|
सामवेद - आग्नेय काण्ड - प्रथमोऽध्यायः सामवेद - प्रथम प्रपाठके - प्रथमार्ध प्रथमा दशतिः भरद्वाजो वार्हस्पत्य ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥ १
हे परमेश्वरा, आम्ही ज्याची इच्छा करतो ते ज्ञान आणि ती भक्ती देण्यासाठी तू आमच्याजवळ ये; आणि आमच्या हृदयमंदिरात बसून आम्हाला भवसागराच्या या दलदलीतून बाहेर काढ.
भरद्वाजो बार्हस्पत्य ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः त्वमग्ने यज्ञानां होता विश्वेषां हितः । देवेभिर्मानुषे जने ॥ २
तू सत्कर्मांचा स्वीकार करतोस, ज्यामुळे सुखाची बीजे, आनंदाची बीजे विखुरली जातात. तू सर्वांचा शुभचिंतक आहेस म्हणून आम्ही तुला ’नायक’ म्हणतो. ज्ञानी लोक तुला मानवमात्राच्या ठिकाणी पाहतात आणि आपल्या मनांत तुझी दृढ स्थापना करतात.
कण्वो मेधतिथिर्ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् । अस्य यज्ञस्य सुक्रतुम् ॥ ३
आम्ही चिरंतन सत्यच संदेशवाहक म्हणून परमेश्वराची निवड करतो. तो खर्या आनंदाचा दाता आणि आपत्तीमध्ये सहाय्य करणारा त्रिकालदर्शी सर्वज्ञ दाता आहे. तोच या विश्वाचा निर्माता असून या यज्ञाचा कर्ताही आहे.
भरद्वाज ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्निर्वृत्राणि जङ्घनद्द्रविणस्युर्विपन्यया । समिद्धः शुक्र आहुतः ॥ ४
भगवंताची अत्यंत कळवळून प्रार्थ केली की तो आमच्या सर्व अशुभाचा, पापांचा नाश करतो. जेव्हा त्याच्या प्रकाशाने, प्रभावाने आम्ही झुकतो, त्यास शरण जातो तेव्हां तो आमच्या अज्ञानाचाही संपूर्ण नाश करतो.
उशना ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः प्रेष्ठं वो अतिथिं स्तुषे मित्रमिव प्रियम् । अग्ने रथं न वेद्यम् ॥ ५
हे परमेश्वरा, मी तुझा, माझा प्रियतम अतिथी म्हणून सन्मान करतो आणि माझा अंतरंगातील जिवलग म्त्र, जिवलग सखा जाणून तुझ्यावर प्रेम करतो. प्रसिस्श सारथी म्हणून तुझी अत्यांत योग्य अशी ख्याती आहे. कारण जेथे कुठलीही प्राकृतिक गोष्ट (वस्तु) आम्हाला कष्ट देऊ शकत नाही अशा शाश्वत सुखाकडे तूच आम्हाला घेऊन जातोस, आमचे जणूं सारथ्य करतोस.
सुदीतिः पुरुमीढोवा ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः त्वं नो अग्ने महोभिः पाहि विश्वस्या अरातेः । उत द्विषो मर्त्यस्य ॥ ६
हे सर्वज्ञ परमेश्वरा ! तुझ्या अलौकिक सौंदयाने व थोरवीने तू सर्व संकुचितपणा, कृपणता आणि वैरभाव, जो मर्त्य मानवच्य ठिकाणी आढळतो, त्याविरुद्ध आमचे रक्षण कर.
बार्हस्पत्यो भारद्वाज ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः एह्यू षु ब्रवाणि तेऽग्न इत्थेतरा गिरः । एभिर्वर्धास इन्दुभिः ॥ ७
हे परमेश्वरा, सत्य ज्ञान प्रदायका, दात्या, आम्ही या वैदिक ऋचांच्या व इतर स्तोत्रांच्या द्वारे तुझे आवाहन करीत आहो की, आमच्या हृदयांत आम्हाला तुझा साक्षात्कार व्हावा. तुझ्या कृपेने आम्हला सत्य व सुसंस्कृत वाणी लाभावी आणि तुझ्या दैवी सौंदर्याच्या ध्यानाने त्यावर मन एकाग्र करण्याने आमचा उत्कर्ष होत रहावा.
काण्वोवत्स ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः आ ते वत्सो मनो यमत्परमाच्चित्सधस्थात् । अग्ने त्वां कामये गिरा ॥ ८
हे परमेश्वरा, मी तुझेच लेकरु आहे, मी तुझे मन, जे अत्यंत श्रेष्ठ आहे, ते मझ्याकडे आकर्षित करून घेईन. हे परमेश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस. अत्यंत दूरही तूच आहेस, आणि अत्यंत निकटही तूच आहेस.
भरद्वाज ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः त्वामग्ने पुष्करादध्यथर्वा निरमन्थत । मूर्ध्नो विश्वस्य वाघतः ॥ ९
हे परमेश्वरा, आक्रमक नसलेला साधक वा योगी त्याच्या प्रकर, देदिप्यमान बुद्धिने, सखोल चिंतनाने, ध्यानाने, निदिध्यासाने त्याच्या हृदयांतील सखोल गुहेत तुझ्या दैवी सामर्थ्याचा साक्षात्कार प्राप्त करून घेतो.
वामदेव ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्ने विवस्वदा भरास्मभ्यमूतये महे । देवो ह्यसि नो दृशे ॥ १० हे आमच्या सर्वश्रेष्ठ नायका, आमचे सर्वप्रकारे संरक्षण करण्यासाठी आम्हाला ज्ञानी उपदेशकांच्या द्वारे (गुरुंकडून) तुझ्या स्वरूपाचे ज्ञान प्रदान कर. तूच खरोखर शाश्वत शांति आणि आनंदाचा दाता आहेस (आनंदहू के आनंद दाता). आम्ही ज्ञानदृष्टीने, अंतर्दृष्टीने तुलाच बघण्याची, तुलाच जाणण्याची तीव्रतेने इच्छा करीत असतो.
या व सामवेदाच्या ज्या मंत्रात भक्ती, ध्यान वैगैरेचा उल्लेख आहे, तेथे ’अग्नि’ हा शब्द मुख्यतः ईश्वराचा निर्देश करतो. अग्नि म्हणजे fire चा नव्हे. ’एकं सद् विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहुः । (ऋग्वेद. १.१६४.४६) द्वितीया दशति वामदेवो गौतम ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः नमस्ते अग्न ओजसे गृणन्ति देव कृष्टयः । अमैरमित्रमर्दय ॥ ११
हे भगवंता, तुझ्या सामर्थ्याबद्दल सर्वजण तुझी प्रशंसा, स्तुति करतात. तुझ्या देदिप्यमान शक्तीच्या योगे तू आमच्या शत्रूंचा पराभव कर.
वामदेवो गौतम ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः दूतं वो विश्ववेदसं हव्यवाहममर्त्यम् । यजिष्ठमृञ्जसे गिरा ॥ १२
जो परमेश्वर सर्वज्ञ, सर्वांना पावन करणारा, शर्वशक्तिमान आणि पूजनीय आहे, त्याची मी माझ्या वाणीद्वारे स्तुति करतो. जो कोणी त्याच्यावर दृढ विश्वास, दृढ श्रद्धा ठेवतो, त्याची सर्व पापे तो नाहीशी करतो. तो नित्य शांति आणि आनंदाचा वर्षाव करीत असतो म्हणून आपण त्याची साथ कधीही सोडू नये.
प्रयोगोभार्गव ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः उप त्वा जामयो गिरो देदिशतीर्हविष्कृतः । वायोरनीके अस्थिरन् ॥ १३
हे परमेश्वरा ! तुझ्या भक्तांचे तुझी स्तुति करणारे आणि आश्चर्यकारक परिणाम करणारे सर्व शब्द तू सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असल्याने, तुझ्यापर्यंत पोहोचतात.
मधुच्छन्दा वैश्वामित्र ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः उप त्वाग्ने दिवेदिवे दोषावस्तर्धिया वयम् । नमो भरन्त एमसि ॥ १४
आमची सत्कर्मे आणि शुभ विचार, हे परमेश्वरा, आम्ही तुलाच अर्पण करतो. तरी हे भगवन् ! आपल्या कृपेने आम्हाला आत्म्याच्या दिव्य प्रकाशाची झलक दिसावी आणि तू शाश्वत आनंदाने आमची हृदये व्यापून टाकावीस.
शुनःशेप आजीगतिः ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः जराबोध तद्विविड्ढि विशेविशे यज्ञियाय । स्त्ॐअं रुद्राय दृशीकम् ॥ १५
हे परमेश्वरा, तू उदार हस्ते न्याय प्रदान करणारा, प्रत्येकास पूजनीय आणि स्तुति करण्यास व जाणण्यास योग्य आहेस. जो भक्त अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत प्रेमाने आणि शुद्ध अंतःकरणाने स्तुति करतो त्याच्या हृदयांत तू प्रगट व्हावेस.
मेधातिथिः काण्व ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः प्रति त्यं चारुमध्वरं गोपीथाय प्र हूयसे । मरुद्भिरग्न आ गहि ॥ १६
हे आमच्या श्रेष्ठ नायका ! आमच्या जीवनरूपी उदात्त यज्ञाकरितां आम्ही तुझे आवाहन करीत आहोत. ज्ञानी लोकांकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आणि प्राणायामादिंच्या अभ्यासाच्या रूपाने तू आमच्या समोर प्रकट व्हावेस. तुझा साक्षात्कार आम्हाला घडावा.
शुनःशेप आजीगतिः ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अश्वं न त्वा वारवन्तं वन्दध्या अग्निं नमोभिः । सम्राजन्तमध्वराणाम् ॥ १७
आमच्या अंतर्बाह्य शत्रूंचा विनाश करण्यार्या हे परमेश्वरा ! उपासना, पूजा यांच्या द्वारे मी तुझा सन्मान करीत आहे, तुला नमन करीत आहे. एखादा अश्व जसा त्याला त्रास देणार्या माशांना उडवून लावतो तसेच तू केले आहेस. सर्व अनाक्रमक सत्कृत्यांचा स्वामी, प्रभु तूच आहेस.
प्रयोगोभार्गव ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः और्वभृगुवच्चुचिमप्नवानवदा हुवे । अग्निं समुद्रवाससम् ॥ १८
आकाश, पृथ्वी, सागर इत्यादिंना व्यापून असणार्या सर्वज्ञ परमेश्वराचे मी आवाहन करीत आहे. खर्या ज्ञानी स्थितप्रज्ञ आणि सत्कर्मे करणार्या महात्म्यांच्या प्रमाणेच मी त्याचे आवाहन करीत आहे.
प्रयोगोभार्गव ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्निमिन्धानो मनसा धियं सचेत मर्त्यः । अग्निमिन्धे विवस्वभिः ॥ १९
जेव्हां एखादा मनुष्य अग्नि प्रज्वलित करतो तेव्हां त्याने त्याच्या अंतरांतील ज्ञानाग्नि संबंधीही विचार करावा. त्या अग्नीच्या योगेच सर्व अशुभाचा आणि पापांचा नाश होतो. सर्व वाईट सवयींत परिवर्तन होणे आवश्यक असते. कारण वाईट सवयींच्यामुळे त्याची हानी होते, त्यास इजा होते आणि त्याचा आनंद, सुख त्याला सोडून जाते. असे होऊ नये म्हणून हे परमेश्वरा, त्याच्या मन-बुद्धीचा सहयोग घडवून आणावा.
