[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, ''हे भगवान, पण हे मोक्षसाधनभूत ब्रह्मविज्ञान कशामुळे प्राप्त होते ? ब्राह्मणांची गती कोणत्या उपायाने होते ? घृत्यूचा नाश कसा होतो ? फलप्राप्ती कशाने होते ?
श्रीनारायण म्हणाले, ''हे निष्पाप शुभ व दिव्य सहसनामावली मी सांगतो. तिच्या श्रवणाने पाप नाश होतो. या एक हजार आठ नावांचा ऋषी ब्रह्मदेव आहे. छंद अनुष्टुभ, देवी गायत्री आहे. त्यातील व्यंजने, बीजे, स्वरशक्ती म्हणून सांगितले आहे. अंगन्यास करन्यास, मातृकाक्षरांनी करावा. आता ध्यान सांगतो.
आता साधकांच्या हिताकरिता मी ध्यान सांगतो. तांबड्या, पांढर्या, पिवळ्या, काळ्या व फिकट अशा वर्णाच्या मणिसमुदायांनी युक्त, तीन नेत्रांनी उज्वल, स्वतः ताम्रवर्ण असून तांबड्या व नव्या पुष्यांच्या मालेने युक्त, कमलासना, कुमारी, जिने करतलावर कुंडिका व कमल धारण केले आहे.
पद्याप्रमाणे जिचे नेत्र आहेत व जिने उत्तम अक्षमाला धारण केली आहे, अशा त्या हंसावर आरूढ झालेल्या गायत्रीचे मी भजन करतो.
हे नारदा, असे ध्यान करून नंतर सहस्रनामाला प्रारंभ करावा. ती सहस्रनामे अशी : -
गायत्रीसहस्रनाम
जिच्या लक्षणाविषयी चिंतन करता येत नाही. जी अव्यक्त आहे. प्रपंच निर्माण करणार्या त्या ब्रह्मादिकांची जी महेश्वरी आहे, जी अघृतसमुद्राच्या मध्यभागी बसलेली आहे. जी अजित, शत्रूकडून पराजित न होणारी, अणिमादि सिद्धींना आधारभूत, सूर्यमंडलामध्ये संस्थित होणारी, जरा रहित, जन्मरहित, जी सर्वांहून अधिक, जात्यादि धर्मशून्य, अक्षसूत्र धरणारी व निकृष्टरूपही आहे.
त्याचप्रमाणे अकारापासून क्षकारापर्यंत जी मातृकारूपिणी आहे, जी सहा शत्रुवर्गाचा भेद करीत असते, जी अंजनपर्वताप्रमाणे तेजस्वी व अंजनपर्वतावर राहणारी, जी देवमाता अदिति, अजपा, जीवोपाधिध्वंसिनी, कमलनयना, सर्वांच्या अंतर्बाह्य राहणारी अविद्याध्वंसिनी, अंतरात्मिका, अजरूपी, ब्रह्ममुखात वास करणारी, कमलाप्रमाणे सुमुखी, अर्धमात्रा, पुरुषार्थदानाचे जिला ज्ञान आहे; अरिमंडलाचे मर्दन करणारी, असुरांना मारणारी, अमावस्या, दारिद्र्य घालविणारी, अंत्यजार्चिता.
आदिलक्ष्मी, आदिशक्ती, आकृति, विस्तृत मुखाची, आदित्याच्या मार्गाने फिरणारी, आदित्याकडून उत्तम प्रकारे सेवा घेणारी, आश्चर्यरूपी, जगाचे आवर्तन करविणारी, आचाररूपी, आदिमूर्तीमध्ये राहणारी, आग्नेयी, अमरावती, आद्या, आराधन करण्यास योग्य, आसनावर स्थित झालेली, मूलाधार हेच जिचे निवासस्थान आहे; सर्वाधारा, अहंकारतत्त्वामध्ये राहणारी, प्रथम अक्षराने युक्त, देहस्थ आकाशाच्या स्वरूपाची, अदित्यमंडळात असलेली, अंतःकरणातील अज्ञान घालविणारी.
