॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. ७ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥


श्लोक - रूपादौ गुणदोषादि - विकल्पाः बुद्धिगा: क्रिया: ।
ताःक्रिया विषयैःसार्धं भासयन्सी चितिर्मता ॥ ७ ॥

श्लोकार्थ : रूप इ. विषयासंबंधी गुणदोष कल्पनांचे मनोव्यापार बुद्धिनिर्मित आहेत. त्या मनोव्यापारांना आणि त्या रूपादी विषयांना चिंधूप फक्त प्रकाशित करते, असे मानले जाते. । । ७ । ।

रसरूपरसादि दोषगुण । विकल्प हे बुद्धीचे विकार होणें ।
त्या क्रिया आणि विषय संपूर्ण । ज्ञान चित्यभा भासवी ॥ ११०० ॥
रूपरस इ. गुणदोष मानणे, ठरवणे इ. मनोव्यापार हे बुद्धिजनित विकार आहेत. ते विकार आणि सर्व विषय यांना ज्ञानरूप चित्प्रभा प्रकाशित करते. (११००)

क्रिया व्यवहार जितुके । बहुधाही बुद्धीचे तितुके । जीव आभासरूपें सर्व निकें । भासविलिया होती ॥ १ ॥
जेवढे म्हणून क्रिया व्यापार असतील ते सगळे बहुधा बुद्धिनिर्मित आहेत. ते चिदाभासाने म्हणजे जीवाने (आभासरूप चैतन्याने) प्रकाशित केल्यानंतरच ते व्यापार घडतात. (११०१)


पद : रूपादौ ।

पदाचा अर्थ दिलेला नाही

पूर्वीचे ईश्वरनिर्मित । रूपादि हे पदार्थजात ।
जयासी ईक्षणादि प्रवेशांत । ह्यणे श्रुति ॥ २ ॥
रूपादी सर्व पदार्थ पूर्वी ईश्वरनिर्मित होते. त्यांना ईक्षणादी आणि प्रवेशांत असे श्रुतीने म्हटले आहे. (११०२)

ईक्षण ह्मणजे अवलोकन । करी मायावी ईशान ।
तया इच्छेसीरसे निर्माण । होतें जाले ॥ ३ ॥
ईक्षण म्हणजे अवलोकन. मायानिर्मित ईश्वराने ते अवलोकन केले आणि मग त्याच्या इच्छेनुसार सर्व उत्पन्न झाले. (११०३)

गुण भूतें निर्माण जाली । जयेतें अष्टधा प्रकृति बोलिली ।
ते अविद्याचि जडत्वा आली । स्थूल सूक्ष्म ॥ ४ ॥
तीन गुण, पंचभूते अशा आठाची मिळून अष्टा प्रकृती निर्माण झाली. त्याच्या निमित्ताने अविद्याच स्थूल, सूक्ष्मरूपाने जडत्वास आली. (११०४)

आकाश वायु तेज आप । पांचवे पृथ्वीचे रूप ।
या भूतांपासून नामरूप । बहुधा जाले ॥ ५ ॥
आकाश, वाणू तेज, आप आणि पाचवी वृद्धी या पंचभूतांपासून अनेक प्रकारची नामरूपे निर्माण झाली. (११०५)

भूतांपासून जें जाले । भौतिकत्व वेगळालें ।
परी तें भोग्य भोक्तृत्वे निवडिलें । चंचळ जड ॥ ६ ॥
भूतांपासून वेगवेगळ्या प्रकारची भौतिक सृष्टी निर्माण झाली. तिचे भोग्य आणि भोक्ता या संबंधाने जड आणि चंचळ असे दोन प्रकार झाले. (११०६)

जडत्वे चारी खाणी होती । साकारत्वे भिन्न भिन्न व्यक्ति ।
तलादि कृणाल जगतीं । सान कीं थोर ॥ ७ ॥
जडत्वाने चार खाणी (उद्धिच्च, स्वेदज, अंडज, जारज) निर्माण झाल्या. त्यांच्या आकारानुसार ब्रह्मदेवापासून ते तृणापर्यंत लहान मोठ्या व्यक्ती अस्तित्वात आल्या. (११०७)

हें पंचीकृत भूतांचे जाले । जें पूर्वी उपक्रमी सांगितलें ।
त्यांत अपंचीकृत मिळालें । सूक्ष्म तत्व ॥ ८ ॥
ही सर्व सृष्टी पंचीकृत भूतांपासून निर्माण झाली, हे अगोदरच आरंभीच्या भागात सांगितले आहे. त्यात अपंचीकृत सूदमतत्त्व मिळाले. (११०८)

इतुकेंही ईश पाहून । खणे हें सर्व जड मजविण ।
चलन न पावती तरी आपण । प्रवेशावे अंतरीं ॥ ९ ॥
हे ईश्वराने पाहिले. तो म्हणाला, या सृष्टीत मी नसत्यामुळे ती जड राहिली आहे. तिच्यात चलनवलन काही नाही तेव्हा आपण तिच्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. (११०९)

मग ईश्वरे रूप आपुले । आच्छादुनी जीवत्व घेतलें ।
तेचि चहंखाणींत प्रवेशले । तेव्हा व्यापारती सर्व ॥ १० ॥
मग ईश्वराने आपले रूप झाकून जीवरूप धारण केले. ते सर्व खाणींमध्ये पसरले. तेव्हा पृथ्वी- वरील सर्व सजीव हालचाल करू लागले. व्यवहार करू लागले. (१११०)

ते व्यापार तितुके जीवाचे । पुढें अनुक्रमें बोलिजे वाचे ।
परी प्रवेश होय तो निर्मित ईशाचें । ईक्षणापासूनी ॥ ११ ॥
जीवाचे जेवढे व्यापार आहेत, ते पुढे क्रमश: सांगण्यात येतील. पण ईश्वराचा जीवरूपाने प्रवेश होण्यापूर्वीची ईश्वराने केलेल्या ईक्षणापासूनची सर्व सृष्टी ईश्वरनिर्मित होती. (११११)

आकाशी शब्द स्पर्श वायूचा । तेजाचे रूप रस विषय जापाचा ।
गंध तो जाणावा वृद्धीचा । एव ही पंचभूतें ॥ १२ ॥
आकाशाचा शब्द हा विषय आहे, स्पर्श वायूचा विषय आहे, तेजाचा रूप हा विषय आहे, रस हा जलतत्त्वाचा विषय आहे. गंध हा वृद्धीचा विषय जाणावा. अशा प्रकारची ही पंचभूते आहेत. (१११२)

भौतिक ज्या चारी खाणी । अथवा कृणान्स आदिकरूनी ।
या सर्वांमाजी विषयश्रेणी । पंचधा असती ॥ १३ ॥
भौतिक म्हणून जन्माला आलेल्या ब्रह्मदेवापासून ते तृणापर्यंतच्या ज्या चार खाणी आहेत, त्या सर्वांमध्ये पाच विषय आहेत. (१११३)

साकार जितुकें रूपासि आलें । तें नेत्रासी दृश्य जाहले ।
ह्यणोनि रूपादिनाम असें ठेविलें । रूप तेथें चारी ॥ १४ ॥
जेवढे म्हणून आकार धारण करणारे होते त्या सगळ्यांना रूप प्राप्त झाले. ते सर्व डोळ्यांनी दिसते म्हणून त्यांना रूप असे नाव ठेवले. जेथे जेथे रूप असेल तेथे बाकीचे चार विषय असतातच (१११४) (पहा ओवी क्र. १११६)

नाम कल्पना असे जीवाची । परी ओळखी व्हावी लागे रूपाची ।
म्हणोनि बोलावे वाउर्गेची । अमुक नामे ह्यणोनी ॥ १५ ॥
नाव ही कल्पना ही जीवकृत आहे. परंतु सरूप पदार्थांची ओळख व्हावी म्हणून उगीचच हा पदार्थ अमुक नावाचा, तो अमुक नावाचा, असे व्यर्थ बोलावे लागते. (नावाला अर्थ नाही. तो यादृच्छिक आहे. सांकेतिक आहे.) (१११५)

रूप तेथें शब्द असे । स्पर्शही तेथेच वसतसे ।
वास्तव्य केले गंधरसें । ह्मणोनी भौतिकत्व ॥ १६ ॥
जेथे रूप आहे तेथे शब्द असतोच. तेथेच स्पर्शाचेही वास्तव्य असते. तेथेच गंध आणि रस यांनीही वास्तव्य केलेले असते म्हणून साकारांच्या ठिकाणी भौतिकत्व असतेच. (१११६)

धोत्रामुळे शब्द हें नाम । त्वचेस्तव स्पर्शासी उद्गम ।
चसूसाठी रूपाचा अनुक्रम । रस जिव्हे प्रीत्यर्थ ॥ १७ ॥
कानांमुळे शब्द हे नाव मिळते. त्वचेमुळे स्पर्श या नावाची उत्पत्ती झाली. डोळ्यांमुळे रूपाचे अस्तित्व ठरते आणि रस हा शब्द जिभेसाठी निर्माण होतो. (१११७)

घाणामुळे गंध जाला । एव पचधा भाव जीवे कल्पिला ।
परी ईश्वरे पदार्थमात्र निर्मिला । तेथें पंचविषयां वस्ती ॥ १८ ॥
नाकामुळे गंध निर्माण झाला. अशाप्रकारे जीवाने या याच प्रकारांची कल्पना केली. पण मूळ सगळे पदार्थ हे ईश्वराने निर्माण केले आहेत. त्यांच्या ठिकाणी वरील पाच विषयांनी वस्ती केली. (१११८)

स्वर्ग सत्य लोक पाताळीं । जितुकें ब्रह्मांड अधोर्स्ट स्थळी ।
सर्वी या पंचभूतां वेगळी । अणुही असेना ॥ १९ ॥
स्वर्ग, मृत्युलोक. पाताळ या तिन्ही लोकांत ब्रह्मांड जेवढे वर खाली पसरलेले आहे, त्या सर्वही ठिकाणी या पंचभूतांहून निराळा असा एक कणही सापडणार नाही. (१११९)

पांचांवेगळा पदार्थ सहावा । नाहींच नाहीं न दिसावा ।
तस्मात् ब्रह्मगोळ जो हा आता । पंचभूतात्मक ॥ २० ॥
या पाच भूतांहून वेगळा असा सहावा पदार्थ नाही, आणि तो दिसणारही नाही. त्यामुळे हा सगळा ब्रह्मांडाचा गोल पंचभूतात्मकच असतो, हे समजून घ्यावे. (११२०)

पृथ्वी आदि ही मुख्यभूतें । आणि भूतांपासून भौतिके समस्ते ।
हे उभयही अनुक्रमें राहते । जाले ब्रह्मगोळीं ॥ २१ ॥
वृद्धी इ. मुख्य भूते आणि त्यांच्यापासून निर्माण झालेली सगळी भौतिके अशी दोन्हीही या ब्रह्मांड गोलकात राहू लागले. (११२१)

असो इतुकेंही ईशनिर्मित । रूपादि विषयाल्पक समस्त ।
हें दृश्य परी अबाधित । अतीत बंध मोक्ष ॥ २२ ॥
असो, इतके सगळे रूपादी विषयात्मक पदार्थ हे ईशनिर्मित आहेत. हे दृश्य आहेत तथापि हे सर्व अबाधित (अबाधक) आहेत. ते बंध आणि मोक्ष यांच्या पलीकडचे आहेत. (११२२)

कवणासी बांधी ना सोडवी । उगीच निर्बाधरूपें असावी ।
यावरी बंधनरूपता उभवावी । कल्पित जीवे ॥ २३ ॥
ते कोणाला बांधत नाहीत किंवा सोडवीत नाहीत. ते निर्हेतुकपणे निर्बाधक रूपात आहेत. त्यांच्यावर बंधकत्वादी कल्पना या निव्वळ जीवनिर्मित आहेत. (११२३)

सहजरूपादि हें निर्माण । याच्याठायी जीव हा आपण ।
उभविता जाला दोषगुण । तेणेंचि बंध पावला ॥ २४ ॥
ही सर्व रूपादी सृष्टी सहज निर्माण झालेली आहे. तिच्यामध्ये जीवाने दोष गुण उभविले आहेत. त्यामुळे जीव हा बंधनात सापडतो. (११२४)


पद ' गुणदोषादिविकल्पा बुद्धिगाःक्रिया: ।

पदार्थ : रूप इ. विषयासंबंधी गुणदोष कल्पनांचे मनोव्यापार हे बुद्धिनिर्मित (जीवनिर्मित) आहेत.

जीवकृत ह्मणजे बुद्धीनें केलें । व्यापारादि नामभेद कल्पिले ।
तेचि क्रियात्मक पाहिजे ऐकिलें । मुमुक्षे त्यागार्थ ॥ २५ ॥
जीवकृत म्हणजे बुद्धीने केलेले व्यापार इ. नामभेद म्हणजेच क्रियात्मक व्यवहार असाच अर्थ मुमुजूने येथे घेतला पाहिजे आणि सर्व क्रियात्मक व्यवहाराचा त्याग केला पाहिजे. (११२५)

गुण ह्मणजे हें हें चौगुले । हें ओंगळ तें तें दूषिलें ।
येणेंरीतीं जीवे कल्पिले । गुणदोषाल्पक ॥ २६ ॥
गुण म्हणजे अमुक गोष्ट चांगली आहे. दोष म्हणजे अमुक गोष्ट ओंगळ आहे, वाईट आहे, अशा प्रकारे जीवाने या गुणदोषात्मक कल्पना केल्या आहेत. (११२६)

हे प्रिय पदार्थ हे अप्रिय । हें सुखकर हें दुःखद होय ।
हे अनुपयोगी हे हे उपाय । हे गुणदोष कल्पना ॥ २७ ॥
हे पदार्थ प्रिय आहेत, हे अप्रिय आहेत, हे सुखकर आहे, हे दुःखकर आहे. हे अनुपयोगी आहे, हे उपयोगी आहेत. (उपाय याचा येथे संदर्भानुसार उपयोगी हा अर्थ केला आहे.) या सगळ्या गुणदोष कल्पना होत. (११२७)

हे पुण्यात्मक असती । हे पापाल्पक ओळखिती ।
हे ग्राह्य हे अग्राह्य असती । हे गुणदोष कल्पना ॥ २८ ॥
हे पुण्यात्मक आहेत, हे पापात्मक असे ओळखणे; हे ग्राह्य आहेत, हे अग्राह्य आहेत इ. सर्व गुणदोष कल्पना आहेत. (११२८)

हे वंद्य निंद्य उंच नीच । हे सफळ हे निर्मळ आहाच ।
हे थोर हे सानसे उगेच । हे गुणदोष कल्पना ॥ २९ ॥
अमुक वंद्य आहे, निंद्य आहे; हे उच्च आहे, हे खालचे आहे; हे सफळ आहे, हे निर्फळ आहे, निरर्थक (आहाच) आहे; हे थोर आहे, हे घतुक निरुपयोगी आहे; या सर्व गुणदोष कल्पना आहेत. (११२९)

हे सुंदर हे ओखटे । हे हे श्रीमान हे करंटे ।
हे वडील हे असती धाकुटे । हे गुणदोष कल्पना ॥ ३० ॥
हे सुंदर आहे, हे कुरुप आहे; हे श्रीमंत आहेत, हा दरिद्री आहे; हे वडील आहे, हे धाकटे आहेत; या सर्व गुणदोष कल्पना आहेत. (११३०)

हे सजातीय हे विजातीय । हे चंचळ हा जड प्रकार होय ।
ही स्त्री नपुसक पुरुष होय । हे गुणदोष कल्पना ॥ ३१ ॥
हे सजातीय आहे, हे विजातीय आहे; हे चंचळ आहे, हा प्रकार जड आहे; ही स्त्री आहे, हा नपुंसक आहे. हा पुरुष आहे; या गुणदोष कल्पना आहेत. (११३१)

हे स्वकीय हे परके । हे आस माझे हे येर असिके ।
हा मी तो तूं हे हें निकें । हे गुणदोष कल्पना ॥ ३२ ॥
हे स्वकीय आहेत, हे परकीय आहेत; हे माझे आस आहेत, हे बाकीचे सर्व परके आहेत; हा मी आहे, हा तू आहेस; हे सर्व चांगले आहे; इ. सर्व गुणदोष कल्पना आहेत. (११३२)

हे स्वामी हे सेवक । हा राजा हे येर रंक ।
हा अधर्मी हा धार्मिक । हे गुणदोष कल्पना ॥ ३३ ॥
हे स्वामी (मालक) आहेत, हे सेवक आहेत; हा राजा आहे, दुसरे गरीब आहेत: हा माणूस अधर्माचरण करणारा आहे, हा धार्मिक आहे: या गुणदोष कल्पना आहेत. (११३३)

हे कीटक ओंगळ अधम । हे पतंगादि मध्यम ।
हे पानकिडे किती उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥ ३४ ॥
हे ओंगळ घद्र कीटक आहेत हे पतंग इ. मध्यम आहेत; हे पानकिडे किती उत्तम आहेत; या सर्व गुणदोष कल्पना आहेत. (११३४)

हे हिवरादि वृक्ष अधम । बोरी बाभळी हे मध्यम ।
धात्री शमी पिंपळ उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥ ३५ ॥
हे हिवर इ. वृक्ष अधम असून बोरी, बाभळी हे वृक्ष मध्यम आहेत; धात्री (आवळी), शमी, पिंपळ हे वृक्ष उत्तम आहेत या गुणदोष कल्पना आहेत. (११३५)

कारळे होले हे पक्षी अधम । चिमण्या साळ्यादि मध्यम ।
रावे नीळकंठादि उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥ ३६ ॥
कावळे, होले हे अधम पक्षी होत; चिमण्या, साळ्या मध्यम पक्षी होत; रावे, मोर इ. उत्तम पक्षी आहेत; या गुणदोष कल्पना आहेत. (११३६)

हे श्वानसूकरादि अधम । हे अश्वमहिषादि मध्यम ।
हे गायहरिणादि उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥ ३७ ॥
ही कुत्री, डुकरं इ. प्राणी अधम असून, हे घोडे, रेडे इ. प्राणी मध्यम प्रकारचे आहेत; हे गाय, हरिण इ. प्राणी उत्तम होत; या गुणदोष कल्पना आहेत. (११३७)

हे अंत्यजादि अधम । हे फ गोपादि मध्यम ।
हे विष आणि हिज उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥ ३८ ॥
ह्या अंत्यज इ. अधम जाती आहेत; हे शूद्र क्षुद्र, गोप इ. मध्यम जाती होत; हे ब्राह्मण, हे संस्कारसंपन्न ब्राह्मण (द्विज), ह्या उत्तम जाती होत; या गुणदोष कल्पना होत. (११३८)

हे दैत्यराक्षसादि अधम । हे पितरगंधर्वादि मध्यम ।
हे देव सर्वांत उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥ ३९ ॥
हे दैत्य, राक्षस ह्या अधम योनी होत; हे पितर, गंधर्व इ. मध्यम योनी होत; हे देव म्हणजे सर्वांत उत्तम योनी होत; या गुणदोष कल्पना होत. (११३९)

यक्षगंधर्वादि अधम । इंद्रादि देव हे मध्यम ।
विष्णू आदि हे उत्तम ।हे गुणदोष कल्पना ॥ ४० ॥
यक्ष, गंधर्व हे अधम दर्जाचे देव होत; इंद्र इ. देव हे मध्यम होत: विष्णू इ. हे उत्तम देव होत. या गुणदोष कल्पना होत. (११४०)

ऐसेचि तृण पाषाणाआत । अथवा संपूर्ण वस्तुजात ।
उत्तमाधम भाव संकेत । हे गुणदोष कल्पना ॥ ४१ ॥
याचप्रमाणे तृण, पाषाण यांच्यामध्ये, अथवा संपूर्ण वस्तूमात्रामध्ये उत्तम, मध्यम आणि अधम असे भेदभावाचे संकेत आहेत. ते संकेत म्हणजे गुणदोष कल्पना होत. (११४१)

येथे शंका ऐसी करिसी । कीं हे निर्माणचि जाली ऐशी ।
जैसियासी कल्पना करितां तैशी । दोष तो कोणता ॥ ४२ ॥
यावर तू अशी शंका घेशील की, हे सर्व पदार्थ अशाच प्रकारे निर्माण झाले आहेत. ते जसे आहेत तशी त्यांच्याबद्दल कल्पना केली तर त्यात दोष कोणता ? (११४२)

तरी या उत्तर ऐकावे । जाले असती तैसे स्वभावें ।
तयावरीच वाउगे भाव कल्याचे । उत्तमाधम मध्यम ॥ ४३ ॥
तरी याचे उत्तर ऐकावे, जसे ते निर्माण झाले तसेच ते स्वाभाविकपणे झाले आहेत. पण त्यांच्याबद्दल उत्तम, मध्यम आणि अधम अशा कल्पना विनाकारण कशासाठी करायच्या ? (११४३)

पाहे पां एकचि पाणी असतां । हे ओहळ अधम मध्यम सरिता ।
भागीरथी आदि उत्तम तत्वतां । हेचि गुणदोष ॥ ४४ ॥
असे बघ की, पाणी सर्वत्र एकच असता, हे ओहळ अधम आहेत; नद्या मध्यम आहेत, भागीरथी इ. नद्या उत्तम होत, इ. कल्पना म्हणजे गुणदोष कल्पना आहेत. (११४४)

प्रेताग्नि तो असे अधम । सहज अग्नि तो मध्यम ।
होमादिकांचा तो उत्तम । हेचि गुणदोष ॥ ४५ ॥
प्रेताग्नी अधम स्वरूपचा अग्नी असून, सहज उत्पन्न होणारा अग्नी मध्यम आहे आणि होमादिकांमधील अग्नी उत्तम होय, असे ठरविणे ह्याच गुणदोष कल्पना आहेत. (११४५)

हा कर्कश वायु अधम । हा समान वायु मध्यम ।
हा मंदवायु शीतळ उत्तम । हेचि गुणदोष ॥ ४६ ॥
कर्कश आवाज करणारा वायू (वारा) अधम आहे; समान वायू मध्यम आहे आणि मंद वाहणारा शीतल वायू उत्तम आहे, या सर्व गुणदोष कल्पनाच आहेत. (११४६)

हें मेघे आकाश दूषिले । हें पहा कैसे असे स्वच्छ जाले ।
या रीती येकासीच भाविलें । हेचि गुणदोष ॥ ४७ ॥
मेघांनी झाकोळलेले हे आकाश दूषित असून, मेघरहित आकाश किती चांगले आहे ! अशा रीतीने आकाश एकच असताना त्याच्यासंबंधी वरीलप्रमाणे कल्पना केल्या जातात, हीच गुणदोष कल्पना आहे. (११४७)

हे भूमि किती पवित्र । हे पहा कुसळ अपवित्र ।
तैसेंचि कुग्राम हें क्षेत्र । हेचि गुणदोष ॥ ४८ ॥
ही भूमी किती पवित्र आहे ! ही दुसरी भूमी दुर्लक्षणी आणि अपवित्र आहे, त्याचप्रमाणे हे कुपाम आहे, हे गाव पवित्र क्षेत्र आहे; याही गुणदोष कल्पनाच होत. (११४८)

ऐसेंचि अवघे कर्म धर्म क्रिया । आश्रम गुण विद्या अविद्या ।
हें हें चौगुले हें हें वायां । हेचि गुणदोष ॥ ४९ ॥
अशाच तऱ्हेने सर्व कर्मे, सर्व धर्म, सर्व क्रिया, आश्रम, गुण, विद्या- अविद्या, यामध्ये चांगले, हे वाईट हे व्यर्थ आहे. इ. पाहणे या गुणदोष कल्पनाच होत. (११४९)

हा सुदिन हा दुर्दिन । कुमुहुर्त भाऊन ।
उगाचि संशयी पडे आपण । हेचि गुणदोष ॥ ५० ॥
हा दिवस चांगला आहे. हा दिवस वाईट आहे, अशा प्रकारे कुमुहूर्ताची कल्पना करून मनुष्य उगीचच संशयात पडतो. ह्यालाच गुणदोष कल्पना म्हणतात. (११५०)

असो ऐसें किती बोलावे । धरणीही लिहिता न पुरवे ।
परी अल्प संकेतें समजावे । सर्वही गुण दोषाल्पक ॥ ५१ ॥
असो, असे किती बोलावे ? लिहायला लागले तर सबंध पृथ्वीही पुरणार नाही. पण या थोड्याशा खुणांवरून समजून ध्यावे की, सर्वच पदार्थ गुणादोषात्मक आहेत. (११५१)

