|
रुद्रार्थ॥ नमकप्रश्नः ॥हरिः ॐ हा शांतिमंत्र आहे. रुद्राध्याय म्हणण्यापूर्वी हा मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे. या शांतिमंत्रानें मनोभूमिका परिमार्जित झाली- शुद्ध झाली- की त्या शुद्ध झालेल्या मनानें पुढें रुद्रसूक्त म्हणावयाचे- म्हणून हा शांतिमंत्र अवश्य म्हणावा ). ॥ अथ श्री रुद्रप्रश्नः ॥श्री॒ गु॒रु॒भ्यो नमः॒ । ह॒रिः॒ ओ३म् । अनुवाक १ ला
ॐ नम॑स्ते रुद्र म॒न्यव॑ उ॒तोत॒ इष॑वे॒ नमः॑ ।
अर्थ - रुद्र, तुझ्या क्रोधाला मी नमस्कार करतों. (तुझा क्रोध आमच्या शत्रूंच्या बाबतींत चरितार्थ होवो.] तसेंच तुझा बाण आणि तुझे धनुष्य आणि तें धारण करणारे तुझे दोन बाहू यांनाही मी नमस्कार करतों. (या सर्व आयुधांचा उपयोग आमच्या शत्रूंच्या बाबतींत होवो.)
या त॒ इषुः॑ शि॒वत॑मा शि॒वं ब॒भूव॑ ते॒ धनुः॑ । अर्थ - हे रुद्र, अशुभाचा परिहार करणार्या शंकरा, जो हा तुझा बाण शिवतमा बभूव शांत झाला, तसेंच तुझे धनुष्य शांत झाले, त्या शांत झालेल्या धनुर्बाणांनी तूं आम्हांला सुख दे. ॥ २ ॥ या ते॑ रुद्र शि॒वा त॒नूरघो॒राऽपा॑पकाशिनी । तया॑ नस्त॒नुवा॒ शन्त॑मया॒ गिरि॑शन्ता॒भि चा॑कशीहि ॥ ३ ॥ अर्थ - हे रुद्र, तुझी जी प्रसिद्ध तनू ( शरीर, मूर्ति) (रुद्राच्या दोन मूर्ति, तनू प्रसिद्ध आहेत. ''रुद्रोवा एषयदग्नि: तस्यै ते तनुवौ । घोराऽन्या शिवाऽन्या इति") हिंसक मूर्ति ही घोरा तनू, अनुग्राहक मूर्ती ती अघोरा, या उभयविध स्वरूपांतील जी तुझी अघोरा तनू जी अपापकाशिनि - पुण्य प्रकाशिनी म्हणूनच कल्याण करणारी, अशा या तुझ्या कल्याण स्वरूपधारी मूर्तीने तूं आमचें अज्ञान दूर कर. अनंत जन्मांचें संचित नाहींसें करून ब्रह्मज्ञानाला योग्य असें कर. ॥ ३ ॥
यामिषुं॑ गिरिशन्त॒ हस्ते॒ बिभ॒र्ष्यस्त॑वे । अर्थ -गिरीशंत, कैलासनिवासी शंकरा, जो बाण तूं शत्रूवर प्रहार करण्यासाठी धारण केलास तो बाण हे गिरित्र, वेद प्रतिपाद्य, तूं सर्वांशानें शांत कर. पुरुषं अस्मदीयं पुत्रपौत्रादि रूपम्, आमच्या मुलाबाळांचे, भावी संततीचे तसेंच जगत् म्हणजे अस्मदीयम् गो-महीष्यादिकम् प्रहाराम क्षेत्रादिकंच मा हिंसीः, आमची गुरेंवासरे, जमीन जुमला वगैरे स्थावरजंगम संपत्तीचें तू रक्षण कर. ॥ ४ ॥
शि॒वेन॒ वच॑सा त्वा॒ गिरि॒शाच्छा॑ वदामसि । अर्थ - हे गिरिश, तुझी प्राप्ती व्हावी म्हणून चांगल्या शब्दांनीं तुझी मी प्रार्थना करतों. मंगलमय वाणीनें आम्ही प्रार्थना करतों. या प्रार्थनेमुळें आम्ही व आमचे सर्व जग, गाई वगैरे स्थावर जंगम रोगरहित आणि सुमना ( चांगल्या मनाचे) होईल असें कर. ॥ ५ ॥
अध्य॑वोचदधिव॒क्ता प्र॑थ॒मो दैव्यो॑ भि॒षक् । अर्थ - सर्वान् अहीन् सर्प, व्याघ्र वगैरे हिंस्रश्वापदांचा तसेच सर्वाश्च यातुधान्यः म्हणजे राक्षस जातीमध्यें निर्माण झालेल्या सर्व श्रेष्ठ पशुवृत्तींचा, जंभयन् म्हणजे नाश करणारा तूं सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि मुख्य आहेस म्हणून तुला देवांचा वैद्य धन्वंतरी म्हणण्यांत येते. तेव्हां तूं मला आपला असें म्हण. माझ्या बाबतीत तुझी ममत्वबुद्धि निर्माण झाली म्हणजे अर्थातच इतरांचीही ती होईल. या मंत्रात, यातुधान्य हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. नितरां धीयते इति धानी यातयन्ति इति यातयः यातयन्ति दुःखयन्ति निवासेन इति यातुधानी- ( अनंत जन्म सञ्चिताः वासनाः ताः यत्र निधीयन्ते ता: यातुधान्यः) ॥ ६ ॥
अ॒सौ यस्ता॒म्रो अ॑रु॒ण उ॒त ब॒भ्रुः सु॑म॒ङ्गलः॑ । अर्थ - पूर्वींच्या आतापर्यंतच्या मंत्रांत वर्णन केलेल्या परोक्ष शंकराचेच वर्णन आतां प्रत्यक्ष स्वरूपांत करत आहेत. असौ म्हणजे हा वर आकाशांमध्यें दिसणारा ताम्रः म्हणजे अरुण वर्णाचा सूर्य हाच आदित्यरूप रुद्र उदयाच्या वेळीं ताम्र, उदयानंतर अरुण वर्णाचा व त्यानंतर बभ्रुः म्हणजे पिंगल वर्णाचा आणि सुमंगलः म्हणजे सम्यक् चांगल्या तर्हेनें मंगल करणारा किंवा अनेक वर्णांचा असा हा सूर्य स्वरूपामध्यें प्रत्यक्ष रुद्रच आहे. तसेंच आजूबाजूच्या सर्व दशदिशांना व्यापून उरणारे इतर अनंत जे रुद्र आहेत, सूर्याचें किरण, हें सर्व जग व्यापतात. म्हणून त्यांना रुद्र असेही म्हटलें आहे. या सर्वांचा हेडः म्हणजे क्रोध ईमहे अवेमहे भक्तिपूर्वक नमस्कार करून त्यांचा क्रोध दूर करतो. ॥ ७ ॥
अ॒सौ यो॑ऽव॒सर्प॑ति॒ नील॑ग्रीवो॒ विलो॑हितः ।
अर्थ:- जो नीलमीव नीलकंठ वर्णाचा रुद्र तोच विशेष करून लोहित वर्णाचा, आरक्त वर्णाचा अवसर्पति - आकाशांत संचार करतो. आकाशांत संचार करणार्या सूर्यरूपी रुद्राला म्हणूनच सर्व गोपाः म्हणजे गुराखी आणि उदहार्यः पाणी नेणार्या घटदासी याही पाहूं शकतात. नमो॑ अस्तु॒ नील॑ग्रीवाय सहस्रा॒क्षाय॑ मीढुषे॑ । अथो॒ ये अ॑स्य॒ सत्वा॑नो॒ऽहं तेभ्यो॑ऽकर॒न् नमः॑ ॥ ९ ॥ अर्थ - कालकूट विष प्राशनाने ज्याचा कंठ नीलवर्णाचा झाला आहे अशा शंकराला आणि सहस्राक्ष म्हणजे असंख्य डोळे ज्याला आहेत अशा शंकराला नमस्कार असो. तसेंच याची सेवा करणारे जे सेवक प्राणि त्यांना सुद्धां मी नमस्कार करतों. ॥ ९ ॥
प्रमु॑ञ्च॒ धन्व॑न॒स्त्व-मु॒भयो॒रार्त्नि॑यो॒र्ज्याम् । अर्थ - हे भगवन्, महदैश्वर्यसंपन्न तुझ्या धनुष्याची दोरी सोडून ठेव. आणि तुझ्या हातांत तुझे बाण आहेत तेही टाकून दे. या मंत्रांत आलेल्या ' भगव ' शब्दाचा अर्थ = ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णाम् भग इतीरणा ॥ ॥ १० ॥
अ॒व॒तत्य॒ धनु॒स्तवँ सह॑स्राक्ष॒ शते॑षुधे । अर्थ - हे सहस्राक्ष, हे शतेषुधे, असंख्य भाते असलेल्या हे रुद्रा, तुझ्या धनुष्याची दोरी शिथिल करून तुझ्या बाणांची टोके बोथट कर. आणि आमच्याकडे चांगल्या दृष्टीने पहा आणि आमच्या बाबतीत तूं कल्याणप्रद हो. ॥ ११ ॥
विज्यं॒ धनुः॑ कप॒र्दिनो॒ विश॑ल्यो॒ बाण॑वाꣳ उ॒त । अर्थ - कपर्दिनः जटाधारी शंकराचें धनुष्य, विज्य म्हणजे दोरीपासून अलग झालेलें असे. तसेंच शंकराचे भाते हे बाणरहित होवोत. या शंकराचे बाण भात्यामध्यें ठेवलेले दुसर्याचा वेध करण्याचे बाबतींत असमर्थ ठरोत. तसेंच या शंकराचा निषंगथि - म्हणजे तलवार खड्ग यांचे सामर्थ्य कमी होवो. ॥ १२ ॥
या ते॑ हे॒तिर्मी॑ढुष्टम॒ हस्ते॑ ब॒भूव॑ ते॒ धनुः॑ । अर्थ - हे भक्तवत्सल, भक्तांच्या कामना पूर्ण करणार्या देवा, ज्या तुझ्या हेति म्हणजे धनुष्यादि आयुधें ही शांत करून शांत अशा या तुझ्या आयुधांनी - अनुपद्रवकारी आयुधांनी आमचें या जगात सर्वांपासून रक्षण कर. ॥ १३ ॥
