नारद उवाच
तुलसी च यदा पूज्या कृता नारायणप्रिया ।
अस्याः पूजाविधानं च स्तोत्रं च वद साम्प्रतम् ॥ १ ॥
केन पूजा कृता केन स्तुता प्रथमतो मुने ।
तत्र पूज्या सा बभूव केन वा वद मामहो ॥ २ ॥
सूत उवाच
नारदस्य वचः श्रुत्वा प्रहस्य मुनिपुङ्गवः ।
कथां कथितुमारेभे पुण्यां पापहरां पराम् ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
हरिः संपूज्य तुलसीं रेमे च रमया सह ।
रमासमानसौभाग्यां चकार गौरवेण च ॥ ४ ॥
सेहे च लक्ष्मीर्गङ्गा च तस्याश्च नवसङ्गमम् ।
सौभाग्यगौरवं कोपात्ते न सेहे सरस्वती ॥ ५ ॥
सा तां जघान कलहे मानिनी हरिसन्निधौ ।
व्रीडया चापमानेन सान्तर्धानं चकार ह ॥ ६ ॥
सर्वसिद्धेश्वरी देवी ज्ञानिनां सिद्धियोगिनी ।
जगामादर्शनं कोपात्सर्वत्र च हरेरहो ॥ ७ ॥
हरिर्न दृष्ट्वा तुलसीं बोधयित्वा सरस्वतीम् ।
तदनुज्ञां गहीत्वा च जगाम तुलसीवनम् ॥ ८ ॥
तत्र गत्वा च सुस्नातो हरिः स तुलसीं सतीम् ।
पूजयामास तां ध्यात्वा स्तोत्रं भक्त्या चकार ह ॥ ९ ॥
लक्ष्मीमायाकामवाणीबीजपूर्वं दशाक्षरम् ।
वृन्दावनीति ङेऽन्तं च वह्निजायान्तमेव च ॥ १० ॥
अनेन कल्पतरुणा मन्त्रराजेन नारद ।
पूजयेद्यो विधानेन सर्वसिद्धिं लभेद् ध्रुवम् ॥ ११ ॥
घृतदीपेन धूपेन सिन्दूरचन्दनेन च ।
नैवेद्येन च पुष्पेण चोपचारेण नारद ॥ १२ ॥
हरिस्तोत्रेण तुष्टा सा चाविर्भूता महीरुहात् ।
प्रसन्ना चरणाम्भोजे जगाम शरणं शुभा ॥ १३ ॥
वरं तस्यै ददौ विष्णुः सर्वपूज्या भवेरिति ।
अहं त्वां धारयिष्यामि सुरूपां मूर्ध्नि वक्षसि ॥ १४ ॥
सर्वे त्वां धारयिष्यन्ति स्वमूर्ध्नि च सुरादयः ।
इत्युक्त्वा तां गृहीत्वा च प्रययौ स्वालयं विभुः ॥ १५ ॥
नारद उवाच
किं ध्यानं स्तवनं किं वा किं वा पूजाविधानकम् ।
तुलस्याश्च महाभाग तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ १६ ॥
श्रीनारायण उवाच
अन्तर्हितायां तस्यां च हरिर्वृन्दावने तदा ।
तस्याश्चक्रे स्तुतिं गत्वा तुलसीं विरहातुरः ॥ १७ ॥
श्रीभगवानुवाच
वृन्दरूपाश्च वृक्षाश्च यदैकत्र भवन्ति च ।
विदुर्बुधास्तेन वृन्दां मत्प्रियां तां भजाम्यहम् ॥ १८ ॥
पुरा बभूव या देवी त्वादौ वृन्दावने वने ।
तेन वृन्दावनी ख्याता सौभाग्या तां भजाम्यहम् ॥ १९ ॥
असंख्येषु च विश्वेषु पूजिता या निरन्तरम् ।
तेन विश्वपूजिताऽऽख्यां पूजितां च भजाम्यहम् ॥ २० ॥
असंख्यानि च विश्वानि पवित्राणि त्वया सदा ।
तां विश्वपावनीं देवीं विरहेण स्मराम्यहम् ॥ २१ ॥
देवा न तुष्टाः पुष्पाणां समूहेन यया विना ।
तां पुष्पसारां शुद्धां च द्रष्टुमिच्छामि शोकतः ॥ २२ ॥
विश्वे यत्प्राप्तिमात्रेण भक्तानन्दो भवेद् ध्रुवम् ।
नन्दिनी तेन विख्याता सा प्रीता भवतादिह ॥ २३ ॥
यस्या देव्यास्तुला नास्ति विश्वेषु निखिलेषु च ।
तुलसी तेन विख्याता तां यामि शरणं प्रियाम् ॥ २४ ॥
कृष्णजीवनरूपा सा शश्वत्प्रियतमा सती ।
तेन कृष्णजीवनी सा सा मे रक्षतु जीवनम् ॥ २५ ॥
