[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ईश्वर म्हणाले, ''हे महासेनापते, कुशग्रंथी, पुत्र, इतर जीव हे रुद्राक्षाच्या सोळाव्या कलेसही पात्र नाहीत. पुरुषात विष्णु, ग्रहात सूर्य, नद्यात गंगा, मुनीत कश्यप, अश्वात उच्चैश्रवा, देवात ईश्वर, देवीत गौरी हे जसे श्रेष्ठ आहेत, तसेच रुद्राक्षधारण हे सर्व साधनात श्रेष्ठ साधन आहे. अक्षय दानातही हे श्रेष्ठ आहे. यापेक्षा कोणतेही स्तोत्र अथवा व्रत श्रेष्ठ नाही. म्हणून रुद्राक्षाच्या पुण्यफलाचा शेवट सांगण्यास कोणीही समर्थ नाही.
ज्याच्या शरीरावर भस्म नाही, ज्याच्याजवळ रुद्राक्ष नाही, ज्याच्याकडे शिवाची पूजा नाही तो ब्राह्मण चांडाल होय. ज्याच्या मस्तकावर रुद्राक्ष असतात, तो मांस खाणारा, मद्यपी, अगम्य गमन करणारा असला तरी पापमुक्त होतो. यज्ञयागादी कर्मे करून जे फल मिळते तेच फल रुद्राक्ष धारणाने मिळते. चार वेद, पुराणांचे पठण, तीर्थवास इत्यादींमुळे जे पुण्य मिळते, ते केवळ रुद्राक्ष धारणाने प्राप्त होते. मृत्यूसमयी रुद्राक्षधारकास शिवत्व प्राप्त होते. कंठात अथवा बहूत रुद्राक्ष असताना मृत्यू आल्यास तो एकवीस कुले उद्धरून रुद्रलोकी जातो. ब्राह्मण वा चांडाल कोणीही असला तरी त्यास देवाची प्राप्ती होते. काही भक्षण करणारा असो, म्लेंच्छ, चांडाळ, पातकी, कोणीही रुद्राक्ष धारण करताच तो कर्ममुक्त होतो. रुद्राक्ष मस्तकावर धारण केल्यास कोटीपद, कर्ण ठिकाणी दहाकोटीपट, गळ्यात शंभरकोटी, मस्तकाच्या अग्रभागी सहस्रकोटी, यज्ञोपवीतात अयुतपट, भुजात लक्षकोटी, मनगटात धारण केल्यास मोक्ष प्राप्ती होते.
रुद्राक्ष धारण करून भक्तीने कर्म करणारास महत्कल मिळते. रुद्राक्षात मन लावून राहिले आहे. त्याने रुद्राक्ष धारण केल्यासारखेच आहे. तो पुरुषही वंद्य होय. रुद्राक्षामुळे कीटक, गर्दभ हे प्राणीही शिवलोकी जातात.''
स्कंद म्हणाला, ''हे परमेश्वरा, कीकट देशात गर्दभाने रुद्राक्ष का धारण केले ?''
श्रीभगवान म्हणाले, ''हे पुत्रा, विंध्य पर्वतावर एक पथिक गर्दभावर रुद्राक्षांचा भार लादून येत होता.
पण थकल्यामुळे त्याला भार सहन न होऊन तो भूमीवर पडला. तेथेच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. पण तत्काल तो त्रिनेत्र, शूलपाणी, महेश्वररूप झाला. तो नंतर मजजवळ आला. त्याच्यावर भारामध्ये जितके रुद्राक्ष होते तितके लक्ष वर्ष तो शिवलोकी राहिला.
हे रुद्राक्षरहस्य फक्त आपल्या शिष्यालाच सांगावे. रुद्राक्ष धारण करणे हे पुण्यप्रद आहे. त्याला उपमा नाही. ज्याने व्रत केले असेल, तो हजार रुद्राक्ष धारण करतो, त्याला सर्व देव मानतात. कारण तो रुद्रतुल्य होय. शिखेत एक, हातात प्रत्येकी बारा, कंठात बत्तीस, मस्तकावर चाळीस, कानात प्रत्येकी सहा, वक्षस्थलावर एकशेआठ रुद्राक्ष धारण करणार्याची सर्व देव पूजा करतात.
मोती, माणिक, स्फटिक, रुपे, वैडूर्यमणी, सुवर्ण यांसह रुद्राक्ष धारण करणारा शंकर होतो. त्याला पाप स्पर्शही करीत नाही. रुद्राक्ष मालेच्या योगाने मंत्र जपल्यास अनंत फल मिळते. रुद्राक्षहीन पुरुषाचे जीवन व्यर्थ होय. रुद्राक्ष मस्तकावर ठेवून स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य मिळते. एकमुखी, पाचमुखी, अकरामुखी, चवदामुखी हे रुद्राक्ष सर्वांना पूज्य आहेत. रुद्राक्षाची भक्तीने पूजा करणारा दरिद्रीही राजा होतो.
कोसल देशात गिरिनाथ नावाचा ब्राह्मण होता. तो श्रीमंत, धर्मात्मा, वेदशास्त्रप्रवीण होता. तो यज्ञामुळे दीक्षित झाला होता. त्याला गुणविधी नावाचा सर्वसुंदर पुत्र होता. त्याने आपल्या गुरूच्या मुक्तावली नावाच्या पत्नीस मोहित केले."
शिववून म्हणाले, ''हे जेथे मृत्यु पावला आहे त्या ठिकणी भूमीच्या खाली दहा हात रुद्राक्ष आहे. म्हणून आम्ही त्याला शंकराकडे नेत आहोत.''
नंतर त्या गुणनिधीने दिव्यरूप धारण केले व विमानात बसून तो शिवलोकी गेला. असे हे रुद्राक्ष महात्म्य आहे. हे सुव्रता, मी तुला रुद्राक्षाचा महिमा निवेदन केला. हा पापक्षय करणारा आहे. तसेच महापुण्य प्राप्त करून देणारा आहे.