शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(३२६) प्रमादाने काय होते हे सांगण्यास आणखी एक उदाहरण.

यथापकृष्टं शैवालं क्षणमात्रं न तिष्ठति ।
आवृणोति तथा माया प्राज्ञ वापि पराङ्‌मुखम् ॥ ३२६ ॥
(पाण्यावरील) शेवाळ बाजूला केले तरी ते त्या स्थितीत क्षणभरसुद्धा राहत नाही, त्याप्रमाणे (जरी मुमुक्षूने बाजूला सारली असली तरीसुद्धा) माया ही शहाणा मुमुक्षू जर पराडूमुख झाला तर त्याला झाकते.


पाण्यावर शेवाळ येते. ते बाजूला केले तरी ते क्षणभरसुद्धा तसे राहत नाही. ते लगेच पुनः पाण्याला झाकून टाकते. मायेकडे दुर्लक्ष करून मुमुक्षू ब्रह्मनिष्ठ झाला आहे; त्या ब्रह्मनिष्ठेत प्रमादाविस्मृती होता कामा नये (श्लोक २२३, ३२५ ). आता, मुमुक्षूला वाटले की क्षणभर विषयांकडे लक्ष द्यावे. याचा अर्थ तो ब्रह्मनिष्ठेला पराडूमुख झाला. या क्षणाचा फायदा माया/अविद्या घेते आणि ती मुमुक्षूला पुनः आपल्या जाळ्यात पकडते.


(३२७) ब्रह्मनिष्ठेकडे क्षणभर जरी दुर्लक्ष झाले तर काय घडू शकते, हे पुनः एकदा आणखी एक उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे.

लक्ष्य-च्युतं चेद्‌यदि चित्तमीषद् बहिर्मुख संनिपते ततस्ततः ।
प्रमादतः प्रचत-केलि-कदुकः सोपान-पंक्तौ पतितो यथा तथा ॥ ३२७ ॥
(ब्रह्म या) लक्ष्यावरून स्तुत झालेले /बाजूला गेलेले चित्त जर (पुनः) (विषयांकडे) बहिर्मुख होऊन पडेल, तर मग बेसावधपणामुळे (हातातून) सुटून गेलेला खेळण्याचा चेंडू जसा जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली घरंगळत जातो, (तद्‌वत) (मन विषयांमध्येच घोटाळत राहते).


मन सतत ब्रह्मावर केंद्रित करण्याची खबरदारी मुमुक्षूने घेतली पाहिजे. ब्रह्माला पराष्ट्रख झालेले मन पुनः विषयांकडे धावेल आणि त्यांतच ते गुंतून पडेल. ते पुनः ब्रह्माकडे आणण्यास प्रयत्‍न करावे लागतील. ते टाळण्यास मन हे ब्रह्मावरून दुसरीकडे जाऊ देता कामा नये.


(३२८) विषयांत पुनः मन गुंतले तर -

विषयेष्वाविशच्चेतः संकल्पयति तद्-गुणान् ।
सम्यक संकल्पनात् कामः कामात् पुंसः प्रवर्तनम् ॥ ३२८ ॥
जर मन विषयांमध्ये घुसेल तर ते विषयांच्याच गुणांचा विचार करू लागेल. त्या विचारापासून लगोलग (सम्यक्) काम/इच्छा निर्माण होते आणि त्या कामामुळे माणसाची प्रवृत्ती पुनः विषयांकडे वळते.


एकदा का ब्रह्मापासून ढळले मन विषयांत घुसले की ते विषयांचाच विचार करू लागते. असे विचार मनात आले की त्या त्या विषयाची अभिलाषा निर्माण होते. या अभिलाषेमुळे ते ते पदार्थ/विषय प्राप्त करून घेण्याकडे माणसाची प्रवृत्ती होते आणि मग ब्रह्माकडे लक्ष देण्यास त्याला वेळच राहत नाही.


(३२९) म्हणून ब्रह्मनिष्ठेच्या बाबतीत प्रमाद करू नये. उलट मन ब्रह्मातच कसे गुंतून राहील यासाठी प्रयत्‍न चालू ठेवावयास हवा.

अतः प्रमादान्न परोऽस्ति मृत्युर्विवेकिनो ब्रह्मविदः समाधौ ।
समाहितः सिद्धिमुपैति सम्यक् समाहितात्मा भव सावधानः ॥ ३२९ ॥
म्हणून ब्रह्म जाणणाऱ्या विवेकी माणसाच्या बाबतीत, प्रमादापेक्षा आणखी दुसरा मृत्यू नाही. ब्रह्माचे ठायी मन एकाग्र करणारा (मोक्ष) सिद्धीप्रत जातो. (म्हणून हे शिष्या) सावधानपणाने (ब्रह्माचे ठिकाणी) मन एकाग्र करणारा हो. ब्रह्मावरील मनाच्या एकाग्रतेत जर फरक पडला, तर त्याच्या परमार्थाचा नाश होतो. या उलट जो कोणी ब्रह्मावर मन एकाग्र करून राहतो तो मोक्षाची सिद्धी प्राप्त करून घेतो.



(३३०) ब्रह्मस्वरूपावरून ज्याचे मन च्युत झाले त्याचा नाश होतो.

ततः स्वरूप-विभ्रंशो विभ्रष्टस्तु पतत्यधः ।
पतितस्य विना नाशं पुनर्नारोह ईध्यते ।
संकल्पं वर्जयेत् तस्मात् सर्वानर्थस्य कारणम् ॥ ३३० ॥
(प्रमाद केल्या) नंतर (ब्रह्म- )स्वरूपापासून घसरण होते. जो घसरतो तो खाली जातो/पडतो. जो खाली पडला त्याला नाशाशिवाय पुनः चढणे हे दिसून येत नाही. म्हणून सर्व अनर्थांचे कारण असणारा संकल्प सोडून द्यावा.