वत्सः काण्वः ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः आदित्प्रत्नस्य रेतसो ज्योतिः पश्यन्ति वासरम् । परो यदिध्यते दिवि ॥ २०
जो सूर्य अत्यंत दूर अंतरावर प्रकाशतांना दिसतो आणि ज्याच्यामुळे दिवस उजाडतो त्याला देदिप्यमान, अलौकिक, अविनाशी परमेश्वरापासूनच प्रकाश प्राप्त होत असतो.
वासरम् - नियामकं ज्योतिः - ’तमेव भान्तमनुभाति सर्वं, तस्य भासा सर्वमिदं विभाति (कठो. २.५) तृतीया दशति प्रयोगोभार्गव ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्निं वो वृधन्तमध्वराणां पुरूतमम् । अच्चा नप्त्रे सहस्वते ॥ २१
जो परमेश्वर, सर्वज्ञ नायक आपल्या सत्कर्मांचे शुभफल प्रदान करतो त्या परमेश्वाशी दृढ सख्य, नातेसंबंध निर्माण व्हावा म्हणून मी त्याचे अत्यंत मनःपूर्वक आवाहन करतो. या संपूर्ण विश्वाचा प्रदेशांचा तोच स्वामी आहे आणि तोच आपला खरा मित्र, परम सुहृदही आहे.
भरद्वाजो वार्हस्पत्य ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्निस्तिग्मेन शोचिषा यंसद्विश्वं न्या३त्रिणम् । अग्निर्नो वंसते रयिम् ॥ २२
तो सर्वज्ञ प्रभु आमच्या अंतरात आणि बाहेर अस्णार्या प्रत्येक भक्षण करणार्या अतिदुष्ट राक्षसांना वा पिशाच्चांना त्याच्या दीप्तीमान तेजाने प्रतापाने दूर फेकून देवो. फक्त तोच आम्हाला ज्ञान, शांति आणि आनंद ही खरी संपत्ति प्रदान करू शकतो.
वामदेवो गौतम ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्ने मृड महां अस्यय आ देवयुं जनम् । इयेथ बर्हिरासदम् ॥ २३
हे परमेश्वरा, आम्हाला सुखी कर. तूच सर्व श्रेष्ठ आहेस. ज्ञानी लोक आणि पुण्यवान् भक्त तुलाच शरण येतात आणि तुलाच जाणतात. त्यांच्या पवित्र हृदय मंदिरांतच तू निवास करतोस.
वसिष्ठो मैत्रावरुणि ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्ने रक्षा णो अंहसः प्रति स्म देव रीषतः । तपिष्ठैरजरो दह ॥ २४
हे आमच्या सत्य नायका, पातकांपासून आमचे रक्षण करा. हे सनातन परमेश्वरा, आमचे तीव्र वासना, क्रोध, मत्सर, अज्ञान, गर्व, अहंकार आणि लोभ यासारख्या अंतर्गत शत्रूपासून तू रक्षण कर. तुझ्या ज्ञान आणि निर्णायक विवेक या सारख्या अत्यंत प्रभावशाली आयुधांच्या योगे तू त्यांना नष्ट करून टाक.
भरद्वाजो वार्हस्पत्य ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्ने युङ्क्ष्वा हि ये तवाश्वासो देव साधवः । अरं वहन्त्याशवः ॥ २५
हे सर्वज्ञ परमेश्वरा, तुझ्या धार्मिक (पवित्र) स्वभावाच्या ज्ञानी भक्तांना योगाभ्यास करण्याची प्रेरणा दे. ते उत्साही राहतील तर तत्परतेने त्यांच्या जीवनाचे ध्येय साध्य करतील.
वसिष्ठो मैत्रावरुणि ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः नि त्वा नक्ष्य विश्पते द्युमन्तं धीमहे वयम् । सुवीरमग्न आहुत ॥ २६
हे देदिप्यमान, सर्वशक्तिमान, सर्वलोकनाथा, ज्या तुझे ज्ञानी लोक आवाहन करतात त्या तुझेच ध्यान आम्ही करतो. हे सर्व मांगल्याचा स्त्रोत असणार्या परमेश्वरा, आम्ही आमच्या हृदयात तुझीच प्रतिष्ठापना करतो.
विरूप आङ्गिरस ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम् । अपां रेतांसि जिन्वति ॥ २७
त्रिकालदर्शी परमेश्वर हाच स्वर्गाचे मस्तक आहे, तोच पृथ्वीपति आहे. तोच ऋतुचक्रास गति देणारा आहे. त्याच्या योगे विद्युल्लतेसह पर्जन्यधारा कोसळतात आणि बीजे संकूरून पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांचे भरण पोषण करतात. गतिहीन जड प्रकृतिला तोच मुख्यतः प्रेरणा देऊन तिचेकडून कार्य करवितो. सर्व कर्मांचे यथायोग्य फ देणाराही तोच आहे.
शुनःशेप ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः इममू षु त्वमस्माकं सनिं गायत्रं नव्यांसम् । अग्ने देवेषु प्र वोचः ॥ २८
हे उदार परमेश्वरा, जे वैदिक ज्ञान जाणण्यास अत्यंत सुयोग्य आहे, जे सर्व आपत्तिंच्यापासून संरक्षण करणारे असून सर्वोत्तम आहे ते तू तुझ्या कृपेने साधकांना देतोस. आम्हांलाही हे ज्ञान दे. हे वैदिक ज्ञान जे तू कृपाकरून सृष्टिनिर्मितिच्या समयी साधकांना दिलेस ते प्राणिमात्रांच्या हितासाठी दिलेले असून त्यामुळे ते प्राप्त करून घेण्याची (अधिकार) योग्यता सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आहे.
गोपवन आत्रेय ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः तं त्वा गोपवनो गिरा जनिष्ठदग्ने अङ्गिरः । स पावक श्रुधी हवम् ॥ २९
हे प्रियतम परमेश्वरा, हे जीवीच्या जिवलगा, ज्याने आपली वाणी पवित्र केली आहे, जो जितेंद्रिय आहे असा ज्ञानी त्यांच्या स्तुतिस्तोत्राद्वारे तुझा साक्षात्कार प्राप्त करू शकतो. हे पतितपावना, तू कृपा करून माझी प्रार्थना ऐक. मजकडे लक्ष दे.
वामदेवो गौतम ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः परि वाजपतिः कविरग्निर्हव्यान्यक्रमीत् । दधद्रत्नानि दाशुषे ॥ ३०
सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, नायक परमेश्वर त्याच्या भक्तांनी भक्तिने अर्पण केलेल्या भेटवस्तु स्वीकारतो आणि त्यांना ज्ञान आणि विशुद्ध चारित्र्यरूपी अमूल्य वस्तु भेट देतो.
प्रस्कण्व ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः उदु त्यं जातवेदसं देवं वहन्ति केतवः । दृशे विश्वाय सूर्यम् ॥ ३१
अनंत सूर्य, अनंत तारे, अनंत सागर, पर्वत व टेकड्या ही सर्व त्या परमेश्वरांचा निर्देश करणार्या ध्वजाप्रमाणे आहेत. तो प्रकाशक, परमेश्वर, सर्व अशुभांचा नाश करून सर्व बाजूंनी आम्हाला वेढून टाकलेल्या दुःखसागरांतून पोहून पैलतीरास जाण्यास आम्हाला मदत करतो. परमेश्वर हा सर्वशक्तिमान व सर्वव्यापी, सर्वज्ञ असून जे ज्ञानी लोक त्याचे ध्यान करतात. त्यांचे मार्गदर्शन करून त्यांना आयुष्य आणि प्रकाश देतो. रात्रंदिवस ते त्या परमेश्वराचेच चिंतन करतात आणि जगाला उचित असे मार्गदर्शनही करतात.
मेधातिथि ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः कविमग्निमुप स्तुहि सत्यधर्माणमध्वरे । देवममीवचातनम् ॥ ३२
अरे मानवा ! जो परमेश्वर सर्वज्ञ असून ज्याचे कायदे, नीतिनियम सनातन आहेत. जो आयुष्य आणि प्रकाश देणारा असून शारिरीक व मानसिक आधीव्याधींना नष्ट करणारा आहे. त्याची स्तुति तू कर.
सिन्धुद्वीप आम्बरीषः ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः शं नो देवीरभिष्टये शं नो भवन्तु पीतये । शं योरभि स्रवन्तु नः ॥ ३३
हे जगज्जननी देवी ! आम्हाला शांति व आनंड देऊन आमच्यावर कृपा कर. आम्हाला तुझ्या अमृताचे असे आकंठ पान घडावे की ज्यायोगे आम्हाला तुझा कधीही विसर पडू नये. आमच्यावर शाश्वर शांतीचा वर्षाव कर. हे सर्वव्यापी माते, आमची सर्व दुःखे दूर सार. तुझ्याशिवाय अन्य कोणीही शाश्वत शांती प्रदान करू शकत नाही.
उशनाकाव्य ऋषिः - अग्निर्देवता - गायत्री छन्दः कस्य नूनं परीणसि धियो जिन्वसि सत्पते । जोषाता यस्य ते गिरः ॥ ३४
प्रश्न - साधुंचे परित्राण करणार्या परमेश्वरा, तू पूर्णकाम असतांनाही कुणाची (सत्कर्मे) कर्मे तू स्विकारतोस ?
उत्तर - ज्या व्यक्तीच्या ऋचा (मंत्र) त्याला जितेंद्रिय होण्यास सहाय्य करतात. जे लोक वाणी, मन आणि क्रिया कर्मे करण्यांत पवित्र असतात. फक्त त्यांचीच कर्मे परमेश्वर स्वीकारतो. शेवटच्या ओळीचा अर्थ ’गोषाता यस्य ते गिरः ।’ पुढील प्रमाणेही होऊ शकतो. भगवंतापासून प्रकट झालेले वेद हे सर्वांसाठी आहेत. वेद हे सर्व जगासाठी आहेत. (गोषाता=) गवां पृथिवी स्थिता मां सर्वेषां मानवानां (सातो) लाभे लाभाय भवन्तीति । अनेन परम शूद्रातिशूद्रा भेद विभक्तांना तत्पुत्राणां स्त्रीपुंस सशरीरभृतां जीवानां समानोऽधिकार इति विस्पष्टं सूचितंभवति ॥ चतुर्थी दशति शंपुर्बाहस्पत्य ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः यज्ञायज्ञा वो अग्नये गिरागिरा च दक्षसे । प्रप्र वयममृतं जातवेदसं प्रियं मित्रं न शंसिषम् ॥ ३५
प्रत्येक यज्ञाच्या समयी हे भ्गवम्ता परमेश्वरा, आम्ही तुझी अत्यंत प्रेमाने आराधना करतो. हे सर्व शक्तिमान् परमेश्वरा, आन्ही जो प्रत्येक शब्द उच्चारतो तो तुझ्या स्तुतिपरच असतो. त्या सनातन परमेश्वराला परम मित्र जाणूनच आम्ही त्याची प्रशंसा करतो. तो परमेश्वर सर्वश्रेष्ठ अमर नायक आहे आणि आमच्या सर्व प्रार्थना त्याच्या प्रीत्यर्थच असतात.
