श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वितीयः स्कन्धः
षष्ठोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


युधिष्ठिरादीनामुत्पत्तिवर्णनम्

सूत उवाच
एवं सत्यवती तेन वृता शन्तनुना किल ।
द्वौ पुत्रौ च तया जातौ मृतौ कालवशादपि ॥ १ ॥
व्यासवीर्यात्तु सञ्जातो धृतराष्ट्रोऽन्ध एव च ।
मुनिं दृष्ट्वाथ कामिन्या नेत्रसम्मीलने कृते ॥ २ ॥
श्वेतरूपा यतो जाता दृष्ट्वा व्यासं नृपात्मजा ।
व्यासकोपात्समुत्पन्नः पाण्डुस्तेन न संशयः ॥ ३ ॥
सन्तोषितस्तया व्यासो दास्या कामकलाविदा ।
विदुरस्तु समुत्पन्नो धर्मांशः सत्यवाक् शुचिः ॥ ४ ॥
राज्ये संस्थापितः पाण्डुः कनीयानपि मन्त्रिभिः ।
अन्धत्वाद्‌धृतराष्ट्रोऽसौ नाधिकारे नियोजितः ॥ ५ ॥
भीष्मस्यानुमते राज्यं प्राप्तः पाण्डुर्महाबलः ।
विदुरोऽप्यथ मेधावी मन्त्रकार्ये नियोजितः ॥ ६ ॥
धृतराष्ट्रस्य द्वे भार्ये गान्धारी सौबली स्मृता ।
द्वितीया च तथा वैश्या गार्हस्त्येषु प्रतिष्ठिता ॥ ७ ॥
पाण्डोरपि तथा पत्‍न्यौ द्वे प्रोक्ते वेदवादिभिः ।
शौरसेनी तथा कुन्ती माद्री च मद्रदेशजा ॥ ८ ॥
गान्धारी सुषुवे पुत्रशतं परमशोभनम् ।
वैश्याप्येकं सुतं कान्तं युयुत्सुं सुषुवे प्रियम् ॥ ९ ॥
कुन्ती तु प्रथमं कन्या सूर्यात्कर्णं मनोहरम् ।
सुषुवे पितृगेहस्था पश्चात्पाण्डुपरिग्रहः ॥ १० ॥
ऋषय ऊचुः
किमेतत्सूत चित्रं त्वं भाषसे मुनिसत्तम ।
जनितश्च सुतः पूर्वं पाण्डुना सा विवाहिता ॥ ११ ॥
सूर्यात्कर्णः कथं जातः कन्यायां वद विस्तरात् ।
कन्या कथं पुनर्जाता पाण्डुना सा विवाहिता ॥ १२ ॥
सूत उवाच
शूरसेनसुता कुन्ती बालभावे यदा द्विजाः ।
कुन्तिभोजेन राज्ञा तु प्रार्थिता कन्यका शुभा ॥ १३ ॥
कुन्तिभोजेन सा बाला पुत्री तु परिकल्पिता ।
सेवनार्थं तु दीप्तस्य विहिता चारुहासिनी ॥ १४ ॥
दुर्वासास्तु मुनिः प्राप्तश्चातुर्मास्ये स्थितो द्विजः ।
परिचर्या कृता कुन्त्या मुनिस्तोषं जगाम ह ॥ १५ ॥
ददौ मन्त्रं शुभं तस्यै येनाहूतः सुरः स्वयम् ।
समायाति तथा कामं पूरयिष्यति वाञ्छितम् ॥ १६ ॥
गते मुनौ ततः कुन्ती निश्चयार्थं गृहे स्थिता ।
चिन्तयामास मनसा कं सुरं समचिन्तये ॥ १७ ॥
उदितश्च तदा भानुस्तया दृष्टो दिवाकरः ।