ब्रह्मनिष्ठेत प्रमाद करणारा खाली पडतो व नाश पावतो. येथे नाश म्हणजे त्याच्या भौतिक शरीराचा नाश नव्हे. ब्रह्मस्वरूपातून स्तुत झालेला विषयांत घोटाळू लागला की त्याच्या पारमार्थिक जीवनाचा नाश होतो. त्यातून सावरणे इतके अवघड आहे की असा स्वरूपभ्रष्ट झालेला माणूस पुनः ब्रह्माकडे वळला असे घडतांना दिसत नाही. म्हणून प्रमादाला कारणीभूत ठरणारा विषयाचा संकल्प टाळावयास हवा.

'संकल्प वर्जयेत् ..... कारणम् ', ही ओळ येथे श्लोक ३३० ची तिसरी ओळ म्हणून घेतली आहे.

चिन्मयानंद-संपादित पुस्तकात असे आढळतेः -
संकल्प वर्जयेत् तस्मात् सर्वानर्थस्य कारणम् ।
अपथ्यानि हि वस्तूनि व्याधिग्रस्तो यथोस्मृजेत् ॥ ३२८ ॥
(ज्याप्रमाणे रोगग्रस्त माणूस अपथ्य वस्तू सोडून देतो, त्याप्रमाणे सर्व अनर्थांचे कारण असणारा संकल्प टाळावा). 'अपथ्यानि 'इत्यादी चरण अन्य प्रतीत सापडत नाही.


(३३१) ब्रह्मरूप झालेला ब्रह्माप्रमाणे अद्वैत होतो. त्याला चुकून जर भेद जाणवला, तर -

जीवतो यस्य कैवल्यं विदेहे च स केवलः ।
यत्र किंचित् पश्यतो भेदं भयं ब्रूते यजु-श्रुति ॥ ३३१ ॥
जिवंत/विद्यमान असताना ज्याला मुक्ती मिळालेली आहे, तो देहपातानंतर केवळ एकटाच असतो. जो कोणी थोडासा तरी भेद पाहतो, त्याला (जन्ममरणादि) भय प्राप्त होते, असे यजुः श्रुती सांगते.


जीवमुक्ताला ब्रह्माच्या एकत्वाचा अनुभव येत असतो. मरणोत्तर तो ब्रह्माशी एकरूप होऊन एकच होतो. आता जीवमुक्त अवस्थेत जर त्याला द्वैत दिसू लागले तर त्याला भय प्राप्त होते असे यजुः धुती सांगते. येथे यजुः धुती शब्दाने यजुर्वेदाशी निगडित असणारे तैत्तिरीय उपनिषद अभिप्रेत आहे. ते असे सांगते - जो कोणी ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो त्याला अभय प्राप्त होते (अथ सोः भय गतो भवति । ) यदा हि एव एषः एतस्मिन् उदर अंतरं कुरुते अथ तस्य भय भवति । ब्रह्मवही, ७ वा अनुवाक) ब्रह्म आनंदरूप आहे. आता ब्रह्मरूप झालेल्याला. जर ब्रह्माच्या एकत्वात फरक/भेद वाटू लागला तर जेथे भीती निर्माण होते. ही भीती अर्थात् पुनः जन्म-मरणाची आहे. म्हणजे असे - अद्वैत ब्रह्मरूप झाल्यावरही जर पुनः भेदाद्वैत जाणवू लागेल, तर ते घातक ठरेल.


(३३२)

यदा कदा वापि विपश्चिदेष ब्रह्मण्यनंतेऽप्यणु-मात्र-भेदम् ।
पश्यत्यथामुष्य भयं तदैव यद् वीक्षितं भिनतया प्रमादात् ॥ ३३२ ॥
जो (जीवमुक्त) विद्वान् केव्हाना केव्हातरी अनंत अशा ब्रह्मात अगदी अरगुप्रमाण भेद आहे असे पाहतो, तेव्हाच त्याला (अमुष्य) भय निर्माण होते; कारण प्रमादामुळे त्याने भेद पाहिला (भिनतया वीक्षितम).


ब्रह्म हे भेदरहित अद्वैत आहे. जीवमुक्ताला सर्वत्र अभिन्न अद्वैत असे ब्रह्मच दिसावयास हवे. पण जर त्याला ब्रह्माखेरीज अपमात्र भिन्न असे काही दिसले, तर त्याला भीती निर्माण होते. प्रमादामुळे तो अभेदात भेद पाहू लागतो असा प्रमाद त्याचेकडून होता कामा नये.


(३३३) बाह्य दृश्याविषय म्हणजे मी असे मानणारा दुःखी होतो.

श्रुति-स्मृति-न्याय-शतैर्निषिद्धे दृश्येऽत्र यः स्वात्म-मतिं करोति ।
उपैति दुःखोपरि दुःखजातं निषिद्ध-कर्ता स मलिम्लुचो यथा ॥ ३३३ ॥
शेकडो श्रुती, शेकडो स्मृती आणि शेकडो न्याय यांनी ज्याचा निषेध केला आहे, अशा या जगातील (अन्न) दृश्याच्या ठिकाणी जो माणूस अहंबुद्धी अहंकार धारण करता, तो माणूस निंद्य कर्म करणाऱ्या (निषिद्ध कर्ता) मलिन पुरुषाप्रमाणे दुःखावर फक्त दुःखेच प्राप्त करून घेत असतो.