भर्ग प्रागाथ ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः पाहि नो अग्न एकया पाह्यू३त द्वितीयया । पाहि गीर्भिस्तिसृभिरूर्जां पते पाहि चतसृभिर्वसो ॥ ३६
हे परमेश्वरा, प्रथम वेदाच्या (ऋग्वेदाच्या) ऋचांच्याद्वारे तू आमचे रक्षण कर; दुसर्या वेदाच्या (यजुर्वेदाच्या) मंत्रांच्याद्वारे तू आमचे रक्षण कर; तिसर्या वेदाच्या (सामवेद) ऋचांच्याद्वारे तू आमचे रक्षण कर. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, चारही वेदांच्या ऋचांच्याद्वारे तू आमचे रक्षण कर (मंत्रांच्याद्वारे तू आमचे रक्षण कर). हे चारही वेद ज्ञानासंबंधी, कर्मासंबंधी, भक्तीसंबंधा व योगासंबंधी आहेत आणि त्यांचेच प्रतिनिधित्व करतात.
शंपुर्बाहस्पत्य ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः बृहद्भिरग्ने अर्चिभिः शुक्रेण देव शोचिषा । भरद्वाजे समिधानो यविष्ठ्य रेवत्पावक दीदिहि ॥ ३७
हे शांति आणि आनंद प्रदान करणार्या, सदैव देदिप्यमान परमेश्वरा ! ज्ञानी लोकांच्या पवित्र अंतःकरणात सदैव प्रमाशमान होणार्या चिरतरुण पतितपावना, तुझा विलक्षण अद्भुत प्रतापाने आणि तुझ्या पवित्र तेजाने ऊ आमच्द्द् अंतःकरणेही प्रकाशमान् कर. आमच्या पवित्र हृदयात (अंतःकरणात) तुझ्या ज्ञानरूपी संपदेने तू नेहमी चमकत रहा.
वसिष्ठो मैत्राअरुणिः ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः त्वे अग्ने स्वाहुत प्रियासः सन्तु सूरयः । यन्तारो ये मघवानो जनानामूर्वं दयन्त गोनाम् ॥ ३८
हे ब्रह्मांडाच्या खर्याखुर्या सत्यनायका ! ज्या तुझे उत्तम प्रकारे पूजन केले जाते अशा तुला आत्मज्ञानी विद्वदजन नेहमी प्रिय वाटोत, आणि अशा ज्ञानी लोकांना मुक्तहस्ते द्रव्य व गाईंची खिल्लारे दान देणारे जितेंद्रिय धनवान लोकही तुला प्रिय वाटत राहोत.
भर्गः प्रागाध ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः अग्ने जरितर्विश्पतिस्तपानो देव रक्षसः । अप्रोषिवान्गृहपते महां असि दिवस्पायुर्दुरोणयुः ॥ ३९
तूंच सर्व लोकांचा स्वामी आहेस आणि तऊंच सर्व पापांना, अशुभांना भस्म करून टाकतोस. तुझ्या भक्तांच्या हृदयातून तू कधीच निघून जात नाहीस. त्यांना त्यांच्या हृदयांत सदैव अस्तित्व जाणवत असते. हे नित्य निरंतर असणार्या लोकनाथा, तू खरोखरच अत्यंत शक्तिमान आहेस. तूं गृहस्थाश्रमी मानवांचा आनि त्याच्या खर्या हितचिंतकाच्या रक्षणकर्ता आहेस. तू आकाशस्थित संरक्ष आहेस आणि सर्व आपत्तिपासून, संकटापासून तूच आमचे रक्षण करतोस.
प्रस्कण्वः काण्व ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः अग्ने विवस्वदुषसश्चित्रं राधो अमर्त्य । आ दाशुषे जातवेदो वहा त्वमद्या देवां उषर्बुधः ॥ ४०
हे अविनाशी, सनातन, सर्वज्ञ परमेश्वरा, आजच म्हनजे रोजच स्वस्वरूप जागृतीरूपी आश्चर्यकारक अद्भुत संपत्ति तू आम्हाला प्रदान कर. अध्यात्मिक ज्ञानाने निर्माण होणारी दैवी संपत्ति (सद्गुण) तुझ्या भक्तांना तू प्राप्त करून दे. अरुणोदय होताच अंधःकार ज्याप्रमाणे नष्ट होतो, त्याप्रमाणे आमच्या हृदयात प्रकट होऊन तू अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून टाक.
शंपुर्बाहस्पत्य ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः त्वं नश्चित्र ऊत्या वसो राधांसि चोदय । अस्य रायस्त्वमग्ने रथीरसि विदा गाधं तुचे तु नः ॥ ४१
हे कृपालु सर्वाधार परमेश्वरा, तू तुझ्या महान संरक्षक शक्तिमुळे अलौकिक आहेस. तू ज्ञान, शांति आणि आनंदाच्या रूपाने आम्हाला भौतिक (प्राकृतिक) आणि अध्यात्मिक संपत्ति प्रदान कर. या सर्व संपत्तिचा स्वामी आणि सारथी तूच आहेस. आमच्या संततिसाठी, वंशासाठी तू भरभराट, मानसन्मान आणि सुरक्षा प्रदान कर.
भर्ग प्रागाथ ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः त्वमित्सप्रथा अस्यग्ने त्रातरृतः कविः । त्वां विप्रासः समिधान दीदिव आ विवासन्ति वेधसः ॥ ४२
हे विश्वव्यापक, संरक्षक परमेश्वरा, फक्त धार्मिक पुण्यात्मा आणि सर्वज्ञ कविश्रेष्ठ आहेस. हे देदिप्यमान परमेश्वरा, जे रात्रंदिवस तुझी पूजा करतात, मंत्रोच्चाराने तुझी स्तुति करतात, त्यांच्यावरच तू मनापासून प्रसन्न होतोस.
भर्गः प्रागाध ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः आ नो अग्ने वयोवृधं रयिं पावक शंस्यम् । रास्वा च न उपमाते पुरुस्पृहं सुनीती सुयशस्तरम् ॥ ४३
हे पतितपावना, हे विश्वव्यापका, हे सृष्ट्निर्मात्या, तू आम्हाला प्रशंसनीय आणि आयुष्याची वृद्धी करणारी सर्वश्रेष्ठ संपत्ति प्रदान कर. ज्याची सर्व इच्छा करतात ती आत्मसाक्षात्काररूपी सर्वोत्तम संपत्ति की ज्यामुळे, जिच्याद्वारे धार्मिकतेपासून प्रतिष्ठेपर्यंत सर्व काही प्राप्त होते ती संपत्ति तू दे. (येथे ज्या संपत्तिसाठी प्रार्थना केली जात आहे ती म्हणजे चारित्र्यसंपन्नता आणि ब्रह्मचर्य ही होय) या संपत्तिमुळे दीर्घायुष्य प्राप्त होऊन जीवन ऊर्जा वाढते.
सौभरि काण्वऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः यो विश्वा दयते वसु होता मन्द्रो जनानाम् । मधोर्न पात्रा प्रथमान्यस्मै प्र स्त्ॐआ यन्त्वग्नये ॥ ४४
परमेश्वरच सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करून त्यांना प्राकृतिक आणि अध्यात्मिक अशी सर्व संपत्ति देतो. तो अत्यंत उदार असून धर्मनिष्ठांना खरा शाश्वत आनंद देतो. ज्याप्रमाणे मधाने भरलेली पात्रे वैशिष्ट्यपूर्ण खास पाहुण्यांना दिली जातात, त्याप्रमाणे या आद्य (प्राचीन) वैदिक ऋचा या सर्वश्रेष्ठ परमेश्वरास अर्पण केल्या जाव्या. पूज्य आदरणीय पाहुण्यांना मधुर मधाने भरलेले पात्र अर्पण करावे त्याप्रमाणे आम्हीही वाचेने सदैव मधुर शब्दांचाच उच्चार करावा.
पंचमी दशति वसिष्ठ ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः एना वो अग्निं नमसोर्जो नपातमा हुवे । प्रियं चेतिष्ठमरतिं स्वाध्वरं विश्वस्य दूतममृतम् ॥ ४५
अरे मानवांनो, उपासना आणि वैदिक ऋचा यांना परमेश्वरास अर्पण करून जो परमात्मा सर्व शक्तीचा मूळस्त्रोत आनेह्, संरक्ष आहे, सर्वांचा सुहृद वा परममित्र आहे, सर्वश्रेष्ठ ज्ञानी व ज्ञानदाता आहे, शुभ यज्ञाद्वारे जो प्रकाशित होत असतो, जो शाश्वत सत्याचा संदेशवाहक आणि अविनाशी श्रेष्ठ आत्मा आहे, तोच तुमच्या हितासाठी आवाहन करीत आहे.
भर्गः प्रागाध ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः शेषे वनेषु मातृषु सं त्वा मर्तास इन्धते । अतन्द्रो हव्यं वहसि हविष्कृत आदिद्देवेषु राजसि ॥ ४६
हे भगवंता, जे तपस्वी सर्वांस आदरणीय असतात आणि जे लोकांच्या अज्ञानाचा नाश करतात, अशांच्या पवित्र अंतःकरणात तू निवास करतोस. सामान्य लोकही ध्यानयोग आणि अन्य योगाभ्यासाच्या द्वारे सदैव सावध राहून त्यांच्या हृदयांत तू प्रकट व्हावेस म्हणून प्रयत्न करतात. तू भक्तांचे प्रेम आणि त्यांची शरणागति यांचा स्वीकार करतोस आणि मग ज्ञानी भक्तांच्या मध्ये प्रगट होतोस, प्रकाशित होतोस.
सौभरि काण्वऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः अदर्शि गातुवित्तमो यस्मिन्व्रतान्यादधुः । उपो षु जातमार्यस्य वर्धनमग्निं नक्षन्तु नो गिरः ॥ ४७
जो सर्वशक्तिमान स्वामी असून आपल्याला धर्मनिष्ठेचा, ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवतो, त्या परमेश्वरास मी पाहिले आहे. त्याचे दर्शन मला झाले आहे. विवेकी त्याला आपली सत्कर्मे अर्पण करतात आणि ज्यांचा ते तिरस्कार करतात ती कर्मे तर ते कधीच करीत नाहीत, मग अर्पण तरी कशी करणार ? परमेश्वरच संतमहात्म्यांना शक्ति-सामर्थ्य देऊन त्यांना अजेय बनवितो. त्याची कीर्ति, प्रतप तर सर्वत्र दिसून येत असते. संत महात्मे त्याला पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात आणि त्यांच्या मंत्रांच्या योगे (स्तुतिस्तोत्रा द्वारे) भगवम्ताची कीर्ति सर्वदून पसरते आणि त्याच्या सम्गतिने ते पवित्र होतात.
विवस्वत्पुत्रो पनुः ऋषिः - विश्वेदेव देवता - बृहती छन्दः अग्निरुक्थे पुरोहितो ग्रावाणो बर्हिरध्वरे । ऋचा यामि मरुतो ब्रह्मणस्पते देवा अवो वरेण्यम् ॥ ४८
यज्ञांत विध्वान नेता मुख्य पुरोहित बनतो आणि अशा अहिंसक (अनाक्रमक) शुभकार्यात इतर विद्वानांची पुजारी म्हणून नेमणूक केली हाते. यज्ञाला लागणारे दर्भ आदि सामुग्रीहे एकत्रित केली जाते. हे भक्तांनो, वेदांचे उत्तम ज्ञान असणार्यांमध्ये श्रेष्ठ असणार्यांनो, मी वैदिक गायनाने सर्वश्रेष्ठ ज्ञान आणि संरक्षण यांची याचना करीत आहे.
आङ्गिरस सुदीतिः पुमीढोवा ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः अग्निमीडिष्वावसे गाथाभिः शीरशोचिषम् । अग्निं राये पुरुमीढ श्रुतं नरोऽग्निः सुदीतये चर्दिः ॥ ४९
अरे मानवांनो, तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही प्रखर तेज असणार्या परमेश्वराची पवित्र स्तोत्रांनी प्रशंसा करा. हे ज्ञानी महात्म्यांनो, भौतिक आणि अध्यात्मिक संपत्ति प्रप्त व्हावी म्हणून सर्व लोक ज्याचा आश्रय घेतात, ज्याला शरण जातात, त्या प्रख्यात जगन्नायकाची स्तुति करा. परमेश्वरच, आपल्याला खरा प्रकाश प्रदान करणारा खात्रीलायक रक्षक अहे. अध्यात्मिक ज्ञानाच स्वामी तो परमेश्वर तुमच्यावर कृपा करो.
प्रस्कण्वः ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः श्रुधि श्रुत्कर्ण वह्निभिर्देवैरग्ने सयावभिः । आ सीदतु बर्हिषि मित्रो अर्यमा प्रातर्यावभिरध्वरे ॥ ५०
हे सर्व काही श्रवण करणर्या परमेश्वरा, आमच्या अत्यंत आर्ततेने केलेल्या प्रार्थना ऐकून तू प्रसन्न व्हावेस. आम्ही जेव्हां सुप्रभाती योगाभ्यास आणि भक्तीयुक्त उपासना, स्वाध्याय, पूरक-रेचक प्राणायाम आदिंचा अभ्यास करतो, त्यावेळी तू कृपा करून आमच्या हृदयांत स्थिरपणे प्रतिष्ठित रहावेस. दहा इंद्रिये व प्राणांदि वर नियंत्रण ठेवावे (प्राणायाम इत्यादिंच्या नियमित अभ्यासाशिवाय मनाची एकाग्रता होणे केवळ अशक्य आहे, म्हणूनच जो अत्यम्त कृपालु आणि सर्वशक्तिमान आहे त्या परमेश्वराच्या कृपेची याचना केली जात आहे).
सौभरिः ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः प्र दैवोदासो अग्निर्देव इन्द्रो न मज्मना । अनु मातरं पृथिवीं वि वावृते तस्थौ नाकस्य शर्मणि ॥ ५१
(१) प्रकाशमान परमेश्वराचा जो आश्रित असतो असा ज्ञानी नेता, सूर्य जसा त्याच्या सर्व शक्तिनिशी प्रकाशित होऊन पृथ्वीमातेला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे जगात सुप्रसिद्ध होतो, सर्वांना ज्ञान प्रदान करतो, आणि अंती तो जीवन्-मुक्ताचा आनंद प्राप्त करून घेतो. (२)अत्यंत तेजस्वी, विद्युल्लता आणि सूर्यालाही प्रकाशित करणाता तो परमात्मा सर्व बाजूंनी पृथ्वीमातेला व्यापून राहिलेला असून त्याचे सनातन सर्वव्यापी अस्तित्व, त्याची सत्ता सर्व दिशांना व्यापून असली तरी तो निरंतर आपल्या सच्चिदानंद स्थितीत प्रतिष्ठित असतो.
मधातिथिः ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः अध ज्मो अध वा दिवो बृहतो रोचनादधि । अया वर्धस्व तन्वा गिरा ममा जाता सुक्रतो पृण ॥ ५२
हे परमेश्वरा, तू पृथ्वी आणि हे प्रकाशमय विस्तीर्ण आकाश असा सर्व व्यापून राहिला आहेस. आमच्या सुदीर्घ प्रार्थना आणि प्रशंसक स्तुति-स्तोत्राद्वारे तुझा सर्व दिशांतून सक्षात्कार होऊ दे. हे परमेश्वरा, तू प्रसन्न हो आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर. आमच्या संततिवरही कृपा करून आमच्या वंशजांना शांति आणि वैभव प्राप्त करून दे.
विश्वामित्र ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः कायमानो वना त्वं यन्मात्ईरजगन्नपः । न तत्ते अग्ने प्रमृषे निवर्तनं यद्दूरे सन्निहाभुवः ॥ ५३
परमेश्वराचा सर्व जीवात्म्यांना उपदेश -
१) हे कर्मतत्पर जीवात्म्यांनो, देह प्राप्त झाल्यावर तुम्ही भौतिक विषयवासना आणि कर्मे यांत गढून गेला आहात. हे तुमचे खर्या उपासनेच्या भक्तीमार्गापासून दूर भलतीकडेच जाणे मला पसंत नाही, मला प्रसन्न करीत नाही. खरेतर तुम्ही प्रकृतिपासून स्पष्टपणे भिन्न असूनही या प्राकृतिक विषयासंबंधी तुमच्या आसक्तिमुळे तुम्ही जन्ममरणाच्या दुष्ट चक्रात सापडला आहात. तुम्ही नेहमी माझ्या अनुसंधानात रहा, माझ्यावर प्रेम करा आणि निष्काम भावनेने तुमची कर्तव्यकर्मे करीत रहा. २) भगवंतास उद्देशून भक्त (साधक) म्हणतो - हे परमेश्वरा, तुम्ही नेहमी तुमच्या प्रजेच्या हिताचाच विचार करता आणि त्यांनी सत्कर्मे आणि योगाभ्यास इत्यादिंच्या द्वारेच तुमच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. हे परमेश्वरा, मला तुझा विरह सहन होत नाही. करे तर तू सर्वव्यापी आहेस पण माझ्या अज्ञानामुळे मला वाटत असते की तू खूप दूर आहेस. तू कृपा करून माझ्या हृदयात प्रकट हो म्हणजे तू सर्वत्र व्यापून आहेस याबद्दल माझी खात्री होईल व मला तसा अनुभव येईल, आणि मी शांति आणि आनंद यांची गोडी चाखू शकेन (’आनंदाचे डोही आनंद तरंग’ होऊ शकेन.) कण्वः ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः नि त्वामग्ने मनुर्दधे ज्योतिर्जनाय शश्वते । दीदेथ कण्व ऋतजात उक्षितो यं नमस्यन्ति कृष्टयः ॥ ५४
हे परमेश्वरा, ज्ञनी योगी सदैव तुझ्यावर मन एकाग्र करून सर्व मानवमात्रांच्या कल्याणासाठी तुझेच ध्यान करतो. तू प्रकाशमय आहेस म्हणून सर्वजण नम्रतेने तुलाच वंदन करतात. ज्ञानी संतमहात्म्यांच्या पवित्र हृदयांत तू प्रकाशरूपाने प्रकट हो, त्यांच्या सत्याच्या आणि वैदिक ज्ञानाच्या योगे त्यांना तुझा साक्षात्कार होऊ दे. तू स्वाभाविकच आनंदघनच आहेस, त्यामुळे सर्वांना आनंद प्रदान करतोस.
प्रथमः प्रपाठक - द्वितीयार्ध - षष्ठी दशति वसिष्ठ ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः देवो वो द्रविणोदाः पूर्णां विवष्ट्वासिचम् । उद्वा सिञ्जध्वमुप वा पृणध्वमादिद्वो देव ओहते ॥ ५५
अरे मानवांनो, शक्ति आणि संपत्ति, ऐश्वर्य यांचा दाता असलेला परमेश्वर तुमच्या स्वार्थत्यागासह पूर्ण समर्पणाची आज्ञा देत आहे. तुझी सर्वकाही पूर्ण समर्पण करा, सर्वांची पूर्ण आहुति द्या, आणि पात्रे पुन्हा पूर्णपने भरून घ्या. मगच ईश्वर तुम्हाला तुमचे इच्छित फळ तात्काळ देईल. प्रत्येकाने गरजू व्यक्तींना उदारपणे मुक्त हस्ताने मदत करावयास पाहिजे व ती करताना सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहेत याची जाणीव ठेवावयास हवी. केवळ त्यायोगेच प्रसन्न होतो.
कण्व ऋषिः - ब्रह्मणस्पतिर्देवता - बृहती छन्दः प्रैतु ब्रह्मणस्पतिः प्र देव्येतु सूनृता । अच्चा वीरं नर्यं पङ्क्तिराधसं देवा यज्ञं नयन्तु नः ॥ ५६
वैदिक ज्ञानाचा स्वामी जो परमात्मा तो आमच्या जवळ येवो. दैवी आणि सर्वांना सुखविणारी वाणी आम्हांस प्राप्त व्हावी. आमच्या निःस्वार्थी सत्कर्मात, यज्ञात खरे ज्ञानी आणि विद्वान लोक आम्हाला सहाय्य करोत. ज्यायोगे समस्त लोकांचे कल्याण होईल. असे यज्ञ हे वीरतायुक्त आणि पवित्र अशा दहा इंद्रियांच्या सहाय्यानेच सिद्धिस जातात.
कण्व ऋषिः - ब्रह्मणस्पतिर्देवता - बृहती छन्दः ऊर्ध्व ऊ षु ण ऊतये तिष्ठा देवो न सविता । ऊर्ध्वो वाजस्य सनिता यदञ्जिभिर्वाघद्भिर्विह्वयामहे ॥ ५७
हे आमच्या सर्वश्रेष्ठा नायका स्वामी ! तू आमचे ज्या गोष्टी नीच आणि कृपण, पापयुक्त आणि कमीपणा आणणार्या असतील त्यांच्यापासून आमचे संरक्षण करण्यास सज्ज, सरळ ताठ उभा रहा. सूर्य ज्यापमाणे आम्हांस प्रकाश देण्यास सज्ज असतो त्याप्रमाणे तूही नेहमी दक्ष रहा. तू सदैव आमच्याबरोबरच रहा आणि आमच्यावर तुझी छत्रछाया नेहमी रहावी. ज्यावेळी आम्ही ज्ञानी भक्तांच्या आणि वैदिक ऋचांच्या, मंत्रांच्या द्वारे तुझ्या थोरवीच वर्णन करू तेव्हां तू आम्हाला सामर्थ्य द्यावेस. हे परमेश्वरा, आम्ही तुझे आवाहन करीत आहो, तुला साद घालीत आहोत. आम्ही तुझेच स्मरण व ध्यान, चिंतन करीत आहोत.
सौभरिः ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः प्र यो राये निनीषति मर्तो यस्ते वसो दाशत् । स वीरं धत्ते अग्न उक्थशंसिनं त्मना सहस्रपोषिणम् ॥ ५८
हे सर्वव्यापका परमेश्वरा, जो मनुष्य सनातन दैवी संपत्तिची, ज्ञान आणि शाश्वत शांतीची उत्कट इच्छा करतो आणि तुला सर्वस्वी शरण येतो त्याला तुझ्या कृपेने प्रतापी, वैदिक विद्येत पारंगत आणि हजारो लोकांना प्राकृतिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या तृप्त करणार्या सामर्थ्यवान पुत्राची प्राप्ती होते.
कण्व ऋषिः - ब्रह्मणस्पतिर्देवता - बृहती छन्दः प्र वो यह्वं पुरूणां विशां देवयतीनाम् । अग्निं सूक्तेभिर्वचोभिर्वृणीमहे यंसमिदन्य इन्धते ॥ ५९
आम्ही वैदिक ऋचा आणि पवित्र स्तुतिंच्याद्वारे जो सर्वश्रेष्ठ नायक आणि त्याच्या शरण आलेल्या त्याच्या सर्व दैवी संपत्तियुक्त जीवनाची इच्छा करणार्या प्रजाजनांचा स्वामी असणार्या आणि अन्य लोकही त्यांच्या हृदयात त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून प्रेरित करतात त्या परमेश्वराची प्रार्थना करतो.
उत्कील ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः अयमग्निः सुवीर्यस्येशे हि सौभगस्य । राय ईशे स्वपत्यस्य ग्ॐअत ईशे वृत्रहथानाम् ॥ ६०
हा आमचा सर्वश्रेष्ठ नायक, मोठ्या समृद्धिचा आणि वीरतायुक्त सामर्थ्याचा स्वामी असून तो सद्गुणी सांततिरूपी धन देणारा आणि गाईंची खिल्लारे आणि अध्यात्मिक ज्ञान देणारा स्वामी दाता आहे. पापयुक्त प्रवृत्ती आणि पापी यांच्याशी लढल्या जाणार्या युद्धांचाही तो स्वामी, नियंत्रक आहे.
वसिष्ठ ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः त्वमग्ने गृहपतिस्त्वं होता नो अध्वरे । त्वं पोता विश्ववार प्रचेता ताक्षि यासि च वार्यम् ॥ ६१
हे सर्वश्रेष्ठ परमेश्वरा, तूच आमच्या गृहाचा (देह अथवा विश्वाचाही) स्वामी आहेस. आमच्या यज्ञासाठी आम्हाला लागणार्या द्रव्यांचा दाताही तूच आहेस. आमची अंतःकरणे पावन करणारा सर्वज्ञ परमात्माही तूच आहेस. हे स्वामी, ज्याची प्राप्ती करून घेण्यास सर्वजण अत्यंत उत्सुक असतात तो तू स्वतः पूर्णकाम, परिपूर्ण आहेस त्यामुळे तूच आम्हा सर्वांना भौतिक आणि अध्यात्मिक सुखदायी संपत्ति प्रदान कर.
विश्वामित्र ऋषिः - अग्निर्देवता - बृहती छन्दः सखायस्त्वा ववृमहे देवं मर्तास ऊतये । अपां नपातं सुभगं सुदंससं सुप्रतूर्तिमनेहसम् ॥ ६२
आम्ही मर्त्य मानव, आविनाशी अशा परमेश्वरा, आमच्या परम सुहृद, सखा म्हणून तुझीच निवड करतो. आमचा संरक्षक म्हणून आम्ही तुझीच निवड करतो. तुझी कृपा आम्हाला अत्यंत आवश्यक वाटते. सत्कर्में तू कधीच विफल होऊ देत नाहीस. हे सकल लोकनाथा, तू अत्यंत वंद्य व पूजनीय आहेस. तुझी सर्व कर्मे उदात्त आणि निर्दोष असतात आणि तूच आम्हाला मुक्ति आणि पराक्रमाकडे घेऊन जातोस. आमचे मार्गदर्शन करतोस.
सप्तमी दशति गौतम ऋषिः - अग्निर्देवता - तृष्टुप् छन्दः आ जुहोता हविषा मर्जयध्वं नि होतारं गृहपतिं दधिध्वम् । इडस्पदे नमसा रातहव्यं सपर्यता यजतं पस्त्यानाम् ॥ ६३
ह मर्त्यजीवांनो, तुझी त्या प्रमेश्वरालाच प्रेमाने शरण जा. तोच शाश्वत शांति देणारा असून तुमच्या गृहाचा, एवढेच नव्हे तर सर्व विश्वाचा स्वामी आहे. असे करण्यानेच तुम्ही सुखी आणि पावन व्हाल. सर्व प्रकारच्या यज्ञांच्या वेळी तुम्ही त्याचाच सन्मान करा, वेदांच्या मंत्राद्वारे तुम्ही तुमच्या हृदयात त्याचेच चिंतन ध्यान करून स्तुतिंचे गायन करा. ज्याची सर्व लोक पूजा करतात, ज्याला वंदन करतात त्य आनंदघन, आनंददात्याची तुम्हीच प्रेमाने, आदराने पूजा करा.
वार्षहव्य उपस्तुत ऋषिः - अग्निर्देवता - जगतीछन्दः चित्र इच्चिशोस्तरुणस्य वक्षथो न यो मातरावन्वेति धातवे । अनूधा यदजीजनदधा चिदा ववक्षत्सद्यो महि दूत्या३ं चरन् ॥ ६४
ज्याची स्तुती सर्व लोक करतात आणि जो चिरतरुण आहे त्याची आधार देण्याची, जीवित ठेवण्याची शक्ति विलक्षण आणि आश्चर्यकनक आहे. तो शक्ति प्राप्त व्हावी यासाठी पृथ्वी आणि आकाश यावर अवलंबून नाही. तो अजन्मा आहे. या सर्व ब्रह्मांडांचा निर्माता आणि सर्व दुःखे दूर करून त्यांचे रक्षण करणारा, त्यांना आधार देणारा तोच परमात्मा, सर्व विश्वाला पवित्र वेदांच्या द्वारे शुभ (सत्य) संदेश देऊन जणुं एखाद्या श्रेष्ठ, कृपालु आणि सुखप्रद संदेशवाहकाचेच काम करीत असतो.
वार्षहव्य उपस्तुत ऋषिः - अग्निर्देवता - जगतीछन्दः इदं त एकं पर ऊ त एकं तृतीयेन ज्योतिषा सं विशस्व । संवेशनस्तन्वे३ चारुरेधि प्रियो देवानां परमे जनित्रे ॥ ६५
हे परमेश्वरा, या जगांत सूर्याच्या रूपाने सर्वप्रथम तुझ्या प्रकाशाचे प्रकटीकरण होते आणि दुसर्या क्र्मांकाने विद्युल्लता व अग्नि यांचे रूपाने प्रकाशाचे प्राकट्य होते. तू सर्वत्र समानतेने व्यापून राहिला आहेस (हरि व्यापक सर्वत्र समाना - तु.दास).तू सर्वत्र व्यापून आहेस म्हणून आमच्या देहाचे आरोग्य आणि पौरुष देणाराही तूच आहेस. जीवन्मुक्त पुरुषांना त्यांच्या जीवन्मुक्त दशेत तूच प्रिय आहेस.
वार्षहव्य उपस्तुत ऋषिः - अग्निर्देवता - जगतीछन्दः इमं स्त्ॐअमर्हते जातवेदसे रथमिव सं महेमा मनीषया । भद्रा हि नः प्रमतिरस्य संसद्यग्ने सख्ये मा रिषामा वयं तव ॥ ६६
आम्ही परमेश्वराची, सनातन परमात्म्याचीच ही स्तुति करत आहोत. तोच आदरणीय, पूज्य असून त्याचे ध्याअन्च आनंददायक आहे. ते च्यान, चिंतन यास आम्ही रथ मानतो, जो आम्ही आमच्या बुद्धिद्वारा, बुद्धिलाच सारथी बनवून चालवतो. म्हणून आमची बुद्धि पवित्र, शुभ संकल्पाने युक्त आणि दृढनिश्चयी असावी. परमेश्वराच्या संगतीत आणि त्याच्या सख्यत्वात आम्हाला दुःखे सहन करावी लागणार नाहीत; आम्ही फक्त त्याचीच आराधना, पूजा करतो.
भरद्वाज ऋषिः - वैश्वानरोऽग्नि देवता - तिष्टुप छन्दः मूर्धानं दिवो अरतिं पृथिव्या वैश्वानरमृत आ जातमग्निम् । कविं सम्राजमतिथिं जनानामासन्नाः पात्रं जनयन्त देवाः ॥ ६७
सत्याचा साक्षात्कार झालेले ज्ञानी लोक त्यांच्या हृदयात ज्याचा साक्षात्कार अनुभवतात, ज्याचे गुणवर्णन करतात तो स्वर्गाचा अधिपति, पृथ्वीपति, सर्वांना प्रिय असणारा आणि सर्वांच्या हृदयात निवास करणारा, ईश्वर सनातन नियम, सत्य आणि त्याग यांच्या द्वारेच प्रकाशात आणला जातो. तो अतिथीप्रमाणे पूज्य, सर्वव्यापी हृदयसम्राट असून त्रिकालदर्शीही आहे. तो सर्वांच्या मुखात राहतो, अर्थात् सर्व त्याचीच स्तुति करतात आणि तोच आमचा रक्षणकर्ता आहे.
भरद्वाज ऋषिः - वैश्वानरोऽग्नि देवता - तिष्टुप छन्दः वि त्वदापो न पर्वतस्य पृष्ठादुक्थेभिरग्ने जनयन्त देवाः । तं त्वा गिरः सुष्टुतयो वाजयन्त्याजिं न गिर्ववाहो जिग्युरश्वाः ॥ ६८
हे श्रेष्ठ नायका ! परवतराम्गांतून जल प्रवाहित व्हावे त्याप्रमाणे यज्ञाद्वारे ज्ञानी लोक तुझ्या कृपेनेच त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेतात. हे परमेश्वरा, वैदिक ऋचांच्या द्वारेच तुजेह् ज्ञान होते. आम्ही म्हटलेल्या ऋचा आणि स्तुतिस्तोत्रे तुझा चरणीच धाव घेतात आणि तुझीच कीर्ति वाढवितात. एखाद्या वीराला युद्धात विजय प्राप्त व्हावा म्हणून घोडे जसे त्यास रणभूमीकडे दौडत नेतात त्याप्रमाणे हे समज.
वामदेव ऋषिः - अग्नि देवता - तिष्टुप छन्दः आ वो राजानमध्वरस्य रुद्रं होतारं सत्ययजं रोदस्योः । अग्निं पुरा तनयित्नोरचित्ताद्धिरण्यरूपमवसे कृणुध्वम् ॥ ६९
जो अनाक्रमक यज्ञांचा स्वामी आहे, जो दुष्ट, पापी लोकांना पश्चात्ताप करण्यास भाग पाडतो, जो सुख आणि शाश्वत आनंदाचा दाता आहे, जो पृथ्वी आणि आकाश यांना व्यापून असतो, आणि जो सृष्टिनिर्मितिरूप आश्चर्यकारक खरा यज्ञकर्ता आहे, त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वरालाच तुझी तुझी तुमचे रक्षक व्हावे म्हणून स्वीकारा, त्यालाच शरण जा. जोपर्यंत वीज कोसळून तुझी निष्प्राण होऊन, धराशायी होत नाही, अर्थात् जोपर्यंत मृत्यू येऊन तुझी हे जग सोडून जात नाही, तोपर्यंत तुझी त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला स्वीकारा, आपला म्हणा आणि त्याला सर्वभावे शरण जा.