मन्त्रोच्चारं तया कृत्वा चाहूतस्तिग्मगुस्तदा ॥ १८ ॥
मण्डलान्मानुषं रूपं कृत्वा सर्वातिपेशलम् ।
अवातरत्तदाकाशात्समीपे तत्र मन्दिरे ॥ १९ ॥
दृष्ट्वा देवं समायान्तं कुन्ती भानुं सुविस्मिता ।
वेपमाना रजोदोषं प्राप्ता सद्यस्तु भामिनी ॥ २० ॥
कृताञ्जलिः स्थिता सूर्यं बभाषे चारुलोचना ।
सुप्रीता दर्शनेनाद्य गच्छ त्वं निजमण्डलम् ॥ २१ ॥
सूर्य उवाच
आहूतोऽस्मि कथं कुन्ति त्वया मन्त्रबलेन वै ।
न मां भजसि कस्मात्त्वं समाहूय पुरोगतम् ॥ २२ ॥
कामार्तोऽस्म्यसितापाङ्‌गि भज मां भावसंयुतम् ।
मन्त्रेणाधीनतां प्राप्प्तं क्रीडितुं नय मामिति ॥ २३ ॥
कुन्त्युवाच ॥
कन्यास्म्यहं तु धर्मज्ञ सर्वसाक्षिन्नमाम्यहम् ।
तवाप्यहं न दुर्वाच्या कुलकन्यास्मि सुव्रत ॥ २४ ॥
सूर्य उवाच
लज्जा मे महती चाद्य यदि गच्छाम्यहं वृथा ।
वाच्यतां सर्वदेवानां यास्याम्यत्र न संशयः ॥ २५ ॥
शप्स्यामि तं द्विजं चाद्य येन मन्त्रः समर्पितः ।
त्वां चापि सुभृशं कुन्ति नोचेन्मां त्वं भजिष्यसि ॥ २६ ॥
कन्याधर्मः स्थिरस्ते स्यान्न ज्ञास्यन्ति जनाः किल ।
मत्समस्तु तथा पुत्रो भविता ते वरानने ॥ २७ ॥
इत्युक्त्वा तरणिः कुन्तीं तन्मनस्कां सुलज्जिताम् ।
भुक्त्वा जगाम देवेशो वरं दत्त्वातिवाञ्छितम् ॥ २८ ॥
गर्भं दधार सुश्रोणी सुगुप्ते मन्दिरे स्थिता ।
धात्री वेद प्रिया चैका न माता न जनस्तथा ॥ २९ ॥
गुप्तः सद्मनि पुत्रस्तु जातश्चातिमनोहरः ।
कवचेनातिरम्येण कुण्डलाभ्यां समन्वितः ॥ ३० ॥
द्वितीय इव सूर्यस्तु कुमार इव चापरः ।
करे कृत्वाथ धात्रेयी तामुवाच सुलज्जिताम् ॥ ३१ ॥
कां चिन्तां करभोरु त्वमाधत्सेऽद्य स्थितास्म्यहम् ।
मञ्जूषायां सुतं कुन्ती मुञ्चन्ती वाक्यमब्रवीत् ॥ ३२ ॥
किं करोमि सुतार्ताहं त्यजे त्वां प्राणवल्लभम् ।
मन्दभाग्या त्यजामि त्वां सर्वलक्षणसंयुतम् ॥ ३३ ॥
पातुत्वां सगुणागुणा भगवती
     सर्वेश्वरी चाम्बिका
स्तन्यं सैव ददातु विश्वजननी
     कात्यायनी कामदा ।
द्रक्ष्येऽहंमुखपङ्कजं सुललितं
     प्राणप्रियार्हं कदा
त्यक्त्वा त्वां विजने वने रविसुतं
     दुष्टा यथा स्वैरिणी ॥ ३४ ॥
पूर्वस्मिन्नपि जन्मनि त्रिजगतां
     माता न चाराधिता
न ध्यातं पदपङ्कजं सुखकरं
