरण्याची इच्छा करणारा - असि - आहेस - हि - कारण - मुमूर्षूणां - मरणोन्मुख प्राण्यांची - गिरः - भाषणे - ननु - खरोखर - विप्लवाः - असंबद्ध - स्युः - असतात. ॥ १२ ॥

मंदभाग्य - हे हतभाग्या - त्वया - तू - यः - जो - मदन्यः - माझ्याहून निराळा - जगदीश्वरः - जगाचा स्वामी - उक्तः - सांगितलास - असौ - तो हा - क्व - कोठे आहे - यदि - जर - सः - तो - सर्वत्र (अस्ति तर्हि) - सर्व ठिकाणी आहे तर - कस्मात् - काय म्हणून - स्तंभे - खांबात - न दृश्यते - दिसत नाही. ॥ १३ ॥

सः अहं - यास्तव मी - विकत्थमानस्य ते - बडबड करणार्‍या तुझ्या - कायात् - देहापासून - शिरः - मस्तक - हरामि - वेगळे करितो - हरिः - हरि - अद्य - आता - त्वा - तुला - गोपायेत - राखो - यः - जो - ते - तुझे - ईप्सितः - इष्ट असा - शरणं (अस्ति) - आश्रयस्थान आहे. ॥ १४ ॥

एवं - याप्रमाणे - रुषा - क्रोधाने - दुरुक्तैः - अपशब्दांनी - मुहुः - वारंवार - महाभागवतं - मोठा भगवद्‌भक्त अशा - सुतं - प्रल्हादाला - अर्दयन् - पीडा देणारा असा - अतिबलः - अत्यंत बलवान - महासुरः - महादैत्य हिरण्यकशिपु - खङगं - तलवार - प्रगृह्य - घेऊन - वरासनात् - सिंहासनावरूनच - उत्पपात - उडी टाकिता झाला - स्वमुष्टिना - आपल्या मुठीने - स्तंभं - खांबाला - तताड - ताडिता झाला. ॥ १५ ॥

अंग - हे धर्मराजा - तदा एव - त्याच वेळेस - तस्मिन् (स्तंभे) - त्या खांबात - अतिभीषणः - अत्यंत भयंकर - निनदः - शब्द - बभूव - झाला - येन - ज्यामुळे - अंडकटाहं - ब्रह्मांडकटाह - अस्फुटत् - फुटून गेले - स्वधिष्ण्योपगतं - आपल्या स्थानी येऊन पोचलेल्या अशा - यं - ज्या शब्दाला - श्रुत्वा - श्रवण करून - अजादयः - ब्रह्मादिक देव - तु - तर - स्वघामाप्ययं - आपल्या लोकाचा नाश होत आहे असे - मेनिरे - मानिते झाले. ॥ १६ ॥

ओजसा - मोठया वीरश्रीने - विक्रमन् - फिरणारा - पुत्रवधेप्सुः - पुत्राच्या नाशाची इच्छा करणारा - सः - तो हिरण्यकशिपु - अपूर्वं - अपूर्व - अद्‌भुतं - विलक्षण असा - निर्ल्हादं - शब्द - निशम्य - श्रवण करून - अंतःसभायां - सभेमध्ये - तत्पदं - त्या शब्दाचे उगमस्थान - न ददर्श - पाहता झाला नाही - येन - ज्या शब्दाने - सुरारियूथपाः - दैत्यसेनापति - वितत्रसुः - भिऊन गेले. ॥ १७ ॥

निजभृत्यभाषितं - आपल्या भक्ताचे भाषण - सत्यं - खरे - विधातुं - करण्याकरिता - च - आणि - अखिलेषु भूतेषु - सर्व पदार्थमात्रामध्ये - आत्मनः - स्वतःची - व्याप्तिं (सत्यां कर्तुं) - व्याप्ति खरी करण्याकरिता - सभायां - सभेतील - स्तंभे - खांबामध्ये - न मृगं - पशु नव्हे - च - आणि - म मानुषं - मनुष्य नव्हे असे - अत्यद्‌भुतरूपं - अत्यंत विलक्षण असे रूप - उद्वहन् - धारण करणारा असा - अदृश्यत - प्रगट झाला. ॥ १८ ॥