येथें हे कल्पिसी ऐसें । गुणदोष वेर्देचि सांगितले जैसे ।
तैसेचि जीवही भावीतसे । तरी बाध तो कोणता ॥ ५२ ॥
येथे अशी कल्पना करशील की, गुणदोष वेदांनीच सांगितले आहेत. जीवानेही त्याप्रमाणे कल्पना केली तर काय बाधा आहे ? (११५२)

तरी याचें उत्तर ऐकावे । जीवे आवडते उत्तर घ्यावें ।
न आवडे तें तें अव्हेरावे । वेदवचन जरी ॥ ५३ ॥
तर याचे उत्तर आता ऐक. जीव फक्त स्वतःला आवडते, ते उत्तर स्वीकारतो, जे आवडत नाही ते ते तो अव्हेरतो. मग वेदाने ते सांगितलेले असले तरी तो ते स्वीकारत नाही. (११५३)

वेदवचनें गुणदोष केले । म्हणोनि तोचि असे स्वीकारिलें ।
तरी काय हें वचन नाहीं ऐकिले । तें कां न घ्यावें ॥ ५४ ॥
वेदवचनाचे गुणदोष सांगितले म्हणून तेवढेच फक्त जीवाने स्वीकारले. वेदाने सांगितलेले पुढील वचन त्याने काय ऐकले नाही काय ? मग ते वचन त्याने का स्वीकारू नये ? (११५४)

गुणदोष पाहणे तो दोष । गुणदोष न पाहणे हा गुण विशेष ।
तरी या वचनें कां निर्दोष । होऊन न परतावे ॥ ५५ ॥
'गुणदोष पाहणे हा दोष आहे, गुणदोष न पाहणे हा विशेष गुण आहे' हे ते वचन होय. मग हे वचन ऐकित्यानंतर तो गुणदोष पाहण्यापासून का परावृत्त होत नाही ? (११५५)

येथें भाविसी अंतःकरणी । कीं बहु वचनें गुणदोषालागुनी ।
येखार्दे वचन असतां निवर्तनी । प्रमाण कैसे घ्यावें ॥ ५६ ॥
आता यावर आणखी मनात म्हणशील की, गुणदोषवाचक वचने संख्येने पुष्कळ आहेत. त्यापासून परावृत्त करणारे वचन एखादेच असते. ते प्रमाण कसे मानावे ? (११५६)

तरी गोज मरता सुतक धरावे । ऐसें कश्चित वचन असेल स्वभावें ।
जें जनी बळकट धरावे । स्वप्नी न विस्मरतां ॥ ५७ ॥
तर मग ' आपल्याच गोत्रातील मनुष्य मरण पावत्यावर सुतक धरावे' असे वचन क्वचित एखादेच असते. पण लोक ते वचन पक्के धरून ठेवतात. त्यांना त्याचे स्वप्नातही विस्मरण होत नाही. (११५७)

आणि ब्रह्मचि जीव अभिन्नपणीं । अनंत या वाक्याच्या आयणी ।
तरी कां सहसा न मानिती कोणी । तस्मात् आवडे ते शास्त्र ॥ ५८ ॥
आणि 'ब्रह्म आणि जीव यांच्यात अभेद आहे. त्यामुळे जीव हा ब्रह्मच आहे. ' या अर्थाच्या वाक्यांचे अनेक समुदाय वेदात आढळतात. मग कोणी त्यावर सहसा विश्वास का ठेवत नाहीत ? म्हणून आपल्याला आवडते ते शास्त्र, असा हा प्रकार आहे. (११५८)

असो पदार्थमात्रासी गुणदोष । कल्पून घेतसे शोक हर्ष ।
हेचि बुद्धीची कल्पना विशेष । निर्मित जीवाचे ॥ ५९ ॥
असो, तेव्हा पदार्थांमध्ये गुणदोषांची कल्पना करून जीव त्यामुळे आनंद अथवा दुःख मानतो. असे मानणे हीच बुद्धीची विशेष कल्पना आहे आणि ती जीवाची निर्मिती आहे. (११५९)

पूर्वी ईशनिर्मित जितुकें । भोगाचे उपेगा आणी तितुके ।
हेचि जीवाचे करणें असिकें । कल्पनायोर्गे ॥ ६० ॥
पूर्वी ईश्वराने जेवढे निर्माण केले तेवढे सर्व आपल्या भोगासाठी वापरतो. हेच सगळे जीवाचे कल्पनानिर्मित कार्य आहे. (११६०)

जैशी बापे कन्या निर्मिली । ते भर्त्यासी भोग्य जाली ।
तैशी ईश्वरे सर्व सृष्टि केली । ते भोगा आली जीवाचे ॥ ६१ ॥
ज्याप्रमाणे बापाने कन्येला जन्म दिला, पण ती कन्या तिच्या पतीला भोग्य झाली. त्याप्रमाणे ईश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली, ती जीवाच्या भोगासाठी उपयोगी पडली. (११६१)

येक स्त्री निर्मिली ईश्वरे । तेथें कल्पना हे करिती सारे ।
त्यांत कवणाचें मानावें खरें । हें बरें पहा ॥ ६२ ॥
ईश्वराने एक स्त्री निर्माण केली. तेथे हे सगळे लोक निरनिराळ्या कल्पना करतात. त्यात कुणाचे मत खरे मानायचे ते ठरवा. (११६२)

बंधु लणे हे माझी भगिनी । पुत्र ह्मणे हे माझी जननी ।
भर्ता लणे हे माझी पत्नी । भोग्य क्रीडेसी ॥ ६३ ॥
भाऊ म्हणतो ही माझी बही ण आहे, पुत्र म्हणतो ही माझी आई आहे. पती म्हणतो ही माझी पत्नी आहे. ती माझ्या विलासासाठी भोग्य आहे. (११६३)

देवर ह्मणे श्वातृभार्या । पितरे ह्मणताति कन्या तया ।
सासू जाली असे जांवाया । विहिण व्याह्याची ॥ ६४ ॥
दीर म्हणतो, ही माझी भावजय आहे आणि आईवडील तिलाच आपली कन्या मानतात. तीच तिच्या जावयाची सासू होते आणि व्याह्याची विहीण होते. (११६४)

ऐसे कितेक कितेकापरी । बोलताती स्वजनें सारी ।
परंतु येकचि असे जे नारी । ते भेदावली नाहीं ॥ ६५ ॥
असे कित्येक नातेवाईक कित्येक प्रकारांनी बोलतात. परंतु स्त्री मात्र एकच असते. तिच्यात काही फरक होत नाही. (११६५)

परी हे माझी माझी ह्मणून बैसले । सदृढ प्रेमाचे बंधन पडिलें ।
ते मेलिया रडती आपणही मेले । सुखदु- शिणोनी ॥ ६६ ॥
परंतु हे लोक मात्र माझी माझी म्हणत राहिले. अतिशय दृढ प्रेमाचे बंधन त्यांच्यावर पडले. ती स्त्री मरण पावत्यावर ते रडले आणि नंतर सुखदुःखांनी शिणल्यानंतर स्वतःच मरून गेले. (११६६)

परी अज्ञाने वासना बेडी । पडिली ती न सुटे सांकडी ।
उगीच जन्मती मरती बापुडी । उंच नीच योनी ॥ ६७ ॥
परंतु अज्ञानामुळे वासनेची बेडी पायात पडते, ती काही केल्या सुटत नाही आणि ते बापडे जीव उंच नीच योनींमध्ये पुन: पुन: जन्मतात आणि मरतात. (११६७)

येथें तुझी होईल भावना । कीं जीवे उगीच केली कल्पना ।
परी तुजी कोणती केली रचना । ईशनिर्मितावरी ॥ ६८ ॥
येथे तुझी अशी भावना होईल की, जीवाने उगीच कल्पना केली म्हणून काय झाले ? जे ईश्वराने निर्माण केलेले होते त्याच्या जोडीला त्याने वेगळे असे काय निर्माण केले ? दुसरी कोणती नवीन भर घातली ? (११६८)

पहिली स्त्री असतां खरी । येणे कोणती निर्मिली दुसरी ।
आणि भावने सुखदुःखा माझारी । कैसा पडे ॥ ६९ ॥
मुळातली स्त्री खरी असताना तिच्याशी वेगवेगळी नाती जोडत्याने जीवांनी वेगळी स्त्री तर निर्माण केली नाही ना ? आणि भावना अथवा कल्पना केल्याने जीव सुखदुःखात कसा काय पडतो ? (११६९)

तरी या आक्षेपाचे उत्तर । दिधले पाहिजे साधार ।
आधीं जीवे निर्मिले तो प्रकार । पुढे बंधनरूप बोल- ॥ ७० ॥
तर आता या आक्षेपाचे उत्तर दिले पाहिजे. आधी जीवाने काय काय निर्माण केले ते पाहू आणि नंतर त्या निर्मितीमुळे बंधन कोणते पडते ते पाहू (जीवनिर्मित गोष्टींचे बंधनरूप पाहू) (११७०)

ईश निर्मिली मांसमयी । ते गोचर असे इद्रियसमुदायी ।
तुजी जीवे ही मनोमयी । निर्मिली अंतरीं ॥ ७१ ॥
ईश्वराने निर्माण केली ती स्त्री हाडामांसाची होती. ती निरनिराळ्या इंद्रियांनी जाणवत होती (गोचर) पण जीवाने आपल्या अंतःकरणात ही दुसरी नवीन मनोमयी स्त्री निर्माण केली. (११७१)

मांसमयी सन्निध नसता । अथवा ते मरोनिही जातां ।
परी मनोमयीच वासने आतौता । स्मरतां उभी राहे ॥ ७२ ॥
हाडामांसाची स्त्री जवळ नसताना अथवा ती मरण पावली असतानासुद्धा जीवनिर्मित ही मनोमयी स्त्रीच तिचे स्मरण करताच वासनेत उभी राहते. (११७२)

मांसमयी चसूनें पहावी । मनोमयी मने आठवावी ।
ते भासतांचि तळमळी जीवी । आहा भेटेल कधीं ॥ ७३ ॥
हाडामांसाची स्त्री डोळ्यांनी पाहता येते. पण मनोमयी स्त्री मनाने आठवली जाते. ती कल्पनेने भासमान होताच 'ती कधी भेटेल ? ' अशी जीवाला तळमळ लागते. (११७३)

त्या तळमळीने परमार्थ नातुडे । आणि येथें स्त्रीसुख न जोडे ।
परी मरतांचि पुनःपुन्हा साकडे । जन्ममृत्यूचे ॥ ७४ ॥
त्या तळमळीने परमार्थ तर हाती लागतच नाही, पण त्या स्त्रीचे सुखही भेटत नाही. परंतु आपण मेल्यानंतर मात्र जन्ममृत्यूच्या संकटात पुन्हा पुन्हा सापडावे लागते (११७४)

मांसमयीनें येथे बांधिलें । सोडून न जाती कांहीं केलें ।
मनोमयीने बंधन पडिलें । परलोकाचे ॥ ७५ ॥
मांसमयी स्त्रीने येथेच बांधून ठेवले, ते बंधन काही केल्या तोडून जाता येत नाही. मनोमयीमुळे तर परलोकाचे बंधन पडले. (११७५)

तस्मात् मनोमय निर्मित जीवाचे । भिन्न निर्मिताहून ईशाचें ।
आणि याहूनही जीवसृष्टीचें । प्रत्यक्षपण असे ॥ ७६ ॥
त्यामुळे मनोमय निर्मिती ही जीवकृत असून ती ईशनिर्मित सृष्टीपेक्षा भिन्न आहे. ईशवृष्टापेक्षा जीवसृष्टीचे प्रत्यक्षपण अधिक आहे. (११७६)

तृण पाषाणाची घरे करावी । मृत्तिकेच्या धातु निपजवी ।
धातूची पात्रे नगे घडावी । बहु कारागिरीनें ॥ ७७ ॥
तृण, पाषाण इ. पासून घरे करावीत, माती चाळून तिच्यातून धातू निर्माण करावेत, धातूंची पात्रे बनवावीत, कलाकुसरीने दागिने घडवावेत; (११७७)

अनेकापरीचें करणें नाना । कत्यनेने करिती रचना ।
तितुके बोलतां तें सरेना । कर्तव्यता जीवाची ॥ ७८ ॥
अशा प्रकारची कार्ये माणसे करतात. ती सर्व कल्पनेचीच रचना असते. जीवाच्या या कामगिरीबद्दल जितके बोलावे तेवढे थोडेच होईल. (११७८)

परी जितुकें स्थलानं निर्मिले । तेणें जीवासी नाहीं बांधिलें ।
निर्वाध असती पदार्थ जेतुले । ईश सुष्टापरी ॥ ७९ ॥
पण यातही जितके पदार्थ स्थलदेहाने निर्माण केले, ते ईशसूष्टाप्रमाणेच निर्बाध आहेत. त्यांनी जीवाला बंधनात अडकवले नाही. (११७९)

मनोमयाची जे प्रीति । हेचि जीवासी बंधनरूप असती ।
हेचि सांगू येका दृष्टांतीं । निर्बाध बाधक ॥ ८० ॥
मनोमय कत्यनानिर्मित सुष्टीचे जीवाला आकर्षण असते तेच जीवाला बंधनकारक असते. तेव्हा निर्बाध काय आणि बाधक काय हेच आता एका दृष्टान्ताने स्पष्ट करून सांगतो. (११८०)

पुत्र देशांतरा गेला । तो स्वत सिद्ध सुखरूप असिला ।
परी कोणीं वंचकें सांगितलें कीं मेला तेव्हां रडे अट्टहास्थे ॥ ८१ ॥
आपला पुत्र परदेशात गेला आहे. तो स्वत: व्या दक्षतेने तेथे सुखरूप आहे. पण कोणा लबाड माणसाने येऊन सांगितले की, तो मेला आहे. तेव्हा माणूस जीव मोकलून रडतो. (११८१)

अथवा पुत्र मृत्यूही पावतां । नायके जोवरी त्याची वार्ता ।
तोवरी न रडे सुखे वर्ततां । दुःख तें नव्हे ॥ ८२ ॥
अथवा पुत्र खरोखरच मृत्यू पावला आहे, पण त्याच्या मृत्यूची वार्ता बापाला कळली नाही, तोपर्यंत तो (बाप) सुखात राहतो, रडत वगैरे काही नाही. तेव्हा पुत्राचा मृत्यू खरा दुःखकारक नाही. (११८२)

पुत्राचा मृत्यू नव्हे दु ःखकारी । अथवा वाचणे नव्हे सुखकारी ।
तस्मात् कल्पनाचि मात्र सारी । सुखदुःखप्रद ॥ ८३ ॥
पुत्राचा मृत्यू प्रत्यक्षात दु: खकारक नाही, अथवा त्याचे जिवंत असणे प्रत्यक्षात सुखकारक नाही. तेव्हा फक्त त्या घटनांची कल्पनाच तेवढी सुखदुःख देणारी असते. (११८३)

कल्पने कांहीं येक भावावें । तेव्हांचि सुखदुःखादि व्हावें ।
ना तरी पदार्थ असतां न घडावे । सुखदु ख कदा ॥ ८४ ॥
कल्पनेने काहीएक भावना करावी तेव्हाच सुखदुःखादी निर्माण होतात. केवळ पदार्थ किंवा घटना उपस्थित असत्या तर सुखदु खादी होणारच नाहीत. (११८४)

निद्रेत कवणाचे पुढें मागें । स्त्री सर्प दोनी असतां प्रसंगे ।
परी ते कल्पनेवीण दंगे । सुखदुःखाचे न होती ॥ ८५ ॥
एखादा मनुष्य गाढ झोपेत असताना प्रसगपरत्वे त्याच्या मुख्यात स्त्री आहे, मागे सर्प आहे. असे दोन्ही असताना त्याच्या गाढ झोपेत कल्पनेच्या अभावी त्याला सुख अथवा दुःख यापैकी काहीच वाटत नाही. (११८५)

एव जीवसृष्टि तेचि बाधक । ईशसुष्टि निर्बाधक ।
हें जाणिजे निश्चयात्मक । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ८६ ॥
अशा प्रकारे जीवसृष्टी हीच बाधक ठरते. तशी ईशसूष्टी बाधक नसते, असे निश्चयपूर्वक समजावे. हे त्रिवार सत्य आहे. (११८६)

एतदर्थ तितीर्घु साधक जन । अनेकधा श्रवणादि अभ्यासेंकडून ।
करिती जीवद्वैताचें हनन । तेव्हांचि सुखी होती ॥ ८७ ॥
त्यामुळे संसारसागरातून तरून जाण्याची इच्छा करणारे (तितीर्दू साधक लोक निरनिराळ्या श्रवणादी अभ्यासाच्या योगाने जीवकृत द्वैत नष्ट करतात, तेव्हाच सुखी होतात. (११८७)

निःशेष हानि जीबबूताचि । हेचि पराकाष्ठा जीवमुक्तीची ।
मिथ्यात्वदृष्टि ईदारुष्टाची । निःशेष हानि नको ॥ ८८ ॥
जीवकृत द्वैताचा संपूर्ण नाश हीच जीवन्मुक्तीची उत्कृष्ट स्थिती होय. ईशसूष्टांकडे मिथ्यात्व दृष्टीने पाहिले तरी पुरे आहे. त्यांचा संपूर्ण नाश करण्याची आवश्यकता नाही. (११८८)

ईशवृष्टीचे पदार्थ जितुके । परी ते द्विविध असती तितुके ।
मिथ्या पाहणे तेचि निर्बाधकें । साधकें गुरुशास्त्रे ॥ ८९ ॥
ईशसूष्टीचे जेवढे म्हणून पदार्थ आहेत ते सर्व दोन प्रकारचे आहेत. (बाधक आणि निर्बाधक) त्यांच्याकडे मिथ्यात्वाने पाहिले की ते बाधक ठरत नाहीत. याबाबतीत गुरू आणि शास्त्र ही मिथ्यात्वाची दृष्टी प्राप्त होण्यासाठी उपयुक्त आहेत. (११८९)

गुरु सच्छास्त्रावीण कांहीं । साधका तरणोपाय नाहीं ।
म्हणोनि साधकत्व तया पाही । उपयोगी प्ग्रमार्था ॥ ९० ॥
सद्‌गुरू आणि सच्छास्त्र या दोन्हीवाचून साधकाला तरणोपाय नाही म्हणून त्यांना साधक असे म्हटले आहे; ते परमार्थासाठी उपयुक्त आहेत. (११९०)

तैशीच जीव सृष्टि दोन रीती । शास्त्रीय अशास्त्रीय ह्मणविती ।
शास्त्रीय अहंब्रह्मास्मि अनुभूति । आणि संपत्ति श्रवणादि ॥ ९१ ॥
त्याचप्रमाणे जीवसृष्टी ही शास्त्रीय आणि अशास्त्रीय अशी दोन प्रकारची आहे. शास्त्रीय जीवसृष्टी म्हणजे श्रवण इ. साधनसंपत्ती आणि ' अहं ब्रह्मास्मि' असा अनुभव ही होत. (११९१)

हे जीवसृष्टि परी उपयोगी । मुक्ति येणेंचि जीवालागीं ।
यावीण अशास्त्रीय जे वाउगी । त्यागावी साधर्के ॥ २२ ॥
ही जरी जीवनिर्मित सृष्टी असली तरी उपयुक्त आहे. या दोहोंमुळेच जीवाला मुक्ती मिळते. याखेरीज जी अशास्त्रीय जीवसृष्टी आहे ती व्यर्थ आहे. साधकाने तिचा त्यागच केला पाहिजे. (११९२)

अशास्त्रीयाचेही प्रकार द्विविध । एक मंद एक तीव्र इंद्र ।
तीव्र ते जाणावे कामक्रोध । मंद तें मनोराज्य ॥ ९३ ॥
अशास्त्रीय जीवसुष्टीचेही दोन प्रकार आहेत. एक मंद आणि दुसरा तीव्र. तीव्र प्रकार म्हणजे काम आणि क्रोध हे होत. तर मंद म्हणजे मनोराज्य हा होय. (११९३)

मनोराज्य तें हे कल्पना । जे सांगितली उंच नीच भावना ।
तिचा परिणाम जे करी यातना । कामादि जीवासी ॥ ९४ ॥
मनोराज्य म्हणजे कल्पना. ती म्हणजे उच्च आणि नीच अशी भावना. तिचा परिणाम म्हणजे जीवाला यातना देणारे कामादी शत्रू होत. (११९४)

तस्मात कामादि आणि मनाची । कल्पनारूप सृष्टि जीवाची ।
त्यागिली पाहिजे अंतरीची । निपटूनि साधकें ॥ ९५ ॥
म्हणून जीवनिर्मित कामादी आणि जीवाची कल्पनासुष्टी या गोष्टी साधकाने आपल्या अंतःकरणातून समूळ निपटून काढाव्यात. (११९५)

उंचनीच भावरूपे कल्पना । हें जागृतीचे विषयसुख नाना ।
अहं ब्रह्मास्मि प्रतीति गहना । हे मोक्षप्रद सुखद ॥ ९६ ॥
उच्च नीच भावनारूप कल्पना हे जागृतीचे नाना प्रकारचे सुख, तर ' अहं ब्रह्मास्मि' हा गहन अनुभव मोक्षप्रद असून सुखदायक आहे. (११९६)

एव जागतीपासून जीवाची । मोक्षापर्यंत रचना साची ।
त्यांत त्यागणें आग्रहणाची । वेवादणी सांगितली ॥ ९७ ॥
अशा प्रकारे जागृतीपासून मोक्षापर्यंत ही सर्व जीवाची कृती आहे. त्यातील कशाचा त्याग करावा, कशाचा स्वीकार करावा याचा विवेक सांगितला. (११९७)

तैसेचि ईदारुष्ट पदार्थजात । ईक्षणापासोनि प्रवेशांत ।
रूपरसादि हे विख्यात । सांगितले स्पष्ट ॥ ९८ ॥
त्याचप्रमाणे ईश्वरनिर्मित ईक्षणापासून ते ईश्वराच्या अनुप्रवेशापर्यंत जे रूप, रस इ. सर्वज्ञात पदार्थ आहेत, ते स्पष्टपणे सांगितले. (११९८)

असो रूपरसादि या पदार्थावरी । जीव कल्पनारूप क्रिया सारी ।
हे बुद्धिगत भावना खरी । नसोनि भावी जीव ॥ ९९ ॥
असो. रूप, रस इ. पदार्थांवर जीव कल्पनारूप क्रियेचा आरोप करतो, ही भावना अर्थात बुद्धीची आहे. ती खरी अस्तित्वात नसताना सुद्धा जीव तिची कल्पना करतो. (११९९)


श्लोक: ता:मतेःक्रियाविषयैःसार्धं चितिः भासयन्सी ॥ ७ ॥ (उत्तरार्ध)

अर्थ : त्या बुद्धिनिर्मित व्यापारांना आणि त्या रूपरसादी विषयांना चिद्र्रए फक्त प्रकाशित करते; असे मानले जाते. । । ७ । । (उत्तरार्ध)

त्या क्रिया ज्या बुद्धिवृत्तीच्या । विषयासहित कल्पना जीवाच्या ।
तितुक्या येकदांचि प्रकाशवी साच्या । स्वप्रकाशे चिडूपता ॥ १२०० ॥
बुद्धिवृत्तीचे जे व्यापार आहेत ते आणि जीवाच्या विषयासहित ज्या कल्पना आहेत, त्या सगळ्यांना जीव स्वप्रकाशाने एकदमच प्रकाशित करतो. (१२००)

विषय तेचि रूपरसादिके । साकार दृश्य जितुकें ।
ब्रह्मादि स्थावराल्ल अनेकें । सान थोर ईशजनित ॥ १ ॥
विषय म्हणजे रूप, रस इ. आणि ब्रह्मदेवादीपासून ते अनेक स्थावर लहान मोठ्या पदार्थापर्यन्त हे ईश्वरनिर्मित आहेत. (१२०१)

