॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १ ला

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरवे नमः । श्रीराम समर्थ ॥

जय जय स्वामी सद्‌गुरू । शंकराचार्य करुणाकरू ।
मोक्षश्वजा परपारू । पावी निजदासा ॥ १ ॥
सद्‌गुरू स्वामी श्री शंकराचार्य महाराज, आपण करुणेचे सागरच आहात. आपण मोक्षाची मूर्त ध्वजारूप खूण आहात. आपला जयजयकार असो. आपण आपल्या या सेवकाला भवसागराच्या दुसऱ्या टोकाला नेऊन पोचवावे, अशी आपल्यापाशी विनंती आहे. (१)

मी अज्ञानसागरीं पडिलों । मायाडोहींच सापडलो ।
ममता मगरीने गिळिलों । येधून कष्ट न सुटे ॥ २ ॥
मी अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहे, मायेच्या डोहात सापडलो आहे; ममतारूपी मगरीने (माझेपणाच्या भावनेने) मला गिळून टाकलेले आहे; कितीही कष्ट केले, धडपडलो तरी येथून माझी सुटका होत नाही आहे. (२)

साधनेही उदंड केली । कर्म धर्मादि जी आपुली ।
पीर तीं असती साह्य जाली । अविद्येसी ॥ ३ ॥
मी त्यासाठी अनेक कर्मरूप आणि धार्मिक स्वरूपाची साधने केली, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. उलट ती साधने अज्ञान वाढवण्यासच कारणीभूत झाली. ती अज्ञानालाच उपकारक ठरली. (३)

जप तपादि पुरसरणे । अथवा व्रतें नाना दाने ।
तीर्थयात्रा संतर्पणें । उद्यापने शांति ॥ ४ ॥
त्यांमध्ये जप, तप, पुरश्चरणे यांचा समावेश होता, व्रते होती, निरनिराळ्या दानांचा, तीर्थयात्रांचा, संतर्पणांचा, उद्यापनादी धार्मिक कृत्यांचा, निरनिराळ्या शांतिविधानांचा समावेश होता. (४)

इतुकें ही आदरें करितां । परी उपशम नसेचि चित्ता ।
मात्र अधिकच वाढे अहंता । च्या केले ह्मणोनी ॥ ५ ॥
हे सर्व कर्मकांड मी मोठ्या आदरभावनेने केले, पण माझ्या चित्ताला समाधान लाभले नाही. उलट त्यायोगे 'हे मी केले, हे मी केले' अशाप्रकारचा अहंकारच अधिक वाढला. (५)

मी अमुक येक रविदत्त । माता पिता जें नाम ठेवित ।
हाचि देह मी असें निद्यांत । सर्वदा दृढ ॥ ६ ॥
मी अमुक एक रविदत्त आहे, आईवडिलांनी देहाला जे नाव ठेवले होते तो देह म्हणजेच मी, हे सर्वकाळ माझ्या मनात ठामपणे पक्के बसले होते. (६)

पीर मी पूर्वी असें कवण । जन्मलो आतां आलों कोठोन ।
मरता कोणे स्थळा जाईन । हें नेणें मी सहसा ॥ ७ ॥
पण यापूर्वी मी कोण होतो ? आता जन्माला आलो ते कुठून ? मेल्यानंतर मी कोणत्या ठिकाणी जाईन ? हे मला काहीच माहीत नाही. (७)

परी आपण कोण हें जाणा । ऐसा हेतु उद्भवला जीवे ।
येर साधन जितुकें आघवे । तृणतुल्य जाले ॥ ८ ॥
पण आपण कोण आहोत, हे कळावे. ही इच्छा मनात उत्पन्न झाली. त्यासाठी मी पुष्कळ साधने केली, पण सगळी कस्पटाप्रमाणे ठरून वाया गेली. (त्यांचा काही उपयोग झाला नाही.) (८)

यास्तव देवी देव धुंडिले । अति निग्रहें प्रसन्न झाले ।
तंव ते वर माग म्हणो लागले । देहबुद्धिच बळावया ॥ ९ ॥
यासाठी अनेक देवता, देव यापैकी कोणीतरी आपल्या मदतीला येतील म्हणून त्यांची उपासना केली, त्यांच्यापुढे खूप हट्ट धरला, तेव्हा ते प्रसन्न झाले. मला 'वर माग' असे ते म्हणू लागले. अशा वराने काय होणार ? केवळ देहबुद्धीच बळावणार ! (९)

मग मी सर्वांसी उपेसून । गेलों सदाशिवासी शरण ।
तिही स्वप्नामाजीं येऊन । सांगितले मज ॥ १० ॥
तेव्हा मी त्या सर्व देवदेवतांकडे पाठ फिरवली आणि एका शंकराला शरण गेलो. त्यांनी मला स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला आणि सांगितले, (१०)

कीं उठी उठी गा रविदत्ता । तूं भवभयाची न करी चिंता ।
सद्यरूसी शरण जाई आतां । ममाज्ञेदरुनी ॥ ११ ॥
'रविदत्ता, ऊठ. तू संसारभयाची काळजी करू नकोस. माझी आशा म्हणून तू आता सहुरूंना शरण जा. (११)

प्रस्तुत मीच जगदोद्धारा । प्रगटला असें निर्धारा ।
ऐसिया अज्ञान -कली माझा रा । श्रीशंकर नामे ॥ १२ ॥
सध्याच्या या अज्ञानग्रस्त कलियुगात मीच शंकराचार्य या नावाने प्रगट झालो आहे. (१२)

तस्मात् तया शंकरस्वामीसी । शरण जाऊनि या समयासीं ।
उपदेश धरूनिया मानसी । अज्ञान जिंकी ॥ १३ ॥
तेव्हा तू आता शंकराचार्यांना शरण जा. त्यांनी केलेला उपदेश मनात ठसवून अज्ञानावर मात कर.' (१३)

ऐसिया स्वण्याती जागती । पावोनि विस्मणपन्न जाल चित्तीं ।
मग धावोंनि आलों सत्वर गती । शरण श्रीचरणा ॥ १४ ॥
अशा प्रकारचे ते स्वप्न संपल्यानंतर मी जागा झालो आणि मनामध्ये आश्चर्यचकित झालो. मग वेगाने श्रीगुरूंच्या चरणापाशी धावत आलो. (१४)

आतां सदगुरुराया मज । अंगीकारावे महाराज ।
धन्य धन्य हा सुदिन आज । देखिले चरण ॥ १५ ॥
आणि म्हणालो, सद्‌गुरुराया, आता आपण माझा स्वीकार करावा. महाराज, मी आज आपल्या चरणांचे दर्शन घेऊ शकलो त्याअर्थी आजचा दिवस मोठा भाग्याचा होय. (१५)

हा देह आणि वाणी मन । गुरुचरर्णी केलें अर्पण ।
यांत किमपि जरी घडे प्रतरण । तरी चूर्ण होवो मस्तक ॥ १६ ॥
माझा हा देह आणि मन ही दोन्ही मी सद्‌गुरुचरणांवर अर्पण केली आहेत. यात कणभर देखील प्रतारणा आढळली तर ह्या माझ्या मस्तकाचे चूर्ण होऊन जावो. (१६)

जरी वाणी हे आणिका स्तवी । तरी ते तत्क्षणीं तुटावी ।
चित्ते जरी अन्य कांही आठवी । तरी घडावी ब्रह्महत्या ॥ १७ ॥
जर माझ्या जिभेने सद्‌गुरूंखेरीज अन्य कोणाचे स्तवन केले तर ती तत्क्षणी तुटून जावो; आणि मनाने इतर गोष्टींचे स्मरण केले तर मला ब्रह्महत्या घडो. (१७)

या रीती करूनी निर्धार । साष्टांग घालित नमस्कार ।
तारी तारी हा निज किंकर । स्वकीय ब्रीद रक्षनी ॥ १८ ॥
अशा रीतीने निर्धार करून मी आपणांस साष्टांग नमस्कार घालत आहे. तेव्हा आपण स्वत:च्या ब्रीदाचे रक्षण करून या आपल्या सेवकाचा उद्धार करावा. (१८)

ऐसा अधिकारी पाहूनी । विचारे परीक्षिती अंतःकरणीं ।
हा चतुष्टयसपन्नत्व पावोनी । शरण आला असे ॥ १९ ॥
यावर सद्‌गुरूंनी 'हा अधिकारी दिसतो. हा साधनचतुष्टयसपन्न असून शरण आला आहे,' अशी त्याची मनोमन पारख केली. (१९)

सत्य मिथ्या यासि कळले । ह्यणोनि असत्यासी मन विटले ।
हेचि नित्यानित्य विचारिलें । सत्य कळावे इच्छिता ॥ २० ॥
ब्रह्म जाणावे जे इच्छा होणें । हेचि मुमुशत्वाची लक्षणें ।
आणि इह पर भोगासी उबग । हेचि विरक्ति ॥ २१ ॥
'याला सत्य आणि मिथ्या यांतील भेद कळला आहे; त्यामुळे असत्य अथवा मिथ्या गोष्टींनी याचे मन विटले आहे; त्याने सदसद्विवेक केला आहे; आणि सत्य कळावे अशी इच्छा करता करता त्याला ब्रह्म जाणण्याची इच्छा झाली आहे, हीच मुमुक्षू असण्याची लक्षणे आहेत, आणि ऐहिक आणि पारलौकिक भोगांविषयी त्याच्या मनात उबग निर्माण झालेला आहे. हीच विरक्ती अथवा वैराग्य होय. (२०-२१)

अन्य मनाचे सांडोनि तर्क । आत्मा वोळखून धरावा येक ।
हाचि घाम निश्चयात्मक । इंद्रियनिग्रह तो दम ॥ २२ ॥
मनाच्या इतर तर्कांचा त्याग करून एका आत्म्याची ओळख दृढ धरावी या निश्चयालाच 'शम' असे म्हणतात. आणि इंद्रियांना आवर घालणे यालाच 'दम' असे म्हणतात. (२२)