इत्येवं स्तवनं कृत्वा तस्थौ तत्र रमापतिः ।
ददर्श तुलसीं साक्षात्पादपद्मनतां सतीम् ॥ २६ ॥
रुदतीमवमानेन मानिनीं मानपूजिताम् ।
प्रियां दृष्ट्वा प्रियः शीघ्रं वासयामास वक्षसि ॥ २७ ॥
भारत्याज्ञां गहीत्वा च स्वालयं च ययौ हरिः ।
भारत्या सह तत्प्रीतिं कारयामास सत्वरम् ॥ २८ ॥
वरं विष्णुर्ददौ तस्यै सर्वपूज्या भवेरिति ।
शिरोधार्या च सर्वेषां वन्द्या मान्या ममेति च ॥ २९ ॥
विष्णोर्वरेण सा देवी परितुष्टा बभूव च ।
सरस्वती तामाकृष्य वासयामास सन्निधौ ॥ ३० ॥
लक्ष्मीर्गङ्गा सस्मिता च तां समाकृष्य नारद ।
गृहं प्रवेशयामास विनयेन सतीं तदा ॥ ३१ ॥
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी ।
पुष्पसारा नन्दनी च तुलसी कृष्णजीवनी ॥ ३२ ॥
एतन्नामाष्टकञ्चैव स्तोत्रं नामार्थसंयुतम् ।
यः पठेत्तां च संपूज्य सोऽश्वमेधफलं लभेत् ॥ ३३ ॥
कार्तिक्यां पूर्णिमायां च तुलस्या जन्म मङ्गलम् ।
तत्र तस्याश्च पूजा च विहिता हरिणा पुरा ॥ ३४ ॥
तस्यां यः पूजयेत्तां च भक्त्या वै विश्वपावनीम् ।
सर्वपापाद्विनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति ॥ ३५ ॥
कार्तिके तुलसीपत्रं यो ददाति च विष्णुवे ।
गवामयुतदानस्य फलं प्राप्नोति निश्चितम् ॥ ३६ ॥
अपुत्रो लभते पुत्रं प्रियाहीनो लभेत्प्रियाम् ।
बन्धुहीनो लभेद् बन्धून् स्तोत्रश्रवणमात्रतः ॥ ३७ ॥
रोगी प्रमुच्यते रोगाद् बद्धो मुच्येत बन्धनात् ।
भयान्मुच्येत भीतस्तु पापान्मुच्येत पातकी ॥ ३८ ॥
इत्येवं कथितं स्तोत्रं ध्यानं पूजाविधिं शृणु ।
त्वमेव वेदे जानासि कण्वशाखोक्तमेव च ॥ ३९ ॥
तद्वृक्षे पूजयेत्तां च भक्त्या चावाहनं विना ।
तां ध्यात्वा चोपचारेण ध्यानं पातकनाशनम् ॥ ४० ॥
तुलसीं पुष्पसारां च सतीं पूतां मनोहराम् ।
कृतपापेध्मदाहाय ज्वलदग्निशिखोपमाम् ॥ ४१ ॥
पुष्पेषु तुलना यस्या नास्ति वेदेषु भाषितम् ।
पवित्ररूपा सर्वासु तुलसी सा च कीर्तिता ॥ ४२ ॥
शिरोधार्या च सर्वेषामीप्सिता विश्वपावनी ।
जीवन्मुक्तां मुक्तिदां च भजे तां हरिभक्तिदाम् ॥ ४३ ॥
इति ध्यात्वा च संपूज्य स्तुत्वा च प्रणमेत्सुधीः ।
उक्तं तुलस्युपाख्यानं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ४४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे
तुलसीपूजाविधिवर्णनं नाम पञ्चविशोऽध्यायः ॥ २५ ॥
तुलसीची पूजा -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, "हे मुने, तुलसी पूजेचे विधी व तिचे स्तोत्र तुम्ही मला सांगा. तिची प्रथम पूजा कुणी केली ?" नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, तुलसीची पूजा करून हरीने रमेशी क्रीडा केली. तिला आपली पत्नी केले. गंगा व लक्ष्मी यांनी हे सहन केले, पण तिचा गौरव सरस्वतीला आवडला नाही. कलह उपस्थित करून सरस्वतीने तुलसीला ताडण केले. तेव्हा तुलसी गुप्त झाली. ती सर्वांची सिद्धीदेवता हरीला कोठेही दिसेना.
