व्यास उवाच
अथ प्रमुदिताः सर्वे देवा इन्द्रपुरोगमाः ।
महिषं निहतं दृष्ट्वा तुष्टुवुर्जगदम्बिकाम् ॥ १ ॥
देवा ऊचुः
ब्रह्मा सृजत्यवति विष्णुरिदं महेशः
शक्त्या तवैव हरते ननु चान्तकाले ॥
ईशा न तेऽपि च भवन्ति तया विहीना-
स्तस्मात्त्वमेव जगतः स्थितिनाशकर्त्री ॥ २ ॥
कीर्तिर्मतिः स्मृतिगती करुणा दया त्वं
श्रद्धा धृतिश्च वसुधा कमलाजपा च ।
पुष्टिः कलाथ विजया गिरिजा जया त्वं
तुष्टिः प्रमा त्वमसि बुद्धिरुमा रमा च ॥ ३ ॥
विद्या क्षमा जगति कान्तिरपीह मेधा
सर्वं त्वमेव विदिता भुवनत्रयेऽस्मिन् ।
आभिर्विना तव तु शक्तिभिराशु कर्तुं
को वा क्षमः सकललोकनिवासभूमे ॥ ४ ॥
त्वं धारणा ननु न चेदसि कूर्मनागौ
धर्तुं क्षमौ कथमिलामपि तौ भवेताम् ।
पृथ्वी न चेत्त्वमसि वा गगने कथं स्था-
स्यत्येतदम्ब निखिलं बहुभारयुक्तम् ॥ ५ ॥
ये वा स्तुवन्ति मनुजा अमरान्विमूढा
मायागुणैस्तव चतुर्मुखविष्णुरुद्रान् ।
शुभ्रांशुवह्नियमवायुगणेशमुख्यान्
किं त्वामृते जननि ते प्रभवन्ति कार्ये ॥ ६ ॥
ये जुह्वति प्रविततेऽल्पधियोऽम्ब यज्ञे
वह्नौ सुरान्समधिकृत्य हविः समृद्धम् ।
स्वाहा न चेत्त्वमसि ते कथमापुरद्धा
त्वामेव किं न हि यजन्ति ततो हि मूढाः ॥ ७ ॥
भोगप्रदासि भवतीह चराचराणां
स्वांशैर्ददासि खलु जीवनमेव नित्यम् ।
स्वीयान्सुराञ्जननि पोषयसीह यद्व-
त्तद्वत्परानपि च पालयसीति हेतोः ॥ ८ ॥
मातः स्वयंविरचितान्विपिने विनोदा-
द्वन्ध्यान्पलाशरहितांश्च कटूंश्च वृक्षान् ।
नोच्छेदयन्ति पुरुषा निपुणाः कथञ्चि-
त्तस्मात्त्वमप्यतितरां परिपासि दैत्यान् ॥ ९ ॥
यत्त्वं तु हंसि रणमूर्ध्नि शरैरराती-
न्देवाङ्गनासुरतकेलिमतीन्विदित्वा ।
देहान्तरेऽपि करुणारसमाददाना
तत्ते चरित्रमिदमीप्सितपूरणाय ॥ १० ॥
चित्रं त्वमी यदसुभी रहिता न सन्ति
त्वच्चिन्तितेन दनुजाः प्रथितप्रभावाः ।
येषां कृते जननि देहनिबन्धनं ते
क्रीडारसस्तव न चान्यतरोऽत्र हेतुः ॥ ११ ॥
प्राप्ते कलावहह दुष्टतरे च काले
न त्वां भजन्ति मनुजा ननु वञ्चितास्ते ।
धूर्तैः पुराणचतुरैर्हरिशङ्कराणां
सेवापराश्च विहितास्तव निर्मितानाम् ॥ १२ ॥
ज्ञात्वा सुरांस्तव वशानसुरार्दितांश्च
ये वै भजन्ति भुवि भावयुता विभग्नान् ।
धृत्वा करे सुविमलं खलु दीपकं ते
कूपे पतन्ति मनुजा विजलेऽतिघोरे ॥ १३ ॥
विद्या त्वमेव सुखदासुखदाप्यविद्या
मातस्त्वमेव जननार्तिहरा नराणाम् ।
मोक्षार्थिभिस्तु कलिता किल मन्दधीभि-
र्नाराधिता जननि भोगपरैस्तथाज्ञैः ॥ १४ ॥
ब्रह्मा हरश्च हरिरप्यनिशं शरण्यं