सर्वांपासून तो परतला । हाचि असे कीं उपरम जाला ।
न भी कदां सुखदुःखाला । हेचि तितिक्षा ॥ २३ ॥
सर्व गोष्टींकडे पाठ वळवून तो या मार्गाकडे आला आहे, त्या अर्थी त्याला उपरम साध्य झालेला आहे; तो आता केव्हाही सुखे अथवा दुःखे यांच्यामुळे भयभीत होणार नाही, यालाच तितिक्षा म्हणतात. (२३)

सदगुरुवचनापरतें कांही । यासि दुजे च उरले नाहीं ।
हे हि श्रद्धा निःसंदेही । समाधान एकाग्रता ॥ २४ ॥
सद्‌गुरुवचनाखेरीज त्याच्या दृष्टीने इतर काही उरलेलेच नाही; हीच श्रद्धा होय, यात काही संशय नाही आणि आपल्या इष्ट ध्येयावर याची एकाग्रता झाली आहे, हेच त्याचे समाधान होय. (२४)

तस्मात् साधन चतुष्टयता । अर्थात् आली याचिया हाता ।
ऐशिया अधिकारिया उपदेशितां । दोष हा कवण ॥ २५ ॥
या सर्व गोष्टींचा विचार करता याच्या ठिकाणी साधनचतुष्टयसंपन्नता बाणली आहे, असे दिसते. तेव्हा अशा अधिकारी व्यक्तीला उपदेश करण्यात कोणता दोष आहे ? (२५)

प्रज्ञा' जरी मंद असे । तरी उपदेशावें सदभ्यासें ।
वृत्ति खलिता दृढ विश्वासे । अपरोक्षता बाणे ॥ २६ ॥
याची बुद्धी जरी मंद असली तरी चांगल्या अभ्यासांची जोड देऊन याला उपदेश करावा त्यानंतर दृढ विश्वास धरून वृत्तीचा खल केल्यावर त्याच्या ठिकाणी अपरोक्षज्ञान बाणेल. (२६)

ऐसा हेत ठेऊनि अंतरीं । उठविती रविदत्ता करी ।
ना भी ना भी बोलती उत्तरी । मनोरथसिद्धि होय ॥ २७ ॥
असा हेतू मनात बाळगून शंकराचार्य स्वामींनी स्वत:च्या हातांनी त्याला उठवले; आणि 'तू भिऊ नकोस, तुझा मनोरथ पूर्ण होईल' असे त्यांनी त्याला आश्वासन दिले. (२७)

परी आह्मी उपदेणूं आतां । तें दृढ विश्वासे धरी चित्ता ।
आणि अभ्यासें हे वृत्ति खलिता । अपरोक्ष पावसी ॥ २८ ॥
ते पुढे म्हणाले, 'पण एक लक्षात ठेव. आम्ही आता तुला जो उपदेश करू तो मनामध्ये, दृढ विश्वास बाळगून धारण कर आणि त्यावर अभ्यासपूर्वक वृत्तीचा खल करशील तेव्हा अपरोक्ष ज्ञानाची तुला प्राप्ती होईल. (२८)

अपरोक्ष ह्मणजे आपण कोण । तें निजरूप अगेचि होणें ।
परोक्ष ह्मणजे आपण । ओळखावे आपणा ॥ २९ ॥
अपरोक्ष ज्ञान म्हणजे आपण खरे कोण आहोत हे परमार्थाने ओळखून आपले निजरूप स्वतःच होऊन जाणे म्हणजे त्याच्याशी अभिन्न होणे. याच्या उलट परोक्ष ज्ञान म्हणजे आपल्या निजरूपाला दुरून जाणणे होय. (२९)

गुरुवचनीं विश्वास । तरी पाविजे परोक्ष ज्ञानास ।
तस्मातू श्रद्धा असावी चित्तास । तरी आल्पत्व ओळखसी ॥ ३० ॥
गुरुवचनावर जर विश्वास असेल तर परोक्ष ज्ञान प्राप्त होते. म्हणून चित्तामध्ये श्रद्धा ठेव. तरच तुला आत्मस्वरूपाची ओळख पटेल. (३०)

मात्र अपरोक्ष ज्ञान व्हाव्या । विचार पाहिजे शिष्यराया ।
तोही अभ्यासें पावेल उद्या । नि: संशय आपणची ॥ ३१ ॥
पण अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी मात्र विचाराची गरज आहे. तोही अभ्यासाने आपोआपच निःसंशयपणे उदयाला येईल. (३१)

प्रस्तुत तुज परोक्ष ज्ञान । उपदेशिजे घे ओळखून ।
तेंचि विश्वासे दृढ करून । अभ्यास करी ॥ ३२ ॥
आता प्रथम तुला परोक्ष ज्ञानाचा उपदेश करतो. तो नीट समजून घे आणि विश्वासाने ते दृढ करून त्याचा अभ्यास कर. (३२)

तूं हेतु धरोनि जो आलासी । कीं जाणावे आप आपणासी ।
तो तूं कोण या समयासीं । बोलिजे अवधारीं ॥ ३३ ॥
आपली आपल्याला ओळख पटावी, हा हेतू मनात धरून तू आलास. तेव्हा तू कोण आहेस हे या प्रसंगी तुला सांगतो, त्याकडे लक्ष देऊन तू ऐक. (३३)

चहे वेदाची वाक्यें चार । याचा अर्थ तो येक साचार ।
कीं जीव ब्रह्म ऐक्य निर्धार । हा विषय वेदांतींचा ॥ ३४ ॥
चार वेदांची चार महावाक्ये आहेत. त्या सर्वांचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे जीव आणि ब्रह्म यामध्ये पूर्ण ऐक्य आहे आणि हाच वेदान्ताचा मुख्य विषय आहे. (३४)

त्यांत उपदेश वाक्य तत्त्वमसि । तें विचारून ध्यावे गुरूपाशीं ।
मग अहंब्रह्मास्मि या वाक्यासी । वृत्तीने दृढ धरावे ॥ ३५ ॥
त्यात 'तत्त्वमसि ' हे (छान्दोग्योपनिषद ६. ८. ७) सामवेदाच्या छान्दोग्य उपनिषदामध्ये आलेले वाक्य आहे. त्यास उपदेश वाक्य असे म्हणतात. या वाक्याचा अर्थ सद्‌गुरूंकडून समजून घ्यावा. त्यानंतर 'अहं ब्रह्मास्मि' (बृहदारण्यकोपनिषद १. ४. १०) ह्या यजुर्वेदाच्या बृहदारण्यकोपनिषद या उपनिषदातील महावाक्याचा वृत्तीने खल करावा आणि ते वाक्य वृत्तीमध्ये पक्के धरावे. (३५)

तरी अवधारीं एकाग्रभावें । तें तूं ब्रह्म असी स्वभावें ।
अहंकारादि देहान्स आधवें । आपण नव्हे सत्य सत्य ॥ ३६ ॥
तर आता मन एकाग्र करून ऐक. तू स्वभावतः ते ब्रह्मच आहेस. अहंकारापासून ते देहापर्यंत जेवढी तत्त्वे आहेत त्यांमध्ये आपण मुळीच नाही आहोत, हे सत्य ध्यानात ठेव. (३६)

मी ब्रह्म आल्या स्वतःसिद्ध । येकरूप असंग अभेद ।
वोळखून घेई प्रमाद । देहबुद्धीचा सांडनी ॥ ३७ ॥
मी ब्रह्म आहे; स्वतःसिद्ध आत्मा आहे. तो मी एकरूप, निःसंग आणि अभिन्न आहे, हे देहबुद्धीचा (मी देह आहे या बुद्धीचा) दोष टाकून देऊन ओळखून घे. (३७)

हेचि अहं ब्रह्मास्मि निश्चिती । वाक्यार्थाची जे अनुभूती ।
ऐशी वृत्ति ते वाक्यवृत्ती । हा वृत्तीली अभ्यास ॥ ३८ ॥
'अहं ब्रह्मास्मि' या वाक्यार्थाचा हाच अनुभवाला येणारा आशय आहे. अशाप्रकारची वृत्ती होणे हीच वाक्यवृत्ती होय. त्या वृत्तीचा अभ्यास (पुन्हा पुन्हा अनुभव) करावा. (३८)

कायिक वाचिक मानसिक । शास्त्रीय अथवा जी लौकिक ।
कर्में घडतांही अनेक । परी अभ्यास सोडू नये ॥ ३९ ॥
आपल्या हातून शारीरिक, वाचिक (बोलण्याने होणारी) मानसिक, शास्त्रविहित (शास्त्रांनी सांगितलेली) अथवा लौकिक (लोकरूढीमुळे करावी लागणारी) अनेक कर्मे होत असतात. पण ही करत असताना सुद्धा वृत्तीचा अभ्यास सोडू नये. (३९)

अभ्यास ह्मणजे मी ब्रह्म आपण । या अर्थाचे अनुसंधान ।
कदापि न पडावे विस्मरण । अहर्निशीं सदा ॥ ४० ॥
अभ्यास म्हणजे 'मी ब्रह्म आहे' या अर्थाचे अनुसंधान ठेवणे होय. ते अनुसंधान अहोरात्र ठेवावयाचे असून त्याचे विस्मरण कधीही होऊ नये. (४०)

तूं ह्मणसी आत्या ब्रह्म पूर्ण । याचें किमात्यक असे लक्षण ।
तें यथार्थ ओळखिल्यावांचून । अनुसंधान केवीं घडे ॥ ४१ ॥
तू म्हणशील की जर आत्मा हाच पूर्ण ब्रह्म आहे, तर त्याचे लक्षण कसे आहे ? ते वास्तव रूपाने कळल्याखेरीज अनुसंधान ठेवणे कसे शक्य होईल ? (४१)