सः - तो हिरण्यकशिपु - परितः - सभोवार - पश्यन् अपि - पाहत असताहि - स्तंभस्य - खांबाच्या - मध्यात् - मधून - अनुनिर्जिहानं - निघणार्‍या - नृमृगेंद्ररूपं - नृसिंहस्वरूप - एनं - ह्या - सत्त्वं - प्राण्याला - दृष्ट्‌वा - पाहून - अहो - अहो - अयं - हा - मृगः - पशु - न - नव्हे - नरः अपि - मनुष्यहि - न - नव्हे - एतत् - हे - विचित्रं - विचित्र - किं (अस्ति) - काय आहे. ॥ १९ ॥

(एवं) मीमांसमानस्य (तस्य) - असे विचार करणार्‍या हिरण्यकशिपुच्या - अग्रतः - पुढे - नृसिंहरूपः - नृसिंहरूपी ईश्वर - समुत्थितः - उभा राहिला - तत् - ते रूप - अलं - सर्वप्रकारे - भयानकं - भयंकर - प्रतप्तचामीकरचंडलोचनं - तापलेल्या सुवर्णाप्रमाणे आरक्त नेत्रांचे - स्फुरत्सटाकेसरजृंभिताननं (आसीत्) - चमकणार्‍या आयाळाच्या केसांमुळे मोठया मुखाचे होते. ॥ २० ॥

करालदंष्ट्रं - भयंकर दाढांचे - करवालचंचलक्षुरान्तजिह्वं - तलवारीप्रमाणे लवलवीत व वस्तर्‍याच्या धारेसारख्या जिभेचे - भ्रुकुटीमुखोल्बणं - भुंवया चढविल्यामुळे ज्याचे मुख भयंकर दिसत आहे असे - स्तब्धोर्ध्वकर्णं - ज्याचे कान ताठ व उभे आहेत असा - गिरिकन्दराद्‌भुतव्यात्तास्यनासं - पर्वताच्या गुहेप्रमाणे चमत्कारिक रीतीने ज्याच्या नाकपुडया व मुख पसरलेले आहे असे - हनुभेदभीषणं - ओठ फाटलेले असल्यामुळे भयंकर स्वरूपाचा. ॥ २१ ॥

दिविस्पृशत्कायं - ज्याचे शरीर आकाशाला स्पर्श करणारे असे - अदीर्घपीवरग्रीवोरुवक्षःस्थलं - मान आखूड व पुष्ट व छातीचा भाग विशाल आहे ज्याचा असा - अल्पमध्यमं - बारीक कमरेचे - चंद्रांशुगौरैः तनूरुहैः छुरितं - चंद्रकिरणाप्रमाणे शुभ्र अशा अंगावरील केशांनी व्यापिलेले - विष्वग्भुजानीकशतं - ज्याचे शेकडो हात चोहोकडे पसरले आहेत असा - नखायुधं - नखे हीच शस्त्रे आहेत ज्याची असा. ॥ २२ ॥

दुरासदं - ज्याला धरणे अगदीच अशक्य असे - सर्वनिजेतरायुधप्रवेकविद्रावितदैत्यदानवं - आपल्या व इंद्रादि देवांच्या वज्रादि सर्व आयुधांनी देव व दैत्य यांना पळवून लाविले आहे ज्याने असे - प्रायेण - बहुतकरून - उरुमायिना - महामायावी अशा - हरिणा - हरीने - मे - माझा - वधः - वधाचा उपाय - अयं - हा - स्मृतः (स्यात्) - योजिला असावा - (किन्तु) अनेन समुद्यतेन - परंतु असे रूप सिद्ध झाल्याने - (मम) किं भवेत् - माझे काय होणार आहे. ॥ २३ ॥

