शौनक उवाच
आद्यो मन्वन्तरः प्रोक्तो भवता चायमुत्तमः ।
अन्येषामुद्भवं ब्रूहि मनूनां दिव्यतेजसाम् ॥ १ ॥
सूत उवाच
एवमाद्यस्य चोत्पत्तिं श्रुत्वा स्वायम्भुवस्य हि ।
अन्येषां क्रमशस्तेषां सम्भूतिं परिपृच्छति ॥ २ ॥
नारदः परमो ज्ञानी देवीतत्त्वार्थकोविदः ।
नारद उवाच
मनूनां मे समाख्याहि सूत्पत्तिं च सनातन ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
प्रथमोऽयं मनुः स्वायम्भुव उक्तो महामुने ।
देव्याराधनतो येन प्राप्तं राज्यमकण्टकम् ॥ ४ ॥
प्रियव्रतोत्तानपादौ मनुपुत्रौ महौजसौ ।
राज्यपालनकर्तारौ विख्यातौ वसुधातले ॥ ५ ॥
द्वितीयश्च मनुः स्वारोचिष उक्तो मनीषिभिः ।
प्रियव्रतसुतः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥ ६ ॥
स स्वारोचिषनामापि कालिन्दीकूलतो मनुः ।
निवासं कल्पयामास सर्वसत्त्वप्रियङ्करः ॥ ७ ॥
जीर्णपत्राशनो भूत्वा तपः कर्तुमनुव्रतः ।
देव्या मूर्तिं मृण्मयीं च पूजयामास भक्तितः ॥ ८ ॥
एवं द्वादश वर्षाणि वनस्थस्य तपस्यतः ।
देवी प्रादुरभूत्तात सहस्रार्कसमद्युतिः ॥ ९ ॥
ततः प्रसन्ना देवेशी स्तवराजेन सुव्रता ।
ददौ स्वारोचिषायैव सर्वमन्वन्तराश्रयम् ॥ १० ॥
आधिपत्यं जगद्धात्री तारिणीति प्रथामगात् ।
एवं स्वारोचिषमनुस्तारिण्याराधनात्ततः ॥ ११ ॥
आधिपत्यं च लेभे स सर्वारातिविवर्जितम् ।
धर्मं संस्थाप्य विधिवद्राज्यं पुत्रैः समं विभुः ॥ १२ ॥
भुक्त्वा जगाम स्वर्लोकं निजमन्वन्तराश्रयात् ।
तृतीय उत्तमो नाम प्रियव्रतसुतो मनुः ॥ १३ ॥
गङ्गाकूले तपस्तप्त्वा वाग्भवं सञ्जपन् रहः ।
वर्षाणि त्रीण्युपवसन् देव्यनुग्रहमाविशत् ॥ १४ ॥
स्तुत्वा देवीं स्तोत्रवरैर्भक्तिभावितमानसः ।
राज्यं निष्कण्टकं लेभे सन्ततिं चिरकालिकीम् ॥ १५ ॥
राज्योत्थान्यानि सौख्यानि भुक्त्वा धर्मान्युगस्य च ।
सोऽप्याजगाम पदवीं राजर्षिवरभाविताम् ॥ १६ ॥
चतुर्थस्तामसो नाम प्रियव्रतसुतो मनुः ।
नर्मदादक्षिणे कूले समाराध्य जगन्मयीम् ॥ १७ ॥
महेश्वरीं कामराजकूटजापपरायणः ।
वासन्ते शारदे काले नवरात्रसपर्यया ॥ १८ ॥
तोषयामास देवेशीं जलजाक्षीमनूपमाम् ।
तस्याः प्रसादमासाद्य नत्वा स्तोत्रैरनुत्तमैः ॥ १९ ॥
अकण्टकं महद्राज्यं बुभुजे गतसाध्वसः ।
पुत्रान्वलोद्धताञ्छूरान्दश वीर्यनिकेतनान् ॥ २० ॥
उत्पाद्य निजभार्यायां जगामाम्बरमुत्तमम् ।
पञ्चमो मनुराख्यातो रैवतस्तामसानुजः ॥ २१ ॥
कालिन्दीकूलमाश्रित्य जजाप कामसंज्ञकम् ।
बीजं परमवाग्दर्पदायकं साधकाश्रयम् ॥ २२ ॥
एतदाराधनादाप स्वाराज्यर्द्धिमनुत्तमाम् ।
बलमप्रहतं लोके सर्वसिद्धिविधायकम् ॥ २३ ॥
सन्ततिं चिरकालीनां पुत्रपौत्रमयीं शुभाम् ।
धर्मान्व्यस्य व्यवस्थाप्य विषयानुपभुज्य च ।
जगामाप्रतिमः शूरो महेन्द्रालयमुत्तमम् ॥ २४ ॥
मनूंचे वर्णन
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
शौनक म्हणाले, "आता इतर मनूंचे वर्णन आम्हाला सांगा."
