श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
दशमः स्कन्धः
द्वितीयोऽध्यायः


विन्ध्योपाख्यानवर्णनम्

श्रीदेव्युवाच
भूमिपाल महाबाहो सर्वमेतद्‍भविष्यति ।
यत्त्वया प्रार्थितं तत्ते ददामि मनुजाधिप ॥ १ ॥
अहं प्रसन्ना दैत्येन्द्रनाशनामोघविक्रमा ।
वाग्भवस्य जपेनैव तपसा ते सुनिश्चितम् ॥ २ ॥
राज्यं निष्कण्टकं तेऽस्तु पुत्रा वंशकरा अपि ।
मयि भक्तिर्दृढा वत्स मोक्षान्ते सत्पदे भवेत् ॥ ३ ॥
एवं वरान्महादेवी तस्मै दत्त्वा महात्मने ।
पश्यतस्तु मनोरेव जगाम विन्ध्यपर्वतम् ॥ ४ ॥
योऽसौ विन्ध्याचलो रुद्धः कुम्भोद्‍भवमहर्षिणा ।
भानुमार्गावरोधार्थं प्रवृत्तो गगनं स्पृशन् ॥ ५ ॥
सा विन्ध्यवासिनी विष्णोरनुजा वरदेश्वरी ।
बभूव पूज्या लोकानां सर्वेषां मुनिसत्तम ॥ ६ ॥
ऋषय ऊचुः
कोऽसौ विन्ध्याचलः सूत किमर्थं गगनं स्पृशन् ।
भानुमार्गावरोधं च किमर्थं कृतवानसौ ॥ ७ ॥
कथं च मैत्रावरुणिः पर्वतं तं महोन्नतम् ।
प्रकृतिस्थं चकारेति सर्वं विस्तरतो वद ॥ ८ ॥
न हि तृप्यामहे साधो त्वदास्यगलितामृतम् ।
देव्याश्चरित्ररूपाख्यं पीत्वा तृष्णा प्रवर्धते ॥ ९ ॥
सूत उवाच
आसीद्विन्ध्याचलो नाम मान्यः सर्वधराभृताम् ।
महावनसमूहाढ्यो महापादपसंवृतः ॥ १० ॥
सुपुष्पितैरनेकैश्च लतागुल्मैस्तु संवृतः ।
मृगा वराहा महिषा व्याघ्राः शार्दूलका अपि ॥ ११ ॥
वानराः शशका ऋक्षाः शृगालाश्च समन्ततः ।
विचरन्ति सदा हृष्टा पुष्टा एव महोद्यमाः ॥ १२ ॥
नदीनदजलाक्रान्तो देवगन्धर्वकिन्नरैः ।
अप्सरोभिः किम्पुरुषैः सर्वकामफलद्रुमैः ॥ १३ ॥
एतादृशे विन्ध्यनगे कदाचित्पर्यटन् महीम् ।
देवर्षिः परमप्रीतो जगाम स्वेच्छया मुनिः ॥ १४ ॥
तं दृष्ट्वा स नगो मङ्‌क्षु तूर्णमुत्थाय सम्भ्रमात् ।
पाद्यमर्घ्यं तथा दत्त्वा वरासनमथार्पयत् ॥ १५ ॥
सुखोपविष्टं देवर्षिं प्रसन्नं नग ऊचिवान् ।
विन्ध्य उवाच
देवर्षे कथ्यतां जात आगमः कुत उत्तमः ॥ १६ ॥
तवागमनतो जातमनर्घ्यं मम मन्दिरम् ।
तव चङ्‌क्रमणं देवाभयार्थं हि यथा रवेः ॥ १७ ॥
अपूर्वं यन्मनोवृत्तं तद्‌ ब्रूहि मम नारद ।
नारद उवाच
ममागमनमिन्द्रारे जातं स्वर्णगिरेरथ ॥ १८ ॥
तत्र दृष्टा मया लोकाः शक्राग्नियमपाशिनाम् ।
सर्वेषां लोकपालानां भवनानि समन्ततः ॥ १९ ॥
मया दृष्टानि विन्ध्याग नानाभोगप्रदानि च ।
इति चोक्त्वा ब्रह्मयोनिः पुनरुच्छ्वासमाविशत् ॥ २० ॥
उच्छ्वसन्तं मुनिं दृष्ट्वा पुनः पप्रच्छ शैलराट् ।
उच्छ्वासकारणं किं तद्‌ ब्रूहि देवऋषे मम ॥ २१ ॥
इत्याकर्ण्य नगस्योक्तं देवर्षिरमितद्युतिः ।
अब्रवीच्छ्रूयतां वत्स ममोच्छ्वासस्य कारणम् ॥ २२ ॥
गौरीगुरुस्तु हिमवाञ्छिवस्य श्वशुरः किल ।
सम्बन्धित्वात्पशुपतेः पूज्य आसीत्क्षमाभृताम् ॥ २३ ॥
एवमेव च कैलासः शिवस्यावसथः प्रभुः ।
पूज्यः पृथ्वीभृतां जातो लोके पापौघदारणः ॥ २४ ॥
निषधः पर्वतो नीलो गन्धमादन एव च ।
पूज्याः स्वस्थानमासाद्य सर्व एव क्षमाभृतः ॥ २५ ॥
यं पर्येति च विश्वात्मा सहस्रकिरणः स्वराट् ।
सग्रहर्क्षगणोपेतः सोऽयं कनकपर्वतः ॥ २६ ॥
आत्मानं मनुते श्रेष्ठं वरिष्ठं च धराभृताम् ।
सर्वेषामहमेवाग्र्यो नास्ति लोकेषु मत्समः ॥ २७ ॥
एवंमानाभिमानं तं स्मृत्वोच्छ्वासो मयोज्झितः ।
अस्तु नैतावता कृत्यं तपोबलवतां नग ।
प्रसङ्‌गतो मयोक्तं ते गमिष्यामि निजं गृहम् ॥ २८ ॥