येथे 'शेकडो धुती, शेकडो स्मृती, आणि शेकडो न्याय ', ही अतिशयोक्ती आहे. काही सुती, स्मृती व तर्क (न्याय) यांनी दृश्य हे मिथ्या आहे, असा दृश्याचा निषेध केला आहे. अशा स्थितीत जर कोणी दृश्य हे सत्य आहे असे मानून, त्यावर - स्त्री, पुत्र, देह इत्यादींवर - मी म्हणजे आत्मा अशी धारणा (मति) करीत असेल तर त्याला दुःखापाठोपाठ दुःखे भोगावी लागतात. दृश्याला सत्य मानल्याने माणसाच्या पदरात दुःखेच पडतात. जसे - जो कोणी धुती, स्मृती इत्यादींनी निषिद्ध केलेली कर्मे करीत असेल तो दुःखी बनतो. निषिद्ध कर्मे करणारा कधी सुखी होत नाही. त्याप्रमाणे दृश्याला आत्मा मानणारा दुःखी होतो.

मलिम्लुच म्हणजे चोर. पण येथे प्रत्यक्ष चोर अभिप्रेत नाही तर चोराप्रमाणे निषिद्ध/वाईट कर्मे करणारा माणूस अभिप्रेत आहे.


(३३४)

सत्याभिसंधान-रतो विमुक्तो महत्त्वमात्मीयमुपैति नित्यम् ।
मिथ्याभिसंधान-रतस्तु तश्येद् दृष्ट नदेतद् यदचौर-चौरयोः ॥ ३३४ ॥
सत्याच्या अनुसंधानात/आचरणात रत असणारा पुरुष हा सतत मोकळा (विमुक्त) राहून स्वतःचा मोठेपणा प्राप्त करून घेतो. याउलट मिथ्या गोष्टींचे अनुसंधान-आचरण-करणारा नष्ट होतो. असा हा सज्जन आणि चोर यांतील फरक दिसून येतो.


सत्य ब्रह्माचे अनुसंधान करण्यात तत्पर असणारा पुरुष मुक्त होऊन स्वतःचे नित्य मोठेपणा म्हणजे ब्रह्मत्व प्राप्त करून घेतो. याउलट देह इत्यादी मिथ्या वस्तूंचे अनुसंधान करण्यात तत्पर असणारा माणूस नष्ट होतो म्हणजे संसारात बुडून जातो. वरील संदर्भात साव (अचौर) आणि चोर यांचे उदाहरण दिले आहे. यात छादोग्य उपनिषदाने सांगितलेल्या कथेचा संदर्भ असण्याची शक्यता आहे. छांदोग्य उपनिषद सांगते - एकदा चोरी झाली. संशयाने दोघांना पकडण्यात आले. दोघांच्याही हातांत तापलेले परशू देण्यात आले. ज्याने चोरी केली नव्हती तो सत्याला चिकटून राहिला. तो खरा असल्याने परशूने त्याचा हात भाजला नाही. ते पाहून तो चोरीच्या आरोपातून मोकळा केला जातो. याउलट चोरी करणाऱ्याचा हात परशूने भाजतो. तेव्हा तो खरा चोर आहे हे जाणून त्याला बडवले जाते/मारले जाते. (६. १६. १-२)

तात्पर्य - सत्य ब्रह्माचे चिंतन करणारा संसारातून सुटून ब्रह्मरूप होतो. याउलट जो जग इत्यादी मिथ्या पदार्थांत आणि त्यांच्या चिंतनात गुंतून राहतो, तो नष्ट होतो म्हणजे संसारात बुडल्याने तो बंधनातच राहतो.


(३३५)

यतिरसदनुसंधिं बंध-हेतुं विहाय
स्वयमयमहस्मीत्यादि-टष्ट्यैव तिष्ठेत् ।
सुखयति ननु निष्ठा ब्रह्मणि स्वानुभूत्या
हरति परमविद्या-कार्य-दुःखं प्रतीतम् ॥ ३३५ ॥
(मुमुक्षू संयमी पुरुषाने बंधाचे कारण असणारे असत्/मिथ्या पदार्थांचे चिंतन, अनुसंधान सोडून, 'हा मी (अय अहं) स्वतः (स्वयं) (सत् ब्रह्म आहे) अशी दृष्टी बाळगून (नेहमी) राहावे. (ब्रह्म-) स्वरूपाच्या अनुभूतीने ब्रह्माच्या ठायीची निष्ठा ही खरोखर सुख देते आणि अविद्येचे कार्य या स्वरूपात भासणारे (प्रतीत) महार दु ख दूर करते.


जन्ममरणादि बंधांचे कारण आहे. 'असत् असा 'लतात्मा म्हणजे मी आत्मा '. हे अनुसंधान टाकून देऊन, 'हा आत्मा म्हणजे मी स्वतःच आहे 'अशी दृष्टी बाळगून राहावे. 'मी म्हणजे आत्मा ', या स्वरूपात स्वतःच्या अनुभवाने जी ब्रह्मनिष्ठा/आत्मनिष्ठा होते ती संयमी पुरुषाला सुखकारक होते, आणि ती नेहमी प्रत्ययाला येणारे अविद्येचे कार्य असणारे जे दुःख ते ती दूर करते. अज्ञानाने असत् विश्व भासते. त्याचे अनुसंधान हे बंधाचे आणि दुःखाचे कारण बनते. याउलट. मी ब्रह्माआत्मा आहे ', हे अनुसंधान राहिले तर ते सांसारिक दुःख दूर करून सुखदायक होते.

म्हणून पुढील श्लोक ३३६ सांगतो की बाह्य मिथ्या/असत् दृश्याविषयीचे चिंतन सोडून, स्वतःच्या आत्म्याचे अनुसंधान करीत राहणे हे श्रेयस्कर आहे.


(३३६)

बाह्यानुसंधिः परिवर्धयेत् फलं दुर्वासनामेव ततस्ततोऽधिकाम् ।
ज्ञात्वा विवेकैः परिहृत्य बाह्यं स्वात्मानुसंधिं विदधीत नित्यम् ॥ ३३६ ॥
बाह्य (दृश्याचे-विषयाचे) अनुसंधान हे वाईट वासनारूपी फळच अधिकाधिक वाढवीत असते. ही गोष्ट सतत विचाराने जाणून घेऊन, बाह्य (विषया) चे अनुसंधान टाळावे आणि स्वतःच्या प्रत्यर्क आत्म्याचे अनुसंधान सतत ठेवावे.