     देव्याः शिवायाश्चिरम् ।
तेनाहं सुत दुर्भगास्मि सततं
     त्यक्त्वा पुनस्त्वां वने
तप्स्यामि प्रिय पातकं स्मृतवती
     बुद्ध्या कृतं यत्स्वयम् ॥ ३५ ॥
सूत उवाव
इत्युक्त्या तं सुतं कुन्ती मञ्जूषायां धृतं किल ।
धात्रीहस्ते ददौ भीता जनदर्शनतस्तथा ॥ ३६ ॥
स्नात्वा त्रस्ता तदा कुन्ती पितृवेश्मन्युवास सा ।
मञ्जूषा वहमाना च प्राप्ता ह्यधिरथेन वै ॥ ३७ ॥
राधा सूतस्य भार्या वै तयासौ प्रार्थितः सुतः ।
कर्णोऽभूद्‌बलवान्वीरः पालितः सूतसद्मनि ॥ ३८ ॥
कुन्ती विवाहिता कन्या पाण्डुना सा स्वयम्वरे ।
माद्री चैवापरा भार्या मद्रराजसुता शुभा ॥ ३९ ॥
मृगयां रममाणस्तु वने पाण्डुर्महाबलः ।
जघान मृगबुद्ध्या तु रममाणं मुनिं वने ॥ ४० ॥
शप्तस्तेन तदा पाण्डुर्मुनिना कुपितेन च ।
स्त्रीसङ्गं यदि कर्तासि तदा ते मरणं धुवम् ॥ ४१ ॥
इति शप्तस्तु मुनिना पाण्डुः शोकसमन्वितः ।
त्यक्त्वा राज्यं वने वासं चकार भृशदुःखितः ॥ ४२ ॥
कुन्ती माद्री च भार्ये द्वे जग्मतुः सह सङ्गते ।
सेवनार्थं सतीधर्मं संश्रिते मुनिसत्तमाः ॥ ४३ ॥
गङ्गातीरे स्थितः पाण्डुर्मुनीनामाश्रमेषु च ।
शृण्वानो धर्मशास्त्राणि चकार दुश्चरं तपः ॥ ४४ ॥
कथायां वर्तमानायां कदाचिद्धर्मसंश्रितम् ।
अशृणोद्वचनं राजा सुपृष्टं मुनिभाषितम् ॥ ४५ ॥
अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गे गन्तुं परन्तप ।
येन केनाप्युपायेन पुत्रस्य जननं चरेत् ॥ ४६ ॥
अंशजः पुत्रिकापुत्रः क्षेत्रजो गोलकस्तथा ।
कुण्डः सहोढः कानीनः क्रीतः प्राप्तस्तथा वने ॥ ४७ ॥
दत्तः केनापि चाशक्तौ धनग्राहिसुताः स्मृताः ।
उत्तरोत्तरतः पुत्रा निकृष्टा इति निश्चयः ॥ ४८ ॥
इत्याकर्ण्य तदा प्राह कुन्तीं कमललोचनाम् ।
सुतमुत्पादयाशु त्वं मुनिं गत्वा तपोऽन्वितम् ॥ ४९ ॥
ममाज्ञया न दोषस्ते पुरा राज्ञा महात्मना ।
वसिष्ठाज्जनितः पुत्रः सौदासेनेति मे श्रुतम् ॥ ५० ॥
तं कुन्ती वचनं प्राह मम मन्त्रोऽस्ति कामदः ।
दत्तो दुर्वाससा पूर्वं सिद्धिदः सर्वथा प्रभो ॥ ५१ ॥
निमन्त्रयेऽहं यं देवं मन्त्रेणानेन पार्थिव ।
आगच्छेत्सर्वथासौ वै मम पार्श्वं निमन्त्रितः ॥ ५२ ॥
भर्तुर्वाक्येन सा तत्र स्मृत्वा धर्मं सुरोत्तमम् ।