तरी अवधारावे निश्चित । अहंकारादि जितुकें देहांत ।
यांत आत्याही जाला मिश्रित । अज्ञानवसें कडोनी ॥ ४२ ॥
तर आता निश्चयपूर्वक लक्ष देऊन ऐक. अहंकारापासून ते देहापर्यंत जेवढी तत्त्वे असतील, त्या सर्वांमध्ये आत्मा अज्ञानामुळे मिसळलेला आहे. (४२)

यासी विवेचन पाहिजे जाले । देहादि मिथ्यात्व जरी त्यागिले ।
तरी आल्पत्व जाय निवडिलें । त्रिविधा प्रतीतीने ॥ ४३ ॥
याचे नीट विवेचन केले पाहिजे. देह इ. तत्त्वांचा मिथ्या म्हणून त्याग केला, तर आत्म्याचा अनुभव गुरुप्रतीती, आत्मप्रतीती आणि शास्त्रप्रतीती या तिन्ही प्रतीतींच्या निकषाने निवडून घेता येतो. (४३)

तेचि विवेचन ह्मणसी कैसे । बोलिजेत असे अपैसें ।
तरी सावधान असावें मानसे । दुश्चित्त न होतां ॥ ४४ ॥
तेच विवेचन कसे करायचे असे म्हणशील तर ते ओघात आले म्हणून सांगतो. तेव्हा मन इकडे तिकडे भटकू न देता सावधान राहून ऐक. (४४)

जैसा माळेतून तंतू निवडावा । कीं मणीच तंतूवरील जोडावा ।
तैसा देहादिकाहून ओळखावा । आल्या भिन्न ॥ ४५ ॥
ज्याप्रमाणे माळेतील सुताचा धागा शोधून काढायचा झाला तर माळेतील सुताचा धागा ओढावा लागतो किंवा त्या तंतूवरील मणीच बाजूला ओढावा लागतो, त्याप्रमाणे देह इ. तत्त्वांमधून आत्मा भिन्न आहे, हे ओळखावे. (४५)

अथवा देहादिक हे ओळखूनी । भिन्न करावे जात्ययाहूनी ।
हें सर्व कळेल निरूपणी । अती सावधान जरी होसी ॥ ४६ ॥
किंवा देह इ. तत्त्वे ओळखून ती आत्म्याहून भिन्न करावीत. हे सर्व निरूपणाच्या ओघात तुला कळेल. त्यासाठी सावधान होऊन निरूपणाकडे नीट लक्ष दे. '' (४६)

ऐसे बोलतां आचार्य माउली । रविदत्ते वृत्ति सावध केली ।
शब्दासरिसी झेप घाली । मने अर्थावरी ॥ ४७ ॥
आचार्य माउलीने असे म्हटल्याबरोबर रविदत्ताने आपली वृत्ती सावध केली आणि सद्‌गुरूंच्या तोंडून शब्द बाहेर पडताक्षणीच तो मनाने त्यांच्या अर्थावर झेप घालू लागला. (अर्थाकडे लक्ष देऊ लागला). (४७)

रविदत्त येक उपलक्षण । परी जे जे असती अधिकारी पूर्ण ।
तेही असावें सावधान । आचार्य गुरुवचनीं ॥ ४८ ॥
येथे रविदत्त हे एक उपलक्षण (उदाहरण) झाले. परंतु जे जे पूर्ण अधिकारी झाले असतील त्यांनीही आपापल्या गुरूंच्या उपदेशाकडे असेच लक्षपूर्वक ध्यान द्यावे. (अथवा जे अधिकारी असतील त्यांनीही श्री शंकराचार्य रूप गुरूंच्या वचनाकडे लक्ष द्यावे) (४८)

चातकासाठी वर्षे घन । परी सर्वांसीच होय जीवन ।
तेवीं रविदत्ताचे निमित्तेकडोन । सर्वही अवधारा ॥ ४९ ॥
मेघ चातकासाठी वर्षाव करत असतो; परंतु त्या वृष्टीमुळे उपलब्ध झालेले पाणी सर्वांसाठीच असते. त्याप्रमाणे रविदत्ताच्या निमित्ताने निर्माण झालेले हे विवेचन सर्वांनीच लक्षपूर्वक ऐकावे. (४९)

परी भूमीचा सांडून चारा । जो घन लक्षी तो चातक खरा ।
तेवीं देहादि विषय हे अव्हेरा । तेव्हां वचनरहस्थ जोडे ॥ ५० ॥
परंतु पृथ्वीवरील चाऱ्याचा त्याग करून जो मेघाकडेच डोळे लावून असतो, तो खरा चातक पक्षी होय. त्याप्रमाणे अधिकारी श्रोत्यांनो, देह इ. विषयांचा त्याग कराल, तेव्हाच तुम्हांला सद्‌गुरुवचनांचे रहस्य कळेल. (५०)

तस्मात् जयासी खरें सुटावे । वाटे तेणें विषय हे टाकावे ।
तरीच कार्य हें साधावे । श्रवण मननें ॥ ५१ ॥
तेव्हा ज्याला खरेच मुक्त व्हावे असे वाटत असेल त्याने सर्व विषयांचा त्याग करावा. तेव्हाच श्रवण-मनन यांचा उपयोग होऊन त्याचे मुक्त होण्याचे कार्य सिद्धीस जाईल. (५१)

आतां सर्वी सावधान । आचार्य वोळले कृपाघन ।
वाक्यवृत्तीचें निरूपण । रविदत्ता करिती ॥ ५२ ॥
आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. दयाघन आचार्य रविदत्ताकडे वळलेले आहेत आणि ते रविदत्ताला वाक्यवृत्तीचे निरूपण करत आहेत. (५२)

प्रथम घडावे विवेचन । यास्तव देहत्रयाचें कथन ।
कीजे श्लोकार्थी निरूपण । आदरें ऐकावे ॥ ५३ ॥
प्रथम विवेचन करता यावे म्हणून श्लोकाच्या अर्ध्या भागात देहत्रयाचे (तीन देहांचे) निरूपण करत आहेत. ते आदरपूर्वक ऐकावे. (५३)

श्लोक - स्थूलो मांसमयो देहः सूक्ष्मः स्याद्‌वासनामयः ।
ज्ञानकर्मेंद्रियैः सार्धं धी: प्राणौ तच्छरीरगौ ॥ १ ॥
श्लोकार्थ : स्थूल देह मांसमय आहे. (इथे मांसमय म्हणजे मांस, रक्त, अस्थी इ. स्थूल घटक असलेला) सूक्ष्मदेह हा वासनात्मक आहे. त्या शरीराचे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कमेंद्रिये, बुद्धी (इथे मन व बुद्धी असा एकत्रित अर्थ). पाच प्राण अशी सतरा तत्त्वे घटक आहेत. ॥ १ ॥

स्थूल देह मांसमयाचा । सूक्ष्म तोचि वासनाल्पक साचा ।
तेथें प्रकार असे सत्रा तत्वांचा । इंद्रिय प्राणें मन बुद्धी ॥ ५४ ॥
स्थूल देह मांसमय घटकांचा आहे. सूक्ष्मदेह वासनात्मक घटकांचा आहे. पाच कर्मेन्द्रिये, पाच ज्ञानेन्द्रिये, पाच प्राण, मन आणि बुद्धी अशा सतरा तत्त्वांचा हा सूक्ष्मदेह होतो. (५४)

पद ' स्थूलो मांसमयो देह: ।
पदाचा अर्थ दिलेला नाही

स्थूल देह मांसमय कैसा । विस्तार बोलिजे अल्पसा ।
पंचीकृत भूतांचा सहसा । जो का उभारला ॥ ५५ ॥
आता स्थूलदेह मांसमय म्हणजे काय ते थोडा विस्तार करून सांगतो. तो देह पंचीकृत तत्त्वांचा मिळून झाला आहे. (म्हणजे पंचमहाभूतांच्या सरमिसळीतून झाला आहे) (५५)

भूतांपासोनियां जाले । जें का अपंचीकृत पहिलें ।
तेचि एकमेकांसी वांटिले । हेचि पंचीकृत ॥ ५६ ॥
पंचमहाभूतांपासून जी तत्त्वे निर्माण झाली ती प्रथम सुटी, सुटी नि स्वतंत्र होती ती अपंचीकृत तत्त्वे होत. नंतर तीच तत्त्वे प्रत्येकी दोन भागांमध्ये विभागली गेली. नंतर प्रत्येक भूताकडे स्वांशाचा निम्मा भाग ठेवून घेऊन उरलेल्या अर्ध्या भागाचे चार विभाग करून ते अंश बाकीच्या चार भूतांमध्ये वाटून टाकत्यानंतर प्रत्येक भूतामध्ये स्वतःचा अर्धा भाग आणि इतर चार भूतांपासून मिळालेला प्रत्येकी एक अष्टमांश भाग मिळून झालेला अर्धा भाग अशी जी सरमिसळ होते तिला पंचीकृत अवस्था म्हणतात. (५६)

अंतःकरण व्यान श्रवण । वाचा शब्द हें आकाश पूर्ण ।
याचे भाग केले दोन । ईक्षणमात्रे ईश ॥ ५७ ॥
अंतःकरण, व्यान, श्रवण, वाचा, शब्द या घटकांनी आकाश पूर्ण होते. ईश्वराने आपल्या केवळ अवलोकनाने त्याचे दोन भाग केले. (५७)

मुख्य अंतःकरण अर्धभाग । तो आकाशीच ठेवून मग ।
उरत्या अर्धभागाचे विभाग । चतुर्धा केले ॥ ५८ ॥
त्याचा मुख्य अवयव जे अंतःकरण त्याचा अर्धा भाग आकाशातच ठेवून मग उरलेल्या अर्ध्या भागाचे चार विभाग केले (हे चार भाग म्हणजे अंतःकरणाचे प्रत्येकी एक अष्टमांश भाग होत.) (५८)

