श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
सप्तदशोऽध्यायः


सन्ध्यादिकृत्यवर्णनम्

श्रीनारायण उवाच
भिन्नपादा तु गायत्री ब्रह्महत्याप्रणाशिनी ।
अभिन्नपादा गायत्री ब्रह्महत्यां प्रयच्छति ॥ १ ॥
अच्छिन्नपादागायत्रीजपं कुर्वन्ति ये द्विजाः ।
अथोमुखाश्च तिष्ठन्ति कल्पकोटिशतानि च ॥ २ ॥
सम्पुटैका षडोङ्‌कारा गायत्री विविधा मता ।
धर्मशास्त्रपुराणेषु इतिहासेषु सुव्रत ॥ ३ ॥
पञ्चप्रणवसंयुक्तां जपेदित्यनुशासनम् ।
जपसंख्याष्टभागान्ते पादो जप्यस्तुरीयकः ॥ ४ ॥
स द्विजः परमो ज्ञेयः परं सायुज्यमाप्नुयात् ।
अन्यथा प्रजपेद्यस्तु स जपो विफलो भवेत् ॥ ५ ॥
सम्पुटैका षडोङ्‌कारा भवेत्सा ऊर्ध्वरेतसाम् ।
गृहस्थो ब्रह्मचारी वा मोक्षार्थी तुरीयां जपेत् ॥ ६ ॥
तुरीयपादो गायत्र्याः परोरजसे सावदोम् ।
ध्यानमस्य प्रवक्ष्यामि जपसाङ्‌गफलप्रदम् ॥ ७ ॥
हृदि विकसितपद्मं सार्कसोमाग्निबिम्बं
     प्रणवमयमचिन्त्यं यस्य पीतं प्रकल्प्यम् ।
अचलपरमसूक्ष्मं ज्योतिराकाशसारं
     भवतु मम मुदेऽसौ सच्चिदानन्दरूपः ॥ ८ ॥
त्रिशूलयोनी सुरभिमक्षमालां च लिङ्‌गकम् ।
अम्बुजं च महामुद्रामिति सप्त प्रदर्शयेत् ॥ ९ ॥
या सन्ध्या सैव गायत्री सच्चिदानन्दरूपिणी ।
भक्त्या तां ब्राह्मणो नित्यं पूजयेच्च नमेत्ततः ॥ १० ॥
ध्यातस्य पूजां कुर्वीत पञ्चभिश्चोपचारकैः ।
लं पृथिव्यात्मने गन्धमर्पयामि नमो नमः ॥ ११ ॥
हमाकाशात्मने पुष्पं चार्पयामि नमो नमः ।
यं च वाय्वात्मने धूपं चार्पयामि ततो वदेत् ॥ १२ ॥
रं च वह्न्यात्मने दीपमर्पयामि ततो वदेत् ।
वममृतात्मने तस्मै नैवेद्यमपि चार्पयेत् ॥ १३ ॥
यं रं लं वं हमिति च पुष्पाञ्जलिमथार्पयेत् ।
एवं पूजां विधायाथ चान्ते मुद्राः प्रदर्शयेत् ॥ १४ ॥
ध्यायेत्तु मनसा देवीं मन्त्रमुच्चारयेच्छनैः ।
न कम्पयेच्छिरो ग्रीवा दन्तान्नैव प्रकाशयेत् ॥ १५ ॥
विधिनाष्टोत्तरशतमष्टाविंशतिरेव वा ।
दशवारमशक्तो वा नातो न्यूनं कदाचन ॥ १६ ॥
तत उद्वासयेद्देवीमुत्तमेत्यनुवाकतः ।
न गायत्रीं जपेद्विद्वाञ्जलमध्ये कथञ्चन ॥ १७ ॥
यतः साग्निमुखी प्रोक्तेत्याहुः केचिन्महर्षयः ।
सुरभिर्ज्ञानशूर्पं च कूर्मो योनिश्च पङ्‌कजम् ॥ १८ ॥
लिङ्‌गं निर्वाणकं चैव जपान्तेऽष्टौ प्रदर्शयेत् ।
यदक्षरपदभ्रष्टं स्वरव्यञ्जनवर्जितम् ॥ १९ ॥
तत्सर्वं क्षम्यतां देवि कश्यपप्रियवादिनि ।
गायत्रीतर्पणं चातः करणीयं महामुने ॥ २० ॥
गायत्री छन्द आख्यातं विश्वामित्रऋषिः स्मृतः ।
सविता देवता प्रोक्ता विनियोगश्च तर्पणे ॥ २१ ॥
भूरित्युक्त्वा च ऋग्वेदपुरुषं तर्पयामि च ।
भुव इत्येतदुक्त्वा च यजुर्वेदमथो वदेत् ॥ २२ ॥
स्वर्व्याहृतिं समुक्त्वा च सामवेदं समुच्चरेत् ।
मह इत्येतदुक्त्वान्तेऽथर्ववेदं च तर्पयेत् ॥ २३ ॥
जनः पदान्त इतिहासपुराणमितीरयेत् ।
