|
ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ३१ ते ४० ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३१ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - गोतम् राहूगण : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
प्र सोमा॑सः स्वा॒ध्य१ ः पव॑मानासो अक्रमुः ।
प्र सोमासः स्वाध्यः पवमानासः अक्रमुः रयिं कृण्वन्ति चेतनम् ॥ १ ॥
जे उत्तम रीतीनें ध्यानसेवा करवितात, ज्या पवित्रप्रवाह सोमरसांनीं कलशांचें आक्रमण केलें, तेच सोम ज्ञानरूप ऐश्वर्य देतात. १.
दि॒वस्पृ॑थि॒व्या अधि॒ भवे॑न्दो द्युम्न॒वर्ध॑नः ।
दिवः पृथिव्याः अधि भव इन्दो इति द्युम्न वर्धनः भव वाजानां पतिः ॥ २ ॥
द्युलोक आणि पृथिवी यांच्या ठिकाणीं हे सोमा, तूं तेजस्वितेची अभिवृद्धि करणारा हो. तूं सत्वसामर्थ्याचा प्रभु हो. २.
तुभ्यं॒ वाता॑ अभि॒प्रिय॒स्तुभ्यं॑ अर्षन्ति॒ सिन्ध॑वः ।
तुभ्यं वाताः अभि प्रियः तुभ्यं अर्षन्ति सिन्धवः सोम वर्धन्ति ते महः ॥ ३ ॥
सर्वप्रिय वायुदेव तुजकडे वहातो; सरिताहि तुझ्याचकडे वहातात. हे सोमा, सर्वजण तुझेंच महत्त्व वृद्धिंगत करतात. ३.
आ प्या॑यस्व॒ सं ए॑तु ते वि॒श्वतः॑ सोम॒ वृष्ण्य॑म् ।
आ प्यायस्व सं एतु ते विश्वतः सोम वृष्ण्यं भव वाजस्य सं गथे ॥ ४ ॥
तूं सर्व प्रकारांनीं वृद्धिंगत हो. हे सोमा, चोहोंकडून तुझ्या ठिकाणीं वीर्यशालित्व एकवट होऊं दे. आणि सत्वपरीक्षेच्या धकाधकींत तुझें अधिष्ठान आम्हांस लाभूं दे. ४.
तुभ्यं॒ गावो॑ घृ॒तं पयो॒ बभ्रो॑ दुदु॒ह्रे अक्षि॑तम् ।
तुभ्यं गावः घृतं पयः बभ्रो इति दुदुह्रे अक्षितं वर्षिष्ठे अधि सानवि ॥ ५ ॥
विचित्रवर्णा सोमा, अत्यंत श्रेष्ठ अशा भक्तीच्या शिखरावर धेनू तुझ्यासाठीं घृत आणि दुग्ध यांचा अक्षय्य प्रवाह सोडतात. ५.
स्वा॒यु॒धस्य॑ ते स॒तो भुव॑नस्य पते व॒यम् ।
सु आयुधस्य ते सतः भुवनस्य पते वयं इन्दो इति सखि त्वं उश्मसि ॥ ६ ॥
आल्हादप्रदा सोमा, हे भुवनपाला, तूं उत्तम आयुधांनीं सज्ज आहेस; तूं सद्रूप आहेस. म्हणूनच तुझ्या मैत्रीची आम्ही लालसा धरली आहे. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३२ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
प्र सोमा॑सो मद॒च्युतः॒ श्रव॑से नो म॒घोनः॑ ।
प्र सोमासः मद च्युतः श्रवसे नः मघोनः सुताः विदथे अक्रमुः ॥ १ ॥
हर्षप्रवाह जणों सांडून देणारे आणि यज्ञमंडपांत पिळून सिद्ध केलेले सोमरस आमच्या यज्ञकर्त्या यजमानाच्या सत्कीर्तिसाठीं पुढें सरसावून गेले. १.