बाह्य दृश्य विषय हे सर्व अनात्या आहे. त्याचेच चिंतन करीत बसले तर आत्म्यापासून दूर नेणाऱ्या वाईट वासना हे फळ सतत मिळते आणि वाढत जाणाऱ्या वासना जर फलद्रूप झाल्या नाहीत तर पदरात दुःखच पडते. ही गोष्ट सतत विवेक करून जाणून घ्यावी. मग अनात्म्यावरून लक्ष काढून घेऊन स्वतःच्या अंतर आत्म्याकडे वळावे. स्वतःचा अंतरात्मा/प्रत्यगात्मा सुखरूप आहे. त्याचेच सतत चितन/अनुसंधान करीत राहिल्यास संयमी माणसाला सुखच मिळणार आहे.


(३३७) अनात्म्यावरून लक्ष काढल्याने होणारे फायदे असे आहेत -

बाह्ये निरुद्धे मनसः प्रसन्नता मनःप्रसादे परमात्म-दर्शनम् ।
तस्मिन् सुदृष्टे भब-बंध-नाशो बहिर्निरोधः पदवी विमुक्तेः ॥ ३३७ ॥
बाह्य विषयांकडे (धावणाऱ्या मनाचा) निरोध केला असता, मनाची प्रसन्नता लाभते. मन प्रसन्न झाले असता परमात्म्याचे दर्शन होते. परमात्म्याचे उत्तम दर्शन झाले असता संसाराच्या बंधनाचा नाश होतो. (अशाप्रकारे) बाह्य विषयांचा (मनाने) निरोध हा मुक्तीचा मार्ग (पदवी) आहे.


बाह्य विषयांत मन गुंतले तर आसक्ती आणि अहंकार वाढत जाऊन होणाऱ्या कर्मांच्या प्रभावाने जन्म-मरणरूप संसार दृढ होतो. तेच मन जर बाह्य विषयांतून निवृत्त झाले तर मन प्रसन्न म्हणजे शुद्ध होते. शुद्ध मनाला परमात्म्याचे दर्शन होते. म्हणून 'मनसा एष द्रष्टव्यः 'असे एक उपनिषद् सांगते आणि मग परमात्म्याचे दर्शन झाले की संसाराचा बंध तुटून जातो. म्हणून बाहेरील दृश्य विषयांतून मनाची परावृत्ती हाच मोक्षाचा मार्ग आहे.

असे असल्यामुळेच जो माणूस विवेकी आहे तो आपले मन बाह्य मिथ्या/असत् विषयांकडे जाऊ देत नाही.


(३३८)

कः पंडितः सन् सदसद्-विवेकी श्रुति-प्रमाणः परमार्थदर्शी ।
जानन् हि कुर्यादसतोऽवलंबं स्वपात-हेतोः शिशुवन्मुमुक्षुः ॥ ३३८ ॥
वेदाला प्रमाण मानणारा, अंतिम बझ या सत् तत्त्वाचे ज्ञान झालेला, सत् आणि असत् यांचा विवेक करणारा कोणता शहाणा (पंडित) मुमुक्षू हे सर्व जाणत असता, एखाद्या लहान मुलाप्रमाणे, आपल्या (संसारातील) पतनाचे कारण असणाऱ्या अशा (बाह्य) असत् (मिथ्या) वस्तूंवर अवलंबून राहील ?


वेदाने - उपनिषदांनी सांगितले आहे की ब्रह्म हे सत् आहे आणि विश्व हे असत्र/मिथ्या आहे. यावरून ब्रह्म हे एकमेव एक सर्वोच्च तत्त्व (परमार्थ) आहे. हे मुमुक्ष्या कळलेले आहे. असते, जड, मिथ्या अशा अनाक्याचे मागे लागून नये असे गुरूने सांगितले आहे. या स्थितीत शहाणा मुमुक्षू मिथ्या बाह्य विश्वाकडे लक्ष देईल काय ? उत्तर नाही असे आहे. येथे लहान मुलाचे उदाहरण दिले आहे. पतनासापडण्यास कारणीभूत होणाऱ्या वस्तू कडे लहान मूल लक्ष देत नाही. तसे करावयाचे नाही. संसारात पाडणाऱ्या बाह्य वस्तू कडे शहाण्या माणसाने लक्ष द्यावयाचे नाही.


(३३९) देहाला मी आत्मा असे मानणाऱ्या माणसाला मोक्ष मिळत नाही. याउलट जीवन्मुक्त माणसाचा 'देह म्हणजे मी', असा अभिमान असत नाही.

देहादि-संसक्तिमतो न मुक्तिर्मुक्तस्य देहाद्यभिमत्यभावः ।
सुखाय नो जागरणं न जाग्रतः स्वप्नस्तयोर्भिन्न-गुणाश्रयत्वात् ॥ ३३९ ॥
देह इत्यादीवर आसक्ती असणाऱ्या माणसाला मुक्ती (मिळत) नाही. आणि जीवन-) मुक्त पुरुषाचा देह इत्यादीवर अभिमान असत नाही. जसे - झोपी गेलेल्या माणसाला जागृती नसते, आणि जागे असागाऱ्याला झोप नसते; कारण ते दोघे भिन्न गुणांच्या आश्रयाने असतात.


झोपेत अज्ञान असते आणि जागृतीत ज्ञान असते. म्हणजे या दोन अवस्था या ज्ञान आणि अज्ञान या भिन्न गुणांवर आधारित आहेत. म्हणून जागृती असताना निद्रा असत नाही आणि निद्रा असताना जागृती असत नाही. येथे निद्रित माणूस म्हणजे देहासक्त पुरुष आणि जागत पुरुष म्हणजे देहासक्ती नसणारा जीवमुक्त होय. देहावर आसक्ती आणि अनासक्ती हे भिन्न गुणधर्म आहेत. त्यावर बंध आणि मोक्ष अवलंबून असतात. देहासक्त माणसाला मुक्ती मिळत नाही आणि देहासक्ती नसणाऱ्याला मुक्ती मिळते.


