सूतउवाच
एवं समुपदिश्यायं देवर्षिः परमः स्वराट् ।
जगाम ब्रह्मणो लोकं स्वैरचारी महामुनिः ॥ १ ॥
गते मुनिवरे विन्ध्यश्चिन्तां लेभेऽनपायिनीम् ।
नैव शान्तिं स लेभे च सदान्तःकृतशोचनः ॥ २ ॥
कथं किं त्वत्र मे कार्यं कथं मेरुं जयाम्यहम् ।
नैव शान्तिं लभे नापि स्वास्थ्यं मे मानसे भवेत् ॥ ३ ॥
(धिगुत्साहं च मानं च धिङ्मे कीर्तिं च धिक्कुलम्)
धिग्बलं मे पौरुषं धिक् स्मृतं पूर्वैर्महात्मभिः ।
एवं चिन्तयमानस्य विन्ध्यस्य मनसि स्फुटम् ॥ ४ ॥
प्रादुर्भूता मतिः कार्ये कर्तव्ये दोषकारिणी ।
मेरुप्रदक्षिणां कुर्वन्नित्यमेव दिवाकरः ॥ ५ ॥
सग्रहर्क्षगणोपेतः सदा दृप्यत्ययं नगः ।
तस्य मार्गस्य संरोधं करिष्यामि निजैः करैः ॥ ६ ॥
तदा निरुद्धो द्युमणिः परिक्रामेत्कथं नगम् ।
एवं मार्गे निरुद्धे तु मया दिनकरस्य च ॥ ७ ॥
भग्नदर्पो दिव्यनगो भविष्यति विनिश्चयम् ।
एवं निश्चित्य विन्ध्याद्रिः खं स्पृशन् ववृधे भुजैः ॥ ८ ॥
महोन्नतैः शृङ्गवरैः सर्वं व्याप्य व्यवस्थितः ।
कदोदेष्यति भास्वांस्तं रोधयिष्याम्यहं कदा ॥ ९ ॥
एवं सञ्चिन्तयानस्य सा व्यतीयाय शर्वरी ।
प्रभातं विमलं जज्ञे दिशो वितिमिराः करैः ॥ १० ॥
कुर्वन्स निर्गतो भानुरुदयायोदये गिरौ ।
प्रकाशते स्म विमलं नभो भानुकरैः शुभैः ॥ ११ ॥
विकासं नलिनी भेजे मीलनं च कुमुद्वती ।
स्वानि कार्याणि सर्वे च लोकाः समुपतस्थिरे ॥ १२ ॥
हव्यं कव्यं भूतबलिं देवानां च प्रवर्धयन् ।
प्राह्णापराह्णमध्याह्नविभागेन त्विषां पतिः ॥ १३ ॥
एवं प्राचीं तथाग्नेयीं समाश्वास्य वियोगिनीम् ।
ज्वलन्तीं चिरकालीनविरहादिव कामिनीम् ॥ १४ ॥
भास्करोऽथ कृशानोश्च दिशं नूनं विहाय च ।
याम्यां गन्तुं ततस्तूर्णं प्रतस्थे कमलाकरः ॥ १५ ॥
न शशाकाग्रतो गन्तुं ततोऽनूरुर्व्यजिज्ञपत् ।
अनूरुरुवाच
भानो मानोन्नतो विन्ध्यो निरुध्य गगनं स्थितः ॥ १६ ॥
स्पर्धते मेरुणा प्रेप्सुस्त्वद्दत्तां च प्रदक्षिणाम् ।
सूत उवाच
अनूरुवाक्यमाकर्ण्य सविता ह्यास चिन्तयन् ॥ १७ ॥
अहो गगनमार्गोऽपि रुध्यते चातिविस्मयः ।
प्रायः शूरो न किं कुर्यादुत्पथे वर्त्मनि स्थितः ॥ १८ ॥
निरुद्धो नो वाजिमार्गो दैवं हि बलवत्तरम् ।
राहुबाहुग्रहव्यग्रो यः क्षणं नावतिष्ठते ॥ १९ ॥
स चिरं रुद्धमार्गोऽपि किं करोति विधिर्बली ।
एवं च मार्गे संरुद्धे लोकाः सर्वे च सेश्वराः ॥ २० ॥
नान्वविन्दन्त शरणं कर्तव्यं नान्वपद्यत ।
चित्रगुप्तादयः सर्वे कालं जानन्ति सूर्यतः ॥ २१ ॥
संरुद्धो विन्ध्यगिरिणा अहो दैवविपर्ययः ।
यदा निरुद्धः सविता गिरिणा स्पर्धया तदा ॥ २२ ॥
नष्टः स्वाहास्वधाकारो नष्टप्रायमभूज्जगत् ।
