श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
तृतीयोऽध्यायः


आर्यास्तवः

वैशंपायन उवाच
आर्यास्तवं प्रवक्ष्यामि यथोक्तमृषिभिः पुरा ।
नारायणीं नमस्यामि देवीं त्रिभुवनेश्वरीम् ॥ १ ॥
त्वं हि सिद्धिर्धृतिः कीर्तिः श्रीर्विद्या संनतिर्मतिः ।
संध्या रात्रिः प्रभा निद्रा कालरात्रिस्तथैव च ॥ २ ॥
आर्या कात्यायनी देवी कौशिकी ब्रह्मचारिणी ।
जननी सिद्धसेनस्य उग्रचारी महाबला ॥ ३ ॥
जया च विजया चैव पुष्टिस्तुष्टिः क्षमा दया ।
ज्येष्ठा यमस्य भगिनी नीलकौशेयवासिनी ॥ ४ ॥
बहुरूपा विरूपा च अनेकविधिचारिणी ।
विरूपाक्षी विशालाक्षी भक्तानां परिरक्षिणी ॥ ५ ॥
पर्वताग्रेषु घोरेषु नदीषु च गुहासु च ।
वासस्ते च महादेवि वनेषूपवनेषु च ॥ ६ ॥
शबरैर्बर्बरैश्चैव पुलिन्दैश्च सुपूजिता ।
मयूरपिच्छध्वजिनी लोकान् क्रमसि सर्वशः ॥ ७ ॥
कुक्कुटैश्छागलैर्मेषैः सिंहैर्व्याघ्रैः समाकुला ।
घण्टानिनादबहुला विन्ध्यवासिन्यभिश्रुता ॥ ८ ॥
त्रिशूलपट्टिशधरा सूर्यचन्द्रपताकिनी ।
नवमी कृष्णपक्षस्य शुक्लस्यैकादशी तथा ॥ ९ ॥
भगिनी बलदेवस्य रजनी कलहप्रिया ।
आवासः सर्वभूतानां निष्ठा च परमा गतिः ॥ १० ॥
नन्दगोपसुता चैव देवानां विजयावहा ।
चीरवासाः सुवासाश्च रौद्री संध्याचरी निशा ॥ ११ ॥
प्रकीर्णकेशी मृत्युश्च सुरामांसबलिप्रिया ।
लक्ष्मीरलक्ष्मीरूपेण दानवानां वधाय च ॥ १२ ॥
सावित्री चापि देवानां माता मन्त्रगणस्य च ।
कन्यानां ब्रह्मचर्यं त्वं सौभाग्यं प्रमदासु च ॥ १३ ॥
अन्तर्वेदी च यज्ञानामृत्विजां चैव दक्षिणा ।
कर्षुकाणां च सीतेति भूतानां धरणीति च ॥ १४ ॥
सिद्धिः सांयात्रिकाणां तु वेला त्वं सागरस्य च ।
यक्षाणां प्रथमा यक्षी नागानां सुरसेति च ॥ १५ ॥
ब्रह्मवादिन्यथो दीक्षा शोभा च परमा तथा ।
ज्योतिषां त्वं प्रभा देवि नक्षत्राणां च रोहिणी ॥ १६ ॥
राजद्वारेषु तीर्थेषु नदीनां सङ्‌‌‍गमेषु च ।
पूर्णा च पूर्णिमा चन्द्रे कृत्तिवासा इति स्मृता ॥ १७ ॥
सरस्वती च वाल्मीके स्मृतिर्द्वैपायने तथा ।
ऋषीणां धर्मबुद्धिस्तु देवानां मानसी तथा ॥ १८ ॥
सुरा देवी च भूतेषु स्तूयसे त्वं स्वकर्मभिः ।
इन्द्रस्य चारुदृष्टिस्त्वं सहस्रनयनेति च ॥ १९ ॥
तापसानां च देवी त्वमरणी चाग्निहोत्रिणाम् ।