आदीं॑ त्रि॒तस्य॒ योष॑णो॒ हरिं॑ हिन्व॒न्त्यद्रि॑भिः ।
आत् ईं त्रितस्य योषणः हरिं हिन्वन्ति अद्रि भिः इन्दुं इन्द्राय पीतये ॥ २ ॥
म्हणूनच त्रिताच्या तरुण स्त्रिया ह्या हरिद्वर्ण सोमाचा आल्हादप्रद रस इंद्रानें प्राशन करावा यासाठीं ग्राव्यांच्या योगानें जोरानें पिळीत आहेत. २.
आदीं॑ हं॒सो यथा॑ ग॒णं विश्व॑स्यावीवशन् म॒तिम् ।
आत् ईं हंसः यथा गणं विश्वस्य अवीवशत् मतिं अत्यः न गोभिः अज्यते ॥ ३ ॥
ह्यासाठींच हा सोम हंसाप्रमाणें आपल्या सर्व गणांकडून देवाचें मननीय स्तोत्र मोठ्यानें म्हणवितो, आणि तीव्रवेगी शूराप्रमाणें गोदुग्धानें स्नान करतो. ३.
उ॒भे सो॑माव॒चाक॑शन् मृ॒गो न त॒क्तो अ॑र्षसि ।
उभे इति सोम अव चाकशत् मृगः न तक्तः अर्षसि सीदन् ऋतस्य योनिं आ ॥ ४ ॥
उभय लोकांकडे दृष्टि फेंकून हे सोमा, तूं तेजस्वी मृगाप्रमाणें सत्धर्माच्या उद्गमस्थानीं वेदीवर आरूढ होऊन तेथून प्रवाह सोडतोस. ४.
अ॒भि गावो॑ अनूषत॒ योषा॑ जा॒रं इ॑व प्रि॒यम् ।
अभि गावः अनूषत योषा जारं इव प्रियं अगन् आजिं यथा हितम् ॥ ५ ॥
तरुणी आपल्या प्रियकराकरितां उत्कंठित होते त्याप्रमाणें तुझ्याकडे पाहून स्तुति धेनू मोठ्यानें हंबारल्या; तेव्हां न्याय्य किंवा हितकर अशा संग्रामाला शूर जातो त्याप्रमाणें सोम हा पुढें सरसावला. ५.
अ॒स्मे धे॑हि द्यु॒मद्यशो॑ म॒घव॑द्भ्यश्च॒ मह्यं॑ च ।
अस्मे इति धेहि द्यु मत् यशः मघवत् भ्यः च मह्यं च सनिं मेधां उत श्रवः ॥ ६ ॥
आमचे यज्ञकर्ते यजमान आणि मीं अशा उभयतांमध्यें उज्ज्वल यश ठेव; तसेंच विजयश्री, सत्बुद्धी आणि सत्कीर्तिहि ठेव. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३३ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - त्रित आप्त्य : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
प्र सोमा॑सो विप॒श्चितो॑ऽ॒पां न य॑न्त्य् ऊ॒र्मयः॑ ।
प्र सोमासः विपः चितः अपां न यन्ति ऊर्मयः वनानि महिषाः इव ॥ १ ॥
सूक्ष्मविज्ञानी सोमरस उदकाच्या तरंगाप्रमाणें, किंवा वनाकडे धांवणार्या महिषांप्रमाणें द्रोणपात्राकडे धांवतात. १.
अ॒भि द्रोणा॑नि ब॒भ्रवः॑ शु॒क्रा ऋ॒तस्य॒ धार॑या ।
अभि द्रोणानि बभ्रवः शुक्राः ऋतस्य धारया वाजं गो मन्तं अक्षरन् ॥ २ ॥
विचित्रवर्ण परंतु शुभ्रतेजस्क सोमरस सद्धर्माच्या धाराप्रवाहानें सत्वसामर्थ्य आणि ज्ञान गोधनांचा ओघ लोटून द्रोणपात्राकडे वहात जाऊं लागतात. २.
