PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १६१ ते १७०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६१ (ऋभू सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : ऋभवः - छंद - जगती


किमु॒ श्रेष्ठः॒ किं यवि॑ष्ठो न॒ आज॑ग॒न्किमी॑यते दू॒त्यङ्१॑कद्यदू॑चि॒म ।
न नि॑न्दिम चम॒सं यो म॑हाकु॒लोऽ॑ग्ने भ्रात॒र्द्रुण॒ इद्भू॒॒तिमू॑दिम ॥ १ ॥

किं ऊं इति श्रेष्ठः किं यविष्ठः नः आ अजगन् किं ईयते दूत्यं कत् यत् ऊचिम ॥
न निंदिम चमसं यः महाऽकुलः अग्ने भ्रातः द्रुणः इत् भूतिं ऊदिम ॥ १ ॥

काय ? हा जो आमच्याकडे आला आहे तो सर्वात वडील, कीं धाकटा ? हा कशा करितां आला असावा बरें ?आम्ही तरी असे काय बोललो ? एका थोर विभूतीनें बनविलेल्या ह्या यज्ञपात्राची आम्ही कांही निंदा केली नाही. तर हे अग्निदेवा, हे बंधो, आम्ही त्या काष्ठपात्राची महतीच वर्णन केलेली आहे ॥ १ ॥


एकं॑ चम॒सं च॒तुर॑स्कृणोतन॒ तद्वो॑ दे॒वा अ॑ब्रुव॒न्तद्व॒ आग॑मम् ।
सौध॑न्वना॒ यद्ये॒वा क॑रि॒ष्यथ॑ सा॒कं दे॒वैर्य॒ज्ञिया॑सो भविष्यथ ॥ २ ॥

एकं चमसं चतुरः कृणोतन तत् वः देवाः अब्रुवन् तत् वः आ अगमम् ॥
सोधन्वना यदि एव करिष्यथ साकं देवैः र्यज्ञियासः भविष्यथ ॥ २ ॥

देवांनी तुम्हाला सांगितले ना कीं, एका चमसाचे चार चमस करा म्हणून ? तर मग त्या करितांच मी आलो आहे. हे सुधन्वाच्या पुत्रांनो, तुम्ही जर असे कराल तर देवांबरोबर तुम्ही यज्ञार्ह व्हाल. ॥ २ ॥


अ॒ग्निं दू॒तं प्रति॒ यदब्र॑वीत॒नाश्वः॒ कर्त्वो॒ रथ॑ उ॒तेह कर्त्वः॑ ।
धे॒नुः कर्त्वा॑ युव॒शा कर्त्वा॒ द्वा तानि॑ भ्रात॒रनु॑ वः कृ॒त्व्येम॑सि ॥ ३ ॥

अग्निं दूतं प्रति यत् अब्रवीतन अश्वः कर्त्वः रथः उत इह कर्त्वः ॥
धेनुः कर्त्वा युवशा कर्त्वा द्वा तानि भ्रातः अनु वः कृत्वि आ इमसि ॥ ३ ॥

देवांचा प्रतिनिधि जो अग्नि त्याच्या जवळ तर तुम्ही बोललांच कीं हे बंधो, एक अश्व निर्माण करावयाचा आहे, तसाच एक रथ करावयाचा आहे, गाय करावयाची व दोघांजणांना तरुण करावयाचे आहे; आणि हे सर्व करून मग तुमच्याकडे येतो. ॥ ३ ॥


च॒कृ॒वांस॑ ऋभव॒स्तद॑पृच्छत॒ क्वेद॑भू॒द्य स्य दू॒तो न॒ आज॑गन् ।
य॒दावाख्य॑च्चम॒साञ्च॒तुरः॑ कृ॒तानादित्त्वष्टा॒ ग्नास्व॒न्तर्न्यानजे ॥ ४ ॥

चकृवांसः ऋभवस्तत् अपृच्छत क्वेत् अभूत् यः स्य दूतः नः आजगन् ॥
यदावाख्यच् चमसाञ् चतुरः कृतान् आत् इत् त्वष्टा ग्नासु अंतर्नि आनजे ॥ ४ ॥

तेव्हां ते सर्व कार्य उरकल्यावर तुम्ही विचारलें कीं, " आम्हांकडे निरोप घेऊन आला होता तो कोठें आहे ? " इतक्यात त्वष्ट्याने चार चमस तयार केलेले पाहिले मात्र, तात्काळ तो देवपत्न्यांकडे जाऊन लपून राहिला. ॥ ४ ॥


हना॑मैनाँ॒ इति॒ त्वष्टा॒ यदब्र॑वीच्चम॒सं ये दे॑व॒पान॒मनि॑न्दिषुः ।
अ॒न्या नामा॑नि कृण्वते सु॒ते सचाँ॑ अ॒न्यैरे॑नान्क॒न्या३॑नाम॑भिः स्परत् ॥ ५ ॥

हनामैनान् इति त्वष्टा यत् अब्रवीच् चमसं ये देवपानं अनिंदिषुः ॥
अन्या नामानि कृण्वते सुते सचान् अन्यैरेनान् कन्या नामभि स्परत् ॥ ५ ॥

ह्यांनी देवांच्या सोम पिण्याच्या चमसाला नावें ठेविली आहेत, तर ह्यांना आपण मारून टाकूं या असे हे ऋभूंनो ज्या वेळेस तो त्वष्टा बोलला, त्या वेळेपासूनच सोमरस अर्पण होत असतांना तुमचे स्वरूप पालटलें, तुम्ही देवरूप झालांत आणि मग स्वर्गीय युवतीजन त्या नवीन स्वरूपामुळें तुम्हांवर मोहित होऊन प्रेम करूं लगला. ॥ ५ ॥


इंद्रो॒ हरी॑ युयु॒जे अ॒श्विना॒ रथं॒ बृह॒स्पति॑र्वि॒श्वरू॑पा॒मुपा॑जत ।
ऋ॒भुर्विभ्वा॒ वाजो॑ दे॒वाँ अ॑गच्छत॒ स्वप॑सो य॒ज्ञियं॑ भा॒गमै॑तन ॥ ६ ॥

इंद्रः हरी युयुजे अश्विना रथं बृहस्पतिर्विश्वरूपां उपाजत ॥
ऋभुर्विभ्वा वाजः देवान् अगच्छत स्वपसः यज्ञियं भागं ऐतन ॥ ६ ॥

तुम्ही निर्माण केलेले घोडे इंद्राने आपल्या रथास जोडूनहि टाकले, अश्वीदेवांनी आपला रथ सज्ज केला, आणि इच्छेस येईल ते रूप घेणारी अशी ही धेनू बृहस्पति आपल्या बरोबर घेऊन गेला. त्या वेळेसच ऋभु, विभ्वा आणि वाज असे तुम्ही तिघे बंधु देवत्व पावलां, आणि सत्क्रियावान् जे तुम्ही त्या तुम्हांला यज्ञांमध्ये हविर्भाग प्राप्त झाला. ॥ ६ ॥


निश्चर्म॑णो॒ गाम॑रिणीत धी॒तिभि॒र्या जर॑न्ता युव॒शा ताकृ॑णोतन ।
सौध॑न्वना॒ अश्वा॒दश्व॑मतक्षत यु॒क्त्वा रथ॒मुप॑ दे॒वाँ अ॑यातन ॥ ७ ॥

निश्चर्मणः गां अरिणीत धीतिभिर्या जरंता युवशा ताकृणोतन ॥
सौधन्वना अश्वात् अश्वं अतक्षत युक्त्वा रथं उप देवान् अयातन ॥ ७ ॥

तुम्ही आपल्या अतुल बुद्धिमत्तेनें नुसते चामडे घेऊन त्यांतून जिवंत गाय उत्पन्न केली. आणि वृद्धत्व आलेल्या जोडप्यास पुन्हां तरुण केले. सुधन्वाच्या पुत्रांनो, तुम्ही एका सामान्य अश्वापासून एक नवीन अपूर्व अश्व निर्माण केलात; आणि हे सर्व करून रथ जोडून देवांकडे निघून गेलांत. ॥ ७ ॥


इ॒दमु॑द॒कं पि॑ब॒तेत्य॑ब्रवीतने॒दं वा॑ घा पिबता मुञ्ज॒नेज॑नम् ।
सौध॑न्वना॒ यदि॒ तन्नेव॒ हर्य॑थ तृ॒तीये॑ घा॒ सव॑ने मादयाध्वै ॥ ८ ॥

इदं उदकं पिबतेति अब्रवीतनेदं वा घा पिबता मुञ्जनेजनम् ॥
सौधन्वना यदि तन् नेव हर्यथ तृतीये घा सवने मादयाध्वै ॥ ८ ॥

त्या ऋभूंना अशी विनंती करा कीं, "तुम्ही हें उदक प्या किंवा मुंज तृणानें गाळून शुद्ध केलेलें ते दुसरें प्या; आणि हे सुधन्वाचे पुत्र हो, तुम्हांस दोन्हीही आवडत नसतील, तर मग तिसर्‍या वेळेस सोमरसानें तरी हर्ष पावा ". ॥ ८ ॥


आपो॒ भूयि॑ष्ठा॒ इत्येको॑ अब्रवीद॒ग्निर्भूयि॑ष्ठ॒ इत्य॒न्यो अ॑ब्रवीत् ।
व॒ध॒र्यन्तीं॑ ब॒हुभ्यः॒ प्रैको॑ अब्रवीदृ॒ता वद॑न्तश्चम॒साँ अ॑पिंशत ॥ ९ ॥

आपः भूयिष्ठा इति एकः अब्रवीत् अग्निर्भूयिष्ठ इति अन्यः अब्रवीत् ॥
वधर्यंतीं बहुभ्यः प्रैकः अब्रवीत् ऋता वदंतश्चमसान् अपिंशत ॥ ९ ॥

एक म्हणला " उदकें सर्वांत जास्त उपयोगी, दुसरा म्हणला अग्नि सर्वांत श्रेष्ठ, तिसरा म्हणाला कीं सर्वांकरितां आपणास जाळून घेणारी अशी भूमि हीच अत्यंत उपयोगी ". ह्या प्रमाणे निरनिराळ्या तत्त्वांचा अनुवाद करतां करतां तुम्ही सहज चार्‍ही चमस तयार केलेत. ॥ ९ ॥


श्रो॒णामेक॑ उद॒कं गामवा॑जति मां॒समेकः॑ पिंशति सू॒नयाभृ॑तम् ।
आ नि॒म्रुचः॒ शकृ॒देको॒ अपा॑भर॒त्किं स्वि॑त्पु॒त्रेभ्यः॑ पि॒तरा॒ उपा॑वतुः ॥ १० ॥

श्रोणां एक उदकं गां अवाजति मांसं एकः पिंशति सूनयाभृतम् ॥
आ निम्रुचः शकृत् एकः अपाभरत् किं स्वित् पुत्रेभ्यः पितरा उपावतुः ॥ १० ॥

बांधेसूद गाईला एक जण पाणी दाखविण्यास दूर घेऊन जातो, दुसरा इकडे यज्ञांत सुरीनें कापलेलें मेध्य मांस व्यवस्थित ठेवून देतो. आणि तिसरा सायंकाळ पूर्वींच आलब्ध पशूचा अमेध्य भाग दूर नेऊन टाकतो. ह्या पेक्षां यज्ञप्रसंगी पुत्रापासून आईबापांना आणखी तें काय पाहिजे ? ॥ १० ॥


उ॒द्वत्स्व॑स्मा अकृणोतना॒ तृणं॑ नि॒वत्स्व॒पः स्व॑प॒स्यया॑ नरः ।
अगो॑ह्यस्य॒ यदस॑स्तना गृ॒हे तद॒द्येदमृ॑भवो॒ नानु॑ गच्छथ ॥ ११ ॥

उद्वत्सु अस्मा अकृणोतना तृणं निवत्सु अपः स्वपस्यया नः रः ॥
अगोह्यस्य यत् असस्तना गृहे तत् अद्येदं ऋभवः नानु गच्छथ ॥ ११ ॥

हे वीरांनो तुम्ही आपल्या विलक्षण कर्तबगारीनें पशूं करितां उंचवट्यावर व डोंगरांच्या खोल कपारींत स्वच्छ पाणी निर्माण केलेंत. आणि हें करून जो अगोह्य म्हणजे कधींही लपविला जाणरा नव्हे, त्या अगोह्याच्या म्हणजे सूर्याच्या घरीं जाऊन स्वस्थ निजलां आहांत, तर तो क्रम अजून तुम्ही कां सुरू करीत नाही. ॥ ११ ॥


स॒म्मील्य॒ यद्भुकव॑ना प॒र्यस॑र्पत॒ क्व स्वित्ता॒त्या पि॒तरा॑ व आसतुः ।
अश॑पत॒ यः क॒रस्नं॑ व आद॒दे यः प्राब्र॑वी॒त्प्रो तस्मा॑ अब्रवीतन ॥ १२ ॥

सम्मील्य यत् भुवना पर्यसर्पत क्व स्वित् तात्या पितरा व आसतुः ॥
अशपत यः करस्नं व आददे यः प्राब्रवीत् प्रः तस्मा अब्रवीतन ॥ १२ ॥

सर्व भुवनांना झांकून टाकून जेव्हां तुम्ही चोहोंकडे पसरलांत, तेव्हां तुमचे प्रेमळ आईबाप कोठें बसले होते ? ज्याने तुमचे मनगट धरले, त्याला तुम्ही शाप दिलात; परंतु ज्यानें तुमचें स्तवन केलें त्याला आशिर्वाद दिलात. ॥ १२ ॥


सु॒षु॒प्वांस॑ ऋभव॒स्तद॑पृच्छ॒तागो॑ह्य॒ क इ॒दं नो॑ अबूबुधत् ।
श्वानं॑ ब॒स्तो बो॑धयि॒तार॑मब्रवीत्संवत्स॒र इ॒दम॒द्या व्यख्यत ॥ १३ ॥

सुषुप्वांसः ऋभवस्तत् अपृच्छतागोह्य क इदं नः अबूबुधत् ॥
श्वानं बस्तः बोधयितारं अब्रवीत् संवत्सर इदं अद्या वि अख्यत ॥ १३ ॥

झोंप झाल्यावर जागें होऊन जेव्हां तुम्ही सूर्याला विचारलेंत कीं हे अगोपनीय सूर्या, आम्हाला कोणी जागें केले, तेहां बकरा म्हणाला की तुम्हांला जागे करणारा हा श्वान पहा, बाकी आज सबंध वर्षांत त्यानें तुम्हास आजच पाहिलें. ॥ १३ ॥


दि॒वा या॑न्ति म॒रुतो॒ भूम्या॒ग्निर॒यं वातो॑ अ॒न्तरि॑क्षेण याति ।
अ॒द्‌भिर्या॑ति॒ वरु॑णः समु॒द्रैर्यु॒ष्माँ इ॒च्छन्तः॑ शवसो नपातः ॥ १४ ॥

दिवा यांति मरुतः भूम्याग्निरयं वातः अंतरिक्षेण याति ॥
अद्भि्र्याति वरुणः समुद्रैर्युष्मान् इच्छंतः शवसः नः पातः ॥ १४ ॥

मरुत् उंच आकाशांत संचार करतात, अग्नि पृथ्वीवर प्रदीप्त होत असतो. वायु अंतराळांत वहात असतो व वरुण समुद्रांच्या उदकामधून संचार करतो. परंतु हे सामर्थ्यशाली ऋभूंनो हे सर्व तुमच्या सहवासाची इच्छा करतात. ॥ १४ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६२

ऋषि : दीर्घतमाः - देवता : अवस्तुतिः - छंद - त्रिष्टुप्


मा नो॑ मि॒त्रो वरु॑णो अर्य॒मायुरिंद्र॑ ऋभु॒क्षा म॒रुतः॒ परि॑ ख्यन् ।
यद्वा॒जिनो॑ दे॒वजा॑तस्य॒ सप्तेः॑ प्रव॒क्ष्यामो॑ वि॒दथे॑ वी॒र्याणि ॥ १ ॥

मा नः मित्रः वरुणः अर्यमा आयुरिंद्रः ऋभुक्षाः मरुतः परि ख्यन् ॥
यत् वाजिनः देवऽजातस्य सप्तेः प्रऽवक्ष्यामः विदथे वीर्याणि ॥ १ ॥

साक्षात देवांपासून निर्माण झालेला जो यज्ञांतील मोठा चपल आणि पाणिदार अश्व त्याच्या गुणांचे वर्णन ह्या विद्वत्सभेमध्यें आतां आम्हांस करावयाचे आहे, तर ह्या प्रसंगी मित्र, वरुण, अर्यमा, मरुत् व विश्वाचा प्राण आणि प्रभु असा इंद्र, हे आम्हांस दूर लोटून न देवोत. ॥ १ ॥


यन्नि॒र्णिजा॒ रेक्ण॑सा॒ प्रावृ॑तस्य रा॒तिं गृ॑भी॒तां मु॑ख॒तो नय॑न्ति ।
सुप्रा॑ङ्॒॑जो मेम्य॑द्वि॒श्वरू॑प इंद्रापू॒ष्णोः प्रि॒यमप्ये॑ति॒ पाथः॑ ॥ २ ॥

यत् निःऽनिजा रेक्णसा प्रावृतस्य रातिं गृभीतां मुखतः नयंति ॥
सुऽप्राङ् अजः मेम्यत् विश्वऽरूप इंद्रापूष्णोः प्रियं अपि एति पाथः ॥ २ ॥

उंची साज व झूल अंगावर घालून चाललेल्या त्या घोड्यापुढें, हातांमध्ये बली घेऊन लोक चालत असतात, वे बें बें करीत ओरडत ऐटीने चालणारा चित्र विचित्र रंगाचा एक बकराही, इंद्र आणि पूषा ह्यांच्या प्रिय निवासस्थलीं जाण्याकरितां पुढें जात असतो. ॥ २ ॥


ए॒ष छागः॑ पु॒रो अश्वे॑न वा॒जिना॑ पू॒ष्णो भा॒गो नी॑यते वि॒श्वदे॑व्यः ।
अ॒भि॒प्रियं॒ यत्पु॑रो॒ळाश॒मर्व॑ता॒ त्वष्टेदे॑नं सौश्रव॒साय॑ जिन्वति ॥ ३ ॥

एष छागः पुरः अश्वेन वाजिना पूष्णः भागः नीयते विश्वऽदेव्यः ॥
अभिऽप्रियं यत् पुरोळाशं अर्वता त्वष्टा इत् एनं सौश्रवसाय जिन्वति ॥ ३ ॥

ह्या पाणिदार घोड्यापुढें हा बकरा नेत आहेत तो तर सर्व देवांना प्रिय आहेच, परंतु ह्या प्रसंगी पूषा देवांकरितां तो बळी द्यावयाचा आहे. हा देवांचा फार आवडीचा पुरोडाश नैवेद्य अशी ह्याची चोहोंकडे ख्याती व्हावी म्हणून खुद्द त्वष्टाच ह्या बकर्‍याला त्या अश्वाबरोबरच तिकडे नेत आहे असे वाटतें. ॥ ३ ॥


यद्ध॑वि॒ष्यमृतु॒शो दे॑व॒यानं॒ त्रिर्मानु॑षाः॒ पर्यश्वं॒ नय॑न्ति ।
अत्रा॑ पू॒ष्णः प्र॑थ॒मः भा॒ग ए॑ति य॒ज्ञं दे॒वेभ्यः॑ प्रतिवे॒दय॑न्न॒जः ॥ ४ ॥

यत् हविष्यं ऋतुऽशः देवऽयानं त्रिः मानुषाः परि अश्वं नयंति ॥
अत्र पूष्णः प्रथमः भागः एति यज्ञं देवेभ्यः प्रतिऽवेदयन् अजः ॥ ४ ॥

देवलोकीं जाण्यास निघालेल्या व त्याचा हविर्भाग म्हणून त्यांना अर्पण केलेल्या त्या अश्वास ऋत्विज् बलिदानावेळीं तिनदां अग्नि भोंवती फिरवीत असतात, तोंच तिकडे पूषादेवाचा प्रथम भाग असा तो बकरा यज्ञास आरंभ झाला म्हणून कळविण्याकरितां स्वतः बळी जाऊन देवांकडे जातो. ॥ ४ ॥


होता॑ध्व॒र्युराव॑या अग्निमि॒न्धो ग्रा॑वग्रा॒भ उ॒त शंस्ता॒ सुवि॑प्रः ।
तेन॑ य॒ज्ञेन॒ स्वरङ्कृ तेन स्विष्टेन व॒क्षणा॒ आ पृ॑णध्वम् ॥ ५ ॥

होता अध्वर्युः आऽवयाः अग्निंऽइंधः ग्रावऽग्राभः उत शंस्ता सुऽविप्रः ॥
तेन यज्ञेन सुऽअरंकृतेन सुऽइष्टेन वक्षणाः आ पृणध्वम् ॥ ५ ॥

होता, अध्वर्यु, आवया, अग्निमिन्ध, ग्रावस्तुत्, प्रस्तोता आणि विद्वान ब्रह्मा इ. ऋत्विजांनो, घृताचे प्रवाहच्या प्रवाह वाहतील अशा रीतीनें हा यज्ञ थाटाने यथागत पूर्ण करा. ॥ ५ ॥


यू॒प॒व्र॒स्का उ॒त ये यू॑पवा॒हाश्च॒षालं॒ ये अ॑श्वयू॒पाय॒ तक्ष॑ति ।
ये चार्व॑ते॒ पच॑नं स॒म्भर॑न्त्यु॒तो तेषा॑म॒भिगू॑र्तिर्न इन्वतु ॥ ६ ॥

यूपऽव्रस्काः उत ये यूपऽवाहाः चषालं ये अश्वऽयूपाय तक्षति ॥
ये च अर्वते पचनं संऽभरंति उतो इति तेषां अभिऽगूर्तिः नः इन्वतु ॥ ६ ॥

यज्ञाकरितां यूप तयार करणारे, तो वाहून आणणारे, त्याच्या शेंड्यावर बसविण्याकरितां कळस करणारे व अश्व शिजविण्याकरितां भांडे तयार करणारे अशा सर्वांच्या संतोषाने हा आमचा यज्ञ समारंभ सिद्धिस जावो. ॥ ६ ॥


उप॒ प्रागा॑त्सु॒मन्मे॑ऽधायि॒ मन्म॑ दे॒वाना॒माशा॒ उप॑ वी॒तपृ॑ष्ठः ।
अन्वे॑नं॒ विप्रा॒ ऋष॑यो मदन्ति दे॒वानां॑ पु॒ष्टे च॑कृमा सु॒बन्धु॑म् ॥ ७ ॥