व्यान झोत वाचा शब्द । हे चहंसी दिधले प्रसिद्ध ।
व्यान वाणूसी दिधला स्तब्ध । श्रोत्र तेजास ॥ ५९ ॥
व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द हे ते आकाशाचे उरलेले चार भाग होत. त्या प्रत्येकाचा एक अष्टमांश भाग इतर भूतांना अनुक्रमाने दिला. व्यान वायूला दिला. श्रोत्र (श्रवणेंद्रिय) तेजाला दिले. (५९)

वाचा दिधली आपासी । शब्द दिधला पृथ्वीसी ।
एव आकाश विभागिले पाचासी । आतां वायु ऐके ॥ ६० ॥
वाचा, आप या तत्त्वाला दिली. शब्द पृथ्वीला दिला अशाप्रकारे आकाशाचे पाच विभाग करून ते पाचही भूतांमध्ये वाह्टून टाकले. आता वायूची वाटणी कशी झाली ते ऐक. (६०)

मन समान त्वचा पाणी । स्पर्श विषय पांचवा मिळूनी ।
वायूच बोलिजे चंचलपणी । हाही द्विधा केला ॥ ६१ ॥
मन, समान, त्वचा, पाणि (हात) आणि पाचवा स्पर्श हे वायूचे भाग होत. कारण या सर्वांत चंचलपणा हा गुण समान आहे. या वायूचे दोन भाग केले. (६१)

एक भाग अर्धा तो समान । हा वापूत मौनेचि ठेवून ।
उरला अर्ध भाग तो विभागून । चतुर्धा केला ॥ ६२ ॥
समान हा वायूचा अर्धा भाग असून तो वायूच्या ठिकाणी मुकाट्याने (मौने) ठेवून उरलेल्या अर्ध्या भागाची विभागणी करून त्याचे चार भाग केले. (६२)

मन दिधले आकाशासी । त्वचा दिधली तेजासी ।
पाणी दिधला आपासी । पृथ्वीसी स्पर्श ॥ ६३ ॥
मन आकाशाला दिले, त्वचा तेजाला दिली, पाणि (हात) आपाला दिला, आणि स्पर्श पृथ्वीला दिला. (६३)

बुद्धि उदान चक्ष पाद । रूप विषय मिळून पंचविध ।
तेजच बोलिजे तें विशद । हेंही द्विभाग केलें ॥ ६४ ॥
बुद्धी, उदान, चक्षू (डोळा), पाद (पाय) आणि रूप हे भाग मिळून तेज बनते. त्याचेही दोन भाग केले. (६४)

एक भागाचा लक्ष तो तेजी । तेजीच ठेविला सहजी ।
अन्य भूतांलागीं विभाजी । उरला अर्ध ॥ ६५ ॥
त्याचा अर्धा अंश असलेला चक्षू तो तेजामधेच ठेवून उरलेला अर्धा भाग इतर भूतांमध्ये विभागून दिला. (६५)

बुद्धि आकाशाली देत । उदान वायूली समर्पित ।
पाव आपासी अर्पित । पृथ्वीसी रूप ॥ ६६ ॥
बुद्धी आकाशाला दिली; उदान, वायूला समर्पण केला, पाय (चरण) आप (पाणी) तत्त्वाला दिला आणि पृथ्वीला रूप हा भाग दिला. (६६)

चित्त प्राण जिव्हा उपस्थ रस । हें पचविध आप सुरस ।
हें द्विविध करूनि ईश । वांटिता हे ॥ ६७ ॥
चित्त, प्राण, जिव्हा, उपस्थ (जननेंद्रिय) आणि रस या विषयांचे मिळून आपतत्त्व बनले आहे. ते रसयुक्त आहे त्याचे ईश्वराने दोन भाग करून सर्व भूतांमध्ये वाटून टाकले. (६७)

येक भाग उपस्थ जापाचे । जापामध्येच ठेविलें साचे ।
येर चार उरल्या भागाचे । वाटी येर चहंसी ॥ ६८ ॥
उपस्थ हा आपतत्त्वाचा अर्धा भाग असून तो आपामधेच ठेवला. बाकीचे चार भाग इतर चार भूतांना वाटून दिले. (६८)

चित्त आकाशा दिधले । प्राणासी वाणूंत ठेविलें ।
तेजासी जिव्हेसी समर्पिले । पृथ्वीली रस ॥ ६९ ॥
चित्त आकाशाला दिले. प्राणाला वायूत ठेविले, तेज या भूताच्या ठिकाणी जिव्हा ठेविली आणि पृथ्वीला रस दिला. (६९)

अहंकार जपान घाण । गुरू गंध हे पांच मिळोन ।
पृथ्वीची असती लक्षणें । हेंही हिविधा केले ॥ ७० ॥
अहंकार, अपान, घ्राण, गुद (मल विसर्जनाचे इंद्रिय) आणि गंध हे पाच भाग मिळून पृथ्वीची लक्षणे होतात. त्यांचेही दोन भाग केले. (७०)

गंध भाग जो कां असे येक । तरे पृथ्वीत ठेवी निश्चयात्मक ।
उरला अर्ध भाग जो आणिक । येर चहंसी वाटी ॥ ७१ ॥
त्यामध्ये गंध हा पृथ्वीचा अर्धा भाग असून तो पृथ्वीतच निश्चयपूर्वक ठेवून दिला. पृथ्वीचा उरलेला अर्धा भाग तो पुन्हा बाकीच्या चार भूतांमध्ये वाटून दिला. (७१)

आकाशा दिधला अहंकार । जपान वापूत ठेवी निर्धार ।
घाण तेजा दिधले साधार । आपासी गुळ ॥ ७२ ॥
अहंकार आकाशाला दिला, अपान हा वायूत ठेवून दिला, घ्राण हे तेजाला दिले आणि आप (पाणी) या भूताला गुद हे इंद्रिय दिले. (७२)

एव एक एक भूत द्विधा केलें । ज्याचे त्यांत येकेक भाग ठेविले ।
येर येकाचे चार चार केले । ते ते दिधले येस फौ ॥ ७३ ॥
अशाप्रकारे एकेक भूत दोन भागांत विभागले. ज्या भूताचा जो भाग होता तो त्यामध्येच ठेवून बाकीच्या भागांचे चार चार भाग करून ते इतर भूतांना वाटून दिले. (७३)

ऐसा भूतकर्दम हा करोनी । स्थूल देहाची केली उभवणी ।
तेच कैसी अल्पवचनी । बोलिजेत आहे ॥ ७४ ॥
असा भूतांचा कर्दम (सरमिसळ) करून स्थूल देहाची उभारणी केली. तीच कशी झाली हे थोडक्या शब्दांत सांगतो. (७४)

शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पांचांचे अंश पंचविध ।
पृथ्वीत मिळता पृथ्वी प्रसिद्ध । स्पष्ट जाली असे ॥ ७५ ॥
वरील पंचीकरणामुळे पृथ्वीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही भूतांचे अंश एकत्र आले. त्यामुळे पृथ्वीचे रूप स्पष्ट झाले. (७५)

हे पांच पृथ्वीसी जेव्हां मिळाले । तेव्हां जडत्वे हे पांच प्रगटले ।
अस्थि मांस त्वचा नाडी रोम जाले । स्थळाचे साहित्य ॥ ७६ ॥
हे पाच घटक जेव्हा पृथ्वीत एकत्र आले तेव्हा ते पाचही घटक जडरूपाने प्रकट झाले. अस्थी, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पाच घटक स्थूलदेहाची सामग्री झाले. (७६)

वाचा पाणी पाव उपस्थ गुद । हे आपी मिळता पांचांचे प्रसिद्ध ।
आप स्पष्ट होऊन सिद्ध । पांच जाले द्रवत्वे ॥ ७७ ॥
वाचा, हात, चरण, जननेंद्रिय, मल विसर्जनाचे इंद्रिय हे आप तत्त्वामध्ये एकत्र येताच आपतत्त्व स्पष्ट रूपात प्रकट झाले आणि पाच प्रकारच्या द्रवांच्या रूपाने सिद्ध झाले. (७७)

शुक्र शोणित लाळ मूत्र स्वेद । हे आपाचे गुण पंचविध ।
प्रगटले असती प्रसिद्ध । पातळपणीं ॥ ७८ ॥
रेत (शुक्र), रक्त (शोणित), लाळ, मूत्र आणि स्वेद (घाम) हे आपतत्त्वाचे पाच प्रकारचे गुण होत. ते पातळ अशा द्रवांच्या रूपाने प्रकट झाले आहेत. (७८)

श्रोत्र त्वचा लक्ष जिव्हा घाण । हे पांचांपासून पांच होऊन ।
तेजामाजी मिळता भासकपण । पांच प्रकार जाले ॥ ७९ ॥
श्रोत्र (कान), त्वचा, चक्षू (डोळे), जिव्हा (जीभ) आणि घ्राण (नाक) हे पाच भूतांपासून निर्माण झालेले भाग तेजामध्ये एकत्र मिसळताच प्रकाशण्याचे (ज्ञान मिळवण्याचे) पाच प्रकार निर्माण झाले. (७९)

क्षुधा तृषा आळस निद्रा मैथुन । हे तेजाचे पांच अंश पूर्ण ।
स्थळी उमटले येऊन । पंचीकरण होतां ॥ ८० ॥
क्षुधा (भूक), तृषा (तहान), आळस, निद्रा आणि मैथुन (स्त्रीपुरुष समागम) हे तेजाचे पाच अंश आहेत. ते पंचीकरण झाल्यानंतर स्थूल देहामध्ये प्रकट झाले. (८०)