एवं - याप्रमाणे - तु - तर - ब्रुवन् - बोलणारा - गदायुधः - गदा धारण केलेला - दैत्यकुञ्जरः - दैत्येंद्र - नदन् - गर्जना करित - नृसिंहं प्रति - नृसिंहावर - अभ्यपतत् - धावता झाला - यथा - ज्याप्रमाणे - अग्नौ - अग्नीत - पतितः - पडलेला - पतंगमः - पतंग - तथा - त्याप्रमाणे - तदा - त्यावेळेस - सः - तो - असुरः - असुर - नृसिंहौजसि - नृसिंहाच्या तेजात - अलक्षितः - लोपून गेला. ॥ २४ ॥

सत्त्वधामनि - सत्त्वाचे केवळ घर अशा परमेश्वराच्या ठिकाणी - तत् - ते - विचित्रं - चमत्कारिक - खलु - खरोखर - न (अस्ति) - नव्हे - यः - जो - पुरा - सृष्टीच्या प्रारंभी - नु - निश्चयेकरून - स्वतेजसा - आपल्या तेजाने - तमः - प्रलयकालीन अंधःकाराला - अपिबत् - पिऊन टाकिता झाला - ततः - नंतर - महासुरः - हिरण्यकशिपु - रुषा - क्रोधाने - नृसिंहं - नृसिंहाप्रत - अभिपद्य - चाल करून - उरुवेगया - विपुल वेगाच्या - गदया - गदेने - अभ्यहनत् - मारता झाला. ॥ २५ ॥

यथा - ज्याप्रमाणे - तार्क्ष्यसुतः - गरुड - महोरगं (तथा) - मोठया सापाला त्याप्रमाणे - गदाधरः - गदाधर परमेश्वर - तं - त्या - विक्रमंतं - पराक्रम करणार्‍या - सगदं - गदाधारी दैत्याला - अग्रहीत् - धरिता झाला - तदा - त्यावेळी - यद्वत् - ज्याप्रमाणे - विक्रीडतः - बागडणार्‍या - गरुत्मतः - गरुडाच्या हातांतून - अहिः (उत्कलते) - साप सुटतो त्याप्रमाणे - सः - तो - असुरः - दैत्य - तस्य - त्या नृसिंहाच्या - हस्तोत्कलितः - हातांतून निसटला. ॥ २६ ॥

भारत - हे धर्मराजा - घनच्छदाः - मेघ ज्याचे आच्छादन आहे असे - हृतौकसः - ज्यांची स्थाने हरली गेली आहेत असे - सर्वाधिष्ण्यपाः - सर्व लोकपाल - अमराः - देव - असाधु - वाईट - अमन्यंत - मानिते झाले - यत् - की - मृधे - युद्धात - जितश्रमः - जिंकिले आहेत श्रम ज्याने असा - महासुरः - दैत्यराज - हस्तमुक्तः - हातांतून सुटलेला असा - तं - त्या - नृहरिं - नृसिंहाला - निजवीर्यशंकितं - आपल्या पराक्रमाला भ्यालेला असा - मन्यमानः - मानीत - पुनः - पुनः - खड्‌गचर्मणी - ढाल व तलवार - प्रगृह्य - घेऊन - वेगेन - आवेशाने - तं - त्यावर - आसज्जत - चाल करून गेला. ॥ २७ ॥

महाजवः - मोठा वेगवान - हरिः - नृसिंह - खरं - तीव्र - उत्स्वनोल्बणं - मोठया ध्वनीमुळे भयंकर अशा - अट्टहासं - हसण्याचा ध्वनी - कृत्वा - करून - तं - त्या - श्येनवेगं - ससाण्यासारख्या वेगाच्या - शतचंद्रवर्त्मभिः - ढाल-तलवारीच्या हातांनी - उपर्यधः - वर खाली - अच्छिद्रं - छिद्र न राहील अशा रीतीने - चरंतं - फिरणार्‍या - निमीलिताक्षं - ज्याने डोळे मिटले आहेत अशा दैत्याला - जगृहे - पकडता झाला. ॥ २८ ॥