नम॑स्ते अ॒स्त्वायु॑धा॒याना॑तताय धृ॒ष्णवे॑ । अर्थ - हे रुद्र, न ताणलेल्या तुझ्या धनुष्यरूप आयुधाला आणि बाणरूप आयुधाला नमस्कार असो. धैर्यशाली (समर्थ) अशा या तुझ्या बाहूंना नमस्कार असो. ॥ १४ ॥ परि॑ ते॒ धन्व॑नो हे॒तिर॒स्मान्वृ॑णक्तु वि॒श्वतः॑ । अर्थ - हे रुद्र, तुझ्या आयुधाच्या बाणरूप शल्यापासून आमचे रक्षण कर. तुझा भाता आमच्यापासून दूर ठेव. अनुवाक २ रा
पहिल्या अनुवाकात धनुष्यबाण धारण केलेली श्रीशंकराची प्रधानतनु म्हणजे मूर्ति हिचीच प्रामुख्याने स्तुति केली आहे. या पुढील आठही अनुवाकांत श्रीशंकराचे सर्वांतरव्यापित्व व सर्वगामित्व मुख्यतः सांगावयाचे आहे. पुढील अनुवाकामध्यें सर्व मंत्र यजुःस्वरूप आहेत. म्हणजे यजुर्वेदांतर्गत आहेत. हे मंत्र दोन प्रकारचे, मंत्राच्या आरंभीं व शेवटीं "नमः" शब्द असणारे व मंत्राच्या केवळ आरंभीच "नमः" शब्द असणारे अशा दोन्ही स्वरूपांतील म्हणजे उभयतो नमस्कारात्मक (मंत्रादौ मंत्रान्ते च) व अन्यतो नमस्कारात्मक (मंत्रादाऽवेव) असे आहेत. त्यापैकीं सुरुवातीला उभयतो नमस्कारात्मक मंत्र या दुसर्या अनुवाकांत सुरू होत आहेत. नमो॒ हिर॑ण्यबाहवे सेना॒न्ये॑ दि॒शां च॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ १ ॥ अर्थ - सुवर्णनिर्मित अलंकार हे ज्याच्या बाहूमध्यें आहेत अशा व युद्धामध्यें सेना संचलन व नियमन करणारा जो सेनानी त्याचें स्वरूप धारण करणार्या आणि दिशांचा जो अधिपति आहे अशा शंकराला नमस्कार. ॥ १ ॥ नमो॑ वृ॒क्षेभ्यो॒ हरि॑केशेभ्यः पशू॒नां पत॑ये॒ नमो॒ ॥ २ ॥ अर्थ - हिरवीगार पानें ज्या वृक्षाची आहेत त्या वृक्षस्वरूप रुद्राला नमस्कार, आणि पशूंचा म्हणजे सार्या प्राणसूष्टीचा जो पालनकर्ता त्याला नमस्कार. या मंत्रातील वृक्ष शब्द आणि हरिकेश हा शब्द महत्त्वाचा आहे. वृक्ष शब्दाने संसारवृक्ष व हरिकेश शब्दाने त्रिगुण-सत्त्व-रज-तम हे घ्यावयाचे. त्रिगुणोद्भव संसारवृक्ष हा गीतेंत सांगिल्याप्रमाणें उर्ध्वमूलमध:शाखम् । असा आहे. अशा संसाररूप वृक्षस्वरूपी रुद्राला नमस्कार या मंत्रांत अभिप्रेत आहे. ॥ २ ॥ नमः॑ स॒स्पिञ्ज॑राय॒ त्विषी॑मते पथी॒नां पत॑ये॒ नमो॒ ॥ ३ ॥ अर्थ - बालतृणाप्रमाणें (कोवळ्या गवताप्रमाणें) अनेक वर्णांच्या तेजस्वी शरीर धारण करणार्या लौकिक आणि वैदिक अशा उभयविध मार्गांचा प्रवर्तयिता (प्रवृत्ति करणारा) प्रवर्तक असलेल्या शंकराला नमस्कार असो. ॥ ३ ॥ नमो॑ बभ्लु॒शाय॑ विव्या॒धिनेऽन्ना॑नां॒ पत॑ये नमो॒ ॥ ४ ॥ अर्थ - बिभर्ति रुद्रम् इति बभ्रुः म्हणजे वृषभ (नंदी) त्याच्या- वर जो बसतो तो बभ्लुश - त्याला म्हणजे वृषभारूढ शंकराला आणि विव्याधी, विशेषेकरून वध करणार्या शंकराला नमस्कार, आणि अन्नांचा अधिपति असलेल्या रुद्राला नमस्कार असो. ॥ ४ ॥ नमो॒ हरि॑केशायोपवी॒तिने॑ पु॒ष्टाणं॒ पत॑ये नमो॒ ॥ ५ ॥ अर्थ - हरिकेशाय नीलवर्णीचा केशसंभार ज्याचा आहे अशा शंकराला नमस्कार. आणि मंगल म्हणून यज्ञोपवीत धारण करणार्या रुद्राला नमस्कार. तसेंच पुष्टांना म्हणते परिपूर्ण गूण ज्यांच्या जवळ आहेत अशांचा रक्षणकर्ता जो शंकर त्याला नमस्कार. काहींच्या मतें पुष्ट शब्दाचा अर्थ पुष्टि असा आहे आणि अशा दहा पुष्टी सांगितलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणें - वाक्पुष्टिः, ज्ञानपुष्टिः, शरीरेंद्रियपुष्टिः, ग्रहक्षेत्रपुष्टिः, धनधान्यपुष्टिः, प्रजापुष्टिः, पशुपुष्टिः, ग्रामपुष्टिः, धर्मपुष्टिः, आणि अणिमादिपुष्टिरिति. ॥ ५ ॥ नमो॑ भ॒वस्य॑ हे॒त्यै जग॑तां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ६ ॥ अर्थ - भव म्हणजे संसार - त्याचा नाश करणार्या आणि जगाचें पालन करणार्या शंकराला नमस्कार. काहींच्या मते या मंत्रांत संसार छेदक जशा पंचमुखी शंकराचें वर्णन केलें आहे. ॥ ६ ॥ नमो॑ रु॒द्राया॑तता॒विने॒ क्षेत्रा॑णां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ७ ॥ अर्थ - आकृष्ट धनुष्याने रक्षण करतो तो ''आततावी", अशा सज्ज धनुष्य असलेल्या शंकराला नमस्कार आणि क्षेत्राणां पति म्हणजे शरीरांचे पालन करणार्या किंवा अविमुक्तादि पुण्यक्षेत्रे; (प्रयाग, काशी इ.) यांचा अधिपति असलेल्या शंकराला नमस्कार. ॥ ७ ॥ नमस्सू॒तायाह॑न्त्याय॒ वना॑नां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ८ ॥ अर्थ - सूत म्हणजे सारथी आणि अहन्त्याय म्हणजे शत्रूंकडून ज्याचा नाश होऊं शकत नाही का आणि वनांचा पालन करणारा जो शंकर त्याला नमस्कार. काहींच्या मते जगद्रूपी यंत्र आहे ज्या रथाला अशा रथाचें नियंत्रण करणारा देव किंवा सूत म्हणजे पुराण सांगणारा. ॥ ८ ॥ नमो॒ रोहि॑ताय स्थ॒पत॑ये वृ॒क्षाणं॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ९ ॥ अर्थ - लोहित वर्णाचा जो स्थपति म्हणजे प्रभु शंकर त्याला आणि वृक्षांचे पालन करणार्या रुद्राला नमस्कार. यांत वृक्ष शब्द स्थापयति वृश्चति अशा व्युत्पत्तींनी सिद्ध होतो. ॥ ९ ॥ नमो॑ म॒न्त्रिणे॑ वाणि॒जाय॒ कक्षा॑णं॒ पत॑ये नमो॒ ॥ १० ॥ अर्थ - राजसभेमध्यें कुशल सल्ला देणार्या आणि वाणिजाय पदार्थांचा विनिमय करणार्यांचा अधिपति असणार्या, तसेंच गहन अरण्याचे रक्षण करणार्या रुद्राला नमस्कार असो. काहींच्या मते मंत्रि शब्दाचा अर्थ पांच ब्रह्मदेव असाही आहे. ॥ १० ॥ नमो॑ भुव॒न्तये॑ वारिवस्कृ॒धायौष॑धीनां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ११ ॥ अर्थ - भुवम् तनोति इति भुवन्तिः - चतुर्दश भुवने निर्माण करणार्या आणि वारिवस्कृताय वरिवः म्हणजे धन तें निर्माण करणार्या आणि अरण्यांचे रक्षण करणार्या रुद्राला (रुद्रस्वरूप शंकराला नमस्कार). वारिवस्कृत या शब्दाचे आणखीही अर्थ आहेत. वरिवः म्हणजे परिचर्या (सेवा.) ती करणारे भक्त, त्यांच्या बाबतीत भक्तवत्सल असा एक अर्थ. दुसरा वारीणि म्हणजे पाण्यांत जो राहतो तो वारिवस्कृत म्हणजे विष्णुस्वरूप किंवा वरुणस्वरूप अशा रुद्राला नमस्कार. ॥ ११ ॥ नम॑ उ॒च्चैर्घो॑षायाक्र॒न्दय॑ते पत्ती॒नाम् पत॑ये॒ नमो॒ ॥ १२ ॥ अर्थ - युद्धकाळांत गगनभेदी ज्याचा ध्यनि होतो तो उचैर्घोष असा, आक्रंदयते म्हणजे शत्रूंना रडवणार्या आणि पत्ती म्हणजे पादचारी योद्धे त्यांचा पति असणार्या रुद्राला नमस्कार. पति शब्दाचा अर्थ पुढील लोकांत सांगितला आहे.