विंध्य व नारद यांचा संवाद

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीदेवी म्हणाली, "हे पृथ्वीपते, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. भयंकर दैत्यांचा नाश करणारी, पराक्रम सफल होणारी मी वाग्भव नावाच्या मंत्रामुळे तुजवर संतुष्ट झाले आहे. तुला निष्कंटक राज्य प्राप्त होईल व तुझी पुत्रपौत्रादि समृद्धी होईल. तू मद्‌भक्त होशील व ब्रह्मपदी स्थिर रहाशील."

असे म्हणून ती देवी विंध्य पर्वताकडे गेली. विंध्याने पूर्वी सूर्याचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला, पण अगस्तीमुनीने त्याचे निवारण केले. अशा त्या विंध्य पर्वतावर ती वरदायिनी ईश्वरी रहात होती. ती सर्वांना पूजनीय झाली."

ऋषी म्हणाले, "हे सूता, हा विंध्याचल कोण ? तो गगनस्पर्शाची का इच्छा करू लागला ? सूर्याचा मार्ग त्याने का अडविला ? अगस्तीने त्याचे कसे निवारण केले ? हे आम्हाला सांग."

सूत म्हणाले, "पर्वतात मान्य, अनेक महावनांनी युक्त, प्रचंड वृक्ष असलेला विंध्य नावाचा पर्वत होता. सुंदर पुष्पे, वेली यांनी तो वेष्टित होता. हरणे, रानडुक्कर, रेडे, व्याघ्र, सिंह, वानरे, ससे, रीस, कोल्हे हे सर्व प्राणी त्या पर्वतावर वास करीत होते. नदी- जल जलाने पूर्ण होते. यक्ष, गंधर्व, अप्सरा वगैरे तेथे विहार करीत असत.

एकदा नारद तेथे आले. त्यांना विंध्याने सत्वर आसन, पाद्य, वअर्घ्य दिले व ते कोठून आले म्हणून विचारले.

तो म्हणाला, "आपल्या आगमनाने माझे वैभव वाढले आहे. रवीप्रमाणेच आपणही देवहितासाठीच श्रमण करीत असता. म्हणून आपले वर्तमान सांगा."

नारद म्हणाले, "इंद्रशत्रू मेरूकडे माझे येणे झाले होते. तेथे मी शक, अग्नी, यम, वरुण या सर्वांचे लोक पाहिले. त्यांची सुंदर उपभोग मंदिरे अवलोकन केली." असे म्हणून नारदांनी दीर्घ उसासा टाकला. तेव्हा विंध्य म्हणाला, "निःश्वास टाकण्याचे कारण काय ?"

नारद म्हणाले, "हे वत्सा, गौरीचा पिता हिमालय हा शंकराचा श्वशूर असल्याचे विदीतच आहे. त्यामुळे तो पर्वतराजा श्रेष्ठ झाला आहे. शिवाय शिवाचा कैलास लोकही त्यावरच आहे. तो पूज्य व पापहरण करणारा आहे. निषध, नील, गंधमादन इत्यादींनी स्वतःची स्थाने पूज्य करून घेतली. हजारो किरणांचा विश्वाला प्रकाश देणारा सूर्य व अनेक नक्षत्रे यांच्यासह जो सभोवार फिरतो तो सुवर्णपर्वत स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतो. चवदाही लोकात मजसारखा कोणी श्रेष्ठ नाही असे म्हणतो. त्या गर्विष्ठ सुमेरूचे स्मरण होऊन मी निःश्वास टाकला.

हे पर्वता आम्ही तपस्वी असल्याने आम्हाला त्याशी कर्तव्य नाही. केवळ प्रसंग पडला म्हणून तुला मी हे सांगितले. आता मी स्वस्थानी जातो."



इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे विन्ध्योपाख्यानवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

अध्याय दुसरा समाप्त

GO TOP