सु॒ता इन्द्रा॑य वा॒यवे॒ वरु॑णाय म॒रुद्भ्यः॑ ।
सुताः इन्द्राय वायवे वरुणाय मरुत् भ्यः सोमाः अर्षन्ति विष्णवे ॥ ३ ॥
पिळून सिद्ध केलेले सोमरस इंद्राप्रीत्यर्थ, वायूप्रीत्यर्थ, वरुणाप्रीत्यर्थ, मरुतांप्रीत्यर्थ, आणि विष्णूप्रीत्यर्थ वहात आहेत. ३.
ति॒स्रो वाच॒ उदी॑रते॒ गावो॑ मिमन्ति धे॒नवः॑ ।
तिस्रः वाचः उत् ईरते गावः मिमन्ति धेनवः हरिः एति कनिक्रदत् ॥ ४ ॥
तीन प्रकारची वाणी ऋत्विज उच्चारतो, तेव्हां धेनू हंबरतात आणि सोमहि गर्जना करीत गमन करतो. ४.
अ॒भि ब्रह्मी॑रनूषत य॒ह्वीरृ॒तस्य॑ मा॒तरः॑ ।
अभि ब्रह्मीः अनूषत यह्वीः ऋतस्य मातरः मर्मृज्यन्ते दिवः शिशुम् ॥ ५ ॥
ब्रह्मस्तुतींनीं देवाची महती गायिली, त्यामुळें सत्यधर्माच्या प्रभावशाली जननी, द्युलोकाच्या त्या बाळकाला सोमाला पुनः पुनः पुसून स्वच्छ करतात. ५.
रा॒यः स॑मु॒द्रांश्च॒तुरो॑ऽ॒स्मभ्यं॑ सोम वि॒श्वतः॑ ।
रायः समुद्रान् चतुरः अस्मभ्यं सोम विश्वतः आ पवस्व सहस्रिणः ॥ ६ ॥
हे सोमा, संपत्तीचे चार समुद्र किंवा चारच काय पण सहस्त्रावधि समुद्र चोहोंकडून आमच्याकडे वहात आण. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३४ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - त्रित आप्त्य : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
प्र सु॑वा॒नो धार॑या॒ तनेन्दु॑र्हिन्वा॒नो अ॑र्षति ।
प्र सुवानः धारया तना इन्दुः हिन्वानः अर्षति रुजत् दृळ्हा वि ओजसा ॥ १ ॥
आल्हादकर सोमरस पिळला जात असतां संतत धारेनें वेगानें पुढें सरसावून आपल्या ओजस्वितेनें शत्रूंचे कठीण दुर्ग फोडून टाकून वहात जातो. १.
सु॒त इन्द्रा॑य वा॒यवे॒ वरु॑णाय म॒रुद्भ्यः॑ ।
सुतः इन्द्राय वायवे वरुणाय मरुत् भ्यः सोमः अर्षति विष्णवे ॥ २ ॥
तो पिळून सिद्ध झाला म्हणजे इंद्राप्रीत्यर्थ, वायूप्रीत्यर्थ, वरुणाप्रीत्यर्थ, मरुतांप्रीत्यर्थ अथवा विष्णूप्रीत्यर्थ वहात राहतो. २.
वृषा॑णं॒ वृष॑भिर्य॒तं सु॒न्वन्ति॒ सोमं॒ अद्रि॑भिः ।
वृषाणं वृष भिः यतं सुन्वन्ति सोमं अद्रि भिः दुहन्ति शक्मना पयः ॥ ३ ॥
वीर्यशाली ऋत्विजांनीं वेष्टित अशा वीर्यशाली सोमाला ग्राव्यांनीं जोरानें चुरून त्यांतून रसरूप पेयाचें दोहन भक्त करतात. ३.
भुव॑त् त्रि॒तस्य॒ मर्ज्यो॒ भुव॒दिन्द्रा॑य मत्स॒रः ।
भुवत् त्रितस्य मर्ज्यः भुवत् इन्द्राय मत्सरः सं रूपैः अज्यते हरिः ॥ ४ ॥
त्रिताच्या हातानें तो स्वच्छ करण्याला योग्य झाला, इंद्राप्रीत्यर्थ तो हर्षोत्पादन योग्य ठरला; असा तो हरिद्वर्ण सोम नाना रूपांनीं दृग्गोचर होतो. ४.
