|
श्रीमद् भगवद्गीता दैवासुर संपत्ति विभाग योगः १ दैवासुर संपत्तीचे गुण व फल. नवव्या अध्यायांत प्राण्यांची दैवी, आसुरी व राक्षसी अशी त्रिविध प्रकृति सुचविली. तिचे विस्ताराने स्वरूपप्रदर्शन करण्यासाठी ‘अभयं सत्वसंशुद्धिः’ इत्यादि अध्याय आरंभिला जातो. त्यांतील दैवी प्रकृति संसारांतून मुक्त होण्यास आणि राक्षसी व आसुरी प्रकृति अत्यंत बंधास कारण होते. यास्तव दैवी प्रकृतीचे ग्रहण करण्यासाठी व दुसर्या दोन प्रकृतींचे परिवर्जन करण्यासाठी येथे त्यांचे स्वरूपप्रदर्शन केले आहे.
श्रीभगवानुवाच - अन्वय :
व्याख्या : श्रीः । पूर्वाध्यायारंभे ’ऊर्ध्वमूलमधःशाखामश्वत्थं’ इति संसारवृक्षो वर्णितः । दैवासुरसंपद्धेतुकयोः मोक्षसंसारवृक्षयोः क्रमेण उपादानहान (ग्रहणनाशन) नियमार्थं षोडशारंभ । तत्र तावत् महाफलत्वेन अभिमतां दैवीं संपदं आह । अभयमिति । हे भारत ! यथा राजानं अनुवर्त्तमानस्य पुंसः तत्परिचारकाः राजसेवकाः आनुकूल्यत्वेन वर्तंते । तथा दैवीं देवस्य स्वयंप्रकाशस्य इयं दैवी तां दैवीं संपदं संपादनहेतुभूतां शुद्धसात्त्विकवृत्तिं अभिजातस्य रेतसः सेककाले जननीजनकशुद्धसत्त्ववृत्तिं अनुलक्षेण उत्पन्नस्य स्वजन्मांतरशुद्धविद्यादि संस्कारं अभिजातस्य एतानि अभयादिनि षड्विंशतिलक्षणानि अनायासेन भवंति इति तृतीयेनान्वयः । एतानि कानि । अभयं न विद्यते भयं यस्य तत् अभयं साधारणतया लौकिके कर्मणि वा वैदिके कर्मणि यथावत् यथाशास्त्रं क्रियमाणे सति भयाभावः । चेत्यपरं सत्त्वसंशुद्धिः सत्त्वस्य अंतःकरणस्य संशुद्धिः असत्पथविमुखता चेत्यपरं ज्ञानयोगव्यवस्थितिः ज्ञानस्य आत्मज्ञानस्य योगः प्राप्तिः ज्ञानयोगः ज्ञानयोगो व्यवस्थितिः परिनिष्ठता ज्ञानयोगव्यवस्थितिः चेत्यपरं दानं दीयते तत् दानं प्राप्तस्य द्रव्यादेः यथासंविभागेन त्यागः किंच सर्वभूतानां अभयदानं किंच स्वभोज्यस्य अन्नादेः यथोचितसंविभागः चेत्यपरं दमः इंद्रियाणि दमयतीति दमः निषिद्धविषयेभ्यः बाह्येंद्रियाणां उपरमः चेत्यपरं यज्ञः यथाधिकारं प्राप्तं स्वधर्मानुष्ठानं किंच यथाधिकारं दर्शपूर्णमासादिः चेत्यपरं स्वाध्यायः ब्रह्मयज्ञादिः चेत्यपरं तपः कृच्छ्रचांद्रायणादि किंच मनसः इंद्रियाणां ऐकाग्र्यं चेत्यपरं आर्जवं ऋजोर्भावः आर्जवं अवक्रता किंच अंतर्बहिः कापट्यव्यवहाराभावः ॥ १ ॥ अर्थ : भगवान् म्हणाले - शास्त्राने उपदेशिलेल्या अर्थाचे निर्भयपणे - निःशंकपणे अनुष्ठान करणे, चित्ताची अतिशय शुद्धि - कपटादिकांचा त्याग करून शुद्ध भावाने व्यवहार करणे, ज्ञान व योग यांतील तन्निष्ठता, यथाशक्ति अन्नादिक वाटणे, बाह्य इंद्रियांचा निग्रह, श्रौत अग्निहोत्र व स्मार्त देवयज्ञ, ऋग्वेदादिकांचे पुण्यासाठी अध्ययन, कायिक, वाचिक व मानसिक तप, अंतःकरणाचा सरळपणा, प्राण्यांना पीडा न देणे, अप्रिय व अनृत वर्ज करून सत्य भाषण करणे, क्रोध आला असतांहि त्याला शांत करणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, एखाद्याची गुप्त गोष्ट दुसर्याला न सांगणे, दुःखी जीवांवर कृपा करणे, विषय अमीप असले तरी इंद्रियांचे विकारराहित्य, मृदुत्व, अकार्याविषयी लोकलज्जा, कारणावांचून हात - पाय इत्यादिकांचा व्यापार न करणे, प्रगरुभता, विशिष्ट सामर्थ्य - धीटपणा, कोणी कांही अपराध केला असतांहि मनांत विकार उत्पन्न होऊ न देणे, शरीर, इंद्रिये, इत्यादिकांना उत्साह देणारे धैर्य, बाह्य व आंतर शुद्धि, दुसर्यांना मारण्याची इच्छा न करणे, अतिशय मानित्व धारण न करणे, हे गुण अर्जुना, दैवी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषामध्ये असतात. [ यांतील अभय, चित्ताची शुद्धि व ज्ञानयोगव्यवस्थिति हे दैवी संपत्तीचे मुख्य गुण आहेत व दानादि पुढील तेवीस गुण सर्व साधारण दैवी संपत्तीचे आहेत. देवांच्या संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषांमध्ये ते दिसून येतात. पुढे ज्याचे कल्याण व्हावयाचे असते, त्याचीच ही विशेषणे आहेत. ] विवरण :
