श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
चतुश्चत्वारिंशोऽध्यायः


स्वधोपाख्यानवर्णनम्

श्रीनारायण उवाच
शृणु नारद वक्ष्यामि स्वधोपाख्यानमुत्तमम् ।
पितॄणां च तृप्तिकरं श्राद्धान्तफलवर्धनम् ॥ १ ॥
सृष्टेरादौ पितृगणान्ससर्ज जगतां विधिः ।
चतुरश्च मूर्तिमतस्त्रींश्च तेजःस्वरूपिणः ॥ २ ॥
दृष्ट्वा सप्तपितृगणान् सुखरूपान्मनोहरान् ।
आहारं ससृजे तेषां श्राद्धं तर्पणपूर्वकम् ॥ ३ ॥
स्नानं तर्पणपर्यन्तं श्राद्धं तु देवपूजनम् ।
आह्निकं च त्रिसन्ध्यान्तं विप्राणां च श्रुतौ श्रुतम् ॥ ४ ॥
नित्यं न कुर्याद्यो विप्रस्त्रिसन्ध्यं श्राद्धतर्पणम् ।
बलिं वेदध्वनिं सोऽपि विषहीनो यथोरगः ॥ ५ ॥
देवीसेवाविहीनश्च श्रीहरेरनिवेद्यभुक् ।
भस्मान्तं सूतकं तस्य न कर्मार्हश्च नारद ॥ ६ ॥
ब्रह्मा श्राद्धादिकं सृष्ट्वा जगाम पितृहेतवे ।
न प्राप्नुवन्ति पितरो ददति ब्राह्मणादयः ॥ ७ ॥
सर्वे च जग्मुः क्षुधिताः खिन्नास्तु ब्रह्मणः सभाम् ।
सर्वं निवेदनं चक्रुस्तमेव जगतां विधिम् ॥ ८ ॥
ब्रह्मा च मानसीं कन्यां ससृजे च मनोहराम् ।
रूपयौवनसम्पन्नां शतचन्द्रनिभाननाम् ॥ ९ ॥
विद्यावतीं गुणवतीमतिरूपवतीं सतीम् ।
श्वेतचम्पकवर्णाभां रत्‍नभूषणभूषिताम् ॥ १० ॥
विशुद्धां प्रकृतेरंशां सस्मितां वरदां शुभाम् ।
स्वधाभिधां च सुदतीं लक्ष्मीलक्षणसंयुताम् ॥ ११ ॥
शतपद्मपदन्यस्तपादपद्मं च बिभ्रतीम् ।
पत्‍नीं पितॄणां पद्मास्यां पद्मजां पद्मलोचनाम् ॥ १२ ॥
पितृभ्यश्च ददौ ब्रह्मा तुष्टेभ्यस्तुष्टिरूपिणीम् ।
ब्राह्मणानां चोपदेशं चकार गोपनीयकम् ॥ १३ ॥
स्वधान्तं मन्त्रमुच्चार्य पितृभ्यो देयमित्यपि ।
क्रमेण तेन विप्राश्च पित्रे दानं ददुः पुरा ॥ १४ ॥
स्वाहा शस्ता देवदाने पितृदाने स्वधा स्मृता ।
सर्वत्र दक्षिणा शस्ता हतं यज्ञमदक्षिणम् ॥ १५ ॥
पितरो देवता विप्रा मुनयो मनवस्तथा ।
पूजां चक्रुः स्वधां शान्तां तुष्टुवुः परमादरात् ॥ १६ ॥
देवादयश्च सन्तुष्टाः परिपूर्णमनोरथाः ।
विप्रादयश्च पितरः स्वधादेवीवरेण च ॥ १७ ॥
इत्येवं कथितं सर्वं स्वधोपाख्यानमेव च ।
सर्वेषां च तुष्टिकरं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ १८ ॥
नारद उवाच
स्वधापूजाविधानं च ध्यानं स्तोत्रं महामुने ।
श्रोतुमिच्छामि यत्‍नेन वद वेदविदांवर ॥ १९ ॥