अ॒भीं ऋ॒तस्य॑ वि॒ष्टपं॑ दुह॒ते पृश्नि॑मातरः ।
अभि ईं ऋतस्य विष्टपं दुहते पृश्नि मातरः चारु प्रिय तमं हविः ॥ ५ ॥
हा जो सद्धर्माचरणाचें अधिष्ठान आहे त्याच्यापासून प्रश्निपुत्र मरुत् सुंदर आणि सर्वप्रिय असें रसरूप हव्य पिळून घेतात. ५.
सं ए॑नं॒ अह्रु॑ता इ॒मा गिरो॑ अर्षन्ति स॒स्रुतः॑ ।
सं एनं अहुताः इमाः गिरः अर्षन्ति स स्रुतः धेनूः वाश्रः अवीवशन् ॥ ६ ॥
निर्व्याज आणि झरझर वाहणार्या ह्या स्तवनवाणी सोमाला एकदम घेरून टाकतात; तेव्हां तोहि स्तुतिरूप धेनूंना पाहून गर्जना करतो. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३५ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - प्रभूवसु अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
आ नः॑ पवस्व॒ धार॑या॒ पव॑मान र॒यिं पृ॒थुम् ।
आ नः पवस्व धारया पवमान रयिं पृथुं यया ज्योतिः विदासि नः ॥ १ ॥
आपल्या धारेनें, हे पवित्रप्रवाहा सोमा, आम्हांकडे अपार ऐश्वर्य वहात आण; ज्या धारेनें तूं आम्हांला प्रकाशाचा लाभ करून दिलास त्या धारेनें आण. १.
इन्दो॑ समुद्रमीङ्खय॒ पव॑स्व विश्वमेजय ।
इन्दो इति समुद्रं ईङ्खय पवस्व विश्वं एजय रायः धर्ता नः ओजसा ॥ २ ॥
आल्हादप्रदा सोमा, समुद्र उचंबळून सोड, वहात रहा, सारें जग हलवून टाक; आणि तूं आमच्यासाठीं दिव्याऐश्वर्याचा धारक हो. २.
त्वया॑ वी॒रेण॑ वीरवोऽ॒भि ष्या॑म पृतन्य॒तः ।
त्वया वीरेण वीर वः अभि स्याम पृतन्यतः क्षर नः अभि वार्यम् ॥ ३ ॥
हे वीरोत्कृष्टा, तुज वीराच्या अग्रेसरत्वानें आम्हीं शौर्य गाजविणारे भक्त शत्रुसैन्यावर जय मिळवूं; तर आमचें जें उत्कृष्ट ध्येय त्याच्याकडे तूं वहात रहा. ३.
प्र वाजं॒ इन्दु॑रिष्यति॒ सिषा॑सन् वाज॒सा ऋषिः॑ ।
प्र वाजं इन्दुः इष्यति सिसासन् वाज साः ऋषिः व्रता विदानः आयुधा ॥ ४ ॥
आल्हादप्रद सोमरस भक्तांना लाभ करून द्यावा म्हणून सत्वबलाची इच्छा करतो, तेव्हां त्याचींच व्रतरूप आयुधें हातीं घेऊन ऋषि सत्वबलाढ्य होतो. ४.
तं गी॒र्भिर्वा॑चमीङ्ख॒यं पु॑ना॒नं वा॑सयामसि ।
तं गीः भिः वाचं ईङ्खयं पुनानं वासयामसि सोमं जनस्य गो पतिम् ॥ ५ ॥
म्हणून, जनांचा धुरीण, वाणीला स्फूर्ति देणारा, आणि प्रभावशाली अशा सोमाला आम्हीं स्तुतींनीं आच्छादन करतों. ५.