सङ्गम्य सुषुवे पुत्रं प्रथमं च युधिष्ठिरम् ॥ ५३ ॥
वायोर्वृकोदरं पुत्रं जिष्णुं चैव शतक्रतोः ।
वर्षे वर्षे त्रयः पुत्राः कुन्त्या जाता महाबलाः ॥ ५४ ॥
माद्री प्राह पतिं पाण्डुं पुत्रं मे कुरु सत्तम ।
किं करोमि महाराज दुःखं नाशय मे प्रभो ॥ ५५ ॥
प्रार्थिता पतिना कुन्ती ददौ मन्त्रं दयान्विता ।
एकपुत्रप्रबन्धेन माद्री पतिमते स्थिता ॥ ५६ ॥
स्मृत्वा तदाश्विनौ देवौ मद्रराजसुता सुतौ ।
नकुलः सहदेवश्च सुषुवे वरवर्णिनी ॥ ५७ ॥
एवं ते पाण्डवाः पञ्च क्षेत्रोत्पन्ताः सुरात्मजाः ।
वर्षवर्षान्तरे जाता वने तस्मिन्द्विजोत्तमाः ॥ ५८ ॥
एकस्मिन्समये पाण्डुर्माद्रीं दृष्ट्वाथ निर्जने ।
आश्रमे चातिकामार्तो जग्राहागतवैशसः ॥ ५९ ॥
मा मा मा मेति बहुधा निषिद्धोऽपितया भृशम् ।
आलिलिङ्ग प्रियां दैवात्पपात धरणीतले ॥ ६० ॥
यथा वृक्षगता वल्ली छिन्ने पतति वै द्रुमे ।
तथा सा पतिता बाला कुर्वन्ती रोदनं बहु ॥ ६१ ॥
प्रत्यागता तदा कुन्ती रुदती बालकास्तथा ।
मुनयश्च महाभागाः श्रुत्वा कोलाहलं तदा ॥ ६२ ॥
मृतः पाण्डुस्तदा सर्वे मुनयः संशितव्रताः ।
सहाग्निभिर्विधिं कृत्वा गङ्गातीरे तदादहन् ॥ ६३ ॥
चक्रे सहैव गमनं माद्री दत्त्वा सुतौ शिशू ।
कुन्त्यै धर्मं पुरस्कृत्य सतीनां सत्यकामतः ॥ ६४ ॥
जलदानादिकं कृत्वा मुनयस्तत्र वासिनः ।
पञ्चपुत्रयुतां कुन्तीमनयन्हस्तिनापुरम् ॥ ६५ ॥
तां प्राप्तां च समाज्ञाय गाङ्गेयो विदुरस्तथा ।
नगरीं धृतराष्ट्रस्य सर्वे तत्र समाययुः ॥ ६६ ॥
पप्रच्छुश्च जनाः सर्वे कस्य पुत्रा वरानने ।
पाण्डोः शापं समाज्ञाय कुन्ती दुःखान्विता तदा ॥ ६७ ॥
तानुवाच सुराणां वै पुत्राः कुरुकुलोद्‌भवाः ।
विश्वासार्थं समाहूताः कुन्त्या सर्वे सुरास्तदा ॥ ६८ ॥
आगत्य खे तदा तैस्तु कथितं नः सुताः किल ।
भीष्मेण सत्कृतं वाक्यं देवानां सत्कृताः सुताः ॥ ६९ ॥
गता नागपुरं सर्वे तानादाय सुतान्वधूम् ।
भीष्मादयः प्रीतचित्ताः पालयामासुरर्थतः ॥ ७० ॥
एवं पार्थाः समुत्पन्ना गाङ्गेयेनाथ पालिताः ॥ ७१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
द्वितीयस्कन्धे युधिष्ठिरादीनामुत्पत्तिवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥


पांडवांचा जन्म

"शंतनूराजाला सत्यवतीपासून चित्रागंद व विचित्रवीर्य, असे दोन पुत्र झाले. दैवयोगाने ते मरण पावले. त्यानंतर सत्यवतीच्या आज्ञेवरुन व्यासांनी सत्यवतीच्या सुनांचे ठिकाणी पुत्र निर्माण केले. पण व्यासवीर्यापासून जन्माला आलेला धृतराष्ट्र आंधळा जन्मला. कारण व्यासाच्या तेजाने ती त्याक्षणी दिपून गेली होती. म्हणून तीने डोळे मिटले. सत्यवतीची दुसरी सुन व्यासांना पाहताच पांडुरवर्णी झाली. त्यामुळे तिच्या ठिकाणी श्वेत वर्णाचा पुत्र निर्माण झाला. विचित्रवीर्याच्या पत्नीने कामशास्त्रनिपुण दासीला व्यासांकडे पाठविल्यामुळे तिला विदुर नावाचा धर्मतत्पर पुत्र झाला. तो सत्यवचनी होता. पांडु कनिष्ठ असला तरी मंत्र्यांनी त्याला राज्यावर बसविले. धृतराष्ट्र अंध असल्याने त्याला राज्याधिकार दिले नाहीत. भीष्माच्या संमतीने पांडुला राज्य दिले व विदुर बुद्धीमान असल्याने त्याला सल्लागार म्हणून नेमला. गांधारी व संसारदक्ष वैश्या, या नावाच्या धृतराष्ट्राला दोन भार्या होत्या. प्रतापवान पांडूला शूरसेन राजाची कन्या कुंती व मद्रदेशाधिपतिची कन्या माद्री या दोन राण्या होत्या. गांधारीला शंभर पुत्र व वैश्येला युयुत्सु नावाचा एकच पण सुंदर पुत्र झाला. कुंतीला अविवाहित अवस्थेत रजोदर्शन होण्यापूर्वी सूर्यापासून कर्ण नावाचा बलवान पुत्र झाला होता.

त्यावेळी ती पित्याच्या घरी होती. पुढे पांडूने तिला वरले.

हे सूताचे बोलणे श्रवण करताच ऋषी म्हणाले, "विवाहापूर्वी पुत्र होऊनही पंडूने तिच्याशी विवाह कसा केला ? कन्या अवस्थेत कुंतीला सूर्यापासून पुत्र कसा झाला ? शिवाय रजोदर्शन न होता पुरुष समागमाशिवाय हे घडले कसे ? सूता, याविषयी तू आमचे समाधान कर."

सूत पुढे सांगू लागले. "शूरसेनाची कन्या कुंती लहान होती. तेव्हा कुंती भोज राजाने, ही कन्या म्हणून, माझी कन्या व्हावी अशी माझी इच्छा आहे! अशाप्रकारे शूरसेनाला विनंती केली. शूरसेनानेही ती विंनती मान्य केल्यावर कुंतीभोज राजाने कन्या म्हणून तिचा स्वीकार केला. पुढे होमशाळेत तिला अग्नीच्या सेवेसाठी तत्पर राहण्यास सांगितले. एकदा चातुर्मास प्राप्त झाल्यावर दुर्वास मुनी तेथे येऊन राहिले होते. कुंतीने त्यांची उत्तम प्रकारे सेवा केल्यामुळे ते संतुष्ट झाले. आणि ज्या देवाला तू आवाहन करशील, तो देव इच्छा पूर्ण करील असे सांगून तिला मंत्र शिकविला. मुनी निघून गेले. आपल्याला दिलेल्या मंत्राचे प्रत्यंतर पाहण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली, पण कोणत्या देवाला आवाहान करावे, याचा निर्णय होईना. तोच उदयगेरीवर सूर्याचे तेजस्वी बिंब तिला दिसले. तिने कसलाही विचार न करता, मंत्र म्हणून सूर्यालाच आवाहन केले. त्याच वेळी सूर्याने अत्यंत मनोहर रुप धारण केले व तो तिच्या मंदिरात आला. तिच्याजवळ प्रत्यक्ष सूर्य उभा राहिलेला पाहून ती आश्चर्यभरीत होऊन, थर,थर कापू लागली, त्याचक्षणी ती रजस्वला झाली. ती अत्यंत नम्र होऊन सूर्याला म्हणाली,
"महाराज, आपणाला पाहून मला फार समाधान झाले. आता आपण आपल्या स्वस्थानी मंडलाकडे जावेत."