पादाम्बुजं तव भजन्ति सुरास्तथान्ये ।
तद्वै न येऽल्पमतयो मनसा भजन्ति
भ्रान्ताः पतन्ति सततं भवसागरे ते ॥ १५ ॥
चण्डि त्वदङ्घ्रिजलजोत्थरजःप्रसादै-
र्ब्रह्मा करोति सकलं भुवनं भवादौ ।
शौरिश्च पाति खलु संहरते हरस्तु
त्वां सेवते न मनुजस्त्विह दुर्भगोऽसौ ॥ १६ ॥
वाग्देवता त्वमसि देवि सुरासुराणां
वक्तुं न तेऽमरवराः प्रभवन्ति शक्ताः ।
त्वं चेन्मुखे वससि नैव यदैव तेषां
यस्माद्भवन्ति मनुजा न हि तद्विहीनाः ॥ १७ ॥
शप्तो हरिस्तु भृगुणा कुपितेन कामं
मीनो बभूव कमठः खलु सूकरस्तु ।
पश्चान्नृसिंह इति यश्छलकृद्धरायां
तान्सेवतां जननि मृत्युभयं न किं स्यात् ॥ १८ ॥
शम्भोः पपात भुवि लिङ्गमिदं प्रसिद्धं
शापेन तेन च भृगोर्विपिने गतस्य ।
तं ये नरा भुवि भजन्ति कपालिनं तु
तेषां सुखं कथमिहापि परत्र मातः ॥ १९ ॥
योऽभूद् गजाननगणाधिपतिर्महेशा-
त्तं ये भजन्ति मनुजा वितथप्रपन्नाः ।
जानन्ति ते न सकलार्थफलप्रदात्रीं
त्वां देवि विश्वजननीं सुखसेवनीयाम् ॥ २० ॥
चित्रं त्वयारिजनतापि दयार्द्रभावा-
द्धत्वा रणे शितशरैर्गमिता द्युलोकम् ।
नोचेत्स्वकर्मनिचिते निरये नितान्तं
दुःखातिदुःखगतिमापदमापतेत्सा ॥ २१ ॥
ब्रह्मा हरश्च हरिरप्युत गर्वभावा-
ज्जानन्ति तेऽपि विबुधा न तव प्रभावम् ।
केऽन्ये भवन्ति मनुजा विदितुं समर्थाः
सम्मोहितास्तव गुणैरमितप्रभावैः ॥ २२ ॥
क्लिश्यन्ति तेऽपि मुनयस्तव दुर्विभाव्यं
पादाम्बुजं न हि भजन्ति विमूढचित्ताः ।
सूर्याग्निसेवनपराः परमार्थतत्त्वं
ज्ञातं न तैः श्रुतिशतैरपि वेदसारम् ॥ २३ ॥
मन्ये गुणास्तव भुवि प्रथितप्रभावाः
कुर्वन्ति ये हि विमुखान्ननु भक्तिभावात् ।
लोकान्स्वबुद्धिरचितैर्विविधागमैश्च
विष्ण्वीशभास्करगणेशपरान्विधाय ॥ २४ ॥
कुर्वन्ति ये तव पदाद्विमुखान्नराग्र्या-
न्स्वोक्तागमैर्हरिहरार्चनभक्तियोगैः ।
तेषां न कुप्यसि दयां कुरुषेऽम्बिके त्वं
तान्मोहमन्त्रनिपुणान्प्रथयस्यलं च ॥ २५ ॥
तुर्ये युगे भवति चातिबलं गुणस्य
तुर्यस्य तेन मथितान्यसदागमानि ।
त्वां गोपयन्ति निपुणाः कवयः कलौ वै
त्वत्कल्पितान्सुरगणानपि संस्तुवन्ति ॥ २६ ॥
ध्यायन्ति मुक्तिफलदां भुवि योगसिद्धां
विद्यां पराञ्च मुनयोऽतिविशुद्धसत्त्वाः ।
ते नाप्नुवन्ति जननीजठरे तु दुःखं
धन्यास्त एव मनुजास्त्वयि ये विलीनाः ॥ २७ ॥
चिच्छक्तिरस्ति परमात्मनि येन सोऽपि
व्यक्तो जगत्सु विदितो भवकृत्यकर्ता ।
कोऽन्यस्त्वया विरहितः प्रभवत्यमुष्मिन्
कर्तुं विहर्तुमपि सञ्चलितुं स्वशक्त्या ॥ २८ ॥