शौनक म्हणाले, "अशारीतीने स्वायंभुव मनूची उत्पत्ती ऐकल्यावर नारदाने अन्य मनूंची उत्पत्ती विचारली. तेव्हा नारायणमुनी म्हणाले, "पहिल्या स्वायंभुव मनूने देवीची सेवा करून पृथ्वीचे निष्कंटक राज्य मिळविले. प्रियव्रत व उत्तानपाद हे त्याचे महान पुत्र होते.
दुसरा स्वारोचित मनू होय. तो प्रियव्रत पुत्र असून महान पराक्रमी होता. त्याने कलिंदीच्या तीरी आपले निवासस्थान केले. सुकलेली पाने खाऊन, देवीच्या मृण्मयमूर्तीची त्याने आराधना केली. अशी बारा वर्षे तपश्चर्या केल्यावर सहस्रसूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारी देवी प्रकट झाली. तिने स्वारोचित्तालाच सर्व मन्वंतरांचे आधिपत्य दिले. म्हणून तिला जगद्धात्री किंवा तारिणी असे म्हणतात. तारिणीची आराधना केल्यामुळे त्याला अजातशत्रू आधिपत्य मिळाले.
त्याने धर्मस्थापना केली व पुत्रपौत्रासह राज्य उपभोग घेतला. अखेर सर्वाधिकाराचा त्याग करून तो स्वर्गलोकी गेला.
प्रियव्रत पुत्र उत्तम हा तिसरा मनू झाला. त्याने गंगाकिनार्यावर वाग्भव मंत्राने उत्तम तप केले. तीन वर्षे उपवास करून त्याने देवीस प्रसन्न करून घेतले. तिचे स्तवन करून त्याने दीर्घ आयुष्य व निष्कंटक राज्य मिळविले. अनेक सुखे भोगून तो राजर्षींनी मिळविलेल्या स्थानाप्रत गेला.
प्रियव्रतपुत्र तामस हा चवथा मनू होय. नर्मदेच्या दक्षिणतीरी त्याने महेश्वरीची आराधना केली. कामराजकूट जपाचे त्याने पारायण केले. वसंत ॠतूत नवरात्र पूजन केले. त्यामुळे जलजाक्षी देवीस त्याने संतुष्ट करून घेतले. तिचे उत्तम स्तोत्रांनी त्याने स्तवन केले व राज्यभोग प्राप्त करून घेतले. त्याने अत्यंत सामर्थ्यसंपन्न असे दहा पुत्र आपल्या भार्योच्या ठिकाणी उत्पन्न केल्यावर तो स्वर्गास गेला.
तामसाचा भ्राता रैवतक हा पाचवा मनू झाला. कालिंदीतीरावर कामबीज मंत्राजा जप करून त्याने स्वराज्य, संपत्ती, सर्वसिद्धी देणारे बल, दीर्घायुष्य, पुत्रपौत्र यांची प्राप्ती करून घेतली. त्याने धर्माचे विभाग केले व उत्तम व्यवस्था करून विषयांचा उपभोग घेऊन तो इंद्रलोकी गेला.
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे मनूत्पत्तिवर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