इंदिरा, इष्टदा, सर्वांस इष्ट, जिचे कमलाप्रमाणे नेत्र आहेत. इरावती, इंद्रपदा, इंद्राणी, इंद्ररूपिणी, इदयुधनुह्य्ययुक्त व इदपुजाणाचे संधान करणारी, इंद्रनीलाच्या आकाराची, इडा व पिंगलरूपिणी, इंद्राक्षी.
ईश्वरीदेवी, एषणात्रयरहित, उमा, उषा, नक्षत्राच्या कांतीची, काकडीप्रमाणे जिचे मुख आहे, चंद्ररूपिणी, उडुमती, उडुप्रभा, उडुमध्यमा, ऊर्द्धदेशरूपी, ऊर्द्धकेशी, ऊर्ध्य व अधोगतीचा भेद करणारी, ऊर्द्धबाहुप्रिया, ऊर्मिमालावाग्रंथदायिनी. सत्यरूपी, वेदरूपी, रजस्वला, ऋषी व देव यांनी नमस्कृत, ऋग्वेदरूपीणी, ऋण हरण करणारी, ऋषिमंडलामध्ये फिरणारी, ऋद्धी देणारी, ऋजुमार्गस्था, ऋजुधर्मा, ऋतुपदा, ऋग्वेदाचे स्थान, ऋज्वी.
लुप्त झालेल्या धर्माची प्रवृत्ती करणारी, लूतानामक रोगाचा नाश करणारा मंत्र जिच्यापासून झाला, कोळी इत्यादिकांचे विष हरण करणारी, एकाक्षरा, एकाकमात्रा, एकैकामध्ये निश्चयाने स्थित, ऐंद्री, ऐरावतावर आरूढ झालेली, ऐहिक व आमुष्मिक देणारी, ओंकार, औषधी, सर्वांच्या अभ्यंतरी राहणारी, जगामध्ये राहणारी, ऊर्वीमध्ये झालेली, औषधयुक्त, उपासनेचे फल देणारी, अंडमध्यस्थिता देवी, विसर्गरूप मंत्ररूपिणी.
कात्यायनी, कालरात्री, कामाक्षी, कामसुंदरी, कमला, कामिनी, कांता, कामदा, कलकठिनी, करीच्या गंडस्थळाप्रमाणे जिचा स्तनभार आहे. करवीरक्षेत्री राहणारी, कल्याणी, कुंडलवती, कुरुक्षेत्रात राहणारी, नागरमोथ्याच्या पत्राच्या आकाराची, कुंडली, कुमुदालया, कालजिव्हा, करालास्या, कालिका, कालरूपिणी, सुंदरगुणा, कांती, कलाधारा, कुमुद्वती, कौशिकी, कमलाकार, कामचारप्रभंजिनी, कौमारी, करुणाकटाक्षयुक्ता, दिशांची सीमा, दिग्गजांस प्रिय असलेली, सिंहरूपिणी, केशवाकडून स्तुत, कदंबाची फुले जीस प्रिय आहेत, कालिंदीरूप, कालिका, कांची, अगस्त्यकृषीकडून उत्तम प्रकारे स्तुत, कामाची माता, ऋतुमती, कामरूपा, कृपावती, कुमारी, अग्निकुंडनिलया, किराती, कीरवाहना, कैकयी, कोकिलेप्रमाणे जिचा स्वर आहे, केतकीचे पुष्य जिला प्रिय आहे, कमंडलू धारण करणारी, काली, कर्मांचे निर्मुलन करणारी, कलहंसाप्रमाणे जिची गती आहे. कक्षा, कृतकौतुकमंगलरूपा, कस्तुरीचा जिने तिलक लाविला आहे, कुहू, सुंदरी, श्रेष्ठ हत्तीप्रमाणे जिचे गमन आहे, कर्पूराचा जिने लेप केला आहे, कृष्णा, कपिला, गुहेचा आश्रय करणारी, कुधरा, कूटस्था, कम्रानामक देवी, कुक्षिस्था, सर्वाधारभूत.