सूर्य म्हणाला, "हे कुंती, तू मंत्रसामर्थ्याच्या बळावर मला अवाहान केलेस ते का ? आनि बोलावूनही तू आता माजा स्वीकार का करीत नाहीस ? हे कृष्णनयने, मी मदनविव्हल झालो असून, तू प्रेमाने माझे सेवन कर. केवळ मंत्र सामर्थ्यामुळे मी तुझ्या स्वाधीन झालो आहे. रतिक्रीडा करुन तू सुखाचा उपभोग घे !

कुंती म्हणाली, "धर्मवत्सला, मी कन्या असल्यामुळे आपणाला प्रणाम करीत आहे. आपले हे बोलणे ऐकणेही, मला शिष्टसंमत वाटत नाही. कारण मी कुलवान आहे. मला हे अयोग्य वाटते."

सूर्य म्हणाला, " येथून कामाशिवाय परत जाणे, हे माझ्या दृष्टीने अत्यंत लज्जास्पद आहे. कारण त्यामुळे सर्व देवलोकात माझी अपकीर्ति होईल. ते माझी निंदा करतील. शिवाय हे सुंदरी, तू माझा स्वीकार केला नाहीस तर ज्यांनी तुला हे मंत्र दिले, त्यांना व तुला मी दोघानांही अत्यंत शाप देईन. हे सुंदर वदने, तू माझ्याशी समागम केलास, तरी कौमार्य अखंड राहील व इतरजणांना ही गोष्ट समजणार नाही. शिवाय प्रति सूर्य असा तेजस्वी माझ्यासारखा तुला बलाढ्य पुत्र होईल."

सूर्याने अशाप्रकारे तिची समजूत घालून, कुंतीचा उपभोग घेतला व तिला उत्तम वर देऊन सूर्य तेथून निघून गेला, अखेरीस तिला गर्भ राहिला. पण ती तिच्या मंदिरात सुरक्षित होती. शिवाय तिची माता, पिता व इतर दासदासी यांनाही याची वार्ता समजली नाही. फक्त कुंतीची एक आवडती व विश्वासातील दाई होती. तिला मात्र ही घटना माहीत होती. पुढे त्या मंदिरातच, पन अत्यंत गुप्त ठिकाणी कुंतीला अत्यंत सुंदर असा पुत्र झाला. जन्मत:च मनोहर कवच-कुंडलांनी तो विभूषित होता. कार्तिकेयासारखा तो तेजस्वी होता. त्याची कांती सूर्याप्रमाणे होती. प्रसूती झाल्यामुळे कुंती लज्जित झाली. तिची दासी म्हणाली,

"अग तू का काळजी करीत आहेस ? आताच मी तुझी काळजी दूर करण्यास सिद्ध आहे."

नंतर दाईने पुढील तयारी केली. कुंतीने आपल्या पुत्राला पेटीत ठेवले व म्हणाली, "हे सुंदर पुत्रा, मी तुझ्या विरहाने व्याकूळ होऊनही व तू मला प्राणापेक्षाही प्रिय असूनही, मी तुजा त्याग करीत आहे. मी तरी काय करणार ? केवढी दुर्भागी मी तुझ्यासारख्या सुलक्षणी पुत्राचा मला त्याग करावा लागत आहे. सगुण व निर्गुण रुप असलेली ती अंबादेवी तुझे रक्षण करो, ही जगन्माता असून भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी आहे, ती वत्सल कात्यायनी तुला स्तनपान देवो, एखाद्या दुष्ट व स्वैरिणी स्त्रीप्रमाणे मी तुझ्यासारख्या सूर्यपुत्राचा त्याग करीत आहे. हे सुमुखा, तुझे हे रमणीय वदन पुन: केव्हा मला दिसेल ? खरोखरच पूर्व जन्मात मी त्या त्रैलोक्याच्या अधिष्ठात्री देवीची आराधना केली नाही. त्या कल्याणी देवीच्या सुखद चरणाचे चिंतन केले नाही. म्हणूनच तुझ्यासारख्या अति प्रियतम पुत्राला अत्यंत दुर्भाग्याने वनात सोडून द्यावा लागत आहे. खरोखरच तुझ्यावाचून राहणे म्हणजे दुर्देवच होय. पण काय करु ? मी समजून उमजून हे पाप केले आहे, त्याचे फळ मला भोगलेच पाहिजे."

