श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वादशः स्कन्धः
त्रयोदशोऽध्यायः


जनमेजयेनाम्बामखकरण-देवीभागवतश्रवणपूर्वकं स्वपित्रुद्धारवर्णनम्

व्यास उवाच
इति ते कथितं भूप यद्यत्पृष्टं त्वयानघ ।
नारायणेन यत्प्रोक्तं नारदाय महात्मने ॥ १ ॥
श्रुत्वैतत्तु महादेव्याः पुराणं परमाद्‍भुतम् ।
कृतकृत्यो भवेन्मर्त्यो देव्याः प्रियतमो हि सः ॥ २ ॥
कुरु चाम्बामखं राजन् स्वपित्रुद्धरणाय वै ।
खिन्नोऽसि येन राजेन्द्र पितुर्ज्ञात्वा तु दुर्गतिम् ॥ ३ ॥
गृहाण त्वं महादेव्या मन्त्रं सर्वोत्तमोत्तमम् ।
यथाविधिविधानेन जन्मसाफल्यदायकम् ॥ ४ ॥
सूत उवाच
तच्छ्रुत्वा नृपशार्दूलः प्रार्थयित्वा मुनीश्वरम् ।
तस्मादेव महामन्त्रं देवीप्रणवसंज्ञकम् ॥ ५ ॥
दीक्षाविधिं विधानेन जग्राह नृपसत्तमः ।
तत आहूय धौम्यादीन्नवरात्रसमागमे ॥ ६ ॥
अम्बायज्ञं चकाराशु वित्तशाढ्यविवर्जितः ।
ब्राह्मणैः पाठयामास पुराणं त्वेतदुत्तमम् ॥ ७ ॥
श्रीदेव्यग्रेऽम्बिकाप्रीत्यै देवीभागवतं परम् ।
ब्राह्मणान्भोजयामासाप्यसंख्यातान्सुवासिनीः ॥ ८ ॥
कुमारीर्वटुकादींश्च दीनानाथांस्तथैव च ।
द्रव्यप्रदानैस्तान्सर्वान् सन्तोष्य वसुधाधिपः ॥ ९ ॥
समाप्य यज्ञं संस्थाने संस्थितो यावदेव हि ।
तावदेव हि चाकाशान्नारदः समवातरत् ॥ १० ॥
रणयन्महतीं वीणां ज्वलदग्निशिखोपमः ।
ससम्भमः समुत्थाय दृष्ट्वा तं नारदं मुनिम् ॥ ११ ॥
आसनाद्युपचारैश्च पूजयामास भूमिपः ।
कृत्वा तु कुशलप्रश्नं पप्रच्छागमकारणम् ॥ १२ ॥
राजोवाच
कुत आगमनं साधो ब्रूहि किं करवाणि ते ।
सनाथोऽहं कृतार्थोऽहं त्वदागमनकारणात् ॥ १३ ॥
इति राज्ञो वचः श्रुत्वा प्रोवाच मुनिसत्तमः ।
अद्याश्चर्यं मया दृष्टं देवलोके नृपोत्तम ॥ १४ ॥
तन्निवेदयितुं प्राप्तस्त्वत्सकाशे सुविस्मितः ।
पिता ते दुर्गतिं प्राप्तो निजकर्मविपर्ययात् ॥ १५ ॥
स एवायं दिव्यरूपवपुर्भूत्वाधुनैव हि ।
देवदेवैः स्तुतः सम्यगप्सरोभिः समन्ततः ॥ १६ ॥
विमानवरमारुह्य मणिद्वीपं गतोऽभवत् ।
देवीभागवतस्यास्य श्रवणोत्थफलेन च ॥ १७ ॥
अम्बामखफलेनापि पिता ते सुगतिं गतः ।
धन्योऽसि कृतकृत्योऽसि जीवितं सफलं तव ॥ १८ ॥
नरकादुद्धृतस्तातस्त्वया तु कुलभूषण ।
देवलोके स्फीतकीर्तिस्तवाद्य विपुलाभवत् ॥ १९ ॥
सूत उवाच
नारदोक्तं समाकर्ण्य प्रेमगद्‌गदितान्तरः ।
पपात पादाम्बुजयोर्व्यासस्याद्‌भुतकर्मणः ॥ २० ॥
तवानुग्रहतो देव कृतार्थोऽहं महामुने ।
किं मया प्रतिकर्तव्यं नमस्कारादृते तव ॥ २१ ॥
अनुग्राह्यः सदैवाहमेवमेव त्वया मुने ।
इति राज्ञो वचः श्रुत्वाप्याशीर्भिरभिनन्द्य च ॥ २२ ॥
उवाच वचनं श्लक्ष्णं भगवान् बादरायणः ।
राजन्सर्वं परित्यज्य भज देवीपदाम्बुजम् ॥ २३ ॥
देवीभागवतं चैव पठ नित्यं समाहितः ।
अम्बामखं सदा भक्त्या कुरु नित्यमतन्द्रितः ॥ २४ ॥
अनायासेन तेन त्वं मोक्ष्यसे भवबन्धनात् ।
सन्त्यन्यानि पुराणानि हरिरुद्रमुखानि च ॥ २५ ॥
देवीभागवतस्यास्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।
सारमेतत्पुराणानां वेदानां चैव सर्वशः ॥ २६ ॥
मूलप्रकृतिरेवैषा यत्र तु प्रतिपाद्यते ।
समं तेन पुराणं स्यात्कथमन्यन्नृपोत्तम ॥ २७ ॥
पाठे वेदसमं पुण्यं यस्य स्याज्जनमेजय ।
पठितव्यं प्रयत्‍नेन तदेव विबुधोत्तमैः ॥ २८ ॥
इत्युक्त्वा नृपवर्यं तं जगाम मुनिराट् ततः ।
जग्मुश्चैव यथास्थानं धौम्यादिमुनयोऽमलाः ॥ २९ ॥
देवीभागवतस्यैव प्रशंसां चक्रुरुत्तमाम् ।
राजा शशास धरणीं ततः सन्तुष्टमानसः ।
देवीभागवतं चैव पठच्छृण्वन्तिरन्तरम् ॥ ३० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादलसाहस्र्यां
संहितायां द्वादशस्कन्धे
जनमेजयेनाम्बामखकरण-देवीभागवतश्रवणपूर्वकं
स्वपित्रुद्धारवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥


जनमेजयाचा देवीयज्ञ

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, ''हे राजा, नारायणमुनीने नारदास सांगितलेले सर्व मी तुला सांगितले. हे देवीचे पुराण ऐकून मनुष्य कृतकृत्य होतो. हे श्रेष्ठ राजा, तूपित्याच्या दुर्गतीमुळे खिन्न झाला आहेस. म्हणून त्याच्या उद्धारासाठी देवीयज्ञ कर. तो उत्तम जन्मसाफल्य देणारा आहे. तसेच देवीचा महामंत्र तू ग्रहण कर.

सूत म्हणाले, ''हे ऋषीही, राजाने मंत्रासाठी त्या मुनीश्वराची प्रार्थना केली. नंतर त्या मुनीश्वरापासून विधिपूर्वक दीक्षा घेऊन देवीचा महामंत्र राजाने ग्रहण केला. पुढे नवरात्रसमयी धौम्यादि ऋषींना बोलावून सढळ हाताने कोटीहोमात्मक देवीयज्ञ केला. त्यावेळी ब्राह्मणांकडून हे उत्तम पुराण वाचून घेतले. श्रीदेवीसाठी ह्या देवी भागवताचे वाचन झाल्यावर यज्ञसमाप्ती केली. त्यावेळी असंख्य ब्राह्मण, सुवासिनी, कुमारी, ब्रह्मचारी, अनाथ इत्यादींना विपुल दान-धर्म केला. यज्ञसमयी तेजस्वी नारद आकाशातून खाली उतरला. तेव्हा राजाने आसनादि उपचारांनी त्याची पूजा केली.

राजा म्हणाला, ''हे साधो, आपल्या आगमनाने मी कृतार्थ झालो आहे. मी आपले कोणते कार्य करू ?'' नारद म्हणाला, ''मी आज देवीलोकात आश्चर्य पाहिले. ते तुला कळविण्यासाठी मी आलो आहे. तुझा दुर्गतीस गेलेला पिता आजच दिव्य शरीर धारण करून देवीच्या पूज्य फलामुळे मणिद्वीपास गेला आहे.

त्यामुळे गंधर्व, अप्सरा त्याची स्तुती करीत होते. तुझ्या देवीयज्ञामुळे तुझा पिता शाश्वत गतीस गेला आहे. तुझे जीवन सफल झाले. हे कुलभूषणा, तू पित्याचा उद्धार केलास. तुझी देवलोकी कीर्ती झाली आहे.''

नारदाच्या भाषणामुळे आनंदित झालेल्या राजाने सद्‌गदित होऊन नारदाला साष्टांग नमस्कार घातला. तो म्हणाला, ''हे महामुने, आपण केलेल्या उपकाराची फेड या नमस्काराशिवाय मी कशी करणार ? मी असेच आपल्या अनुप्रहास नित्य पात्र व्हावे.''

तेव्हा नारदाने राजाला अनेक आशीर्वाद दिले. व्यास म्हणाले, ''हे राजा, तू आता सर्वांचा त्याग करून देवीच्या चरणाची सेवा कर. देवीभागवताचे एकाग्रतेने नित्य पठण कर म्हणजे तू सर्व बंधनातून मुक्त होशील. हे राजा, हरी, रुद्र इत्यादी देवतांची पुराणे आहेतच. पण देवी पुराणाच्या सोळाव्या कलेचीही त्याची योग्यता नाही. सर्व वेद, पुराणे यांचे हे सार आहे. कारण प्रत्यक्ष मूलप्रकृतीचेच यामध्ये प्रतिपादन केलेले आहे. या पुराणाच्या पठणामुळे वेदाध्ययनाचे पुण्य मिळते म्हणून हे आदराने पठण करावे.''

सूत म्हणाले, ''असे सांगून तो मुनिराज तेधून निघून गेला. धौम्यादि सर्व मुनीही देवीभागवताची स्तुती करीत स्वस्थानी गेले.''

नंतर संतुष्ट होऊन राजा नित्य देवीभागवताचे श्रवण व पठण करून पृथ्वीचे पालन करू लागला.



अध्याय तेरावा समाप्त

GO TOP