उप प्र अगात् सुऽमत् मे अधायि मन्म देवानां आशाः उप वीतऽपृष्ठः ॥
अनु एनं विप्राः ऋषयः मदंति देवानां पुष्टे चकृमा सुऽबंधुम् ॥ ७ ॥

मी स्तोत्र गायन उत्तम रीतीने केलें न केलें तोंच पहा हा अश्व - हा परिपुष्ट अश्व - देवांच्या लोकीं जाण्याकरितां पुढें चालता झाला; स्तोतेजन आणि ऋषि मोठ्या हर्षाने त्यास पोहोंचविण्यास गेले. ह्या अश्वानें देवांचा संतोष संपादन केला. त्यामुळें त्याला आम्ही बंधुप्रमाणें मानले आहे. ॥ ७ ॥


यद्वा॒जिनो॒ दाम॑ सं॒दान॒मर्व॑तो॒ या शी॑र्ष॒ण्या रश॒ना रज्जु॑रस्य ।
यद्वा॑ घास्य॒ प्रभृ॑तमा॒स्ये३॑तृणं॒ सर्वा॒ ता ते॒ अपि॑ दे॒वेष्व॑स्तु ॥ ८ ॥

यत् वाजिनः दाम संऽदानं अर्वतः या शीर्षण्या रशना रज्जुः अस्य ॥
यत् वा घ अस्य प्रऽभृतं आस्ये तृणं सर्वा ता ते अपि देवेषु अस्तु ॥ ८ ॥

ह्या चलाख घोड्याची रशी, पायबंद व डोक्याच्या पट्या, काढणी इत्यादि जें जें काही आहे, किंवा खातांना त्याने जे गवत तोंडांत धरले असेल, तें तें सर्व देव लोकांत त्याच्या बरोबरच जावो. ॥ ८ ॥


यदश्व॑स्य क्र॒विषो॒ मक्षि॒काश॒ यद्वा॒ स्वरौ॒ स्वधि॑तौ रि॒प्तमस्ति॑ ।
यद्धस्त॑योः शमि॒तुर्यन्न॒खेषु॒ सर्वा॒ ता ते॒ अपि॑ दे॒वेष्व॑स्तु ॥ ९ ॥

यत् अश्वस्य क्रविषः मक्षिका आश यत् वा स्वरौ स्वऽधितौ रिप्तं अस्ति ॥
यत् हस्तयोः शमितुः यत् नखेषु सर्वा ता ते अपि देवेषु अस्तु ॥ ९ ॥

ह्या घोड्याच्या मांसाचा जो कांही अंश माशीनें खाल्ला असेल, किंवा लांकडी ठोकळ्याला व सुरीला चिकटून राहिला असेल, अगर मारणाराच्या हाताला व नखांना राहिला असेल, तोही सर्व देवांना जाऊन पोहोंचो. ॥ ९ ॥


यदूव॑ध्यमु॒दर॑स्याप॒वाति॒ य आ॒मस्य॑ क्र॒विषो॑ ग॒न्धो अस्ति॑ ।
सु॒कृ॒ता तच्छ॑मि॒तारः॑ कृण्वन्तू॒त मेधं॑ शृत॒पाकं॑ पचन्तु ॥ १० ॥

यत् ऊवध्यं उदरस्य अपऽवातिः यः आमस्य क्रविषः गंधः अस्ति ॥
सुऽकृता तत् शमितारः कृण्वंतु उत मेधं शृतऽपाकं पचंतु ॥ १० ॥

कोठ्यांत गवताचा जो अपक्व भाग राहून त्याचा वाईट वास येत असतो व कच्च्या मांसाचाही जो एक प्रकारचा वास चालतो, म्हणून तो सर्व भाग हे मांस कापणारे लोक धुवून स्वच्छ करोत व मेध्य मांस उत्तम रीतीनें शिजवून तयार करोत. ॥ १० ॥


यत्ते॒ गात्रा॑द॒ग्निना॑ प॒च्यमा॑नाद॒भि शूलं॒ निह॑तस्याव॒धाव॑ति ।
मा तद्‌भूम्या॒मा श्रि॑ष॒न्मा तृणे॑षु दे॒वेभ्य॒स्तदु॒शद्भ्यो॑ि रा॒तम॑स्तु ॥ ११ ॥

यत् ते गात्रात् अग्निना पच्यमानात् अभि शूलं निऽहतस्य अवऽधावति ॥
मा तत् भूम्यां आ श्रिषत् मा तृणेषु देवेभ्यः तत् उशत्ऽभ्यः रातं अस्तु ॥ ११ ॥

तुझे मांस शिजत असतांना त्यांतील जो जो अंश ओतू जाईल किंवा लोहशूलावर तुझ्या मांसाचे तुकडे रोवून भाजत असतांना जो अंश त्या शूलावर पाघळेल, तो जमीनींत जिरून किंवा गवतांत सांडून वाया न जावो, तर तोही उत्सुक देवांनांच अर्पण केला असे होवो. ॥ ११ ॥


ये वा॒जिनं॑ परि॒पश्य॑न्ति प॒क्वं य ई॑मा॒हुः सु॑र॒भिर्निर्ह॒रेति॑ ।
ये चार्व॑तो मांसभि॒क्षामु॒पास॑त उ॒तो तेषा॑म॒भिगू॑र्तिर्न इन्वतु ॥ १२ ॥

ये वाजिनं परिऽपश्यंति पक्वं ये ईं आहुः सुरभिः निः हर इति ॥
ये च अर्वतः मांसऽभिक्षां उपऽआसत उतो इति तेषां अभिऽगूर्तिः न इन्वतु ॥ १२ ॥

हा जवान घोडा शिजून तयार झाला कीं नाहीं हें पाहण्याचे काम ज्यांचे असतें तें म्हणतात कीं, " पहा हा याचा सुवास येऊं लागला तर आतां भांडे खाली उतरा." व तसेच जे लोक अश्वमांसाचा प्रसाद मिळण्याची उत्सुक्तेनें प्रतीक्षा करीत असतात - अशा ह्या सर्व मंडळींच्या संतोषाने आमच्या कार्यभागास सहाय्य होवो. ॥ १२ ॥


यन्नीक्ष॑णं माँ॒स्पच॑न्या उ॒खाया॒ या पात्रा॑णि यू॒ष्ण आ॒सेच॑नानि ।
ऊ॒ष्म॒ण्यापि॒धाना॑ चरू॒णाम॒ङ्काः॑ सू॒नाः परि॑ भूष॒न्त्यश्व॑म् ॥ १३ ॥

यत् निऽईक्षणं मांस्पचन्याः उखायाः या पात्राणि यूष्णः आऽसेचनानि ॥
ऊष्मण्या अपिऽधाना चरूणां अं‍काः सूनाः परि भूषंति अश्वम् ॥ १३ ॥

मांस शिजले कीं नाहीं हें पाहण्याकरितां भांड्यात घालवयाची लांब पळी, सुरवा ओतून ठेवावयाची पात्रें, हविरन्नाची वाफ जाऊं नये म्हणून पातेल्यावर ठेवावयाची झांकणे, आंकडे आणि सुर्‍या हीं सर्व उपकरणीं अश्वाचें मांस शिजवून तयार करण्याकरितां लागत असतात. ॥ १३ ॥


नि॒क्रम॑णं नि॒षद॑नं वि॒वर्त॑नं॒ यच्च॒ पड्बी॑श॒मर्व॑तः ।
यच्च॑ प॒पौ यच्च॑ घा॒सिं ज॒घास॒ सर्वा॒ ता ते॒ अपि॑ दे॒वेष्व॑स्तु ॥ १४ ॥

निऽक्रमणं निऽसदनं विऽवर्तनं यच् च पड्बीशं अर्वतः ॥
यच् च पपौ यच् च घासिं जघासः सर्वा ता ते अपि देवेषु अस्तु ॥ १४ ॥

ज्या ठिकाणाहून तो अश्व निघाला, जेथें बसून त्याने विश्रांती घेतली, जेथें लोळून त्यानें आपलें अंग मोकळें केले ती सर्व ठिकाणें, तसेंच त्याचा पायबंद, त्यानें प्यालेले पाणी व खाल्लेलें गवत ही सर्व त्याला देवलोकीं प्राप्त होवोत. ॥ १४ ॥


मा त्वा॒ग्निर्ध्व॑नयीद्धू॒मग॑न्धि॒र्मोखा भ्राज॑न्त्य॒भि वि॑क्त॒ जघ्रिः॑ ।
इ॒ष्टं वी॒तम॒भिगू॑र्तं॒ वष॑ट्कृतं॒ तं दे॒वासः॒ प्रति॑ गृभ्ण॒न्त्यश्व॑म् ॥ १५ ॥

मा त्वा अग्निः ध्वनयीत् धूमऽगंधिः मा उखा भ्राजंति अभि विक्त जघ्रिः ॥
इष्टं वीतं अभिऽगूर्तं वषट्ऽकृतं तं देवासः प्रति गृभ्णंति अश्वम् ॥ १५ ॥

विस्तवांत तुझें मांस करपून चालल्याचा आवाज न होवो, व भांडे तापून ओतू जावून उपडें न होवो, कारण जेव्हां मांसाचे योग्य हवन होतें व ते स्वादिष्ट बनून देवांस पसंत पडून जेव्हां वषट् शब्दानें त्याला पवित्रपणा येतो, तेव्हांच त्या अश्वाचा देव स्वीकार करतात. ॥ १५ ॥


यदश्वा॑य॒ वास॑ उपस्तृ॒णन्त्य॑धीवा॒सं या हिर॑ण्यान्यस्मै ।
सं॒दान॒मर्व॑न्तं॒ पड्बी॑शं प्रि॒या दे॒वेष्वा या॑मयन्ति ॥ १६ ॥

यत् अश्वाय वासः उपऽस्तृणंति अधीवासं या हिरण्यानि अस्मै ॥
संऽदानं अर्वंतं पड्बीशं प्रिया देवेषु आ यमयंति ॥ १६ ॥

घोड्याच्या पाठीवर झूल घालतात ती, त्याचें खोगीर, त्याचा सोन्याचा साज, लगाम आणि पायबंद ह्या सर्व प्रिय वस्तू त्याच्या बरोबर देवलोकीं पाठविण्याची वहिवाट आहे. ॥ १६ ॥


यत्ते॑ सा॒दे मह॑सा॒ शूकृ॑तस्य॒ पार्ष्ण्या॑ वा॒ कश॑या वा तु॒तोद॑ ।
स्रु॒चेव॒ ता ह॒विषो॑ अध्व॒रेषु॒ सर्वा॒ ता ते॒ ब्रह्म॑णा सूदयामि ॥ १७ ॥

यत् ते सादे महसा शूकृतस्य पार्ष्ण्या वा कशया वा तुतोद ॥
स्रुचाऽइव ता हविषः अध्वरेषु सर्वा ता ते ब्रह्मणा सूदयामि ॥ १७ ॥

तूं थकून जाऊन मोठमोठ्यानें धापा टाकीत असतांही तुझ्यावर स्वार होऊन कोणी तुला परांच्यानी किंवा चाबकानें मारून दुःख दिलें असेल तें तुझे सर्व दुःख यज्ञांत होमाच्या पळीनें व ह्या माझ्या स्तवनानें पार नाहिसें करतो. ॥ १७ ॥


चतु॑स्त्रिंशद्वा॒जिनो॑ दे॒वब॑न्धो॒र्वङ्क्री॒ रश्व॑स्य॒ स्वधि॑तिः॒ समे॑ति ।
अच्छि॑द्रा॒ गात्रा॑ व॒युना॑ कृणोत॒ परु॑ष्परुरनु॒घुष्या॒ वि श॑स्त ॥ १८ ॥

चतुःत्रिंशत् वाजिनः देवऽबंधोः वङ्क्रीः अश्वस्य स्वऽधितिः सं एति ॥
अच्छिद्रा गात्रा वयुना कृणोत परुःपरुः अनुऽघुष्या वि शस्त ॥ १८ ॥

बलि जाण्यामुळें देवतांना बंधू प्रमाणें प्रिय झालेल्या ह्या अश्वाच्या चौतीस बरगड्यांत आतां ही सुरी घुसत आहे. कापणार्‍या लोकांनो ह्याची सर्व गात्रें चातुर्यानें सबंधच्या सबंध सोडवा. प्रत्येक सांधान सांधा , हा अमुक, हा तमूक असें मोठ्यानें सांगून कापून काढा. ॥ १८ ॥


एक॒स्त्वष्टु॒रश्व॑स्या विश॒स्ता द्वा य॒न्तारा॑ भवत॒स्तथ॑ ऋ॒तुः ।
या ते॒ गात्रा॑णामृतु॒था कृ॒णोमि॒ ताता॒ पिण्डा॑नां॒ प्र जु॑होम्य॒ग्नौ ॥ १९ ॥

एकः त्वष्टुः अश्वस्य विऽशस्ता द्वा यंतारा भवतः तथा ऋतुः ॥
या ते गात्राणां ऋतुऽथा कृणोमि ताऽता पिण्डानां प्र जुहोमि अग्नौ ॥ १९ ॥

साक्षात त्वष्ट्यानें निर्माण केलेल्या ह्या घोड्याला विशसिता म्हणजे कापणारा एकच असतो पण त्याला धरणारे दोन असावे लागतात, कारण असा प्रघातच आहे. हे अश्वा तुझे जे जे अवयव मी क्रमाक्रमानें कापून काढले आहेत त्यांचे पिंड करून ते मी यज्ञाग्नींत अर्पण करतो. ॥ १९ ॥


मा त्वा॑ तपत्प्रि॒य आ॒त्मापि॒यन्तं॒ मा स्वधि॑तिस्त॒न्व१॑आ ति॑ष्ठिपत्ते ।
मा ते॑ गृ॒ध्नुर॑विश॒स्ताति॒हाय॑ छि॒द्रा गात्रा॑ण्य॒सिना॒ मिथू॑ कः ॥ २० ॥

मा त्वा तपत् प्रियः आत्मा अपिऽयंतं मा स्वऽधितिः तन्वः आ तिस्थिपत् ते ॥
मा ते गृध्नुः अविऽशस्ता अतिऽहाय छिद्रा गात्राणि असिना मिथु करिति कः ॥ २० ॥

तूं इहलोक सोडून जाते वेळी तुझ्या प्राणाला यातना न होवोत, व कापणाराची सुरी तुझ्या मानेंत कुचंबून न राहो. कापणारा अडाणीपणानें एखाद्या गिधाडाप्रमाणें तुझी गात्रें आपल्या सुरीनें भलत्याच ठिकाणी तोडतोडून खराब न करोत. ॥ २० ॥


न वा उ॑ ए॒तन्म्रि॑यसे॒ न रि॑ष्यसि दे॒वाँ इदे॑षि प॒थिभिः॑ सु॒गेभिः॑ ।
हरी॑ ते॒ युञ्जा॒ पृष॑ती अभूता॒मुपा॑स्थाद्वा॒जी धु॒रि रास॑भस्य ॥ २१ ॥

न वै ऊं इति एतन् म्रियसे नः रिष्यसि देवान् इत् एषि पथिऽभिः सुऽगेभिः ॥
हरी इति ते युञ्जा पृषती इति अभूतां उप अस्थात् वाजी धुरि रासभस्य ॥ २१ ॥

हे पहा तूं कांही मरत नाहींस व नाहिंसा होतोस असेही नाही तर सुलभ मार्गांनी देवांकडेसच जात आहेस. साक्षात् इंद्राचे हरिद्‌वर्ण अश्व किंवा मरुतांच्या हरिणी ह्या तुझ्या जोडीस येतील किंवा अश्वी देवाच्या मोठ्यानें खिंकाळणार्‍या मजबूत घोड्याच्या धूरेला जवान असा तूंच जोडला जाशील. ॥ २१ ॥


सु॒गव्यं॑ नो वा॒जी स्वश्व्यं॑ पुं॒सः पु॒त्राँ उ॒त वि॑श्वा॒पुषं॑ र॒यिम् ।
अ॒ना॒गा॒स्त्वं नो॒ अदि॑तिः कृणोतु क्ष॒त्रं नो॒ अश्वो॑ वनतां ह॒विष्मा॑न् ॥ २२ ॥

सुऽगव्यं नः वाजी सुऽअश्व्यं पुंसः पुत्रान् उत विश्वऽपुषं रयिम् ॥
अनागाःऽत्वं नः अदितिः कृणोतु क्षत्रं नः ः अश्वः वनतां हविष्मान् ॥ २२ ॥

हा यज्ञार्पित पाणिदार घोडा आम्हांस उत्तम गोधन, उत्कृष्ट अश्वसंपदा, वीर्यशाली पुत्र व सर्व बाजूंनी आमची अभिवृद्धि करणारी अशी दिव्य संपत्ति देवो. अनाद्यनंत अदिति आम्हांस पाप निर्मुक्त करो, आणि हा अश्वमेध आम्हांला अधिकार प्राप्त करून देवो. ॥ २२ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६३ ( अश्वमेध सूक्त )

ऋषि : दीर्घतमस औचथ्य - देवता : अश्व - छंद - त्रिष्टुभ्


यदक्र॑न्दः प्रथ॒मं जाय॑मान उ॒द्यन्स॑मु॒द्रादु॒त वा॒ पुरी॑षात् ॥
श्ये॒नस्य॑ प॒क्षा ह॑रि॒णस्य॑ बा॒हू उ॑प॒स्तुत्यं॒ महि॑ जा॒तं ते॑ अर्वन् ॥ १ ॥

यत् अक्रंदः प्रथमं जायमानः उत्ऽयन् समुद्रात् उत वा पुरीषात् ॥
श्येनस्य पक्षा हरिणस्य बाहू इति उपऽस्तुत्यं महि जातं ते अर्वन् ॥ १ ॥

समुद्रपासून म्हणा किंवा मेघोदका पासून म्हणा, वर उडून प्रकट होतांच जेव्हां पहिल्याने तू खिंकाळलास, तेव्हांचे तुझे स्वरूप तुला ससाण्याचे पंख व हरिणाचे पाय अशा प्रकारचे होते. हे अश्वा ह्याप्रमाणे उत्तम जन्म येणें हे तुझे भाग्यच आहे. ॥ १ ॥


य॒मेन॑ द॒त्तं त्रि॒त ए॑नमायुन॒गिंद्र॑ एणं प्रथ॒मो अध्य॑तिष्ठत् ॥
ग॒न्ध॒र्वो अ॑स्य रश॒नाम॑गृभ्णा॒त्सूरा॒दश्वं॑ वसवो॒ निर॑तष्ट ॥ २ ॥

यमेन दत्तं त्रितः एनं आयुनक् इंद्र एनं प्रथमः अधि अतिष्ठत् ॥
गंधर्वः अस्य रशनां अगृभ्णात् सूरात् अश्वं वसवः निः अतष्ट ॥ २ ॥

यमाने दिलेल्या ह्या घोड्यावर त्रितानें साज घालून त्याला तयार केला, आणि खुद्द इंद्रानेंच त्याच्यावर प्रथम आरोहण केलें, व गंधर्व त्याचा लगाम धरून उभा राहिला. वसूंनो असा हा दिव्य वारू तुम्ही सूर्यापासून निर्माण केलात. ॥ २ ॥


असि॑ य॒मो अस्या॑दि॒त्यो अ॑र्व॒न्नसि॑ त्रि॒तो गुह्ये॑न व्र॒तेन॑ ॥
असि॒ सोमे॑न स॒मया॒ विपृ॑क्त आ॒हुस्ते॒ त्रीणि॑ दि॒वि बन्ध॑नानि ॥ ३ ॥

असि यमः असि आदित्यः अर्वन् असि त्रितः गुह्येन व्रतेन ॥
असि सोमेन समया विऽपृक्तः आहुः ते त्रीणि दिवि बंधनानि ॥ ३ ॥

ईश्वराच्या अद्‍भूत लीलेच्या दृष्टीनें पहातां हे अश्वा तूंच यम आहेस, आदित्य आहेस आणि त्रितही तूंच आहेस, सोमरसाशीही तुझें तादात्म्यच आहे. आणि असें सांगतात कीं, तुझीं तीन बंधने स्वर्गलोकी आहेत. ॥ ३ ॥


त्रीणि॑ त आहुर्दि॒वि बन्ध॑नानि॒ त्रीण्य॒प्सु त्रीण्य॒न्तः स॑मु॒द्रे ॥
उ॒तेव॑ मे॒ वरु॑णश्छन्त्स्यर्व॒न्यत्रा॑ त आ॒हुः प॑र॒मं ज॒नित्र॑म् ॥ ४ ॥

त्रीणि ते आहुः दिवि बंधनानि त्रीणि अप्ऽसु त्रीणि अंतरिति समुद्रे ॥
उतऽइव मे वरुणः छंत्सि अर्वन् यत्र ते आहुः परमं जनित्रम् ॥ ४ ॥

तुझे स्वर्गलोकीं तीन संबंध आहेत, असें सांगतात, मेघोदकांत तीन आणि समुद्रामध्येंही तीनच; तेव्हां हे अश्वा, वरुणाप्रमाणे तुझेंही अति श्रेष्ठ जन्मस्थान आहे म्हणून म्हणतात, ते कोठें ते मला सांग. ॥ ४ ॥


इ॒मा ते॑ वाजिन्नव॒मार्ज॑नानी॒मा श॒फानां॑ सनि॒तुर्नि॒धाना॑ ॥
अत्रा॑ ते भ॒द्रा र॑श॒ना अ॑पश्यमृ॒तस्य॒ या अ॑भि॒रक्ष॑न्ति गो॒पाः ॥ ५ ॥

इमा ते वाजिन् अवऽमार्जनानि इमा शफानां सनितुः निऽधाना ॥
अत्र ते भद्राः रशनाः अपश्यं ऋतस्य या अभिऽरक्षंति गोपाः ॥ ५ ॥

हे बलवान अश्वा, जेथें तुझे अंग रगडीत असत तीं हीं स्थले, तसेंच तून् विजयी होऊन आनंदानें फुरफुरून आपल्या खुरांनी जमीन उकरीत असलेली ती ठिकाणें, येथें तुझे मंगलदायक रज्जू पडलेले मी पाहिले. सत्यधर्माचे जे रक्षक तेच ह्या रज्जूचेंही रक्षण करीत असतात. ॥ ५ ॥


आ॒त्मानं॑ ते॒ मन॑सा॒राद॑जानाम॒वो दि॒वा प॒तय॑न्तं पतं॒गम् ॥
शिरो॑ अपश्यं प॒थिभिः॑ सु॒गेभि॑ररे॒णुभि॒र्जेह॑मानं पत॒त्रि ॥ ६ ॥