एवं च पाश्चिमा लोका दाक्षिणात्यास्तथैव च ॥ २३ ॥
निद्रामीलितचक्षुष्का निशामेव प्रपेदिरे ।
प्राञ्चस्तथोत्तराहाश्च तीक्ष्णतापप्रतापिताः ॥ २४ ॥
मृता नष्टाश्च भग्नाश्च विनाशमभजन् प्रजाः ।
हाहाभूतं जगत्सर्वं स्वधाकव्यविवर्जितम् ।
देवाः सेन्द्राः समुद्विग्नाः किं कुर्म इतिवादिनः ॥ २५ ॥
विंध्य वृद्धिंगत होतो
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
विंध्याद्रीला असे सांगून नारद निघून गेला. तेव्हा इकडे विंध्य चिंतातूर झाला. तो मनात शोक करू लागला, "आपण मेरूवर कसा विजय मिळवावा ?" याचा तो विचार करू लागला. तो स्वतःशी म्हणाला, "माझ्या सामर्थ्याचा धिक्कार असो." असा विचार करीत असताना त्याच्या मनात एक कल्पना आली. पण ती अपराध घडविणारी होती. ग्रह, नक्षत्र यांसह सूर्य मेरूला प्रदक्षिणा घालत असतो. म्हणून तो गर्व करीत आहे. पण मी त्याचा मार्ग अडवला तर सूर्य प्रदक्षिणा कशी घालील ? त्या पर्वताचेही गर्वहरण होईल.
असा विचार करून विंध्य शिखरांसह आकाशाकडे वृद्धींगत होऊ लागला. रात्र संपून प्रभात झाली. सूर्य उदयगिरीवर आला. चंद्रविकासी कमले मिटली. सूर्यविकासी कमले उमलली. सर्व लोक नित्य कर्मे करू लागले. हव्य, कव्य, भूतबली वगैरे देवकृत्ये, पूर्वाण्ह अपरान्ह, मध्यान्ह, वगैरे कालाचे विभाग करणारा तेजस्वी सूर्य दक्षिणेकडे सत्वर निघाला. पण रथाचे अश्व पुढे जाईनात. अरुण म्हणाला, हे भानो, विंध्याने उन्नत होऊन गगनाचा मार्ग अडविला आहे. तो मेरूशी स्पर्धा करीत आहे."
अरुणाचे हे वाक्य ऐकून सूर्य विचार करू लागला. तेथे सूर्याने विचार केला, पर्वतही गगन मार्ग अडवू शकतो ? दैव बलवत्तर आहे यात शंकाच नाही. राहूच्या बाहूत सापडून व्याकूळ झाल्यावर तो स्थिर रहात नाही, पण मार्गच कुंठित झाल्यामुळे आता काय करावे ? लोकपालांनाही कोणाला शरण जावे हे समजेना. कारण चित्रगुप्त वगैरे सूर्यामुळेच काल जाणू शकतात. सूर्याला पर्वताने अडविल्यामुळे स्वाहाकार, स्वधाकार नष्ट झाला. सर्व जग नष्ट होण्याची वेळ झाली. निद्रेमुळे नेत्र मिटले. पश्चिम व दक्षिण या भागातील सर्व लोक दीर्घ रात्रीत पडले. पूर्व व उत्तर यामधे सर्वदा दिवस निर्माण झाला. उत्पात होऊन प्रजा नष्ट होऊ लागली. तिचा सर्व बाजूंनी संहार होऊ लागला. सर्व जगात हाहाःकार उडाला. जग स्वधा व कव्य याविरहित झाले. इंद्र वगैरे देवसुद्धा, आता काय करावे, म्हणून उद्विग्न झाले.
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे देवीमाहात्म्ये विन्ध्योपाख्यानवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