वसिष्ठ ऋषिः - वैश्वानरोऽग्नि देवता - त्रिष्टुप छन्दः इन्धे राजा समर्यो नमोभिर्यस्य प्रतीकमाहुतं घृतेन । नरो हव्येभिरीडते सबाध आग्निरग्रमुषसामशोचि ॥ ७०
आपल्या कीर्तिमुळे प्रकाशणारा राजा आणि या विश्वाचा स्वामी, भरभरून प्रेम करणे आणि सामर्थ्यवान असणे हा ज्याचा स्वभावच आहे त्याला आराधनेच्या द्वारी प्रसन्न केले जाते. माणसे सामान्यतः जेव्हां संकटात सापडतात तेव्हां प्रशंसा करून त्याची पूजा करतात. अरुणोदयी जेव्हा आम्ही ध्यान करतो तेव्हा आमच्या हृदयात तो सर्वश्रेष्ठ लोकनायक प्रगट होत असतो.
त्रिशिरा ऋषिः - अग्निर्देवता - त्रिष्टुप छन्दः प्र केतुना बृहता यात्यग्निरा रोदसी वृषभो रोरवीति । दिवश्चिदन्तादुपमामुदानडपामुपस्थे महिषो ववर्ध ॥ ७१
आमचा सर्वश्रेष्ठ नायक, बृहत ज्ञान घेऊन येत असतो. तो आनंदाची विष्टि करणारा असून पृथ्वी व आकाश यांना व्यापणारा आहे आणि तोच वेदांच्या द्वारे लोकांना खरे तत्त्वज्ञान प्राप्त करून देत असतो. तो परमात्मा आकाशत सुदूरही उपस्थित असतो. तसेच तो आपल्या कीर्तिने प्रकाशित असून मध्ल्या प्रदेशात, एवढेच नव्हे जलाशयाच्या अत्यंत सखोल तळातही उपस्थित असतो. एवंच तो सर्वव्यापी आहे.
वसिष्ठ ऋषिः - अग्निर्देवता - विराट् त्रिष्टुप छन्दः अग्निं नरो दीधितिभिरण्योर्हस्तच्युतं जनयत प्रशस्तम् । दूरेदृशं गृहपतिमथव्युम् ॥ ७२
ज्याप्रमाणे गृहस्थाश्रमी हाताच्ता बोटांच्या योगे दोन अरणीचे घर्षण करून अत्यंत तेजस्वी, दूर अंतरावरूनही दिसणारी अशी प्रखर अग्निची ज्योत प्रकट करतो, त्याप्रमाणेच ज्ञानी लोकही त्यांच्या अंतःकरणात धार्मिक सावधानतेने आणि भक्तीयुक्त विचाराने जो दूरदर्शी आणि त्रिकालदर्शी सर्वज्ञ परमेश्वर आहे; जो या विशाल विश्वाचे रक्षण करतो आणि जो या सर्व विश्वाला व्यापून राहिला असूनही अज्ञानी लोक ज्याला जाणत नहीत, त्याला प्रकट करतात. दोन अरणी ज्यायोगे ज्ञानाग्नि प्रकट करतो त्याप्रमाणे दोन अरणी म्हणजे आपला देह आणि ॐकाराचा ध्यानांत केलेला उच्चार, या होत. (स्वदेहमरणिं कृत्वा, प्रणवं चोत्तररणिम् । ध्याननिर्मथनाभासाद् देवं पश्येन्निगूढवत् ॥ श्वेता० १.१४)
अष्टमी दशति बुधगविष्ठिरौ ऋषी - अग्निर्देवता - त्रिष्टुप् छन्दः अबोध्यग्निः समिधा जनानां प्रति धेनुमिवायतीमुषासम् । यह्वा इव प्र वयामुज्जिहानाः प्र भानवः सस्रते नाकमच्च ॥ ७३
ज्याप्रमाणे लोकांच्या इन्धनाच्यायोगे, दूध देणार्या गाईप्रमाणे येणार्या उषःकालापर्यंत, अग्नी प्रज्वलित ठेवला जातो आणि नुकत्याच उगवलेल्या वृक्षांव्ना वरवर नवीन फांद्या फुटतात, किंवा पक्षांचे थवे गगनांत भरारी घेतात; ज्याप्रमाणे त्या अग्नीच्या ज्वाला स्वर्गाच्या गुहेत चढत जातात, त्याप्रमाणेच उषःकाली प्राणायामादिंच्या अभ्यासाच्याद्वारे (या इंधनाच्या द्वारे) हृदयात अध्यात्मिक दैवी अग्नि, अर्थात् ज्ञानाग्नि प्रज्वलित केला जातो. सूर्यकिरणांप्रमाणे ज्यांचे तेन असते असे थोर महात्मे सर्वव्यापी परमेश्वराचे ध्यान करून त्याची प्राप्ती करून घेतात आणि पूर्ण आनंदात मग्न होतात.
वत्सप्रिर्ऋषिः - अग्निर्देवता - त्रिष्टुप् छन्दः प्र भूर्जयन्तं महां विपोधां मूरैरमूरं पुरां दर्माणम् । नयन्तं गीर्भिर्वना धियं धा हरिश्मश्रुं न वार्मणा धनर्चिम् ॥ ७४
हे मानवांनो जो सर्व विश्वाचे जीवन आहे, जो सर्वांना जिंकतो, ज्ञानी साधुलोकांचे जो रक्षण करतो आणि मूर्खांच्या देहाचा, जो स्वतः ज्ञानमय असल्याने, नाश करतो, आणि जो आपल्या धार्मिकतेच्या मार्गावर वाट दाखवतो, ज्याची वैदिक मंत्रांद्वारे, ऋछांद्वारे आराधना केली जाते; जो प्रामाणिकपणे श्रद्धा आणि भक्ती या आयुधांसह त्याची स्तुती केली असतां सूर्याप्रमाणे आत्मप्रकाश देऊन भक्तांचे रक्षण करतो, त्या परमेश्वराचेच तुम्ही ध्यान करा आणि तुमची सर्व कर्मे त्यालाच अर्पण करून कर्मबंधनातून मुक्त व्हा.
भरद्वाज ऋषिः - पूषादेवता - त्रिष्टुप छन्दः शुक्रं ते अन्यद्यजतं ते अन्यद्विषुरूपे अहनी द्यौरिवासि । विश्वा हि माया अवसि स्वधावन्भद्रा ते पूषन्निह रातिरस्तु ॥ ७५
हे परमेश्वरा, हे जगदाधारा, तुझे एक रूप अद्भुत तेजाने परिपूर्ण आहे, तर दुसरे रूप शान्त आणि आराधना करण्यास योग्य आहे. ही दोन्ही रूपे म्हणजे तुझ्या दोन भिन्न उपाधि आहेत. दिवस आणि रात्री प्रमाणे. सर्वांना प्रकाश देणारा तू जणुं सूर्यच आहेस. तू स्वतंत्र आहेस आणि तूंच ज्ञानाच्या उच्च भूमिकेवर सर्व भक्तांना नियुक्त करतोस. या जगांत तुझी उदारताच आमच्या सुखाचा, शाश्वत आनंदाचा स्त्रोत बनो. तुझ्या कृपालु उदार स्वभावामुळे आम्हाला सुखाची, शाश्वत आनंदाची प्राप्ती होवो.
विश्वामित्र ऋषिः - अग्निर्देवता - त्रिष्टुप छन्दः इडामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध । स्यान्नः सूनुस्तनयो विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ७६
हे स्वयंप्रकाश श्रेष्ठ जगन्नायका ! जो तुझा भक्त जगात विविध सत्कर्मे करण्यात गढलेला असतो, त्याला तू विचारशील सर्वोत्तम वाणी, सत्याचा पाठपुरावा करण्याची शक्ति आणि सनातन ज्ञान द्यावेस म्हणजे ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रसार करणारे प्रख्यात, पौरुषयुक्त आणि विजयी पुत्र जन्मास येतील. हे लोकनायका ! तुझे आनंददायक ज्ञान आमच्या ठिकाणी प्रतिष्ठित होवो.
वत्सप्रिर्ऋषिः - अग्निर्देवता - त्रिष्टुप् छन्दः प्र होता जातो महान्नभोविन्नृषद्मा सीददपां विवर्ते । दधद्यो धायी सुते वयांसि यन्ता वसूनि विधते तनूपाः ॥ ७७
परमेश्वर हाच सुख, आनंद आणि शांतिचा सर्वश्रेष्ठ आणि प्रसिद्ध दाता आहे. तो गगनास गवसणी घालणारा, आणि मध्यभागीही सर्व व्यापून असणारा असून सर्व मानवांच्या हृदयांत तोच राहतो. तो सर्वाधार आम्हाला अन्नपाणी आणि दीर्घायुष्य देवो. आपल्या भक्तांच्या देहांचे रक्षण करणारा तोच असून तोच त्यांना ज्ञान, दैवी संपत्ति आणि आनंद देत असतो.
वसिष्ठ ऋषिः - अग्निर्देवता - त्रिष्टुप् छन्दः प्र सम्राजमसुरस्य प्रश्स्तं पुंसः कृष्टीनामनुमाद्यस्य । इन्द्रस्येव प्र तवसस्कृतानि वन्दद्वारा वन्दमाना विवष्टु ॥ ७८
(१) दुसर्या लोकांचे हित साधण्यात ज्यांना आनंद वाटतो त्या आदरणीय वीरतायुक्त ज्ञानी माणसांची थोरवी, त्यांचे तेज, प्रताप जाणून घ्यावा. जे सूर्याप्रमाणे तेजस्वी असतात आणि सर्वांचे हित करतात त्या पराक्रमी व्यक्तींची स्तुतियोग्य अशी कर्मे प्रत्येकाने स्तुतिद्वारे जाणून घेण्याची इच्छा करावयास हवी.
(२) सर्वश्रेष्ठ पराक्रमा माणसांनी आणि सामान्य व्यक्तींनीही स्तुति करण्यासजो युग्य आहे, त्या परमेश्वराची कीर्ति वर्णन करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्याच्या पराक्रमी लीला या सूर्याप्रमाणे प्रत्येकास आदरणीय आणि अनुकरणीय आहेत. विश्वामित्र ऋषिः - अग्निर्देवता - त्रिष्टुप छन्दः अरण्योर्निहितो जातवेदा गर्भ इवेत्सुभृतो गर्भिणीभिः । दिवेदिव ईड्यो जागृवद्भिर्हविष्मद्भिर्मनुष्येभिरग्निः ॥ ७९
दोन लाकडांच्या ओंडक्यात ज्याप्रमाणे अग्नि गुप्त असतो आणि स्त्रियांच्या गर्भाशयात जसा पूर्ण वाढ झालेला गर्भ गुप्त असतो, त्याप्रमाणे सर्वव्यापक आणि सर्वज्ञ परमात्मा जगांतील सर्व वस्तूंमध्ये आणि सर्व प्राणिमात्रांत गुप्तपणे वास करीत असतो. सदा जागरूप असण्यार्या, सावध आणि दानशूर भक्तांकडून प्रत्येक दिवशी त्या सर्वश्रेष्ठ जगन्नायकाची उपासना व्हावयास हवी.
पायुर्ऋषिः - रक्षोहाग्निर्देवता - त्रिष्टुप छन्दः सनादग्ने मृणसि यातुधानान्न त्वा रक्षांसि पृतनासु जिग्युः । अनु दह सहमूरान्कयादो मा ते हेत्या मुक्षत दैव्यायाः ॥ ८०
हे सर्वश्रेष्ठ जगन्नायका ! प्राचीन काळापासून तूं दुष्ट राक्षसांचा, दुष्प्रवृत्तींचा वध करीत आला आहेस. युद्धात पातके किंवा दुष्ट प्रवृत्ति आणि दुष्ट व्यक्ती तुझा पधीच पराभव करू शकत नाहीत. हे परमेश्वरा, मांस भक्षण करणारे मूर्ख आणि दुष्ट लोक तुझ्या दैवी शस्त्रास्त्रांपासून कधीही सुटूं नयेत. त्या शस्त्रांनी त्यांचा नाश व्हावा. (वेदांत मांसभक्षण निषिद्ध आहे याचे उदाहरण)
नवमी दशति गय अत्रेय ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः अग्न ओजिष्ठमा भर द्युम्नमस्मभ्यमध्रिगो । प्र नो राये पनीयसे रत्सि वाजाय पन्थाम् ॥ ८१
हे सर्वश्रेष्ठ लोकनायका, तुझ्याकदे यावयाच्या मार्गावर आम्हाला कुठल्याही अडथळ्यातवाचून सर्वोत्तम प्रखर तेज प्रदान कर. जो आत्मसाक्षात्काररूपी संपत्ति आणि शक्ती प्राप्त करून देतो तो मार्ग तू आमच्यासाठी निर्माण कर.
वामदेव ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः यदि वीरो अनु ष्यादग्निमिन्धीत मर्त्यः । आजुह्वद्धव्यमानुषक्शर्म भक्षीत दैव्यम् ॥ ८२
जर एखादा उत्साही मनुष्य परमात्म्याची रोजच्या रोज दैवी शक्ती आणि सत्कर्मेरूपी पवित्र देणग्या देऊन सेवा करील, आणि त्याच्या चरणी संपूर्ण शरणागति स्वीकारेल, तर तो वीर पुरुष बनतो आणि दैवी, शाश्वत आनंद व शांति यांचा उपभोग घेतो.
भरद्वाज ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः त्वेषस्ते धूम ऋण्वति दिवि सं च्चुक्र आततः । सूरो न हि द्युता त्वं कृपा पावक रोचसे ॥ ८३
तुझी थरकांप उडविणारी तेजस्वी शक्ति खूच उंच जाते आणि आकाशांत दूरवर पसरते. पतितपावना, भक्तांच्या हृदयांत तू सूर्याप्रमाणे तुझ्या प्रखर तेजाने आणि प्रतापाने प्रकाशमान असतोस.
भरद्वाज ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः त्वं हि क्षैतवद्यशोऽग्ने मित्रो न पत्यसे । त्वं विचर्षणे श्रवो वसो पुष्टिं न पुष्यसि ॥ ८४
हे सर्वश्रेष्ठ नायका ! तू एखाद्या परम सुहृदाप्रमाणे स्वयंप्रकाशाने तळपत असतोस आणि आम्हाला अन्न आणि भौतिक व अध्यात्मिक संपत्ति देतोस. हे विश्वाच्या सर्वज्ञ निर्मात्या, ऊर्जा पुरविणार्या सामुग्रीप्रमाणे तू आमचे ज्ञान आणि कीर्ति वाढवीत असतोस.
भरद्वाज ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः प्रातरग्निः पुरुप्रियो विष स्तवेतातिथिः । विश्वे यस्मिन्नमर्त्ये हव्यं मर्तास इन्धते ॥ ८५
अरुणोदयाला सर्वा ज्याच्यावर अत्यंत प्रेम करतात आणि जो अतिथीप्रमाणे पूज्य आहे त्याची कीर्ति गायली जावी. सर्व मर्त्य आपल्या सत्कर्मांची आहुति त्या अविनाशी परमात्म्यालाच अर्पण करतात.
मुक्तवाहाद्वित ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः यद्वाहिष्ठं तदग्नये बृहदर्च विभावसो । महिषीव त्वद्रयिस्त्वद्वाजा उदीरते ॥ ८६
हे तेजरूपी प्रकाशांनी समृद्ध असणार्या मानवांनो, त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याची उत्तम प्रकारे पूजा करा आणि त्यालाच तुमचे जीवन समर्पित करा (रामचरणी जीवन हे वाहिले) कारण विशाल अशा पृथ्वीपासून अन्न उपजते त्याप्रमाणे त्याच्यापासूनच अमर्याद संपत्ति आणि शक्ती यांची वृद्धि होत असते.
गोपवन ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः विशोविशो वो अतिथिं वाजयन्तः पुरुप्रियम् । अग्निं वो दुर्यं वचः स्तुषे शूषस्य मन्मभिः ॥ ८७
त्या सर्वश्रेष्ठ अतिथीप्रमाणे प्रिय व पूज्य आणि सर्व प्रजेला व्यापून असणार्या परमात्म्याचीच कीर्ति आम्ही, आम्हाला सामर्थ्य लाभावे म्हणून वर्णन करतो.
आत्रेयः पुरुर्ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः बृहद्वयो हि भानवेऽर्चा देवायाग्नये । यं मित्रं न प्रशस्तये मर्तासो दधिरे पुरः ॥ ८८
ज्याच्यावर ज्ञानी महात्मे आपली अंतर्दृष्टि, एखाद्या खर्या मित्राप्रमाणे खिळवून ठेवतात व ज्याच्यामुळे त्यांचे हित साध्य होते त्या शांति आणि आनंद प्रदान करणार्या कीर्तिमान परमेश्वराचीच तुझी स्तुति करा.
आत्रेयः पुरुर्ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः अगन्म वृत्रहन्तमं ज्येष्ठमग्निमानवम् । य स्म श्रुतर्वन्नार्क्षे बृहदनीक इध्यते ॥ ८९
सर्व मानवांचा परमसुहृद, पातकांचे निर्दालन करणार्या आमच्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराकडेच आम्ही येतो. तो महान शक्तिमान तेजस्वी असल्याने अखिल ब्रह्मांडात आणि तारकांत प्रकाशत असतो. तोच मानवजातीचे सर्वोत्तम हित करणारा मित्र आहे.
वामदेव ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः जातः परेण धर्मणा यत्सवृद्भिः सहाभुवः । पिता यत्कश्यपस्याग्निः श्रद्धा माता मनुः कविः ॥ ९०
हे परमेश्वरा, तू तुझ्या आश्चर्यकारक शक्तिसह सदा उपस्थित असतोस आणि म्हणून तुझे कायदे प्रकट करतोस. हा सर्वश्रेष्ठ लोकनायक, ज्यायाचे रक्षण करणारा, सत्याचा कैवार घेणारा, त्रिकालदर्शी असून ज्ञानी लोकांचा तोच पिता आहे. श्रद्धा आणि सत्याचे कुठल्याही परिस्थितीत रक्षण करण्याची शक्ती ही त्याची माता आहे.
अग्निर्ऋषिः - विश्वेदेवता - अनुष्टुप छन्दः स्ॐअं राजानं वरुणमग्निमन्वारभामहे । आदित्यं विष्णुं सूर्यं ब्रह्मानं च बृहस्पतिम् ॥ ९१
आम्ही या विश्वाचा जो निर्माता आहे, जो सर्व दुःखांचा विनाशक म्हणून स्वीकारण्यास अत्यंत योग्य असून, सर्वश्रेष्ठ जगन्नायक, अविनाशी, सर्वव्यापी, प्रकाशक आणि ज्ञानाचा आणि विशाल विश्वाचा रक्षणकर्ता आहे, त्याच्यावर दृढ विश्वास ठेव्तो.
वामदेव ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः इत एत उदारुहन्दिवः पृष्ठान्या रुहन् । प्र भूर्जयो यथा पथोद्यामङ्गिरसो ययुः ॥ ९२
पृथ्वीवरील राजे ज्याप्रमाणे युद्धात विजयी झाल्यावर परोपकाराच्या मार्गाचे अनुकरण करतात, त्याप्रमाणे तेजस्वी योगीही प्रकाशमय प्रदेशांत, उच्च प्रकाशमय भूमिकेस प्राप्त करून शेवटी मुक्ती प्राप्त करतात.
वामदेव ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः राये अग्ने महे त्वा दानाय समिधीमहि । ईडिष्वा हि महे वृषं द्यावा होत्राय पृथिवी ॥ ९३
हे आनंदाची आणि शांतीची वृष्टि करणार्या परमेश्वरा, आम्ही आमच्या हृदयात तुला प्रगट करतो म्हणजे तू आम्हाला कदाचित् ज्ञानाची संपत्ति प्रदान करशील. आम्ही तुझ्या चरणी स्वतःला वाहून घेत तुला सर्वस्वी शरण आलो आहोत. महायज्ञांत ही पृथ्वी, हे आकाश तसेच आमचे श्वास या तुला अर्पण केलेले बली किंवा नैवेद्यच आहेत. अरे मानवा तू कुठल्याही प्रकारची शंका मनांत न ठेवतां तत्परतेने आणि अंतःकरणपूर्वक त्या परमेश्वराची आराधना कर.
सोमाहुतिर्ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः दधन्वे वा यदीमनु वोचद्ब्रह्मेति वेरु तत् । परि विश्वानि काव्या नेमिश्चक्रमिवाभुवत् ॥ ९४
योगी ज्याचे ध्यान करतात आणि ते वैदिक ऋचांनी ज्याची स्तुति करतात, तो सर्वज्ञ त्रिकालदर्शी स्वामी म्हणजेच हा परमेश्वर होय. नेमि जशी चाकाला धरून ठेवते त्याप्रमाणे तो परमेश्वर सर्व ज्ञान त्याच्या मुठीत ठेवतो.
पायुर्ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः प्रत्यग्ने हरसा हरः शृणाहि विश्वतस्परि । यातुधानस्य रक्षसो बलं न्युब्जवीर्यम् ॥ ९५
हे लोकनायका ! दुष्ट आणि प्रजापीडक शासकाच्या शक्तीचा सर्व बाजूंनी तुझ्या तेजाने पराक्रमाने नाश कर. राक्षसांच्या शक्तीचा आणि पराक्रमाचाही नाश कर. हे भगवंतासही उचित् आहे (भगवंतांनीही असेच करावे).
प्रस्कणव ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः त्वमग्ने वसूंरिह रुद्रां आदित्यां उत । यजा स्वध्वरं जनं मनुजातं घृतप्रुषम् ॥ ९६
हे नायका, येथे एकत्र जमा आणि जे २४ वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करतात, त्या वसूंना, ज्यांनी ३६ वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन केले आहे, त्या रुद्रांना, आणि ज्यांनी ४८ वर्षे ब्रह्मचर्याचे पालन केले त्या आदित्यांना, आणि जे सूर्याप्रमाणे विश्वात प्रकाशतात त्यांचा आदरसत्कार करा. त्यांना मान द्या. जे यज्ञ करतात, अनाक्रमक असतात. जे ज्ञानी पुरुषांचे विवेकी, पराक्रमी पुत्र असतील त्यांची संगति करावी. मानवतेचे जे ज्ञानी दाते, हितैषी आहेत त्यांची संगति प्राप्त व्हावी यासाठी आम्हाला सक्षम अशी ही प्रार्थना परमेश्वरालाही केली आहे.
सामवेद - द्वितीय प्रपाठके - प्रथमार्ध प्रथमा दशति दीर्घतमा ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः पुरु त्वा दाशिवां वोचेऽरिरग्ने तव स्विदा । तोदस्येव शरण आ महस्य ॥ ९७
हे सर्वश्रेष्ठ जगन्नायका, मी तुझा स्वामीनिष्ठ सेवक फक्त तुझेच आवाहन करतो. तुलाच भक्तियुक्त विचार आणि सत्कर्मे अर्पण करतो. सेवक जसा त्याच्या धन्याच्या घराचा आश्रय घेतो किंवा विद्यार्थी जसे त्याच्या गुरूच्या घराचा, गुरुकुलाचा आश्रय घेतो, त्याप्रमाणे हे भगवंना, मी तुझाच आश्रय घेतो.
विश्वामित्र ऋषिः - अग्निर्देवता - अनुष्टुप छन्दः प्र होत्रे पूर्व्यं वचोऽग्नये भरता बृहत् । विपां ज्योतींषि बिभ्रते न वेधसे ॥ ९८
जो तुम्हाला शांति आणि आनंद देतो त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वरालाच तुमच्याजवळ जे सर्वोत्तम असेल ते, तुमची उन्नत वैदिक वाणी अर्पण करा. जो सर्व जगाचा संस्थापक आहे आणि ज्ञानी लोकांचा प्रकाश आणि तेज धारण करतो, त्यालाच सर्व अर्पण करा.
गौतम ऋषिः - अग्निर्देवता - उष्णिक् छन्दः अग्ने वाजस्य ग्ॐअत ईशानः सहसो यहो । अस्मे धेहि जातवेदो महि श्रवः ॥ ९९
हे सर्वश्रेष्ठ परमेश्वरा, अध्यात्मिक शक्तीच्याद्वारे आमच्या ठिकाणी प्रगट हो. वैदिक ऋचांच्यामध्ये जे ज्ञान आणि जी शक्ति साठवलेली असते त्याचा तूच स्वामी आहेस. हे सर्वव्यापक सर्वज्ञ परमेश्वरा, तू आम्हाला ज्ञान आणि महान यशकीर्ति प्रदान कर.
विश्वामित्र ऋषिः - अग्निर्देवता - उष्णिक् छंदः अग्ने यजिष्ठो अध्वरे देवां देवयते यज । होता मन्द्रो वि राजस्यति स्रिधः ॥ १००
हे परमपूज्य परम आदरणीय परमेश्वरा, तूच शांति आणि आनंद देणारा आहेत. ज्या मनुष्यास दैवी गुण व दैवी सत्कर्मे करण्याची इच्छा असेल त्या दैवी संपत्तिस धारण करण्याची पात्रता दे. आमच्या अंतरांतील शत्रूंना तुझा पराक्रम दूर पिटाळून लावतो.
त्रित ऋषिः - अग्निर्देवता - उष्णिक् छन्दः जज्ञानः सप्त मातृभिर्मेधामाशासत श्रिये । अयं ध्रुवो रयीणां चिकेतदा ॥ १०१
योगाच्या सात विभागांचा, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान यांचा नियमित अभ्यास केल्याने परमात्म्याचा साक्षात्कार होतो. तो आपले हित व्हावे म्हणून आपल्यावर शासन करतो आणि तोच संपत्ति, वैभव आणि विपुलता यांचा उदार दाता आहे.
इरिमिठिर्ऋषिः - अदितिर्देवता - उष्णिक् छंदः उत स्या नो दिवा मतिरदितिरूत्यागमत् । सा शन्ताता मयस्करदप स्रिधः ॥ १०२
आम्ही प्रार्थना अक्रतो. अविनाशी वैवी ज्ञान, अथवा दैवी सर्वज्ञ माता आमचे जवळ येवो आणि आमचे रक्षण करून आम्हाला प्रकाश देवो. ती दैवीमाता (जगज्जननी) परम कृपेने आमचे कल्याण करो, ज्यायोगे आम्हाला शांति मिळून आनच्या अंतरातील आणि बाहेरील शत्रूंना पिटाळून लावील. (काम, क्रोध, लोभ, अज्ञान, अहंकार आणि मत्सर हे आंतरिक शत्रू आहेत).
विश्वमना ऋषिः - अग्निर्देवता - उष्णिक् छन्दः ईडिष्वा हि प्रतीव्या३ं यजस्व जातवेदसम् । चरिष्णुधूममगृभीतशोचिषम् ॥ १०३
तुम्ही त्या सर्वव्यापक, सर्वत्र, सर्वांना व्यापून असणार्या आणि हलवून सोडणार्या, आणि ज्याच्या पराक्रमाण्ची, तेजाची कोणी बरोबरी करू शकत नाही अशा अतुलनीय परमेश्वराची आराधना पूजा करा. तुम्ही स्वतःला त्याच्या चरणी सर्वस्वी समर्पण करा. सर्वस्वी त्यालाच शरण जा.
विश्वमना ऋषिः - अग्निर्देवता - उष्णिक् छन्दः न तस्य मायया च न रिपुरीशीत मर्त्यः । यो अग्नये ददाश हव्यदातये ॥ १०४
जो सर्वश्रेष्ठ परमात्म्यास, जो सर्वश्रेष्ठ लोकनायक, ज्ञान आणि सर्व इच्छित वस्तू देणारा दाता आहे, त्यास स्वतःला सर्वस्वी अमर्पण अक्रतो त्या भक्तावर आपल्या बुद्धिचातुर्याने अथवा धूर्तपणाने कोणताही शत्रू मात करू शकत नाही.
भरद्वाज ऋजिश्वा ऋषिः - अग्निर्देवता - उष्णिक् छन्दः अप त्यं वृजिनं रिपुं स्तेनमग्ने दुराध्यम् । दविष्ठमस्य सत्पते कृधी सुगम् ॥ १०५
हे सर्वश्रेष्ठ लोकनायका ! तू दुष्ट शत्रूला, दुष्ट हृदयी चोराला दूर दूर हाकलून दे. हे न्यायी परमेश्वरा, आम्हाला आनंदाचा सुगम मार्ग दाखव, आणि दुष्टही चांगल्या मार्गाचे अनुसरण करतील अशी कृपा कर. (जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ॥ पसायदान, ज्ञानेश्वरी)
विश्वमना ऋषिः - अग्निर्देवता - उष्णिक् छन्दः श्रुष्ट्यग्ने नवस्य मे स्त्ॐअस्य वीर विश्पते । नि मायिनस्तपसा रक्षसो दह ॥ १०६
हे मानवांच्या पराक्रमी परमेश्वरा ! मी केलेली ही अपूर्व यथायोग्य स्तुति ऐकून तू सर्व कपटी धूर्त ठगांचा नाश कर, त्यांना तुझ्या पराक्रमाने, तेजाने भस्म करून टाक.
द्वितीता दशति सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः प्र मंहिष्ठाय गायत ऋताव्ने बृहते शुक्रशोचिषे । उपस्तुतासो अग्नये ॥ १०७
अरे भक्तांनो, तुम्ही सर्वश्रेष्ठ जगन्नायकाची परम पवित्र, अत्यंत उदार, सत्स्वरूप आणि देदिप्यमान तेजाने प्राभावशाली असनार्या परमेश्वराची कीर्ति गा.
सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः प्र सो अग्ने तवोतिभिः सुवीराभिस्तरति वाजकर्मभिः । यस्य त्वं सख्यमाविथ ॥ १०८
हे सर्वश्रेष्ठ जगन्नायका, जो तुझा मित्र बनतो, त्याची तुझ्या संरक्षणाखाली भरभराट होते; त्याला ज्ञान प्रेम प्राप्त होते; ज्यायोगे तो श्रेष्ठ वीर आणि महान कृत्यें करण्यास सक्षम असा ज्ञानी होतो.
सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः तं गूर्धया स्वर्णरं देवासो देवमरतिं दधन्विरे । देवत्रा हव्यमूहिषे ॥ १०९
अरे मानवा, ज्याला सर्व ज्ञानी या विश्वाचा त्रिकालदर्शी नाथ आणि शांति देणारा म्हणून जाणून त्याच्याजवळ जातात त्या सर्वलोकनाथाचीच तू आराधना, पूजा कर.
सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः मा नो हृणीथा अतिथिं वसुरग्निः पुरुप्रशस्त एशः । यः सुहोता स्वध्वरः ॥ ११०
जो आपला सर्वश्रेष्ठ नायक असून अतिथीप्रमाणे अत्यंत पूज्य आहे, जो सर्वांना आश्रय देतो, आणि ज्याची स्तुति सर्व ज्ञानी लोक करतात, जो आनंदाचा सर्वश्रेष्ठ दाता असून अत्यंत प्रेमळ, आपला प्रियतम आहे, त्याचा कधी अपमान करू नका, त्याला राग येऊ देऊ नका.
सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः भद्रो नो अग्निराहुतो भद्रा रातिः सुभग भद्रो अध्वरः । भद्रा उत प्रशस्तयः ॥ १११
तो सर्वश्रेष्ठ लोकनायक त्याची यथायोग्य प्रकारे आराधना केल्यावर आपल्याल आनंद आणि धन्यता प्राप्त करून देवो आपली दानशूरता आणि त्याग, आपल्याला धन्यता, मोक्ष प्राप्त करून देवो.
सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः यजिष्ठं त्वा ववृमहे देवं देवत्रा होतारममर्त्यम् । अस्य यज्ञस्य सुक्रतुम् ॥ ११२
आम्ही आराधना करण्यासाठी प्रियतम परमेश्वर, सर्व प्रकाशक, विश्वनिर्माता, अविनाशी आणि सर्वेश्वर अशा परमेश्वराची निवड करतो. त्याची कृपा हे आमच्या प्रत्येक अधःपतनापासून आम्हाला वाचवणारे कवच आहे.
सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः तदग्ने द्युम्नमा भर यत्सासाहा सदने कं चिदत्रिणम् । मन्युं जनस्य दूढ्यम् ॥ ११३
हे अग्ने ! ते तेजस्वी यश आम्हाला दे जे यज्ञामध्ये अथवा राहण्याच्या ठिकाणी कोणत्याही खादाड शत्रूला पराभूत करू शकेल; तसेच दुष्ट व लोकांच्या क्रोधालाही दूर करून शकेल.
सौभरिर्ऋषिः - अग्निर्देवता - ककुप् छंदः यद्वा उ विश्पतिः शितः सुप्रीतो मनुषो विशे । विश्वेदग्निः प्रति रक्षांसि सेधति ॥ ११४
(१) ज्यावेळी आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुषांच्या अंतर्यामी असलेला परमेश्वर प्रसन्न होतो तेव्हां तो श्रेष्ठ जगन्नायक त्या विवेकी पुरुषापासून तो सर्व दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावतो.
(२) जेव्हा एखादा अग्निप्रमाणे अत्यंत तेजस्वी पराक्रमी राजा आपल्या प्रेजेवर खूप प्रसन्न होतो तेव्हा तो सर्व दुष्ट व्यतिंना त्याच्या राज्यातून हाकलून लावतो. इति आग्नेयकाण्डे प्रथमोध्यायः ॥ १ ॥ |