आत्मानं ते मनसा आरात् अजानां अवः दिवा पतयंतं पतंगम् ॥
शिरः अपश्यं पथिऽभिः सुऽगेभिः अरेणुऽभिः जेहमानं पतत्रि ॥ ६ ॥

तुझा आत्मा खालून वर आकाशांत उंच उडणार्‍या पक्ष्याप्रमाणें मी दुरून आपल्या मनानेंच अवलोकन केला; व पंख असलेलें तुझे मस्तकसुद्धां, पापरूप रजःकणांनी मलीन न होणार्‍या अशा सुगम्य मार्गांनी फडफडत वर जात असतांना मी पाहिलें आहे. ॥ ६ ॥


अत्रा॑ ते रू॒पमु॑त्त॒मम॑पश्यं॒ जिगी॑षमाणमि॒ष आ प॒दे गोः ॥
य॒दा ते॒ मर्तो॒ अनु॒ भोग॒मान॒ळादिद्ग्रसि॑ष्ठ॒ ओष॑धीरजीगः ॥ ७ ॥

अत्र ते रूपं उत्ऽतमं अपश्यं जिगीषमाणं इषः आ पदे गोः ॥
यदा ते मर्तः अनु भोगं आनट् आत् इत् ग्रसिष्ठः ओषधीः अजीगरिति ॥ ७ ॥

येथें यज्ञमंडपांतही तुझी मनोहर आकृति वेदीजवळ हविरन्नाचा आस्वाद घेण्याकरितां उत्सुकतेनें तोंड पुढें करीत असलेली माझ्या दृष्टीस पडली; ती अशी कीं भक्तजनानें तुझ्या तोंडापुढें खाद्य आणतांच क्षुधार्त होऊन तो तृणाहार तूं पार खाऊन टाकलास. ॥ ७ ॥


अनु॑ त्वा॒ रथो॒ अनु॒ मर्यो॑ अर्व॒न्ननु॒ गावो ऽ॑नु॒ भगः॑ क॒नीना॑म् ॥
अनु॒ व्राता॑स॒स्तव॑ स॒ख्यमी॑यु॒रनु॑ दे॒वा म॑मिरे वी॒र्यं ते ॥ ८ ॥

अनु त्वा रथः अनु मर्यः अर्वन्न् अनु गावः अनु भगः कनीनाम् ॥
अनु व्रातासः तव सख्यं ईयुः अनु देवाः ममिरे वीर्यं ते ॥ ८ ॥

हे अश्वा, रथ, शूर योद्धा, स्वधेनूंचा समूह, मुग्ध बालिकांचे प्रेम (कटाक्ष) आणि मरुतांचा संघ हे सर्व तुझ्या सहवासाची कामना धरून तुझ्या पाठोपाठ गेले, व देवांस सुद्धां तुझ्या शौर्याचें कौतुकच वाटले. ॥ ८ ॥


हिर॑ण्यशृ॒ङ्गोवऽ॑यो अस्य॒ पादा॒ मनो॑जवा॒ अव॑र॒ इंद्र॑ आसीत् ॥
दे॒वा इद॑स्य हवि॒रद्य॑माय॒न्यो अर्व॑न्तं प्रथ॒मो अ॒ध्यति॑ष्ठत् ॥ ९ ॥

हिरण्यऽशृङ्गः् अयः अस्य पादाः मनःऽजवाः अवरः इंद्र आसीत् ॥
देवाः इत् अस्य हविःऽअद्यं आयन् यः अर्वंतं प्रथमः अधिऽअतिष्ठत् ॥ ९ ॥

ह्या दिव्य अश्वाचे आयाळ सोन्याचें व पाय (जणुंकाय) पोलादाचे बनले आहेत. मनापेक्षांही जो वेगवान व ज्याच्यापुढे कोणाचेंही कांहीएक चालत नाही तो इंद्र ह्याचा धनी अशा ह्या अश्वाचा काय, पण जो ह्या अश्वावर प्रथम आरूढ झाला तो इंद्र सुद्धां आला होता. ॥ ९ ॥


ई॒र्मान्ता॑सः॒ सिलि॑कमध्यमासः॒ सं शूर॑णासो दि॒व्यासो॒ अत्याः॑ ॥
हं॒सा इ॑व श्रेणि॒शो य॑तन्ते॒ यदाक्षि॑षुर्दि॒व्यमज्म॒मश्वाः॑ ॥ १० ॥

ईर्मऽअंतासः सिलिकऽमध्यमासः सं शूरणासः दिव्यासः अत्याः ॥
हंसाःऽइव श्रेणिऽशः यतंते यत् आक्षिषुः दिव्यं अज्मं अश्वाः ॥ १० ॥

ज्यांचे पुठ्ठे भरदार व बांधा रेखीव आहे, असे हे देवलोकींचे चलाख आणि तेज घोडे एका रांगे मागून दुसरी ह्या प्रमाणें हंसांच्या मालिके प्रमाणे हारीनें धांवत असतात, व स्वर्ग मार्गांत एकच गर्दी करून तो व्याप्त करून टाकतात. ॥ १० ॥


तव॒ शरी॑रं पतयि॒ष्ण्वर्व॒न्तव॑ चि॒त्तं वात॑ इव॒ ध्रजी॑मान् ॥
तव॒ शृङ्गा॑तणि॒ विष्ठि॑ता पुरु॒त्रार॑ण्येषु॒ जर्भु॑राणा चरन्ति ॥ ११ ॥

तव शरीरं पतयिष्णु अर्वन् तव चित्तं वातःऽइव ध्रजीमान् ॥
तव शृङ्गा्णि विऽस्थिता पुरुऽत्रा अरण्येषु जर्भुराणा चरंति ॥ ११ ॥

हे अश्वा, तुझा देह पक्ष्याप्रमाणे उड्डाण करूं शकतो. तुझें मनही वायू प्रमाणे वेगवान व तुझें आयाळ तर इतकें विस्तीर्ण असतें कीं, तें जिकडे तिकडे विखरून पसरतें व अरण्यांतूनही त्याचा सर सर असा ध्वनी ऐकूं येतो. ॥ ११ ॥


उप॒ प्रागा॒च्छस॑नं वा॒ज्यर्वा॑ देव॒द्रीचा॒ मन॑सा॒ दीध्या॑नः ॥
अ॒जः पु॒रो नी॑यते॒ नाभि॑र॒स्यानु॑ प॒श्चात्क॒वयो॑ यन्ति रे॒भाः ॥ १२ ॥

उप प्र अगात् शसनं वाजि अर्वा देवद्रीचा मनसा दीध्यानः ॥
अजः पुरः नीयते नाभिः अस्य अनु पश्चात् कवयः यंति रेभाः ॥ १२ ॥

बलि प्रदान करावयाचें त्या स्थलाजवळ पहा हा जवान घोडा येऊन पोहोंचला देखील; ह्या वेळीं त्याचें अंतःकरण देवाच्या एकाग्र ध्यानांत कसें गढून गेलेलें आहे. ह्या घोड्याचा बांधव जो बोकड त्यालाही घोड्याच्या पुढेंच चालविले आहे व दोघांच्या मागें प्रतिभा संपन्न स्तोतेजन चालले आहेत. ॥ १२ ॥


उप॒ प्रागा॑त्पर॒मं यत्स॒धस्थ॒मर्वाँ॒ अच्छा॑ पि॒तरं॑ मा॒तरं॑ च ॥
अ॒द्या दे॒वाञ्जुष्ट॑तमो॒ हि ग॒म्या अथा शा॑स्ते दा॒शुषे॒ वार्या॑णि ॥ १३ ॥

उप प्र अगात् परमं यत् सधऽस्थं अर्वान् अच्छ पितरं मातरं च ॥
अद्य देवान् जुष्टऽतमः हि गम्या अथ आ शास्ते दाशुषे वार्याणि ॥ १३ ॥

हा घोडा अत्युच्च अशा स्वर्गलोकांत जाऊन पोहोंचला व त्याला जगत्पिता आणि जगन्माता ह्यांचे दर्शनही झाले. हे अश्वा अत्यंत प्रसन्नांतःकरणानें देवांना भेट, कारण इकडेही स्तोतृजन यजमानास उत्कृष्ट वर प्रसादांचा लाभ व्हावा म्हणून प्रार्थना करीत आहेत. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६४ ( अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्त )

ऋषि : दीर्घतमस औचथ्य - देवता : विश्वेदेव, सोम, अग्नि, सूर्य, वायु, काल, सरस्वती
- छंद - जगती, त्रिष्टुभ्, अनुष्टुभ्, प्रस्तारपंक्ति


अ॒स्य वा॒मस्य॑ पलि॒तस्य॒ होतु॒स्तस्य॒ भ्राता॑ मध्य॒मो अ॒स्त्यश्नः॑ ॥
तृ॒तीयो॒ भ्राता॑ घृ॒तपृ॑ष्ठो अ॒स्यात्रा॑पश्यं वि॒श्पतिं॑ स॒प्तपु॑त्रम् ॥ १ ॥

अस्य वामस्य पलितस्य होतुः तस्य भ्राता मध्यमः अस्ति अश्नः ॥
तृतीयः भ्राता घृतऽपृष्ठः अस्य अत्र अपश्यं विश्पतिं सप्तऽपुत्रम् ॥ १ ॥

हा पहा शुभ्र किरणरूप जटामंडित पुरातन आचार्य. त्याचा मधला भाऊ सर्व-भोक्ता असून तिसर्‍या भावाचा देह घृतकांतीने दीप्तिमान् आहे. सर्व लोकांच्या ह्या प्रभूचें दर्शन त्याच्या सात पुत्रांनिशी मला येथेंच झालें. ॥ १ ॥


स॒प्त यु॑ञ्जन्ति॒ रथ॒मेक॑चक्र॒मेको॒ अश्वो॑ वहति स॒प्तना॑मा ॥
त्रि॒नाभि॑ च॒क्रम॒जर॑मन॒र्वं यत्रे॒मा विश्वा॒ भुव॒नाधि॑ त॒स्थुः ॥ २ ॥

सप्त युञ्जंति रथं एकऽचक्रं एकः अश्वः वहति सप्तऽनामा ॥
त्रिऽनाभि चक्रं अजरं अनर्वं यत्र इमा विश्वा भुवना अधि तस्थुः ॥ २ ॥

एक चाकी रथ सात जण जोडून तयार करतात, त्या रथाला एकच घोडा असतो, परंतु त्यांची स्वरूपें सात आहेत. रथाच्या चाकाला तीन तुंवे असून ते कधींही झिजत नाहींत वा मोडतही नाहीत. ह्या एकाच चाकाच्या आधारावर सर्व भुवनें व्यवस्थित चाललेली आहेत. ॥ २ ॥


इ॒मं रथ॒मधि॒ ये स॒प्त त॒स्थुः स॒प्तच॑क्रं स॒प्त व॑ह॒न्त्यश्वाः॑ ॥
स॒प्त स्वसा॑रो अ॒भि सं न॑वन्ते॒ यत्र॒ गवां॒ निहि॑ता स॒प्त नाम॑ ॥ ३ ॥

इमं रथं अधि ये सप्त तस्थुः सप्तऽचक्रं सप्त वहंति अश्वाः ॥
सप्त स्वसारः अभि सं नवंते यत्र गवां निऽहिता सप्त नाम ॥ ३ ॥

दुसरा एक रथ सात चाकी आहे. त्यांत सात जण बसतात, व रथाला सात घोडे जुंपलेले असतात. सात बहिणी ह्या रथाचें महत्त्व वर्णन करतात, कारण ह्या रथाच्या जागेंत दिव्य धेनूंचीं सात स्वरूपें गुप्तपणें राहिलेली आहेत. ॥ ३ ॥


को द॑दर्श प्रथ॒मं जाय॑मानमस्थ॒न्वन्तं॒ यद॑न॒स्था बिभ॑र्ति ॥
भूम्या॒ असु॒रसृ॑गा॒त्मा क्व स्वि॒त्को वि॒द्वांस॒मुप॑ गा॒त्प्रष्टु॑मे॒तत् ॥ ४ ॥

कः ददर्श प्रथमं जायमानं अस्थन्ऽवंतं यत् अनस्था बिभर्ति ॥
भूम्या असुः असृक् आत्मा क्व स्वित् कः विद्वांसं उप गात् प्रष्टुं एतत् ॥ ४ ॥

स्वतः अस्थि रहित (म्हणजे अजड) असून ह्या अस्थियुक्त प्राण्यांचा म्हणजे जड विश्वाचा जो सांभाळ करीत असतो, त्या ईश्वरालाच उत्पन्न होतांना कोणी तरी पाहिलें आहे काय ? ह्या पृथ्वीचें जीव तत्त्व व तिचें रक्त (म्हणजे घटक द्रव्य) आणि आत्मतत्त्व हीं त्या वेळीं कोठें होती ? आणि ज्याला ह्या सर्व गोष्टी माहित आहेत त्याला त्या विचारण्याकरितां तरी कोण गेला होता ? ॥ ४ ॥


पाकः॑ पृच्छामि॒ मन॒सावि॑जानन्दे॒वाना॑मे॒ना निहि॑ता प॒दानि॑ ॥
व॒त्से ब॒ष्कयेऽ॑धि स॒प्त तन्तू॒न्वि त॑त्निसरे क॒वय॒ ओत॒वा उ॑ ॥ ५ ॥

पाकः पृच्छामि मनसा अविऽजानन् देवानां एना निऽहिता पदानि ॥
वत्से बष्कये अधि सप्त तंतून् वि तत्नि्रे कवयः ओतवै ऊं इति ॥ ५ ॥

मी मनाचा निष्कपट परंतु अज्ञानी; तेव्हां देवांची ही जी स्वरूपें गूढ आहेत, ती कशी आहेत ते विचारतो. पहा ह्या एक वर्षाच्या वत्साच्या अंगावर ज्ञानी जनांनी उपासनारूप वस्त्र विणण्याकरितां सात धागे पसरून दिले आहेत. ॥ ५ ॥


अचि॑कित्वाञ्चिकि॒तुष॑श्चि॒दत्र॑ क॒वीन्पृ॑च्छामि वि॒द्मने॒ न वि॒द्वान् ॥
वि यस्त॒स्तम्भ॒ षळि॒मा रजां॑स्य॒जस्य॑ रू॒पे किमपि॑ स्वि॒देक॑म् ॥ ६ ॥

अचिकित्वान् चिकितुषः चित् अत्र कवीन् पृच्छामि विद्मने न विद्वान् ॥
वि यः तस्तंभ षट् इमा रजांसि अजस्य रूपे किं अपि स्वित् एकम् ॥ ६ ॥

ह्या संबंधांत आपल्याला कांहीच कळत नाही, अज्ञानी पडलो, तेव्हां, हे सर्व ज्यांना कळत आहे अशा ज्ञानी जनांपासून सर्व समजून घावे म्हणून त्यांना विचारतो कीं ज्याने हे सहाही लोक धारण केले आहेत त्या जन्मरहित ईश्वराच्या स्वरूपांत कांही एकात्मक आहे हें खरे ना ? ॥ ६ ॥


इ॒ह ब्र॑वीतु॒ य ई॑म॒ङ्गी वेदा॒स्य वा॒मस्य॒ निहि॑तं प॒दं वेः ॥
शी॒र्ष्णः क्षी॒रं दु॑ह्रते॒ गावो॑ अस्य व॒व्रिं वसा॑ना उद॒कं प॒दापुः॑ ॥ ७ ॥

इह ब्रवीतु यः ईं अंग वेद अस्य वामस्य निऽहितं पदं वेरिति वेः ॥
शीर्ष्णः क्षीरं दुह्रते गावः अस्य वव्रिं वसाना उदकं पदा अपुः ॥ ७ ॥

ज्या कोणाला हे खरोखर माहीत असेल त्यानें आतां विलंब न लावता सांगून टाकावे. ह्या मनोहर दिव्य पक्ष्यांचे निवास स्थान फार गूढ आहे. ह्याच्या धेनू अशा चमत्कारिक आहेत कीं त्यांच्या मस्तकांतूनच दुधाचा प्रवाह चालतो. त्या तेजोमय वस्त्रें पांघरतात व पायानेंच पाणी पीत असतात. ॥ ७ ॥


मा॒ता पि॒तर॑मृ॒त आ ब॑भाज धी॒त्यग्रे॒ मन॑सा॒ सं हि ज॒ग्मे ॥
सा बी॑भ॒त्सुर्गर्भ॑रसा॒ निवि॑द्धा॒ नम॑स्वन्त॒ इदु॑पवा॒कमी॑युः ॥ ८ ॥

माता पितरं ऋते आ बभाज धीती अग्रे मनसा सं हि जग्मे ॥
सा बीभत्सुः गर्भऽरसा निऽविद्धा नमस्वंतः इत् उपऽवाकं ईयुः ॥ ८ ॥

भूमातेनें पित्याची यज्ञांमध्ये सेवा केली तेव्हां ध्यानानें आणि मनाने त्याचा तिच्याशी प्रथम समागम होऊन त्या पतिसेवोत्सु पत्नीवर वृष्ट्युदकाचा वर्षाव झाला, तेव्हां भक्तजन दोघांच्याही जवळ जाऊन स्तवन करूं लागले. ॥ ८ ॥


यु॒क्ता मा॒तासी॑द्धु॒रि दक्षि॑णाया॒ अति॑ष्ठ॒द्गर्भो॑ वृज॒नीष्व॒न्तः ॥
अमी॑मेद्व॒त्सो अनु॒ गाम॑पश्यद्विश्वरू॒प्यं त्रि॒षु योज॑नेषु ॥ ९ ॥

युक्ता माता आसीत् धुरि दक्षिणायाः अतिष्ठत् गर्भः वृजनीषु अंतरिति ॥
अमीमेत् वत्सः अनु गां अपश्यत् विश्वऽरूप्यं त्रिषु योजनेषु ॥ ९ ॥

दक्षिणेच्या म्हणजे यज्ञ धेनूच्या कामाकडे भूमातेची योजना झाली, आर्द्र अशा मेघ धेनूच्या पोटीं गर्भ राहिला. वासरूं ओरडून आपल्या आईकडे पाहूं लागले. ती गाय आहे कीं, ह्या भुवनांत तिला वाटेल तें रूप घेता येते. ॥ ९ ॥


ति॒स्रो मा॒तॄस्त्रीन्पि॒तॄन्बिभ्र॒देक॑ ऊ॒र्ध्वस्त॑स्थौ॒ नेमव॑ ग्लापयन्ति ॥
म॒न्त्रय॑न्ते दि॒वो अ॒मुष्य॑ पृ॒ष्ठे वि॑श्व॒विदं॒ वाच॒मवि॑श्वमिन्वाम् ॥ १० ॥

तिस्रः मातॄः त्रीन् पितॄन् बिभ्रत् एकः ऊर्ध्वः तस्थौ न ईं अव ग्लपयंति ॥
मंत्रयंते दिवः अमुष्य पृष्ठे विश्वऽविदं वाचं अविश्वऽमिन्वाम् ॥ १० ॥

मातृरूपी तीन व पितृरूपी तीन अशा सहा भुवनांस हा एकटा सांवरून धरून उभा आहे तरी ह्या ओझ्यामुळें तो यत्किंचित ही थकत नाहीं. ह्या स्वर्लोकाच्या पाठीवर राहणारे देव अशी एक भाषा बोलत असतात कीं, तिच्या योगानें सर्व कांही समजतें, पण ती मात्र सर्वांनाच कळते असें नाही. ॥ १० ॥


द्वाद॑शारं न॒हि तज्जरा॑य॒ वर्व॑र्ति च॒क्रं परि॒ द्यामृ॒तस्य॑ ॥
आ पु॒त्रा अ॑ग्ने मिथु॒नासो॒ अत्र॑ स॒प्त श॒तानि॑ विंश॒तिश्च॑ तस्थुः ॥ ११ ॥

द्वादशऽअरं नहि तत् जराय वर्वर्ति चक्रं परि द्यां ऋतस्य ॥
आ पुत्राऽ अग्ने मिथुनासः अत्र सप्त शतानि विंशतिः च तस्थुः ॥ ११ ॥

ह्या सृष्टिक्रमाच्या चक्राला बारा अरे आहेत. तें कधींही न झिजतां आकाश मंडलांत निरंतर भ्रमण करीत असतें. हे अग्निदेवा, ह्याच चक्रावर सर्वजण जोडप्यांनी बसलेले आहेत त्या व्यक्तींची एकंदर संख्या सातशें वीस आहे. ॥ ११ ॥


पञ्च॑पादं पि॒तरं॒ द्वाद॑शाकृतिं दि॒व आ॑हुः॒ परे॒ अर्धे॑ पुरी॒षिण॑म् ॥
अथे॒मे अ॒न्य उप॑रे विचक्ष॒णं स॒प्तच॑क्रे॒ षळ॑र आहु॒रर्पि॑तम् ॥ १२ ॥

पंचऽपादं पितरं द्वादशऽआकृतिं दिव आहुः परे अर्धे पुरीषिणम् ॥
अथ इमे अन्ये उपरे विऽचक्षणं सप्तऽचक्रे षट्ऽअरे आहुः अर्पितम् ॥ १२ ॥

पित्याला पांच चरण व स्वरूपें बारा प्रकारची आहेत. तो जल वर्षक असून आकाशाच्या अत्युच्च प्रदेशांत राहतो असे म्हणतात, व दुसरे असें म्हणतात कीं तो जवळच्या भागांत असून सहा अरे असलेल्या सात चाकी रथावर बसून सर्व पहात असतो. ॥ १२ ॥


पञ्चा॑रे च॒क्रे प॑रि॒वर्त॑माने॒ तस्मि॒न्ना त॑स्थु॒र्भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥
तस्य॒ नाक्ष॑स्तप्यते॒ भूरि॑भारः स॒नादे॒व न शी॑र्यते॒ सना॑भिः ॥ १३ ॥

पंचऽअरे चक्रे परिऽवर्तमाने तस्मिन् आ तस्थुः भुवनानि विश्वा ॥
तस्य न अक्षः तप्यते भूरिऽभारः सनात् एव न शीर्यते सऽनाभिः ॥ १३ ॥

चाकाला पांच अरे असून ते एक सारखे फिरतच असतें, आणि त्याच्यावर ही सर्व भुवनें राहिलेली आहेत. त्या चाकाच्या कण्यावर जबरदस्त ओझें पडते, तरी तो कधीं तापत नाहीं व अनंत कालापासून ह्या चाकाला एकच पावटा आहे व तोही कधीं मोडत नाहीं. ॥ १३ ॥


