नारद उवाच
नारायण महाभाग नारायण महाप्रभो ।
रूपेणैव गुणेनैव यशसा तेजसा त्विषा ॥ १ ॥
त्वमेव ज्ञानिनां श्रेष्ठः सिद्धानां योगिनां मुने ।
तपस्विनां मुनीनां च परो वेदविदांवर ॥ २ ॥
महालक्ष्म्या उपाख्यानं विज्ञातं महदद्भुतम् ।
अन्यत्किञ्चिदुपाख्यानं निगूढं वद साम्प्रतम् ॥ ३ ॥
अतीव गोपनीयं यदुपयुक्तं च सर्वतः ।
अप्रकाश्यं पुराणेषु वेदोक्तं धर्मसंयुतम् ॥ ४ ॥
श्रीनारायण उवाच
नानाप्रकारमाख्यानमप्रकाश्यं पुराणतः ।
श्रुतं कतिविधं गूढमास्ते ब्रह्मन् सुदुर्लभम् ॥ ५ ॥
तेषु यत्सारभूतं च श्रोतुं किं वा त्वमिच्छसि ।
तन्मे ब्रूहि महाभाग पश्चाद्वक्ष्यामि तत्पुनः ॥ ६ ॥
नारद उवाच
स्वाहा देवी हविर्दाने प्रशस्ता सर्वकर्मसु ।
पितृदाने स्वधा शस्ता दक्षिणा सर्वतो वरा ॥ ७ ॥
एतासां चरितं जन्मफलं प्राधान्यमेव च ।
श्रोतुमिच्छामि त्वद्वक्त्राद्वद वेदविदांवर ॥ ८ ॥
सूत उवाच
नारदस्य वचः श्रुत्वा प्रहस्य मुनिसत्तमः ।
कथां कथितुमारेभे पुराणोक्तां पुरातनीम् ॥ ९ ॥
श्रीनारायण उवाच
सृष्टेः प्रथमतो देवाः स्वाहारार्थं ययुः पुरा ।
ब्रह्मलोकं ब्रह्मसभामाजग्मुः सुमनोहराम् ॥ १० ॥
गत्वा निवेदनं चक्रुराहारहेतुकं मुने ।
ब्रह्मा श्रुत्वा प्रतिज्ञाय निषेवे श्रीहरिं परम् ॥ ११ ॥
नारद उवाच
यज्ञरूपो हि भगवान् कलया च बभूव ह ।
यज्ञे यद्यद्धविर्दानं दत्तं तेभ्यश्च ब्राह्मणैः ॥ १२ ॥
श्रीनारायण उवाच
हविर्ददति विप्राश्च भक्त्या च क्षत्रियादयः ।
सुरा नैव प्राप्नुवन्ति तद्दानं मुनिपुङ्गव ॥ १३ ॥
देवा विषण्णास्ते सर्वे तत्सभां च ययुः पुनः ।
गत्वा निवेदनं चक्रुराहाराभावहेतुकम् ॥ १४ ॥
ब्रह्मा श्रुत्वा तु ध्यानेन श्रीकृष्णं शरणं ययौ ।
पूजाञ्चकार प्रकृतेध्यानेनैव तदाज्ञया ॥ १५ ॥
प्रकृतेः कलया चैव सर्वशक्तिस्वरूपिणी ।
अतीव सुन्दरी श्यामा रमणीया मनोहरा ॥ १६ ॥
ईषद्धास्यप्रसन्नास्या भक्तानुग्रहकातरा ।
उवाचेति विधेरग्रे पद्मयोने वरं वृणु ॥ १७ ॥
विधिस्तद्वचनं श्रुत्वा सम्भ्रमात्समुवाच ताम् ।
प्रजापतिरुवाच
त्वमग्नेर्दाहिका शक्तिर्भव यातीव सुन्दरी ॥ १८ ॥
दग्धुं न शक्तः प्रकृतीर्हुताशश्च त्वया विना ।
त्वन्नामोच्चार्य मन्त्रान्ते यो दास्यति हविर्नरः ॥ १९ ॥
सुरेभ्यस्तत्प्राप्नुवन्ति सुराः सानन्दपूर्वकम् ।
अग्नेः सम्पत्स्वरूपा च श्रीरूपा सा गृहेश्वरी ॥ २० ॥
देवानां पूजिता शश्वन्नरादीनां भवाम्बिके ।
ब्रह्मणश्च वचः श्रुत्वा सा विषण्णा बभूव ह ॥ २१ ॥
तमुवाच ततो देवी स्वाभिप्रायं स्वयम्भुवम् ।
स्वाहोवाच
अहं कृष्णं भजिष्यामि तपसा सुचिरेण च ॥ २२ ॥
ब्रह्मंस्तदन्यं यत्किञ्चित्स्वप्नवद् भ्रममेव च ।
विधाता जगतस्त्वं च शम्भुर्मृत्युञ्जयो विभुः ॥ २३ ॥
