PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त २१ ते ३०

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २१ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


आ या॒त्विन्द्रोऽ॑वस॒ उप॑ न इ॒ह स्तु॒तः स॑ध॒माद॑स्तु॒ शूरः॑ ।
वा॒वृ॒धा॒नस्तवि॑षी॒र्यस्य॑ पू॒र्वीर्द्यौर्न क्ष॒त्रम॒भिभू॑ति॒ पुष्या॑त् ॥ १ ॥

आ यातु इंद्रः अवस उप नः इह स्तुतः साधऽमात् अस्तु शूरः ।
ववृधानः तविषीः यस्य पूर्वीः द्यौः न क्षत्रं अभिऽभूति पुष्यात् ॥ १ ॥

भगवान इंद्र आमच्यावर अनुग्रह करण्याकरितां आमच्याकडे आगमन करो. भक्तांनी स्तवन केल्यावर तो शूरवीर येथें अय्ज्ञांत सर्वांबरोबरच सोमरसानें आनंदमग्न होवो. तो निरंतर उल्लसितच आहे. आणि त्याची धडाडीही अतिशय, तेव्हां, आकाशाप्रमाणे सर्वांनाच भारी अशा त्याच्या राजसत्तेचा उत्कर्ष हा होणारच. ॥ १ ॥


तस्येदि॒ह स्त॑वथ॒ वृष्ण्या॑नि तुविद्यु॒म्नस्य॑ तुवि॒राध॑सो॒ नॄन् ।
यस्य॒ क्रतु॑र्विद॒थ्यो३॑न स॒म्राट् सा॒ह्वाँ तरु॑त्रो अ॒भ्यस्ति॑ कृ॒ष्टीः ॥ २ ॥

तस्य इत् इह स्तवथ वृष्ण्यानि तुविऽद्युम्नस्य तुविऽराधसः नॄन् ।
यस्य क्रतुः विदथ्यः न संऽराट् साह्वान् तरुत्रः अभि अस्ति कृष्टीः ॥ २ ॥

ज्याची तेजस्वीता अप्रार, आणि शूर पुरुषांवर ज्याची कृपाही तशीच निःसीम असते, आणि धर्मसभेमध्यें अधिष्ठित झालेल्या चक्रवर्ति राजाप्रमाणें ज्याची कर्तृत्वशक्ति दुष्टांवर विजय मिळवून भक्तांना संकटांच्या पार नेते, आणि प्राणिमात्रांवर आपले अचल अधिपत्य चालवित, अशा त्या इंद्राच्याच महापराक्रमांची येथें, ह्या यज्ञां, महती वर्णन करा ॥ २ ॥


आ या॒त्विन्द्रो॑ दि॒व आ पृ॑थि॒व्या म॒क्षू स॑मु॒द्रादु॒त वा॒ पुरी॑षात् ।
स्वर्णरा॒दव॑से नो म॒रुत्वा॑न् परा॒वतो॑ वा॒ सद॑नादृ॒तस्य॑ ॥ ३ ॥

आ यातु इंद्रः दिवः आ पृथिव्या मक्षू समुद्रात् उत वा पुरीषात् ।
स्वःऽनरात् अवसे नः मरुत्वान् पराऽवतः वा सदनात् ऋतस्य ॥ ३ ॥

इंद्र् द्युलोकांतून, पृथिवीपासून, अंतरिक्षांतून अथवा महा सागरांतून अवतीर्ण होऊन आमच्याकडे धांव घेवो. आकाशस्थ ज्योतिंचा नाथ जो सूर्य त्याच्यापासून किंवा अत्यंत दूरचा जो देव लोक त्याच्यापासून, अथवा सनातन सत्यलोकीं जरी तो सुखासीन असला तरी तेथून सुद्धां तो मरुत्परिवेष्टित भगवान आमच्यावर अनुग्रह करण्याकरितां आम्हांकडे त्वरीत येवो. ॥ ३ ॥


स्थू॒रस्य॑ रा॒यो बृ॑ह॒तो य ईशे॒ तमु॑ ष्टवाम वि॒दथे॒ष्विन्द्र॑म् ।
यो वा॒युना॒ जय॑ति॒ गोम॑तीषु॒ प्र धृ॑ष्णु॒या नय॑ति॒ वस्यो॒ अच्छ॑ ॥ ४ ॥

स्थूरस्य रायः बृहतः यः ईशे तं ऊं इति स्तवाम विदथेषु इंद्रं ।
यः वायुना जयति गोऽमतीषु प्र धृष्णुऽया नयति वस्यः अच्छ ॥ ४ ॥

अचल आणि श्रेष्ठ अशा ऐश्वर्याचा जो स्वामी त्या इंद्राचेंच आम्ही आमच्या यज्ञसभेमध्यें यशस्तवन करूं. प्रकाश धेनूंकरितां केलेल्या संग्रामांत तो वायूसह विजयी होतो आणि धडक्यासरशी भक्तांना अभिलषणीय संपत्तिकडे नेऊन पोहोंचवितो. ॥ ४ ॥


उप॒ यो नमो॒ नम॑सि स्तभा॒यन्निय॑र्ति॒ वाचं॑ ज॒नय॒न्यज॑ध्यै ।
ऋ॒ञ्ज॒सा॒नः पु॑रु॒वार॑ उ॒क्थैरेन्द्रं॑ कृण्वीत॒ सद॑नेषु॒ होता॑ ॥ ५ ॥

उप यः नमः नमसि स्तभायन् इयर्ति वाचं जनयन् यजध्यै ।
ऋंजसानः पुरुऽवार उक्थैः आ इंद्रं कृण्वीत सदनेषु होता ॥ ५ ॥

जो देवापुढें लोटांगणांवर लोटांगणे घालून मनाला धीर देतो, आपली वाक्‌शक्ति जागृत करून यज्ञकर्म करावे म्हणून लोकांना प्रोत्साहन देतो, आणि अशारीतीनें दीर्घप्रयत्‍न करून जो सर्वांना प्रिय झाला आहे तो आमचा आचार्य सामगायनानें इंद्राला यज्ञगृही पाचारण करो. ॥ ५ ॥


धि॒षा यदि॑ धिष॒ण्यन्तः॑ सर॒ण्यान्सद॑न्तो॒ अद्रि॑मौशि॒जस्य॒ गोहे॑ ।
आ दु॒रोषाः॑ पा॒स्त्यस्य॒ होता॒ यो नो॑ म॒हान्त्सं॒वर॑णेषु॒ वह्निः॑ ॥ ६ ॥

धिषा यदि धिषण्यंतः सरण्यान् सदंतः अद्रिं औशिजस्य गोहे ।
आ दुरोषाः पास्त्यस्य होता यः नः महान् संऽवरणेषु वह्निः ॥ ६ ॥

एकाग्र मनानें ध्यानासक्त झालेले भक्तजन, उत्सुक यजमानाच्या गृही बसून जर आज सोमवल्ली रस काढण्याचें ग्रावे फिरवीत आहेत, तर स्वतः दग्ध न होणारा आणि भक्तांना पैलथडीस नेणारा असा तो यजमानाचा थोर यज्ञहोता अग्नि येथेंच आमच्या यज्ञमंडपांत प्रकट होवो. ॥ ६ ॥


स॒त्रा यदीं॑ भार्व॒रस्य॒ वृष्णः॒ सिष॑क्ति॒ शुष्मः॑ स्तुव॒ते भरा॑य ।
गुहा॒ यदी॑मौशि॒जस्य॒ गोहे॒ प्र यद्धि॒ये प्राय॑से॒ मदा॑य ॥ ७ ॥

सत्रा यत् ईं भार्वरस्य वृष्णः सिषक्ति शुष्म स्तुवते भराय ।
गुहा यत् ईं औशिजस्य गोहे प्र यत् धिये प्र अयसे मदाय ॥ ७ ॥

ही गोष्ट अगदी खरी कीं, ह्या वीराच्या प्रभावाचा आसरा स्तोतृजनांचा उत्कर्ष व्हावा म्हणून निरंतर त्याच्या पाठिशीं असतो. उत्साही यजमानांच्या यज्ञ गृहांत जो गुप्त रूपानें राहतो, तो इंद्राचा प्रभाव भक्तांना सद्‍बुद्धिदायक व अभीष्टदानानें हर्षप्रद होतो. ॥ ७ ॥


वि यद्वरां॑सि॒ पर्व॑तस्य वृ॒ण्वे पयो॑भिर्जि॒न्वे अ॒पां जवां॑सि ।
वि॒दद्गौ॒रस्य॑ गव॒यस्य॒ गोहे॒ यदी॒ वाजा॑य सु॒ध्यो३॑वह॑न्ति ॥ ८ ॥

वि यत् वरांसि पर्वतस्य वृण्वे पयःऽभिः जिन्वे अपां जवांसि ।
विदत् गौरस्य गवयस्य गोहे यदी वाजाय सुऽध्यः वहंति ॥ ८ ॥

पर्वताच्या माथ्यावरील विस्तीर्ण प्रदेश जेव्हां तो इंद्र दृष्टिगोचर करतो, नदीप्रवाहांच्या जोरदार धारांना जलवृष्टीने जेव्हां तो अधिकच वेग देतो, किंवा ध्यानतत्पर भक्त जेव्हां सत्वसामर्थ्याचा विजय व्हावा म्हणून त्यास पाचारण करून स्वगृही घेऊन जातात त्यावेळेस गौरभृग अथवा गवा हे पशू इंद्रास समर्पण होतात. ॥ ८ ॥


भ॒द्रा ते॒ हस्ता॒ सुकृ॑तो॒त पा॒णी प्र॑य॒न्तारा॑ स्तुव॒ते राध॑ इन्द्र ।
का ते॒ निष॑त्तिः॒ किमु॒ नो म॑मत्सि॒ किं नोदु॑दु हर्षसे॒ दात॒वा उ॑ ॥ ९ ॥

भद्रा ते हस्ता सुऽकृता उत पाणी इति प्रऽयंतारा स्तुवते राध इंद्र ।
का ते निऽसत्तिः किं ऊं इति नो इति ममत्सि किं न उत्ऽउत् ऊं इति हर्षसे दातवै ऊं इति ॥ ९ ॥

ज्या तुझ्या हातांनी सत्कर्मेंच घडतात, ते तुझे हस्त, हे इंद्रा, खरोखरच धन्य होत. असे असतां तूं अगदींच स्वस्थ कां ? तूं सोमरसानें आनंदभरीत कां होत नाहीस, आणि भक्तांना आपला प्रसाद देण्याकरितां तुला आज हर्ष कां बरे वाटत नाहीं ? ॥ ९ ॥


ए॒वा वस्व॒ इन्द्रः॑ स॒त्यः स॒म्राड्ढन्ता॑ वृ॒त्रं वरि॑वः पू॒रवे॑ कः ।
पुरु॑ष्टुत॒ क्रत्वा॑ नः शग्धि रा॒यो भ॑क्षी॒य तेऽ॑वसो॒ दैव्य॑स्य ॥ १० ॥

एव वस्वः इंद्रः सत्यः संऽराट् हंता वृत्रं वरिवः पूरवे करिति कः ।
पुरुऽस्तुत क्रत्वा नः शग्धि रायः भक्षीय ते अवसः दैव्यस्य ॥ १० ॥

अशा रीतीने हा सत्यस्वरूप अमोलिक दिव्य धनाचा राजाधिराज होय. अज्ञान अंधकाराचा उच्छेद करून मनुष्यमात्राला स्वतंत्रतेच्या आरामाचा लाभ त्यानेंच करून दिला. तर हे सर्वलोकस्तुत देवा, तूं आपल्या कर्तृत्वशक्तीनें आम्हांस अलौकिक ऐश्वर्याची जोड करून दे आणि तुझ्या दिव्यप्रसादाचा मी उपभोग घेईन असें कर. ॥ १० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑ न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥

हे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना ? तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २२ ( संपात सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप् 0