(३४०) जीवन्मुक्त कोण ते आता सांगितले आहे -

अंतर्बहिः स्वं स्थिर-जंगमेषु ज्ञात्वात्मनाधारतया विलोक्य ।
त्यक्ताखिलोपाधिरखंडरूपः पूर्णात्मना यः स्थित एष मुक्तः ॥ ३४० ॥
आत्मा हाच आधार/अधिष्ठान असल्यामुळे स्थावर जंगम पदार्थांत आत-बाहेर आपण (म्हणजे प्रत्यगात्मा) (स्व) आहे हे जाणून म्हणजे तशी दृष्टी पत्करून, जो सर्व उपाधीचा त्याग करतो आणि संपूर्णपणे (पूर्णात्मना) अखंड (असे परमात्यरूप) होऊन जो राहतो, तो हा मुक्त होय.


गुरूने सांगितलेली अध्यारोपाची प्रक्रिया जीवमुक्ताला कळलेली आहे. त्या प्रक्रियेप्रमाणे स्व म्हणजे प्रत्यगात्मा ? परमात्मा यावर स्थावर-जंगमात्मक विश्वाचा अभ्यास होतो. म्हणजे स्थावर जंगम पदार्थांच्या आत आणि बाहेर फक्त आत्मा हाच आधाराअधिष्ठान आहे. हे कळल्यावर लक्षात येते की स्थावर आणि जंगम असे विश्व ही आत्म्याला आलेली उपाधी आहे, आणि त्या उपाधीमध्ये अंतरात्मारूपाने आत्मा/परमात्मा आहे. असे आत्मामुळे मुमुक्षू उपाधीकडे लक्ष देत नाही. मग त्याला कळते की एकच अखंड आत्मरूप म्हणजे स्वतःचेच रूप सर्वच आहे. हे कळल्यावर मनन, निदिध्यासन यांच्या अभ्यामने तो संपूर्णपणे अखंड आत्मरूप होऊन राहतो. तोच जीवचत ?. उदा., देह या उपाधीकडे दुर्लक्ष केले की आपण प्रत्यगात्मा आहोत हे कळते आणि ते जाणणारा प्रत्यगात्मरूप/परमात्ममरूप होऊन रहातो. तो विद्यमान जीवनातच परमात्यरूप झाला असल्याने त्याला जीवम्युक्त असे म्हणतात.


(३४१) सर्वच आत्मदर्शन हे संसार-बंधनातून सुटण्याचे साधन आहे. ते कसे प्राप्त होने ते श्लोक ३४१ मध्ये सांगितले आहे.

सर्वात्मना बंध-विमुक्ति-हेतुः सर्वात्म-भावान्न परोऽस्ति कश्चित् ।
दृश्याग्रहे सर्युपपद्यतेऽसौ सर्वात्म-भावोऽस्य सदात्मनिष्ठया ॥ ३४१ ॥
बंधनातून संपूर्णपणे (सर्वात्यना) सुटण्याचा उपाय/हेतू हा सर्वात्मभावाशिवाय अन्य कोणताही नाही. दृश्य (विश्वा) चे ग्रहण बंद झाल्याविना हा सर्वात्मभाव या (मुमुके च्या (अस्य) ठिकाणी आत्म्यावर सदा निष्ठा ठेवल्याने उत्पन्न होतो.


सर्व काही आत्मा आहे हे अंगी बाणल्याशिवाय संसाराच्या बंधनातून सुटका होत नाही आणि दृश्य-विषय म्हणजे मी अशाप्रकारची दृश्य विषयावरची आसक्ती नसेल तरच हा सर्वात्मभाव प्राप्त होतो.


(३४२) सर्वात्मभाव कसा शक्य आहे याविषयी एक प्रश्न व त्याचे उत्तर -

दृश्यस्थाग्रहणं कथं तु घटते देहात्मना तिष्ठतो
बाह्यार्थानुभव-प्रसक्त-मनसस्तत् तत् क्रियां कुर्वतः ।
संन्यस्ताखिल-धर्म-कर्म-विषयैर्नित्यात्म-निष्ठा-परै-
स्तत्त्वज्ञैः करणीयमात्मनि सदानंदेच्छुभिर्यत्‍ननः ॥ ३४२ ॥
देह म्हणजे आत्मा या बुद्धीने जो माणूस बाह्य विषयांचा अनुभव घेण्यात मनाने गुंतला आहे आणि त्यानुसार तो जोपर्यंत ती ती क्रिया करीत आहे, तोपर्यंत बाह्य दृश्याचे ग्रहण न होणे, हे कसे बरे शक्य आहे ? उत्तर) (ते शक्य होण्यास) सदा आनंदाची इच्छा करणाऱ्या (ब्रह्म हे) तत्त्व जाणणाऱ्या (मुमुक्षूंनी) आत्मनिष्ठेत नित्य तत्पर होऊन, प्रयत्‍नपूर्वक मनाने (आत्मनि) सर्व धर्म, कर्म आणि विषय यांचा त्याग करणे ही गोष्ट आवश्यक आहे.