दंभो दर्पोऽतिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अन्वय : व्याख्या : एकस्मिन्नेव मूले दैवासुरसंपद्विभागेन द्विरूपो वृक्षो विरोहति इति उक्तम् । तत्र दैवीसंपद्रूपः वृक्षभेदः निरूपितः । इदानीं अपरं भेदं सूत्रप्रायं अनुवदति । दंभ इति । हे पार्थ ! आसुरीं असुषु इंद्रियेषु प्राणेषु विषयसुखलाभाय रमंति ते असुराः असुराणां इयं आसुरी तां आसुरीं संपदं असुरयोनिप्राप्तिहेतुभूतां अभिजातस्य अनुलक्ष्य उत्पन्नस्य एतानि दंभादीनि चिह्नानि भवंति इति शेषः । एतानि कानि । दंभः धर्मध्वजित्वं चेत्यपरं दर्पः धनविद्यादिनिमित्तेन परावमानहेतुः चेत्यपरं अभिमानः अहमेव ज्ञानी धार्मिकः अहमेव दानशूरः इति अभिनिवेशः चेत्यपरं क्रोधः उक्तलक्षणः प्रसिद्धः च पारुष्यं मनोवाक्कायैः सर्वकाठिन्यं च अज्ञानं कार्याकार्याविवेकः एतानि असुरसंपच्चिह्नानि सूत्रप्रायाणि कथितानि ॥ ४ ॥ अर्थ : अर्जुना, आतां आसुरी संपत्तीचे गुण तुला सांगतो. आसुरी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषामध्ये पुढील गुण दिसतात. ‘ मी मोठा धार्मिक आहे ’ असे बाह्य वेष व आचार यांवरून लोकांस भासविणे, हा दंभ; पुष्कळ धन असणे, किंवा पिता, बंधु इत्यादि आप्त मोठा अधिकारी - राजाप्रभृति असणे, यामुळे सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जो मद उत्पन्न होतो, तो दर्प होय; अशा दर्पाने युक्त असलेला पुरुष मोठमोठ्या विद्वान् व शीलसंपन्न पुरुषांचाहि धिक्कार करतो. त्याचप्रमाणे ‘ मी उत्कृष्ट आहे ’ असे मानणे, कोप, कठोर - मर्मभेदक शब्द बोलणे, जसे कुरूपाला सुस्वरूप, हीनाला उत्तम, आंधळ्याला डोळस, इत्यादि म्हणणे व कर्तव्याकर्तव्याविषयीचे अविवेकज्ञानमिथ्याप्रत्यय; हे पांच गुण राजस पुरुषांमध्ये मुख्यतः असतात. विवरण :
दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरीमता । अन्वय : व्याख्या : ननु-एकमूलकः वृक्षः एक एव भवतु कथं तद्वैविध्यम् ? इत्याशंक्य फभेदात् वृक्षभेदः इति न्यायेन फलभेदं दर्शयति । दैविति । दैवी संपत् विमोक्षाय मुक्तये मता मम चेत्यपरं सर्वेषां संमता अस्ति । चेत्यपरं आसुरी संपत् निबंधाय नितरां बंधः निबंधः तस्मै निबंधाय अपारसंसारप्राप्तये मता मम च सर्वेषां संमता अस्ति । एवं आसुरी संपत् निबंधाय ममेति श्रुत्वा इंद्रियलालनात् आसुरत्वं अस्माकं राज्ञां नितरां अस्तीति व्याकुलितांतःकरणं अर्जुनं ज्ञात्वा मन्निकटवर्तित्वेन हेतुना त्वं दैवी संपदं अभिजातोस्मि इति विश्वासं कुरु इति अभिप्रायेणाह । हे पांडव ! त्वं दैवीसंपदं अभिजातोसि । त्वं मां निरंतरत्वेन सर्वदा वर्तसे अनेनैव आत्मानं दैवी संपदं अनुलक्ष्य जातोस्मीति मन्यमानः सन् मा शुचः शोकं मा कार्षीः ॥ ५ ॥ अर्थ : आतां मी दोन संपत्तीचे कार्य - फल सांगतो. यांतील देवांची संपत्ति संसारबंधापासून विशेषेकरून मुक्त होण्यासाठी आहे आणि आसुरांची संपत्ति नियत बंधासाठी आहे, असे मानलेले आहे. अर्जुना, तू शोक करू नकोस. तू दैवी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झाला आहेस. [ पुढे तुझे अतिशय कल्याण होणार आहे. दयाशून्य राक्षसांची जी तिसरी प्रकृति तिचा आसुरी प्रकृतीतच अंतर्भाव होतो. ] विवरण :
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च । अन्वय : व्याख्या : उक्तं संसारभेदं अनूद्य विस्तरेण उक्तं दैवीसंपद्विभागं उपसंहृत्य असुरसंपद्विभागं विस्तरेण त्यागाय मत्तः शृणु इति आह । द्वाविति । हे पार्थ ! हे अर्जुन ! अस्मिन् प्रत्यक्षत्वेन वर्तमाने श्रुतदृष्टे लोके लोक्यत इति लोकः तस्मिन् लोके भूर्भुवःस्वरात्मकलोके द्वावेव द्विसंख्याकावेव भूतसर्गौ सृज्येत इति सर्गौ भूतानां प्राणिमात्राणां सर्गौ जन्मप्रकारौ स्तः इति शेषः । द्वौ कौ दैवः दैवसर्गः चेत्यपरं आसुरः आसुरवर्गः । हे पार्थ ! मया दैव सर्गः ’अभयं सत्त्वसंशुद्धिः’ इत्यादिना विस्तरशः विस्तरेण प्रोक्तः कथितः । इदानीं त्वं सूत्रप्रायस्य ’दंभो दर्प’ इत्यादिना उक्तस्य वृत्तिस्थानीयं आसुरं आसुरसर्गं विस्तरशः विस्तरेण मे मत्तः शृणु ॥ ६ ॥ अर्थ : हे पार्था, राक्षसी प्रकृतीचा आसुरी प्रकृतीतच अंतर्भाव होत असल्यामुळे या लोकी मनुष्यांचे दैव व आसुर असे दोनच सर्ग आहेत. त्यांतील दैवभूत सर्ग १-३ श्लोकांत सविस्तर सांगितला. तो सर्वथा ग्राह्य आहे. आतां तू मजपासून सर्वथा त्याज्य असलेला असुरांचा सर्ग ऐक. आतां या अध्यायाच्या परिसमाप्तीपर्यंत आसुरी संपत् प्राण्यांच्या विशेषणत्वाने प्रदर्शित केली जाते. कारण आसुरी संपत्ति कोणती, हे प्रत्यक्ष कळले, म्हणजे तिला वर्ज्य करतां येते, म्हणून तिचा येथे विस्तार केला आहे. विवरण : २ आसुर संपत्तीचे सविस्तर वर्णन.