तत्त्वानि चिद्विरहितानि जगद्विधातुं
किं वा क्षमाणि जगदम्ब यतो जडानि ।
किं चेन्द्रियाणि गुणकर्मयुतानि सन्ति
देवि त्वया विरहितानि फलं प्रदातुम् ॥ २९ ॥
देवा मखेष्वपि हुतं मुनिभिः स्वभागं
गृह्णीयुरम्ब विधिवत्प्रतिपादितं किम् ।
स्वाहा न चेत्त्वमसि तत्र निमित्तभूता
तस्मात्त्वमेव ननु पालयसीव विश्वम् ॥ ३० ॥
सर्वं त्वयेदमखिलं विहितं भवादौ
त्वं पासि वै हरिहरप्रमुखान्दिगीशान् ।
कालेऽत्सि विश्वमपि ते चरितं भवाद्यं
जानन्ति नैव मनुजाः क्व नु मन्दभाग्याः ॥ ३१ ॥
हत्वासुरं महिषरूपधरं महोग्रं
मातस्त्वया सुरगणः किल रक्षितोऽयम् ।
कां ते स्तुतिं जननि मन्दधियो विदामो
वेदा गतिं तव यथार्थतया न जग्मुः ॥ ३२ ॥
कार्यं कृतं जगति नो यदसौ दुरात्मा
वैरी हतो भुवनकण्टकदुर्विभाव्यः ।
कीर्तिः कृता ननु जगत्सु कृपा विधेया-
प्यस्मांश्च पाहि जननि प्रथितप्रभावे ॥ ३३ ॥
व्यास उवाच
एवं स्तुता सुरैर्देवी तानुवाच मृदुस्वरा ।
अन्यत्कार्यं च दुःसाध्यं ब्रुवन्तु सुरसत्तमाः ॥ ३४ ॥
यदा यदा हि देवानां कार्यं स्यादतिदुर्घटम् ।
स्मर्तव्याहं तदा शीघ्रं नाशयिष्यामि चापदम् ॥ ३५ ॥
देवा ऊचुः
सर्वं कृतं त्वया देवि कार्यं नः खलु साम्प्रतम् ।
यदयं निहतः शत्रुरस्माकं महिषासुरः ॥ ३६ ॥
स्मरिष्यामो यथा तेऽम्ब सदैव पदपङ्कजम् ।
तथा कुरु जगन्मातर्भक्तिं त्वय्यप्यचञ्चलाम् ॥ ३७ ॥
अपराधसहस्राणि मातैव सहते सदा ।
इति ज्ञात्वा जगद्योनिं न भजन्ते कुतो जनाः ॥ ३८ ॥
द्वौ सुपर्णो तु देहेऽस्मिंस्तयोः सख्यं निरन्तरम् ।
नान्यः सखा तृतीयोऽस्ति योऽपराधं सहेत हि ॥ ३९ ॥
तस्माज्जीवः सखायं त्वां हित्वा किं नु करिष्यति ।
पापात्मा मन्दभाग्योऽसौ सुरमानुषयोनिषु ॥ ४० ॥
प्राप्य देहं सुदुष्प्रापं न स्मरेत्त्वां नराधमः ।
मनसा कर्मणा वाचा ब्रूमः सत्यं पुनः पुनः ॥ ४१ ॥
सुखे वाप्यथवा दुःखे त्वं नः शरणमद्भुतम् ।
पाहि नः सततं देवि सर्वैस्तव वरायुधैः ॥ ४२ ॥
अन्यथा शरणं नास्ति त्वत्पादाम्बुजरेणुतः ।
व्यास उवाच
एवं स्तुता सुरैर्देवी तत्रैवान्तरधीयत ।
विस्मयं परमं जग्मुर्देवास्तां वीक्ष्य निर्गताम् ॥ ४३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे
देवीसान्त्वनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
भगवतीचा देवांना वर -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, "हे राजा, महिषासुराचा वध झाल्यामुळे आनंदित झालेले इंद्रादि देव जगदंबेची स्तुती करू लागले."