तयावरी जीवाची कल्पना । जे कां जीवसृष्टीची रचना ।
मनोमयाल्पक भास नाना । प्रिय द्वेष्य उपेक्ष ॥ २ ॥
त्या ईश्वरनिर्मित सूटीवर जीव आपल्या कल्पना करतो. त्या कल्पनांमध्ये प्रिय, द्वेष्य, उपेक्षणीय इ. भावना आणि इतर अनेक मनोनिर्मित भास इचा समावेश होतो. त्या सर्व जीवसृष्टीच्या रचना होत. (१२०२)

ऐसे जीव ईदारुष्ट दोनी । प्रकाशी आल्पप्रभा चिल्लाणी ।
दुजे नसता साह्य उपकरणी । येकपणी स्वतेजे ॥ ३ ॥
अशा प्रकारे जीवसृष्ट आणि ईश्वरसूष्ट या दोन्ही पदार्थांना चैतन्याची मूर्तिमंत खाणच असलेली आत्मप्रभा दुसऱ्या कोणत्याही उपकरणाचे साहाय्य न घेता एकटीच स्वतःच्या तेजाने प्रकाशित करते. (१२०३)

जैसा सूर्य आकाशींचा । दुजा साहाकारी तरी कैचा ।
एकलाचि स्वप्रकाश साचा । पदार्थमात्र प्रकाशी ॥ ४ ॥
आकाशातील सूर्याला दुसरा कोणी साहाय्यकर्ता असतो काय ? तो एकटाच स्वप्रकाशाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो. (१२०४)

भिंती माळवदे अंगणे । जैसा आकार त्रिचतुष्कोणे ।
त्यामाजी घट ठेविलें भिन्नभित्रे । सजळें भरोनी ॥ ५ ॥
भिंती, माळवदे, अंगणे, मग ते त्रिकोणी चौकोनी असे कोणत्याही आकाराचे असोत; त्यामध्ये निरनिराळे पाण्याने भरलेले घट ठेवलेले आहेत. (१२०५)

त्या जळामाजीं प्रतिबिंबे पडती । दुसरे सूर्यांऐशींची वाटती ।
त्याची झळझळ पडली भिंती । सामान्य प्रकाशावरी ॥ ६ ॥
त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबे पडतात, ती सूर्यासारखीच वाटतातत्यांची झळझळ भिंतीवर पडते. भिंतीवर सूर्याचा सामान्य प्रकाश अगोदरचा होताच. त्यावर ही प्रतिबिंबाच्या प्रकाशाची झळझळ उमटते. (१२०६)

असो भिंती आणि घट सजळ । प्रतिबिंब आणि भिंती झुळझुळ ।
येकदांचि प्रकाशी सकळ । सूर्य माध्याहीचा ॥ ७ ॥
त्या भिंती आणि ते पाण्याने भरलेले घट, घटात पडलेली सूर्याची प्रतिबिंबे आणि भिंतीवरील त्यांची झळझळ यांना तो मूळचा माध्याहीचा सूर्य एकाचवेळी प्रकाशित करतो. (१२०७)

तैसाचि आत्मा सूर्य जगाचा । स्थावर आदि जंगमाचा ।
जयातळी सर्वा उत्पत्तीचा । प्रकार जाला ॥ ८ ॥
त्याप्रमाणे आत्मा हा सर्व स्थावर आणि जंगम पदार्थासह सर्व जगाचा सूर्य आहे. त्याच्या खालीच सर्व प्रकारच्या उत्पत्ती झाल्या आहेत. (१२०८)

ऐसा ब्रह्मांडरूप हा मठ । भिंती रूपरसादि ह्या नीट ।
त्यामाजी चारी खाणी घट । लिंगजळें भरिले ॥ ९ ॥
हे सर्व ब्रह्मांड हेच एक मठ आहे. त्याच्या रूप, रसादी विषय या भिंती आहेत. त्यांच्यामध्ये चारी खाणी रूपी घट लिंगदेहरूपी जलाने भरलेले ठेवले आहेत. (१२०९)

अथवा स्थूल मांसमय भिंती । त्यांत अविद्या घट अव्याकृति ।
जळ तेंचि बुद्धीची वृत्ति । आदिकरोनि सत्रा ॥ १० ॥
किंवा स्थूल मांसमय देह ह्या भिंती आहेत, त्यात अव्याकृत असे अविद्यारूपी घट आहेत. त्यामध्ये बुद्धिवृत्तीचे सतरा प्रकार हेच पाणी भरलेले आहे. (१२१०)

त्या बुद्धीमाजी जात्यसूर्याचे । प्रतिबिंब पडलें जेवी साचे ।
तेचि रूप मिथ्या जीवाचे । चिदाभास नावी ॥ ११ ॥
त्या बुद्धीमध्ये आत्मसूर्याचे, आकाशातील सूर्याप्रमाणे हुबेहूब असलेले, प्रतिबिंब पडते तेच मिथ्या जीवाचे स्वरूप आहे; त्यामुळे त्याला चिदाभास असे म्हणतात. (१२११)

त्या प्रतिभासाची झळझळ । रूपरसादिकांवरी पडे सकळ ।
तेचि कल्पना उंच नीच बरळ । भावना जीवाची ॥ १२ ॥
या प्रतिबिंबाच्या प्रतिभासाची झळझळ सर्व रूपरसादी विषयांवर पडते; ही झळझळ म्हणजेच उच्चनीच अशा प्रकारची जीवाची व्यर्थ भावना होय. (१२१२)

पहिलें रूपादि ईशनिर्मित । वरती जीवाचे भासरूप जनित ।
आणि बुद्धिआदि जीवासहित । भासवी चित्प्रभा ॥ १३ ॥
प्रथम ईश्वरनिर्मित रूपरसादि सुटी, त्यानंतर तिच्यावर जीवाने निर्माण केलेली भासरूप कल्पनासुष्टी आणि बुद्धी इ. जीवसामग्री या सर्वांना चित्यभाच प्रकाशित करते. (१२१३)

जैसे भिंती घट जळासहित । प्रतिबिंब आणि भिंती झळकत ।
हें इतुकेंही एकदांचि प्रकाशित । निजतेजें सूर्य ॥ १४ ॥
ज्याप्रमाणे भिंती, जलाने भरलेले घट, सूर्याचे प्रतिबिंब आणि भिंतीवरील झळझळ या सर्वांना सूर्यच स्वतःच्या तेजाने प्रकाशित करतो. (१२१४)

तैशी स्थल अविद्याबुद्धि । प्रतिभास जीवही त्यामधीं ।
रूपरसादि ईशजनित आधीं । त्यावरी कल्पना जीवाची ॥ १५ ॥
त्याप्रमाणे स्थूलदेह, अविद्यायुक्त बुद्धी, आभासरूप प्रतिबिंबित जीव, त्यात ईशसूष्ट रूप, रसादी विषय, त्यावर जीवाने उभ्या केलेल्या कल्पना; (१२१५)

इतुक्यासहित जितुकें निर्माण । कार्य अथवा अज्ञान कारण ।
ज्ञान किंवा विपरीत ज्ञान । स्वये प्रकाशी चित्प्रभा ॥ १६ ॥
एवढ्यांसमवेत जेवढे काही निर्माण झालेले कार्य अथवा अज्ञान कारण, ज्ञान अथवा विपरीत ज्ञान या सर्वांना चित्ययाच स्वत: प्रकाशित करते. (१२१६)

मूळ मायेपासून कृणाल । गुणविषय पंचभूत ।
ईश आणि ईशजनित । आल्पप्रकाशे भासती ॥ १७ ॥
मूळ मायेपासून तृणापर्यंत, गुण, विषय, पंचभूते, ईश्वर आणि ईश्वराने निर्माण केलेले सर्व काही त्या आत्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होतात. (ज्ञात होतात) (१२१७)

बुद्धीपासून विषयानं कल्पना । व्यापार मनोमय जे नाना ।
जीवजनित आणि जीवपणा । आल्पप्रकाशे भासती ॥ १८ ॥
बुद्धीपासून विषयापर्यंतच्या कल्पना, विविध मनोव्यापार, जीवसृष्ट पदार्थ आणि जीवत्व हे सर्व आत्मप्रकाशानेच प्रकाशित होतात. (१२१८)

एव साराही इतुका आभास । वाउगा अज्ञाने भासला भास ।
परी आत्मा हा येकदांचि सर्वांस । जात्यप्रकाशे भासवी ॥ १९ ॥
अशा प्रकारे एवढा सारा सुष्टीचा पसारा म्हणजे आभासच होय. केवळ अज्ञानामुळे तो खोटा असूनही दिसू लागला. परंतु आत्मा हा एकाच वेळी सर्वांना आत्मप्रकाशाने भासमान करतो. (१२१९)

या कोकींचे निरूपण ऐसें । सत्यमिथ्या निवडिलें असे ।
आणि ईश जीवाचे निर्मित जैसे । तेंही स्पष्ट जाले ॥ १२० ॥
या सातव्या श्लोकावरील हे निरूपण आहे. त्याच्यायोगे सत्य मिथ्या यांचा निवाडा झाला आहे आणि ईशनिर्मित आणि जीवनिर्मित यांचेही रूप स्पष्ट झाले. (१२२०)

मुख्य सामान्य आणि आभास । निवडिले कळावया साधकास ।
आणि अज्ञानकाळींही चितूपास । लोप नसे तें स्पष्ट जाहले ॥ २१ ॥
मुख्य म्हणजे सामान्य आणि आभास यांच्यातील भेद कळावा यासाठी त्यांचा यथायोग्य निवाडा केला. अज्ञानकाळीदेखील चिद्र्रप लोप पावत नाही, हे स्पष्ट केले. (१२२१)

ऐसें ऐकतांचि रविदत्त । साष्टांग घाली दंडवत ।
जी जी महाराज हर्ष स्तवित । प्रश्रहेतु ठेऊनी ॥ २२ ॥
असे ऐकताच रविदत्ताने साष्टांग दंडवत घातला. तो मोठ्या आनंदाने सद्‌गुरूंची स्तुती करू लागला. त्याच्या मनात मात्र एक प्रश्न विचारण्याचा हेतू होता. (१२२२)

हैत ईशाचें आणि जीवाचे । भिन्न भिन्न साकार मनोमयाचे ।
निरूपण जाले संकेतें त्याचें । परी अपेक्षा उरली ॥ २३ ॥
तो म्हणाला, ' 'महाराज, ईशसूष्ट आणि जीवसृष्ट यांच्यातील भेद आपण स्पष्ट केलात मनोमय सृष्टीतील सामान्य आणि आभास इ. भिन्न रूपांचेही स्पष्टीकरण केले. पण अजून पूर्ण समाधान झाले नाही. मनात एक प्रश्न राहिलाच आहे. (१२२३)

वेद आणि शास्त्रें सारी । हे निर्माण जाहली बहुधा परी ।
यांसी ईश कीं जीव निर्माण करी । हें कळावे मज ॥ २४ ॥
वेद आणि शास्त्रे ही अनेक प्रकारांनी निर्माण झालेली आहेत. पण त्यांची निर्मिती ईश्वराने केली की जीवाने केली ? आपण मला सांगावे. '' (१२२४)

बहु बरें ह्मणून श्री गुरु । बोलते जाले करुणाकल ।
यथार्थाचे बोलिजे साधाल । निर्भीडपणे आतां ॥ २५ ॥
यावर करुणासागर सहुरू म्हणाले, ' 'खूप छान ! आता या प्रश्नाचे यथार्थ उत्तर सांगतो ते ऐक. '' (१२२५)

जीवही साकार असेना । मग साकारत्व कैसे ईशाना ।
हें न कळून करिती वलाना । उभयां साकारत्याची ॥ २६ ॥
जीवही साकार नाही. मग ईश्वराला तरी साकारत्व कसे असेल ? पण हे न कळल्यामुळे लोक या दोघांनाही साकारत्व असत्याची बडबड करतात. (१२२६)

पुरुषत्व आलें साकारत्वासी । श्वासही उत्पन्न तयासी ।
कल्पिता वेद होणें श्वासी । अति विरोध कीं ॥ २७ ॥
साकार म्हटले की, त्याच्या ठिकाणी पुरुषत्वाची कल्पना आलीच. मग त्याच्या श्वासोच्छासाची कल्पनाही आलीच. त्यामुळे 'वेद हे ईश्वराची नि: श्वसिते आहेत' अशी कल्पना करण्यात आली. पण असे करण्यात मोठा विरोध निर्माण होतो. (१२२७)

जरी पुरीमध्ये राहिला । पुरुष नाम यास्तव जीवाला ।
तरीही तया अभासाला । अभाव श्वासाचा ॥ २८ ॥
जीव पुरीमध्ये राहतो म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात. पण कितीही झाले तरी तो मुळात आभासरूपच आहे. आभासाच्या ठिकाणी श्वासाचा अभावच आहे. (१२२८)

तस्मात् श्वासापासून वेदाची । उत्पत्ति खणता साची ।
अपौरुषत्व या वचनाची । हानि होय ॥ २९ ॥
त्यामुळे वेदाची उत्पत्ती श्वासापासून झाली असे म्हणणे संभवत नाही. तसे मानले तर 'वेद हे अपौरुषेय आहेत' या वचनाला विरोध उत्पन्न होतो. (१२२९)

ह्मणोनि अज्ञानाची कल्पना । स्वीकारिली जरी वलाना ।
तरी अनुभवा उणेपणा । आणि सूतीसी विरोध ॥ ३० ॥
म्हणून ही अज्ञानामुळे केलेली कल्पना आहे. ही व्यर्थ उक्ती स्वीकारली तर ते अनुभवाच्या विरुद्ध आहे. आणि वेदाच्याही विरुद्ध आहे. (१२३०)

यास्तव लोकवार्ता सांडावी । अनुभवे प्रतीति स्वीकारावी ।
तरीच हे भ्रांति निरसावी । येऱ्हवी सदृढ ॥ ३१ ॥
म्हणून या समजुतीकडे लोकवार्ता (लोकांची पोकळ बडबड) समजून तिचा त्याग करावा आणि अनुभवाने ज्याची खात्री पटेल त्याचा स्वीकार करावा. तेव्हाच या धान्य कल्पनेचा निरास होईल. अन्यथा ती दृढ होऊन बसेल. (१२३१)

असो स्वानुभवानुसार । बोलिजेत आहे सविस्तर ।
आधीं कैसा जीव कोण ईश्वर । पुढें वेद तो कैसा ॥ ३२ ॥
तेव्हा स्वानुभवाच्या आधाराने आता सविस्तर सांगतो. प्रथम जीव म्हणजे काय ? ईश्वर म्हणजे काय ? वेद म्हणजे काय ? ते पाहू (१२३२)

मागें तुजला ईशजीवाचें । रूप निवडून दिधले साचे ।
परी तें तुजला कळले नवचे । ह्यणोनि पुन्हा सागू ॥ ३३ ॥
मागे तुला जीव आणि ईश्वर यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले आहे, पण ते तुला कळलेले दिसत नाही. म्हणून पुन्हा सांगतो (१२३३)

वृत्तिरूप माया उद्भवली । तेचि दोप्रकारें विभागली ।
विद्या अविद्या जे सांगितली । ज्ञानाज्ञानरूप ॥ ३४ ॥
(ओव्या क्र. १८६ आणि १८७ पहा). वृत्तीच्या स्वरूपात माया उत्पन्न झाली. ती दोन प्रकारांत विभागली गेली. ज्ञानस्वरूप ती विद्या आणि अज्ञानस्वरूप ती अविद्या हेही सांगितले. (१२३४)

अविद्येत जाणतेपणाचें । प्रतिभासले रूप तें जीवाचे ।
विद्येत प्रतिबिंब चिदूपाचें । तोचि ईश्वर ॥ ३५ ॥
अविद्येत जे जाणतेपणाचे रूप प्रतिबिंबित झाले तेच जीवाचे रूप होय. आणि विद्येत जे जाणतेपणाचे (चैतन्याचे) प्रतिबिंब पडले तोच ईश्वर होय. (१२३५)

अविद्या उपाधीमुळे जीवा । अन्यथा भाव यावा ।
सूक्ष्मदेहाचा प्रकार व्हावा । विकार बुद्धि वृत्तीचा ॥ ३६ ॥
अविद्या या उपाधीमुळे जीवाला खोटेपणाची कल्पना चिकटली. त्यानंतर बुद्धिवृत्तीचा विकार होऊन सतरा प्रकारचा सूक्ष्मदेह तयार झाला. (१२३६)

बुद्धिवृत्तींत जें पडिलें । तें बुद्धि ऐसें न जाय कल्पिले ।
तरी मग सत्रा प्रकारें जीवत्व जाले । कासयावरूनी ॥ ३७ ॥
ज्याचे बुद्धिवृत्तीत प्रतिबिंब पडते ते बुद्धिवृत्तीसारखेच असत नाही. मग जीवत्व सतरा प्रकारचे झाले, असे कसे म्हणता येईल ? (१२३७)

बुद्धीचे विकार सत्रा असती । त्यांत प्राण जडत्वे पांच बोलती ।
त्या प्राणाचे श्वास उमटती । तरी ते न होती जीवाचे ॥ ३८ ॥
बुद्धीचे सतरा विकार होतात. त्यात पाच प्राण आहेत. ते जड असतात. त्या प्राणांचे श्वास उत्पन्न होतात. पण जीवाचे श्वास असे म्हणता येत नाही. (१२३८)

अज्ञानास्तव मात्र जीवानें । देहासहित तादात्म्य धरणे ।
तया अभिमानत्रयाचें बोलणें । पुढें निरोपू ॥ ३९ ॥
पण जीव मात्र अज्ञानामुळे देहासहवर्तमान सर्वांशी तादात्म्य धरतो. त्या तीन प्रकारच्या अभिमानांचे स्वरूप पुढे सागू (१२३९)

कल्पनारूप जीवे केलें । तें आतां जीवसृष्ट सांगितलें ।
जें जें योजना करून उभविलें । जागतीपासून मोक्षान्स ॥ ४० ॥
सध्या जीवाने कल्पनेच्या रूपाने जे जे निर्माण केले त्या जीवसृष्टाचे स्वरूप सांगितले. जागृतीपासून ते मोक्षापर्यंत त्याने जे निर्माण केले ते सर्व जीवसुष्टाचे स्वरूप आहे. (१२४०)

असो जीवांचे रूप ज्ञानाऐसें । परी ते ज्ञान नव्हे प्रतिबिंब भासे ।
तें बुद्धीहूनही अनारिसें । कळावे साधका ॥ ४१ ॥
असो. जीवाचे स्वरूप ज्ञानासारखे आहे. पण त्याचे ज्ञान हे खरे ज्ञान नव्हे. ते केवळ प्रतिबिंस्वरूप आहे. खरे ज्ञान बुद्धिवृत्तीपेक्षाही निराळे आहे. हे साधकास कळले पाहिजे. (१२४१)

आतां ईश जो विद्याल्पकवृत्ति । त्यामाजीं प्रतिबिंबरूप वस्ती ।
जयाची तो सर्वज्ञ अमूर्ति । विद्येऐसाही नव्हे ॥ ४२ ॥
विद्यात्मक अशी जी वृत्ती तिच्यात पडलेले स्वरूपाचे प्रतिबिंब म्हणजे ईश्वर होय. तो अमूर्त आहे. सर्वज्ञ आहे. त्यामुळे तो विद्येपेक्षा निराळा आहे. (१२४२)

तया वृत्तीपासून बहु निर्मित । जाले परी तें विकास न पावत ।
अन्यथा न होऊन निवांत । स्फूर्ति रूप स्फूर्ति असे ॥ ४३ ॥
त्या वृत्तीपासून पुष्कळ पदार्थ निर्माण झाले. पण ती विद्यात्मक वृत्ती मात्र विकार पावत नाही. तिच्यात इतर काहीही बदल न होता ती स्फूर्ती केवळ स्फुरणरूपानेच असते. (१२४३)

विद्यास्कूर्ति विकारा न पावे । मग ईश कैसे अन्यथा व्हावें ।
नुसधे विद्या उपाधीनें असावें । उत्पत्ति हेतु ठेउनी ॥ ४४ ॥
विद्या स्फूर्ती विकार पावत नाही, मग ईश्वर कसा बदलेल ? फक्त एवढेच की केवळ उत्पत्तीचा हेतू ठेवून तो विद्या उपाधीने युक्त अशा स्वरूपाने असतो. (१२४४)

हिरण्यगर्भ सत्रा प्रकार । त्यांत या ईशाचें जरी बिढार ।
लणावे परी सर्वांचे विकार । सर्वज्ञा न लागती ॥ ४५ ॥
हिरण्यगर्भाचे सतरा प्रकार (अवयव) आहेत. त्यात ईश्वराची वसती असते. पण तरी त्या सतरा प्रकारांचे विकार त्या सर्वज्ञ ईश्वराला लागत नाहीत. (१२४५)

ऐसें ईशाचें जरी भासरूप । सांगितलें कळावया अल्प ।
तेथें श्वास ना नव्हे संकल्प । तरी योजना केंची ॥ ४६ ॥
अशा ईश्वराचे स्वरूप भासरूप आहे ते थोडेफार कळावे म्हणून तसे सांगितले आहे. त्या रूपात श्वास नाहीत, तसे संकल्पही नाहीत. मग ईश्वराने आपल्या निःश्वासातून निर्माण केले असे जे म्हटले जाते, ते कसे ? त्यामागे कोणती योजना आहे. (१२४६)

श्वास हे धर्म प्राणाचे । कल्पनारूप तें जीवाचे ।
श्वास संकल्पाविण ईशाचें । रूप नुसर्धे स्कूर्तिरूप ॥ ४७ ॥
श्वास हा तर प्राणाचा धर्म आहे. आणि जीवाचे कल्पना हेच रूप आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी श्वास अथवा संकल्प दोन्हीही नसून त्याचे रूप केवळ स्कूर्तिरूप आहे. (१२४७)

तया स्कूर्तिज्ञानामुळें । भूत गुणादि जाली सकळे ।
परी तें जीवेशाहून वेग । चंचळ जड दोन्ही ॥ ४८ ॥
त्या स्कूर्तिज्ञानामुळे पंचभूते; सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण इ. सर्व निर्माण झाले. त्यांच्यापासून चंचळ आणि जड असे पदार्थ निर्माण झाले. ते जीव आणि ईश्वर यांच्यापेक्षा निराळेच आहेत. (१२४८)

आरंभी ब्रह्मा निर्माण जाला । स्वयंभूव नामे बोलती त्याला ।
परी तो साकार जेणे निर्मिला । तया नाव स्वयंभू ॥ ४९ ॥
आरंभी ब्रह्मदेव निर्माण झाला. त्याला स्वयंभुव या नावाने ओळखतात. पण असा हा साकार ब्रह्मदेव ज्याने निर्माण केला, खरे पाहता, त्याचेच नाव स्वयंभू होय. (तोच खरा स्वयंभू आहे.) (१२४९)

साकारावरीच दृष्टि जयाची । अज्ञानास्तव बोलती तेची ।
कीं स्वयंभूव साकार विरिंचि । परी तें नव्हे ॥ ५० ॥
ज्यांची दृष्टी नेहमी साकारावरच असते तीच माणसे अज्ञानामुळे साकार ब्रह्मदेवाला स्वयंभू असे म्हणतात, पण ते खरे नाही. (१२५०)

अहं ब्रह्मस्कूर्ति मायेची । त्या चचळपणी वस्ती जाण त्याची ।
तेथेंचि इच्छा वसे बहुपणाची । कीं व्हावें बहुत ॥ ५१ ॥
' अहं ब्रह्म' ही स्फूर्तीच मुळात मायेची आहे. त्या ब्रह्मदेवाची वस्ती त्या चंचलपणात आहे. त्याच्याच ठिकाणी ' आपण बहु व्हावे' अशी बहुपणाची इच्छा निर्माण होते. (१२५१)

ती इच्छा परी निर्हेतुक । मन संकल्पादि नसती तर्क ।
नुसधी वृत्ति निर्विकल्पक । त्या इच्छेनें सर्व जाहले ॥ ५२ ॥
ती इच्छा निर्हेतुक असते. त्यामागे मन, संकल्प इ. तर्कांची लक्षणे नसतात. तिथे केवळ निर्विकल्पक वृत्ती असते. त्याच इच्छेने हे सर्व विश्व निर्माण झाले. (१२५२)