क्षुधा च सर्वभूतानां तृप्तिस्त्वं दैवतेषु च ॥ २० ॥
स्वाहा तृप्तिर्धृतिर्मेधा वसूनां त्वं वसूमती ।
आशा त्वं मानुषाणां च पुष्टिश्च कृतकर्मणाम् ॥ २१ ॥
दिशश्च विदिशश्चैव तथा ह्यग्निशिखा प्रभा ।
शकुनी पूतना त्वं च रेवती च सुदारुणा ॥ २२ ॥
निद्रापि सर्वभूतानां मोहिनी क्षत्रिया तथा ।
विद्यानां ब्रह्मविद्या त्वमोङ्‌‌‍कारोऽथ वषट् तथा ॥ २३ ॥
नारीणां पार्वतीं च त्वां पौराणीमृषयो विदुः ।
अरून्धती च साध्वीनां प्रजापतिवचो यथा ॥ २४ ॥
पर्यायनामभिर्दिव्यैरिन्द्राणी चेति विश्रुता
त्वया व्याप्तमिदं सर्वं जगत्स्थावरजङ्‌‌‍गमम् ॥ २५ ॥
संग्रामेषु च सर्वेषु अग्निप्रज्वलितेषु च ।
नदीतीरेषु चौरेषु कान्तारेषु भयेषु च ॥ २६ ॥
प्रवासे राजबन्धे च शत्रूणां च प्रमर्दने ।
प्राणात्ययेषु सर्वेषु त्वं हि रक्षा न संशयः ॥ २७ ॥
त्वयि मे हृदयं देवि त्वयि चित्तं मनस्त्वयि ।
रक्ष मां सर्वपापेभ्यः प्रसादं कर्तुमर्हसि ॥ २८ ॥
इमं यः सुस्तवं दिव्यमिति व्यासप्रकल्पितम् ।
यः पठेत्प्रातरुत्थाय शुचिः प्रयतमानसः ॥ २९ ॥
त्रिभिर्मासैः काङ्‌‌‍क्षितं च फलं वै संप्रयच्छसि ।
षद्भिर्मासैर्वरिष्ठं तु वरमेकं प्रयच्छसि ॥ ३० ॥
अर्चिता तु त्रिभिर्मासैर्दिव्यं चक्षुः प्रयच्छसि ।
संवत्सरेण सिद्धिं तु यथाकामं प्रयच्छसि ॥ ३१ ॥
सत्यं ब्रह्म च दिव्यं च द्वैपायनवचो यथा ।
नृणां बन्धं वधं घोरं पुत्रनाशं धनक्षयम् ॥ ३२ ॥
व्याधिमृत्युभयं चैव पूजिता शमयिष्यसि ।
भविष्यसि महाभागे वरदा कामरूपिणी ॥ ३३ ॥
मोहयित्वा च तं कंसमेका त्वं भोक्ष्यसे जगत् ।
अहमप्यात्मनो वृत्तिं विधास्ये गोषु गोपवत् ॥ ३४ ॥
स्ववृद्ध्यर्थमहं चैव करिष्ये कंसगोपताम् ।
एवं तां स समादिश्य गतोऽन्तर्धानमीश्वरः ॥ ३५ ॥
सा चापि तं नमस्कृत्य तथास्त्विति च निश्चिता ॥ ३६ ॥
यश्चैतत् पठते स्तोत्रं शृणुयाद् वाप्यभीक्ष्णशः ।
सर्वार्थसिद्धिं लभते नरो नास्त्यत्र संशयः ॥ ३७ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
स्वप्नगर्भविधाने आर्यास्तुतौ त्रितीयोऽध्यायः ॥ ३ ॥


आर्यास्तव -

१ वैशंपायन सांगतातः- हे राजा, त्रिभुवनाची स्वामिनी जी देवी नारायणी तिला नमस्कार करून मी पूर्वकाली ऋषींनी तिचा जसा स्तव केला आहे तसाच तुला बोलून दाखवितों.