देव म्हणाले, "हे देवी, ब्रह्मदेव तुझ्याच शक्तीने सृष्टी उत्पन्न करतो, विष्णु तुझ्याच शक्तीने तिचे पालन करतो व महेश तुझ्या शक्तीमुळेच प्रलयकाळी तिचा संहार करतो, शक्तिहीन असलेले ते ज्या अर्थी ही कृत्ये करण्यास समर्थ होत नाहीत त्याअर्थी जगताची उत्पत्ती, स्थिती, लय तूच करतेस. कीर्ति, मति, स्मृति, गति, करुणा, दया, श्रद्धा, धृति, वसुधा, कमला, पुष्टि, कला, विजया, गिरिजा, जया, तुष्टि, प्रभा, बुद्धि, कांति व मेधा वगैरे सर्व या जगतामध्ये तूच आहेस.
तूच या त्रैलोक्यात विख्यात आहेस. या तुझ्या शक्तिशिवाय जगात व्यवहार करण्यास कोण समर्थ आहे ? तूच धारणाशक्ती असल्याने कूर्म व नाग पृथ्वी धारण करण्यास समर्थ झाले. तूच असामान्य शक्ती आहेस.
म्हणूनच हे जग अंतरिक्षात स्थिर आहे. जे मानव ब्रह्मा, विष्णु, महेश्वर, चंद्र, अग्नी, यम, वायु, गणेश वगैरे मुख्य देवांचे स्तवन करतात ते तुझ्या मायागुणांनी मूढच झाले आहेत. कारण हे माते, देव तुझ्याशिवाय कोणतेही कार्य करण्यास समर्थ नाहीत.
त्याचप्रमाणे यज्ञात देवांना उद्देशून जे विपुल हविर्द्रव्याचे हवन करतात तेही अल्पमतीच होत. कारण तूच जर स्वाहारूप नसतीस तर देवांना हविर्भाग कसा प्राप्त झाला असता ! मग तुलाच का बरे यजन करीत नाहीत ! म्हणून ते मूढ आहेत. चराचर प्राण्यांना भोग देणारी तूच आहे. तुझ्यामुळेच ते जिवंत रहातात. हे माते, स्वकीय देवांचे ज्याप्रमाणे तू पोषण करतेस, त्याचप्रमाणे असुरांचेही पालन करीत असतेस. हे माते, बागेत स्वत: लावलेले वृक्ष जरी फल- पर्णरहित व कटु असले तरी सुद्धा प्राज्ञजन त्याचा उच्छेद करीत नाहीत. म्हणूनच तूही दैत्यांचे पालन करीत असतेस.
हे माते, दुसरा देह धारण करून तू देवांगनांच्या क्रीडेचे सुख प्राप्त होण्यासाठी इच्छा करणार्या दैत्यांचा आमचे शत्रू म्हणून आमचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच केला आहे. तू ज्यांच्यासाठी अवतार घेतलास ते दैत्य तुझ्या इच्छेनेच केवळ गतप्राण झाले असते.
अतिदुष्ट कलिकाल प्राप्त झाला तरी मानव तुला भजत नाहीत. त्यांना पुराणचतुर धूर्तांनी खरोखरच फसवले आहे. तू निर्माण केलेल्या विष्णु, रुद्र प्रभृती देवांच्या सेवेविषयी त्यांना तत्पर करून ठेवले आहेस.