बिभर्ति शेषो विश्वं च धर्मः साक्षी च धर्मिणाम् ।
सर्वाद्यपूज्यो देवानां गणेषु च गणेश्वरः ॥ २४ ॥
प्रकृतिः सर्वसम्पूज्या यत्प्रसादात्पुराभवत् ।
ऋषयो मुनयश्चैव पूजिता यन्निषेवया ॥ २५ ॥
तत्पादपद्मं नियतं भावेन चिन्तयाम्यहम् ।
पद्मास्या पाद्यमित्युक्त्वा पद्मनाभानुसारतः ॥ २६ ॥
जगाम तपसे देवी ध्यात्वा कृष्णं निरामयम् ।
तपस्तेपे वर्षलक्षमेकपादेन पद्मजा ॥ २७ ॥
तदा ददर्श श्रीकृष्णं निर्गुणं प्रकृतेः परम् ।
अतीव कमनीयं च रूपं दृष्ट्वा च रूपिणी ॥ २८ ॥
मूर्च्छां सम्प्राप कालेन कामेशस्य च कामुकी ।
विज्ञाय तदभिप्रायं सर्वज्ञस्तामुवाच ह ॥ २९ ॥
समुत्थाप्य च तां क्रोडे क्षीणाङ्गीं तपसा चिरम् ।
श्रीभगवानुवाच
वाराहे वै त्वमंशेन मम पत्नी भविष्यसि ॥ ३० ॥
नाम्ना नाग्नजिती कन्या कान्ते नग्नजितस्य च ।
अधुनाग्नेर्दाहिका त्वं भव पत्नी च भामिनी ॥ ३१ ॥
मन्त्राङ्गरूपा पूज्या च मत्प्रसादाद् भविष्यसि ।
वह्निस्त्वां भक्तिभावेन सम्पूज्य च गृहेश्वरीम् ॥ ३२ ॥
रमिष्यति त्वया सार्धं रामया रमणीयया ।
इत्युक्त्वान्तर्दधे देवो देवीं सम्भाष्य नारद ॥ ३३ ॥
तत्राजगाम सन्त्रस्तो वह्निर्ब्रह्मनिदेशतः ।
सामवेदोक्तध्यानेन ध्यात्वा तां जगदम्बिकाम् ॥ ३४ ॥
सम्पूज्य परितुष्टाव पाणिं जग्राह मन्त्रतः ।
तदा दिव्यं वर्षशतं स रेमे रामया सह ॥ ३५ ॥
अतीव निर्जने देशे सम्भोगसुखदे सदा ।
बभूव गर्भस्तस्यां च हुताशस्य च तेजसा ॥ ३६ ॥
तं दधार च सा देवी दिव्यं द्वादशवत्सरम् ।
ततः सुषाव पुत्रांश्च रमणीयान्मनोहरान् ॥ ३७ ॥
दक्षिणाग्निगार्हपत्याहवनीयान् क्रमेण च ।
ऋषयो मुनयश्चैव ब्राह्मणाः क्षत्रियादयः ॥ ३८ ॥
स्वाहान्तं मन्त्रमुच्चार्य हविर्दानं च चक्रिरे ।
स्वाहायुक्तं च मन्त्रं च यो गृह्णाति प्रशस्तकम् ॥ ३९ ॥
सर्वसिद्धिर्भवेत्तस्य मन्त्रग्रहणमात्रतः ।
विषहीनो यथा सर्पो वेदहीनो यथा द्विजः ॥ ४० ॥
पतिसेवाविहीना स्त्री विद्याहीनो यथा पुमान् ।
फलशाखाविहीनश्च यथा वृक्षो हि निन्दितः ॥ ४१ ॥
स्वाहाहीनस्तथा मन्त्रो न हुतः फलदायकः ।
परितुष्टा द्विजाः सर्वे देवाः सम्प्रापुराहुतीः ॥ ४२ ॥
स्वाहान्तेनैव मन्त्रेण सफलं सर्वमेव च ।
इत्येवं कथितं सर्वं स्वाहोपाख्यानमुत्तमम् ॥ ४३ ॥
सुखदं मोक्षदं सारं किं भूयः श्रोतुमिच्छसि ।
नारद उवाच
स्वाहापूजाविधानं च ध्यानं स्तोत्रं मुनीश्वर ॥ ४४ ॥
सम्पूज्य वह्निस्तुष्टाव येन तद्वद मे प्रभो ।
श्रीनारायण उवाच
ध्यानं च सामवेदोक्तं स्तोत्रपूजाविधानकम् ॥ ४५ ॥
वदामि श्रूयतां ब्रह्मन् सावधानो मुनीश्वर ।
सर्वयज्ञारम्भकाले शालग्रामे घटेऽथवा ॥ ४६ ॥
स्वाहां सम्पूज्य यत्नेन यज्ञं कुर्यात्कलाप्तये ।