देह म्हणजेच आत्मा असे मागून माणूस जोपर्यंत बाह्य पदार्थांचा अनुभव घेण्यात मनाने गुंतला आहे, तोपर्यंत बाह्य विषयांचे ग्रहण न होणे हे शक्य नाही. या माणसाला आत्म्याचे अधिष्ठान माहीत नाही, आत्म्यावर भासमान होणारे विषय खरे आहेत, असे मागून तो मनुष्य त्यांचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक त्या क्रिया करीत आहे, तोपर्यंत बाह्य दृश्य विषयांवरची त्याची आसक्ती कमी होणे शक्य नाही. अशा माणसाप्रमाणे ब्रह्माजिज्ञासू माणसाने वागू नये. जर त्याला सततचा .आत्मानंद हवा असेल, तर त्याने बाह्य विषयांशी निगडित असे सर्व वर्ण-आश्रम-धर्म, सर्व कर्मे आणि बाह्य विषय हे टाकले पाहिजेत म्हणजे मनातील विषयांची अभिलाषा आणि आसक्ती त्याने टाकावयास हवी. सर्वत्र अधिष्ठानरूपाने आत्मा आहे, हे निश्चितपणे समजून आणि सर्व विषय हे आत्म्यावर भासमान आहेत असा दृढ निश्चय त्याने करावयास हवा. तरच त्याची बाह्यविषयांतील आसक्ती नष्ट होईल. येथे 'सदानंद 'म्हणजे सदाचा/सततचा आनंद, तसेच सत् असा आत्म्याचा आनंद, असे दोन अर्थ होऊ शकतात.


(३४३) सर्वात्मभाव असा सिद्ध होतोः -

सर्वात्म-सिद्धये भिक्षोः कृत-श्रवण-कर्मणः ।
समाधिं विदधात्येषा शांतो दांत इति श्रुतिः ॥ ३४३ ॥
ज्याने (गुरूचे आणि केवलाद्वैत वेदांताचे) श्रवण केले आहे, अशा मनाने संन्यस्त पुरुषासाठी, 'शांतो दौतः 'ही श्रुती सर्वात्मभाव सिद्ध होण्यास समाधीचे विधान करते.


सर्वात्मभाव सिद्ध होण्यासाठी केवळ श्रुतीचे वचन आणि गुरूचे वचन यांचे श्रवण उपयोगी पडत नाही. म्हणजे असे - सर्वकाही ब्रह्म आहे, सर्वांचे अधिष्ठान ब्रह्म आहे, हे केवळ ऐकण्याने सर्वात्मभाव सिद्ध होत नाही. त्यासाठी श्रवणानंतर मनन आणि निदिध्यासन आणि मग ब्रह्माशी एकरूपता व्हावी लागते. ब्रह्माशी एकरूपता होण्यास ब्रह्मावर मनाचे केंद्रीकरण (समाधी) हवे, असे 'शांत दात 'इत्यादी श्रुतीचे सांगणे आहे. हे श्रुतीचे - वृहदारण्यक उपनिषद ४. ४. २३) वचन असे आहे -

तस्माद् एववित् शांतो दात उपरतः तितिसुः समाहितो भूत्या आत्मनि एव आत्मानं पश्यति, सर्व आत्मानं पश्यति । (म्हणून असे जाणणारा, शांत, (शमयुक्त), दात (इंद्रियदमनयुत)-), उपरत (विषयांतून निवृत्त), तितिसु (तितिक्षा पाळणारा) माणूस सनाधियुक्त होऊन आपल्यामध्येच आत्म्याचे स्वरूप पाहतो. सर्व काही आत्मा आहे असे तो पाहतो). आत्मा हा सर्वव्यापक असल्याने सर्व काही आत्माच आहे, असा सर्वात्मभाव त्याला प्राप्त होतो.

येथ 'शांत दांत' इत्यादी शब्दांनी शमादिषट्क अभिप्रेत आहे.


(३४४) सर्वात्मभाव प्राप्त होण्यास बाह्य विषयांची आसक्ती संपुष्टात यावयास हवी. त्यासाठी देह म्हणजे मी असा अहंकार नष्ट व्हावयास हवा. अहंकार हा सतत बळावत आहे आणि अनंत जन्मांच्या वासना मनात आहेत. त्या वासना व अहंकार नष्ट करणे हे अत्यंत अवघड आहे.

आरूढ-शक्तेरहमो विनाशः कर्तुं न शक्यः सहसापि पंडितैः ।
ये निर्विकल्पाख्य-समाधि-निश्चला स्तानंतरांनंत-भवा हि वासनाः ॥ ३४४ ॥
जे मुमुक्षू निर्विकल्पनामक समाधीमध्ये निश्चल झाले .असतील, त्यांच्याशिवारा (तान अंतरा) इतर तथाकथित शहाण्या माणसांकडून शक्ती वाढलेल्या अहंकाराचा नाश चट्‌दिशी होणे शक्य नाही. कारण (हि अनंत जन्मांमध्ये उत्पन्न झालेल्या वासना (मनात घर करून) आहेत.

देह म्हणजे मी या सततच्या वृत्तीने अहंकाराची वाढ झालेली आहे. त्यामुळे बाह्य विषयांची आसक्ती सुटत नाही आणि हा अहंकार बसवा झालेला आहे कारण माणसाच्या मनात अनंत जन्मांच्या ंr मी म्हणजे देह 'इत्यादी वासना खोलवर रुजलेल्या आहेत. या वासनांचा आणि अहंकाराचा नाश करणे सोपे नाही. त्यासाठी मुमुक्षूने 'निर्विकल्प 'नावाल्या - प्रकारच्या -समाधीत सतत राहवयास हवे. म्हणजे ब्रह्माशी एकरूप स्थितीत राहण्याचा सततचा अभ्यास अमेल तर दृढरक झालेल्या वासना आणि अहंकार यांचा प्रभाव पडू शकत नाही. त्या स्थितीत मुमुक्षूला सर्वात्मभाव प्राप्त होतो.

या 'निर्विकल्प 'समाधीचा खुलासा पुढे लोक ३६४, ३९५, ४१०, ४१२ या श्लोकात आलेला आहे.