श्रीनारायण उवाच
ध्यानं च स्तवनं ब्रह्मन् वेदोक्तं सर्वमङ्‌गलम् ।
सर्वं जानासि च कथं ज्ञातुमिच्छसि वृद्धये ॥ २० ॥
शरत्कृष्णत्रयोदश्यां मघायां श्राद्धवासरे ।
स्वधां सम्पूज्य यत्‍नेन ततः श्राद्धं समाचरेत् ॥ २१ ॥
स्वधां नाभ्यर्च्य यो विप्रः श्राद्धं कुर्यादहंमतिः ।
न भवेत्फलभाक्सत्यं श्राद्धस्य तर्पणस्य च ॥ २२ ॥
ब्रह्मणो मानसीं कन्यां शश्वत्सुस्थिरयौवनाम् ।
पूज्यां वै पितृदेवानां श्राद्धानां फलदां भजे ॥ २३ ॥
इति ध्यात्वा शिलायां वा ह्यथवा मङ्‌गले घटे ।
दद्यात्पाद्यादिकं तस्यै मूलेनेति श्रुतौ श्रुतम् ॥ २४ ॥
ओं ह्रीं श्रीं क्लीं स्वधादेव्यै स्वाहेति च महामुने ।
समुच्चार्य तु सम्पूज्य स्तुत्वा तां प्रणमेद्‌ द्विजः ॥ २५ ॥
स्तोत्रं शृणु मुनिश्रेष्ठ ब्रह्मपुत्र विशारद ।
सर्ववाञ्छाप्रदं नॄणां ब्रह्मणा यत्कृतं पुरा ॥ २६ ॥
श्रीनारायण उवाच
स्वधोच्चारणमात्रेण तीर्थस्नायी भवेन्नरः ।
मुच्यते सर्वपापेभ्यो वाजपेयफलं लभेत् ॥ २७ ॥
स्वधा स्वधा स्वधेत्येवं यदि वारत्रयं स्मरेत् ।
श्राद्धस्य फलमाप्नोति बलेश्च तर्पणस्य च ॥ २८ ॥
श्राद्धकाले स्वधास्तोत्रं यः शृणोति समाहितः ।
स लभेच्छ्राद्धसम्भूतं फलमेव न संशयः ॥ २९ ॥
स्वधा स्वधा स्वधेत्येवं त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
प्रियां विनीतां स लभेत्साध्वीं पुत्रगुणान्विताम् ॥ ३० ॥
पितॄणां प्राणतुल्या त्वं द्विजजीवनरूपिणी ।
श्राद्धाधिष्ठातृदेवी च श्राद्धादीनां फलप्रदा ॥ ३१ ॥
नित्या त्वं सत्यरूपासि पुण्यरूपासि सुव्रते ।
आविर्भावतिरोभावौ सृष्टौ च प्रलये तव ॥ ३२ ॥
ॐ स्वस्तिश्च नमः स्वाहा स्वधा त्वं दक्षिणा तथा ।
निरूपिताश्चतुर्वेदैः प्रशस्ताः कर्मिणां पुनः ॥ ३३ ॥
कर्मपूर्त्यर्थमेवैता ईश्वरेण विनिर्मिताः ।
इत्येवमुक्त्वा स ब्रह्मा ब्रह्मलोके स्वसंसदि ॥ ३४ ॥
तस्थौ च सहसा सद्यः स्वधा साऽऽविर्बभूव ह ।
तदा पितृभ्यः प्रददौ तामेव कमलाननाम् ॥ ३५ ॥
तां सम्प्राप्य ययुस्ते च पितरश्च प्रहर्षिताः ।
स्वधास्तोत्रमिदं पुण्यं यः शृणोति समाहितः ।
स स्नातः सर्वतीर्थेषु वाञ्छितं फलमाप्नुयात् ॥ ३६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसंवादे
स्वधोपाख्यानवर्णनं नाम चतुश्चत्वारिशोऽध्यायः ॥ ४४ ॥