असे म्हणून अत्यंत दु:खी मनाने कुंतीने पुत्राला पेटीत ठेवले. केवळ लोकनिंदेला भिऊनच तिने ती पेटी बंद करुन आपल्या दाईच्या हातात दिली. अत्यंत उदास होऊन तिने स्नान केले व ती शुचिर्भूत झाली आणि पित्याच्या घरी राहू लागली.

इकडे ती पेटी वाहत गेली. पुढे दूरवर असलेल्या, अधिरथ नावाच्या एका सारथ्याला, ती पेटी सापडली. त्या सारथ्याची राधा नावाची भार्या होती. तिने त्या पुत्राला आपलाच पुत्र मानून त्यांचा स्वीकार केला. तेथेच त्याचे लालन पालन व पोषण झाले. तोच पुढे प्रभावशाली वीर म्हणून प्रसिद्ध पावला. कन्या अवस्थेत असलेल्या कुंतीला पंडूने स्वयंवरात वरले व तिच्याशी विवाह केला. मद्रराजकन्या माद्री ही त्याची दुसरी पत्नी. नित्य मृगयेत रममान होणार्‍या पंडूने एकदा रासक्रीडेत मग्न असलेल्या एका मृगाचा वध केला. पण तो एक मुनी होता व मृग होऊन रतिक्रीडा करीत होता. त्या मुनीने पंडूला त्वरित शाप दिला.

"हे राजा ज्याअर्थी समागम करीत असलेल्या माझा, तू वध केलास. त्याअर्थी तूही स्त्रीशी संग करशील त्याच वेळी तुला मृत्यू प्राप्त होईल."

मुनीच्या शापामुळे पंडूला अत्यंत दु:ख झाले. त्याने राज्याचा त्याग केला व दु:खपूर्ण अंत:करणाने तो वनात राहू लागला . त्याच्या दोन्ही प्रिय भार्या पतिव्रता असल्याने धर्माप्रमाणे वागून पतीची सेवासुश्रुषा करण्यासाठी राजाबरोबर वनात येऊन राहिल्या. राजा गंगातीरावरील मुनींच्या आश्रमात धर्मशास्त्राचे श्रवण करीत, तेथील काळ घालवू लागला. त्याने दारुण तपश्चर्या करण्यास सुरवात केली. एकदा त्याला मुनींकडून धर्माचे उत्कृष्ठ भाषण ऐकावयास मिळाले.

मुनी म्हणाले, "हे राजा, शत्रुनाशका, निपुत्रिक पुरुषाला कधीही स्वर्गप्राप्ती होत नाही. म्हणून पुत्र होण्यास उपाय करावेत. औरस, पुत्रिकापुत्र, क्षेत्रज, गोळक, कुंडसहोढ, कानीन, क्रीत, वनात आलेला तसेच, कुणीतरी सामर्थ्य नसल्याने पालन करण्यास दिलेला पुत्र, धनग्राही असून निकृष्ट होय, असे धर्मशास्त्र सांगते."

