श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ५ वा - अन्वयार्थ

हिरण्यकशिपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्‍न -

भगवान् - ऐश्वर्यवान - काव्यः - शुक्राचार्य - पौरोहित्याय - उपाध्यायाच्या जागी - किल - निश्चयेकरून - वृतः - नेमिला होता - तस्य - त्या शुक्राचार्याचे - शंडामर्कौ - शंड व अमर्क या नावाचे - सुतौ - दोन मुलगे - दैत्यराज्यगृहांतिके - हिरण्यकशिपुच्या घराजवळ राहात होते. ॥ १ ॥

तौ - ते शंड व अमर्क - राज्ञा - राजाने - प्रापितं - गुरुगृही पोचविलेल्या - बालं - लहान अशा - नयकोविदं - नितिशास्त्रात निपुण अशा - प्रल्हादं - प्रल्हादाला - च - आणि - अन्यान् - दुसर्‍या - पाठयान् - शिकण्याला योग्य अशा - असुरबालकान् - दैत्यांच्या मुलांना - पाठयामासतुः - शिकविते झाले. ॥ २ ॥

तत्र - त्याठिकाणी - यत् - जे - गुरुणा - गुरूने - प्रोक्तं - सांगितलेले - शुश्रुवे - तो ऐके - च - आणि - अनुपपाठ - ह्मणे - स्वपरासद्‌ग्रहाश्रयं - स्वकीय व परकीय ह्या दुरभिमानाला आधारभूत असल्यामुळे - मनसा - मनाने - साधु - चांगले - न मेने - मानिता झाला नाही. ॥ ३ ॥

पांडव - हे युधिष्ठिरा - असुरराट् - दैत्यराज हिरण्यकशिपु - पुत्रं - मुलाला - अंकं - मांडीवर - आरोप्य - घेऊन - पप्रच्छ - विचारिता झाला - वत्स - हे बाळा - भवान् - तू - यत् - जे - साधु - चांगले आहे असे - मन्यते - समजतोस - (तत् त्वया) कथ्यतां - ते तू सांगावे. ॥ ४ ॥

असुरवर्य - हे दैत्याधिपते - असत्‌ग्रहात् - दुरभिमानाने - समुद्विग्नधियां - ज्यांची मने अत्यंत खिन्न झाली आहेत अशा - देहिनां - प्राण्यांचे - आत्मपातं - आत्मपतनाचे साधन - अंधकूपं - काळोखी विहीर असे - गृहं - घर - हित्वा - टाकून - वनं गतः सन् - अरण्यात गेलेल्या पुरुषाने - हरिं आश्रयेत् - परमेश्वराचा आश्रय करावा - (इति) यत् - असे जे म्हणतात - तत् - ते - सदा - नेहमी - साधु - चांगले - मन्ये - मी मानितो. ॥ ५ ॥

दैत्यः - हिरण्यकशिपु - परपक्षसमाहिताः - शत्रुपक्षाकडे पर्यवसान पावणारे - पुत्रगिरः - मुलाचे शब्द - श्रुत्वा - श्रवण करून - जहास (उवाच च) - हसला व म्हणाला - बालानां बुद्धिः - बालकांची बुद्धि - परबुद्धिभिः भिद्यते - दुसर्‍यांच्या बुद्धिवादाने फिरविली जाते. ॥ ६ ॥

द्विजातिभिः - ब्राह्मणांकडून - गुरुगृहे - गुरूच्या घरी - बालः - बालक प्रल्हाद - सम्यक् - चांगला - विधार्यतां - धारण केला जावा - यथा - जेणेकरून - प्रतिच्छनैः - गुप्त अशा - विष्णुपक्षैः - विष्णूच्या पक्षाकडील लोकांकडून - अस्य - ह्याची - धीः - बुद्धि - न भिद्येत - फिरविली जाणार नाही. ॥ ७ ॥

दैत्ययाजकाः - दैत्याचे पुरोहित - गृहं - घरी - आनीतं - आणिलेल्या - प्रल्हादं - प्रल्हादाला - आहूय - हाक मारून - श्लक्ष्णया वाचा - प्रेमळ वाणीने - प्रशस्य - गौरवून - सामभिः - शांतपणाने - समपृच्छंत - विचारिते झाले. ॥ ८ ॥