सरस्वतीची समजूत घालून हरी तुलसीवनात गेला. तेथे स्नानाने शुचिर्भूत होऊन त्याने तुलसीचे पूजन केले. तिचे स्तोत्र गाइले.
श्रीबीज, भुवनेश्वरीबीज, मन्मथबीज, वाग्भवबीज यांसह हे चार चरणी पद, पदांती दशाक्षरीमंत्र करून स्तोत्र केले. तुपाचा दिवा, धूप, शेंदूर, चंदन, नैवेद्य, पुष्पे, उपहार, स्तोत्र यामुळे तुलसी प्रसन्न झाली व वृक्षातून साकार झाली. ती हरीच्या चरणाजवळ गेली. तेव्हा विष्णु म्हणाले, "तू सर्वांना पूज्य हो. मी तुला वृक्षावर व मस्तकावर धारण करीन."
असे तिला वचन देऊन तुलसीला घेऊन हरी स्वस्थानी गेला. प्रथम विरहाने व्याकुळ झाल्यावर भगवान तिला म्हणाला, "वृंदारूपी वृक्ष एकत्र आल्यावर माझी प्रिया वृंदा हिला हाका मारतात. मी तिचे भजन करतो. ती जेथे वसती करते त्याला वृंदावन म्हणतात. त्या सौभाग्यवतीची मी भक्ती करतो. ती विश्वपूजिता असून तिच्यामुळे अनेक विश्व ब्रह्मांडे पवित्र झाली आहेत. तिच्यावाचून इतर पुष्पांमुळे देव संतुष्ट होत
नाहीत. तिच्या भक्तीमुळेच सर्वांना आनंद मिळतो. म्हणून ती नंदिनी या नावाने प्रसिद्ध होईल. तिला कुठेही तुलना नसल्याने तिला तुलसी म्हणतात. ती कृष्णाची प्रिया आहे. म्हणून ती कृष्णजीवनी होय. ती माझे रक्षण करो."
अशारीतीने स्तवन केल्यावर त्याने आपल्या चरणाजवळ तुलसीला अवलोकन केले. त्या मानी प्रियेला त्याने वक्षस्थली स्थान दिले. सरस्वतीच्या आज्ञेने त्याने तिला वैकुंठास आणले. नंतर तिचे सख्य करून दिले. तेव्हा सरस्वतीनेही तिला जवळ घेतले. लक्ष्मी, गंगा, सरस्वती यांनी त्या साध्वीला आनंदाने घरात नेले.
वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपाविनी, पुष्पसारा, नंदनी, तुलसी, कृष्णजीवनी वगैरे नावांनी तिची पूजा केल्यास मोक्ष मिळतो.
तुलसीच्या जन्मवेळी हरीने तिची पूजा केली. म्हणून तिची पूजा करणार्यास विष्णुलोक मिळतो. कार्तिकात वैष्णवाला तुलसीपत्र दान केल्यास दहा हजार गाईंचे दान केल्याचे पुण्य मिळते. तिचे स्तोत्र म्हणणार्यास पुत्र होतो. शिवाय जो जी इच्छा करील ते त्याला प्राप्त होईल. असे हरीने तिचे महत्त्व सांगितले आहे.
वेदातील कण्वशाखेत असे सांगितले आहे की, आवाहनाशिवाय तुलसीचे पूजन करावे म्हणजे पापनाश होतो. पुष्पसारभूत, स्वाधी, पवित्र मनोहर अशा तुलसीचे पूजन करावे. तिच्या पुष्पाची बरोबरी करणारे पुष्प त्रिभुवनात नाही. तुलसी सर्वात पवित्र आहे. ती जीवनमुक्ती देते. हरीभक्ती देते. अशा त्या देवीची मीही सेवा करतो. ध्यानपूर्वक तिची पूजा करतो. ज्ञानी पुरुषाने तिचे पूजन करावे.