त्याचे शब्द ऐकून दु:खी झालेला पंडू, कमलनयना कुंतीला म्हणाला, "हे प्रिये, कोणत्या तरी थोर तपस्व्यांकडे जाऊन नियोगनिधीचा स्वीकार करुन पुत्रप्राप्ती करुन घे. माझीच आज्ञा असल्यामुळे तुला दोष लागणार नाही. पूर्वी धर्मवेत्त्या सौदास राजाने वसिष्ठांपासून नियोगनिधीनेच पुत्र उत्पन्न केला. तेव्हा नि:शंक मनाने जा."

त्यावर कुंती म्हणाली, "हे राजा, शोककूल होऊ नका. आपले मनोरथ पूर्ण होइल, असा मंत्र मला दुर्वास मुनींनी दिलेला आहे. या मंत्रसामर्थ्याने मी ज्या देवाला आवाहन करील, तो देव माझ्याजवळ येईल व माझ्या आधीन होऊन जाईन."

पतीची आज्ञा घेऊन कुंतीने देवश्रेष्ठ धर्माचे स्मरण केले. त्याच्याशी समागम झाल्यावर त्याच्यापासून कुंतीला युधिष्ठिर नावाचा पुत्र झाला. नंतर वायूदेवापासून भीमसेन व इंद्रापासून अर्जुन, असे तीन बलवान पुत्र कुंतीला झाले. कुंतीला पुत्र झाल्याचे अवलोकन करुन माद्री पंडु राजाकडे गेली ती म्हणाली, " महाराज, आपण जाणते आहात मलाही पुत्र व्हावा असे वाटते, तेव्हा हे पतीदेवा, माझे दु:ख जाणून आपण ते दूर करा." माद्रीचे बोलणे ऐकून पंडूने कुंतीला विनंती केली. तेव्हा त्या दयाळू कुंतीने आपले मंत्र माद्रीला शिकविले. पतीच्या आज्ञेत राहणार्‍या माद्रीने अश्विनीकुमारांचे स्मरण केले. त्यांच्यापासून नकुल व सहदेव असे दोन सुंदर तिला पुत्र झाले.

अशा प्रकारे देवांपासून पंडुराजाच्या भार्याना पाच पुत्र झाले. तेच ते पांडव म्हणून प्रसिद्ध पावले. आता पंडुराजा आसन्नमरण झाला होता. तो आश्रमात पहुडलेला असता माद्री त्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा तो कामविव्हल झाला व तिला आलिंगन देऊन तो तिच्याशी क्रीडा करण्याचा प्रयत्न करु लागला . माद्रीने त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्याने तिला आलिंगन दिले व क्रीडारत असताच तो मृत्यू पावला. माद्री जोराने रोदन करु लागली. तेव्हा कुंतीही तेथे आक्रोश करु लागली. ती लहान बालके दु:खी झाली. पंडुराजा मरण पावल्याचे अवलोकन करुन ते शुद्ध आचरणाचे मुनी पंडूचे यथाविधी दहन करते झाले. माद्रीने आपले पुत्र कुंतीच्या स्वाधीन करुन ती सती गेली. नंतर पुढे कुंती व ती पाच मुले यांना तेथील मुनींनी हस्तिनापूरला पोहोचते केले. कुंती आल्यावर भीष्म, धृतराष्ट्र वगैरे सर्वजण जमा झाले. पांडूला झालेला शाप सर्वांना माहित होता. म्हणून त्यांनी विचारले, "माते ही कुणाची मुले ?" कुंतीने सांगितले, "कुरु कुळामध्ये देवांपासून हे पुत्र आमचे ठिकाणी उत्पन्न झाले आहेत. पण कोणाचाही विश्वास बसेना. तेव्हा कुंतीने देवांना अवाहन केले. देवांनी आकाशात येऊन हे आमचे पुत्र आहेत." असे सांगताच भीष्मांनी त्या पुत्रांचा गौरव केला व ते संतुष्ट झाले. त्यांचे राजपुत्राला शोभेसे पालन केले.



अध्याय सहावा समाप्त

GO TOP