सने॑मि च॒क्रम॒जरं॒ वि वा॑वृत उत्ता॒नायां॒ दश॑ यु॒क्ता व॑हन्ति ॥
सूर्य॑स्य॒ चक्षू॒ रज॑सै॒त्यावृ॑तं॒ तस्मि॒न्नार्पि॑ता॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥ १४ ॥

सऽनेमि चक्रं अजरं वि ववृते उत्तानायां दश युक्ताः वहंति ॥
सूर्यस्य चक्षूः रजसा एति आऽवृतं तस्मिन्न् आर्पिता भुवनानि विश्वा ॥ १४ ॥

एकच अखंड पावटा असलेले असें जें एक अविनाशी चक्र फिरत राहिलें आहे, त्याच्या धुरेचें लाकूड उताणे असून त्याला जोडलेले दहा घोडे तें चाक ओढीत असतात. तऱ्हेतऱ्हेच्या रंगांच्या वलयांनी वेष्टिलेला असा सूर्याचा नेत्र आपला मार्ग आक्रमण करीतच असतो आणि त्याच्यावरच सर्व भुवनें अवलंबून आहेत. ॥ १४ ॥


सा॒कं॒जानां॑ स॒प्तथ॑माहुरेक॒जं षळिद्य॒मा ऋष॑यो देव॒जा इति॑ ॥
तेषा॑मि॒ष्टानि॒ विहि॑तानि धाम॒शः स्था॒त्रे रे॑जन्ते॒ विकृ॑तानि रूप॒शः ॥ १५ ॥

साकंऽजानां सप्तथं आहुः एकऽजं षट् इत् यमाः ऋषयः देवऽजाः इति ॥
तेषां इष्टानि विऽहितानि धामऽशः स्थात्रे रेजंते विऽकृतानि रूपऽशः ॥ १५ ॥

सात जण एकदमच जन्मले खरे पण त्यापैकीं सातवा मात्र एकटाच निराळा जन्मला असें समजतात आणि बाकीचे सहा जुळे असून तेच देवांपासून झालेले ऋषि होत असें म्हणतात. त्यांच्या पासून मिळणारी इच्छित फळें त्यांच्या क्रमाप्रमाणे येतात; आणि त्यांची रूपें विविध आहेत तरी ते सर्व आपल्या मालकाच्या धोरणानेंच राहतात. ॥ १५ ॥


स्त्रियः॑ स॒तीस्ताँ उ॑ मे पुं॒स आ॑हुः॒ पश्य॑दक्ष॒ण्वान्न वि चे॑तद॒न्धः ॥
क॒विर्यः पु॒त्रः स ई॒मा चि॑केत॒ यस्ता वि॑जा॒नात्स पि॒तुष्पि॒तास॑त् ॥ १६ ॥

स्त्रियः सतीः तान् ऊं इति मे पुंसः आहुः पश्यत् अक्षण्ऽवान् न वि चेतत् अंधः ॥
कविः यः पुत्रः सः ईं आ चिकेत यः ता विऽजानात् सः पितुः पिता असत् ॥ १६ ॥

त्या वास्तविक स्त्रिया असतांना ते पुरुषच आहेत असे त्यांनी मला सांगितलें; ही गोष्ट ज्याला डोळे असतील त्याला दिसेल, आंधळ्याला काय दिसणार ? जो सुपुत्र खरा ज्ञानी असेल त्यालाच हें समजेल व हें ज्याला समजत असेल तो आपल्या पित्याचाही पिता होईल. ॥ १६ ॥


अ॒वः परे॑ण प॒र ए॒नाव॑रेण प॒दा व॒त्सं बिभ्र॑ती॒ गौरुद॑स्थात् ॥
सा क॒द्रीची॒ कं स्वि॒दर्धं॒ परा॑गा॒त्क्व स्वित्सूते न॒हि यू॒थे अ॒न्तः ॥ १७ ॥

अवः परेण परः एना अवरेण पदा वत्सं बिभ्रती गौः उत् अस्थात् ॥
सा कद्रीची कं स्वित् अर्धं परा अगात् क्व स्वित् सूते नहि यूथे अंतरिति ॥ १७ ॥

अत्युच्च स्थानांच्या खाली पण ह्या भूगोलाच्यावर आपलें वासरूं आपल्या पायानें उचलून धरणारी अशी गाय वर दिसूं लागली आहे. ती कोणीकडे कोणत्या बाजूला निघून जाते ? ती कोठें वीत असावी बरें ? कळपांत तर वीत नाहींच. ॥ १७ ॥


अ॒वः परे॑ण पि॒तरं॒ यो अ॑स्यानु॒वेद॑ प॒र ए॒नाव॑रेण ॥
क॒वी॒यमा॑नः॒ क इ॒ह प्र वो॑चद्दे॒वं मनः॒ कुतो॒ अधि॒ प्रजा॑तम् ॥ १८ ॥

अवः परेण पितरं यः अस्य अनुऽवेद परः एना अवरेण ॥
कवीऽयमानः कः इह प्र वोचत् देवं मनः कुतः अधि प्रऽजातम् ॥ १८ ॥

अत्युच्च स्थानाच्या खाली परंतु अगदी खालच्या वर (म्हणजे मध्यें) जें हें विश्व आहे, त्याचा पिता जो ईश्वर त्याची ओळख ज्याला झालेली आहे, असा कोणता ज्ञानी पुरुष ह्या जगांत उपदेश करून गेला ? दिव्य मन कोठून निर्माण झाले ? ॥ १८ ॥


ये अ॒र्वाञ्च॒स्ताँ उ॒ परा॑च आहु॒र्ये परा॑ञ्च॒स्ताँ उ॑ अ॒र्वाच॑ आहुः ॥
इंद्र॑श्च॒ या च॒क्रथुः॑ सोम॒ तानि॑ धु॒रा न यु॒क्ता रज॑सो वहन्ति ॥ १९ ॥

ये अर्वांचः तान् ऊं इति पराचः आहुः ये परांचः तान् ऊं इति अर्वाचः आहुः ॥
इंद्रः च या चक्रथुः सोम तानि धुरा न युक्ता रजसः वहंति ॥ १९ ॥

वास्तविक जे आपल्याकडे खाली येत असतात, त्यांना म्हणतात कीं हे वर चालले आहेत, आणि जे खरोखर वर जात असतात त्यांना म्हणतात कीं हे आपल्या कडेच येत आहेत; तर हे सोमा, इंद्र आणि तूं अशा तुम्हीं दोघांनी जे असे चमत्कार केले आहेत, ते रजोगुणमुळे जोखडाला जुंपलेल्या घोड्या प्रमाणे व्यवस्थित चालले आहेत. ॥ १९ ॥


द्वा सु॑प॒र्णा स॒युजा॒ सखा॑या समा॒नं वृ॒क्षं परि॑ षस्वजाते ॥
तयो॑र॒न्यः पिप्प॑लं स्वा॒द्वत्त्यन॑श्नन्न॒न्यो अ॒भि चा॑कशीति ॥ २० ॥

द्वा सुपर्णा सऽयुजा सखाया समानं वृक्षं परि सस्वजाते इति ॥
तयोः अन्यः पिप्पलं स्वादु अत्ति अनश्नन् अन्यः अभि चाकशीति ॥ २० ॥

सुंदर पंखांचे, एकात्मक व परस्पर जिवलग मित्र असे दोन पक्षी एकाच वृक्षावर बसलेले आहेत, त्यांतला एक त्या झाडाच्या मधुर फळाचा उपभोग घेतो, परंतु दुसरा मात्र स्वतः कांही एक न खातां फक्त पहात बसतो. ॥ २० ॥


यत्रा॑ सुप॒र्णा अ॒मृत॑स्य भा॒गमनि॑मेषं वि॒दथा॑भि॒स्वर॑न्ति ॥
इ॒नो विश्व॑स्य॒ भुव॑नस्य गो॒पाः स मा॒ धीरः॒ पाक॒मत्रा वि॑वेश ॥ २१ ॥

यत्रा सुऽपर्णा अमृतस्य भागं अनिऽमेषं विदथा अभिऽस्वरंति ॥
इनः विश्वस्य भुवनस्य गोपाः सः मा धीरः पाकं अत्र आ विवेश ॥ २१ ॥

सुंदर पंखांचे पक्षी ज्ञान सामर्थ्याने अमरत्वाचा अंश जेथें निरंतर पोहोंचवीत असतात तेथें, म्हणजे मज मूढाच्या अंगी, खुद्द विश्वाचा पालक जो ज्ञानस्वरूप परमात्मा, त्यानें वास केलेला आहे. ॥ २१ ॥


यस्मि॑न्वृ॒क्षे म॒ध्वदः॑ सुप॒र्णा नि॑वि॒शन्ते॒ सुव॑ते॒ चाधि॒ विश्वे॑ ॥
तस्येदा॑हुः॒ पिप्प॑लं स्वा॒द्वग्रे॒ तन्नोन्न॑श॒द्यः पि॒तरं॒ न वेद॑ ॥ २२ ॥

यस्मिन् वृक्षे मधुऽअदः सुऽपर्णाः निऽविशंते सुवते च अधि विश्वे ॥
तस्य इत् आहुः पिप्पलं स्वादु अग्रे तत् न उत् नशत् यः पितरं नः वेद ॥ २२ ॥

सुंदर पिसार्‍याचे सर्व पक्षी मधुर फळें खाऊन ज्या वृक्षावर विश्रांती घेतात आणि पिलेंही घालतात, त्याच वृक्षाच्या शेंड्यावर जें फळ असतें तें फारच स्वादिष्ट असतें, परंतु जगत्पिता जो ईश्वर त्याचें ज्ञान ज्याला नाहीं त्याला तें फळ मिळत नाहीं. ॥ २२ ॥


यद्गा॑य॒त्रे अधि॑ गाय॒त्रमाहि॑तं॒ त्रैष्टु॑भाद्वा॒ त्रैष्टु॑भं नि॒रत॑क्षत ॥
यद्वा॒ जग॒ज्जग॒त्याहि॑तं प॒दं य इत्तद्वि॒दुस्ते अ॑मृत॒त्वमा॑नशुः ॥ २३ ॥

यत् गायत्रे अधि गायत्रं आऽहितं त्रैस्तुभात् वा त्रैस्तुभं निःअतक्षत ॥
यत् वा जगज् जगति आऽहितं पदं ये इत् तत् विदुः ते अमृतऽत्वं आनशुः ॥ २३ ॥

गायत्रावर गायत्राची स्थापना कशी झालेली आहे किंवा त्रैष्टुभापासून त्रैष्टुभ कसें निर्माण झालें अथवा जगतावर जें जगत् पद स्थापिलें आहे ते कसें हें ज्यांना समजले ते अमरत्व पावले. ॥ २३ ॥


गा॒य॒त्रेण॒ प्रति॑ मिमीते अ॒र्कम॒र्केण॒ साम॒ त्रैष्टु॑भेन वा॒कम् ॥
वा॒केन॑ वा॒कं द्वि॒पदा॒ चतु॑ष्पदा॒क्षरे॑ण मिमते स॒प्त वाणीः॑ ॥ २४ ॥

गायत्रेण प्रति मिमीते अर्कं अर्केण साम त्रैस्तुभेन वाकम् ॥
वाकेन वाकं द्विऽपदा चतुःपदा अक्षरेण मिमते सप्त वाणीः ॥ २४ ॥

गायत्र छंदामध्यें अर्क म्हणावयाचें असते, अर्कावरून सामगायनाची रचना झाली. अनेक त्रैष्टुभ मिळून एक वाक होतो, दोन चरणी किंवा चार चरणी वाकांच्या योगानें अनुवाक होतो आणि अक्षरांच्या संख्येवरून सात मुख्य वृत्तें बनतात. ॥ २४ ॥


जग॑ता॒ सिंधुं॑ दि॒व्यस्तभायद्रथंत॒रे सूर्यं॒ पर्य॑पश्यत् ॥
गा॒य॒त्रस्य॑ स॒मिध॑स्ति॒स्र आ॑हु॒स्ततो॑ म॒ह्ना प्र रि॑रिचे महि॒त्वा ॥ २५ ॥

जगता सिंधुं दिवि अस्तभायत् रथंऽतरे सूर्यं परि अपश्यत् ॥
गायत्रस्य संऽइधः तिस्रः आहुः ततः मह्ना प्र रिरिचे महित्वा ॥ २५ ॥

जागत सामाच्या योगानें, आकाशामध्यें आकाशगंगेला सांवरून धरलेले आहे व रथंतर सामामुळें आकाशांत सूर्याचें दर्शन होतें. गायत्रीच्या ज्वाला तीन आहेत असे सांगतात व म्हणूनच तेज आणि थोरवी ह्या गोष्टीमध्यें तीच वरचढ आहे. ॥ २५ ॥


उप॑ ह्वये सु॒दुघां॑ धे॒नुमे॒तां सु॒हस्तो॑ गो॒धुगु॒त दो॑हदेनाम् ॥
श्रेष्ठं॑ स॒वं स॑वि॒ता सा॑विषन्नोऽ॒भीद्धो घ॒र्मस्तदु॒ षु प्र वो॑चम् ॥ २६ ॥

उप ह्वये सुऽदुघां धेनुं एतां सुऽहस्तः गोऽधुक् उत दोहत् एनाम् ॥
श्रेष्ठं सवं सविता साविषत् नः ः अभिऽइद्धः घर्मः तत् ऊं इति सु प्र वोचम् ॥ २६ ॥

ह्या बहुदुधी धेनूला मी आतां हांक मारतो. हिची धार जो कुशल असेल तोच काढूं शकेल. सर्व-प्रेरक सविता आम्हास अत्युत्कृष्ट जीवनाचा लाभ करून देवो. ह्या सूर्याचा प्रताप पहा कसा जाज्ज्वल्य आहे; तेव्हां ह्या सूर्याचेंही गुण वर्णन मला केलें पाहिजे. ॥ २६ ॥


हि॒ङ्कृ॒ ण्व॒ती व॑सु॒पत्नी॒ वसू॑नां व॒त्समि॒च्छन्ती॒ मन॑सा॒भ्यागा॑त् ॥
दु॒हाम॒श्विभ्यां॒ पयो॑ अ॒घ्न्येयं सा व॑र्धतां मह॒ते सौभ॑गाय ॥ २७ ॥

हिङ्ऽकृण्वती वसुऽपत्नी वसूनां वत्सं इच्छंती मनसा अभि आ अगात् ॥
दुहां अश्विऽभ्यां पयः अघ्न्या इयं सा वर्धतां महते सौभगाय ॥ २७ ॥

ही सकल निधींची स्वामिनी आपल्या पाडसाला जवळ घेण्याकरितां हंबरडा फोडीत उत्कंठेनें धांवतच आली. ही अवध्य धेनू अश्विदेवा करितां दुधाचा पान्हा सोडो आणि थोर सौभाग्य प्राप्त व्हावें म्हणून ती वृद्धिंगत होवो. ॥ २७ ॥


गौर॑मीमे॒दनु॑ व॒त्सं मि॒षन्तं॑ मू॒र्धानं॒ हिङ्ङ॑ीकृणो॒न्मात॒वा उ॑ ॥
सृक्वा॑णं घ॒र्मम॒भि वा॑वशा॒ना मिमा॑ति मा॒युं पय॑ते॒ पयो॑भिः ॥ २८ ॥

गौः अमीमेत् अनु वत्सं मिषंतं मूर्धानं हिङ् अकृणोत् मातवै ऊं इति ॥
सृक्वाणं घर्मं अभि वावशाना मिमाति मायुं पयते पयःऽभिः ॥ २८ ॥

डोळे मिटून पडलेल्या आपल्या पाडसाकडे ही धेनू वळते आणि त्याचें डोकें चाटण्याकरितां हंबारत असते, नंतर मोठ्या उत्सुक्तेनें वासराचें तोंड आपल्या धारोष्ण दुग्धाकडे नेऊन ती हलकेच ओरडते इतक्यांत तिची कास दुधानें भरून जाते. ॥ २८ ॥


अ॒यं स शि॑ङ्क्ते॒ येन॒ गौर॒भीवृ॑ता॒ मिमा॑ति मा॒युं ध्व॒सना॒वधि॑ श्रि॒ता ॥
सा चि॒त्तिभि॒र्नि हि च॒कार॒ मर्त्यं॑ वि॒द्युद्भव॑न्ती॒ प्रति॑ व॒व्रिमौ॑हत ॥ २९ ॥

अयं सः शिंक्ते येन गौः अभिऽवृता मिमाति मायुं ध्वसनौ अधि श्रिता ॥
सा चित्तिऽभिः नि हि चकार मर्त्यं विऽद्युत् भवंती प्रति वव्रिं औहत ॥ २९ ॥

हा वत्स सुद्धा पहा कसा ओरडत आहे. ह्याच्याकडे त्या धेनूचें चित्त अगदीं वेधून गेलेलें आहे व त्यामुळें वृष्टि करणार्‍या मेघावर आग टाकून ती ही ओरडत आहे. अशा रीतीनें एकनिष्ठेमध्यें मनुष्याला सुद्धां तिने लाजविलें आहे, परंतु जेव्हां ती विजेचें रूप घेतें तेव्हां मात्र ती आपलें खरें रूप प्रकट करते. ॥ २९ ॥


अ॒नच्छ॑ये तु॒रगा॑तु जी॒वमेज॑द्ध्रु॒वं मध्य॒ आ प॒स्त्यानाम् ॥
जी॒वो मृ॒तस्य॑ चरति स्व॒धाभि॒रम॑र्त्यो॒ मर्त्ये॑ना॒ सयो॑निः ॥ ३० ॥

अनत् शये तुरऽगातु जीवं एजत् ध्रुवं मध्ये आ पस्त्यानाम् ॥
जीवः मृतस्य चरति स्वधाभिः अमर्त्यः मर्त्येन सऽयोनिः ॥ ३० ॥

श्वासोच्छ्वास करणारी, चंचल व जिवंतपणानें हालचाल करणारी अशी जी वस्तु आहे ती ह्या देहरूपी डोल्हार्‍यांत पक्की रोवून राहिली आहे. जीवात्मा हा मृत (म्हणजे जड) पदार्थाच्या नियमानुरोधानेंच चालतो व मृत देह आणि अमर आत्मा हे एकाच ठिकाणीं असतात. ॥ ३० ॥


अप॑श्यं गो॒पामनि॑पद्यमान॒मा च॒ परा॑ च प॒थिभि॒श्चर॑न्तम् ॥
स स॒ध्रीचीः॒ स विषू॑ची॒र्वसा॑न॒ आ व॑रीवर्ति॒ भुव॑नेष्व॒न्तः ॥ ३१ ॥

अपश्यं गोपां अनिऽपद्यमानं आ च परा च पथिऽभिः चरंतम् ॥
सः सध्रीचीः सः विषूचीः वसानः आ वरीवर्ति भुवनेषु अंतरिति ॥ ३१ ॥

देह धारक आत्मा कधींही न थकतां आपल्या नेहमींच्या पद्धतीनें येथें येतो व परत जातो हें मी पाहिलें आहे. संयोगाच्या व वियोगाच्या अशा दोन्ही सामर्थ्यांनी युक्त होऊन तो पुनः पुनः जगामध्यें परत येत असतो. ॥ ३१ ॥


य ईं॑ च॒कार॒ न सो अ॒स्य वे॑द॒ य ईं॑ द॒दर्श॒ हिरु॒गिन्नु तस्मा॑त् ॥
स मा॒तुर्योना॒ परि॑वीतो अ॒न्तर्ब॑हुप्र॒जा निर्‌ऋ॑ति॒मा वि॑वेश ॥ ३२ ॥

यः ईं चकार न सः अस्य वेद यः ईं ददर्श हिरुक् इत् नु तस्मात् ॥
सः मातुः योना परिऽवीतः अंतः बहुप्रजाः निःऽऋतिं आ विवेश ॥ ३२ ॥

ज्यानें ह्याला निर्माण केलें त्याला हा जाणत नाहीं, कारण जो ह्याला एक सारखा पहात असतो तो ह्याच्यापासून गुप्त राहिला आहे व म्हणूनच हा मनुष्य प्राणी मातेच्या उदरांत गुंडाळून टाकला जाऊन आणि अनेक जन्म घेऊन दुःखसागरांत बुडून गेला आहे. ॥ ३२ ॥


द्यौर्मे॑ पि॒ता ज॑नि॒ता नाभि॒रत्र॒ बन्धु॑र्मे मा॒ता पृ॑थि॒वी म॒हीयम् ॥
उ॒त्ता॒नयो॑श्च॒म्वो३॑र्योनि॑र॒न्तरत्रा॑ पि॒ता दु॑हि॒तुर्गर्भ॒माधा॑त् ॥ ३३ ॥

द्यौः मे पिता जनिता नाभिः अत्र बंधुः मे माता पृथिवी मही इयम् ॥
उत्तानयोः चम्वोः र्योनिः अंतः अत्र पिता दुहितुः गर्भं आ अधात् ॥ ३३ ॥

द्यौ हा माझा पिता, उत्पन्न कर्ता आणि जीवनाचें आदिकरण होय. तसेंच ही थोर पृथिवी माझी जननी; माझे आप्त इष्ट सुद्धां हीच. उताण्या असलेल्या दोन डेरेदार शकलांच्या मधला पोकळींत सर्वांचे जन्म स्थान आहे. व तेथें पित्यानें आपल्या कन्येचा गर्भ ठेवून दिला आहे. ॥ ३३ ॥


पृ॒च्छामि॑ त्वा॒ पर॒मन्तं॑ पृथि॒व्याः पृ॒च्छामि॒ यत्र॒ भुव॑नस्य॒ नाभिः॑ ॥
पृ॒च्छामि॑ त्वा॒ वृष्णो॒ अश्व॑स्य॒ रेतः॑ पृ॒च्छामि॑ वा॒चः प॑र॒मं व्योम ॥ ३४ ॥

पृच्छामि त्वा परं अंतं पृथिव्याः पृच्छामि यत्र भुवनस्य नाभिः ॥
पृच्छामि त्वा वृष्णः अश्वस्य रेतः पृच्छामि वाचः परमं विऽओम ॥ ३४ ॥

आतां तुला विचारतो कीं, पृथ्वीची अखेरची मर्यादा कोणती ? आणखी असें विचारतों कीं जगाचा मध्य कोणत्या ठिकाणीं ? वळू घोड्याचें रेत कोणते तें तुला विचारतो, आणि वाचेचें अत्यंत श्रेष्ठ असे स्थान कोणतें तेंही पुसतो. ॥ ३४ ॥