हे सर्व देव दैत्यांकडून पराभूत झाल्यामुळे तुझ्या आधीन झाले आहे. त्यांचा अभिमान नाहीसा झाला आहे. असे माहित असूनही सर्व मानव देवांनाच भजतात. ते हातात उज्वल दीप घेऊनही निर्जल व अतिभयंकर कूपामध्ये पडतात.
हे जननी, सुखदायक विद्या व दु:खदायक अविद्या तूच असून तूच प्राण्यांचे जन्ममरणरूप दु:ख हरण करतेस. म्हणून मुमुक्षू तुझी आराधना करतात. ब्रह्मा, विष्णु, महेश व इतर देवांनी तुला शरण जावे अशी तुझी योग्यता असूनही विषयलंपट लोक देवांनाच भजतात. ते अल्पमती असून संसारसागरात गुरफटून पडतात.
हे चंडी तुझ्या चरणकमलापासून निघालेल्या रजः कणापासून ब्रह्मा सृष्टीची रचना करीत असतो, विष्गु पालन करतो व शिव संहार करतो. असे असूनही मानव तुझी सेवा करीत नाही हे त्यांचे दुर्भाग्य. हे देवी, तूच सर्वांची वाग्देवता असल्याने तूच मुखामध्ये वास्तव्य करतेस. म्हणूनच तर सुरश्रेष्ठ भाषण करतात. कारण मुख असले तरी मानव वाग्देवतारहित असल्यास कसा बोलू शकेल ?
हे माते, भृगूने कुद्ध होऊन खरोखर हरीला शाप दिल्यामुळे त्याला मस्त्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन ह्या रूपांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. तेव्हा विष्णू प्रभूती देवांची भक्ती करणार्यांना मृत्यूचे भय असते. हे माते, त्याच अरण्यात गेलेल्या भृगूऋषींच्या शापाने शंभूचे लिंग भूतलावर पतन पावले. जे पुरुष त्या रुद्राचे आराधना करतात त्यांना ऐहिक व पारलौकिक सुख कसे प्राप्त होणार ? गजाननाला भजणारे मानवही भ्रांतच होत. कारण तूच संपूर्ण पुरुषार्थ देणारी विश्वजननी असूनही ते तुझे आराधन
करणे जाणत नाहीत. तू दयाळू असल्यानेच शत्रूचा तीक्ष्ण बाणांनी वध करून त्यांना स्वर्गात पाठविलेस, नाही तर ते स्वकर्माने नरकात पडून राहिले असते व दु:खरूप संकटात पडले असते.
ब्रह्मा, विष्णु, महेशही गर्वामुळे तुझा प्रभाव जाणीत नाहीत, मग मानव तरी जाणण्यास कसे समर्थ होणार ? मोह झाल्याने जे मुनी सूर्य व अग्नीची उपासना करतात पण तुझ्या चरणकमलाची सेवा करीत नाहीत त्यांना क्लेशच प्राप्त होतात. त्यांना शृतींनी प्रतिपादलेले वेदसारभूत तत्व समजले नाही. ज्याचा प्रभाव या सर्वांवर आहे असे तुझे गुणच नाना प्रकारच्या आगमनांनी लोकांना विष्णु, शंकर, सूर्य, गणेश त्यांच्या सेवेविषयी तत्पर करून तुझ्या भक्तीपासून पराङ्मुख करीत असतात. तरीही हे देवते, तू त्यांच्यावर कोप न करता दयाच करीत असतेच. त्यांना तू धन, वंश इत्यादींच्या योगाने विस्तार करण्यास मदत करतेस. यावरून त्यांच्या प्रारब्धामुळे तूच त्यांची बुद्धी विपरीत केली आहेस हेच खरे.