मायास्कूर्तिसहित जाणीव । इच्छाबीजेसी जो आठव ।
आदिनारायण तयाचे नांव । सविशेष स्वयंभू ॥ ५३ ॥
मायास्फुरणासहित जी जाणीव असते, त्या इच्छाबीजाचे जे स्मरण असते त्याचे नाव आदिनारायण असे आहे. त्यालाच विशेष स्वयंभूव आदिनारायण असे म्हणतात. (१२५३)

तयाचिये इच्छेसरिसे । भूतगुणादि होती अपैसे ।
चंचल तत्त्वादि होऊन सरिसे । स्थल जाला विश्चिचीचा ॥ ५४ ॥
त्याच्या इच्छेनेच भूते, गुण इ. आपोआप निर्माण होतात. पुढे चंचल आणि जड पदार्थ निर्माण झाले आणि नंतर विरंची म्हणजे ब्रह्मदेवाचा स्थूलदेह निर्माण झाला. (१२५४)

तया स्थूलामाजी प्रवेशतां । ईशचि जाहला जीवत्वे स्वता ।
मग चंचळ जड उभयता । चळण पावले ॥ ५५ ॥
त्या स्थूल देहात प्रवेश केल्याबरोबर ईश्वरच स्वत: जीवरूप होतो, आणि मग जड, चंचल तत्त्वे हालचाल करू लागली. (१२५५)

देहाचा चाळक तो प्राण । विषय निवडाव्या मन ।
तया संकल्पामाजी जीवपण । आभासरूप असे ॥ ५६ ॥
देहाचा चालक म्हणून प्राण झाला. विषय निवडण्यासाठी झाले मन. मनाच्या संकल्पामध्ये जीवपणा, हे आभासरूप तत्त्व आहे. (१२५६)

पूर्वींचा जो निर्विकल्प हेतु । तोही असे बुद्धिआतु ।
तोचि ईशान प्रवर्तवितु । सकत्यासह सर्वा ॥ ५७ ॥
पूर्वीचा जो निर्विकल्प हेतू तो बुद्धीमध्ये आहे. तोच ईश्वर असून तो संकल्पासहित सर्व पदार्थांना प्रवृत्त करतो. (१२५७)

एव मायेसहित ईश्वर । ससंकल्पजीव अनेश्वर ।
पां उभयांनींही केलें बिढार । साकार सप्राण ॥ ५८ ॥
अशा प्रकारे मायेसहित ईश्वर, ईश्वराहून भिन्न असलेला संकल्पासह जीव या दोघांनीही साकार सप्राण अशा देहामध्ये आपले बिऱ्हाड केले. (१२५८)

इतुका संघ जेव्हां मिळाला । देही प्राण वायु कळासिला ।
तेव्हां वर्णरूपें शब्द उठिला । ध्वनि नादासहित ॥ ५९ ॥
इतका हा संघात जेव्हा मिळाला आणि देहात प्राणवायू जेव्हा बंदिस्त झाला, तेव्हा वर्णरूपाने शब्द आणि नादासह ध्वनी उत्पन्न झाला. (१२५९)

शब्द गुण तरी गगनाचा । परी हेलावा पाहिजे बापूचा ।
त्यावरी आवाका भासरूप तेजाचा । वरी आपाचे द्रवत्व ॥ ६० ॥
शब्द आकाशाचा गुण आहे, परतु तो उत्पन्न होण्यासाठी वायूची हालचाल पाहिजे, त्यावर भासरूप तेजाचा प्रभाव आणि आपतत्त्वाचे द्रवत्व यांची जरूरी आहे. (१२६०)

हे चान्ही मिळतांही पृथ्वी पाहिजे । जडाच्या आधारे चळण पाविजे ।
तेव्हांचि हेलावियासरिसा उठिजे । शब्द हा वर्णान्मक ॥ ६१ ॥
हे चारी एकत्र आत्यानंतर तेथे वृद्धी ही पाहिजेच. ती जड असत्यामुळे तिच्या आधाराने चलनवलन होऊ शकते. या सर्व गोष्टींचा मेळ होताच हेलाव्याने वर्णात्मक शब्द उत्पन्न होतो. (१२६१)

आरंभी सामान्य ध्वनि । नादरूपे झाली उभवणी ।
तोचि अकार जेफ श्रेणी । पन्नास मात्रांच्या होती ॥ ६२ ॥
आरंभी नादरूपाने सामान्य ध्वनी उत्पन्न झाला. तोच ' अकार' होय. त्यापासूनच पन्नास मात्रा उत्पन्न झाल्या. (१२६२)

अकारीं उकार मिळता । ओकार उमटे पाहतां ।
मकार शेवटी आदळतां । ळ इति प्रगटे ॥ ६३ ॥
अकारात उकार मिसळताच ' ओकार' उमटतो. त्याच्यानंतर शेवटी त्यात मकार मिसळत्याबरोबर ' अ ' असा ध्वनी उत्पन्न होतो. (१२६३)

पहिली स्कूर्ति अर्थरूप । अहंब्रह्म जे निर्विकल्प ।
तेंचि प्राण आणि मन संकल्प । मीनतां जडत्वा आली ॥ ६४ ॥
प्रथम अर्थरूप असलेली अहं ब्रह्मात्मक निर्विकल्प स्कूर्ती होती. तीच प्राण आणि मन संकल्प मिळाल्याबरोबर जडत्व धारण करती झाली. (जड बनली) (१२६४)

सोहे अक्षरे प्राणाच्या बळे । उठली त्यांत हेतु तो मिळे ।
तेणें सोहे शब्द हा उफाळे । हाच की प्रणव ॥ ६५ ॥
प्राणाच्या साहाय्याने प्रथम 'सोध्हय् अशी अक्षरे उत्पन्न झाली. त्यात हेतू मिळाला, त्या सरशी 'सोऽहर शब्द उत्पन्न झाला. हाच 'प्रणव' होय. (१२६५)

सकारशक्ति बीजाआत । अकार उकार मकार मिश्रित ।
हे चंचळपणाचे प्रकार होत । देह उपाधीमुळे ॥ ६६ ॥
सोहम् या उद्वारातील सकार या शक्तिबीजामध्ये अकार, उकार आणि मकार हे मिळाले की देहउपाधीमुळे चंचळपणाचे प्रकार होतात. (१२६६)

ध्वनीमाजी चंचळ जाणता । ते अर्धमात्रा बोलिजे तत्वतां ।
तेथें मात्रेचा उच्चार न होतां । नुसधा नाद ॥ ६७ ॥
या अ, उ, म द्धनीमध्ये जे चंचळपणाचे जाणते तत्त्व आहे, त्याला अर्धमात्रा असे म्हणतात. तेथे मात्रेचा (अक्षराचा) उच्चार न होता केवळ नाद असतो. (१२६७)

तिही मात्रांतही नाद असे । परी ते मात्राद्धनि भिन्न दिसे ।
त्या ध्वनीत नुसधा जाणता विलसे । तो हिंदु कत्यावा ॥ ६८ ॥
तसा नाद वरील तिन्ही मात्रांमध्ये (अ, उ, म या अक्षरांमध्ये) असतोच पण तो मात्राध्वनी भिन्न दिसतो. त्या द्धनीमध्ये केवळ जाणते तत्त्व म्हणून जे असते त्याचे प्रतीक म्हणून अ०, या अक्षरातील बिंदू समजावा (१२६८)

एव अर्धमात्रा बिंदू सहज । हाचि हकार पुरुषबीज ।
पहिला सकार तोचि समज । त्रिमात्राल्पक ॥ ६९ ॥
अशाप्रकारे अर्धमात्रेचा बिंदूरूप नाद हाच 'सोऽहर या उद्रारातील हकार होय. तेच त्यातील पुरुषबीज आहे. आणि आरंभीचा 'सकार तोच त्रिमात्रात्मक आहे असे समजावे. (१२६९)

एव अकार उकार मकार । अर्धमात्रा चौथा प्रकार ।
पांचवा तो बिंदू साचार । ऐशी पांच अंगे प्रणवाची ॥ ७० ॥
अशा प्रकारे ' अ' कार, उकार आणि ' मकार या तीन मात्रा, अर्धमात्रा हा चौथा प्रकार आणि पाचवा बिंदूचा केवळ नादरूप प्रकार अशी प्रणवाची पाच अंगे आहेत. (१२७०)

परी सोहे अक्षरे जी दोन । तोचि प्रणव पंचांग संपूर्ण ।
चि पहावे विचारून । साधर्के अंतरीं ॥ ७१ ॥
पणसोध्हम् या उद्गारात तर दोनच अक्षरे दिसतात पण ही दोनच अक्षरे म्हणजे संपूर्ण पाच अंगांनी युक्त असा प्रणव होत. साधकाने आपल्या अंतःकरणात याचाच विचार करून पहावे. (१२७१)

ऐसा जो प्रणव उमटला । हाचि वेद स्वयंभ जाला ।
येकादनर ब्रह्म नाम जयाला । आणि मोक्षाचा सेतु ॥ ७२ ॥
असा हा जो प्रणव उत्पन्न झाला तोच खरा स्वयंभू वेद उत्पन्न झाला, असे म्हणता येईल. या प्रणवालाच एकाक्षर ब्रह्म असे नाव आहे. आणि तोच मोक्षाला नेणारा पूलही आहे. (१२७२)

वेद म्हणिजे जाणणिया । तें जाणतेपप या वेदराया ।
येर अक्षरा कल्पिणें वायां । वेद ह्यणोनी ॥ ७३ ॥
वेद म्हणजे जाणणे अथवा ज्ञान. हे ज्ञान या प्रणवरूपी वेदामध्ये सामावलेले आहे. म्हणून हाच खरा वेद होय. इतर अक्षरसमूहांना वेद म्हणून संबोधणे व्यर्थ आहे. (१२७३)

तथापि शब्दाविण अर्थासी । जाणणें न घडे मुख्य जीवासी ।
ह्यणोनी शब्दरचना व्हावयासी । पन्नास मात्रा निर्मिल्या ॥ ७४ ॥
परंतु जीवाला शब्दावाचून अर्थाचे ज्ञान होत नाही. म्हणून शब्दाची जडणघडण होण्यासाठी पन्नास मात्रांची निर्मिती करण्यात आली आहे. (१२७४)

अकारादि सोळा वर्ण । कादिमांत पंचवीस गणन ।
तयासी स्पर्श ह्मणती विचक्षण । जे स्पर्शोन उठती ॥ ७५ ॥
अकारादी सोळा स्वराक्षरे (अ, आ, इ, ई, उ, ऊ, क्र, क्र, लू. लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:), क ने आरंभ होणारा पंचवीस व्यजनांचा जो गट (कखगघड, चछजझज, टठडढण, तथदधन, पफबभम) आहे, त्याला शहाणे लोक स्पर्शवर्ण म्हणतात. कारण ते जिभेच्या टाळूशी होणाऱ्या स्पर्शातून निर्माण होतात. (१२७५)

यरादि हे उन्मसान्स । आणि हक्क हे मुळींचे उक्त ।
एव पन्नासांची होय गणित । भिन्नभिन्न मात्रा ॥ ७६ ॥
'यपासून 'स' पर्यतच्या (य र ल व श ष स) सात वर्णांना उष्मवर्ण म्हणतात. 'हकार आणि क्ष हे वर्ण मूळचेच उत्पन्न झालेले आहेत. अशा प्रकारे पन्नास भिन्न मातृकांचे गणित पूर्ण होते. (१२७६)

इतुकियांतही प्रणवाची । व्याप्ति असे अन्वयाची ।
अकारावीण तो नव्हेची । उच्चार मात्रेचा ॥ ७७ ॥
या सर्व मातृकांत प्रणवाची अन्वयरूप व्याप्ती आहे. यातील एकाही मात्रेचा ' अकाराच्या साहाय्यावाचून उच्चार होत नाही. (१२७७)

भास तोचि उकाराचा । दिसणेपणा अक्षरांचा ।
दृश्यभास तो मकाराचा । परिणाम असे ॥ ७८ ॥
अक्षरांचे दिसणे हे उकाराच्या भासकत्वावाचून शक्य होत नाही. अक्षरांच्या ठिकाणी जो दृश्यभास निर्माण होतो तो मकाराचा परिणाम आहे. (१२७८)

एव त्रिमात्राल्पक अकार । तयापासूनीच पन्नास अक्षरे ।
आणि सर्वांमाजींही निरंतर । व्याप्ति प्रणवाची ॥ ७९ ॥
थोडक्यात असे की, त्येकार हा तीन मात्राचा (अ, उ, रे असून त्याच्यापासूनच पन्नास अक्षरे निर्माण होतात. आणि त्या सर्व अक्षरांमध्ये प्रणवाची सातत्याने व्याप्ती असते. त्या सर्व अक्षरांमध्ये प्रणव सतत व्यापून असतो. (१२७९)

तस्मात् इतुकियाही मातृकांसी । वेदचि ह्मणावे अक्षरांसी ।
हे निर्माण झाले अंतरश्वासीं । साकार ब्रह्मयाचे ॥ ८० ॥
त्यामुळे या सर्व मातृकांना (अक्षरांना) वेद असेच म्हणावे. कारण ही अक्षरेदेखील साकार ब्रह्मदेवाच्या अंतरश्वासापासून निर्माण झालेली आहेत. (वेदांची उत्पत्तीही परमेश्वराच्या नि : श्वसितांपासून झाली, अशी समजूत आहे. तुळा : - 'यस्य नि: श्वसितं वेदा: ') (१२८०)

पस पश्यंती मध्यम वैखरी । हीच स्थानें वेदाची चारी ।
चहंपासून यां येकसरी । उच्चार होतसे ॥ ८१ ॥
पस, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी हीच मातृकांप्रमाणेच चारही वेदांचीही स्थाने आहेत. या चारही वाचा प्रकारांपासून एकत्रितपणे उच्चार होत असतो. (१२८१)

ह्याचि मातृका पुढे मागें । होतां शब्द होती अनंत प्रसंर्गे ।
ह्यणोनि आहे निजांगे । अनंता वै वेदा ॥ ८२ ॥
पन्नास मातृका पुढे मागे केल्याने प्रसंगपरत्वे अनंत शब्द तयार होतात. म्हणून ' अनंता वै वेदा: ' असे म्हटले जाते. वेदांचे स्वरूपही तसेच आहे. (१२८२)

ऐसा वेद जो निर्माण जाला । तो साकार ब्रह्मयानें नाहीं केला ।
प्राणचि परिणामा पावला । परी न करी प्राण ॥ ८३ ॥
असा जो वेद निर्माण झाला तो कोणा साकार शरीरधारी ब्रह्मदेवाने निर्माण केलेला नाही. प्राणाचेच परिवर्तन होऊन तो निर्माण झाला. पण तो प्राणाने निर्माण केलेला नाही. तो प्राणांचा केवळ परिणाम आहे. (१२८३)

संकल्पासहित जो जीव । तयासीही कर्तुत्वाचा अभाव ।
ह्यणोनि ईश्वर जो स्वयमेव । तेणेचि केला ॥ ८४ ॥
संकल्पासह असणारा जो जीव त्याच्याकडेही वेदाचे कर्तृत्व जात नाही, जो स्वयमेव (स्वतःच) ईश्वर आहे, त्यानेच वेद निर्माण केला. (१२८४)

मायेसहित जो मायावी । वाउगेचि येकाचे येक दावी ।
जो शिव शक्ति नारायण नावी । तेणेचि वेद निर्मिला ॥ ८५ ॥
जो मायासहित असत्यामुळे मायावी म्हणून ओळखला जातो, तोच उगीचच एकापासून एक झालेले दाखवतो आणि जो शिवशक्ती, नारायण या नावांनी ओळखला जातो, त्यानेच खरी वेदांची निर्मिती केली आहे. (१२८५)

हेंही मायेचेंचि करणें आघवे । जें अज्ञानास्तव वाउगे उभवावें ।
परी तें जड ह्यणोनि आरोपावे । आभासरूप ईशावरी ॥ ८६ ॥
ही निर्मितीदेखील खरी मायेचीच निर्मिती आहे. अज्ञानाच्या प्रभावामुळे हा व्यर्थ पसारा उभा करण्यात आला आहे. परंतु अज्ञान हे जड असत्यामुळे त्याचे कर्तृत्व आभासरूप ईश्वरावर लादले जाते. (आरोपित केले जाते.) (१२८६)

जैसे बुद्धीनें केले जे जे संकल्प । ते ते जीवावरी कीजे आरोप ।
तैसेंचि मायेचें कृत्य मोठे की अल्प । तें ईशे केले ह्मणावे ॥ ८७ ॥
ज्याप्रमाणे बुद्धीने केलेल्या संकल्पांचा जीवावर आरोप केला जातो, त्याप्रमाणे मायेने केलेले कोणतेही लहान मोठे कृत्य असेल ते ईश्वराने केले असे म्हणावे. (१२८७)

असो ऐसा शब्द ब्रह्मासहित । ब्रह्मा निर्माण जाला सुष्टिहेत ।
तो कल्पना जीव जेव्हां करित । तेव्हां अनंत प्रजा निर्मिल्या ॥ ८८ ॥
असो, याप्रमाणे सुष्टीचे मूळ कारण असलेला ब्रह्मदेव शब्दब्रह्मासहित निर्माण झाला. त्याने ईशभावाने जशी सृष्टी निर्माण केली तशा जीवभावाने कल्पनेच्या साहाय्याने अनंत प्रजा निर्माण केल्या. (१२८८)

पशु पक्षी श्वापद कीटक । स्थावर जगमाल्पक जितुकें ।
अवघे जोडेचि सकौतुकें । निर्माण होते जाले ॥ ८९ ॥
पशू पक्षी, श्वापदे, कीटक, जेवढे म्हणून स्थावर (वृक्षादी वनस्पती) आणि जंगम आहे (पशु पक्षी इ. सृष्टी) त्यांची स्त्री-पुरुष नर-मादी अशा युग्मस्वरूपात त्याने निर्मिती केली. (१२८९)

पुढे मैधुनसूष्टि उद्भवली । सर्वही येकापासून येक जाली ।
परी आरंभी संकल्प जे प्रगटली । ते मानसिक सृष्टि ॥ ९० ॥
त्यातून मैधुनसृष्टी निर्माण झाली. तिच्यातून एकापासून दुसरा अशी सुष्टीची निर्मिती होत राहिली. परंतु सर्वांत प्रथम ती एकाच्याच संकल्पातून निर्माण झाली होती. तिलाच मानसिकसृष्टी असे नाव आहे. (१२९०)

येथेंही कोणी मंदमति । येकाचे येकचि भाविति ।
कीं मानसिक संकल्प जे होती । तें करणें ब्रह्मया ॥ ९१ ॥
येथे कोणी मंदबुद्धीचे लोक म्हणतील की एका कारणापासून एकच प्रकारची सृष्टी निर्माण होते. तेव्हा मानसिक जे होतात ती ब्रह्मदेवाची कृती होय. (१२९१)

तो ब्रह्मदेवचि ईश्वर ह्यणावा । कारण की कर्ता जाहला सर्वा ।
जरी हा साकार जीव कल्पावा । तरी विरोध येतसे ॥ ९२ ॥
त्या ब्रह्मदेवालाच ईश्वर म्हणावे. कारण सर्व सुष्टीचा तो कर्ता झाला आहे. पण त्यालाच जर साकार जीव मानले तर या मांडणीत विरोध येतो. (१२९२)

भूतादि तृणान्स निर्माण जितुकें । हें ईशाचें कर्तव्य असे तितुके ।
आतां जीवे केलें ह णतां निकें । तरी केवढा विरोध ॥ ९३ ॥
भूतांपासून ते गवतापर्यंत जे जे काही निर्माण होते ते सर्व ईश्वराचे कर्तृत्व आहे आणि आता तुम्ही ते सर्व जीवाने केले म्हणून सांगता, यात केवढा मोठा विरोध निर्माण होतो. (१२९३)

ऐसिये आशकेसी उत्तर । बोलिजेत आहे पहा विचार ।
जरी मानसिक करी अनेश्वर । तरी मैधुनसूष्टि ही जीवाची ॥ ९४ ॥
अशा आशंकेचे उत्तर सांगतो कसे ते पहा. मानसिक सुष्टीची निर्मिती जरी आभासी (प्रतिबिंबरूप) ईश्वराने (अनेश्वर) केली असली तरी मैधुनसुष्टी ही जीवाचीच असते. (१२९४)

स्त्रीपुरुषसंयोगे उत्पत्ति व्हावी । हे जीवाचे स्वाधीनचि जरी असावी ।
तरी मग संतति नसतो जीवी । तळमळ कासया ॥ ९५ ॥
स्त्रीपुरूष संयोगाने जी उत्पत्ती होते, तिचे कर्तृत्व जर जीवाच्या स्वाधीन आहे असे मानले तर जेव्हा एखाद्याला संतती होत नाही तेव्हा त्याच्या जिवाला तळमळ का वाटावी ! (१२९५)

प्रतिसंगासी बा व्हावें । ऐसें तो कोठे न सभवे ।
मैथुन तो दिनदिशीं न सोडावे । परी पुत्रार्थ रडती ॥ ९६ ॥
प्रत्येक स्त्रीसंगाबरोबर बाळ झालेच पाहिजे, असे तर कधी संभवत नाही. मैथुन रात्रंदिवस सोडलेले नसते तरी माणसे पुत्रप्राप्तीसाठी का रडत असतात ' (१२९६)

तस्मात् करणें नव्हे जीवाचे । मैथुन जरी स्त्रीपुरूषांचे ।
जेव्हां प्रारब्ध उद्धवे होणाराचे । तेव्हा ईदासत्ते होतें ॥ ९७ ॥
त्यामुळे संततिनिर्मिती हे जीवाचे कृत्य नाहीच. मैथुन जरी स्त्रीपुरुषच करीत असले तरी जन्म घेणाऱ्या जीवाचे प्रारब्ध जेव्हा उदय पावते तेव्हा ते ईश्वराच्याच सत्तेने होते. (१२९७)

कोणीकडे रक्तरेत । कोणीकडे साकार जन्मत ।
प्राण जीव ही होय त्यांत । हें जीवाचे बापे नव्हे ॥ ९८ ॥
कोणीकडे रक्त आणि रेत आणि कोणीकडे साकार प्राण्याचा जन्म ! त्यातच प्राण आणि जीवही समाविष्ट होतात. हे सर्व कृत्य जीवाच्या बापालाही शक्य होणार नाही. (१२९८)

तैसाचि जीव संकल्प ब्रह्मयाचा । परी करणें हा उपाय नव्हे त्याचा ।
जरी स्वाधीनचि असता साचा । तरी घाबरता कासया ॥ ९९ ॥
त्याप्रमाणेच जीवभावनेने केलेला संकल्प जरी ब्रह्मदेवाचा होता तरी तो प्रत्यक्षात उतरवणे त्याच्या स्वाधीन नाही. जर ते त्याच्या स्वाधीन असते तर 'काय करावे' म्हणून कशासाठी घाबरून गेला असता ? (भागवताच्या द्वितीय स्कंधात ब्रह्मदेवाला विष्णूने उपदेश करून मार्गदर्शन केल्याचा प्रसंग आला आहे, त्याचा हा संदर्भ आहे) (१२९९)

येकदा दुष्ट प्रजा निघाली । ती विरिचीशी मैधुना प्रवर्तली ।
तेव्हां पळता भूमि थोडी जाली । कोणी कैवारीही नसे ॥ १३०० ॥
एकदा तर दुष्ट प्रजा निर्माण झाली. ती ब्रह्मदेवाशीच मैथुन करण्यास प्रवृत्त झाली तेव्हा ब्रह्मदेवाला पळता पुई थोडी झाली. त्यावेळी त्याला तर कोणी कैवारीही भेटला नाही. (१३००)

मग त्या दूषित देहा त्यागिलें । शकले स्त्रीपुरूष रूप जाले ।
तोचि स्वायंभूमनु नामे बोलिलें । शतरूपा कामिनी ॥ १ ॥
मग त्याने त्या दूषित देहाचा त्याग केला. त्याची स्त्री-पुरुष अशी दोन शकले झाली त्यात पुरुषाचे स्वायंभुव मनु असे नाव पडले आणि स्त्रीशकलाची शतरूपा झाली. ती स्वायंभुव मजूची एली झाली. (१३०१) (पहा भागवत ३ रा स्कंध अ. १२)