व्यान समानोदान प्राणापान । हे पांचांपासून पांच होऊन ।
ते वाणूंत राहिले असतां येऊन । तेणें वायु स्पष्ट जाला ॥ ८१ ॥
व्यान, समान, उदान प्राण, अपान (अधोवायू) हे पाच घटक पाच महाभूतांपासून निर्माण होऊन ते वायूमध्ये येऊन राहिले. त्या योगाने वायुतत्त्वाचे रूप स्पष्ट झाले. (८१)

तेणें पांच प्रकार चळण वळण । प्रसरण आकुंचन निरोधन ।
हे उत्पन्न होती वायूपासून । स्त चळावया ॥ ८२ ॥
त्यामुळे चलन, वलन, प्रसरण, आकुंचन आणि निरोध हे वायूपासून निर्माण झालेले घटक स्थूल देहात प्रकट होताच स्थूलदेहाच्या हालचाली सुरू झाल्या. (८२)

अंतःकरण मन बुद्धि चित्त । अहंकार हे आकाशी रहात ।
परी हे पांचांपासून पांच होत । अपंचीकृत पहिलें ॥ ८३ ॥
अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आकाशात राहिले, पण मुळात ते पाच महाभूतांपासून निर्माण झालेली पाच तत्त्वे होत. ती तत्त्वे अपंचीकृत होती. (८३)

हे पांच आकाशी मिळता क्षणी । या पांचांची जाली उभवणी ।
काम क्रोध लोभ मोहपणी । पाचवे भय ॥ ८४ ॥
हे भाग आकाशात मिळताक्षणीच पुढील पाचांची उभारणी झाली. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह आणि पाचवे भय असे आहेत. (८४)

असो ऐसें पंचीकृत होतां । स्थलाची उभवणी जाली समस्तां ।
हेचि माया देवीने व्यवस्था । ईशसत्ते केली ॥ ८५ ॥
अशाप्रकारे पंचीकृत झाल्याबरोबर सगळ्या स्थूल शरीरांची निर्मिती झाली. ईश्वराच्या अस्तित्वाच्या बळावर मायादेवीने अशीच व्यवस्था केली आहे. (८५)

अस्थिमांसादि पांच मिळोनी । शुक्लितादि मेळविलें पाणी ।
कालवोनि सांदोसांदीं बांधोनी । उभविला गर्भी ॥ ८६ ॥
अस्थि, मास, त्वचा, नाडी आणि रोम असे पाच एकत्र मिळाले, तेव्हा त्यात शुक्र, शोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद असे पाच प्रकारचे पाणी मिसळले आणि कालवून चिखल तयार केला, तो प्रत्येक कानाकोपऱ्यात भरून हा स्थूलदेह गर्भात तयार केला. (८६)

प्राण संचारें वळण वळण । होतां पूर्ण होऊन पावे जन ।
पुढे क्षुधा तृषादिर्के येणे । पोषण होय ॥ ८७ ॥
त्यामध्ये प्राणांचा संचार होताच त्या देहाचे चलनवलन सुरू झाले. अशा तऱ्हेने तो देह पूर्ण होताच मग तो जन्म पावला. पुढे भूक, तहान, इ. मुळे त्याचे पोषण होऊ लागले. (८७)

कामक्रोधादि जेव्हां उमटले । तेव्हां देहाचे रक्षण जाले ।
येणेंपरी स्थळ उभविलें । पंचीकृत भूतांचें ॥ ८८ ॥
काम, क्रोध, लोभ, मोह, भय हे जेव्हा निर्माण झाले तेव्हा या स्थूल देहाचे रक्षण होऊ लागले. अशा प्रकारे पंचीकृत (पंचीकरण झालेल्या भूतांच्या साहाय्याने) स्थूल देहाची उभारणी झाली. (८८)

भूतांपासोनि जाले म्हणोनी । भौतिकत्व नाम या लागोनी ।
परी निर्मित जनक जननी । पासाव पुढे ॥ ८९ ॥
हा देह भूतांपासून निर्माण झाला म्हणून त्यास भौतिक असे म्हणतात. पण याची निर्मिती आई आणि वडील यांच्यापासून नंतर झाली. (८९)

रक्त देत मिळता जठरी । अवयवें ही होती सारी ।
उभयांची सप्तविध जाली परी । ससकोशीक देहा ॥ ९० ॥
स्त्रीच्या जठरामध्ये रक्त आणि रेत यांची मिळणी होताच सर्व अवयवांची निर्मिती झाली. त्याचे सात प्रकार झाले म्हणून या देहाला सप्तकौशिक असे म्हणतात. (९०)

अस्थि नाडी मज्या नख । हे पित्याचे साडेतीन सुरेख ।
मांस त्वचा रक्त केश अशेख । मातेच्या रक्ताचे ॥ ९१ ॥
पित्याच्या वीर्यापासून अस्थी, नाडी, मज्जा आणि नख असे सुरेख अवयव निर्माण झाले. आणि आईच्या रक्तापासून मांस, त्वचा, रक्त आणि केस हे सर्व अवयव निर्माण झाले. (९१)

या रीती हा मांसमय । अन्नापासोनियां होय ।
अज्ञेकडून वाचे उपाय । दुजा असेना ॥ ९२ ॥
अशा रीतीने हा मांसमय देह अन्नापासून निर्माण झाला, अन्नामुळेच तो वाचतो. अन्नावाचून त्याला दुसरा उपाय नाही. (९२)

आणि लय जो होय याचा । तो अन्नरूप पृथ्वीत साचा ।
ह्यणोनि कोश बोलिजे वाचा । अन्नमय शब्दे ॥ ९३ ॥
आणि त्याचा जेव्हा लय होतो तेव्हा अन्नरूप पृथ्वीतच तो होतो. म्हणून त्याला अन्नमय कोश म्हणतात. (उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांत तो अन्नानेच व्यापलेला आहे.) (९३)

असो स्थूलदेह जो ऐसा । आत्या हाचि होईल कैसा ।
पुढे होईल याचिया निरासा । प्रस्तुत जड सांगितला ॥ ९४ ॥
अशा प्रकारचा जो स्थूल देह आहे, तो आत्मा कसा होऊ शकेल ? भविष्यात तो आत्मा होऊ शकेल, या मताचा निरास करण्यासाठी तो देह जड आहे असे म्हटले आहे. (९४)

पद ' सूक्ष्म:स्थाद्वासनामय: ।

पदाचा अर्थ दिलेला नाही

जया वासने स्थल निर्मिला । कीटक कवड्या जेवी केला ।
तया वासनारूप वृत्तीला । लिंगदेह बोलिजे ॥ ९५ ॥
एखाद्या कीटकाने स्वतः राहण्यासाठी ज्याप्रमाणे कवडा निर्माण करावा, त्याप्रमाणे वासनेने या स्थूल देहाची निर्मिती केली. या वासनारूप वृत्तीलाच लिंग देह असे म्हणतात. (९५)

या लिंगदेहीं कोश तीन । प्राण मन आणि विज्ञान ।
या सत्रा तत्त्वांचें निरूपण । पुढे कीजे ॥ ९६ ॥
या लिंगदेहात प्राणमय कोश, मनोमय कोश, आणि विज्ञानमय कोश समाविष्ट आहेत. त्यातील सतरा तत्त्वांचे निरूपण पुढे करण्यात येईलच. (९६)

प्रस्तुत वासनेचे रूप । प्रांजळ कजिताहे अल्प ।
श्रोती सावधान साक्षेप । असिलें पाहिजे ॥ ९७ ॥
सध्या येथे वासनेचे स्वरूप थोडेसे सांगतो. श्रोत्यांनी सावधान होऊन लक्ष द्यावे. (९७)

आकाशी जेवी वायु वळे । तेवीं ब्रह्मी स्फूर्ति चंचळे ।
समष्टितादाज्ये तयेशीं निवळे । माया नाम ॥ ९८ ॥
आकाशात ज्याप्रमाणे वायू वाहू लागतो, त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी चंचल स्फूर्तीचे स्फुरण होते. त्या स्फूर्तीला समष्टितादात्म्यामुळे माया हे नाव दिले आहे. (ब्रह्मामध्ये अशी स्फुरणे अनंत होत असतात. त्या सर्वांना एकरूप मानून माया हे नाव देण्यात येते.) (९८)

तेचि व्यष्टीत विभागली । येका पिंडी तादात्म्य पावली ।
अभिमान माथा घेऊन बैसली । तिही अवस्थांचा ॥ ९९ ॥
तीच माया व्यक्ती-व्यक्तींमध्ये विभागली जाते तेव्हा ती एका पिंडामध्ये तादात्म्य पावते. त्या पिंडाच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा अभिमान ती स्वतःच्या माथ्यावर घेते. (९९)

द अवस्थेंत कर्में घडती । ते व्या केली असती निश्चिती ।
तेचि भोगीन पुढती पुढती । तेचि वासना ॥ १०० ॥
जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थांमध्ये जी कर्मे होतात ती 'मीच केली आहेत, त्यांचीच फळे पुढे भोगावी लागतील' असे जे वाटते, तीच वासना होय (१००)

सुघुसी माजी ही नेणिवेचा । अभिमान घेतला असे साचा ।
अभाव नव्हेचि कर्तुत्वाचा । लीनत्वे जरी ॥ १ ॥
सुषुप्ती (झोपेत) मध्येही ती नेणिवेचा अभिमान घेते. झोपेमध्ये ती वासना विलीन झाली असली तरी तिचा कर्तृत्वाचा अभिमान सुटत नाही. (१०१)

उत्थान होतांच मी देह स्फुरे । व्या अमुक केलें करीन सारे ।
ऐसी अभिमानें जे डुंबरे । तेचि वासना ॥ २ ॥
जागृतीमध्ये तिचे उत्थान होताच मी देह आहे, असे स्फुरण सुरू होते. मी अमुक केले, आणखी खूप सारे करीन अशा अभिमानाने जी गुरगुरते तीच वासना होय. (१०२)

सुधुप्तींत मात्र गुप्त होती । नेणीव गोचर राहे वृत्ति ।
तेथील आठव घेऊन येती । स्फूर्तिउत्थान क लीं ॥ ३ ॥
सुषुप्तीत मात्र ती गुप्त होती. त्यावेळी नेणीवगोचर (नेणिवेच्या स्वरूपात दृश्य असलेली अथवा जाणवणारी) वृत्तीच्या स्वरूपात होती. पण त्या वृत्तीचे जागृतीमध्ये पुन्हा उत्थान होताच त्या नेणिवेची आठवण घेऊन ती येते. (१०३)

तेथें अभाव जरी असतां । तरी उत्थानी प्रास न होता ।
तस्मात् वासनारूपे अहंता । इचा सुघुप्तींत अभाव नाहीं ॥ ४ ॥
सुषुप्तीमध्ये जर तिचा अभाव असता तर उत्थानकाळात त्या अभावाचे स्फुरण तिला झाले नसते. त्यामुळे वासनारूप अहंतेचा सुषुप्तीत अभाव नसतो. (१०४)

हे असो सुघुप्तीची कथा । परी मृत्युकाळीं हानी नोहे सर्वथा ।
सर्वही घेऊन बैसली माथा । अनंत जन्मीचे केलें ॥ ५ ॥
ही सुषुप्तीची गोष्ट राहू द्या, पण मरणकाळी सुद्धा तिचा अभाव होत नाही. मागील अनंत जन्मात त्या जीवाने जे जे केलेले असते ते सगळे आपल्या माथ्यावर घेऊन ती वासना बसलेली असते. (१०५)

जेवी घोकिलें जन्मवरी । न ह्मणतां न विसरे तिळभरी ।
तेवीं वासनेमाजी सामग्री । अनंत जन्मींची असे ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे आयुष्यभर जे घोकलेले असते ते पुढील काळात नको म्हणूनसुद्धा तिळभरही विसरत नाही. त्याप्रमाणे वासनेमध्ये अनंत जन्मातील आठवणींची सामग्री असते. (१०६)

स्वरूपाहून वेगळी पडली । तधींपासून जी जी कर्में केली ।
तीं तीं माथा घेऊन बैसली । तया नांव संचित ॥ ७ ॥
ही वासना स्वरूपापासून जेव्हा वेगळी पडली होती, तेव्हापासून तिने जी जी कर्मे केली असतील ती सर्व आपल्या माथी घेऊन बसते. त्यालाच संचित असे म्हणतात. (१०७)

जोवरी ज्ञान नोव्हे प्रास । तो काळ हें न जळे संचित ।
भोगणेंचि लागे अकस्मात । जें विभागा जे क्षणी ॥ ८ ॥
जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत हे संचित जळून जात नाही. आपल्या वाट्याला जेवढे आले असेल तेवढे जेव्हापर्यंत भोगावे लागणार असेल तेवढे आणि त्या काळापर्यंत भोगणेच प्राप्त आहे. (१०८)

येका देही यात योनीचे । कर्म केलें पापपुण्याचें ।
तितुके येकदाचि भोगा नवचे । येकेक भोगावे लागे ॥ ९ ॥
पूर्वीच्या शंभर जन्मात पापपुण्याची जेवढी कर्मे केली असतील तेवढी सगळी एकाच जन्मात भोगावी लागतात, असे नाही, तर प्रत्येक जन्माचे पापपुण्य वेगवेगळे भोगावे लागते. (१०९)

शतांतील नव्याण्णव राहती । येक योनीसी येक घेऊन येती ।
तेथेही यात योनींची कर्में होतीं । त्यांतील ही येक भोगासी ये ॥ १० ॥
शंभर जन्मातील एका जन्माचे कर्मफल एका जन्मात भोगण्यासाठी वाट्याला येते. बाकीची नव्याण्णव जन्मांची कर्मफले मागे राहतात. आपण जे कर्मफल एका जन्मात भोगत असतो त्या एका जन्मातही शेकडो जन्मांना पुरतील तेवढी कर्मे आपण करत असतो. त्यापैकी एकाच जन्माच्या कर्माचे फळ आपल्याला भोगण्यासाठी वाट्याला येते (११०)

ऐसें अनंत जन्मीचे साचले । भोगा येऊन जे जें उरले ।
तितुके वासनेमाजी गुप्त राहिलें । तया नांव संचित ॥ ११ ॥
अशा प्रकारे अनेक जन्मात जे साचत गेलेले असते त्यापैकी भोगण्यासाठी वाट्याला आलेले भोगून जे शिल्लक राहते, ते सर्व वासनेमध्ये गुप्तपणे राहाते. त्यालाच संचित असे म्हणतात. (१११)

देहा येऊन जें जें करी । तें तें क्रियमाण निर्धारी ।
प्रस्तुत भोगूनियां सारी । तें प्रारब्ध देहारंभका ॥ १२ ॥
एखादा देह स्वीकारल्यानंतर आपण जे जे करतो, त्यास क्रियमाण असे म्हणतात आणि जे कर्मफल भोगून संपवतो त्यास प्रारब्ध कर्म असे म्हणतात. प्रस्तुतच्या देहाला अथवा जन्माला ते कारणीभूत झालेले असते. (११२)

एव प्रारब्ध संचित क्रियमाण । कर्तेपणे बैसलीसे घेऊन ।
हेचि वासना बैसली बळाऊन । अनंत कल्पें जरी जातां ॥ १३ ॥
अशाप्रकारे प्रारब्ध, संचित, अथवा क्रियमाण या सर्व प्रकारच्या कर्मांचे कर्तृत्व स्वत:च्या माथ्यावर घेऊन ही वासना बळावलेली असते. ती अनंत कल्पांपासून दृढमूल झालेली असते. (११३)

कल्पांतींही अभाव नसता । या मृत्यु सुप्तींत कायसी वार्ता ।
एव ऐसी वासनारूप अहंता । इचेचि नाम सूक्ष्म देह ॥ १४ ॥
तिचा कल्पाच्या शेवटी सुद्धा अभाव होत नाही. मग ती झोप अथवा मृत्यू यांमध्ये कशी नष्ट होणार ? अशाप्रकारे ही जी वासनारूप अहंता आहे तिचेच नाव सूक्ष्मदेह असे आहे. (११४)

ऐसिया लिंगदेहावांचून । स्थूळदेहासी कैचे वर्तणें ।
ह्यणोनि वासनायोगे जन्ममरण । प्राणियां होय ॥ १५ ॥
सूक्ष्मदेह म्हणजेच लिंगदेह होय. अशा या लिंगदेहावाचून स्थूल देहाला अस्तित्व कसे येईल ? म्हणून प्राणिमात्राला या वासनेमुळेच जन्म, मरण इ अवस्था प्राप्त होतात. (११५)

पूर्ववासनेनें देह केला । तो प्रारब्ध सरतांचि पुन्हा मेला ।
पुढे दुसरा देह अवलंबिला । मृत्युकाळीं ॥ १६ ॥
पूर्वकालीन वासनेमुळे प्रस्तुतचा देह निर्माण होतो. तो प्रारब्ध संपले की मरण पावतो. मग त्या मृत्यूच्या वेळी तो जीव आणखी दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो. (११६)

अळिका जेर्वी पुढील पाय । धरोनि मागील सोडिती होय ।
तेर्वी पुढील देह धरोनि जाय । हा देह सोडूनी ॥ १७ ॥
अळी पुढील पायांना आधार मिळताच मागील पायांचा आधार सोडते, त्याप्रमाणे हा जीव पुढील देहाचा आधार मिळताच प्रस्तुतचा देह सोडून जातो. (११७)

ऐसे अनंत जन्म नानायोनी । किती जाले कोण वाखाणी ।
पुढे होणार तेंही लेखनीं । नये कवणाच्या ॥ १८ ॥
अशाप्रकारे अनंत जन्म लोटले असतील, निरनिराळे देह धारण करावे लागले असतील, त्यांचे वर्णन कोण करू शकेल ? पुढे किती होतील, हेही कुणाच्याही लेखनात येणार नाही. (कोणीही ते लिहिणार नाही) (११८)

जेधवां आपुले अज्ञान फिटेल । स्वस्वरूप ज्ञान प्राप्त होईल ।
तेधवाचि हे वासना निमेल । येरवी न नासे ॥ १९ ॥
जेव्हा आपले अज्ञान नष्ट होईल, आणि स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होईल, तेव्हाच ही वासना नष्ट होईल. येर्‍हवी ती नष्ट होणार नाही. (११९)

कल्पवरी अग्रींत जळेना । पाणिया माजी विधुरेना ।
बहुत कासयासी वलाना । सहसा योगेही न निमे ॥ २० ॥
संपूर्ण कल्पभर अग्नीत टाकली तरी ती जळणार नाही, पाण्यात ती विरघळणार नाही, जास्त कशाला बोलायला पाहिजे ? हजारो प्रकारच्या योगाभ्यासानेही ती नष्ट होणार नाही. (१२०)

असो ऐसी वासना दृढ । हाचि सूक्ष्म देह वाड ।
वर्तवित असे स्थूळ जड । जो जो प्रास ज्या क्षणी ॥ २१ ॥
तेव्हा हे असू देत. वासना ही अशी दृढ असते. हाच मोठा बळकट असा सूक्ष्म देह होय. ती वासना ज्या ज्या क्षणी जो जो स्थूल देह प्राप्त झालेला असतो त्याला त्याला आपल्या तंत्रानुसार वागायला लावते. (१२१)