हरिः - नृसिंह - यथा - जसा - व्यालः - सर्प - आखुं (गह्वाति तथा) - उंदराला पकडतो त्याप्रमाणे - कुलिशाक्षतत्त्वचम् - ज्याची कातडी वज्रानेही फाटली नव्हती अशा - विष्वक् - जिकडून तिकडून - स्फुरंतं - चळवळणार्‍या - ग्रहणातुरं - पकडल्यामुळे घाबरलेल्या दैत्याला - द्वारि - दरवाज्यात - ऊरे- मांडीवर - आपात्य - पाडून - यथा - जसा - गरुडः - गरुड - महाविषं - मोठया विषवाल्या - अहिं (दारयति तथा) - सर्पाला फाडितो त्याप्रमाणे - नखैः - नखांनी - लीलया - सहज - ददार - फाडिता झाला. ॥ २९ ॥

संरंभदुष्प्रेक्ष्यकराललोचनः - त्वेषामुळे पाहण्यास कठीण व उग्र आहेत नेत्र ज्याचे असा - स्वजिह्वया - आपल्या जिभेने - व्यात्ताननांतं - पसरलेल्या मुखाच्या बाजूंना - विलिहन् - चाटणारा - यथा - जसा - द्विपहत्यया - हत्तीच्या वधाने - हरिः (तथा) - सिंह त्याप्रमाणे - असृग्लवाक्तारुणकेसराननः - ज्याची आयाळ व मुख ही रक्तबिंदूंनी भिजल्यामुळे लाल झाली आहेत असा - अन्त्रमाली - आंतडयांची माळ अडकविलेला. ॥ ३० ॥

दोर्दंडयूथः - भुजदंडाचे समूह आहेत ज्याला असा नृसिंह - नखांकुरोत्पाटितहृत्सरोरुहं - नखांकुरांनी ज्याचे हृदयकमळ उपटले आहे अशा दैत्याला - विसृज्य - फेकून देऊन - तस्य - त्याच्या - उदायुधान् - आयुधे धारण केलेल्या - अनुचरान् - सेवकांना - सहस्त्रशः - हजारो - अनुपथान् - दैत्यपक्षीय लोकांना - समंतात् - चोहोंकडून - नखशस्त्रपार्ष्णिभिः - नखांनी, शस्त्रांनी व पायाच्या टाचांनी - अहन् - मारिता झाला. ॥ ३१ ॥

सटावधूताः - मानेवरील केसांनी कंपित झालेले - जलदाः - मेघ - परापतन् - पडले - च - आणि - ग्रहाः - ग्रह - तद्‌द्वष्टिविमुष्टरोचिषः (अभवन्) - त्याच्या दृष्टीने ज्यांचे तेज फिक्के पडले आहे असे झाले - श्वासहताः - श्वासाचे आघात झालेले - अंभोधयः - समुद्र - विचुक्षुभुः - खवळून गेले - निर्ह्लादभीताः - गर्जनेने भ्यालेले - दिगिभाः - दिग्गज - विचुक्रुशुः - ओरडले. ॥ ३२ ॥

द्यौः - आकाश - तत्सटोत्क्षिप्तविमानसंकुला - त्याच्या मानेवरील केसांनी वर उडवून दिलेल्या देवांच्या विमानांनी व्याप्त झालेले - प्रोत्सर्पत - स्थानभ्रष्ट झाले - च - आणि - क्ष्मा - पृथ्वी - पदा - पायाने - अतिपीडिता (अभवत्) - अत्यंत दबून गेली - अमुष्य - ह्याच्या - रंहसा - वेगाने - शैलाः - पर्वत - समुत्पेतुः - उडू लागले - तत्तेजसा - त्याच्या तेजापुढे - खं - आकाश - ककुभः - दिशा - न रेजिरे - प्रकाशत नाहीशा झाल्या. ॥ ३३ ॥