विश्वो॒ यस्य॑ व्र॒ते जनो॑ दा॒धार॒ धर्म॑ण॒स्पतेः॑ ।
विश्वः यस्य व्रते जनः दाधार धर्मणः पतेः पुनानस्य प्रभु वसोः ॥ ६ ॥
ज्या धर्मप्रतिपालकाच्या, ज्या भक्तपावनाच्या, आणि ज्या अपार-ऐश्वर्य प्रभूच्या नियमपालनानेंच हा अखिल जनसमाज धारण केला गेला आहे, त्या सोमाची महती वर्णन करा. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३६ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - प्रभूवसु अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
अस॑र्जि॒ रथ्यो॑ यथा प॒वित्रे॑ च॒म्वोः सु॒तः ।
असर्जि रथ्यः यथा पवित्रे चम्वोः सुतः कार्ष्मन् वाजी नि अक्रमीत् ॥ १ ॥
चमूपात्रांत पिळलेला सोमरस एखाद्या महारथ्याप्रमाणें पवित्रांतून वहात सुटला आहे; पहा तो अश्वारूढ वीर विजयतोरणाकडे धांवत गेला आहे. १.
स वह्निः॑ सोम॒ जागृ॑विः॒ पव॑स्व देव॒वीरति॑ ।
सः वह्निः सोम जागृविः पवस्व देव वीः अति अभि कोशं मधु श्चुतम् ॥ २ ॥
हे सोमा असा तूं हविर्वाहक, जागरूक, आणि देवप्रिय आहेस. तर मधानें ओथंबलेल्या पात्रांत पवित्रांमधून वहात जा. २.
स नो॒ ज्योतीं॑षि पूर्व्य॒ पव॑मान॒ वि रो॑चय ।
सः नः ज्योतींषि पूर्व्य पवमान वि रोचय क्रत्वे दक्षाय नः हिनु ॥ ३ ॥
हे आद्या, हे पवित्रप्रवाहा, तूं नक्षत्रें सुप्रकाशिक कर; आणि सत्कर्तृत्वाकडे, चातुर्यबलाकडे आम्हांला प्रवृत्त कर. ३.
शु॒म्भमा॑न ऋता॒युभि॑र्मृ॒ज्यमा॑नो॒ गभ॑स्त्योः ।
शुम्भमानः ऋतयु भिः मृज्यमानः गभस्त्योः पवते वारे अव्यये ॥ ४ ॥
सद्धर्माचरणी ऋत्विजांकडून अलंकृत होऊन त्यांच्या हातांनीं ऊर्णावस्त्राच्या पवित्रांतून स्वच्छ होऊन जो वहात रहातो; ४.
स विश्वा॑ दा॒शुषे॒ वसु॒ सोमो॑ दि॒व्यानि॒ पार्थि॑वा ।
सः विश्वा दाशुषे वसु सोमः दिव्यानि पार्थिवा पवतां आ अन्तरिक्ष्या ॥ ५ ॥
असा सोम, दिव्य, ऐहिक आणि अन्तरिक्षांतील सर्व वैभव दानशाली भक्तांकडे वहाता आणो. ५.
आ दि॒वस्पृ॒ष्ठं अ॑श्व॒युर्ग॑व्य॒युः सो॑म रोहसि ।
आ दिवः पृष्ठं अश्व युः गव्य युः सोम रोहसि वीर युः शवसः पते ॥ ६ ॥
द्युलोकाच्या शिखरावर हे सोमा, तूं विराजमान होतोस; हे प्रतापी प्रभो, तूं अश्वप्रेमी, गोधनप्रेमी आणि वीरप्रेमी आहेस. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३७ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - रहूगण अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
स सु॒तः पी॒तये॒ वृषा॒ सोमः॑ प॒वित्रे॑ अर्षति ।
सः सुतः पीतये वृषा सोमः पवित्रे अर्षति वि घ्नन् रक्षांसि देव युः ॥ १ ॥
प्राशनासाठीं पिळलेला, देवोत्सुक आणि वीर्यशाली सोमरस राक्षसांना ठार करून कुशपवित्रांतून वहात जातो. १.
स प॒वित्रे॑ विचक्ष॒णो हरि॑रर्षति धर्ण॒सिः ।
सः पवित्रे वि चक्षणः हरिः अर्षति धर्णसिः अभि योनिं कनिक्रदत् ॥ २ ॥
तो सूक्ष्मविज्ञानी, हरिद्वर्ण, आणि सर्वाधार सोम, पवित्रांतून वहातो आणि स्वस्थानांत म्हणजे द्रोणपात्रांत पडतांना गर्जना करतो. २.