(३४५) ही अहंकार-बुद्धी का वाढते याचे कारण असे -

अहं-बुड्या मोहिन्या योजयित्वावृतेर्बलात् ।
विक्षेप-शक्तिः पुरुष विक्षेपयति तद्-गुणेः॥ ३४५ ॥
आवरणशक्तीच्या सामर्थ्यामुळे मोहात पाडणाऱ्या अह-बुद्धीर्शा पुरुषाचा संयोग करून. विक्षेप-शक्ती ही आपल्या गुणांनी पुरुषाला विक्षिप्त /भ्रांतचित्त करते.


अविद्या त्रिगुणात्मक आहे. अविद्येतील तमोगुणाजवळ आवरण- शक्ती आहे. (श्लोक ११५), आणि ती रजोगुणाच्या विक्षेप- शक्तीला क्रियाशील बनवते. (श्लोक ११५). रजोगुणामुळे काम, क्रोध, अहंकार इत्यादी उत्पन्न होतात (श्लोक ११४) या गुणांनी विक्षेपशक्ती माणसाला विकारांच्या ताय्यात देऊन त्याला विक्षिप्त म्हणजे श्वातचित्त, चंचल करते. ब्रह्म या वस्तू ला झाकण्याचे कार्य आवरण- शक्ती करते. तिच्या सामर्थ्यामुळे विक्षेपशक्ती ही कार्यप्रवण होऊन काम, क्रोध, इत्यादी विकार आणि अहंकार निर्माण करते. विक्षेपशक्तीमुळे 'मी म्हणजे देह 'इत्यादी अहंबुद्धी पुरुषांच्या ठिकाणी निर्माण होते आणि मग विक्षेपशक्तीच्या ईर्ष्या इत्यादी गुणांमुळे माणूस मनाने विषयासक्त, चंचल, अस्थिर होतो. ती शक्ती त्याला कर्मप्रवृत्त करते आणि संसर ? बंधनात पाडते. या सर्वांचे मूळ आवरण- शक्ती आहे.

ही आवरण- शक्ती कशी नष्ट होते, हे पुढील श्लोक ३४६ मध्ये सांगितले आहे.


(३४६)

विक्षेप-शक्ति -विजयो विषमो विधातुं
निःशेषमावरण शक्ति-निवृत्त्यभावे ।
दृग्-दृश्ययोः स्फुट-पयो -जलवद् विभागे
नश्येत् तदावरणमात्मनि च स्वभावात् ।
निःसंशयेन भवति प्रतिबंधशून्यो
विक्षेपणं नहि तदा यदि चेन्मृषार्थे ॥ ३४६ ॥
जोपर्यंत आवरण शक्तीच्या निवृत्तीचा अभाव संपूर्णपणे झालेला नाही, तोपर्यंत वि क्षेप शक्तीवर विजय मिळविणे हे अत्यंत अवघड आहे. दूध (पयः) आणि पाणी यांच्या स्पष्ट पृ थक्करणाप्रमाणे जेव्हा ह आया ज्ञेय आणि द्रष्टा/ज्ञाता यांचे संपूर्णपणे वेगळे म्हणून पृथक्करण होईल, तेव्हा आत्मावर्गल आवरण शक्ती ही आपी आप/सहजपणे ; स्वभावात् ) नष्ट होईल. मिथ्या वस्तूंचे ठिकाणी जर विक्षेप होत नसेल, तर तेव्हा नि सशयपणाने, (त्या मुमुक्षूला) प्रतिबं ध-रहित (असा विक्षेप-शक्तीचा विजय) प्राप्त होतो.


अज्ञानाची आवरण शक्ती आहे तोपर्यंत वि क्षेप शक्ती कार्य करणारच. विक्षेप- शक्तीमुळे दृश्य (विश्व) खरे वाटते आणि त्याचा द्रष्टा असणारा आत्मा कळून येत नाही. पण जेव्हा मिथ्या द् श्यावरी ल वि क्षेप शक्ती संपते आणि द्रष्ट्याचे भान येते, तेव्हा प्रतिबंधरहित असा विक्षेपशक्तीवरील विजय शक्य होतो. जसे - हंस हा दूध आणि पाणी एकत्र असताना त्यांचे पृथक्करण करून फक्त दूधच घेतो, त्याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा यांच्या विवेकाने मुमुक्ष्या कळते की दृश्य अनात्मा मिथ्या आहे आणि द्रष्टा आत्मा सत्य आहे. तेव्हा आत्मावरील आवरणशक्ती दूर होते आणि मग मिथ्या असणाऱ्या अनाक्यावरील भान उडून जाऊन, ते फक्त आत्म्यावर केंद्रित होते. हाच भाग-पुढील श्लोकात अधिक स्पष्ट केला आहे.


(३४७)

सम्यग्-विवेकः स्फुट-बोध-जन्यो विभज्य दृग्-दृश्य-पदार्थ-तत्त्वम् ।
छिनत्ति माया-कृत-मोह-बंधं यस्माद् विमुक्तस्य पुनर्न संसृतिः ॥ ३४७ ॥
द्रष्टा आणि दृश्य या पदार्थाचे खरे स्वरूप वेगळे करून जाणल्यावर, त्या स्पष्ट ज्ञानाने उत्पन्न झालेला - जो योग्य तो विवेक तो मायेने केलेला मोहाचा बंध तोडून टाकतो; आणि मग त्या बंधातून सुटलेल्या मुमुक्षूला पुनः संसार नाही.


दृश्य पदार्थ अनात्मा आहेत आणि त्यांचा द्रष्टा आत्मा आहे आणि ते दोघे वेगळे आहेत (विभज्य) असे त्या दोन पदार्थांचे खरे स्वरूप (तत्त्व) कळल्यावर, त्या स्पष्टास्वच्छ ज्ञानाने निर्माण होणारे जे आत्मा आणि अनात्मा यांतील भेदांचे स्पष्ट ज्ञान हे मायेने केलेल्या मोहातून सुटका करते. माया ब्रह्मावर जगाचा आभास दाखविते. तो खरा वाटून माणूस त्या जगातील वस्तूंच्या मोहात अहंकाराने पडतो आणि या मोहामुळे विषयांत अडकलेले मन बंधाला कारणीभूत होते (श्लोक ३३३ पहा) त्या मोहाच्या बंधातून जो सुटतो त्याला पुनः संसारात पडावे लागत नाही.