ऐसिया लिंगदेहाचे प्रकार । सत्रा भिन्न भिन्न साचार ।
तेचि ऐकावे सविस्तर । बोलिजे असे ॥ २२ ॥
अशा या लिंगदेहाचे सतरा वेगवेगळे प्रकार आहेत. ते आता मी सविस्तर सांगतो. ते ऐका (१२२)

पद : ज्ञानकर्मेंद्रियै सार्धं धी:प्राणौ तच्छरीरगौ ॥ १ ॥ (उत्तरार्ध)
पदाचा अर्थ दिलेला नाही

येका वृत्तीचे प्रकार दोन । येक बुद्धि दुजे मन ।
संकल्प जो होणें । हें मनाचे रूप ॥ २३ ॥
एका वृत्तीचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार बुद्धी हा असून दुसरा मन हा आहे. संकल्प विकल्प करते ते मन होय. (१२३)

पुढे निश्चय करी ते बुद्धि । ऐसे दोन प्रकार जाले आधीं ।
यांत जाणतेपणा जो त्रिशुद्धी । आला असे ॥ २४ ॥
त्यानंतर जी निश्चय करते ती बुद्धी होय. प्रथम हे दोन प्रकार निर्माण झाले. या दोहोंमध्ये जो जाणतेपणा येतो, (१२४)

याचि नावे ज्ञानशक्ति । भोक्ता सत्वगुणाल्पक वृत्ती ।
याचेही प्रकार पांच होती । व्यापारभेदे ॥ २५ ॥
त्याला ज्ञानशक्ती म्हणतात. आता हिलाच भोक्ता सत्त्वगुणात्मक वृत्ती असेही म्हणतात. व्यापारभेदानुसार या सत्त्वगुणात्मक वृत्तीचे पाच प्रकार होतात. (१२५)

श्रोत्रेद्रियासी येऊनी । ऐकूं लागे शब्दालागुनी ।
तयासी श्रोत्र बोलिजे वचनीं । द्वार निर्गमाचे ॥ २६ ॥
ही वृत्ती श्रोत्रेद्रियात (कानात) येऊन शब्द ऐकते. ह्या श्रोत्रेद्रियालाच श्रोत्र असे म्हणतात. हे मन आणि बुद्धी बाहेर पडण्याचे द्वार (मार्ग) आहे. (१२६)

त्वचाद्वारे स्पर्श घेणे । तयासी त्वगिंद्रिय लागणे ।
चक्षद्वारा जया पहाणे । तोचि अधू ॥ २७ ॥
त्वचेच्या मार्गाने स्पर्शाचे ज्ञान होते. तिलाच त्वगिंद्रिय असे म्हणतात. डोळ्यांच्या द्वाराने पाहिले जाते. ते डोळे म्हणजेच चझीरद्रिय होय. (१२७)

जिव्हेद्रिये रस घेणे । सुगंध निवडिजे घाणे ।
एव पांचही बहिःकरणें । मन बुद्धीची ॥ २८ ॥
जिहेट्यिद्रयाच्या मार्गाने रस घेतला जातो. घाणेंद्रियांकडून (नाकाकडून) सुगंध घेतला जातो. अशाप्रकारे मन आणि बुद्धी यांची ही पाच बाह्येन्द्रिये होत. (१२८)

आंतील इंद्रिय अंत करण । ज्ञानेंद्रिया नाम बहिःकरण ।
एव सातही जाली लक्षणें । वृत्तिरूप ज्ञानाची ॥ २९ ॥
मन आणि बुद्धी ही आतील इंद्रिये असत्यामुळे त्यांना अंतःकरण असे म्हणतात ज्ञानेंद्रियांना बहिःकरण असे म्हणतात अशा प्रकारे वृत्तिरूप ज्ञानाची ही सात लक्षणे (अंतःकरणे दोन क बहिःकरणे पाच सात साधने) ठरतात. (१२९)

स्फूर्तीत जाणीव जे होती । तिचे प्रकार बोलिले असती ।
आतां चळणरूप जे जे वावरती । तेचि प्राण ॥ ३० ॥
स्फूर्तीत जी जाणीव असते तिचे हे प्रकार याप्रमाणे सांगितले. आता चंचलपणाने जे वावरतात त्यांना प्राण असे म्हणतात. (१३०)

जाणीव मन बुद्धीकडे गेली । नुसती जडता जे उरली ।
ते नाडीद्वारा फिर लागली । तोचि प्राण ॥ ३१ ॥
स्कूर्तीतील जाणीव मन आणि बुद्धी यांच्याकडे गेली. आता मागे जी केवळ जडता उरली ती नाड्यांमधून फिरू लागली तिलाच प्राण असे म्हणतात. (१३१)

व्यापार भेर्दे तोचि प्राण । पंचधा जाला संपूर्ण ।
व्यान समान उदान प्राण । जपान पांचवा ॥ ३२ ॥
प्राणाचे व्यापारभेदाने पाच प्रकार झाले. ते म्हणजे व्यान, समान, उदान, प्राण आणि पाचवा अपान हे होत. (१३२)

अथो वाहे तो जपान । ऊर्ध्व वाहे तोचि प्राण ।
उभयांची ग्रंथी तो समान । नाभिस्थानीं ॥ ३३ ॥
जो खाली वाहतो तो अपान होय. वरच्या बाजूला जो वाहतो तो प्राण होय. या दोघांचीही नाभिस्थानी (बेंबीच्या ठिकाणी) गाठ पडते. ती गाठ म्हणजेच समान होय. नाभी हे त्याचे स्थान आहे. (१३३)

कंठी उदान रहातसे । व्यान सर्वांगी विलसे ।
या पंचप्राणांच्या सहवासें । कमीद्रया चळण ॥ ३४ ॥
उदान कंठामध्ये राहतो. व्यान सर्व अंगभर वावरतो. या पंचप्राणांच्या सहवासाने कर्मेन्द्रियांची हालचाल शक्य होते. (१३४)

वाचा पाणी आणि पाद । वर्षे उपस्थ पांचवे गुद ।
एव ही कमद्रिये प्रसिद्ध । क्रियारूप प्राणाऐसीं ॥ ३५ ॥
वाचा (वाणी), पाणि (हात), याद (पाय), शिस्त (जननेंद्रिय) आणि पाचवे गुदस्थान अशी ही पाच कर्मेन्द्रिये प्रसिद्ध आहेत. ती पाच आणि प्राण पाच दोन्हीही क्रियारूप आहेत. (१३५)

पाणी पाद उपस्थ गुरू । ही चार तो कर्मेंद्रियें प्रसिद्ध ।
परी वाणी माजी द्विविध । ज्ञानक्रिया असे ॥ ३६ ॥
हात, पाय, शिस्त, गुदद्वार ही चार कर्मेन्द्रिये म्हणून प्रसिद्ध आहेतच, पण वाणीमध्ये दोन प्रकारची ज्ञानक्रिया आहे. (१३६)

वैखरी जे शुद्ध बोलणें । हें तो क्रियारूप होणें ।
मध्यमेमाजी असती लक्षणें । ज्ञान क्रिया दोन्ही ॥ ३७ ॥
परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. त्यापैकी वैखरीच्या द्वारे स्पष्ट बोलण्याची क्रिया होते. ती अर्थात क्रियारूप आहे. मध्यमेमध्ये मात्र ज्ञान आणि क्रिया या दोन्हीची लक्षणे आहेत. (१३७)

परा आणि तुजी पश्यंती । ह्या दोन्ही ज्ञानरूप असती ।
तेथें क्रियेची समासि । असे सहसा ॥ ३८ ॥
धरा आणि पश्यन्ती या दोन्ही ज्ञानरूप आहेत. त्यांच्यामध्ये साधारणपणे क्रियेची समासीच झालेली असते. (१३८)

एव मन बुद्धि ज्ञानेंद्रिय । पंचप्राण कर्मेंद्रिय ।
हा सत्रा तत्वांचा समुदाय । लिंगदेह बोलिजे ॥ ३९ ॥
अशा तऱ्हेने मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिये, पंचप्राण, कर्मेंद्रिये या सतरा तत्त्वांच्या समुदायाला लिंगदेह म्हणतात. (१३९)

इतुकीं सत्रा तत्वे बोलिली । ही सर्व वासनेची विभागली ।
परी ही भूतांपासून जाली । यास्तव भौतिक ॥ ४० ॥
इतकी जी सतरा तत्त्वे सांगितली ती सर्व वासनाच विभागलेली आहे. पण ती सर्व भूतांपासून निर्माण झाली आहेत. म्हणून त्यांना भौतिक असेच म्हणतात. (१४०)

भूतांचे जे गुण तीन । तेच द्रव्यशक्ति क्रिया ज्ञान ।
द्रव्यशक्ति जो तमोगुण । तींच विषय भूतें ॥ ४१ ॥
भूतांचे जे तीन गुण (सत्त्व, रज आणि तम) आहेत, तेच ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती हप्ते द्रव्यशक्ती ही तमोगुणात्मक असून तीच विषय होते. हे विषय भौतिक म्हणजे पंच महाभूतांपासून निमा ? झाले आहेत (१४१)

आतां क्रिया ज्ञान दोन्ही शक्ति । भूतांपासून केवीं होती ।
हेच लिंगदेहाची उत्पत्ति । अपंचीकृत बोलिजे ॥ ४२ ॥
आता क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती भूतांपासून होत नाहीत. म्हणून ही लिगदेहच - अपंचीकृत (पंचीकरण होण्यापूर्वीची) आहे. (१४२)

गुण भूतें कालवली । जे अष्टा बोलिजे पहिली ।
तेचि सत्रा तत्वे प्रसवली । ईक्षणे ईशाचे ॥ ४३ ॥
प्रथम गुण आणि पंचमहाभूते ही परस्परात भिसळत्न ती पहिली अष्टा प्रकृती होय. ईश्वराच्या केवळ ईक्षणाने त्या अष्टधा प्रकृतीने सतरा तत्त्वाना जन्म दिला (१४३)