यन्न॒ इन्द्रो॑ जुजु॒षे यच्च॒ वष्टि॒ तन्नो॑ म॒हान्क॑रति शु॒ष्म्या चि॑त् ।
ब्रह्म॒ स्तोमं॑ म॒घवा॒ सोम॑मु॒क्था यो अश्मा॑नं॒ शव॑सा॒ बिभ्र॒देति॑ ॥ १ ॥

यत् नः इंद्रः जुजुषे यत् च वष्टि तन् नः महान् करति शुष्मि आ चित् ।
ब्रह्म स्तोमं मघऽवा सोमं उक्था यः अश्मानं शवसा बिभ्रत् एति ॥ १ ॥

आमच्या ज्या ज्या उपायनाचा इंद्र प्रेमानें उपभोग घेतो, अथवा जें उपायन मग तें स्तोत्र असो, प्रार्थना असो, सोम असो वा सामगायन असो, त्यास आवडते, तें सर्व आम्हांकरितां, तो परम थोर प्रभावशाली भगवान - जो आपल्या उत्कृष्ट बलानें भयंकर अशनि हातीं घेऊन भक्तसहाय्यार्थ येतो - तो दिव्यैश्वर्यसंपन्न देवच निर्माण करून ठेवतो. ॥ १ ॥


वृषा॒ वृष॑न्धिं॒ चतु॑रश्रि॒मस्य॑न्नु॒ग्रो बा॒हुभ्यां॒ नृत॑मः॒ शची॑वान् ।
श्रि॒ये परु॑ष्णीमु॒षमा॑ण॒ ऊर्णां॒ यस्याः॒ पर्वा॑णि स॒ख्याय॑ वि॒व्ये ॥ २ ॥

वृषा वृषंधिं चतुःऽअश्रिं अस्यन् उग्रः बाहुऽभ्यां नृऽतमः शचीऽवान् ।
श्रिये परुष्णीं उषमाणः ऊर्णां यस्याः पर्वाणि सख्याय विव्ये ॥ २ ॥

पौरुषाचा निधिच असे त्याचे चारधारी वज्र, तो पौरुषशाली वीर शिरोमणि आणि अद्‍भुत शक्तिमान इंद्र आपल्या बाहुबलानें शत्रूंवर फेंकून मारतो व भिवयांमधींल भोंवर्‍याप्रमाणें चित्ताकर्षक दिसणार्‍या परुष्णी नदीला शोभा यावी म्हणून तिच्यावर प्रकाश पाडून प्रेमामुळे तिच्या खडकाळ प्रवाहाचे निरनिराळे भाग तो एकांत एक गोवून देतो. ॥ २ ॥


यो दे॒वो दे॒वत॑मो॒ जाय॑मानो म॒हो वाजे॑भिर्म॒हद्भि्॑श्च॒ शुष्मैः॑ ।
दधा॑नो॒ वज्रं॑ बा॒ह्वोरु॒शन्तं॒ द्याममे॑न रेजय॒त्प्र भूम॑ ॥ ३ ॥

यः देवः देवऽतमः जायमानः महः वाजेभिः महत्ऽभिः च शुष्मैः ।
दधानः वज्रं बाह्वोः उशंतं द्यां अमेन रेजयत् प्र भूम ॥ ३ ॥

जो थोर देव आपल्या सत्वसामर्थ्यांनी आणि महापराक्रमांनी देवांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असाच अवतीर्ण झाला, व सज्जनांचे रक्षण करण्याकरितां उत्सुक झालेल्या वज्राला जो आपल्या बाहूंवर वागवितो त्या इंद्रानें आपल्या धाकानें द्यु आणि पृथिवी ह्यांनाही थरथरा कांपावयास लावलें. ॥ ३ ॥


विश्वा॒ रोधां॑सि प्र॒वत॑श्च पू॒र्वीर्द्यौरृ॒ष्वाज्जनि॑मन्रेजत॒ क्षाः ।
आ मा॒तरा॒ भर॑ति शु॒ष्म्या गोर्नृ॒वत्परि॑ज्मन्नोनुवन्त॒ वाताः॑ ॥ ४ ॥

विश्वा रोधांसि प्रऽवतः च पूर्वीः द्यौः ऋष्वात् जनिमन् रेजत क्षाः ।
आ मातरा भरति शुष्मी आ गोः नृऽवत् परिऽज्मन् नोनुवंत वाताः ॥ ४ ॥

यच्चावत् उच्च गिरिदुर्ग, असंख्य जलौघ आणि स्वर्ग व भूलोक हे सुद्धां इंद्र प्रकट झाला त्यावेळेस त्या अत्युदात्त विभूतीपुढें कांपू लागले. तथापि ज्योतिर्मय वृषभाच्या (सूर्याच्या) मातापितरांचा सांभाळ तो प्रभावशाली देवच करीत आहे. एतदर्थ वायूही अंतरिक्षांत मनुष्यांप्रमाणे मोठमोठ्यानें स्तुतिघोष करूं लागला. ॥ ४ ॥


ता तू त॑ इन्द्र मह॒तो म॒हानि॒ विश्वे॒ष्वित्सव॑नेषु प्र॒वाच्या॑ ।
यच्छू॑र धृष्णो धृष॒ता द॑धृ॒ष्वानहिं॒ वज्रे॑ण॒ शव॒सावि॑वेषीः ॥ ५ ॥

ता तु त इंद्र महतः महानि विश्वेषु इत् सवनेषु प्रऽवाच्या ।
यत् शूर धृष्णो इति धृषता दधृष्वान् अहिं वज्रेण शवसा अविवेषीः ॥ ५ ॥

हे इंद्रा, तूं परमथोर, त्या अर्थी ते तुझे महापराक्रम सर्व सोमसेवनाच्या वेळेस खरोखरच वर्णन करण्याजोगे आहेत; कीं हे शूरा, हे धैर्यमंडिता, तूं धैर्यसागर, तेव्हां तूं आपल्या उत्कट बलानें बेधडकपणे वज्राच्या योगानें अहि भुजंगाला पार उखडून टाकलेस. ॥ ५ ॥


ता तू ते॑ स॒त्या तु॑विनृम्ण॒ विश्वा॒ प्र धे॒नवः॑ सिस्रते॒ वृष्ण॒ ऊध्नः॑ ।
अधा॑ ह॒ त्वद्वृ॑षमणो भिया॒नाः प्र सिन्ध॑वो॒ जव॑सा चक्रमन्त ॥ ६ ॥

ता तु ते सत्या तुविऽनृम्ण विश्वा प्र धेनवः सिस्रते वृष्ण ऊध्नः ।
अध ह त्वत् वृषऽमनः भियानाः प्र सिंधवः जवसा चक्रमंत ॥ ६ ॥

आपल्या सहज वर्षाव करणार्‍या कासेंतून स्वर्धेनू अभिष्ट वस्तूंचा पाऊस पाडतात, आणि हे शूरोदारमनस्का, महानद्या भिऊन जाऊन अत्यंत वेगानें समुद्राकडे धांवत सुटतात, हे खरोखर तुझेच पराक्रम होत. ॥ ६ ॥


अत्राह॑ ते हरिव॒स् ता उ॑ दे॒वीरवो॑भिरिन्द्र स्तवन्त॒ स्वसा॑रः ।
यत् सी॒मनु॒ प्र मु॒चो ब॑द्बनधा॒ना दी॒र्घामनु॒ प्रसि॑तिं स्यन्द॒यध्यै॑ ॥ ७ ॥

अत्र अह ते हरिऽवः ता ऊं इति देवीः अवःऽभिः इंद्र स्तवंत स्वसारः ।
यत् सीं अनु प्र मुचः बद्बसधानाः दीर्घां अनु प्रऽसितिं स्यंदयध्यै ॥ ७ ॥

हे हरिदश्व इंद्रा, आपोदेवी प्रतिबंधांत पडल्या असतां त्यांच्या ओघांना लांबचलांब अशा मालिकेंत यथेच्छ संचार करण्याकरितां जेव्हां तूं बंधमुक्त केलेंस तेव्हां, हे इंद्रा, त्या भगिनीतुल्य आपोदेवींनी मोठ्या आनंदाने तुझे यशोगायन केले. ॥ ७ ॥


पि॒पी॒ळे अं॒शुर्मद्यो॒ न सिन्धु॒रा त्वा॒ शमी॑ शशमा॒नस्य॑ श॒क्तिः ।
अ॒स्म॒द्र्यक्छुशुचा॒नस्य॑ यम्या आ॒शुर्न र॒श्मिं तु॒व्योज॑सं॒ गोः ॥ ८ ॥

पिपीळे अंशुः मद्यः न सिंधुः आ त्वा शमी शशमानस्य शक्तिः ।
अस्मद्र्यक् शुशुचानस्य यम्याः आशुः न रश्मिं तुविऽओजसं गोः ॥ ८ ॥

अंतःकरणाला उल्लसित करणारा सोमवल्लीचा रस इतका पिळून ठेवला आहे कीं त्याची जणों काय एक नदीच बनली आहे. तर तुझे स्तवन करणार्‍या ह्या भक्ताची अपूर्व कल्पना आणि भक्तिसामर्थ्य तुला-तुज तेजःपुंज भगवंताच्या रश्मिला वळवून आमच्याकडे आणोत. एखादा तडफ धावणारा घोडेस्वार आपल्या घोड्याच्या मजवूत कातडी लगामाला ताण देत देत दौडत येतो त्याप्रमाणे तूं आमच्याकडे ये. ॥ ८ ॥


अ॒स्मे वर्षि॑ष्ठा कृणुहि॒ ज्येष्ठा॑ नृ॒म्णानि॑ स॒त्रा स॑हुरे॒ सहां॑सि ।
अ॒स्मभ्यं॑ वृ॒त्रा सु॒हना॑नि रन्धि ज॒हि वध॑र्व॒नुषो॒ मर्त्य॑स्य ॥ ९ ॥

अस्मे इति वर्षिष्ठा कृणुहि ज्येष्ठा नृम्णानि सत्रा सहुरे सहांसि ।
अस्मभ्यं वृत्रा सुऽहनानि रंधि जहि वधः वनुषः मर्त्यस्य ॥ ९ ॥

विजयशाली वीरा, अत्यंत प्रशंसनीय आणि श्रेष्ठ अशी शौर्याची व साहसाची कृत्यें तूं निरंतर आमच्या हांतून कर. आम्हांस अंधकारानें व्याप्त करणारे परंतु तुझ्या हातून सहज मारले जाणारे जे दुष्ट त्यांना आमच्या स्वाधीन कर, आणि आमचा घात करूं पाहणार्‍या शत्रूंचे हत्यार मोडून खालीं पाड. ॥ ९ ॥


अ॒स्माक॒मित्सु शृ॑णुहि॒ त्वमि॑न्द्रा॒स्मभ्यं॑ चि॒त्राँ उप॑ माहि॒ वाजा॑न् ।
अ॒स्मभ्यं॒ विश्वा॑ इषणः॒ पुरं॑धीर॒स्माकं॒ सु म॑घवन्बोधि गो॒दाः ॥ १० ॥

अस्माकं इत् सु शृणुहि त्वं इंद्र अस्मभ्यं चित्रान् उप माहि वाजान् ।
अस्मभ्यं विश्वा इषणः पुरंऽधीः अस्माकं सु मघऽवन् बोधि गोऽदाः ॥ १० ॥

हे इंद्रा, आमचां धांवा अगदीं लक्षपूर्वक ऐकून घेच. नाना प्रकारची अद्‍भुत सामर्थ्यें आमच्या ठिकाणी ठेव, सर्व प्रकारची बुद्धिमत्ता आमच्यामध्यें त्वरित उत्पन्न कर, आणि हे दिव्य ऐश्वर्यवंता, तूं आम्हांस ज्ञानरूप धेनु देणारा हो. ॥ १० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥

हे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना ? तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २३ ( संपात ऋतुप्रशंसा सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप् 0