एकोरथो गजश्चैको नरः पंचपदातयः ।
अर्थ - युद्धकाळांत ज्याचा गगनभेदी ध्वनि होतो तो उच्चैर्घोष, आक्रंदयते म्हणजे शत्रूंना रडवणार्या, आणि पत्ती म्हणजे पादचारी योद्धे त्यांचा पति, अशा रुद्राला नमस्कार. पति शब्दाचा अर्थ येणेप्रमाणे - नमः॑ कृत्स्नवी॒ताय॒ धाव॑ते॒ सत्व॑नां॒ पत॑ये॒ नमः॑ ॥ १३ ॥ अर्थ - संपूर्ण सैन्य ज्याने वेढलेले आहे, ज्याने तो कृत्स्नवित सर्व सैन्यांचा अधिपति असणार्या आणि युद्धांत पळणार्या शत्रुसैन्याचा पाठलाग करणार्या आणि शरणागतांचे रक्षण करणार्या अशा शंकराला नमस्कार असो. ॥ १३ ॥ अनुवाक ३ रातिसर्या अनुवाकामध्यें मागील अनुवाकाप्रमाणेंच मंत्राच्या आरंभीं आणि शेवटीं 'नमः' शब्द असलेलेच कांहीं मंत्र आहेत. त्यांतील पहिला मंत्र पुढीलप्रमाणे- नमः॒ सह॑मानाय निव्या॒धिन॑ आव्या॒धिनी॑नां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ १ ॥ अर्थ:- शत्रूंचा पराभव करण्यामध्यें समर्थ असलेल्या आणि शत्रूंचा निश्चयानें निःपात करणार्या शंकराला नमस्कार असो. आणि आपल्या कक्षेतल्या तसेंच आजूबाजूला दूर असणार्या सर्व शत्रूंचा निःपात करूं शकणार्या शूर सेनेचा सेनापति असलेल्या शंकराला नमस्कार असो. नमः॑ ककु॒भाय॑ निष॒ङ्गिणे॑ स्ते॒नानां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ २ ॥ अर्थ:- श्रेष्ठतम आणि खड्ग हस्त अशा शंकराला नमस्कार. तसेंच चोरांचा अधिपति असलेल्या शंकराला नमस्कार. टीप-ह्या व अशा स्वरूपाच्या मंत्रांत स्तेनानाम् पति वगैरे जे शब्द येतात त्यांचा वाच्यार्थ घेऊं नये. मुख्यार्थाच्या अनुसंधानासाठी लोकप्रसिद्ध शब्द ऋषि वापरत असतात. परमात्मा दोन स्वरूपांनी प्रत्येक पदार्थांमध्ये, व्यक्तीमध्ये असतो. जीवस्वरूप आणि ईश्वरस्वरूप ही तीं दोन स्वरूपें होत. स्तेनादि शब्दांचा वाच्यार्थ चोर असा असला व तो निंद्य असला तरी या स्नेन शब्दाने वाच्यार्थ जो चोर तो न घेतां तो ईश्वर स्वरूपाचें अनुसंधान करणारा उपलक्षक ससजावा, म्हणजे ईश्वराचा बोध करुन देणारा हा स्तेन शब्द आपामर प्रसिद्ध असल्यामुळे प्रसिद्ध शब्दांनी ईश्वराचें अनुसंधान करणें सर्वांना सुलभ जातें. म्हणून स्तेन शब्द उच्चारला तरी त्याचा चोर असा वाच्यार्थ न घेतां लक्ष्यार्थ घ्यावयाचा. लक्ष्यार्थ ईश्वर आहे हें वर सांगितलेंच आहे. अशा रीतीनें स्तेनसदृश शब्दांनी होणारे ईश्वरस्मरण पापक्षय करणारे होते, असें खुद्द सायणाचार्यही आपल्या भाष्यामध्ये सुचवितात. नमो॑ निष॒ङ्गिण॑ इषुधि॒मते॒ तस्क॑राणां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ३ ॥ अर्थः- धनुष्यावर शरसंधान करण्यासाठी हातांत घेतलेला जो बाण तो निषङ्ग, बाण ठेवण्यासाठी पाठीवर बांधलेला भाता त्याला इषुधि म्हणतात. ज्याच्या पाठीवर बाणांचा भाता आहे व ज्यानें हातांत बाण घेतलेला आहे अशा श्री शंकराला या मंत्रांत नमस्कार सांगितला आहे. नमो॒ वञ्च॑ते परि॒वञ्च॑ते स्तायू॒नां पत॑ये॒ नमो॒ ॥ ४ ॥ अर्थः-प्रथम स्वतःबद्दल विश्वास निर्माण करून त्या विश्वासाचा फायदा म्हणन चोरी करणारा त्याला वञ्चक असें म्हणतात. अशा चोरीमध्ये बुद्धीचा उपयोग केला जातो. म्हणून याला बौद्धिक चोरी (बुद्धीच्या आधारे करणारा) म्हणतां येईल. आणि मिळेल त्याची आणि मिळेल तिथें जो चोरी करतो त्याला 'परिवञ्चक' असे म्हणतात. समाजांत चोर आणि भुरटे चोर असे दोन प्रकार आढळतात. चोरांच्या समाजांत भुरटे चोर हे कमी दर्जाचे मानले जातात. तेव्हां अशा त्यांच्याही समाजांत उभयविध कनिष्ठ आणि श्रेष्ट अशा स्वरूपांत असणार्या श्री शंकराला नमस्कार. आतां स्तायू म्हणजे गुप्तचोर हे दोन प्रकारचे, गुप्त वेषाने रात्रीच्या वेळीं येऊन कपाट इ. फोडून जे चोरी करतात त्यांना स्तेन म्हणतात. हे आपल्या निवासस्थानापासून लांब अशा ठिकाणींच चोरी करतात. आणि मी तुमच्यांतलाच आहे असें भासवून जे चोरी करतात त्यांना स्तायू असें म्हणतात. स्तेन आणि स्तायू या स्वरूपांत असणार्या व त्यांचे, रक्षण करणार्या श्री शंकराला नमस्कार. नमो॑ निचे॒रवे॑ परिच॒रायार॑ण्यानां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ५ ॥ अर्थ - धन्याच्या घरांतच केव्हां बरं मी चोरी करूं शकेन ? मला तशी सुवर्णसंधि केव्हा प्राप्त होईल ? अशा विचारानें घरांत वावरणारा जो चोर त्याला निचेरव असें म्हणतात. येतां जातां बाजारांत व इतर सार्वजनिक ठीकाणी चोरी करण्याच्या बुद्धीनें हिंडणारा तो परिचर, आणि एकट्या दुकट्या पांथस्थाला गाठून त्याचे सर्वस्व अपहरण करणारे ते अरण्यचोर. ते नेहमी अरण्यांतच रहातात. अशा त्रिविध चोरांचे पालन करणार्या श्रीशंकराला नमस्कार. नमः॑ सृका॒विभ्यो॒ जिघाँ॑सद्भ्यो मुष्ण॒तां पत॑ये॒ नमो॒ ॥ ६ ॥ अर्थ - सृक शब्द हा वज्रवाची आहे. शस्त्रधारी चोरांना सृकावि म्हणतात. ठार करून चोरी करणारे त्यांना जिघांसक म्हणतात. शेतीचा पेशा असणारे आणि प्रसंगानें मालकाचें धान्य चोरणारे ज्यांना धान्यचोर (मुष्णन्तः) असें म्हणतात. या सर्वांचा अधिपति असणार्या श्री शंकराला नमस्कार. नमो॑ऽसि॒मद्भ्यो॒ नक्त॒ं चर॑द्भ्यः प्रकृ॒न्तानां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ७ ॥ अर्थ:- नेहमी खड्गधारी चोर आणि रात्रीं अपरात्री नगरांत हिंडून चोरी करणारे ते नक्तंचर, या दोघांचा अधिपति श्री शंकर त्याला नमस्कार. आणि ठार मारून चोरी करणारे त्यांना प्रकृन्त असे म्हणतात. त्यांचाही पालक अशा श्री शंकराला नमस्कार. नम॑ उष्णी॒षिणे॑ गिरिच॒राय॑ कुलु॒ञ्चानां॒ पत॑ये॒ नमो॒ ॥ ८ ॥ अर्थ - मुंडासे बांधलेल्या खेडूताप्रमाणे स्वत: मुंडासे बांधून त्यांच्यांत वावरणार्या आणि लाकूडफांटा आणण्यासाठी डोंगरांत गेलेल्या लोकांचें वस्त्र अपहरण करण्यासाठीं त्यांच्यांत संचार करणार्या श्री शंकराला नमस्कार असो. तसेंच घरें, शेतीवाडी वगैरे हरण करणार्या चोरांचा अधिपति असलेल्या श्री शंकराला नमस्कार. नम॒ इषु॑मद्भ्यो धन्वा॒विभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ ९ ॥ अर्थ - बाण धारण करणार्या बाणधारी आणि धनुर्धारी अशा तुम्हांला नमस्कार असो. या मंत्रांत प्रत्यक्ष अनेक रूपांत वावरणार्या अनेक रुद्र देवांना नमस्कार सांगितलेला आहे. याच्या पूर्वीच्या मंत्रांत त्यांच्या पतीला नमस्कार होता. लोकशासनासाठीं स्वतः श्री शंकर अनेक रूपें धारण करुन त्या त्या ठिकाणी वावरत असे. आणि त्यांना वाईट कृत्याबद्दल शिक्षा देऊन वा पश्चाचाप निर्माण करुन चुकलेल्यांना मार्गावर आणणें व समाजधारणा स्थिर करणें हेंच श्री शंकराचें कार्य, ते ते वेष धारण करुन त्यांच्या त्यांच्यात मिसळल्यामुळे कोण कशी चोरी करतो कोणत्या पद्धतीने करतो हें आपोआपच शंकराच्या निदर्शनाला येत असे. त्यांचे मार्ग कोणते, युक्त्या कोणत्या, पद्धति कशा इ. गोष्टीचें सूक्ष्म ज्ञान समाजनेत्याला आवश्यकच होय. ह्या पुढील मंत्रांत प्रत्यक्ष रुद्र स्वरूपांत वावरणार्या अनेकविध रुद्र देवांना नमस्कार सांगितला आहे, हें मागें येऊन गेलेंच आहे. नम॑ आतन्वा॒नेभ्य॑ प्रति॒दधा॑नेभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १० ॥ अर्थ - धनुष्यावर प्रत्यंचा (दोरी) चढविणार्या आणि शरसंधान करणार्या तुम्हाला नमस्कार. नम॑ आ॒यच्छ॑द्भ्यो विसृ॒जद्भ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ ११ ॥ अर्थ - धनुष्याची दोरी ताणणारे ते आयछन्त रुद्र आणि बाण सोडणारे ते विसृजन्त रुद्र अशा तुम्हाला नमस्कार असो. नमोऽस्य॑द्भ्यो॒ विध्य॑द्भ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १२ ॥ अर्थ - लक्ष्यापर्यंत बाण सोडणार्या आणि लक्ष्यापर्यंत गेलेल्या बाणाला लक्ष्यांत घुसवणार्या तुम्हाला नमस्कार. नम॒ आसी॑नेभ्यः॒ शया॑नेभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १३ ॥ अर्थ - बसलेल्या आणि झोपलेल्या अशा उभय स्थितींत असणार्या तुम्हाला नमस्कार. नमः॑ स्व॒पद्भ्यो॒ जाग्र॑द्भ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १४ ॥ अर्थ - झोपी गेलेल्या आणि जागृत अवस्थेंत असलेल्या म्हणजे सुषुप्ति आणि जागृति अशा दोन्ही अवस्थांत असलेल्या तुम्हाला नमस्कार. नम॒स्तिष्ठ॑द्भ्यो॒ धाव॑द्भ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १५ ॥ अर्थ - उभे राहणार्या आणि धावणार्या तुम्हाला नमस्कार. नमः॑ स॒भाभ्यः॑ स॒भाप॑तिभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १६ ॥ अर्थ - एकत्र येऊन संघशः बसलेल्या आणि त्यांचे अधिपति असलेल्या तुम्हाला नमस्कार. नमो॒ अश्वे॒भ्योऽश्व॑पतिभ्यश्च वो॒ नमः॑ ॥ १७ ॥ अर्थ - अश्वशरीरेभ्य: = घोड्यांचे शरीर असणार्या आणि त्यांचे अधिपति असणार्या तुम्हाला नमस्कार. कांहीच्या मते अश्व या शब्दाचा अर्थ न विद्यते स्वम् धनम् येषाम् ते अश्व: निष्कांचन असाहि अर्थ. स आणि श यांच्यामध्ये कोणी भेद मानीत नाहीत. काहीजण स आणि श यांच्यात अभेद मानण्यापेक्षा न विद्यते श्वस्तनय् धनम् येषाम् ते अश्व: असाहि अर्थ करतात. हे सर्व रुद्र श्री शंकराचे अनुचर किंवा त्याचेच लीलाविग्रह विशेष होत. अनुवाक ४ थाया अनुवाकापासून क्रिया गुण आणि द्रव्य या विषयींचे अधिपथ्य (रुद्राचे) वर्णन केलेले आहे. प्रत्यक्ष रुद्राला आणि त्यांच्या समुदायाला नमस्कार केलेला आहे. नम॑ आव्य॒धिनी॑भ्यो वि॒विध्य॑न्तीभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १ ॥ अर्थ - आसमंतांत असणार्या शत्रूंचा नाश करण्यास समर्थ असलेल्या, इतकेच नव्हे तर विशेष प्रकाराने नाश करण्यास समर्थ असलेल्या तुम्हाला नमस्कार. नम॒ उग॑णाभ्यस्तृँह॒तीभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ २ ॥ अर्थ - उत्कृष्टगणरूप: सप्तमातुकाथ: स्त्रियः उगणः - उत्कृष्ट गुण असलेल्या, आणि हिंसा करण्यास समर्थ असलेल्या अशा दुर्गाप्रभूति उग्र देवता त्या तृँहती, अशा उभय स्वरूपांतील हे रुद्र देवांनो, तुम्हाला नमस्कार. नमो॑ गृ॒त्सेभ्यो॑ गृ॒त्सप॑तिभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ ३ ॥ अर्थ - गर्धनशील ते गृत्स, विषयलंपट त्यांना आणि त्याचे अधिपति असलेल्या तुम्हाला नमस्कार. नमो॒ व्राते॑भ्यो॒ व्रात॑पतिभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ ४ ॥ अर्थ - नाना जातींचे संघ म्हणजे व्रात त्यांना आणि त्यांचे जे अधिपति ते व्रातपति त्यांना नमस्कार. नमो॑ ग॒णेभ्यो॑ ग॒णप॑तिभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ ५ ॥ अर्थ:- प्रमथादि जे भूतगण आणि त्यांचा पति तो गणपति अशा उभयविध स्वरूपांत असलेल्या तुम्हाला नमस्कार. नमो॒ विरू॑पेभ्यो वि॒श्वरु॑पेभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ ६ ॥ अर्थ:- विकृत रूप धारण करणार्या नग्न मुंडादि भृत्य तुरंग गज वक्त्रादि नाना तर्हेची रूपें धारण करणारे जे भृत्य त्यांना नमस्कार. नमो॑ म॒हद्भ्यः॑ क्षुल्ल॒केभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ ७ ॥ अर्थ - अणिमादि सिद्धीमुळें प्राप्त होणार जें ऐश्वर्य तें ज्यांच्या जवळ आहे ते महान, क्षुद्रसिद्धियुक्त ते क्षुल्लक अशा उभयविध रुद्रांना नमस्कार. नमो॑ र॒थिभ्यो॑ऽर॒थेभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ ८ ॥ अर्थ - रथारूढ असणार्या आणि रथा विरहित असणार्या अशा श्री रुद्रांना नमस्कार. नमो॒ रथे॑भ्यो॒ रथ॑पतिभ्यश्च वो॒ नमो॒ ॥ ९ ॥ अर्थ - रथस्वरूप असणार्या आणि रथावयवभूत असणार्या रुद्राला नमस्कार. महाभारतांमध्यें 'हयांश्च चतुरो वेदान्सर्वदेवमयं रथम्' अशी रथ शब्दाची व्याख्या केली आहे. भविष्यपुराणांतही - अर्काऽब्जनेमिर्वेदाश्वस्त्रयस्त्रिंशन्मरुन्मयः पुरारे कल्पितो दैवे: सरथो ब्रह्मसारथिः । असे रथ शब्दाचें निर्वचन आढळून येतें. रथपति म्हणजे रथस्वामी. नमः॒ सेना॑भ्यः सेना॒निभ्य॑श्च वो॒ नमः॑ ॥ १० ॥ अर्थ - सेनास्वरूप रुद्राला नमस्कार आणि सेनेचें नेतृत्व करणार्या रुद्राला नमस्कार. नमः॑ क्ष॒त्तृभ्यः॑ सङ्ग्रही॒तृभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ ११ ॥ अर्थ - रथ कसे करावेत याचे शिक्षण देणार्या आणि रथ चालवावेत कसे याचें शिक्षण देणार्या रुद्राला नमस्कार (संगृहीतृभ्य ये रश्मिन् संगृह्णन्ती यावरून रथ चालविण्याचे शिक्षण देणारे ते रुद्र असा अर्थ होतो.). नम॒स्तक्ष॑भ्यो रथका॒रेभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ १२ ॥ अर्थ - तक्षक म्हणजे रंधा मारणारे. तक्षणकुशल आणि रथकार म्हणजे रथ निर्माण करणारे या सर्वांच्या ठिकाणी दैवी शक्ति असते या भावनेनें या सर्वांना नमस्कार केला आहे. सायुध रथ युद्धांत जाण्यासाठी आवश्यक त्या शस्त्रांसह जो रथ निर्माण करतो तो रथकार. नमः॒ कुला॑लेभ्यः क॒र्मारे॑भ्यश्च वो॒ नमो॒ ॥ १३ ॥ अर्थ - मातीचे घट निर्माण करणारे जे कुंभकार - कुंभं करोति इति कुंभकारः । म्हणजेच कुंभार - त्यांना आणि कर्मारेऽभ्यः म्हणजे लोहकार म्हणजे लोहार यांनाहि समाजघटकाच्या दृष्टीने उपयुक्तता आहे म्हणून नमस्कार. यावरून तत्कालीन ग्रामरचनेची कल्पना येते. आज ही अठरा बलुत्यांची पद्धत लुप्त झाली - परंतु त्याचें पुनरुज्जीवन होणें आवश्यक वाटते. नमः॑ पुञ्जिष्टे॑भ्यो निषा॒देभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ १४ ॥ अर्थ - पक्षिसमुदायाचा (जाळ्यांत पकडून) वध करणारे आणि निषाद म्हणजे मत्स्यघाती म्हणजे मासे मारणारे या दोघांनाही नमस्कार. नम॑ इषु॒कृद्भ्यो॑ धन्व॒कृद्भ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ १५ ॥ अर्थ - चांगले बाण आणि चांगली धनुष्ये करणार्या रुद्राला नमस्कार. नमो॑ मृग॒युभ्यः॑ श्व॒निभ्य॑श्च वो॒ नमो॒ ॥ १६ ॥ अर्थ - मृगयु म्हणजे पशूंची शिकार करणारे आणि श्वनिभ्यः म्हणजे कुत्र्यांच्या गळ्यांत दोरी बांधून त्यांना (शिकारी- करितां) पाळणारे अशा रुद्राला नमस्कार. नमः॒ श्वभ्यः॒ श्वप॑तिभ्यश्च वो॒ नमः॑ ॥ १७ ॥ अर्थ - कुत्र्यांचें रूप धारण करणार्या आणि त्यांचा अधिपति असणार्या अशा उभयविध रुद्राला नमस्कार. अनुवाक ५ वाआतांपर्यंतच्या अनुवाकांत आदी आणि अंती म्हणजे आरंभी आणि शेवटी नमः शब्द असणारेच कांही यजुर्मंत्र सांगावयाचे आहेत. त्यांतील पहिला मंत्र पुढीलप्रमाणे - नमो॑ भ॒वाय॑ च रु॒द्राय॑ च॒ ॥ १ ॥ अर्थ - भवन्ति प्राणिनः असात इति भवः । सर्व प्राणिमात्र आणि, चराचर विश्व ज्याच्यापासून निर्माण होतें त्या शंकराला आणि रुद्राला ( रोदनेहेतुलभू दुःखम् दावयति इति रुद्र:) दुःख हरण करणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ श॒र्वाय॑ च पशु॒पत॑ये च॒ ॥ २ ॥ अर्थ-सर्व पाप हरण करणाऱ्या आणि पशूसमान अज्ञानी लोकांचें पालन करणाऱ्या देवाला नमस्कार. नमो॒ नील॑ग्रीवाय च शिति॒कण्ठा॑य च॒ ॥ ३ ॥ अर्थ-कालकूट प्राशनानें ज्याचा कंठ नीलवर्णाचा झाला आहे तो नीलकंठ त्याला नमस्कार आणि जो शितिकंठ आहे ( गौर वर्णाचा ज्याचा कंठ आहे) त्याला नसत्कार. नमः॑ कप॒र्दिने॑ च॒ व्यु॑प्तकेशाय च॒ ॥ ४ ॥ अर्थ-जटाधारी शंकराला नमस्कार. आणि मुंडितकेश ज्याचे आहेत, त्याला म्हणजे मुंडन केलेल्या शंकराला नमस्कार. नमः॑ सहस्रा॒क्षाय॑ च श॒तध॑न्वने च॒ ॥ ५ ॥ अर्थ-इंद्ररूपानें सहखाक्ष म्हणजे हजार डोळे असल्या आणि असंख्य धनुष्ये धारण केलेल्या शंकराला नमस्कार. नमो॑ गिरि॒शाय॑ च शिपिवि॒ष्टाय॑ च॒ ॥ ६ ॥ अर्थ-कैलासावर राहणाऱ्या शंकराला नमस्कार आणि विश्- स्वरूप असलेल्या शंकराला नमस्कार. नमो॑ मी॒ढुष्ट॑माय॒ चेषु॑मते च॒ ॥ ७ ॥ अर्थ-मेघांच्या रूपानें अतिशय वर्षाव करणारा तो मीढुष्टम ( पाऊस पाडणारा) त्याला आणि बाण धारण करणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ ह्र॒स्वाय॑ च वाम॒नाय॑ च॒ ॥ ८ ॥ अर्थ: - ठेंगू असलेल्या शंकराला नमस्कार आणि वामन म्हणजे कातपाय इत्यादि अवयव ज्याचे अल्प वाहेत त्याला नमस्कार. नमो॑ बृह॒ते च॒ वर्षी॑यसे च॒ ॥ ९ ॥ अर्थ-आकारानें मोठा तो बृहत् आणि गुणांनीं समृद्ध तो! वधीयाच. आकारानें विशाल असलेल्या आणि गुणांनीही समृद्ध अस- लेल्या शंकराला नमस्कार. ( आकारसदृशः प्रज्ञा प्रज्ञया सदृशागम;) ही कालिदासोक्ति प्रसिद्धच आहे.) नमो॑ वृ॒द्धाय॑ च सं॒वृध्व॑ने च॒ ॥ १० ॥ अर्थ-त्रयानें वृद्ध असलेल्या आणि ज्ञानानेंही वृद्ध असलेल्या शंकराला नमस्कार. वृद्ध म्हणजे वयानें वृद्ध आणि सेतुचा म्हणजे- ज्ञानानें वृद्ध. वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा शंकराला नमस्कार. नमो॒ अग्रि॑याय च प्रथ॒माय॑ च॒ ॥ ११ ॥ अर्थ-जगाच्या उत्पत्तिपूर्वी असणाऱ्या आणि सभेमध्ये मुख्य असलेल्या शंकराला नमस्कार. नम॑ आ॒शवे॑ चाजि॒राय॑ च॒ ॥ १२ ॥ अर्थः-सर्वव्यापी आणि कुशल आणि गतिकुशल असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॒ शीघ्रि॑याय च॒ शीभ्या॑य च॒ ॥ १३ ॥ अर्थ-शि धियः म्हणजे शीधगामी आणि शीम्य म्हणजे उदक- .प्रवाहामध्ये असणारा. शीभ शब्दाचा अर्थ उदकप्रवाह. तत्र स्थित: म्या शीव्रगामी आणि उदक-प्रवाह-स्थित अशा शंकराला नमस्कार. नम॑ ऊ॒र्म्या॑य चावस्व॒न्या॑य च॒ ॥ १४ ॥ अर्थ - तरंगाकार असणाऱ्या आणि निस्तरंगाकार असणाऱ्या किराला नमस्कार. नमः॑ स्रोत॒स्या॑य च॒ द्वीप्या॑य च ॥ १५ ॥
अर्थ - प्रवाहांत असलेल्या आणि द्वीपप्रदेशावर असलेल्या (जलमध्यवर्ति प्रदेशावर) शंकराला नमस्कार. अनुवाक सहावा (६)नमो॑ ज्ये॒ष्ठाय॑ च कनि॒ष्ठाय॑ च॒ ॥ १ ॥ अर्थ:- विद्या आणि ऐश्वर्य यांनी युक्त असलेला तो जेष्ठ आणि यांनी रहित असलेला तो कनिष्ठ. अशा उभयस्वरूप शंकराला नमस्कार. नमः॑ पूर्व॒जाय॑ चापर॒जाय॑ च॒ ॥ २ ॥ अर्थ: -जगाव्या आरंभीं हिरण्यगर्भ रूपानें उत्पन्न झालेल्या आणि जगदुत्पत्तिनंतर जगाच्या अवसानकालीं काल, अग्नि इत्यादि रूपानी असलेल्या शंकराला नमस्कार. टीप-यांत सृष्टीच्या उत्पत्तीचें सूक्ष्म रहस्य सांगितलें आहे. नमो॑ मध्य॒माय॑ चापग॒ल्भाय॑ च॒ ॥ ३ ॥ अर्थ-मधल्या कालखंडांत देव, तिर्यक) इत्यादि स्वरूपांनीं निर्माण झालेल्या आणि अपगल्भ म्हणजे ज्याच्या इंद्रियांचा विकास झाला नाही अशा शंकराला नमस्कार. नमो॑ जघ॒न्या॑य च॒ बुध्नि॑याय च॒ ॥ ४ ॥
अर्थ-जघनातून निर्माण झालेला तो जघन्य. आणि बुद्धिय म्हणजे वृक्षांच्या मुळांतून निर्माण झालेला. जघन्य आणि बुध्निय अशा शंकराला नमस्कार. नमः॑ सो॒भ्या॑य च प्रतिस॒र्या॑य च॒ ॥ ५ ॥
अर्थ -मनुष्यलोकामध्ये निर्माण झालेल्या आणि वित्राहकालीं हातांत रक्षाबंध धारण करणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॒ याम्या॑य च॒ क्षेम्या॑य च॒ ॥ ६ ॥ अर्थ-यम लोकामध्ये असणाऱ्या शंकराला नमस्कार. आणि मोक्षकाली असणाऱ्या शंकराला नमस्कार. नम॑ उर्व॒र्या॑य च॒ खल्या॑य च॒ ॥ ७ ॥ अथ-उर्वरा म्हणजे सर्वसत्याख्या भूमि:-धारसमृद्ध अशी जी भमि-तिच्या स्वरूपांत असणाऱ्या शंकराला नमस्कार. आणि धान्य गोळा करण्याचा जो प्रदेरा त्याला खल असे म्हणतात. तिथे अस- णारा तो खल्य त्यालाही नमस्कार. नमः॒ श्लोक्या॑य चाऽवसान्या॑य च॒ ॥ ८ ॥ अर्थ-वेदप्रतिपाथ अशा शंकराला नमस्कार. आणि वेदान्त- प्रतिपाद्य अशाही शंकराला नमस्कार. उपनिषदांत वर्णन केलेल्य अद्वैतस्वरूप शंकराला नमस्कार. नमो॒ वन्या॑य च॒ कक्ष्या॑य च॒ ॥ ९ ॥ अर्थ-अरण्यामध्ये वृक्ष इत्यादि रूपानें असलेल्या आणि लता वगैरे स्वरूपानें असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ श्र॒वाय॑ च प्रतिश्र॒वाय॑ च॒ ॥ १० ॥ अर्थ--ध्वनिस्वरूपाने असणाऱ्या आणि प्रतिप्पनिस्वरूपार्के असणाऱ्या शंकराला नमस्कार. टीप-या उल्लेखावरून ध्वनि-विज्ञानाची सू६म प्रक्रिया कर्यांना माहिती होती हें यावरून दिसते. नम॑ आ॒शुषे॑णाय चा॒शुर॑थाय च॒ ॥ ११ ॥ अर्थ- शीधगामी ज्याची सेना आहे आणि ज्याचा रथही शीध- गामी आहे अशा शंकराला नमस्कार. नमः॒ शूरा॑य चावभिन्द॒ते च॒ ॥ १२ ॥ अर्थ--युद्धामध्यें शूर असलेल्या आणि शत्रूंनी ज्याचें अभिनंदन केलें आहे अशा शंकराला नमस्कार. नमो॑ व॒र्मिणे॑ च वरू॒थिने॑ च॒ ॥ १३ ॥ अर्थ-चिलखतं घातलेला आणि गुप्तस्थान असलेल्या शंकराला नमस्कार. नमो॑ बि॒ल्मिने॑ च कव॒चिने॑ च॒ ॥ १४ ॥ अर्थ-सच्छिद शिरोवेष्टन ज्याचें आहे तो बिली आणि कवच करीर रक्षण करणारे ज्याचें आहे तो कवची, चिलखत धारण करणाऱ्या, अशा शंकराला नमस्कार. नमः॑ श्रु॒ताय॑ च श्रुतसे॒नाय॑ च ॥ १५ ॥
अर्थ-वेदप्रसिद्ध असल्या आणि ज्याची सेना प्रसिद्ध आहे अशा शंकराला नमस्कार. अनुवाक सातवा (७)नमो॑ दुन्दु॒भ्या॑य चाहन॒न्या॑य च॒ ॥ १ ॥ अर्थ-दुंदुभी म्हणजे भेरी (नगारा) तिथे ध्वनिरूपाने उत्पन्न होणाऱ्या आणि आहनन्य म्हणजे भेरी वाजविण्यासाठी घेतला जाणारा दंड म्हणजे टिपरी तिथे असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ धृ॒ष्णवे॑ च प्रमृ॒शाय॑ च॒ ॥ २ ॥ अर्थ-युद्धामध्यें पळ न काढणाऱ्या आणि शत्रूकडील बित्तंबातमी काढण्यांत कुशल असलेल्या श्री शंकराला नमस्कार. नमो॑ दू॒ताय॑ च॒ प्रहि॑ताय च॒ ॥ ३ ॥
अर्थ--वृत्तांत सांगण्यामध्ये कुशल असलेल्या आणि पाठविलेल्या दूताची चिंता वाहणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ निष॒ङ्गिणे॑ चेषुधि॒मते॑ च॒ ॥ ४ ॥ अर्थ-खड्ग आणि भाता धारण करणाऱ्या महादेवाला नमस्कार. नम॑स्ती॒क्ष्णेष॑वे चाऽऽयु॒धिने॑ च॒ ॥ ५ ॥ अर्थ-तीक्ष्ण बाण ज्याच्या जवळ आहेत आणि असंख्य आयुधें ज्याच्या जवळ आहेत त्या श्री शंकराला नमस्कार. नमः॑ स्वायु॒धाय॑ च सु॒धन्व॑ने च॒ ॥ ६ ॥ अर्थ -त्रिशूळ हे ज्याचें खास आयुध आहे आणि ज्याच्याजवळ सुंदर धनुष्य आहे त्याला नमस्कार. नमः॒ स्रुत्या॑य च॒ पथ्या॑य च॒ ॥ ७ ॥ अर्थ-कृति म्हणजे लहानशी पाऊलवाट. तिथेही असणाऱ्या आणि राजमार्गावरही असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ का॒ट्या॑य च नी॒प्या॑य च॒ ॥ ८ ॥ अर्थ -काट : म्हणजे अल्प प्रवाहे-! लहानसें डबकें ). तिथेही असणाऱ्या आणि पर्वतावरून जियें पाण्याचा प्रपात ( झोत) पडतो त्याला नीप असें म्हणतात, तिथेही असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॒ सूद्या॑य च सर॒स्या॑य च॒ ॥ ९ ॥ अर्थ --सूद म्हणजे चिखलाचा प्रदेश, तिथे असणारा तो सूस. आणि सर: म्हणजे सरोवर, तियें असणारा तो सरस्थ. या दोघांनाही नमस्कार. नमो॑ ना॒द्याय॑ च वैश॒न्ताय॑ च॒ ॥ १० ॥ अर्थ-नदीतल्या पाण्यांत असणाऱ्या आणि थोड्या पाण्यांत असणाऱ्या शंकराला नमस्कार. टीप-नाद्य या शब्दाचा अर्थ नादें भव अशी व्युत्पत्ति करून ध्वनि- मध्ये निर्माण होणारा असाही केला आहे. नमः॒ कूप्या॑य चाव॒ट्या॑य च॒ ॥ ११ ॥ अर्थ -खोल विहिरीतल्या पाण्यांत असणाऱ्या आणि लहानशा खड्ड्यात असणाऱ्या पाण्यांत राहणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॒ वर्ष्या॑य चाव॒र्ष्याय॑ च॒ ॥ १२ ॥ अर्थ -पावसाच्या पाण्यात असणाऱ्या आणि पावंसाशिवाय सत्यातल्या पाण्यांत असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ मे॒घ्या॑य च विद्यु॒त्या॑य च॒ ॥ १३ ॥ अर्थ -मेघामध्ये असलेल्या आणि विजेमध्यें असलेल्या शंकराला नमस्कार. नम॑ ई॒ध्रिया॑य चात॒प्या॑य च॒ ॥ १४ ॥ अर्थ-ईध म्हणजे निर्मल असा शरदांतील मेघ, त्यांत राहतो तो ईधिय. आणि सूर्यामध्ये असणाऱ्या म्हणजे सूर्यापासून उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमध्येंही असणाऱ्या रांकराला नमस्कार. नमो॒ वात्या॑य च॒ रेष्मि॑याय च॒ ॥ १५ ॥ अर्थ-वावळीमध्ये असणाऱ्या आणि प्रलयकालीं निर्माण होणाऱ्या झंझावातामध्यें असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ वास्त॒व्या॑य च वास्तु॒पाय॑ च ॥ १६ ॥
अर्थ-स्तू म्हणजे पदार्थ-धन-नाना तर्हेचे पदार्थ - व ते रहातो तो वास्तव्य. आणि हे पदार्थ जिथे ठेवले जातात तो वास्तु, स्वाचे पालन कणारा तो वास्तुप. वास्तव्य आणि वास्तुप अशा शंकराला नमस्कार. अनुवाक आठवा (८)नमः॒ सोमा॑य च रु॒द्राय॑ च॒ ॥ १ ॥
अर्थ-उमेसहवर्तमान असणाऱ्या आणि दुःख हरण करणाऱ्या शंकराला नमस्कार. नम॑स्ता॒म्राय॑ चारु॒णाय॑ च॒ ॥ २ ॥ अर्थ-सूर्यरूपाने उदयकालीं अत्यंत आरक्तवर्णाच्या असणार्या आणि उदयानंतर अरुणवर्णाच्या असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ श॒ङ्गाय॑ च पशु॒पत॑ये च॒ ॥ ३ ॥ अर्थ-सुख प्राप्त करून देतो तो शंग. ( शं गमयति इति शंगः ). पशूंचे पालन करणारा तो पशुपति, या दोघांनाही नमस्कार. नम॑ उ॒ग्राय॑ च भी॒माय॑ च॒ ॥ ४ ॥
अर्थ-शत्रूंचा नाश करण्यांत कठोर असलेल्या आणि केवळ दर्शनानेच भीति निर्माण करणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ अग्रेव॒धाय॑ च दूरेव॒धाय॑ च॒ ॥ ५ ॥ अर्थ-समोरासमोर वध करूं शकणाऱ्या आणि दुरूनही वध करूं शकणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ ह॒न्त्रे च॒ हनी॑यसे च॒ ॥ ६ ॥
अर्थ-जो कोणी ज्याचा वध करील त्याच्या स्वरूपामध्यें असणाऱ्या आणि त्याच्या स्वरूपांत राहून निश्चयानें वध करणाऱ्या कराला नमस्कार. नमो॑ वृ॒क्षेभ्यो॒ हरि॑केशेभ्यो॒ ॥ ७ ॥
अर्थ-हरित पर्णें ज्यांची आहेत असे जे कल्पवृक्ष ( हरित पर्णें म्हणजे हिरवीगार पानें) त्यांच्या स्वरूपात असलेल्या तुला नमस्कार. नम॑स्ता॒राय॒ ॥ ८ ॥ अर्थ - ॐकाराने वर्णन केलेल्या म्हणजेच प्रणवप्रतिपाद्य अशा तुला नमस्कार. तार शब्दाचा अर्थ प्रणवप्रतिपाद्य असा आहे. तारयति संसारसागरात जंतून् इति तारः अशी त्याची व्युत्पत्ति आहे. नम॑श्श॒म्भवे॑ च मयो॒भवे॑ च॒ ॥ ९ ॥ अर्थ-ऐहिक आणि पारलौकिक सुख देणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ शङ्क॒राय॑ च मयस्क॒राय॑ च॒ ॥ १० ॥ अर्थ-विषयसुख आणि मोक्षसुख देणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ शि॒वाय॑ च शि॒वत॑राय च॒ ॥ ११ ॥ अर्थ-स्वतः कल्याणरूप असणारा म्हणजेच निष्कल्मष आणि निस्त्रैगुण्य, म्हणूनच शिवतर असलेल्या - सर्वांशानें कल्याण करूं शकणाऱ्या - श्रीशंकराला नमस्कार. नम॒स्तीर्थ्या॑य च॒ कूल्या॑य च॒ ॥ १२ ॥ अर्थ-प्रयाग आदि तीर्थाजवळ असलेल्या आणि नदीतीरावर असलेल्या श्रीशंकराला नमस्कार. [ नदीतीरावर लिंगाची प्रतिष्ठापना करतात हें प्रसिद्धच आहे. ] नमः॑ पा॒र्या॑य चावा॒र्या॑य च॒ ॥ १३ ॥ अर्थ-संसारसमुद्राच्या पैलतीरावर असणाऱ्या आणि समुद्राच्या ऐलतीरावर म्हणजेच संसार समुद्राच्या ऐलतीरावर असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ प्र॒तर॑णाय चो॒त्तर॑णाय च॒ ॥ १४ ॥ अर्थ - मंत्रजपानें पापांतून तरून जाण्याला कारणीभूत असणारा तो प्रतरण. तत्त्वज्ञानाने मोक्षप्राप्ती होण्याला कारणीभूत होणारा तो उत्तरण. अशा श्रीशंकराला नमस्कार. नम॑ आता॒र्या॑य चाऽऽला॒द्या॑य च ॥ १५ ॥
अर्थ - पुनः पुनः या संसारांत जन्म घेणाऱ्या जीवांच्या स्वरूपांत असणाऱ्या आणि प्रत्यक्ष भोग घेणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपांत असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॒ शष्प्या॑य च॒ फेन्या॑य च ॥ १६ ॥ अर्थ - बालतृण - नदीतीरावर निर्माण होणारे कुशकाश नांवाचे दर्भ - यांच्या स्वरूपांत असणाऱ्या आणि फेंसाच्या स्वरूपांत असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ सिक॒त्या॑य च प्रवा॒ह्या॑य च ॥ १७ ॥ अर्थ - पाण्यापासून निर्माण होणाऱ्या, वाळूंत असणाऱ्या आणि प्रवाहामध्यें असणाऱ्या अशा श्रीशंकराला नमस्कार. इति अष्टमोऽनुवाकः अनुवाक नववा (९)नम॑ इरि॒ण्या॑य च प्रप॒थ्या॑य च॒ ॥ १ ॥ अर्थ - इरिण म्हणजे ऊषर म्हणजे बीळ. तिथे असणाऱ्या आणि राजमार्गावर असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ किꣳशि॒लाय च॒ क्षय॑णाय च॒ ॥ २ ॥ अर्थ - लहान लहान दगडांचा जो प्रदेश त्याला किँशिल असे म्हणतात. ( शार्करिल प्रदेश) तिथे असणाऱ्या आणि क्षयण म्हणजे निवासयोग्य अशा जागी असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ कप॒र्दिने॑ च पुल॒स्तये॑ च॒ ॥ ३ ॥ अर्थ - लहान लहान दगडांचा जो प्रदेश त्याला किँशिल असे म्हणतात. ( शार्करिल प्रदेश) तिथे असणाऱ्या आणि क्षयण म्हणजे निवासयोग्य अशा जागी असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॒ गोष्ठ्या॑य च॒ गृह्या॑य च॒ ॥ ४ ॥ अर्थ - गायीच्या गोठ्यांत असणाऱ्या आणि घरांत असणाऱ्या शंकराला नमस्कार. नम॒स्तल्प्या॑य च॒ गेह्या॑य च॒ ॥ ५ ॥ अर्थ - खाटेवर असलाच्या आणि राजप्रासादांत असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ का॒ट्या॑य च गह्वरे॒ष्ठाय॑ च॒ ॥ ६ ॥ अर्थ - काट्याकुट्यांनी प्रवेश कतणार्याला अशक्य अशा कठीण प्रदेशांत असणाऱ्या आणि गुहेमध्ये असणाऱ्या अशा शंकराला नमस्कार. टीप - मागे काट्य याचा अर्थ विहिरीतील जल असा केलेला होता. इथे दुर्गम अरण्य-विशेषः-काटः असा केलेला आहे. नमो᳚ ह्रद॒य्या॑य च निवे॒ष्प्या॑य च॒ ॥ ७ ॥ अर्थ - मोठमोठ्या डोहामध्ये असणाऱ्या आणि निवेष्प म्हणजे बर्फरूप पाणी - त्यामध्यें असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ पाꣳस॒व्या॑य च रज॒स्या॑य च॒ ॥ ८ ॥ अर्थ - अतिसूक्ष्म परमाणूमध्यें असणाऱ्या आणि दृष्टिगोचर अशा धुळींच्या कणांमध्यें असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॒ शुष्क्या॑य च हरि॒त्या॑य च॒ ॥ ९ ॥ अर्थ - वाळलेल्या नीरस पदार्थांमध्यें असणाऱ्या शंकराला नमस्कार. आणि हरित म्हणजे आर्द्र जीवनरसानें रसरसलेल्या पदार्थांमध्ये असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॒ लोप्या॑य चोल॒प्या॑य च॒ ॥ १० ॥ अर्थ - ज्या ठिकाणीं गवतसुद्धां उगवूं शकत नाहीं असा जो कठीण प्रदेश त्याला लोप असे म्हणतात. तिथे असणारा तो लोप्य. आणि उलप म्हणजे लहान लहान गवत. त्याच्यामध्यें असणारा तो उलप्य. लोप्य आणि उलप्य अशा शंकराला नमस्कार. नम॑ ऊ॒र्व्या॑य च सू॒र्म्या॑य च॒ ॥ ११ ॥ अर्थ - पृथ्वीपासून निर्माण होणाऱ्या आणि तरंगात असणाऱ्या शंकराला नमस्कार. नमः॑ प॒र्ण्या॑य च पर्णश॒द्या॑य च॒ ॥ १२ ॥ अर्थ - पानांमध्ये असणारा तो पर्ण्य. आणि शुष्कानां पर्णानां संघात: = पर्णशदः = वाळलेला पाचोळा तिथे असणाऱ्या, अशा पर्ण्य आणि पर्णशद्य शंकराला नमस्कार. नमो॑ऽपगु॒रमा॑णाय चाभिघ्न॒ते च॒ ॥ १३ ॥ अर्थ - उद्यतायुद्ध आणि प्रहार करणाऱ्या शंकरला नमस्कार. नम॑ आक्खिद॒ते च॑ प्रक्खिद॒ते च॒ ॥ १४ ॥ अर्थ - अपराधानुसार अल्प क्लेश देणाऱ्या आणि तदनुसारच आत्यंतिक क्लेश देणाऱ्या शंकराला नमस्कार. नमो॑ वः किरि॒केभ्यो॑ दे॒वाना॒ꣳ हृद॑येभ्यो॒ ॥ १५ ॥
अर्थ - भक्तांना धन, ऐश्वर्य जे देतात त्यांना किरिक असें म्हणतात. किरन्ति मक्तेभ्यः धनानि । अशी त्याची व्युत्पत्ति आहे. हे किरिक म्हणजे रुद्रावतार म्हणून प्रसिद्ध आहेत. हे सर्व देवांना प्रिय असल्यामुळें यांना देवांचें हृदय असें म्हटले आहे. सर्व देवप्रिय आणि उदार असणाऱ्या अशा हे रुद्रांनो तुम्हाला नमस्कार. नमो॑ विक्षीण॒केभ्यो॒ ॥ १६ ॥ अर्थ - केव्हांही ज्यांचा क्षय होत नाही ते विक्षीणक. अशा तुम्हाला नमस्कार. नमो॑ विचिन्व॒त्केभ्यो॒ ॥ १७ ॥ अर्थ - विचिन्वन्ति अपेक्षितमर्थम् संपादयन्ति इति विचिन्वत्काः । हे दुर्जन, हे सज्जन - असा विभाग करणाऱ्या हे रुद्रांनो तुम्हाला नमस्कार. नम॑ आनिर्ह॒तेभ्यो॒ ॥ १८ ॥ अर्थ - निशेःष रीतीनें जे पापाचा नाश करतात ते आनिर्हत रुद्र. भक्तांचें पाप निःशेष रीतीनें नाहींसे करणाऱ्या हे रुद्रांनो तुम्हाला नमस्कार. नम॑ आमीव॒त्केभ्यः॑ ॥ १९ ॥
अर्थ - सर्व विषयांची भक्तांना समृद्धि प्रास करून देणाऱ्या हे रुद्रांनो तुम्हाला नमस्कार. अनुवाक दहावा (१०)
अनुवाकामध्यें आरंभीं व शेवटीं नमस्कार असणारे कांहीं मंत्र तसेच काही मंत्र फक्त आरंभीच नमस्कार असणारे, असे येऊन गेले. त्यामध्यें शंकराचे सर्वव्यापित्व व भक्तवत्सलता इत्यादि गुणविशेष सांगितले आहेत.