तपः सर्वागमं चैव पुरुषं तर्पयामि च ॥ २४ ॥
सत्यं च सत्यलोकाख्यपुरुषं तर्पयामि च ।
ॐ भूर्भूर्लोकपुरुषं तर्पयामि ततो वदेत् ॥ २५ ॥
भुवश्चेति भुवर्लोकपुरुषं तर्पयामि च ।
स्वः स्वर्गलोकपुरुषं तर्पयामि ततः परम् ॥ २६ ॥
ॐभूरेकपदा नाम गायत्रीं तर्पयामि च ।
भुवो द्विपदां गायत्रीं तर्पयामीति कीर्तयेत् ॥ २७ ॥
स्वश्च त्रिपदां गायत्रीं तर्पयामि ततो वदेत् ।
ॐभूर्भुवः स्वश्चेति तथा गायत्रीं च चतुष्पदाम् ॥ २८ ॥
उषसीं चैव गायत्रीं सावित्रीं च सरस्वतीम् ।
वेदानां मातरं पृथ्वीमजां चैव तु कौशिकीम् ॥ २९ ॥
साङ्‌कृतिं वै सार्वजितिं गायत्रीं तर्पणे वदेत् ।
तर्पणान्ते च शान्त्यर्थं जातवेदसमीरयेत् ॥ ३० ॥
मानस्तोकेति मन्त्रं च शान्त्यर्थं प्रजपेत्सुधीः ।
ततोऽपि त्र्यम्बको मन्त्रः शान्त्यर्थः परिकीर्तितः ॥ ३१ ॥
तच्छंयोरिति मन्त्रं च जपेच्छान्त्यर्थमेव तु ।
अतो देवा इति द्वाभ्यां सर्वाङ्‌गस्पर्शनं चरेत् ॥ ३२ ॥
स्योनापृथिविमन्त्रेण भूम्यै कुर्यात्प्रणामकम् ।
यथाविधि च गोत्रादीनुच्चरेद्‌द्विजसत्तमः ॥ ३३ ॥
एवं विधानं सन्ध्यायाः प्रातःकाले प्रकीर्तितम् ।
सन्ध्याकर्म समाप्यान्तेऽप्यग्निहोत्रं स्वयं हुनेत् ॥ ३४ ॥
पञ्चायतनपूजां च ततः कुर्यात्समाहितः ।
शिवां शिवं गणपतिं सूर्यं विष्णुं तथार्चयेत् ॥ ३५ ॥
पौरुषेण तु सूक्तेन व्याहृत्या वा समाहितः ।
मूलमन्त्रेण वा कुर्याद्‌ह्रीश्च ते इति मन्त्रतः ॥ ३६ ॥
भवानीं तु यजेन्मध्ये तथैशान्यां तु माधवम् ।
आग्नेय्यां गिरिजानाथं गणेशं रक्षसां दिशि ॥ ३७ ॥
वायव्यामर्चयेत्सूर्यमिति देवस्थितिक्रमः ।
षोडशानुपचारांश्च षोडशर्ग्भिर्हरेन्नरः ॥ ३८ ॥
देवीमभ्यर्च्य पुरतो यजेदन्याननुक्रमात् ।
न देवीपूजनात्पुण्यमधिकं क्वचिदीक्ष्यते ॥ ३९ ॥
अत एव तु सन्ध्यासु सन्ध्योपास्तिः श्रुतीरिता ।
नाक्षतैरर्चयेर्द्विष्णुं न तुलस्या गणेश्वरम् ॥ ४० ॥
दूर्वाभिर्नार्चयेद्दुर्गां केतकैर्न महेश्वरम् ।
मल्लिकाजातिकुसुमं कुटजं पनसं तथा ॥ ४१ ॥
किंशुकं बकुलं कुन्दं लोध्रं तु करवीरकम् ।
शिंशपाऽपराजितापुष्पं बब्धूकागस्त्यपुष्पके ॥ ४२ ॥
मदन्तं सिन्दुवारं च पालाशकुसुमं तथा ।
दूर्वाङ्कुरं बिल्वदलं कुशमञ्जरिकां तथा ॥ ४३ ॥
शल्लकीमाधवीपुष्पमर्कमन्दारपुष्पकम् ।
केतकीं कर्णिकारं च कदम्बकुसुमं तथा ॥ ४४ ॥
पुन्नागश्चम्पकस्तद्वद्यूथिकातगरौ तथा ।
एवमादीनि पुष्पाणि देवीप्रियकराणि च ॥ ४५ ॥
गुग्गुलस्य भवेद्धूपो दीपः स्यात्तिलतैलतः ।
कृत्वेत्थं देवतापूजां ततो मूलमनुं जपेत् ॥ ४६ ॥
एवं पूजां समाप्यैव वेदाभ्यासं चरेद्‌बुधः ।
ततः स्ववृत्त्या कुर्वीत पोष्यवर्गार्थसाधनम् ।
तृतीयदिनभागे तु नियमेन विचक्षणः ॥ ४७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे
सन्ध्यादिकृत्यवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥


गायत्री जप व पंचायतन पूजा

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण म्हणाले, ''पादशः भिन्न गायत्रीचा जप केल्यास ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. तसे न म्हटल्यास ब्रह्महत्या लागते. प्रणवरूप गायत्री, एक ओंकारयुक्त, सहा ओंकारयुक्त अशाप्रकारे धर्मशास्त्र मानलेली आहे. पाच प्रणवयुक्त गायत्रीचा जप करावा. जेवढा जप करायचा असेल तेवढ्या अष्टमांश जप झाल्यावर चवथ्या भागाचा जप करावा. असा जप करणारा श्रेष्ठ होय. त्याला सायुज्येतर लाभते. याविना केलेला जप निष्फल होय.

एक ओंकार व सहा ओंकार यांनी युक्त अशा गायत्रीचा जप ऊर्ध्वर यांनी करावा. गृहस्थ, ब्रह्मचारी, मोक्षार्थी यांनी तुरीयपदात्मक गायत्रीचा जप करावा. ' परो रजसे सावदोम्' हा गायत्रीचा चवथा पाद होय.

हृदयात अग्नी, सोम व सूर्य यांच्यासारखे तेजस्वी प्रफुल्लित कमल आहे. ते प्रणवमय व अचिंत्य आहे. ते अचल सूक्ष्मज्योतिरूप व आकाशाचे तत्त्व आहे, अशा प्रकारचा सच्चिदानंदरुप ईश्वर मला आनंद होवो.' या तुरीय गायत्रीच्या त्रिशूल, योनी, सुरभी, अक्षमाला, लिंग, कमल, महामुद्रा अशा सप्त मुद्रा दाखवाव्यात.

जी संध्या तीच सच्चिदानंदरुपी गायत्रीचे ब्राह्मणाने भक्तीपूर्वक पूजन करावे. पृथ्वीरूप ल वर्णात्मक ईश्वरास मी गंध अर्पण करतो व नमस्कार करतो. आकाशरूप ह कारास पुष्प समर्पण करतो व नमस्कार करतो. वायुरूप यं या अक्षरास धूप समर्पण करतो. वन्हीरूप रं अक्षरास दीप समर्पण करतो, असे म्हणावे. अमृतरूप ' व' वर्णाने नैवेद्य समर्पण करतो. ' यं रं लं वं हं' असे म्हणून पुष्पे अर्पण करावीत. शेवटी मुद्रा दाखवाव्यात. मनात देवीचे ध्यान करावे. हळूहळू मंत्रोच्चार करावा. मस्तक, मान स्थिर ठेवून तोंड मिटून घ्यावे. अशाप्रकारे एकशे आठ, अठ्ठावीस किंवा अशक्य असल्यास दहा वेळा जप करावा. नंतर 'उत्तमेशिखरे' इत्यादि म्हणून देवीची प्रार्थना करावी. उदकात राहून गायत्रीजप करू नये. कारण तिला अग्नीमुखी म्हटले आहे.

सुरभी, ज्ञान, शूर्प, कूर्म, योनीकमल, निर्वाणक, लिंग ही आठ लिंगे जपाच्या शेवटी दाखवावीत.

हे कश्यपप्रियवादिनी, जे अक्षर वा पद भ्रष्ट झाले असेल अथवा स्वरव्यंजनरहित उच्चारले त्या बद्दल क्षमा कर. असे म्हणून गायत्री तर्पण करावे. गायत्री छंद, विश्वामित्र देवता, सविता देवता व तर्पणास विनीयोग सांगितला आहे. 'भूः ऋग्वेदपुरुषं तर्पयामि' असे म्हणावे. 'भुवः' असे म्हणून ' यजुर्वेद तर्पयामि' असे म्हणावे. ' स्वः' म्हणून ' सामवेद तर्पयामि महः' म्हणून 'अथर्ववेद तर्पयामि' असे म्हणावे. ' जनः' 'इतिहासपुराण तर्पयामि' तपःसर्वगामापुरुषं तर्पयामि, सत्यं सत्यलोकांख्यं पुरुषं तर्पयामि' असे म्हणून तर्पण करावे.

'ॐ भूः भूलोकपुरुषे तर्पयामि' असे म्हणावे. ' स्वः' म्हणून भुवर्लोकपुरुषास तृप्त करतो, ' स्वः' म्हणून स्वर्गलोक पुरुषास तृप्त करतो, असे म्हणावे. 'ॐ भूः भुवः स्वः' असे म्हणून चतुष्पाद गायत्रीस तृप्त करतो, असे बोलून तर्पण करावे. नंतर उषसी, गायत्री, सावित्री, सरस्वती, वेदमाता, पृथ्वी, अजा, कौशिकी, सांकृती, सार्वजाती या नावांचा उच्चार करून गायत्रीचे तर्पण करावे. शेवटी जातवेदसे सुनवाम हा मंत्र म्हणावा. शांतीसाठी ' मानस्त्रोके' 'तनये' इत्यादी मंत्र म्हणावे. त्यानंतर त्र्यंबकं यजामहे हा मंत्र म्हणावा. 'अतोदेवो' या दोन्ही मंत्रांनी सर्वांगस्पर्श करावा. 'स्योना पृथिवि' या मंत्रांनी भूमीस प्रणाम करावा. गोत्राचा उच्चार करावा. याप्रमाणे प्रातःकालीन संध्या करावी.

नंतर अग्नीचे हवन करावे. पंचायतनपूजा करावी. शिवा, शिव, गणपती, सूर्य, विष्णू यांची पूजा करावी. पुरुषसूक्त, व्याहृती, मूलमंत्र किंवा 'र्‍हीश्च ते लक्ष्मीश्च' या मंत्राने पूजन करावे. भवानीची मध्ये, माधवाची ईशान्येस, शंकराची अग्नेय दिशेस, गणेशाची दक्षिणेस, सूर्याची वायव्येस स्थापना करावी.

सोळा ऋचांनी उपचार समर्पण करावेत. प्रथम देवीचे पूजन करावे. अनुक्रमे देवांची पूजा करावी. देवीपूजन हे सर्वश्रेष्ठ होय. विष्णूचे अक्षतांनी पूजन करू नये. गणेशाचे तुलसीने पूजन करू नये. दुर्गेची दुर्वांनी पूजा करू नये. केतकीपत्र शंकरास वाहू नये, मल्लिका, जाई, कुड्याचे फूल, पनस, किंशुक, बकुळ, कुंद, लोध्र, केतकी, शिंशपा, अपराजिता, बंधूक, अगस्त्य, मंदर, सिंदूवार, पळस यांची पुष्पे, दुर्वांकुर, बिल्वदल, कुशाची, मंजिरी, शल्लकी, माधवीचे फूल, रूई व मंदार तसेच कर्णिकार, कदंब, नागचाफा, सोनचाफा, यूथिका, तगर इत्यादी पुष्पे देवीस फार आवडतात.

गुग्गुलाचा धूप असावा. तेलाचा दिवा लावावा. अशा रीतीने देवतांची पूजा करावी. मूलमंत्रांचा जप करावा व पूजेची समाप्ती करून वेदाभ्यास करावा. नंतर योग्य अशा पोषणाचे साधन जे वित्त ते दिवसाच्या, दुसर्‍या भागी नियमाने मिळवावे.



अध्याय सतरावा समाप्त

GO TOP