वत्स प्रल्हाद - हे बाळा प्रल्हादा - ते भद्रं (अस्ति) - तुझे कल्याण असो - सत्यं - खरे - कथय - सांग - मृषा - खोटे - मा (कथय) - बोलू नको - बालान् - सगळ्या मुलांच्या - अति - पलीकडील - एषः - ही - बुद्धिविपर्ययः - विपरीत बुद्धि - तुभ्यं - तुला - कुतः (समुत्पन्नः) - कोठून उत्पन्न झाली. ॥ ९ ॥

कुलनंदन - हे कुलनंदना - अहो - अरे - ते बुद्धिभेदः - तुझा बुद्धिभेद - परकृतः - दुसर्‍याने केलेला - उत - किंवा - स्वतः - स्वतःसिद्धच - अभवत् - झाला - श्रोतुकामानां गुरूणां नः - श्रवण करण्याची इच्छा करणार्‍या आम्हा गुरूंना - भण्यतां - सांगावेस. ॥ १० ॥

स्वः - आपले - च - आणि - परः - दुसर्‍याचे - इति - असा - असद्‌ग्रहः - दुरभिमान - यन्मायया - ज्याच्या मायेने - कृतः - निर्मिलेला - विमोहितधियां - मायेने मोहिलेल्या अंतःकरणाच्या - पुंसां - पुरुषांमध्ये - दृष्टः - दिसून येतो - तस्मै भगवते - त्या परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥ ११ ॥

सः - तो परमेश्वर - पुंसां - पुरुषांना - यदा - जेव्हा - अनुव्रतः - अनूकूल होतो तेव्हा - एषः अन्यः - हा दुसरा - तथा - त्याप्रमाणे - अहं अन्यः - मी दुसरा - इति - अशी - भेदगता - भेद दाखविणारी - असती - खोटी - पशुबुद्धिः - संसारविषयक बुद्धि - विभिद्यते - नाहीशी होते. ॥ १२ ॥

अबुद्धिभिः - अविवेकी पुरुषांनी - दुरत्ययानुक्रमणः - ज्याचे चरित्र वर्णन करणे दुर्घट आहे असा - सः - तो - एषः - हा - आत्मा - आत्मा - स्वपरेति - स्वपर अशा बुद्धीने - निरुप्यते - निरूपिला जातो - हि - यास्तव - वेदवादिनः - वेदवेत्ते - ब्रह्मादयः - ब्रह्मादिक देव - यद्वर्त्मनि - ज्यांचे स्वरूप जाणण्याच्या मार्गात - मुह्यंति - मोह पावतात - एषः - तो - मे - माझ्या - मतिं - बुद्धीला - भिनत्ति - फिरवितो. ॥ १३ ॥

ब्रह्मन् - अहो गुरूजी - यथा - ज्याप्रमाणे - अयः - लोखंड - आकर्षसन्निधौ - लोहचुंबकाजवळ - स्वयं - आपण होऊन - भ्राम्यति - फिरते - तथा - त्याप्रमाणे - मे - माझे - चेतः - चित्त - वक्रपाणेः (सन्निधौ) - परमेश्वराच्या सन्निध - यदृच्छया - सहजगत्या - भिद्यते - भेद पावते. ॥ १४ ॥

महामतिः - महाबुद्धिमान प्रल्हाद - एतावत् - एवढे - ब्राह्मणाय - ब्राह्मणाला - उक्त्वा - सांगून - विरराम - स्वस्थ बसला - अथ - नंतर - सः - तो - दीनः - दीन असा - राजसेवकः - राजाचा सेवक ब्राह्मण - कुपितः - रागावलेला - तं - त्या प्रल्हादाला - निर्भर्त्स्य (उवाच) - झिडकारून म्हणाला. ॥ १५ ॥

अरे - अरे - वेत्रं - छडी - आनीयतां - आणिली जावी - अस्माकं - आम्हाला - अयशस्करः - अपकीर्तिकारक - अस्य - ह्या - कुलाङ्गारस्य - कुलाला अग्निरूप अशा - दुर्बुद्धेः - वाईट बुद्धीचा - चतुर्थः - चौथा - दमः - दंडरूपी दम - उदितः - सांगितला आहे. ॥ १६ ॥

अयं - हा - दैतेय चंदनवने - दैत्यरूपी चंदनवनात - कंटकद्रुमः - काटयांचा वृक्ष - जातः - उत्पन्न झाला आहे - यत् - कारण - अर्भकः - हे पोरगे - मूलोन्मूलपरशोः - मूळाचे छेदन करणारी कुर्‍हाड अशा - विष्णोः - विष्णूचा - नालायितः - दांडा झाला आहे. ॥ १७ ॥

