श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ४ था - अन्वयार्थ

हिरण्यकशिपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन -

अथ - नंतर - एवं - याप्रमाणे - वृतः - वराची याचना केलेला - तत्तपसा - त्या हिरण्यकशिपूच्या तपश्चर्येने - प्रीतः - संतुष्ट झालेला - शतधृतिः - ब्रह्मदेव - तस्य हिरण्यकशिपोः - त्या हिरण्यकशिपूला - सुदुर्लभान् वरान् - अत्यंत दुर्लभ असे वर - प्रादात् - देता झाला ॥१॥

तात - हे हिरण्यकशिपो - यान् वरान् - जे वर - मम - माझ्यापासून - वृणीषे - तू मागत आहेस - इमे - ते हे - पुंसां - पुरूषांना - दुर्लभाः - मिळण्यास कठीण - यद् अपि - जरी आहेत - तथा अपि - तरीही - अंग - हिरण्यकशिपो - दुर्लभान् वरान् - दुर्लभ वरांना - वितरामि - मी देतो ॥२॥

ततः - नंतर - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - अमोघानुग्रहः - ज्याचा अनुग्रह कधी फुकट जावयाचा नाही असा - असुरवर्येण - दैत्यश्रेष्ठ हिरण्यकशिपूने - पूजितः - पूजिलेला - प्रजेश्वरैः - मरीचि आदिकरून प्रजापतींनी - स्तूयमानः - स्तविलेला - विभूः - ब्रह्मदेव - जगाम - स्वस्थानी गेला ॥३॥

एवं - याप्रमाणे - लब्धवरः दैत्यः - ज्याला वर मिळाला आहे असा हिरण्यकशिपु दैत्य - हेममयं वपुः - सुवर्णमय शरीर - बिभ्रत - धारण करीत - भ्रातुः वधं - भावाचा वध - अनुस्मरन् - नित्य आठवीत - भगवति - परमेश्वराविषयी - द्वेषं अकरोत् - वैर करिता झाला. ॥४॥

सः महासूरः - तो मोठा दैत्य हिरण्यकशिपु - सर्वाः दिशः - सर्व दिशांना - च - आणि - त्रीन् लोकान् - तिन्ही लोकांना - विजित्य - जिंकून - देवासुरमनुष्येन्द्रान् - देव, दैत्य व मनुष्य यांच्या अधिपतींना - गंधर्वगरुडोरगान् - गंधर्व, गरुड व सर्प यांना ॥५॥

अथ - तसेच - सिद्धचारणविद्याध्रान् - सिद्ध, चारण व विद्याधर यांना - ऋषीन् - ऋषींना - पितृपतीन् - यमधर्मादिकांना - मनून् - मनूंना - यक्षरक्षःपिशाचेशान् - यक्ष, राक्षस व पिशाच यांच्या स्वामींना - प्रेतभूतपतीन् - प्रेत व भूते यांच्या अधिपतींना ॥६॥

विश्वजित् - विश्वाला जिंकणारा दैत्य - सर्वसत्त्वपतीन् - सर्व प्राणिमात्रांच्या अधिपतींना - जित्वा - जिंकून - वशं च आनीय - आणि आपल्या ताब्यात आणून - तेजसा सह - तेजासह - लोकपालानां - लोकपालांची - स्थानानि - स्थाने - जहार - हरण करिता झाला. ॥७॥

अखिलर्द्धिमत् - सर्व ऐश्वर्याने युक्त असा तो दैत्य - देवोद्यानश्रिया - देवांच्या क्रीडास्थानरूपी संपत्तीने - जुष्टं - युक्त असा - त्रिविष्टपं - स्वर्ग - अध्यास्ते स्म - बळकविता झाला - विश्वकर्मणा - विश्वकर्म्याने - साक्षात् - प्रत्यक्ष - निर्मितं - निर्माण केलेल्या - त्रैलोक्यलक्ष्म्यायतनं - त्रैलोक्याच्या लक्ष्मीचे वसतिस्थान अशा - महेंद्रभवनं - इंद्राच्या घरी - अध्युवास - राहता झाला. ॥८॥

यत्र - ज्याठिकाणी - विद्रुमसोपानाः - पोवळ्यांचे जिने - महामारकताः भुवः - मूल्यवान पाचूंच्या जमिनी - यत्र - ज्याच्या ठिकाणी - स्फाटिककुडयानि - स्फटिक मण्यांच्या भिंती - वैदूर्यपंक्तयः - वैडूर्य मण्यांच्या खांबांच्या ओळी. ॥९॥

यत्र - ज्याठिकाणी - चित्रवितानानि - चित्र-विचित्र छते - पद्मरागासनानि - पद्मराग मण्यांची आसने - पयःफेननिभाः - पाण्याच्या फेसाप्रमाणे स्वच्छ - च - आणि - मुक्तादामपरिच्छदाः - मोत्यांचे हार हीच आहेत वेष्टणे ज्यांची असे - शय्याः सन्ति - बिछाने आहेत. ॥१०॥

सुदतीः देव्यः - सुंदर देवस्त्रिया - कूजद्भिः नूपुरैः - रुणझुणणार्‍या नूपुरांनी युक्त अशा - इतस्ततः - जिकडेतिकडे - शब्दयंत्यः - एकमेकींना हाक मारीत - रत्नस्थलीषु - रत्नजडित भूमीवर - सुंदरं मुखं - आपले सुंदर मुख - पश्यंति - पाहतात. ॥११॥

तस्मिन् महेंद्रभवने - त्या इंद्राच्या घरात - महाबलः - महाबलवान - महामनाः - मोठया मनाचा - निर्जितलोकः - ज्याने तिन्ही लोक जिंकले आहेत असा - एकराट् - ज्याला प्रतिस्पर्धी कोणीही नाही असा एकच राजा - प्रतापितैः - पराक्रमी अशा - सुरादिभिः - देवादिकांनी - अभिवंद्यांघ्नियुगः - ज्याचे पाय वंदिले आहेत असा - ऊर्जितचंडशासनः - ज्याचा अंमल बळकट व तीव्र आहे असा तो हिरण्यकशिपु - रेमे - रमता झाला. ॥१२॥

अंग - हे राजा - पांडव - परीक्षिता - उरुगंधिना - ज्याचा गंध उग्र आहे अशा - मधुना - मद्याने - मत्तं - उन्मत्त झालेल्या - विवृत्तताम्राक्षं - तारवटलेले व लाल आहेत नेत्र ज्याचे अशा - तपोयोगबलौजसां पदं - तप, योग, बल व वीर्य ह्यांचे माहेर घर अशा - त्रिभिःविना - ब्रह्मा, विष्णु व रुद्र यांच्याशिवाय - अशेषधिष्ण्यपाः - सर्व लोकपाल - उपायनपाणिभिः - हातांत नजराणे घेऊन - उपासत - सेविते झाले. ॥१३॥

पांडव - हे परीक्षित राजा - विश्वावसुः - विश्वावसु - तुम्बुरुः - तुम्बुरु - अस्मदादयः - आम्ही आहो आदि ज्यांमधे असे - गंधर्वसिद्धाः - गंधर्व व सिद्ध - ऋषयः - ऋषी - च - आणि - विद्याधराः - विद्याधर - अप्सरसः - अप्सरा - मुहुः - वारंवार - ओजसा - आपल्या पराक्रमाने - महेंद्रासनं - इंद्राच्या आसनावर - स्थितं - बसलेल्या दैत्याला - अस्तुवन् - स्तविते झाले - जगुः - गाते झाले. ॥१४॥

सः एव - तो दैत्यच - वर्णाश्रमिभिः - वर्णाश्रमसंबंधी - भूरिदक्षिणैः - ज्यांत पुष्कळ दक्षिणा दिली जाते अशा - क्रतुभिः - यज्ञांनी - इज्यमानः - पूजिलेला असा - स्वेन - आपल्या - ओजसा - सामर्थ्याने - हविर्भागान् अग्रहीत् - हविर्भाग ग्रहण करिता झाला. ॥१५॥

तस्य - त्या दैत्याची - सप्तदीपवती - सात द्वीपांनी युक्त अशी - मही - पृथ्वी - अकृष्टपच्या - नांगरल्याशिवाय पिकणारी - आसीत् - झाली - तथा - त्याप्रमाणे - द्यौः - स्वर्ग - तु - तर - कामदुधा - इच्छित वस्तू देणारा - नभः च - आणि आकाश - नानाश्चर्यपदं - नानाप्रकारच्या आश्चर्याचे स्थान झाले.॥१६॥

क्षारसीधुघृतक्षौद्रदधिक्षीरामृतोदकाःरत्नाकराः - क्षार, मद्य, घृत, मध, दही, दूध व गोडे पाणी यांचे समुद्र - च - आणि - तत्पत्न्यः - त्यांच्या स्त्रिया ज्या नद्या त्या - उर्मिभिः - लाटांनी - रत्नौघान् - रत्नांच्या समुदायांना - ऊहुः - वाहून आणित्या झाल्या.॥१७॥

शैलाः - पर्वत - द्रोणिभिः - दर्‍यांनी - आक्रीडं - क्रीडास्थानाला - द्रुमाः - वृक्ष - सर्वर्तुषु - सगळ्या ऋतूंमध्ये - गुणान् - पुष्पफलादिक गुणांना - सः च - व तो दैत्य - लोकपालानां - लोकपालांच्या - पृथग्गुणान् - वर्षण, दहन व शोषण इत्यादि निरनिराळया गुणांना - एकः एव दधार - एकटाच धारण करिता झाला. ॥१८॥

सः - तो - निर्जितककुब् - ज्यांनी दाही दिशा जिंकल्या आहेत असा - एकराट् - निष्कंटक राजा - प्रीयान् विषयान् - आवडत्या विषयांना - यथोपजोषं - आवडीप्रमाणे - भुंजानः - भोगीत असतानाही - अजितेंद्रियः - जिंकली नाहीत इंद्रिये ज्याने असा - न अतृप्यत् - तृप्त झाला नाही. ॥१९॥

एवं - याप्रमाणे - ऐश्वर्यमत्तस्य - ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या - दृप्तस्य - गर्विष्ठ अशा - उच्छास्त्र वर्तिनः - शास्त्राचे उल्लंघन करणार्‍या - ब्रह्मशापं उपेयुषः - ब्राह्मणांच्या शापाला प्राप्त झालेल्या त्या दैत्याचा - महान् कालः - मोठा अवधि - व्यतीयाय - निघून गेला. ॥२०॥

तस्य उग्रदंडसंविग्नाः - त्याच्या कडक शिक्षेने त्रासलेले - सपालकाः - लोकपालासह - सर्वे लोकाः - सगळे लोक - अन्यत्र अलब्धशरणाः - दुसरा कोणी रक्षण करणारा मिळाला नाही ज्यांना असे - शरणं जग्मुः - शरण गेले - अच्युतं - नारायणाला. ॥२१॥

यत्र - ज्याठिकाणी - आत्मा - सर्वांतर्यामी - ईश्वरः - परमेश्वर - हरिः - नारायण - यत् (च) - व जेथे - गत्वा - जाऊन - शान्ताः - शमदमादियुक्त - अमलाः - पापरहित - संन्यासिनः - सर्वसंगपरित्याग केलेले लोक - न निवर्तते - मागे फिरत नाहीत - तस्यै काष्ठायै - त्या दिशेला - नमः अस्तु - नमस्कार असो. ॥२२॥

इति - असे म्हणून - ते - ते - संयतात्मानः - आत्मसंयमन केलेले - समाहितधियः - ज्यांची बुद्धि निश्चल झाली आहे असे - अमलाः - पापरहित - विनिद्राः - सुटली आहे निद्रा ज्यांची असे - वायुभोजनाः - वात भक्षण करणारे - हृषीकेशं उपतस्थुः - नारायणाची उपासना करिते झाले. ॥२३॥

तेषां - त्यांना - अरूपा - जिचा वक्ता दिसत नाही अशी - मेघनिस्वना - मेघाप्रमाणे गंभीर ध्वनीची - ककुभः संनादयंती - दिशा दुमदुमविणारी - साधूनां - साधूंना - अभयंकरी - अभय देणारी - वाणी - वाणी - आविरभूत् - प्रगट झाली. ॥२४॥

विबुधश्रेष्ठाः - देवश्रेष्ठ हो - मा भैष्ट - भिऊ नका - वः - तुमचे - सर्वेषां - सर्वांचे - भद्रं - कल्याण - अस्तु - असो - हि - कारण - मद्दर्शनं - माझे दर्शन - भूतानां - प्राण्यांच्या - सर्वश्रेयोपपत्तये (अस्ति) - सर्व प्रकारच्या कल्याणांच्या प्राप्तीकरिता असते. ॥२५॥

च - शिवाय - एतस्य दैतेयापसदस्य - ह्या दुष्ट दैत्यश्रेष्ठ हिरण्यकशिपुचे - दौरात्म्यं - दुष्टपण - (मया) ज्ञातं - मी जाणिले - तस्य - त्याची - शांतिं - शांति - करिष्यामि - मी करीन - तावत् - तोपर्यंत - कालं - काही काळ - प्रतीक्षत - वाट पाहा. ॥२६॥

यदा - जेव्हा - देवेषु - देवांच्या ठिकाणी - वेदेषु - वेदांच्या ठिकाणी - गोषु - गाईंच्या ठिकाणी - विप्रेषु - ब्राह्मणांविषयी - साधुषु - साधूंविषयी - धर्मे च - धर्माविषयी - वा - अथवा - मयि - माझ्याविषयी - (तस्य) विद्वेषः (भवति) - त्याचा अतिशय द्वेष होईल - तदा - तेव्हा - सः आशु विनश्यति - तो लवकर नष्ट होईल. ॥२७॥

यदा - जेव्हा - महात्मने - श्रेष्ठ मनाच्या - निर्वैराय - वैरभावरहित अशा - प्रशांताय - अत्यंत शांत अशा - स्वसुताय प्रल्हादाय - स्वतःचा मुलगा जो प्रल्हाद त्याचा - सः द्रुह्येत् (तदा) - तो द्रोह करील तेव्हा - वरोर्जितं अपि (तं) - वरामुळे बलाढय झालेल्या सुद्धा त्याला - हनिष्ये - मी ठार मारीन. ॥२८॥

लोकगुरुणा - परमेश्वराने - इति - याप्रमाणे - उक्ताः - आश्वासन दिलेले - दिवौकसः - देव - तं प्रणम्य - त्या विष्णूला नमस्कार करून - गतोद्वेगाः - ज्यांची चिंता नाहीशी झाली आहे असे - न्यवर्तन्त - परत फिरले - च - आणि - असुरं हतं मेनिरे - राक्षस मेला असे मानते झाले. ॥२९॥

तस्य दैत्यपतेः - त्या दैत्यश्रेष्ठ हिरण्यकशिपुचे - परमाभ्दुताः - अत्यंत गुणवान असे - चत्वारः पुत्राः - चार मुलगे होते - तेषां प्रल्हादः - त्यामध्ये प्रल्हाद हा - गुणैः - सद्गुणांनी - महान् - श्रेष्ठ - महदुपासकः (च) - आणि सत्पुरुषांची सेवा करणारा - अभूत् - होता. ॥३०॥

ब्रह्मण्यः - ब्राह्मणांच्या कल्याणाविषयी झटणारा - शीलसंपन्नः - सुस्वभावी - सत्यसंधः - सत्य आहे प्रतिज्ञा ज्याची असा - जितेंद्रियः - इंद्रिये जिंकलेला - सर्वभूतानां - सर्व प्राणिमात्रांचा - आत्मवत् - अंतर्यामी आत्म्याप्रमाणे - एकः - एकटाच - प्रियसुहृत्तमः - अत्यंत प्रिय मित्र असा. ॥३१॥

दासवत् - दासाप्रमाणे - संनतार्यांघ्निः - नमस्कार केला आहे सत्पुरुषांच्या चरणाला ज्याने असा - पितृवत् - बापाप्रमाणे - दीनवत्सलः - दीनांविषयी कृपाळू - भ्रातृवत् - भावाप्रमाणे - सदृशे - आपल्याशी समान अशा लोकांविषयी - स्निग्धः - स्नेह बाळगणारा - गुरुषु - गुरुंचेविषयी - ईश्वरभावनः - ईश्वराप्रमाणे भावना ठेवणारा - विद्यार्थरूपजन्माढयः - विद्या, संपत्ति, रूप व जन्म यांनी संपन्न - मानस्तंभविवर्जितः - मानरहित व गर्वरहित असा. ॥३२॥

व्यसनेषु - संकटात - नोद्विग्नचित्तः - दुःखित चित्त नाही ज्याचे असा - निःस्पृहः (सन्) - निरिच्छ असल्यामुळे - श्रुतेषु - ऐकिलेल्या - दृष्टेषु - पाहिलेल्या - गुणेषु - विषयांच्या गुणांविषयी - अवस्तुदृक् - सत्यत्वाने न पाहणारा - दांतेंद्रियप्राणशरीरधीः - इंद्रिय, प्राण, शरीर व बुद्धि यांचे ज्याने दमन केले आहे असा - सदा - सदा - प्रशांतकामः - अत्यंत शांत स्वभावाचा - असुरः - असुर - रहितासुरः - असुरांच्या दोषांनी रहित. ॥३३॥

राजन् - हे राजा - यस्मिन् - ज्याच्यामधील - महद्‌गुणाः - थोरांचे गुण - कविभिः - विद्वानांकडून - मुहुः - वारंवार - गृह्यंते - ग्रहण केले जातात - ते - ते गुण - अधुना - अजून - यथा ईश्वरे भगवति (तथा) - जसे समर्थ अशा भगवंताच्या ठिकाणी त्याचप्रमाणे - न अपिधीयन्ते - गुप्त झाले नाहीत. ॥३४॥

नृप - हे राजा - साधुगाथासदसि - साधू कोण असा प्रश्न उपस्थित झालेल्या सभेमध्ये - रिपवः अपि - शत्रुरूप असलेलेहि - सुराः - देव - यं - ज्या प्रल्हादाला - प्रतिमानं - दृष्टांतरूप - प्रकुर्वंति - करितात - किमुत - तर मग - अन्ये भवादृशा - दुसरे तुझ्यासारखे. ॥३५॥

असंख्येयैः गुणैः - अनंत गुणांनी - तस्य माहात्म्यं - त्याचे थोरपण - अलं सूच्यते - पुरेसे दाखविले जात - यस्य - ज्याची - भगवति वासुदेवे - भगवान वासुदेवाच्या ठिकाणी - नैसर्गिकी - स्वाभाविक - रतिः - प्रीती ॥३६॥

न्यस्तक्रीडनकः - सोडून दिले आहेत खेळ ज्याने असा - जडवत् - अज्ञान्याप्रमाणे - तन्मनस्तया - परमेश्वराकडे चित्त लागून राहिल्यामुळे - कृष्णग्रहगृहीतात्मा - कृष्णरूपी पिशाचाने ज्याचे मन पछाडले आहे असा - बालः - लहान प्रल्हाद - ईदृशं - अशा - जगत् - जगाला - न वेद - जाणत नव्हता. ॥३७॥

गोविंदपरिरंभितः - परमेश्वराने आलिंगिलेला तो प्रल्हाद - आसीनः - बसताना - पर्यटन् - फिरताना - अश्र्नन् - खाताना - शयानः - निजताना - प्रपिवन् - पिताना - ब्रुवन् - बोलताना - एतानि - ह्या सर्व कृत्यांना - न अनुसंधत्त - लक्षात घेत नसे. ॥३८॥

क्वचित् - एखाद्या वेळी - वैकुंठचिंताशबलचेतनः - परमेश्वराच्या चिंतनाने भांबावून गेला आहे आत्मा ज्याचा असा तो - रुदति - रडे - क्वचित् - कधी - तच्चिंतल्हादः - त्या परमेश्वराच्या ध्यानाने आनंद पावलेला असा - हसति - हसे - क्वचित् - केव्हा - उद्‌गायति - मोठयाने गाई. ॥३९॥

क्वचित् - केव्हा - उत्कंठः - मोठा ध्वनी आहे ज्याचा असा - नदति - ओरडे - क्वचित् - कधी - विलज्जः - सोडिली आहे लज्जा ज्याने असा - नृत्यति - नाचे - ह - खरोखर - क्वचित् - एखाद्या वेळी - तद्भावनायुक्तः - परमेश्वराच्या भक्तीने युक्त असा - तन्मयः - तदाकार वृत्ति झालेला - अनुचकार - सारख्या लीला करीत असे. ॥४०॥

क्वचित् - कधी - संस्पर्शनिर्वृतः - आलिंगनाने सुखी झालेला - उत्पुलकः - रोमांचयुक्त असा - अस्पंदप्रणयानंदसलिलामीलितेक्षणः - निश्चल व प्रेमांनी उद्‌भवलेल्या आनंदाश्रूंनी ज्याचे नेत्र थोडे मिटले आहेत असा - तूष्णीं आस्ते - स्तब्ध बसे. ॥४१॥

सः - तो प्रल्हाद - अकिंचनसंगलब्धया - सर्वसंगपरित्याग केलेल्या सत्पुरुषांच्या समागमाने प्राप्त झालेल्या - उत्तमश्लोकपदारविंदयोः - पुण्यश्लोक परमेश्वराच्या चरणकमलांच्या - निषेवया - सेवेने - मुहुः - वारंवार - आत्मनः - स्वतःचे - परां - श्रेष्ठ - निर्वृतिं - सुख - तन्वन् - मिळविणारा असा - दुःसंगदीनान्यमनःशमं - दुष्टांच्या संगतीने दीन झालेल्या इतरांच्या मनाची शांती - व्यधात् - करीत असे. ॥४२॥

राजन् - हे राजा - हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - तस्मिन् महाभागवते - त्या मोठया भगवद्भक्त अशा - महाभागे - महाभाग्यवान अशा - महात्मनि - उदार मनाच्या प्रल्हादाच्या ठिकाणी - अघं - छळ - अकरोत् - करिता झाला. ॥४३॥

सुव्रत देवर्षे - हे सदाचारसंपन्न नारदमुने - यत् - ज्या कारणास्तव - पिता - बाप - साधवे - साधु अशा - शुद्धाय - सदाचारी - आत्मजाय - स्वतःच्या पुत्राचा - अघं - छळ - अदात् - करिता झाला - एतत् - हे - तव - तुझ्यापासून - वेदितुं - ऐकण्यास - हि - खरोखर - इच्छामः - आम्ही इच्छितो.॥४४॥

पुत्रवत्सलाः - पुत्रावर प्रेम करणारे - पितरः - वडील - स्वान् - आपल्या - विप्रतिकूलान् - प्रतिकूल वागणार्‍या - पुत्रान् - मुलांना - शिक्षार्थं - चांगले शिक्षण मिळावे म्हणून - उपालभंते - रागे भरतात पण - यथा - जसा - अपरः - शत्रु त्याप्रमाणे - अघं - छळ - न एव (कुर्वन्ति) - करीतच नाहीत. ॥४५॥

अनुवशान् - अनुकूल अशा - तादृशान् - तसल्या प्रल्हादासारख्या - गुरुदेवतान् - वडिलांना मान देणार्‍या - साधून् - सत्पुरुषांना - किमुत - कसे छळतील - प्रभो - समर्थ - ब्रह्मन् - हे नारदा - यत् - जो - पुत्राय - मुलांविषयीचा - पितुः - बापाचा - द्वेषः - द्वेष - मरणाय - मरणाला - प्रयोजितः - कारणीभूत झाला - एतत् - ते हे - अस्माकं - आम्हाला - कौतूहलं - कौतुक वाटते ते - विधम - दूर कर. ॥४६॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय चवथा समाप्त

GO TOP