इ॒यं वेदिः॒ परो॒ अन्तः॑ पृथि॒व्या अ॒यं य॒ज्ञो भुव॑नस्य॒ नाभिः॑ ॥
अ॒यं सोमो॒ वृष्णो॒ अश्व॑स्य॒ रेतो॑ ब्र॒ह्मायं वा॒चः प॑र॒मं व्योम ॥ ३५ ॥

इयं वेदिः परः अंतः पृथिव्याः अयं यज्ञः भुवनस्य नाभिः ॥
अयं सोमः वृष्णः अश्वस्य रेतः ब्रह्मा अयं वाचः परमं विऽओम ॥ ३५ ॥

ही वेदी हीच पृथ्वीची शेवटची सीमा, हा यज्ञ हाच सर्व जगाचा मध्य, हा सोम रस हेंच वळू घोड्याचें रेत आणि हा जो ब्रह्मा तोच वाचेचें अतिशय श्रेष्ट स्थान होय. ॥ ३५ ॥


स॒प्तार्ध॑ग॒र्भा भुव॑नस्य॒ रेतो॒ विष्णो॑स्तिष्ठन्ति प्र॒दिशा॒ विध॑र्मणि ॥
ते धी॒तिभि॒र्मन॑सा॒ ते वि॑प॒श्चितः॑ परि॒भुवः॒ परि॑ भवन्ति वि॒श्वतः॑ ॥ ३६ ॥

सप्त अर्धऽगर्भाः भुवनस्य रेतः विष्णोः तिष्ठंति प्रऽदिशा विऽधर्मणि ॥
ते धीतिऽभिः मनसा ते विपःऽचितः परिऽभुवः परि भवंति विश्वतः ॥ ३६ ॥

जे अपुरे सात गर्भ ह्या जगाचें बीज म्हणून आहेत ते विष्णुच्या आज्ञेनें आपआपल्या नियमाप्रमाणें राहतात. ते बुद्धिमान व व्यापक असल्यामुळें विवेकानें व सावचित्तानें यच्चावत् वस्तूंचे आकलन करीत असतात. ॥ ३६ ॥


न वि जा॑नामि॒ यदि॑वे॒दमस्मि॑ नि॒ण्यः संन॑द्धो॒ मन॑सा चरामि ॥
य॒दा माग॑न्प्रथम॒जा ऋ॒तस्यादिद्वा॒चो अ॑श्नुवे भा॒गम॒स्याः ॥ ३७ ॥

न वि जानामि यत्ऽइव इदं अस्मि निण्यः संऽनद्धः मनसा चरामि ॥
यदा मा आ अगन् प्रथमऽजाः ऋतस्य आत् इत् वाचः अश्नुवे भागं अस्याः ॥ ३७ ॥

हे सर्व मीच आहे असें मी जाणत नाहीं आणि मनानें बांधला जाऊन माझी विलक्षण तऱ्हा होऊन मी भ्रमण करीत आहे, परंतु परम तत्त्वापासून पहिल्यानें उत्पन्न झालेलें चैतन्य जेव्हां माझ्यांत आले, तेव्हां पासून ह्या ईश्वरी वाचेचा अंश मला प्राप्त झाला. ॥ ३७ ॥


अपा॒ङ्‍ प्राङ्ए॑नति स्व॒धया॑ गृभी॒तोऽ॑मर्त्यो॒ मर्त्ये॑ना॒ सयो॑निः ॥
ता शश्व॑न्ता विषू॒चीना॑ वि॒यन्ता॒ न्य१॑न्यं चि॒क्युर्न नि चि॑क्युर॒न्यम् ॥ ३८ ॥

अपाङ्‍ प्राङ्‍ एति स्वधया गृभीतः अमर्त्यः मर्त्येन सऽयोनिः ॥
ता शश्वंता विषूचीना विऽयंता नि अन्यं चिक्युः न नि चिक्युः अन्यम् ॥ ३८ ॥

ह्या आत्म्याचे अस्तित्व त्याच्या व्यापारामुळेंच कळतें. तो कधी मागें राहतो व कधीं पुढेंही सरसावतो. तो अमर असूनही ह्या मर्त्य देहाबरोबरच जन्मास येतो. ते दोन्ही नित्य संलग्न असून सर्व ठिकाणीं नाना प्रकारांनी जात असतात; परंतु लोकांना शरीर मात्र दिसते, आत्मा दिसत नाहीं. ॥ ३८ ॥


ऋ॒चो अ॒क्षरे॑ पर॒मे व्योम॒न्यस्मि॑न्दे॒वा अधि॒ विश्वे॑ निषे॒दुः ॥
यस्तन्न वेद॒ किमृ॒चा क॑रिष्यति॒ य इत्तद्वि॒दुस्त इ॒मे सम् आ॑सते ॥ ३९ ॥

ऋचः अक्षरे परमे विऽओमन् यस्मिन् देवा अधि विश्वे निऽसेदुः ॥
यः तत् न वेद किं ऋचा करिष्यति ये इत् तत् विदुः ते इमे सं आसते ॥ ३९ ॥

अत्युच्च अशा स्वर्लोकीं राहिल्याप्रमाणेंच वेदांतील ऋचांच्या अक्षरांत सर्व देवांनी वास केला आहे. तर असें जें ऋचेचें अक्षर तें ज्याला येत नाही त्याला वेद घेऊन तरी काय करावयाचें आहे ? आणि तें अक्षर ज्यांना समजलें ते सर्व आनंदानें एकत्र रहतात. ॥ ३९ ॥


सू॒य॒व॒साद्भग॑वती॒ हि भू॒या अथो॑ व॒यम् भग॑वन्तः स्याम ॥
अ॒द्धि तृण॑मघ्न्ये विश्व॒दानीं॒ पिब॑ शु॒द्धमु॑द॒कमा॒चर॑न्ती ॥ ४० ॥

सुयवसऽअत् भगऽवती हि भूयाः अथो इति वयं भगऽवंतः स्याम ॥
अद्धि तृणं अघ्न्ये विश्वऽदानीं पिब शुद्धं उदकं आऽचरंती ॥ ४० ॥

तुला खाण्याला उत्तम गवत मिळून तूं भाग्य संपन्न हो म्हणजे त्यामुळें आम्हींही भाग्यवान होऊं. हे अवध्य धेनु तूं आमच्याकडे येऊन नित्य चारा खाऊन स्वच्छ पाणी पीत जा. ॥ ४० ॥


गौ॒रीर्मि॑माय सलि॒लानि॒ तक्ष॒त्येक॑पदी द्वि॒पदी॒ सा चतु॑ष्पदी ॥
अ॒ष्टाप॑दी॒ नव॑पदी बभू॒वुषी॑ स॒हस्रा॑क्षरा पर॒मे व्योमन् ॥ ४१ ॥

गौरीः मिमाय सलिलानि तक्षति एकऽपदी द्विऽपदी सा चतुःऽपदी ॥
अष्टाऽपदी नवऽपदी बभूवुषी सहस्रऽअक्षरा परमे विऽओमन् ॥ ४१ ॥

ही शुभ्र तेजस्वी धेनु उदक निर्माण करीत असतांना हंबरत असतें. तिला एकच पाय किंवा दोन किंवा चार पाय असतात, अथवा आठ किंवा नऊ सुद्धां असतात. ही हजार अक्षरांची असून अति उच्च अशा स्वर्लोकीं राहते. ॥ ४१ ॥


तस्याः॑ समु॒द्रा अधि॒ वि क्ष॑रन्ति॒ तेन॑ जीवन्ति प्र॒दिश॒श्चत॑स्रः ॥
ततः॑ क्षरत्य॒क्षरं॒ तद्विश्व॒मुप॑ जीवति ॥ ४२ ॥

तस्याः समुद्राः अधि वि क्षरंति तेन जीवंति प्रऽदिशः चतस्रः ॥
ततः क्षरति अक्षरं तत् विश्वं उप जीवति ॥ ४२ ॥

तिच्यामुळें समुद्र तुडुंब भरून गेले आहेत. आणि त्यांच्या मुळेंच ह्या पृथ्वीवरील चाऱ्ही दिशांकडील प्रदेश जिवंत राहिले आहेत. तेथूनच अक्षय्य अशा अमृताचा वर्षाव होऊन सर्व विश्वाचा निर्वाह चालतो. ॥ ४२ ॥


श॒क॒मयं॑ धू॒ममा॒राद॑पश्यं विषू॒वता॑ प॒र ए॒नाव॑रेण ॥
उ॒क्षाणं॒ पृश्नि॑मपचन्त वी॒रास्तानि॒ धर्मा॑णि प्रथ॒मान्या॑सन् ॥ ४३ ॥

शकऽमयं धूमं आरात् अपश्यं विषूऽवता परः एना अवरेण ॥
उक्षाणं पृश्निं अपचंत वीराः तानि धर्माणि प्रथमानि आसन् ॥ ४३ ॥

दूर अंतरावर गोंवर्‍यांचा धूर माझ्या दृष्टीस पडला. त्याचे एकामागून एक असे वर जाणारे धुराचे लोट जिकडे तिकडे पसरले होते. तेथें चित्रविचित्र रंगाचा वृषभ शूर पुरुष शिजवीत होते कारण तोच पुरातन धर्म होय. ॥ ४३ ॥


त्रयः॑ के॒शिन॑ ऋतु॒था वि च॑क्षते संवत्स॒रे व॑पत॒ एक॑ एषाम् ॥
विश्व॒मेको॑ अ॒भि च॑ष्टे॒ शची॑भि॒र्ध्राजि॒रेक॑स्य ददृशे॒ न रू॒पम् ॥ ४४ ॥

त्रयः केशिन ऋतुऽथा वि चक्षते संवत्सरे वपते एकः एषाम् ॥
विश्वं एकः अभि चष्टे शचीभिः ध्राजिः एकस्य ददृशे नः रूपम् ॥ ४४ ॥

लांब लांब जटा वाढलेले तिघेजण आपआपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणें पृथ्वीवर येतात, त्यांच्यापैकीं एक दरवर्षी सर्वत्र साफसूफ करून टाकतो, दुसरा आपल्या सामर्थ्यानें सर्व विश्वावर नजर ठेवतो आणि तिसरा जो आहे त्याची हालचाल मात्र आपणांस समजते पण मूर्ति दृष्टीस पडत नाही. ॥ ४४ ॥


च॒त्वारि॒ वाक्परि॑मिता प॒दानि॒ तानि॑ विदुर्ब्राह्म॒णा ये म॑नी॒षिणः॑ ॥
गुहा॒ त्रीणि॒ निहि॑ता॒ नेङ्ग्॑यन्ति तु॒रीयं॑ वा॒चो म॑नु॒ष्या वदन्ति ॥ ४५ ॥

चत्वारि वाक् परिमिता पदानि तानि विदुः ब्राह्मणा ये मनीषिणः ॥
गुहा त्रीणि निऽहिता न इंगयंति तुरीयं वाचः मनुष्याः वदंति ॥ ४५ ॥

वाचेचे चार प्रकार गणले आहेत, ते सर्व प्रकार जे ज्ञानसंपन्न ब्राह्मण आहेत त्यांना ठाऊक असतात. कारण पहिले तीन प्रकार गुप्त आहेत, ते समजण्यांत येत नाहींत, व मनुष्यें बोलतात तो चौथा प्रकार होय. ॥ ४५ ॥


इंद्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमा॑हु॒रथो॑ दि॒व्यः स सु॑प॒र्णो ग॒रुत्मा॑न् ॥
एकं॒ सद्विप्रा॑ बहु॒धा व॑दन्त्य॒ग्निं य॒मं मा॑त॒रिश्वा॑नमाहुः ॥ ४६ ॥

इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् ॥
एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुः ॥ ४६ ॥

त्या ईश्वरालाच इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. तो वस्तुतः एकच आहे तरी ज्ञानी जन त्याला पुष्कळ प्रकारचीं नांवे देतात. त्याला अग्नि, यम अथवा मातरिश्वा असेंही म्हणतात. ॥ ४६ ॥


कृ॒ष्णं नि॒यानं॒ हर॑यः सुप॒र्णा अ॒पो वसा॑ना॒ दिव॒मुत्प॑तन्ति ॥
त आव॑वृत्र॒न्सद॑नादृ॒तस्यादिद्घृ॒तेन॑ पृथि॒वी व्युद्यते ॥ ४७ ॥

कृष्णं निऽयानं हरयः सुऽपर्णा अपः वसाना दिवं उत् पतंति ॥
त आ अववृत्रन् सदनात् ऋतस्य आत् इत् घृतेन पृथिवी वि उद्यते ॥ ४७ ॥

सुवर्ण वर्णाचे सुंदर पक्षी जलरूप वस्त्र पांघरून, आकाशांत जाण्याचा जो एक कृष्णवर्ण मार्ग आहे त्या मार्गानें आकाशांत उड्डाण करतात. आणि नंतर सत्य धर्माच्या वसतिस्थानाहून ते परत आले कीं लागलीच पृथ्वी घृतवृष्टीनें चिंब भिजून जाते. ॥ ४७ ॥


द्वाद॑श प्र॒धय॑श्च॒क्रमेकं॒ त्रीणि॒ नभ्या॑नि॒ क उ॒ तच्चि॑केत ॥
तस्मि॑न्त्सा॒कं त्रि॑श॒ता न श॒ङ्कृवो॑ऽर्पि॒ताः ष॒ष्टिर्न च॑लाच॒लासः॑ ॥ ४८ ॥

द्वादश प्रऽधयः चक्रं एकं त्रीणि नभ्यानि कः ऊं इति तत् चिकेत ॥
तस्मिन् साकं त्रिऽशता न शंकवः अर्पिताः षष्टिः न चलाचलासः ॥ ४८ ॥

चाक एकच परंतु त्याला बारा धांवा आणि तीन तुंबे आहेत, हें कसें व तें कोण ओळखतो ? त्या चाकाला तीनशें साठ अरे आहेत. आणि ते शंकू प्रमाणें गरगर फिरत असतात. ॥ ४८ ॥


यस्ते॒ स्तनः॑ शश॒यो यो म॑यो॒भूर्येन॒ विश्वा॒ पुष्य॑सि॒ वार्या॑णि ॥
यो र॑त्न॒॒धा व॑सु॒विद्यः सु॒दत्रः॒ सर॑स्वति॒ तमि॒ह धात॑वे कः ॥ ४९ ॥

यः ते स्तनः शशयः यः मयःऽभूः येन विश्वा पुष्यसि वार्याणि ॥
यः रत्नऽधाः वसुऽवित् यः सुऽदत्रः सरस्वति तं इह धातवे करिति कः ॥ ४९ ॥

हे सरस्वती अक्षय्य, कल्याणप्रद, असा जो तुझा स्तन आहे व ज्याच्या योगानें सर्व रमणीय वस्तूंचे सौंदर्य तूं वृद्धिंगत करतेस, जो रत्नांचा निधि, व मनोरथ पुरविणारा उदार दाता आहे, तो तुझा स्तन तूं आम्हांस पिण्याकरितां दे. ॥ ४९ ॥


य॒ज्ञेन॑ य॒ज्ञम॑यजन्त दे॒वास्तानि॒ धर्मा॑णि प्रथ॒मान्या॑सन् ॥
ते ह॒ नाकं॑ महि॒मानः॑ सचन्त॒ यत्र॒ पूर्वे॑ सा॒ध्याः सन्ति॑ दे॒वाः ॥ ५० ॥

यज्ञेन यज्ञं अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन् ॥
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ॥ ५० ॥

यज्ञ पुरुषाच्या योगानें देवांनी यज्ञ केला व अगदी प्रथम (सनातन) धर्म पाहूं गेले तर तो हाच होय. नंतर श्रेष्ठ विभूतींनी, पुरातन साध्य देव जेथें रहात असतात अशा अत्युच्च स्वर्ग लोकांमध्यें जाऊन वास केला. ॥ ५० ॥


स॒मा॒नमे॒तदु॑द॒कमुच्चैत्यव॒ चाह॑भिः ॥
भूमिं॑ प॒र्जन्या॒ जिन्व॑न्ति॒ दिवं॑ जिन्वन्त्य॒ग्नयः॑ ॥ ५१ ॥

समानं एतत् उदकं उत् च एति अव च अहऽभिः ॥
भूमिं पर्जन्याः जिन्वंति दिवं जिन्वंति अग्नयः ॥ ५१ ॥

उदक येथून तेथून सारखेंच. ते बाष्परूपानें वर जाते आणि कांही दिवसांनी वृष्टि रूपानें खाली येते, या प्रमाणें पर्जन्य हा पृथ्वीला टवटवीत करतो आणि यज्ञाग्निही आकाशाला तेजःपुंज करतात. ॥ ५१ ॥


दि॒व्यं सु॑प॒र्णं वा॑य॒सं बृ॒हन्त॑म॒पां गर्भं॑ दर्श॒तमोष॑धीनाम् ॥
अ॒भी॒प॒तो वृ॒ष्टिभि॑स्त॒र्पय॑न्तं॒ सर॑स्वन्त॒मव॑से जोहवीमि ॥ ५२ ॥

दिव्यं सुऽपर्णं वायसं बृहंतं अपां गर्भं दर्शतं ओषधीनाम् ॥
अभीपतः वृष्टिऽभिः तर्पयंतं सरस्वंतं अवसे जोहवीमि ॥ ५२ ॥

द्यु लोकींचा अति वेगवान प्रबळ पक्षी, उदकाचें आणि वनस्पतीचें सुंदर तान्हे बालक; आणि जलवृष्टी करून सर्वांची मनें लीलेनें प्रसन्न करणारा असा जो सरस्वान् त्यानें कृपा करावी म्हणून त्याची आम्हीं वारंवार प्रार्थना करीत असतों. ॥ ५२ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६५ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्


कया॑ शु॒भा सव॑यसः॒ सनी॑ळाः समा॒न्या म॒रुतः॒ सं मि॑मिक्षुः ॥
कया॑ म॒ती कुत॒ एता॑स ए॒तेऽ॑र्चन्ति॒ शुष्मं॒ वृष॑णो वसू॒या ॥ १ ॥

कया शुभा सऽवयसः सऽनीळाः समान्या मरुतः सं मिमिक्षुः ॥
कया मती कुतः आऽइतासः एते अर्चंति शुष्मं वृषणः वसुऽया ॥ १ ॥

एक सारख्या जोमाचे व एकत्रच राहणारे असे हे मरुद्देव पहा कशा एक सारख्या मंगल अंगकांतिने सुशोभित दिसत आहेत बरे ? ते काय हेतूनें व कोठून आले असावेत ! कांही असो, हे आमचे शूर मित्र (ऋत्विज) अभीष्ट प्राप्तीच्या लालसेनें, त्यांच्या सामर्थ्यास अनुलक्षून मोठ्यानें गायन करीत आहेत. ॥ १ ॥


कस्य॒ ब्रह्मा॑णि जुजुषु॒र्युवा॑नः॒ को अ॑ध्व॒रे म॒रुत॒ आ व॑वर्त ॥
श्ये॒नाँ इ॑व॒ ध्रज॑तो अ॒न्तरि॑क्षे॒ केन॑ म॒हा मन॑सा रीरमाम ॥ २ ॥

कस्य ब्रह्माणि जुजुषुः युवानः कः अध्वरे मरुतः आ ववर्त ॥
श्येनान्ऽइव ध्रजतः अंतरिक्षे केन महा मनसा रीरमाम ॥ २ ॥

हे यौवनाढ्य मरुत् ह्या वेळी कोणत्या भक्ताच्या स्तोत्ररसाचें सेवन करीत बसले आहेत. आपल्या यज्ञामध्यें ह्या मरुतांना कोण भक्त घेऊन गेला असावा. असा श्रेष्ठ भक्तीचा प्रकार तरी कोणता कीं ज्याच्या योगानें ससाण्याप्रमाणें वेगानें आकाशांत उडणार्‍या ह्या मरुतांना आम्हांस प्रसन्न करून घेतां येईल ? ॥ २ ॥


कुत॒स्त्वमिं॑द्र॒ माहि॑नः॒ सन्नेको॑ यासि सत्पते॒ किं त॑ इ॒त्था ॥
सं पृ॑च्छसे समरा॒णः शु॑भा॒नैर्वो॒चेस्तन्नो॑ हरिवो॒ यत्ते॑ अ॒स्मे ॥ ३ ॥

कुतः त्वं इंद्र माहिनः सन् एकः यासि सत्ऽपते किं ते इत्था ॥
सं पृच्छसे संऽअराणः शुभानैः वोचेः तत् नः हरिऽवः यत् ते अस्मे इति ॥ ३ ॥

हे इंद्रा, तूं एव्हढा परम श्रेष्ठ, साधुजनांचा प्रतिपालक असून एकटांच कां चालला आहेस ? खरोखर हें असें तुझ्या मनांत काय आहे ? आपल्या यशस्वी मंडळला बरोबर घेऊन जातांना तूं आमचें कुशल विचारित असतोस, तर आतां हे हरिदश्व-पालक इंद्रा, तुझ्या मनांत आमच्या विषयीं असें काय आलें आहे तें सांग बरें. ॥ ३ ॥


ब्रह्मा॑णि मे म॒तयः॒ शं सु॒तासः॒ शुष्म॑ इयर्ति॒ प्रभृ॑तो मे॒ अद्रिः॑ ॥
आ शा॑सते॒ प्रति॑ हर्यन्त्यु॒क्थेमा हरी॑ वहत॒स्ता नो॒ अच्छ॑ ॥ ४ ॥

ब्रह्माणि मे मतयः शं सुतासः शुष्मः इयर्ति प्रऽभृतः मे अद्रिः ॥
आ शासते प्रति हर्यंति उक्था इमा हरी इति वहतः ता नः अच्छ ॥ ४ ॥

सर्व स्तोत्र, गायनें व भक्ति पुरःसर केलेल्या प्रार्थना ह्या मलाच उद्देशून असतात. सोमरस ही मलाच हर्षप्रद होतो, व माझें प्रतापी वज्र फेंकल्या बरोबर शत्रूला जाऊन भिडते. भक्तजन विनवणी करतात ती माझीच आणि साम गायकांचे प्रेमही माझ्या ठिकाणीं व म्हणूनच माझे अश्व मला त्यांच्याकडे घेऊन जातात. ॥ ४ ॥


अतो॑ व॒यम॑न्त॒मेभि॑र्युजा॒नाः स्वक्ष॑त्रेभिस्त॒न्व१ः॑ शुम्भ॑मानाः ॥
महो॑भि॒रेताँ॒ उप॑ युज्महे॒ न्विंद्र॑ स्व॒धामनु॒ हि नो॑ ब॒भूथ॑ ॥ ५ ॥