स्वाहां मन्त्राङ्गयुक्तां च मन्त्रसिद्धिस्वरूपिणीम् ॥ ४७ ॥
सिद्धां च सिद्धिदां नॄणां कर्मणां फलदां शुभाम् ।
इति ध्यात्वा च मूलेन दत्त्वा पाद्यादिकं नरः ॥ ४८ ॥
सर्वसिद्धिं लभेत्स्तुत्वा मूलमन्त्रं मुने शृणु ।
ॐ ह्रीं श्रीं वह्निजायायै देव्यै स्वाहेत्यनेन च ॥ ४९ ॥
यः पूजयेच्च तां भक्त्या सर्वेष्टं सम्भवेद् ध्रुवम् ।
वह्निरुवाच
स्वाहा वह्निप्रिया वह्निजाया सन्तोषकारिणी ॥ ५० ॥
शक्तिः क्रिया कालदात्री परिपाककरी ध्रुवा ।
गतिः सदा नराणां च दाहिका दहनक्षमा ॥ ५१ ॥
संसारसाररूपा च घोरसंसारतारिणी ।
देवजीवनरूपा च देवपोषणकारिणी ॥ ५२ ॥
षोडशैतानि नामानि यः पठेद्भक्तिसंयुतः ।
सर्वसिद्धिर्भवेत्तस्य इह लोके परत्र च ॥ ५३ ॥
नाङ्गहीनं भवेत्तस्य सर्वं कर्म सुशोभनम् ।
अपुत्रो लभते पुत्रं भार्याहीनो लभेत्प्रियाम् ॥ ५४ ॥
रम्भोपमां स्वकान्तां च सम्प्राप्य सुखमाप्नुयात् ॥ ५५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसंवादे
स्वाहोपाख्यानवर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४३ ॥
स्वाहादेवी -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, "नारायणा, तुम्ही ज्ञानरूप आहात. लक्ष्मीचे उपाख्यान व स्तवन मी ऐकले. आता तिचे गुप्त आख्यान मला सांगा."
श्रीनारायण म्हणाले, "आता तुला अतिशय गूढ-दुर्लभ असे ज्ञान मी तुला सांगतो."
नारद म्हणाले, "ही देवी, स्वाहा, स्वधा, दक्षिणा वगैरेमध्ये वास करते. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे."
नारायण म्हणाले, "पूर्वी देव स्वतःच्या आहारासाठी ब्रह्मदेवाकडे गेले व त्याला आपल्या आहाराविषयी सर्व निवेदन केले. तेव्हा ब्रह्मदेवाने श्रीहरीची स्तुती केली."
नारद म्हणाले, "भगवान यज्ञरूप झाला. मग यज्ञात ब्राह्मणांनी दिलेल्या दानामुळे देवांची तृप्ती का होत नाही ?"
नारायण म्हणाले, "ब्राह्मण, क्षत्रिय भक्तीपूर्वक हवी देतात. पण देवांना ते प्राप्त होत नाही. म्हणून पुन्हा उदास होऊन देव ब्राह्मणाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेव ध्यानाने श्रीकृष्णास शरण गेले व ध्यानानेच त्याने प्रकृतीचे स्तवन केले. तेव्हा कृष्णवाणी, मनोहररूप असलेली, वरदायिनी देवी ब्रह्मदेवापुढे प्रकट झाली. ती म्हणाली, "हे पद्मयोने, वर माग."
तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, "तू अति सुंदर आहेस. म्हणून तू अग्नीची दाहशक्ती हो. तुझ्यावाचून अग्नी दहन करण्यास असमर्थ आहे. तुझ्या नामोच्चाराने व मंत्रांनी मिळणारा हवी देवास प्राप्त होईल असे कर. संपत्ती, श्री, गृहेश्वर असे रूप असलेल्या अंबिके, देव व मानव यांना तू नित्य पूजनीय होशील."