ऐसें ब्रह्मदेवें कल्पिता । निर्माण होती प्रजा समस्ता ।
परी ते ब्रह्मयाची नव्हे सत्ता । सामर्थ्य ईशाचे ॥ २ ॥
पण त्या ठिकाणी ब्रह्मदेवच आपली कन्या सरस्वती हिच्या सौंदर्यावर भाळत्यामुळे कामासक्त होऊन तिच्या मागे लागला. तेव्हा त्याच्या मरीचि इ. पुत्रांनी त्याची निर्भर्त्सना केल्यामुळे त्याने आयत्या शरीराचा त्याग करून दुसरा देह धारण केला असा कथाभाग आहे.) (हंसराज स्वामींच्या कथेचा अन्यत्र शोध ध्यावा लागेल.) अशा प्रकारे ब्रह्मदेवाने कल्पना केल्याबरोबर सर्व प्रजा निर्माण झाल्या. पण ते सामर्थ्य ब्रह्मदेवाचे नसून ईश्वराचे आहे. (१३०२)

जरी स्वसत्तेनें ब्रह्मदेव । उत्पन्न करिता प्रजा सर्व ।
तरी हें दुःखरूप अपूर्व । वाटतें कां तया ॥ ३ ॥
जर ब्रह्मदेव स्वतः च्या सामर्थ्याने सर्व प्रजा निर्माण करता, तर हे दुःखरूप अपूर्व आहे, असे त्याला वाटले असते का ? (१३०३)

हे काय हो दुष्ट प्रजा जाली । तेव्हां खेर्दे नकोशी वाटली ।
मन्यादि पाहतां वृत्ति तुष्टली । तस्मात् खरी पराधीनता ॥ ४ ॥
अरेरे, काय ही दुष्ट प्रजा निर्माण झाली, या खेदाने त्याला ती नकोशी वाटली. पण मनु इ. प्रजा पाहताच त्याला समाधान झाले; यावरून तो खरेच पराधीन होता, हे स्पष्ट होते. (१३०४)

ब्रह्मदेवें अमुकसें कल्पावें । तें ईश्वरे आणून उभे करावें ।
जैसे बाळाने छंदे रडावे । तें पुरवावे जननीने ॥ ५ ॥
ब्रह्मदेवाने अमुक हवे म्हणून कल्पना करावी आणि ईश्वराने लगेच ते त्याच्यापुढे आणून उभे करावे; बाळाने काही हट्ट धरून रडावे आणि आईने तो हट्ट लगेच पुरवावा असाच हा प्रकार झाला. (१३०५)

जें जें होणार तें तें कल्पिता । उत्पन्न होतसे ईशसत्ता ।
न होणार तें येणे दौत खाता । काय होते ॥ ६ ॥
जे जे व्हायचे असेल ते ते ब्रह्मदेवाने कल्पना करताच ईश्वराच्या सामर्थ्याने उत्पन्न होत आले: पण जे होणार नव्हतेच त्या संदर्भात ब्रह्मदेवाने कितीही दातओठ खाल्ले असते तरी काय होणार होते ? (१३०६)

जेवी व्हावयाजोगा छंद घेतला । तो बाळाचा मातेने पुरविला ।
न होणारा छंदे तो ताडिला । मुखावरी करें ॥ ७ ॥
जेव्हा पुरवता येण्याजोगा हट्ट बाळाने धरला तेव्हा तो हट्ट त्याच्या आईने पुरविला. पण न होण्याजोगा हट्ट त्याने धरताच आईने त्याच्या तोंडात (चापटी) मारली, तसाच हा प्रकार होता. (१३०७)

जरी ह्मणतील कोणी ब्रह्मयासी । न होणें हे वाणी कायसी ।
तरी पहा होणार जालियासी । पुढे खुंटली मानसिक ॥ ८ ॥
जर कुणी म्हटलं की 'ब्रह्मदेवाकडून न होणे' ही भाषा कशी काढता येईल ? त्याला काय अशक्य आहे ? त्याचे उत्तर असे आहे, जे होण्यासारखे होते तेवढेच त्याच्या हातून झाले आहे. न होण्यासारखे होते ते झाले नाही. त्याला जर ते शक्य असते तर एकदा मानसिक प्रजा उत्पन्न होऊन गेल्यानंतर पुढे त्यांचे होणे का थांबले ? (१३०८)

पुढें मैधुनवृष्टीच चालता । मग मानसिका न ये उभवितां ।
होत असती जरी आतां । तरी प्रत्यया कां न येती ॥ ९ ॥
पुढे मैधुनसुष्टीच चालू राहिली. मग मानसिक सृष्टी उभी करणे त्याला का शक्य झाले नाही ? सध्याही अशी मानसिक सृष्टी होत असेल, असे कोणी म्हटले तर त्याचा प्रत्यय का येत नाही ? (१३०९)

तस्मात् होणार तितुके मात्र जाले । न होणारा कल्पना न चले ।
ह्मणोनि हें ईशसूष्ट जितुले । मैधुनी कीं मानसिक ॥ १० ॥
त्यामुळे जे होणार होते तेवढेच फक्त झाले, जे न होण्यासारखे होते त्याबाबतीत त्याची कल्पना चालली नाही. म्हणून मैधुनी सृष्टी असो की मानसिक जेवढे म्हणून निर्माण झाले ते ईश्वराकडून झाले. (१३१०)

कल्पित भावना ते जीवाची । जी मागें निरोपिली मनोमयाची ।
प्रत्यक्षता करणें जे तृणाची । ती ईशाची कृति ॥ ११ ॥
कारण ईश्वराने जे निर्माण केलेले असते त्यावर कल्पना करणे ही जीवाची कृती होय. हे मागे मनोमयाची सृष्टी वर्णन करताना स्पष्ट केले आहे. (पहा - ओव्या ११२५ ते ११९८) पण प्रत्यक्षात गवत जरी निर्माण करायचे असले तर ती ईश्वराचीच कृती होय. (१३११)

येथें विरोध तो असे कोण । भास तितुका जीवनिर्माण ।
प्रत्यक्ष होणें तो मायावी ईशान । करी मायिक ॥ १२ ॥
याबाबतीत विरोध असण्याचे कारणच नाही. जेवढी भासमय निर्मिती असेल ती जीवाची निर्मिती होय. प्रत्यक्ष जे घडते ते मायावी ईश्वर (कारण तोही केवळ प्रतिबिंबरूपच आहे) मायेच्या योगाने करतो. (१३१२)

असो ब्रह्मदेवाचे कल्पनेस्तव । ईश्वरे निर्मिल्या प्रजा सर्व ।
तितुक्या ब्रह्मदेवापुढे स्वभाव । उभ्या तिष्ठती ॥ १३ ॥
असो. तर ब्रह्मदेवाने कल्पना केली म्हणून ईश्वराने सर्व प्रजा निर्माण केल्या. त्या प्रजा उत्पन्न झाल्याबरोबर स्वाभाविकपणे ब्रह्मदेवाच्या समोर उम्या राहिल्या. (१३१३)

पाहे रविदत्ता पूर्वीचा । प्रणवरूप जो वेद साचा ।
जो सांगितला पंच अंगांचा । त्याचाचि हा परिणाम ॥ १४ ॥
रविदत्ता, पूर्वी जो पाच अंगांचा प्रणवरूप वेद सांगितला, त्याचाच हा परिणाम होय. (१३१४)

हे जितुकी मानससूष्टि । उंच नीच योनींची दाटी ।
ब्रह्मादि कीटकान्त थाटी । वरी येका प्रणवाच्या ॥ १५ ॥
ही जेवढी मानसिक अथवा मैधुनिक सुटी, जिच्यात उच्च- नीच योनींची दाटी आहे, ब्रह्मदेवापासून ते कीटकांपर्यंत रांगा लागलेल्या आहेत, ती सगळी एका प्रणवापासून झालेली आहे. (१३१५)

प्रणवरूप द्रव्याचे जाहले । या इतुकियांत प्रणवेंचि व्यापिले ।
तेंचि कैसे पाहिजे ऐकिलें । प्रणवचि येक अवघिया ॥ १६ ॥
ती प्रणवरूप द्रव्याची झाली आहे, त्या सर्व सृष्टीला एका प्रणवानेच व्यापले आहे, या सर्वांत एकच प्रणव कसा व्यापून आहे, ते सांगतो, ऐक. (१३१६)

सर्वांचा साकार जो दिसे । तो येक अकार मात्र विलसे ।
सर्वांचा लिंगदेह चळतसे । तो भासरूप उकार ॥ १७ ॥
या सर्वांचा जो आकार दिसतो तो प्रणवाच्या एका अकार मात्रेचीच व्याप्ती आहे. सर्व सजीवांच्या ठिकाणी जे लिंगदेहांचे स्फुरण आहे ते म्हणजे प्रणवाची भासरूप उकारमात्राच होय. (१३१७)

सर्वही आपणातें न जाणती । यास्तव द देहां जाहली उत्पत्ति ।
तोचि मकार अज्ञान भ्रांति । मात्रा तिसरी ॥ १८ ॥
सर्वच सजीव स्वतःचे खरे रूप ओळखत नाहीत; त्यामुळे या दोन देहांची (स्थूल आणि सूक्ष्म) उत्पत्ती झाली. तीच अज्ञानश्रांतिरूप मकारमात्रा होय. (१३१८)

पुढें प्रवृत्ति पाहते जाले । तेंचि ज्ञान अन्यथा भाविलें ।
तया ज्ञानाचे प्रकार विभागले । सामान्य विशेष ॥ १९ ॥
दोन देह उत्पन्न झाल्यावर ते बहिर्मुख होऊन पाहू लागले. तेव्हा त्यांना अन्यथाज्ञान झाले. त्या ज्ञानाचे दोन प्रकार होत. एक सामान्य आणि दुसरा विशेष. (१३१९)

हे दोन्हीही कीटकास्त असती । विशेष तया अर्धमात्रा बोलती ।
सामान्य प्रकाश बिंदू निश्चिती । एव पंच अंगी प्रणव ॥ २० ॥
हे दोन्हीही प्रकार ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्वांच्या मध्ये असतात. त्यातील विशेष प्रकाराला अर्धमात्रा म्हणतात व सामान्य प्रकाशास (सामान्य ज्ञानास) बिंदू असे म्हणतात. अशा प्रकारे पंच अंगांचा प्रणवच सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. (१३२०)

ऐसा एकला प्रणव सर्वांमाजीं । ब्रह्मादि कीटकान्स सहजी ।
येथें परी नसे किमपि तुजी । सर्वही वेदरूप ॥ २१ ॥
असा एकटा प्रणवच ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्व ठिकाणी व्यापून आहे. प्रणवानेच व्यापले म्हणजे सर्वच वेदानेच व्यापले आहे. हे निश्चित आहे. याखेरीज दुसरा प्रकार संभवत नाही. (१३२१)

ऐसा सर्वही वेद असतां । त्या कीटकादिकांच्या अतौता ।
जेथें प्राणवायु जाला चळता । तेथें सोहे शब्दही उठे ॥ २२ ॥
याप्रकारे सर्वच वेदमय असत्यामुळे ज्या ज्या ठिकाणी प्राणवायूचे चलनवलन आहे त्या त्या कीटकांमध्ये सुद्धा 'सोध्हम् हा ध्वनी उमटतो. (१३२२)

सोहे अक्षरे हाचि प्रणव । मागें निरोपिला वेदराव ।
तोचि या सर्वांत स्वयमेव । सर्वदा चाले ॥ २३ ॥
'सोध्हम् ही अक्षरे म्हणजे प्रणवच होत आणि प्रणव म्हणजेच मागे वर्णन केल्याप्रमाणे प्रत्यक्ष वेदच आहे. तोच या सर्व सुष्ट पदार्थांत सर्वत्र नेहमी वास्तव्य करून असतो. (१३२३)

हें असो गुरुषदेह जितुके । देवक्रषिमानवादिकें ।
तेथें मातृकांसहित कौतुकें । शब्दब्रह्म प्रगटला ॥ २४ ॥
देव, ऋषी, मानव इ. जितके पुरुष देह (मनुष्य देह) आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी मातृकांसह मोठ्या हौसेने हा शब्दब्रह्म (वेद) प्रकट झाला. (१३२४)

परा पदयति मध्यमा तिसरी । ह्या तीन वाणी कीटकान्स निर्धारी ।
या पुरुषदेही चौथी वैखरी । प्रगटती जाली ॥ २५ ॥
परा, पश्यन्ती आणि मध्यमा या तीन वाणी ब्रह्मदेवापासून ते कीटकांपर्यंत सर्वांच्या ठिकाणी प्रकट झाल्या. मात्र वैखरी ही चौथी वाणी फक्त मनुष्यदेहातच प्रकट झाली. (१३२५)

मागें पुढे मातृका उमटती । तयाचे शब्द अनंत होती ।
ऐसा अनंतरूप वेद निशिती । पुरुषदेहीं वसे ॥ २६ ॥
या वैखरी वाणीमध्ये मातृका पुढे मागे उमटतात त्यामुळे त्यांच्यापासून अनंत शब्द बनतात. असा हा अनंत शब्दांच्या रूपातला हा वेद मनुष्याच्या देहात वास्तव्य करून असतो. (१३२६)

पहिला प्रणवरूप वेद । तो कीटकान्त सोहं शब्द ।
परी तेथें प्रवृत्ति निवृत्ति विशद । दोन्ही न होती ॥ २७ ॥
वेद दोन प्रकारचा आहे एक प्रणवरूप वेद आणि दुसरा शब्दरूप वेद. त्यापैकी पहिला प्रणवरूप वेद हा ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्वच सजीवांमध्ये प्रकटतो पण तेथे प्रवृत्ती (बहिर्मुख वृत्ती) अथवा निवृत्ती (अंतर्मुख वृत्ती) या दोन्ही स्पष्ट होत नाहीत. (१३२७)

आहार निद्रा आणि मैथुन । पशुदेहीं हे व्यापार तीन ।
होत असती पराधीन । म्हणोनि ते निकृष्ट ॥ २८ ॥
सर्वच पशुदेहांत आहार, निद्रा, आणि मैथुन हे तीन व्यापार असतात पण त्याबाबतीत ते पराधीन असतात. म्हणून ते निकृष्ट प्रकारचे होत. (१३२८)

पुरुषदेहीं मात्रा उमटल्या । वैखरीने स्पष्ट जात्या ।
तयाच्या श्रेणी प्रगटल्या । व्हावया प्रवृत्ति निवृत्ति ॥ २९ ॥
पण फक्त मनुष्य देहातच मात्रा प्रकट शब्दरूपात उमटतात. वैखरी वाणीमुळे ते स्पष्ट होतात. त्यांचे प्रवृत्तिपर अथवा निवृत्तिपर असे श्रेष्ठत्व कनिष्ठत्वदर्शक प्रकार निर्माण होतात. (१३२९)

म्हणून पुरुषदेह उत्तम । प्रवृत्ति निवृत्तीचे धाम ।
जागतिआदि मोक्षान सम । करूं इच्छी तें घडे ॥ ३० ॥
यामुळे मनुष्यदेह सर्वांत श्रेष्ठ देह होय. तो प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोहींचे घरच आहे. जागृतीपासून ते मोक्षापर्यंत तो जे काही करण्याची इच्छा करील ते ते घडून येते. (१३३०)

असो प्रणव आणि शब्दरूप । सांगितलें वेदाचे स्वरूप ।
या उभयांसी किंचित अल्प । जीवकृत्यता नसे ॥ ३१ ॥
असो. याप्रमाणे वेदाची प्रणवरूप आणि शब्दरूप अशी दोन प्रकारची रूपे सांगितली ही दोन्ही निर्माण होण्यात जीवाचा यत्किंचितही सहभाग नाही. ही दोन्ही रूपे जीवसृष्ट नाहीत. (१३३१)

हा प्रणवरूप जो वेद साचा । हाचि ईश्वर प्रेरक सर्वांचा ।
तथापि कर्ताही त्रिमात्रांचा । ईशचि मायावी ॥ ३२ ॥
हा जो प्रणवरूप वेद आहे, तोच ईश्वर असून तोच सर्वांचा प्रेरक आहे. हा ईश्वर त्रिमात्रात्मक प्रणवरूप वेदांचा कर्ता असूनही मायावीच आहे. (१३३२)

दुसऱ्या मात्रा पन्नास असती । ज्या नादस्वरास्तव उमटती ।
हाही शब्दब्रह्म याची उदभूति । ईश्वरापासुनी ॥ ३३ ॥
दुसरा शब्दरूप जो वेद आहे, त्याच्या पन्नास मात्रा आहेत त्या नाद आणि स्वरामुळे निर्माण होतात. त्यातून शब्दब्रह्मरूप वेदाची उत्पत्ती होते. ही शब्दब्रह्माची उत्पत्ती ईश्वरापासूनच होते. (१३३३)

आतां तुझी आशंका मुख्य चित्ताची । कीं प्रवृत्ति निवृत्तिरूप रचना ज्याची ।
तया मार्गप्रदर्शक वेदाची । उत्पत्ति कोणीं केली ॥ ३४ ॥
रविदत्ता, आता तुझ्या मनातली मुख्य शंका ही की, ज्याची प्रवृत्तिनिवृत्तिरूप रचना आहे, अशा मार्गदर्शक शब्दरूप वेदाची उत्पत्ती कोणी केली ? (१३३४)

हे जीवे केली तरी सामर्थ्यहीन । ईश करी तरी त्या नसे योजन ।
म्हणून या रचनेसी कर्ते आपण । उभयता जीवेश ॥ ३५ ॥
ही उत्पत्ती जीवाने केली असे म्हणावे तर तो सामर्थ्यहीन आहे. ईश्वराने केली म्हणावे तर त्याला काही निर्माण करण्याचे प्रयोजन नाही. म्हणून या शब्दरूप ब्रह्माची उत्पत्ती जीव आणि ईश्वर या दोघांनी मिळून केली असे म्हणावे लागते. (१३३५)

तरी हेंचि कैसे तें ऐकावे । कवणेपरी वेदे प्रगटावें ।
बोलिजे तें जैसे स्वभावें । यथातथ्य असे ॥ ३६ ॥
तर हे कसे होते, ते आता ऐकावे. हा शब्दरूप वेद कसा प्रकट झाला, ते यथातथ्य सांगतो. (१३३६)

जितक्या मानसिक प्रजा जात्या । त्यांत पश्वादि स्वव्यापारा लागल्या ।
पुरुषाकृति जितक्या उरत्या । त्या तिष्ठती ब्रह्मयासमीप ॥ ३७ ॥
जेवढ्या मानसिक प्रजा प्रथम निर्माण झाल्या, त्यामध्ये पशू इ. ज्या प्रजा होत्या, त्या उत्पन्न झाल्याबरोबर आपापल्या व्यापारात मग्न झाल्या. पण मनुष्यरूप प्रजा मात्र ब्रह्मदेवाजवळ येऊन उभ्या राहिल्या. (१३३७)

प्रजापति देव क्रषि संपूर्ण । मनु आदि मानव जन ।
ते ब्रह्मदेवासी कर जोडून । विनविते जाले ॥ ३८ ॥
प्रजापती, देव, ऋषी. मनू इ मानव हे सर्व ब्रह्मदेवाला हात जोडून विनंती करू लागले. (१३३८)

तूंचि आमुचा मातापिता । तूचि धाता स्वामी देवता ।
तरी आह्मांसी आज्ञापीं आतां । काय करावें तें ॥ ३९ ॥
तूच आमची माता आहेस, तूच आमचा पिता आहेस, तूच आमचा पालनपोषणकर्ता आहेस, तूच आमचा स्वामी आहेस, तूच आमची देवता आहेस, तेव्हा तूच आता आम्ही काय करावे त्याविषयी आला कर. (१३३९)

करावें काय न करावें कोणतें । कोठे रहावे काय खावे तें ।
काय गावे काय ध्यावे चित्ते । आज्ञापिसी तें करूं ॥ ४० ॥
आम्ही काय करावे, काय करू नये, कोठे राहावे, काय खावे, काय गावे, मनाने कशाचे ध्यान करावे, याविषयी तू ज्या आज्ञा करशील त्याप्रमाणे आम्ही करू. (१३४०)

हें ब्रह्मदेवें सर्वांचे ऐकोन । करिता जाला अंतरीं मनन ।
यासी काय सांगावे आपण । तें कृत्याकृत्य नेणे ॥ ४१ ॥
हे ब्रह्मदेवाने सगळ्यांचे ऐकून घेतले. त्याने मनामध्ये काही चिंतन केले आता या प्रजांना आपण काय सांगावे ? कर्तव्य काय, अकर्तव्य काय, हे तर आपल्याला काहीच माहीत नाही. (१३४१)

आणि हे मजलाचि कर्ता म्हणती । नेणती कवणाची सामर्थ्यशक्ति ।
आतां प्रवृत्तीच सागू या प्रति । तरी निवृत्ति कळे कैसी ॥ ४२ ॥
आणि या प्रजा तर मलाच कर्ता म्हणून समजत आहेत. कोणाच्या सामर्थ्यशक्तीने आपण निर्माण झालो, हे त्यांना माहीत नाही, आता यांना केवळ प्रवृत्तीच सांगितली तर त्यांना निवृत्ती कळणार कशी ? (१३४२)

निवृत्तीच जरी सांगावी । तरी पुढें उत्पत्ति केवीं व्हावी ।
ऐसी रजोगुणें पडली गोवी । ब्रह्मदेवासी ॥ ४३ ॥
केवळ निवृत्तीच त्यांना सांगितली तर पुढील प्रजांची उत्पत्ती कशी होणार ? अशा प्रकारे रजोगुणाच्या प्रभावाखाली असत्यामुळे ब्रह्मदेवाला प्रश्न पडला. (१३४३)

तेव्हां दुश्चितपणें स्तब्ध ठेला । कांहीं सुचेना वेडावला ।
तंव अंतरांतून भडाडिला । शब्दाचा बोध ॥ ४४ ॥
तेव्हा त्याला काही कळेनासे झाले. तो उगाच स्वस्थ राहिला. त्याला काही सुचेना, तो अगदी वेडावून गेला. तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये शब्दांचा ओघ एकदम प्रवाहित झाला. (१३४४)

हे प्रेरणा नव्हे विरिचीची । कल्पना तो खुंटली जीवाची ।
परी अंतर्यामी मायावी ईशाची । वस्ती जे असे ॥ ४५ ॥
ही ब्रह्मदेवाची प्रेरणा नाही. जीवाची तर नव्हेच नव्हे, कारण त्याची कल्पनाच खुंटलेली आहे. तेव्हा अंतर्यामी असलेल्या मायावी ईश्वराचीच ही प्रेरणा असली पाहिजे. (१३४५)

मुख्य स्कूर्ति जे निर्विकल्पक । त्यांत भासला जो प्रकाशक ।
जो कर्तेपणाचा माइक । ईक्षणशक्ति जयाची ॥ ४६ ॥
मुख्य ब्रह्माच्या ठिकाणी जे निर्विकल्प स्फुरण निर्माण झाले. त्या स्कूरणामध्ये जो प्रकाशक म्हणून भासला, जो मायावी असूनही कर्ता वाटतो, ज्याच्याकडे ईक्षणशक्ती आहे, (१३४६)

तया ईश्वरापासून । उद्भवला हा वेद संपूर्ण ।
बुद्धि किंवा नसतो मन । संकल्पासहित ॥ ४७ ॥
त्या ईश्वरापासूनच संपूर्ण वेद निर्माण झाला. त्यावेळी बुद्धी किंवा मन यांचा उदय झाला नव्हता. मग सकत्य कोठून असणार ? (१३४७)

सकल्पेविण जीवत्व मंदले । योजना कैशी कांहींच न चले ।
जैसे निजेले मनुष्य वोसणले । तें बोले परी कळेना ॥ ४८ ॥
संकल्प नसल्यामुळे जीवत्व मंद झाले, अशा वेळी काय योजना करावी, कशी करावी, हे त्याला काही सुचेना. निजलेला मनुष्य झोपेत बरळतो तेव्हा तो बोलत असला तरी त्याचा अर्थ काही कळत नाही, तशी त्याची अवस्था झाली. (१३४८)

तैसा ब्रह्मदेव सकत्यासहित । मूर्छितापरी जाहला द्यांत ।
परी शब्द उठताति अनंत । जेवीं भरते समुद्रा ॥ ४९ ॥
तेव्हा ब्रह्मदेवाची विचारशक्ती नाहीशी झाली. मूर्च्छित पडलेल्या माणसाप्रमाणे त्याची श्रांत अवस्था झाली. परंतु आतून तर समुद्राला भरती यावी तसे अनत शब्दांचे लोटच्या लोट येत होते. (१३४९)

अनंत शब्द दाटले अपार । फुटो पाहे सर्व शरीर ।
एका मुखांतून नव्हे वार । म्हणून चौमुर्खा निघती ॥ ५० ॥
या अनंत शब्दांची अंत: करणात एवढी दाटी झाली की, त्यामुळे शरीर फुटते की काय अशी त्याची गत झाली. ते शब्द बाहेर पडताना एका मुखाचे द्वार अपुरे पडले म्हणून त्या चार मुखांतून ते शब्द बाहेर पडू लागले. (१३५०)

एकदांचि चौमुखांची गर्जना । होती जाली शब्दरचना ।
ते कवणे आकळावी अवधारणा । येवढी कवणाची ॥ ५१ ॥
एकदम चारही मुखांची गर्जना सुरू झाल्याबरोबर शब्दरचना होऊ लागली. एवढी शब्दरचना कोणाला आकलन होणार ? एवढी ग्रहणशक्ती कोणाची असणार ? (१३५१)

परी तेही सर्व बुद्धिमंत । आकळिते जाहले शब्दजात ।
अर्थासी मात्र पारंगत । न होती कोणी ॥ ५२ ॥
परंतु त्या मानसिक प्रजांमध्ये सर्वजण बुद्धिमंत होते. त्यांना ते शब्द आकलन झाले. परंतु त्याचा अर्थ जाणण्यास मात्र कोणीही समर्थ नव्हते. (१३५२)

असो ऐसा मार्गप्रदर्शक । निर्माण जाला वेद सकळिक ।
इतुक्याचा कर्ता तो एक । ईश अंतर्यामी ॥ ५३ ॥
अशा तऱ्हेने मार्गदर्शक असा संपूर्ण वेद निर्माण झाला. या सगळ्यांचा एकमेव कर्ता म्हणजे अंतर्यामात वास्तव्य करणारा तो एकटा ईश्वरच होय. (१३५३)

आतां जीवाची कृति तेही कैशी । प्रस्तुत बोलिजे अल्पशी ।
सर्वी ग्रहण करून शब्दासी । योजना करिते जाले ॥ ५४ ॥
आता जीवाची कृती कोणत्या प्रकारची आहे, हे या ठिकाणी थोडेसे सांगतो. त्यांनी सर्व शब्दांचे ग्रहण करून (लक्षात ठेवून) योजना केली. (१३५४)

अमुक शब्दाचा अमुक अर्थ । अमुक नामाचा हा पदार्थ ।
ऐसें कल्पोनियां आवडता स्वार्थ । योजना करिती ॥ ५५ ॥
अमुक शब्दाचा अमुक अर्थ आहे. अमुक नावाचा अमुक पदार्थ आहे. याप्रमाणे आयत्या आवडत्या अर्थाची- स्वार्थाची कल्पना करून त्यांनी योजना केली. (१३५५)

नाना लिंगभेद केले । नाना वित्यत्तीतें वाढविले ।
नाना तर्क विभक्तीतें स्थापिलें । न्याय व्याकरणादि करोनी ॥ ५६ ॥
निरनिराळ्या प्रकारच्या लिंगभेदांची कल्पना केली, निरनिराळ्या व्यत्पत्ती शोधून काढत्या, निरनिराळे तर्क करून विभागांची निश्चिती केली; न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र इ. तयार केली, (१३५६)

छंद निरुक्त ज्योतिषादि । अंगे उपांगे नानाविधि ।
प्रतिपादिती निर्णयबुद्धि । करणें हे न करणें ॥ ५७ ॥
छंदःशास्त्र, ज्योतिषशास्त्र, निरुक्तशास्त्र इ. नाना प्रकारची वेदाची अंगे, उपांगे सिद्ध केली; ही शास्त्रे काय करावे, काय करू नये या संबंधीचे निर्णय सांगू लागली. (१३५७)

पुढें पुढे तो व्यासादिक । आचार्य जाहले अनेक ।
तेणें तो वेद सूत्रादि कौतुक । रचिला विस्तार ॥ ५८ ॥
पुढे पुढे तर व्यास इ. अनेक आचार्य निर्माण झाले; व्यासांनी तर वेद, सूत्रग्रंथ इ. कौतुकास्पद विस्तार उभा केला. (१३५८)

हा क्रग्वेद हा यजुर्वेद । हा अथर्वण हा सामवेद ।
उदात्त अनुदात्तादि विशद । कल्पना केली ॥ ५९ ॥
हा क्रग्वेद, हा यजुर्वेद, हा अथर्ववेद, हा सामवेद इ. वेदांची कल्पना केली. त्यांच्या उच्चारणांचे उदात्त, अनुदात्त इ. कल्पना स्पष्ट केल्या, (१३५९)

ऐशी योजना जे जे कल्पनेची । अनेकधा रचनाही शब्दाची ।
तितुकीही कृति असे जीवाची । एव द्विविध कर्ते या ॥ ६० ॥
अशा प्रमाणे निरनिराळ्या कल्पना करून जी योजना केली, शब्दांच्या अनेकविध रचना केल्या, इ. सर्व जीवकृत सुष्टीची रचना होय. अशा तऱ्हेने या वेदाचे दोन प्रकारचे कर्ते आहेत. एक ईश्वर आणि दुसरा जीव (१३६०)

ऐसा वेद रचनात्मक । निर्माण जाला मार्गप्रवर्तक ।
त्यांत कर्मचि प्रतिपाडून येक । निश्चर्ये बैसले ॥ ६१ ॥
असा रचून केलेला वेद निर्माण झाला. तो मार्गप्रवर्तक झाला. त्यानंतर काहींनी कर्माची प्रतिष्ठापना करून त्याचा आग्रह धरून बसले. (१३६१)

उपासना कोणी श्रेष्ठ म्हणती । परी आवडी ऐशी भिन्न स्थापिती ।
एकं म्हणती ज्ञानचि गति । परी ज्ञेय निर्धारा न ये ॥ ६२ ॥
इतर कोणी उपासना श्रेष्ठ मानतात. परंतु तिच्यातही आपापल्या आवडीनुसार भेद मानतात. काहीजण ज्ञान हे श्रेष्ठ आहे असे मानतात. तोच एकमेव मोक्षाचा मार्ग मानतात. पण त्यांचा ज्ञेय वस्तूच्या (जाणून घ्यावयाच्या वस्तूच्या बाबतीत) एक-निश्चय होत नाही. (१३६२)

पहिला प्रणवाल्पक वेद । दुसरा मात्राल्पक शब्द ।
याची हेळणा करून प्रसिद्ध । म्हणती वेदाक्षरें खरें ॥ ६३ ॥
प्रथम प्रणवात्मक वेद निर्माण झाला. दुसरा मात्रांनी बनलेला शब्दरूप वेद. यांना न मानता काहीजण वेदाचे अक्षर हेच तेवढे खरे असे मानतात. (१३६३)

नाना वर्ण नाना आश्रम । विस्तारिले भिन्न अनुक्रम ।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे उत्तम । अधिकारी वेदाचे ॥ ६४ ॥
यानंतर समाजामध्ये निरनिराळे वर्ण (वर्णव्यवस्था) निर्माण झाले, निरनिराळे आश्रम (आश्रमव्यवस्था) निर्माण झाले, त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे वेदाचे उत्तम अधिकारी, (१३६४)

हे स्त्रीच्छादि अनधिकारी । अंत्यवसाई तो दूरीच्या दूरी ।
ऐशी कल्पनाच वाढवून अंतरीं । साभिमानें बद्ध होती ॥ ६५ ॥
स्त्रीशूद्र हे अनधिकारी, अंत्यज हे तर दूर दूरच ठेवलेले, अशा केवळ कल्पना वाढवून अंत: करणामध्ये अभिमान बाळगून बद्ध झाले. (१३६५)

असो बहु बोलतां न सरे । हें अनावरचि असे सारे ।
परी जीवकल्पित बाधक निधरिं । विचारावे मुमुक्षे ॥ ६६ ॥
असो, कितीही बोलले तरी जीवकृत कल्पनांचा पसारा संपणार नाही. पण मुमुक्षूने एवढे मात्र लक्षात ठेवावे की, जेवढे म्हणून जीवकल्पित असेल, ते ते बाधक आहे हे निश्चित. (१३६६)

तंव विनवितसे रविदत्त । जी जी निवडिलें जीवेश द्वैत ।
परी ईशनामाचा संकेत । कवणासी असे ॥ ६७ ॥
यावर रविदत्ताने विनंती केली की, महाराज, आपण जीव आणि ईश्वर या जोडीतील भेद चांगला स्पष्ट केलात. पण ईश्वर असे नेमके कुणाला म्हणावे ? (ईश्वर या नामाचा संकेत कोणाला लागू पडतो ?) (१३६७)

चतुराननाचे अंतरांतून । शब्द प्रेरिता ।
जाहला ईशान । येणे श ब्रह्मा आपण । ईश्वर नव्हे ॥ ६८ ॥
ब्रह्मदेवाच्या अंत: करणातून (अंतरातून) ईश्वराने शब्दांची प्रेरणा केली, असे सांगितले जाते. तेव्हा या माहितीवरून ब्रह्मदेव हा ईश्वर नव्हे, असे सिद्ध होते. (१३६८)

आणि पराधीन सृष्टि निर्मिली । तेव्हां ते स्वतंत्र कोणे केली ।
तया ईशासी व्यक्तता आली । किंवा अव्यक्त ॥ ६९ ॥
ब्रह्मदेवाने ईश्वराच्या प्रेरणेने सृष्टी केली यावरून तो पराधीन आहे, असे लक्षात येते. म्हणजे तो ईश्वर नाही, असे ठरते. मग स्वतंत्रपणे सृष्टी कोणी निर्माण केली ? तो सृष्टी निर्माण करणारा ईश्वर व्यक्त आहे की अव्यक्त ? (१३६९)

जनाचे तर्क तरी अनेक । तैसेचि स्थापिती शास्त्रकाक ।
कीं ईश्वर असे कोणी येक । तो चाळक सर्वांचा ॥ ७० ॥
लोकांचे तर्क अनेक आहेत. त्यानुसार शास्त्रकर्ते सांगतात की, कोणी एक ईश्वर आहे, तोच सर्वांचा चालक आहे. (१३७०)

परी तो रहात असे कोठे । सूत्रे केवीं हालवी नेटे ।
हें न कळे कवणा परी बोभाटे । प्राणिमात्र व्यर्थ ॥ ७१ ॥
पण तो ईश्वर कुठे राहतो, सर्व सूत्रे तो कशी हलवितो, हे कोणासही कळत नाही. पण सर्व प्राणी ईश्वरासंबंधी वेगवेगळ्या वायफळ गोष्टी सांगत असतात. (१३७१)

उत्पत्ति करी चतुरानन । विष्णू जगाचें करी पालन ।
संहारीतसे रुद्र आपण । सर्वांलागी ॥ ७२ ॥
ते सांगतात की, ब्रह्मदेव निर्मिती करतो, विष्णू जगाचे पालन करतो आणि रुद्र स्वत: त्याचा संहार करतो. (१३७२)

त्यांत ब्रह्मदेवाचे पराधीनत्व । कळले असे कीं आरोपितत्व ।
परी विष्णू सदाशिव स्वतंत्र अपूर्व । असती कीं कैसे ॥ ७३ ॥
त्यापैकी, ब्रह्मदेव पराधीन आहे हे कळले. त्याच्यावर सृष्टिनिर्मितीचा व्यवहार आरोपित केला आहे हेही कळले. मग विष्णू आणि शिव हे दोघे तरी स्वतंत्र आहेत की कसे ? (१३७३)

ऐसा प्रश्न रविदत्ताचा । ऐकोन श्रीगुरू बोलती वाचा ।
अरे स्वतंत्रपणा कवणासी कैचा । आकारा आले तया ॥ ७४ ॥
रविदत्ताचा हा प्रश्न ऐकल्यानंतर श्रीगुरू स्पष्ट शब्दांत म्हणाले, अरे, ज्यांनी आकार धारण केला त्यामध्ये कोणाला स्वतंत्रपणा मिळाला आहे ? (१३७४)

साकारत्व जीवालागीं न ये । मा अवयवी ईश कैसा होय ।
जितुकें दृश्य तें भूतमय । जरी स्वता प्रगटती ॥ ७५ ॥
जीवाला साकारत्व नाही (जीवाला आकार नाही), मग ईश्वर तरी अवयवी (साकार) कसा असेल ? जेवढे म्हणून दृश्य असेल ते ते सर्व भूतांपासून निर्माण झालेले असते. मग त्यापैकी ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकरासारखे स्वयंभू म्हणून प्रगट झालेले का असेनात ! (१३७५)

स्वता प्रगटती ते अयोनिसंभव । ह्मणती परी तो मिथ्या गौरव ।
दृश्यासी कारणें असती सर्व । स्कृरणादि पूज्येत ॥ ७६ ॥
जे स्वत: प्रगट झालेले आहेत ते अयोनिसंभव म्हटले जातात. पण हा केवळ मिथ्या गौरव आहे. स्फुरणापासून ते थेट वृद्धीपर्यंत सर्व दृश्य सुष्टीला काही ना काही कारणे असतातच. (१३७६)

कारणासींच ह्मणावें योनि । तेधून कार्याची उभवणी ।
तया संभवा मानावें अयोनि । तरी वृक्षादिकां न ह्मणावें ॥ ७७ ॥
ही कारणे म्हणजे योनी म्हणजेच त्या त्या पदार्थाचे उत्पत्तिस्थान. तेधूनच पुढील कार्य उभे राहते. अशा जन्म पावलेल्या पदार्थालाही अयोनि असे म्हणाल तर वृक्ष इत्यादींनाही अयोनि का म्हणू नये ? (१३७७)

असो विष्णू आणि सदाशिव । गुणमायेचे स्वभाव ।
पालन संहार जगाचा सर्व । करणें हे परतंत्र ॥ ७८ ॥
असो. तर विष्णू सदाशिव हे देव म्हणजे गुणमायेचेच स्वभाव आहेत. ते सर्व जगाचे पालन आणि संहार करतात. पण तेही परतंत्रपणेच करतात. (१३७८)

विष्णू जरी पालनकर्ता । तरी होणारा स्वाधीन न होता ।
क्रषि यज्ञामाजी प्रगटतां । अहं भोक्ता भाविलें ॥ ७९ ॥
विष्णू जर पालनकर्ता आहे, तर तो होणाराच्या स्वाधीन झाला नसता. विष्णू ऋषींच्या यशामध्ये प्रगट झाला. त्याने स्वतःला यज्ञाचा भोक्ता मानले. या गोष्टीचा अहंकार झाला. त्याचा त्याला नंतर पश्चात्तापही झाला. (१३७९)

तत्क्षणीं निजकरींचें सुदर्शन । तेणे स्वशिराचें जाहले कुंतन ।
मग सर्वी बैसविलें अश्वाचे आन । तो हयग्रीव अवतार ॥ ८० ॥
आणि त्याच्या हातात जे सुदर्शन चक्र होते, त्याने त्या चक्राने आपले स्वतःचे मस्तक कापून टाकले. मग त्याला घोड्याचे तोंड त्या मस्तकाच्या जागी लावले. तोच हयग्रीवाचा अवतार होय. (१३८०)

तस्मात् स्वशरीर रक्षवेना । तो काय संरक्षी अन्य जनां ।
ह्यणोनि परतंत्रता चतुराना । तेवीच विष्णूची ॥ ८१ ॥
तेव्हा स्वतःच्या शरीराचे त्याला रक्षण करता आले नाही, तो अन्य लोकांचे काय रक्षण करणार ? म्हणून ब्रह्मदेवाच्या ठिकाणी जशी परतंत्रता आहे, तशीच विष्णूच्याही ठिकाणी ती आहेच आहे. (१३८१)

कोणी ह्मणेल अभिमान उठता । न साहे किमपि भगवंता ।
ह्मणोनि शिरच्छेद जाला तत्त्वतां । स्वकीय इच्छेनें ॥ ८२ ॥
कोणी म्हणेल की हा विष्णूचा पराधीनपणा नव्हेच. अभिमान उठत्याबरोबर विष्णूला ही गोष्ट सहन झाली नाही. म्हणून त्याच्याच इच्छेने त्याचा शिरच्छेद झाला. (१३८२)

तरी पहा कल्पना कवणा जाहली । कवणाचे हेतूनें हानि जाहली ।
ज्याची सत्ता तो ईश येर हे मुली । कल्पनारूप जीवाची ॥ ८३ ॥
यावर असे पहा की, शिर कापावे अशी कल्पना कोणास झाली ? कोणाच्या हेतूने ही हानी झाली ? वास्तविक पाहता ईश्वर म्हणजे ज्याची सत्ता चालते तो. बाकीच्या कल्पनारूप घटना हा सर्व जीवाचा भ्रम आहे. (१३८३)

संहार करणें शिवाकडे । त्याचे साम जाहले हें कुडे ।
येणे अर्थ तो जाले उघडे । पराधीनत्व विष्णूचे ॥ ८४ ॥
संहार करण्याचे काम शिवाकडे आहे. त्यामुळे विष्णूचे सामर्थ्य मर्यादित होते. या दृष्टीने विष्णूची पराधीनता ही स्पष्ट झाली. (१३८४)

आतां सहारा जरी सदाशिव । स्वतंत्र असे सर्वदैव ।
तरी त्रिपुरवधाचें अपूर्व । साकडे कां पडते ॥ ८५ ॥
आता संहाराच्या कार्यापुरता सदाशिव सर्वथा समर्थ असता तर त्रिपुरांच्या वधाच्या बाबतीत त्याला संकट का पडले असते ? (१३८५)

तस्मात् कोणीही स्वतंत्र नसे । ब्रह्मा विष्णू सदाशिव ऐसे ।
मा येर देव तो अपैसे । उघड परतंत्र ॥ ८६ ॥
म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि सदाशिव यापैकी कोणीही खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही. मग इतर देव तर उघड उघड परतंत्रच आहेत. (१३८६)

जरी ह्मणेल कोणी कीं स्वतंत्र कोण । कोण करी उत्पत्ति लय पालन ।
तरी हे ईशाधीन गुण तीन । तेणे तिन्ही होती ॥ ८७ ॥
आता कोणी जर असे म्हटले की मग तुमच्या मते खरा स्वतंत्र कोण आहे ? कोण उत्पत्ती, पालन आणि लय ही कार्ये करतो ? तर याचे उत्तर असे की, सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण ईश्वराच्या स्वाधीन आहेत. त्याच्यामुळेच ही कार्ये घडून येतात (१३८७)

तेही गुण ज्याचे त्यापाशीं । ब्रह्मादि कीटकान्त दिवानिशीं ।
असती येक येतां उदासी । दोन आच्छादती ॥ ८८ ॥
हेच तीन गुण ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्वांच्या ठिकाणी रात्रंदिवस असतात. त्यातील एका गुणाचा प्रभाव वाढताच बाकीचे दोन झाकले जातात. (१३८८)

जाणणें तोचि सत्वगुण । जाण जाणा वाचती संपूर्ण ।
ऐसें सत्वगुणें होतें पालन । तोचि विष्णू ॥ ८९ ॥
जाणणे (ज्ञान) हाच सत्त्वगुण आहे. सर्व जीव या जाणण्यामुळेच स्वतःचा बचाव करून आपले संरक्षण करतात. या ज्ञानामुळेच म्हणजेच सत्त्वगुणामुळेच प्राणिमात्रांचे पालन होत असते. हाच विष्णू होय. (१३८९)

नेणणें तमोगुण विख्यात । नेणीव विस्मरणें प्राणी मरत ।
ऐसाचि रुद्र संहारित । तमोगुण रूपें ॥ ९० ॥
नेणणे म्हणजे अज्ञान. हाच तमोगुण म्हणून प्रसिद्ध आहे. नेणीव म्हणजे विस्मरणाने प्राणी मृत्यू पावतात. हेच रुद्राचे तमोगुणाच्या मार्गाने होणारे संहार कर्म होय. (१३९०)

जाणीव नेणीव समान जाहली । म्हणोनि रजोगुणे उत्पत्ति पावली ।
एव सृष्टि ब्रह्मदेवें रचिली । रजोगुण रूपें ॥ ९१ ॥
ज्यावेळी जाणीव आणि नेणीव समान होते त्यावेळी रजोगुणाची उत्पत्ती होते. आणि त्या रजोगुणामुळे प्रजा निर्माण होते. यालाच आपण ब्रह्मदेवाने रजोगुणाच्या रूपाने सृष्टी निर्माण केली असे म्हणतो. (१३९१)

एव रजःसत्व तमाल्पक । त्रिगुण उत्पत्ति स्थिति लयकारक ।
या तिन्ही गुणांसी प्रवर्तक । तो येक ईश्वर ॥ ९२ ॥
अशा प्रकारे सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कर्ते आहेत. या तिन्ही गुणांचा जो प्रवर्तक तोच ईश्वर होय. (१३९२)

तरी तो ईश्वर कोठे राहतसे । त्रिगुणांसी कैसा प्रेरितसे ।
ह्मणाल तरी अवधारा अल्पसें । बोलोनि दाबू ॥ ९३ ॥
तर असा तो ईश्वर कोठे राहतो, तो त्रिगुणांना कशी प्रेरणा देतो, असे म्हणत असाल तर ऐका. त्यासंबंधी थोडेफार विवेचन करू. (१३९३)

ईश्वर जरी सावयव असता । तरी देहाबाहेरी म्हणो येता ।
जेवीं बुद्धि तेथें जीव ऐता । तेवीं स्कूर्ति तेथें ईश्वर ॥ ९४ ॥
ईश्वर जर सावयव असता तर तो देहाबाहेर राहतो, असे म्हणता आले असते. ज्याप्रमाणे बुद्धी तेथे जीव, असे आपण म्हणतो त्याप्रमाणे जेथे स्फूर्ती आहे तेथे ईश्वर आहे, असे समजावे. (१३९४)

बुद्धींत अविद्येस्तव पडिलें । प्रतिबिंब ते जीवत्वा पावलें ।
तेवींच विद्यामायेनें चैतन्य फळले । स्मृतींत तो ईश्वर ॥ ९५ ॥
बुद्धीमध्ये अज्ञानामुळे (अविद्येमुळे) जे प्रतिबिंब पडते, त्यालाच जीव असे नाव आहे. त्याप्रमाणे विद्यारूप मायेमध्ये (जाणीव अथवा विद्या) जे चैतन्य निर्माण झाले आणि त्याने स्फुरणरूप धारण केले तो ईश्वर होय. (१३९५)

जीवासी स्वतंत्रता असेना । कारण कीं कल्पिले तैसें घडेना ।
म्हणून ईश्वर करीतसे प्रेरणा । प्रारब्धउदयाऐशी ॥ ९६ ॥
जीव हा स्वतंत्र नाही. कारण त्याने केलेल्या कल्पनांप्रमाणे नेहमी घडतेच असे नाही. म्हणून ईश्वर हा स्वतंत्र आहे. तो जीवाच्या पराधीनतेमुळे त्याच्या प्रागधानुसार त्याला प्रेरणा करतो. (१३९६)

प्रारब्धभोग असे जीवासी । तें सुखदुःख नव्हे ईश्वराली ।
म्हणोन जीव नव्हे तो स्वतंत्रत्वेसी । प्रेरणा मात्र करी ॥ ९७ ॥
जीवाला प्रारब्धाचा भोग आहे. त्यामुळे सुख आणि दु: ख यांचा भोक्ता असतो. पण असे सुखदुःख ईश्वराला नाही. म्हणून ईश्वर हा जीव नाही. तो स्वतंत्रपणे प्रेरणा फक्त करतो. (१३९७)

जीवाचे होणार नव्हे स्वाधीन । परतंत्र भोगी आपण ।
म्हणून प्रेरक येक असे ईशान । चाळक बुद्धीचा ॥ ९८ ॥
जीवाचे भवितव्य (होणाऱ्या गोष्टी) त्याच्या स्वाधीन नसते. तो परतंत्रपणे जे प्रागधात असेल ते भोगतो. म्हणून ईश्वर हा बुद्धीचा चालक असत्यामुळे जीवाला त्याच्या प्रारब्धानुसार प्रेरणा देतो. (१३९८)

असो जीव जैसा बुद्धिआत । रहात असे सदोदित ।
तेवींच ईश्वर गुणांसहित । स्मृतींत वसे ॥ ९९ ॥
हे असू द्या जीव ज्याप्रमाणे सदैव बुद्धीमध्येच राहत असतो त्याप्रमाणेच ईश्वर त्रिगुणांसहित स्फुरणात वास्तव्य करतो. (१३९९)

ब्रह्मादि कीटकास्त येकला । अंतर्यामित्वे हदयी राहिला ।
अलिप्तपणे नियंता सर्वांला । असे स्वसामध्यें ॥ १४०० ॥
ब्रह्मदेवापासून ते कीटकांपर्यंत सर्वांचा अंतर्यामी होऊन तो एकटा त्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. आणि आपल्या सामर्थ्याने तो अलिप्त राहून सर्वांचे नियंत्रण करतो. (१४००)

ज्याच्या भये सूर्य चंद्र चालती । ज्याच्या भर्ये वायु प्राण वाहती ।
ज्याच्या भर्ये अग्रीसी ज्योति । मृत्यू धांवे ज्याच्या भये ॥ १ ॥
ईश्वर सर्वांचा नियंता असल्यामुळे त्याच्या भीतीनेच सर्व विश्व चालते. सूर्य, चंद्र त्याच्या भीतीनेच त्याच्या आज्ञेत राहतात. त्याच्या भीतीनेच वायू आणि प्राण वाहण्याचे काम करतात. त्याच्याच भीतीने अग्नी प्रकाशतो आणि मृत्यूही त्याच्याच भीतीने धावत असतो. (१४०१)

भूमी धारण द्रवत्व आपी । काळही युगादि क्षण मापी ।
ब्रह्मा विष्णू शिव प्रतापी । जयाच्या भये ॥ २ ॥
त्याच्या भीतीने भूमी सर्वांचे धारण करते. आपतत्त्व द्रवत्व धारण करते, काळ हा युगापासून क्षणापर्यंत सर्व मापे टाकतो; ब्रह्मदेव, विष्णू सदाशिव हे देखील त्याच्या भीतीने (आज्ञेत राहून) आपापले पराक्रम करतात. (१४०२)

ऐसा अंतर्यामी एकला । अंतरी नियामक राहिला ।
सर्व नियंतियां करूं लागला । नियंतृत्व ॥ ३ ॥
अशा प्रकारे एकच ईश्वर अंतर्यामी होऊन सर्वांच्या अंतःकरणात नियामक होऊन वास्तव्य करतो आणि सर्व नियंत्रण करणाऱ्यांचे नियंत्रण करतो. (१४०३)

सर्वांचे ज्या ज्या रीती होणार । त्या त्याचा प्रेरक निर्धार ।
त्यावाचून तुणही साचार । पडिलें न हाले ॥ ४ ॥
सर्वांचे जे जे भवितव्य असेल त्याचा तो प्रेरक असतो. त्याच्यावाचून गवताची काडी देखील पडलेली जागची हलत नाही. (१४०४)

ऐसा नियंता सर्वांमाजी । अलिप्त राहून सहजी ।
प्रेरणा करी होणार जी जी । ब्रह्मादि कीटकास्त ॥ ५ ॥
असा हा नियंता सर्वीपासून अलिप्त असून सर्वांमध्ये राहतो आणि ब्रह्मदेवापासून ते कीटकांपर्यंत सर्वांच्या भवितव्याची प्रेरणा करतो. (१४०५)

स्फूर्ति विद्याविद्या ज्ञानाज्ञान । मन बुद्धि इंद्रियें प्राण ।
हें ब्रह्मादि कीटकान देही समान । असे जयापरी ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे स्फूर्ती, विद्या, अविद्या, ज्ञान, अज्ञान, मन, बुद्धी, इंद्रिये, प्राण ही सर्व तत्त्वे ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्वांच्या देहात सारखीच असतात. (१४०६)

तैसेंचि बुद्धींत प्रतिबिंब जयाचे । तो जीव जीवन करी जडाचे ।
वृत्तींत भासकत्व तया ईशाचें । नाम ईशान शक्तीस्तव ॥ ७ ॥
त्याप्रमाणेच बुद्धीत जो प्रतिबिंब रूपाने असतो तो जीव जड तत्त्वांना (देहांना) जीवन देतो. वृत्तीत जो ईश भासत असतो, त्याला त्याच्या शक्तीमुळे ईशान असे नाव आहे. (१४०७)

ईशान ह्यणिजे प्रेरणा करावी । होणारा ऐशी बुद्धि योजावी ।
त्या रीती जीवे सुखदुःखे भोगावी । पराधीन ॥ ८ ॥
ईशान म्हणजे प्रेरणा करावी, त्या जीवाचे पुढे जे काही होणार असेल त्यासारखी बुद्धी त्याला द्यावी, हे त्याचे काम आहे. त्यानुसार तो जीव पराधीनपणाने मग सुखदु: खे भोगत राहतो. (१४०८)

स्वतंत्रपणे प्रेरणा करी । परी कर्तुत्वाचा अभिमान न धरी ।
ह्मणून अलिप्त निरहंकारी । बंधन न पावे ॥ ९ ॥
ईश्वर स्वतंत्र असून तो फक्त प्रेरणा देतो. पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही. म्हणून तो जगाच्या सर्व व्यवहारापासून अलिप्त असतो, तो निरहंकारी (म्हणजे अहंकाररहित) असतो. त्यामुळे त्याला कोणतेच बंधन प्राप्त होत नाही. (१४०९)

जीवे तरी कांहीं न करितां । मीच होय या कर्माचा कर्ता ।
ब मस्तकी घेऊन अहंता । बंधनीं पडे ॥ १० ॥
पण जीव काहीच करत नाही. पण उगीचच स्वतःला त्या कर्माचा कर्ता मानत असतो. त्यामुळे आपल्या मस्तकावर बळेच अहंता घेऊन तो बंधनात पडतो. (१४१०)

ईश विद्यागुणें सर्वज्ञ जाहला । जीव अविद्यागुणें किंचिज्ज्ञत्व पावला ।
ईश प्रवर्तवीतसे गुणाला । जीव जाहला गुणाधीन ॥ ११ ॥
विद्येमुळे ईश्वर हा सर्वत्र झाला आहे आणि जीव अविद्येमुळे किंचिज्ज्ञ झाला. ईश्वर गुणांना प्रेरणा देतो आणि जीव मात्र त्या गुणांच्या अधीन होतो. (१४११)

ईश आवरणी विक्षेप शक्तीतें । स्वाधीन ठेऊन वर्तवी सर्वांते ।
जीव आवरणविक्षेपें गुंते । द्यांत होऊनी ॥ १२ ॥
ईश्वर आवरण आणि विक्षेप या दोन शक्तींना स्वाधीन ठेवून सर्वांना वागावयास लावतो. जीव मात्र आवरण आणि विक्षेप या शक्तीत भांतपणामुळे गुंतून पडतो. (१४१२)

तिही अवस्थांत समे जीव । तें तें तादात्म्य घेऊन सर्व ।
ईश त्यागून तो तो भाव । अवस्थातीत असे ॥ १३ ॥
जीव त्या त्या अवस्थेशी तादात्म्य पावतो. तो सर्व तिन्ही अवस्थांमध्ये भ्रमण करतो. ईश्वर मात्र त्या त्या अवस्थेचा त्याग करून अवस्थातीत होऊन राहतो. (१४१३)

बुद्धीपासून जीव विषयांत । साभिमान घेऊन विहरत ।
नुसधी वृत्ति जे निर्विकल्प स्फुरत । त्यांत वसे संचाराविण ॥ १४ ॥
जीव बुद्धीपासून विषयांपर्यंत त्या त्या गोष्टीचा अभिमान घेऊन विहार (क्रीडा) करत असतो आणि ईश्वर केवळ निर्विकल्प स्फुरणाऱ्या वृत्तीत संचार न करता वास्तव्य करून राहतो. (१४१४)

ईश प्रेरणा मात्र करावी । जीवे ते ते मस्तकी ध्यावी ।
या उभयाने सृष्टि आघवी । व्यापिली असे ॥ १५ ॥
ईश्वर फक्त प्रेरणा करण्याचे काम करतो. जीव ती मस्तकी धारण करून (तिचा स्वीकार करून) तिचे पालन करतो. या दोघांनीच सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे. (१४१५)

प्रतिबिंबा तरी येकरूपता । परी कर्म भिन्न भिन्न तत्वतां ।
येक भोक्ता येक नियंता । यास्तव भेद जाहला ॥ १६ ॥
दोघेही प्रतिबिंबरूप आहेत. हेच या दोघांमध्ये साम्य आहे. पण दोघांच्या कर्मांमध्ये मात्र खूप फरक आहे. एक भोक्ता आहे तर दुसरा नियंता आहे. यामुळे या दोघात भेद निर्माण झाला. (१४१६)

असो हे दोन्ही सर्वा शरीरी । असती ब्रह्मादि पिपीलिकावरी ।
जीव बद्धता अभिमानें वरी । ईश मुक्तत्वे वसे ॥ १७ ॥
असो, ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सर्व प्रकारच्या शरीरांत हे दोघे वास्तव्य करतात; जीव अभिमानाने बद्ध होऊन राहतो आणि ईश्वर मात्र मुक्तपणे राहतो. (१४१७)

उभयां सर्वी ह्मणतां वस्ती । येथें कोणी कल्पना करिती ।
कीं निरहंकारी ईश स्वयंज्योति । देहावेगळा राहे ॥ १८ ॥
दोघेही सर्व देहात वास्तव्य करतात असे म्हणताच कोणी कल्पना करतील की अहंकार नसलेला, स्वयंप्रकाशी असा ईश्वर देहाच्या बाहेरच राहतो. (१४१८)

तरी देहावेगळी स्कृाएंत असेना । प्रतिबिंब तो वृत्तीवीण पडेना ।
तस्मात् देहावीण जे करणें कल्पना । ते न सभवे सहसा ॥ १९ ॥
यावर उत्तर असे की, देहाशिवाय स्कूर्ती असत नाही, आणि वृत्तीशिवाय प्रतिबिंबही पडत नाही. तेव्हा ईश्वर देहाशिवाय राहू शकतो अशी कल्पना संभवतच नाही. (१४१९)

आणीक शंका कीं वृत्तींत बिंबले । वृत्तीवीण स्थळ रिते पडलें ।
ईश तो सर्वव्यापी शास्त्र बोले । या विरोधा उत्तर देऊं ॥ २० ॥
आणखी एक शंका अशी की, ईश्वर म्हणजे वृत्तीत पडलेले प्रतिबिंब, असे जर असेल तर वृत्ती नसलेली जागा रिकामीच असेल ना ! ईश्वर तर सर्वव्यापी आहे असे शास्त्र सांगते, हे विसंगत वाटते. तेव्हा या विसंगतीच्या संदर्भात उत्तर देतो. (१४२०)

ईशसत्ता सर्वी असे । परी स्वता ईश वृत्तींत वसे ।
जेवी सार्वभौम राजधानी राहत असे । आज्ञा सर्व जगती ॥ २१ ॥
ईश्वराची सत्ता सर्वत्र सगळीकडे आहे, पण स्वत: ईश्वर मात्र वृत्तीतच वास्तव्य करतो. सार्वभौम राजा राजधानीत राहतो पण त्याची आज्ञा सर्व जगभर चालते, असाच हा प्रकार आहे. (१४२१)

मागुती म्हणतील येकत्र असतां । अन्य स्थळी उगीच चाले सत्ता ।
तरी येकचि राजधानी साकारता । विच्छी कां न म्हणावी ॥ २२ ॥
यानंतर काही लोक असे म्हणतील की, एकाच ठिकाणी राहून अन्य ठिकाणी जर सत्ता चालू शकते, असे जर असेल तर साकारता ही एकच राजधानी एकद्या विष्णूचीच असे का म्हणू नये ? (१४२२)

कीटकान्त अन्य देही जीव । राहे परी ईशाचा अभाव ।
विष्णूचे साकारीं ईश स्वयमेव । असे अभाव जीवाचा ॥ २३ ॥
कीटकादींच्या देहात जीव असतो पण तेथे ईश्वराचा अभाव असतो. विष्णूच्या देहात स्वत: ईश्वरच वास्तव्य करून असतो, पण तेथे जीवाचा अभाव असतो. (१४२३)

तरी पहा कीटका माझारी । वृत्तीची स्फूर्ति नसे निर्धारी ।
वृत्ति असतां प्रतिबिंबता खरी । कैशी न ये बिंबा ॥ २४ ॥
तर यावर असे पहा की, कीटकाच्या देहात वृत्तीची स्कूर्ती निश्चितपणे नसते असे आपण मान्य करू. वृत्ती असताना मूळ बिंबाचे प्रतिबिंब तेथे कसे पडणार नाही ? (१४२४)

विष्णूचे अंतरीं काय बुद्धि नसे । ह्मणून जीवाचे प्रतिबिंब न दिसे ।
बुद्धीच नसता व्यापारही कैसे । होतील देहाचे ॥ २५ ॥
पण विष्णूच्या देहात बुद्धी नाही काय ? म्हणून तेथे जीवाचे प्रतिबिंब दिसत नाही, असे कधी होईल काय ? आणि विष्णूच्या देहात बुद्धीच नसेल तर त्याच्या देहाचे व्यापार तरी होणार कसे ? (१४२५)

बुद्धि तेथें जीवाचे प्रतिबिंब । वृत्ति तेथें ईशाचें डिंब ।
जडीं मात्र नसती आदिस्तंब । वृत्ति बुद्धि अभावीं ॥ २६ ॥
जेथे बुद्धी आहे, तेथे जीव प्रतिबिंबरूपाने असणारच, आणि जेथे वृत्ती आहे तेथे ईश्वर प्रतिबिंबरूपाने भासणारच. जड पदार्थांमध्ये मात्र वृत्ती आणि बुद्धी ही दोन तत्त्वे नसत्यामुळे ईश्वर आणि जीव ही सुष्टीची आधारतत्त्वे नसतात. (१४२६)

तस्मात साकार तितुका जडाविंण । उत्तमाधम सप्राण ।
तयामाजी वृत्ति बुद्धि दोन । असती निश्च ॥ २७ ॥
तेव्हा जड पदार्थ सोडल्यास जेवढी म्हणून साकार (सदेह) प्राणयुक्त सृष्टी असेल, मग ती उत्तम असो की अगदी धतुक असो, तिच्यामध्ये वृत्ती आणि बुद्धी या दोन्ही असणारच. (१४२७)

त्या असो साकार शिवादिकांचा । अथवा देह कीटकाचा ।
वृत्ति बुद्धि या उद्धव दोहींचा । तेथें जीवेश असती ॥ २८ ॥
मग तो देह शिव इ. श्रेष्ठ देवतांचा असो, अथवा कीटकाचा असो, तेथे वृत्ती आणि बुद्धी या दोहींची उत्पत्ती होणारच, आणि त्यामुळे तेथे जीवेशांची वसती असणारच. (१४२८)

जैसे सूर्याचे तळवटीं । जळ भरोनि ठेविलें घटीं ।
त्यांत प्रतिबिंब पडेलच उठाउठी । मग सान थोर कीं बहुत ॥ २९ ॥
ज्याप्रमाणे सूर्य वर तळपतो आहे, त्याखाली एका घटात पाणी भरून ठेवले आहे, त्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असणारच. मग तो घट मोठा असो की लहान असो, अथवा घट एक असो की अनेक ! (१४२९)

तैसें ब्रह्मादि कीटकान्स जितुकें । साकार सुबुद्धि वृत्ति तितुके ।
त्यामाजी जीवेश हे निके । आभासरूप भासती ॥ ३० ॥
त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत जेवढे बुद्धियुक्त आणि सवृत्तिक (वृत्तियुक्त) देह असतील, त्यामध्ये जीव आणि ईश्वर ही तत्त्वे आभासरूप अशी भासणारच. (१४३०)

येथेंही म्हणतील कोणी । कीं घटीं येक प्रतिबिंबा उभवणी ।
येथें प्रतिपिंडीं आभासती दोन्ही । कैसे ते अवधारा ॥ ३१ ॥
येथेही कोणी म्हणतील की, एका घटात एक प्रतिबिंब दिसेल, पण येथे प्रत्येक पिंडात ही दोन्ही तत्त्वे कशी भासमान होतील ? त्याचे उत्तर ऐका. (१४३१)

उथळ जळी स्पष्ट दिसते । सखोल जळीचे दिसेना तें ।
आतचे आतचि झळफळितें । सूक्ष्मदृष्टीने दिसे ॥ ३२ ॥
उथळ पाण्यात प्रतिबिंब स्पष्ट दिसते. पण खोल पाण्यात ते दिसत नाही. ते खालच्या खालीच प्रकाशित होत असते. आतल्या आत सूक्ष्म दृष्टीने पाहिले असता ते दिसते. (१४३२)

तैसें बुद्धीचें रूप उथळ । तेथें जीवत्व दिसे टळटळ ।
वृत्तीचे रूप सूक्ष्म केवळ । ह्मणून प्रतिबिंब अस्पष्ट ॥ ३३ ॥
त्याप्रमाणे बुद्धीचे स्वरूप उथळ असेल तेथे जीवत्व स्पष्ट दिसते. वृत्तीचे रूप अगदी सूक्ष्म असत्यामुळे तिच्यातील प्रतिबिंब अस्पष्ट दिसेल. (१४३३)

तेंही सूक्ष्मदृष्टीने दिसे । कार्यावरून अनुमाना येतसे ।
बुद्धि विकल्पाहून जीवाचे जैसे । तैसे प्रेर्य प्रेरक समजावे ॥ ३४ ॥
ते सुद्धा रूम दृष्टीनेच दिसू शकेल. पण कार्यावरून त्याचे अनुमान करता येते. बुद्धीच्या अस्तित्वावरून जीवाचे अनुमान होते, तसे वृत्तीच्या असित्वावरून ईश्वराचे अनुमान करता येते. जीव हा प्रेर्य आहे आणि त्याचा प्रेरक ईश्वर आहे. हा संबंध लक्षात घेता प्रेर्य जीव जेथे आहे तेथे प्रेरक ईश्वर असलाच पाहिजे हे उघड आहे. (१४३४)

प्रेर्य तो हा जीव वावरे । तेव्हां प्रेरिला असे ईश्वरे ।
या जीवत्वाचेनि अनुकारें । ईशही असे ऐसा ॥ ३५ ॥
प्रेर्य असलेला जीव जेथे वावरतो त्याअर्थी त्याला ईश्वरानेच प्रेरणा केली असली पाहिजे. या जीवतत्त्वाच्या मागावरून ईश्वरही असाच आहे हे कळते. (१४३५)

ती वृत्ति अनुभवावी बुद्धीविण । त्यांत ईश होय भासमान ।
बुद्धीच्या योगें वृत्तीचे अभान । मा ईश कळे कैसा ॥ ३६ ॥
वृत्तीचा, बुद्धीची मदत न घेता अनुभव घेतला असता त्यातूनच त्या अनुभव घेणाऱ्याला ईश्वर भासमान होतो. बुद्धीच्या योगाने वृत्तीच जर कळली नाही, तर ईश्वराचे ज्ञान तरी कसे होईल ? (१४३६)

प्रेरक सामर्थ्याहून पहावा । बोलतां शंका वाटेल जीवा ।
कीं विष्णू सामर्थ्यवान- स्वभावा । तेथें ईशत्व प्रत्यया ये ॥ ३७ ॥
ईश्वर त्याच्या प्रेरक सामर्थ्यावरून ओळखावा असे कोणी म्हटल्यास कोणाला शंका वाटेल की, विष्णू हा स्वभावतःच सामर्थ्यवान असत्याने त्याचे ईशत्व प्रत्ययाला येऊ शकते. (१४३७)

तैसें सामर्थ्य कीटकांत नसे । तरी ईशत्व तेथें कैसे असे ।
या आपी बोलिजे अल्पसें । अवधारावें ॥ ३८ ॥
तसे सामर्थ्य कीटकात नाही. त्यामुळे तेथे ईश्वरत्व कसे असेल ? असा आक्षेप कोणी घेतल्यास थोडेसे बोलणे भाग आहे. तर ऐका. (१४३८)

विष्णूचे सामर्थ्य जें दिसते । तें ते जीवाचे जाणावे समस्ते ।
ईशसामर्थ्य न दिसे आहे तें । प्रेरणात्यक ॥ ३९ ॥
आपल्याला विष्णूचे जे सामर्थ्य दिसते, ते ते सर्व जीवाचे सामर्थ्य आहे, हे जाणून ध्यावे. कारण ईश्वराचे सामर्थ्य कधीच दिसून येत नाही ते फक्त प्रेरणात्मक आहे. (१४३९)

सिंहामाजीं हत्ती विदारी । मांजर होऊन उंदीर मारी ।
हे उपाधीस्तव उंच नीच परी । परंतु जीवधर्म ॥ ४० ॥
सिंह हत्तीला मारतो, मांजर उंदराला मारते, हे सर्व त्यांच्या त्यांच्या श्रेष्ठ-कनिष्ठ उपाधीमुळे होय. परंतु ते जीवधर्मच आहेत. (१४४०)

तैसें विष्णूच्या देही सामर्थ्य मोठे । कीटका तृण उचलितां नुठे ।
परी तें जीवाचे कर्म गोमटे । दोहींही ठायीं ॥ ४१ ॥
त्याप्रमाणे विष्णूच्या शरीरात अफाट सामर्थ्य आहे, कीटकाला साधी गवताची काडीही उचलता येत नाही. पण ही दोन्ही कमी- जास्त अशा जीवसामर्थ्याचीच उदाहरणे होत. त्या दोन्ही ठिकाणी ती जीवाचीच कार्ये होत. (१४४१)

ईशासी कर्मीचे असेना । उगीच जीवाची करी प्रेरणा ।
ह्मणून ईश्वर स्थल दृष्टी दिसेना । जीवत्व दिसे ॥ ४२ ॥
ईश्वराला काहीच कर्म करायचे नसते. तो आपला उगाच राहून जीवाला प्रेरणा करण्याचे काम करत असतो. म्हणून स्थूल दृष्टीला ईश्वर दिसत नाही. तिला फक्त जीवत्वच दिसते. (१४४२)

तस्मात् ब्रह्मादि कटिकान्स देही । जीवेश असती निःसंदेही ।
येक दिसे येक न दिसे पाही । स्थष्टास्पष्ट म्हणोनी ॥ ४३ ॥
म्हणून ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्वांच्याच शरीरात जीव आणि ईश्वर ही दोन्ही तत्त्वे असतात. त्यापैकी जीव स्पष्टपणे दिसतो. ईश्वर अस्पष्ट असत्यामुळे दिसत नाही. (१४४३)

ही वचनें मानिती अप्रमाण । तरी या अर्था बहुत प्रमाण ।
गीतेमाजीं भगवान । अर्जुना सांगे ॥ ४४ ॥
हे बोलणे लोकांना खोटे वाटते. प्रत्येक शरीरात ईश्वर असतो हे त्यांना खरे वाटत नाही, पण ते सत्य आहे. त्याला गीतेतच आधार आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. (पहा भ. गी. १८. ६१) (१४४४)

ईश्वर हा यंत्रारूढ होऊन । हदयी सर्वा स्वता राहून ।
सर्व भूतांतें स्वमायेकडून । प्रेरणा करी ॥ ४५ ॥
(ईश्वर: सर्वभूतानां हदेशेडर्जुन तिष्ठति । श्वामयन्सर्वभूतानि यऱ्यारूढानि माया । । भ गी. १८. ६१) ईश्वर सर्वांच्या हृदयात राहतो. तो अंतर्यामी आहे. तो शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व जीवांना आपल्या मायेने त्यांच्या कर्मानुसार फिरवत असतो. त्यांना प्रेरणा करत असतो. (१४४५)

ऐसेंचि वृत्तींत शिव असे यासी । श्रुति प्रमाण निश्चयेसी ।
माया आणि अविद्या ऐशी । आपुल्या आभासी निमी दोघां ॥ ४६ ॥
याप्रमाणेच शिवरूप ईश्वर वृत्तीत वास्तव्य करतो, या वचनाला धुतीचाही आधार आहे. तो आपल्या भासरूप प्रतिबिंबात माया आणि अविद्या या दोन तत्त्वांना उत्पन्न करतो. (१४४६)

