श्रीनारायण उवाच
अथर्षिमण्डलादूर्ध्वं योजनानां प्रमाणतः ।
लक्षैस्त्रयोदशमितैः परमं वैष्णवं पदम् ॥ १ ॥
महाभागवतः श्रीमान् वर्तते लोकवन्दितः ।
औत्तानपादिरिन्द्रेण वह्निना कश्यपेन च ॥ २ ॥
धर्मेण सह चैवास्ते समकालयुजा ध्रुवः ।
बहुमानं दक्षिणतः कुर्वद्भिः प्रेक्षकैः सदा ॥ ३ ॥
आजीव्यः कल्पजीविनामुपास्ते भगवत्पदम् ।
ज्योतिर्गणानां सर्वेषां ग्रहनक्षत्रभादिनाम् ॥ ४ ॥
कालेनानिमिषेणायं भ्राम्यतां व्यक्तरंहसा ।
अवष्टम्भस्थाणुरिव विहितश्चेश्वरेण सः ॥ ५ ॥
भासते भासयन्भासा स्वीयया देवपूजितः ।
मेढिस्तम्भे यथा युक्ताः पशवः कर्षणार्थकाः ॥ ६ ॥
मण्डलानि चरन्तीमे सवनत्रितयेन च ।
एवं ग्रहादयः सर्वे भगणाद्या यथाक्रमम् ॥ ७ ॥
अन्तर्बहिर्विभागेन कालचक्रे नियोजिताः ।
ध्रुवमेवावलम्ब्याशु वायुनोदीरिताश्च ते ॥ ८ ॥
आकल्पान्तं च क्रमन्ति खे श्येनाद्याः खगा इव ।
कर्मसारथयो वायुवशगाः सर्व एव ते ॥ ९ ॥
एवं ज्योतिर्गणाः सर्वे प्रकृतेः पुरुषस्य च ।
संयोगानुगृहीतास्ते भूमौ न निपतन्ति च ॥ १० ॥
ज्योतिश्चक्रं केचिदेतच्छिशुमारस्वरूपकम् ।
सोपयोगं भगवतो योगधारणकर्मणि ॥ ११ ॥
यस्यार्वाक्शिरसः कुण्डलीभूतवपुषो मुने ।
पुच्छाग्रे कल्पितो योऽयं ध्रुव उत्तानपादजः ॥ १२ ॥
लाङ्गूलेऽस्य च सम्प्रोक्तः प्रजापतिरकल्मषः ।
अग्निरिन्द्रश्च धर्मश्च तिष्ठन्ते सुरपूजिताः ॥ १३ ॥
धाता विधाता पुच्छान्ते कट्यां सप्तर्षयस्ततः ।
दक्षिणावर्तभोगेन कुण्डलाकारमीयुषः ॥ १४ ॥
उत्तरायणभानीह दक्षपार्श्वेऽर्पितानि च ।
दक्षिणायनभानीह सव्ये पार्श्वेऽर्पितानि च ॥ १५ ॥
कुण्डलाभोगवेशस्य पार्श्वयोरुभयोरपि ।
समसंख्याश्चावयवा भवन्ति कजनन्दन ॥ १६ ॥
अजवीथी पृष्ठभागे आकाशसरिदौदरे ।
पुनर्वसुश्च पुष्यश्च श्रोण्यौ दक्षिणवामयोः ॥ १७ ॥
आर्द्राश्लेषे पश्चिमयोः पादयोर्दक्षवामयोः ।
अभिजिच्चोत्तराषाढा नासयोर्दक्षवामयोः ॥ १८ ॥
यथासंख्यं च देवर्षे श्रुतिश्च जलभं तथा ।
कल्पिते कल्पनाविद्भिर्नेत्रयोर्दक्षवामयोः ॥ १९ ॥
धनिष्ठा चैव मूलं च कर्णयोर्दक्षवामयोः ।
मघादीन्यष्टभानीह दक्षिणायनगानि च ॥ २० ॥
युञ्जीत वामपार्श्वीयवंक्रिषु क्रमतो मुने ।
तथैव मृगशीर्षादीन्युदग्भानि च यानि हि ॥ २१ ॥
दक्षपार्श्वे वंक्रिकेषु प्रातिलोम्येन योजयेत् ।
शततारा तथा ज्येष्ठा स्कन्धयोर्दक्षवामयोः ॥ २२ ॥
अगस्तिश्चोत्तरहनावधरायां हनौ यमः ।
मुखेष्वङ्गारकः प्रोक्तो मन्दः प्रोक्त उपस्थके ॥ २३ ॥
बृहस्पतिश्च ककुदि वक्षस्यर्को ग्रहाधिपः ।
नारायणश्च हृदये चन्द्रो मनसि तिष्ठति ॥ २४ ॥
स्तनयोरश्विनौ नाभ्यामुशनाः परिकीर्तितः ।
बुधः प्राणापानयोश्च गले राहुश्च केतवः ॥ २५ ॥
सर्वाङ्गेषु तथा रोमकूपे तारागणाः स्मृताः ।
एतद्भगवतो विष्णोः सर्वदेवमयं वपुः ॥ २६ ॥
सन्ध्यायां प्रत्यहं ध्यायेत्प्रयतो वाग्यतो मुनिः ।
निरीक्षमाणश्चोत्तिष्ठेन्मन्त्रेणानेन धीश्वरः ॥ २७ ॥
नमो ज्योतिर्लोकाय कालायानिमिषां
पतये महापुरुषायाभिधीमहीति ॥ २८ ॥
ग्रहर्क्षतारामयमाधिदैविकं
पापापहं मन्त्रकृतां त्रिकालम् ।
नमस्यतः स्मरतो वा त्रिकालं
नश्येत तत्कालजमाशु पापम् ॥ २९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
ध्रुवमण्डलसंस्थानवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
ध्रुव मंडलाच्या भ्रमणाचे वर्णन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, आता यापुढील सर्व ग्रहांची भ्रमणे मी तुला सांगणार आहे. आता तुला सर्वोत्तम मंडलाचे वर्णन सांगतो.