ततः - नंतर - सभायां - सभेमध्ये - उत्तमे नृपासने - उत्तम सिंहासनावर - उपविष्टं - बसलेल्या - संभृततेजसं - पूर्ण तेजस्वी अशा - अलक्षितद्वैरथं - ज्याचा प्रतिस्पर्धी कोणीच दिसला नाही अशा - अत्यमर्षणं - अत्यंत रागावलेल्या - प्रचंडवक्त्रं - भयंकर मुखाच्या - विभुं - प्रभूला - कश्चन - कोणीही - न बभाज - सेवण्याला पुढे सरसावेना. ॥ ३४ ॥

लोकत्रयमस्तकज्वरं - सगळ्या त्रैलोक्याचा मस्तकशूळ अशा - तं आदिदैत्य - त्या आदिदैत्य हिरण्यकशिपुला - मृधे - युद्धात - हरिणा - हरीने - हृतं - मारिलेला - निशम्य - ऐकून - प्रहर्षवेगोत्कलिताननाः - आनंदाने ज्यांची मुखे प्रफुल्लित झाली आहेत अशा - सुरस्त्रियः - देवांच्या स्त्रिया - प्रसूनवर्षैः - पुष्पवृष्टींनी - मुहुः - वारंवार - ववृषुः - वर्षाव करित्या झाल्या. ॥ ३५ ॥

तदा - त्यावेळी - नभस्तलं - आकाश - दिदृक्षतां - दर्शनाची इच्छा करणार्‍या - नाकिनां - देवांच्या - विमानावलिभिः - विमानांच्या ओळींनी - संकुलं - व्याप्त - आस - झाले - अथ - नंतर - सुराः - देव - आनकाः - नगारे - ददुंभयः - नौबती - जघ्निरे - वाजविते झाले - स्त्रियः - देवस्त्रिया - ननृतुः - नाचू लागल्या - गन्धर्वमुख्याः - मोठमोठे गंधर्व - जगुः - गाऊ लागले. ॥ ३६ ॥

तात - हे धर्मा - ब्रह्मेंद्रगिरिशादयः - ब्रह्मदेव, इंद्र, रुद्र आदिकरून - विबुधाः - देव - ऋषयः - ऋषि - पितरः - पितर - सिद्धाः - सिद्ध - विद्याधरमहोरगाः - विद्याधर व मोठमोठाले सर्प - मनवः - मनु - प्रजानां - प्रजांचे - पतयः - स्वामी - गंधर्वाप्सरचारणाः - गंधर्व, अप्सरा व चारण - यक्षाः - यक्ष - किंपुरुषाः - किंपुरुष - वेतालाः - वेताळ - सिद्धकिन्नराः - सिद्ध व किन्नर - सुनंदकुमुदादयः - सुनंद, कुमुद आदिकरून - ते - ते - सर्वे - सगळे - विष्णुपार्षदाः - विष्णुचे पार्षद - तत्र - तेथे - उपव्रज्य - जवळ येऊन - अतिदूरचराः - फारच दूर उभे न राहणारे - मूर्घ्नि - मस्तकावर - बद्धाञ्जलिपुटाः - हात जोडिले आहेत ज्यांनी असे - आसीनं - बसलेल्या - तीव्रतेजसं - प्रखर तेजाच्या - नरशार्दूलं - पुरुषोत्तमाला - पृथक् - निरनिराळ्या रीतीने - ईडिरे - स्तविते झाले. ॥ ३७-३९ ॥

पवित्रकर्मणे - शुद्ध कर्मे करणार्‍या - स्वलीलया - स्वतःच्या लीलेने - गुणैः - गुणांनी - विश्वस्य सर्गस्थितिसंयमान् - जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार - संदधते - करणार्‍या - अव्ययात्मने - अविनाशी अशा - विचित्रवीर्याय - ज्याचे पराक्रम अद्‌भुत आहेत अशा - दुरन्तशक्तये - अपार आहे शक्ती ज्याची अशा - अनंताय - अनंताला - नतःअस्मि - नमस्कार करितो. ॥ ४० ॥