अतः वयं अंतमेभिः युजानाः स्वऽक्षत्रेभिः तन्वः शुम्भमानाः ॥
महःऽभिः एतान् उप युज्महे नु इंद्र स्वधां अनु हि नः बभूथ ॥ ५ ॥

ह्याकरितांच आम्हीं तरी अगदीं खास स्वतःच्या पराक्रमानें युक्त होऊन त्यानेंच स्वतःस शोभा आणतो, व आपल्या प्रभावानें हे अश्व जोडून सज्ज होत असतो. ह्या आमच्या प्रघाताची, हे इंद्रा, तुला स्वतःला इत्थंभूत माहिती आहेच. ॥ ५ ॥


क्व१॑ स्या वो॑ मरुतः स्व॒धासी॒द्यन्मामेकं॑स॒मध॑त्ताहि॒हत्ये॑ ॥
अ॒हं ह्यू१॑ ग्रस्त॑वि॒षस्तुवि॑ष्मा॒न्विश्व॑स्य॒ शत्रो॒रन॑मं वध॒स्नैः ॥ ६ ॥

क्व स्या वः मरुतः स्वधा आसीत् यन् मां एकं संऽअधत्त अहिऽहत्ये ॥
अहं हि उग्रः तविषः तुविष्मान् विश्वस्य शत्रोः अनमं वधऽस्नैः ॥ ६ ॥

हे मरुतांनो, अहीचा वध मी एकट्यानेंच करावा म्हणून तुम्हा मला विनंति केलीत, तव्हां तुमचा तो प्रघात कोठें गेला होता ? मी खरोखरच भयंकर धैर्यशाली व प्रतापी म्हणूनच सर्व जगताच्या शत्रूचा नक्षा मी आपल्या मारक शस्त्रांनी उतरला. ॥ ६ ॥


भूरि॑ चकर्थ॒ युज्ये॑भिर॒स्मे स॑मा॒नेभि॑र्वृषभ॒ पौंस्ये॑भिः ॥
भूरी॑णि॒ हि कृ॒णवा॑मा शवि॒ष्ठेन्द्र॒ क्रत्वा॑ मरुतो॒ यद्वशा॑म ॥ ७ ॥

भूरि चकर्थ युज्येभिः अस्मे इति समानेभिः वृषभ पौंस्येभिः ॥
भूरीणि हि कृणवाम शविष्ठ इंद्र क्रत्वा मरुतः यत् वशाम ॥ ७ ॥

हे शूरा, तूं तर आपल्या पुरुषार्थानें आमच्यासाठीं पुष्कळच कृत्यें केलीं आहेस. हे तुझे पुरुषार्थ म्हणजे समान वीर्य असे तुझे मित्रच होत. तर हे महा प्रतापी इंद्रा, आम्हां मरुतांनाही आपल्या कर्तबगारीनें आम्हांस इष्ट वाटतील तीं तीं कृत्यें आतां करूं दे. ॥ ७ ॥


वधीं॑ वृ॒त्रं म॑रुत इंद्रि॒येण॒ स्वेन॒ भामे॑न तवि॒षो ब॑भू॒वान् ॥
अ॒हमे॒ता मन॑वे वि॒श्वश्च॑न्द्राः सु॒गा अ॒पश्च॑कर॒ वज्र॑बाहुः ॥ ८ ॥

वधीं वृत्रं मरुतः इंद्रियेण स्वेन भामेन तविषः बभूवान् ॥
अहं एताः मनवे विश्वऽचंद्राः सुऽगा अपः चकर वज्रऽबाहुः ॥ ८ ॥

हे मरुतांनो, मी क्रोधानें अतिशय उग्र होऊन स्वतःच्या पराक्रमानें वृत्रास ठार मारून टाकलें, आणि सर्व विश्वाला आल्हाददायक अशी मेघोदकें, वज्र हातीं घेऊन मनू करितां मी सुगम करून दिलीं. ॥ ८ ॥


अनु॑त्त॒मा ते॑ मघव॒न्नकि॒र्नु न त्वावाँ॑ अस्ति दे॒वता॒ विदा॑नः ॥
न जाय॑मानो॒ नश॑ते॒ न जा॒तो यानि॑ करि॒ष्या कृ॑णु॒हि प्र॑वृद्ध ॥ ९ ॥

अनुत्तं आ ते मघऽवन् नकिः नु न त्वाऽवान् अस्ति देवता विदानः ॥
न जायमानः नशते न जातः यानि करिष्या कृणुहि प्रऽवृद्ध ॥ ९ ॥

हे औदार्यशील इंद्रा, तुझ्यापुढें कोणाचाही निभाव लागत नाहीं. देवांमध्यें तुझ्या प्रमाणें ज्ञानी असा दुसरा कोणींही नाहीं. तुझी बरोबरी करील असा कोणी जन्मास येणार नाहीं व आलेलाही नाही. तर हे महा बलिष्ठा, तूं करीन म्हणून म्हटलेंस तीं कृत्यें आतां कर. ॥ ९ ॥


एक॑स्य चिन्मे वि॒भ्व१॑ स्त्वोजो॒ या नु द॑धृ॒ष्वान्कृ॒णवै॑ मनी॒षा ॥
अ॒हं ह्यू१॑ ग्रो म॑रुतो॒ विदा॑नो॒ यानि॒ च्यव॒मिंद्र॒ इदी॑श एषाम् ॥ १० ॥

एकस्य चित् मे विऽभु अस्तु ओजः या नु दधृष्वान् कृणवै मनीषा ॥
अहं हि उग्रः मरुतः विदानः यानि च्यवं इंद्र इत् ईशे एषाम् ॥ १० ॥

विश्वालाही व्यापून उरणारे असें तुझे सामर्थ्य माझ्या एकट्याच्या आंगी आहे असेंच म्हटलें पाहिजे - कारण जें जें करावें म्हणून मीं मनानें निर्धार करतो तें मी करून दाखवितोच. हे मरुतांनो, मी अति भयंकर आहे, तसाच ज्ञानीही आहे. म्हणूनच मी (इंद्रानें) जें जें म्हणून निर्माण केलें आहे त्या सर्वांचा मालक मीच आहे. ॥ १० ॥


अम॑न्दन्मा मरुत॒ स्तोमो॒ अत्र॒ यन्मे॑ नरः॒ श्रुत्यं॒ ब्रह्म॑ च॒क्र ॥
इंद्रा॑य॒ वृष्णे॒ सुम॑खाय॒ मह्यं॒ सख्ये॒ सखा॑यस्त॒न्वे त॒नूभिः॑ ॥ ११ ॥

अमंदत् मा मरुतः स्तोमः अत्र यत् मे नरः श्रुत्यं ब्रह्म चक्र ॥
इंद्राय वृष्णे सुऽमखाय मह्यं सख्ये सखायः तन्वे तनूभिः ॥ ११ ॥

आणखी हे मरुतांनो, तुम्ही जें आतां स्तवन केलेंत, हे शूरांनो जें कर्णमधुर स्तोत्र तुम्हीं गाइलेंत त्यानें मला फार आनंद वाटला. कारण अत्यंत पूज्य आणि वीर्यशाली इंद्राकरितां तुम्ही, म्हणजे माझ्या मित्रांनी, हे स्तोत्र अंतःकरणपूर्वक केलेलें आहे. ॥ ११ ॥


ए॒वेदे॒ते प्रति॑ मा॒ रोच॑माना॒ अने॑द्यः॒ श्रव॒ एषो॒ दधा॑नाः ॥
सञ्॒चक्ष्या॑ मरुतश्च॒न्द्रव॑र्णा॒ अच्छा॑न्त मे छ॒दया॑था च नू॒नम् ॥ १२ ॥

एव इत् एते प्रति मा रोचमानाः अनेद्यः श्रवः आ इषः दधानाः ॥
संऽचक्ष्य मरुतः चंद्रऽवर्णाः अच्छांत मे छदयाथ च नूनम् ॥ १२ ॥

निष्कलंक व कीर्ति आणि सामर्थ्य ह्यांना वरणारे तुम्ही तर माझ्यापुढें घवघवीत उभे आहांत, तर हे मनोहरकांति मरुतांनो, तुम्हीं पूर्ण विचारांनी मला पूर्वीं प्रसन्न केलेंत, तसें आतांही प्रसन्न करून घ्या. ॥ १२ ॥


को न्वत्र॑ मरुतो मामहे वः॒ प्र या॑तन॒ सखीँ॒रच्छा॑ सखायः ॥
मन्मा॑नि चित्रा अपिवा॒तय॑न्त ए॒षां भू॑त॒ नवे॑दा म ऋ॒ताना॑म् ॥ १३ ॥

कः नु अत्र मरुतः मामहे वः प्र यातन सखीन् अच्छ सखायः ॥
मन्मानि चित्राः अपिऽवातयंतः एषां भूत नवेदाः म ऋतानाम् ॥ १३ ॥

हे मरुतांनो, ह्या लोकीं तुमची महती खरोखर कोणीं वर्णन केली आहें बरें ? तर हे मित्रांनो, तुमचे मित्र जे आम्हीं त्या आमच्याकडे या. तुमची कांति अद्‍भुत आहे, तर हे मरुतांनो, माननीय स्तोत्रांची स्फूर्ति आम्हांस देऊन सत्यधर्मास अनुसरून केलेल्या ह्या आमच्या उपासनेकडे लक्ष असूं द्या. ॥ १३ ॥


आ यद्दु॑व॒स्याद्दु॒वसे॒ न का॒रुर॒स्माञ्च॒क्रे मा॒न्यस्य॑ मे॒धा ॥
ओ षु व॑र्त्त मरुतो॒ विप्र॒मच्छे॒मा ब्रह्मा॑णि जरि॒ता वो॑ अर्चत् ॥ १४ ॥

आ यत् दुवस्यात् दुवसे न कारुः अस्मान् चक्रे मान्यस्य मेधा ॥
ओ इति सु वर्त मरुतः विप्रं अच्छ इमा ब्रह्माणि जरिता वः अर्चत् ॥ १४ ॥

एखादा विद्वान कवि एका भक्ताकडून दुसर्‍या भक्ताकडे जातो, त्याप्रमाणें सज्जनांना मान्य अशा मान्यांच्या बुद्धि-प्रभावानें तुम्हांला आमच्या बाजूला आणलेले आहे, तर हे मरुतांनो, ह्या ज्ञानसंपन्न विप्राकडे लवकर वळां. स्तोत्र गायकानें हीं स्तोत्रें तुम्हाला उद्देशूनच गायीलीं आहेत. ॥ १४ ॥


ए॒ष व॒ स्तोमो॑ मरुत इ॒यं गीर्मा॑न्दा॒र्यस्य॑ मा॒न्यस्य॑ का॒रोः ॥
एषा या॑सीष्ट त॒न्वे व॒यां वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १५ ॥

एषः वः स्तोमः मरुतः इयं गीः मादार्यस्य मान्यस्य कारोः ॥
आ इषा यासीष्ट तन्वे वयां विद्याम इषं वृजनं जीरऽदानुम् ॥ १५ ॥

हे मरुतांनो, हे स्तोत्र व ही प्रार्थना सन्मान्य अशा मांदार्यानें तुमच्या प्रित्यर्थ केलेली आहे, तर आमच्या स्वतःकरितां उत्साहप्रद शक्ति तुम्हीं घेऊन या म्हणजे त्या सामर्थ्य शाखेच्या आश्रयानें त्या तात्काळ फलद्रूप होणार्‍या आश्रयानें आम्हीं राहूं. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६६ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : मरुतः - छंद - त्रिष्टुभ्, जगती


तन्नु वो॑चाम रभ॒साय॒ जन्म॑ने॒ पूर्वं॑ महि॒त्वं वृ॑ष॒भस्य॑ के॒तवे॑ ॥
ऐ॒धेव॒ याम॑न्मरुतस्तुविष्वणो यु॒धेव॑ शक्रास्तवि॒षाणि॑ कर्तन ॥ १ ॥

तत् नु वोचाम रभसाय जन्मने पूर्वं महिऽत्वं वृषभस्य केतवे ।
ऐधाऽइव यामम् नरुतः तुविऽस्वनः युधाऽइव शक्राः तविषाणि कर्तन ॥ १ ॥

आतां सकल कामनापूरक वीर अशा इंद्राचा जो जणुं ध्वजच शोभतो आणि मोठ्या धडाक्याने एकदम प्रकट होतो असा जो मरुतांचा समुदाय त्याच्या प्रित्यर्थ, त्यां मरुतांनींच पूर्वीं जी जी महत्कृत्यें केलेलीं आहेत त्यांचे वर्णन करणे हे आमचे कर्तव्य होय; तर हे मरुतांनो, भयंकर सिंहनाद करणार्‍या पराक्रमी वीरांनो, एका हातांत पेटलेला हिलाल आणि दुसर्‍या हातांत तरवार घेऊन चाल करावी त्याप्रमाणें ह्या लोकीं येतांना मार्गानें आपले पराक्रम गाजवा. ॥ १ ॥


नित्यं॒ न सू॒नुं मधु॒ बिभ्र॑त॒ उप॒ क्रीळ॑न्ति क्री॒ळा वि॒दथे॑षु॒ घृष्व॑यः ॥
नक्ष॑न्ति रु॒द्रा अव॑सा नम॒स्विनं॒ न म॑र्धन्ति॒ स्वत॑वसो हवि॒ष्कृत॑म् ॥ २ ॥

नित्यं न सूनुं मधु बिभ्रतः उप क्रीळन्ति क्रीळाः विदथेषु घृष्वयः ।
नक्षन्ति रुद्रा अवसा नमस्विनं न मर्धन्ति स्वऽतवसः हविःकृतम् ॥ २ ॥

अति देदीप्यमान्, अनेक लीला करणारे व बाप आपल्या स्वतःच्या मुलास खाऊ देतो त्या प्रमाणें भक्तांना मधुर प्रेमाची देणगी देणारे असे हे मरुत् येथें यज्ञ मंडपांत मौजेनें क्रीडा करीत असतात. हे रुद्ररूप मरुत्, त्यांच्यापुढें अंतःकरणपूर्वक मस्तक लवविणार्‍या भक्तांकडे आपले कृपाप्रसाद घेऊन येतात, स्वतःच्याच सामर्थ्यावर ज्यांची भिस्त आहे, असे मरुत् हविर्भाग देणार्‍या भक्तांचे कधींही अहित होऊं देत नाहींत. ॥ २ ॥


यस्मा॒ ऊमा॑सो अ॒मृता॒ अरा॑सत रा॒यस्पोषं॑ च ह॒विषा॑ ददा॒शुषे॑ ॥
उ॒क्षन्त्य॑स्मै म॒रुतो॑ हि॒ता इ॑व पु॒रू रजां॑सि॒ पय॑सा मयो॒भुवः॑ ॥ ३ ॥

यस्मै ऊमासः अमृताः अरासत रायः पोषं च हविषा ददाशुषे ।
उक्षन्ति अस्मै मरुतः हिताःऽइव पुरु रजांसि पयसा मयःऽभुवः ॥ ३ ॥

भक्तरक्षक आणि अमर मरुतांनी, हविर्भाग अर्पण करणार्‍या भक्तास, वृद्धिंगत होणारे दिव्य ऐश्वर्य दिलेले असते, अशा भक्तांकरितांच, मंगलप्रद व आप्ताप्रमाणे भक्तांची चिंता वाहणारे मरुत् हा विस्तीर्ण अंतरिक्ष प्रदेश वृष्टिभरानें आर्द्र करून टाकतात. ॥ ३ ॥


आ ये रजां॑सि॒ तवि॑षीभि॒रव्य॑त॒ प्र व॒ एवा॑सः॒ स्वय॑तासो अध्रजन् ॥
भय॑न्ते॒ विश्वा॒ भुव॑नानि ह॒र्म्या चि॒त्रो वो॒ यामः॒ प्रय॑तास्वृ॒ष्टिषु॑ ॥ ४ ॥

आ ये रजांसि तविषीभिः अव्यत प्र वः एवासः स्वऽयतासः अध्रजन् ।
भयन्ते विश्वा भुवनानि हर्म्या चित्रः वः यामः प्रऽयतासु ऋष्टिषु ॥ ४ ॥

हे मरुतांनो, हे तुमचे अश्व आपण होऊनच व्यवस्थितपणानें राहणारे खरे, परंतु जेव्हां ते दौडत गेलेले आहेत, तेव्हां आपल्या धौशानें एवढा रजोलोक पण तो सुद्धा त्यांनी हालवून सोडलेला आहे. तुम्हीं बाहेर निघालां म्हणजे सर्व सृष्टी आणि मनुष्यांची वस्तीदेखील भयानें गांगरून जाते, परंतु तुम्ही आपले भाले रोखुन चालता तेव्हां तुमच्या स्वारीचा थाट मात्र अपूर्व दिसतो. ॥ ४ ॥


यत्त्वे॒षया॑मा न॒दय॑न्त॒ पर्व॑तान्दि॒वो वा॑ पृ॒ष्ठं नर्या॒ अचु॑च्यवुः ॥
विश्वो॑ वो॒ अज्म॑न्भयते॒ वन॒स्पती॑ रथी॒यन्ती॑व॒ प्र जि॑हीत॒ ओष॑धिः ॥ ५ ॥

यत् त्वेषऽयामाः नदयन्त पर्वतान् दिवः वा पृष्ठं नर्या अचुच्यवुः ।
विश्वः वः अज्मन् भयते वनस्पतिः रथीयन्तीऽइव प्र जिहीत ओषधिः ॥ ५ ॥

जेव्हां हे विक्रांत आणि त्वेषानें चालून जाणारे मरुत् आपल्या गडगडाटाच्या प्रतिध्वनीनें गिरिकंदरे दुमदुमून टाकतात, किंवा आकाशाचा प्रचंड गोल सुद्धां हादरून सोडतात, तेव्हां हे मरुतांनो, तुमच्या मार्गांतील सर्व मोठमोठे वृक्ष भयानें उन्मळून पडतात; आणि बारीक सारीक झुडपें तर रथाच्या चाकाप्रमाणें वेगानें गिरक्या घेत घेत दूर उडून जाऊन आपटतात. ॥ ५ ॥


यू॒यं न॑ उग्रा मरुतः सुचे॒तुनारि॑ष्टग्रामाः सुम॒तिम् पि॑पर्तन ॥
यत्रा॑ वो दि॒द्युद्रद॑ति॒ क्रिवि॑र्दती रि॒णाति॑ प॒श्वः सुधि॑तेव ब॒र्हणा॑ ॥ ६ ॥

यूयं नः उग्राः मरुतः सुऽचेतुना अरिष्टऽग्रामाः सुऽमतिं पिपर्तन ।
यत्रा वः दिद्युद् रदति क्रिविःऽदती रिणाति पश्वः सुधिताऽइव बर्हणा ॥ ६ ॥

भयानक मरुतांनो, ज्या तुमच्या सेनासमूहास यत्किंचित् ही इजा कधीं होत नाहीं ते तुम्हीं दयार्द्र अंतःकरणानें आमचे सन्मनोरथ पूर्ण करा. पहा ही तुमची कराल-दंष्ट्रा विद्युत्, बरोबर नेम धरून मारलेल्या अस्त्रानें स्वापदें लोळवावी, त्याप्रमाणें पातक्यांचा दुराडा उडवून टाकते. ॥ ६ ॥


प्र स्क॒म्भदे॑ष्णा अनव॒भ्ररा॑धसोऽलातृ॒णासो॑ वि॒दथे॑षु॒ सुष्टु॑ताः ॥
अर्च॑न्त्य॒र्कं म॑दि॒रस्य॑ पी॒तये॑ वि॒दुर्वी॒रस्य॑ प्रथ॒मानि॒ पौंस्या॑ ॥ ७ ॥

प्र स्कम्भऽदेष्णाः अनवभ्रऽराधसः अलातृणासः विदथेषु सुऽस्तुताः ।
अर्चन्ति अर्कं मदिरस्य पीतये विदुः वीरस्य प्रथमानि पौंस्या ॥ ७ ॥

मरुतांनी दिलेले वरप्रदान चिरकाल लाभतें, ज्यांच्या कृपेचा ओघ अक्षय्य, परंतु ज्याचें विद्युदस्त्र फार जलाल आहे. अशा मरुतांचे स्तवन यज्ञमंदिरांतून अतिशय चाललेलें असतें, व आल्हाददायक सोमरसानें प्राशन करण्याकरितां मोठ्यानें घोष करीत ते येत असतात. कारण त्या महावीरानें (इंद्रानें) प्राचीन काळीं केलेले सर्व पराक्रम त्यांनाच माहीत अहेत. ॥ ७ ॥


श॒तभु॑जिभि॒स्तम॒भिह्रु॑तेर॒घात्पू॒र्भी र॑क्षता मरुतो॒ यमाव॑त ॥
जनं॒ यमु॑ग्रास्तवसो विरप्शिनः पा॒थना॒ शंसा॒त्तन॑यस्य पु॒ष्टिषु॑ ॥ ८ ॥

शतभुजिऽभिः तं अभिह्रुते अघा पूःऽभिः रक्षत मरुतः यं आवत ।
जनं यं उग्राः तवसः विऽरप्शिनः पाथन शंसात् तनयस्य पुष्टिषु ॥ ८ ॥

हे मरुतांनो, पातकापासून व दुष्टांच्या मर्मभेदक भाषणांपासून, तटबंदीचे ज्यांना शंभर वेढे आहेत अशा शहरांच्या योगाने राज्याचें संरक्षण करावे, त्याप्रमाणे ज्या भक्तावर तुम्हीं प्रसन्न झालेले असतां त्यांचे संरक्षण करता. हे महाप्रतापी व महाघोर मरुतांनो, ज्या मनुष्यावर तुम्हीं कृपादृष्टि ठेवतां त्याचाही तुम्ही कुटुंब पोषणाच्या उद्योगामुळें उत्पन्न होणार्‍या जननिंदे पासून बचाव करतां. ॥ ८ ॥


विश्वा॑नि भ॒द्रा म॑रुतो॒ रथे॑षु वो मिथ॒स्पृध्ये॑व तवि॒षाण्याहि॑ता ॥
अंसे॒ष्वा वः॒ प्रप॑थेषु खा॒दयोऽ॑क्षो वश्च॒क्रा स॒मया॒ वि वा॑वृते ॥ ९ ॥

विश्वानि भद्रा मरुतः रथेषु वः मिथस्पृध्याऽइव तविषाणि आऽहिता ।
अंसेषु आ वः प्रऽपथेषु खादयः अक्षः वः चक्रा समया वि ववृते ॥ ९ ॥