क॒था म॒हाम॑वृध॒त्कस्य॒ होतु॑र्य॒ज्ञं जु॑षा॒णो अ॒भि सोम॒मूधः॑ ।
पिब॑न्नुशा॒नो जु॒षमा॑णो॒ अन्धो॑ वव॒क्ष ऋ॒ष्वः शु॑च॒ते धना॑य ॥ १ ॥

कथा महां अवृधत् कस्य होतुः यज्ञं जुषाणः अभि सोमं ऊधः ।
पिबन् उशानः जुषमाणः अंधः ववक्षे ऋष्वः शुचते धनाय ॥ १ ॥

सोमरस आणि भक्तिनिर्झर ह्यांचे मनापासून सेवन करणारा इंद्र हा आनंदाने कसा उचंबळून गेला ? कोणत्या यजमानाच्या उत्तम यज्ञाचा त्यानें कसकसा उत्कर्ष केला ? कारण मोठ्या औत्सुक्यानें मधुर पेय प्राशन करून व तृप्त होऊन तो उदात्तचारित्र्य देव उज्ज्वल दिव्यधन देण्याकरितांच बलशालित्वानें वृद्धिंगत झाला आहे. ॥ १ ॥


को अ॑स्य वी॒रः स॑ध॒माद॑माप॒ समा॑नंश सुम॒तिभिः॒ को अ॑स्य ।
कद॑स्य चि॒त्रं चि॑किते॒ कदू॒ती वृ॒धे भु॑वच्छशमा॒नस्य॒ यज्योः॑ ॥ २ ॥

कः अस्य वीरः सधऽमादं आप सं आनंश सुमतिऽभिः कः अस्य ।
कत् अस्य चित्रं चिकिते कत् ऊती वृधे भुवत् शशमानस्य यज्योः ॥ २ ॥

कोणता शूर पुरुष भगवंताच्या आनंदाचा विभागी झाला ? त्याच्या दयार्द्र बुद्धीशी कोणाचा योग घडून आला ? त्या देवाचें अद्‍भुत प्रेम केव्हां दृष्टीस पडेल व स्तवनरत यजमानाच्या रक्षणाकरितां व त्याच्या उन्नतीकरितां तो केव्हां अवतीर्ण होईल ? ॥ २ ॥


क॒था शृ॑णोति हू॒यमा॑न॒मिन्द्रः॑ क॒था शृ॒ण्वन्नव॑सामस्य वेद ।
का अ॑स्य पू॒र्वीरुप॑मातयो ह क॒थैन॑माहुः॒ पपु॑रिं जरि॒त्रे ॥ ३ ॥

कथा शृणोति हूयमानं इंद्रः कथा शृण्वन् अवसां अस्य वेद ।
काः अस्य पूर्वीः उपऽमातयः ह कथा एनं आहुः पपुरिं जरित्रे ॥ ३ ॥

भक्त त्याचा धांवा करतात. तो धांवा तो काय केलें असतां ऐकेल ? आणि ऐकून घेऊन त्याच्यावर अनुग्रह करण्याची गोष्ट तो कशानें मनांत आणील ? त्याचे जे असंख्य वरप्रसाद आहेत ते कोणते ? आणि त्याला स्तोतृजनांचे मनोरथ पूर्ण करणारा असें म्हणतात तें कशामुळें ? ॥ ३ ॥


क॒था स॒बाधः॑ शशमा॒नो अ॑स्य॒ नश॑द॒भि द्रवि॑णं॒ दीध्या॑नः ।
दे॒वो भु॑व॒न्नवे॑दा म ऋ॒तानां॒ नमो॑ जगृ॒भ्वाँ अ॒भि यज्जुजो॑षत् ॥ ४ ॥

कथा सऽबाधः शशमानः अस्य नशत् अभि द्रविणं दीध्यानः ।
देवः भुवन् नवेदाऽ मे ऋतानां नमः जगृभ्वान् अभि यज् जुजोषत् ॥ ४ ॥

आपत्तीनें त्रस्त झालेला उपासक जन एकाग्रतेनें ध्यान करून भगवंताच्या सामर्थ्यसंपत्तीचा अनुभव घेतो असें म्हणतात तें कसे बरें ? भक्तांनी केलेले प्रणिपात त्याला प्रिय आहेत तर अशा प्रणिपाताचा स्वीकार करून तो भगवान माझ्या सद्धर्माचरणाची किंमत ओळखील असें होवो. ॥ ४ ॥


क॒था कद॒स्या उ॒षसो॒ व्युष्टौ दे॒वो मर्त॑स्य स॒ख्यं जु॑जोष ।
क॒था कद॑स्य स॒ख्यं सखि॑भ्यो॒ ये अ॑स्मि॒न्कामं॑ सु॒युजं॑ तत॒स्रे ॥ ५ ॥

कथा कत् अस्याः उषसः विऽउष्टौ देवः मर्तस्य सख्यं जुजोष ।
कथा कत् अस्य सख्यं सखिऽभ्यः ये अस्मिन् कामं सुऽयुजं ततस्रे ॥ ५ ॥

आजचा प्रभातसमय प्राप्त होऊन दिशासुद्धां उजळल्या; आतां तरी भगवंतानें ह्या दीन मानवाशीं सख्य केलें अशी गोष्ट कशी आणि केव्हां घडेल ? प्रिय भक्तांवर त्याचा दयालाभ उलट केव्हां व कसा जडेल ? ॥ ५ ॥


किमादम॑त्रं स॒ख्यं सखि॑भ्यः क॒दा नु ते॑ भ्रा॒त्रं प्र ब्र॑वाम ।
श्रि॒ये सु॒दृशो॒ वपु॑रस्य॒ सर्गाः॒ स्व१र्ण चि॒त्रत॑ममिष॒ आ गोः ॥ ६ ॥

किं आत् अमत्रं सख्यं सखिऽभ्यः कदा नु ते भ्रात्रं प्र ब्रवाम ।
श्रिये सुऽदृशः वपुः अस्य सर्गाः स्वः ण चित्रऽतमं इषे आ गोः ॥ ६ ॥

तुझ्या जिवलग भक्तांविषयीचें तुझें मित्रप्रेम काय वर्णावे ? परंतु तुझ्या भ्रातृप्रेमाचें वर्णन आम्हांस केव्हां करावयांस सांपडेल बरे ! अद्‍भुत स्वरूपाचें दर्शन, सूर्याप्रमाणे किंवा स्वर्गीय धेनूंच्या दुग्धप्रवाहाप्रमाणें सर्वांस हवेसेंच वाटते. ॥ ६ ॥


द्रुहं॒ जिघां॑सन्ध्व॒रस॑मनि॒न्द्रां तेति॑क्ते ति॒ग्मा तु॒जसे॒ अनी॑का ।
ऋ॒णा चि॒द्यत्र॑ ऋण॒या न॑ उ॒ग्रो दू॒रे अज्ञा॑ता उ॒षसो॑ बबा॒धे ॥ ७ ॥

द्रुहं जिघांसन् ध्वरसं अनिंद्रां तेतिक्ते तिग्मा तुजसे अनीका ।
ऋणा चित् यत्र ऋणऽयाः नः उग्रः दूरे अज्ञाताः उषसः बबाधे ॥ ७ ॥

सर्व उध्वस्त करून टाकणारे व इंद्राला न भजणारे जे मानवद्वेष्टे शत्रु त्यांना ठार मारण्याकरितां इंद्रदेवानें आपली शस्त्रास्त्रें त्यांच्यावर चालविण्याकरितां झगझगीत पाजळून ठेवलीं आहेत. त्यांच्यायोगानें आमची पातकरूप ऋणें नाहींशी करणार्‍या त्या उग्र देवानें आम्हांस कळत नव्हते त्या दिवसापासून घडलेल्या आमचा पातकांस दूर हांकून देऊन त्यांचा नाश केला. ॥ ७ ॥


ऋ॒तस्य॒ हि शु॒रुधः॒ सन्ति॑ पू॒र्वीर्‌ऋ॒तस्य॑ धी॒तिर्वृ॑जि॒नानि॑ हन्ति ।
ऋ॒तस्य॒ श्लोको॑ बधि॒रा त॑तर्द॒ कर्णा॑ बुधा॒नः शु॒चमा॑न आ॒योः ॥ ८ ॥

ऋतस्य हि शुरुधः संति पूर्वीः ऋतस्य धीतिः वृजिनानि हंति ।
ऋतस्य श्लोकः बधिरा ततर्द कर्णा बुधानः शुचमान आयोः ॥ ८ ॥

सत्यधर्माच्या अंगी क्लेशविनाशक शक्ति असंख्य आहेत. सनातन सत्याचे चिंतन पातकांचा नाश करतें आणि सत्यधर्माचें बोधप्रद परम पावन संकीर्तन भाविकाचे कर्ण, बधीर असले तरीही, त्यांना भेदून आंत घुसतें. ॥ ८ ॥


ऋ॒तस्य॑ दृ॒ळ्हा ध॒रुणा॑नि सन्ति पु॒रूणि॑ च॒न्द्रा वपु॑षे॒ वपूं॑षि ।
ऋ॒तेन॑ दी॒र्घमि॑षणन्त॒ पृक्ष॑ ऋ॒तेन॒ गाव॑ ऋ॒तमा वि॑वेशुः ॥ ९ ॥

ऋतस्य दृळ्हा धरुणानि संति पुरूणि चंद्रा वपुषे वपूंषि ।
ऋतेन दीर्घं इषणंत पृक्षः ऋतेन गाव ऋतं आ विवेशुः ॥ ९ ॥

सनातन सत्याचा पाया अगदीं अभेद्य आहे. आतां त्याच्या चित्ताकर्षक रूपाविषयीं म्हटले तर सत्यधर्मालाही आल्हाददायक रूपें पुष्कळच आहेत. सद्धर्माचरणानें चिरकाल रूपाचे सामर्थ्य सच्छील लोक आपल्या अंगी मिरवितात आणि सत्याचरणनेंच बुद्धिरूप धेनू सनातन सत्याच्या ठिकाणी जाऊन भिडतात. ॥ ९ ॥


ऋ॒तं ये॑मा॒न ऋ॒तमिद्व॑नोत्यृ॒तस्य॒ शुष्म॑स्तुर॒या उ॑ ग॒व्युः ।
ऋ॒ताय॑ पृ॒थ्वी ब॑हु॒ले ग॑भी॒रे ऋ॒ताय॑ धे॒नू प॑र॒मे दु॑हाते ॥ १० ॥

ऋतं येमान ऋतं इत् वनोति ऋतस्य शुष्मः तुरऽया ऊं इति गव्युः ।
ऋताय पृथ्वी इति बहुले गभीरे इति ऋताय धेनू इति परमे इति दुहाते इति ॥ १० ॥

सद्धर्माला धरून राहणार्‍या भक्ताला सनातन सत्यच प्राप्त होते. सद्धर्माचा जोर एवढा विस्तीर्ण आहे कीं तो त्वरेनें ज्ञान धेनू हस्तगत करून देतो. सनातन सत्याकरितांच विस्तीर्ण व सखोल अशा द्यावापृथिवी, सनातन सत्याकरितांच त्या परम श्रेष्ठ धेनु, ज्ञान आणि वृष्टिरूप दुग्धाच्या धारा सोडीत असतात. ॥ १० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥

हे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना ? तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २४ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप् 0


का सु॑ष्टु॒तिः शव॑सः सू॒नुमिन्द्र॑मर्वाची॒नं राध॑स॒ आ व॑वर्तत् ।
द॒दिर्हि वी॒रो गृ॑ण॒ते वसू॑नि॒ स गोप॑तिर्नि॒ष्षिधां॑ नो जनासः ॥ १ ॥

का सुऽस्तुतिः शवसः सूनुं इंद्रं अर्वाचीनं राधस आ ववर्तत् ।
ददिः हि वीरः गृणते वसूनि स गोऽपतिः निःऽसिधां नः जनासः ॥ १ ॥