सप्तर्षीच्या मंडलाच्या पुढे तेरा लक्ष योजने अंतरावर त्या भगवान विष्णूचे सर्वोत्तम स्थान आहे. सर्व लोकांना अत्यंत पूज्य असलेला तो उत्कृष्ट बाल भगवद्भक्त श्रीमान असा ध्रुव वास्तव्य करतो. तो उत्तानपादराजाचा पुत्र आहे. तो ध्रुव, इंद्र, अग्नी, कश्यप व एकाच कालांनी परिपूर्ण अशा धर्मासह त्या ठिकाणी रहात आहे. दक्षिणेकडील सर्व ग्रह व इतर प्रेक्षक त्याचा बहुमान करतात.
हा ध्रुव एक कल्पभर जिवंत रहाणार्यांनाही जीवन देत असतो. तो भगवंताच्या पदाची नित्य उपासना करीत काल व्यतीत करीत असतो. त्याचा वेग भ्रमणाच्या दृष्टीने अस्पष्ट आहे. तसेच तो असंख्य कालपर्यंत भ्रमण करतो. त्याची कालगणना करणे कठीण आहे. अशा कालगणनेपलीकडे असलेल्या नक्षत्रांप्रमाणे सर्व ज्योतिर्गणांच्या आधारे त्याला ईश्वराने आधारस्तंभाप्रमाणे जणू काय स्थिरच करून ठेवले आहे.
त्या बाल ध्रुवाची प्रत्यक्ष देवही पूजा करतात. तो स्वतःच्या प्रकाशाने युक्त असून इतरांनाही आपला प्रकाश देत असतो. कारण तो स्वयंप्रकाशी आहे. मेढीला बांधलेले बैल जसे सदासर्वकाल घाणाच ओढीत असतात तसे हा ध्रुव सर्व नक्षत्रे व ग्रह यांच्या समुदायाने क्रमाक्रमाने फिरत असतो. अंतर्बाह्य विभाग करून कालचक्रात जे ग्रह योजले आहेत ते सर्वजण या ध्रुवाचा मेढीप्रमाणे उपयोग करतात व कालचक्रात भ्रमण करीत रहातात. त्या इतर ग्रहांना वायू प्रेरणा करतो.
आकाशात ज्याप्रमाणे श्येन, खग इत्यादि पक्षी भ्रमण करीत असतात त्याप्रमाणे ते कल्पाच्या अंतापर्यंत तसेच फिरत असतात. कर्म हाच त्यांचे सारथ्य करीत असतो. ते ग्रह सर्व बाजूंनी वायूच्या आधीन होऊन राहिलेले असतात. अशाप्रकारे त्या ध्रुवामुळे सर्व जोतिर्गणांना आधार मिळाला आहे. कारण प्रकृती व पुरुष यांच्या संयोगाने त्याच्यावर अनुग्रह केल्यामुळे ते भूमीवर पडत नाहीत.
शिशुमार चक्राप्रमाणे असलेले हे ज्योतिष्चक्र खद्योगासह भगवानाच्या योग धारणेमध्ये स्थिर आहे असे काही जण सांगतात.
हे मुनीश्वरा, ज्याचे मस्तक पूर्वेकडे आहे व ज्याचा आकार पूर्णाकृति कुंडलाप्रमाणे आहे, अशा त्या चक्राच्या पुच्छाच्या टोकावर हा उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव आहे अशी कल्पना केली आहे. त्याच्या शेपटावर पूर्वीच सांगितल्याप्रमाणे व देवांना पूज्य असलेले अकल्मष, प्रजापती, इंद्र, अग्नी व धर्म हे रहात असतात.