हे मरुतांनो, तुमच्या रथांत यच्चावत् मंगल लाभ आणि सामर्थ्यें अशा रीतीनें खेंचून भरली आहेत कीं, तेथें जागा मिळविण्याकरितां जणुं काय त्यांची एकमेकांशी चढा-ओढच चालली आहे असें वाटते. तुम्ही कूच करूं लागलांत म्हणजे शत्रूवर फेंकण्याची चक्रें तुमच्या खांद्यावरून एखाद्या अलंकाराप्रमाणें लटकत असतात, व तुमच्या रथाचा आंस असा असतो कीं त्याच्यामुळें त्याची सर्व चाकें एकदम जोरानें फिरतात. ॥ ९ ॥


भूरी॑णि भ॒द्रा नर्ये॑षु बा॒हुषु॒ वक्षः॑सु रु॒क्मा र॑भ॒सासो॑ अ॒ञ्जयः॑ ॥
अंसे॒ष्वेताः॑ प॒विषु॑ क्षु॒रा अधि॒ वयो॒ न प॒क्षान्व्यनु॒ श्रियो॑ धिरे ॥ १० ॥

भूरीणि भद्रा नर्येषु बाहुषु वक्षःऽसु रुक्माः रभसासः अञ्जयः ।
अंसेषु एताः पविषु क्षुराः अधि वयः न पक्षान् वि अनु श्रियः धिरे ॥ १० ॥

प्रतापी भुजदंडांत भरपूर यश, वक्षस्थलावर लकलकीत ठळक अलंकार, गळ्यांत शुभ माळा, आणि हत्यांरांना तीक्ष्ण धार, अशा वैभवानें जात असतां पक्षी ज्या प्रमाणे आपले पंख पसरतात, त्याप्रमाणें मरुत् हे आपली दिव्य कांति दूरवर पसरीत असतात. ॥ १० ॥


म॒हान्तो॑ म॒ह्ना वि॒भ्वो विभू॑तयो दूरे॒दृशो॒ ये दि॒व्या इ॑व॒ स्तृभिः॑ ॥
म॒न्द्राः सु॑जि॒ह्वाः स्वरि॑तार आ॒सभिः॒ संमि॑श्ला॒ इंद्रे॑ म॒रुतः॑ परि॒ष्टुभः॑ ॥ ११ ॥

महान्तः मह्ना विऽभ्वः विऽभूतयः दूरेऽदृशः ये दिव्याःऽइव स्तृभिः ।
मन्द्राः सुऽजिह्वाः स्वरितारः आसऽभिः संऽमिश्लाः इंद्रे मरुतः परिऽस्तुभः ॥ ११ ॥

आपल्या प्रभावामुळें महा थोर व्यापक आणि ऐश्वर्यसंपन्न असे हे मरुत् नक्षत्रांच्या योगानें द्युलोक जसा दूरवर प्रकाशतो, तसे फार दूर पर्यंत प्रकाशतात. ते उल्हासी मधुर भाषणी आणि तोंडानें सुस्वर गायन करणारे आहेत. तेव्हां अर्थात् ते इंद्राशी अगदीं मिळून असतात आणि त्याला स्तुतींनी चोहोकडून जणों वेष्टून टाकतात. ॥ ११ ॥


तद्वः॑ सुजाता मरुतो महित्व॒नं दी॒र्घं वो॑ दा॒त्रमदि॑तेरिव व्र॒तम् ॥
इंद्र॑श्च॒न त्यज॑सा॒ वि ह्रु॑णाति॒ तज्जना॑य॒ यस्मै॑ सु॒कृते॒ अरा॑ध्वम् ॥ १२ ॥

तत् वः सुऽजाताः मरुतः महिऽत्वनं दीर्घं वः दात्रं अदितेःऽइव व्रतम् ।
इंद्रः चन त्यजसा वि ह्रुणाति तत् जनाय यस्मै सुऽकृते अराध्वम् ॥ १२ ॥

हे मरुतांनो, अति पवित्र ठिकाणींच तुम्हीं प्रकट होतां, आणि तुमचा महिमा एवढा थोर कीं अदितीचा अधिकार जसा अमर्याद तशी तुमची देणगीही अपरिमित असते. ज्या पुण्य पुरुषावर तुम्हीं कृपा करतां त्याला इंद्र सुद्धां दूर ढकलून देऊन तुमच्या लौकिकाला कमीपणा आणीत नाही. ॥ १२ ॥


तद्वो॑ जामि॒त्वं म॑रुतः॒ परे॑ यु॒गे पु॒रू यच्छंस॑म॒मृता॑स॒ आव॑त ॥
अ॒या धि॒या मन॑वे श्रु॒ष्टिमाव्या॑ सा॒कं नरो॑ दं॒सनै॒रा चि॑कित्रिरे ॥ १३ ॥

तत् वः जामिऽत्वं मरुतः परे युगे पुरु यत् शंसं अमृतासः आवत ।
अया धिया मनवे श्रुष्टिं आव्य साकं नरः दंसनैः आ चिकित्रिरे ॥ १३ ॥

अमर मरुतांनो, तुमचें प्रेम इतकें कळकळीचे असतें कीं स्तोतृजनांवर तुमची कृपा पुढील युगांतही निरंतर राहील. अशाच सुबुद्धिमुळें मनुष्याच्या कल्याणार्थ, त्याची प्रार्थना ऐकून घेऊन हे शूर मरुत् आपल्या अद्‍भुत पराक्रमांनी विख्यात झाले आहेत. ॥ १३ ॥


येन॑ दी॒र्घं म॑रुतः शू॒शवा॑म यु॒ष्माके॑न॒ परी॑णसा तुरासः ॥
आ यत्त॒तन॑न्वृ॒जने॒ जना॑स ए॒भिर्य॒ज्ञेभि॒स्तद॒भीष्टि॑मश्याम् ॥ १४ ॥

येन दीर्घं मरुतः शूशवाम युष्माकेन परीणसा तुरासः ।
आ यत् ततनन् वृजने जनासः एभिः यज्ञेभिः तत् अभि इष्टिं अश्याम् ॥ १४ ॥

वेगवान् मरुतांनो, तुमच्या अपार दिव्य समृद्धीच्या योगानें आमचा निरंतर उत्कर्ष होवो. ज्या ज्या ठिकाणीं आमचे लोक राहतील त्या त्या ठिकाणीं त्यांची संतति वाढावी म्हणून जे हे आम्हीं यज्ञ करतो, त्यांच्या योगानें आमचा अभिष्ट हेतु पूर्ण होवो. ॥ १४ ॥


ए॒ष वः॒ स्तोमो॑ मरुत इ॒यं गीर्मा॑न्दा॒र्यस्य॑ मा॒न्यस्य॑ का॒रोः ॥
एषा या॑सीष्ट त॒न्वे व॒यां वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १५ ॥

एषः वः स्तोमः मरुतः इयं गीः मान्दार्यस्य मान्यस्य कारोः ।
आ इषा यासीष्ट तन्वे वयां विद्याम इषं वृजनं जीरऽदानुम् ॥ १५ ॥

हे मरुतांनो, हे स्तोत्र व ही प्रार्थना सन्मान्य अशा मांदार्यानें तुमच्या प्रित्यर्थ केलेली आहे, तर आमच्या स्वतःकरितां उत्साहप्रद शक्ति तुम्हीं घेऊन या म्हणजे त्या सामर्थ्य शाखेच्या आश्रयानें त्या तात्काळ फलद्रूप होणार्‍या आश्रयानें आम्हीं राहूं. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६७ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः, मरुतः - छंद - त्रिष्टुभ्


स॒हस्रं॑ त इंद्रो॒तयो॑ नः स॒हस्र॒मिषो॑ हरिवो गू॒र्तत॑माः ॥
स॒हस्रं॒ रायो॑ माद॒यध्यै॑ सह॒स्रिण॒ उप॑ नो यन्तु॒ वाजाः॑ ॥ १ ॥

सहस्रं त इंद्रः ऊतयः नः सहस्रं इषः हरिऽवः गूर्तऽतमाः ।
सहस्रं रायः मादयध्यै सहस्रिणः उप नः यन्तु वाजाः ॥ १ ॥

हे हरिदश्व इंद्रा, तुझे ते हजारों प्रसाद, ते उत्साहप्रद व अत्यंत स्तुत्य अशा हजारों प्रेरणा,, सहस्रावधि दिव्य संपत्ति आणि त्या अगणित पवित्र शक्ति आम्हांला आनंदांत निमग्न करण्याकरितां आमच्याकडे येवोत. ॥ १ ॥


आ नोऽ॑वोभिर्म॒रुतो॑ या॒न्त्वच्छा॒ ज्येष्ठे॑भिर्वा बृ॒हद्दि॑वैः सुमा॒याः ॥
अध॒ यदे॑षां नि॒युतः॑ पर॒माः स॑मु॒द्रस्य॑ चिद्ध॒नय॑न्त पा॒रे ॥ २ ॥

आ नः अवऽभिः मरुतः यान्तु अच्छ ज्येष्ठेभिः वा बृहत्ऽदिवैः सुऽमायाः ।
अध यत् एषां निऽयुतः परमाः समुद्रस्य चित् धनयन्त पारे ॥ २ ॥

चमत्कार कुशल मरुत् आपल्या उत्कृष्ट व अत्यंत दीप्तिमान अशा प्रसादांसहित आमच्याकडे येवोत. असें करणें त्यांस कांहींच कठीण नाही. कारण त्यांचे नियुत् नांवाचे उत्तम घोडे दौडत दौडत समुद्राच्या सुद्धां पार जाऊं शकतात. ॥ २ ॥


मि॒म्यक्ष॒ येषु॒ सुधि॑ता घृ॒ताची॒ हिर॑ण्यनिर्णि॒गुप॑रा॒ न ऋ॒ष्टिः ॥
गुहा॒ चर॑न्ती॒ मनु॑षो॒ न योषा॑ स॒भाव॑ती विद॒थ्येव॒ सं वाक् ॥ ३ ॥

मिम्यक्ष येषु सुऽधिता घृताची हिरण्यऽनिर्णिक् उपरा न ऋष्टिः ।
गुहा चरन्ती मनुषः न योषा सभाऽवती विदथ्याऽइव सं वाक् ॥ ३ ॥

जिचें अंग नवनीताप्रमाणे कोमल, जिची कांति सुवर्णाप्रमाणे तेजःपुंज आणि जिचा बांधा अगदी रेखीव अशी एक सुंदरी मरुतांबरोबर एक सारखी असते. त्यांच्या हातांतील बरची जशी कधीं वेगळी होत नाही, त्याप्रमाणेच ही युवती सुद्धां त्यांच्या पासून कधींही वेगळी होत नाहीं. परंतु अंतःपुरांतच वावरणार्‍या स्त्रीप्रमाणें केव्हां केव्हां ती गुप्त असते. आणि केव्हां केव्हां भरसभेत येणार्‍या एखाद्या स्त्रीप्रमाणे किंवा यज्ञकाळीं होणार्‍या मेघ गर्जनारूप देवस्तुतीप्रमाणें सर्वांना गोचर होते. ॥ ३ ॥


परा॑ शु॒भ्रा अ॒यासो॑ य॒व्या सा॑धार॒ण्येव॑ म॒रुतो॑ मिमिक्षुः ॥
न रो॑द॒सी अप॑ नुदन्त घो॒रा जु॒षन्त॒ वृधं॑ स॒ख्याय॑ दे॒वाः ॥ ४ ॥

परा शुभ्राः अयासः यव्या साधारण्याऽइव मरुतः मिमिक्षुः ।
न रोदसी इति अप नुदन्त घोराः जुषन्त वृधं सख्याय देवाः ॥ ४ ॥

शुभ्र कांतिमान आणि कितीही श्रम झाले तरी न थकणार्‍या अशा त्या मरुतांनी त्या तरुणीला आपल्या अगदीं जवळ घेतलें व तें अशा प्रेमानें कीं जणुं काय तीच एकटी सर्वांची अत्यंत आवडती. मरुत् हे उग्र खरे परंतु त्यांनी रोदसीचा त्याग केला नाहीं. पण उलट तिच्यावर प्रेम करावें म्हणून त्यांनी त्या आनंद वर्धिकेचा अंगिकार केला. ॥ ४ ॥


जोष॒द्यदी॑मसु॒र्या स॒चध्यै॒ विषि॑तस्तुका रोद॒सी नृ॒मणाः॑ ॥
आ सू॒र्येव॑ विध॒तो रथं॑ गात्त्वे॒षप्र॑तीका॒ नभ॑सो॒ नेत्या ॥ ५ ॥

जोषत् यत् ईं असुर्या सचध्यै विसितऽस्तुका रोदसी नृऽमनाः ।
आ सूर्य़ाऽइव विधतः रथं गात् त्वेषऽप्रतीका नभसः न इत्या ॥ ५ ॥

दिव्यरूप, लुलितकुंतल परंतु त्या धिरोदात्त मनाच्या रोदसीनें मरुतांचा अखंड सहवास व्हावा म्हणून जेव्हां त्यांना वरलें, तेव्हां सूर्याची अंगकांति जशी चंचलगतीनें आकाशांतून त्याच्या रथाजवळ येते, त्याप्रमाणें ती तेजोरूप रोदसी प्रेमानें सर्वस्वी आधीन झालेल्या त्या मरुतांच्या रथाजवळ गेली. ॥ ५ ॥


आस्था॑पयन्त युव॒तिं युवा॑नः शु॒भे निमि॑श्लां वि॒दथे॑षु प॒ज्राम् ॥
अ॒र्को यद्वो॑ मरुतो ह॒विष्मा॒न्गाय॑द्गा॒थं सु॒तसो॑मो दुव॒स्यन् ॥ ६ ॥

आ अस्थापयन्त युवतिं युवानः शुभे निऽमिश्लां विदथेषु पज्राम् ।
अर्कः यत् वः मरुतः हविष्मान् गायत् गाथं सुतऽसोमः दुवस्यन् ॥ ६ ॥

तरुण मरुतांनी त्या तरुणीला, आनंदाशीं एकरूप झालेल्या व यज्ञ सभांमध्यें भारदस्तपणानें वावरणार्‍या त्या रोदसीला आपल्या रथांत बसवून घेतली, त्या वेळेस हे मरुतांनो, तुमच्या स्तोतृजनानें तुमची सेवा करून तुम्हांस हवि आणि सोम अर्पण करून तुमच्या प्रित्यर्थ स्तोत्र केलें. ॥ ६ ॥


प्र तं वि॑वक्मि॒ वक्म्यो॒ य ए॑षां म॒रुतां॑ महि॒मा स॒त्यो अस्ति॑ ॥
सचा॒ यदीं॒ वृष॑मणा अहं॒यु स्थि॒रा चि॒ज्जनी॒र्वह॑ते सुभा॒गाः ॥ ७ ॥

प्र तं विवक्मि वक्म्यः यः एषां मरुतां महिमा सत्यः अस्ति ।
सचा यत् ईं वृषऽमनाः अहंऽयुः स्थिरा चित् जनीः वहते सुऽभागाः ॥ ७ ॥

हा मरुतांचा जो एक वर्णनीय महिमा आहे तो अगदी खरा आहे. व त्याचें वर्णन मी कितीतरी करीत असतो. तो महिमा हा कीं , ही मानी परंतु इमानी वीरपत्नी जी रोदसी ती जलवृष्टिरूप भाग्यशाली स्त्रियांनांसुद्धां आपल्या बरोबरच घेऊन येत असते. ॥ ७ ॥


पान्ति॑ मि॒त्रावरु॑णावव॒द्याच्चय॑त ईमर्य॒मो अप्र॑शस्तान् ॥
उ॒त च्य॑वन्ते॒ अच्यु॑ता ध्रु॒वाणि॑ वावृ॒ध ईं॑ मरुतो॒ दाति॑वारः ॥ ८ ॥

पान्ति मित्रावरुणौ अवद्यात् चयते ईं अर्यमो इति अप्रऽशस्तान् ।
उत च्यवन्ते अच्युता ध्रुवाणि ववृधे ईं मरुतः दातिऽवारः ॥ ८ ॥

हाही तुमचाच महिमा कीं मित्र, वरुण आणि अर्यमा हेही तुमच्या भक्तांचे पातकापासून रक्षण करतात, आणि दुष्टांस हुस्कून काढून त्यांस शिक्षा करतात. त्याचप्रमाणे जे पदार्थ पूर्णपणें अढळ आणि अचल, तेही एकवेळ जागचे ढळतील परंतु दानशाली भक्ताचा उत्कर्ष हा होणारच. ॥ ८ ॥


न॒ही नु वो॑ मरुतो॒ अन्त्य॒स्मे आ॒रात्ता॑च्चि॒च्छव॑सो॒ अन्त॑मा॒पुः ॥
ते धृ॒ष्णुना॒ शव॑सा शूशु॒वांसोऽ॑र्णो॒ न द्वेषो॑ धृष॒ता परि॑ ष्ठुः ॥ ९ ॥

नहि नु वः मरुतः अन्ति अस्मे इति आरात्तात् चित् शवसः अन्तं आपुः ।
ते धृष्णुना शवसा शूशुऽवांसः अर्णः न द्वेषः धृषता परि स्थुः ॥ ९ ॥

हे मरुतांनो, आम्हां मानवापैकीं - मग तो सध्याच्या काळचा असो किंवा पुरातन काळचा असो - कोणासही तुमचा अंत लागला नाहीं. मरुत् हे आपल्या आवेशानें व प्रतापानें एकदां खवळून गेले म्हणजे दुर्जनांना झपाट्यासरशीं समुद्राप्रमाणें चोहोंकडून घेरून बुडवून टाकतात. ॥ ९ ॥


व॒यम॒द्येन्द्र॑स्य॒ प्रेष्ठा॑ व॒यं श्वो वो॑चेमहि सम॒र्ये ॥
व॒यं पु॒रा महि॑ च नो॒ अनु॒ द्यून्तन्न॑ ऋभु॒क्षा न॒रामनु॑ ष्यात् ॥ १० ॥

वयं अद्य इंन्द्रस्य प्रेष्ठाः वयं श्वः वोचेमहि सऽमर्ये ।
वयं पुरा महि च नः अनु द्यून् तत् नः ऋभुक्षाः नरां अनु स्यात् ॥ १० ॥

युद्धांत काय आणि यज्ञांत काय, आम्ही इंद्राचे लाडके भक्त, त्याचे स्तवन आज उद्यांच नव्हे तर निरंतर करीत राहूं. ह्या पूर्वींही आम्हीं त्यांचे स्तवन प्रेमानें केलें आहे, तसेंच पुढेंही दिवसानुदिवस करूं. तरी मरुतांचा स्वामी जो इंद्र तो इतर मनुष्यांच्या आधीं आम्हांलाच प्रसन्न होवो. ॥ १० ॥


ए॒ष वः॒ स्तोमो॑ मरुत इ॒यं गीर्मा॑न्दा॒र्यस्य॑ मा॒न्यस्य॑ का॒रोः ॥
एषा या॑सीष्ट त॒न्वे व॒यां वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ११ ॥

एषः वः स्तोमः मरुतः इयं गीः मान्दार्यस्य मान्यस्य कारोः ।
आ इषा यासीष्ट तन्वे वयां विद्याम इषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ११ ॥

हे मरुतांनो, हे स्तोत्र व ही प्रार्थना सन्मान्य अशा मांदार्यानें तुमच्या प्रित्यर्थ केलेली आहे, तर आमच्या स्वतःकरितां उत्साहप्रद शक्ति तुम्हीं घेऊन या म्हणजे त्या सामर्थ्य शाखेच्या आश्रयानें त्या तात्काळ फलद्रूप होणार्‍या आश्रयानें आम्हीं राहूं. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६८ ( मरुतः सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : मरुतः - छंद - त्रिष्टुभ्


य॒ज्ञाय॑ज्ञा वः सम॒ना तु॑तु॒र्वणि॒र्धियं॑धियं वो देव॒या उ॑ दधिध्वे ॥
आ वो॑ऽ॒र्वाचः॑ सुवि॒ताय॒ रोद॑स्योर्म॒हे व॑वृत्या॒मव॑से सुवृ॒क्तिभिः॑ ॥ १ ॥

यज्ञाऽयज्ञा वः समना तुतुर्वणिः धियंऽधियं वः देवऽयाः ऊं इति दधिध्वे ।
आ वः अर्वाचः सुविताय रोदस्योः महे ववृत्यां अवसे सुवृक्तिऽभिः ॥ १ ॥

हे मरुतांनो प्रत्येक यज्ञांत तुम्हा सर्वांची उपासना एकदम करण्याविषयी अतिशय आतुर झालेला जो जो भक्त आहे, तो तो तुमचा. आणि तुम्हींही आपला म्हटलेल्या देव सेवक भक्ताची प्रत्येक प्रार्थना अंतःकरणांत सांठवून ठेवतां, तर सर्व जगाचे उत्तम प्रकारचें कल्याण व्हावे व मजवर अनुग्रह व्हावा म्हणून पवित्र अशा स्तुतींनी मीं तुम्हास इकडे वळवीन असें करा. ॥ १ ॥


व॒व्रासो॒ न ये स्व॒जाः स्वत॑वस॒ इषं॒ स्वरभि॒जाय॑न्त॒ धूत॑यः ॥
स॒ह॒स्रिया॑सो अ॒पां नोर्मय॑ आ॒सा गावो॒ वन्द्या॑सो॒ नोक्षणः॑ ॥ २ ॥

वव्रासः न ये स्वऽजाः स्वऽतवसः इषं स्वः अभिजायन्त धूतयः ।
सहस्रियासः अपां न ऊर्मयः आसा गावः वन्द्यासः न उक्षणः ॥ २ ॥

आपल्या आपण जन्म पावणारे व सर्व जगास हालवून सोडणारे हे मरुत् पर्वतांप्रमाणें आपल्या स्वतःच्याच बळावर अवलंबून असतात, व मनोत्साह आणि प्रकाश ह्याची अभिवृद्धि करण्याकरतांच प्रकट होतात. महा पराक्रमी मरुत् हे महा सागराच्या प्रचंड लाटांप्रमाणें असंख्य आणि दिव्य धेनूप्रमाणे सर्वतोपरी पूज्य होत. ॥ २ ॥


सोमा॑सो॒ न ये सु॒तास्तृ॒प्तांश॑वो हृ॒त्सु पी॒तासो॑ दु॒वसो॒ नास॑ते ॥
ऐषा॒मंसे॑षु र॒म्भिणी॑व रारभे॒ हस्ते॑षु खा॒दिश्च॑ कृ॒तिश्च॒ सं द॑धे ॥ ३ ॥

