श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः


लोकवर्णनम्

जनमेजय उवाच
ब्रह्मणा देवदेवेन सार्धं सलिलयोनिना ।
ब्रह्मलोकगतो ब्रह्मन्वैकुण्ठः किं चकार ह ॥ १॥
किमर्थे चादिदेवेन नीतः कमलयोनिना ।
विष्णुर्दैत्यवधे वृत्ते देवैश्च कृतसत्क्रियः ॥ २॥
ब्रह्मलोके च किं स्थानं कं वा योगमुपास्त सः ।
कं वा दधार नियमं स विभुर्भूतभावनः ॥ ३॥
कथं तस्याऽऽसतस्तत्र विश्वं जगदिदं महत् ।
श्रियमाप्नोति विपुलां सुरासुरनरार्चिताम् ॥ ४॥
कथं स्वपिति घर्मान्ते बुध्यते चाम्बुदप्लवे ।
कथं च ब्रह्मलोकस्थो धुरं वहति लौकिकाम् ॥ ५॥
चरितं तस्य विप्रेन्द्र दिव्यं भगवतो दिवि ।
विस्तरेण यथातत्त्वं सर्वमिच्छामि वेदितुम् ॥ ६॥
वैशम्पायन उवाच
शृणु नारायणस्यादौ विस्तरेण प्रवृत्तयः ।
ब्रह्मलोकं यथारूढो ब्रह्मणा सह मोदते ॥ ७॥
कामं तस्य गतिः सूक्ष्मा देवैरपि दुरासदा ।
यत्तु वक्ष्याम्यहं राजंस्तन्मे निगदतः शृणु ॥ ८॥
एष लोकमयो देवो लोकाश्चैतन्मयास्त्रयः ।
एश देवमयश्चैव देवाश्चैतन्मया दिवि ॥ ९॥
तस्य पारं न पश्यन्ति बहवः पारचिन्तकाः ।
एश पारं परं चैव लोकानां वेद माधवः ॥ १०॥
अस्य देवान्धकारस्य मार्गितव्यस्य दैवतैः ।
शृणु वै यत् तदा वृत्तं ब्रह्मलोके पुरातनम् ॥ ११॥
स गत्वा ब्रह्मणो लोकं दृष्ट्‌वा पैतामहं पदम् ।
ववन्दे तानृषीन्सर्वान्विष्णुरार्षेण कर्मणा ॥ १२॥
सोऽग्निं प्राक्सवने दृष्ट्वा हूयमानं महर्षिभिः ।
अवन्दत महातेजाः कृत्वा पौर्वाह्निकीं क्रियाम् ॥ १३॥
स ददर्श मखेष्वाज्यैरिज्यमानं महर्षिभिः ।
भागं यज्ञियमश्नानं स्वदेहमपरं स्थितम् ॥ १४॥
अभिवाद्याभिवाद्यानामृषीणां ब्रह्मवर्चसाम् ।
परिचक्राम सोऽचिन्त्यो ब्रह्मलोकं सनातनम् ॥ १५ ॥
स ददर्शोच्छ्रितान् यूपांश्चषालाग्रविभूषितान् ।
मखेषु च ब्रह्मर्षिभिः शतशः कृतलक्षणान् ॥ १६॥
आज्यधूमं समाघ्राय शृण्वन् वेदान्द् विजेरितान् ।
यज्ञैरिज्यन्तमात्मानं पश्यंस्तत्र चचार ह ॥ १७॥
ऊचुस्तमृषयो देवाः सदस्याः सदसि स्थिताः ।
अर्घ्योद्यतभुजाः सर्वे पवित्रान्तरपाणयः ॥ १८॥
देवेषु वर्तते यद्वै तद्धि सर्वं जनार्दनात् ।
यत्प्रवृत्तं च देवेभ्यस्तद् विद्धि मधुसूदनात् ॥ १९॥
अग्नीषोममयं लोकं यं विदुर्विदुषो जनाः ।
तं सोममग्निं लोकं च वेद विष्णुं सनातनम् ॥ २०॥
क्षीराद् यथा दधि भवेद्दध्नः सर्पिर्भवेद्यथा ।
मथ्यमानेषु भूतेषु तथा लोको जनार्दनात् ॥ २१॥
यथेन्द्रियैश्च भुतैश्च परमात्माभिधीयते ।
तथा देवैश्च वेदैश्च लोकैश्च विहितो हरिः ॥ २२॥
यथा भूतेन्द्रियावाप्तिर्विहिता भुवि देहिनाम् ।
तथा प्राणेश्वरावाप्तिर्देवानां दिवि वैष्णवी ॥ २३॥
सत्रिणां सत्रफलदः पवित्रं परमात्मवान् ।
लोकतन्त्रधरो ह्येष मन्त्रैर्मन्त्र इवोच्यते ॥ २४॥
ऋषय ऊचुः
स्वागतं ते सुरश्रेष्ठ पद्मनाभ महाद्युते ।
इदं यज्ञियमातिथ्यं मन्त्रतः परिगृह्यताम् ॥ २५॥
त्वमस्य यज्ञपूतस्य पात्र पाद्यस्य पावनः ।
अतिथिस्त्वं हि मन्त्रोक्तः स दृष्टः सन्ततं मतः ॥ २६॥
त्वयि योद्धुं गते विष्णौ न प्रावर्तन्त नः क्रियाः ।
अवैष्णवस्य यज्ञस्य न हि कर्म विधीयते ॥ २७॥
सदक्षिणस्य यज्ञस्य त्वत्प्रसूतिः फलं भवेत् ।
अद्यात्मानमिहास्माभिरिज्यमानं निरीक्ष्यसे ॥ २८॥
एवमस्त्विति तान् सर्वान् भगवान् प्रत्यपूजयत् ।
मुमुदे बह्मलोकस्थो ब्रह्मा लोकपितामहः ॥ २९॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
लोकवर्णनं नाम एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः


विष्णूसंबंधी जनमेजयाचे प्रश्न -

जनमेजय विचारतो : -गताध्यायी देवदेव जो कमलोभ्दव ब्रह्मा त्यासह श्रीविष्णू ब्रह्मलोकास गेले म्ह्णून आपण सांगितले; तर तेथें जाऊन श्रीविष्णूने काय केलें, व आदिदेव जो कमलयोनी ब्रह्मा त्यानें सर्व देवांनी व विष्णूंनी केलेल्या दैत्यवधाबद्दल त्यांचा योग्य सत्कार केला असताही पुनरपि त्यास ब्रह्मलोकीं याचा हेतु काय? ब्रह्मलोकांत श्रीविष्णू कोणत्या स्थानी रहातात, तेथें कोणता योग धारण करून व कोणत्या नियमाचे पालन करीत ते भूतपति तेथें असतात? ते ब्रह्मलोकांत असतांना या सर्व विशाल जगतांत देव, असुर व मनुष्य यांना पूज्य अशी विपुल लक्ष्मी कोठून प्राप्त झाली? श्रीविष्ण ऊष्णकालाचे अखेरीस निजतात व वर्षाकालाच्या अखेरीस जागे होतात हें कसें ? व ब्रह्मलोकीं राहून सर्व लोकांचा ते कार्यभार कसा वाहातात? हे विप्रेंद्रा, त्या भगवंतांचे तें दिव्य चरित यथातत्व सविस्तर तुझे मुखानें ऐकण्याची इच्छा आहे.

वैशंपायन सांगतात : - हे राजा, परमात्मा नारायण ब्रह्मलोकीं ब्रह्मदेवासह राहून कसा आनंदांत असतो, हें ऐकण्याचे पूर्वी त्या भगवंताची प्रवृत्ति कशी आहे, हें सविस्तर ऐक. बाकी मी तरी त्याची प्रवृत्ति सांगण्यास समर्थ थोडाच आहें, कारण, ती इतकी सूक्ष्म आहे कीं, देवांनाही तिचा थांग लागत नाहीं; तथापि माझे ज्ञानाप्रमाणे मी तुला सांगतो, तें ऐक. हा भगवान्‌ पटात ज्याप्रमाणें तंतु त्याप्रमाणें पृथिव्यादि सर्व लोकांत आपणच आहे, व तंतूंत ज्याप्रमाणें पट त्याप्रमाणें त्रैलोक्य ही याच्यांतच आहे. स्वर्गातही हा देवरूप आहे आणि देवही याचे स्वरूपांत आहेत.

पुष्कळ लोक याच्या अंताचा शोध लावण्याच्या खटपटींत आहेत. तथापि, त्याचा अंतपार त्यांस लागत नाहीं. या माधवाला मात्र सर्व लोकांचा पार माहीत आहे. असा हा देवांनाही अगम्य व मनुष्याच्या इद्रियांना तर केवळ अंधकारच ( अज्ञातच) असा हा परमात्मा ब्रह्मलोकांत असतांना पूर्वी काय घडले तें ऐक. मागें सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाबरोबर ब्रह्मलोकी गेल्यावर श्रीविष्णनें प्रथम तें ब्रह्मदेवाचे स्थान मन:पूर्वक अवलोकन केलें. नंतर तेथें असणाऱ्या सर्व ऋषींना मंत्रपूर्वक अभिवादन केलें. तदुत्तर तेथें प्रात:काली महर्षि अग्नीचे हवन करीत होते असें पाहून त्या महातेजस्वी विष्णुने आपलें स्नानसंध्यादि प्रात:- कालचें कर्म उरकून अग्नीला वंदन केलें. त्या यज्ञमंडपांत मह्र्षी अग्नीला घृताहुतींनी' पूजित होते व अग्नि तो यज्ञाहुति प्राशन करीत होता. असे पाहून अग्निरूपा्ने आपणच हे प्राशन करीत आहो असें त्यानें पाहिले. नंतर त्या अचिंत्यस्वरूप परमात्म्याने वंद्य असे जे ब्रह्म-वर्चस्वी ऋषि त्यांना वंदन करून त्या सनातन ब्रह्मलोकाला एक फेरी घातली. तो त्याला ब्रह्मर्षींनी ज्यांच्या मस्तकावर "चषाल" वगैरे चिन्हे बसविली आहेत असे शतशः यज्ञीय यूप त्याला आढळले. मग यज्ञभूमितून फिरत अग्नीत घातलेल्या घृताचा वास घेत घेत व ब्राह्मणांच्या मुखांतून आलेले वेद श्रवण करीत करीत आणि यज्ञाच्या रूपाने सर्वजण आपलेंच आराधन करीत आहेत असें पाहात पाहात तो चालला. वाटेने त्या यज्ञशालांतील देव, ऋषि व सदस्य हे बोटांत पवित्रके घालून आणि हातांत अर्घ्यपाद्यादि पूजासामुग्री घेऊन उभे होते. हे राजा, देवाचे जें कांहीं वैभव आहे तें सर्व या जनार्दनापासूनच. व देवांपासूनच जें कांहीं कोणाला मिळतेसे दिसते तेही सर्व या जनार्दनापासूनच. ज्ञाते लोक, ही सृष्टि अग्नीषोममय आहे असेच समजतात. पण ही सृष्टि व तिला व्यापणारे अग्नि आणि सोम हे तरी हा सनातन विष्णुच होय. ज्याप्रमाणें दुधातून दही होतें, आणि दह्यापासून तूप निघते, त्याचप्रमाणें ध्यानबलानें देहेंद्रिये लीन झाली असतां अंतरदृष्टीला हा सर्व चराचर लोक जनार्दनापासून निघाला आहे, असें व्यक्त दिसते. या भूलोकामध्ये ज्याप्रमाणें चेतनव्याप्त जी इंद्रिये व भूते त्यांवरून परमात्म्याचे अस्तित्वाचें अनुमान होते. त्याप्रमाणें देव, वेद व लोक यांपासून श्रीविष्णूचें ज्ञान होतें. ज्या प्रमाणें या पृथ्वीवर देहधारी जीवांच्या इंद्रियांचा सर्वथा पंचमहाभूतांवर अवलंब दिसून येतो त्याप्रमाणेंच स्वर्गामध्यें देवाचे बल व ऐश्वर्य ही श्रीविष्णवर अवलंबून आहेत, असें समजते. असा तो श्रीविष्णू यज्ञकर्त्याना यज्ञाचे फल देणारा, सर्व पवित्रांचा पवित्र, सर्वतंत्र-स्वतंत्र, लोकांना वागविणारा व ज्या मंत्रस्वरूपाची योग्य स्तुति त्याच्याच मंत्रांशिवाय होणे शक्य नाहीं, अशा त्या परमात्याला पाहून ऋषीगण स्वागत करून म्हणाले, "हे सुरश्रेष्ठा, हे पद्मनाभा, हे महाद्युते, हें आह्मीं तुझे यज्ञीय आतिथ्य करीत आहोंत; अर्थात्, याचा आपण मंत्ररूपानें स्वीकार करावा. आम्ही जें हें यज्ञाने पवित्र झालेलें पाद्य आणिले आहे, असल्या पाद्याचें ग्रहण करण्याला तुजसारखाच पावित्र पुरुष योग्य होय. आम्ही मंत्रद्वारा ज्याला अतिथी समजून यज्ञाचे ठिकाणी नित्य आलास हें मानीत होतों, तो तूं आज खराखुराच आमचे दृष्टीस पडलास. हे विष्णो, तूं येथून युद्धाला निघून जाताच आमच्या यज्ञाक्रिया बंद पडल्या.

कारण, विष्णूचे अविद्यमानी कोणतीही यज्ञीय क्रिया करण्याविषयी शास्त्राची आज्ञा नाहीं. यज्ञांतही दक्षिणा वगैरे देऊन तो सांग केला असताही त्याचें फळ तं देशील तेच प्राप्त होतें. आज तू समक्षच पाहातो आहेस कीं, आम्ही तुझीच यज्ञरूपाने आराधना करीत आहो.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
लोकवर्णनं नाम एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ४९ ॥
अध्याय एकोणपन्नासावा समाप्त

GO TOP