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः । अन्वय : व्याख्या : तमेव आसुरविस्तरं ’प्रवृत्तिमित्यादिना’ प्रद्विषंतोऽभ्यसूयका’ इत्यंतेन ग्रंथेन अनुवदति द्वादशभिः लोकैः प्रवृत्तिमिति असुरां जनाः प्रवृत्तिः धर्मे प्रवर्तनं चेत्यपरं निवृत्तिं अधर्मात् निवर्तनं न विदुः न जानंति । अतः हेतोः तेषु असुरस्वभावेषु जनेषु शौचं प्रवृत्तिनिवृत्तिशौचाचारः न विद्यते नास्ति । चेत्यपरं सत्यं यथार्थभाषणं न विद्यते चेत्यपरं तेषु असुरेषु आचारः शास्त्रप्रणीतः धर्मः न विद्यते नास्ति ॥ ७ ॥ अर्थ : आसुरी प्रकृतीचे जन प्रवृत्ति कोठे करावी व निवृत्त कशापासून व्हावे ते जाणत नाहीत. त्यांना पुरुषार्थाच्या विहित साधनानुष्ठानांत प्रवृत्त व्हावे व निषिद्ध संसारसाधनानुष्ठानापासून निवृत्त व्हावे, हे कळत नाही. त्यांच्या ठिकाणी पूर्वोक्त द्विविध शौच नसते, सदाचार नसतो व सत्यहि नसते. [ आसुर जन अशुचि, दुराचरणी, मायावी - कपटी, असत्य भाषण करणारे असतात, हे प्रसिद्ध आहे. ] विवरण :
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् । अन्वय : व्याख्या : तेषु सत्याचारौ न स्तः इति उक्तं प्रपंचयति । असत्यमिति । असुराः जगत् प्राणिजातं असत्यं नास्ति सत्यं वेदपुराणादिप्रमाणं यस्मिन् तत् असत्यं आहुः वदंति । वेदादीनां प्रामाण्यं न मन्यंते इत्यर्थः । तदुक्तम् । ’त्रयो वेदस्य कर्तारो मुनिभंडनिशाचराः’ । अत एव अप्रतिष्ठं नास्ति प्रतिष्ठा धर्माधर्मरूपा व्यवस्था यस्य तत् अप्रतिष्ठं स्वाभाविकं जगत् आहुः वदंति । अत एव अनीश्वरं नास्ति ईश्वरः कर्ता व्यवस्थापकः यस्य तत् अनीश्वरं जगत् आहुः । तर्हि कुतोस्य जगतः उत्पत्तिं वदंति ? इति आह । कथंभूतं जगत् । अपरस्परसंभूतं अपरश्च परश्च इति अपरस्परं अपरस्परतः स्त्रीपुरुषमिथुनात् संभूतं उत्पन्नं अपरस्परसंभूतम् । पुनः कथंभूतम् । कामहैतुकं कामः हेतुः यस्य तत् कामहेतुकं कामहेतुकमेव कामहैतुकं स्त्रीपुरुषयोः कामप्रवाहकारणं अन्यत् किम् ? न किमस्य कामं विना जन्महेतुरित्यर्थः ॥ ८ ॥ अर्थ : ते आसुरी जन जसे असत्यप्रचुर - आम्हांमध्ये असत्य फार व सत्य थोडे, तसे हे सर्व जगत् असत्यप्रचुर आहे. आम्हांप्रमाणेच ते खोटे आहे. त्याला धर्माधर्मादिकांची कांही प्रतिष्ठा नाही. तसेच धर्म व अधर्म यांची ज्याला विशेष अपेक्षा आहे, असा याचा शास्ता ईश्वरहि नाही. यास्तव ते ईश्वररहित आहे, असे म्हणतात. ‘ तर मग जगाची उत्पत्ति कशी होते ?’ म्हणून विचाराल तर ते म्हणतात, कामाने प्रेरित झालेली स्त्री व पुरुष यांच्या अन्योन्य संयोगापासून सर्व जगत् उत्पन्न झाले आहे. जगाचे ‘अदृष्ट’ या नावाचे धर्माधर्मादि दुसरे काय कारण असणार ? कांही नाही. कामच प्राण्यांच्या उत्पत्तीचे कारण आहे, असे सांगतात. विवरण :
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः । अन्वय : व्याख्या : एतामिति । किंच आसुराः असुरस्वभावाः जनाः एतां मिथ्याभूतं दृष्टिं दर्शनं अवष्टभ्य आश्रित्य नष्टात्मानः संतः शून्यवादाभिनिवेशेन शून्यसाक्षिणं आत्मानं नष्टयंति नाशयंति ते नष्टात्मानः मलिनचित्ताः संतः । ननु- एतादृशास्ते किमर्थं उत्पद्यंते इत्यत ? आह । उग्रकर्माणः उग्रं स्वात्महिंस्त्रं कर्म येषां ते उग्रकर्माणः भूत्वा जगतः क्षयाय नाशाय प्रभवंति उत्पद्यंते । ननु अकारणं वैरिणः जगतः ते कथं । इत्याशंक्य यत्र आत्महिंसां कुर्वंति तत्र परहिंसायां का शंका इत्याभिप्रायेणाह । कथंभूता असुराः । अहिताः न विद्यते हितं येषां ते अहिताः स्वमरणं पुरस्कृत्य आत्मवधे प्रवृत्ताः अत एव अल्पबुद्धयः अल्पा बुद्धिर्येषां ते अल्पबुद्धयः स्ववधे शत्रुत्वेन वर्तंते । जगतः क्षये तेषां का शंका ? इत्यर्थः ॥ ९ ॥ अर्थ : पण हे अर्जुना, या नास्तिक दृष्टीचा आश्रय करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे, जे परलोकाच्या साधनापासून विशेषेकरून भ्रष्ट झाले आहेत, ज्यांची बुद्धि अल्पविषयांविषयीच् असते, असे ते क्रूर कर्मे करणारे, हिंसा स्वभावाचे जगाचे शत्रु सर्व प्राण्यांच्या क्षयासाठीच उत्पन्न होतात. विवरण :
काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः । अन्वय : व्याख्या : काममिति । किंच असुराः जनाः दुष्पूरं त्रैलोक्यमपि दुःखेन कष्टेन पूरयितुं अशक्यः दुष्पूरः तं दुष्पूरं कामं अभिलाषापरपर्यायं आश्रित्य अवलंब्य दंभमानमदान्विताः संतः दंभश्च कुमारभृगुवसिष्ठप्रवृत्तधर्मं स्वस्मिन् संभाव्य बाह्यरंगाविर्भावरूपः धर्मध्वजः मानश्च अहं धर्मवान् इति अभिमानः दंभमानौ दंभमानाभ्यां मदः कार्याकार्यविवेकः दंभमानमदः दंभमानमदेन अन्विताः युक्ताः दंभमानमदान्विताः मोहात् दंभमानमदमोहात् असद्वाहान् असत्सु जारणमारणादिषु ग्राहाः आग्रहाः असद्वाहाः तान् असद्वाहान् गृहीत्वा स्वीकृत्य प्रवर्तंते परमपुरुषार्थत्वेन लोके वर्तनं कुर्वंति । कथंभूताः असुराः । अशुचिव्रताः अशुचीनि मद्यमांसादीनि व्रतानि देवतापूजानियमाः येषां ते अशुचिव्रताः ॥ १० ॥ अर्थ : ज्याची पूर्ति - तृप्ति होणे अशक्य आहे, अशा कामाचा आश्रय करून ते दंभ, मान व मद यांनी युक्त होत्साते अविवेकामुळे अशुभ निश्चय करून घेऊन तदनुसार जगातील व्यवहार करितात. त्यांची व्रते अशुचि असतात. विवरण :
चिंतामपरिमेयां च प्रलयांतामुपाश्रिताः । अन्वय : व्याख्या : चिंतामिति । किंच कथंभूताः असुराः अपरिमेयां परिमातुं अशक्या अपरिमेया तां अपरिमेयां अपरिमितां चिंतां इदं कृत्वा इदं करिष्यामि इदं कथं भविष्यति इत्यादिरूपां अंतःकरणप्रवृत्तिं उपाश्रिताः आश्रित्य स्थिताः । पुनः कथंभूताः असुराः । कामोपभोगपरमाः काम्यंते इष्यंति इति कामाः शब्दादिविषयाः कामानां उपभोगः प्रीत्या सेवनं कामोपभोगः कामोपभोग एव परमः परमपुरुषार्थः येषां ते कामोपभोगपरमाः । कामोपभोगपरमत्त्वं तेषामेव दर्शयति । पुनः कथंभूताः । एतावत् कामोपभोग एव पुरुषार्थः नान्यत्किमपि जन्मसाफल्यं इति एवं प्रकारेण निश्चिताः निश्चयः संजातो येषां ते निश्चिताः निश्चयवंतः । कथंभूतां चिन्ताम् । प्रलयान्तां प्रलय एव मरणमेव अंतः पर्यवसानं यस्याः सा प्रलयान्ता तां प्रलयान्ताम् ॥ ११ ॥ अर्थ : ते आसुर लोक जिचे प्रमाण - इयत्ता कळत नाही, अशा मरणापर्यंत टिकणार्या - मरणानेच संपणार्या चिंतेचा आश्रय केलेले असतात. शब्दादि विषयांचा उपभोग घेण्यामध्येच तत्पर असलेले ते, विषयोपभोग घेणे हाच काय तो परम पुरुषार्थ आहे, असा निश्चय केलेले असतात. [ ते योगक्षेमांच्या उपायांची मरेपर्यंत चिंता वहातात. चिंतेचे विषय असंख्य असल्यामुळे ती अपरिमेय असते. विषयोपभोग हेच कायते सुख. या पलीकडे पारलौकिक सुखादि काही नाही, असा त्यांचा निश्रय झालेला असतो. ] विवरण :
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः । अन्वय : व्याख्या : आशापाशशतैरिति । किंच असुरजनाः इति शेषः । कामभोगार्थं कामानां ईप्सितकामानां भोगः विषयसेवनं कामभोगः कामभोगाय इति कामभोगार्थं अन्यायेन चौर्यादिना अर्थसंचयान् अर्थानां द्रव्याणां संचयाः राशयः अर्थसंचयाः तान् अर्थसंचयान् ईहंते इच्छंति । कुर्वंतीत्यर्थः । कथंभूताः असुरजनाः । आशापाशशतैः आशा एव सदसत्पदार्थलिप्सा एव पाशाः बंधनरज्जवः आशापाशाः आशापाशानां शतानि अनेकानि आशापाशशतानि तैः आशापाशशतैः बद्धाः पाशिताः । पुनः कथंभूताः । कामक्रोधपरायणाः कामः विषयाभिलाषः च क्रोधः विषयप्रतिघातः कामक्रोधौ कामक्रोधौ परं गमननिरोधकं अयनं आशापाशबंधनस्थानं येषां ते कामक्रोधपरायणाः ॥ १२ ॥ अर्थ : आशा, हेच शेकडो पाश. त्यांनी बद्ध - नियंत्रित - निगडित होत्साते सर्व बाजूंनी आकर्षण केले जाणारे , काम व क्रोध ज्यांचा परम आश्रय आहे, असे ते आसुर प्रवृत्तीचे लोक विषयोपभोग हे प्रयोजन सिद्ध व्हावे म्हणून, धर्मासाठी नव्हे, दुसर्याच्या धनाचा अपहार करणे इत्यादि अन्यायाने द्रव्यसंचय करितात. विवरण :
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् । अन्वय :
व्याख्या : प्रलयांतां अपरिमेयां उक्तां चिंतां प्रपंचयति चतुर्भिः । इदमद्येति । अद्य अधुना मया इदं अर्थजातं लब्धं प्राप्तं अहं इमं काममानं सर्वं प्राप्स्ये प्राप्स्यामि । किंच अपरमपि मनोरथं मनसः प्रियं प्राप्स्ये इदं वर्तमानं धनं पदार्थजातं मे मम गृहे अस्ति इदं एतज्जातीयं धनं बहुतरं धनं पुनः भविष्यति ॥ १३ ॥ अर्थ : त्या असुर लोकांचा असा विवेकविरोधी आशय असतो - आता मी हे गायी, सुवर्ण, इत्यादि धन संपादन केले आहे. हे दुसरेहि संपादन करीन. मनाला संतोष देणारे हे धन आज मजपाशी आहे. मला हवे असलेले हे दुसरे धनहि पुढल्या वर्षी मिळेल. त्यामुळे ‘हा धनाढ्य आहे’ अशी माझी ख्याति होईल. ‘या एका दुर्जय शत्रूला मी मारले आहे. या दुसर्याहि दुष्ट व क्षुद्र शत्रूंना मी मारीन. ते गरीब बिचारे माझ्यापुढे काय करणार ! या जगांत माझ्या बरोबरीचा कोणीच नाही. मी ईश्वर - सर्व ऐश्वर्याचा उपभोग घेणारा आहे. मी भोगी - पुत्र - पौत्रादिकांनी संपन्न आहे. मी कांही कोणी साधारण मनुष्य नव्हे, तर सिद्ध आहे. मोठा बलाढ्य व सुखी आहे.’ [ बाकीचे सर्व भूमीला भार होण्यासाठी उत्पन्न झाले आहेत. ] विवरण :
विद्या, वर्तन, धन व कुल यांत माझ्या तोडीचा कोणी नाही, असे ते समजतात व याप्रमाणे कर्तव्याकर्तव्यविवेकरहित झालेल्या त्यांची काय अवस्था होते, ते सांगतात -
आढ्योऽभिजनवानस्मि कोन्योस्ति सदृशो मया । अन्वय :
व्याख्या : आढ्येति । किंच अहं आढ्यः धनादिभिः संपन्नः अस्मि । किंच अहं अभिजनवान् अभिजनः पुत्रपौत्रादिजनः विद्यते यस्य सः अभिजनवान् कुलीनः अस्मि । अस्मिन् समय मया सदृशः मत्तुल्यः कः अन्यः पुरुषः अस्ति । अपि तु कोपि नास्ति । इति नेत्रकटाक्षोक्तिः । यस्मात् अहं इदानीं सर्वैः गुणैः चेत्यपरं लौकिकत्वेन संपन्नः अस्मि तस्मात् अहं इदानीं यक्ष्ये सर्वेभ्यः दीक्षितेभ्यः श्रेष्ठत्वाय यज्ञं करिष्यामि । तथा दास्यामि सामान्ययाचकाय चेत्यपरं विशेषयाचकाय देशांतरे कीर्तिविस्ताराय नटविटादिभ्यः अभिप्रेतं इष्टं प्रयच्छामि । ततः यज्ञदानाभ्यां इह अस्मिन् लोके चेत्यपरं परत्र परलोके मोदिष्ये मोदं आनंदं प्राप्स्ये इति एवं प्रकारेण मनोरथेन अभिनिविष्टमनसः सामान्येन अज्ञानविमोहिताः संतः अज्ञानेन गाढाज्ञानेन विमोहिताः अत्यंतं मोहिताः अज्ञानमोहिताः । अपरिमितां चिंतां प्रापुरित्यर्थः ॥ १५ ॥ अर्थ : मी धनाने अत्यंत संपन्न व वंशाने अत्यंत कुलीन - सात पुरुषांपर्यंत श्रोत्रियत्वाने संपन्न आहे. त्यामुळेहि माझी बरोबरी करील, असा कोणी नाही. यज्ञाच्या योगानेहि मी इतरांचा पराभव करीन. नटादिकांना दान देईन व अतिशय हृष्ट होईन. अशा प्रकारे ते आसुर प्रकृतीचे लोक अज्ञानाने मूढ झालेले असतात. याप्रमाणे अनेक चित्तांनी अनेक प्रकारे भ्रान्त झालेले ते अविवेकाच्या आवरणाने आच्छादित व विषयोपभोगामध्ये आसक्त होत्साते अपवित्र नरकांत पडतात. विवरण :
पण त्यांच्यातीलहि कित्येकांची वैदिक याग-दानादि कर्मामध्ये प्रवृत्ति होत असल्यामुळे सर्वांनीच नरकांत पडणे अयुक्त आहे, असे कोणी म्हणेल म्हणून भगवान् सांगतात -
आत्मसंभावितास्तब्धा धनमानमदान्विताः । अन्वय : व्याख्या : यक्ष्ये दास्यामि इति तेषां मनोरथः उक्तः । तत्कार्यं इदानीं दर्शयति । आत्मसंभाविता इति । ते असुरजनाः दंभेन लोके धर्मध्वजित्वस्थापनहेतुना अविधिपूर्वकं यथास्यात्तथा विधिपूर्वकं यथाशास्त्रं न भवति यस्मिन् कर्मणि यथा भवति तथा अविधिपूर्वकं विधिरहितं नामयज्ञैः नाममात्रेण यज्ञसंज्ञा येषां ते नामयज्ञाः तैः नामयज्ञैः यजंते यज्ञान् ब्राह्मणद्वारा संपादयंति । कथंभूताः ते । आत्मसंभाविताः आत्मनैव संभाविताः आत्मसंभाविताः न तु अन्यैः संभाविताः वयं सर्वेभ्यः श्रेष्ठाः इति संभावनां प्रापाः । पुनः कथंभूताः । स्तब्धाः संभावनागर्वोद्रेकेण अनम्राः । पुनः कथंभूताः । धनमानमदान्विताः धनेन मानः अभिमानः धनमानेन मदः स्वनिकृष्टतिरस्कारः धनमानमदेन अन्विताः युक्ताः धनमानमदान्विताः ॥ १७ ॥ अर्थ : आसुरलोक ‘आम्ही अनेक गुणांनी युक्त आहोत’ असे स्वतःच मानणारे व कोणापुढेहि नम्र न होण्याचा ज्यांचा स्वभाव आहे, असे असतात. धनाविषयींचा मान व मद यांनी युक्त होत्साते दंभाने नाममात्र यज्ञांनी अविधीने यजन करितात. [ आसुर जन आपली धार्मिकता प्रकट करण्याच्या हेतूने विहित अंगे व इतिकर्तव्यता यांनी रहित अशा यज्ञांनी यजन करितात. त्यांचे ते यज्ञ केवल नांवाचे असतात. त्यांत ढोंग फार असते. त्यामुळे आसुर संपत्तीचे लोक वैदिक मार्गात जरी प्रवृत्त झाले तरी त्यांत पुण्यापेक्षा पापच अधिक जोडतात. ] विवरण :
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः । अन्वय : व्याख्या : अविधिपूर्वकं यजंति इति उक्तं दर्शयति । अहंकारमिति । पुनः कथंभूताः ते । अहंकारं अहमेव यज्ञकर्ता इति अहंकरणं चेत्यपरं बलं शिष्टपराभवकरणं च दर्पं क्रूरस्वभावतां च कामं दृष्टादृष्टाभिलाषं च क्रोधं कामप्रतिघातजन्य तीव्राक्रोशवृत्तिविशेषं संश्रिताः अहंकारादीन् आश्रित्य वर्तमानाः आत्मपरदेहेषु आत्मदेहः स्वदेहः च परदेहाः अन्यदेहाः आत्मपरदेहाः तेषु आत्मपरदेहेषु मां चिदाभासेन रूपेण वर्तमानं परमेश्वरं प्रद्विषंतः प्रकर्षेण द्विषंति ते प्रद्विषंतः द्वेषं कुर्वंतः । पुनः कथंभूताः । अभ्यसूयकाः सन्मार्गवर्तिनां गुणेषु दोषारोपकाः पश्वादीनां अविधिना हिंसया द्रोहमात्रमेव भवति । ’अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् । असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥’ इति ॥ १८ ॥ अर्थ : अहंकार, बल, दर्प, काम व क्रोध यांचा आश्रय केलेले ते आसुर लोक आपल्या व दुसर्यांच्या देहांमध्ये माझा अतिशय द्वेष करणारे व अतिशय असुया करणारे असतात. [ स्वतःमध्ये असलेल्या व नसलेल्या गुणांचा आरोप करून त्यांनी विशिष्ट अशा स्वतःला ‘मी’ असे म्हणणे हा अहंकार होय. अविद्या हे त्याचे मूळ आहे. म्हणून त्यालाहि अविद्या म्हणतात. हा अविद्या संज्ञक अहंकार अतिशय कष्ट देणारा आहे. तो सर्व दोषांचे व अनर्थप्रवृत्तींचे मूळ आहे; पण आसुर लोक अशा अहंकाराचा आश्रय करितात. त्याचप्रमाणे बल म्ह. दुसर्यांच्या पराभवाला कारण होणारे व विषयासक्तीने युक्त असलेले शरीरेंद्रियसामर्थ्य; दर्प म्ह. ज्याचा उद्भव झाला असतां मनुष्य धर्माचे अतिक्रमण करितो, असा एक अंतःकरणस्थ दोष, स्त्र्यादिकांविषयींचा काम; अनिष्ट विषयांविषयींचा क्रोध, या व अशाच मात्सर्यादि दुसर्या मोठ्या दोषांचा आश्रय केलेले; तसेच, स्वदेह व परदेह, तांतील ज्ञान व कर्म यांच्या साक्षिभूत अशा माझा अत्यंत द्वेष करणारे व सन्मार्गस्थांच्या गुणांमध्ये दोषदृष्टि ठेवणारे - त्यांचे गुण सहन न करणारे, असे ते सर्व आसुरसंपत्तीचे लोक असतात. ] विवरण :
अशा आसुर प्रकृतीच्या लोकांचे शेवटी काय होते, ते सांगतात -
तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् । अन्वय : व्याख्या : ये एवंभूताः तेभ्यः कां गतिं ददासि एत्यपेक्षायां सदैव आसुरीमेव गतिं ददामि इत्याह । तानिति । अहं तान् उक्तप्रकारान् नराधमान् नरेषु परमपुरुषार्थोपयोगित्वेन उत्तमनरजातिषु अधमाः चांडालाः नराधमाः तान् नराधमान् अजस्रं निरंतरं संसारेषु जन्ममृत्युमार्गेषु क्षिपामि अनवरतं संसारं दास्यामि । ननु- शुभकर्मिणामपि संसारप्राप्तिः भवत्येव इत्याशंक्य तेभ्यः तद्वैलक्षण्यं दर्शयति । आत्मपरदेहद्वेषत्वात् क्रूरत्वात् नराधमत्वात् तान् पूर्वोक्तान् अशुभान् न विद्यते शुभं कल्याणं येषां ते अशुभाः तान् अशुभान् अमंगलान् आसुरीषु अतिक्रूरासु योनिषु व्याघ्रसर्पादियोनिषु अजस्रं निरंतरं क्षिपामि । न तु देवमनुष्यादियोनिषु इत्यर्थः । कथंभुतान् नराधमान् । आत्मपरदेहेषु मां चिदंशेन वर्तमानं द्विषतः द्विषंति ते द्विषंतः तान् द्विषतः अत एव क्रूरान् सर्वत्र आत्मनः मम द्वेषात् क्रूरकर्मणः ॥ १९ ॥ अर्थ : मी त्या माझा द्वेष करणार्या क्रूरांस, अशुभ नराधमास संसारातील आसुरी योनीतच सतत टाकतो. [ सन्मार्गाचे प्रतिपक्षभूत शत्रूच अशा साधूंचा व माझा द्वेष करणार्या त्या नराधमांस मी संसारातच म्ह. नरकगमनमार्गातच सतत टाकतो. कारण ते अधर्म दोषाने युक्त असतात. त्या अशुभ कर्मे करणार्या मूढांना ज्यांत क्रूर कर्माचे आधिक्य आहे, अशा व्याघ्रसिंहादि योनीतच टाकतो. ] विवरण :
त्यांचेहि क्रमाने अनेक जन्मांच्या शेवटी कल्याण होईल, म्हणून म्हणाल तर तसे होत नाही. आसुर प्रकृतीचे लोक उत्तरोत्तर अधम योनीलाच प्राप्त होतात, असे सांगतात -
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि । अन्वय : व्याख्या : आसुरीयोनिप्राप्तौ का क्षतिरित्याशंक्य तद्गतिमाह । आसुरीमिति । हे कौंतेय ! ते असुरजनाः मां परमेश्वरं अप्राप्य मत्प्राप्त्युपायं सन्मार्गं अप्राप्य ततः सन्मार्गाभावात् अधमां अतिनिकृष्टां कृमिकीटादिरूपां वा स्थावरादिरूपां गतिं गम्यत इति गतिः तां गतिं फलं यांति प्राप्नुवंति । कथंभूताः ते । जन्मनि जन्मनि प्रतिजन्मनि आसुरीं असुराणां इयं आसुरी तां आसुरीं योनिं मूढयोनिं आपन्नाः प्राप्ताः अत एव मूढाः अविवेकिनः अतः हेतोः आत्मपरदेहेषु मां द्विषंतीत्यर्थः ॥ २० ॥ अर्थ : हे कुंतीपुत्रा, याप्रमाणे आसुर योनीला प्राप्त झालेले व व प्रत्येक जन्मामध्ये अज्ञानप्रचुर योनीतच उत्पन्न होणारे ते अविवेकी मज ईश्वराला प्राप्त न होता - फार काय, पण माझ्या प्राप्तीचे साधन जो सन्मार्ग त्यालाहि प्राप्त न होतां उत्तरोत्तर अत्यंत निकृष्ट गतीला जातात. विवरण : ३ त्रिविध नरकद्वार, शास्त्राचे प्रामाण्य. ज्यांत सर्व आसुर संपत्तीचा अंतर्भाव होतो, ज्याच्या परिहाराने सर्व आसुर संपत्तीचा परिहार होतो व जो सर्व अनर्थाचे मूळ आहे, असा हा सर्व आसुर संपत्तीचा संक्षेप सांगतात -
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । अन्वय : व्याख्या : आसुरीसंपदः विस्तारं ब्रह्मायुषापि वक्तुं अशक्यमिति मत्वा उक्तानुक्तसंग्रहं त्रिधा राशौ सिद्धवत् कृत्वा आह । त्रिविधमिति नरकस्य नरकप्राप्तेः इदं वक्ष्यमाणं त्रिविधं त्रिप्रकारं द्वारं प्रवेशमार्गः अस्ति । कथंभूतं द्वारम् ? आत्मनः स्वस्य नाशनं नाशयति तत् नाशनं नाशकारकं यथा वर्तमानस्य सूर्यप्रकाशस्य सर्वोपि त्रिविधः व्यवहारः नेत्रतिमिरं मेधावरणं नीहारः अदर्शनहेतुभूतः । तथा इदमपि त्रिविधं नरकद्वारं आविर्भूतप्रकाशस्य आत्मनः अदर्शनहेतुभूतमित्यर्थः । किं तत् त्रिविधम् ? कामः विषयाभिलाषः चेत्यपरं क्रोधः प्रसिद्धः तथा लोभः अधिकतृष्णा तस्मात् कारणात् मुमुक्षुः एतत् प्रसिद्धं त्रयं कामक्रोधलोभात्मकं नरकद्वारं त्यजेत् ॥ २१ ॥ अर्थ : काम, क्रोध व लोभ असे हे तीन प्रकारचे, आत्म्याचा नाश करणारे नरकाचे द्वार आहे; म्हणून या त्रयाचा त्याग करावा. [ त्यांत प्रवेश करताच आत्मा नाश पावतो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच पुरुषार्थाची योग्यता रहात नाही. असे हे काम - क्रोध - लोभरूप त्रिविध नरकद्वार आहे. ज्याअर्थी ते आत्म्याचा नाश करणारे आहे, त्याअर्थी त्याचा त्याग करावा. ही कामादिकांच्या त्यागाची स्तुति आहे व त्यांचा त्याग केला असतां श्रेयःप्राप्तीच्या प्रतिबंधाची निवृत्ति होते, असा त्या स्तुतीचा भावार्थ आहे. ] विवरण :
आतां या कामादिकांच्या त्यागाचे फल सांगतात -
एतैर्विमुक्तः कौंतेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः । अन्वय : व्याख्या : ततः किं स्यात् इत्यपेक्षायां आह । एतैरिति । हे कौंतेय ! हे कुंतिपुत्र ! नरः पुरुषः एतैः कामादिभिः त्रिभिः त्रिसंख्याकैः तमोद्वारैः तमसः नरकस्य द्वाराणि तमोद्वाराणि तैः तमोद्वारैः नरकप्रवेशमार्गैः विमुक्तः सन् विशेषेण मुक्तः सन् आत्मनः स्वस्य श्रेयः श्रेयःसाधनं तपोयोगादिकर्म कल्याणं आचरति । ततः किं तत्राह । नरः पुरुषः ततः तस्मात् श्रेय आचरणात् परां श्रेष्ठां गतिं मोक्षाख्यां याति गच्छति प्राप्नोतीति यावत् ॥ २२ ॥ अर्थ : हे अर्जुना, या तीन तमोद्वारांनी मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे - मोक्षाचे साधन आचरितो, त्यामुळे मोक्ष नावाच्या परागतीला प्राप्त होतो. [ दुःखमोहात्मक नरकाची द्वारेच अशा कामादिकांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या श्रेयःसाधनाचे अनुष्ठान करतो. पूर्वी या त्रिविध नरकद्वारानेच प्रतिबद्ध झाल्यामुळे तो श्रेयःसाधन आचरीत नव्हता. पण आतां त्याचा प्रतिबंध निघून गेल्याने ते आचरितो व त्या योगानेच श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. ] विवरण :