सोमासः न ये सुताः तृप्तऽअंशवः हृत्‌ऽसु पीतासः दुवसः न आसते ।
ऐषां अंसेषु रम्भिणीऽइव ररभे हस्तेषु खादिः च कृतिः च सं दधे ॥ ३ ॥

सरस आणि पुष्ट अशा सोमवल्लीचा रस काढून प्राशन केला असतां तो जसा हृदयांत आनंदरूपानें राहतो त्याप्रमाणेंच मरुत् हे भक्ताच्या अंतःकरणांत वास करतात. सुंदर तरुणीच्या भुजलते प्रमाणें त्यांच्या खांद्यावरून फुलांच्या माळेचा विळखा असतो आणि त्यांनी एका हातांत ढाल व दुसर्‍या हातांत तरवार घेतलेली असते. ॥ ३ ॥


अव॒ स्वयु॑क्ता दि॒व आ वृथा॑ ययु॒रम॑र्त्याः॒ कश॑या चोदत॒ त्मना॑ ॥
अ॒रे॒णव॑स्तुविजा॒ता अ॑चुच्यवुर्दृ॒ळ्हानि॑ चिन्म॒रुतो॒ भ्राज॑दृष्टयः ॥ ४ ॥

अव स्वऽयुक्ताः दिवः आ वृथा ययुः अमर्त्याः कशया चोदत त्मना ।
अरेणवः तुविऽजाताः अचुच्यवुः दृळ्हानि चित् मरुतः भ्राजत्ऽऋष्टयः ॥ ४ ॥

ज्यांच्या रथास घोडे आपल्या आपण जुंपले जातात, असे हे मरुत् आपल्या रथांत बसून आकाशांतून सहज लीलेनें खाली भूलोकीं आलेले आहेत. अमर मरुतांनो, तुम्ही आतां स्वतःच तुमच्या घोड्यांना चाबकानें जरा इषारा द्या. मरुत् हे निष्कलंक, उपजतच बलशाली, व त्यांच्या हातांतील भाले पाहिले तर अगदी झगझगीत; तेव्हां कसलेंही न हालणारे धूड असो त्यास त्यांनी उलथून पाडलेंच म्हणून समजावे. ॥ ४ ॥


को वो॑ऽ॒न्तर्म॑रुत ऋष्टिविद्युतो॒ रेज॑ति॒ त्मना॒ हन्वे॑व जि॒ह्वया॑ ॥
ध॒न्व॒च्युत॑ इ॒षां न याम॑नि पुरु॒प्रैषा॑ अह॒न्यो३॑नैत॑शः ॥ ५ ॥

कः वः अन्तः मरुतः ऋष्टिऽविद्युतः रेजति त्मना हन्वाऽइव जिह्वया ।
धन्वऽच्युतः इषां न यामनि पुरुऽप्रैषाः अहन्यः न एतशः ॥ ५ ॥

लकलकीत वीज हाच तुमचा भाला, तर हे मरुतांनो, बोलतांना ओठ जसे जिभेच्या सामर्थ्यानें हालतात, त्याप्रमाणें तुम्हाला अंतर्यामी प्रेरणा कोणामुळें होतें बरें ? सर्वांस ताजे तवानें करणारीं जीं सामर्थ्यें, तीं आम्हांस मिळवून देण्याच्या मार्गांत तुम्ही असलांत म्हणजे अंतरिक्षांतून झपाट्यानें बाहेर पडून, सूर्याच्या तऱ्हेतऱ्हेच्या किरणांप्रमाणें सर्वत्र संचार करतां. ॥ ५ ॥


क्व स्विद॒स्य रज॑सो म॒हस्परं॒ क्वाव॑रं मरुतो॒ यस्मि॑न्नाय॒य ॥
यच्च्या॒वय॑थ विथु॒रेव॒ संहि॑तं॒ व्यद्रि॑णा पतथ त्वे॒षम॑र्ण॒वम् ॥ ६ ॥

क्व स्वित् अस्य रजसः महः परं क्व अवरं मरुतः यस्मिन् आऽयय ।
यत् च्यवयथ विथुराऽइव संऽहितं वि अद्रिणा पतथ त्वेषं अर्णवम् ॥ ६ ॥

हे मरुतांनो, जेथून तुम्ही भूलोकीं आलांत त्या ह्या महान् रजो-लोकाला शेवट कसचा आणि आरंभ कसचा ? असें आहे तरी एकवट झालेल्या मेघरूप शत्रूंच्या समूहास अशनीच्या तडाख्यासरशी तुम्हीं भुस्कटाप्रमाणें उडवून देतां, तेव्हां देदीप्यमान अशा अंतरिक्ष समुद्राच्याही पार जोरानें उडून जातां. ॥ ६ ॥


सा॒तिर्न वोऽ॑मवती॒ स्व॑र्वती त्वे॒षा विपा॑का मरुतः॒ पिपि॑ष्वती ॥
भ॒द्रा वो॑ रा॒तिः पृ॑ण॒तो न दक्षि॑णा पृथु॒ज्रयी॑ असु॒र्येव॒ जञ्ज॑ती ॥ ७ ॥

सातिः नः वः अमऽवती स्वःऽवती त्वेषा विऽपाका मरुतः पिपिष्वती ।
भद्रा वः रातिः पृणतः न दक्षिणा पृथुऽज्रयी असुर्याऽइव जञ्जती ॥ ७ ॥

तुमच्यामुळें प्राप्त झालेली विजयश्री जशी बलवर्धक, स्वर्गदात्री, उज्ज्वल आणि आनंद परिणामी असते, तशीच हे मरुतांनो, तुमची देणगीही एखाद्या दानशूराच्या दक्षिणेप्रमाणें मंगलकारक असून आकाशांतील विद्युल्लतेप्रमाणें अतिशय वेगानें खालीं येणारी व सर्वांस थक्क करून टाकणारी अशी असते. ॥ ७ ॥


प्रति॑ ष्टोभन्ति॒ सिंध॑वः प॒विभ्यो॒ यद॒भ्रियां॒ वाच॑मुदी॒रय॑न्ति ॥
अव॑ स्मयन्त वि॒द्युतः॑ पृथि॒व्यां यदी॑ घृ॒तं म॒रुतः॑ प्रुष्णु॒वन्ति॑ ॥ ८ ॥

प्रति स्तोभन्ति सिंधवः पविऽभ्यः यत् अभ्रियां वाचं उत्ऽईरयन्ति ।
अव स्मयन्त विऽद्युतः पृथिव्यां यदी घृतं मरुतः प्रुष्णुवन्ति ॥ ८ ॥

मरुत् हे घनगर्जनेच्या शब्दांनी जयघोष करीत असतात त्यावेळीं त्यांच्या रथचक्राच्या पावट्यांच्या रगड्यामुळें मेघसमुद्रहि खवळून जाऊन गर्जना करतो. आणि पृथ्वितलावर अमृत वृष्टि करतात, त्यावेळी विद्युल्लता ही चमकत चमकत स्मित हास्य करीत असतात. ॥ ८ ॥


असू॑त॒ पृश्नि॑र्मह॒ते रणा॑य त्वे॒षम॒यासां॑ म॒रुता॒मनी॑कम् ॥
ते स॑प्स॒रासो॑ऽजनय॒न्ताभ्व॒मादित्स्व॒धामि॑षि॒रां पर्य॑पश्यन् ॥ ९ ॥

असूत पृश्निः महते रणाय त्वेषं अयासां मरुतां अनीकम् ।
ते सप्सरासः अजनयन्त अभ्वं आत् इत् स्वधां इषिरां परि अपश्यन् ॥ ९ ॥

घोर संग्राम करण्याकरितांच पृश्नी मातेनें वेगवान मरुतांच्या जाज्वल्य समूहाला जन्म दिला. ते मोठे लढवय्ये असल्यामुळें त्यांनी आपलें शौर्य प्रकट केलें आणि त्यामुळेंच प्राणिमात्राच्या हालचालींत व्यवस्था दृष्टीस पडूं लागली. ॥ ९ ॥


ए॒ष वः॒ स्तोमो॑ मरुत इ॒यं गीर्मा॑न्दा॒र्यस्य॑ मा॒न्यस्य॑ का॒रोः ॥
एषा या॑सीष्ट त॒न्वे व॒यां वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १० ॥

एष वः स्तोमः मरुतः इयं गीः मान्दार्यस्य मान्यस्य कारोः ।
आ इषा यासीष्ट तन्वे वयां विद्याम इषं वृजनं जीरऽदानुम् ॥ १० ॥

हे मरुतांनो, हे स्तोत्र व ही प्रार्थना सन्मान्य अशा मांदार्यानें तुमच्या प्रित्यर्थ केलेली आहे, तर आमच्या स्वतःकरितां उत्साहप्रद शक्ति तुम्हीं घेऊन या म्हणजे त्या सामर्थ्य शाखेच्या आश्रयानें त्या तात्काळ फलद्रूप होणार्‍या आश्रयानें आम्हीं राहूं. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६९ ( मरुतः सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : मरुतः - छंद - त्रिष्टुभ्


म॒हश्चि॒त्त्वमिं॑द्र य॒त ए॒तान्म॒हश्चि॑दसि॒ त्यज॑सो वरू॒ता ॥
स नो॑ वेधो म॒रुतां॑ चिकि॒त्वान्त्सु॒म्ना व॑नुष्व॒ तव॒ हि प्रेष्ठा॑ ॥ १ ॥

महः चित् त्वं इंद्र यतः एतान् महः चित् असि त्यजसः वरूता ।
सः नः वेधः मरुतां चिकित्वान् सुम्ना वनुष्व तव हि प्रेष्ठा ॥ १ ॥

हे इंद्रा, कोणी कितीही मोठा, कसाही बलाढ्य असो, त्याच्या हल्ल्यापासून आमचा बचाव करणारा तूं आहेस. हे सकल देव प्रभो महाज्ञानी असाही तूंच आहेस. तर मनुष्य मात्राला अत्यंत प्रिय असे जे जे आनंद तुजपाशीं आहेत ते ते आम्हांस प्राप्त करून दे. ॥ १ ॥


अयु॑ज्रन्त इंद्र वि॒श्वकृ॑ष्टीर्विदा॒नासो॑ नि॒ष्षिधो॑ मर्त्य॒त्रा ॥
म॒रुतां॑ पृत्सु॒तिर्हास॑माना॒ स्वर्मीळ्हस्य प्र॒धन॑स्य सा॒तौ ॥ २ ॥

अयुज्रन् ते इंद्र विश्वऽकृष्टीः विदानासः निःसिधः मर्त्यऽत्रा ।
मरुतां पृत्सुतिः हासमाना स्वःऽमीळ्हस्य प्रधनस्य सातौ ॥ २ ॥

हे इंद्रा, ह्या मनुष्य लोकांतील शत्रुनाशक, सकलजनाचे मार्ग दर्शक आणि ज्ञानी अशा देवांना तुझे हुकुम सुटले आहेत. असें वाटतें कारण ही मरुतांची सेनाच पहा स्वर्लोकींचा प्रकाश जिंकून आणण्याकरितां होणार्‍या युद्धांत जय मिळविण्याकरितां कशी मोठ्या ईर्षेनें निघाली आहे. ॥ २ ॥


अम्य॒क्सा त॑ इंद्र ऋ॒ष्टिर॒स्मे सने॒म्यभ्वं॑ म॒रुतो॑ जुनन्ति ॥
अ॒ग्निश्चि॒द्धि ष्मा॑त॒से शु॑शु॒क्वानापो॒ न द्वी॒पं दध॑ति॒ प्रयां॑सि ॥ ३ ॥

अम्यक् सा ते इंद्र ऋष्टिः अस्मे इति सनेमि अभ्वं मरुतः जुनन्ति ।
अग्निः चित् हि स्म अत्से शुशुक्वान् आपः न द्वीपं दधति प्रयांसि ॥ ३ ॥

हे इंद्रा, तें तुझें प्रसिद्ध हत्यार आम्हांकरितां नेहमी पुढें सरसावलेलेंच आहे. व मरुतांनीही आपलें सामर्थ्य बाहेर निदर्शनास आणलें आहे. प्रज्वलित अग्नि ज्या प्रमाणें शुष्क काष्ठांना चोहोंकडून घेरतो किंवा पाण्याचा प्रवाह एखाद्या बेटाला वेढून टाकतो त्याप्रमाणें इंद्र व मरुत् ह्यांनी सर्व सुखें आम्हांकरितां आपल्या हातांत घेऊन ठेवलेली आहेत. ॥ ३ ॥


त्वं तू न॑ इंद्र॒ तं र॒यिं दा॒ ओजि॑ष्ठया॒ दक्षि॑णयेव रा॒तिम् ॥
स्तुत॑श्च॒ यास्ते॑ च॒कन॑न्त वा॒यो स्तनं॒ न मध्वः॑ पीपयन्त॒ वाजैः॑ ॥ ४ ॥

त्वं तू नः इंद्र तं रयिं दाः ओजिष्ठया दक्षिणयाऽइव रातिम् ।
स्तुतः च याः ते चकनन्त वायोः स्तनं न मध्वः पीपयन्त वाजैः ॥ ४ ॥

हे इंद्रा, ऐहिक देणगी तूं ज्याप्रमाणें प्रभावशाली अशा गोधनांच्या रूपानें दिलेली आहेस, त्याप्रमाणें तें अनिर्वर्ण्य दिव्य ऐश्वर्यही तूं आम्हांस अनमान न करतां दे. तुझें स्तवन आम्हीं यथामति केलें तेव्हां ज्या स्तुतींनी तूं प्रसन्न झालास त्याच स्तुतींनी, वायूचें अंतरंग मधुर सुगंधानें भरून जावें त्याप्रमाणें आमचें अंतःकरण भक्तिच्या उमाळ्यानें उचंबळून गेलें. ॥ ४ ॥


त्वे राय॑ इंद्र तो॒शत॑माः प्रणे॒तारः॒ कस्य॑ चिदृता॒योः ॥
ते षु णो॑ म॒रुतो॑ मृळयन्तु॒ ये स्मा॑ पु॒रा गा॑तू॒यन्ती॑व दे॒वाः ॥ ५ ॥

त्वे इति रायः इंद्र तोशऽतमाः प्रऽनेतारः कस्य चित् ऋतऽयोः ।
ते सु नः मरुतः मृळयन्तु ये स्म पुरा गातुयन्तिऽइव देवाः ॥ ५ ॥

प्रत्येक सच्छील भक्ताचा योगक्षेम चालविणारे आणि अत्यंत समृद्ध असें जें दिव्य ऐश्वर्य आहे तें, हे इंद्रा, तुझ्याच हातीं असतें. तर तुझ्या भक्तांस सामोरे जाण्याची जणुं जे इच्छा करीत असतात, असे ते तुझे देदीप्यमान मरुत् आम्हांवर अतिशय कृपालोभ करोत. ॥ ५ ॥


प्रति॒ प्र या॑हीन्द्र मी॒ळ्हुषो॒ नॄन्म॒हः पार्थि॑वे॒ सद॑ने यतस्व ॥
अध॒ यदे॑षां पृथुबु॒ध्नास॒ एता॑स्ती॒र्थे नार्यः पौंस्या॑नि त॒स्थुः ॥ ६ ॥

प्रति प्र याहि इंन्द्र मीळ्हुषः नॄन् महः पार्थिवे सदने यतस्व ।
अध यत् एषां पृथुऽबुध्नासः एताः तीर्थे न अर्यः पौंस्यानि तस्थुः ॥ ६ ॥

हे इंद्रा, मरुत् हे कृपाप्रसादांचा वर्षाव करणारे, थोर आणि वीर्यवान आहेत, त्यांच्या सहाय्याकरितां ये आणि पृथ्वितलावर आपला पराक्रम गाजव. हा पहा ह्या मरुतांचा, भरगच्च पुठ्यांच्या हरिणांचा किरणरूप तांडा राजांची सैन्यें रणमैदानावर येऊन उभी रहावी, त्याप्रमाणे येथें उभा राहिला आहे. ॥ ६ ॥


प्रति॑ घो॒राणा॒मेता॑नाम॒यासां॑ म॒रुतां॑ शृण्व आय॒तामु॑प॒ब्दिः ॥
ये मर्त्यं॑ पृतना॒यन्त॒मूमै॑रृणा॒वानं॒ न प॒तय॑न्त॒ सर्गैः॑ ॥ ७ ॥

प्रति घोराणां एतानां अयासां मरुतां शृण्वे आऽयतां उपब्दिः ।
ये मर्त्यं पृतनाऽयन्तं ऊमैः ऋणऽवानं न पतयन्त सर्गैः ॥ ७ ॥

भयंकर आणि अतिशय तडफदार असे हे मरुत् मोठ्या धुधाट्यानें येत आहेत. हा पहा त्यांचा आवाज मोठ्यानें ऐकूं येऊं लागला. आपल्यावर प्रेम करणार्‍याशींही जो शत्रुत्व करतो अशा दुष्ट अधमाला, एखाद्या पातकी ऋणकर्‍याला हाणून पाडावा त्याप्रमाणें आपल्या धडाक्यानें हे मरुत् जमीनदोस्त करून टाकतात. ॥ ७ ॥


त्वं माने॑भ्य इंद्र वि॒श्वज॑न्या॒ रदा॑ म॒रुद्‌भिः॑ शु॒रुधो॒ गोअ॑ग्राः ॥
स्तवा॑नेभि स्तवसे देव दे॒वैर्वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ८ ॥

त्वं मानेभ्यः इंद्र विश्वऽजन्या रद मरुत्‌भिः शुरुधः गोऽअग्राः ।
स्तवाऽनेभि स्तवसे देव देवैः विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ८ ॥

हे इंद्रा, तूं मरुतांसह इकडे ये आणि जिच्यापासून सर्व जगाचें हित होईल व जिच्यामध्यें ज्ञानरूप प्रकाशाचेंच प्राधान्य असेल अशी एक दुःखनिवारक देणगी आम्हां मान्यकुळांतील पुरुषांना दे. हे देवाधिदेवा इंद्रा, आम्हांस पूज्य असे इतर देव हे सुद्धां तुझें स्तवन करतात तर तात्काळ फलद्रुप होणारा आणि उत्साहकारक असा तुझा आसरा आम्हांस लाभेल असें कर. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७० ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - बृहती, अनुष्टुप्, त्रिष्टुभ्


न नू॒नमस्ति॒ नो श्वः कस्तद्वे॑द॒ यदद्भु॑ततम् ॥
अ॒न्यस्य॑ चि॒त्तम॒भि सञ्॑च॒रेण्य॑मु॒ताधी॑तं॒ वि न॑श्यति ॥ १ ॥

न नूनं अस्ति नो इति श्वः कः तत् वेद यत् अद्‌भुतम् ।
अन्यस्य चित्तं अभि संऽचरेण्यं उत आऽधीतं वि नश्यति ॥ १ ॥

आज नाही आणि उद्या नाही; मग त्याच्यापुढें काय होणार हें कोणाला माहित ? दुसर्‍याचें मन सुप्रसन्न करून घ्यावयास जावे मात्र, कीं आपल्या मनांतील फिसकटलेच म्हणून समजावें. ॥ १ ॥


किं न॑ इंद्र जिघांससि॒ भ्रात॑रो म॒रुत॒स्तव॑ ॥
तेभिः॑ कल्पस्व साधु॒या मा नः॑ स॒मर॑णे वधीः ॥ २ ॥

किं नः इंद्र जिघांससि भ्रातरः मरुतः तव ।
तेभिः कल्पस्व साधुऽया मा नः संऽअरणे वधीः ॥ २ ॥

हे इंद्रा, आम्हांस मारून टाकण्याचें कां बरें मनांत आणतोस ? मरुत् हे तुझे बंधूच आहेत. तर त्यांच्याविषयीं मनांत प्रेम धर, आणि युद्धांत आमचा नाश करूं नकोस. ॥ २ ॥


किं नो॑ भ्रातरगस्त्य॒ सखा॒ सन्नति॑ मन्यसे ॥
वि॒द्मा हि ते॒ यथा॒ मनो॑ऽ॒स्मभ्य॒मिन्न दि॑त्ससि ॥ ३ ॥

किं नः भ्रातः अगस्त्य सखा सन् अति मन्यसे ।
विद्म हि ते यथा मनोः अस्मभ्यं इत् न दित्ससि ॥ ३ ॥

हे बंधो अगस्त्या, तूं आमचा जिवलग म्हणवितोस आणि आम्हांलाच वगळतोस ? समजले आम्हांला तुझें मन. तुझ्या मनांत आम्हांलाच मात्र कांही एक द्यावयाचें नाहीं. ॥ ३ ॥


अरं॑ कृण्वन्तु॒ वेदिं॒ सम॒ग्निमिं॑धतां पु॒रः ॥
तत्रा॒मृत॑स्य॒ चेत॑नं य॒ज्ञं ते॑ तनवावहै ॥ ४ ॥

अरं कृण्वन्तु वेदिं सं अग्निं इंधतां पुरः ।
तत्र अमृतस्य चेतनं यज्ञं ते तनवावहै ॥ ४ ॥

असे रागावूं नका. हें पहा, वेदी तयार करू द्या, अग्निला समोर प्रज्वलित होऊं द्या कीं प्रत्यक्ष अमरत्वासच चैतन्य आणणारा असा जो हा यज्ञ आम्ही तुझ्या प्रित्यर्थ उभयतां यथासांग करूं. ॥ ४ ॥


त्वमी॑शिषे वसुपते॒ वसू॑नां॒ त्वं मि॒त्राणां॑ मित्रपते॒ धेष्ठः॑ ॥
इंद्र॒ त्वं म॒रुद्‌भिः॒ सं व॑द॒स्वाध॒ प्राशा॑न ऋतु॒था ह॒वींषि॑ ॥ ५ ॥

त्वं ईशिषे वसुऽपते वसूनां त्वं मित्राणां मित्रऽपते धेष्ठः ।
इंद्र त्वं मरुत्ऽभिः सं वदस्व अध प्र अशान ऋतुऽथा हवींषि ॥ ५ ॥

हे सकल सिद्धिंच्या प्रभो इंद्रा, सर्व स्पृहणीय लाभांचा स्वामी तूंच आहेस. हे सर्व मित्रांमध्यें वरिष्ठ अशा इंद्रा, अत्यंत उदार असाहि एक तूंच; तर आतां मरुतांशी तूं प्रेमानें भाषण कर, आणि आम्ही अर्पण केलेले हविर्भाग योग्यवेळीं येऊन ग्रहण कर. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP