PREVIOUS
NEXT

सामवेद - ऐन्द्र काण्ड - द्वितीयोऽध्यायः

सामवेद - द्वितीय प्रपाठके - प्रथमार्ध

तृतीया दशति

शंयुर्बार्हस्पत्य ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

तद्वो गाय सुते सचा पुरुहूताय सत्वने । शं यद्गवे न शाकिने ॥ ११५

अरे मानवांनो, तुमच्या यज्ञांत अनेक भक्तांनी ज्यांचे आवाहन केले आहे, त्या अशुभांचा नाश करणार्‍या सर्वशक्तिमान् परमेश्वराची कीर्ति तुम्ही सर्व एकत्रितपणे गा.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

यस्ते नूनं शतक्रतविन्द्र द्युम्नितमो मदः । तेन नूनं मदे मदेः ॥ ११६

हे त्रिकालदर्शी परमेश्वरा, हे शेकडो विवेकी आविष्कारांच्या निर्मात्या, तुझ्या सर्वाधिक प्रशंसनीय कृपेने तू आम्हाला आनंदी राहण्यास आनंद उपभोगण्यास समर्थ कर.


हर्यतः प्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

गाव उप वदावटे महि यज्ञस्य रप्सुदा । उभा कर्णा हिरण्यया ॥ ११७

हे परमेश्वरा, जेथे निर्विघ्न ध्यान करता येते अशा या निर्जन स्थळी तू मला वैदिक ज्ञानाचा उपदेश कर. कारण की तुझ्या भक्तांना सत्कृत्यात श्रेष्ठ सल्ला देणारा आहेस. तू तुझ्या वेदातील सत्यपूर्ण वाणीने माझे दोन्ही कान भरून टाक.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अरमश्वाय गायत श्रुतकक्षारं गवे । अरमिन्द्रस्य धाम्ने ॥ ११८

१) हे वेदविद्या पारंगत विद्वाना, सनातन भगवंताची परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे तू उत्तमप्रकारे गा. वैदिक सूर्याची कीर्ति तू तुउअमप्रकारे गा. या ब्रह्मांड नायकाची स्तुति तू उत्तमप्रकारे गा.


सुकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

तमिन्द्रं वाजयामसि महे वृत्राय हन्तवे । स वृषा वृषभो भुवत् ॥ ११९

१) या विश्वनाथाची, अशुभांचा नाश करावा म्हणून आम्ही मनःपूर्वक स्तुति करतो. तोच शांति आणि आनंदाची वृष्टी करणारा आहे. तो आमच्यावर शांतीचा वर्षाव करो.
२) पराक्रमी पापावर आघात करण्यासाठी आम्ही आमच्या आत्म्याला सामर्थ्यसंपन्न बनवू. तो तेजस्वी नायक होवो.


इन्द्रमातरो देवजामय ऋषिकाः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

त्वमिन्द्र बलादधि सहसो जात ओजसः । त्वं सन्वृषन्वृषेदसि ॥ १२०

हे आत्म्या ! शक्ति, विजय आणि सामर्थ्य यावर तुझे प्राकट्य अवलंबून आहे. हे महापराक्रमी वीरा, तूच आनंदाचा वर्षाव करणारा आहेस.


इन्द्रमातरो देवजामय ऋषिकाः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

यज्ञ इन्द्रमवर्धयद्यद्भूमिं व्यवर्तयत् । चक्राण ओपशं दिवि ॥ १२१

१) पृथ्वीला लाभदायक ठरतो आणि आकाशात ढग उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरतो.
२) वंदनीय परमेश्वर जो आकाशात उपस्थित असतो आणि पृथ्वीला परिभ्रमण करावयास लावतो तो त्याचे ध्यान केले असतां आत्म्याचा विकास साधण्यास त्यास सक्षम करतो.


गोषक्‌यश्व सूक्तिनौ काण्वायनौ ऋषी - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

यदिन्द्राहं तथा त्वमीशीय वस्व एक इत् । स्तोता मे गोसखा स्यात् ॥ १२२

हे परमेश्वरा, मी जर तुझ्यासारखा सर्व ज्ञानरूपी संपत्तीचा एकमेव शासक, माझा आत्मा सर्व पृथ्वीचा परम सुहृद असलो तरीही मी तुझी स्तुति करीन.


गोषक्‌यश्व सूक्तिनौ काण्वायनौ ऋषी - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

पन्यंपन्यमित्सोतार आ धावत मद्याय । स्ॐअं वीराय शूराय ॥ १२३

अरे उपासका, तूं उत्तम श्रेष्ठ भक्तीसह, ज्ञानोत्तर भक्तीसह तुला स्वतःला त्या परमेश्वराच्या चरणी समर्पित कर. त्यायोगे सर्व अशुभांचा नाश करणारा तो सर्वशक्तिमान्, वीर आणि शूर परमात्मा तुझ्यावर प्रसन्न होईल.


मेधातिथि ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इदं वसो सुतमन्धः पिबा सुपूर्णमुदरम् । अनाभयिन्ररिमा ते ॥ १२४

१) ही जीवात्म्या, ही स्वादिष्ट मधुर मधुर दैवी सुरा, ज्ञानोत्तर भक्तीरस आकंठ प्राशन कर. हे निर्भय मानवा सर्व अशुभांचा त्याग करून तुझे हृदय मंदिरच बनव.
२) हे निर्मल परमेश्वरा, सृष्टि निर्माणकर्त्या, आम्ही तुला भक्तीने परिपूर्ण दैवी रस ज्यात ज्ञान मिसळलेले आहे असा अर्पण करीत आहो. तू त्याचा स्वीकार करून आमच्यावर उपकार कर, आम्हांला कृतार्थ कर.


चतुर्थी दशति

सुकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

उद्धेदभि श्रुतामघं वृषभं नर्यापसम् । अस्तारमेषि सूर्य ॥ १२५

अज्ञानरूपी अंधःकारास जो संपूर्ण नष्ट करतो, घालवतो, त्या दैवी सूर्या, जो प्रसिद्ध ज्ञानरूपी संपत्तिने युक्त आहे, आनंदाची वृष्टि करणारा आणि मानवांच्या हिताची कर्मे करून सर्व अशुभांना घालवून देणारा तो तुझी उपासना करतो, तुझी सेवा करतो.


गुह्यकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

यदद्य कच्च वृत्रहन्नुदगा अभि सूर्य । सर्वं तदिन्द्र ते वशे ॥ १२६

१) हे अज्ञाननाशका, पापविनाशका, हे दैवी सूर्या या जगांत जे जे अस्तित्वात आहे ते ते हे परमेश्वरा, तुझ्या ताब्यांत आहे.
२) ज्या वस्तूची तू तीव्र इच्छा करतोस ती वस्तू तुझ्या ताब्यात येते. समर्थ मनुष्य दृढ निश्चयाद्वारे त्याच्या हृदयात जे काही ठरवतो ते प्राप्त करतो.


भरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

य आनयत्परावतः सुनीती तुर्वशं यदुम् । इन्द्रः स नो युवा सखा ॥ १२७

१) जे अज्ञानामुळे वाईट कर्मे करतात आणि दूर जातात त्यांना जो शक्तिमान पुरुष आपला तरुण उत्साही मित्र बनून त्याच्या न्यायी वर्तनाने पुन्हा आपल्याजवळ आणतो.
२) हे परमेश्वरालाही लागू पडते. तो सर्वशक्तिमान परमेश्वर ताच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने ज्या दुष्टांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली असते त्यांना योग्य मार्गावर आणतो आणि आपल्या भक्तात त्यांचे परिवर्तन घडवून आणतो. (वाल्याचा वाल्मीकि होतो)


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

मा न इन्द्राभ्याऽऽ३ दिशः सूरो अक्तुष्वा यमत । त्वा युजा वनेम तत् ॥ १२८

हे सर्वशक्तिमान परमेश्वरा ! कामासक्ति आणि इतर वाईट वासना किंवा दुष्ट प्रवृत्तीचे लोक यांच्याकडून कुठल्याही बाजूने रात्रीच्या एळी आम्ही घेरले जाऊ नये. (अध्यात्मिक दृष्ट्या अज्ञानाची काळोखी रात्र असा अर्थ होऊ शकतो). कधी वाईट कल्पना क्ंवा दुष्ट हृदयाच्या व्यक्ती आपल्याजवळ आल्याच तर, हे परमेश्वरा ! तुझ्या मदतीने किंवा तुझ्या सख्यत्वामुळे आम्ही त्यांच्यावर विजय प्राप्त कऊ शकू आणि त्यांचा नाशही करू शकू.


मधुच्छ्न्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

एन्द्र सानसिं रयिं सजित्वानं सदासहम् । वर्षिष्ठमूतये भर ॥ १२९

हे परमेश्वरा ! आमच्या संरक्षणासाठी तू भौतिक आणि अध्यात्मिक संपदा, आणि जिच्यायोगे आम्हां सर्वांना ज्यात सहभागी होता येईल असा आनंद आम्हाला दे, विजेत्याची नेहमी विजय मिळवून देणारी, भरपूर आणि सर्वोत्तम संपत्ति आमच्यासाठी तू आण.


मधुच्छ्न्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इन्द्रं वयं महाधन इन्द्रमर्भे हवामहे । युजं वृत्रेषु वज्रिणम् ॥ १३०

महायुद्धात (जे दुष्ट प्रवृत्तिबरोबर सतत चालू असते त्यात) आम्ही परमेश्वराचे आवाहन करतो. लहान युद्धाच्या वेळीही आम्ही त्याचेच आवाहन मदतीसाठी करतो. सर्व अशुभांचा आणि दुष्ट प्रवृत्तींच्या ब्यक्तींचा नाश करणारा तोच आपला मित्र आहे.


त्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अपिबत्कद्रुवः सुतमिन्द्रः सहस्रबाह्वे । तत्राददिष्ट पौंस्यम् ॥ १३१

१) या जगांत ज्ञानी महात्म्यांकडून राजा ज्ञान प्राप्त करतो आई त्यायोगे त्याच्या अनेक शत्रूंच्यावर विजय मिळवितो. या प्रकारे त्याच्या ठिकाणी पराक्रम आणि पौरुष यांचा विकास होतो.
२) जेव्हां ज्ञानी भक्ताचे प्रेम भगवान स्वीकारतात आणि त्याच्यावरील हजारो संकटे वा विघ्ने दूर करतात तेव्हां सर्वत्र त्याच्या पराक्रमाचा प्रकाश पडतो.


वसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

वयमिन्द्र त्वायवोऽभि प्र नोनुमो वृषन् । विद्धी त्वा३स्य नो वसो ॥ १३२

हे आमच्या सर्व उदात्त इच्छा पूर्ण करणार्‍या परमेश्वरा ! तुला प्राप्त करण्याच्या इच्छेने आम्ही तुला सर्व बाजूंनी, दिशांनी नमस्कार कततो. हे उत्तम परमेश्वरा, तू आमचे हे कृत्य आणि आमची इच्छा जाणतोस.


त्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

आ घा ये अग्निमिन्धते स्तृणन्ति बर्हिरानुषक् । येषामिन्द्रो युवा सखा ॥ १३३

ज्यांचा मित्र चिरतरूण परमेश्वर, ज्ञानाची ज्योतरूपी परमात्मा असतो, ते या प्रकारे सर्व लोकांचे या पृथ्वीवर नियमितपणे कल्याण करतात. ते त्यांच्या देहाचे बंधन तोडून मुक्ति प्राप्त करतात.


त्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

भिन्धि विश्वा अप द्विषः परि बाधो जही मृधः । वसु स्पार्हं तदा भर ॥ १३४

हे परमेश्वरा, तू आमच्या सर्व शत्रूंना (अन्तरातील आणि बाहेरील) हाकलून लाव; आमच्या विकासाच्या मार्गावर विघ्ने आणणार्‍या शत्रूंना तू मारून टाक आणि आम्ही ज्या भौतिक व अध्यात्मिक संपत्तीची इच्छा करतो ती संपत्ति घेऊन या.


पंचमी दशति

कण्वोघोर ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इहेव शृण्व एषां कशा हस्तेषु यद्वदान् । नि यामं चित्रमृञ्जते ॥ १३५

१) मला अगदी जवळच सैनिकांनी चाबूक ओढल्याचा कडाक्याचा आवाज ऐकू येत आहे. ते सैनिक मार्गाने जात असतामाच वैभव गोळा करीत आहेत.
२) अध्यात्मिक स्पष्टिकरण : मी योगाभ्यास करण्यांत मग्न असतां अत्यंत आवश्यक असा श्वाछ्वासांचा आवाज ऐकतो. त्यांनी ॐ चा चाबूक त्यांच्या हातात धरलेला असतो. प्रणवच आश्चर्यकारक रीतीने सर्व विश्वार शासन करीत असतो. [श्वासोछ्वासावर ताबा मिळवता आला तर साधकास आश्चर्यकारक शक्ति प्राप्त होते. त्यावेळी त्याला अण्तरातील सूक्ष्म नाद, ज्याला योगाच्या परिभाषेत ’अनाहत नाद" म्हणतात, तो ऐकू येऊ लागतो.]


त्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इम उ त्वा वि चक्षते सखाय इन्द्र स्ॐइनः । पुष्टावन्तो यथा पशुम् ॥ १३६

हे परमेश्वरा, आम्ही तुझे मित्र ज्ञानासह भक्तीने युक्त आहोत आणि चारा असलेले मानव जसे गायींच्या कळपाकडे प्रेमाने पाहतात तसे तुझ्याकडे पहात आहोत.


कुसीदीकाण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

समस्य मन्यवे विशो विश्वा नमन्त कृष्टयः । समुद्रायेव सिन्धवः ॥ १३७

भगवंताच्या ज्ञान, कीर्ति आणि थोरवी पुढे सर्व लोक नतमस्तक होत असतात. ज्याप्रमाणे नद्या सर्व प्रथम नतमस्तक होऊन सागराकडे धाव घेत असतात, अगदी त्याप्रमाणे.


कुसीदीकाण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

देवानामिदवो महत्तदा वृणीमहे वयम् । वृष्णामस्मभ्यमूतये ॥ १३८

आम्ही स्वतःमध्ये ते परम प्रेम, ज्ञान आणि पूर्णपणे, खर्‍या अर्थाने विद्वान ज्ञानी लोकांच्या संरक्षणाची निवड करीत असतो. कारण आमच्या विकासासाठी ते शांति आणि आनंदाचा पृथ्वीवर वर्षाव करीत असतात.


मेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

स्ॐआनां स्वरणं कृणुहि ब्रह्मणस्पते । कक्षीवन्तं य औशिजः ॥ १३९

हे ज्ञानेश्वरा, मला, तुझ्या पुत्राला तू सर्वश्रेष्ठ, लोकप्रिय, उद्योगी, वैभवसंपन्न आणि ज्ञानाच्या प्रकाशाने युक्त अशा व्यक्तीप्रमाणे लोकांना मी आवडेन असा बनव.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

बोधन्मना इदस्तु नो वृत्रहा भूर्यासुतिः । शृणोतु शक्र आशिषम् ॥ १४०

ज्ञान आणि भक्ति यांनी युक्त अशा तर्पणाने ज्याचा मानसन्मान केला गेला आहे असा तो पापविनाशक परमेश्वर आमचे मन उजळून टाको. त्या सर्वशक्तिमानाने आमची प्रार्थना ऐकावी.


श्वाश्व आत्रेय ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अद्य नो देव सवितः प्रजावत्सावीः सौभगम् । परा दुःष्वप्न्यं सुव ॥ १४१

हे सृष्टिनिर्मात्या परमेश्वरा ! तू आजच आम्हाला भरभराट आणि संतति प्रदान कर. तू दुःस्वप्ने, अज्ञान आणि आळस यांना दूर हाकलून दे.


प्रगाथः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

क्वा३स्य वृषभो युवा तुविग्रीवो अनानतः । ब्रह्मा कस्तं सपर्यति ॥ १४२

जो सर्वांवर शांति आणि आनंदाचा वर्षाव करतो तो चिरतरुण, अनेक मुखे असलेला, दुर्जय परमेश्वर कोठे आहे ? सर्व वेद ज्याची आराधना करतात त्या सर्व वेदांचा ज्ञाता कोण आहे ? त्या सनातन सर्वव्यापक परमेश्वराला जाण्य़्न घ्या, आणि त्याच्या पायाशी बसून सर्वव्यापक परमेश्वरासंबंधी सर्व त्याच्याकडून जाणून घ्या.


वत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

उपह्वरे गिरीणां सङ्‌गमे च नदीनाम् । धिया विप्रो अजायत ॥ १४३

जेथे पर्वतांच्या उतारावर निर्झर एकत्र भेटतात अशा निसर्गरम्य, शांत, एकांत स्थानी ध्यानाभ्यास आणि सत्कृत्ये केल्याने मनुष्य ज्ञानी बनतो.


वत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

प्र सम्राजं चर्षणीनामिन्द्रं स्तोता नव्यं गीर्भिः । नरं नृषाहं मंहिष्ठम् ॥ १४४

जो मानव जातीला अत्यंत पूज्य आहे, एकमेव सम्राट आहे, सर्वश्रेष्ठ जगन्नायक असून, अत्यंत उदार असून मानवांचे शासन करतो त्या परमेश्वराची वैदिक ऋचांच्याद्वारे स्तुति करा.


षष्ठी दशति

मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अपादु शिप्रयन्धसः सुदक्षस्य प्रहोषिणः । इन्द्रोरिन्द्रो यवाशिरः ॥ १४५

काम करण्यात तत्पर, वेगवान्, सनातन आणि सर्वशक्तिमान् परमेश्वरा, जे देतात आणि घेतात अशांच्या अति आवश्यक अशा विकसित शक्तीचे संरक्षण व्हावे अशी कृपा तू करतोस.


मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इमा उ त्वा पुरुवसोऽभि प्र नोनवुर्गिरः । गावो वत्सं न धेनवः ॥ १४६

यथेष्ठ संपत्ति आणि त्याचाच्या ईश्वरा, दुभत्या गायींनी वासरांना पाहून हंबरावे त्याप्रमाणे या स्तुति स्त्रोत्राने तुझे आम्ही आवाहन करतो.


गौतम रहूगण ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

अत्राह गोरमन्वत नाम त्वष्टुरपीच्यम् । इत्था चन्द्रमसो गृहे ॥ १४७

ज्ञानी लोक चंद्राच्या महालात लपलेल्या सूर्यकिरणांना जाणतात, अर्थात् चंद्राला सूर्यापासून त्याचा प्रकाश प्राप्त होतो. त्याप्रमाणे आपणा सर्वांच्या आनंदी अंतःकरणातही परमात्म्याचा प्रकाश वास्तव्य करेत असतो. परमात्म्यामुळे, तो आनंदघन असल्यामुळे आपण आनंदीत होतो.


पूतदक्ष ऋषिः - मरुतो देवता - गायत्री छन्दः

यदिन्द्रो अनयद्रितो महीरपो वृषन्तमः । तत्र पूषाभुवत्सचा ॥ १४८

जेव्हां परमात्म्याने, आनंदाची, शाश्वत सुखाची वृष्टि करणार्‍या परमेश्वराने पाण्याचे प्रचंड प्रवाह पृथ्वीवर आणले तेव्हांच त्याने या विश्वाला आधार देण्याचे कामही केले.


पूतदक्ष ऋषिः - मरुतो देवता - गायत्री छन्दः

गौर्धयति मरुतां श्रवस्युर्माता मघोनाम्युक्ता वह्नी रथानाम् ॥ १४९

अत्यंत आवश्यक अशा श्वासोछ्वासांची माता जिव्हा योगयज्ञात सहभागी होते तेव्हां ती टाळूतून जो अमृतस्राव होतो ते अमृत प्राशन करते आणि आनंदाचा अनुभव घेते. जेव्हां ती इंद्रियरूपी वाहनांशी जखडली जाते तेव्हां ती त्यांना त्यांच्या इच्छित ध्येयाप्रत घेऊन जाते (येथे खेचरी मुद्रेचा संबंध आहे).


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

उप नो हरिभिः सुतं याहि मदानां पते । उप नो हरिभिः सुतम् ॥ १५०

हे अतिप्रसन्न आनंदघन परमेश्वरा, तू तुझ्या सर्व उपाधिंसह, गुणांसह आमच्या यज्ञात ये. त्या तुझ्या उपाधि सर्व अंधःकाराचा आणि अशुभांचा नाश करतील. अथवा तुझ्या दिव्य अशा ज्ञान किरणांसह, हे दैवी सूर्या, तू ये. (आपण यज्ञ किंवा अन्य काही सत्कृत्ये करताना आपल्या अंतरबाह्य परमेश्वराचे अस्तित्व आहे याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे.)


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इष्टा होत्रा असृक्षतेन्द्रं वृधन्तो अध्वरे । अच्चावभृथमोजसा ॥ १५१

सात इंद्रियरूपी सात ऋषि (दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान आणि एक जीभ) ही विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करून या जीवनांत आत्म्याची कीर्ति आणि शक्ति वाढवितात, आणि या जीवनरूपी यज्ञात जीवनाच्या अंतापर्यंत त्या शक्तिनुसार बलि (नैवेद्य) अर्पण करीत असतात. (हे वर्ण अध्यात्मिक यज्ञाचे आहे)


वसः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अहमिद्धि पितुष्परि मेधामृतस्य जग्रह । अहं सूर्य इवाजनि ॥ १५२

ज्ञान आणि सत्याचा स्त्रोत असलेल्या परमपिता परमेश्वराकडून सखोल ज्ञान प्राप्त करून मी आता सूर्याप्रमाणे तेजस्वी झालो आहे आणि आता कोणाकडूनही पराभूत केला जाऊ शकत नाही.


शुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

रेवतीर्नः सधमाद इन्द्रे सन्तु तुविवाजाः । क्षुमन्तो याभिर्मदेम ॥ १५३

१) आपल्या लोकांनी शक्तिसंपन्न, ज्ञानसंपन्न असावे. भगवंताच्या बाबतीत आज्ञाधारक असावे. एकमेकासोबत आनंद लुटावा, म्हणजे धनधान्य, समृद्धि आणि भक्तिभावाने समृद्ध झालो की आपण आनंद प्राप्त करू शकू.
२) आमच्या गाई दूधदुभतेरूपी समृद्ध आणि शारिरीक दृष्ट्या धष्टपुष्ट असाव्या म्हणजे आपण आनंद साजरा करू.


वामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

स्ॐअः पूषा च चेततुर्विश्वासां सुक्षितीनाम् । देवत्रा रथ्योर्हिता ॥ १५४

परमेश्वर हा विश्वनिर्माता आणि सर्व प्राणीमात्रांचा आधार असून सर्व तेजस्वी वस्तूंना आणि ज्ञानी लोकांना व्यापून असतो. तो सर्व प्राणीमात्रांचा हितेच्छु सर्व अवस्थांमध्ये त्यांचे हित करतो. या दोन्ही रूपांत तोच असून तोच त्यांना ज्ञान देत असतो. ज्ञानी लोकांचा तोच संरक्षक असून शांति आणि आनंदाचा तो मूळ स्त्रोत असल्याने मन आणि जीवात्म्याचा उपकारकर्ताही तोच आहे.


सप्तमी दशति

श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

पान्तमा वो अन्धस इन्द्रमभि प्र गायत । विश्वासाहं शतक्रतुं मंहिष्ठं चर्षणीनाम् ॥ १५५

अरे मानवांनो ! जो परमेश्वर तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक अन्न पुरवितो, जो सर्वांना जिंकून घेतो, आश्चर्यजनक आणि शेवट नसलेल्या सत्कृत्याचा कर्ता, सर्व लोकांसाठी उदार दाता, सर्व ज्ञानी लोक ज्याचे पूजन करतात, त्या परमेशव्राची तुम्ही स्तुतिस्तोत्रे गा.


वसिष्ठः ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

प्र व इन्द्राय मादनं हर्यश्वाय गायत । सखायः स्ॐअपाव्ने ॥ १५६

अरे मित्रांनो ! जो परमेश्वर सर्व अशुभांचा नाश करतो आणि सर्वव्यापिई असून ज्ञानोत्तर भक्तिरूपी अमृताचा स्वीकार करतो त्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्याची स्तुतिस्तोत्रे तुम्ही गा.


मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

वयमु त्वा तदिदर्था इन्द्र त्वायन्तः सखायः । कण्वा उक्थेभिर्जरन्ते ॥ १५७

हे परमेश्वरा ! आम्ही तुझी, फक्त तुझीच तीव्र अभिलाषा धरून, तुला जीवन वाहिलेले आम्ही तुझी आणि तुझीच याप्रकारे प्रार्थ करतो.


अनुकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इन्द्राय मद्वने सुतं परि ष्टोभन्तु नो गिरः । अर्कमर्चन्तु कारवः ॥ १५८

जो आनंदाचा दाता आहे त्या परमेश्वराची स्तुति आमची वाणी करो. जो परम आदरणीय त्या परमेश्वराची स्तुति भक्तांनी करावी.


इरिम्विठिः कण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अयं त इन्द्र स्ॐओ निपूतो अधि बर्हिषि । एहीमस्य द्रवा पिब ॥ १५९

येथे माझ्या हृदयाकाशात तुझी शुद्ध ज्ञानोत्तर भक्ति वास करीत आहे. हे परमेश्वरा, तू त्वरेने इकडे ये आणि तिचा स्वीकार कर. किंवा हे परमेश्वरा, मी माझे जीवनच यज्ञरूपाने तुला अर्पण करीत आहे त्याचा तू स्वीकार कर.


मधुछन्द ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

सुरूपकृत्‍नुमूतये सुदुघामिव गोदुहे । जुहूमसि द्यविद्यवि ॥ १६०

एखादी चांगली गाय तिची धार काढणार्‍याला साद घालते त्याप्रमाणे आम्ही दररोज सत्कर्मांचा कर्ता असलेल्या त्या परमेश्वरास आमच्या संरक्षणासाठी साद घालतो.


त्रिशोक काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अभि त्वा वृषभा सुते सुतं सृजामि पीतये । तृम्पा व्यश्नुही मदम् ॥ १६१

आमच्या शुभकामनांची पूर्ती करणार्‍या परमेश्वरा ! सोमरस, भक्तिरस जो ज्ञानमिश्रित आहे तो वाहू लागला आहे. मी भक्तिरूप अमृत तू प्राशन करावेस म्हणून तुझ्यापुढे सादर करीत आहे. तू तो प्राशन करून प्रसन्न हो आणि महान आनंदाचा उपभोग घे. (योगाच्या परिभाषेत जिला धर्ममेय समाधि म्हणतात त्या योगिक अवस्थेचे हे वर्णन आहे.)


कुसीदीकाण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

य इन्द्र चमसेष्वा स्ॐअश्चमूषु ते सुतः । पिबेदस्य त्वमीशिषे ॥ १६२

हे परमेश्वरा ! तू सर्वांचा अखिल ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. म्हणून तुझी कीर्ति जी बुद्धिमध्ये प्रकट होते, पृथ्वी आणि आकाशात प्रगट होते, तिचा तू उपभोग घे, आनंद लूट.


शुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

योगेयोगे तवस्तरं वाजेवाजे हवामहे । सखाय इन्द्रमूतये ॥ १६३

कुठल्याही शुभकार्याचा आरंभ करताना आणि प्रत्येक युद्धाच्या प्रसंगी अर्थात् दुष्ट प्रवृत्तीशी लढा देतांना किंवा बाह्य दुष्टांशी युद्धाच्या प्रसंगी, आम्ही तुला आमचा सुहृद म्हणून, आमचे संरक्षण करावेस म्हणून हे सर्व शक्तिमान् परमेश्वरा, आम्ही तुला आवाहन करीत आहोत, तुझ्याशी संभाषण साधू इच्छितो.


मधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

आ त्वेता नि षीदतेन्द्रमभि प्र गायत । सखायः स्त्ॐअवाहसः ॥ १६४

हे सहकार्‍यांनो, तुझी येथे या, खाली बसा, आणि त्या परमेश्वापुढे त्याची प्रसंसा करणार्‍या ऋचांचे गायन करा.


अष्टमी दशति

विश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इदं ह्यन्वोजसा सुतं राधानां पते । पिबा त्वा३स्य गिर्वणः ॥ १६५

हे लक्ष्मीपते ! हा सोमरस ज्ञानयुक्त भक्तिरसामृत तुझ्यासाठी व्यक्त केला जात आहे. आध्यात्मिक शक्ति आणि प्रांजलपणाने आम्ही हे करीत आहोत. हे प्रशंसा करण्यास योग्य अशा तू, आमच्या या भाषणाचा , वाणीचा तू स्वीकार कर.


मधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

महां इन्द्रः पुरश्च नो महित्वमस्तु वज्रिणे । द्यौर्न प्रथिना शवः ॥ १६६

जो सदैव आपल्या समोरच असतो आणि सर्व अशुभांचा गरजणार्‍या मेघांप्रमाणे नाश करओ, तो परमेश्वर थोरच आहे. आकाशाप्रमाणे त्याचा पराक्रमही विस्तीर्ण. विशाल आहे.


कुसीदी काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

आ तू न इन्द्र क्षुमन्तं चित्रं ग्राभं सं गृभाय । महाहस्ती दक्षिणेन ॥ १६७

हे पराक्रमी बाहू असलेल्या पराक्रमी राजा, तू तुझ्या उजव्या हाताने आमच्यासाठी उत्तमोत्तम आणि स्वीकारण्यास अत्यंत योग्य अशी संपत्ति आणि पौष्टिक अन्न गोळा कर. (लाक्षणिक अर्थाने हे परमेश्वरास लागू पडते. उजवा हात याचा अर्थ मदत आणि शक्ति असा होतो)


प्रियनेध ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अभि प्र गोपतिं गिरेन्द्रमर्च यथा विदे । सूनुं सत्यस्य सत्पतिम् ॥ १६८

१) तुम्ही तुमच्या शब्दांनी त्या पराक्रमी राजाची, गायींच्या खिल्लाराचे पालनकर्त्याची, पृथ्वीच्या संरक्षकाची, सत्याच्या पुत्राची (मूर्तिमंत सत्याची) आणि सत्याच्या संरक्षकाची स्तुति करा.
२) आत्म्यासंबंधीचा अर्थ असा - अरे मानवा, तुझ्या शब्दांनी, तुला खरे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून आत्म्याची, प्रकशांचा स्वामी असलेल्या आणि मूर्तिमंत सत्याची आणि सत्याच्या संरक्षकाची स्तुति कर.


वामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

कया नश्चित्र आ भुवदूती सदावृधः सखा । कया शचिष्ठया वृता ॥ १६९

नेहमी आपल्या हिताची, कल्याणाची जो काळजी घेतो, तो आपला अद्‌भुत मित्र परमेश्वर आपल्यासाठी कुठले संरक्षण घेऊन येईल ? उत्कृष्ट ज्ञानासह कुठल्या पराक्रमी आचरणाने युक्त तो असेल (कं म्हणजे आनंद - आणि यातच प्रश्नाचे उत्तरही आहे. तो बरोबर आनंद आणि ज्यायोगे इतरांच्या आनंदात वृद्धि होईल असे आचरणयुक्त असा तो परमेश्वर असेल.)


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

त्यमु वः सत्रासाहं विश्वासु गीर्ष्वायतम् । आ च्यावयस्यूतये ॥ १७०

अरे भक्ता ! तुझ्या संरक्षणासाठी जो मेहमी तुझ्या हृदयांत वास करतो त्या नेहमी जिंकणार्‍या सत्याच्या योगे सर्व वाईट दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणार्‍या व जो आपल्या सर्व श्ब्दात प्रवेश करतो, त्या परमेश्वराला तू जाणून घे, त्याचा अनुभव घे.


मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

सदसस्पतिमद्भुतं प्रियमिन्द्रस्य काम्यम् । सनिं मेधामयासिषम् ॥ १७१

चांगल्या आणि वाईट गोष्टीतील भेद ज्याने कळतो त्या ज्ञानासाठी, या आश्चर्यकारक पृथ्वीचा पति असलेल्या आणि आत्म्याचा परम सुहृद असलेल्या परमेश्वराची प्रार्थना करा.


वामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

ये ते पन्था अधो दिवो येभिर्व्यश्वमैरयः । उत श्रोषन्तु नो भुवः ॥ १७२

या आकाशातून ज्या मार्गाने तू वायु आणि सूर्य यांना गति देतोस ते सर्व आम्ही जाणू शकू असे हे परमेश्वरा, तू कर. या पृथ्वीवरील सर्व कोकांपर्यंत सर्व दिशांना आमचा संदेश ऐकू जाईल अशी तू कृपा कर.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

भद्रंभद्रं न आ भरेषमूर्जं शतक्रतो । यदिन्द्र मृडयासि नः ॥ १७३

हे त्रिकालदर्शी परमेश्वरा ! तू सर्व उत्तमोत्तम वस्तू, म्हणजे अन्नधान्य, शुभ इच्छा, ज्ञान आणि सामर्थ्य आम्हाला दे. हे परमेश्वरा ! तू नेहमी आम्हाला आनंद देतोस आणि तू नेहमी आमच्यावर कृपा करतोस.


पूतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अस्ति स्ॐओ अयं सुतः पिबन्त्यस्य मरुतः । उत स्वराजो अश्विना ॥ १७४

हा येथे नुकताच पिळून काढलेला सोमरस (ज्ञान आणि भक्तीच्या मिश्रणाचा अमृतरस) तयार आहे. सूर्य आणि पृथ्वी किंवा पतीपत्‍नीप्रमाणे सद्‌गुणसंपन्न भक्त त्याचा एकत्रितपणे आस्वाद घेतात.


नवमी दशति

देवजामय इन्द्रमातर ऋषिका - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

ईङ्‌खयन्तीरपस्युव इन्द्रं जातमुपासते । वन्वानासः सुवीर्यम् ॥ १७५

पुरुष आणि स्त्रिया जेव्हा कार्यतत्वपर आणि शुभकार्ये करण्यास इच्छुक असतात, तेव्हां नी हृदयस्थ परमेश्वराची स्तुति करावी आनि त्यांना ही कार्ये करण्यास परमेश्वराने उत्तम सामर्थ्य द्यावे म्हणून त्याची प्रार्थना करावी. (यामंद्राचे द्रष्टे स्त्रिया आहेत, म्हणून हे स्पष्ट आहे की स्त्रियांनाही वेदांचे अध्ययन करून त्यांचा प्रसार करण्याचा अधिकार आहे.)


गोधा ऋषिका - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

न कि देवा इनीमसि न क्या योपयामसि । मन्त्रश्रुत्यं चरामसि ॥ १७६

आम्ही ज्ञानी पुरुष आणि स्त्रिया आहोत म्हणून आम्ही कधीही कुणाचा अपमान करीत नाही किंवा कुणाला दुखवतही नाही. तसेच आम्ही कुणाला मोहात पाडीत नाही किंवा अज्ञानात ठेवत नाही. वेदांच्या आज्ञांना अनुसरून आम्ही चालतो किंवा त्यांना अनुसरून वागतो. (सर्व स्त्रियांनी व पुरुषांनी वेदांच्या उदात्त उपदेशानुसार वागावे. त्याप्रमाणे आचरण न करतां नुसते अध्ययन करून चालणार नाही.)


वामदेवो दध्यङ् ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

दोषो आगाद्बृहद्गाय द्युमद्गामन्नाथर्वण । स्तुहि देवं सवितारम् ॥ १७७

सर्व तमाचा, अंधकाराचा नाश करणार्‍या परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो. हे सामवेद गायका, माझ्या आत्म्या ! तू स्वतःची ऊर्जा कधी व्यर्थ जाऊ देऊं नक्को; हे क्रियाशील, अनाक्रमक आत्म्या ! जो आनंदाचा आणि प्रकाशाचा दाता आहे त्या परमेश्वराची स्तुति कर.


प्रस्कण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

एषो उषा अपूर्व्या व्युच्चति प्रिया दिवः । स्तुषे वामश्विना बृहत् ॥ १७८

१) प्रियतम आत्म्याची, तेजस्वी आध्यात्मिक द्युति तिच्या प्रकाशाने दीपवून टाकत आहे. हे गुरो आणि प्रवचनकारा ! तुझ्या गुणांबद्दल मी तुझी भरभरून स्तुति करीत आहे. (हे वर्णन ’ज्योतिष्मती प्रज्ञा’ या योगिक अवस्थेचे असून हृदयाच्या केंद्रस्थानी मन एकाग्र केले असता ही अवस्था प्राप्त होते - योगदर्शन १-३६)
२) आतां हा अत्यंत सुंदर उषःकाल येत आहे, हे स्त्रियांनो आणि पुरुषांनो तुम्ही चंच्र सूर्याप्रमाणे आहात ! तुम्ही त्या परमेश्वराची भरभरून स्तुति करा.


गौतम ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

इन्द्रो दधीचो अस्थभिर्वृत्राण्यप्रतिष्कुतः । जघान नवतीर्नव ॥ १७९

परमेश्वर, ज्याची शक्ती अमर्याद आहे तो त्याच्या पापविनाशक शक्तीने नऊ इंद्रियांच्या शक्तीचा नाश करतो. (पांच कर्मेंद्रिये, अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकारादि) कारण ही इंद्रिये अशुभ विचार आणि दुष्कृत्ये करण्यांत मग्न असतात आणि म्हणून जो साधक ध्यानाभ्यास करतो त्याचे रक्षण करण्यांत असमर्थ असतात.


मधुछन्दा ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

इन्द्रेहि मत्स्यन्धसो विश्वेभिः स्ॐअपर्वभिः । महां अभिष्टिरोजसा ॥ १८०

१) हे परमेश्वरा, तू ये आणि आध्यात्मिक ज्ञानोत्तर भक्तीचा, येथे जमलेल्या ब्राह्मणांनी तयार केलेला रस (सोमरस) सेवून प्रसन्न हो. तू तुझ्या अप्रमेय शक्तीने आमचा संरक्षक आहेस.
२) हे परमात्म्या ! तू प्रकट हो. तुझ्या शक्तीने जो उत्तम प्राणायामाद्वारे तेजाचा अर्कच असे सामर्थ्य होईल त्याने तू प्रसन्न हो. तू महान इच्छांनी परिपूर्ण आहेस.


वामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

आ तू न इन्द्र वृत्रहन्नस्माकमर्धमा गहि । महान्महीभिरूतिभिः ॥ १८१

हे महापातकनाशना परमेश्वरा, तू ये ! हे परमेश्वरा, तू आमच्याजवळ ये. (आमच्या हृदयांत तुझा अनुभव आम्हांला येऊ दे. हे परम शक्तिमंता, तुझ्या परम शक्तिशाली संरक्षणाचा लाभ आम्हांला होऊं दे.


वत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

ओजस्तदस्य तित्विष उभे यत्समवर्तयत् । इन्द्रश्चर्मेव रोदसी ॥ १८२

जेव्हां परमात्मा त्याच्या चर्मासारख्या आवरणाने पृथ्वी आणि आकाशाला व्यापून टाकतो तेव्हां त्याचा पराक्रम त्याच्या तेजाने आसमंत उजळून टाकतो.


शुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

अयमु ते समतसि कपोत इव गर्भधिम् । वचस्तच्चिन्न ओहसे ॥ १८३

हा भक्त केवळ तुझाच आहे. ज्याप्रमाणे कपोत त्याच्या प्रियेकडे वळतो त्याप्रमाणे तू तुझ्या भक्ताला जवळ करतोस. त्याला जवळ ओढून घेतोस. हे प्रार्थनेकडेही लक्ष देतोस !


उलोवातायन ऋषिः - वायुर्देवता - गायत्री छन्दः

वात आ वातु बेषजं शम्भु मयोभु नो हृदे । प्र न अयूंषि तारिषत् ॥ १८४

या विश्वाला फिरविणार्‍या सर्व शक्तिमान परमेश्वराने आमच्यावर शांतीदायक औषधीयुक्त त्याचा श्वास आमच्यावर सोडावा जो आमच्या हृदयास निरोगी आणि आनंदी बनवेल. त्याने आम्हांला दीर्घायुषी करावे. (हे वर्णन शुद्ध हवेलाही लागू पडते की जिच्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभून आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ होतो.


दशमी दशति

कण्वो घोर ऋषिः - वरुणमित्रार्यमणो देवता - गायत्री छन्दः

यं रक्षन्ति प्रचेतसो वरुणो मित्रो अर्यमा । न किः स दभ्यते जनः ॥ १८५

ज्याचे अति उत्कृष्ट ज्ञानी आणि सुहृद व न्यायी लोक रक्षण करतात त्याला कधीही कुठलीही इजा होऊ शकत नाही.


वत्स ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

गव्यो षु णो यथा पुराश्वयोत रथया । वरिवस्या महोनाम् ॥ १८६

अरे मानवा ! उत्तम वाणी, शक्ति, उत्तम आरोग्य, देहयष्टि आणि श्रेष्ठ सद्‌गुणा यांची प्राप्ती व्हावी म्हणून पूर्वीप्रमाणे तू परमेश्वराची उपासना कर.


वत्स ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

इमास्त इन्द्र पृश्नयो घृतं दुहत आशिरम् । एनामृतस्य पिप्युषीः ॥ १८७

१) हे परमेश्वरा ! तू निर्माण केलेल्या सूर्याचे किरण पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे पाऊस पडतो, किंवा या गायी लोणी, दूध इत्यादि दुग्धयुक्त वसू देतात, त्यायोगे त्या यज्ञाला सहाय्य करत असतात. लोकांमध्येही तेज उत्पन्न करण्यास त्या सहाय्य करोत.
२) हे आत्म्या, गायी ज्याप्रमाणे पाणी पिऊन दूध देतात त्याप्रमाणे ही तुझी इंद्रिये ज्ञान प्राप्त करून तेज प्राप्त करून देतात.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

अया धिया च गव्यया पुरुणामन्पुरुष्टुत । यत्स्ॐएस्ॐअ आभुवः ॥ १८८

हे परमेश्वरा, तूच अत्यंत स्तुत्य आहेस, तुझी अनेक नावे आहेत, या आमच्या उदात्त वाणीने आणि इंद्रियांनी तू निर्मिलेल्या प्रयेक वस्तूंच्या द्वारा आमच्याकडे ये. शांत स्वभावाच्या प्रत्येक मनुष्याच्या हृदयांत अंतःकरणात तू प्रकट हो.


मधुच्छन्दा वैश्वा ऋषिः - सरस्वती देवता - गायत्री छन्दः

पावका नः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । यज्ञं वष्टु धियावसुः ॥ १८९

जी वैदिक वाणी आम्हाला पवित्र करते, आम्हांला ती पवित्र उदात्त जीवन जगण्याची शक्ति ज्ञानाद्वारे आणि आमच्या कृतीत आणि बुद्धीत प्रतिष्ठित होऊन, प्रदान करो.


वामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

क इमं नाहुषीष्वा इन्द्रं स्ॐअस्य तर्पयात् । स नो वसून्या भरात् ॥ १९०

सर्व मनुष्यामध्ये या विश्वेस्वराला, ज्ञानयुक्त भक्तिद्वारा कोण प्रसन्न करून घेतो ? आनंदघन असा परमेश्वरच आपल्याला सर्व भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति देत असतो म्हणून त्याला या प्रकारे प्रसन्न करून घ्यावे. (तो ज्ञानोत्तर भक्तिनेच प्रसन्न होत असतो.)


हरिम्विठिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

आ याहि सुषुमा हि त इन्द्र स्ॐअं पिबा इमम् । एदं बर्हिः सदो मम ॥ १९१

हे परमेश्वरा ! ये, आम्ही ज्ञानोत्तर भक्तिरूपी सोमरस तुझ्यासाठी काढला आहे, त्याचा स्वीकार कर; आणि माझ्या पवित्र आणि उदात्त हृदयांत तू आसन ग्रहण अक्र आणि तेथेच निरंतर राहा. (माझ्या हृदयांत मला निरंतर तुझ्या अस्तित्वाची जाणीव होत राहावी.)


वामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

महि त्रीणामवरस्तु द्युक्षं मित्रस्यार्यम्णः । दुराधर्षं वरुणस्य ॥ १९२

खरा मित्र, न्यायी (निष्पक्षपाति न्यायी) आणि उत्तमोत्तम शिक्षकामध्येंही, गुरुमध्येंही सर्वोत्कृष्ट गुरु या तिघांचे संरक्षण हे श्रेष्ठ आणि अमूल्य असेच असते.


कण्वो घोर ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

त्वावतः पुरूवसो वयमिन्द्र प्रणेतः । स्मसि स्थातर्हरीणाम् ॥ १९३

हे सर्वलोकनाथा, हे लक्ष्मीपते, हे श्रेष्ठ जगन्नायका, आमच्या मार्गदर्शक गुरो ! आम्ही केवळ तुझ्यासारख्यावरही अवलंबून आहोत तूच सर्व लोकांच्या हृदयात राहून त्यांना सत्कर्मे करण्याची प्रेरणा देत असतोस.


प्रगाथ काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

उत्त्वा मन्दन्तु स्ॐआः कृणुष्व राधो अद्रिवः । अव ब्रह्मद्विषो जहि ॥ १९४

हे ब्रह्माण्डाची उत्पत्ति आणि लय करण्याचे सामर्थ्य असणार्‍या हे परमेश्वरा, शांत स्वभावाचे, तुझे भक्त तुला प्रसन्न करोत. तू आम्हांला भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति प्रदान कर. ज्ञानाच्या सर्व शत्रूंना तू दूर हाकलून दे.


सामवेद - तृतीय प्रपाठके - प्रथमार्ध

प्रथमा दशति

प्रगाथ काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गयत्री छन्दः

उत्त्वा मन्दन्तु स्ॐआः कृणुष्व राधो अद्रिवः । अव ब्रह्मद्विषो जहि ॥ १९४

हे ब्रह्माण्डाची उत्पत्ति आणि लय करण्याचे सामर्थ्य असणार्‍या हे परमेश्वरा, शांत स्वभावाचे, तुझे भक्त तुला प्रसन्न करोत. तू आम्हांला भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति प्रदान कर. ज्ञानाच्या सर्व शत्रूंना तू दूर हाकलून दे.


विश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

गिर्वणः पाहि नः सुतं मधोर्धाराभिरज्यसे । इन्द्र त्वादातमिद्यशः ॥ १९५

ऋचांनी स्तुति करण्यास, आराधना करण्यास योग्य अशा परमेश्वरा, आमच्यामध्ये जे तुझे भक्त आहेत त्यांचे तू रक्षण कर. वैदिक ज्ञानाच्या अमृतमय प्रवाहानी आणि भक्तीने तुझे स्तवन केले जाते. ही सर्व कीर्ति, हे यश, संपत्ति, अन्नधान्य आणि जल ही सर्व तुझी भेट आहे. तू दिलेल्या या भेट वस्तू आहेत.


वामदेव ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

सदा व इन्द्रश्चर्कृषदा उपो नु स सपर्यन् । न देवो वृतः शूर इन्द्रः ॥ १९६

परमात्मा, परमेश्वर नेहमीच तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करून घेत असतो. तो अत्यंत काळजीपूर्वक तुमचे रक्षण करतो. तो सर्वशक्तिमान, परमानंद देणारा परमेश्वर खरोखर लपलेला किंवा अदृश्य नाही. तो सदैवच तुमच्याबरोबर असतो.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

आ त्वा विशन्त्विन्दवः समुद्रमिव सिन्धवः । न त्वामिन्द्राति रिच्यते ॥ १९७

१) ज्याप्रमाणे नद्या समुद्राकडे वहात जातात त्याप्रमाणे आम्ही जी यज्ञादि शुभकर्मे करतो ती, हे परमेश्वरा, तुला समर्पित असावी. तुझ्यामध्ये प्रविष्ट होवोत. हे परमेश्वरा, तुझ्यहून उत्कृष्ट असे काहीच नाही.
२) ध्यानाभ्यास करीत असता सर्व भक्त सर्वस्वी तुझ्याशी एकरूप होऊन जावोत. (जीवब्रह्मैक्य होवो).


मधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

इन्द्रमिद्गाथिनो बृहदिन्द्रमर्केभिरर्किणः । इन्द्रं वाणीरनूषत ॥ १९८

सामदेवाचे गायन करणारांनी, त्यांच्या गायनाद्वारे परमेश्वराची कीर्ति वर्णन करावी. ऋग्वेद गाणारांनी मंत्रांच्या द्वारे त्या परमेश्वराची कीर्ति वर्णावी. अन्य साधकांनी उपासकांनी यजुर्वेदातील ऋचांनी आणि त्यांच्या पवित्र उच्चारांनी त्याचीच आराधना करावी.


मधुच्छन्दा ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

इन्द्र इषे ददातु न ऋभुक्षणमृभुं रयिम् । वाजी ददातु वाजिनम् ॥ १९९

आमच्या भौतिक इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून परमेश्वराने आम्हाला अन्न द्यावे. त्या सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, त्रिकालदर्शी, शांति आणि शाश्वत आनंद देणार्‍या परमेश्वराने आम्हाला त्याचे ज्ञान आणि आमध्या आध्यात्मिक अभिलाषांचे समाधान होईल असा आत्मसाक्षात्कार घडवून आमच्यावर कृपा करावी.


गृत्समद ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

इन्द्रो अङ्‌ग महद्भयमभी षदप चुच्यवत् । स हि स्थिरो विचर्षणिः ॥ २००

खरोखर, परमेश्वर सर्वांवर विजय मिळवून महा भयंकर भयालाही दूर पळवून लावतो. कारण तो अचल आणि त्रिकालदर्शी, सर्वज्ञही आहे.


भरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

इमा उ त्वा सुतेसुते नक्षन्ते गिर्वणो गिरः । गावो वत्सं न धेनवः ॥ २०१

आमच्या मंत्रोच्चाराने आराधना करण्यास योग्य अशा, हे परमेश्वरा, आमची ही पदे, त्यांतील ज्ञानयुक्त भक्तिरसाच्या सोमरसाच्या प्रत्येक घोटागणिक आम्ही त्यांना ओतत असता केवळ तुझ्याकडे येवोत. दुध देणार्‍या गायींचे कळप, खिल्लारे जशी त्यांच्या वासराकडे धा घेतात तशी उत्कंठतेने ती तुलाच समर्पित होवोत.


भरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

इन्द्रा नु पूषणा वयं सख्याय स्वस्तये । हुवेम वाजसातये ॥ २०२

आम्ही परमेश्वरचे त्याच्या दोन उपाधिरहित संपत्तिचा स्वामी, आणि विश्वाचा अधार म्हणून त्याचे सख्यत्वासाठी, भरभराटीसाठी आणि ज्ञान व शक्ती प्रप्त व्हावी म्हणून आवाहन करीत आहोत.


वामदेव ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

न कि इन्द्र त्वदुत्तरं न ज्यायो अस्ति वृत्रहन् । न क्येवं यथा त्वम् ॥ २०३

हे पातकांचा आणि अज्ञानाचा नाश करणार्‍या परमेश्वरा, तुझ्यापेक्षा उत्तम वाशक्तिमान कोणीच नाही. खरोखरच तुझ्यासारखे कोणीही नाही.


द्वितीया दशति

त्रिशोकः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

तरणिं वो जनानां त्रदं वाजस्य ग्ॐअतः । समानमु प्र शंसिषम् ॥ २०४

दुःखशोकादिच्या सागराऊन जो आम्हांला परतीरास घेऊन जातो त्या परमेश्वराची मी स्तुति करतो. तो ज्ञान, शक्ति आणि गायीची खिल्लारेरूपी संपत्तिचा निःपक्षपाती दाता आहे.


त्रिशोकः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

असृग्रमिन्द्र ते गिरः प्रति त्वामुदहासत । सजोषा वृषभं पतिम् ॥ २०५

हे आमच्यावर प्रेम करणार्‍या, शांति आणि आनंदाची आमच्यावर वृष्टि करणार्‍या, आमचे रक्षण करणार्‍या परमेश्वरा, तुझी प्रशंसा करणारी स्तुतिस्तोत्रें विनासायास अगदी सहजच बाहेर पडून तुझ्याकडे येत असतात. प्रेमी पत्‍नी जशी तिच्या पौरुषसंपन्न पतीकडे यावी तशी ती स्तोत्रे उत्कंठतेने आणि प्रेमाने तुझ्याकडे येतात.


कृत्सः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

सुनीथो घा स मर्त्यो यं मरुतो यमर्यमा । मित्रास्पान्त्यद्रुहः ॥ २०६

ज्या मर्त्य मानवाचे ज्ञानी भक्त तसेच न्यायी आणि ज्यांच्या ठिकाणी जराही द्वेषादि नाही अशा प्रेमी व्यक्ती संरक्षण करतात, त्यालाच उत्तम मार्गदर्शन मिळते.


त्रिशोकः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

यद्वीडाविन्द्र यत्स्थिरे यत्पर्शाने पराभृतम् । वसु स्पार्हं तदा भर ॥ २०७

हे परमेश्वरा, ज्याचे आम्ही इच्छा करतो ते आध्यात्मिक आणि प्राकृतिक धन तू आम्हांला दे. सुद्ह्ढ, निश्चयी, सावध आणि बुद्धिमान लोकांजवळच असे धन असते. (म्हणजे आम्हालाही त्यांच्यासारखे कर.)


सुकक्ष अङ्‌गिरस ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

श्रुतं वो वृत्रहन्तमं प्र शर्धं चर्षणीनाम् । आशिषे राधसे महे ॥ २०८

जो मानवाच्या पातकांचा आणि अज्ञानाचा नाश करतो त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची मी माझ्या ठिकाणी अत्यंत दानशीलता आणि शुभ कामनांची पूर्ती व्हावी म्हणून प्रार्थना करतो.


वामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

अरं त इन्द्र श्रवसे गमेम शूर त्वावतः । अरं शक्र परेमणि ॥ २०९

हे परमेश्वरा ! आम्ही तुझ्या पराक्रमाची आराधना करतो. तुझ्यासारख्या महान कीर्तीवंतावर आम्ही अत्यंत प्रेम करतो. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझ्या थोरवीचे ध्यान करीत असता> आम्ही त्यात मग्न होऊन जावे. सखोल ध्यानाभ्यासायोगे आम्ही तुला पूर्णपणे जाणून घ्यावे. तुझा साक्षात्कार आम्हाला प्राप्त होवो.


विश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

धानावन्तं करम्भिणमपूपवन्तमुक्थिनम् । इन्द्र प्रातर्जुषस्व नः ॥ २१०

हे परमेश्वरा, मी तुझा भक्त आहे. मी रोज सकाळी तुझे ध्यानात दंग असतो. हातांनी दानधर्म करत असतो आणि सत्कर्मे करण्यांत गुंतलेला असतो. माझ्या प्रतिज्ञांपासून मी कधी दूर जात नाही. माझे वचन मी नेहमी पाळतो आणि प्रामाणिकपणे, मनःपूर्वक तुझी प्रार्थना करतो म्हणून तू माझा स्वीकार कर.


गोषुत्तयश्व सूक्तिनौ ऋषी - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

अपां फेनेन नमुचेः शिर इन्द्रोदवर्तयः । विश्वा यदजय स्पृधः ॥ २११

हे आत्म्या ! तू जेव्हां अंतरांतील शत्रूंच्यावर (आसक्ति, क्रोध, लोभ इ०) विजय मिळवशील तेव्हांच तू ज्ञानाची वृद्धि करून आणि पवित्र सत्कर्मे करून पातकांचा शिरच्छेद करू शकशील.


वामदेवो गौतम ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

इमे त इन्द्र स्ॐआः सुतासो ये च सोत्वाः । तेषां मत्स्व प्रभूवसो ॥ २१२

हे आत्म्या ! ज्ञानयुक्त भक्तीचा रस तुझाच आहे. परम शांतीही तुझीच असून ती अद्याप प्रगट व्हावयाची आहे. ज्ञानरूपी राजविद्येच्या स्वामी, हे परमेश्वरा, तू त्याचा आनंद घे.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

तुभ्यं सुतासः स्ॐआः स्तीर्णं बर्हिर्विभावसो । स्तोतृभ्य इन्द्र मृडय ॥ २१३

हे जगदात्म्या, प्रकाशाच्या स्वामी, तुझ्यासाठी हा ज्ञानयुक्त सोमरस (भक्तिरस) कुटून तयार केला आहे आणि हृदयरूपी आसनही तयार केले आहे. तुझ्या आराधकांवर, उपासकांवर तू कृपा कर.


तृतीया दशति

शुनःशेप ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

आ व इन्द्र कृविं यथा वाजयन्तः शतक्रतुम् । मंहिष्ठं सिञ्च इन्दुभिः ॥ २१४

शेतकरी जशी त्याच्या शेतांची मशागत करतो किंवा एकादा कामगार जसे त्याच्या यंत्राला वंगण घालतो त्याप्रमाणे हे अनेक कार्ये करणार्‍या सर्वज्ञा, आनंददात्या आणि परमपूज्य परमेश्वराला आम्ही, आम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून स्तुति, याचना करून तुला त्यांच्या पुरांत बुडवून टाकतो. स्तुतिंचा वर्षाव तुझ्यावर करतो.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

अतश्चिदिन्द्र न उपा याहि शतवाजया । इषा सहस्रवाजया ॥ २१५

म्हणून हे परमेश्वरा, तू आध्यात्मिक भोजन घेऊन आमच्याजवळ ये म्हणजे त्यायोगे आम्हाला शेकडो नव्हे हजारो शक्ति प्राप्त होतील.


त्रिशोक ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

आ बुन्दं वृत्रहा ददे जातः पृच्चद्वि मातरम् । क उग्राः के ह शृण्विरे ॥ २१६

अज्ञानाचा नाश करणार्‍या आत्म्याचा हृदयात साक्षात्कार झाल्यावर तो विचारतो, तुझ्या शांतीचा भंग करणारे, तुझ्या उद्दिष्टाची हानी करणारे असे तुला त्रास देणारे तुझे भयंकर शत्रू कोण आहेत ? त्यांचा नाश केला जाईल ?


मेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवताः - गायत्री छन्दः

बृबदुक्थं हवामहे सृप्रकरस्नमूतये । साधः कृण्वन्तमवसे ॥ २१७

ज्याचे हात फार लांब आहेत, ज्याची खूप प्रशंसा केली जाते, जो आपल्या संरक्षणाचे काम पूर्ण करतो, त्याचे आपण आपले संरक्षण करण्यासाथी आवाहन करूया. (हा मंत्र परमेश्वरासही लागू पडतो, रूपकात्म अर्थाने आणि शब्दशः तो सद्‌गुणी उदात्त राजाला लागू पडतो.)


गोतम ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

ऋजुनीती नो वरुणो मित्रो नयति विद्वान् । अर्यमा देवैः सजोषाः ॥ २१८

सर्व अशुभांचा, पापांचा नाश करणारा, अत्यंत स्वीकारार्ह, सर्वांचा सुहृद आणि सव्रांना जाणणारा, न्यायी, सर्व सत्यप्रिय ज्ञानी महात्म्यावर सारखेच प्रेम करणारा परमेश्वर आम्हाला सरळ न्यायाच्या मार्गावर घेऊन जातो. (हे वर्णन जे लोक सर्वांशी मित्रत्त्वाने वागतात आणि न्याय करतात अशा संत महात्मे यांनाही लागू आहे. असेच लोक खरे उत्तम नेतृत्व करू शकतात.)


ब्रह्मातिथिः ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

दूरादिहेव यत्सतोऽरुणप्सुरशिश्वितत् । वि भानुं विश्वथातनत् ॥ २१९

अत्यंत दूर आणि प्रकाशमान सूर्य ज्याप्रमाणे विविध वस्तूंना प्रकाश देत असतो, त्याप्रमाणे अध्यात्मिक अरुणोदय, उषःकाल झाला की आत्मप्रभा प्रकट होते आणि ती सर्व बाजूला प्रकाशित करते.


विश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

आ नो मित्रावरुणा घृतैर्गव्यूतिमुक्षतम् । मध्वा रजांसि सुक्रतू ॥ २२०

हे उदात्त अध्यापका आणि उपदेशका, तुम्ही सर्वांशी मित्रत्त्वाने वागता, सर्वांना उत्तम ज्ञान देता, हे उत्कृष्ट सत्कर्मे करणार्‍या, तू आमच्या आध्यात्मिक मार्गावर तेजाचे सिंचक कर, आमचा मार्ग प्रकाशमय कर. आमच्यातील लालसेला तू ज्ञानाच्या मधाने शांत कर.


प्रस्कण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

उदु त्ये सूनवो गिरः काष्ठा यज्ञेष्वत्‍नत । वाश्रा अभिज्ञु यातवे ॥ २२१

यज्ञात ऋचांच्या, मंत्रांच्या उच्चाराने सर्व वातावरण भरून जावो आणि सर्व दिशांना पसरो.


विष्णुर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इदं विष्णुर्वि चक्रमे त्रेधा नि दधे पदम् । समूढमस्य पांसुले ॥ २२२

पृथ्वी, मधला प्रदेश आणि आकाश यांनी युक्त सर्व विश्वास परमेश्वर व्यापून आहे. पण प्रत्येक अणू परमाणूमध्ये असलेले त्याचे रूप मात्र त्याने लपवून ठेवलेले आहे.


चतुर्थी दशति

मधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

अतीहि मन्युषाविणं सुषुवांसमुपेरय । अस्य रातौ सुतं पिब ॥ २२३

हे परमेश्वरा, अत्यंत क्रुद्ध स्वभावाच्या दात्यापासून तू दूर निघून जातोस आणि जो तुला भक्ति आणि ज्ञानाचा नैवेद्य, आहुति अर्पण करतो त्याच्याजवळ तूं धाव घेतोस. त्याने तुला अर्पण केलेल्या भक्तिरसाचा तू उपभोग घे, रसास्वाद घे. (हा अर्थ उदात्त स्वभावाच्या राजाकडे लागू शकतो. जो नजराणे आणि भेटवस्तू आदि व्यावहारिक दृष्ट्या स्वीकारतो. पहिल्या ओळीवरून एवढे लक्षात घ्यायला हवे की आपण क्रोधावर विजय मिळवायला हवा.)


वामदेव ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

कदु प्रचेतसे महे वचो देवाय शस्यते । तदिध्यस्य वर्धनम् ॥ २२४

एखादा शब्द मग तो कितीही लहान असला पण जर तो श्रेष्ठ आणि सर्वज्ञ भगवंतास उद्देशून त्याचा स्तुतिपर असला तर तो त्या भक्ताची उन्नति करतो.


मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

उक्थं च न शस्यमानं नागो रयिरा चिकेत । न गायत्रं गीयमानम् ॥ २२५

उत्कृष्ट गायकाने केलेली स्तुति आणि त्याने गायलेली गाणी सर्वज्ञ परमेश्वर जाणत नाही का ? निश्चितच तो ते उत्तमप्रकारे जाणतो.


विश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

इन्द्र उक्थेभिर्मन्दिष्ठो वाजानां च वाजपतिः । हरिवान्त्सुतानां सखा ॥ २२६

शक्ति देणार्‍या सर्व वस्तूंचा परमेश्वर स्वामी आहे. प्रामाणिकपणे प्रेमाने केलेल्या प्रशंसेने तो प्रसन्न होतो. त्याच्या सर्व पुत्रांचा तो मित्र परम सुहृद आहे आणि सर्व अशुभाम्चा नाश करण्यासाठी आवश्यक शक्तीने तो युक्त आहे.


प्रियमेध ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

आ याह्युप नः सुतं वाजेभिर्मा हृणीयथाः । महां इव युवजानिः ॥ २२७

हे परमेश्वरा, आम्ही तर्पण केलेल्या भक्तीचा नैवेद्य ग्रहण करण्यास तू ज्ञानरूपी संपत्ति आणि सामर्थ्यासह ये. ज्याप्रमाणे उदात्त गृहस्थाश्रमी ज्याला सद्‌गुणी तरुण बायको असते तो तिच्या लहान सहान चुकांच्याकडे दुर्लभ करतो, त्याबद्दल कधीही तिच्यावर रागवत नाही त्याप्रमाणे हे परमेश्वरा, तूही आमच्यावर रागावू नको (आमचे अपराध क्षमा कर.)


सुमित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

कदा वसो स्तोत्रं हर्यत आ अव श्मशा रुधद्वाः । दीर्घं सुतम् वाताप्याय ॥ २२८

हे सनातन परमेश्वरा ! हे वेदांत पारंगत आहेत त्यांच्या, वेदांचे ज्ञान असणार्‍या शरीरातील जीवनप्रवाह तुम्ही कधी रोखू शकाल ? नाही केव्हांच नाही. जो प्राणायामद्वारा आपल्या श्वासावर ताबा मिळवतो त्याला तू दीर्घायुष्य प्रदान करतोस.


मेधातिथिः ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

ब्राह्मणादिन्द्र राधसः पिबा स्ॐअमृतूं रनु । तवेदं सख्यमस्तृतम् ॥ २२९

हे माझ्या आत्म्या ! ज्ञानी लोकांचे अनुसरण करून तू भक्तीच्या आध्यात्मिक रस, जो ईश्वराची देणगी आहे सर्व ऋतूमध्ये प्राशन कर. ईश्वराशी असलेली तुझी मैत्रीही अजेय आणि अभेद्य आहे.


मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

वयं घा ते अपि स्मसि स्तोतार इन्द्र गिर्वणः । त्वं नो जिन्व स्ॐअपाः ॥ २३०

हे स्तुति करण्यास, वेदमंत्रांनी प्रशंसा करण्यास योग्य अशा परमेश्वरा ! आम्ही तुझी प्रशंसा करणारे गायक आहोत. आम्ही तुला ज्ञानयुक्त भक्तीचा नजराणा अर्पण करीत आहो त्याचा स्वीकार कर आणि आमच्यावर कृपा कर.


विश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

एन्द्र पृक्षु कासु चिन्नृम्णं तनूषु धेहि नः । सत्राजिदुग्र पौंस्यम् ॥ २३१

हे परमेश्वरा ! वाईट सवयी आणि दुर्जन यांच्या बरोबरच्या प्रत्येक भांडणांत आणि युद्धात लढण्यासाठी आम्हांला शारिरीक सामर्थ्य, पौरुष दे. हे परमेश्वरा आम्हांला नित्य विजय मिळावा म्हणून प्राकृतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य देण्याची कृपा कर.


श्रुतकक्ष ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः

एवा ह्यसि वीरयुरेवा शूर उत स्थिरः । एवा ते राध्यं मनः ॥ २३२

हे परमेश्वरा, तू शूरांचा मित्र आहेस, तू शक्तिमान नायक आहेस, म्हणून हे आदरणीय स्वभावाचे पूजन करून आणि तुझे ज्ञान प्राप्त करून घेऊ.


इति ऐन्द्रकाण्डे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥


GO TOP