(३४८) आत्मा-अनात्मा अथवा द्रष्टा -दृश्य यांतील फरक कळल्यावर प्रत्यगात्मा हाच परमात्मा आहे हे कळते. आणि हा ज्ञानरूपी अग्नी अविद्येचे दहन करतो.

परावरैकत्व-विवेक-वह्निर्दहत्यविद्या-गहन ह्यशेषम् ।
किं स्यात् पुनः संसरणस्य बीजमद्वैत-भावं समुपेयुषोऽस्य ॥ ३४८ ॥
पर (आत्मा) आणि अवर (आत्मा) हे एकच आहेत हे स्पष्ट ज्ञान (विवेक रूपी अग्नी अविद्या-रूपी अरण्य जाळून टाकतो. अशाप्रकारे प्रत्यगात्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचे ज्ञान ज्याला झाले आहे, त्या मुमुक्षूला पुनः संसारात पडण्यास कोणते कारण असेल बरे ?


आत्मा आणि अनात्मा यांतील भेद जाणून घेताना हे कळले की उपाधीत सापडलेला म्हणून गौण वाटणारा (अवर) प्रत्यगात्मा आणि श्रेष्ठ (पर) आत्मा हे दोघे एकच आहेत. हे त्यांच्या एकत्वाचे ज्ञानच अज्ञान नष्ट करते. अज्ञानाने परमात्म्यावर जग भासते, जगातील वस्तूंचा मोह पडतो आणि त्या मोहामुळे बंध उत्पन्न होतो. आता, अविद्या/अज्ञान नष्ट होऊन, प्रत्यगात्मा आणि परमात्मा हे एकच आहेत, हे ज्ञान ज्या मुमुक्ष्या होते, त्याला पुनः संसारात सापडण्याचे कारण उरत नाही; कारण ज्या अज्ञानामुळे संसार भासतो ते अज्ञानच नष्ट होऊन गेले आहे. म्हणजे असे घडते -


(३४९)

आवरणस्य निवृत्तिर्भवति च सन्यक्र पदार्थ-दर्शनतः ।
मिथ्या-ज्ञान-विनाशस्तद्-विक्षेप-जनित-दुःख-निवृत्तिः ॥ ३४९ ॥
यथायोग्यपणे (आत्मा-अनात्या, प्रत्यगात्मा-परमात्मा या) पदार्थांचे ज्ञान (दर्शन) झाले की (तमोजन्य) आवरण निवृत्त होते, मिथ्या (जगा) च्या ज्ञानाचा लय होतो आणि मग त्या आवरणामुळे निर्माण झालेल्या विक्षेपामुळे उत्पन्न झालेले दुःख संपते.


आवरणशक्तीमुळे विक्षेपशक्ती कार्य करते (श्लोक ३४५) विक्षेपशक्तीने आत्म्यावर जगाचा आभास होतो. ही आवरणशक्ती अज्ञानातील तमोगुणामुळे आहे हे अज्ञानच सम्यक विज्ञानाने नष्ट होते, साहजिकच अज्ञानाची आवरणशक्ती नष्ट होते. त्यामुळे मिथ्या जगाचे भान राहत नाही. मिथ्या ज्ञान हे विक्षेप- शक्तीने होते आणि त्या मिथ्या ज्ञानाने संसार-दुःख मागे लागले होते. सय्यगू विवेकाने आवरणशक्ती, विक्षेपशक्ती हे नष्ट झाल्यावर सहजच संसार- दुःखाची निवृत्ती होते. या सर्वांचे मूळ आहे प्रत्यगात्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचे ज्ञान.


(३५०) आवरणशक्तीची निवृत्ती, मिथ्या ज्ञानाचा नाश आणि दुःखाची निवृत्ती या तीनही गोष्टी रखु-सर्प दृष्टांतावरून समजून येतात -

एतत् त्रितयं-दृष्टं सम्यग् रज्जु-स्वरूप-विज्ञानात् ।
तस्माद् वस्तु-सत्तत्त्वं ज्ञातव्यं बंध-मुक्तये विदुषा ॥ ३५० ॥
योग्य प्रकारे रजूच्या स्वरूपाचे ज्ञान झाले की तीन गोष्टी घडतात असे दिसून येते. म्हणून (परमार्थात) बंधनातून सुटण्यासाठी शहाण्या मुमुक्षूने सत् असे जे ब्रह्म-तत्त्व ते जाणून घ्यावयास हवे.


रज्जू-सर्प-दृष्टांत असा - जमिनीवर पडलेली रज्जू कळली नाही. त्या अज्ञानाने रज्जूवर आवरण पडले मग विक्षेपाने तेथे सर्प भासू लागला. सर्पाच्या मिथ्या ज्ञानाने 'हा साप चावेल 'या कल्पनेने दुःख झाले. पण रघूचे यथार्थ ज्ञान होताच, अज्ञानाचे आवरण संपले, विक्षेपजन्य मिथ्या सर्प दिसेनासा झाला आणि मग सर्पामुळे आलेले दुःखही नष्ट झाले. त्याप्रमाणे ब्रह्माचे यथार्थ ज्ञान झाले की अज्ञानजन्य आवरण नष्ट होते, मिथ्या विश्वीचा विक्षेप नष्ट होतो आणि विक्षेपामुळे आलेले संसाराचे दुःख नष्ट होऊन जाते. म्हणून शहाण्या मुमुक्षूने ब्रह्म हे तत्त्व जाणून घेणे आवश्यक ठरते.


GO TOP