२ ( ऋषि म्हणतात. ) हे देवि, तूंच आमची सिद्धि, जीवन, कीर्ति, संपत्ति, विद्या, नम्रता, मति असून तूंच सन्ध्या, रात्रि, प्रभा, निद्रा व कालरात्रीहि आहेत. ३ तूंच आर्या, तूंच कात्यायनी, तूच कौशिकी, तूच ब्रह्मचर्यपालनकर्ती, तूंच कार्तिकस्वामीची माता,तूंच उग्रकर्म करणारी असून महाबलाढ्य आहेस. ४ तूंच जया, विजया, पुष्टि, तुष्टि, क्षमा, दया, नील वस्त्र धारण करणारी यमाची वडील बहीणही तूंच. ५ बहुरूपा, विरूपा, विरूपाक्षी, विशालाक्षी व नानाप्रकारचे विधी आचरून भक्तांचे परिरक्षण करणारी तूंच. ६ हे महादेवि, घोर पर्वतशिखरें, नद्या, गुहा, वने व उपवनें यांत तुझी वस्ती असते. ७ शबर, बर्बर व पुलिंद हे लोक तुझी पूजा करितात आणि मयूरपिच्छांचा ध्वज लाविलेल्या रथात बसून तू सर्वत्र फिरतेस. ८ तूं विन्ध्य पर्वतावर रहात असून तेथें तुजभोवती कोंबडे, बकरे, मेंढे, सिंह, व्याघ्र इत्यादिकांची गर्दी असून अक्षयीं अनेक घंटांचा नाद चालू असतो अशी तुजबद्दल ख्याति आहे. ९ तुझे हातीं त्रिशूल व पट्टिश असून सूर्यआणि चन्द्र हे तुझे पताकेवर आहेत; तूं कृष्णपक्षांतील नवमी व शुक्लपक्षांतील एकादशीहि होस. १० तूं बलरामाची बहीण असून जनाचें रंजन करणारी आहेस; तं कलहप्रिय असून सर्वभूतांना मरण व मुक्ति देणारी आहेस. ११ नंद गवळ्याची मुलगी असून देवांना विजय देणारी आहेस; तू सुंदर वस्त्र नेसणारी, रूपानें मोठी भयंकर, सन्ध्याकाली संचार करणारी व रात्री रूपिणी आहेस. १२ तुझे केश पिंजारलेले असून मद्यमांसाच्या बलीची तुला फार आवड आहे; तूं एरवीं रूपानें अति मोहक असतां असुरांच्या वधार्थ मोठे विक्राल रूप धारण करितेस, आणि त्यांस प्रत्यक्ष मृत्युरूपिणी होतेस. १३ तू देवांची गायत्री, मन्त्रगणांची आई, कुमारी जनांचें ब्रह्मचर्य व तरुणींचे सौभाग्यहि तूंच आहेस. १४ यज्ञातील वेदि, ऋत्विजांची दक्षिणा, कृषिजनांची सीता ( नांगराचा फाळ ) व भूतमात्रांची धारण करणारी तूंच आहेस. १५ गलबतांतून व्यापार करणाऱ्यांना यशदात्री तूंच असून समुद्राची तीरमर्यादाहि तूंच आहेस; यक्षांमधील कुबेराची आई तूंच व नागांमधील नागमाता जी सुरसा ती तूंच. १६ ब्रह्मवादिनी तूच; यज्ञदीक्षा तूंच; व उत्तम शोभा तूच; हे देवि, ज्योतीचे तेज तूंच; नक्षत्रांमधील रोहिणी तूंच. १७ राजद्वारांस, तीर्थास व नद्यांच्या संगमांस पूर्ण शोभा आणणारी तूंच; चन्द्राचे ठिकाणची पूर्णिमा तूंच व तुलाच कृत्तिवासा ह्मणजे गजचर्म पांघरणारी असें ह्मटलें आहे. १८ वाल्मीकमुनीची काव्यवणि तूंच; व्यासमुनीची स्मरणशक्ति तूंच; ऋषींची धर्मबुद्धि तूंच; देवांची सत्यसंकल्पात्मक मानसिक शक्तिहि तूंच; व आपल्या कृतीनें स्तुतीस पात्र होणारी अशी प्राणिमात्रांना सुराहि तूंच. १९ इन्द्राची सहस्त्रनयनयुक्त मोहक दृष्टि तूच; तपस्व्याचे आराध्य दैवत आणि अग्निहोत्र्यांची अरणीहि ह तूंच; २० सर्वभूतांची क्षुधा व सर्व दैवतांची स्वाहा, तृप्ति,धृति व मेधाहि तूंच व अष्टवसूंची वसुमतीहि तूंच. २१ उद्योगी जनांची आशा तूंच व कृतोद्योगांची पुष्टिहि तूंच; दिशा, विदिशा, अग्निशिखा व प्रभाही तूंच. २२ शकुनि, पूतना व दारुण अशी रेवती तूंच आहेस. सर्व भूतांना झांपड घालणारी अशी शूर निद्राहि तूंच. २३ विद्यांमधील जी ब्रह्मविद्या ती तूंच. ओंकार तूंच; वषट् तूंच; स्त्रियांपैकीं फार पुरातन अशी जी पार्वती ती तूंच असें ऋषि समजतात. २४ प्रजापतीचे ह्मणण्याप्रमाणें साध्वींमधील अरुंधती तूच. अनेक इतर दिव्य नामांनी विश्रुत असणारी इन्द्राणीही तूच. २५ - २६ यावत् स्थावरजंगमात्मक जगत्‌ही तूंच; सर्व युद्धांत, सर्व अग्निप्रळयात, नदीकांठीं, चोरांशी गांठ पडली असतां, अरण्यांत, कोणत्याही भयप्रसंगीं, प्रवासांत, राजबंधांत, शत्रुमर्दनप्रसंगीं, व कोणत्याही प्राणसंकटीं तूंच आमची रक्षणकर्ती यांत शंका नाहीं. २७ हे देवि, माझें हृदय सर्वथा तुझे ठिकाणी आहे. तसेंच माझें मन व चित्तही तुझेच ठिकाणीं. याकरिता मजवर कृपा करून सर्व पापांपासून माझे रक्षण कर.२८ - २९ हा श्रीविष्णूंनी स्वमुखाने केलेला व व्यासमुनींनीं पद्यरूपानें लिहिलेला दिव्यस्तव जो कोणी नित्य प्रातःकाली उठून शूचिर्भूत होऊन निर्मल अंतःकरणानें पठण करील त्याला हे देवि, तीन महिन्यांत तर इच्छित फल देतेस व सहा महिन्यांनी तर फारच उंची असा वर देतेस. ३० शिवाय तीन महिनेपर्यत जर कोणी तुझे अर्चन करील तर तूं त्याला दिव्य चक्षु देशील आणि संवत्सरपर्यत अर्चन करणाराची तर कोणतीहि मनकामना तूं पुरवितेस. ३१ - ३२ कृष्णद्वैपायनांचे म्हणण्याप्रमाणे तूंच ब्रह्म किंवा दिव्य असें सत्य आहेस. आणि पूजन केलें असतां मनुष्यांना बंधन, वध, घोर पुत्रनाश, धनक्षय, व्याधिभय, व मृत्युभय ही बाधूं देत नाहीस. हे कामरूपिणि, हे महाभागे, तूं जगताला वरदात्री होशील. आणि त्या कंसाला भूल पाडून तूं एकटीच सर्व जगताचा उपभोग घेशील. ३३ ( विष्णू म्हणतात, ) मीही गायींत राहून गवळ्यांची वृत्ति धरीन इतकेंच नव्हे तर माझें कल्याण व्हावें म्हणून मी कंसाचाच गुराखी होईन. ३४ याप्रमाणे त्या आर्येला सांगून तो परमात्मा अंतर्धान पावला व तीही त्याला नमस्कार करून " बरें, आपण म्हणतां तसेंच असो " असें त्याला निश्चयानें बोलली. ३५ जो कोणी हें स्तोत्र पठण करील किंवा वारंवार श्रवण करील त्या पुरुषाला निखालस सर्वार्थ सिद्धि प्राप्त होईल.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
स्वप्नगर्भविधाने आर्यास्तुतौ नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
अध्याय तिसरा समाप्त

GO TOP