धाता, विधाता हे पुच्छाच्या शेवटी आणि सप्तर्षी कटिप्रदेशी असतात व ते दक्षिणावर्त भोग घेऊ लागल्यामुळे कुंडलाकृति होतात. या दक्षाच्या बाजूला उत्तरायणासंबंधी अभिजितपासून पुनर्वसूपर्यंत सर्व नक्षत्रे आणि दक्षिण बाजूला दक्षिणायनासंबंधी पुष्यापासून उत्ताराषाढा नक्षत्रांपर्यंत इतर नक्षत्रे योजली आहेत हे ध्यानात ठेव. हे ब्रह्मपुत्र नारदा, याप्रमाणे कुंडलाच्या विस्तार प्रदेशाच्या दोन्ही बाजूला अवयवांसारखे स्थिर असतात. त्याच्या पृष्ठभागी अजवीथी व उदरात आकाशगंगा आहेत. पुनर्वसु व पुष्य या उजव्या डाव्या श्रोणीच आहेत. मागील बाजूस उजव्या व डाव्या बाजूवरील पायावर आर्द्रा व आश्लेषा, तसेच उजव्या व डाव्या नाकपुड्यांवर अभिजित व उत्तराषाढा अशा क्रमाने असतात.
हे देवर्षे, जाणकारांनी अशी कल्पना केली आहे की, श्रवण व पूर्वाषाढा ही दोन्ही नक्षत्रे उजव्या व डाव्या नेत्रांचे ठिकाणी आहेत असे म्हणतात. तसेच उजव्या व डाव्या कर्णाचे ठिकाणी धनिष्ठा व मूल या नक्षत्रांची गणना केली आहे.
हे नारदा, दक्षिणायनामध्ये मघा इत्यादि उरलेली नक्षत्रे आहेत. त्यांची उजव्या व डाव्या अस्थींचे ठिकाणी योजना केली आहे. तसेच मृगशीर्ष वगैरे उत्तरायणात जी नक्षत्रे आहेत त्यांची उलट बाजूने उजव्या आणि डाव्या अस्थींचे ठिकाणी योजने केली आहे.
शततारका व ज्येष्ठा यांची योजना उजव्या व डाव्या खांद्याचे ठिकाणी करावी, तसेच वरच्या हनुवटी भागावर अगस्ती, खालच्या हनुवटीवर यम, मुखाचे भागावर मंगळ, उपस्थाचे भागी शनी अशी क्रमवार योजना करावी असे पूर्वी सांगून ठेवले आहे.
या सर्व योजनेप्रमाणे पाठीवर बृहस्पती आहे. अशी कल्पना करावी. ग्रहांचा अधिपती सूर्य हा वक्षस्थलावर योजावा. हृदयस्थलावर नारायण, मनाचे स्थानी चंद्र याप्रमाणे ह्यांची वसतीस्थाने आहेत. दोन अश्विनी नक्षत्रे दोन्ही स्तनांवर असून शुक्र नाभीचे ठिकाणी आहे. प्राण व अपान यांचे ठिकाणी बुध आहे तर कंठात राहू आणि केतू आहेत अशी कल्पना करावी. तसेच सर्व शरीरावर असलेल्या रोमरंध्राचे ठिकाणी सर्व तारांगना आहेत अशी कल्पना शास्त्रवेत्त्यांनी केली आहे.
हे सर्व शरीर देवमय असून भगवान विष्णूचे निधान आहे. संध्याकाळचे वेळी ज्ञानेंद्रियांचे नियमन करावे आणि मौन धारण करावे. मुनींचे ध्यान करून मंत्रोच्चाराने त्यांचेच निरीक्षण करीत बुद्धिमान पुरुषाने उठावे, असे नित्य आचरण करावे.
"ज्योतिर्लोक, काल, चिरंजीवी प्राण्यांचे स्वामी व महापुरुष अशा त्या ईश्वराला नमस्कार असो. आम्ही त्याचेच ध्यान करीत असतो." असा तो नित्य पठणाचा मंत्र आहे.
ग्रह, नक्षत्र व तारामय अंतरिक्ष, आधिदैविक व मंत्रवेत्त्यांच्या पापाचा प्रत्यक्ष नाश करणारे असे स्वरूप त्या स्वरूपाला जो तिन्ही काल नमस्कार करतो व त्याचप्रमाणे त्याचे सर्व वेळ स्मरण करतो, त्याचे तो सर्वसाक्षी प्रभू तिन्ही कालातील पाप नाहीसे करून टाकतो.