इति - याप्रमाणे - तर्जनादिभिः - दरडावणे इत्यादि - विविधोपायैः - नाना उपायांनी - भीषयन् - भिवविणारा तो ब्राह्मण - तं - त्या - प्रल्हादं - प्रल्हादाला - त्रिवर्गस्य - तीन पुरुषार्थाचे - उपपादनं - विवेचन - ग्राहयामास - शिकविता झाला. ॥ १८ ॥

ततः - नंतर - गुरुः - गुरू - एनं - ह्या प्रल्हादाला - ज्ञातज्ञेयचतुष्टयम् - जाणिले आहेत सामदामादि चतुर्विध उपाय ज्याने असा - ज्ञात्वा - जाणून - मातृमूष्टं - आईने न्हाऊ घातलेल्या - अलंकृतं - अलंकार घातलेल्या प्रल्हादाला - दैत्येंद्रं - हिरण्यकशिपुला - दर्शयामास - दाखविता झाला. ॥ १९ ॥

असुरः - हिरण्यकशिपु - पादयोः - पायांवर - पतितं - पडलेल्या - बालं - बालकाला - आशिषा - आशिर्वादाने - प्रतिनंद्य - आनंदित करून - दोर्भ्यां - बाहूंनी - चिरं - पुष्कळ वेळपर्यंत - परिष्वज्य - आलिंगन देऊन - परमां - मोठया - निर्वृतिं - सुखाला - आप - प्राप्त झाला. ॥ २० ॥

युधिष्ठिर - हे धर्मराजा - अंकं - मांडीवर - आरोप्य - बसवून - मूर्घनि - मस्तकावर - अवघ्राय - हुंगून - अश्रुकलाम्बुभिः - अश्रूंच्या पाण्याने - आसिंचन् - अभिषेक करीत - विकसद्वक्त्रं (पुत्रं) - प्रसन्नमुख अशा आपल्या मुलाला - इदं - हे - आह - विचारू लागला. ॥ २१ ॥

तात - बाबा - आयुष्मन् - दीर्घायुष्यवान - प्रल्हाद - हे प्रल्हादा - भवान् - तू - एतावता कालेन - इतक्या दिवसात - यत् - जे - गुरोः - गुरूपासून - अशिक्षत् - शिकलास - किंचित् - थोडे - उत्तमं - उत्तम - स्वधीतं - चांगले शिकलेले - अनूच्यतां - म्हणून दाखवावेस. ॥ २२ ॥

विष्णोः - विष्णूचे - श्रवणं - कथाश्रवण - कीर्तनं - नामसंकीर्तन - स्मरणं - स्मरण - पादसेवनं - चरणांची सेवा - अर्चनं - पूजा - वंदनं - नमस्कार - दास्यं - सेवा - सख्यं - मित्रत्व - आत्मनिवेदनं - स्वतःचे अर्पण. ॥ २३ ॥

इति - याप्रमाणे - पुंसा - पुरुषाकडून - भगवति - ऐश्वर्यसंपन्न अशा - विष्णौ - विष्णुच्या ठिकाणी - नवलक्षणा - नऊ प्रकारची - अद्धा - साक्षात - अर्पिता - अर्पण केलेली - भक्तिः - भक्ति - क्रियते चेत् - जर घडून येईल तर - तत् - ते - अधीतं - अध्ययन - उत्तमं - उत्तम - मन्ये - मी समजतो. ॥ २४ ॥

तदा - त्यावेळी - हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - एतत् - हे - सुतवचः - मुलाचे भाषण - निशम्य - श्रवण करून - रुषा - रागाने - प्रस्फुरिताधराः - फुरफुरत आहेत ओठ ज्याचे असा - गुरुपुत्रं - गुरुपुत्राला - इदं - हे - उवाच - म्हणाला. ॥ २५ ॥

दुर्मते - हे दुष्टबुध्दे - ब्रह्मबंधो - अधम ब्राह्मणा - विपक्षं - शत्रुपक्षाला - श्रयता - आश्रय देणार्‍या अशा - असता (त्वया) - तुज दुष्टाकडून - मां अनादृत्य - माझा तिरस्कार करून - बालः - मुलगा - असारं - निरर्थक विषय - ग्राहितः - शिकावयास लाविला गेला - एतत् - हे - ते किम् (कृतम्) - त्वा काय केले ॥ २६ ॥