खड्गखेटकरा, र्हस्वा, आकाशगामी, पक्षी जिचे वाहन आहे; खट्वांग धारण करणारी, ख्याता, खगराजावर आरूढ झालेली, खलघ्नी, खंडितजरा, भेदशास्त्राचे व्याख्यान देणारी, चंद्राच्या कोरीचा जिने तिलक लाविला आहे; गंगा, गुह व गणेश यांनी पूजित, गायत्री, गोमती, गीता, गांधारी, गानलोलुपा, गोमती, गामिनी, गाधा, गंधर्वसेविता, अप्सरांनी सेवित, गोविंदाच्या चरणांचे जिने आक्रमण केले आहे; तीन गुणांनी विभावित, गंधर्वी, गव्हरी, पृथ्वी, शिरीशा, गहना, चक्रगतिमती, गुहेत राहणारी, गुणवती, महापापाचा नाश करणारी, गौरववती, सत्त्वादिकांची साम्यावस्था, गुह्या, गोप्तव्या, गुणदायिनी, गिरिजा, गुह्यमातंगी, विष्णुप्रिया, गर्व नाहिसा करणारी, गोदा, गोकुलस्था, गदाधरा, गोकर्णक्षेत्र जिचे वसतिस्थान असून त्यात जी सक्ता, गुह्यमंडलामध्ये रहाणारी.
घर्मदा, घनदा, घोर दानवांचे मर्दन करणारी, घृणिमंत्रमयी घोषा, धनसंपत्ती देणारी, घंटारव जिला प्रिय आहे. घ्राणा, सूर्यास संतोष देणारी, जिचे निबिड अरिमंडल आहे, पूर्णा, घृताची, घनवेगिनी, चर्चा, चर्चिता, चारुहासिनी, चटुलाचंडिका, चित्रा, चित्रविचित्र मालांनी भूषित, चतुर्भुजा, चारुदंता, चातुरी, चीरतप्रदा, चूलिका, चित्रवस्त्रांता, चंद्रमाकर्णकुंडला, चंद्रहासा, चारुदात्री, चकोरी, चंद्रहासिनी, चंद्रिका, चंद्रधात्री, चौरीचौरानामक एक प्रकारची वनस्पती, चंडिका, सुंदर वाणी बोलणारी, चंद्रचुडा, चोरविनाशिनी, सुंदर चंदनाचे जिचे अंग लिप्त झालेले असते. चंचल चामरांनी वीजित, चारुमध्या, चारुगती, चंदिला, चंद्ररूपिणी, चारुहोमप्रिया, चारु आचरणसंपन्न, चक्राप्रमाणे जिचे बाहू आहेत. चंद्रमंडलमध्यवर्ती, चंद्रमंडलदर्पणा, चक्रवाकाप्रमाणे जिचे स्तन आहेत; चेष्टा, चित्रा, सुंदर विलास करणारी, चित्स्वरूपा, चंद्रवती, चंद्रमा, चंदनप्रिया, चोदयित्री, चिरप्रज्ञा, चातका, चारुहेतुकी.
जननी, जन्मरहिता, जातवेदा, जगन्मयी, जान्हवी, जटिला, जेत्री, जरामरणशून्य, जंबुद्वीपवती, ज्वाला, जयंती, जलशायिनी, जितेंद्रिया, जितक्रोधा, जितशत्रु, जगत्प्रिया, जातरूपमयी, जिव्हा, जानकी, जगती, जरा, जनित्री, जन्हुतनया, जगत्रयहितेच्छु, ज्वालामुखी, जपवती, ज्वरघ्नी, जिने पुण्यलोक जिंकले आहेत, जयाने जिने पुरुषास स्वाधीन करून घेतले आहे. ज्वाला, जाग्रती, ज्वरदेवता, ज्वलंती, जलदा, ज्येष्ठा, जिच्या धनुष्याचा टणत्कार सर्व दिशांमध्ये पसरत असतो अशी, जंभिनी, जृंभणा, जृंभा, जाज्वल्या, माणकांची कुंडले जिच्या कानात आहेत अशी.