सामर्थ्यप्रभव इंद्राला कोणती रमणीय स्तुती आमच्यावर कृपाप्रसाद करण्याकरितां आम्हांकडे वळवून घेऊन येईल ? तोच वीर स्तोतृजनाला अमोलिक अभीष्टवस्तु देतो. हे जनहो, सर्व उत्कृष्ट देणग्यांचा महाधिपति तोच आहे. ॥ १ ॥


स वृ॑त्र॒हत्ये॒ हव्यः॒ स ईड्यः॒ स सुष्टु॑त॒ इन्द्रः॑ स॒त्यरा॑धाः ।
स याम॒न्ना म॒घवा॒ मर्त्या॑य ब्रह्मण्य॒ते सुष्व॑ये॒ वरि॑वो धात् ॥ २ ॥

स वृत्रऽहत्ये हव्यः सः ईड्यः सः सुऽस्तुतः इंद्रः सत्यराधाः ।
सः यामन् आ मघऽवा मर्त्याय ब्रह्मण्यते सुस्वये वरिवः धात् ॥ २ ॥

महनीय असा तोच. उत्तम रीतीनें स्तवन त्याचेंच होत असते. अंधकाररूपी शत्रूचा नाश करण्याकरितांही त्याचा धांवा केला पाहिजे. त्याचेच कृपाप्रसाद सत्य होतात, आणि तोच दिव्यैश्वर्यसंपन्न प्रभु येतां येतांच, प्रार्थनारत आणि सोमार्पणपरायण अशा दीन भक्ताला दुःख मुक्ततेचा आराम प्राप्त करून देतो. ॥ २ ॥


तमिन्नरो॒ वि ह्व॑यन्ते समी॒के रि॑रि॒क्वांस॑स्त॒न्वः कृण्वत॒ त्राम् ।
मि॒थो यत्त्या॒गमु॒भया॑सो॒ अग्म॒न्नर॑स्तो॒कस्य॒ तन॑यस्य सा॒तौ ॥ ३ ॥

तं इत् नरः वि ह्वयंते संऽईके रिरिक्वांसः तन्वः कृण्वत त्रां ।
मिथः यत् त्यागं उभयासः अग्मन् नरः तोकस्य तनयस्य सातौ ॥ ३ ॥

शूर सैनिक युद्धांमध्ये त्यालाच आपल्याकडे हांक मारतात. जेव्हां उभय पक्षांकडील योद्ध्यांनी जिवावर उदार होऊन परस्परांशी लढतांना सर्वस्वाची आशा सोडली असते, किंवा त्यांना पुत्रपौत्रांचा लाभ पाहिजे असतो त्या वेळेस सर्व शूर पुरुष त्यालाच आपला तारक समजतात. ॥ ३ ॥


क्र॒तू॒यन्ति॑ क्षि॒तयो॒ योग॑ उग्राशुषा॒णासो॑ मि॒थो अर्ण॑सातौ ।
सं यद्विशोऽ॑ववृत्रन्त यु॒ध्मा आदिन्नेम॑ इन्द्रयन्ते अ॒भीके॑ ॥ ४ ॥

क्रतुऽयंति क्षितयः योगे उग्र आशुषाणासः मिथः अर्णऽसातौ ।
सं यत् विशः अववृत्रंत युध्मा आत् इत् नेम इंद्रयंते अभीके ॥ ४ ॥

उग्ररूप देवा, कारणपरत्वें युद्धाची धुमश्चक्री चालू झाली असतां उपासनातत्पर नागरिक एकमेकांशी भिडून पराक्रम गाजवितात अगर युद्धकुशल सैनिकांची पथकें एकमेकांवर तुटून पडतात तेव्हांसुद्धां त्यांपैकी पुष्कळ लोक तुज इंद्राच्याच कृतीचे अनुकरण करतात. ॥ ४ ॥


आदिद्ध॒ नेम॑ इन्द्रि॒यं य॑जन्त॒ आदित्प॒क्तिः पु॑रो॒ळाशं॑ रिरिच्यात् ।
आदित्सोमो॒ वि प॑पृच्या॒दसु॑ष्वी॒नादिज्जु॑जोष वृष॒भं यज॑ध्यै ॥ ५ ॥

आत् इत् ह नेमे इंद्रियं यजंत आत् इत् पक्तिः पुरोळाशं रिरिच्यात् ।
आत् इत् सोमः वि पपृच्यात् असुस्वीन् आत् इत् जुजोष वृषभं यजध्यै ॥ ५ ॥

कित्येक भक्त इंद्राच्या ईश्वरी सामर्थ्याचे कौतुक करीत आहेत अशा वेळेस पुरोडाशाची रिकामी जागा पक्वान्नानें भरून जाऊं द्या. सोम अर्पण करणारा भक्त सोमार्पणविन्मुख लोकांना तेव्हांच वेगळे काढून देशोधडीस लावील, कारण यज्ञासाठी त्या वीरश्रेष्ठाला भक्तानें संतुष्ट केलेलें असतें. ॥ ५ ॥


कृ॒णोत्य॑स्मै॒ वरि॑वो॒ य इ॒त्थेन्द्रा॑य॒ सोम॑मुश॒ते सु॒नोति॑ ।
स॒ध्री॒चीने॑न॒ मन॒सावि॑वेन॒न्तमित्सखा॑यं कृणुते स॒मत्सु॑ ॥ ६ ॥

कृणोति अस्मै वरिवः य इत्था इंद्राय सोमं उशते सुनोति ।
सध्रीचीनेन मनसा अविऽवेनन् तं इत् सखायं कृणुते समत्ऽसु ॥ ६ ॥

उत्कंठित झालेल्या इंद्राकरितां जो अंतःकरणपूर्वक सोमरस सिद्ध करतो त्याला तो भगवान सुखसमाधान प्राप्त करुन देतो आणि यत्किंचितही असंतुष्ट न होतां तत्परतेने रणांगणामध्यें त्यालाच आपला मित्र म्हणवितो. ॥ ६ ॥


य इन्द्रा॑य सु॒नव॒त्सोम॑म॒द्य पचा॑त्प॒क्तीरु॒त भृ॒ज्जाति॑ धा॒नाः ।
प्रति॑ मना॒योरु॒चथा॑नि॒ हर्य॒न्तस्मि॑न्दध॒द्वृष॑णं॒ शुष्म॒मिन्द्रः॑ ॥ ७ ॥

य इंद्राय सुनवत् सोमं अद्य पचात् पक्तीः उत भृज्जाति धानाः ।
प्रति मनायोः उचथानि हर्यन् तस्मिन् दधत् वृषणं शुष्मं इंद्रः ॥ ७ ॥

इंद्राकरितां जो आज सोमरस सिद्ध करील, पक्वान्न बनवील किंवा त्याच्या प्रित्यर्थ यज्ञाकरितां लाह्या भाजून तयार करील अशा खर्‍या जिव्हाळ्याच्या भक्तांची स्तोत्रें प्रेमानें ऐकून ज्या पराक्रमानें जिकडे तिकडे दरारा बसतो असा पराक्रम इंद्र त्या भक्तांमध्ये ठेवील. ॥ ७ ॥


य॒दा स॑म॒र्यं व्यचे॒दृघा॑वा दी॒र्घं यदा॒जिम॒भ्यख्य॑द॒र्यः ।
अचि॑क्रद॒द्वृष॑णं॒ पत्न्यिच्छा॑ दुरो॒ण आ निशि॑तं सोम॒सुद्भिः॑ ॥ ८ ॥

यदा सऽमर्यं वि अचेत् ऋघावा दीर्घं यत् आजिं अभि अख्यत् अर्यः ।
अचिक्रदत् वृषणं पत्निर अच्छ दुरोणे आ निऽशितं सोमसुत्ऽभिः ॥ ८ ॥

तो उग्रप्रतापी भगवान युद्धाला उद्युक्त झाला, व त्या जगत्‌प्रभूनें बरेच दिवस चालणारे असें झुंज अवलोकन केलें म्हणजे सोमयाजी भक्तांनी यज्ञमंदिरांत जो पौरुषमय सोमरस अगदी तीक्ष्ण बनविला असतो तो प्राशन करण्याकरितां यजमानपत्‍नी इंद्राला मोठ्यानें पाचारण करूं लागते. ॥ ८ ॥


भूय॑सा व॒स्नम॑चर॒त्कनी॒योऽ॑विक्रीतो अकानिषं॒ पुन॒र्यन् ।
स भूय॑सा॒ कनी॑यो॒ नारि॑रेचीद्दी॒ना दक्षा॒ वि दु॑हन्ति॒ प्र वा॒णम् ॥ ९ ॥

भूयसा वस्नं अचरत् कनीयः अविऽक्रीतः अकानिषं पुनः यन् ।
सः भूयसा कनीयः न अरिरेचीत् दीनाः दक्षाः वि दुहंति प्र वाणं ॥ ९ ॥

भारी मालाला तो थोडी किंमत देऊं लागला, तेव्हां विक्री न करतांच परत येऊन मी स्वस्थ बसलो; तथापि तो पुष्कळ मालाची थोडी किंमत देण्याचा नाद सोडीना; ह्याप्रमाणे गरीब आणि व्यवहारदक्ष दोघेही आपआपल्यापरी सौदा पटविण्यांत जिकीर करीत असतात. ॥ ९ ॥


क इ॒मं द॒शभि॒र्ममेन्द्रं॑ क्रीणाति धे॒नुभिः॑ ।
य॒दा वृ॒त्राणि॒ जङ्घ॑न॒दथै॑नं मे॒ पुन॑र्ददत् ॥ १० ॥

कः इमं दशऽभिः मम इंद्रं क्रीणाति धेनुऽभिः ।
यदा वृत्राणिः जंघनत् अथ एनं मे पुनः ददत् ॥ १० ॥

दहा धेनू देऊन ह्या इंद्राला मजपासून कोणी विकत घेण्यास तयार आहे काय ? त्यानें अंधकाररूपी शत्रूंची धूळधाण केल्यावर मग मात्र त्याला मजपाशी परत आणून दिले पाहिजे. ॥ १० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥

हे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना ? तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २५ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप् 0


को अ॒द्य नर्यो॑ दे॒वका॑म उ॒शन्निन्द्र॑स्य स॒ख्यं जु॑जोष ।
को वा॑ म॒हेऽ॑वसे॒ पार्या॑य॒ समि॑द्धे अ॒ग्नौ सु॒तसो॑म ईट्टे ॥ १ ॥

कः अद्य नर्यः देवऽकामः उशन् इंद्रस्य सख्यं जुजोष ।
कः वा महे अवसे पार्याय संऽइद्धे अग्नौ सुतऽसोम ईट्टे ॥ १ ॥

आज कोणत्या भगवत्सेवक व लोकहित तत्पर सत्पुरुषानें मोठ्या उत्सुकतेनें इंद्राच्या भक्तप्रेमाचा लाभ जोडला ? अथव त्याच्या पूर्ण कृपेस पात्र व्हावे म्हणून वेदीवरील अग्नि प्रज्वलित झाला असतां सोमरस सिद्ध करून त्या भगवंताची स्तुती कोण करीत असतो ? ॥ १ ॥


को ना॑नाम॒ वच॑सा सो॒म्याय॑ मना॒युर्वा॑ भवति॒ वस्त॑ उ॒स्राः ।
क इन्द्र॑स्य॒ युज्यं॒ कः स॑खि॒त्वं को भ्रा॒त्रं व॑ष्टि क॒वये॒ क ऊ॒ती ॥ २ ॥

कः नानाम वचसा सोम्याय मनायुः वा भवति वस्ते उस्राः ।
कः इंद्रस्य युज्यं कः सखिऽत्वं कः भ्रात्रं वष्टि कवये कः ऊती ॥ २ ॥

कोणत्या भक्तानें गुणानुवाद वर्णन करून सोमप्रिय देवापुढे आपलें मस्तक लवविलें ? भक्तीचा जिव्हाळा कोण जाणतो ? प्रातःकाळी उठून संधिप्रकाशाचे परिधान कोण करतो ? इंद्राच्या आत्मत्वाची, मित्रत्वाची अथवा बंधुत्वाची लालसा कोणी धरली आहे ? त्या महाबुद्धिमंताकडे संरक्षणार्थ कोण गेला आहे ? ॥ २ ॥


को दे॒वाना॒मवो॑ अ॒द्या वृ॑णीते॒ क आ॑दि॒त्याँ अदि॑तिं॒ ज्योति॑रीट्टे ।
कस्या॒श्विना॒विन्द्रो॑ अ॒ग्निः सु॒तस्यां॒शोः पि॑बन्ति॒ मन॒सावि॑वेनम् ॥ ३ ॥

कः देवानां अवः अद्य वृणीते कः आदित्यान् अदितिं ज्योतिः ईट्टे ।
कस्य अश्विनौ इंद्रः अग्निः सुतस्य अंशोः पिबंति मनसा अविऽवेनं ॥ ३ ॥

दिव्य विभूतींचे कृपाछत्र आपणावर असावें अशी याचना आज कोण करीत आहे ? आदित्य, अदिति (अनाद्यनंत शक्ति) आणि दिव्य तेज ह्यांची उपासना कोण करीत आहे ? कोणत्या भक्तानें पिळून सिद्ध केलेला रस, इंद्र, अश्विन आणि अग्नि हे आज मनापासून प्राशन करीत आहेत ? ॥ ३ ॥


तस्मा॑ अ॒ग्निर्भार॑तः॒ शर्म॑ यंस॒ज्ज्योक्प॑श्या॒त्सूर्य॑मु॒च्चर॑न्तम् ।
य इन्द्रा॑य सु॒नवा॒मेत्याह॒ नरे॒ नर्या॑य॒ नृत॑माय नृ॒णाम् ॥ ४ ॥

तस्मै अग्निः भारतः शर्म यंसत् ज्योक् पश्यात् सूर्यं उत्ऽचरंतं ।
यः इंद्राय सुनवाम इति आह नरे नर्याय नृऽतमाय नृणां ॥ ४ ॥

वीरहितदक्ष आणि वीरांमध्यें अत्यंत श्रेष्ठ असा जो इंद्र त्याच्या प्रित्यर्थ आपण सोमरस पिळून सिद्ध करूं असे जो म्हणतो त्याचेसुद्धां भारतीयांवर प्रेम करणारा हा अग्नि देव कल्याण करो. तो भक्त उदयोन्मुख सूर्याचा दर्शनलाभ चिरकाल घेवो. ॥ ४ ॥


न तं जि॑नन्ति ब॒हवो॒ न द॒भ्रा उ॒र्वस्मा॒ अदि॑तिः॒ शर्म॑ यंसत् ।
प्रि॒यः सु॒कृत्प्रि॒य इन्द्रे॑ मना॒युः प्रि॒यः सु॑प्रा॒वीः प्रि॒यो अ॑स्य सो॒मी ॥ ५ ॥

न तं जिनंति बहवः न दभ्राः उरु अस्मै अदितिः शर्म यंसत् ।
प्रियः सुऽकृत् प्रियः इंद्रे मनायुः प्रियः सुप्रऽअवीः प्रियः अस्य सोमी ॥ ५ ॥

शत्रु पुष्कळ असोत कीं थोडे असोत, त्या भक्ताचा कोणीही पराभव करूं शकत नाही; अदिति अशा भक्ताला शाश्वत सुख देईलच. इंद्राला कोण बरें प्रिय नाही ? सदाचरणी मनुष्य प्रिय, मनःपूर्वक ईशचिंतन करणारा प्रिय, औत्सुक्यानें सेवा करणारा प्रिय आणि सोम अर्पण करणाराही त्याला प्रियच असतो. ॥ ५ ॥


सु॒प्रा॒व्यः प्राशु॒षाळे॒ष वी॒रः सुष्वेः॑ प॒क्तिं कृ॑णुते॒ केव॒लेन्द्रः॑ ।
नासु॑ष्वेरा॒पिर्न सखा॒ न जा॒मिर्दु॑ष्प्रा॒व्योऽवह॒न्तेदवा॑चः ॥ ६ ॥

सुप्रऽअव्यः प्राशुषाट् एष वीरः सुष्वेः पक्तिं कृणुते केवला इंद्रः ।
न असुष्वेः आपिः न सखा न जामिः दुःप्रऽअव्यः अवऽहंता इत् अवाचः ॥ ६ ॥

हा श्रेष्ठ वीर दीनांचा मोठ्या काळजीनें सांभाळ करणारा व दुष्टांना हां हां म्हणतां पादाक्रांत करणारा आहे. सोमसवन करणार्‍या भक्तानें अर्पण केलेले पक्वान्न इंद्र हा अगदी आपलें म्हणून ग्रहण करतो. परंतु सोमरस जो अर्पण करीत नाही त्याचा मात्र तो कोणी नव्हे - ना आप्त, ना मित्र, ना बंधु. सोमविमुख जनांवर त्याची इतराजी होते व त्याचा तो नाशच करतो. ॥ ६ ॥


न रे॒वता॑ प॒णिना॑ स॒ख्यमिन्द्रोऽ॑सुन्वता सुत॒पाः सं गृ॑णीते ।
आस्य॒ वेदः॑ खि॒दति॒ हन्ति॑ न॒ग्नं वि सुष्व॑ये प॒क्तये॒ केव॑लो भूत् ॥ ७ ॥

न रेवता पणिना सख्यं इंद्रः असुन्वता सुतऽपाः सं गृणीते ।
आ अस्य वेदः खिदति हंति नग्नं वि सुस्वये पक्तये केवलः भूत् ॥ ७ ॥

अत्यंत धनाढ्य परंतु अगदी कंजुष अशांशी किंव सोमविमुख जनांशी सोमप्रिय इंद्र प्रेम ठेवूं इच्छित नाही. इतकेंच नव्हे तर अशा दातृत्वहीनाच्या वैभवाचा तो नूरच उतरून टाकतो व सर्वतोपरी नागवलेल्या स्थितींतच त्याचा अंत करतो. परंतु मनःपूर्वक सोमरस आणि पक्व हविरन्न अर्पण करणार्‍या भक्तांच्या मात्र तो सर्वस्वी आधीन होतो. ॥ ७ ॥


इन्द्रं॒ परेऽ॑वरे मध्य॒मास॒ इन्द्रं॒ यान्तोऽ॑वसितास॒ इन्द्र॑म् ।
इन्द्रं॑ क्षि॒यन्त॑ उ॒त युध्य॑माना॒ इन्द्रं॒ नरो॑ वाज॒यन्तो॑ हवन्ते ॥ ८ ॥

इंद्रं परे अवरे मध्यमासः इंद्रं यांतः अवऽसितासः इंद्रं ।
इंद्रं क्षियंतः उत युध्यमानाः इंद्रं नरः वाजऽयंतः हवंते ॥ ८ ॥

श्रेष्ठ असोत वा कनिष्ठ असोत, सर्वजण इंद्रालाच हांक मारतात. मध्यम स्थितींतेल लोकही इंद्राचीच प्रार्थना करतात. उद्योग करीत असलेले व स्वस्थ बसलेले लोकही इंद्रालाच आळवितात. सुखवस्तु लोक व लढाईवर गेलेले सैनिक हेही इंद्रासच पाचारण करतात आणि सत्त्वसामर्थ्याकरितां झटणारे शूर पुरुषसुद्धां इंद्राचाच धांवा करतात. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २६ ( परमात्मन्, वामदेव साक्षात्कार सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


अ॒हं मनु॑रभवं॒ सूर्य॑श्चा॒हं क॒क्षीवाँ॒ ऋषि॑रस्मि॒ विप्रः॑ ।
अ॒हं कुत्स॑मार्जुने॒यं न्यृञ्जेऽ॒हं क॒विरु॒शना॒ पश्य॑ता मा ॥ १ ॥

अहं मनुः अभवं सूर्यः च अहं कक्षीवान् ऋषिः अस्मि विप्रः ।
अहं कुत्सं आर्जुनेयं नि ऋंजे अहं कविः उशना पश्यता मा ॥ १ ॥

पूर्वी मीच मनु झालो होतों. सूर्य मीच आणि महाबुद्धिमान असा कक्षीवान ऋषि तोही मीच. अर्जुनीचा पुत्र कुत्स तो मी व उशना कविही मीच- माझ्याकडे पहा. ॥ १ ॥


अ॒हं भूमि॑मददा॒मार्या॑या॒हं वृ॒ष्टिं दा॒शुषे॒ मर्त्या॑य ।
अ॒हम॒पो अ॑नयं वावशा॒ना मम॑ दे॒वासो॒ अनु॒ केत॑मायन् ॥ २ ॥

अहं भूमिं अददां आर्याय अहं वृष्टिं दाशुषे मर्त्याय ।
अहं अपः अनयं वावशानाः मम देवासः अनु केतं आयन् ॥ २ ॥

सर्व देश मी आर्यांना दिला आहे. दानशूर भाविक जनांकरितां पर्जन्यवृष्टि मी केली. धों धों शब्द करून वाहणार्‍या उदकांना वाट मींच करून देली आणि माझ्याच ईश्वरी संकेताप्रमाणें देव वागत आले आहेत. ॥ २ ॥


अ॒हं पुरो॑ मन्दसा॒नो व्यै॑रं॒ नव॑ सा॒कं न॑व॒तीः शम्ब॑रस्य ।
श॒त॒त॒मं वे॒श्यं स॒र्वता॑ता॒ दिवो॑दासमतिथि॒ग्वं यदाव॑म् ॥ ३ ॥

अहं पुरः मंदसानः वि ऐरं नव साकं नवतीः शम्बरस्य ।
शतऽतमं वेश्यं सर्वताता दिवःऽदासं अतिथिऽग्वं यत् आवं ॥ ३ ॥

हर्षनिर्भर होऊन शंबर दानवाची नव्याण्णवची नव्याण्णव तटबंदी नगरें मीच कोसळून दिलीं. परंतु शततमाचे स्थळ मात्र पूर्णसुखाच्या धामीं प्रविष्ट करून दिले आणि दिवोदास व अतिथिग्व ह्यांचे रक्षण केले. ॥ ३ ॥


प्र सु ष विभ्यो॑ मरुतो॒ विर॑स्तु॒ प्र श्ये॒नः श्ये॒नेभ्य॑ आशु॒पत्वा॑ ।
अ॒च॒क्रया॒ यत्स्व॒धया॑ सुप॒र्णो ह॒व्यं भर॒न्मन॑वे दे॒वजु॑ष्टम् ॥ ४ ॥

प्र सु सः विऽभ्यः मरुतः विः अस्तु प्र श्येनः श्येनेभ्यः आशुऽपत्वा ।
अचक्रया यत् स्वधया सुपर्णः हव्यं भरन् मनवे देवऽजुष्टं ॥ ४ ॥

मरुतांनो, सर्व पक्षिगणांमध्ये तोच पक्षी श्रेष्ठ असो. सर्व श्येन पक्ष्यांमध्येंसुद्धां तो अतित्वरेनें उड्डाण करणारा श्येनच श्रेष्ठ असो. पहा, रथाप्रमाणे ज्याला चाकांची मुळीं गरजच लागत नाही अशा आपल्या आंगच्या जोमानें त्या पक्षिराजानें, देवांनीही ज्याच्यावर भुलुन पडावें असें सोमरूपी हव्य मानवांकरितां त्यानें, खाली आणले. ॥ ४ ॥


भर॒द्यदि॒ विरतो॒ वेवि॑जानः प॒थोरुणा॒ मनो॑जवा असर्जि ।
तूयं॑ ययौ॒ मधु॑ना सो॒म्येनो॒त श्रवो॑ विविदे श्ये॒नो अत्र॑ ॥ ५ ॥

भरत् यदि विः अतः वेविजानः पथा अरुणा मनःऽजवा असर्जि ।
तूयं ययौ मधुना सोम्येन उत श्रवः विविदे श्येनः अत्र ॥ ५ ॥

सर्वांना भयानें कंपित करणार्‍या त्या पक्ष्यानें जेव्हां तेथून सोम हरण केला तेव्हां तो मनोवेगानें उडणारा पक्षी विस्तीर्ण अशा आकाशमार्गानें तडक निघाला व मधुर सोमरस घेऊन फारच त्वरेनें उडत चालला आणि येथें मृत्युलोकीं सोमरस आणल्याचें महद्यश त्या श्येन पक्ष्यास मिळाले. ॥ ५ ॥


ऋ॒जी॒पी श्ये॒नो दद॑मानो अं॒शुं प॑रा॒वतः॑ शकु॒नो म॒न्द्रं मद॑म् ।
सोमं॑ भरद्दादृहा॒णो दे॒वावा॑न्दि॒वो अ॒मुष्मा॒दुत्त॑रादा॒दाय॑ ॥ ६ ॥

ऋजीपी श्येनः ददमानः अंशुं परावतः शकुनः मंद्रं मदं ।
सोमं भरत् दादृहाणः देवऽवान् दिवः अमुष्मात् उत्ऽतरात् आऽदाय ॥ ६ ॥

नीट सरळ उड्डाण करणार्‍या त्या श्येनानें अत्यंत दूरच्या अशा स्वर्ग लोकांतून ती हर्षकारक उल्लासकारक सोमवल्ली घेऊन व गवींत घट्ट धरून त्या देवप्रिय पक्ष्यानें अत्युच्च द्युलोकांतून उचलून येथें आणली. ॥ ६ ॥


आ॒दाय॑ श्ये॒नो अ॑भर॒त्सोमं॑ स॒हस्रं॑ स॒वाँ अ॒युतं॑ च सा॒कम् ।
अत्रा॒ पुरं॑धिरजहा॒दरा॑ती॒र्मदे॒ सोम॑स्य मू॒रा अमू॑रः ॥ ७ ॥

आऽदाय श्येनः अभरत् सोमं सहस्रं सवान् अयुतं च साकं ।
अत्र पुरंऽधिः अजहात् अरातीः मदे सोमस्य मूराः अमूरः ॥ ७ ॥

श्येन पक्ष्यानें सोमवल्ली उचलून हजारों किंबहुना लक्षावधि सोमसवनांचे श्रेय घेऊन ती येथें भूलोकीं आणली, तेव्हां सोमाच्या हर्षभरांत त्या प्रज्ञाशाली आणि जडातीत पक्षानें अधार्मिकांस जडमूढ करून टाकून दिलें. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २७ (श्येन सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप् 0


गर्भे॒ नु सन्नन्वे॑षामवेदम॒हं दे॒वानां॒ जनि॑मानि॒ विश्वा॑ ।
श॒तम् मा॒ पुर॒ आय॑सीररक्ष॒न्नध॑ श्ये॒नो ज॒वसा॒ निर॑दीयम् ॥ १ ॥

गर्भे नु सन् अनु एषां अवेदं अहं देवानां जनिमानि विश्वा ।
शतं मा पुर आयसीः अरक्षन् अध श्येनः जवसा निः अदीयं ॥ १ ॥

गर्भामध्ये असतांनाच मला ह्या देवांचे एकंदर जन्म अवगत झाले आहेत. आणि लोखंडाच्या शेंकडो कपाटांत जरी मला जतन करून ठेवलें होतें तरी मी श्येन पक्षी त्यांतून झपाट्यानें उडून बाहेर पडलो. ॥ १ ॥


न घा॒ स मामप॒ जोषं॑ जभारा॒भीमा॑स॒ त्वक्ष॑सा वी॒र्येण ।
ई॒र्मा पुरं॑धिरजहा॒दरा॑तीरु॒त वाताँ॑ अतर॒च्छूशु॑वानः ॥ २ ॥

न घ सः मां अप जोषं जभार अभि ईं आस त्वक्षसा वीर्येण ।
ईर्मा पुरंऽधिः अजहात् अरातीः उत वातान् अतरत् शूशुवानः ॥ २ ॥

त्याच्यानें माझा पुरता मोड करवलाच नाही. मी मात्र उलट त्याला आपल्या उज्ज्वल तेजानें आणि वीर्यभरानें रगडून टाकले. ह्याप्रमाणे त्या संततगति आणि महाबुद्धिशाली पक्ष्यानें अधार्मिकांस दूर झुगारून दिले व स्वबलानें स्फुरण पावून वायूलाही मागे टाकले. ॥ २ ॥


अव॒ यच्छ्ये॒नो अस्व॑नी॒दध॒ द्योर्वि यद्यदि॒ वात॑ ऊ॒हुः पुरं॑धिम् ।
सृ॒जद्यद॑स्मा॒ अव॑ ह क्षि॒पज्ज्यां कृ॒शानु॒रस्ता॒ मन॑सा भुर॒ण्यन् ॥ ३ ॥

अव यत् श्येनः अस्वनीत् अध द्योः वि यत् यदि वा अत ऊहुः पुरंऽधिं ।
सृजत् यत् अस्मै अव ह क्षिपत् ज्यां कृशानुः अस्ता मनसा भुरण्यन् ॥ ३ ॥

त्या श्येनपक्ष्याने द्यूलोकाच्या खालच्या प्रदेशी आल्यावर मोठ्यानें शब्द केला व त्या बुद्धिवर्धक सोमरसाला भक्तजन आपआपल्या गृही घेऊन गेले. इतक्यांत सोमवल्लीची राखण करणार जो कृशानु नांवाचा धनुर्धर होता त्यानें मनांतल्या मनांत जळफळून जाऊन त्या श्येनपक्ष्यावर धनुष्याची प्रत्यंचा झाडली आणि बाणही मारला. ॥ ३ ॥


ऋ॒जि॒प्य ई॒मिन्द्रा॑वतो॒ न भु॒ज्युं श्ये॒नो ज॑भार बृह॒तो अधि॒ ष्णोः ।
अ॒न्तः प॑तत् पत॒त्र्यस्य प॒र्णमध॒ याम॑नि॒ प्रसि॑तस्य॒ तद्वेः ॥ ४ ॥

ऋजिप्यः ईं इंद्रऽवतः न भुज्युं श्येनः जभार बृहतः अधि स्णोः ।
अंतरिति पतत् पतत्रि अस्य पर्णं अध यामनि प्रऽसितस्य तत् वेरिति वेः ॥ ४ ॥

अगदी सरळरेषेंत उडणार्‍या त्या श्येन पक्ष्यानें, भुज्युला अश्विदेवांनी संभाळून आणले त्याप्रमाणे इंद्रलोकाच्या अत्युच्च शिखरावरून ह्या सोमवल्लीला भूलोकी आणले. त्यावेळेस मार्गामध्यें कृशानूनें हल्ला केल्यामुळें त्या पक्ष्याच्या पंखांतील एक पीस तुटून खाली पडलें. ॥ ४ ॥


अध॑ श्वे॒तं क॒लशं॒ गोभि॑र॒क्तमा॑पिप्या॒नं म॒घवा॑ शु॒क्रमन्धः॑ ।
अ॒ध्व॒र्युभिः॒ प्रय॑तं॒ मध्वो॒ अग्र॒मिन्द्रो॒ मदा॑य॒ प्रति॑ ध॒त्पिब॑ध्यै॒ शूरो॒ मदा॑य॒ प्रति॑ ध॒त्पिब॑ध्यै ॥ ५ ॥

अध श्वेतं कलशं गोभिः अक्तं आऽपिप्यानं मघऽवा शुक्रं अंधः ।
अध्वर्युऽभिः प्रऽयतं मध्वः अग्रं इंद्रः मदाय प्रति धत् पिबध्यै शूरः मदाय प्रति धत् पिबध्यै ॥ ५ ॥

तर आतां दिव्यैश्वर्य संपन्न भगवान इंद्र, हा चांदीचा शुभ्रकलश हातीं घेऊन दुग्धमिश्रित पौष्टिक आणि तेजस्वी पेय, अध्वर्यूंनी नम्रपणानें अर्पण केलेल्या मधुर सोमाचें सार असें हे पेय, पिऊन हर्षभरित होण्याकरितां हातीं घेवो, - तो महावीर इंद्र सोमप्राशन करून आनंदमग्न होण्यकरितां हा चषक हाती घेवो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २८ (इंद्रासोम सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - इंद्रासोम : छंद - त्रिष्टुप्


त्वा यु॒जा तव॒ तत्सो॑म स॒ख्य इन्द्रो॑ अ॒पो मन॑वे स॒स्रुत॑स्कः ।
अह॒न्नहि॒मरि॑णात्स॒प्त सिन्धू॒नपा॑वृणो॒दपि॑हितेव॒ खानि॑ ॥ १ ॥

गर्भे नु सन् अनु एषां अवेदं अहं देवानां जनिमानि विश्वा ।
शतं मा पुर आयसीः अरक्षन् अध श्येनः जवसा निः अदीयं ॥ १ ॥

हे सोमरसा, खुद्द इंद्रानें तुझ्याशी युक्त होऊन, तुझे सख्य संपादन करून मनुष्यमात्रांच्या हितार्थ, नद्यांचे ओघ वाहतील असे केले. त्यानें अहिचा वध करून सात महानद्यांना बंधमुक्त केलें, आणि ज्ञानेंद्रियांची द्वारें झांकून गेल्याप्रमाणें झाली होती ती खुली केली. ॥ १ ॥


त्वा यु॒जा नि खि॑द॒त्सूर्य॒स्येन्द्र॑श्च॒क्रं सह॑सा स॒द्य इ॑न्दो ।
अधि॒ ष्णुना॑ बृह॒ता वर्त॑मानं म॒हो द्रु॒हो अप॑ वि॒श्वायु॑ धायि ॥ २ ॥

न घ सः मां अप जोषं जभार अभि ईं आस त्वक्षसा वीर्येण ।
ईर्मा पुरंऽधिः अजहात् अरातीः उत वातान् अतरत् शूशुवानः ॥ २ ॥

हे आल्हाददायक सोमरसा, तुला आपल्यांत मिळवून घेऊन इंद्रानें झपाट्यासरशी सूर्याच्या रथाचें चक्र एकदम दाबून धरले, आणि परम उग्र अशा आकाशशेखरामुळे (सूर्यामुळें) जे विश्वजीवित्व येथें वावरत आहे त्याला मानवद्वेष्ट्या शत्रूच्या तावडींतून सोडविलें. ॥ २ ॥


अह॒न्निन्द्रो॒ अद॑हद॒ग्निरि॑न्दो पु॒रा दस्यू॑न्म॒ध्यंदि॑नाद॒भीके॑ ।
दु॒र्गे दु॑रो॒णे क्रत्वा॒ न या॒तां पु॒रू स॒हस्रा॒ शर्वा॒ नि ब॑र्हीत् ॥ ३ ॥

अव यत् श्येनः अस्वनीत् अध द्योः वि यत् यदि वा अत ऊहुः पुरंऽधिं ।
सृजत् यत् अस्मै अव ह क्षिपत् ज्यां कृशानुः अस्ता मनसा भुरण्यन् ॥ ३ ॥

हे चित्ताभिराम सोमा, प्राचीन काळीं इंद्रानें मध्यान्ह होण्यापूर्वींच दस्यूंचा वध केला, त्यावेळेस त्या अधार्मिकांना अग्निदेवानें जाळून भस्म करून टाकले. निबिड अरण्यांना आणि गांवातून घरांतूनसुद्धां त्या दुष्टांनी जणोंकाय आपल्या कर्तबगारीनेंच प्रवेश करून घेतला होता. असे असतांना त्यांच्या पैकी सहस्रावधी दुष्टांचा इंद्रानें आपल्या अशनीच्या तडाक्यानें संहार करून टाकला. ॥ ३ ॥


विश्व॑स्मात्सीमध॒माँ इ॑न्द्र॒ दस्यू॒न्विशो॒ दासी॑रकृणोरप्रश॒स्ताः ।
अबा॑धेथा॒ममृ॑णतं॒ नि शत्रू॒नवि॑न्देथा॒मप॑चितिं॒ वध॑त्रैः ॥ ४ ॥

ऋजिप्यः ईं इंद्रऽवतः न भुज्युं श्येनः जभार बृहतः अधि स्णोः ।
अंतरिति पतत् पतत्रि अस्य पर्णं अध यामनि प्रऽसितस्य तत् वेरिति वेः ॥ ४ ॥

हे इंद्रा, त्या नीच धर्मविहीनांना, त्या धर्मभ्रष्ट जातींना तूं सर्वांपेक्षाही निंद्य स्थितीस आणून पोंहचविलेस. हे इंद्रसोमहो, धर्मनीतिविहीन शत्रूंना ह्याचप्रमाणे जर्जर करा, त्यांचा नायनाट करा. तुम्ही दोघेही आपल्या पापविनाशक आयुधांच्या योगानें सर्वांना वंद्य झालां आहांत. ॥ ४ ॥


ए॒वा स॒त्यं म॑घवाना यु॒वं तदिन्द्र॑श्च सोमो॒र्वमश्व्यं॒ गोः ।
आद॑र्दृत॒मपि॑हिता॒न्यश्ना॑ रिरि॒चथुः॒ क्षाश्चि॑त्ततृदा॒ना ॥ ५ ॥

अध श्वेतं कलशं गोभिः अक्तं आऽपिप्यानं मघऽवा शुक्रं अंधः ।
अध्वर्युऽभिः प्रऽयतं मध्वः अग्रं इंद्रः मदाय प्रति धत् पिबध्यै शूरः मदाय प्रति धत् पिबध्यै ॥ ५ ॥

दिव्यैश्वर्यसंपन्न देवांनो, इंद्र आणि हे सोमा, तुम्ही उभयतांनी, बुद्धिरूप अश्वाचें बंधनगृह आणि प्रकाशरूप धेनूंना छपवून ठेवण्याच्या जागा - ज्या अगदी चिणून बंद करून टाकल्या होत्या - त्यांना अशनीनें फोडून मोकळ्या केल्यात आणि अंधकाराला विदारण करून सर्व प्रदेश भक्तांना खुला करून दिलात. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २९ (इंद्रः सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


आ न॑ स्तु॒त उप॒ वाजे॑भिरू॒ती इन्द्र॑ या॒हि हरि॑भिर्मन्दसा॒नः ।
ति॒रश्चि॑द॒र्यः सव॑ना पु॒रूण्या॑ङ्गू॒ाषेभि॑र्गृणा॒नः स॒त्यरा॑धाः ॥ १ ॥

आ नः स्तुतः उप वाजेभिः ऊती इंद्र याहि हरिऽभिः मंदसानः ।
तिरः चित् अर्यः सवना पुरूणि आंगूषेभिः गृणानः सत्यऽराधाः ॥ १ ॥

हे इंद्रा, आम्ही तुझे यशोगायन केले आहे तर तूं हृष्टचित्त होऊन सत्त्वसामर्थ्ये आणि रक्षणसामग्री ह्यांच्यासह आपल्या हरिद्वर्ण अश्वांवर आरोहण करून आमच्याकडे ये आणि वाटेंत शत्रूंनी जरी सोमसवन समारंभ सुरू केले असले तरी ते सोडून आमच्याचकडे आगमन कर. तुझे संकीर्तन उच्च स्वरांत चालत असतें आणि तुझा कृपाप्रसाद कधींही असत्य होत नाही. ॥ १ ॥


आ हि ष्मा॒ याति॒ नर्य॑श्चिकि॒त्वान्हू॒यमा॑नः सो॒तृभि॒रुप॑ य॒ज्ञम् ।
स्वश्वो॒ यो अभी॑रु॒र्मन्य॑मानः सुष्वा॒णेभि॒र्मद॑ति॒ सं ह॑ वी॒रैः ॥ २ ॥

आ हि स्म याति नर्यः चिकित्वान् हूयमानः सोतृऽभिः उप यज्ञं ।
सुऽअश्वः यः अभीरुः मन्यमानः सुष्वानेभिः मदति सं ह वीरैः ॥ २ ॥

हा मानवहितकारी व सकलांना निरीक्षण करणारा देव सोमयाजकांनी निमंत्रण करतांच यज्ञसामारंभास तत्काळ येतो. ज्याचा दिव्य अश्व अत्यंत उमदा आहे, ज्याला भिती म्हणून स्पर्शही करीत नाही, उत्तम रीतीनें सोम तयार करणारे भक्त ज्याची अतिशय प्रशंसा करीत असतात असा इंद्र आपल्या वीरगणांसह राहून नेहमी सोमरसानें आनंदमग्न होतो. ॥ २ ॥


श्रा॒वयेद॑स्य॒ कर्णा॑ वाज॒यध्यै॒ जुष्टा॒मनु॒ प्र दिशं॑ मन्द॒यध्यै॑ ।
उ॒द्वा॒वृ॒षा॒णो राध॑से॒ तुवि॑ष्मा॒न्कर॑न्न॒ इन्द्रः॑ सुती॒र्थाभ॑यं च ॥ ३ ॥

श्रावय इत् अस्य कर्णा वाजयध्यै जुष्टां अनु प्र दिशं मंदयध्यै ।
उत्ऽववृषाणः राधसे तुविष्मान् करत् नः इंद्रः सुऽतीर्था अभयं च ॥ ३ ॥

इंद्राने त्याला आवडेल त्याप्रमाणे सोमरस ग्रहण करून उल्लसित व्हावे आणि अपल्या सत्वसामर्थ्याचा पराक्रम गाजवावा म्हणून हे स्तोत्रकर्त्या, तूं त्याच्या कानावर आपली स्तुति जाईल असे कर; म्हणजे वरप्रसादांचा केवळ पाऊस पाडणारा असा जो महाप्रतापी इंद्र तो आम्हांवर कृपानुग्रह करण्यासाठी आम्हांस सर्व कांही सुलभ करून देऊन पूर्णपणें निर्भय करील. ॥ ३ ॥


अच्छा॒ यो गन्ता॒ नाध॑मानमू॒ती इ॒त्था विप्रं॒ हव॑मानं गृ॒णन्त॑म् ।
उप॒ त्मनि॒ दधा॑नो धु॒र्या३॑शून्स॒हस्रा॑णि श॒तानि॒ वज्र॑बाहुः ॥ ४ ॥

अच्छ यः गंता नाधमानं ऊती इत्था विप्रं हवमानं गृणंतं ।
उप त्मनि दधानः धुरि आशून् सहस्राणि शतानि वज्रऽबाहुः ॥ ४ ॥

खरोखर काकुळतीस येणार्‍या भक्तांकडे किंवा धांवा करून स्तुति करणार्‍या ज्ञानी स्तोत्रकर्त्याकडेच तो जातो. आणि एवढ्याकरितांच हा वज्रधर भगवान शेंकडो किंबहुना हजारो घोडे आपण होऊन रथाला जोडून अगदीं सज्ज होऊन बसला आहे. ॥ ४ ॥


त्वोता॑सो मघवन्निन्द्र॒ विप्रा॑ व॒यं ते॑ स्याम सू॒रयो॑ गृ॒णन्तः॑ ।
भे॒जा॒नासो॑ बृ॒हद्दि॑वस्य रा॒य आ॑का॒य्यस्य दा॒वने॑ पुरु॒क्षोः ॥ ५ ॥

त्वाऽऊतासः मघऽवन् इंद्र विप्राः वयं ते स्याम सूरयः गृणंतः ।
भेजानासः बृहत्ऽदिवस्य रायः आऽकाय्यस्य दावने पुरुक्षोः ॥ ५ ॥

दिवैश्वर्यसंपन्न इंद्रा, तुझ्या रक्षणछत्राखाली राहून गुणानुवाद गाणारे आम्ही विप्र अधिकारी होऊन तुझे म्हणून राहूं असें घडो. आणि सर्वस्वी स्तवनार्ह, अतुलबल व महदाकाशस्थ असा जो तूं त्या तुझ्या औदार्यामुळें आम्ही दिव्य‍ऐश्वर्याचा उपभोग घेऊं असें होवो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३० (उषा-इंद्र सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - उषा, इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


नकि॑रिन्द्र॒ त्वदुत्त॑रो॒ न ज्यायाँ॑ अस्ति वृत्रहन् । नकि॑रे॒वा यथा॒ त्वम् ॥ १ ॥

नकिः इंद्र त्वत् उत्ऽतरः न ज्यायान् अस्ति वृत्रहन् । नकिः एवा यथा त्वं ॥ १ ॥

हे इंद्रा, हे वृत्रनाशना, तुझ्यापेक्षां उत्कृष्ट किंवा श्रेष्ठ असा तर कोणी नाहींच परंतु तुझ्यासारखा सुद्धां कोणीही नाही. ॥ १ ॥


स॒त्रा ते॒ अनु॑ कृ॒ष्टयो॒ विश्वा॑ च॒क्रेव॑ वावृतुः । स॒त्रा म॒हाँ अ॑सि श्रु॒तः ॥ २ ॥

सत्रा ते अनु कृष्टयः विश्वा चक्राऽइव ववृतुः । सत्रा महान् असि श्रुतः ॥ २ ॥

खरोखर सर्व मनुष्यप्राणी तुझ्याच अनुरोधानें चक्राप्रमाणें फिरत असतात, तेव्हां खरोखरच तूं परमथोर आणि विख्यात होय. ॥ २ ॥


विश्वे॑ च॒नेद॒ना त्वा॑ दे॒वास॑ इन्द्र युयुधुः । यदहा॒ नक्त॒माति॑रः ॥ ३ ॥

विश्वे चन इत् अना त्वा देवासः इंद्र युयुधुः । यत् अहा नक्तं आ अतिरः ॥ ३ ॥

सर्व देव जरी असले तरी हे इंद्रा त्यांनी तुझ्याशी युद्ध केलें असें घडलेंच नाही, कारण रात्रीचा काळाकुट्ट अंधकार दिनप्रकाशाने तूंच नष्ट करून टाकलास. ॥ ३ ॥


यत्रो॒त बा॑धि॒तेभ्य॑श्च॒क्रं कुत्सा॑य॒ युध्य॑ते । मु॒षा॒य इ॑न्द्र॒ सूर्य॑म् ॥ ४ ॥

यत्र उत बाधितेभ्यः चक्रं कुत्साय युध्यते । मुषायः इंद्र सूर्यं ॥ ४ ॥

आणि हे इंद्रा, पीडित झालेल्या जनाच्या हितार्थ आणि युद्ध करणार्‍या कुत्साकरितां तूं सूर्याच्या रथाचे चक्र हरण केलेंस. ॥ ४ ॥


यत्र॑ दे॒वाँ ऋ॑घाय॒तो विश्वाँ॒ अयु॑ध्य॒ एक॒ इत् । त्वमि॑न्द्र व॒नूँरह॑न् ॥ ५ ॥

यत्र देवान् ऋघायतः विश्वान् अयुध्यः एकः इत् । त्वं इंद्र वनून् अहन् ॥ ५ ॥

हे इंद्रा, देवांना त्रस्त करून सोडणार्‍या यच्चावत् घातकी अधम शत्रूशी तू एकट्याने युद्ध करून त्यांना ठार मारून टाकलेस. ॥ ५ ॥


यत्रो॒त मर्त्या॑य॒ कमरि॑णा इन्द्र॒ सूर्य॑म् । प्रावः॒ शची॑भि॒रेत॑शम् ॥ ६ ॥

यत्र उत मर्त्याय कं अरिणाः इंद्र सूर्यं । प्र आवः शचीभिः एतशं ॥ ६ ॥

हे इंद्रा, मनुष्यमात्रांकरितां त्यांच्याच सुखार्थ तूं सूर्याला आविष्कृत केलेंस आणि आपल्या शक्तीनी एतशाचे संरक्षण केलेंस. ॥ ६ ॥


किमादु॒तासि॑ वृत्रह॒न्मघ॑वन्मन्यु॒मत्त॑मः । अत्राह॒ दानु॒माति॑रः ॥ ७ ॥

किं आत् उत असि वृत्रऽहन् मघऽवन् मन्युमत्ऽतमः । अत्र अह दानुं आतिरः ॥ ७ ॥

हे वृत्रनाशना, दिव्यैश्वर्यसंपन्ना, म्हणूनच तुला अत्यंत ओजस्वी मनाचा म्हणतात ना ? आणि म्हणूनच तूं दानवांचा संहार केलास ना ? ॥ ७ ॥


ए॒तद्धेदु॒त वी॒र्य१मिन्द्र॑ च॒कर्थ॒ पौंस्य॑म् । स्त्रियं॒ यद्दु॑र्हणा॒युवं॒ वधी॑र्दुहि॒तरं॑ दि॒वः ॥ ८ ॥

एतत् घ इत् उत वीर्यं इंद्र चकर्थ पौंस्यं । स्त्रियं यत् दुःऽहनायुवं वधीः दुहितरं दिवः ॥ ८ ॥

आणि हे इंद्रा तूं पराक्रमाचा हा एक पुरुषार्थ केलास कीं दुसर्‍याचा घात करूं पाहणारी द्यूची उषा नावाची स्त्री तिचा तूं नाश करून टाकलास. ॥ ८ ॥


दि॒वश्चि॑द्धा दुहि॒तरं॑ म॒हान्म॑ही॒यमा॑नाम् । उ॒षास॑मिन्द्र॒ सं पि॑णक् ॥ ९ ॥

दिवः चित् घ दुहितरं महान् महीयमानां । उषसं इंद्र सं पिणक् ॥ ९ ॥

तूं थोरच, परंतु आपणच काय तें मोठे आहों असे उद्दामपणानें समजणारी जी द्यूची मुलगी उषा तिला हे इंद्रा तूं शासन केलेंस. ॥ ९ ॥


अपो॒षा अन॑सः सर॒त्सम्पि॑ष्टा॒दह॑ बि॒भ्युषी॑ । नि यत्सीं॑ शि॒श्नथ॒द्वृषा॑ ॥ १० ॥

अप उषा अनसः सरत् संऽपिष्टात् अह बिभ्युषी । नि यत् सीं शिश्नथत् वृषा ॥ १० ॥

जेव्हां वीरश्रेष्ठ इंद्रानें तिच्या रथाचा चुराडा केला तेव्हां घाबरून त्या मोडलेल्या रथांतून ती पळून गेली. ॥ १० ॥


ए॒तद॑स्या॒ अनः॑ शये॒ सुस॑म्पिष्टं॒ विपा॒श्या । स॒सार॑ सीं परा॒वतः॑ ॥ ११ ॥

एतत् अस्या अनः शये सुऽसंपिष्टं विऽपाशि आ । ससार सीं पराऽवतः ॥ ११ ॥

राई एवढे तुकडे होऊन गेलेला तो तिचा रथ विपाशा नदीच्या कांठीच पडला आणि ती उषा मात्र तेथून दूर पळून गेली. ॥ ११ ॥


उ॒त सिन्धुं॑ विबा॒ल्यं वितस्था॒नामधि॒ क्षमि॑ । परि॑ ष्ठा इन्द्र मा॒यया॑ ॥ १२ ॥

उत सिंधुं विऽबाल्यं विऽतस्थानां अधि क्षमि । परि स्थाः इंद्र मायया ॥ १२ ॥

आणि इंद्रा, जिचा ओघ लहान सहान नव्हे, उफाड्याचा आहे, व जिचे प्रवाह निरनिराळे वहात आहेत अशा सिंधु नदीची स्थापना आपल्या अतर्क्य शक्तीनें पृथ्वीवर तूंच केलीस. ॥ १२ ॥


उ॒त शुष्ण॑स्य धृष्णु॒या प्र मृ॑क्षो अ॒भि वेद॑नम् । पुरो॒ यद॑स्य सम्पि॒णक् ॥ १३ ॥

उत शुष्णस्य धृष्णुऽया प्र मृक्षः अभि वेदनं । पुरः यत् अस्य संऽपिणक् ॥ १३ ॥

आणि ज्या शुष्ण नामक दानवाच्या तटबंदी नगराचा तूं विध्वंस केलास त्या शुष्णाच्या वैभवाचा तोराही तूं धडाक्यासरशी पार उतरून टाकलास. ॥ १३ ॥


उ॒त दा॒सं कौ॑लित॒रं बृ॑ह॒तः पर्व॑ता॒दधि॑ । अवा॑हन्निन्द्र॒ शम्ब॑रम् ॥ १४ ॥

उत दासं कौलिऽतरं बृहतः पर्वतात् अधि । अव अहन् इंद्र शम्बरं ॥ १४ ॥

तसेंच कुलितराचा पुत्र जो शंबर नांवाचा अधार्मिक दस्यु त्याला हे इंद्रा उंच पर्वतावरून खाली आपटून तूं मारून टाकलेंस. ॥ १४ ॥


उ॒त दा॒सस्य॑ व॒र्चिनः॑ स॒हस्रा॑णि श॒ताव॑धीः । अधि॒ पञ्च॑ प्र॒धीँरि॑व ॥ १५ ॥

उत दासस्य वर्चिनः सहस्राणि शता अवधीः । अधि पंच प्रधीन्ऽइव ॥ १५ ॥

शिवाय वर्चि नामक दस्यूचें पांच लाख सैन्य चाकाच्या कड्या प्रमाणे बंदोबस्तानें राहिलेले होते, परंतु त्या सर्व सैन्याचा तूं अगदीं मोड करून टाकलास. ॥ १५ ॥


उ॒त त्यं पु॒त्रम॒ग्रुवः॒ परा॑वृक्तं श॒तक्र॑तुः । उ॒क्थेष्विन्द्र॒ आभ॑जत् ॥ १६ ॥

उत त्यं पुत्रं अग्रुवः पराऽवृक्तं शतऽक्रतुः । उक्थेषु इंद्र आ अभजत् ॥ १६ ॥

आणि अग्रु नामक एका स्त्रीचा पुत्र परावृज लपून होता, त्याचे नांव अनंतशक्ति इंद्रानें सामसूक्तांमध्यें कायमचे राहील असें केलें. ॥ १६ ॥


उ॒त त्या तु॒र्वशा॒यदू॑ अस्ना॒तारा॒ शची॒पतिः॑ । इन्द्रो॑ वि॒द्वाँ अ॑पारयत् ॥ १७ ॥

उत त्या तुर्वशायदू इति अस्नातारा शचीऽपतिः । इंद्रः विद्वान् अपारयत् ॥ १७ ॥

आणि ज्यांना पाण्यांत बुडी मारतां येत नव्हती असे तुर्वश आणि यदु हे भक्त त्यांना त्या दिव्य शक्तिच्या प्रभूने, त्या सर्वज्ञ इंद्रानें, पैलतीरास पोहोंचवून दिले. ॥ १७ ॥


उ॒त त्या स॒द्य आर्या॑ स॒रयो॑रिन्द्र पा॒रतः॑ । अर्णा॑चि॒त्रर॑थावधीः ॥ १८ ॥

उत त्या सद्यऽ आर्या सरयोः इंद्र पारतः । अर्णा चित्ररथा अवधीः ॥ १८ ॥

पुन्हा हे इंद्रा, अर्ण नामक आणि चित्ररथ हे दोघे आर्य होते तथापि ते दुष्ट असल्यामुळें सरयू नदीच्या पलीकडच्या तीरावर त्यांचा तूं एकदम वध करून टाकलास. ॥ १८ ॥


अनु॒ द्वा ज॑हि॒ता न॑योऽ॒न्धं श्रो॒णं च॑ वृत्रहन् । न तत्ते॑ सु॒म्नमष्ट॑वे ॥ १९ ॥

अनु द्वा जहिता नयः अंधं श्रोणं च वृत्रऽहन् । न तत् ते सुम्नं अष्टवे ॥ १९ ॥

हे वृत्रनाशना देवा, एक आंधळा आणि एक पांगळा अशा दोन अनाथांस कोणी टाकून दिलें होतें त्यांना तूं सुखरूपपणें वाट दाखविलीस, तस्मात् तुझ्या आनंदधामाचा अंतपार कोणास लागणार नाहीं हेंच खरे. ॥ १९ ॥


श॒तम॑श्म॒न्मयी॑नां पु॒रामिन्द्रो॒ व्यास्यत् । दिवो॑दासाय दा॒शुषे॑ ॥ २० ॥

शतं अश्मन्ऽमयीनां पुरां इंद्रः वि आस्यत् । दिवःऽदासाय दाशुषे ॥ २० ॥

शत्रूंच्या चिरेबंदी कोट असलेल्या शेंकडो नगरांची इंद्रानें, आपल्या दिवोदास नांवाच्या भक्तासाठीं धूळधाण उडवूण दिली. ॥ २० ॥


अस्वा॑पयद्द॒भीत॑ये स॒हस्रा॑ त्रिं॒शतं॒ हथैः॑ । दा॒साना॒मिन्द्रो॑ मा॒यया॑ ॥ २१ ॥

अस्वापयत् दभीतये सहस्रा त्रिंशतं हथैः । दासानां इंद्रः मायया ॥ २१ ॥

आणि दभीति नांवाच्या भक्तासाठी आपल्या दिव्य शक्तीनें आणि मारक शस्त्रांनी तीस हजार अधार्मिक दस्यूंना रणांगणावर निजवून तूंच देत आहेस. ॥ २१ ॥


स घेदु॒तासि॑ वृत्रहन्समा॒न इ॑न्द्र॒ गोप॑तिः । यस्ता विश्वा॑नि चिच्यु॒षे ॥ २२ ॥

स घ इत् उत असि वृत्रऽहन् समानः इंद्र गोऽपतिः । यः ता विश्वानि चिच्युषे ॥ २२ ॥

हे वृत्रनाशना इंद्रा, अशा प्रकारचा तूं सर्व मानवांचा सारखाच महाधिपति आहेस. ह्या सर्व भुवनांना सतत तूंच चालना देत असतोस. ॥ २२ ॥


उ॒त नू॒नं यदि॑न्द्रि॒यं क॑रि॒ष्या इ॑न्द्र॒ पौंस्य॑म् । अ॒द्या नकि॒ष्टदा मि॑नत् ॥ २३ ॥

उत नूनं यत् इंद्रियं करिष्याः इंद्र पौंस्यं । अद्या नकिः तत् आ मिनत् ॥ २३ ॥

तसेंच हे इंद्रा, जें जें कंही ईश्वरीसामर्थ्य आणि पौरुष तुं प्रकट केलेंस त्याला आजपर्यंत कोणाच्यानेंही धक्का लाववला नाही. ॥ २३ ॥


वा॒मंवा॑मं त आदुरे दे॒वो द॑दात्वर्य॒मा । वा॒मं पू॒षा वा॒मं भगो॑ वा॒मं दे॒वः करू॑ळती ॥ २४ ॥

वामंऽवामं त आऽदुरे देवः ददातु अर्यमा । वामं पूषा वामं भगः वामं देवः करूळती ॥ २४ ॥

हे नम्र भाविका, उत्कृष्टांतही जे अभिलषणीय प्राप्तव्य आहे तें अर्यमारूपी इंद्रदेव तुला देवो. तोच पूषा, तोच भाग्यदाता देव, तें वांछित प्राप्तव्य, तें उत्तमोत्तम प्राप्तव्य तुला देवो, आणि तोच ’करूळती’ हे नांव धारण करणारा देव तुझें स्पृहणीय ध्येय तुला प्राप्त करून देवो. ॥ २४ ॥


ॐ तत् सत्


GO TOP