हि - खरोखर - लोके - लोकांत - दुर्मैत्राः - मैत्री करण्यास अयोग्य - छद्मवेषिणः - कपट वेष घेणारे - असावधः - दुष्ट पुरूष - संति - आहेत - तेषां - त्यांचे - अघं - दुष्ट कृत्य - काले - काही काळाने - पातकिनां - पापी लोकांचा - रोगः इव - रोग जसा तसे - उदेति - उघडकीस येते ॥ २७ ॥

इंद्रशत्रो - हे हिरण्यकशिपो - एषः - हा - तव - तुझा - सुतः - मुलगा - मत्प्रणीतं - मी शिकविलेले - न वदति - म्हणत नाही - परप्रणीतं - दुसर्‍याने शिकविलेले - न - नाही - राजन् - हे राजा - अस्य - ह्याची - इयं - ही - नैसर्गिकी - स्वाभाविक - मतिः (अस्ति) - बुध्दि आहे - मन्युं - क्रोधाला - नियच्छ - आवर - नः - आम्हाला - कत् - दोष - मा स्म अदाः - देऊ नको ॥ २८ ॥

गुरुणा - गुरूने - एवं - या प्रमाणे - प्रतिप्रोक्तः - प्रत्युत्तर दिलेला - असुरः - दैत्य - भूयः - पुनः - सुतम् - मुलाला - आह - म्हणाला - अभद्र - हे मूर्खा - इयं - ही - ते - तुझी - असती - वाईट - मतिः - बुध्दि - गुरुमुखी - गुरुच्या उपदेशाने मिळालेली - न चेत् तर्हि - जर नव्हे तर - कुतः प्राप्ता - कोठून प्राप्त झाली ॥ २९ ॥

अदान्तगोभिः - न जिंकलेल्या इंद्रियांच्या योगाने - तमिस्रं - अंधारात - विशतां - प्रवेश करणार्‍या - पुनः पुनः - पुनः पुनः - चर्वितचर्वणानां - चावलेले पुन्हा चघळणार्‍या - गृहव्रतानां - गृहसंबंधी नानाप्रकारचे संकल्प करणार्‍या लोकांची - मतिः - बुध्दि - परतः - दुसर्‍यामुळे - स्वतः - स्वतःमुळे - वा - किंवा - मिथः - परस्परांमुळे - कृष्णे - कृष्णाच्या ठिकाणी - न अभिपद्यते - लागत नसे ॥ ३० ॥

ये - जे - दुराशयाः - विषयवासना ज्यांच्या अंतःकरणात भरल्या आहेत असे - बहिरर्थमानिनः - बाह्य विषयांनाच पुरुषार्थ मानणारे - ते - ते - स्वार्थगतिं - स्वस्वरूपामध्येच पुरुषार्थ आहे असे मानणार्‍याचे उद्दिष्ट स्थान अशा - विष्णुं - विष्णूला - न विदुः - जाणत नाहीत - यथा - जसे - अंधैः - आंधळ्यांनी - उपनीयमानाः - पुढारीपण घेऊन चालविलेल्या - अंधाः तथा - आंधळे तसे - उरुदाम्नि - जिला पुष्कळ दावी जोडली आहेत अशा - ईशतन्त्यां - ईश्वराची दावणच अशा - वाचि - वेदरुप वाणीच्या ठिकाणी - बध्दाः (सन्ति) - जखडून गेले आहेत ॥ ३१ ॥

यावत् - जोपर्यंत - एषां मतिः निष्किंचनानां - यांची बुध्दि विषयाभिमान सोडलेल्या - महीयसां - थोर पुरूषांच्या - पादरजोभिषेकं - चरणांच्या धुळीने स्नान - न वृणीत - पसंत करीत नाही - तावत् - तोपर्यंत - उरुक्रमाघ्रिं - परमेश्वराच्या चरणसेवेला - न स्पृश्यति - स्पर्श करीत नाही - यदर्थः - ज्या बुध्दिचा हेतु - अनर्थापगमः (अस्ति) - अनर्थमय संसाराचा नाश हाच आहे ॥ ३२ ॥

हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - रुषा - क्रोधाने - अंधीकृतात्मा - ज्याचे मन आंधळे झाले आहे असा - इति - याप्रमाणे - उक्त्वा - बोलून - उपरतं - स्वस्थ बसलेल्या - पुत्रं - मुलाला - स्वोत्संगात् - आपल्या मांडीवरून - महीतले - पृथ्वीवर - निरस्यत - ढकलून देता झाला. ॥ ३३ ॥

अमर्षरुषाविष्टः - संताप व क्रोध याने भरलेला - कषायीभूतलोचनः - डोळे लाल झालेला - आह - म्हणाला - नैऋताः - राक्षसांनो - अयं - हा - वध्यः - मारण्यास योग्य असलेला पोर - आशु - लवकर - वध्यतां - मारला जावा - निःसारयत - माझ्या दृष्टीआड करा ॥ ३४ ॥

अयं - हा - मे भ्रातृहा - माझ्या भावाला मारणारा होय - सः (अयम्) - तोच हा - अधमः अस्ति - अधम होय - यः - जो - स्वान् - स्वतःच्या - सुहृदः - इष्ट जनांना - हित्वा - सोडून - पितृव्यहंतुः - चुलत्याला मारणार्‍या - विष्णोः - विष्णूचे - पादौ - चरण - दासवत् - सेवकांप्रमाणे - अर्चति - पूजितो ॥ ३५ ॥

यः - जो - पञ्चहायनः - पाच वर्षांच्या वयाचा - पित्रोः - आईबापाच्या - दुस्त्यजं - टाकण्यास कठीण अशा - सौह्रदं - प्रेमाला - अहात् - सोडिता झाला ॥ ३६ ॥

यथा - ज्याप्रमाणे - औषधं - औषध त्याप्रमाणे - परः अपि - परकाही - हितकृत् - हित करणारा - (सः) अपत्यं (एव अस्ति) - तो पुत्र होय - स्वदेहजः - आपला औरस - सुतः अपि - मुलगाही - अहितः - अकल्य़ाण करणारा - आमयवत् - रोगासारखा - आत्मनः - शरीराला - यत् अंगं - जो शरीराचा अवयव - अहितं - अहित करणारा - तत् उत - तो खरोखर अवयव - छिंद्यात् - तोडावा - यद्विवर्जनात् - जे कापून टाकिल्यामुळे - शेषं - बाकीचे - सुखं - सुखाने - जीवति - जगते. ॥ ३७ ॥

मुनेः - मुनीच्या - दुष्टं - दुष्ट - इंद्रियं इव - इंद्रियांप्रमाणे - सुहृल्लिंगधरः - मित्राचे सोंग घेणारा - शत्रुः - शत्रु होय - संभोजशयनासनैः - भोजन, शयन व आसन इत्यादिक प्रसंगी - सर्वैः उपायैः - सर्व उपायांनी - हंतव्यः - मारिला जावा. ॥ ३८ ॥

भर्त्रा - स्वामीने - समादिष्टाः - आज्ञा केलेले - शूलपाणय़ः - हातांत शूल घेतलेले - तिग्मदंष्ट्रकरालास्याः - तीक्ष्ण दाढांचे व भयंकर मुखाचे - ताम्रश्मश्रुशिरोरुहाः - तांबडया दाढया-मिशांचे व केसांचे - ते - ते - नैऋताः - राक्षस - वै - खरोखर. ॥ ३९ ॥

भैरवान् नादान् नदन्तः - भयंकर गर्जना करणारे - च - आणि - धिन्धि भिन्धि इति - मारा तोडा असे - वादिनः - बोलणारे - आसीनं - बसलेल्या - प्रल्हादं - प्रल्हादाला - सर्वमर्मसु - सर्व मर्मस्थानी - शूलैः - शूळांनी - अहनन् - प्रहार करिते झाले. ॥ ४० ॥

अपुण्यस्य - भाग्यहीन पुरुषांच्या - सत्क्रियाः इव - मोठाल्या उद्योगाप्रमाणे - ब्रह्मणि - परब्रह्मरूपी - अनिर्देश्ये - दाखविता न येण्याजोग्या - भगवति - ऐश्वर्यसंपन्न - अखिलात्मनि - सर्वांचा आत्मा अशा - परे - परमेश्वराच्या ठिकाणी - युक्तात्मनि (प्रल्हादे) - ज्याचे अंतःकरण लागून राहिले आहे अशा प्रल्हादाच्या ठिकाणी - अफलाः आसन् - ते प्रहार निष्फल झाले. ॥ ४१ ॥