माया ह्मणजे विद्याल्पक वृत्ति । अविद्या तेचि नेणीव स्फूर्ति ।
हे दोन्ही येकरूप असती । बुद्धि उद्धवेना तंव ॥ ४७ ॥
माया म्हणजे विद्यात्मक वृत्ती आणि अविद्या म्हणजे नेणीव अथवा अज्ञानरूप स्फूर्ती होय. जोपर्यंत बुद्धीचा उदय होत नाही, तोपर्यंत ही दोन्ही तत्त्वे एकरूपच असतात. (१४४७)

बुद्धि उद्धवतां बुद्धींत । जीवत्व प्रवृत्तीकडे येत ।
ह्मणून स्पष्टत्वे दिसूं लागत । ईश नोव्हे तैसा ॥ ४८ ॥
बुद्धीचा उदय होताच जीवत्व बुद्धीमध्ये येऊन प्रवृत्तीचा मार्ग स्वीकारते. म्हणून ते स्पष्टपणे दिसू शकते. पण ईश्वर तसा नाही. (१४४८)

विद्यास्फूर्तीस ईश्वर । ये बुद्धीली विक्षेप करणार ।
बुद्धींत न ये निमित्तमात्र । असतो म्हणोनि ॥ ४९ ॥
ईश्वर विद्याशक्तीत प्रवेश करतो. तो बुद्धीस विक्षेप करतो. तो केवळ निमित्तमात्र असत्याने बुद्धीत येत नाही. (१४४९)

अविद्याल्पक जीव उपादान । विद्याल्पक ईश निमित्तकारण ।
जैसे कुल्लाळ मृत्तिका दोन । घटकार्या असती ॥ ५० ॥
अविद्यात्मक जीव हा उपादान कारण (निर्मितीत प्रत्यक्ष सहभागी असलेले कारण) असतो, तर विद्यात्मक ईश्वर हा फक्त निमित्तकारण असतो. घटनिर्मितीच्या कार्यात मृत्तिका ही उपादान कारण असून कुंभार हा निमित्त कारण असतो, तसा हा प्रकार आहे. (१४५०)

घटामाजी मृतिका येत । तेवीं उपादान जीव बुद्धींत ।
कुल्लाळ घटाहून भिन्न राहत 7 तेवीं भिन्न राहे ईश ॥ ५१ ॥
ज्याप्रमाणे घटाच्या निर्मितीमध्ये मृत्तिका उपादान म्हणून घटामध्ये असतेच. त्याप्रमाणे जीव हा बुद्धीत असतोच. कुंभार जसा निमित्तकारण असल्यामुळे घटापासून वेगळा असतो, त्याप्रमाणे ईश्वर हा बुद्धीपासून अलिप्त असतो. (१४५१)

विद्या जरी बुद्धींत प्रवेशे । परी ईयात्व न ये जीवसहवासें ।
अथवा विद्यासह ईश प्रतिभासे । तरी तो परिणाम ॥ ५२ ॥
विद्या जरी बुद्धीत प्रवेश करते तरी ईश्वर मात्र जीवाच्या सहवासाने बुद्धीत येत नाही. अथवा विद्येसह ईश्वर बुद्धीत प्रतिबिंब म्हणून भासला तरी तो परिणाम म्हणून भासेल. (१४५२)

प्रेरणाकार्य ईशासी जोवरी । ईशही सरूप सनाम तोवरी ।
तें कार्य नसता नाम ईश्वरी । कोठे उरे ॥ ५३ ॥
ईश्वराला जोपर्यंत प्रेरणा कार्य आहे तोपर्यंत त्याला रूप आणि नाव आहे. ते कार्य नसेल तेव्हा ईश्वराचे नाव कोठे असते ? (१४५३)

बुद्धीमाजीं जरी येता । प्रेरणाकार्या होय त्यागिता ।
तैसाचि सुघुसिकाळ होतां । ईश सकार्य नाम साडी ॥ ५४ ॥
तो बुद्धीत जरी आला तरी त्यावेळी त्याने प्रेरणाकार्याचा त्याग केलेला असतो. त्याचप्रमाणे सुषुप्ती (झोपेच्या) काळात ईश्वर आपल्या कार्यासह आपल्या नावाचाही त्याग करतो. (१४५४)

जीव जैसा अज्ञानगर्भी उरे । तैसेंचि आनंदकोशीं ईबात्व स्थिरे ।
विज्ञानात्या जीवा नाम बा रे । प्रज्ञानाला ईश ॥ ५५ ॥
सुपुसीच्या काळात जीव अज्ञानगर्भात उरतो. त्याप्रमाणे ईशत्व आनंदकोशात स्थिर होते. जीवाला विज्ञानात्मा असे नाव प्राप्त होते आणि ईश्वराला प्रज्ञानात्मा असे नाव प्राप्त होते. (१४५५)

हे दोन्ही कारणात्मा शुद्ध । त्यांतचि मिळून राहती अभेद ।
जेव्हां प्रवृत्तीचा उभारा विशद । तेव्हां दोघे उद्धवती ॥ ५६ ॥
या अवस्थेत ही दोन्ही तत्त्वे शुद्ध कारणात्मा याच स्वरूपात असतात. ते त्याच आनंदमय कोशात अभेदत्वाने मिळून राहतात. पण प्रवृत्तीचा उद्धव जेव्हा होतो त्यावेळी ते दोघे स्पष्टपणे उद्भवतात. (१४५६)

जीवाच्या प्रात्यधदशेचा उभारा । तेव्हां बुद्धियोगे ये जागरा ।
तयाचा प्रेरक ईश हा खरा । तितुक्या विक्षेपकाळीं ॥ ५७ ॥
जीवाच्या प्रागधदशेचा जेव्हा उभारा होतो तेव्हा जीव बुद्धीच्या योगाने जागृतीस येतो. त्याच्या त्या तेवड्या विक्षेप काळात ईश्वर त्याचा प्रेरक होतो. (१४५७)

पुन्हा बुद्धीचे तरंग नाना । होत असती जे क्षणक्षणां ।
तेही ईश्वराची प्रेरणा । परी ते विकार जीवाचे ॥ ५८ ॥
या काळात बुद्धीचे क्षणाक्षणाला जे तरंग उठतात ते ईश्वराच्या प्रेरणेने उठतात, पण तरीसुद्धा ते खरे जीवाचेच विकार असतात. (१४५८)

तूं ह्मणसी तो अंतर्यामी । ओळखीस न ये अनुक्रमीं ।
तरी तो अतिसूक्ष्म सुखधामी । जहाच पाहतां न कळे ॥ ५९ ॥
रविदत्ता, यावर तू म्हणशील की, हा अंतर्यामी असणारा ईश्वर ओळखता येत नाही. तर तो अति सूक्ष्म अशा सुखरूप कोशात असतो. वरवर पाहिल्याने तो कळून येत नाही. (१४५९)

पटामाजीं तंतू ओळखितां । प्रतीतीस येत असे तत्त्वतां ।
परी तक्ते अंतरीं अंशू असतां । स्थूळदृष्टी दिसेना ॥ ६० ॥
पटामधील तंतू पाहू जाता त्याचा अनुभव येतो. परंतु त्या तंतूंच्या अंतर्भागात जे रूम धागे असतात ते धागे स्थूल दृष्टीने पाहिल्यास कळून येत नाहीत. (१४६०)

तैसा बुद्धीचा आभास कळो येतो । परी विद्याप्रतिबिंबी कळेना तो ।
तोही सूक्ष्म अनुभवा कळतो । अंशु सूक्ष्मदृष्टी जेवीं ॥ ६१ ॥
त्याप्रमाणे बुद्धीत भासणारे जीवरूप प्रतिबिंब कळून येते. पण विद्येत पडणारे ईश्वररूप प्रतिबिंब सहजासहजी कळून येत नाही. पण सूक्ष्मदृष्टीने जसे तंतूचे सूदमकण कळून येतात, तसा ईश्वरही सूक्ष्म दृष्टीने कळतो. (१४६१)

पहा पहा बुद्धीविण जीव । जो नुसधा अविद्याल्पक भाव ।
तयाचाही नव्हे अनुभव । बहिर्मुखत्वे ॥ ६२ ॥
असे पहा की, बुद्धीविरहित जीव म्हणजे नुसता अविद्यात्मक भाव आहे. पण बहिर्मुख दृष्टीने पहाणाऱ्यास तोही दिसून येत नाही. (१४६२)

बुद्धिअभावीं जीव दिसेना । मा ईश कैसा ये अनुमाना ।
न कळे म्हणून न करावी कल्पना । जीवेश अभावाची ॥ ६३ ॥
बुद्धीचा अभाव असताना साधा जीवदेखील दिसत नाही, मग ईश्वर कसा कळेल ? परंतु ही दोन्ही तत्त्वे कळत नाहीत म्हणून जीव आणि ईश यांचा अभावच आहे, असे मानू नये. (१४६३)

बुद्धि उद्धवे आणि नासे । परी विद्याअविद्याल्पक वृत्ति न नासे ।
त्या दोहींमाजीं असतचि असे । जीवत्व ईबात्व ॥ ६४ ॥
बुद्धी उद्भवते आणि नाशही पावते. पण विद्या अविद्यात्मक वृत्ती मात्र कधीही नष्ट होत नाही. त्या दोहींमध्ये जीवत्व आणि ईशत्व ही दोन्ही तत्त्वे असतातच. (१४६४)

तस्मात् जयासी पहावे वाटे । तेणें अंतर्मुख व्हावें नेटें ।
विशेष बुद्धीचा तरंग नुठे । तेव्हां वृत्ति अनुभवावी ॥ ६५ ॥
म्हणून ज्याला या दोघांचे दर्शन ध्यावे असे वाटत असेल त्याने प्रयत्नपूर्वक अंतर्मुख व्हावे. ज्यावेळी विशेष बुद्धीचा तरंग उठणार नाही त्यावेळी वृत्तीचा अनुभव घ्यावा. (१४६५)

या वृत्तींत कळणे न कळणे । दोन्हीही असती समानें ।
तेचि विद्याअविद्येची लक्षणें । आवरण विशेषरूपे ॥ ६६ ॥
या वृत्तीत कळणे (ज्ञान) आणि न कळणे (अज्ञान) ही दोन्ही समान प्रमाणात असतात. तीच विद्या आणि अविद्या यांची लक्षणे होत. अज्ञान म्हणजे आवरण असून विक्षेप म्हणजे विपरीत ज्ञान या रूपात ती आढळतात. (१४६६)

जया अधिष्ठानीं वृत्ति । उद्भवली तया होय नेणती ।
जाणूं लागे चंचल स्कूर्ति । सहित कार्य जें जें ॥ ६७ ॥
वृत्ती ज्या अधिष्ठानावर उत्पन्न झाली त्या अधिष्ठानाला ती जाणत नाही. आणि चंचल स्कूर्तीसह जे जे कार्य निष्पन्न होते त्यास ती जाणू लागते. (१४६७)

स्कूर्तिसी जाणे तेचि विद्या । येर न जाणे ते अविद्या ।
ह्या दोन्हीं समजाव्या आद्या । सूक्ष्मदृष्टी ॥ ६८ ॥
स्कूर्तीस जी जाणते ती विद्या होय. जी स्कूर्तीस जाणत नाही, ती अविद्या होय. या दोन्ही रूम दृष्टीने पाहिल्या असता त्या फार पुरातन म्हणजे आद्य तत्त्वे आहेत, असे कळते (१४६८)

त्यांत चिडूप ज्ञानाऐसें । ज्ञान स्कृरे जें मिथ्या आभासें ।
तेचि जीवेश जाणावे अभ्यासें । तेव्हां कळती ॥ ६९ ॥
त्यामध्ये चिद्र्रप ज्ञानासारखेच परंतु मिथ्यात्वाने भासणारे जे ज्ञान स्फुरते तेच अनुक्रमे ईश्वर आणि जीव आहेत, असे अभ्यासाच्या साहाय्याने कळते. (१४६९)

परी त्यांतही मुख्य बिंबाल्या । सामान्यत्वे ज्ञानघन आत्मा ।
तोचि जाणावा कारणात्मा । त्याहून भिन्न हे दोन्ही ॥ ७० ॥
पण त्या दोन्ही प्रतिबिंबांचे जे मूळ बिंबरूप आहे ते म्हणजेच सामान्यत्वाने ज्ञानघन असा आत्मा होय. तोच या दोहोंचा कारणरूप आत्मा असे जाणावे. जीव आणि ईश्वर त्या कारणात्म्याहून भिन्न आहेत. (१४७०)

तो ब्रह्मप्रत्यगात्मा ज्ञानघन । ब्रह्मादि तृणास्त अविच्छिन्न ।
जो स्वप्रकाश भासवी संपूर्ण । आणि लयही जाणे ॥ ७१ ॥
तो कारणरूप आत्मा म्हणजेच ज्ञानघन (संपूर्ण ज्ञानाने व्यापलेला, ज्ञानमयच असा) ब्रह्म असून तोच प्रत्यगात्मा आहे. तो ब्रह्मदेवापासून ते गवताच्या काडीमध्ये सर्वत्र अविच्छिन्नपणे (सलगपणे) व्यापलेला असून स्वतःच्या प्रकाशाने सर्वांना प्रकाशित करतो. तो सर्वांचा लयही जाणतो. (१४७१)

जो या कोकी निरोपिला । रूपादिसह बुद्धिव्यापाराला ।
बुद्धि आणि निर्विकल्प वृत्तीला । सहज प्रकाशी ॥ ७२ ॥
या सातव्या श्लोकात त्याचेच वर्णन केले आहे. रूपादी विषय, बुद्धीचे व्यापार, बुद्धी आणि निर्विकल्प वृत्ती या सर्वांना तो सहज प्रकाशतो. (१४७२)

अविद्याविद्या जीवशिव । निर्माण तितुके प्रकाशी सर्व ।
याहून प्रतिबिंबित जो स्वभाव । जीवेशांचा भिन्न ॥ ७३ ॥
अविद्या, विद्या, जीव, शिव इ. जे काही निर्माण झालेले असते त्या सर्वांना तो प्रत्यगात्मा प्रकाशतो. प्रतिबिंबाच्या स्वरूपात असणाऱ्या जीव आणि ईश्वर यांचा स्वभाव या प्रत्यगात्म्यापेक्षा वेगळा आहे ? (१४७३)

जैसा सूर्य भिंती जगणे घरे । घट जळ प्रतिबिंबादि सारे ।
एकदांचि प्रकाशी साचोकारें । तैसा आत्या प्रकाशी ॥ ७४ ॥
ज्याप्रमाणे सूर्य भिंती अंगणे ? घरे, घट, त्यातील पाणी, त्यातील प्रतिबिब इतक्या सर्वाना एकदमच प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आत्मादेखील सर्वांना प्रकाशित करतो. (१४७४)

घटजळीं जो बिंबला । तो सूर्याहून वेगळा जाहला ।
तैसा आभासरूपे वृत्तींत उमटला । तो स्वरूपाहून भिन्न ॥ ७५ ॥
घटाच्या पाण्यात जो प्रतिबिब रूपाने उमटला तो साहजिकच सूर्यापेक्षा वेगळा असतो. त्याप्रमाणे आभासरूपाने जो वृत्तीत उमटतो तो स्वरूपापेक्षा (आत्म्यापेक्षा) भिन्न असतो. (१४७५)

वृत्तीचा उगाच चंचळपणा । त्यांत जाणिवेची बिंबित लक्षणा ।
येक चिडूपाचा व्यापकपणा । एव दोन्हीही सत्यमिथ्या ॥ ७६ ॥
वृत्तीचा अकारण चंचळपणा, त्यात चिद्र्रपाचे प्रतिबिंब पडले. आता मूळ चिद्र्रपाचा व्यापकपणा हा सत्य असून वृत्तीतील त्याचे प्रतिबिंब हे मिथ्या आहे. (१४७६)

सत्य तो व्यापक बिंबाल्पा । मिथ्या तो प्रतिबिंब अनाल्या ।
हे दोन्ही जो निवडी महात्मा । विचारदृष्टीने ॥ ७७ ॥
जो सत्य आहे तो व्यापक असा बिंबात्मा म्हणजेच चिद्र्रप होय. मिथ्या आहे तो म्हणजे प्रतिबिंबरूप अनात्मा म्हणजेच ईश्वर होय. या दोन्हींचा विवेकाने जो निवाडा करतो (या दोहोंमधील भेद जाणतो तो महात्मा होय.) (१४७७)

मिथ्या मिय्याचा करी त्याग । सत्य तें सत्य होय अंगे ।
परी दोन्हीही समजावे अव्यंग । सत्य आणि आभास ॥ ७८ ॥
जे मिथ्या आहे त्याचा मिथ्या म्हणून तो त्याग करतो जे सत्य आहे ते सत्यच तो स्वत: होऊन जातो. याप्रमाणे व्यंगरहित सत्य आणि आभास हे दोन्हीही समजून घ्यावेत. (१४७८)

सूर्यवृष्टांतीं जळी व्यापकता । नसे म्हणून न ये साभ्यता ।
परी सत्यमिथ्या चिदाभासता । निवडून गेली ॥ ७९ ॥
सूर्याच्या दृष्टान्तामध्ये तो सूर्य घटातील पाणी पूर्णपणे व्यापून टाकत नाही हा दोष आहे. त्यामुळे चिद्र्रप आणि आभास यांच्या स्वरूपाशी त्याचे साम्य होत नाही. पण सत्य आणि मिथ्या, चिदूप आणि आभास यांच्यातील भेद तरी स्पष्ट झाला. (१४७९)

आतां वृत्तींतचि येक प्रतिबिंब । दुसरें व्यापक चिद्रप स्वयंभ ।
हें स्पष्ट कळावे सुलभ । ऐसा दृष्टात देऊं ॥ ८० ॥
आता वृत्तीतच एक प्रतिबिंब आणि दुसरे व्यापक आणि स्वयंभू असे चिद्र्रप कसे राहतात हे सुलभपणे कळेल असा दुसरा दृष्टान्त देऊ. (१४८०)

घटीं जल घालितां भासत । आकाशापरी आभास दिसत ।
दुसरें शुद्ध गगन सर्व घटात । न दिसता व्यापून असे ॥ ८१ ॥
घटामध्ये पाणी घातले म्हणजे त्यात आकाशासारखाच प्रतिबिंबरूपाने त्याचा आभास दिसतो. त्याचबरोबर शुद्ध असे आकाश (पोकळीच्या रूपाने) सर्व घटाला व्यापून असलेले पण डोळ्याला न दिसणारे असे तिथे असतेच. (१४८१)

व्यापले तें जला आदि अती । आहे तैसें असे निश्चिती ।
तैसा स्मृतींत व्यापक जो चिन्सर्ति । वृत्ति अभावीं सत्य ॥ ८२ ॥
जे व्यापणारे आकाश आहे ते पाणी घालण्याच्या अगोदर आणि पाणी घातल्यानंतरही घटात जसे आहे तसे असतेच. तसे मूल स्फुरणामध्ये चिद्र्रप, व्यापकत्वामुळे वृत्तीचा उदय होण्यापूर्वी असतेच आणि तेच सत्य असते. आणि पाण्यातील आकाशाचा आभास पाणी असेल तोवरच जसा असतो आणि पाणी नसेल तेव्हा तो नष्ट होतो, त्याप्रमाणे स्मृतीस वृत्तीच्या उदयापूर्वी व्यापून टाकणारे चिद्र्रप हे सत्य असते. (१४८२)

जलाभास जल तोवरी दिसे । जल नसता भासकता नासे ।
तेर्वी वृत्तींत प्रतिबिंबरूप भासे । तें नासे वृत्तीसर्वे ॥ ८३ ॥
पण जलातील आकाशाचा आभास जल असेल तोपर्यंत दिसतो आणि जल नसताना त्याचे भासकत्व नष्ट होते. त्याप्रमाणे वृत्तीत प्रतिबिंबरूपाने भासणारे तत्त्व वृत्ती नष्ट होताच नष्ट होते. (१४८३)

जें वृत्तिबुद्धीत प्रतिबिंबलें । चिमूपा ऐसें उगेंच भासले ।
तया मिथ्यासी नाम ठेविलें । जीवेश दोन ॥ ८४ ॥
जे वृत्ती आणि बुद्धी यांमध्ये प्रतिबिंबरूपाने भासते ते चिद्र्रपासारखे असते. पण ते मिथ्या प्रतिबिंब असते. त्या वृत्तिबुद्धींमधील प्रतिबिंबांना अनुक्रमे ईश्वर आणि जीव असे म्हणतात. (१४८४)

येक विकल्प दोष गुणाचा । करितो जीव बुद्धिगत साचा ।
हुजा प्रेरक जीवाचे कर्माचा । नुसधे वृत्तीचा आभास ॥ ८५ ॥
त्यातील बुद्धीमध्ये प्रतिबिंबरूपाने असणारा जीव गुणदोषांचा विचार करत असतो तर वृत्तीतील आभासरूपाने असणारा ईश्वर केवळ जीवाच्या कर्मांना प्रेरणा देण्याचे काम करतो. (१४८५)

असो जीवे केलें तें जीवनिर्मित । ईश केलें तें ईश्वरद्वैत ।
इतुकेंही कार्यरूप जगता आणि जीवेश कारण ॥ ८६ ॥
असो, जीवाने जे केले ते जीवनिर्मित असून ईश्वराने जे केले ते ईश्वरद्वैत अथवा ईश्वरनिर्मित. ही दोन्ही मिळून कार्यरूप जगत बनते आणि कार्यरूप जगताचे कारण म्हणजे अनुक्रमे जीव आणि ईश्वर हे होत. (१४८६)

इतुकियाही दृश्यभासाहन । स्वप्रकाश ब्रह्म आल्या ज्ञानघन ।
वेगळा असे सर्वांत असून । निर्विकारें असंग ॥ ८७ ॥
या सर्व दृश्यभासापेक्षा स्वप्रकाश ब्रह्म, अथवा ज्ञानघन आत्मा हा सर्वांत व्यापलेला असूनही निर्विकारत्वाने असंग आहे. (१४८७)

जैसे घटजळीं असोन गगन । सर्वा वेगळे व्यापकपणे ।
जळाचे विकार अनान । न स्पर्शती तया ॥ ८८ ॥
ज्याप्रमाणे आकाश घटातील जलामध्ये असूनसुद्धा इतर सर्व पदार्थापेक्षा व्यापकपणाने सर्वांपेक्षा वेगळे आहे. पाण्याचे वेगवेगळे विकार त्याला स्पर्श करत नाहीत. (१४८८)

तैसेंचि सर्व जग जीवेशांसहित । चंचळ जड दृश्य भास समस्त ।
इतुकियांमाजींही चित्यभा व्यास । परी वेगळी सर्वाली ॥ ८९ ॥
त्याप्रमाणे जीव ईश यांच्या सहित सर्व जग; चंचल, जड, दृश्य आणि भासमान आहे. या सर्वाना चित्यभा व्यापून असते आणि तरीसुद्धा ती त्यांच्यापासून वेगळी असते. (१४८९)

तेचि आतां पुढील कोकी । विवेचना कीजे निकी ।
येथें सावधान असावें सार्थकी । या निरूपणीं ॥ ९० ॥
तेच आता पुढील श्लोकात स्पष्ट सांगावयाचे आहे. त्या विवेचनाकडे साधकांनी नीट लक्ष द्यावे. (१४९०)

सर्व मागील आलोहून आलें । निरूपण जितुकें होऊन गेलें ।
सर्व पदार्थमात्र निवडले । तितुकाही अनुवाद येथें ॥ ९१ ॥
मागे जे निरूपण होऊन गेले आहे, त्या सर्वांचा नीट अभ्यास केल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की, सर्व पदार्थ वेगवेगळे पाहून झाले आहेत. त्या सर्वांची आता येथे उजळणी करायची आहे. (१४९१)

तस्मात अतितर सावधान । सांग घडत असे विवेचन ।
अनात्यजात निरसून । आल्पत्वे आत्या भेटे ॥ ९२ ॥
म्हणून अतिशय सावधान असावे. आता सर्व विवेचन यथासांग होणार आहे. त्यामध्ये सर्व आत्महीन गोष्टींचे निरसन होणार असून आत्म्याची मूक स्वरूपात येथे भेट होणार आहे. (१४९२)

GO TOP