स वा॒जी रो॑च॒ना दि॒वः पव॑मानो॒ वि धा॑वति ।
सः वाजी रोचना दिवः पवमानः वि धावति रक्षः हा वारं अव्ययम् ॥ ३ ॥
तो सत्ववीर, पवित्रप्रवाह, राक्षसान्तक सोम द्युलोकाचा देदीप्यमान प्रदेश आणि ऊर्णावस्त्राचें गालनपात्र ह्यांच्याकडे निरनिराळ्या प्रकारांनीं धांवत जातो. ३.
स त्रि॒तस्याधि॒ सान॑वि॒ पव॑मानो अरोचयत् ।
सः त्रितस्य अधि सानवि पवमानः अरोचयत् जामि भिः सूर्यं सह ॥ ४ ॥
त्रिताच्या अत्युच्च शिखरांवर तो सोमरस पवित्रप्रवाहानें वाहून अङ्गुलीरूप भगिनींसह सूर्यासहवर्तमान प्रकाशूं लागला. ४.
स वृ॑त्र॒हा वृषा॑ सु॒तो व॑रिवो॒विददा॑भ्यः ।
सः वृत्र हा वृषा सुतः वरिवः वित् अदाभ्यः सोमः वाजं इव असरत् ॥ ५ ॥
तो वृत्रनाशक, वीर्यशाली, उत्कृष्ट लाभप्रद, अजिंक्य सोमरस सत्वपरीक्षेच्या युद्धाकडेच जणों वाहूं लागला. ५.
स दे॒वः क॒विने॑षि॒तोऽ॒भि द्रोणा॑नि धावति ।
सः देवः कविना इषितः अभि द्रोणानि धावति इन्दुः इन्द्राय मंहना ॥ ६ ॥
कवीनें ज्याला प्रोत्साहन दिलें तो आल्हादकर दिव्य सोमरस इंद्रासाठीं आणि भक्ताला वरदान देण्यासाठीं द्रोणकलशाकडे धांवला. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३८ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - रहूगण अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
ए॒ष उ॒ स्य वृषा॒ रथो॑ऽव्यो॒ वारे॑भिरर्षति ।
एषः ओं इति स्यः वृषा रथः अव्यः वारेभिः अर्षति गच्चन् वाजं सहस्रिणम् ॥ १ ॥
हा रथाप्रमाणें वेगवान् आणि वीर्यशाली सोम उर्णावस्त्राच्या पवित्रांतून सहस्त्रावधि सत्वसामर्थ्यांकडे गमन करीत देवाकडे वहात जातो. १.
ए॒तं त्रि॒तस्य॒ योष॑णो॒ हरिं॑ हिन्व॒न्त्यद्रि॑भिः ।
एतं त्रितस्य योषणः हरिं हिन्वन्ति अद्रि भिः इन्दुं इन्द्राय पीतये ॥ २ ॥
ह्या हरिद्वर्ण आल्हादप्रद सोमाला इंद्रानें प्राशन करावें म्हणून त्रिताच्या स्त्रिया ग्राव्यांनीं चुरीत आहेत. २.
ए॒तं त्यं ह॒रितो॒ दश॑ मर्मृ॒ज्यन्ते॑ अप॒स्युवः॑ ।
एतं त्यं हरितः दश मर्मृज्यन्ते अपस्युवः याभिः मदाय शुम्भते ॥ ३ ॥
त्या ह्या वनस्पतीला यज्ञकर्मोत्सुक दहा जणी स्वच्छ करीत आहेत. त्याच्यामुळेंच तो देवाला हर्षनिर्भर करण्यास समर्थ होतो. ३.
ए॒ष स्य मानु॑षी॒ष्व् आ श्ये॒नो न वि॒क्षु सी॑दति ।
एषः स्यः मानुषीषु आ श्येनः न विक्षु सीदति गच्चन् जारः न योषितम् ॥ ४ ॥
तोच हा सोम मानवी प्रजांमध्यें श्येन पक्ष्याप्रमाणें वास करतो; आपल्या वल्लभेकडे जाणार्या तरुणाप्रमाणें भूलोकीं राहतो. ४.
ए॒ष स्य मद्यो॒ रसो॑ऽव चष्टे दि॒वः शिशुः॑ ।
एषः स्यः मद्यः रसः अव चष्टे दिवः शिशुः यः इन्दुः वारं आ अविशत् ॥ ५ ॥
हाच तो आवेश उत्पन्न करणारा, द्युलोकाचा बालक, आल्हादप्रद रस, द्युलोकांतून खालीं अवलोकन करतो आणि ऊर्णावस्त्राच्या पवित्रांत प्रवेश करतो. ५.
ए॒ष स्य पी॒तये॑ सु॒तो हरि॑रर्षति धर्ण॒सिः ।
एषः स्यः पीतये सुतः हरिः अर्षति धर्णसिः क्रन्दन् योनिं अभि प्रियम् ॥ ६ ॥
तो हा रस देवाच्या प्राशनासाठीं पिळला आहे. सर्वांचा आधार असा हा हरिद्वर्ण रस गर्जना करून आपल्या आवडत्या स्थानाकडे द्रोणकलशाकडे वहात जात आहे. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३९ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - बृहन्मति अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
आ॒शुर॑र्ष बृहन्मते॒ परि॑ प्रि॒येण॒ धाम्ना॑ ।
आशुः अर्ष बृहत् मते परि प्रियेण धाम्ना यत्र देवाः इति ब्रवन् ॥ १ ॥
थोर अन्तःकरणाच्या सोमा, तूं शीघ्रगती आहेस; तर आपल्या भक्तप्रिय अशा तेजोवलयांसह, जेथें देव तेथें मीं असें म्हणून वाहूं लाग. १.
प॒रि॒ष्कृ॒ण्वन्न् अनि॑ष्कृतं॒ जना॑य या॒तय॒न्न् इषः॑ ।
परि कृण्वन् अनिः कृतं जनाय यातयन् इषः वृष्टिं दिवः परि स्रव ॥ २ ॥
अपूर्ण असेल ते परिपूर्ण आणि अलंकृत करून, आणि जनतेला कार्यप्रवृत्त करून तूं आकाशांतून पर्जन्यवर्षाव कर. २.
सु॒त ए॑ति प॒वित्र॒ आ त्विषिं॒ दधा॑न॒ ओज॑सा ।
सुतः एति पवित्रे आ त्विषिं दधानः ओजसा वि चक्षाणः वि रोचयन् ॥ ३ ॥
हा पिळलेला सोमरस आपल्या तेजस्वितेनें इतरांमध्येंहि झळाळी उत्पन्न करणारा आहे. तो सूक्ष्मावलोकनी सोम जगताला नाना प्रकारांनीं प्रकाशित करणारा आहे. ३.
अ॒यं स यो दि॒वस्परि॑ रघु॒यामा॑ प॒वित्र॒ आ ।
अयं सः यः दिवः परि रघु यामा पवित्रे आ सिन्धोः ऊर्मा वि अक्षरत् ॥ ४ ॥
तोच हा, कीं जो द्युलोकाच्या भोंवतीं झपाट्यानें वाहणार्या आकाशसिंधूच्या ज्या लहरी त्यांच्यांत मिसळून, पवित्रांतून पात्रांत वहात चालला आहे. ४.
आ॒विवा॑सन् परा॒वतो॒ अथो॑ अर्वा॒वतः॑ सु॒तः ।
आविवासन् परावतः अथो इति अर्वावतः सुतः इन्द्राय सिच्यते मधु ॥ ५ ॥
अतिशय दूरचा स्वर्लोक, तसेंच हा जवळचा भूलोक ह्या दोहोंनाहि आच्छादून टाकणारा हा सोमरस आम्हीं पिळला आहे. हें मधुरपेय आम्हीं इंद्राप्रीत्यर्थ पिळून सिद्ध केलें आहे. ५.