सत्ययुगात तुझा सत्वगुण प्रबल होत असल्याने निंद्य आगमांचा नाश होतो. कलियुगात तुला गुप्त ठेवून तू निर्माण केलेल्या देवगणांचीच काही कवी स्तुती करीत असतात. अतिशुद्ध मुनी मात्र तूच योगसिद्ध पराविद्या असून मुक्तिफल देतेस म्हणून तुझे भूतलावर ध्यान करतात. म्हणून त्यांना पुनः जन्म घ्यावा लागत नाही. सारांश, तुझी आराधना करणारे पुरुष धन्य होत. परमात्म्याचे ठिकाणी तुझी चिद्शक्ती असल्याने तोही नामरूपांनी व्यक्त जगतामध्ये प्रसिद्ध आणि विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय करण्यास समर्थ होतो. तुझ्यावाचून स्वसामर्थ्याने या जगात कोणतेही कार्य, क्रीडा करण्यास कोण समर्थ आहे ? हे जगदंबे, चित्शक्तीरहित तत्वे जड असल्याने जगत् उत्पन्न करण्यास कशी समर्थ होणार ? त्याचप्रमाणे गुणकर्मयुक्त इंद्रिये तरी तुझ्याशिवाय कोठून फल देणार ? हे अंबे, तू जर नसशील तर यज्ञात अर्पण केलेला हविर्भाग देवांना कसा प्राप्त होईल ? तूच विश्वपालक आहेस.
हे संपूर्ण जगत् तूच उत्पन्न केले आहेस. हरिहरप्रभूती देवांचे व दिक्पालांचे तूच पालन करतेस. प्रलयकाळी विश्वाचा संहार तूच करतेस. परंतु हे तुझे चरित्र देवही जाणत नाहीत, मग मनुष्याची गोष्टच सोडा. हे माते, महिषरूप धारण करणार्या असुराचा वध करून व देवगणांचे रक्षण करून तूच आम्हाला ऋणी केले आहेस. म्हणून आम्ही तुझी स्तुती करावी. पण हे माते, वेदांनाही जर तुझा अर्थ लागलेला नाही तेथे आम्ही मंदमतींनी तुझी स्तुती कशी करावी ? तरीही तुझा प्रभाव प्रसिद्धच आहे. तू दुरात्मा, वैरी, जगत्कंटक आणि अचिंत्य महिषासुराचा वध करून जगावर उपकार केलेस आणि कीर्ती केलीस. त्याचप्रमाणे तू वारंवार जगावर अशीच कृपा कर व आमचे रक्षण कर.
देवी मृदु स्वराने म्हणाली, "हे सुरश्रेष्ठांनो, यापुढे दुसरे काही दु:साध्य कार्य असल्यास तुम्ही मला सांगा. तुमच्यावर जेव्हा दुर्घट संकट येईल तेव्हा ते संकट मी सत्वर नाहीसे करीन."
देवीचे भाषण ऐकून देव म्हणतात, "हे देवी, तू आता तरी आमचे सर्व काही कार्य केले आहेस. तू महिषासुराला मारल्यामुळे तुझ्या चरणकमलांचे आम्हाला नेहमी स्मरण राहील. पण तुझ्या ठिकाणी आमची निश्चल भक्ती उत्पन्न होईल असे तू कर. मातेप्रमाणे ही जगन्माता हजारो अपराध सहन करीत आहे असे समजून कोणता मानव तुझे भजन करणार नाही ?
या देहामध्ये दोन पक्षी आहेत व त्यांचे नेहमी सख्य आहे. अपराध सहन करणारा त्यांचा तिसरा सखा कोणीच नाही. हे भगवती, मित्ररूप असलेल्या तुझा त्याग करून हा पापात्मा व भाग्यहीन जीव देव व मानव या योनींमध्ये काय बरे करणार आहे ? अत्यंत दुष्प्राप्य देह प्राप्त होऊनही जो तुला स्मरणार नाही तो नराधम होय. हे देवी, आम्ही कायावाचामनेकरून हे सत्यच सांगत आहोत की सुखदु:खामध्ये तूच आमचा अद्भुत आश्रय आहेस. म्हणून श्रेष्ठ आयुधांच्या योगाने तूच आमचे रक्षण कर. तुझ्या चरणकमलांच्या रजः कणाशिवाय आम्हाला दुसरा आश्रय नाही."
व्यास म्हणतात, "याप्रमाणे देवांनी स्तुती केल्यावर देवी तेथेच अंतर्धान पावली आणि ती गुप्त झाल्याचे पाहून देवांनाही आश्चर्य वाटले."