हे ऐकताच देवी खिन्न झाली. ती म्हणाली, "मी भयंकर तपाने कृष्णाची सेवा करीन. कारण त्याशिवाय इतर सर्व स्वप्नाप्रमाणे आहे. तू जगाचा कर्ता व शंकर संहर्ता आहे. शेषाने विश्वाला धारण केले आहे. धर्म धार्मिकांचा साक्षी आहे. गणेश्वर देवांना पूज्य आहे. पण ज्याच्या प्रसादाने प्रकृती, ऋषीमुनी सर्वांना पूज्य झाले त्या श्रीकृष्णाचे मी चिंतन करते."
असे म्हणून ती लक्ष्मीचा अंश असलेली देवी एका पायावर उभी राहून तप करू लागली. एक लक्ष वर्षे तप केल्यावर तिला श्रीकृष्णदर्शन झाले. ते मनोरूप पाहून ती
रूपवती कामेच्छेने मूर्च्छित झाली. तेव्हा तपाने क्षीण झालेल्या देवीस उचलून धरून भगवान म्हणाला, "तू वराहकल्पात माझी पत्नी होशील. तू नाग्नजिताची नाग्नजीती नावाची कन्या होशील. तू सर्वांना पूज्य होशील. नंतर अग्नी भक्तीभावाने तुला सांभाळून तुझ्याशी क्रीडा करील."
असे म्हणून देव गुप्त झाला. त्याच वेळी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्रस्त झालेला अग्नी तेथे आला. सामवेदोक्त मंत्रांनी त्या जगदंबिकेचे त्याने पूजन केले. तिची स्तुती करून नंतर तिचे पाणीग्रहण केले. नंतर शंभर दिव्य वर्षे त्याने निर्जन प्रदेशात तिला संभोगसुख दिले. तिच्या ठिकाणी गर्भ राहिला. बारा वर्षे तो गर्भ धारण केल्यावर तिच्या पोटी दिव्य बालके जन्मास आली. दक्षिणाग्नी, गार्हपत्याग्नी व आहवनीयाग्नी अशी त्यांची नावे आहेत. ऋषी, मुनी, क्षत्रिय सर्वजण स्वाहांत मंत्र उच्चारून हविर्दान देऊ लागले.
स्वाहायुक्त मंत्रग्रहण करणार्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात. स्वाहाशून्य मंत्र निंद्य होय. स्वाहान्न मंत्रामुळे देवांना आहुती मिळू लागल्या.
"हे नारदा, मी तुला स्वाहाचे उपाख्यान सांगितले. आता तुला काय ऐकायचे आहे ?"
नारद म्हणाले, "स्वाहाच्या पूजेचे विधान, ध्यान व स्तोत्र मला सांगा."
श्री नारायण म्हणाले, "सर्व यज्ञाच्या प्रारंभी शालिग्रामाचे ठिकाणी अथवा घरात स्वाहेची पूजा करावी. नंतर कालप्राप्तीसाठी यज्ञ करावा. ती सर्व सिद्धी देणारी, मनुष्यांना कर्मांचे फल देणारी व शुभ आहे. तिचे ध्यान केल्यावर मूलमंत्राने पाद्यादि देऊन तिचे स्तवन करावे म्हणजे सिद्धी मिळते. त्याला मूलमंत्र असा -
"ॐ र्हीं श्रीं वन्हिजायायै देव्यै स्वाहा । "
या मंत्राने पूजा केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात. अग्नी म्हणतो, "स्वाहा वन्हीस प्रिय आहे. त्याला संतोष देणारी ती स्त्री आहे. ती त्याची शक्ती आहे. क्रियेचा काल देणारी आहे. कर्माचा परिपाक देणारी नित्य गती, पुरुषांना दहन करणारी, अग्नीस योग्य, संसारसाररूप, घोर संसारातून पार नेणारी, देवांना जीवनरूप, देवांचे पोषण करणारी अशी आहे. ही सोळा नावे जो भक्तीने पठण करतो त्याला ऐहिक व पारलौकिक सिद्धी प्राप्त होतात. त्याची सर्व कर्मे अंगहीन न होता शुभ होतात. निपुत्रिकाला पुत्र होतो. भार्याहिनास भार्या मिळते. रंभेप्रमाणे सुंदर पत्नी लाभल्यामुळे तो परम सुखी होतो."