या सर्व आसुर संपत्तीच्या परित्यागाचे व श्रेयःसाधनाचरणाचे कारण शास्त्र आहे. शास्त्रप्रमाणावरूनच ते करता येते, त्यावांचून नाही. यास्तव -
यः शास्तविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । अन्वय : व्याख्या : अन्यथा दोषमाह । य इति । यः असुरभावमापन्नः शास्त्रविधिं शास्त्रस्य विधिं शास्त्रविधिः तं शास्त्रविधिं शास्त्रेण कर्तव्यतया उपदिष्टं श्रेयोनुष्ठानं उत्सृज्य त्यक्त्वा कामकारतः यथेच्छं वर्तते वर्तनं करोति सः असुरभावसंपन्नः सिद्धिं कामादित्रयनिरसकद्वारहेतुभूतां चित्तशुद्धिं न आप्नोति न प्राप्नोति । चेत्यपरं सुखं चित्तशुद्ध्यभावेन ऐहिकं निरीहजन्यं अनुकूलसंवेदनीयं आनंदवृत्ति विशेषं सुखं न प्राप्नोति । तथा परां आमुष्मिकीं गतिं गम्यत इति गतिः तां गतिं फलं न प्राप्नोति तत्साधनोपायमपि न प्राप्नोति । तत्र कुतस्तत्प्राप्तिरित्यर्थः ॥ २३ ॥ अर्थ : जो शास्त्राचा - वेदाचा विधि सोडून - वेदविधीचा त्याग करून कामाकडून प्रेरणा केला गेलेला असा होत्साता वर्तन करतो, तोपुरुषार्थाच्या योग्यतेला प्राप्त होत नाही. त्याला या लोकी सुख होत नाही व तो स्वर्ग व मोक्ष यांतील एकाहि उत्तम गतीला प्राप्त होत नाही. [ कर्तव्य व अकर्तव्य यांच्या ज्ञानाचे साधन असा शास्त्रोक्त विधि व प्रतिषेध, यांना सोडून जो केवल कामाने प्रेरित होत्साता मनसोक्त वर्तन करतो, तो पुरुषार्थाच्या योग्यतेला प्राप्त होत नाही. त्याला सुख किंवा सर्वोत्तम गतीहि मिळत नाही. ज्याच्या योगाने अपूर्व अर्थ ज्ञात होतो ते शास्त्र. विधि व निषेध हे त्याचे स्वरूप आहे. विधिवरून कर्तव्य व निषेधावरून अकर्तव्य यांचे ज्ञान होते. अर्थात् विधिनिषेधरूपशास्त्र हेच कर्तव्य व अकर्तव्य यांच्या ज्ञानाचे साधन आहे. शास्त्रविमुख पुरुषाची प्रवृत्ति कामाधीन असते. पण असे लोक पुरुषार्थाला अयोग्य असतात. हाच यापुढील श्लोक गीतेतील कर्मादि शब्दांचा अर्थ निश्चित करताना डोळ्यापुढे ठेवणे अत्यंत अवश्य आहे. ] विवरण :
शास्त्राला सोडून केलेले कर्म निष्फल आहे, असे सुचवून त्यावरून निष्पन्न होणारा अर्थ सांगतात -
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । अन्वय :
व्याख्या : आस्तां तावत् इतरेषां कथा अस्मिन् समये मया किं कर्तव्यं इति साकांक्षं प्रति आह । तस्मादिति । यस्मात् शास्त्रविध्युल्लंघने ऐहिकामुष्मिकविघातः अस्ति तस्मात् कारणात् हे अर्जुन ! ते तव कार्यव्यवस्थितौ कार्यं इदं कार्यं च अकार्यं इदं अकार्यं कार्याकार्ये कार्याकार्ययोः व्यवस्थितिः व्यवस्था कार्याकार्यव्यवस्थितिः तस्यां कार्याकार्यव्यवस्थितौ शास्त्रं श्रुतिस्मृतिपुराणादिकं प्रमाणं प्रकर्षेण मानं नियामकं प्रमाणं अस्ति । किंच त्वं शास्त्रविधानोक्तं शास्त्रस्य श्रुतिस्मृतिपुराणदिकस्य विधानं यथावर्णाश्रमनियमताचारः शास्त्रविधानं शास्त्रविधानेन उक्तं कथितं शास्त्रविधानोक्तं कर्म इदानीं प्राप्तं युद्धाख्यं स्वधर्मरूपं कर्म कर्तुं संपादयितुं अर्हसि योग्यो भवसि । अन्यथा शास्त्रोल्लंघनेन असुरभावं प्राप्तस्य तव अनिष्टं स्यात् इत्यर्थः ॥ २४ ॥
अर्थ : म्हणून कार्याकार्याची व्यवस्था करावयाची झाल्यास म्हणजे कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याचा प्रसंग आल्यास तुला शास्त्र हेच प्रमाण आहे. यास्तव शास्त्राने केलेले जे विधान म्ह. ‘करावे’ व ‘न करावे’, अशा स्वरूपाचा जो शास्त्रविधि तो समजून घेऊन या कर्माधिकारभूमीत तुला स्वकर्मयुद्धादि करणेच योग्य आहे. [ या अध्यायांत पूर्व जन्मातील कर्मवासनानुसार या जन्मात अभिव्यक्त होणार्या ज्या सात्विकादि तीन प्रकृति, त्यांचा दैवी व आसुरी असा विभाग करून त्यांतील पहिल्या संपत्तीचा स्वीकार व दुसरीचा त्याग करावा, असा उपदेश केला आणि परम पुरुषार्थाची इच्छा करणार्या मुमुक्षूने काम, क्रोध व लोभ यांना टाकून शास्त्रदृष्टि व्हावे आणि शास्त्रविधीच्या अनुसार वर्तन करावे, असा निर्धार केला. ] विवरण :
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु |