श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय २ रा - अन्वयार्थ

हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकशिपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन -

राजन् - हे धर्मराजा- एवं - याप्रमाणे- क्रोडमूर्तिना हरिणा - वराहरूपी परमेश्वराकडून- भ्रातरि विनिहते - भाऊ मारिला गेला असता- हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु- शुचा (च) रुषा - शोकाने व क्रोधाने- पर्यतप्यत् - संतप्त झाला. ॥१॥

च - आणि- रुषा - क्रोधाने- घूर्णः - भ्रमिष्ट झालेला- संदष्टदशनच्छदः - दात खाणारा- कोपोज्ज्वलद्‌भ्यां चक्षुर्भ्यां - कोपाने अतिशय भडकून गेलेल्या नेत्रांनी- धूम्रं अंबरं - धूम्रयुक्त आकाश- निरीक्षन् - पाहात- इदं आह - हे बोलला. ॥२॥

करालदंष्ट्रोग्रदृष्टया - भयंकर दाढांमुळे उग्र दिसणार्‍या डोळ्यांनी- दुष्प्रेक्ष्यभ्रुकुटीमुखः - पाहण्यास कठीण अशा भुवया आहेत मुखावर असा- सदसि - सभेमध्ये- शूलं - शूळ- उद्यम्य - वर करून- दानवान् - दानवांना- इदं - हे- अब्रवीत् - बोलला. ॥३॥

भो भो - अहो- दानवदैतेयाः - दानव व दैत्य हो- द्विमूर्धन् - हे द्विमूर्धा- त्र्यक्ष - हे त्र्यक्षा- शंबरः - हे शंबरा- शतबाहो - हे शतबाहो- हयग्रीव - हे हयग्रीवा- नमुचे - हे नमुचे- पाक - हे पाका- इल्वल - हे इल्वला. ॥४॥

विप्रचित्ते - हे विप्रचित्ते- पुलोमन् शकुनादयः - हे पुलोम्या, अहो शकुन आदिकरून दैत्य हो- सर्वे - सर्वजण- शृणुत - तुम्ही ऐका- अनंतरं - नंतर- आशु - लवकर- क्रियतां - त्याप्रमाणे करा- चिरं मा - विलंब लावू नका. ॥५॥

समेन अपि - देवदैत्यांशी समानभाव असणार्‍याही- उपधावनैः - पण स्तुतीच्या योगाने- पार्ष्णिग्राहेण हरिणा - साह्यकारी होणार्‍या विष्णूमुळे- क्षुद्रैः सपत्नैः - क्षुद्र शत्रु जे देव त्यांनी- मे - माझा- सहृद् - सखा- दयितः - प्रिय- भ्राता - भाऊ- घातितः - मारिला. ॥६॥

तस्य त्यक्त्तस्वभावस्य - आपला मूळ स्वभाव सोडणार्‍या त्या- घृणेः - निर्दय अशा- मायावनौकस - मायारूपी अरण्यात राहणार्‍या- भजंतं भजमानस्य - भक्ती करणार्‍याला सेवणार्‍या- बालस्य इव अस्थिरात्मनः - बालकाप्रमाणे चंचलचित्ताच्या- मच्छूलभिन्नग्रीवस्य - माझ्या शूलाने ज्याचे मस्तक भग्न झाले आहे अशा विष्णूच्या- भूरिणा रुधिरेण - पुष्कळ रक्ताने- वै - खरोखर- गतव्ययः - ज्याचे दुःख नाहीसे झाले आहे असा मी- मे रुधिरप्रियं भ्रातरं - ज्याला रक्त आवडते अशा माझ्या भावाला- तर्पयिष्ये - तृप्त करीन. ॥७-८॥

तस्मिन् कूटे अहिते नष्टे - तो कपटी अकल्याण करणारा नष्ट झाला असता- विष्णुप्राणाः दिवौकसः - विष्णु हाच आहे प्राण ज्याचा असे देव- कृत्तमूले वनस्पतौ - वृक्षाचे मूळ तोडिले असता- विटपाः इव - जशा खांद्या तसे- शुष्यंति - सुकतील. ॥९॥

तावत् - तेथपर्यंत- यूयं - तुम्ही- विप्रक्षत्त्रसमेधितां - ब्राह्मण व क्षत्रिय यांनी वाढलेल्या- भुवं - भूमीवर- यात - जा- तपोयज्ञस्वाध्यायव्रतदानिनः - तप, यज्ञ, अध्ययन, व्रत व दान करणार्‍यांना- सूदयध्वं - मारा. ॥१०॥

विष्णुः - विष्णु- द्विजक्रियामूलः - ब्राह्मणाचे अनुष्ठान हा ज्याचा आधार आहे असा- युज्ञः - यज्ञरूपी- पुमान् - पुरुष आहे- देवर्षि पितृभूतानां - देव, ऋषि, पितर व प्राणी यांचे- च - आणि- धर्मस्य - धर्माचे- परायणं - श्रेष्ठ आश्रयस्थान आहे. ॥११॥

यत्रयत्र - जेथे जेथे- द्विजाः - ब्राह्मण- गावः - गाई- वेदाः - वेद- वर्णाश्रमाः - वर्ण व आश्रम- क्रियाः - कर्मे ह्या गोष्टी चालू आहेत- तंतं जनपदं - त्या त्या देशाला- यात - जा- संदीपयत - जाळा- वृश्चत - उच्छिन्न करा. ॥१२॥

इति - याप्रमाणे- ते - ते दैत्य- भर्तृनिर्देशं - स्वामीची आज्ञा- शिरसा - मस्तकाने- आदाय - ग्रहण करून- आदृताः - आदर दाखविणारे- कदनप्रियाः - हिंसा करणे ज्यांना प्रिय आहे असे- तथा - त्याप्रमाणे- प्रजानां - प्रजांची- कदनं - हिंसा- चक्रुः - करिते झाले. ॥१३॥

पुरग्रामव्रजोद्यानक्षेत्रारामाश्रमाकरान् - नगर, गाव, गोठे, बागा, शेते, उपवने व रत्नादिकांच्या खाणी- खेटखर्वटघोषान् - शेतकर्‍यांच्या झोपडया, डोंगरांच्या दर्‍यांमधील गाव, गवळ्यांचे वाडे- च - आणि- पत्तनानि - राजधान्या- ददहुः - जाळिते झाले. ॥१४॥

केचित् - कोणी- खनित्रैः - खणण्याच्या हत्यारांनी- सेतुप्राकारगोपुरान् - पूल, देवळे, गोपुरे- बिभिदुः - फोडिते झाले- केचित् - कोणी- परशुपाणयः - हातांत कुर्‍हाड घेतलेले- आजीव्यान् - ज्यांवर उपजीविका होते असे- वृक्षान् - वृक्ष- चिच्छिदुः - तोडिते झाले- अन्ये - दुसरे- ज्वलितोल्मुकैः - जळक्या कोलत्यांनी- प्रजानां - प्रजांची- शरणानि - घरे- प्रादहन् - जाळिते झाले. ॥१५॥

एवं - याप्रमाणे- दैत्येंद्रानुचरैः - हिरण्यकशिपुच्या सेवकांनी- मुहुः - वारंवार- लोके विप्रकृते - जन त्रासवून सोडिले असता- देवाः - देव- अलक्षिताः - कोणीकडून न पाहिले गेलेले- दिवं - स्वर्गलोकाला- परित्यज्य - सोडून- भुवि - पृथ्वीवर- चेरुः - संचार करिते झाले. ॥१६॥

दुःखितः - दुःखी- हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु- संपरेतस्य - मेलेल्या- भ्रातुः - भावांची- कटोदकादीनि - प्रेताला उदक देणे, प्रेतश्राद्धे इत्यादि कृत्ये- कृत्वा - करून- भ्रातृपुत्रान् असांत्वयत् - भावांच्या मुलांचे सांत्वन करिता झाला. ॥१७॥

शकुनिं - शकुनीला- शंबरं - शंबराला- धृष्टं - धृष्टाला- भूतसंतापनं - भूतसंतापनाला- वृकं - वृकाला- कालनाभं - कालनाभाला- महानाभं - महानाभाला- हरिश्मश्रुं - हरिश्मश्रूला- अथ - आणि- उत्कचं - उत्कचाला- जनेश्वर - हे धर्मराजा- देशकालज्ञः - देश व काळ जाणणारा हिरण्यकशिपु- तन्मातरं रुषाभानुं - त्यांची आई जी रुषाभानु तिला- च - आणि- जननीं दितिं - आपली आई जी दिति तिला- श्लक्ष्णया गिरा - मधुर वाणीने- इदं - हे- आह - म्हणाला. ॥१८-१९॥

अंब अंब - हे माते हे माते- हे वधूः - हे वहिनी- पुत्राः - पुत्र हो- वीरं - पराक्रमी हिरण्याक्षाविषयी- शोचितुं - शोक करण्याला- मा अर्हथ - तुम्ही योग्य नाही- शूराणां वधः रिपोः अभिमुखे - शत्रूंच्यासमोर शूरांचे वध- ईप्सितः श्लाघ्यः - इष्ट व स्तुत्य होय. ॥२०॥

सुव्रते - हे सुशील आई- दैवेन - दैवयोगाने- एकत्र - एकाठिकाणी- नीतानां - मिळालेल्या- स्वकर्मभिः - आपल्या कर्मांनी- उन्नीतानां - वियोग पावलेल्या- इह - ह्या लोकांत- भूतानां - प्राणिमात्रांचा- संवासः - एकत्र वास- प्रपायां इव - पाणपोईवरील वासाप्रमाणे. ॥२१॥

असौ - हा- नित्यः - नित्य- अव्ययः - नाशरहित- शुद्धः - पवित्र- सर्वगः - सर्वव्यापी- सर्ववित् - सर्वज्ञ- परः - सर्वश्रेष्ठ- आत्मा - आत्मा- आत्मनः मायया - आपल्या मायेने- गुणान् - सत्त्वादि गुणांना- विसृजन् - उत्पन्न करणारा- लिंगं - व्यक्तस्वरूप- धत्ते - धारण करितो. ॥२२॥

यथा - ज्याप्रमाणे- प्रचलता अंभसा - हलणार्‍या उदकामुळे- तरवः अपि - वृक्षही- चलाः इव दृश्यन्ते - जणू हालणारे असे दिसतात- वा - किंवा- भ्राम्यमाणेन चक्षुषा - फिरणार्‍या नेत्राच्या योगाने- भूः - पृथ्वी- चलती इव - जणू फिरणारी अशी- दृश्यते - दिसते. ॥२३॥

एवं - याप्रमाणे- भद्रे - हे कल्याणकारक आई- गुणैः - गुणांनी- भ्राम्यमाणे मनसि - भ्रमिष्ठ झालेल्या मनाच्या ठिकाणी- अलिंगः - देहरहित- अविकलः - परिपूर्ण- पुमान् - पुरुष- लिंगवान् इव - देहवानाप्रमाणे- तत्साम्यतां - त्याच्या सारखेपणाला- याति - प्राप्त होतो. ॥२४॥

हि - कारण- अलिंगे - देहरहित जीवाच्या ठिकाणी- लिंगभावना - देहाची कल्पना- प्रियाप्रियैः - प्रिय व अप्रिय यांच्याशी क्रमाने- वियोगः - वियोग- योगः - योग- कर्म - कर्म- संसृतिः - अनेक योनींत जन्म- संभवः - उत्पत्ति- च - आणि- विनाशः - नाश- च - आणि- विविधः - नानाप्रकारचा- स्मृतः - सांगितला आहे- शोकः - शोक- च - आणि- अविवेकः - अविचार- च - आणि- चिंता - काळजी- च - आणि- विवेकास्मृतिः - विवेकाचे विस्मरण- एव - खरोखर- एषः - हा- आत्मविपर्यासः (अस्ति) - आत्म्याचे स्वरूप उलट करण्याचा प्रकार होय. ॥२५-२६॥

अत्र अपि - ह्याविषयीसुद्धा - इमं पुरातनं इतिहासं - हा प्राचीन इतिहास - उदाहरंति - उदाहरण म्हणून सांगतात - यमस्य प्रेतबंधूनां - यम व मृताचे संबंधी यांमधील - तं संवादं - तो संवाद - निबोधत - समजून घ्या. ॥२७॥

उशीनरेषु - उशीनर देशामध्ये - विख्यातः - प्रख्यात - सुयज्ञः इति - सुयज्ञ नावाचा - राजा - राजा - अभूत् - होता - सपत्नैः - शत्रूंनी - युद्धे - युद्धात - निहतः - मारिला - ज्ञातयः - ज्ञातिबांधव - तं उपासत - त्याच्याजवळ बसले. ॥२८॥

विशीर्णरत्नकवचं - तुटून गेले आहे रत्नाचे कवच ज्याचे अशा - विभ्रष्टाभरणस्रजं - गळून गेले आहे अलंकार व माळा ज्याच्या अशा - शरनिर्भिन्नहृदयं - बाणाने फुटले आहे हृदय ज्याचे अशा - शयानं - निजलेल्या - असृगाविलं - रक्ताने माखलेल्या - प्रकीर्णकेशं - विखुरले आहेत केस ज्याचे अशा - ध्वस्ताक्षं - नष्ट झाली आहे दृष्टि ज्याची अशा - रभसा - क्रोधाने - दष्टदच्छदं - चाविला आहे ओठ ज्याने अशा - रजःकुंठमुखांभोजं - धुळीने मुखकमळ भरून गेले ज्याचे अशा - मृधे छिन्नायुधभुजं - रणात शस्त्रे व हात छिन्न झालेल्या. ॥२९-३०॥

दुःखिताः - दुःखी - महिष्यः - राजाच्या पटटराण्या - विधिना - दैवाने - तथाकृतं - त्याप्रमाणे अवस्था केलेल्या - पतिं उशीनरेंद्रं - उशीनरदेशाच्या राजाला - प्रसमीक्ष्य - पाहून - नाथ - हे स्वामी - हतः स्म - आम्ही अभागी आहो - इति - असे ओरडत - करैः - हातांनी - उरः - वक्षस्थलाला - भृशं - अत्यंत जोराने - घ्नंत्यः - ताडण करणार्‍या - मुहुः - वारंवार - तत्पदयोः उप अपतन् - त्याच्या पायांजवळ पडल्या. ॥३१॥

उच्चैः - मोठयाने - रुदंत्यः - रडणार्‍या - दयितांघ्रिपंकजं - पतीच्या चरणकमळाला - कुचकुंकुमारुणैः - स्तनांवरील केशरामुळे लाल झालेल्या - अस्रैः - अश्रूंनी - सिंचन्त्यः - भिजविणार्‍या - विस्रस्तकेशाभरणाः - केस व अलंकार अस्ताव्यस्त झालेल्या - आक्रंदनया - आक्रोशाने - नृणां - मनुष्यांच्या - शुचं - शोकाला - सृजंत्यः - उत्पन्न करणार्‍या स्त्रिया - विलेपिरे - विलाप करित्या झाल्या. ॥३२॥

अहो - अहो - प्रभो - स्वामी - अकरुणेन विधात्रा - निर्दय ब्रह्मदेवाने - नः दृगगोचरां - आमच्या दृष्टीने न दिसणार्‍या अशा - दशां - दशेला - भवान् - तू - प्रणीतः - नेलेला आहेस - उशीनराणां - उशीनर देशाच्या लोकांना - वृत्तिदः - निर्वाहाचे साधन देणारा असा - पुराकृतः - पूर्वी केलेला होतास - येन - ज्याने - अधुना - सांप्रत - शुचां विवर्धनः - शोकाची वृद्धी करणारा. ॥३३॥

महीपते - हे स्वामी - कृतज्ञेन - केलेले जाणणार्‍या - सुहृत्तमेन - अत्यंत इष्ट अशा - त्वया विना - तुझ्याशिवाय - ते - तुझ्या - वयं - आम्ही - कथं - कशा - स्याम - जगू - वीर - हे पराक्रमी स्वामी - यत्र - ज्याठिकाणी - यास्यसि - तू जाशील - तत्र - त्याठिकाणी - तव पादयोः - तुझ्या पायाशी - शुश्रूषतीनां (नः) - सेवा करणार्‍या आम्हाला - अनुयानं देहि - सहगमन करण्याची आज्ञा दे. ॥३४॥

एवं - ह्याप्रमाणे - वै - खरोखर - निर्हारं - दहनासाठी नेणे - अनिच्छन्तीनां - न इच्छिणार्‍या - मृतं पतिं - मेलेल्या पतीला - परिगृह्य - घेऊन - विलपतीनां (तासां) - शोक करणार्‍या त्या स्त्रियांचा - अर्कः - सूर्य - अस्तं - अस्तास - सन्यवर्तत - गेला. ॥३५॥

ह - खरोखर - तत्र - त्याठिकाणी - प्रेतबंधूनां - मृतांच्या बांधवांचा - परिदेवितं - विलाप - आश्रुत्य - श्रवण करून - स्वयं - स्वतः - यमः - यम - बालकः - बालक - भूत्वा - होऊन - उपागतः - आला - तान् - त्यांना - आह - म्हणाला. ॥३६॥

अहो - काय हो - वयसा अधिकानां अमीषां - वयाने वडील असणार्‍या ह्यांना - लोकविधिं - व लोकांमधील जन्ममरणादि प्रकार - विपश्यतां - पाहणार्‍यांना - विमोहः - मोठा मोह - यत्र - ज्या अव्यक्तापासून - आगतः - आला - तत्र - त्याठिकाणी - गतं - गेलेल्या - मनुष्यं - मनुष्याविषयी - स्वयं - स्वतः - सधर्माः अपि - तुल्य धर्माचे असतानाही - अपार्थं - व्यर्थ - शोचंति - शोक करीत आहेत. ॥३७॥

यत् - ज्याअर्थी - अत्र - ह्याठिकाणी - पितृभ्यां - आईबापांनी - त्यक्ताः - टाकिलेले - न विचिंतयामः - चिंता करीत नाही - अहो - अहो - वयं - आम्ही - वृकादिभिः - लांडगे आदिकरून पशूंकडून - अभक्ष्यमाणाः - न खाल्लेले - अबलाः - दुर्बळ असताही - धन्यतमाः - अत्यंत धन्य आहो - हि - कारण - यः - जो - गर्भे - गर्भामध्ये - रक्षति - रक्षण करितो - सः - तो सर्वठिकाणी - रक्षिता - रक्षण करील. ॥३८॥

यः - जो - ईशः - ईश्वर - इच्छया - इच्छेने - इदं - हे जग - सृजति - उत्पन्न करितो - यः - जो - अव्ययः - अविनाशी - अवलुंपते - संहार करितो - अबलाः - हे स्त्रियांनो - तस्य - त्या - इशितुः - परमेश्वराचे - चराचरं - स्थावरजंगमात्मक जग - क्रीडनं - खेळण्याचे साधन - आहुः - म्हणतात - निग्रहसंग्रहे - चराचराच्या संहारपालनाविषयी - प्रभुः - समर्थ. ॥३९॥

दिष्टरक्षितं - दैवाने रक्षण केलेले - पथि - रस्त्यात - च्युतं - पडलेले सुद्धा - तिष्ठति - जिवंत राहते - गृहे - घरात - स्थितं - असलेले - तद्विहतं - दैवाने उपेक्षिलेले - विनश्यति - नष्ट होते - तदीक्षितः - दैवाने अवलोकिलेला - वने - अरण्यात - अनाथः अपि - रक्षणकर्त्याशी रहित असताही - जीवति - जगतो - अस्य - ह्या परमेश्वराने - हतः - उपेक्षिलेला - गृहेअपि - घरातही - गुप्तः - रक्षण केलेला - न जीवति - जगत नाही. ॥४०॥

भूतानि - प्राणी - तैः तैः - त्या त्या - निजयोनिकर्मभि - आपल्या उत्पत्तीला कारणीभूत असे जे लिंगशरीर त्याला निमित्त झालेल्या कर्मांनी - भवंति - उत्पन्न होतात - काले - वेळ आली असता - सर्वशः - सर्वस्वी - न भवंति - नष्ट होतात - तत्र ह - खरोखर त्या वेळी - प्रकृतौ अपि - देहाच्या ठिकाणीही - स्थितः - असणारा - आत्मा - आत्मा - अन्यतमः - अगदी भिन्न असल्यामुळे - तस्याः - त्या प्रकृतीच्या - गुणैः - गुणांनी - न निबध्यते - बांधला जात नाही. ॥४१॥

इदं - हे - पुरुषस्य - पुरुषाचे - मोहजं - अविवेकापासून उत्पन्न झालेले - शरीरं - शरीर - यथा - ज्याप्रमाणे - भौतिकं - ऐश्वर्ययुक्त - गृहं - घर त्याप्रमाणे - पृथक् - वेगळे - ईयते - दिसते - यथा - जसा - औदकैः - उदकापासून झालेल्या पदार्थांनी - पार्थिवतैजसैः - पृथ्वी व तेज यांपासून झालेल्या पदार्थांनी - जातः - झालेला बुडबुडा, घट व कुंडल इत्यादि पदार्थ - कालेन - काही काळाने - विनश्यति - नष्ट होतो तसा - जनःविकृतः - पुरुषाचा देह परिणत झाल्यावर. ॥४२॥

यथा - ज्याप्रमाणे - अनलः - अग्नि - दारुषु - काष्ठांच्या ठिकाणी - भिन्नः - निराळा - ईयते - प्रतीत होतो - यथा - जसा - अनिलः - वायु - देहगतः - देहात असून - पृथक् स्थितः - निराळा अनुभवास येतो - तथा - ज्याप्रमाणे - नभः - आकाश - सर्वगतं - सर्वव्यापक असूनही - न सज्जते - कशालाही चिकटून राहत नाही - तथा - त्याप्रमाणे - पुमान् - आत्मा - सर्वगुणाश्रयः - देहेंद्रियाचा आश्रयभूत - परः - निराळा ॥४३॥

मूढाः - हे मूर्ख लोक हो - यं - ज्याकरिता - अनुशोचथ - तुम्ही शोक करिता - अयं - हा - सुयज्ञः - सुयज्ञ - ननु - खरोखर - शेते - निजलेला आहे - इह - ह्याठिकाणी - यः - जो - श्रोता - ऐकणारा - यः - व जो - अनुवक्ता - बोलणारा - सः - तो - कर्हिचित् - केव्हाही - न दृश्येत - दिसणार नाही. ॥४४॥

अयं - हा - अत्र - येथे - महान् - मोठा - असुः - प्राण - मुख्यः अपि - मुख्य असताही - श्रोता - ऐकणारा - न - नाही - अनुवक्ता - बोलणारा - न - नाही - च - आणि - यः - जो - इह - याठिकाणी - देहेंद्रियवान् - शरीर व इंद्रिये धारण करणारा - आत्मा - आत्मा - सः - तो - तु - तर - प्राणदेहयोः - प्राण व देह यांहून - अन्यः (अस्ति) - निराळा आहे. ॥४५॥

हि - कारण - अन्यः - निराळा - प्रभुः - आत्मा - भूतेंद्रियमनोलिंगान् - पंचमहाभूते, इंद्रिये, मन इत्यादि आहेत लक्षणे ज्यांची अशा - उच्चावचान् - लहानमोठया - देहान् - देहांना - भजति - सेवन करतो - च - आणि - स्वेन तेजसा - आपल्या तेजाने - तत् अपि - तेहि - उत्सृजति - टाकितो. ॥४६॥

हि - खरोखर - यावत् - जोपर्यंत - आत्मा लिंगान्वितः - आत्मा लिंगशरीराने युक्त - तावत् - तोपर्यंत - कर्मनिबंधनं - त्याला कर्माचे बंधन असते - ततः - त्यामुळे - विपर्ययः - स्वरूपाच्या उलट असे देहधर्मसेवन - क्लेशः - दुःख - अनुवर्तते - मागोमाग येते - (यतः अयं) मायायोगः - कारण हा सर्व मायेचा खेळ होय. ॥४७॥

गुणेषु - गुणांच्या कार्याविषयी - यत् - जे - अर्थदृग्वचः - वास्तविक दृष्टीचे बोलणे - अयं - हा - वितथाभिनिवेशः - मिथ्या आरोप - सर्वं - सर्व - ऐंद्रियकं - इंद्रियांचे व्यापार - मृषा - असत्य - यथा - जसे - मनोरथः स्वप्नः - मनात आलेले स्वप्न. ॥४८॥

अथ - यास्तव - इह - ह्या लोकांत - नित्यं - नित्य अशा आत्म्याविषयी - वा - किंवा - अनित्यं - अनित्य देहाविषयी - तद्विदः - नित्यानित्यविवेकी ज्ञानी पुरुष - न शोचंति - शोक करीत नाहीत - शोचतां - शोक करणार्‍यांचा - स्वभावः - स्वभाव - अन्यथा कर्तुं - पालटणे - न शक्यते - शक्य नाही - इति - असा हा प्रकार आहे. ॥४९॥

विपिने पक्षिणां - अरण्यात पक्ष्यांचा - अंतकः - काळ म्हणून - निर्मितः - परमेश्वराने निर्माण केलेला - कश्चित् लुब्धकः - कोणी एक पारधी - तत्रतत्र - प्रत्येक ठिकाणी - प्रलोभयन् - पक्ष्यांना लोभ दाखवीत - जालं वितत्य - जाळे पसरून - विदधे - धरून होता. ॥५०॥

तत्र - तेथे - विचरत् - फिरणारे - कुलिंगमिथुनं - कुलिंगपक्ष्यांचे जोडपे - तेन समदृश्यत - त्याला दिसले - तयोः - त्या जोडप्यांमधील - कुलिंगी - मादी - लुब्धकेन - पारध्याने - सहसा - अकस्मात - प्रलोभिता - लोभविली. ॥५१॥

सा - ती - कालयंत्रिता - कालचक्रांत सापडलेली - महिषी - कुलिंगपक्ष्याची स्त्री - शिचः - जाळ्याच्या - तंत्यां - दोर्‍यात - असज्जत - अडकली - भृशदुःखितः - अत्यंत दुःखित असा - कुलिंगः - कुलिंग पक्षी - स्नेहात् - प्रेमामुळे - तां - त्या - तथा आपन्नां - त्याप्रमाणे दुःखात सापडलेल्या - कृपणां - दीन अशा स्त्रीला - निरीक्ष्य - पाहून - अकल्पः - तिला मुक्त करण्यास असमर्थ असा - कृपणः (सन्) - दीन होत्साता - पर्यदेवयत् - शोक करिता झाला. ॥५२॥

अहो - अहो - अकरुणः - निर्दय असा - प्रभुःदेवः - समर्थ परमेश्वर - मा अनु कृपणं शोचंत्या - दीन अशा माझ्याविषयी शोक करणार्‍या - अकरुणया - कृपा करण्यास योग्य अशा - दीनया स्त्रिया - दीन स्त्रीला नेऊन - कि करिष्यति - काय करणार ॥५३॥

देवः - देव - मा - मला - कामं - खुशाल - नयतु - नेवो - हि - कारण - अनेन - ह्या - विधुरायुषा - विधुरावस्थेतील आयुष्यक्रमाने - दुःखेन - दुःखाने - जीवता - जगणार्‍या - दीनेन - दीन अशा - मे आत्मनः अर्धेन - माझ्या अर्ध्या शरीराने - किं - काय ॥५४॥

अहं - मी - तान् - त्या - अजातपक्षान् - पंख न फुटलेल्या - मातृहीनान् - पोरक्या बालकांना - तु - तर - कथं - कसा - बिभर्मि - पोसणार - मे - माझी - मंदभाग्याः - दुर्दैवी - प्रजाः - बालके - नीडे - घरटयात - मातरं प्रतीक्षंते - आईची वाट पाहत आहेत. ॥५५॥

एवं - याप्रमाणे - आरात् - जवळ - विलपंतं - विलाप करणार्‍या - प्रिया वियोगातुरं - स्त्रीच्या वियोगाने पीडित झालेल्या - अश्रुकंठं - रडून गळा भरून आलेल्या - तं कुलिंगं - त्या कुलिंग पक्ष्याला - शाकुनिकः - पक्षी मारणारा पारधी - कालप्रहितः - काळाने प्रेरणा केलेला - विलीनः - लपून बसलेला - सः एव - तोच - शरेण - बाणाने - विव्याध - मारता झाला. ॥५६॥

एवं - याप्रमाणे - अबुद्धयः यूयं - निर्बुद्ध अशा तुम्ही - आत्मापायं - आपल्या मृत्यूला - अपश्यंत्यः - न पाहणार्‍या - शोचंत्यः - शोक करणार्‍या - वर्षशतैरपि - शेकडो वर्षांनीसुद्धा - एनं पतिं - ह्या पतीला - नप्राप्स्यथ - मिळवू शकणार नाही. ॥५७॥

एवं - याप्रमाणे - बाले प्रवदति - बालक भाषण करीत असता - सर्वे - सगळे - विस्मितचेतसः - मनात आश्चर्य पावलेले - ज्ञातयः - बांधव - सर्व - सगळे - अनित्यं - अनित्य - अयथोत्थितं - खोटयापासूनच उत्पन्न झालेले - मेनिरे - मानिते झाले. ॥५८॥

यमः - यमराज - एतत् - हे चरित्र उपाख्याय - सांगून - तत्र एव - त्याठिकाणीच - अंतरघीयत - अंतर्धान पावला - सुयज्ञस्य ज्ञातयः अपि - सुयज्ञाचे बांधव देखील - यत् सांपरायिकं - जे परलोकसंबंधी कृत्य असते. ॥५९॥

ततः - त्या कारणास्तव - परं - दुसर्‍याविषयी - च - आणि - आत्मानं - स्वतःविषयी - यूयं - तुम्ही - एव - खरोखर - मा शोचत - शोक करू नका - देहिनां - प्राण्यांच्या - स्वपराभिनिवेशेन - हे आपले व हे दुसर्‍याचे अशा आग्रहरूपी - अज्ञानेन विना - अज्ञानाशिवाय - अत्र - या जगात - आत्मा कः - आपण कोण - च - आणि - परः कः - दुसरा कोण - वा - अथवा - स्वीयः कः - आपला कोण - वा - किंवा - पारक्यः एव कः - दुसर्‍याचा कोण. ॥६०॥

सस्नुषा - सुनेसह - दितिः - दिति - इति - याप्रमाणे - दैत्यपतेः - हिरण्यकशिपुचे - वाक्यं - भाषण - आकर्ण्य - श्रवण करून - क्षणात् - थोडया वेळात - पुत्रशोकं - पुत्राविषयीचा शोक - त्यक्त्वा - टाकून - तत्त्वे - आत्मस्वरूपी - चित्तं - मन - अधारयत् - ठेविती झाली. ॥६१॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय दुसरा समाप्त

GO TOP