आकाशाचा सत्व गुण । श्रोत्रेद्रिय जाले निर्माण ।
त्वगिंद्रिय होय उत्पन्न । वायु सत्वांशाचें ॥ ४४ ॥
आकाशाच्या सत्त्वगुणापासून श्रोत्रेद्रियाची निर्मिती झाली. वायूच्या सत्त्वांशापासून त्वगिंद्रिय (त्वचा) निर्माण झाले. (१४४)

अक्ष तेज सत्वांशाचे । जिव्हेंद्रिय तें आपसत्वाचें ।
घाण ते पृथ्वी सत्वांशाचें । ज्ञानेंद्रियें पांच ऐसी ॥ ४५ ॥
तेजाच्या सत्त्वाशापासून चक्षू (डोळे) निर्माण झाले. आपाच्या सत्त्वांशापासून जिव्हेंद्रियाची (जिभेची) निर्मिती झाली. वृद्धीच्या सत्त्वाशापासून घाणेंद्रिया नाकाचीची निर्मिती झाली. अशा तऱ्हेने पाच ज्ञानेंद्रिये निर्माण झाली. (१४५)

पांचापासून पांच वेगळाले । जाले तें असाधारण कार्य बोलिले ।
आतां साधारण कार्य उभवले । भूत सत्वांशाचें ॥ ४६ ॥
पाच भूतापासून पाच ज्ञानेंद्रिये निर्माण झाली हे त्यांचे असाधारण (इतरांचा सहभाग नसलेले) कार्य आहे असे म्हणतात. आता पंचभूतांच्या सत्त्वांशाचे साधारण सर्वच्या सहभागाने झालेले) कार्य निर्माण झाले ते सांगतो. (१४६)

पांचांचे येकदाचि काढिलें । सत्वावो जें कां द्रव्य निघाले ।
तेंचि अंत : करण विभागलें दो प्रकारें ॥ ४५ ॥
पाच भूतांच्या सत्त्वगुणांचा एकत्र करून काढलेला जो अंश होता त्यापासून अंतःकरण निर्माण झाले, ते दोन प्रकारात विभागले गेले. (१४७)

मन बुद्धि प्रकार दोन । व्यापारभेदे अभिधान ।
एव ज्ञानशक्तींचे सप्तधा लक्षण । भूत सत्वांशाचें ॥ ४८ ॥
मन आणि बुद्धी हे ते दोन प्रकार होत. त्याच्या व्यापारातील भेदांवरून त्यांची नावे भिन्न भिन्न झाली आहेत. अशा प्रकारे ज्ञानशक्तीचे भूतांच्या सत्त्वांशापासून झालेले हे सात प्रकार होत. (१४८)

आतां भूतरजांशाची उत्पत्ति । जाली असे ते बोलिजे ती ।
तेही साधार; असाधारण असती । शक्ति क्रियात्मक ॥ ४९ ॥
आता भूतांच्या रजोंशापासून जी उत्पत्ती झाली ते सांगतो. त्यामध्ये देखील शक्ती आणि क्रियानुसार साधारण आणि असाधारण असे दोन प्रकार आहेत. (१४९)

आकाश रजांशाची वाचा । पाणी वायु रजाशाचा ।
पाद तो तेज रजाचा । उपस्थ आप रजा ॥ ५० ॥
आकाशाच्या रजोगुणात्मक अंशापासून वाचा निर्माण झाली. वायूच्या रजोशापासून पाणि (हात). तेज रजोंशापासून पाद (पाय), आपाच्या (जलाच्या) रजोंशापासून उपस्थ शिस्त जननेंद्रिय) अशी कर्मेन्द्रिये निर्माण झाली. (१५०)

पृथ्वी रजा गुद । एव पंचकर्मेंद्रिये प्रसिद्ध ।
हे असाधारण बोलिजे सिद्ध । वेगळालें ह्मणोनि ॥ ५१ ॥
वृद्धीच्या रजोंशापासून गुद (मलविसर्जनाचे इंद्रिय) निर्माण झाले. अशा प्रकारे पाच प्रसिद्ध कर्मेंद्रिये निर्माण झाली. ही त्या भूतांची असाधारण (वैयक्तिक) निर्मिती होय. (१५१)

आतां साधारण रजोभूतांचा । येकदाच काढिला सर्वांचा ।
तोचि प्राण पंचधा साचा । व्यापारभेदे जाला ॥ ५२ ॥
आता भूतांच्या रजोगुणात्मक अंशापासून जी साधारण (एकत्रित) स्वरूपाची निर्मिती म्हणजे प्राण हे तत्त्व होय. तो व्यापारभेदाने पाच प्रकारचा झाला. (१५२)

हृदयी वाहे तो प्राण । तेणें सुख होय जीवालागून ।
विसर्ग करी तो जपान । अधोगामी ॥ ५३ ॥
हृदयामध्ये जो वाहतो तो प्राण होय. त्या योगाने जीवाला सुख होते. जो प्राण खाली वाहत असून तो मलोत्सर्ग करतो. त्याला अयान म्हणतात. (१५३)

समान तो संधी हालवी । उदान तो शत्पान करवी ।
सर्व नाडीद्वारा तुझि द्यावी । वावरून ष्याने ॥ ५४ ॥
समान नाभीच्या ठिकाणी राहून सांध्यांची हालचाल करतो. उदान कंठात राहून क्षुधा (भूक) आणि तृष्णा निर्माण करतो. व्यान सर्वांगात राहून नाडीच्या मार्गाने तृप्ती देतो. (१५४)

एव पंचप्राण कमद्रिय । हा दशधा भूतरजाचा समुदाय ।
पहिले सात मिळून अन्वय । सत्रा तत्वे ॥ ५५ ॥
अशी ही भूतांच्या रजोंशापासून झालेली निर्मिती होय. ती पाच प्राण आणि पाच कर्मेन्द्रिये अशा दहा तत्त्वांचा मिळून झालेला समुदाय आहे. यापूर्वीची सात तत्त्वे मिळून ही सतरा तत्त्वे होतात. (१५५)

ऐसें हे भूतांपासून जाले । अपंचीकृत भौतिक पहिलें ।
पुढें पंचीकृत करून जें निर्मिले । स्त देहासी ॥ ५६ ॥
अशा प्रकारे पंच महाभूतांपासून निर्माण झालेली अपंचीकृत स्वरूपाची ही पहिली भौतिक सृष्टी आहे. हा रूम देह होय. तो अपंचीकृत अवस्थेतला आहे. या भूतांचे पंचीकरण होऊन स्थूल देह निर्माण झाला. (१५६)

तया स्थूळदेहामाझारी । सत्रा येऊन राहिली सारी ।
मन प्राण हे राहती अंतरीं । गोलकीं दशेंद्रिये ॥ ५७ ॥
त्या स्थूल देहामध्ये लिंग देहाची सर्व सतरा तत्त्वे येऊन राहिली. मन, बुद्धी आणि पंच प्राण हे त्या देहाच्या अंतर्भागात राहतात आणि पाच कर्मेन्हिये आणि पाच ज्ञानेन्द्रिये ही त्यांच्या त्यांच्या गोलकात राहतात (१५७)

इतुकीं मिळून येक वासना । विभागली ते बोलिली वचना ।
व्यापार याचे ते वर्णना । पुढे करणें ॥ ५८ ॥
या सर्व सतरा तत्त्वांची मिळून एक वासना तयार होते. त्यांची विभागणी वर सांगितली आहे. आता यापुढे त्यांच्या व्यापारांचे वर्णन करावयाचे आहे. (१५८)

असो वासना तिकडे सत्रा जाती । झोपेत तरी गुप्त राहती ।
जडत्वे प्राण मात्र वावरती । क्रियेवांचून ॥ ५९ ॥
वासना जिकडे जाते तिकडे ही सतरा तत्त्वे जातात. झोपेत ती गुप राहतात प्राण मात्र जड असत्यामुळे कोणतीही क्रिया न करता वावरत असतात. (१५९)

जेव्हां प्राण प्रयाणसमय । तेव्हां वासना जो जो धरी काय ।
ते समयी हा सर्व समुदाय । जाय तिकडे तिकडे ॥ ६० ॥
जेव्हा प्राण जाण्याचा काळ येतो तेव्हा वासना ज्या शरीराचा आधार घेते त्या शरीराकडे हा सर्व सतरा तत्त्वांचा समुदाय जातो. (१६०)

देहांत प्राण जेव्हां प्रगटती । मन बुद्धि तेथें उमटती ।
आणि इद्रियेही वावरती । स्वस्वव्य पार्टी ॥ ६१ ॥
त्या देहात प्राणतत्त्व प्रकट झाल्याबरोबर तेथे मन आणि बुद्धीही प्रकट होतात आणि दहा इंद्रियेही आपआपले व्यापार करत तेथे वावरू लागतात. (१६१)

म्हणोनि ज्ञान कर्मेंद्रियासहित । प्राण मन बुद्धि विख्यात ।
हे लिंगदेहग सर्व असत । वासना तिकडे सत्रा ॥ ६२ ॥
म्हणून ज्ञानेंद्रिये, कमेंद्रिये, पंचप्राण आणि मन व बुद्धी ही तत्त्वे लिंगदेहाबरोबरच जाणारी असतात. जिकडे वासना तिकडे ही सतरा तत्त्वे असतातच. (१६२)

एव स्थूळ सूक्ष्म देह दोन । यांचें केलें निरूपण ।
आतां तिसरे याचें कारण । शरीर केवीं ते बोलिजे ॥ ६३ ॥
अशा तऱ्हेने स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांचे निरूपण केले. आता या सर्व समूहाचे जे मूळ कारण शरीर त्याचे स्वरूप सांगू (१६३)

GO TOP