द्रापे॒ अन्ध॑सस्पते॒ दरि॑द्र॒न्नील॑लोहित ।
अर्थ - अभक्तांना वाईट गति प्राप्त करून देणाऱ्या व भक्तांना अन्नादि गोष्टी देऊन त्यांचे पालन करणाऱ्या अन्नपति असूनही निष्कांचन वृत्तीने रहाणाऱ्या (स्वतःसाठी संग्रह न करणाऱ्या) आणि कंठाच्या बाबतीत नीलवर्ण आणि इतरत्र आरक्तवर्ण असणाऱ्या हे देवाधिदेवा रुद्रा, ह्या आमच्या पुत्रपौत्रादिकांना आणि गाई- महिषी- वगैरे आमच्या ह्या पशूंना तूं भीति दाखवू नकोस आणि ह्या माझ्या उभयविध संपत्तिपैकीं एकही गोष्ट नाहींशी होऊं देऊं नकोस. तसेंच यांच्यापैकी कोणालाही कसलाही विकार तूं होऊं देऊं नकोस.
या ते॑ रुद्र शि॒वा त॒नूः शि॒वा वि॒श्वाह॑ भेषजी ।
अर्थ-हे रुद्रा, तुझी कल्याणकारक आणि शांत अशी जी तनु आहे त्या तनूने तूं आम्हाला सुख दे. तुझी तनु कल्याणकारक कां ? तर ती विश्वाहमेषजी अशी आहे. म्हणजे सर्वेषु अहस्सु रोगदारिद्रादे: औषधवत् विनाशहेतुः । तस्मात् शिवा विश्वानि अहानि विश्वा: । सर्व दिवसांमध्यें तुझी तनू भेषजी आहे. भेषजी म्हणजे औषधाप्रमाणे उपयुक्त आहे. तेव्हां अशा तुझ्या परमकल्याणप्रद आणि संसाररोग नाहीसें करणाऱ्या तुझ्या शांत व मंगल तनूने तूं आम्हाला निरंतर सुख निर्माण कर.
इ॒माꣳ रु॒द्राय॑ त॒वसे॑ कप॒र्दिने᳚ क्ष॒यद्वी॑राय॒ प्रभ॑रामहे म॒तिम् ॥
अर्थ-भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास समर्थ असलेल्या, जटाबंध युक्त व तापसवेष धारण केलेल्या आणि ज्याच्या समोर शत्रु टिकूं शकत नाहीं अशा रुद्राविषयी म्हणजे रुद्राकरितां इमाम् मतिम् पूजाध्यानविषयक बुद्धि आम्ही धारण करितो. ज्या बुद्धीमुळे आमच्या पुत्रपौत्रादि संततीला व चतुष्पद गोमहिष्यादि पशुरूप संपत्तीला यथा शम् असत् म्हणजे सुख होईल. येवढेंच नव्हे तर आम्ही ज्या गांवामध्ये रहातो त्या गावातील सर्वम् विश्वम् म्हणजे सर्व प्राणिजात सुखपूर्ण आणि उपद्रवरहित होईल. निरंतर तुझ्या ध्यानपूजेंत निमग्न असलेल्या आम्हा भक्तांवर व आमच्या गांवावर तुझी पूर्ण कृपा राहील, हा या मंत्रातील आशय.
मृ॒डा नो॑ रुद्रो॒ तनो॒ मय॑स्कृधि क्ष॒यद्वी॑राय॒ नम॑सा विधेम ते । अर्थ -हे रुद्रा, आम्हाला इहलोकामध्यें सुख दे, आणि परलोकामध्येंही दे. आमची पापें नाहींशी करणाऱ्या तुझी नमस्कारानें आम्ही सेवा करूं. पिता मनूने आणि प्रजापतिनें सुख आणि दुःख जें कांहीं आमच्यासाठी निर्माण केलें ते तझी आमच्यावर कृपा झाली असतां आम्ही सुखानें ग्रहण करूं. सुखोतिरेकाने आम्ही उन्मत्तही होणार नाही आणि हातून घडलेल्या अपराधामुळे तुझ्या कृपेनें अधोगतीलाही जाणार नाहीं.
मा नो॑ म॒हान्त॑मु॒त मा नो॑ अर्भ॒कं मा न॒ उक्ष॑न्तमु॒त मा न॑ उक्षि॒तम् । अर्थ-हे रुद्रा, आमच्यातील वृद्ध पुरुषांना तूं त्रास देऊं नकोस. आमच्यातील लहान मुलांना तूं मारूं नकोस. तसेच आमच्यातील उक्षन्तम् सेचनसमर्थम् अशा तरुण पुरुषांना तूं मारूं नकोस आणि उक्षितम् म्हणजे गर्भस्थ जीवांनाही तूं त्रास देऊं नकोस. आमच्या पितरांना तूं मारूं नकोस आणि आमच्या मातरांनाही. ( मातृदेवतांना) तूं मारूं नकोस तसेच आमच्या प्रिय शरीरांनाही तूं इजा पोहोचूं देऊं नकोस.
मा न॑स्तो॒के तन॑ये॒ मा न॒ आयु॑षि॒ मा नो॒ गोषु॒ मा नो॒ अश्वे॑षु रीरिषः ।
अर्थ - हे रुद्रा, आमच्या संततीला विशेषतः पुत्राला त्रास देऊं नकोस. आमचें आयुष्य विनासंकट जावें. आम्ही पाळलेल्या गाईंच्या बाबतींत तूं त्रास देऊं नकोस. तसेंच आमच्या घोड्यांनाही उपद्रव देऊं नकोस. आणि रागाच्या भरांत आमच्या वीर पुरुषांना तूं त्रास देऊं नकोस. हविर्द्रव्याच्या योगानें आणि नमस्काराने आम्ही तुझी परिचर्या करूं.
आ॒रात्ते॑ गो॒घ्न उ॒त पू॑रुष॒घ्ने क्ष॒यद्वी॑राय सु॒म्नम॒स्मे ते॑ अस्तु ।
अर्थ- गोवध आणि पुरुषवध तसेच सर्व वीर पुरुष नाहीसे करणाऱ्या तुझें अत्यंत भयानक आणि उग्र स्वरूप आमच्यापासून दूर राहूं दे. आणि तुझें सुखकर जें रूप आहे तें आमच्याजवळ राहूं दे. तुझ्या दोन शरीरापैकी घोर शरीर हें दूर राहूं दे व शिव शरीर आमच्या समोर येऊं दे. हे देवा, इतर यजमानापेक्षांही आमच्या बाबतींत तूं इतर देवांकडे अधिक शिफारस कर. आणि इहपरलोकांमध्यें आमचे कल्याण कर.
स्तु॒हि श्रु॒तं ग॑र्त॒सदं॒ युवा॑नं मृ॒गन्न भी॒म-मु॑पह॒त्नुमु॒ग्रम् ।
अर्थ-हा मंत्र स्वतःला उद्देशून आहे. भक्त आपल्या मनाला उद्देशून म्हणतो हें मना तूं श्रतम् रुद्रम् स्तुहि. तूं प्रसिद्ध अशा त्या रुद्राची स्तुति कर. हृदयपुंडरीकामध्यें सर्वदा ज्याचा निवास आहे आणि जो नित्य तरुण आहे आणि प्रलयकालीं हत्तीवर झडप घालणाऱ्या सिंहाप्रमाणे उग्र असणारा असा तो भगवान् श्रीरुद्र आहे.
परि॑णो रु॒द्रस्य॑ हे॒तिर्वृ॑णक्तु॒ परि॑ त्वे॒षस्य॑ दुर्म॒तिर॑घा॒योः । अर्थ-हे रुद्रा, तुझी ''हेति", म्हणजे आयुध हें आम्हाला पुत्रपौत्रादिसह वर्ज्य करो. तुझ्या आयुधापासून आम्हाला कोणताही त्रास न होवो, हा आशय. क्रोधाने लाल झालेल्या आणि प्रहार करूं इच्छिणाऱ्या तुझी जी दुर्मति म्हणजे उग्र बुद्धि तिच्यापासूनही आम्हाला दूर ठेव. शत्रंचा नाश करण्याची जी तुझी निश्चयात्मक बुद्धि तिच्यापासूनही हविर्लक्षण असें जें अन्न त्यांनीं युक्त असलेल्या यजमानांचे रक्षण कर आणि भक्तेच्छा पुऱ्या करणाऱ्या हे देवा, आमच्या पुत्राला आणि त्याच्या पुत्राला तूं सुख दे.
मीढु॑ष्टम॒ शिव॑तम शि॒वो नः॑ सु॒मना॑ भव । अर्थ- हें मिढुष्टम, म्हणजे भक्त मनोरथ पूर्ण करणाऱ्या रुद्रा, हे शिवतम, म्हणजे शांत मंगल स्वरूप असणाऱ्या, तूं आमच्याही बाबतीत तसाच हो. आणि तुझें आयुध ( त्रिशूळ) हें उंच अशा एखाद्या वडावर किंवा पिंपळावर ठेव. आम्हाला दिसणार नाहीं असें ठेव. आणि मग केवळ व्याघ्रचर्म परिधान करून धनुष्य घ्यावयाचें असेल तर केवळ शोभेकरिता म्हणून धारण करून आमच्याजवळ ये. बाण वगैरे बाजूला ठेव. केवळ शोभा म्हणूनच धनुर्धारी बनून तूं आम्हाला दर्शन दे. तूं निःशस्त्र होऊन आमच्याशी एकरूप हो, हा आशय.
विकि॑रिद॒ विलो॑हित॒ नम॑स्ते अस्तु भगवः ।
अर्थ - भक्तांना यथेष्ट धनधान्य देणाऱ्या आणि गौरवर्ण असणाऱ्या किंवा सुवर्णाप्रमाणे तेज: पुंज असणाऱ्या आणि षड्गुणैश्वर्यसंपन्न असणाऱ्या हे भगवंता, रुद्रा, तुला आमचा नसस्कार असो. तुझी असंख्य आयुधें आमच्या व्यतिरिक्त आमच्या शत्रूंवर जाऊन प्रहार करूं देत.
स॒हस्रा॑णि सहस्र॒धा बा॑हु॒वोस्तव॑ हे॒तयः॑ ।
अर्थ - हे समर्थ रुद्रा, तुझ्या हातांत जी असंख्य आयुधें आहेत धनुष्य खड्ग त्रिशूळ इ. प्रकारापैकी प्रत्येक आयुध हजार प्रकारचे, अशीं अगणीत आयुधें तुझ्या हातांत आहेत. हे षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवंता, तूं समर्थ असल्यामुळें त्या आयुधांची अग्रें आमच्यापासून मागें कर. आमच्यापासून तुझीं आयुधें तूं पराङ्गमुख कर. कारण त्या आयुधांची आतां गरज नाही. अनुवाक अकरावा (११)दहाव्या अनुवाकात ऋक्स्वरूपाचे कांहीं मंत्र सांगितले. आतां या अनुवाकात राहिलेले कांहीं ऋक्स्वरूपाचे मंत्र आणि यजुर्मंत्र सांगावयाचे आहेत. आरंभींचे दहा मंत्र हे ऋक्स्वरूप आहेत व शेवटचे तीन यजुःस्वरूप आहेत. या अनुवाकांतील पहिला मंत्र पुढील प्रमाणें -
स॒हस्रा॑णि सहस्र॒शो ये रु॒द्रा अधि॒ भूम्या᳚म् ।
अर्थ-या पृथ्वीतलांवर जे हजारो विनायक, प्रमथ, शैलाद इत्यादि विविध जातींचे रुद्र आहेत - रुद्रस्वरूपाने वावरणारे श्रीशंकराचे सृष्टिनियमनाकरितां जे भृत्य त्यांची अगणित, अपरिमित आयुधें म्हणजे धनष्यें आहेत ती आमच्यापासून हजारों योजने दूर ठेव व धनुष्याची दोरी शिथिल करून किंवा काढून ठेव अशी आम्ही प्रार्थना करतो. अ॒स्मिन् म॑ह॒त्य॑र्ण॒वे᳚ऽन्तरि॑क्षे भ॒वा अधि॑ ॥ २ ॥
अर्थ - या महान् समुद्रसदृश असणाऱ्या अंतरिक्षामध्यें म्हणजे विश्वाच्या अनंत अवकाशांत जे भव म्हणजे रुद्र राहतात त्यांची धनुष्यें हजारों योजन दूर आम्ही ठेवतो. नील॑ग्रीवाः शिति॒कण्ठाः᳚ श॒र्वा अ॒धः क्ष॑माच॒राः ॥ ३ ॥ अर्थ - नीलकंठ आणि गौर वर्णाचे असे जे अधोलोक म्हणजे पाताळांत संचार करणारे रुद्र आहेत त्यांची धनुष्ये आम्ही हजारों योजने दूर ठेवतो. नील॑ग्रीवाः शिति॒कण्ठा॒ दिव॑ꣳ रु॒द्रा उप॑श्रिताः ॥ ४ ॥ अर्थ - नीलकंठ आणि गौर वर्णाचे जे रुद्र स्वर्गांत राहतात त्यांची धनुष्यें आम्ही हजारों योजने दूर ठेवतो. ये वृ॒क्षेषु॑ स॒स्पिञ्ज॑रा॒ नील॑ग्रीवा॒ विलो॑हिताः ॥ ५ ॥
अर्थ - ज्याप्रमाणें तिन्ही लोकांमध्ये कांहीं रुद्र राहतात तसेच कांहीं रुद्र वृक्षांवरही राहतात. त्यांतील कांहीं कोवळ्या तृणांप्रमाणे पिंजर वर्णाचे आणि नीलकंठ व गौरवर्ण ज्यांचा आहे अशा रुद्रांची धनुष्यें आम्ही हजारों योजने दूर ठेवतो. ये भू॒ताना॒मधि॑पतयो विशि॒खासः॑ कप॒र्दिनः॑ ॥ ६ ॥ अर्थ - प्राण्यांच्या शरीरांतून सूक्ष्म रूपानें प्रवेश करून जे जंतू त्यांना उपद्रव देतात त्यांचा निःपात करून सर्वांना कल्याण देणारे अधिपति असे जे रुद्र त्यांच्यामध्यें कांहीं विशिख म्हणजे मुंडितकेश तर कांहीं कपर्दी म्हणजे जटाधारी असे आहेत. अशा रुद्रांची धनुष्ये आम्ही हजारों योजने दूर ठेवतो. टीप-या मंत्रातील भूतानां अधिपति या शब्दांचा सायणाचार्यांनी केलेला अर्थ ध्यानी घेतां त्या काळीं जंतूमुळे रोग निर्माण होतात ही स्पष्ट कल्पना तत्कालिन लोकांना असावी असे वाटतें. ये अन्ने॑षु वि॒विध्य॑न्ति॒ पात्रे॑षु॒ पिब॑तो॒ जनान्॑ ॥ ७ ॥ अर्थ - जे रुद्र आहारांतील अन्नामध्ये गुप्त रूपानें राहून आहाराचा अतिरेक झाला असतांना धातुवैषम्य निर्माण करून विविध रोग निर्माण करतात व अशा रीतीनें अत्याहाराचें प्रायश्चित्त लोकांना देतात आणि असावधपणानें कसेंतरी पाणी पितात त्यांनाही याच स्वरूपानें प्रायश्चित्त देणारे जे रुद्र आहेत त्यांची धनुष्यें आम्ही सहस्त्र योजने दूर ठेवतो. ये प॒थां प॑थि॒रक्ष॑य ऐलबृ॒दा य॒व्युधः॑ ॥ ८ ॥ अर्थ - लौकिक, वैदिक व तांत्रिक असे जे विविध पंथ आहेत त्यांचें रक्षण करणारे वर सांगितलेल्या कोणत्याही मार्गानें जाणाऱ्या लोकांचें रक्षण करणारे असे जे रुद्र ते पथिरक्षय रुद्र, आणि ऐलबृद रुद्र म्हणजे विपुल अन्न धारण करणारे, अन्न प्रदान करून लोकांचे पोषण करणारे जे रुद्र त्यांना ऐलबृद असे म्हणतात. इरा म्हणजे अन्न, त्याचा समूहो तो ऐर, त्याला धारण करणारे जे ते ऐलबृद अशी त्याची व्युत्पत्ति आहे. तसेच यव्युध असेही कांहीं रुद्र आहेत. यव्युध रुद्र म्हणजे शत्रूंचा नाश करणारे रुद्र. यु: म्हणजे शत्रू. युधिसह युध्यन्ति ते यव्युध अशी त्याच्यी व्युत्पत्ति आहे. विविध भाग रक्षक ऐलबृद आणि यव्युध असे तीन प्रकारचे जे रुद्र आहेत त्यांची धनुष्यें आम्ही हजारों योजनें दूर ठेवतो. ये ती॒र्थानि॑ प्र॒चर॑न्ति सृ॒काव॑न्तो निष॒ङ्गिणः॑ ॥ ९ ॥ अर्थ -जे रुद्र काशी-प्रयाग इत्यादी तीर्थक्षेत्रें रक्षण करण्याकरितां त्या त्या क्षेत्रांत संचार करतात व जे सृकावन्त म्हणजे हातांत शस्त्र धारण करतात व कांहीं नंगी तलवार धारण करून संचार करतात, अशा रुद्रांची धनुष्यें आम्ही हजारों योजने दूर ठेवतो.
य ए॒ताव॑न्तश्च॒ भूया॑ꣳसश्च॒ दिशो॑ रु॒द्रा वि॑तस्थि॒रे । अर्थ -आतांपर्यंतच्या मंत्रांनी आतांपर्यंत सांगितलेले विविध प्रकारचे हे असे रुद्र आणि याहून दशदिशांमध्यें वास्तव्य करून राहिलेले जे अगणित, अपरिमित व असंख्येय असे जे रुद्र आहेत त्या सर्वांची धनुष्यें विविध प्रकारची आयुधें ही आतां त्यांचें प्रयोजन संपल्यामुळे आम्ही हजारों योजने दूर ठेवतो.
नमो॑ रु॒द्रेभ्यो॒ ये पृ॑थि॒व्यां ये॑ऽन्तरि॑क्षे॒ ये दि॒वि येषा॒मन्नं॒
अर्थ - पृथ्व्यादि जे तीन लोक आहेत त्यांच्या तीन प्रकारामुळें यांत तीन यजुर्मंत्र आहेत ते असे - नमोरूपेभ्य येथून ये पृथियां येषां अन्नं ईषवः । येथपर्यंत एक मंत्र. ये अंतरिक्षे येषां वात ईषवः येथपर्यंत २ रा मंत्र. ये दिवि येषां वर्षमिषवः हा तिसरा मंत्र. या तिन्ही मंत्राशी मिळून दश प्राची: हा पुढील मंत्रा संबद्ध होतो. जे रुद्र पृथ्वीतलावर राहून अन्नरूपी बाणानेच अपध्यकारक अन्न भक्षण करणारे किंवा अन्नाकरितां चौर्य कर्म करणारे व त्याकरिता प्रसंगीं दुसऱ्याचा खूनही करणारे असे जे लोक आहेत त्यांना या अन्नरूपी बाणानेंच शुद्धीवर आणणारे, तसेच जे रुद्र अंतराळांत राहून वायुरूप बाणानें नानाप्रकारचे रोग निर्माण करून शासन करणारे आणि जे रुद्र स्वर्गांत राहून वृष्टिरूप बाणानें दुराचारी लोकांना शासन करणारे, केव्हां अतिवृष्टीनें तर केव्हां अनावृष्टीने असे हे तीन प्रकारचे रुद्र सांगितले. अन्नेषु रुद्र,वातेषु रुद्र आणि वर्षेषुरुद्र अशा त्रिविध रुद्रांना आम्ही दश प्राची: म्हणजे पूर्वेला दहा अंगुली सरळ करून नमस्कार करतों. त्याचप्रमाणें दश दक्षिणा दक्षिणेलाही तसाच नमस्कार करतों. दश प्रतीची: पश्चिमेलाही तसाच आणि उत्तेरलाही तसाच नमस्कार करतों. नमस्कार कसा करतों याचे वर्णन दश प्राची: या मंत्रांत केलें आहे. पूर्वेला दोन्ही हातांची अंजली केली म्हणजे दोन्ही हातांची मिळून दहा बोटें ही पूर्वाग्र होतात. त्याचप्रमाणें दक्षिण, पश्चिम आणि उत्तर समजावी. अशा विशिष्ट तर्हेनें वरील सांगितलेल्या तीन प्रकारच्या रुद्रांना आमचा नमस्कार असो. आमच्या नमस्काराने प्रसन्न झालेले रुद्र आम्हाला सुख देवोत. आणि ज्यांचा आम्ही मनापासून द्वेष करतों आणि जे आम्ही स्वस्थ राहिलो असतांनाही आमचा मनापासून द्वेष करतात असे जे उभयविध शत्रू त्या शत्रूंना हे रुद्रांनो, तुमच्या जंभे म्हणजे पसरलेल्या जबड्यांमध्यें आम्ही ठेवून देतो.
त्र्य॑म्बकं यजामहे सुग॒न्धिं पु॑ष्टि॒वर्ध॑नम् ।
यो रु॒द्रो अ॒ग्नौ यो अ॒प्सु य ओष॑धीषु॒ यो रु॒द्रो
तमु॑ष्टु॒हि॒ यः स्वि॒षुः सु॒धन्वा॒ यो विश्व॑स्य॒ क्षय॑ति भेष॒जस्य॑ ।
अ॒यं मे॒ हस्तो॒ भग॑वान॒यं मे॒ भग॑वत्तरः ।
ये ते॑ स॒हस्र॑म॒युतं॒ पाशा॒ मृत्यो॒ मर्त्या॑य॒ हन्त॑वे । तान् य॒ज्ञस्य॑
ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्यु॑र्मे पा॒हि ।
नमो रुद्राय विष्णवे मृत्यु॑र्मे पा॒हि |