स॒मी॒ची॒ना अ॑नूषत॒ हरिं॑ हिन्व॒न्त्यद्रि॑भिः ।
समीचीनाः अनूषत हरिं हिन्वन्ति अद्रि भिः योनौ ऋतस्य सीदत ॥ ६ ॥
ज्या सर्व भक्तांनीं एकत्र मिळून मोठ्यानें स्तुतिघोष केला, तेच भक्त हरिद्वर्ण सोमाला ग्राव्यांनीं पिळून वहाण्यास लावतात. ह्यामुळेंच तो सनातन धर्माच्या उद्गमस्थानीं अधिष्ठित झाला आहे. ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४० (पवमान सोमसूक्त)
ऋषी - बृहन्मति अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री
पु॒ना॒नो अ॑क्रमीद॒भि विश्वा॒ मृधो॒ विच॑र्षणिः ।
पुनानः अक्रमीत् अभि विश्वाः मृधः वि चर्षणिः शुम्भन्ति विप्रं धीति भिः ॥ १ ॥
भक्तपावन सर्वविज्ञानी सोमानें यच्चावत् शत्रुसैन्याला पादाक्रांत केलें म्हणून त्या ज्ञानरूपाला भक्तजन एकाग्र स्तुतींनीं अलंकृत करतात. १.
आ योनिं॑ अरु॒णो रु॑ह॒द्गम॒दिन्द्रं॒ वृषा॑ सु॒तः ।
आ योनिं अरुणः रुहत् गमत् इन्द्रं वृषा सुतः ध्रुवे सदसि सीदति ॥ २ ॥
तो आरक्तवर्ण सोम स्वस्थानीं अधिष्ठित झाला. तो वीर्यशाली रस इंद्राकडे गेला, आणि आपल्या अढळ स्थानींहि द्रोणकलशांत विराजमान झाला. २.
नू नो॑ र॒यिं म॒हां इ॑न्दोऽ॒स्मभ्यं॑ सोम वि॒श्वतः॑ ।
नु नः रयिं महां इन्दो इति अस्मभ्यं सोम विश्वतः आ पवस्व सहस्रिणम् ॥ ३ ॥
म्हणून हे आल्हाददायका सोमा, आम्हांकडे तूं चोहोंकडून हजारों प्रकारचें महदैश्वर्य वहावयास लाव. ३.
विश्वा॑ सोम पवमान द्यु॒म्नानी॑न्द॒व् आ भ॑र ।
विश्वा सोम पवमान द्युम्नानि इन्दो इति आ भर विदाः सहस्रिणीः इषः ॥ ४ ॥
हे पावनप्रवाहा सोमा, आल्हादप्रदा, सर्व प्रकारचीं देदीप्यमान धनें आमच्याकडे आण. हजारों प्रकारची उत्साहसंपत्ति आम्हांस प्राप्त करून दे. ४.
स नः॑ पुना॒न आ भ॑र र॒यिं स्तो॒त्रे सु॒वीर्य॑म् ।
सः नः पुनानः आ भर रयिं स्तोत्रे सु वीर्यं जरितुः वर्धय गिरः ॥ ५ ॥
असा तूं सोम, स्तोत्रकर्त्याला ऐश्वर्य आणि उत्साहशौर्य दे, आणि गुणगायकाच्या स्तुतिवाणी वृद्धिंगत कर. ५.
पु॒ना॒न इ॑न्द॒व् आ भ॑र॒ सोम॑ द्वि॒बर्ह॑सं र॒यिम् ।
पुनानः इन्दो इति आ भर सोम द्वि बर्हसं रयिं वृषन् इन्दो इति नः उक्थ्यम् ॥ ६ ॥
आल्हादप्रदा सोमा, भक्तपावन असा तूं उभय लोकींचें ऐश्वर्य आम्हांकडे आण. हे आल्हादप्रदा वीरा जें जें प्रशंसनीय आहे तें तें घेऊन ये. ६.
ॐ तत् सत् |