युधिष्ठिर - हे धर्मराजा - तस्मिन् प्रयासे अपहते - तो प्रयत्न फुकट गेला असता - परिशंकितः - शंकित झालेला - दैत्येंद्रः - हिरण्यकशिपु - तद्वधोपायान् - प्रल्हादाच्या त्या वधाचे उपाय - निर्बंधेन - आग्रहाने - चकार - करिता झाला. ॥ ४२ ॥

दिग्गजैः - मोठया हत्तींच्या पायी बांधण्याने - दंदशूकैः - सर्पांकडून दंश केल्याने - च - आणि - अभिचारावपातनैः - कृत्या पाठीस लावणे व कडेलोट करणे यांनी - मायाभिः - कपटयुक्तींनी - गरदानैः - विष घालण्याने - अभोजनैः - उपाशी ठेवण्याने - हिमवाय्वग्निसलिलैः - थंडी, वारा, अग्नि व पाणी यांच्या कहरात बसविण्याने - च - आणि - पर्वताक्रमणैः अपि - अंगावर पर्वत टाकणे इत्यादि उपायांनीसुद्धा - अपापं सुतं - पापरहित अशा मुलाला - हन्तुं - मारण्यास - यदा असुरः न शशाक - जेव्हा हिरण्यकशिपु समर्थ झाला नाही - सः - तो - दीर्घतमां - फार मोठया - चिंतां - काळजीला - प्राप्तः - प्राप्त झालेला असा - तत् - ते वधकर्म - कर्तुं - करण्यास - न अभ्यपद्यत - समर्थ झाला नाही. ॥ ४३-४४ ॥

एषः - हा - मे - माझ्याकडून - बहु - पुष्कळ - असाधु - दुर्भाषणे - उक्तः - बोलला गेला - च - आणि - वधोपायाः - वधाचे उपाय - निर्मिताः - योजिले गेले - तैः तैः - त्या त्या - असद्धर्मैः - पापमूलक अशा - द्रोहैः - घाताच्या उपायांतून - स्वेन एव तेजसा - आपल्या स्वतःच्याच तेजाने - (सः) मुक्तः - तो मुक्त झाला. ॥ ४५ ॥

अविदुरे - जवळ - वर्तमानः - असणारा - अयं - हा - बालः अपि - लहान असूनही - वै - खरोखर - अजडधीः - भीतीने मंद झालेली बुद्धि ज्याची असा - प्रभुः - सामर्थ्यवान असा - शुनःशेपः इव - शुनशेपाप्रमाणे - मे - माझे - अनार्यं - वाईट कृत्य - न विस्मरति - विसरणार नाही. ॥ ४६ ॥

अयं - हा - अप्रमेयानुभावः - ज्याचे सामर्थ्य कळण्याजोगे नाही असा - अकुतश्चिद्भयः - ज्याला कोणापासून भीती नाही असा - अमरः - अमर - नूनं - खरोखर - एतद्विरोधेन - ह्याच्याशी विरोध केल्याने - मे - मला - मृत्यूः - मृत्यू - भविता - होईल - (अन्यथा) न वा भविता - एरवी होणार नाही. ॥ ४७ ॥

इति - अशा - चिंतया - काळजीमुळे - किंचित् - थोडी - म्लानश्रियं - मलिन झाली आहे चर्या ज्याची अशा - अधोमुखं - खाली तोंड करून बसलेल्या - तं - त्या हिरण्यकशिपुला - औशनसौ - शुक्राचे मुलगे - शंडामर्कौ - शंड व अमर्क हे - विविक्ते - एकांती - इति ह - असे खरोखर - ऊचतुः - बोलले. ॥ ४८ ॥

नाथ - हे स्वामी - त्वया एकेन - तुझ्या एकटयाकडूनच - भ्रुवा - भ्रुकुटींच्या - विजृंभणत्रस्तसमस्तधिषपं - चमकण्याने ज्यांतील सर्व लोकपाल त्रासले आहेत असे - जगत्त्रयं - त्रैलोक्य - जितं - जिंकले गेले - तस्य तव - त्या तुला - चिन्त्यं - काळजी करण्याजोगे - (किंचित् अपि) न चक्ष्महे - काही आम्हाला दिसत नाही - वै - खरोखर - शिशूनां - लहान मुलांची कृति - गुणदोषयोः - लाभ व हानि यांचे - पदं - स्थान - न - नाही. ॥ ४९ ॥

यावत् - जोपर्यंत - गुरुः - गुरु - भार्गवः - शुक्राचार्य - आगमिष्यति - येईल तोपर्यंत - इमं - ह्याला - तु - तर - वरुणस्य - वरुणाच्या - पाशैः - पाशांनी - बद्धवा - बांधून - निधेही - ठेव - यया - जेणेकरून - भीतः (सः) - भ्यालेला तो - न पलायते - पळणार नाही - पुंसः - पुरुषांची - बुद्धिः - बुद्धि - वयसा - योग्य वयात आल्याने - च - आणि - आर्यसेवया - सत्पुरुषांच्या सेवेने - समीचीना भवति - चांगली होते. ॥ ५० ॥

गुरुपुत्रोक्तं - गुरुपुत्रांचे भाषण - तथा इति - बरे आहे म्हणून - अनुज्ञाय - स्वीकारून - इदं - हे - अब्रवीत् - म्हणाला - हि - आता - गृहमेधिनां - गृहस्थाश्रमी अशा - राज्ञां - राजांचे - ये - जे - धर्माः - धर्म - (ते) अस्य - ते ह्याला - उपदेष्टव्याः - शिकविले जावे. ॥ ५१ ॥

राजन् - हे धर्मराजा - प्रश्रितावनताय - विनयशील व नम्र अशा - प्रल्हादाय - प्रल्हादाला - नितरां - अत्यंत काळजीने - धर्मं च अर्थं - धर्म आणि अर्थ - कामं च - आणि काम - अनुपूर्वशः - क्रमाक्रमाने - ऊचतुः - सांगते झाले. ॥ ५२ ॥

गुरुभिः - गुरूंनी - आत्मने - स्वतःला - यथा (वत्) - योग्य रीतीने - त्रिवर्गं - तीन पुरुषार्थ - उपशिक्षितं - शिकविले - द्वंद्वारामोपवर्णितां - सुखदुःखादि द्वंद्वात विश्राम पावणार्‍यांनी वर्णिलेल्या - तच्छिक्षां - त्यांच्या शिक्षणाला - साधु - चांगले - न मेने - मानिता झाला नाही. ॥ ५३ ॥

यदा - जेव्हा - आचार्यः - गुरुजी - गृहमेधीयकर्मसु - गृहस्थाश्रमासंबंधी कर्मांनिमित्त - परावृत्तः - दूर जाई - कृतक्षणैः - ज्यांना संधी सापडली आहे अशा - वयस्यैः बालकैः - बरोबरीच्या मुलांनी - तत्र - त्याठिकाणी - सः - तो प्रल्हाद - उपहूतः - बोलाविला जात असे. ॥ ५४ ॥

अथ - मग - तन्निष्ठां विद्वान् - त्या मुलांची स्थिती जाणणारा - महाबुधः - मोठा ज्ञानी असा तो प्रल्हाद - तान् - त्यांना - श्लक्ष्णया - मधुर अशा - वाचा - वाणीने - प्रत्याहूय - हाक मारून - प्रहसन् इव - हसतहसतच - उवाच - बोलला. ॥ ५५ ॥

राजेंद्र - हे धर्मराजा - द्वंद्वारामेरितेहितैः - सुखदुःखादिकांनी रममाण होणार्‍यांच्या उपदेशांनी - नदूषितधियः - ज्यांची बुद्धि भ्रष्ट झाली नाही असे - तन्न्यस्तहृदयेक्षणाः - त्या प्रल्हादाच्या ठिकाणी मन व नेत्र लागून गेले आहेत ज्यांचे असे - त्यक्तक्रीडापरिच्छदाः - ज्यांनी आपली क्रीडासाधने सर्व टाकिली आहेत असे - ते - ते - सर्वे - सगळे - बालाः - बालक - तु - तर - तग्दौरवात् - त्या प्रल्हादाच्याविषयी आदर असल्यामुळे - पर्युपासत - सभोवार बसते झाले - करुणः - दयाळू - मैत्रः - सर्वांशी मित्रत्वाने वागणारा - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त असा - असुरः - दैत्य प्रल्हाद - तान् - त्या बालकांना - आह - म्हणाला. ॥ ५६-५७ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय पाचवा समाप्त

GO TOP