स्वधा देवीचे स्तोत्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री नारायण म्हणाले, "हे नारदा, पितरांची तृप्ती करणारे, श्राद्धान्नाचे फल वृद्धिंगत करणारे असे स्वधेचे आख्यान तुला सांगतो."

सृष्टीच्या आरंभी जगत्कर्त्याने पितृगण उत्पन्न केले. त्यापैकी चार मूर्तिमंत व तीन तेजोरूप होते. त्या सात पितृगणांसाठी त्याने तर्पणयुक्त आहार केला. स्नान व तर्पणयुक्त श्राद्ध, देवपूजन, त्रिसंध्यांत अन्हिक हे ब्राह्मणांचे वेदोक्त कर्म आहे. जे असे आचरण करीत नाहीत ते विषहीन सर्पाप्रमाणे होत. देवीची पूजा न करणारा, श्रीहरीस नैवेद्य न दाखवता खाणारा हा जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे स्मशानात भस्म होईपर्यंत सुतकी समजावा. पितरांसाठी श्राद्धे वगैरे निर्माण केल्यावर ब्रह्मदेव स्वस्थानी गेला. पण ब्राह्मण वगैरे जे तर्पण करीत होते, ते पितरांना प्राप्त होत नव्हते. तेव्हा सर्व क्षुधार्त पितर ब्रह्मदेवाकडे गेले. नंतर ब्रह्मदेवाने एक मानसकन्या उत्पन्न केली. ती गुणरूप व यौवनसंपन्न होती. विद्यावती, शुद्ध, प्रकृतीच्या अंशभूत स्वधा नावाची सुंदर कन्या होती. ती लक्ष्मीच्या लक्षणांनी युक्त पद्मरूप धारण करणारी, पितरांची पत्नी होती. पद्माप्रमाणे नेत्र असलेली अशी ती कन्या ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केली व ब्राह्मणांना तिचा अत्यंत गुप्त उपदेश केला. त्या स्वधात मंत्रामुळे पितरांना भाग मिळण्याची व्यवस्था केली. म्हणून देवांना दान देताना स्वाहा व पितरांना स्वधा असे मंत्र सांगितले आहेत. नंतर पितर, देवता, ब्राह्मण, मुनी वगैरे सर्वांनी स्वधेचे स्तवन केले. स्वधेच्या वरामुळे सर्वजण संतुष्ट झाले.

"हे नारदा, मी तुला स्वधेचे उपाख्यान निवेदन केले. आता आणखी तुला काय ऐकायचे आहे ?"

नारद म्हणाले, "हे महामुने, आता स्वधेचे पूजन व तिचे स्तोत्र मला सांगा."
श्री नारायण म्हणाले, "श्राद्धदिनी, मघायुक्त दिवशी, शरदऋतूतील कृष्ण त्रयोदशीस प्रयत्नपूर्वक स्वधेचे पूजन करावे. नंतर श्राद्ध करावे. स्वधेची पूजा न करता श्राद्ध करणार्‍यास तर्पणाची फलप्राप्ती होत नाही.

"चिरयौवनसंपन्न, पितर व देव यांना पूज्य अशा ब्रह्मदेवाच्या कन्येचे मी स्तवन करतो." असे म्हणून शीला अथवा मंगल घटात तिची कल्पना करावी. नंतर तिला मूलद्रव्ये व पाद्य अर्पण करावे.

"ॐ र्‍हीं श्रीं क्लीं स्वधादेव्यै स्वाहा ।" असे म्हणून तिची पूजा व स्तुती करावी. आता ब्रह्मदेवाने स्वतः केलेले स्तोत्र ऐक.

स्वधेच्या केवळ उच्चाराने पुरुषाचे तीर्थस्नान घडते. तो पापमुक्त होतो. त्याला वाजपेयज्ञाचे फल मिळते. स्वधा, स्वधा असे त्रिवार स्मरण केल्यास श्राद्ध, बली व तर्पणाचे फल मिळते. श्राद्धाचे वेळी एकाग्र चित्ताने स्वधेचे स्तोत्र ऐकणार्‍यास श्राद्धाचे पूर्ण फल मिळते. तसेच पुत्र अथवा स्त्री प्राप्त होते. स्वधा, तू श्राद्धांची अधिष्ठात्री देवता आहेस. तू नित्य, सत्यरूप व पुण्यरूप आहेत. सृष्टीकाली व प्रलयकाली तुझी उत्पत्ती व लय होतो. ॐ स्वस्ति नम:, स्वाहा, स्वधा व दक्षिणा या सर्वांना प्रशस्त होत. कर्मे पूर्ण व्हावीत म्हणून परमेश्वराने यांना उत्पन्न केले असे ब्रह्मदेव ब्रह्मसभेत म्हणाला व स्तब्ध झाला. त्याचक्षणी स्वधा तेथे प्रकट झाली. तेव्हा त्या कमलमुख स्वधेला ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केले. त्यामुळे पितर अत्यंत हर्षित झाले.

हे स्वधेचे स्तोत्र एकाग्र होऊन ऐकल्यास सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते व त्याचे मनोरथ पूर्ण होतात."


अध्याय चव्वेचाळिसावा समाप्त

GO TOP