झिंगुर्याप्रमाणे ' झणण ' असा जिचा घोष आहे. झंझावाताप्रमाणे जिचा वेग आहे. झल्लकीसंज्ञक वाद्यामध्ये कुशाल असलेली, ञरूपा म्हणजे बलीवर्दरूपा, ञभुजा म्हणजे जिच्या भुजावर शुक आहे अशी.
टाकी व बाण यांनी युक्त, टंकिनी, टंकभेदिनीटकीनामक रुद्रगणाप्रमाणे जिने घोष केला आहे, वर्णन करण्यासारखे जिचे मोठे वक्षस्थल आहे; टं शब्द करणारी देवी, ठ असा आवाज करणारी.
डाकिनी, डामरी, बालरूपा, डुन्डुमारराक्षसाकडून निर्जित, डामरी तंत्रमार्गामध्ये असलेली, डमत् डमत् असा डमरू वाजविणारी, डिंडीनामक वाद्यांचा शब्द सहन करणारी बालकांच्या सुंदर क्रीडेमध्ये परायण, ढुंढी जो विनाशक त्याची माता, ढक्का जिच्या हातात आहे, ढिलीसंज्ञक रुद्रगणसमुदाय जिच्या स्वाधीन आहे, नित्यज्ञाना, निरुपमा, निर्गुणा, नर्मदानदी.
योगासनरूप, योगाने ज्ञान होण्यास योग्य, योगरूप, यौवनसंपन्न, यौवनी, युद्धामध्ये राहणारी, यमुना, युगांचे धारण करणारी, यक्षिणी, योगयुक्ता, यक्षराजाची माता, यात्रा, यान कसे करावे हे जाणणारी, यदुवंशामध्ये उत्पन्न झालेली, यकारापासून हकारापर्यंत असणारी, याजुषी, यज्ञरूपिणी, यामिनी, योगनिरता, यातुधानभयं करी.
रुक्मिणी, रमणी, रामा, रेवती, रेणुका, रती, रौद्री, रुदास प्रिय अशा आकाराची, राजमाता, रतिप्रिया, रोहिणी, रज्यदा, रेवा, रमा, राजीवलोचना, राकेशी, रूपसंपन्ना, रत्नसिंहासनस्थिता, रक्त पुष्पे व वस्त्रे धारण करणारी, रक्त गंधाचे अनुलेपन करणारी, राजहंसावर आरूढ झालेली, रंभा, तांबडा बली जिला प्रिय आहे, युगांचा रमणीय आधार जिने सर्व भूतल सुशोभित केले आहे. अजिन परिधान करणारी, रथिनी, रत्नमालिका, रोगेशी रोगशमनी, राविणी, रोमहर्षिणी, रामचंद्रचरणाक्रांत, रावणाचा उच्छेद करणारी, रत्ने व वस्त्रे यांनी सर्व बाजूंनी आच्छादित झालेली, रथावर बसलेली, सुवर्णभूषणांनी युक्त.
लज्जेची देवी, लीला, ललिता, लिंगधारण करणारी, लक्ष्मी, लुप्तविषा, लोकिनी, लोकविश्रुता, लज्जा लंबोदरी देवी, ललना, लोकधारिणी.
वरदा, वंदिता, विद्या, वैष्णवी, शुद्ध आकृती, वाराही, विरजा, वर्षा, श्रेष्ठलक्ष्मी, विलासीनी, विनता, व्योमध्यस्था, कमलासनावर बसलेली, वारुणी, वेणूपासून उत्पन्न झालेली, वीतिहोत्रा, विरूपिणी, वायुमंडलामध्ये रहाणारी, विष्णूरूपा, विधिक्रिया, विष्णूपत्नी, विष्णुमती, विशालनेत्रावती वसुंधरा, वामदेवप्रिया, वेला, वज्रिणी वसुदोहिनी, वेदाक्षरांनी जिचे अंग भरले आहे. वाजपेयफल देणारी, वासवी, वाममार्ग उत्पन्न करणारी, वैकुंठ हे जिचे घर आहे, वरा, व्यासप्रिया, वर्म धारण करणारी, वाल्मीकीकडून परिसेवित.
षड्भाषा, षड्ऋतुप्रिया, सहा आधारामध्ये स्थिती असणारी देवी, षण्मुखांचे प्रिय करणारी, षडंगरूप.
सुमति, सुर व असुर ह्यांनी जिला नमस्कार केला आहे, सरस्वती, सदाधारा, सर्व मंगलकारिणी, सामगान जिला प्रिय आहे; सुक्ष्मा, सावित्री, सामापासून उत्पन्न झालेली, सर्ववासा, सदानंद, सुस्तनी, सागरांबरा, सर्वैश्वर्यप्रिया, सिद्धी, साधूंच्या बांधवाकडे पायाने जाणारी, सप्तर्षिमंडलामध्ये असलेली, चंद्रमंडलात राहणारी, सर्वज्ञा, करुणापूर्ण, जिच्याहून अधिक किंवा समानही कोणी नाही; सर्वांहून उन्नत, संगरहित, सद्गुणी, सकल इष्ट देणारी, सरघा, सूर्यकन्या, सुकेशी, सोमाचा समुदाय.
हिरण्यवर्णा, हरिणी, र्हींकरी, हंसवाहिनी.
रेशमी वस्त्राचे जिचे अंग आच्छादित झाले आहे; क्षीरसागराची कन्या, क्षमा, गायत्री, सावित्री, पार्वती, सरस्वती, वेदगर्गा, वरारोहा श्रीगायत्री, परांबिका.
हे नारदा, ह्याप्रमाणे ही गायत्रीची हजार नावे मी तुला सांगितली. ही नामावली पुण्य देणारी, पापाचा नाश करणारी व महासंपत्ती देणारी आहे. ह्याप्रमाणे ही संतोष उत्पन्न करणारी गायत्रीची नावे विशेषतः अष्टमीच्या दिवशी जप करून व विशेषतः होम, पूजा व ध्यान करून ब्राह्मणांसह म्हणावी.
ही गायत्रीची सहस्रनामावली भलत्यासलत्याला देऊ नये. उत्तम भक्त, उत्तम शिष्य व ब्राह्मण यांस मात्र हे साधक किंवा बांधव असतील त्यांस हे दाखवूही नये. ज्याच्या घरी हे शास्त्र लिहिलेले असते त्याच्या घरी कोणालाही भय नसते. चंचल लक्ष्मीही तेथे स्थिर होऊन रहाते.
हे परम रहस्य आहें व गुह्याहूनही गुह्य आहे, मानवास मोठे पुण्य देणारे, दारिद्र्यास धनाचा निधी देणारे, मुमुक्षूस मोक्ष देणारे व कामी पुरुषास काम्य विषय देणारे आहे. रोगी रोगापासून मुक्त होतो. ब्रह्महत्या, सुरापान व सुवर्णाची चोरी करणारे पुरुष व गुरुभार्येशी गमन करणार हेसुद्धा एकवार जप केल्यानेच पापापासून मुक्त होतात.
असत्प्रतिग्रहापासून विशेषतः अभक्ष्य भक्षणापासून व पाखंड, अनृत गोष्टी, इत्यादिकांपासून ह्याचे पठण करिताक्षणीच प्राणी मुक्त होतो. हे ब्रह्मपुत्रा, हे शुद्ध रहस्य मी तुला सांगितले. हे मनुष्यास शुद्ध सायुज्य देणारे आहे. हे सत्य आहे यात संशय नाही.