ते - तुझा - कोपकालः - कोपाचा समय - युगान्तः (अस्ति) - युगाचा अंत होय - अयं - हा - अल्पकः - क्षुद्र - असुरः - राक्षस - हतः - मारिला गेला - भक्तवत्सल - हे भक्तवत्सला - उपसृतं - जवळ आलेल्या - तत्सुतं - त्या दैत्याचा पुत्र अशा - ते भक्तं - तुझ्या भक्ताला - पाहि - राख ॥ ४१ ॥

परम - हे परमेश्वरा - नः त्रायता - आमचे रक्षण करणार्‍या - भवता - तुझ्याकडून - स्वभागाः - स्वतःचेच हविर्भाग - प्रत्यानीताः - परत आणिले गेले - त्वद्‍गृहं - तुझे वसतिस्थान असे - दैत्याक्रान्तं - दैत्यांच्या भीतीने ग्रासिलेले - हृदयकमलं - आमचे हृदयकमळ - प्रत्यबोधि - प्रफ़ुल्लित झाले - अहो नाथ - अहो स्वामिन् - नारसिंह - हे नृसिंह - ते शुश्रुषतां - तुझी सेवा करणार्‍यांना - इदं - हे - कालग्रस्तं - काळाच्या तडाक्यात सापडलेले ऐश्वर्य - कियत् (अस्ति) - काय होय - हि - कारण - तेषां - त्यांना - मुक्तिः - मोक्षसुद्धा - बहुमता - बहुमत - न - नाही - अपरैः - इतरांशी - किं (कर्तव्यं) - काय करावयाचे आहे ॥ ४२ ॥

आदिपुरुष - हे आदिपुरुषा - येन - ज्याच्या योगाने - आत्मगतं - आत्मस्वरुपी लीन असलेले - इदं - हे विश्व - ससर्ज - उत्पन्न करिता झालास - (तत्) आत्मतेजः - ते स्वतःचे प्रभावरुपी - परमं - श्रेष्ठ असे - यत् - जे - तपः - तप - त्वं - तू - नः - आम्हाला - आत्थ - सांगता झालास - तत् - ते - अमुना - ह्या दैत्याने - विप्रलुप्तं - नष्ट केलेले - पुनः - पुनः - अद्य - आता - शरण्यपाल - हे शरणगतरक्षका - रक्षागृहीतवपुषा - रक्षणासाठी घेतलेल्या या शरीराने - (त्वं) अन्वमंस्थाः - तू मान्य केलेस ॥ ४३ ॥

नः - आमच्या - तनूजैः - मुलांनी - दत्तानी - दिलेली - श्राद्धानि - श्राद्धे - प्रसभं - बलात्काराने - अघिबुभुजे - भक्षण करिता झाला - तीर्थसमये - तीर्थस्नानाच्या वेळी - तिलांबु अपि - दिलेले तिलोदकहि - अपिबत् - पिता झाला - तस्य - त्याच्या - नखविदीर्णवपात् - नखांनी फाडली आहे त्वचा ज्याची अशा - उदरात् - उदरापासून - आर्च्छत् - बाहेर काढिले - तस्मै - त्या - अखिलधर्मगोप्त्रे - सर्व धर्माचे रक्षण करणार्‍या - नृहरये - नृसिंहाला - नमः - नमस्कार असो ॥ ४४ ॥

नृसिंह - हे नरहरि - यः असाधुः - जो दुष्ट दैत्य - नः - आमच्या - योगसिद्धां - योगबलाने मिळविलेल्या - गतिं - अणिमादिक सिद्धिंना - योगतपोबलेन - योग व तप यांच्या सामर्थ्याने - अहारषीत् - हरण करिता झाला - तं - त्या - नानादर्पं - नानाप्रकारे गर्व वहाणार्‍या दैत्याला - नखैः - नखांनी - (भवान्) निर्ददार - तू फाडिता झालास - तस्मै - त्या - तुभ्यं - तुम्हाला - प्रणताः स्म - वंदन करितो ॥ ४५ ॥

अज्ञ - मूढ - बलवीर्यदृप्तः - बल व पराक्रम यांनी गर्विष्ठ असा तो दैत्य - पृथग्धारणया - स्वतंत्रपणे धारण करुन - अनुराद्धां विद्यां - संपादिलेल्या गुप्त होण्याच्या विद्येला - न्यषेधत् - हिरावून घेता झाला - सः - तो - येन - ज्याने - संख्ये - युद्धांत - पशुवत् - पशूप्रमाणे - हतः - मारिला - तं - त्या - मायानृसिंहं - मायेने नृसिंहस्वरुप घेतलेल्या तुला - नित्यं - नित्य - प्रणताः स्म - नमस्कार करितो ॥ ४६ ॥

येन - ज्या - पापेन - पाप्याने - नः - आमची - रत्नानि - रत्ने - स्त्रीरत्नानी - उत्तम स्त्रिया - हृतानि - हरिल्या - तद्वक्षःपाटनेन - त्याचे वक्षःस्थळ विदारण करुन - आसां - या स्त्रियांना - दत्तानंद - ज्याने आनंद दिला आहे अशा हे नृसिंहा - ते - तुला - नमः अस्तु - नमस्कार असो ॥ ४७ ॥

देव - हे परमेश्वरा - तव - तुझ्या - निदेशकारिणः - आज्ञेचे पालन करणारे - वयं - आम्ही - मनवः - मनु - दितिजेन परिभूतसेतव - हिरण्यकशिपूने ज्यांच्या धर्ममर्यादा मोडिल्या आहेत् असे - प्रभो - हे परमेश्वरा - भवता - तुझ्याकडून - सः - तो - खलः - दुष्ट - उपसंहृतः - मारिला गेला - ते - तुझे - किं - काय - (वयं) करवाम - आम्ही करावे - किंकरान् (नः) - सेवक अशा आम्हाला - अनुशाधि - आज्ञा कर ॥ ४८ ॥

परेश - हे परमेश्वरा - ते अभिसृष्टाः - तू उत्पन्न केलेले - वयं - आम्ही - प्रजेशाः - प्रजापिता - येन - ज्याने - निषिध्दाः (सन्तः) - प्रतिबंध केलेले - प्रजाः - प्रजा - वै - खरोखर - न सृजामः - उत्पना करु शकत नाही - सः - तो - एषः - हा दैत्य - त्वया - तुझ्याकडून - भिन्नवक्षाः - ज्याचे वक्षःस्थळ विदारिले गेले आहे असा - शेते - पडला आहे - सत्त्वमूर्ते - हे सत्वस्वरुपा - नु - निश्चये करुन - (अयं ते) अवतारः - हा तुझा अवतार - जगन्मङगलं (अस्ति) - जगाचे कल्याण करणारा होय ॥ ४९ ॥

विभो - हे परमेश्वरा - ते - तुझी - नटनाटयगायकाः - नाचणे, गाणे इत्यादिकांनी सेवा करणारे - वयं - आम्ही - येन - ज्या दैत्याकडून - वीर्यबलोजसा - वीर्य, बल व शक्ति यांच्या योगे - आत्मसात् - स्वाधीन - कृताः - केले गेले - सः - तो - एषः - हा दैत्य - भवता - तुझ्याकडून - इमां दशां - ह्या अवस्थेला - नीतः - पोचविला गेला - उत्पथस्थः - अनीतीने चालणारा - कुशलाय - कल्याणाला - कल्पते किम् - प्राप्त होतो काय. ॥ ५० ॥

हरे - हे प्रभो - तव - तुझ्या - भवापवर्गं - संसारभयापासून सोडविणार्‍या - अंघ्रिपंकजं - चरणकमळाला - (वयं) आश्रिताः - आम्ही अवलंबून राहिलो आहो - यत् - कारण - त्वया - तुझ्याकडून - एषः - हा - साधुहृच्छयाः - साधूंच्या हृदयात सलणारा - असुरः - दैत्य - समापितः - संहारिला गेला. ॥ ५१ ॥

मनौज्ञैः - मनाजोग्या - कर्मभिः - कर्माच्या योगे - वयं - आम्ही - ते - तुझ्या - अनुचरमुख्याः (भूताः) - सेवकांमध्ये अग्रगण्य झालो - ते - ते आम्ही - इह - या ठिकाणी - दितिसुतेन - हिरण्यकशिपुकडून - वाहकत्वं - भोयांच्या दशेला - प्रापिताः - आणिले गेलो - पंचविंश - हे पंचविसाव्या - नरहरे - नृसिंहा - तत्कृतं - त्याने केलेल्या - जनपरितापं - लोकसंतापाला - जानता - जाणणार्‍या - ते - तुझ्याकडून - सः - तो दैत्य - तु - तर - पंचतां - मृत्युप्रत - उपनीतः - नेला गेला. ॥ ५२ ॥

वयं - आम्ही - किंपुरुषाः (स्म) - तुच्छ पुरुष आहो - त्वं - तू - तु - तर - महापुरुषः - महापुरुष असा - ईश्वरः (असि) - परमेश्वर आहेस - अयं - हा - कुपुरुषः - निंद्य पुरुष हिरण्यकशिपु - यदा - जेव्हा - साधुभिः - साधूंनी - धिक्कृतः - धिक्कारिला गेला - (तदा एव) नष्टः - तेव्हाच नष्ट झाला. ॥ ५३ ॥

सभासु - सभांमध्ये - सत्त्रेषु - यज्ञांमध्ये - तव - तुझे - अमलं - निर्मळ असे - यशः - यश - गीत्वा - गाऊन - महती - मोठया - सपर्यां - मानाला - लभामहे - मिळवीत होतो - भगवन् - हे भगवंता - यः - जो दैत्य - तां - त्या आमच्या मनाला - भृशं - अगदी - व्यनैषीत् - दूर करिता झाला - एषः - तो हा - दुर्जनः - दुष्ट - यथा आमयः (तथा) - जसा रोग तसा - ते - तुझ्याकडून - द्विष्टया - सुदैवाने - हतः - मारिला गेला. ॥ ५४ ॥

ईश - हे ईश्वरा - तव - तुझे - अनुगाः - अनुचर असे - वयं - आम्ही - किन्नरगणाः - किन्नरगण - अमुना - ह्या - दितिजेन - दैत्याकडून - विष्टिं - वेठीला - अनुकारिताः - लाविले गेलो होतो - हरे - हे नृसिंहा - भवता - तुझ्याकडून - सः - तो - वृजिनः - दुष्ट पापी - अवसादितः - मारिला गेला - नरसिंह - हे नरहरे - नाथ - हे स्वामिन - (त्वं) नः विभवाय - तू आमचे कल्याण करणारा - भव - हो. ॥ ५५ ॥

शरणद - हे आश्रयदात्या - अद्य - आज - एतत् - हे - ते - तुझे - सर्वलोकशर्म - सर्व लोकांचे कल्याण करणारे - अद्‌भुतं - चमत्कारिक - हरिनररूपं - नरसिंहरूप - (नः) दृष्टं - आम्हाकडून पाहिले गेले - ईश - हे परमेश्वरा - सः - तो - अयं - हा - ते - तुझा - विधिकरः (अस्ति) - सेवक होय - विप्रशस्तः - ब्राह्मणांनी शापिलेल्या - तस्य - त्याचे - इदं - हे - निधनं - मरण - अनुग्रहाय - अनुग्रहासाठी - विद्मः - आम्ही समजतो. ॥ ५६ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय आठवा समाप्त

GO TOP